07 March 2012







क the  first consonant in the DM alphabet. दक्षिणि मराठीच पहिलच व्यंजन॑.

कचकच n  henpeck. किचकिच. सळिवाच स्वभाव. किरकिरी. uis बाईलीच कचकच सोसाल होईनात॑ करतां तेनी दिवसोडी ऑफीसाला पाष्टे साडे आठला हेऊन रात्री साडे आठ पर्यंतीन बसतील॑ म्हणून मात्र नहो, घर फार जवळ असून पणीं दुपारच॑ जेवण॑ पणीं बांधींगूनीं येतील॑. 

कचडा n  rubbish. कुप्पा (tamil). केर ; कचरा in sm.  uis  बांगळूरांत॑ अम्च घरापठीस कोरपरेषनाच झाडुवाले घरो-घरी दिवसास्क॑ येवून कचडा काढणे आहे.

कचवाळा n  a small vessel to keep sandal paste, mantrakshatha etc. कचवाळे. कचोळा. कचोळे. गंधीं मंत्राक्षताहीं ठिवाच एक ल्हान वाटी. पंचवाळा ; कचोळे in sm. uis अता होत असाच अधिक महिनेच दान द्याकरतां उत्तरादि मठाच बाजू असाच देवसामग्री विकाच दुकानाला जाऊन तेहतीस कचवाळा घेईंगून आलों. 

कचाकच adj  closely packed. जवळ-जवळ असणे. uis इंडियाहीं पाकिस्थानहीं क्रिकट खेळताना खेळ पाह्याला येणार मैदानांत कचाकच भरून असतील॑. 

कचेरी  n  court. कोर्ट (English). न्यायालय. न्यायकचेरी. uis कचेरीच न्यायाधीशांला त्यंचेच म्हणून असाच  प्रत्येक खोलीला "चेंबर" म्हणून सांगतात.

कचेरी n  office. ऑफ़ीस. uis अताच॑ सरकार सेक्रटेरियटाला जुने काळांत हुज़ूर कचेरी म्हणून सांगत होते.

कचेरि n  a musical concert. a musical programme. संगीताच कार्यक्रम॑. uis चेन्नैंत॑ चाललते एम. एस. सुब्बलक्ष्मीच कचेरि एक पणीं मी चुकलते नाही.

कचोळा n  a small vessel to keep sandal paste, mantrakshatha etc. कचवाळा. गंधीं मंत्राक्षताईं ठिवाच एक ल्हान वाटी. पंचवाळा ; कचोळे in sm. uis श्री राघवेन्द्रस्वामी मठांत॑ तीर्थ-प्रसाद आरंभ होयाच पुढे अग्गि दादिग्यांसीन हस्तोदक विचाराच बरोरेच कचोळांत अंगारा-अक्षता लावींगाला देणे आहे. 

कच्चा adj  raw. unripe. पिकल नाहीते. हिरव॑. कोवळ॑. uis  कच्चा चिंच खालतर॑ दांताला तंटा होईल.

कच्चा adj  imperfect. crude. पक्का नाहीते. uis कराच काम कच्चा असलतरीन ते कामाला विचाराच पैसा मात्र तो उणे करना.

कच्छ  n  dhoti worn by tucking in the pleats at the back and front of the wait. कासोटा. काचा. uis कित्ति प्रयत्न केलतरीन मला कच्छ बांधणे म्हणजे थोड कष्टच.

कटदोरा n  a twisted cord or  twisted silver chain worn around the waist below the navel. कडदोरा. बोंबीच खाले, कटींत/कमरांत॑/मादांत॑/माजांत॑ बांधाच रुपेच दोरा. uis ल्हान लेंकरांला कटदोरा बांधताना कटीला घाव लागनास्क॑ पाह्यींगाम॑. Note:- (1) कटि+दोरा. (2) कडि+दोरा. (3) कड+दोरा. (4) कटि/कडि/कड/कट/कडे means "hip" or "flank". (5) This is usually worn by infants.

कटारी n  dagger. एक ल्हान आयुध. खड्ग ; कटार in sm. uis तो हत्यारोपांतून चुकींगाला मुख्य कारण काय होत॑ म्हणजे, न्यायालयांत तज विरुद्ध तर्क होत असताना साक्षीप्रमाण म्हणून वादीच वकील दाखिवलते कटारी वध कराला प्रयोग केलत॑ नहो म्हणून आरोपीच वकीलाला स्थापना कराला झाल॑, हेच॑. 

कटाक्ष n  side-wise glance. डोळेच कोनेंतूं पाह्णे. uis कोडी केलत॑ लेंकरूला शिवा देत असताना ते लेंकरू तज बापाच खर॑ भावना कळींगाला कटाक्ष दृष्टींतून कळींगून हांसाला आरंभ केला. 

कटी n  flank of the hips. मादाच/माजाच बाजूच भाग. कडी. कडे. कड. कमर. uis दुकानबीदींत॑ चालून जात असताना ते म्हातारेला गाय डिवून कटीला घाव झाल॑. 

कटी घेणे vt  to carry (a child) on the side of the hips. लेंकरांला मादाच एकबाजूकडे उच्चलून घेणे. कडे घेणे. कडि घेणे. Note:- कटी means side or flank of hips. uis कटी घेऊन कटी घेऊन ते लेंकराला दंडक झालाहे म्हणून अता किती जवळ जाम॑ म्हणून असलतरीन अपाप चालना म्हणतो.

कट्ट॑ n  decanted thin portion of dhal cooked in water. वरणाच नित्तल भाग ; कट in sm.  uis पोटाच तंटा असलतर॑ कट्टाच भातीन ताक भातीन मात्र खाणेच चोखोट॑.

कट्ट॑ n  a tied bunch (of any thing). बांधलते काहीं एक सधन॑. uis (1) तीन कट्ट॑ मोळकीरेला दुकानवाला पांच रुपे विचारला. (2) मी भाजीपाला घ्याला निघाच वेळ दोन कट्ट॑ कोत्तमल्लि पणीं आणाला मझ॑ बाईल मला सय केली. Note :- from Tamil. 

कट्टा n  sliced wood, ready to work on.  wood other than what is used as fuel. कापलते/काटलते लांकड॑. uis  (1) जुन॑ काळच एक मेज अम्च घरांत॑ आहे. तज वर्च भाग पूरा खजून गेल-ते-करतां ते रिपेरी कराला 4’ x 2 ½’  मापाच एक कट्टा सुताराला सांगून आणिवलों. (2) एक दहा पंध्रा वर्षाच पुढे पतोरी 'टीक' कट्टांतून कवाड, खिडकी, 'फर्नीचर' वगैरा करणे साधारण होत॑. पण, टीकाच माघ/मोल उदंड॑ जास्ति झालामुळे अत्ताअग्गीन प्लैवुडाच उपयोग सर्वसाधारण झालाहे.

कठिन adj  difficult. कष्ट. प्रयास ; कठीण in sm. uis  हे वर्षाच एस.एस.एल.सी. परीक्षांत॑ इषोबाच परीक्षा थोड कठिन होत॑.

कठोर adj  hard hearted. उदंड॑ कठिन मनाच॑. uis रावणासुर पंडित होता तरीन कठोर अणी मूर्ख होता.

कठोर adj  cruel. उदंड॑ दुष्ट मनाच॑. uis मुस्लीम तीव्रवादि लोकांच मन्न॑ फार कठोर असत॑. थोडकपणीं दया-दाक्षण्य दाखिवनास्क॑ दुसरेंस मरिवणे त्यांस एक सर्वसाधारण विषयास्क॑ झालाहे.

कड n  flank of the hips. मादाच/माजाच बाजूच भाग. कडी. कडे. कटी. कमराच एक पटीसच॑ भाग. uis घरदार नियंत्रणांत ठींगाच सासूलोक॑ किलसाताच गुच्छ केम्हाहीं कडेंत खोवींगून असतील॑.

कडक adj  strong textured. घट्टि. uis कॉफीच कडक डिकोक्शन पह्जे म्हणजे थोडक॑ चिकोरी मिळिवून केलतर॑ होईल॑.

कडक adj brittle. शिवलतर मोडास्क॑ असाच॑. uis कडक असाच पापड मौ होयनास्क॑ असाम॑ म्हणजे तळतांतरून ते एक डब्बांत॑ घालाम॑.

कडदोरा n  a twisted cord or  twisted silver chain worn around the waist below the navel. बोंबीच खाले कडींत/कमरांत॑/मादांत॑/माजांत॑ बांधाच रुपेच दोरा. कटदोरा. uis ल्हान लेंकरांला कडदोरा बांधताना कटीला घाव लागनास्क॑ पाह्यींगाम॑. Note:- (1) कड+दोरा. (2) कटी+दोरा. (3) कडी+दोरा. (4) कटी/कडी/कड/कट/कडे means "hip" or "flank". (5) This is usually worn by infants.

कडा n  cliff. precipice. कडा. uis ब्रज़ील देशाच राजधानी ब्यूनस-एयर्सांत॑ "जीसस थ सेवियर" म्हणून येशू-क्रिस्तूच एक थोर शिलाविग्रह पट्णाच बाजू असाच कडाच व॑र स्थापना करलाहेत॑.   

कडी n  flank of the hips. मादाच/माजाच बाजूच भाग. कटी. कडे. कड. कमराच एक पटीसच॑ भाग. uis घरदार नियंत्रणांत ठींगाच सासूलोक॑ किलसाताच गुच्छ केम्हाहीं कडींत खोवींगून असतील॑.

कडी घेणे vt  to carry (a child) on the side of the hips. लेंकरांला मादाच॑ एकबाजूकडे उच्चलून घेणे. कडे घेणे. कटी घेणे. Note:- कडी or कटी means side or flank of hips. uis कडी घेऊन कडी घेऊन दंडक झालत॑ ते लेंकरू अता कोठ गेलतरीन कडी घे म्हणून हट्ट करत आहे.

कडी n  latch. कवाड, नाहीतर॑, खिडकी उघडनास्क॑ असाला घालाच कोंडी. uis वार॑ बडिवताना कवाड अपाप उघडनास्क॑ असाम॑ म्हणजे तला कडी ठिवणे चोखोट.

कडी n  a chain. सांखळी. uis काले पाष्टे अमच॑ कुत्र कडी तुटींगून बाह्येर बीदींत पळून गेलत॑, अत्ता पर्यंतीन पर्तून आलेच नाही.

कडी n  a link in a chain. सांखळीच एक भाग. uis मस्त धरल॑त॑ हत्ती, तला बांधून घाट्लत॑ सांगळीच एक कडी तुटींगून गांव पूरा पळत होत॑.

कडी n  squirrel. खडी ; खार in sm. uis सेतू बंधनाच वेळी सहाय केल॑ म्हणून श्रीरामा कडीला थापडून देलत्यामळे तज पाठींत॑ तीन रेखा आल॑ म्हणून रामायणांत एक उप-कथा आहे.

कडुग॑ n  mustard. मोहरी. संपाकाला उपयोग कराच एक बीं. uis नुस्त जीराच फोड्णीपक्षा तजबरोर कडुगीं घाटलतर॑ रूच अण्खीन थोड बर॑ असेल॑. Note :- from Tamil.

कडुलिंब n  neem tree. निंबाच झाड. uis वाळिवलते कडुलिंबाच फूल तळून भाताच बरोर मिळिवून खायाला रूच असेल॑. 

कडू adj  bitter. एक मातिरिच/विधाच रूच. uis कारलीच गोज्जांत॑ कडू अणी गुळचीट मिळून असाच रूच कित्येकदनास॑ अवडना.

कडे n  bracelet. रुंद कांकण॑. uis नव॑ काळाच पोरी अग्गीन कांकण घालाला संकोच भोगतात॑. तज बद्दिल रुंदाच कडे घालाला थोड तय्यार अहेत॑.

कडे prep  in the direction of. towards. एक बाजूला. एक दिशाला. uis मझ घराच समोरच बीदींतल॑ भयंकर ट्राफ़िकांमुळे र्रोडाच एक बाजूकडून दुसर॑ बाजूकडे चालून जाणेम्हण्जे एक ब्रह्मप्रयत्न झालाहे.

कडे prep  (along) with. बरोर. uis तिजकडे विचारून काय प्रयोजनीं नाही. तिन॑ एक अप्पावी, काहीं कळना.

कडे n  flank of the hips. कटी. कड. कडी. कमर. मादाच/माजाच बाजूच भाग. uis पाऊसाच दिवसी अडवाटेंत्सून स्कूटर पळिवत असताना म्हैशीच शिंग कडेला लागून घाव झाल॑ मला.

कडे घेणे vt  to carry (a child) on the side of the hips. लेंकरांला मादाच॑ एकबाजूकडे उच्चलून घेणे. कडी घेणे. कटी घेणे. Note:- कडे means side or flank of hips. uis कडे घेऊन कडे घेऊन मझ॑ आंग दुखाला आरंभ झाल॑ म्हणून लेंकराला बाईलीच हाती देऊनटाकलों.

कढणे vi  to boil. तावून ऊत होणे. uis चूलावरच दूध कढणे झाल-की-नाही समेच(सवेच) उतरिवनातर॑ उतून बाहेर येईल॑.

कढत adj  boiling hot. वाफ यापर्यंतीन तावलते. uis लेंकरांला आंघोळी करिवापुढे पाणी कढत आहेका नाहीका म्हणून पाह्णे चोखोट.

कढाई n  frying pan. तळाला उपयोग कराच भांडि ; कढई in sm. uis तेलकट, म्हणजे, तेलाच चिकटपणामुळे घांसून विसलाला तंटा होईल म्हणून हे काळांत॑ लोखंडाच कढाईच बद्दिल लोक॑ "नोण-स्टिक" कढाई वापरतात॑.

कढिवणे vt  to boil. ऊत होयापर्यंतीं तावणे ; कढविणे/कढवणे in sm. uis दूध कढिवताना उतून बाहेर येनास्क॑ असालाम्हणून एक प्रत्येक भांडी मिळते.

कढी n  a dish made of buttermilk. ताकांत॑ केलते एक कालवण॑. uis अंबट ताक उरून असलतर॑ तजांतून मझ॑ बाईल कढी करूनटाकल॑.

कढीपत्ता n  curry leaves. करेपाक. संपाकाच पदार्थाला वास द्याच एक पान. uis अम्च घराच समोरल॑ तीन कढीपत्ताच झाडीन मझ॑ आजी वर्षा-वर्षी कुत्तकेला देवूनटाकून, नंतर॑ संपाकाला कढीपत्ता पह्जे म्हणताना कोणालीन कळनास्क॑ तेच झाडांतून थोड-थोड तोडून काढतील॑.

कढी विटना, सोयरीक सुटना say  a saying meaning, "you can not get rid of your relatives. You have to live with them !" "सोयरीकांकडून सुटणे कद्दीन होयनाते विषय" अस॑ सांगाच एक म्हण. Note :- the literal meaning being, कढी will never get spoiled and you can never change your relatives. 

कणे n  small broken particles or granules of outside materials (found in grains). धान्यांच बरोर मिळून असाच दुसर॑ वस्तूच ल्हान-ल्हान मोडक॑ चूर ; कणी/कण in sm. uis  तांदूळाच कणे सूपानिशी पाखडून काढाम॑ म्हणजे बरोरल अभ्यास असलतरेच होईल॑. 
   
कणे n  a broken bit, kernel or particle of food grains. धान्याच चूर ; कणी/कण in sm. uis पोटाला बर नाहीस्क॑ असताना कणेच गंजींत॑ ताकीं मीठीं घालून पीलतर॑ हायशी असेल॑.

कद्दी adv  on what day ? which day ? कोण्त॑ दिवस ? केद्दी. कधी. uis उदंड दिवस झालकी तुला पाव्हून. कद्दी आलास॑ ?

कथक n  a classical dance of Northern India. उत्तर भारताच एक नृत्य शैली. uis दक्षिण भारतांत भरतनाट्यम, कुच्चिपुडी, मोहिनिआटम, कथकळी अस॑ विध-विध रीतीच नृत्य आहे तरीन, उत्तर भारतांत॑ मुख्य होऊन कथक मात्रच आहे.

कथकळी n  a classical dance of Kerala State. केरळ संस्थानाच एक नृत्य शैली. uis कथकळींत॑ नृत्य कराच कलाकार अभिनय-रस अणी मुद्राच भरून प्रयोग करतात तरीन, खाणीच विवरण पूरा मागे बसणार लोके सांगत असतात॑. 

कथा n  story. tale. खाणी. uis इंदोनेश्या, कंबोडिया असलत॑ दक्षिण-पूर्व एश्याच देशांत चालिवाच रामयणाच कथा, भारताच रामायण कथाच बरोर पाह्ताना कित्येक ठिकाणी वेगळ॑ असत॑. 

कथाकालक्षेप n  a type of narrative folk entertainment. कथाप्रसंग॑. हरिकथा. uis तमिल-नाडांत॑ कथाकालक्षेप प्रचार होयाला मुख्य कारण तंजावूर मराठी लोकांच संपर्कामुळे आहे, अस॑ सांगतात॑.

कथाप्रसंग॑ n  a type of narrative folk entertainment. हरिकथा. कथाकालक्षेप. uis विशाखा हरीच कथाप्रसंग ऐकलतर॑ वेगळ॑ कोण्तीन तजपक्षा बेष असना म्हणून अग्गिदनीं सांगतील॑, तेवढ॑ बेष असेल॑ ते. 

कदळी n  a variety of plantain. एक प्रकारच केळ॑ ; कर्दळी/कदली in sm. uis कदळी केळ॑ केरळांत भरून वाढिवतात॑ अणी तिकडून वेगळ॑ संस्थानाला पाठिवून देतात॑.

कधी adv  on what day ? which day ? कोण्त॑ दिवस ? केद्दी. कद्दी. uis मझ॑ मित्र फार संकटांत बसल॑होते. कां म्हणून विचारताना सांगिट्ले, त्यंच लोंक परदेशाला निघून गेला अणी कद्दी परतून येईल म्हणून कळना, ते करतां संकट आहे म्हणट्ले.

कधी-कधी adv  whenever sometimes. whenever at times. whenever now and then. तम्हा-तम्हा कित्येक वेळ. केद्दी-केद्दी. uis घरच॑ वड्या तळून खायाला अदृष्ट नाही मला, कां म्हणजे, मझ॑ बाईल कद्दी-कद्दी लाह्येंच वड्या करून ऊनांत वाळिवाला घालतीकी, तद्दी अग्गीन पाऊस येऊन ते हाळ करेल॑.

कधीच॑ adv  at some earlier time. कित्तीकी दिवसाच पुढेच. केद्दीच॑. uis मझकडे बोलणे कद्दीच सोडूनटाकला तो, कां म्हणून कळत नाही.

कधीच॑ adj  of what day ? on which day ? कोण्त दिवसाच ?  केद्दीच॑. uis ते विषय मला कळनाकी, कद्दीच न्यूसपेपरांत आल॑होत॑ ते समाचार ?

कधीतरीन adv  at some time or other. at some day or other. कोण्त॑ वेळांत॑ तरीन. कोण्त॑ दिवस तरीन. केद्दीतरीं. uis कद्दीतरीन वेळ मिळताना मला येऊन पाह्शीलका ?

कधीन adv  at all times. केम्हा पह्जेतरीन. केद्दीन. uis मला नीट कळेल॑, कद्दीन तो मझ॑ विषयीन चोखोटेच बोलल॑ म्हणून. 

कनक n  gold. सोने. स्वर्ण. uis कनकाभिषेक करताना साधारण होऊन कनक नाणे डोस्के व॑रून घालतों विना, सोनेच आभरण की, सोनेच वेगळ॑ कोण्तीन साधन की घालणे नाही.

कनकाभिषेक n  ceremony of performing abhishek with gold coins. सोनेच नाण्याच अभिषेक. uis दादिगा वंशजांत॑ नातूच लोंक, म्हणजे, पणतू उजलतर॑ पणजाला कनकाभिषेक करणे आहे.

कनिष्ठ adj  younger. सगळेंतीं पक्षा धक्ट॑. uis दोन भाऊ-भाऊंडे (भावंडे) एकच ठिकाणी बसून श्राद्ध करताना दोघ्येंत कनिष्ठ भाऊला थोरळेंच मागे बसिवून कार्यक्रम करणे आहे.

कनिष्ठपक्षा adv  at the least. उणेपक्षा. uis महाभारत युद्ध आरंभ होयाच पुढे श्रीकृष्ण कौरवांस मिळून त्यंचकडे न्याय बोलून काहीं साध्य झाल नाही. शेवटी कनिष्ठपक्षा एक गांव तरीन पांडवांस द्याला होईलका म्हणून विचारल॑त्यालापणीं दुर्योधन तिरस्कार केला.

कन्या n  prospective bride. वराडाच वयेच पोरी. uis अमच॑ सूनाच भाऊला अण्खीन नवरी निश्चय झाल॑ नाही. विचारताना कळ्ळ॑, दहा कन्यांस पाह्यले अणी त्यांत कोण्तीन बरोर पडल॑ नाही म्हणून.

कन्या n  virgin. कुमारी. uis येशु क्रिस्तूच माय मेरी एक कन्या होते म्हणून इसवी धर्माच लोके विश्वास करतात॑.

