इ
इ the third vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच तिसर स्वर.
इकडच॑ adj relating to this side. इकडल॑. हे पटीसच॑. एथेल॑. यथेल॑. इथेल॑. हे बाजूच॑ ; इकडचा / इकडला in sm. uis तुम्ही तुम्च काम प्हायींगा, इकडच॑ काम मी प्हायींगतों.
इकडच॑ adj relating to this place. इकडल॑. हे ठिकाणीच॑ ; इकडचा / इकडला in sm. uis इकडच॑ लोक त्यंच काम पूरा करलांपिरी / करला नंतर मी त्यना तुम्चकडे पाठीवून देतों.
इकडच॑-तिकडच॑ adj of various unspecified places, things etc. इकडल॑-तिकडल॑. एथेल॑-तथेल॑. यथेल॑-तथेल॑. इथेल॑-तथेल॑ (कोण्त म्हणून व्यक्त करनाते) ; इकडचातिकडचा in sm. uis तुम्ही काय केलांत, हे मला व्यक्त होऊन सांगा. उगे एकडच-तिकडच विषय सांगून प्रयोजन नाही.
इकडून adv from here. एथून. एथसून. यथून. यथसून. इथून. इथसून. uis इकडून तुम्च गांम कित्ति दूर आहे ?
इकडून-तिकडून adv from various unspecified places. इकडसून-तिकडसून. व्यक्त होऊन सांगनाते वेगळ-वेगळ ठामांतून / ठामांतसून. कोण्त म्हणून व्यक्त करनाते वेगळ-वेगळ ठिकाणांतून / ठिकाणांतसून / ठामांतसून / ठावांतसून uis तला एक निश्चय काम काहीन नाही. इकडून-तिकडून काय काम मिळतकी ते करून काळ-कांडत आहे.
इकडे adv here. this side. in this place. हे ठिकाणी. हे ठामी. हे ठांवी. हे बाजू. एथे. यथे. इथे. uis मला हे पेटी उचलाला होत नाही. इकडे येऊन मला थोड सहाय करशीलका ?
इकडे-तिकडे adv hither and thither. एथे-तथे. यथे-तथे. इथे-तथे. uis उकलून सोडलते गाढवास्क तो इकडे-तिकडे हिंडत आहे.
इच्छा n wish. desire. आग्रह. अवड. इष्ट. uis मी सांगाच सांगणे झाल॑. इत्तिपर / इत्तपर / इथपर काय करतोस्की ते तुज इच्छा प्रकार करींग.
इच्छाप्रकार adv as per one's wish. इष्ट प्रकार. इच्छासार्ख. uis तज वागणे थोडकीन बर॑ नाही. इच्छाप्रकार तला सोडलतर कंडिप तो अवघड होणारच.
इच्छाशक्ती n will power. मनशक्ती. मनाच बळ. मनोबळ. uis जीवनांत कठिन विषय काहीं करून दाखिवाम / दाखिवांव म्हणजे आंगाच श्रम मात्र नोहो, इच्छाशक्ती पणीन असल तरेच होईल.
इच्छासार्ख adv as per one's wish. इष्ट प्रकार. इच्छाप्रकार. uis मला हे विषयांत अभिप्रय काहीं नाही. तुम्च इच्छासार्ख करींगा.
इटीदंडा n a type of play with two sticks, one about one foot long and the other about six inches. दोन ल्हान काठीनिशी खेळाच एक विधाच खेळ. गिल्लि-दंडा ; इटीदांडू in sm. uis ल्हान पोरे ईटीदंडा खेळताना फार जागृतान असणे चोखोट, कां म्हणजे त्यांतल ल्हान काठी डोळेला लागून घाव होयाच साध्यता आहे.
इडिकी n tongs used in the kitchen. चिमटा. uis तावलते दूधाच पात्र चूलींतून उतरिवताना इडिकी उपयोग करून उचलून काढनास्क, हातांत मिळ्ळते एक चूर कागद मुजलून भांडी उतरिवाला प्हायलों अणी पात्र चुकून कढलते दूध मझ हात अणी बोटाला लागून लासले. Note. from Tamil.
इड्ळगे n idli. steamed dumpling of rice and black gram flour. इड्ळि. इळ्ळगे. इड्ळे. uis इड्ळगे खाताना तज बरोर तोळ्लायींगून खायाला कांदाच सांभार, नारळीच चट्णी अणी मोळगापुडी हे अस्कीन अस्त. Note.(1) The earliest reference to the word "इड्डलिगे" is found in Vaddaradhane, the Kannada work of Sivakoti Acharya in 920 CE. (2) इड्ळगे, इळ्ळगे and इड्ळे appear to be morphed forms of इड्डलिगे. (2) see http://www.deccanherald.com/content/490030/kitchen-chronicles.html for earliest ref to idli.
इड्ळे n idli. steamed dumpling of rice and black gram flour. इड्ळि. इड्ळगे. इळ्ळगे. uis दक्षिणी मराठींत इड्ळीला इड्ळे, इड्ळगे अणी इळ्ळगे अस पणीन म्हणणे आहे.
इड्ळि n idli. steamed dumpling of rice and black gram flour. इड्ळगे. इळ्ळगे. इड्ळे. तांदूळाच पीट अणी उडिदाच पीट मिळिवूनमिळिवून केलते एक खायाच पदार्थ. uis नुस्त तमिलनाडांत मात्र न्हो, पूरा भारतांत इड्ळि-सांभार प्रसिद्ध झालाहे.
इतक॑ adj so much. एवढ ; इतका in sm. uis इतक वेळ होऊन आलासकी, बंडी तम्हाच निघून गेल॑.
इतकूस्क collo very little. फारेच थोडक. फार नंखर. एवढूस्क (collo). Note. words like इतकूस्क and एवढूस्क are not only colloquial, but also are vulgar usages of language. uis खीर फार बेष आहे तरीन मला इतकूस्क वाढलतर पुरे.
इतपर adv hereafter. henceforth. अत्ता पसून. इथपर. इत्तिपर ; इत:पर in sm. uis पाकिस्तानाच परिस्थिती एवढ मोस झालाहे म्हणजे, इतपर ते राज्याला काय होयाला जात की, हे कोणालीन सांगाला होईना. Note. (1) better इथपर. (2) मोस is a loan word from Tamil meaning हाळ.
इतिहास n history. चरित्र. uis (1) पुरातत्वाच आधाराप्रकार भारताच इतिहास सरस्वती सभ्यताच काळांत, म्हणजे पांच हदार / हजार वर्षाच पुढेपसून, आरंभ झाल॑ म्हणूया. (2) मुंबईच सात द्वीपीन पोर्तुगीस राजकुमारी कॅतरीन अणी इंग्ळीष राजा चार्ळ्स हेंच वराडाच वेळ चार्ळ्स यांस वरदक्षिणा होऊन मिळ्ळ॑, अस इतिहास सांगते. Note. of late Indus Valley Civilization is often referred to as Saraswati Valley Civilization.
इथपर adv here afterwords. henceforth. इतपर. इत्तिपर. अण्कीन पुढे. Note. better इथपर.
इथून adv from here. इकडून. येथून. एथून. uis इथून चेन्नै सुमार तीनशे-वीस किलोमीटर दूर आहे.
इथे adv here. इकड. हे ठिकाणी. येथे. एथे. uis मला प्हाम म्हण्जे दोन दिवसाच आंत इथे येम॑. कां म्हण्जे, तज नंतर मी गांवाला जाईन.
इथे-तथे adv hither and thither. इकडे-तिकडे. यथे-तथे. एथे-तथे. uis हे जवळ सोनाराच दुकानांतून अम्च नाताच उजलादिवसाला घेट्लते कांकण आणी लोलक कोठकी ठिवूनटाकून तीन चार दिवस इथे-तथे हुडुकून मिळापर्यंतीन तरपडूनगेलों.
इनाम n a grant or a gift received / given for perpetual benefit. निरंतरविणी भोग कराला मिळ्ळते दान. uis जुने काळंत म्हणजे, दोनशे तीनशे वर्षाच पुढे हिंदु देउळ अणी मठांला भरून आस्त अणी संपत इनाम म्हणून मिळत होत॑. पण अत्त हे काळांत तसलते इनाम फार अप्रूप झालाहे. Note. अपरूप in SM.
इनाम n land received as a hereditary grant in perpetuity. निरंतर अणी पारंपरीक अधिकार समेत दान मिळ्ळते जमीन. uis भारत स्वतंत्र झाल॑नंतर इनाम अणी जागीर संप्रदाय रद्द झाल॑ अणी कोणाकोणाकडे इनामाच अथवा जागीराच जमीन होत॑की, ते सगळीन सरकार स्वताकडे करींगट्ले. Note. कोणाकोणाकडे is a colloquial form of कोणाच-कोणाच कडे.
इनामदार n holder of an inam grant in perpetuity. इनामाच अधिकार मिळ्ळते अधिकारि. uis भारत स्वतंत्र झालानंतर सरकार जमीनदारी संप्रदाय रद्द करले अणी तेमळे / त्यामळे तम्हा पसून जमीनदारी, जागीरदारी इनामदारी असलते पिढी-पिढींतसून येत होतते अधिकार अग्गीन बंद झाल॑.
इप्पा n madhuka tree. mahuwa tree. इप्पि. इप्पीच झाड. इलिप्पै (Tamil) ; महुआ / म्होंव in SM. Note. oil extracted from the seeds of this tree is considered sacred for Lord Siva. It isused during Navarathi for lighting the sacred lamps to the goddess. It is called इप्पे in Kannada.
इप्पि n madhuka tree. mahuwa tree. इप्पा. इप्पीच झाड. इलिप्पै (Tamil) ; महुआ / म्होंव in SM. Note. oil extracted from the seeds of this tree is considered sacred for Lord Siva. It is used during Navarathi for lighting the sacred lamps to the goddess. It is called इप्पे in Kannada.
इप्पीच तेल n the oil extracted from seeds of the madhuk tree. इप्पीच झाडाच बींतून काढाच तेल. uis ल्हाण पोरविणी असताना मी एक दिवस मझ आजाच इप्पीच तेलाच पात्र लोटून तेल पूरा खाले सांडलों. Note. the oil is considered sacred for Lord Siva. It is used during Navarathi for lighting the sacred lamps to the goddess. It is called म्होंवाच तेल in sm and इलिप्पै एण्णै in Tamil.