कन्या n  daughter. लेंक. uis मझ॑ बरोर ऑफीसांत काम करत होतत॑ एकलांस पांच लेंक होत॑ अणी पाप तेनी केम्हाहीं सांगतील॑, "एक कन्या असलतरेच तिला वराड करून पाठिवाला पैसाच फार कष्ट होईल॑, पण मला पांच कन्या आहेत, मझ॑ कष्ट पावा" म्हणून.

कन्यादान n  name of one of the rituals associated with a Hindu wedding. वराडाला संबंध झालते एक पद्धती. uis वराडाच नवरीला बाप-माय नाही म्हणून कन्यादान कराला तिज काका-काकी पाटांत बसले.

कपट n  deceit. fraud. लबाड. लटक॑. uis कपट सन्यासी नित्यानंदाच अवघड काम पोलीसाला दाखिवून देलते तजेच एक चेला म्हणून सांगतात॑.

कपटरूप n  disguise. लटक वेष. uis रामायणांत॑ सीताला अपहरण कराला रावण राक्षस सन्यासीच कपटरूप घालींगून आला.

कपाळ n  forehead. डोळेच वरच॑ डोस्केच पुढेच भाग. uis दोन दिवसाच पुढे मझ॑ मित्राच नातू स्कूटरांतून खाले पडून कपाळाला घाव लागींगटला.

कपाळ n  skull. डोस्केच हड॑. uis इंग्ळीष नाटकीय लेखक विल्ल्यम शेकस्पीयराच हॅम्लेट नाटकांत॑ मरून गेलते योरिक विदूषकाच कपाळ हाती धरींगून स्मशानांत॑ हॅम्लेट द्याच भाषण ते नाटकाच एक मुख्य दृश्य आहे.   

कपाळसूळ n  head ache. डोस्केसूळ. डोस्केच दुखणे ; कपाळशूळ in sm. uis पाष्टे उठतांतरून मला कपाळसूळ आरंभ झाल॑. तरपडत आहें मी.

कपाळसूळ fig  troublesome botheration. तंटाच शल्य. तंटाच उपद्रव. uis बंग्ळादेशांत॑ बदलून-बदलून येत असाच सरकार भारताला एक कपाळसूळ झालाहे. कारण, त्यांत॑ एक सरकार भारताच विरुद्ध॑ अक्रम कराच आतंगवादी लोकांला प्रेरणा देत असत॑.

कपाळाच लिपी fig  pre-destined fate. कर्म. प्राराब्ध. कपाळाच विधी. Note:- प्रारब्ध means 'fate' in sm whereas it is प्राराब्ध in DM. uis सांगून सांगून पुरे झाल॑, बरोर वाचलतर॑, वाचूनदे. नाहीतर॑ कपाळाच लिपी काय आहेकी ते होईल. अम्हाला काहीं कराला होईना म्हणून सोडूनटाकणेच बर॑. 
 
कपाळाच विधी fig  pre-destined fate. कर्म. प्राराब्ध. कपाळाच लिपी. uis अवघड वाटांतून तला चुकिवाला किती प्रयत्न केलोंतरीन काहीं प्रयोजन झाल॑ नाही. नंतर॑, काय होयाल जात की, ते तझ॑ कपाळाच विधी म्हणून सोडूनटाकलों.

कप्पी n  a remnant. उरलत॑. uis दंतांत (जंतांत) पीठ कित्ती बेष दळलतरीन नंखर कप्पी त्यांत उरणे सहजच॑. 

कफ n  phlegm. थुंका. पडसा, खोंकळामुळे घसांतीं नाकांतीं होयाच मेळ (मळ). uis एक वारापसून मला पडसाच तंटा होत॑. अत्ता खोंकताना हिरव॑-पिवळ॑ रंगाच कफ येत आहे.

कबड्डि n  a type of field game. एक रीताच खेळ. uis एश्यन-गेम्सांतीन कोमण-वेल्त गेम्सांतीन भारताला कबड्डींत॑ हे पर्यंतीन कोण्त॑ देशालीन हरिवाला झाल॑ नाही.

कबर n  mohammedan tomb. दरगा. uis बंगळूर जयनगर 4th ब्ळोक बसठाणाच जवळ एक मोहम्मदन कबर होत॑. ते कबर अडव॑ होतत॑ करतां तिकडल॑ रोड विस्तार कराला होईनास्क॑ उदंड वर्ष तसच॑ पडल॑होत॑. नंतर॑ एक पोरी स्कूटर आफतांत॑ मरल॑ नंतर॑ कबराच भोंताले असाच जमीन ते लोके सोडून देले अणी रोड विस्ताराच काम झाल॑.   

कमळीच फूल n  lotus. तामरै (Tamil). uis वरमहालक्ष्मीच सणाला कमळीच फूल॑ फार श्रेष्ट आहे.

कमंडल n  a small water pot with a spout. नळी असाच एक ल्हान पाणीच पात्र ; कमंडलु in sm. uis बलि चक्रवर्ती वामन रूपाच विष्णूला दान द्या करतां कमंडल वाटे पाणी ओतताना पाणी बाहेर येताने म्हणून शुक्राचार्य ल्हान रूपांत॑ कमंडलाच नळीच आंत घूंसून अडव॑ बसले. विषय कळून, वामन मूर्ती गवताच एक काडीनिशी नळीच आंत टोंचले अणी तेमळे शुक्राचार्यांच एक डोळे फुटून नाश झाल॑. 

कम्मि adj  less. उणे ; कमी in sm. uis मला कडक कॉफी अवडना म्हणून थोड कम्मि डिकोक्षन घालूनच पीणे.

कम्मि adj  wanting. उणे असणे ; कमी in sm. uis तज वागणे पाह्लतर॑ पैसाच कष्ट अहेस्क॑ दाखींगतो. पण, तला पैसाच कम्मि काहीं नाही म्हणून मला कळेल॑.

करडणे vt  to nibble or gnaw. चूर चूर उक्करून चावणे. uis  भोईंत॑ करडून पडलसाच खोब्रेच चूर पाव्हून मला समेच कळ्ळ॑, संपाक घरांत उंदीर घूंसलाहे म्हणून.

करडि n  bear. भालू. र्रांणांतल॑ एक मृग॑. uis रामायणांत॑ जांबवान म्हणून एक करडी श्रीरामालीं वानरसेनालीं उपदेश करत होते. Note :- from Tamil.

करणे vt & vi  to do. to execute. to make. काम/कृत्य कराच॑. uis मझकडून काय करामते होतेकी, ते मी करणे झाल॑. अण्खि इथपर तुज इष्ट प्रकार करींग॑.

करतां prep  for the sake of. for. because of. मुळें. मळे ; करिता in sm. uis वेगळ॑ कामाकरतां हेपटीस याच असलतर॑ ये. मझकरतां तू एकड॑ येणे नको.

करपणे vi  to get scorched. to get singed. एक वस्तूच बाहेरच भाग मात्र काळ॑ होया पर्यंतीं भाजाणे. uis पापड भाजताना करपून जायनास्क॑ असाम॑ म्हणजे चूलाच विस्तू उणे करणे चोखोट.

करपिवणे vt  to scorch. to singe. एक वस्तूच बाहेरच भाग मात्र काळ॑ होया पर्यंतीं भाजून काढणे ; करपवणे/करपविणे in sm. uis थोर वांगीच भरीत करताना चूलीच विस्तूंत॑ वांगीला नंखर करपिवून काढतील॑.

करसेना n  infantry. भूसेना. uis भूलोकांतच तिसर॑ थोर करसेना भारताच म्हणतात॑.

कर॑ n  tax. toll. सरकार वसूल कराच रोक्कम. uis सरकाराला देमते कर॑ वेळावेळी बांधूनटाकलतर॑ नंतर॑ तंटा काहीं असना. Note:-  रक्कम in sm.

करार n  agreement. सम्मत॑. ओप्पंदम (tamil). uis गंगा नदीच पाणी वाटींगणे विषयीं भारतीं बंग्ळादेशीं मध्ये तय्यार झालते करार पश्चिम बंगाळाच आवश्या प्रकार नाही म्हणून तृणमूल कांग्रसाच नेता ममता बानर्जी हेनी राहते करूनटाकले.

करारकंडीप॑ adv  proper systems and practices of behaviour. बरोरल॑ वागणे-चालणेच धर्म. uis येतां येतां थोडकपणीन करारकंडिप नाहीस्क॑ वागतो तो. कळत नाही तला काय झाल॑ म्हणून

करिवणे vt  to make one do. दूसरेकडून करून घेणे ; करवणे/करविणे in sm. uis अम्च नव कामवाली शुद्ध॑ शोभेरी. तिजकडून काम करिवणे फार कष्ट झालाहे.

करुणा n  compassion. pity. mercy. अनुकंपा. दया. uis तिला ल्हान वयेंतसूनच मूकप्राणीं म्हणजे प्राण॑. तिन॑ त्यंचवर दाखिवाच करुणा पाह्तानच अम्हाला हे कळूनजात॑.

करे n  sap of a plant, fruit, etc. वनस्पतीच रस. uis फणस कापताना हाताला करे लागनास्क॑ असाला बोटाला तेल लावींगणे आहे. Note :- from Tamil. 

करेपाक n  curry leaf. संपाकाच॑ स्वाद जास्ति कराला वापराच एक रीतिच पान. कढीपत्ता. uis करेपाक चेंचून घाटलते ताकपाणीच रूच मला उदंड अवडेल॑.

करोड n  crore. कोटि. uis टीवींत॑ याच "कौन बनेगा करोरपती" कार्यक्रमांत॑ वेगळ॑ कोण करोडपती होतीलकी नाहीकी, अमिताभ बच्छन कंडिपहोऊन करोडपती होण्यांत॑ संदेहच नाही.

कर्ज n  loan. debt. रीण. ऋण. उधार. uis विचारतांतरून कर्ज देलतर कित्येकदन॑ घडी-घडी कर्ज घ्याला येतील॑.

कर्कटक॑ n  zodiacal sign of Cancer. ज्योतिषशास्त्रांत एक राशीच नाव. uis कर्कटक राशीच लोकांस॑ दुसरेंच बरोर संपर्क ठींगणे, दुसरेंस सहाय करणे असलते अग्गीन अवडेल॑. 

कर्तव्य n  responsibility of performing one's duties.  काम कराच जवाबदारी. uis वय होतां-होतां माय-बापांला बरोर पाह्यींगणे अम्च जवाबदारी आहे. अम्च हे कर्तव्य अम्ही कस॑ करतोंम्हणून, अम्च लेंकर॑ पाव्हून शिकतील॑ अणी तेच मातिरि वय होऊन हाताला होयनाते अवस्था अम्हाला येताना  तसेच पाहींगतील॑.

कर्ता n  male head of a joint family. संयुक्त कुटुंबाच मुख्य मनुष. uis संयुक्त कुटुंबाच कर्ता न्याय प्रकार ते कुटुंबाच आस्त कस॑ पह्यिजतरीन व्यवहार करूया.

कर्ता n  subject in grammar, ie, the word in a sentence which indicates the person or thing that performs the action. व्याकरणांत॑, क्रीया करणाराला उद्देश करून सांगाच गोष्ट॑. uis "रावण सीतादेवीला अपहरण॑ केला". हे वाक्यांत॑ "रावण" कर्ता आहे.

कर्पूर n  camphor. कापूर. आरति कराला उपयोग कराच पंढ्र॑ रंगाच एक जळाच वस्तु. uis देवाला आरति कराच कर्पूर वेगळ॑, खायाच पचकर्पूर वेगळ॑ म्हणून मला उदंड दिवसाच नंतरच कळ्ळ॑.

कर्म n  destiny. fate. प्राराब्ध. uis हिंदु धर्माच एक मुख्य आधाराप्रकार मागल॑ जन्मांत॑ अम्ही काय-काय केलोंकी तज परिणाम॑ हे नन्मांतीं याच जन्मांतीं अम्ही अनुभव करवों. हे सिद्धांताला कर्म म्हणून सांगतों.

कर्म n  funeral rites. श्राद्धाच कर्म. uis हे वर्षी मझ॑ बापाच वार्षिक कर्म मार्च महिनेच दहा तारीखाला झाल॑. 

कर्म n  a work. काम. uis कराच कर्म पहिलच॑ बार बरोर करल॑ नाहीतर॑ पुन्हा पुन्हा ते करामत॑ पडेल॑.

कर्म n  in grammar, object in a sentence, ie, the word in a sentence which is affected by the action of the verb. (व्याकराणांत॑) वाक्यांत॑, क्रियाच परिणाम पडाच/लागाच गोष्ट॑. uis "रामदूत हनुमंत सीतादेवीला लंकापुरीच अशोकवनांत॑ पाह्यिले",  हे वाक्यांत॑ कर्म आहे "सीतादेवी".

कर्मयोगी n  a person who practices karmayoga. कर्मयोग आचरण॑ करणार. uis स्वार्थपण॑ दाखिवनास्क॑ पूरा जगताला बरोरल॑ सेवा अणी प्रेम कराच व्यक्तीला कर्मयोगी म्हणूया. 

कर्मयोग॑ n  way  to god-realisation through performing one's duty. कर्मावाटी ब्रह्मज्ञान॑ प्राप्त होणे. uis ब्रह्मज्ञान प्राप्त कराला भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग हे दोनाचीन तुल्य प्राधान्य कर्मयोगालीं आहे म्हणतात॑. 

कलश n  a small water pot made of gold, silver or copper used in puja. पूजाला उपयोग कराच सोनेच अथवा रुपेच अथवा तांबेच एक ल्हान पात्र. uis वरमहालक्ष्मि पूजाला लक्ष्मीदेवीच पट होढलते कलश ठिवणे आहे.

कलंगडि n  water melon. कलंगडि ; कलिंगड/कलंगडी in sm. uis उन्हाळाच दिवसी कलंगडि खालतर॑ आंगाला हिंस॑ वाटेल॑.

कला n  art. सौंदर्यरूपाच वस्तु कराच पद्धति. uis साळेंत॑ पाठ शिकिवाच बरोर विध-विध कला पणीं शिकिवून देणे आहे.

कलाकार n  artist. कलावंत. uis भारताच कलाकारांच नावांत॑ राजा रविवर्माच नाव श्रेष्ट स्थानांत॑ आहे.

कलाप्रेमी n  lover of art. कला आस्वाद कराच मनुष. uis बांगळूराच कलाप्रेमीलोग वर्षा-वर्षी हिमाळाच वेळ, म्हणजे, डिसंबर महिनेंत॑ चालिवाच "बंगळूर-हब्बा" उत्सव उदंड प्रसिद्ध होत येत आहे.

कलाई n  tin coating given to brass cooking vessels. पित्तळाच संपाकाच पात्राला लावाच टिन्नाच  पत्तळ लेपन॑ ; कल्हई in sm. uis पित्तळाच भांडीला कलाई लावणार घराला येतांतरून अम्ही लेंकरे अग्गीन तज बाजू गुंडाळून होठाकून तज काम उदंड उत्साहांत्सून पाहओं.

कलियुग n  the fourth yuga. चार युगांत॑ शेवटीच युग. uis अत्ताच कलियुग महाभारत युद्ध॑ संपल॑ नंतर॑ आरंभ झाल॑ म्हणतात॑.

कल्प n  one full day of Lord Brahma, consisting of 1000 chaturyugas. ब्रह्मदेवाच एक संपूर्ण दिवस म्हणजे एक हदार चतुरयुग॑. Note:- according to other sources 994 chaturyugas make one कल्प. uis 71 चतुर्युग एक मन्वंतराच तुल्य. अस॑ 14 मन्वंतर झालतर॑ एक कल्प होत॑. म्हणजे, 71x14=994 चतुर्युग झालतर॑ एक कल्प होत॑, अस॑ पणीन एक इषोब आहे.

कल्पतरू n  celestial tree that yields whatever one wishes for. कल्पवृक्ष. uis क्षीरसमुद्र मंथन करताना कल्पतरू मिळ्ळ॑ म्हणून हिंदू धर्म विश्वास करत॑.

कल्पना n  thought. imagination. idea. conjucture. विचार. योचना. uis मी सांगाच पूरा श्रद्धांत॑ ऐकूनपणीं हे अवघड काम तो करेल॑ म्हणून मला कल्पना कराला होत नाही.

कल्पना n  idea. plan. concept. योजना. uis उदंड चोखोट कल्पना करून तो तज नव घर बांधलाहे.

कल्पनाशक्ती n  capacity for imagination/ideas. कल्पनाशक्ती. uis मनुष्यांस मात्र कल्पनाशक्ती आहे अणी दुसर॑ जीवजंतूला हे नाही म्हणाच किती खर॑ म्हणून सांगणे कष्टेच॑. 

कल्पवृक्ष n  celestial tree that yields whatever one wishes for. कल्पतरु. uis क्षीरसमुद्र मंथन करताना कल्पवृक्षाच बरोर कामधेनू पणीन मिळ्ळ॑.

कल्बूत n  dolls made by pouring sugar syrup into wooden moulds. साखरीच अच्च. साखरीच बावोली. Note. these are made during Sankranti festivals. uis अमच॑ आजी अमच॑ डोस्केच व॑रून बोर ओताच वेळी तज बरोर कल्बूत पणीन मिळिवत होते.

कल्याणी n  a Carnatic musical raga. कर्नाटक संगीतांत॑ एक राग. uis दक्षिण भारतांत होयाच पोणावांटा हिंदू वराडांत कल्याणी रागाच गाणे वाजिवणे आहे. 

कल्याणी n  a temple tank. पुष्करणी. देऊळाच तीर्थकुंड. uis माघ महिनेंत माघस्नान देऊळाच कल्याणींत करलतर॑ फार पुण्य मिळेल म्हणून विश्वास करतात॑.

कळणे vi  to know. समजणे. uis हे ब्रह्मांड कस॑ संपेल॑, हे कोणालीं कळना.

कळत adv  knowingly. deliberately. कळींगून. पह्जे म्हणून. uis कराच काम नियमाच विरुद्ध आहेम्हणून कळत असूनीं तला ते कराला थोडपणीं संकोच झाल॑नाही.

कळिवणे vt  to inform. to make known. समजिवणे ; कळविणे/कळवणे in sm. uis मला पाह्याला कद्दि येतोसम्हणून मला कळिवलतर॑ मी ते दिवस वेगळ॑ कोण्त कामीं काढींगनास्क॑ तुज कामाला मात्र वेळ करतों.

कळींगून adv  knowingly. deliberately. कळत असून. uis कराच काम नियमाच विरुद्ध आहेम्हणून कळींगूनपणीं तला ते कराला थोडपणीं संकोच झाल॑नाही.

कळून-कळनास्क॑ fig  stealthily. secretly. कोणालीन कळनास्क॑/कळिवनास्क॑. uis ते कंपनींत॑ कळून-कळनास्क॑ तो एवढे थोर मोस॑/'फ्रोड' कस करलाकी, हे मला अर्थ होत नाही.

कळ्ळते adj  known. पुढेच कळून असाच॑. uis ते विषय गामांत॑ तेवढेदनालीं कळ्ळतेचकी म्हणून मी तुजकड॑ ते सांगनास्क॑ उगे बसलों.

कळ्ळते माकड॑ fig  a known devil. तंटा करणार म्हणून पुढेच कळ्ळते मनुष.

कवच n  armour vest. युधाला जाताना आंगाला रक्षा कराला उपयोग कराच लोखंडाच/लोहेंच साधन॑. uis सूर्य भगवानाच अनुग्रहामुळे उजतानाच कर्णाला आंगांत॑ कवच होत॑. ते कवच असापर्यंतीन कोणालीं कर्णाला वध कराला होयना म्हणून होत॑.

कवडा n  cowrie. एक विधाच शंख. कवडी. uis दायकट्टम, पल्लांकुली असलते खेळ खेळताना कवडा वापरणे आहे.

कवडी n  cowrie. एक विधाच शंख. कवडा. uis हे काळांत लेंकरे लूडो, स्नेक-अंड-लॅडर असलते खेळ खेळताना कवडीच बदल डैस वापरतात॑.

कवल n  roofing tile. terracota tile. ओडु (Tamil) ; कौल in sm. uis पाऊस जास्ती पडाच समुद्राच कांठशीच प्रदेशांत कवलाच छताच घर भरून पाव्हूया. 

कवळणे vt  to seize with the mouth. तोंडांत्सून चावून काढणे. तोंडांत धरणे. uis घरच॑ मागे पटीसच आडाच बाजू सरप एक बेटकोळीला कवळून गिळाच पाह्यलों.

कवळणे vt  to stuff into the mouth. तोंडांत भरींगणे. uis अमेरिकांतेच उजलते अमच॑ लोकांच लेंकरे तिकड मिळाच "फास्ट-फुड" खाताना, दोन हातावाटे धरींगून तोंडांत कवळींगाच पाह्ताना मला राग पेटींगून येईल॑.   

कवाड n  door. दार. uis कवाड म्हाणाच एक जुने मराठी गोष्ट आहे अणी महाराष्ट्राच लोक कवाडाला दार म्हणून सांगतात॑.

कवाड n  shutter of window or door. खिडकी अथवा कवाडांत॑ झांकालीं उघडालीं होयाच व्यवस्था. uis वार॑-पाऊसांत॑ कवाड बडिवनास्क॑ असाला कोंडी घालून ठिवाम॑.