इमाम n a Muslim priest. इस्लामाच धर्मगुरु. uis इमाम त्यंच समुदायाला धार्मिक विषयांत उपदेश देतात.
इळ्ळगे n idli. steamed dumpling of rice and black gram flour. इड्ळे. इड्ळि. uis इळ्ळगे, इड्ळगे, इड्ळि, इड्ळे हे गोष्ट अग्गीन वेगळ॑-वेगळ॑विणी दिस्त तरीन खायाच पदार्थ मात्र एकच, म्हणजे इड्ळीच॑ !
इषोब n calculation. computation. working arithmetically. हिषोब. गणना. uis काल तू खेडे गावांला जाताना हाथराखणेला करतां मी तुला सव्वाशें रुपे देलोंकी, त्यांत कित्ति खर्च झाल॑ अणी कित्ति उरले म्हणून इषोब करून सांगशीलका ? Note. (1) the SM word starts with हि and so better to consider हिषोब as the preferred spelling. (2) इषोब could be considered as the under-emphasized form of the "correct" हिषोब.
इषोब n mathematics. हिषोब. गणितशास्त्र. इषोबशास्त्र. हिषोबशास्त्र. uis (1) साळेंत वाचताना मला उजंड अवडलते विषय इषोब होत॑. (2) गेलंदा झालते परीक्षांत अग्गि पेपरीन मी उदंड बेष लिव्हलों तरीन, इषोबांत शंभरांत शंभर मिळ्ळ॑ नाही. Note. (1) in SM the word हिसाब / हिशेब / हिशोब is not used to mean mathematics. (2) the word वाचणे is used in DM to mean "undergoing education", in addition to "reading". This usage is a Tamil adaption.
इषोब n accounts. accounting. हिषोब. आदाय-खर्चाच॑ शास्त्र ; हिसाब / हिशेब / हिशोब in sm. uis हिषोबाच गोळमाळ करून पैसा गिळला म्हणून हे जवळ मझ ऑफीसांत एक थोर अधिकारीला कामांतून काढूनटाकले. Note. (1) better हिषोब, to be in line with the SM word which starts with हि. (1) इषोब is an under-emphasized form of the "correct" हिषोब.
इषोब n bookkeeping, being a part of accounting. हिषोब. आदाय-खर्चाच॑ विवर लिव्हून ठिवणे. पैसा खर्च केलतीन पैसा आलतीन लिव्हून ठिवणे. uis प्रसिद्ध गणितशास्त्र विद्वान श्रीनिवास रामानुजनाच बाप कुंभकोणमांत॑ एक ल्हान जवळीच / कापडेच दुकानांत इषोब लिव्हाच उद्योगांत होते.
इषोब नाहीस्क fig unaccountedly. इषोब अवगणना करून. uis मला कळ्ळते एक सरकारी उद्योगी इषोब नाहीस्क पैसे वेच करला म्हणून अत्ता तज व॑र डिपार्टमेन्टल इन्क्युवरी चालत आहे. Note. इषोब नाहीस्क is the under-emphasized form of हिषोब नाहीस्क.
इषोब नाहीस्क fig unscrupulously. मर्यादा अवगणना करून. uis इषोब नाहीस्क पैसे गडप / हडप करला म्हणून विश्वविद्यालयाच कुलपतीच व॑र गेल वर्ष आरोप आल॑ अणी नंतर सी.बी.ऐ. वालेंकडे सांपडींगून अत्ता कांब मोजत आहे.
इषोब नाहीस्क fig lavishly. धारळविणी. uis लेंकीच वराडाला हिषोब नाहीस्क वेच करून अत्ता तो पैसेच कष्टांत बसलाहे.
इषोब नाहीस्क fig wastefully. अनावश्य होऊन. आवश्य नाहीस्क. uis सत्यनारायण पूजाला कळ्ळते सोयरेंस / सोयरीकांस अग्गिदनांसीन आवंतण देला म्हणून इषोब नाहीस्क सणाच संपाकाच एर्पाड / व्यवस्था करिवला अणी अस्कीन झालाव॑र केलते संपाकाच अर्ध दूर टाकांमते पडल॑.
इषोबशास्त्र (n) mathematics. गणितशास्त्र. हिषोबशास्त्र. uis श्रीनिवास रामानुजन इषोबशास्त्रांत अपार बुधिवंत होते. Note. better हिषोबशास्त्र.
इषोबान adj measured. restrained. इषोबाच. आवश्याच तेवढे. आवश्याजोक्ताच. नियंत्रणांतल॑. uis तेनी उजंड / उदंड मानमर्यादाच मनुष मात्र नाही, बोलतांपणीन हिषोबांतेच बोलतील॑. Note. इषोबान is the under emphasized form of the better हिषोबान.
इष्ट n desire. आग्रह. इच्छा. अवड. uis ते गांवाला जाऊनच सराम / सरांव अस निर्बंध काहीं नाही. तुला इष्ट नाहीतर जाणे नको.
इष्ट adj desired. liked. अवडलते. uis (1) मनाला इष्ट झालते काम करून पैसा संपादून जीवन चालिवाच लोके अदृष्टवंत म्हणूनच सांगाम. (2) पितृपक्षाच वेळी पिंड ठिवताना इष्ट मित्रांस पणीन ठिवणे आहे.
इष्टदेवता n one's favourite deity. एकांला अवडाच देवता. uis पोणावांटा दनासीन इष्टदेवता अणी कुलदेवता हे दोनीन एकच अस्त॑.
इष्टमित्र n a bosom friend. well-liked friend. प्रियमित्र. uis पितृपक्षाच वेळी पिंड ठिवताना इष्टमित्रांस पणीन ठिवणे आहे
इष्टिका n burnt brick. ईट. विटकर. वीट. भिंत / घर वगैरा बांधाला उपयोग कराच जळून काढलते मात्तीच वस्तू. uis जुने काळांत घरांत होम होम कराला भोईंत वाळू पसरून तजव॑र इष्टिका ठिवून होमकुंड करत होते. अत्ताअग्गीन लोखुंडाच होमकुंड उपयोग करणे आरंभ झालाहे.
इसवी adj Christian. क्रिस्तु धर्माच (मताच). uis भारताच उत्तर-पूर्वांतीन केरळ राज्यांतीन इसवींच लोके जास्ती आहेत.
इसवी युग n the Christian era. येशुकृस्तूच (जीससाच) जन्मानंतरल॑ काळ. uis (1) इसवी युगाला अत्ता सामन्य युग म्हणतों. (2) इसवी युग आरंभ होऊन वीस शतवर्ष झालाहे, म्हणजे अत्ता एकवीसवां शतवर्ष चालत आहे.
इस्त्रिपेटी n ironing box. इस्त्री कराला उपयोग कराच पेटी. uis जुने काळांत इस्त्रीपेटी कोळसाच विस्तूंतून ऊन करत होते, पण हे काळांत विद्युतशक्तींत इस्त्रीपेटी ऊन करतात.
इस्त्री adv ironing. इस्त्रिपेटी चेंपून कुसकरून असाच कापड नीट करणे. uis अम्च घराच बाजू दोन इस्त्रीवाले आहेत. त्यांत एकला कराच इश्त्री उदंड बेष अस्त॑ म्हणून अम्ही तजकडेच केम्हीन कापडे इस्त्रीला द्याच. Note. while in DM it is pronounced as कुस्कुरणे or कुस्करणे in SM it is spelt कुसकरणे ; so better to spell it as कुसकरणे in DM also.
इस्तिफा n resignation. उद्योगत्याग. राजिनामा. उद्योग सोडणे. काम सोडणे. uis जुने काळांत एक उद्योगांतून इस्तिफा द्याला लोक भींगतील. अत्ता नव पिढीच पोरां प्रकार कोणतरीन एक उद्योगांतून दोन तीन वर्षांच आंत इस्तिफा देल नाहीतर, तला षाणपण उणे आहे, अस म्हणींगाम / म्हणींगांव ! Note. The word उद्योग used by DMs to mean Employment is an import from Tamil.
इंदिरा n Goddess Lakshmi. Goddess of wealth. लक्ष्मी देवी. uis "इंदिरा" म्हणाच लक्ष्मीदेवीच नावाच अर्थ "ऐश्वर्य, वैभव" अस॑ आहे.
इंदु n Moon. चंद्र. सोम. uis चंद्राला इंदु म्हणून सांगणे आहे.
इंद्र n Indra. king of gods. देवेंद्र. देवांच राजा. uis ऋगवेदाच काळांत इंद्र एक मुख्य देव होते तरीन, अनेक युगांच नंतर विष्णु अणी महादेव हिंदु धर्माच प्रमुख देव झाले.
इंद्रजाल n magic. जादू. uis हाताच कुशलता अणी पाह्णारांच द्यान, गवन, लक्ष अणी दृष्टि चुकिवून प्रदर्शन कराच चातुर्यकलाला इंद्रजाल म्हणतात. Note. गवन meaning attention is from Tamil.
इंद्रधनुष n rainbow. मघांतून पडाच पाणीला सूर्य किरण लागताना आकाशांत दिसाच सात रंगाच धनुषाच रूप. uis इंद्रधनुष भूमीला शिवाच स्थळांत सोनेच घागर असेल, अस पश्चिम देशांच लोक-कथांत आहे.
इंद्रनील n sapphire. एक रीतीच खडा. uis आफ्रिका भूखंडाच बाजू असाच मडगास्कर द्वीप इंद्रनील उत्पादन कराच देशांत सगळ्याचीन पक्षा अग्र स्थानांत आहे.
इंद्रिय n senses. the faculty by which external objects are perceived. ऐकणे, रूच, वास, स्पर्श, दृष्टि हे पांचांचीन अनुभव काढाच शक्ति. uis इंद्रीयांच वर नियंत्रण असणांरांच वर बाहेरच॑ अनावश्य आकर्षणाच परिणाम कद्दीहीं होईना.
इंद्रिय n the five sense organs. श्रवण (ऐकणे), स्वाद (रूच), वास, स्पर्श (शिवणे), दृश्य (दृष्टि) हे पांचांचीन अनुभव द्याच शरीराच भाग म्हणजे, कान, जीव्ह, नाक, चर्म (काताड) अणि डोळे हे पांच भाग. uis पांच इंद्रियहीं नियंत्रणांत ठिवून समान वृत्तीच स्थिती आश्रय करणे फार उत्तम लक्ष्य आहे.
इंधन n fuel. जळिवाला उपयोग कराच वस्तू. जळण. uis पुनर उत्पादन होयनाते इंधन म्हणजे, लांकड, कोळसा, पेट्रोळ, गॅस असल॑ इंधन उपयोग करून करून पुढे येयाच शतकांत भयंकर प्रश्न होयनास्क असाम म्हण्जे अणुशक्ति, वायुशक्ति तसेच, सूर्य प्रकाशाच शक्ति असलत्यांतून विद्युतशक्ति कित्ति जास्तीच जास्ती उपयोग कराला होईलकी तेवढ॑ करूनेच सराम / सरांव.
ई
ई the fourth vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच चौथ स्वर.
ईट n burnt brick. वीट. विटकर. इष्टिका. uis भट्टींत (चुलांत) कराच मातीच ईटाच बद्दिल अत्ता अग्गीन सिमेंटांत कराच हॉलो-ब्रिक उपयोगांत आलाहे.
ईड n a type of sour-bitter citrus fruit or its tree. लिंबूच वर्गाच एक अंबट-कडु फल/फळ/पंडु अथवा तज झाड. uis ईडाच लोणचे नंखर कडू असेल तरीन तज रूच मला उदंड अवडेल. Note. 1. Naarthangaai in Tamil. 2. पंडु meaning "a ripe fruit" or simply "a fruit" is from Telugu.
ईद n a generic term for any Islamic religious event or celebration. इस्लाम धर्मप्रकार आचरण कराच सण. uis (1) रमजान महीनेच शेवटल॑ दिवसी इस्लामीघर्माच लोके ईद-उल-फित्र आचरण करतात. (2) कित्येक वर्षी गणेश-चतुर्थी अणी इस्लामाच बकरीद / बक्रीद हे दोनीन एकच दिवसी अथवा एकदम जवळजवळच॑ दिवसी अस्त॑. अस॑ होयाला मुख्य कारण, हे दोनाचीन तिथी / तारीख निश्चय करणे चंद्राच भ्रमणाच आधारांत होत॑, हेच.
ईश्वर n God. देव. भगवान. uis ईश्वर म्हणाच गोष्टाच अर्थ भगवान अस असल तरीन, सर्वसाधारण होऊन शिवाला उद्देश करून सांगाच गोष्ट झालाहे हे.
ईश्वर n Lord Siva. महादेव. भगवान शंकर. uis शिवरात्रीच सणांत अम्ही पूरा रात्री जागे असून ईश्वराच पूजा वगैरे / इत्यादि करत असतों.
ईश्वरकृपा n divine favour. देवाच दया. uis अम्च सामर्थ्यामळे अम्ही सगळीन करींगट्लों म्हणून मनांत असलतरे तजपक्षा मूर्खपण वेगळे कोण्तीन नाही, कारण ईश्वरकृपा नाहीस्क अम्हाला काहीनच कराला होईना.
ईश्वरभक्ति n devotion to God. देवाच वर असाच भक्ती. uis आध्यात्मिक विषयांत ईश्वरभक्तीच बरीस वेगळे कोण्तीन नाही.
ईश्वरी n goddess Parvathi. पार्वती देवी. uis हिमावत पर्वताच लेंक म्हणून ईश्वरीला पार्वती देवी म्हणून नाव आल॑.
ईश्वरी n a female divinity. शक्ती. भगवती. uis केरळ संस्थानांत कोठ पाह्यलतरीन भगवती क्षेत्र अस्त॑ अणी कोण्त देवीला पूजा करतात तिकडे म्हणून लोकांस विचारलतर सांगतील ते ईशरीच देऊळ म्हणून. Note. ईश्वरी is a generic word applied to female divinities in general but used to specifically denote Parvati.
ईं conj a conjunction indicating inclusiveness aikin to "अणी, and, also" etc. हीं. नि. UIS साळेंत वाचत असताना मला एक मित्र होता. कोठ गेलतरीन तोईं मीईं मिळूनेच जाणे. Note. if the ईं is to be replaced with अणी the sentence would be written as .....तो अणी मी मिळूनेच जाणे.
उ
उ the fifth vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच पांचवां स्वर.
उकडणे vt heat or cook in boiling water. पाणींत॑ बुचकळून बेष ऊन करून शिजिवणे. UIS पाणींत अर्ध उकडून काढलते तांदूल म्हणजे, उकड-तांदूळ सोवळेच संपाकाला वापरणे नाही.
उकडणे vi to be sultry. उष्ण होणे. uis गेल एक वारापसून ऊन उदंड / उजंड / फार जास्ती झालाहे. अण्कीन अस उकडत असलतर एक एर-कंडीषणर घेऊनच सराम / सरांव म्हणून वाटत॑. Note. The literal meaning of "उकडणे" is "to boil in water" and the word for "sultry" in the weather- sense is "उकाडा". It is only by metaphorical extension that "उकडणे" is used to mean "(feeling) sultry" ; a matter of the result replacing the cause showing up because of the evolutionary dynamics of language.
उकड तांदूळ n par-boiled rice. हलक॑ होऊन कोंडानिशी शिजिवून काढलते साळी. uis नुस्त तांदूळांत कराच पक्षा उकड-तांदूळांत इड्ळी केलतर ते बेष मऊ / मौ होऊन येईल.
उकड बसणे vi to rest with weight on your feet, knees bent and bottom just above the ground. तळपांय दोनीं भोईंला ठिऊन, गुडिघा मुजडून / मुजलून, ठीरी भोईंला लागनास्क बसणे. उक्कड बसणे ; उकिडवा / उकुडवा बसणे in sm. uis वये होतां होतां मला उकड बसाला फर्र श्रम झालाहे. Note. better उकड बसणे.
उकडून भाजणे fig to feel the oppressive sultriness of the Sun's heat. ऊभाच फार तंटा होणे. uis बांगळूराच हायशी असाच वातावरणांत एवढ॑ दिवस राहलांपिरी चेन्नैला जायाला मला भें वाटते. रात्रीं-दिवसीं तिकड उकडून भाजत अस्त.
उकरणे vt to scratch or scrape with a slight incision. खाजिवून काढणे. uis ते लेंकरूला पांयेंच फोड येऊन दहा दिवस झाल तरीन अण्कीन वाळल॑ नाही. केम्हाहीं फोडाला उकरून उकरून वाळाला सोडतोच नाही.
उकरून काढणे fig to provoke or dig out a fight. आवश्य नाहीस्क एक भांडणे आरंभ करणे. uis बाजू घरच॑ नव॑ सून एक चोखोट पोरी झाल तरीन तिज सासू सदा तिला सळिवून भांडणे उकरून काढाला पाह्त असते.
उकलणे vt to untie. to unpack. बांधलते उघडणे. uis दुकानांतून मी साखरे घेऊन आणलों की नाही, मझ नातू ते पोट्लम समेच उकलून साखरे पूरा खाले सांडला. Note पोट्लम meaning packet is from Tamil, the SM word being पुडा or पुडका.
उकलून सोडलते गाढव say a saying implying "a person who has been let loose to his own irregular ways". करारकंडिप नाहीस्क हिंडाच मनुष. uis (1) ल्हाण वये पसून तज बाप-माय तला बरोर वाढिवले नाही म्हणून अत्ता तो एक उकलून सोडलते गाढवास्क हिंडत पडलाहे. (2) परीक्षा सग्ळीन झालं, अत्ता दोन महीनेच रजा. करारकंडिप नाहीस्क उकलून सोडलते गाढवांस्क पोरे हिंडेत आहेत.
उक्कड तांदूळ n parboiled rice. rice that has been partially boiled with the husk. उकड-तांदूळ. कोंडानिशी अर्ध शिजिवून काढलते साळी. uis उक्कडतांदूळीन हिरव॑ तांदूळीन मिळिवून रुब्बलते पीठांत इळ्ळग॑ करलतर ते बेष मऊविणी / मौविणी येईल.
उक्कड बसणे vi to rest with weight on your feet, knees bent and bottom just above the ground. तळपांय दोनीं भोईंला ठिऊन, गुडिघा मुजडून / मुजलून, ठीरी भोईंला लागनास्क बसणे ; उकिडवा / उकुडवा बसणे in sm. uis उक्कड बसून जेवताने म्हणतील. कारण, ते लक्ष्मी देवीला अपमान केलास्क होत॑ म्हणून. Note. better उकड बसणे.
उक्काडा n sultriness. humid heat. उष्ण. ऊब. उबारा. uis उन्हाळाच महिनेंत चेन्नैंत सोसाला होईनाते एवढ॑ उक्काडा अस्त. समुद्राच जवळच ओल॑ वारामळे असूया ते.
उखळ n a stone mortar for pounding rice, spices etc. उसळांत साळी, धान्य / धान असल॑ पदार्थ कांडाच धोंडाच उपकरण. उरळ (Tamil). uis समीपांत मी एक ल्हान गावांला गेलस्ताना उखळांत साळी मुसळ वाटे कांडाच प्हायलों.
उगणे vi to bloom. मोहरणे. मोहोरणे ; मोहरणे in SM. uis (1) मोगराच फूल उगताना तज वास दूरूनेच कळूनजाईल. (2) अरुणोदीच वेळी पारिजाताच झाडाखाले उगलते फूल भरून पडलसेल. (3) कीडा चावून हाळ होयनास्क असाला फूल उगाच पुढेच अंबाच झाडाला औषध / ओखद शिंपडणे आहे. Note. in SM उगणे is rarely used to denote "blooming", it is mostly मोहरणे, while in DM मोहरणे is less frequently used, the preferred word being उगणे.
उगणे vi onset / appearance of dawn. दिवस प्रारंभ होणे ; उगवणें in SM. uis (1) दिवस उगतानाच अवसर-अवसरांत स्नान वगैरे करून लोक्कुर-लोक्कुर पल्हार खाऊन रेलवे स्टेषनाला पळून गेल नाहीतर मला ऑफीसाला बरोरल॑ वेळाला जाऊन पावाला होईना. (2) दिवस उगाचवेळी वारेंत ऑक्सिजन भरून असेल म्हणून ते समयांत बागांत चालाल जाणे आरोग्याला फार चोखोट म्हणतात. Note. in DM onset of night (as opposed to appearance of dawn) is never referred to as उगणे.
उगणे vi to rise (heavenly bodies). उदय होणे (सूर्य, चंद्र, नक्षत्र) ; उगवणें in SM. uis (1) अक्रा बडिवाच पुढे चेन्नै जाऊन पावाच उद्देश असलतर पाष्टे-पाष्टे सूर्य उगाच पुढेच निघलतरेच होईल. (2) पौर्णमीच दिवसी चंद्र उगून येताना ते पाह्याला साधरणाच पक्षा थोरविणी दिसेल.