कविता n  poem. काव्य. uis भारताच स्वातंत्रसमराच वेळ तमिल-नाडाच सुब्र्हमण्य भारती ह्येनी लिव्हलते देशप्रेम कविता उदंड प्रसिद्ध झाल॑होत॑. असल॑ देशप्रेम कविता ते वेळी भारतांत॑ वेगळ॑ कोणीन लिव्हलोत नाही म्हणाच एक विशेष कार्य आहे.

कवी n  poet. कविता लिव्हणार. काव्य रचना करणार. uis महाकवी काळीदासाला संस्कृत भाषांत॑ सग्ळ्यांचीनपक्षा सर्व प्रथम कवी म्हणून मान्य करतों.

कवीठ n  wood-apple fruit. एक विधाच फल. कवठ in sm.uis (1) गणेश चतुर्थीच सणांत॑ देवाला कवीठाच नेवेद्य (नैवेद्य) करणे आहे. (2) कवीठाच पंडू बाह्येरून घट्टि असलतरीन आंतल॑ पदार्थ मृदू असेल॑ अणी तज बरोर गूळ मिळिवून पानक करणे आहे.   

कषंड n  residue sticking on the inside bottom of a vessel (immediately) after cooking. कषंडी. खरड॑. चूलांतून उतरीवलते भांडीच बुडांत॑ चिकटून असाच पदार्थाच राड. uis तूप तावल नंतर भांडीच खाले उराच कषंडाच बरोर नंखर मीठ अणी करेपाक घालून भाजून खायाला बेष असेल॑.

कषाय n   a medicinal decoction. औषदाच (ओखदाच) अर्क. वनसपतींतूं केलते आयुर्वेदाच काढा. uis साधारण होऊन आयुर्वेदाच कषायाला एक प्रत्येक वासीं स्वादीं असेलतरीन कित्येक कषाय फार कडू असेल॑.

कष्ट n  difficulty. प्रयास. uis इषोबाच परीक्षांत॑ शेवटीच दोन प्रश्न उदंड कष्ट होत॑म्हणून सोडूनटाकलों.

कष्टकाळ n  difficult times. bad times. दुरवस्था. विषमकाल॑. uis कष्टकाळ येताना मात्र देवाला अठींगापक्षा सदायीं देवाला स्मरण करणे चोखोट॑.

कष्ट-नष्ट n  varied negative experiences in life. जीवनांतल॑ विध-विध कष्टाच अनुभव. uis लेंकरांस वाढिवताना त्यंच सुख-सौकर्य  मात्र पाह्यींगून वाढिवलतर॑, नंतर॑ थोरळे होताना जीवनांत कष्ट-नष्टाच अनुभ नाही झालत्यामळे कित्येकदपा तेनी कष्टी भोगामत॑ पडूनजाऊया.   

कष्ट-सुख n  ups and downs in life. vagaries of life. जीवनांतल॑ विध-विधाच अनुभव, चोक्कोटीन कष्टाचीन. कष्ट-नष्ट. uis जीवनांत कष्ट-नष्टाच बेष अनुभ झालत्यांस कसलत॑ अडचण आलतरीन सांभाळाच सामर्थ्य असेल॑. 

कष्टी भोगणे vi  to suffer. कष्ट अनुभव करणे. uis सोमाळियांतीन, सुडानांतीन देशाच आंतल॑ भांडा-भांडींत॑ लोक कष्टि भोगाच पाह्यलतर॑ मनाला फार संकट वाटते.

कसरत n   physical exercise. व्यायाम. uis आंगांत पूरा तेल लावींगून पफलवान लोके कसरत कराच पाह्याला तमाशा असते.

कसव n  turtle. tortoise. कासव. कूर्म. uis कित्येक वर्गाच कसव तीनशें वर्ष पर्यंतीन जावंत असत॑.

कस॑ adv  how. कोण्त॑ प्रकार ? केस॑ ?  ;  कशी/कसा/कसे in sm. uis कस॑ तुम्हाला कळ्ळ॑, मी इकड॑ आलो म्हणून ?

कस॑कस॑ adv  in what which way/manner. केस॑केस॑ ; कसाकसा in sm. uis अत्ता याच थोर थोर मोटर कारांत वेघून बसणे म्हणजे देव दिसून जाईल॑. कस॑कसकी आंग वंकड॑ करींगून बंडीच आंत वेधांव॑.

कसाच॑ adj  belonging to which? केसाच॑. कसाच बरोर संबंध झालते ? ; कशाचा in sm. uis काल तीन नव॑ बावोली लेंकरांस घेऊन देलों. आज पाह्ताना त्यांत॑ एक बावोलीच एक चक्र भोईंत॑ पडलसाच दिसल॑. कसाच म्हणून कळना.

कसाला adv  what for ? why ? कां ? केसाला ?  uis कसाला तिला उगे घोळ घेतोस॑ ?

कस्तूरी n  the fragrant musk from musk-deer. कस्तूरी हरणांतून मिळाच एक चोखोट गंधाच/वासाच वस्तू. uis कस्तूरी हरण हिमालय पर्वत प्रदेशांत॑ आसत॑.

कक्ष n  armpit. हात आंगाला मिळाच स्थल॑. कांखा. uis पिकलत॑ अंबा खाल्लतर॑ मला कक्षांत पोंपडा येईल म्हणून, घरच॑ बादामी अंबाच झाडांत होयाच अंबा एकपणीं मी खाईना.

कक्ष n  flank of body shoulder. खांदाच एक पटीसच भाग. uis आज पाष्टे अण्थूणांतून उठताना मझ॑ उजव॑ कक्षाकडे लचक धरल॑ म्हणून थोडक॑ ओलीनी लावलों.

कक्षी n  a political party. राजकीय जनतंत्राच एक विभागाच संस्था. uis हे काळाच जनतंत्रांतल॑ कक्षींच वागणे पाह्लतर॑ अम्च वोट कोणालीं देम॑ म्हणून वाटत नाही.

कक्षी n  an organisation. a group of persons. एक विभाग. एक संस्था. uis साळेच बाजू मोकळ॑ पडलसाच मैदान स्वाधीन कराच प्रयत्नांत॑ दोन विभाग लोकांच मध्ये थोर वर्ग विवाद होऊन मारामारी झाल॑.

कंकण-बांधणे vt  to tie an ochre coloured thread offered in Puja on the right hand of a couple as a sign of their commitment for the purpose of the Puja. पूजा झालनंतर पूजाच॑ उद्धेश व्यक्त कराला गाढ-पिवळ रंगाच दोरा (दंपतींच) हातांत॑ बांधणे. uis  वराडांत नवरा-नवरीला कंकण बांधण आहे. कंकण असजोरि तेनी बाहेर जायाला नाही. तसच, अंथरूण शिवाला पणीं नाही.
 
कंगाल adj  poverty stricken. abjectly poor. फार दरिद्र. uis घोडाच रेसांत पैसे घालणार कोणीन जिंतून बाहेर आलते नाही. घाटलते पैसे पूर्त जाऊन कंगाल झालेवरेच॑ ते वेड दंडक सुटल॑. 

कंच n  brass. पितळ॑. Note:- कंच (brass) is an alloy of copper and zinc, whereas कांस॑ (bronze and gun metal) has some tin also in it. uis कंचांत केलते ल्हान ल्हान विग्रह मध्य-मध्य घांसून झळकास्क॑ शुद्ध करून ठिवाला अम्ही ब्रास्सो वापरतों. 

कंच n  brass vessel (used for cooking rice etc.) कंचाच/पितळाच भांडि. uis "प्रेषरकुक्कर" मिळाच पुढे भात कंचाच भांडींत कोळसाच सगडी वर (शेगडी वर) करत होते. नीट शिजलानंतर गंजी वेळून, अण्खीन थोड उशीर चुलीवर ठिवून उतरीवलत॑ भात फार रूच असत॑.

कंजूस adj  miserly. stingy. हिमटा. पैसा खर्च कराला इष्ट नाहीते ; कंजूष in sm. uis तो एक शुद्ध कंजूस मनुष. स्वंत लेंकरांलापणीं आवश्याप्रकार कापड घेऊन देयना.

कंजूसपण॑ n  miserliness. stinginess. हिमटपण॑. भीकारिपण॑. uis तज कंजूसपण॑ सोसाला होयनास्क॑ तिन॑ माहेराला परतून गेली.

कंटाळा n  disgust. abhorrence. मनाच बेजारपण॑. uis हे काळाच कित्येक टी.वी. कार्यक्रम पाह्यतर॑ मला उदंड कंटाळा वाटते.

कंटाळा adj  filthy. unhygienic. गलीज. uis मझ नातू बस-स्टान्डांतल॑ बात-रूमाच आंत गेलातरीन समच परतून येऊनगेला. काय झाल॑ म्हणून विचारलतर॑ आंत पाह्याला कंटाळा आहे म्हणून सांगट्ला.

कंठ n  throat. गळा. uis क्षीरसागर मंथन करताना आलते विष गिळनास्क॑ कंठांतच राह्यल-ते-करतां महादेवाच कंठ नील रंग झाल॑ अणी त्यांस॑ "नीलकंठ" अस नाव आल॑.

कंठ n  voice. कंठाच स्वर॑. uis कर्णाटक संगीत सांगणार एम.एस. सुब्बलक्षीच कंठ ऐकल्यात्यांस॑, तसल॑ कंठ मिळाम॑ म्हणजे देवाच अनुग्रह असलतरेच होईल म्हणून वाटल॑.

कंड n  itch. खंड. खाज ; कंडू/कंड in sm. Note:- खंड is the hyper emphazised form of the correct कंड. uis दोन दिवसांतसून मला घसाच कंड होतहोत॑. नंतर, मीठाच पाणी खुळखुळ (गुळु-गुळु) केलांपिरी थोडक उणे झाल॑.

कंडिप adj  certain. without fail. अगत्य. पक्का. संदेह नायीस्क॑. संशय नायीस्क॑. uis मझ लोंकाच वराडाला तुम्हाला आमंत्रण पत्र पाठिवलोहें. कंडिप होऊन येम॑. Note :- from Tamil.

कंदील n  glass covered lantern. अरसांत झांकटलत॑ दिवा. uis गेल॑ वार आलते थोर वार॑पाऊसांत॑ अम्च॑ घरच॑ नडुवीच भिंतांत॑ अडकिवून ठिवलत॑ कंदील खाल॑ पडून फुटल॑. 

कंदील n  brass hanging oil lamp with five or seven wicks. पांचकी सातकी वाताच पित्तळाच लोंबून घालाच दिवा. uis छप्परांतून लोंबून घाट्लत॑ कंदीलाच सांखळी तुटून पडास्क॑ आहे म्हणून समेच लोहाराला बलावून ते बदलणे चोखोट॑. 

कंबळिपूचि  n  a type of catterpillar whose touch causes allergic skin rashes. शिवलतर॑ आंगाला कंड याच एक विधाच किडा. uis कंबळीपूचीच रोम अम्च आंगाला लागलतर॑ उदंड वेळ खाज होत असल॑. Note :- from Tamil. 

कंबी n  wire. तांत॑. कांबी. कांब. तार. uis खिडकीच कोंडी मोडूनगेल-ते-करतां सद्याला कंबींत॑ बांधून ठिवलों. Note :- from Tamil.

का ind  a particle used as an interrogative suffix. eg. जेवलासका/जेवलास्का ? (did you eat ?), करलासका/करलास्का ? (did you do it ?) etc. एक अविकारी प्रत्यय. उदाहरण, जेवलासका/जेवलास्का ? करलासका/करलास्का ? Note:- का ? in sm means "why ?". The corresponding word in DM is कां ? 

काकडी n  cucumber. वाळूक. Note :- the DM word वाळूक is preferred over काकडी, which is more commonly used in sm. uis उन्हाळाच काळांत॑ काकडी खाल्लतर॑ पोटाला हिंस॑ वाटल॑.

काका n  father's brother. बापाच भाऊ. uis मला दोन काका होते. त्यांत एकले गेले अणी अता मला एक काका आहेत॑.

काकी n  father's brother's wife. बापाच भाऊच बाईल. काकू.

कागद n   paper. लिव्हाला उपयोग कराच पान. uis (1) पुरातन ईजिप्टाच लोक॑ "पापैरस" म्हणून एक विधाच बेतांतून कागद करत होते. हेच भूलोकांतल॑ पहिल॑-पहिलच कागद॑. (2) पांच हदार वर्षापुढेच ईजिप्टाच लोक॑ कागद वापरत होतेतरीन अत्तापतोरी लिव्हाला कागदास्क॑ सौकर्य असाच वेगळ॑ साधन॑ अम्चकडे नाही म्हणाच एक आश्चर्याच गोष्ट आहे.

कागद n  postal letter. कागदपत्र. तपालाच पत्र. uis जुन॑ काळांत "पोस्ट-मॅन" घराला येऊन कागद देताना अम्हाला कित्ति संतोष होतहोतकी ती मादरीच अनुभव अत्तच॑ "ई-मेल" वाचताना अम्हाला मिळत नाही. Note:-  टपाल for post in sm, whereas it is तपाल (Tamil) in DM.

कागदपत्र n  postal letter. कागद. तपालाच पत्र. uis परदेशाला सहा महिनेच पुढे निघून गेलत॑ लोंकांकडून कागदपत्र एकीन आल॑ नाही म्हणून तेनी चिंतांत॑ बसलाहेत॑.

काचर n  cut and sun-dried vegetables. कातर. कातराच वड्या. कापून ऊनांत वाळिवलते भाजिपालाच वड्या. वत्तल (Tamil). Note:- the word काचर is hardly used in DM, whereas कातर is preferred. uis कारळीच काचर तळून खायाला बेष असेल॑.

काचराच मिर्शिंगा n  salted green chillies soaked in curds and dried. वत्तल मोर मोळगा (Tamil). कातराच मिर्शिंगा. uis अंभटभाजी भाताच बरोर तोळ्लायींगाला काचराच मिरशिंगा बेष असल॑.

काचा n  dhoti worn by tucking in the pleats at the back and front of the wait. कासोटा. कच्छ. uis काचा नेसाला कळनात॑ यांस॑ अत्ताअग्गीन रेडी-मेड काचा मिळत॑.

काजळ n  lamp black for applying on the edges of eye lids. मशी. मसी. डोळेला लावाच काळे रंगाच मसी. uis चोखोट रीतींत॑ करनाते काजळ डोळेला लावलतर॑ डोळेला रोग येऊया.
 
काजू n  cashew nut. बिब्बा. uis काजूच मोल ते कित्ति मोठ॑ आहे म्हणाचव॑र असते. म्हणजे, एक "पौन्ड" वजनांत॑ कित्ति काजू असतेकी तजव॑र काजूच मोल निश्चय होत॑. काजूच जाड जास्ती होतां-होतां एक पौंडांत॑ तज संख्या उणे होत जाईल, पण मोल जास्ती होत जाईल. Note:- 1) बिब्बा in sm means 'a marking nut'. 2) the words काजू and cashew are from Portugese caju.

काटणे vt & vi  to cut. कापून टाकणे. कापणे. uis मझ घराच बाजूच अंबाझाडाच फांटा टेलिफोण कंबीच (ताराच) अडव॑ येतम्हणून ते काटाला निश्चय केलों. 

काठी n  stick. staff. rod. pole. wand. लांकडाच बरीक काडी. uis डोळे बरोर नाहीत्यानी बाहेर जताना पंढ्र॑ रंगाच काठी वापरून हळ्ळु-हळ्ळु चालत जातील॑.

काठी n  a stalk or stem of a plant. झाडाच बरीक फांटा. uis अमच॑ घरच॑ बाहेरच॑ चंपक झाडांतून चोरटपणांत॑ फूल तोडाला कोणकी वेघला. चंपकाच काठीला बळ नाही म्हणून कळनास्क॑ काठी तुटून बीदीच मोरींत पडला.

काडवळि n  a thick anklet (usually of silver) worn by rustic men/women. खेडेगामाच दादिगे-बायके पायेंत॑ घालाच एक आभरण॑ ; काडवाळा in sm. uis अत्तापणीं खेडेगावांत बायके-दादिगे काडवळि घालिंगाच पाव्हुया. पटणाच बायके रुपेंत केलते गोलुस (घुंगरू) घालींगतात॑.

काडा n  a chip or splinter of wood. लांकडाच चूर. काडी. uis सोवळेच संपाक कराला लांकडे कापताना मझ॑ हाताला एक ल्हान काडा रुचून वेघल॑.

काडी n  match stick. विस्तूच काठी. uis मेण लिंपलते काडींत॑ विस्तू जास्ति वेळ राहीलम्हणून मी तसलते काडीचपेटीच घेणे.

काडी n  a chip or splinter of wood. लांकडाच चूर. uis चपलि नाहीस्क॑ चालत होताना मझ ल्हान बोटाला एक काडी लागून दोन दिवसांत॑ थोर व्रण (रण) झाल॑.

काडीचपेटी n  match box. विस्तूच पेटी. uis काडीचपेटी अणी दीपावळीच पटाकि हे सगळीन तमिल-नाडाच शिवकाशींत॑ तय्यार करून पूरा देशालीं पाठिवतात॑. 

काढणे vt  to lift. to take out. to remove. to extricate. काढणे. uis मी पेटीच आंतून पुस्तक बाहेर काढून ठिवलों. 

काढणे vt  to bring out. काढणे. uis सगळ॑ देशांपक्षा जास्ति सिनिमा काढाच देश भारत आहे.

काढा n   herbal decoction. कषाय. ओखदाच अर्क. औषदाच अर्क. uis  मला पडसा-खोंकळा आलतर मझ आजी, नाहीतर मझ माय॑ मिरेच काढा करून देतील॑ अणी दोन दिवसांत ते बर होऊन जाईल.

कातर॑ n  scissors. कात्र॑. कापाच उपकरण॑ ; कातर in sm. uis कातर॑ उजव॑ हातांत धरींगून बेष कापाला येईलतरीन तेच कातर॑ डाव॑ हातांत धरींगून नीट कातराला होईना. 

कातर n  cut and sun-dried vegetables. काचर. काचराच वड्या. कापून ऊनांत वाळिवलते भाजिपालाच वड्या. वत्तल (Tamil). uis कारळीच कातर तळून खायाला बेष असेल॑.

कातराच मिर्शिंगा n  salted green chillies soaked in curds and dried. वत्तल मोर मोळगा (Tamil). काचराच मिर्शिंगा. uis अंभटभाजी भाताच बरोर तोळ्लायींगाला कातराच मिरशिंगा बेष असल॑.

कातरणे vt  to cut with scissors. कात्रेंत॑ कापणे. uis दीपावळी सणाला शिवाला देलते अंगि बरोर कातरनास्क॑ शिंपी हाळ करूनटाकला.

काताड n  skin. चर्म. सालपट ; कातडी/कातडे in sm ; Note:-  (1) सालपट in sm means bark of a tree, rind (2) सालपट सोलूनटाकन in DM means 'I will skin you'. uis कित्येकांस॑ उजतानाच काताडांत॑ इकडे तिकडे पंढ्र रंग असत॑ अणी त्यंच लेंकरांस पणीन तस॑ असाच साध्य आहे. 

कात्र n  scissors. कातर॑. कापाच उपकरण॑ ; कातर in sm. uis मोंड झालते कात्रांत॑ कापड कापाला प्रयत्न करून मी मझ बोट कापींगटलों.

कान n  ear. शब्द ऐकाच॑ इंद्रिय. uis उजाच वेळीच कान ऐकनाते लेंकरांस॑ नंतर॑ बोलाल पणीन येईना.

कापड n  cotton cloth material. वस्त्र शिवाच कापूसाच कापड. uis केम्हाहीं मी "रेडिमेड" अंगि घेईनतरीन, "पॅन्ट" मात्र कापड घेऊन शिवन॑.

कापड n  cotton cloth. कापूसाच कापड. uis उत्तर भारतांत॑ हिमाळाच (हिंवाळाच) समयांत॑ कापडाच पांघरविणेच बद्दिल कांबळेच पांघरिवणे पह्जते पडल॑.

कापड n  clothe. dress. नेसाच वस्त्र. uis घरांत असताना नेसाच कापड अम्ही "वाषींग-मषीनांत" धुवतों अणी चोखट कापड हातावाटी धुवतों.

कापणी n harvest. harvesting of crops. पीक. शेताच (जमीनाच) पीक कापणे. uis साळीच पीक बरोरल॑ स्थितींत असताना कापणी करणे चोखोट॑, कां म्हणजे, अवेळाच वार॑पाऊस येऊनगेलतर॑ पीक सगळीन नासून जाईल॑.

कापणे vt  to cut. काटणे. uis कापड कापाच कात्रांत॑ वेगळ॑ कायतरीन कापलतर, ते लोक्कर मोंड होईल.

कापूर n  camphor. कर्पूर. आरति कराला उपयोग कराच पंढ्र॑ रंगाच एक जळाच वस्तु. uis कापूराच आरती सोवळेला येईना म्हणून कापूसाच वातांत॑ आरती करतील॑.

कापूस n  cotton. दोरा/कापड कराला उपयोग कराच एक वनस्पति. uis पाकिस्थानांत वाढिवाच कापूस भारतांत वाढिवाच कापूसाचपक्षा चोखोट असत॑.

कापूस n  carded cotton. रुई. शुद्ध॑ केलते कापूस. uis ऊंशींत चोखोट कापूस भरलनाहीतर॑, निजून झोंपी जाताना डोस्केला रुचत असल॑.

काम n  work. क्रिया. कर्म. uis मज़ूरीच काम करणार कूलीवालेंस॑ केलते कामाला बरोरल॑ मज़ूरी समेच देणे बरोर॑.