उगादि n new year. युगादि. गुढी पाडवा. uis उगादि सणाच दिवसी घराच बाह्येर गुढी बांधाच पद्धत आहे. Note. better युगादि, being the compound word of युग (year) and आदि (beginning). उगादि is a colloquialised form of युगादि.
उगे adv merely. नुस्त॑. केवळ. मात्र. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis योचना करनाकांत॑, ते विषया विषीन उगे विचारत होतों, तेवढेच.
उगे adv in vain. व्यर्थ. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis मझ प्रश्नाला काहीं उपाय आहेका म्हणून कळिंगाला त्यांस पाह्याला गेलते उगे झाल॑, मझ काम काहीन झाल नाही.
उगे adv pointless (talk, topic, action etc). विषय नाहीते (बोली, विषय, क्रिया इत्यादि). उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis पुढे येयाच एलक्शनांत अम्च वोटाकरतां एक स्थानार्थि अम्च गांवाला भाषण कराला आले. एकालेक संबंध नाहीस्क उगे बोलून अम्च वेळ हाळ केले विना वेगळ॑ काहीं झाल नाही.
उगे adv simply. नुस्त तसेच. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis मला तुम्च घराला हे आइतवार येयाच उद्धेश आहे. काहीं नाही, उगे तसेच !
उगे adv without a purpose. आवश्य नाहीस्क. उद्धेश नाहीस्क. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis अवसर-अवसरांत मी ऑफ़ीसाला जायाच तय्यारांत असताना तो मझकडे उगे बोलून वेळ हाळ कराला म्हणून आला.
उगे adv to stay still. हलनास्क. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis कुत्र चावाला येताना अम्ही पळनास्क उगे असणेच चोखोट / चोखट
उगे adv at rest. at ease. idly. आराम होऊन. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis (1) मला तो उगे बसाला सोडना. कायतरीन काम सांगत असेल. (2) पार्कांत उगे बसाला मला उदंड अवडेल.
उगे adv silently. श्ब्द नाहीस्क. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis साळेंत पोरे फार गलाटा करत होते. पण, पंतोजी वेघून आलेकी नाही, अग्गिदनीन उगे झाले.
उगे adv without reason, need, cause, grounds etc. कारण नाहीस्क. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis उगे मला तंटा कर नको.
उगे adv free (without charging). पैसा घेनास्क. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis हे अग्गीन दुकानवाला मला उगे देला, काय मोल झाल॑ म्हणून विचारताना पैसा काईन नोको म्हणट्ला.
उगे adv without working or doing. काहीं करनास्क. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis उगे बसलतर कोण्हीं तुम्हाला परवा करनात.
उगे adv without speaking. बोलनास्क. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis मी तिला हाक्कामारताना तिन उगे बसल्होती, उत्तर काईन देल नाही.
उगे adv without a profession or business. काम नाहीस्क. स्वस्थ. रिकाम. उगेच. उगोच ; उगा / उगाच / उगीच in SM. uis रिटैर झाला नंतर मी अत्ता उगे बसलाहें.
उगे-उगे adv simply. just like that. नुस्त तसेच. uis उगे-उगे लटक॑ बोल नको. Note. denotes emphasising.
उगेच adv for no reason. कारण नाहीस्क. उगे. उगोच ; उगीच / उगाच in SM. uis तू घरांत असतोस म्हणजे तुला पाह्याला येतों. विशेष काहीं नाही, उगेच.
उगोच adv for no reason. कारण नाहीस्क॑. उगे. उगेच ; उगीच / उगाच in ए. uis जातां येतां उगोच तिला मष्किरी करत असतो तो.
उग्र adj ferocious. भयंकर. uis हिरण्यकशिपूला वध करून भयंकर आवेशांत होतते नरसिंह देवाच उग्र रूप शांत कराला प्रह्ळादाला विना वेगळ॑ कोणालीन झाल नाही.
उग्राणाच खोली n store room. संपाकाच सामान दत्तन ठिवाच खोली. uis जुने काळांत एक-एक घरांतीन उग्राणाच खोली होत॑, पण अत्तच काळांत संपाकाच सामान सगळीन ऑण-लैनांत ऑर्डर करलतर॑ दहा निमिषांत घरांत आणून द्याच व्यवस्था आहे-ते-करतां नव॑ पिढींच कुठंबांच घरांत उग्राणाच खोली असनाच असना.
उघडणे vt to open (a book, box etc). झांकून असाच (पुस्तक, पेटि इत्यादि) उघडणे. uis (1) पेटि उघडून त्यांतून मी विचारलते पुस्तक काढून देशीलका ? (2) तो पुस्तक उघडून वाचलते मी पाह्यलतेच नाही. कस॑ परीक्षा जिंताल जातोकी.
उघडणे vt to expose. मोकळ॑ करणे. uis साखरेच डब्बि उघड असलतर मुंग्या येईल.
उघडणे vt to throw open (a window, door etc). झांकून असाच (खिडकी कवाड इत्यादि) उघडणे. uis मोठ वारे-पाऊस येताना खिडकी उघड॑ ठिवलतर कंडिप होऊन खोलीच आंत पाणी बडिवेल.
उघडणे vt to make available (to the public) by inaugurating, opening etc. उद्घाटन करून (समूहाला) अर्पणा करणे. uis एवढ॑ दिवस पर्यंतीन अम्च खेडेगांवांत एक साळे पणीन होत नाही. अत्ता लोकुरेच एक प्राथमिक साळे उघडतों म्हणून सरकार घोषणा केलाहेत.
उघड॑ adj bare. naked. आंगाव॑र कापड नाहीस्क असणे. uis हिंवाळाच / हिमाळाच कळांत उघड॑ आंगांत असलतर मला निश्चय पडसा येईल.
उघड॑ adj transparent in intentions and behaviour. स्पष्ट (उद्देश). uis पैसेच विषयांत मात्र न्हो, दुसरांबरोर कराच संपर्कांत पणीन तेनी फार उघड॑ स्वभाव दाखिवणार म्हणून अग्गिदनासीन कळेल.
उघड॑ adj open (land, space, things etc). उधड॑ (स्थल, ठिकाण, साधन). मोकळ॑. uis अम्ही ल्हाण असताना अम्च अम्मा घरच॑ उघड॑-माडींत वडाम / वड्या वाळिवाला घालून, ते कावळा काढींगून जाईनास्क असाला अम्हाला बसिवत होते. Note. माडी in SM, DM and Tamil mean upper storey and in this instance उघड॑-माडी will be open terrace.
उचका n hiccup. उचकी. गोचका. गुचकी. uis उचकाला शांत कराला एक चूळ (घांस) पाणी सात दपा थोड थोड गिळून पीलतर पुरे.
उचकी n hiccup. उचका. गोचका. गुचकी. uis चूळ भरींगून पाणी सात दपा थोडक थोडक गिळलतर उचकी राहूनजाईल.
उचटणे vt to detach (anything stuck or fixed). (चिकटून, अथवा, घट्टि धरून असाच वस्तूला) उकरून काढणे. uis धिरडे उचटून काढलानंतर तवांत चिकटून असाच करपलते पीट खायाला मला उदंड अवडेल.
उचटणी n a wooden or iron spatula with one end being flat. एक अग्र भाग सपाट असाच परतणी. uis टेफलोन लिंपलते तवांत धिरडेला उचटणीवाटे परतिवून घालताना धिरडे निसरून चूलीच व॑र पडाला साध्य आहेत्यामळे दत्तन असांव / असाम.
उचलणे vt to lift up. वर करणे. uis मादसूळ होतत्यामळे मला ट्रैनांत सामान उचलून व॑र ठिवाला झाल नाही.
उचलून घालणे fig to be shocked by sudden nasty surprise. भे अथवा आश्चर्यामळे होयाच मनाच॑ झटका. uis उदंड / उजंड दिवसापसून तला आंगाला बर॑ नोह्त॑ म्हणून मला कळ्ळ्होत तरीन तज रोडे झालते आंग पाव्हून मला उचलून घाट्ल॑. तज आंग एवढ॑ हाळ झालाहे म्हणून मला विश्वास करालाच झाल नाही.
उचित adj proper. योग्य. बरोरल॑. uis अम्हाला कळनाते विषय चर्चा होत असताना अम्ही तोंड झांकींगून उगे बसणेच उचित.
उच्चार n pronunciation. बोलाच रीति. uis तंजावूर मराठी बोलणारांच उच्चारांत तमिलाच शैली फार मिळून आहे तरीन ते बरोर कराला कोणीन प्रयत्न करास्क मला दिसत नाही. Note. in the context of comparison between DM and SM the word उच्चार would include diction also in addition to pronunciation.
उच्चारणे vt to utter. to pronounce. बोलून ऐकिवणे. uis दक्षिणी मराठी लोकांच मराठी उच्चारणे महाराष्टाच लोकांस विचित्रविणी कानांत पडामळे त्यांस ते बरोर अर्थ करिंगाला नंखर प्रयास होईल.
उच्छिष्ट adj tasted food. रूच करलते पदार्थ. उष्ट केलते पदार्थ. उष्ट॑. uis (1) दुसरे लोकांच उच्छिष्ट पदार्थ खाणे मला अवडना. (2) कित्येक होटलांत उच्छिष्ट पदार्थ अणी नव॑ केलते पदार्थ हे दोनीन मिळिवून देतात म्हणून ऐकलानंतर तसलते होटलांत कायीन / काहीन खायाला मला अवडना.
उच्छिष्ट n leftover of partially eaten food. खाऊन उरलते पदार्थ. तोंडाला लावून उरलते पदार्थ. उष्ट॑. uis प्रेम अणी भक्तिनिशी शबरी माता देलते उच्छिष्ट भगवान श्रीराम संतोषान खाल्ले.
उजव॑ adj right side. right, not left. उजवीकडे. उजव॑ पटीस ; उजवा in sm. uis जेवताना उजव॑ हातावाटी जेवांव / जेवाम म्हणून अम्हाला ल्हाण वये पसून थोरले सांगून शिकिवलाहेत तरीन, वेगळ॑ देशाच अणी वेगळ॑ संप्रदायाच लोकां बरोर मिळींगून डाव॑ हातावाटी पणीन जेवाच एक फॅषन आहे अस॑ म्हणींगणार पणीन आहेत.