काम n  employment. उद्योग. uis कामांतून रिटैर होऊन तीन महिना होयाचपुढेच त्यांस॑ वेगळ॑ एक चोखोट काम मिळ्ळ॑.

काम n  love. प्रेम. uis विरिधीकडून काहीं मिळांव॑ म्हणजे काम, क्रोध, भेद अणी दंड अस॑ चार प्रयोग करांव॑ म्हणून एक म्हण आहे.

काम n  lust. amorous passion. असभ्य विकार. uis सैरंध्रीच वेषांत विराट राजाच रानी सुदेष्णाला सेवा करत होतत॑ द्रौपदीच व॑र काम विकारांत कीचक वागला म्हणून तज वध भीमसेन करले. 

कामधाम n  employment. उद्योग. uis (1) अम्च गामांत टाटा मोटर्स एक नव॑ फाक्टरि आरंभ करतात म्हणे. ते खर॑ झालतर॑ उणेपक्षा चार-पांचशे लोकांस॑ कामधाम मिळेल॑. (2) अम्च व्यवहारांत कां तो मध्य येऊन पडतो, वेगळ॑ कामधाम काईं नाहीका तला ?   

कामधेनु n  divine cow. सगळ॑ आग्रहीं पूरा करून द्याच स्वर्गलोकाच दिव्यगाय. uis क्षीरसागर मंथन करताना कामधेनु आल॑ म्हणून महाभारताच आदि पर्वांत आहे.

कामवाला n  man servant. काम करिवाला म्हणून ठिवलते मनुष. uis अम्ही ल्हान असताना अमच॑ घरांतल॑ तीन गाय पाह्यींगालीन कुत्राला पाह्यींगालीन अणी अमच॑ तीन मोटर-कार धुवालाहीं म्हणून एक कामवाला होता. 

कामवाली n  female servant. काम करिवाला म्हणून ठिवलते बायको. uis अत्तच॑ काळांत॑ घरच॑ काम कराला कामवाली लोक॑ मिळणे फार कष्ट झालाहे. मिळ्ळतरीन महिनाला उणे पक्षा चार पांच हदार रुपे धर्मा देलतरेच ओपींगतील॑.

कामशास्त्र n  science of love. शृंगारशास्त्र. uis कामशास्त्र आधार करून "काम सूत्र" म्हणून एक सुप्रसिद्ध ग्रंथ इसवी चार अथवा पांचवां शतकांत॑ वात्स्यायन मुनी रचना केले. 

कामाले n  jaundice. पित्तशयाला बाधा होयाच एक रोग. Note:- 1. from Tamil. 2. काविळ in sm. uis कामाले रोग आल॑ तर॑ जेवण॑ पथ्यांत॑ फार सूक्ष्म म्हणून असाम॑.

कामाळू adj  good at work. handy. कामाच षाणपण॑. कामाच सामर्थ्य. uis मध्य मध्य अमच॑ घराला कामाळू एकला येईल॑. सगळ॑ कामहीं तजान कराला होईल.

कामिनी n  enchantress. शृंगारी. मोहिनी. uis विश्वामित्र मुनीच तपस भंग कराला स्वर्ग-सुंदरी मेनका एक कामिनीच रूपांत॑ आली.

काय pron  the interrogative pronoun, what ? प्रश्नाच सर्वानाम॑. uis काय समाचार ? केम्हा आलास तू ?

कायकाय pron  what all. काय-काय. uis अम्ही लेंकीच घराला जाताना अग्गीन अम्च नातू अम्च पेटी उघडून तजांत॑ कायकाय आहे म्हणून पाह्यील॑.

कायकायकी pron  all sorts (of things, items etc.). कळनाते विध विध. uis (1) तला थोडपणीं मर्यादाकी, वागाच रीतीकी कळना वाटते. मझ॑ एक ल्हान चूकाला, तोंडाला आलते कायकायकी सांगाला आरंभ केला. (2) तिरुवनंतपुरमांत॑ "गुडमोरणिंग स्टोर्स" म्हणून एक दुकान आहे. ते दुकानांत॑ एक घराला पह्जते सगळीन मिळल. दुकानाच आंत वेघतानेच कायकायकी सामान ठिवलसाच पाव्हूया.

कायकी pron  some (or a) thing not known. कळनाते (एक). uis घडी घडी अमच॑ घराला तो येत अस्तो, तज मनांत कायकी आहे, विषय उघड॑ बोलत॑ नाही तो.

कायतरीन adj  anything. something. कळ्ळते कोणतीन. Note:- काहीतरी in sm. uis घडी घडी अमच॑ घराला तो येत अस्तो. मला तजकडे बोलाला वेळ नाही म्हणून तूच कायतरीन बोलून पाठिवूनटाक.

कायि n  unripe fruit. पिकनाते फळ॑. uis हे वर्ष अम्च घरच॑ समोरल॑ अंबाच झाडांत॑ भरून कायि झाल॑ तरीन, तजांत॑ पोणावांटाहीं झडून पडूनगेल॑. Note :- from Tamil.

कारण n  motive reason. निमित्त॑. uis तेनी दोन दिवसाच पुढे मी घरांत नसताना मला फोण केले म्हणून कळ्ळ॑. काय कारणामुळे फोण केले म्हणून मला कळना.

कारण n  cause. कारण. uis भारतांत॑ अत्ता डयाबीटीस भरूनदनास॑ येत आहे. हेला एक मुख्य कारण लोकांच जेवणांत॑ झालते व्यत्यासामुळे असूयाम्हणून सांगतात॑.

कारला n  bitter gourd. कडू रूचाच एक भाजीपाला. कारली. कारळी. uis कारला घालून गोज्ज॑ कराला किती दिवसापसून सांगत आहें मी. मझ॑ गोष्टीला थोडकपणीन मर्यादा देताने का ?     

कारली n  bitter gourd. कडू रूचाच एक भाजीपाला. कारला. कारळी ;  कारले in sm. uis कारलीच कडू रूच मला फार अवडल॑.

कारळी n  bitter gourd. कडू रूचाच एक भाजीपाला. कारला. कारली  ;  कारले in sm. uis पाष्टे अनशी पोटांत॑ अर्ध लोटा कारळीच रस पीलतर॑ आंगाला फार चोखोट होईल म्हणतात॑.

कारळीपेणी n  a fried snack made from rice flour and besan. तांदूळाच पीठ, बेसन हेजांत॑ केलते एक तळून खायाच पदार्थ. uis मला जेवणाच बरोर घरांत तळलते कारळीपेण्या खाणे फार इष्ट.

कारागृह n  jail. तुरंग. तुरंगा. कैद. दंड मिळ्लत्यांस॑ बंध करून ठिवाच ठिकाण. बंधखाना. uis दक्षिण आफ्रिकांत॑ ते काळांत होतत॑ वंशविद्वेषाच विरुद्ध     नेल्सन मंडेला केलत॑ भांडण॑मळे त्यांस सत्तावीस वर्ष कारागृहांत राह्यामत॑ पडल॑. 

काराबूंदी n  a fried savoury made of channa flour. खाराबूंदी. चणाच पीठांत॑ केलते एक मीठस्वादाच तळलते पदार्थ. काराबूंदी. uis काराबूंदींत॑ जास्ती भोंचणे घाटलतर॑ तज रूच वेगळ॑ होऊनजात॑.

काराभात n  a saltish snack  made of rice or rava. खाराभात. भातांत॑ अथवा र्रवांत॑ केलते एक मीठस्वादाच पदार्थ. काराभात. uis कित्येक होटलांत मिळाच काराभातालीं उप्पीटालीं एकच स्वाद अस्त॑.

कारामणी n  string beans. शेंगा वर्गाच एक भाजीपाला. Note :- from Tamil. uis एक दोन वारापसून बाजारांत॑ कारामणी उदंड सवंगविणी विकत आहेत॑ म्हणून गावांतल॑ होटलांत पूरा कारामणीच भाजी करून घालत आहेत॑. 

कारालस्सी n  saltish buttermilk. खारालस्सी. ताकांत॑ केलते पीयाच एक मीठस्वादाच पानीय. uis ताक-पाणी अणी कारालस्सी हे दोनालीन रूच सुमार एक सार्ख असत॑.

कारासेव n  a  fried savoury made of channa flour. खारासेव. चणाच पीठांत॑ केलते एक मीठस्वादाच तळलते पदार्थ. कारासेव. uis कारासेवांतल॑ मिरेच स्वाद मला फार अवडेल॑. 

कारुण्य n  compassion. pity. दया. करुणा. uis बीदीच कुत्रांकडे कारुण्य दाखिवणे चोखोटेच, पण नियंत्रण नाहीस्क॑ ते इकडे तिकडे हिंडत अस्त॑ अणी कित्येकदपा अमच॑ लेंकरांस चावत॑ पणीं. अस॑ होईनास्क॑ असाला काय वाट आहे तुमच॑ ? 

कार्तिक n  eighth month in the Hindu calendar. हिंदू पंचांगांत॑ आठवां महिना. uis कार्तिक महिना दक्षिणायनाच वेळ येत॑ अणी तुळसी विवाह, कार्तिक पौर्णमी हे दोन सण हे महिनेंत आचरण करतों.

कार्य n  a work or an activity. काम. uis याच वार मी चेन्नैला एक कार्यावर जातों. मझ॑ तिकडल॑ घर विकामते आहे.

कार्य n  an affair. व्यवहार॑. uis त्यंच मद्ये कायकी लपून ठिवामते कार्य आहे म्हणून मला संदेह आहे. कां म्हणजे, मी पाह्ताना अस्कीन ते दोघीं डोस्के लवींगून गुपचुप असतात॑.

कार्य n  a matter. a thing. कार्य. uis (1) तुझ॑ मनांत॑ काय कार्य असलतरीन मला सांग. मी तुला सहाय करतों. (2) काय कार्य झाल॑ तरीन मी सांगाच तू ऐकूनेच सराम॑.

कार्य n  an act or deed. काम. uis तो केलते कार्य मला बर वाटल॑ नाही. 

कार्य n  agenda. चालिवामत॑ विषय. uis मला मिळ्ळत॑ आमंत्रण पत्रांत॑ उद्याच कार्यक्रमाच कार्य काय आहे म्हणून लिव्हल॑ नाही-ते-करतां मी त्यांस॑ फोण करून विचाराला जातों.

कार्य n  predicate (in grammar). (व्याकरणांत॑) एक वाक्यांत॑ कर्ता विषयीं सांगाच गोष्ट॑. uis "मी अंबा खातों". हे वाक्यांत॑ "खातों" हे गोष्टाला "कार्य" म्हणतो.

कार्यक्रम n  programme. समारंभ. विशेष कार्य. uis अम्च गांमांत गेल महिना नृत्याच एक चोखोट कार्यक्रम झाल॑.

कार्यालय n  office. ऑफ़िस. कचेरी. uis बंगळूरांत असाच प्रसिद्ध विधानसौधाच बाजू एक नव॑ कार्यालय हे जवळ बांधले.

काल n  a period of time. काळ॑. समयाच वेळ. uis  ईस्ट-इन्द्या कंपनी भारताला याच काल॑ मोगळ साम्राज्य अधपतनांत॑ होत॑.

काल॑ n  yesterday. आजच पुढेच दिवस. uis आजचपक्षा काल॑ ऊन जास्ति होत॑. 

कालचक्र n  cycle of time. कालाच गती. uis बौद्ध धर्मांत॑ कालचक्र सिद्धांताला भरून प्राधान्य देतात॑.

कालदेव n  Lord Yama. यमदेव. uis कठोपनिषदांत॑ नाचिकेत अणी कालदेवाच मध्य॑ झालत॑ संभाषण अमच॑ धर्म परंपराच एक फार चोखोट उदाहरण म्हणून सांगूया. 

काल-नाही-तेरमा n  the third day before today. आज सोडून तीन दिवस मागल॑ दिवस. तेरमा दिवस. काल-नाही-तेरवा. uis हे वर्षी झालते तुरकडांच सण "रमज़ान" काल-नाही-तेरमा होईल म्हणून पह्यिल घोषणा केल॑ होत॑ तरीन, सणाच दोन दिवसापुढे काल-नाही-परमा होईल म्हणून कळिवले.   

काल-नाही-परमा n  day before yesterday. आज सोडून दोन दिवस मागल॑ दिवस. परमा दिवस. काल-नाही-परवा. uis काल-नाही-परमा गांधि जयंती होत॑-ते-करतां बेंकांला सुट्टी होत॑.

कालवा n  canal. कालवाई. कालवायी. वैक्काल. नदीच पाणी वेगळेकडे परतून सोडाला बांधलते व्यवस्था. Note. वैक्काल is a metathesised or mispronounced form of कालवाई where वाई(वै) gets pronounced before का. uis राजस्थानाच मरुभूमींत॑ "इंदिरा गांधी कनाल" म्हणून एक कालवा बांधलानंतर॑ ते जायाच दोनपटीसीं आवश्याप्रकार पाणी मिळाला आरंभ झाल॑ अणी बेष समृद्धि होऊन कृषी होताहे.

कालक्षेप n  getting on with life. उपजीवन॑. uis तीन लेंकीच वराड करून रिटैर होताना त्यंचकडे जास्तिकाहीं संपादन होतनाही. कालक्षेपाला वेगळ वाट नाही म्हणून त्येनी ल्हान लेंकरांस॑ शिकिवाच काम, म्हणजे, ट्यूषनाच काम आरंभ केले.

कालक्षेप n  time pass. वेळ चालिवणे. Note. क्षेप means casting away, throwing away etc. uis कालक्षेप म्हणाच गोष्टाला "वेळ चालिवणे" अस॑ अर्थ आहे तरीन हे गोष्ट ऐकताना सर्वसाधारण होऊन कथाकालक्षेपाच आठवण॑ येत॑.   

कालाजोक्त॑  adv  as per opportunity. वेळाजोक्त॑. समयाजोक्त॑. uis आतंगवादी संघटनांत॑ मिळ्लते लोकांबरोर सरकार बोली आरंभ कराला तय्यार असलतरीन कालाजोक्त॑ त्येनी त्यंच उद्देशाच काम करतील म्हणून जागृतांत॑ असाम॑.

कालानुकूल॑ n  opportune time. कार्य साध्य होयाच वेळ. uis विधान सभांतकी लोकसभांतकी असणार कित्येक सदस्य कालानुकूल पाव्हून पैसे घेऊन वेगळ॑-वेगळ॑ पक्षांत॑ मिळनास्क॑ असाला एक चोखोट नियम आणाला पह्जे.

कालावधी n  period of time. कालाच अवधी. एक निश्चय अवधीच वेळ. uis पुरातन ईजिप्ताच संस्कृति तीन-चार हदार वर्ष चालू होत॑तरीन, नंतर॑ ते प्रदेशांत॑ इस्लाम आल॑की-नाही ते संपूर्ण अदृश्य होऊनगेल॑. तसच, अत्ता हे काळांत॑ दुसर॑ देशांवर असाच अमेरिका अणी यूरोपाच स्वाधीन॑ उण॑ होऊन ते ठिकाणी चैनाच शक्ति वाढत आहे. हेजांतून कोण्त संस्कारालीं तज-तज कालावधी आहे अस॑ अम्हाला कळते.

कालिवण॑ n  a liquid food preparation like sambar, sar etc eaten with cooked rice. भाताच बरोर कालिवाच सांबार, सार, पिट्ळे, अंबटभाजी असलते पदांर्थ ; कालवण in sm. uis साधारणहोऊन अवियलाला एक तोंडलावणास्क पानांत॑ वाढणे आहेतरीन अम्च घरांत॑ सार, सांभार असलते कालिवणास्क॑ तेपणीं भातांत॑ कालिवून जेवतों.

कालिवणे vt  to mix (eg. food etc). वेगळ॑ वेगळ॑ पदार्थ मिळिवणे. कालवणे ; कालविणे/कालवणे in sm. uis मेतकूटाच पूड भाताच बरोर कालिवताना रूचाप्रकार॑ थोडक॑ मीठीं तेलीं मिळिवणे आहे.

काळ n  time. period. वेळ॑. काल. समय. uis अत्ता तला चोखोट काळ नाही वाटते. कां म्हणजे, काय काम आरंभ केलतरीन ते पुढे सरकत नाही.

काळ n  (grammar)  tense. व्याकरणांत॑ भूत, वर्तमान अणी भविष्य हेज समय. uis पुढे झालते क्रीयाविषयीं सांगाच क्रियापदाला भूतकाळ, सद्या होत असाच क्रियाविषयीं सांगाच क्रियापदाला वर्तमानकाळ अणी नंतर होयाच क्रियाविषयीं सांगाच क्रियापदाला भविष्यकाळ अस॑ क्रियापदाच तीन काळ आहे. 

काळकांडणे id  to eke out subsistence. कष्टी भोगून उपजीवन करणे. काळलोटणे. uis तला एक निश्चय काम काहीं नाही. इकडून-तिकडून काय काम मिळतकी ते करून काळकांडत आहे.

काळकांडणे id   to while away time. समय बरोर उपयोग करनास्क॑ व्यर्था बसणे. काळलोटणे. uis वीसा-स्टांपिंगाला म्हणून चेन्नैतल॑ यु. एस. कोणसलेटाला जाऊन मझ॑ पास-पोर्ट देऊन दहा दिवस झाल॑. त्यंच निर्णय काय म्हणून कळाला इन्टर-नेटांत॑ दिवसोडी पाह्त आहें. अण्खी किती दिवस अस॑ काळकांडाम॑ म्हणून कळत नाही.

काळलोटणे id   to eke out subsistence. काळकांडणे. कष्टी भोगून उपजीवन करणे. uis कोण्त॑ कामांत मिळ्ळतरीन थोडक दिवसांत तला काढूनटाकतील॑. कामधाम काहीन नाहीस्क॑ अत्ता तो काळलोटत आहे.

काळलोटणे id   to while away time. काळकांडणे. समय हाळ करणे. uis  मझ एक मित्र सत्तर वर्षाच असतील॑. फार दिवसानंतर मिळाले. मी त्यना विचारलों "कस आहेंत"? त्यनी उत्तर देले "कायकी, काळलोटत आहें".

काळवेळ n  appropriate time or occasion. सौकर्याच समय/वेळ. uis काळवेळ पाह्यनास्क॑ कोणाचतरीन घराला वेघून जायाच स्वभाव तला आहे.

काळ॑ n  black colour. काळ॑ रंग ; काळा in sm. uis  वज्राचीं कोळसाचीं मूल-धातू "कार्बण" असलतरीन एक झळकत॑ अणी दुसर॑ पाह्याला काळ॑ असत॑.

काळ॑ adj  of black colour. काळ॑ रंगाच॑. uis हे काळांत॑ भरूनदन॑ पिकलते केंस दिसनास्क असाला काळ-रंग लावींगून हिंडतात॑.

काळा adj  a dark man. काळ॑ रंगाच मनुष. uis मनुष काळा असलतरीन परवा नाही, आंतल॑ मन्न॑ निष्कलंक असलतरे पुरे, मी तला वराड करींगतों म्हणून तेन॑ म्हणट्ली.

काळासावळा adj  dark complexioned. काळ॑ रंगाच आंग. uis  ते दिवस मी गेलते वराडांत नवरा काळासावळा होता, पण नवरी उजळ होती.

काळांतर॑ adv  till eternity. for ever. काळाच अंत पतोरी. काळाच शेवटी पर्यंतीन (पतोरीं/पावेतोरीं). uis काळांतर॑ वेळी प्रळय येऊन हे ब्रह्मांड पूरा लय होईल म्हणून हिंदू धर्म वि्श्वास करत॑. 

काळी n  a dark woman. काळ॑ रंगाच बायको. uis ते पोरी दोघीन अवळी-जवळी असल॑ तरीन एकली गोरी आहे अणी अण्खी एकली काळी.

काळीपोती n  black beads in the mangalasutra. मंगळसूत्रांतल॑ क्रिष्णमणी. uis वराड झालते बायकांच॑ गरसोळींत॑ काळी-पोती कंडिप असाम॑ म्हणून आहे.

कावडि n  a religious ritual performed at temples by carrying a decorated wooden contraption on one's shoulder. लांकडांत केलते अलंकारच एक साधन॑ खांदाच वर उचलून देऊळांत॑ नाचाच एक नवस. uis तमिल नाडांत॑ मुरुगन देऊळांत॑ कावडीच नवस उदंड प्रचारांत आहे. Note:- कावड in sm means a bamboo pole slung across shoulder for carrying water, other loads etc.         

कावरा-आवरा होणे  vi  being shocked. caught off-guard. panic stricken. भींगून मनाला काहीं सुचनास्क होणे. uis  मझ मित्राच घरांत त्यंच कामवाली कबोडांतून पैसे चोरत असताना तिला धरूनटाकले. तेनी सांगिटले "ते वेळाल तिज तोंड कावरा-आवरा होऊन गेल॑ अणी एकदम घाम सुटाला आरंभ झाल॑. वेगळ वाट नाहीस्क रडाला आरंभ केली".

कावळा n  crow. काळ॑ रंगाच एक साधारण पक्षी. uis "मलयाळी नाहीते ठिकाणीन अणी कावळा नाहीते ठिकाणीन नाही"  अस॑ एक म्हण आहे.

कावळा n  raven. कावळाच वर्गांतल॑ एक पक्षी. uis कावळा दोन वर्गाच आहे. एकाच॑ गळा थोडक सावळ॑ असेल॑, अण्खी एकाच गळा काळ॑ असेल॑.  हे दुसर॑ वर्गाला इंग्ळीषांत॑ "रेवन" म्हणतात॑.

कावळा हांकणे id   to while away time doing worthless things. प्रयोजन नाहीते काम करून समय हाळ करणे. गाढव हांकणे. uis (1) केम्हा गेलतरीन मुनिसिपालिटी ऑफीसांत उदंड दन॑ काम-धंदा नाहीस्क॑ कावळा हांकत॑ बसलसाच पाह्वूया. (2) कायकी अदृष्टांत गळ्फांत तला काम मिळ्ल॑-के-नाही, "मीच थोर मनुष म्हणून" म्हणून बसलोता. खर॑ सामर्थ्य कळतांतरून तला कामांतून काढूनटाकले. अत्त कावळा हांकत बसलाहे. 

कावि n  ochre-red colour. गेरू रंग ; काऊ or काव in sm. uis सन्यासी लोके कावि रंगाच वस्त्र नेसींगतील॑. हेला मुख्य होऊन दोन कारण सांगतात॑. होमकुंडांत॑ द्याच॑ आहुती देवाला कावि रंगाच अग्नी पाविवत॑ अणी सूर्य उदय होताना पह्यिल॑ याच रंग कावि, हेच. 

काव्य n  poetry. कविता. uis तंजावूर मरठींत लिव्हलते काव्य मी हे पर्यंतीन पाह्यलते नाही.

काशीयात्रा n  a mock ritual in a wedding. वराडांतल॑ एक पद्धत॑. uis वराडाच वेळी काशीयात्राला नवरा जाताना तला आचार-उपचार करून वापस बलाईंगून याच नाटक-पद्धती पाह्याला तमाषा असल॑.

काष्ट n  dried wooden piece. वाळलते लांकडाच चूर. uis तुळसीच काष्टांतून केलते हार श्रेष्ट म्हणून सांगतात॑.

काषाय adj  red-ochre coloured. तंबडेस्क॑ एक रंगाच. गेरू रंग. uis हिंदू देऊळाच भोंताल॑-भिंतांत॑ काषाय अणी पंढ्र॑ रंगाच पट्टी एक सोडून एक ओढलसाच पाव्हूया.

काषाय n  dress of red-ochre colour worn by sanyasis. काषाय वस्त्र. सन्यासी लोक नेसाच वस्त्र. uis सन्यासी लोके काषाय नेसतात तरीन, "डिवैन-लैफाच" श्री श्री रविशंकर केम्हाहीं पंढ्र रंगाच कापडेच नेसतात॑. 

कास n  cash. money. पैसा. पल्लम. uis ए.टी.एमाच हे काळांत कास नाहीस्क॑ बाह्येर गेलतरीन काहीं भींगामत॑ आवश्य नाही, कोण्त बॅन्काच ए.टी.एमात जाऊनहीं कास काढूया.

कास n  coin. नाण्य. uis ल्हान मोलाच कास भीकारी लोकांस देलतर॑, हाता वाटे पणीन तेनी ते शिवनात॑.

कास n  a coin of the smallest value in use in the past. जुने काळाच ल्हान मोलाच एक नाण्य. uis जुने काळाच कासाच नाण्य अत्ता पायालापणीं मिळना. Note:- the word "cash" appears to be derived from "कास".

कासव n  tutle. tortoise. कसव. आमे (Tamil). uis कित्येक वर्गाच कासव तीनशें वर्ष पर्यंतीन जीवनांत असेल॑.

कासोटा n  dhoti worn by tucking in the pleats at the back and front of the wait.  धोती अथवा लुगड॑ मागेपठीसून वरकाढून अडकिवून नेसाच एक रीती. uis हे काळाच उण॑ वयाच बायका कासोटा नेसाच फार अप्रूप झालाहे म्हणून मात्र न्हो, ते कस॑ नेसणे म्हणूनपणीं भरूनदनास॑ कळना. Note:- कास means "the tuck of the धोतर (धोती) or लुगडे ".

काहीं adj  some. कायतरीन ; काही in sm. uis शेजारल॑ घरचा मला बलावल॑ तर॑ मी नाही म्हणून सांगूनटाक अणी पैसाकास विचारल तर॑ काहीं द्याला होईना म्हणूनटाक.

काहींएक adj  anything (known or unknown). (कळ्ळतेकी, कळनातेकी) कोण्त तरीं एक. uis  (1) अम्च ऑफीसांत॑ गोळमाळ करून पैसा गिळतले मनुषाला धरलेकी-नाही, काहींएक लबाड सांगून चुकाला वाट आहेका म्हणून तो वर-खाले पाह्त होता. (2) आसपत्रींत॑ मिळिवून चार दिवस झालतरीन तला काय रोग आहे म्हणून हे पर्यंतीन वैद्यांस॑ (डोक्टरांस॑) कळ्ल॑ नाही. विचारलतर॑, "काहींएक कारणामळे असूया" म्हणून सांगतात॑.

कां adv  why ? कसाला ? uis कां मला उगे नच्च करेत आहेस, मझ॑पाड असाला सोडनास्का ?

कांकण॑ n  bangle. चुडी. हातांत॑ घालाच आभरण. uis बायका हिरव॑ रंगाच कांकण॑ हाताला घालींगणे ऐश्वर्याचीं भव्याचीं चिन्ह म्हणतात॑.

कांगोण्या n  a type of small blue berry, called मणतक्काळी in Tamil. नील रंगाच ल्हान पंडु (तमिलांत हेला मणतक्काळी म्हणतात). uis मीठ लावून ऊनांत वाळिवलत॑ कांगोण्या घालून गोड्डुपिट्ळे करणे आहे. 

कांख n  arm pit. कांध. खांक. कक्ष. हात आंगाला मिळाच स्थल॑. uis थोरळे बायका "स्लीवलेस" चोळी नेसींगून कांख दाखिवणे त्यंच वयाला अवमर्यादा केलास्क अस्त॑.

कांचन n  gold. सोन॑. स्वर्ण. uis सोनेला कांचन म्हणून पणीन नाव आहेतरीन साधारण होऊन लोके तस॑ म्हणत॑ नाहीत॑. 

कांटा n  thorn. झाडांच टोंचाच भाग ; काटा in sm. uis झाडांतून लिंबू तोडताना दत्तन (जत्तन) असनातर॑ हाताला कांटा लागूया.

कांटा n  hand of a watch. घडिगाराच हात ; काटा in sm. Note:-  घड्याळ in sm for watch. uis जुन॑ काळाच घडिगाराला चावी देलांपिरी हाता वाटे तज कांटा ढकळून देमते पडते.

कांठ n  the decorated border of a saree or any dress material (with zari etc). लुगडे, धोती असलते वस्त्राच अग्र भाग. uis कासोटा नेसताना लुगडेच/धोतीच कांठ बरोर दिसास्क॑ नीरे घाटलतर॑ पाह्याला बेष असेल॑.   

कांठ n  edge. verge. brim. rim. कांठ. uis गृहप्रवेश करताना दूध तावून भांडीच कांठ पतोरी येऊन बाहेर ओतून सोडलतर॑ ते घराला ऐश्वर्य म्हणून सांगणे आहे.   

कांठ n  bank. shore. coast. land bordering a water body. तट. तीर. नदी, तडाग, अथवा समुद्राच बाजूच ठिकाण/भूमी ; काठ/कांठ in sm. uis पाणीच सौकर्यामळे पहिल॑-पहिल॑ मनुषांच वास युफ्रटीस/टैग्रीस, सिंधू, नैल (नील) असल॑ नदींच कांठांत॑ झाल॑.

कांठशी adv  by the shore of a lake, river, sea etc. कांठाच बाजू. uis  समुद्राच कांठशी राहणारांला उक्काडा अधीक वाटल तरीन, सायंकाळी समुद्राच वार॑ खायाला सौकर्य मिळल॑.

कांठावर बसणे id   to be mentally very distressed. मनाच फार कष्टांत असणे. uis मझ मित्र  कांठावर बसलाहते अस मी ऐकलों. लेंकरे कोण्हीं  बरोर वाचणे-शिकणे केल नाहीत॑ अस मला नंतर॑ कळ्ल॑.

कांड n  chapter or section of a book. पुस्तकाच अध्याय अथवा भाग. खंड. uis रामायणांत॑ सुंदर कांड वाचला मला उदंड अवडल॑.

कांडणे vt to pound. कुटणे. uis हे काळांत॑ साराच पूड, सांबाराच पूड हे अग्गीन कराम॑ म्हणजे कोणीं उखळांत कांडून करत नाहीत॑. ते तेवढीन "मिक्सीत॑"  करूनटाकतात॑. 

कांती n  splendor. light. lustre. तेजस. शोभा. uis अगाऊच काळाच सिनिमा नटी वैजयंतीमाला बाली थोड दिवसा पुढे "टी.वींत" बोलत होती. तिज चांगळपण॑ अणी तोंडावर असलते कळा-कांते सर्वीं गेलाहे. अत्ता उदंड म्हातारी दिसते.

कांदा n  onion. संपाकाला उपयोग कराच एक भाजीपाल. uis प्रति वेळीं डोळेंतून पाणी येते म्हणून कांदा कापणे म्हणजे मझ॑ बाईलीला थोडकीन अवडना.

कांध n  arm pit. कांख. खांक. कक्ष. हात आंगाला मिळाच स्थल॑. uis थोरळे बायका "स्लीवलेस" चोळी नेसींगून कांध दाखिवणे त्यंच वयाला अवमर्यादा केलास्क अस्त॑.

कांपणे vi  to shiver or tremble. कांपणे ; कापणे in sm. Note:-  कापणे in sm also means 'to cut'. uis मझ॑ बापाला मलेरियाच जेरामळे, मध्य-मध्य ते येतानाअग्गीन कांपणे पणीं होत-होत॑.

कांब n  a metal wire. कांबि. कंबि. तंति. तार. धातूच तार. uis घरच॑ मागे पटीस कापड वाळीवून घालाला म्हणून दोन-तीन कांब बांधून घाटलाहों.

कांब n  a rod made of iron or any metal. लोखंडाच अथवा वेगळ॑ धातूच लांब काठी. uis घर बांधाला "स्टीलाच" कांब मुख्यहोऊन पह्जते एक साधन आहे. 

कांब मोजणे id   to be behind bars. to be jailed. जैलाल जाणे. uis मला कळ्लते एक मनुष ल्हनपणांतच विपरीत बुद्धि दाखिवत होता, पण जातां-जातां ते कुबुद्धींत॑ जाऊन पावले. अत्ता तो पाळयमकोट्टै जैलांत॑ कांब मोजत बसलाहे.

कांबळ॑ n  woolen blanket. बक्राच केंसांत केलते पांघरिवाच घट्टि कापड. Note:-  कांबळे in sm means 'coarse blanket'. uis दक्षिण भारतांत॑ हिमाळाच (हिंवाळाच) काळांत॑ एक-दोन दिवस सोडून वेगळ॑ दिवसालाअग्गीन कांबळ॑च पांघरिवणाच आवश्य असना.

कांबळ॑ n  wool. बक्राच केंस. uis बक्राच कांबळ॑ साधारण होऊन वर्षाल एकदपा काढतात तरीन कित्येक वर्ग बक्राच कांबळ॑ वर्षाला दोनदपा काढणे आहे.

कांबि n  a metal wire. कंबि. कांब. तंति. तार. धातूच तार. uis घरच॑ मागे पटीसच॑ कापड वाळिवाला म्हणून ब्वांधल॑ होतत॑ कांबि तुटून कापडे अग्गीन चिक्कोलांत पडल॑.

कांस॑ n  bronze. an amalgam of copper, zinc and tin. ताम्र, जस्त अणी कधीलाच॑ मिश्र धातू. uis चोळ राजांच काळांत केलते कांसाच विग्रह फार सुंदर असत॑. 

कांस॑ n  gunmetal. a type of bronze, being an  amalgam of copper, zinc and tin in a different proportion to bronze. ताम्र, जस्त अणि कधीलाच मिश्र धातू ; कांसें in sm.Note:- कंच (brass) is an alloy of copper and zinc, whereas कांस॑ (bronze and gun metal) has some tin also in it. uis (1) जुने काळांत तोफ/तोप कराला कांस॑ वापरेत होते तरीन अता अनेक विधाच यंत्राच भाग हेजांतून करतात॑. (2). युद्धभूमींत अति विशिष्ट धैर्य दाखिवाच योधांला ब्रिटनाच "विक्टोरिया क्रोस" पदक देणे आहे. हे पदक ब्रिटन अणी रस्स्याच (रूसाच॑) मध्य॑ सेवस्टपोळांत झालते क्रिमिया युद्धांत धरल॑ते तोफ विघरिवून कराच॑ म्हणतात॑.     

कांस॑ n  bell metal. an amalgam of copper and tin. ताम्र अणि कधीलाच॑ मिश्र धातू ; कांसें in sm. uis कांसाच पात्रांत कराच साराला एक प्रत्येक रूच अस्ते. 

किचकिच n  tickle. कुचकळी. uis  ल्हान लेंकरांला किचकिच करून हांसिवलर॑ त्यंच हांसाच शब्द ऐकाला बेष असल॑.

किचकिच n  henpeck. कचकच. सळिवाच स्वभाव. किरकिरी. Note:- सलणे in sm means 'to rankle'. uis बाईलीच किचकिच स्वभाव सोसाला होयनास्क॑ तो केम्हापाह्यलतरीन ऑफीसांतच बसलसतो.

किच्चडि n  a dish of cooked rice and pulse. तांदूळीं दाळीं मिळिवून शिजिवून कराच एक पदार्थ. uis किच्चडीच बरोर आलाच रायत॑ तोळ्लाईंगून (तोंडलावींगून) खायाला बेष असल॑.

किच्चडि fig  mixed up mess. गोंधळाच स्थिति. uis ते काम मझ॑पाड मीच करत असताना, मझकडून काढून तो हाळ करून ठिवला. अत्ता तेईं नाही येईं नाही म्हणून किच्चडि झालाहे. 

किडक॑ adj  worm eaten. कीडा खाल्लते ; किडका in sm. uis बाहेरसून पाह्याला अंबा किडके म्हणून दिसल॑ नाही तरीन, भरूनदपा गोट्टीच आंत॑ किडा असल॑.

किडा n  worm. maggot. कीडा. कृमी. अळा ;  किडा/कीड/किडू in sm. uis हे वर्ष पाऊसाळाच वेळी अमच॑ बागांत भरून किडा वेघून सगळ॑ फूलीन खाऊन सत्य नाश करूनटाकल॑.

कित्ति adj  how many. how much. केवढ॑  ; किती in sm. uis कित्ति सांगटल॑ तरीन ऐकना म्हणतो, मला उगे सळिवत आहे.

कित्तिएक adj  some. कित्येक. uis कित्तिएक लोकांस॑ नव॑ भाषा शिकणे फार सुलूभान होत॑. 

कित्तिएकदपा adj  once in a while. some times. कित्येकदपा. एक वेळ. केम्हातरीं एकदपा. केम्हातरीं एकदा. uis (1) अम्च घाराच जवळ॑ रामा अणी लक्षमणा म्हणून पाह्याला एकसारख॑ असाच अवळी-जवळी अहेत॑. त्यंच मायेलापणीं हे दोघे मध्य कोण कोण आहेत म्हणून कित्येकदपा चुकून जाते. (2) कित्येकदपा विसरून जातों म्हणून मी दिवसास्क॑ मझ॑ डैरींत॑ तसल॑ विषय पूरा लिव्हून ठींगणे आहे.

कित्तितरीं adj  several types or ways. भरून रीतीच॑. uis अत्ता अग्गीन उघडाच मोट्ठ॑ मोट्ठ॑ "माळांत॑"  कित्तितरीं विध-विधाच साधन ठिवलाहेतकी, ते पाह्यलतरेच विसंबाला होईल॑.

कित्तिदपा adv  how many times ? केवढे दपा ? कित्तिदा ? uis जेवलांपिरी ताट विसलून ठिवाम॑ म्हणून कित्तिदपा सांगटलतरीन तो ऐकना. शेवटी, मीच बसून ते घांसाम॑.

कित्येक adj  some. कित्तिएक. कितेक. uis पिकिवाला म्हणून गवतांत॑ गुंडाळून कित्ति दत्तन ठिवलतरीन कित्येक अंबा कुजून जात॑.

कित्येकदपा adj  once in a while. some times. कित्तिएकदपा. एक वेळ. केम्हातरीं एकदपा. केम्हातरीं एकदा. uis तो पोर फार बुद्धिवंत॑ म्हणून मी ओपींगतों, पण परीक्षाला वाचामत॑ रीतींत॑ वाचल॑ नाहीतर॑ हरूनजावूया म्हणून मला कित्येकदपा वाटत॑.

किरकणे vt  to scribble. to doodle. लक्ष्य नाहीस्क लिव्हणे/ओढणे/होढणे. uis लेंकरे भिंतिवर अस्गीन किरकतात म्हणून कितेकदन॑ त्यंच घराला येणार लेंकरांना द्याल करतां "'ड्राईंग षीट्स" घेऊन ठींगट्लासतात॑. Note :- from Tamil.

किरकिरी n  irritating (behaviour). troublesome. तंटा कराच॑ (स्वभाव). किचकिच. uis सहा महिनापसून अम्च ऑफीसांत॑ मानेजराच स्थल॑ खालीहोऊन पडलहोत॑. शेवटी, येऊन पावलते मानेजर एक थोर किरकिरी मनुषास्क वाटत॑.

किरण n  a ray of light, of Sun or Moon. सूर्याच अथवा चंद्राच एक रश्मी. uis सूर्याच किरण एक प्रत्येक दिवस देवाच विग्रहाच व॑र पडाच अतिशय व्यवस्था कित्येक देऊळांत॑ आहे.   

किरातक adj  to be violent.  to be cruel. क्रूरपणांत॑ असणे. uis  कित्येक धर्माच लोके किरातकपणान॑ वागताते. हेज परिणाम॑/उदाहरण॑ अम्हाला भूलोकांत॑ अनेक ठिकाणी भयंकर नाश-नष्ट होयाच दिसते.

किरि-किरि adj  irksome. troublesome. ल्हान-ल्हान उपद्रव द्याच॑. uis वराडाच घरांत॑ नवराच घरच॑ लोकांस अवंतरण॑ करताना कोणतरीन किरि-किरि लोक॑ असलतर॑ त्यांस सोडनास्क॑ प्रत्येकहोऊन पाह्यींगाम॑.

किरीट n  crown. मुकुट. uis ब्रिटनाच राज किरीटाच॑ मध्य॑ असाच॑ कोहिनूर वज्र गोळकोंडा प्रांतांतून मिळ्ळत॑ म्हणतात॑. 

किलसात n  key. चावी ; किल्ली or चावी in sm. uis अम्च लेंकीच वराडाच दिवसी नवरीला नेसिवामत॑ मुहूर्ताच लुगडे, मंगळसूत्र, तसेच वेगळ॑ सोनेच माळ-मत्ता अग्गीन ठिवल॑ होतते लोखंडाच पेटीच किलसात कोठकी हरपूनटाकून मझ॑ बाईल तय्या-तक्का नाचत होती. शेवटी, देवाच दयान॑ मुहूर्ताच नंखर पुढेच मिळून गेल॑.

किलुप n  lock. कवाड, पेटी असले साधन॑ दत्तन (जत्तन) ठिवाला उपयोग कराच एक साधन. कुलूप in sm. uis गॉद्रेजाच किलुप उदंड चोखोट म्हणतात॑. पण, एक दिवस एकला नुस्त कांबांतून ते उघडून दाखिवलांपिरी मला तजवर असाच पातेरा पूरा गेल॑.

किलुपांत॑ घालणे vt  to imprison. जैलांत॑ घालणे. कारागृहांत घालणे. uis बांगळूरच पोलीस मद्य-मद्य गांवाच गुंडा लोकांस अग्गीन धरून किलुपांत॑ घालणे आहे.

किल्ला n  fort. दुर्ग. uis उत्तर भारतांत॑ अनेक विदेश सैन्यांच आक्रमण झाल॑ म्हणून इतिहास वाचलत्यांस॑ कळेल॑. तसच, तिकडल॑ राज्यांमध्यहीं थोर थोर युद्ध झाल होत॑. हेज परिणामकी कायकी दक्षिण भारतापक्षा तिकड भरून मोट्ठ॑-मोट्ठ॑ किल्ला आहे. 

किळी-किळी n  tickling sensation when someone touches a sensitive part of the body. कुचकळी ; कुचकुली in sm. uis  ल्हान लेंकरांस॑ थोरळेंला किळी-किळी करणे म्हण्जे फार आनंद अस्ते. परतूं तेन्हाला थोरळे किळी-किळी कराला पाह्यलतर॑ पळून जातील॑.

किवडपण॑ n  deafness. किवड॑च अवस्था. किंबडपण॑. uis वय होतां होतां  किवडपण॑ जास्ती होत जाताहे तरीन, ते ओपींगाला तय्यार नाहीस्क॑ बसलाहे तो.

किवड॑ adj  deaf. कान ऐकनाते अवस्था. किंबड॑ ; किवडा in sm. uis किवड॑ लोके हाताच बोटांतूनच चिन्ह दाखिवून त्यंच मध्य बोलींगाच पाह्यलतर॑ अम्हाला ते एक गूढ भाषास्क॑ वाटते.