उजणे vi to be born. जन्म होणे. उदणे ; उपजणे in sm. uis मांदराच पिल्लु उजून सात आठ दिवसानंतरेच दोळे उघडेल.
उजलादिवस n birth day. जन्म दिवस. उदलादिवस ; वाढदिवस in sm uis अम्च नातू जॅनुवरी एक तारीखला उजल-ते-करतां, तज उजलादिवस सये ठींगणे सुलूभ अस्त॑.
उजळ॑ adj fair. bright. light complexioned. उदळ॑. प्हायाला बेष गोरे असाच ; उजळा / उजळ in SM. uis लेंकरूविणी असताना तो उजळ॑ होता, पण क्रिकट खेळाला आरंभ केलानंतर तज गोरपण उणे झालाहे. Note उदळ॑ and उजळ॑ is an example of interuse of द and ज in DM.
उजंड adj much. उदंड. भरून. फार. uis भारताच संस्कृति उजंड पुरातन आहे. पांच हदार / हजार वर्षाच पुढे मोहन-ज-दारो, हडप्पा असल ठिकाणांतून खोदून काढलते पुरावस्तांतून हे अम्हाला कळते. Note उजंड and उदंड is an example of interuse of द and ज in DM.
उजंड adj plenty. उदंड. भरून. फार. uis मी ल्हाण असताना मझ बापाकडून उजंड मार खाल्लोहें. Note उजंड and उदंड is an example of nteruse of द and ज in DM.
उजंड adj abundant. उदंड. भरून. फार. uis हे वर्ष अंबाच झाडांत उजंड फूल सोडलाहे. Note उजंड and उदंड is an example of interuse of द and ज in DM.
उजा adv tomorrow. उद्या. आजच॑ नंतरल॑ दिवस. uis उद्या म्हणाच गोष्ट भरून दक्षिणी मराठी लोके उजा म्हणून उच्चारण करतात, कां म्हणजे द अणी ज हे दोन शब्दीन एकालेक बदलिवून उच्चार कराच दंडक त्यांस आहे. Ety. from Samskrit उदय, meaning rising (Sun). Note. (1) better उद्या. (2) the SM word उद्या morphed into the DM उजा through a double process, first to उज्या and thence to उजा. During the process the द in उद्या of SM was replaced by ज.
उजाड n brightness. light. प्रकाश. दिवा ; उजेड in sm. uis सूर्याच उजाड बेष पडाच ठिकाणि रोवलतरेच झाड बरोर वाढेल. Note. उजाड in sm means desolate, barren (ऒस in SM and DM). उजविणे
उठणे vi to get up. to stand up. बसाच स्थितींतून ओठाकणे / होठाकणे. uis गुडिघा सूळामळे, मला खाले बसलतर लोक्कर उठाला होईना. काय तरीन धरिंगून हळ्ळु उठालाच होईल. Note. the word ओठाकणे / होठाकणे appears to have either become extinct in sm or it was never used in sm. The root may be उठणे, 'to stand up' but this needs further investigation.
उठणे vi to wake up from sleep. झोंपींतूं जागणे. uis पाष्टे सहा घंटेच पुढे उठाला मला होईनाच होईना.
उठणे-बसणे fig to behave in a very humble or servile manner. स्वंत अभिमान नाहीस्क वागणे. uis मस्का बडिवून बडिवून दंडक झालत्यांस थोर लोकांच आज्ञा ऐकलतर तज जोक्त उठणे-बसणे करणेंत थोडकपणीन लाजकी संकोचकी असना.
उठतांबसतां adv at each and every stage. एक एक स्थितींतीन. एक एक वेळीं ; उठताबसता in sm. uis उठतांबसतां अग्गिदनालीन कायतरीन आज्ञा देत असाच एक वंगळ स्वभाव तिला आहे.
उठिवणे vt make one get up or stand up. उठिवणे. उठविणे / उठवणे in sm. uis त्यंच घरच॑ कुत्र सदाहीं टीवीच समोरल॑ सेट्टींतेच निजून पडलसेल. तिकिडून तला उठिवणे म्हणजे ब्रह्मप्रयत्न करलतरीन होईना.
उठिवणे vt to wake someone up from sleep. झोंपींतूं जागिवणे. uis झोंपींतून दिडीरशी उठिवलतर॑ लेंकरे रडणे साधारणेच. Note. दिडीरशी is an adaptation from Tamil, meaning "immediately or suddenly".
उठून ओठाकणे vi to stand up. बसाच॑ स्थितींतूं ओठाकणे. उठून होठाकणे. uis घराला कोणतरीन अतिथिलोके आलतरे उठून-ओठाकून त्यांस स्वागत कराच दंडक अम्हास आहे.
उठून होठाकणे vi to stand up. बसाच स्थितींतूं हो(ओ)ठाकणे. उठून हो(ओ)ठाकणे. uis बसलते ठामी बसिंगून अग्गिदनालीन आज्ञा देत होतते मनुषाला उठून होठाक म्हणून सांगून दोन रपाट देलों मी. Note. better उठून ओठाकणे as होठाकणे is an hyper emphasised form of ओठाकणे.
उठून बसणे fig a dormant thing becoming active again. re-emergence (of a situation). (एक विषय) पुन्हा प्रत्यक्ष होणे. (एक विषय) पुन्हा व॑र येणे. uis चार पांच वर्षापसून तीव्रवादींच तंटा पूरा शांत आहे. परतूनीं ते ऊठून बसना म्हणून वाटते.
उडणे vi to fly. आकाशांत संचार करणे. हुडणे. uis नव॑ होऊन अंडांतून बाह्येर आलते पक्षींला उडणे समेच होईना, पण थोड दिवसकी वारकी झाला नंतर येईल. Note. better उडणे, as हुडणे is an hyper emphasised form of उडणे.
उडिमारणे vi to leap. to jump. हुडिमारणे. uis दुपारच झोंपीच वेळी इकडे तिकडे उडिमारून धिंगाणा करत होतते पोरांस बेष शिवा देवून त्यंच त्यंच घराला पाठिवूनटाकलों. Note. better उडिमारणे, as हुडिमारणे is an hyper emphasised form of उडिमारणे.
उडिवणे vt to let fly. आकाशांत उडाला सोडणे. हुडिवणे. uis दुसरे पोरे पतंग आकाशांत उडिवताना तज दोरा कापाला कित्येक वक्र बुद्धीच पोरे प्रयत्न करतील. हे कामाला तेन्ही मांजाच दोरा प्रयोग करणे आहे. Note. better उडिवणे as हुडिवणे is an hyperemphasised form of उडिवणे.
उडिवणे vt to set off (an explosion). विस्फोट करणे. (पटाकि) फुटिवणे. हुडिवणे. uis दीपावळीच सणांत पटाकी उडिवणे म्हण्जे पोरांस फार मजा येईल. Note. better उडिवणे as हुडिवणे is an hyper emphasised form of उडिवणे.
उडी n a leap. a jump. हुडी. uis ट्रिपल-जंप (म्हणजे हॉप-स्टेप अंड जंप) हेजांत दोन उडी अणी एक लांब पाऊल असते. Note. better उडी, as हुडी is an hyper emphasised form of उडी.
उडीद n a type of pulse. एक रीताच धान्य / धान. uis उडिदाच पीठाच बज्जि अथवा डांगर खायाला फार रूच अस्त.
उणाक adj of inferior (in value / price). उणे स्थितीच / मोलाच ; उणाख in sm. uis तीस चाळीस वर्षाच पुढे अम्च देशांत होतते अर्थव्यवस्था अणी अत्तच॑ परिस्थिती हे दोनीन सार्खपण करलतर उणाक स्थितींतून देश केवढ॑ विकास झालाहे म्हणून व्यक्त होऊन कळेल.
उणावा n deficiency. उणीवता. कम्मीपण ; उणवाई / उणीव in sm. uis गेलंदा मझ लोंक परीक्षांत उणे मार्क घेटला म्हणून साळेच प्रिन्सिपाल मला येऊन पाह्याला सांगून पाठिवले. मझ लोंक वाचणेंत उणावा दाखिवाच कारण पंतोजी शिकीवताना अलक्ष्य होऊन बसतो अस तेनी मला सांगिट्ले.
उणीवता n imperfection. दोष ; उणीव / उणवाई in sm. uis तोड कराला वज्र घेताना वज्राला उणीवता कायतरीन आहेका म्हणून बरोर पाह्यींगून घेणे बर॑ / चोखोट.
उणीवता n disdainful attitude. एळक्कारम (Tamil). uis अम्च पक्षा उणे स्थितींत असणारांला अम्ही कद्दीन उणीवतांत पाह्ताने.
उणे adj deficient. scanty. less. कम्मि ; उणा in sm. uis गेल वर्षाच पक्षा हे वर्षी पाऊस उणे होत॑.
उणे adj wanting. कम्मीपण. उणावा. uis तुला अवडलते लुगडे घ्याला तुझकडे पैसे उणे म्हणून असलतर सांग, मी देतों.
उणे adj inferior (in value etc.). उणे ; उणा in sm. uis टाटा मोटर्साच एक लाख रुपेच बंडी घेणे कायकी उणे म्हणून कितिकी लोक म्हणींगतात.
उणे adj lowly. उणे ; उणा in sm. uis उणे जातीच लोकांला पुढे आणिवाला सरकार भरून कार्यक्रम आरंभ केलाहेत.
उणे adj less. कम्मि ; उणा in sm. uis मझ लोंक सहा फुट उंच आहे. पण, अम्च लेंकीच उंच पांच फुट सहा इंचच ; म्हण्जे, तिन तिज भाऊच पक्षा सहा इंच उणे आहे.
उणे n failing. imperfection. उणीवता ; उणे in sm. uis तुम्च डोळेला तो करलते कामांत काहीं उणे आहे म्हणून दिसलतर सांगा, पुन्हाईं तला ते काम बरोर कराला सांगतों.
उणे n minus. एक संख्यांतून अण्किएक संख्या कम्मि कराच ; उणे / उणा in sm. uis तो ल्हान पोर इषोबांत॑ / हिषोबांत॑ उदंड षाणा (शाहणा). कित्ति थोर असाच दोन संख्या देलतरीन निमिषांत एकांतून अण्किएक उणे करून बरोरल॑ उत्तर देईल.