किष्टांजन॑ n  deer hide used as a sitting mat by ascetics and for keeping puja items ritually pure. क्रिष्णांजन॑. कृष्णांजन॑. सोवळेंत॑ बसाला उपयोग कराच हरणाच चर्म. पूजा सामान सोवळेंत॑ ठिवाला उपयोग कराच हरणाच चर्म. uis अमच॑ घरांत असाच किष्टांजनाच संपुष्ट सुमार दोनशें वर्षापसून अमच॑ कुटुंबात॑ आहे.

किसणी n  grater. scraper. किसाला उपयोग कराच उपकरण॑. uis नारळ किसाच किसणी प्रयोग कराला तज दंडक असलत्यांसच होईल॑. तज दंडक नसणार ते वापरलतर॑ बोटाला घाव लागुया.

किसणे vt  to grate. to scrape. किसून काढणे. uis नारळ किसणे म्हणजे मझ॑ बाईल भींगते, कारण किसताना बोटाला लागून घाव होईलका म्हणून तिला भें आहे.

किसमिस n  raisins. dried grapes without pips. खिसमिस. वाळलते द्राक्ष॑. uis साधारण म्हणून नित्य देवाच नैवेद्याला अम्ही किसमिस अणी खडेसाखरे ठिवतों.

किंबडपण॑ n  deafness. किंबडेच अवस्था. किवडपण॑. uis  साठ वर्षाच वय होतांतरून उदंड लोकांस थोड किंबडपण॑ आरंभ होणे सहजच॑.

किंबड॑ adj  deaf. कान ऐकनाते अवस्था. किवड॑. uis कित्येक किंबड॑ लोके घट्टी बोलतील॑, कारण, त्यांस बरोर ऐकांव॑ म्हणजे दुसरे घट्टी बोलांव॑की, तसेच दुसरेंसीन म्हणींगून घट्टी बोलतील॑. 

किंबडाच कानांत किन्नर वाजिवलतास्क॑ say  a saying meaning, 'to indulge in a futile exercise of telling or advising a person who does not want to be advised'. ऐकाला तैय्यार नाहीते मनुषाला उपदेश देऊन प्रयोजन नाही’, असलते अर्थाच एक म्हण. Note :-  The litteral meaning is 'playing music to a deaf person'.

की conj  an indicative expression (suffixed). सूचना कराच प्रत्यय. uis एक दिवस मी मझ॑ अलमारीच किलसात हरपूनटाकलों. नंतर॑ वेगळ॑ कसाचकी किलसातांत॑ उघडाला झाल॑.

की conj  or. हे नाहीतर॑ ते. अथवा. uis आज तो मला येऊन पाह्तों म्हणट्ला. पण तो येईलकी नाहीकी म्हणून मला संदेह आहे.

कीडा n  worm. maggot. किडा. किडू. कृमी. अळा ;  किडा/कीड/किडू in sm. uis अंबाच झाडाला फूल सोडतानाच औषध बडिवल॑ नाहीतर॑, पिकाच वेळी पंडूंत॑ कीडा याला साध्य आहे.

कीर्तन॑ n  religious musical narrative. देवाविषयीं सांगाच गाणे. uis दिवसोडी संध्याकाळी देवाच दिवा लावून समच एक-दोन कीर्तनाच "सी.डी." ऐकणे अम्च घरांत॑ एक दंडक झालाहे.

कीर्तिमान adj  renowned. celebrated. प्रसिद्धी झालते. uis अणुशास्त्र विज्ञानी ॲल्बेर्ट ऐन्स्टीन त्यंच "थियरी ऑफ़ रिलेटिविटी" प्रस्थावना करताना जर्मनींत॑ पेटेन्ट-ऑफीसांत॑ "टेक्निकल-सहायक" म्हणून एक ल्हान पदवीच उद्योगांत होते. पण, "थियरी ऑफ़ रिलेटिविटी" प्रसिद्ध झाल॑ नंतर तेनी माहा कीर्तिमान झाले. 

कीर्ती n  fame. renown. प्रसिद्धी. uis नामक्कल देवीच अनुग्रहामळे इषोब-शास्त्रांत॑ थोर पांडित्य संपादलते श्रीनिवास रामानुजनाच कीर्ती लोकांला कळून याला केंब्रिड्ज यूणिवेरसिटीच प्रोफ़सर हार्डीच एक थोर भाग होत॑.

कुग्राम n  hamlet. ल्हान खेडे गांम॑. uis भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाल॑ तरीन भरून कुग्राम प्रदेशांत॑ अत्त पणीन पीयाच पाणीच व्यवस्था बरोर नाही. 

कुचकळी n  tickling sensation. किळी-किळी ; कुचकुली in sm. uis ल्हान लेंकरांस जास्ती कुचकळी करल॑तर॑ श्वास धरेल म्हणून तस॑ करताने.

कुचुकुचू-बोलणे vt  talking in whispers. to talk in subdued tone. उणे शब्दांत॑ बोलणे ; कुचकुचणे in sm.  uis  नव वराड झालते पोर-पोरी वेगळ॑ म्हणून जाऊन कुचुकुचू बोलींगणे काहीं अतिशय नाही.

कुजक॑ adj  rotten. decayed. कुजून नासलते ; कुजका/कुजकट in sm. uis दहा दिवसाच पुढे एक किलो सपोटा घेटलते विसरून आज ते उघडून पाह्ताना पूरा कुजून पडलोतत॑ पाह्यलों.

कुजणे vi  to rot. to decay. कुजून नासणे. uis फल-पंडूच कुजणे उणे करांव॑ म्हणजे फिड्जांत ठिवताना प्लास्टिक-कवराच आंत गुंडाळून ठिवताने.

कुजिवणे vt  to let a thing rot. कुजून नासिवणे ; कुजवणे/कुजविणे in sm. uis नाटी-दारू करताना तजांत कुजिवल॑त॑ पंडू घालतील म्हणतात॑.

कुटणे vt  to pound. कुटून चूर्ण करणे. कांडणे. uis हातांत॑ कुटून केलते तिखटमीठाला (तिखटचट्णीला) मिक्सींत॑ केलतेपक्षा रूच असते.

कुटीर n  hut. गोठा. झोपडी. uis राणाच आंत राह्याच आदिवासींच कुटीर सगळीन हत्ती ध्वंस करून नास करल॑ म्हणून त्यांस नव॑ घर बांधून देंव॑ म्हणून सरकाराला विपक्ष-दळाच नेता विधानसभांत॑ विनंती करले.

कुटुंब n  family. परिवार. uis स्वतंत्र भारताला एकच कुटुंब, म्हणजे, नेहरू परिवार तीन प्रधानमंत्री देलाहे.

कुडिका n  ear studs worn by men. दादिगे/दाद्ग्ये कानाला घालाच एक आभरण॑ ; कुडकी in sm. uis मझ॑ ल्हानपणांत॑ "क्ळास आठांत॑" वाचत असताना अम्च इतिहासाच पंतोजी (हेनी इषोबाच क्ळास पणीं काढत होते) कुडिका घालींगाच पाव्हून अम्हाला अग्गीन मष्किरी वाटत होत॑. Note:- this was a fashion in the 19th and early 20th century in Southern India.

कुणबी n  a farm hand. a peasant. an agricultural field hand. ryot. शेतीच काम करणार. जमीनांत काम करणार. नांगरणार. uis येतां येतां हे नव॑ काळांत शेतीच कां करिवाला कुणबी मिळणे फार कष्ट झालाहे.

कुणबीण॑ n  a farm hand's or peasant's wife. कुणबीच बाईल॑. uis कुणबी लोके मात्र नोहो, कुणबीण लोके पणीन मिळणे कष्ट झालाहे, कारण, त्यांस पटणांत चोखोट चोखोट काम मिळत॑, हेच.

कुत्तके n  a contract for alienation of rights to the fruits, leaves and other produce of trees, plants etc.  झाडाच पंडु, पान हे सगळींच वर द्याच व्यापाराच अधिकार॑. uis अम्च घरासमोरल॑ तीन कढीपत्ताच झाडीन मझ॑ आजी वर्षा-वर्षी कुत्तकेला देवूनटाकून, नंतर॑ संपाकाला कढीपत्ता पह्जे म्हणताना कोणालीन कळनास्क॑ तेच झाडांतून तोडून काढतहोते. Note :- from Tamil.

कुत्र n  dog. bitch. एक प्राणी. uis घर पाह्यींगाच कुत्राच वर्गांत॑ "अलसेषन" कुत्र उदंड चोखोट म्हणतात॑. Note:-  कुत्रा for dog & कुत्री for bitch in sm, कुत्रे in sm means 'a small dog'/'puppy.'

कुत्राच पूंसाला लांब करिवाला होईल का ? say a saying meaning "old habits die hard". "जुन॑ दंडक सोडणे कद्दीन होईनाच होईना", हे अर्थाच एक म्हण.

कुप्पा n  garbage. कचडा. केर ; कचरा in sm. uis अम्च बीदींत॑ कोरपरेषनाच लोके घरोघर येऊन कुप्पा काढींगून जातात तरीन, अम्च शेदारल॑ (शेजारल॑) घरच लोके कित्ति सांगटलतरीन त्यंच घरच कुप्पा बीदींतेच भिरकावतील॑. Note :- from Tamil.
 
कुप्पा-कुप्पा fig  a large quantity. immeasurable quantity. मूटा-मूटा. भरून. उदंड॑. उजंड॑. Note :- from Tamil. uis दहा वर्ष एक कामपणीं नाहीस्क रिकाम होऊन बसलत॑ मनुषाला नंतर अदृष्ट बडिवल॑. कसकी गळ्फांत॑ जाऊन कुप्पा-कुप्पा पैसा संपादींगून आला.

कुप्पि n  bottle. बोट्टल ; कुपी in sm. uis अत्ता दूध पोळितीन साषेटांत॑ येत॑. पुढे अग्गीन कुप्पींत॑ येत होत॑. Note :- from Tamil.

कुबुद्धी n  evil mindedness. ओंगळ॑/वंगळ॑ मन्न॑. uis ल्हा वयेंतूनच कुबुद्धी दाखिवत होतत॑ ते पोर अता थोर झांपिरी अवघड 

कुमार n  youth. ल्हान पोर. uis विदेशाच खेळ-संखांच बरोर अमच॑ संघ तुल्य होऊन खेळांव॑ म्हणजे कुमार वये असतानाच बरोरल॑ अभ्यास देलतरेच होईल.

कुमारी n  young girl. ल्हान पोरी. uis पोरींच जिम्नास्टिक्स खेळांत॑ प्रबल होंव॑ म्हणजे कुमारी असतानेच त्यांस चोखोट अभ्यास द्याला पह्जे.

कुमारी n  virgin. वराड झालनाहीते पोरी. uis मझ॑ सोयरीकांत एकली वाराड होईनास्क॑ तसेच कुमारी विणी राहूनगेली.

कुरढणे vt  to crawl on one's buttocks. खुरडणे. टीरींत॑ र्रांगणे ; खुरडणे in sm. uis बीदीच कुत्राला कोणकी धोंडा बडिवून तज मागल॑ पांयाला थोर घाव लागलाहे. अत्ता तला पुढे जाम॑ म्हण्जे कुरढेत-कुरढेत जायालच होईल.   

कुरढणे fig  to be a slow coach. to be a laggard. हळ्ळु शिकणार. uis "मी अठ्रा महीने पतोरी घरांत कुरढत होतों. तेवढीन हळ्ळु शिकलों" अस मझ आजी सांगतील॑.

कुरळ॑ adj  curled. गुंडाळून-वांकलते आकारांत॑ असाच॑ ; कुरळा in sm. uis अत्तलीकडे केंस कुरळ॑ कराच साधन मिळते.

कुरळेकेंस n  curly hair. कुरळते केंस. uis बायका पोरींना उजळ काताड, कुरळेकेंस, मोठ डोळे अणी उंच वाढ हे सर्वीं असणे त्यंच अदृष्ट म्हणून सांगूया.

कुरुवड्या n  sun-dried crispies made from rice flour, eaten after frying. ऊनांत वाळिवून तळून खायाच तांदूळाच पीठाच वड्या. uis वर्षा वर्षी मझ॑ अम्मा  उन्हाळाच॑ पुढेच कुरुवड्या, कोह्ळवड्या असलते अग्गीन घालून अम्ही साळेच सुत्तींत घराला एक महिनेच सुट्टीला येऊन जाताना देऊन पाठिवतील॑.   

कुरूप adj  ugly. पाह्याला बर॑ नसाच॑. विकार॑. uis हान्स क्रिस्टियन आन्डेरसन यांच॑ "द अग्ळि डकळिंग" खाणींत॑ शेवटी सुंदर झालते हंस॑, पिल्लू असताना उदंड कुरूप होत॑ म्हणून संकटांत॑ होत॑.

कुर्सी n  chair. बसाला उपयोग कराच एक साधन ; खुर्ची in sm. uis कित्येक सरकारी साळेंत॑ लेंकरांस॑ बसाला कुर्सी नाही म्हणून भोई व॑र बसिवतात॑.

कुल n  clan. वंश. uis अमच॑ समयांत एक वराड निश्चय कराच पुढे नवरा नवरीच कुल, गोत्र, जातक हे अग्गीन बरोर आहेका म्हणून पाह्यला नंतरेच पुढच॑ काम करणे, पण अत्तच॑ काळांत पोर अणी पोपोरी ते अग्गीन पाह्यनास्क॑ वराड करींगतात॑. 

कुलगुरू n  family priest. कुटुंबाच पुरोहित. uis अम्ही अनंतशयनांत असजोरी अमच॑ कुलगुरू रामाचार अणी त्यंच काळाच नंतर॑ त्यंच लोंक पद्दु-आचारे हेनीच अग्गि सणवारालीन घराला येऊन पूजा अग्गीन करेत होतत॑.

कुलदेवता n  family deity. कुलाच देवता. uis अम्च कुलदेवता बनशंकरीच नवरात्रि-उत्सव बादामींत॑ पौष्य (पौष) महिना शुक्लपक्ष अष्टमीला आरंभ होऊन पौर्णमीला संपते (वारते).

कुलधर्म n  traditional values of the clan. परंपरांतून कुलांत॑ चालत असाच धर्म. uis एक नव॑ सूनाला घराला आणिवताना अमच॑ कुलधर्मा जोक्त॑ वागेलका तिन॑ म्हणून अमच॑ मनांत केम्हाहीं असत॑.

कुलपरंपरा n  family tradition. परंपरा परंपरांतून कुलांत॑ चालत असाच रीती. uis नव॑ सूनाला अमच॑ कुलपरंपरा कित्ती लोक्कुर शिकिवतों की, तेवढीन चोखोट॑.

कुलमर्यादा n  family decorum. कुलाच गौरव॑. कुलाच मान-मर्यादा. uis  मला कळ्ळत॑ एक चोक्कोट कुटुंबांत॑ त्यंच एकच लोंक अवघडविणी होऊन त्यंच कुलमर्यादाला कित्ती अवगणना कराला होईलकी त अग्गीन करेत बसलसाच पाव्हून मला संकट वाटत॑.

कुलसंप्रदाय n  traditional customs or practices of the family. परंपरांतून कुलांत॑ चालत असाच आचार-विचार. uis पल्लमदारविणी होतत॑ ते कुटुंब अत्ता पैसाच कष्टांत तरपडत आहेत तरीन त्यंच कुलसंप्रदाय पूर्त दत्तन ठींगट्लाहेत॑.

कुलाचार n  traditions of the family. कुटुंबांत॑ परंपरा परंपरांतूं असाच आचार-विचार. uis कुलाचार, कुलसंप्रदाय हे अग्गीन अवगणना करलतर॑ तज परिणाम अत्ता कळना, पण पुढे जातां जातां अमच॑ लेंकराच वाग पाव्हून अम्हालाच वाईट वाटेल॑.

कुल्फी n  a type of (Indian) ice-cream. एक हिंस॑ गुळ्चीट देशी पदार्थ. uis कुल्फीच बरोर पाह्ताना ऐस-क्रीम थोड मौ असेलतरीन, कुल्फींत॑ सायेच रूच प्रत्येक होऊन कळेल॑.

कुश n  name of a sacred grass. पूजाला उपयोग कराच एक प्रकारच गवत.uis दर्भ, कुश अणी दुर्वा अस॑ तीन विधाच पुण्य गवत पूजा संप्रदायांत उपयोग करतात॑.

कुशी n  happiness. संतोष. आनंद ; खुशी in sm. uis ल्हान लेंकरांस॑ त्यांस॑ पह्जते मिळताना होयाच कुशीला निजहोवून शुद्ध कुशी म्हणून सांगूया.

कुष्ट n  leprosy. एक प्रकारच महारोग. कुष्टरोग. uis कुष्टाच पहिलच चिन्ह आंगांत कोठतरीन काताडांत॑ पंढ्र रंग येईल॑ म्हणतात॑.

कुष्टरोग n  leprosy. एक प्रकारच महारोग. कुष्ट. uis बरोरल॑ वेळांत॑ ओखद काढाला आरंभ केलतर॑ कुष्टरोग संपूर्णहोऊन बरोर होईल॑.

कुष्टरोगी n  leprosy patient. leper. कुष्टरोग धरलते व्यक्ती. uis जुने काळांत कुष्टरोगी लोकांस अग्गीन गांवाच आंत सोडत होत नाहीत॑ अणी त्यांस म्हणून एक प्रत्येक टिकाण देऊन तिकडेच असास्क॑ व्यवस्था करत होते.

कुसरी n  tiny multi-coloured sugar balls. ल्हान-ल्हान रंग-रंगाच साखरेच बूद. Note:- used during Sankranti celebration for pouring over children’s heads along with coins and other goodies. uis अम्ही ल्हान असताना अमच॑ आजीम्मा अमच॑ दोस्केच व॑रून बोर-ओतताना भोईंत॑ पडलत॑ अग्गीन वेंचून काढाला मझ॑ भाऊ-भावंडेंच लक्ष्य पैसे-नाण्य पंडू हेज व॑र होत अणी मझ॑ लक्ष्य नुस्त कुसरीच व॑र होत॑ !

कुस्करणे vt  to crumple (a sheet/paper etc). (कापड/कागद) रगडून विकार करणे ; कुसकरणे in sm. uis  अवसरांत॑ ऑफीसाला जायाच वेळ मझ॑ बेष इस्त्रि करून ठिवलते अंगी कोणकी कुस्करूनटाकले. 

कुस्करणे vi  getting crumpled (a sheet/paper etc). (कापड/कागद) अपाप रगडून विकार होणे ; कुसकरणे in sm. uis (1) इस्त्रि केलते फडकी घालींगून "आटोरिक्षांत" गेलतर॑ जाऊन पावजोरी ते कुस्करून जाते. (2) इस्त्रि केलते फडकी "हॅंगरांत" अडकिवून ठिवनास्क॑ एक कपाटांत उग॑ ठिवलतर॑ एक वरानंतर॑ ते अपाप कुस्करून जाते.

कुस्ति n  wrestling. मल्लयुद्ध. uis भारताला जुन॑ काळांतूनच कुस्तीच परंपरा आहेतरीन, ओळिंपिक खेळांत अत्तापर्यंतीन दोन कांसाच पदकेच मिळ्लाहे.

कुंकुम n  vermilion coloured powder for placing in forehead or used in pooja. कुंकुमाच पूड. कुंकू. uis मझ॑ बहिणी (बहीण॑) चुम्मण॑ पोरीविणी असतान एक दिवस आजा तिज गाळांत॑ एक टपाटा घाटले, कां म्हणजे आंघोळी कारून आलांपिरी कपाळांत॑ कुंकुम लावली नाही म्हणून.

कुंकुमपू n  saffron. dried saffron flowers. केसरीच फूल. uis खीरांत कुंकुमपू घाट्लतर खीराला चोखोट रंग, खम्मग वास हे दोनीं येते. झालतर ते उदंड माघ/मोल आहे ; ग्रमाच एक ल्हान डब्बाला दोनशे रुपे अस्ते. Note :- from Tamil.

कुंकू n  vermilion coloured powder for placing in forehead or used in pooja. कुंकुमाच पूड. कुंकुम.

कुंकू n  a spot of vermilion coloured dot placed in the forehead. कपाळांत॑ लावाच तंबड॑ रंगाच बिंदी. पोट्टु (tamil). चांद (Tamil). (कपाळांतले) ठिमका. uis बायका पोरी कुंकू लावनास्क॑ अस्ताने म्हणून अम्च॑ संप्रदायांत आहे.

कुंठ n  a pond. a pool. पाणीच एक ल्हान तडाग. ल्हन सरोवर. कुंड ; कुंड in sm. uis शुद्ध॑ केलते पियाच पाणी सगळ॑ खेडेगामालीं देतों म्हणून एलक्षनाच वेळ एक एक राष्ट्रीय पक्षीं सांगतातविना एलक्षन जिंतलेवर खेडेकडे तेनी परतूनपणीं पाह्त नाहीते. अत्तापणीं भरून खेडेगामांत॑ पियाच पाणी कुंठांतूनच शेंदून आणाच॑.