उणे n less in perception or actuality. वाटणेंत उणे. uis तुम्च मनांत तुम्च लोंक वाचणेंत उदंड षाणा (शाहणा) म्हणून असुया. पण, अम्च लोंक पणीन वाचणेंत उणे काहीं नाही.
उणे-करणे vt to reduce. कम्मि करणे. uis तो येतां-येतां विपरीत फुगत आहे. पथ्याच जेवण करून जेड उणे-करींगणे तलाच चोखोट / चोखट.
उणे-करणे vt to subtract. एक अंकांतूं वेगळ एक अंक काढणे. uis श्रद्धा म्हणाच तला नाहीच नाही. इषोबाच / गणिताच परीक्षांत एक प्रश्नाच उत्तर देताना अंक उणे कराच सोडून, जोडून सत्यानाश करला.
उणेपक्षा n at the least. कम्मिपक्षा. uis तला विसंबींगून मी मझ असाच काम सोडून तज बरोर बिसिनस आरंभ केलों. अत्ताच कळ्ळ॑ तजकडे बंडवाळ सांगास्क एवढ॑ काहीं नाही म्हणून. उणेपक्षा तो मला तज खर॑ स्थिती सांगट्लासलतर मी मझ काम सोडलासना.
उणे-प्हाणे vt to find fault. चूक प्हाणे. चूक सांगणे. uis मी कित्ति चोखोट काम केलतरीन मझ व॑र उणे-प्हायलतरेच तला समाधान होईल.
उणे-सांगणे vt to talk ill of. to find fault with. अपवाद बोलणे. अपवाद सांगणे. दोष सांगणे. uis काहीं आधार नाहीस्क दुसरेंला उणे-सांगणे तज एक ओंगळ / वंगळ स्वभाव आहे.
उतणे vi to swell. सुजणे. फुगणे. uis आज पाष्टे तो अंबा तोडाला झाडाच व॑र वेघताना खाले पडला. घाव काहीं झालनाही म्हणून सांगिट्ला. पण, अत्ता पाहताना हात उतून आहेस्क आहे. हड मोडलाहे वाटते.
उतणे vi to boil and over flow. तावून पात्रांतूं बाहेर येणे. uis दूध तावताना उतून बाहेर येईनास्क असाला एक प्रत्येक विधाच भांडि अम्ही गेल वार घेटलों.
उतरणे vi to get down. व॑रून खाले येणे. uis तो नारळ तोडाला झाडाव॑र वेघतानेच मला कळ्ळ॑, तला हे कामाच दंडक नाही म्हणून. तो उतरून येयापतोरी खाले पडतोका म्हणून मला भें वाटत होत॑.
उतरणे vi to alight. to disembark. गाडींतून उतरणे. uis सामान पूरा उतरीवला नंतर तेनी गाडींतून उतरले.
उतरणे vi to abate or subside. उणे होणे. कम्मी होणे. uis गेल दहा दिवसाच नंतर आज पाष्टे तज जेर उतरल॑. एक-दोन दिवसांत आंग बर॑ होईल वाटते.
उतरणे vi to go down (in level). कम्मी होणे. uis उन्हाळांतपणीन अम्च घरच॑ आडाच पाणी उतरना.
उतरणे vi to look pulled down in health. आंग क्षीण होऊन दिसणे. uis समीपांत मी राव-साहेबाना प्हायलों. पाप, उदंड उतरून गेलाहेत.
उतरणे vi to decline or deteriorate. उणे स्थितीच होणे. uis दुसर लोकयुद्धाच नंतर अमेरिका एक "महाशक्ति" झाल॑. पण, अत्ता ते स्थिति उतराच लक्षणांत आहे.
उतरिवणे vt to make one get down or come down. वरून खाले आणिवणे. uis हे पोराच चेष्टा सोसाला होत नाही. अंबाच झाडांतून उतरीवा पतोरी मला देव दिसून गेल॑.
उतरिवणे vt to set down or put down. खाले ठिवणे. uis अवसर करनाका. बंडींतून सामान पूरा उतरिवला नंतरेच मला घराच आंत येयाला होईल.
उतरिवणे vt to unload. सामान उतरिवणे. uis पूरा सामान उतरीवला नंतर मी कूलीवालाला पैसा देलों.
उतरिवणे vt to alight or disembark. (गाडींतून) खाले येणे. uis मझ मायेला चालाला होईना म्हणून कळींगूनीं मी त्यांस गाडींतून उतरिवा पतोरी तुम्ही कां एवढ॑ आतर भोगलांत / दाखिवलांत ?
उतरिवणे vt to make shorter. to reduce the height. उंच उणे करिवणे. uis घरच भोंतालभिंतीच उंच जास्ति झालाहे. थोड उतरिवाम / उतरिवांव.
उतरिवणे vt to abate. to reduce. उणे करिवणे. कम्मि करिवणे. uis तज जेर जास्ति झालाहे. एक नव॑ ओखद / औषध देऊन उतरिवाला पाह्तों.
उतरिवणे vt to put down (tantrum, ego etc). उणे करिवणे. कम्मि करिवणे. uis तज अट्टहास जास्ती झालाहे. थोड उतरिवूंटाकून येतों.
उतरिवणे vt to doff. to strip. कापड उकलिवणे. uis अट्टहास राहत॑ केलनाहीस तर॑ तुज कापडे उतरीवूनटाकेन !
उतार n slope. एक पटीस खाले उतरून असाच. एक पटीस उंच अणी अण्किएक पटीस उतरून असाच. uis (1) अम्ही घेट्लते जमीन उजव॑ पटीस उतार आहे. (2) कवलाच / कौलाच छत बांधताना अथवा छ्ताच कॉण्क्रीट घालताना बरोरल॑ उतार देनातर पाऊसाच पाणी लोकुर गळून जाईना अणी थोर पाऊस येताना पाणी खोलीच आंत येयाच साध्य पणीन असेल. (3) अम्च घर अम्च अग्रहारांत उतार असाच ठिकाणांत आहे. तजमळे थोर पाऊस / पौस आलतर पाऊसाच तेवढे पाणीईं अम्च घरापटीस एक नदीस्क येत अस्त. चोखोट वेळ सोमोर / समोर एक थोर मोरी असामळे पाणी पूरा तजांतसून बेष बडींगून जात. Note. खालपट (adj) means slopping (land).
उतिर adj not sticking together (eg, cooked rice). मोकळ॑. चिकटनास्क वेगळ वेगळ असाच. uis नव॑ तांदूळांत भात करतम्हा उतिर-उतिर भात पह्जे म्हणजे पाणी उणे घालाम / घालांव, नाहीतर शिजलते भात मुद्दा होऊन बसेल. Note. from Tamil.
उतिवणे vt to boil-over (eg. milk). ताविवून बाहेर आणिवणे. uis गृहप्रवेशाच वेळी दूध ताविवून उतिवाच एक पद्धत आहे.
उतून येणे vi to boil and overflow. उतून पात्रांतून बाहेर येणे. uis गृहप्रवेश सणाच वेळी दूध तावून भांडीच बाह्येर उतून येम / येंव म्हणून आहे.
उत्कंठा n anxiety. मनाच अस्वस्थता. मनाच गोंधळ. uis गल्फ देशांत उद्योग मिळ्ळ॑ म्हणून गेलते पोराकडून कागदकी ए-मेलकी येऊन उदंड दिवस झाल म्हणून तज बापाला फार उत्कंठा झालाहे.
उत्तत्या n dried dates. वाळलते खर्जूर. uis दुधांत दोन उत्तत्या, मिरे, हळेद / हळदी हे सर्वीन घालून कढिवून नित्य पीलतर अम्च रक्तला पुष्टी मिळेल मात्र न्हो, पडसा-खोंकळा हे अग्गीन सुलुभांन येईना पणीन.
उत्तप्पम n a dosa like preparation. धिरडेस्क एक खायाच पदार्थ. uis उत्तप्पम कराला म्हणून पीठ कालीवून ठिवणे थोड अपरूपेच. कां म्हण्जे, नुस्त पीठांत उत्तप्पमाला पह्जते कांदा मिळिवलानंतर तेच दिवस उत्तप्पम करनातर पीठ लोक्कुर विटून हाळ होईल. Note. from Tamil.
उत्तम adj very good. excellent. उदंड चोखोट. बेष. uis दरएक मायबापीं त्यंच लेंकरे वेगळ लेंकरांस एक उत्तम उदहरणास्क असांव म्हणून आशा ठींगणे सहजेच.
उत्तर n North. उत्तर दिशा / दिक्. uis महाराष्ट्रा राज्य कर्नाटका राज्याच उत्तर दिशांत आहे.
उत्तर n answer. बदिल. जवाब. uis हिषोबाच परीक्षांत मोत्तम पन्नास प्रश्नांत मला अठ्ठेचाळीस प्रश्नाला बरोरल॑ उत्तर द्याला झाल॑. Note. मोत्तम is Tamil for "total"
उत्तरायन n tha apparent movement of the Sun towards north. दक्षिणायना झालानंतर सूर्य उत्तर दिशाला जायास्क दिसाच प्रयाण. uis अम्च देशाच उन्हाळाच ऋतु उत्तरायनाच वेळांत होत॑.
उत्तरीय n upper cloth covering torso of a man. आंगाच व॑रच भागांत पांघरिवून नेसाच कापड. अंगवस्त्र. अंगोस्त्र uis तिरुवनंतपुरमाच अनंतशयन देऊळाच गर्भगृहाच जवळ जाताना उत्तरीय नेसींगटलसलतर ते काढून हाती धरींगांव॑, नाहीतर मादावर बांधिंगांव॑.
उत्तान द्वादशी n the day of the religious festival conducted during Karthika month for celebrating the wedding of Tulasi with Lord Vishnu. कार्तिक महिनेंत कराच तुळसी-विवाह सणाच दिवस. uis उत्तान द्वादशीच सणांत तुळसीमंटपांत अवळाच काठी रोवून ठिवाच्याला कारण काय म्हणजे, विष्णूच सानिध्य असाच साळिग्रामशिलाच बदिल अवळा ठिवतों म्हणाचेच.
उत्पत्ति n origin. उत्भव. आरंभ होणे. uis (1) विदेश व्यापार करताना सामग्रींच उत्पत्ति कोण्त देशांत झाल॑, हे विषय अधिकारींस लिव्हून कळिवाम, अस एक नियम आहे. (2) व्यापारी लोके ऑण-लैनांत त्यंच सामान विकाच आहे म्हणजे ते सामान कोण्त देशांत उत्पत्ति झाल॑ म्हणून घेणारांस कळिवांव म्हणून हे जवळ नियम आलाहे.
उत्पत्ति n production. उत्पादन. uis वेगळ देशांच बरोर पाह्ताना दूधाच उत्पत्ति भारतांत सगळ्यांच पक्षा जास्ति आहे.
उत्पन्न n produce. उत्पन्न. uis हे वर्ष झालते चोखोट पाऊसामळे शेतीच जमीनांत उत्पन्न बेष झालाहे.
उत्पादन n creation. production. निर्माण. uis आर्सलर-मिट्टल स्टील कंपनि भूलोकांतेच सगळांचीन पक्षा जास्ति लोकुंडाच उत्पादन करतात.
उत्भव n origin. आरंभ. uis पावसाळाच वेळांत पाऊसाच पाणीहीं, उन्हाळाच वेळ हीम विघरून येयाच पाणीहीं असामळे हिमालय पर्वतांत उत्भव होयाच सगळ नदींतीं वर्ष पूराईं पाणीच प्रवाह असेल.
उत्सव n a religious festival. सण. uis (1) वर्षा-वर्षी आचरण कराच श्री राघवेन्द्रस्वामीच आराधना उत्सवाला अम्ही अम्च संभावना चुकनास्क मंत्रालयमाला पाठिवून देणे आहे. (2) जुने काळांत संध्याकाळीच वेळी देऊळाच उत्सवाच मिरिवणी करताना बीदीच दोनपटीसीन दिवटी धरींगून जात होते, पण अत्तच काळांत दिवटीच बदल ट्यूबलैट धरींगतात. Note. दिवटी of SM appears to be from तीवेट्टि of Tamil.
उत्सव n a social or cultural festival. सामूहिक अणी सांस्कृतिक समारंभ. UIS. केरळमाच ओणम तिकडल॑ हिंदु धर्माच सग्ळ्याचीन पक्षा प्रधान सण आहे तरीन, हे काळांत तिकडल॑ सगळ॑ धर्माच पोणावांटा लोकीन ते एक सामूहिक उत्सवास्क आचरण करतात.
उत्सव-मूर्ती n God's idol used for puja and procession outside the sanctum sanctorum or the temple itself. गर्भग्रहाच बाहेर अथवा देऊळाच बाहेर बीदींत पूज अणी मिरिवणी कराच देवाच विग्रह. uis उडुपी क्षेत्रांत रथोत्सवाच समय देवाच उत्सव-मूर्तीला अलंकार केलते रथांत बसिवून मिरिवणी कराच प्हायाला गंभीर अस्त. Note. this idol will usually be of a much smaller size compared to the main idol inside the sanctum sanctorum.
उत्साह n enthusiasm. उत्साह. uis चेन्नैच मेरीना बीचाला बलाईंगून जोतों म्हणून सांगिट्लोंकी नाही, रडत होतते लेंकरू उदंड उत्साहांत तिकड जायाला तय्यार होयाला आरंभ केला.
उत्साह n delight. उत्साह. uis उदंड दिवसापसून पह्जे म्हणून विचारत होतते बावोली लोक्करेच मिळाला जात म्हणून ऐकून तिला फार उत्साह झाल॑.
उदणे vi to be born. उजणे. जन्म होणे ; उपजणे in sm. uis मांदराच पिल्लू उदून सात आठ दिवसाच नंतरेच दोळे उघडेल.
उदय n rising of Sun, Moon or stars. सूर्य, चंद्र अथवा नक्षत्र आकाशांत व॑र येणे. uis ध्रूव प्रदेशांत अस्तमन झालांपिरी सुमार सहा महिनाला सूर्याच उदय होईना.
उदलादिवस n birth day. उजलादिवस. जन्म दिवस ; वाढदिवस in sm. uis अम्च नातू जॅनुवरी एक तारीखला उजल-ते-करतां, तज उदलादिवस सये ठींगणे सुलूभ अस्त॑.
उदळ॑ adj fair. bright. light complexioned. उजळ॑. प्हायाला गोरे असाच ; उजळा / उजळ in SM. uis लेंकरूविणी असताना तो उदळ॑ होता, पण क्रिकट खेळाला आरंभ केलानंतर तज गोरपण उणे झालाहे. Note उदळ॑ and उजळ॑ is an example of interuse of द and ज in DM.
उदंड adj much. उजंड. भरून. फार. uis भारताच संस्कृति उदंड पुरातन आहे. पांच हदार / हज़ार वर्षाच पुढे मोहन-ज-दारो, हडप्पा असल॑ ठिकाणांतून खोदून काढलते पुरावस्तांतून हे अम्हाला कळते.
उदंड adj plenty. उजंड. भरून. फार. uis मी ल्हाण असताना मझ बापाकडून उदंड मार खालोहें.
उदंड adj abundant. उजंड. भरून. फार. uis हे वर्ष अंबाच झाडांत उदंड फूल सोडलाहे.
उदार adj generous. थोर मनाच. धाराळ मनाच. uis मझ पणजा उदंड उदार मनाच होते, ते करतां त्यांस॑ "उदार सिरोमणी" अस एक बहुमानाच बिरुद ट्रावनकूर महाराजा 1924-आंत देले.
उदास adj depressed. dejected. मनाला वाटाच संकट. मनाला वाटाच दुख. uis एक कार्य / विषय झाल नाही म्हणून मन्न उदास करींगून बसापक्षा पुन्हा बेष प्रयत्न करून ते कार्य साध्य कराला पह्जे.
उदाहरण n an example. दृष्टांत. uis बाळपणांत माय-बापांच बरोर घरांत वाढून त्यंच संरक्षण मिळ्ळ॑ नाही तरीन, स्वंत श्रमांतून पुढे येयाला होईल म्हणून करून दाखिवलते अमेरिकाच राष्ट्रपति बराक ओबामा स्वयं-परिश्रमाच एक चोखट / चोखोट उदाहरण आहेत.
उद्घाटन n inauguration. समारंभ आरंभ करणे. कार्यक्रम आरंभ करणे. uis अम्च साळेच नव॑ मैदानाच उद्घाटन कराला अम्ही विद्याभ्यास मंत्रीला एक आमंत्रण पत्र पाठिवलों.
उद्देश n intention. उद्धेश्य. (क्रीयाच / विषयाच) आवश्य. uis उदंड दिवस मझकडे बोलानास्क असून अत्ता तो मला मिळाला आलाहे. तज उद्देश काय मणून कळत नाही.
उद्धरण n restoration. जीर्ण झालते वस्तु बरोर कराच. uis यंत्र, उपकरण, व्यवसाय / वाणिज्याला पह्जते सामग्रि वगैरे निर्माण कराच कारखानांतून येत असाच धूपामळे ताज-महळाच बाहेरच भाग पूरा पिवळ॑ रंगाच डाग झाल॑ अणी उद्धरण केलानंतर अत्ता प्हायाला थोड बर॑ झालाहे.
उद्धरणे vt to restore. जीर्ण झालते वस्तु बरोर करणे. उद्धारणे. uis कंबोडिया देशाच पुरातन हिंदु देऊळ, अंकोर-वात, तज जीर्ण स्थितींतून उद्धरणे करिवाला भारतांतून पुरावस्तु विभागाच अनेक लोक गेल्होते.
उद्धरणी n a small spoon used in pooja. पूजाला उपयोग कराच चमचा. uis दिवसोडीच पूजाला मी एक तांम्रेच उद्धरणीईं सणाच दिवसी रुपेच उद्धरणीईं उपयोग करतों. Note. पंचपात्र and उद्धरणी form the set.
उद्धार n upliftment. उणे स्थितींतूं चोखोट स्थितीला आणणे. uis दलित वर्गाच लोकांला उद्धार कराला सरकार उदंड कार्यक्रम काढलाहे.
उद्धारण n restoration. जीर्ण झालते वस्तू बरोर कराच. उद्धरण. uis हे जवळ बंगळूरच जवळ असाच रामूहळ्ळी म्हणाच खेडेगांवांत श्रीरामाच देऊळ उद्धारण केलते प्रकल्पाला अम्च विहीण अध्यक्ष म्हणून होते.
उद्धारणे vt to restore. जीर्ण झालते वस्तु बरोर करणे. उद्धरणे. uis रामूहळ्ळी श्रीरामाच देऊळ उद्धारणे कराला सुमार एक वर्षाच वेळीन वीस लाख रुपेहीं खर्च झाल॑, पण काम सार्थक झालकी म्हणून अग्गिदनासीन संतोष वाटल॑.
उद्भव n coming into being. उत्पत्ती होणे. uis हिमालया पर्वतांत गंगोत्रींतून गंगा नदीच उद्भव होत आहे.
उद्या adv tomorrow. उजा. आजच॑ नंतरल॑ दिवस. uis काल मझ मित्राला दुकान-बीदींत उदंड दिवसानंतर मिळताना अम्च घराला कां अत्ता अग्गीन येतनाहीस म्हणून विचारत्याला बरोर बदिल देनास्क, उद्या कंडिप येतों म्हणून सांगिट्ला. Ety. from Samskrit उदय, meaning rising (Sun). Note. (1) better उद्या. (2) the SM word उद्या morphed into the DM उजा through a double process, first to उज्या and thence to उजा. During the process the द in उद्या of SM was replaced by ज.
उद्यान n park. garden. बाग. uis गिरिनगरांत अम्च घराच दोन पटीसीन फार जवळ एकेक उद्यान आहे अणी दिवसोडी पाष्टे मी चालाल जाताना एक दिवस एक उद्यानाला जाणे अणी अण्किएक दिवस दुसर॑ उद्यानाला जाणे अस करत असतों.
उद्या-नाही-तेरमा n the third day after today. आज सोडून तीन दिवस नंतरल॑ दिवस. तेरमा दिवस. उद्या-नाही-तेरवा. uis उद्या-नाही-तेरमा इषोबाच परीक्षा असूनपणीन आज तो एक सिनिमाला गेलाहे.
उद्या-नाही-परमा n day after tomorrow. आज सोडून दोन दिवस नंतरल॑ दिवस. परमा दिवस. उद्या-नाही-परवा. uis उद्या-नाही-परमा गांधि जयंती असाकरतां बॅन्काला सुट्टी असेल.