कुंठ n  a pit or hole in the ground. भोईंतल॑ डोंबूर. कुंड ; कुंड in sm. uis जुने काळांत॑ मैसूर संस्थानांत॑ (अत्तच॑ कर्नाटका राज्य) र्राणाच हत्तीला खेढ्ढा संप्रदायांत॑ धरत होत॑. पण, ट्रावनकोर संस्थानांत॑ (अत्त॑च केरळा रज्य) तलाम्हणून र्राणांत॑ कुंठ काढून हत्तीला धरत होते.

कुंठ खांडणे id  an idiom meaning (a guest) determined to stay put. "दुसरेंच घरांत उजंड (उदंड) दिवसाला राह्याला निश्चय करणे", हे अर्थच एक शब्दालंकार. डेरा बडिवणे. Note :- The literal meaning being, "to dig up a pond (as an indication of ensuring long term source of water).

कुंठाच व॑र राग करींगून धुवनास्क॑ गेला म्हणे say  a saying meaning 'inaction on flimsy grounds'. "अर्थ नाहीते कारण सांगून काईं करनास्क उगे बसणे", हे अर्थाच एक म्हण. Note :- The literal translation of this saying is " going away not bathing or cleaning oneself, after getting angry with the pond".

कुंड n  a pond. a pool. पाणीच एक ल्हान तडाग. ल्हान सरोवर. कुंठ ; कुंड in sm.

कुंड n  a pit or hole in the ground. डोंबरा. डोंबूर. भोईंतल॑ कुळि (Tamil). कुंठ ; कुंड in sm.

कुंडल॑ n  ear ornament. कानांत॑ घालाच आभरण॑. uis महाभारतांत॑ कुंतीपुत्र कर्णाला उजतानच आंगांत॑ कवचीं कानांत॑ कुंडलहीं होत॑.

कुंडलिनि n  a term in Yoga denoting an esoteric dormant potential force lying coiled like a serpent at the base of the human spine. योगशास्त्र प्रकार॑ मनुषांच॑ मागल॑ हडाच खालेपटीस सर्पाच आकारांत गुंडाळून निजून असाच गूढ शक्ति. कुण्डलिनि.

कुंडली n  horoscope. जातक. uis दक्षिण भारतांत॑ कुंडलीला जातक म्हणून सांगतात॑.

कुंडी n  an earthen flower-pot. फूलाच झाडाच तोट्टि (Tamil).

कुंथ imp  moan. मनाच आंतच स्वंकट भोगाच॑.

कुंथणे vt  to groan. to let out a sound while straining. श्रम भोगताना तोंडांतून शब्द येणे ; कुढणे/कुंथणे in sm.

कुंथणे met  to fret and fume. कुंथणे. uis तो एक शुद्ध॑ शोंबेरी म्हणून अग्गिदनासीं कळेल॑. कित्ति ल्हान काम देलतरीन कुंथाला आरंभ करतो.

कुंभ n  zodiacal sign of Aquarius. राशीच एक चिन्ह.

कुंभ n  a pitcher. घागर. धातूच मडके.

कुंभमेळा n  a  religious festival involving bathing in sacred river. हिंदु संप्रदाया प्रकार कराच तीर्थस्नान. Note:- The Kumbh Mela celebrated every 4 years and the Ardh (half) Kumbh Mela, celebrated every six years, are held at Haridwar and Prayag-Varanasi. The Purna (complete) Kumbh takes place every twelve years at four places, Prayag-Varanasi), Haridwar, Ujjain and Nasik. The Maha (great) Kumbh Mela which comes after 12 'Purna Kumbh Melas', or 144 years, is held at Varanasi.

कुंभाभिषेक n  the Hindu religious ritual of bathing or consecrating god's idol. हिंदु संप्रदायाप्रकार देवाच विग्रहाला कराच एक अभिषेक॑.

कुंभार n  potter. मातीच मडके अणि मातीच साधन करणार.

कुंभारीण n  potter's wife. a female potter. कुंभाराच बाईल॑.

कूजा n  a vessel with a screw-lid used for carrying water etc. पाणी भरून टिवाच फिरिवून झांकाच झांकणीच एक पात्र. सुरही. सुरई ; खुजा in sm. uis जुने काळांत॑ लेंकर॑-बाळ समेत ट्रेनांत॑ जाताना वाटेंत॑ चोखोट पाणी मिळना म्हणून पाणीच कूजा काढींगून जाणे होत॑.

कूटु n  a liquid preparation eaten with rice. भाताच बरोर कालिवून खायाच एक कालिवण॑.

कूडु n  nest. पक्षींच घर. पिंजरा uis मृग वर्गांत॑ कूडु बांधणे फार अप्रूप असलतरीन, पक्षी वर्गांत॑ पोणावांटा पक्षीनीं कूडु बांधणे आहे. Note :- from Tamil.

कूडु n  hive. मेधमाशा/घुंघुरडा असल॑ उडाच कीडांच घर. uis उंच-उंच बांधणींत॑ अम्हाला मावनाते ठामी घुंघुरडाच कूडु तोडून काढणे तेवढ॑ सुलूभाच काम न्हो. Note :- from Tamil.

कूडु n  cage for domesticated or captured animals birds etc. वाढिवाच, नाहीतर, धरलते प्राणींला ठिवाच पिंजरा. uis मुंबैच पोवाईंत॑ धरलते एक पुलीला एक कूडांत॑ घालून पुन्हा र्राणांत॑ जाऊन सोडून आले. Note :- from Tamil.

कूडे n  a cane basket. बेताच बुट्टि. Note :- from Tamil.

कूरै n  a tiled or thatched roof. कवलाच छप्पर.   ओलेंत॑ (Tamil) केलते छप्पर. Note :- from Tamil.

कूर्प adj  sharp. चूप. Note : चूप is from Kannada and कूर्प is from Telugu. uis अम्च॑ घरच सुरी तेवढीन मोंड झालाहे. साणावाला आलतर॑ ते अग्गीन तला देऊन कूर्प करिवाम॑.

कूर्म n  an avatar of Lord Vishnu. महाविष्णूच एक अवतार.

कूर्म n  tortoise. turtle. कसव. कासव. आमे (Tamil).

कूली n  wages given to a labourer. कूलीकामाच पैसा. धर्मा. uis एक दिवसाच कामाला उण॑पक्षा तीनशे रुपे कूली देलतरेच ते काम कराला कोणतरीन येतील॑.

कूली n  a labourer. कूलीवाला. uis 1952 वर्षंत॑ हिमालयांतल॑ एवरेस्ट शिखर॑ वेघाला आलते इंग्ळीष संघाच नेतांकडे टेनसिंग नोर्गे स्पष्टहोऊन सांगटलते एक विषय कायम्हणजे, शेरपांच सहाय त्यांस॑ पह्जेम्हणजे कोण्त शेरपांलीं कूलीस्क॑ म्हणींगताने, हे होत॑.

कूलीवाला n  a labourer. कामवाला. कूली. uis येतां-येतां दर्मा कित्ति पह्जेतरीन द्याला तय्यार अस्तों तरीन कूलीवाले मिळणे फार श्रम झालाहे.

कृतज्ञ  adj  grateful. उपकार मिळ्लतेला मनाच तृप्ति होणे.

कृतज्ञता  n  gratitude. उपकार मिळ्लतेला मनाच तृप्ति होणे. धन्यता.

कृती  n  an action. कृत्य. कार्य. काम.

कृती  n  a method. पद्धती. रीती.

कृती n  a (classical) musical composition. lyric. संगीताच कृती. uis महाराजा स्वाति तिरुनाळांच कृतींच राग फार सौम्य असामुळे ते ऐकाला मला उदंड अवडल॑.

कृत्य adj  exact. कृत्य. uis अत्ताअग्गीन मी उदंड अवसरांत॑ आहें. तरीन, उद्या कृत्य होऊन साडे-चार घंटेला आलतर॑ मी तुला पाह्तों.   

कृत्रिम adj  artificial. not genuine. असल नसाच. uis चुम्मण वयेंत॑ तिज स्वभावीं वागणेहीं उदंड सरळ होत॑. पण, अत्ता ते पूरा बदलून फार कृत्रिम झालाहे.

कृधा n  bushy sideburns. bushy whiskers. muttonchops. गालांत वाढिवाच जाड केंस. uis मी कॉळेजांत वाचाच काळांत, म्हण्जे सुमार चाळीस पन्नास वर्षाच पुढे, गालांत कृधा ठींगणेहीं "बेल-बोटम पॅन्टस" घालींगणेहीं एक थोर "फॅषन" होत॑.

कृपा n  divine grace. देवाच कारुण्य. uis देवाच कृपा नाहीस्क॑ कोण्त कामहीं अमच्यान कराला होईना.
 
कृपा n  mercy. compassion. कारुण्य. दया. uis धर्माच नावांत॑ समुदायांत॑ उपद्रव पसरणांला थोडपणीं कृपा दाखिवताने.

कृपा n  favourableness. kind disposition. अनुकूलता. uis तृणमूल कांग्रसाच अध्यक्षांच कृपा नाहीस्क॑ पश्चिम बंगाळांत॑ कोणालीं काहीं कराला होयनाम्हणून वाटत॑.

कृमि n  insect. किडा. अळा. पूची (Tamil). क्रिमि. uis ते कुत्राच केंस तिकड-तिकड झडत आहे. तला कायकी कृमीच तंटा होत आहे वाटते.

कृमि n  intestinal worms. पोटांतल॑ कृमि/पूचि. uis पोटांत॑ कृमीच तंटा होयनास्क॑ असाला ल्हान लेंकरांस॑ तम्हा-तम्हा एरंडेलाच तेल नाहीतर॑ तलाम्हणून असाच ओखद (औषध) देणे आहे.

कृषि n  agriculture. शेतीच काम. जमीनांत॑ कराच काम. uis भारतांत॑ सुमार 75% (पंच्याहत्तर प्रतिशत) लोक॑ कृषीच कामांत॑ आहेत॑.

केडी adj  rowdy. ruffian. rogue. गुंडा. Note :- the word केडी is from the English acronym K.D. standing for Known Depredator, used in Police records, nowadays known as "history sheeter". uis बंगळूरांत मध्ये-मध्ये चोरटांच अक्रम जास्ती होताना अग्गीन पोलीसांच पुस्तकांत नाव असाच केडी लोकांस अग्गीन धरून किलुपांत घालणे आहे.       

केतू n  name of one of the navagraha planets of Hindu religion. नवग्रहांत॑ एक ग्रह.

केद्दि adv  on what day ? which day ?  कोण्त॑ दिवस ?  ; कधी in sm. uis  तू केद्दी येतोस म्हणून मला पुढच कळिवलतर॑ मी पूरा व्यवस्था करून ठिवतों.

केद्दि-केद्दि adv  sometimes. at times. now and then.  तम्हा-तम्हा. कित्येक वेळ ; कधी-कधी in sm. uis (1) मझ॑ कंप्यूटर केद्दी-केद्दी अपाप राहून जात॑. (2) मझ॑ भाऊ वेडास्क॑ केद्दी-केद्दी वरडत असतो म्हणून तू अम्च घराला येईनास्क॑ असनको.

केद्दि-केद्दि adv  days as and when. कोण्त कोण्त दिवस होईलकी ते ते दिवस अग्गीन. uis तुला केद्दि-केद्दि वेळ मिळत की मला येऊन पाह्त ऐस॑.

केद्दीच॑ adv  at some earlier time. कित्तीकी दिवसाच पुढच॑ ; कधीच in sm. uis  मी केम्हा अलों म्हणून तू अत्ता विचारतोसकी. केद्दीच॑ येऊन बसलसाच विषय तुला कळ्ल होत नाही म्हणून सांग.

केद्दीच॑ adj  of what day ?  कोण्त दिवसाच ? ; कधीचा in sm. uis  तू वाचत असाच न्यूस-पेपर केद्दीच॑ ?

केद्दीतरीं adv  at some time or other. at some day or other. कोण्त॑ वेळांत॑ तरीन. कोण्त॑ दिवस तरीन ; कधींतरीं in sm. uis  (1) केद्दीतरीन वेळ मिळताना मला येऊन पाह्शीलका ? (2) मी कंडिपहोऊन केद्दीतरीन एक दिवस ईजिप्टाच पिरमिड पाह्यीन. 

केद्दीन adv  at any time. केम्हा पह्जतरीन. uis  मला पाह्याला केद्दीन तू येऊया.

केद्दीन adv  always (without fail). (चुकनास्क॑) केम्हीं. uis  तो चुकनास्क॑ केद्दीन देवपूजा करणे आहे.

केम्हा adv  when ? कोण्त॑ वेळ॑ ? ; कधी/केव्हा in sm. uis मला पाह्याला तू केम्हा येशील॑ ?

केम्हाच adv  some time back. a long time back. थोड वेळापुढे. उदंड वेळापुढे. uis कां तजकरतां तू इकड॑ राखून बसलाहेस॑ ? तो केम्हाच गेला.       

केम्हीन adv  always. at any time. कधीन. केम्हाहीं.  uis नार्ळीच झाडाच मट्टा केम्हीन कोणाच आंगावरीन पडना. तसच नारळ॑पणीं खाले पाव्हूनच पडेल॑ म्हणून सांगणे आहे.

केम्हा-केम्हा adv  as and when. कोण्त कोण्त वेळ॑ होईलकी ते ते वेळ॑ ; केव्हाकेव्हा in sm. uis तुम्हाला बरोर पाह्यींगाला कोणीं नाही म्हणून मला कळल॑. उगे भींगनाकांत॑. मला केम्हा-केम्हा वेळ मिळतेकी तुम्हाला येऊन पाह्त असतों.

केम्हातरीं adv  once-in-a while. rarely. sometimes. अप्रूपांत॑.  uis मरुभूमींत॑ फार अप्रूपांतच पाऊस पडल॑. वर्षांत॑ केम्हातरीन तीन चार दिवस पडलतर॑ जास्ती म्हणूया.

केम्हाहीं adv  always. at any time. केम्हीन. केम्हीं. uis भारताला केम्हाहीं कायतरीन उपद्रव देत असणेच पाकिस्थानाच उद्देश वाटत॑.

केर-कुप्पा n  rubbish. dirt. कुप्पा. कचडा. uis (1) केर-कुप्पा बरोर झाडाला होत नाही म्हणून कामवाली सांगट्ली. समच एक नव केरसोणी घ्याला तिला दुकानाला पाठिवलों. (2) घरांत केर-कुप्पा नाहीस्क पाह्यींगाम॑. ते असणे अम्च आरोग्याला चोखोट नहो, अणी वास्तूशास्त्रा प्रकारपणीं घराला होऊन येईना म्हणतील.

केरसोणी n   broom. झाडू ;  केरसोणी or केरसुणी in sm. uis अत्ताअग्गीन नाहणी शुद्ध कराला प्ळास्टिकाच केरसोणी विकाला आरंभ केलाहेत॑.

केळीचपान n  banana leaf. केळीच झाडाच पान. uis चोखोट गुळ्चीट पंडू होयाच झाडाच केळीचपान जेवाच उपयोलाम्हणून बाजारांत॑ विकणे नाही. जेवाच उपयोगालाम्हणून प्रत्येक वर्गाच झाड आहे.

केळीचफूल॑ n  plantain or banana flower head. केळीच झाडाच फूल. uis केळीचफूलाच अंभटभाजी अणी माठोडा खायाला बेष असत॑.

केळ॑ n  plantain. banana. केळीच पंडू. कच्चा केळ॑. uis जेवण॑ झालांपिरी केळ॑ खाल्लतर॑ जीर्णाला चोखोट म्हणतात॑.(2) नेद्रन केळेच चिपांतून भाजी करणे आहे.

केवडा n  screw pine flower. केवडाच फूल. केतकी. केतकीच फूल. ताळमपू (Tamil). uis केवडाचफुल असाच ठिकाणी सरप/सर्प येईल म्हणून सांगणे आहे. हे कित्ती खरकी हे मला कळ्ना.

केवढ॑ adv  how much ? कित्ती ? ; केवढा in sm. uis हे ब्रह्मांड॑ केवढ॑ थोर आहेम्हणून कोणालीं कळना.

केवढ॑ adv  how many ?  कित्ती ? ; केवढा in sm. uis हे ब्रह्मांडांत॑ केवढ॑ नक्षत्र आहेम्हणून कोणालीं कळना. 

केवल adj  merely. मात्र ; केवळ in sm.

केवलप्रयोगी अव्यय n  interjection (gram). अतिशय व्यक्त कराच गोष्ट॑.

केसर n  saffron. केसरीच फूल॑. कुंमकुमपू (Tamil). संपाकाच पदार्थाला चोखोट वास याला उपयोग कराच एक विशेष प्रकाराच वनस्पति ; केशर/केसर in sm. uis  कष्मीरांतून मिळाच केसर फार चोखोट वर्गाच असलतरीन कित्येकदनांस॑ स्पैनांतून आणिवाच केसर घेणेम्हणजे ते एक थोर कार्य म्हणींगतात॑.

केसरीच फूल॑ n  saffron flower. कुंमकुमपू. संपाकाच पदार्थाला चोखोट वास याला घालाच एक विशेष प्रकाराच वनस्पति ; केशर/केसर in sm. 

केसरीभात n  a sweet preparation made of rava with saffron etc. शिजिवलते र्रवांत॑ केसर घालून केलते एक गुळ्चीट पदार्थ.

केस॑ adv  how. कोण्त॑ प्रकार॑ ? कस॑ ?  ;  कशी/कसा/कसे in sm.

केस॑केस॑ adv  in what which way/manner. कस॑कस॑. प्रत्येक-प्रत्येक (रीत) ; कसाकसा in sm. uis अर्धरात्रि उठून पाह्ताना लेंकरूच वर पांघरिवण॑ केस॑केस॑की गुंडाळून पडलसाच दिसल॑.

केसाच॑ adj  belonging to which? कसाच॑. कसाच बरोर संबंध झालते ? ; कशाचा in sm. uis मोडलते दोन बावोलीहीं चिकटिवून बरोर करताना केसाच चूर केसाबरोर चिकटिवाम॑ म्हणून बरोर पाव्हून जोडाम॑.

केसाला adv  what for ? why ? कां ? कसाला ?  uis तो केसाला इकड॑ आला ?

केंद्र n  centre. मध्यभाग.

केंद्र n  focus. सूक्ष्म केंद्र.

केंद्र n  headquarters. मुख्य स्थळ॑.

केंस n  hair. रोम॑ ; केश in sm. uis तिरुपतींत॑ देवाला नवस करून देलते केंस तिकडल॑ अधिकारीलोक॑ विदेशाला पाठिवून देवस्थानला भरून पैसे करतात॑.

केंसांळणि n  a widow with unshaven head. केंस क्षवर करनाते विधवा. Note:- in the olden days most widows used to shave their head and wear an ocher coloured sari with a part of the sari covering the head.

कैद n  imprisonment. तुरंगांत॑ घालणे. कारागृहांत घालणे.

कैद n  jail. तुरंग. तुरंगा. कारागृह. बंधखाना.

कैदि n  prisoner. कैद झालते मनुष. uis पाकिस्थानाच पूर्व प्रधान-मंत्री ज़ुल्फीकर अली भुट्टोला स्थानभ्रष्ट करून भरून वर्ष कैदी म्हणून ठिवून, नंतर॑ मरिवूनटाकले.

कैरस n  an edible preparation made from bitter lime. ईडाच एक पदार्थ.   

कैलास n  mountain abode of Lord Shiva, beyond Himalayas. शिव निवास कराच पर्वताच नाव (हिमालया वलांडून हे आहे). uis हिंदू धर्माला पवित्र झालते कैलास पर्वत चैनांत॑ टिबेटांत॑ आहे.

कैंच॑ adj  which ? relating to what place ? कोण्त॑ ? कोठल॑ ? ; कैंचा sm.

कोटानुकोटि n  numbers beyond count. millions and millions. billions and billions. मोजाला होयनातवढे मोट्ठ॑ संख्या. uis रात्रीच वेळ आकाशांत॑ एक मनुषाला नुस्त दोळेंत तीन हदार नक्षत्र दिसेल॑. तजपक्षा कोटानुकोटि नक्षत्र अम्च डोलेला अदृश्य होऊन हे ब्रह्मांडांत॑ आहे.

कोटि n  crore. दहा दशलक्ष. uis थोड वर्षापुढे एक लक्ष (लाख) संपादलतर॑ ते एक थोर कार्य होत॑. पण, अत्ता कोटीच संपादन॑ करणार भरूनदन॑ आहेत॑.

कोट्टा n  a hard seed of a fruit. फलाच घट्टि बीं. गोट्टि. गोटा. Note :- from Tamil.

कोटे n  fort. कोटे ; कोट/कोठ in sm.  uis (1) दक्षिण भारताच मराठा इतिहासांत॑ जिंजी कोटेच एक महत्व भाग आहे. इसवी 1677 पसून 1697 पर्यंतीं हे कोटे मराठांच अधिकारांत॑ होत॑. (2) इसवी 1714 वर्षी मुगळांच सेनापती साद-अद-उळ्ळा खान हेनी रजपुत योधा राजा तेज़ सिंह यांस॑ (तमिलांत॑ राजा देसिंग म्हणतात॑) युद्धांत॑ हरिवून जिंजी कोटे धरले (स्वाधीन केले). Note :- from Tamil.

कोठच॑ adj  belonging to which place ? कोठल॑. कोण्त ठिकाणाच॑ ? ; कुठचा in sm. uis ल्हान असताना मला तपालाच स्टांप मिळिवाच "होबी" होत॑. तस मिळिवलते स्टांपांत॑ एक दोन अत्तापणीं कोठच॑ म्हणून (म्हणजे, कोण्त देशाच म्हणून) व्यक्तहोवून कळना. 

कोठल॑ adj  belonging to which place ? कोठच॑. कोण्त ठिकाणाच॑ ? ; कुठला in sm. uis दोन दिवसापुढे सांखळी तुटींगून एक कुत्र अम्च घराला येवून पावल॑. ते कोठल॑ कुत्रकी कोणाला कळेल॑ !

कोठसून adv  from where ? from which place ? कोठ असून ? कोठून ? कोण्त ठिकाणांतूं ? uis ते कुत्र कोठसून अलतेम्हणून हे पर्यंतीन कोणालीं कळना.

कोठसूनकी adv  from some (unknown) place. कोठूनकी. कोण्तकी (कळनाते) ठिकानांतून. uis कोठसूनकी येऊन पावलते ते कुत्राला घरांत॑ ठींगणे बर॑ न्हो म्हणून कित्ती सांगटलतरीन मझ॑ लेंकर॑ ऐकाला तय्यार न्होते.

कोठून adv  where from ? कोठसून. कोण्त ठामांतून ; कुठून in sm. uis मी उदंड हुडकलोंतरीन ते पुस्तक मला मिळ्ल॑ नाही. तुला ते कोठून मिळ्ल॑ ?

कोठून adv  from what point or stage. whence ? कोठून. uis मला अत्ता अवसरांत॑ जामते आहे. तुला उद्या फोण करताना कोठून सोडलोंकी तिकडून नंतरच॑ अग्गीन सांगतों.

कोठूनकी adv  from some (unknown) place. कोठसूनकी. कोण्तकी (कळनाते) ठिकानांतून.

कोठे adv  where ? कोण्त ठाम ? कोठें/कुठे in sm.

कोठे-कोठे adv  where ever. कोण्त कोण्त ठाम ; कुठे कुठे/कोठे कोठे in sm. uis भरून वर्षापुढे सिनिमा थियेटरांत॑ अमुक-अमुक टिकट घेवून प्रत्येक कुर्सींत॑ बसाच सौकर्य न्होत॑. कोठे-कोठे ठाम मिळतेकी लोक॑ तिकडच बसत होते.

कोडबोळे n  a fried ring shaped snack. एक तळ्लते खायाच पदार्थ. Note :- from Kannada.

कोडा n  a small thick wooden log. कोंडा. ओंडा. लांकडाच एक  चूर ; कोंडका in sm.

कोडंजणे vt  to flap suddenly with a jerk. कोडंजणे. झटका देणे. uis धुवलते कापड तांतांत॑ घालापुढे बेष कोडंजून घाटलतर॑ लोक्कुर वाळून मिळेल॑. Note :- from Tamil.

कोडि n  flag. गुढी. ध्वज॑. पताका. Note :- from Tamil.

कोडिसंपंगि n  a creeper giving small greenish bell shaped flowers.ल्हान हिरव॑ रंगाच फूल सोडाच एक लता/वेल/वल्ली. Note:- from Tamil. कोडि in Tamil means 'creeper' and संपंगी is चंपक.

कोडु n  a hand drawn line. रेखा. Note :- from Tamil.

कोण pron  who ? कोण ?

कोणकी pron  someone (unknown).  कोणतरीं. uis तेनी काल देऊळांतून परतून येताना सोडलते ठिकाणी चप्ली दिसल॑ नाही. कोणकी चुकून घालींगून गेले. नंतर॑ वेगळ॑ वाट नाहीस्क॑ कोणाचकी चप्ली घालींगून घराला आले.

कोणतरीं pron  someone.  कोणकी. कोणीं एक. कोणीएक ; कोणीतरी in sm. uis ते घरच लोके बाहेर जाताना कोणतरीं घरांत वेघनास्क॑ असाला कुत्राला उकलून सोडूनटाकून जातील॑. 

कोणतरीं pron  anyone. कोणीं एक. कोणीएक ; कोणीतरी in sm. uis मला हे काम कराला उदंड कष्ट होईल॑. तुम्ही दोघ्यांत॑ कोणतरीं एकले मला सहाय्य कराला येतांतका ?

कोणतींएक adj  any one(thing). कोण्तीं एक. uis कोणतींएक काम हातांत॑ काढलतर॑ ते नीट करूनटाकूनच तो वेगळ॑ कामाला जाईल॑.

कोणाचकी adj  somebody's. कोण्तकी मनुषाच॑. uis  कोणाचकी गोष्ट ऐकींगून असाच चोखोट काम सोडूनटाकून बिसिनस कराला जातों म्हणून तिज दाल्ला बसलाहे.

कोणाच॑ pron  whose ? कोण्त मनुषाच॑ ? ; कुणाचे in sm.

कोण्त॑ adj  which ?  कोण्त ? ; कोणता/कोणचा in sm. (1) कोण्त॑ पुस्तक वाचत आहेस तू अत्ता ? (2) हे दोनांत॑ तुला अवडलते कोण्त॑ म्हणून सांगटलतर॑, ते मी वेगळ॑ काढून ठिवतों.

कोतवालचावडि n  police station. पोलीस स्टेषन/ठाणा.

कोतंबरि n  coriander. कोथंबरी. धनिया. कोत्तमल्लि (Tamil).

कोत्तु n  bunch. cluster. कोत्त. uis (1) मल्लि फूलाच/मोगराच फूलाच मोल उणे झाल॑ म्हणून तिन॑ तज एक मोट्ठ॑ कोत्तु केसांत खोयींगट्ली. (2) नाशीकाच जवळ जातानाच मांडवांत॑ द्राक्षे कोत्त-कोत्त लोंबाच पाव्हूया. Note:- usually while referring to flowers, fruits, leaves, sprigs etc. from Tamil.

कोथळी n  a large sack or a large bin or container (usually made of matting or wicker) for storing grains. धान्य दत्तन (जत्तन) ठींगाच एक थोर पिशवी, नाही, बेताच एक थोर  बुट्टि.

कोथंबरी n  coriander leaves. कोथंबिरी. कोथंबीर. धनियाच रोप अथवा पाला.

कोथंबिरी n  coriander leaves. कोथंबरी. कोथंबीर. धनियाच रोप अथवा पाला.

कोथंबीर n  coriander leaves. कोथंबिरी. कोथंबरी. धनियाच रोप अथवा पाला.

कोनड॑ n  a triangular recess or niche in a wall. भिंतींतल॑ त्रिकोण आकाराच एक ल्हान स्थल॑. uis ’इलेकट्रिसिटी' याच पुढे घरांतल दिवा कोनडांत लावून ठिवत होते. 

कोना n  corner. कोने. मूले (Tamil) ; कोन in sm.

कोने n  corner. कोना. मूले (Tamil) ; कोन in sm.

कोप n  anger. राग.

कोपिष्ट n  hot tempered. रागिष्ट.

कोबी  n  cabbage. कॅबेज. uis कीरे अंबटभाजि अणी कोबी अंबटभाजि हे दोनीं दक्षिणी देशस्थांला फार अवडाच कालवण आहे.

कोमट adj  lukewarm. ऊन जास्ति नाहीते. बेच्चगे (Kannada). uis उन्हाळांत॑ कोमट पाणींतपणीं मला स्नान कराला होइना. हिंस पाणीच पह्जे.

कोमटणे vi  to feel nausea. वांत यास्क॑ वाटणे. उमटणे.

कोमळ adj  tender. mild. delicate. soft. नाजूक ; कोमल in sm. 

कोमाळी n  clown. वेड॑ वेड॑ करणार. Note : from Tamil. uis तज वेड॑ वेड॑ वागणे पाव्हून अग्गिदनीं तो एक कोमाळी म्हणून सांगतात॑.

कोयता n  sickle. कोविता. पीक कापाच उपकरण. uis कोयतांत्सून कोवळ-नारळ॑ विकणार सुलभान वरल॑ भाग कापून अम्हाला नार्ळीच पाणी पीयाला देतो. तेच अम्ही घराला आणून एक कोयतांसून कापाला प्हायलतर ते मोट्ठ॑ समस्या/प्रश्न होईल. हात-पांयाला घाव पणीं लागुया.

कोरड॑ n  dryness (of throat). वाळक॑ (घसा). uis  ल्हान क्लासाला पंतोजी म्हणून असणे एक उदंड कष्ट कामच॑. पूरा दिवस वरडून घसा कोरड॑ होते. मात्र नहो, मुशारापणीं/दर्मापणीं उणे अस्त॑.

कोरड॑ adj  dishes without gravy. रस नसाच भाजी/पदार्थ.

कोरणे vt  sculpting. to chisel a figure etc. कोरून प्रतिमा करणे. uis समुद्राच बाju महाबलिपुरमांत॑ धोंडांत॑ कोरून ठिवलते विग्रह अग्गीन अत्तापणीं पाह्याला सुंदर आहे.

कोरा adj  unused. new. नव॑. उपयोग केल नाहीते. वापरनाते.

कोर्ट n  court. न्याय कचेरी. न्यायालय.

कोलाट्टम n  a dance using small sticks, normally performed by ladies. ल्हान काटीनिशी कराच बायकांच एक नृत्य. Note :- from Tamil.

कोलु n  decorative displaying of dolls during the festival of Navarathri. नवरात्रि सणाच वेळी देवांच बावोलींला (भावोलींला) अलंकारांत॑ ठिवाच पद्धत॑. Note :- the dolls displayed include those of नारयणा, लक्ष्मी, ब्रह्मा, वायु, सरस्वती, भारती, शेषा, गरुडा, रुद्रा etc. from Tamil.

कोल्हा n  fox. कुत्राच सार्खल॑ एक मृग. 

कोलुस॑ n  foot chain with tinkling bells. कोलुस. Note :- from Tamil.

कोळकट्टे n  a type of sweetmeat. मोदक॑. uis विनायक चतुर्थीला कोळकट्टेच नैवेद्य (नेवेद्य) करणे आहे. Note :- from Tamil.

कोळणे vt  to squeeze (tamarind/mango/fruits etc.) in a small quantity of water. थोड पाणींत॑ (चिंच/अंबा/पंढू असल॑) चेंपणे. uis संपाक आरंभ करतानच चिंच कोळून ठिवलतर॑, नंतर॑ सार सांभार असल॑ कालिवण॑ करताना त्यांत॑ चिंचाच पाणी घालणे सुलूभ होईल॑.

कोळसा n  charcoal. लांकड॑ जळिवून कराच इंधन. uis सोवळेच संपाकाला कोळसाच सगडी (शेगडी) वापरणे आहे.

कोळसा n  coal. खनींतून खांडून काढाच एक इंधन. uis नैवेलीच खनींतून मिळाच कोळसा चोखोट वर्गाच न्हो म्हणतात॑.

कोळाई n  water tap. नळ॑. पाणीच टॅप. uis गार्डनाच कोळाई दत्तन पाह्यींगनास्क॑ असलतर॑ बीदींद॑ येणार-जाणार कोण्तरीन ते चोरींगून जातील॑. Note :- from Tamil.

कोळी n  fisherman. मासोळी धरणार.

कोळी n  name of the caste of traditional/hereditary fishermen. कोळी वर्ग.

कोळ्ळिकट्टे घेऊन डोस्के खाजींगणे say  a saying meaning "inviting troubles or problems vluntarily". स्वता उपद्रव आणींगणे. Note :- The litteral meaning is 'to scratch one's head with a burning firewood'. कोळ्ळिकट्टे is Tamil word meaning 'burning firewood'.

कोवक्कायि n  a type of vegetable. तोंडेकायि (Kannada/Tamil). तुंड्ली. Note :- from Tamil.

कोवर॑ n  dried copra. खोवर॑. खोबर॑. खोब्र॑. वाळलते नारळ॑. बुडबुडा.

कोवळ॑ adj  tender. immature. निब्र नसलते ; कोवळा in sm. uis कोण्त॑ भाजीहीं कोवळ॑ असताना संपाकाला उपयोग केलतरेच खायाला बर॑ असेल॑.

कोवळ॑ लेंकरू n  just born infant child. अता अता उजलत॑ लेंकरू. uis कोवळ॑ लेंकरे रडाच ऐकाला बेष असत॑ तरीन, ते ऐकताना अम्हास मनांत कसकी वाटेल॑. 

कोवा n  a sweet preparation of milk thickened to a semi-solid state. खोवा. दूध घट्टि करून तय्यार कराच एक गुळ्चीट पदार्थ ; खवा in sm.

कोविता n  sickle. कोयता. पीक कापाच उपकरण ; कोयता in SM. uis कोवितांत्सून कोवळ-नारळ॑ विकणार सुलभान वरल॑ भाग कापून अम्हाला नार्ळीच पाणी पीयाला देतो. तेच अम्ही घराला आणून एक कोवितांसून कापाला प्हायलतर ते मोट्ठ॑ समस्या/प्रश्न होईल. हात-पांयाला घाव पणीं लागुया.

कोवी n  hollowed cocoanut used as a vessel. नरवटीच पात्र.

कोवी n  semi-hard shell of a seed. पूरा घट्टि झालनाहीत॑ गोट्टि. uis आवक्कायि लोण्चे कराला अंबा चिरताना कोवीनीशी चिरणे आहे.   

कोसंबरि n  a type of salad with moong dal etc. मूंग दाळांत॑ केलते एक खायाच तोंडलावण॑ ; कोशिंबीर in sm.

कोसुरु n  free extras given by seller. विकताना (मिळ्लते पैसेच पक्षा जास्ति) उगे द्याच सामन. Note :-from Tamil.

कोह्ळ॑ n  ash gourd. एक प्रकारच पंढ्र॑ रंगाच भोंपळा ; कोहळा/कोहाळा in sm. uis नुस्त फोड्णीच सांभारांत॑ कोह्ळ-वडा (म्हण्जे कोह्ळाच वडा) तळून घाटलर॑ फार रूच अस्ते.

कोह्ळ-वडा n  a crispy made of udid dhal and ash-gourd. उडीदाच दाळांत॑ कोह्ळ घालून कराच एक वड्या. uis कोह्ळ-वडाच फोड्णीच सांभार खायाला उदंड रूच अस्त॑.

कोंकणस्थ n  a sub-sect of Brahmins hailing from Konkan area. कोंकण प्रदेशाच ब्रह्मणांच एक उपवर्ग.

कोंडा n  husk. bran. chaff. धान्याच भूंस. uis (1) कुटलते साळींतून सूपांत॑ कोंडा पाखडून वेगळ॑ करणे एक सुलूभ काम न्हो. पह्जते अनुभव असलतरेच होईल॑ ! (2) कोंडाच सगडी/शेगडी मिळणे अप्रूप झालाहे. कित्येक ग्रामांत॑ विन्हा वेगळ॑ ठिकाणी ते मिळना. (3) जुने काळांत॑ आंधोळीला पह्जते उनु पाणी कोंडाच चूलांत॑ तावत होते. (4) कोंडाच अण्खीन एक उपयोग; तजांतून 'सिलिका' करतात॑.

कोंडा n  a short thick wooden log.. ओंडा. कोडा. लांकडाच एक चूर ; कोंडका in sm.

कोंडि n  bolt. latch. कडी. तापा (Tamil) ; कडी/खिळी in sm. uis वार॑ बडिवून उघडनास्क॑ असाम॑ म्हण्जे कवाडाच वर्च कोंडि घालूनटाकाम॑.

कोंडे n  a type of hair-do of women where hair is gathered into a bun shape above the neck. a chignon. बिछोडा. डोस्केच मागे बायके केंस गुंडाळून बांधाच एक विध॑. Note :- from Tamil.

कोंपूर n  elbow. हाताच मध्यभागाच एक अवयव॑ ; कोपर in sm. uis ते ल्हान लेंकरू खाले पडून कोंपूराच हड॑ मोडींगटला.

कोंपूराला लागलते सुख॑ id  an idiom meaning 'unnecessary efforts causing unwelcome results'.'अनावश्य श्रम॑ करून आवश्य नाहीते परिणाम येणे’, हे अर्थाच एक श्ब्दालंकार. Note :- the literal meaning being, 'pleasure caused on getting hit on the elbow'. 

कोंबड॑ n  (domestic) fowl. घरांत॑ वाढिवाच एक पक्षि. Note:-  कोंबडे, कोंबडा & कोंबडी for fowl, cock & hen in sm. uis दिवसोडी कोंबडेच एक मुट्टे खालतर॑ आंगाला चोखोट म्हणतात॑.

कोंबड॑ झांकून ठिवलतर॑ दिवस उगनात जाईल का ? say  a saying which means 'no irrelevant or petty action can stop a grand affair'. ’उजंड उणे विषयाच कोण्तालीन एक थोर कार्य राह्ते कराला होयना’ हे अर्थाच एक म्हण. 

कौतुक n  delight. आश्चर्याच संतोष. uis ल्हान लेंकरे खेळाच पाह्ताना मला उदंड कौतुक वाटते.

कौपीन n  loin cloth. लंगोटि.

कौस्तुभ n  name of a jewel worn by Lord Vishnu. महाविष्णूच एक आभरणाच नाव.

क्रम n  regular order. बरोरल॑ स्थानांत॑/स्थितींत॑ असणे. uis गेल वर्ष जपानांत॑ झालते ट्सुनामीच नंतर॑ बाधा झालते लोकांस॑ सरकार भात-पाणी वितरण करताना ल्हान लेंकरपणीं क्रमांत॑ होटाकून ते घ्याच पाव्हून अम्च देशांत॑ अस॑ क्रमांत॑ लोक॑ होठाकतीलका म्हणून वाटून जात॑.

क्रम n  method. पद्धति. कराच रीति. uis कोण्त॑ काम हातांत॑ काढलतरीन, बरोरल॑ क्रम प्रकार केलतर॑ बेष असेल॑.

क्रमांक n numerical order. अंकाच क्रम. संख्याच क्रम.

क्रमेणा adv  gradually (step by step). सावकाश क्रम प्रकार. uis भारताच मध्य भागांत॑ माओ वादींच उपद्रव फार आहेतेला सरकाराकडून कराच विध-विध उपायाच परिणाम क्रमेणा कळल म्हणून वाटत॑.   

क्रमेणा adv  in an orderly manner. क्रम प्रकार.

क्रिमि n  worm. कीडा. पूची (Tamil). कृमि. अळा. uis क्रिमीच तंटामुळे अम्च गार्डनांत॑ रोजाफूलाच झाडाला तम्हा-तम्हा ओखद बडिवत असाम॑.

क्रिया n  an act. काम. कर्म. कृती.

क्रियापद॑ n  verb (gram). एक कृती, अनुभव, संभव अथवा स्थिती विषयीं सांगाच गोष्ट॑. uis "आज पाष्टे पाऊस पडल॑", हे वाक्यांत॑ "पडल॑" हे गोष्टाला क्रीयापद॑ म्हणतों.

क्रियाविशेषण॑ n  adverb (gram).  एक क्रियापदाविषयीं काहीतरीन विवर॑ द्याच गोष्ट॑. uis "आज पाष्टे पाऊस जोरहोऊन पडल॑", हे वाक्यांत॑ "जोरहोऊन" हे गोष्टाला क्रीयाविशेषण॑ म्हणतों.

क्रिष्ण n  an avatar of Lord Vishnu. महाविष्णूच एक अवतार ; कृष्णा in sm. uis महाविष्णूच दहा अवतारांत॑ (याच कल्की अवतार सोडून) शेवटीच अवतार श्री क्रिष्णाच अवतार होत॑.

क्रिष्ण n  black. काळ॑ ; कृष्ण in sm.

क्रिष्णतुळसि n  a variety of light purple hued tulsi. बरीक जांबळ रंगाच एक प्रकारच तुळसि ; कृष्णतुळस in sm.

क्रिष्णपक्ष n  fortnight of the lunar calendar leading to new moon. अमावस्याच पुढेच चौदा दिवस ; कृष्णपक्ष in sm.

क्रिष्णमणि n  black beads in the mangalasutra. मंगळसूत्रांतल॑ काळीपोती ; कृष्णमणी in sm.

क्रिष्णाष्टमि n  festival celebrating the day of  Lord Krishna's birth. श्रिक्रिष्ण उजलते दिवसाच पूजाच सण. जन्माष्टमि. गोकुलाष्टमि ; कृष्णाष्टमी in sm.

क्रिष्णांजन॑ n  deer hide used as a sitting mat by ascetics and for keeping puja items ritually pure. कृष्णांजन॑. किष्टांजन॑. सोवळेंत॑ बसाला उपयोग कराच हरणाच चर्म. पूजा सामान सोवळेंत॑ ठिवाला उपयोग कराच हरणाच चर्म.

क्रिष्णार्पण॑ n  final oblation to Lord Krishna after a puja. पूजा केल नंतर श्रीक्रिष्णाला अर्पण कराच॑ ; कृष्णार्पण in sm.

क्रूर adj  cruel. निर्दय.

क्रोध n  anger. राग. uis विरिधीकडून काहीं मिळांव॑ म्हणजे काम, क्रोध, भेद अणी दंड अस॑ चार प्रयोग करांव॑ म्हणून एक म्हण आहे.

2 comments:

subhashini said...

Good informative blog Sir.It is useful to differentiate between Tamil words & Thanjavur Marathi.

Ananda Rao Vasishta said...

ARV :- Thanks for your comment, Subhashini.