उद्योग n employment under someone else or under some other entity. दुसरेंच खाले कराच काम. नोकरी. uis हे काळांत बेष वाचलतरेच एक उद्योग मिळेल, अस काहीं नाही. देश उदंड विकास झालाहे, ते करतां एक मादिरीच काम कोणालीं मिळेल. Note. (1) उद्योग in SM would generally mean own industry or self owned business related employment or activity. But in DM उद्योग means emplyment under someone else or under some other entity, which in SM is नोकरी. (2) मादिरी is Tamil for a type.
उद्योगछेद n suspension from service. उद्योगांतून सध्याला सरकिवणे. uis कोणालतरीन उद्योगछेदाच शिक्षा देलतर त्यांस धर्माच एक भाग ते शिक्षा रद्द होयापर्यंतीन देवूनेच सरांव अस॑ नियम आहे.
उद्योगत्याग n resignation from service. उद्योगविराम. उद्योग सोडणे. uis चोखट कामांत होतते मझ एक मित्र गळ्फांत काम मिळ्ळ॑ म्हणून उद्योगत्याग करूनटाकून तिकडे गेले.
उद्योगनिवृत्त n retirement from employment. उद्योगांतून निवृत्त / रिटैर होणे. uis मझ उद्योगनिवृति होऊन जवळजवळ वीस वर्ष होत आहे तरीन आजपणीन मी कित्येक जुने सह-उद्योगींच बरोर संपर्कांत आहें.
उद्योगरद्द n dismissal from service. उद्योगांतून स्थिरविणी सरकिवणे. uis मला कळ्ळते एक मनुषाला कामांत गोळमाळ करलत्यामळे उद्योगरद्द करूनटाकले तरीन तो सुप्रीम कोर्ट पर्यंतीन तज केस वाद करून उद्योगरद्दाच निर्णय रद्द करिवला.
उद्योगविराम n resignation from service. उद्योगत्याग. उद्योग सोडणे. uis मी उद्योगांत होतते बॅन्काच नियमाप्रकार कोणतरीन वीस वर्ष उद्योगांत असून, नंतर उद्योगविराम केलतर, त्यांस पूरा पेन्शन मिळेल.
उद्योगस्थ n officer. कचेरींत काम करणार अधिकारी. uis जुने काळांत सरकारी कचेरींत उद्योगस्थाच कामांत असणार मनुषाला लोकांकडून फार मर्यादा मिळत होत॑. पण हे काळांत ऐ.ए.एस. उद्योगस्थांस मात्र तसलते मर्यादा मिळते.
उद्योगी n employee. उद्योगांत असणार. uis केंद्र-सरकाराच उद्योगी लोकांस अग्गीन अत्ता चोखोट धर्मा अणी पेन्शन मिळते, जुने काळास्क नोहो.
उधय n white ant. पंढ्र मुंग्या ; उधई / उधय in sm. uis घरांत उधय वेघनास्क असाला तम्ह-तम्हा नुस्त व॑रून औषध शिंपडलतर पुरना, घरच॑ अस्तिवाराच / पायाच खाले पर्यंतीन औषध पोंचास्क भोई खोदून औषध घालांव.
उधार n transactions on credit or on trust. ऋणांत / रीणांत कराच व्यापार-व्यवहार. uis अम्च घरच॑ बाजूच दाळ-तांदूळाच दुकानवाला सामान उधारांत देत होता तरीन अत्ता उधार द्याच राह्ते करूनटाकला.
उधार n money owed on credit purchase. रीणांत घेट्लते सामानाच मोल. uis (1) मझ मामाला एक चोखोट गुण होत॑. महिना-महिने धर्मा मिळतानाच कोणाला-कोणाला पैसे देमते आहेकी ते समेच देऊनटाकतील. त्यांस उधाराच पैसा हात्ति ठींगणे अवडनाच अवडना. (2) धर्माच दिवसी ऑफ़ीसांतून घराला येयाच वाटी वाणीच दुकान, पेपरवालाच दुकान, लेंकरांच ट्यूषन-मास्टराच घर अस अस कोठ कोठ पैसे द्याच / देमते आहेकी तिकड अग्गीन वेघून उधाराच पैसे देऊनटाकूनेच तेनी घर येऊन पावतील.
उधार n goods held on credit purchase. रीणांत घेट्लते सामान. uis स्वंत बंडवाळ घालनास्क उधाराच माल ठींगून व्यापर केलतर तसल॑ माल देणार विपरीत बड्डि उप्पडतील.
उनु adj heated. hot. ऊन केलते. uis उनु भातांत तूप अणी मीठ घालून कालिवून खायाला लेंकरांस भरून अवडेल.
उनुउनू adj fresh and hot from the stove or oven. चूलींतून उतरिवून नंखरेच वेळ झालते ; ऊनऊन / ऊन्हऊन्ह / उन्हून / उन्हन in sm. uis खायाच पदार्थ उनु असल॑नाही तरीन परवानाही मला, कॉफ़ी मात्र उनुउनू असांव / असाम.
उनुउनू fig quite recent. अत्ताच अलीकडे झालते ; ऊनऊन / ऊन्हऊन्ह / उन्हून / उन्हन in sm. uis टीवींत॑ अत्ता उनुउनू आलते समाचारा प्रकार जपानांत एक थोर सुनामी येयालजात॑ म्हणून घोषणा झालाहे.
उनुपाणी n hot water. ऊन केलते पाणी. uis उनुपाणींत आंघोळ / आंघोळी करून दंडक झलत्यांस हिंस पाणींत आंघोळ करांव म्हणजे दोन दपा हेपटीस तेपटीस पाह्तील !
उन्हाळा n hot weather. summer. ऊनाच वातावरण. uis उन्हाळांत उत्तर भारतांत बडिवाच उनुउनू वार॑ मला सोसाला होईना.
उपकथा n story within a story. sub-plot. एक खाणीच आंतल॑ अण्कीएक खाणि. uis कष्मीरी ब्राह्मण सोमदेव ह्येनी अक्रावां शतकांत राणि सूर्यवतीच आज्ञानुसार लिव्हलते महाग्रंथ कथासरितसागरांत॑ "सिंहासन द्वत्रिंसिका" हे नावाच एक प्रसिद्ध उपकथा पणीन आहे.
उपकरण n instrument. काम कराला उपयोग कराच आयुध. uis घरांत ल्हाण-ल्हाण काम अम्ही स्वता करींगाला हातोडी, स्क्रू-ड्रैवर असल॑ उपकरण केम्हाईं ठींगणे चोखट.
उपकरणी n small utensils used in Deva Pooja. देवपूजाच ल्हाण पात्र. uis अम्च आजी फार सोवळेच होते अणी देवघराच सगळ॑ उपकरणीन वेगळ कोणालीन हात लावाला सोडनास्क तेनीच स्वता शुद्ध करून ठिवत होते.
उपकार n help. सहाय. uis बस्सांत प्रयाण करताना अम्चपक्षा थोरलेंस अम्च ठिकाण सोडून देलतर त्यांस ते एक मोठ उपकारास्क होईल.
उपग्रह n satellite. ग्रहाला प्रदक्षिणा कराच एक ल्हाण ग्रह. uis शनिग्रहाच उपग्रह "टैटान", हेच सूर्यमंडलांत सगळ्याचीन पक्षा थोर उपग्रह.
उपचार n gracious treatment. आदरांत वागणे. uis कित्येक लोकांच वागणेंतून, तेनी तेवढ॑दनालीन बेष उपचार करणार आहेत म्हणून कळूनजात॑.
उपजीवन n subsistence. एकदम उणे पैसांत (आदायांत) जीवन चालिवणे / काळ कांडणे. uis एक चोखोट उद्योगांत होतते ते मनुष आवश्य नाहीस्क ते काम सोडूनटाकला. अत्ता उपजीवनाला तिंडाट्टम झालाहे. Note. तिंडाट्टम as a figure of speech in Tamil means "problem".
उपदेश n advice. चोखोट प्रयोजनाच गोष्ट. uis महाभारतांत विदुर धृतराष्ट्राला कित्ति उपदेश देवूनीं शेवटी ते कोण्तीन तेनी पालन केल नाहीते.
उपद्रव n trouble. तंटा. uis अम्च गिरिनगर घराच भोंताले थोर थोर वृक्ष भरून असामळे उन्हाळाच महिनेंत सूर्याच ऊन नंखर उणे वाटते तरीन ते झाडांत केम्हीन असाच माकडांच उपद्रव सोसाला होईनास्क झालाहे.
उपद्रव n harassment. पीडा. तंटा. नच्च. uis ल्हाण-ल्हाण कामाच आवश्याकरतां सरकारी ऑफ़ीसांत जाणार लोकांला तिकडले उद्योगी लोके लांचाच उपद्रव करनास्क असाला लोकायुक्त नियुक्त झालाहेत.
उपद्रव n nuisance. तंटा. नच्च. uis अम्च बाजू घरांत आलते नव॑ कुटुंबांत दहा बारा लोके आहेत. रात्रि पूरा काय-कायकी शब्द होत असत॑. मला हे उपद्रव सोसाला होत नाही.
उपद्रव n botheration. तंटा. नच्च. uis झोंपी जाताना थोर घुरका सोडाच दंडक मला आहे. मझमळे दुसरेंस उपद्रव होताने म्हणून मी केम्हाईं वेगळ॑ एक खोलींतेच झोंपी जायाच.
उपनगर n satellite town. मोठ पट्णांच बाजु स्थापना झालते ल्हाण नगर. uis थोर-थोर पट्णांत जमीनाच मोल उदंड जास्ती असाकरतां पैसावंत नाहीत जन, म्हण्जे मध्य वर्गाच लोके, उपनगरांत घर करणे आहे.
उपनदि n a tributary. मुख्य नदीच बरोर मिळाच नदि. uis यमुना नदि गंगा नदीच एक उपनदि असलतरीन, ते स्वता एक मोठ नदि आहे.
उपनयन n thread ceremony. मुंज. जानव धारणाच सण. uis उपनयन झाल-की-नाही, ब्रह्मचारींस दिवसोडि संध्यावंदन करिवांमते जवाबदरी थोरले काढींगणे चोखोट.
उपनिषद n a set of ancient esoteric Hindu philosophical tomes following the four Vedas meaning "sitting down near". चार वेदाच नंतर येयाच पांडित्यज्ञान भरलते कित्येक प्रचीन हिंदू ग्रंथ. हे गोष्टाच अर्थ आहे "खाले जवळ बैसणे". uis बृहदारण्यक उपनिषदांत विदेह चक्रवर्ति जनकांच राजसदसांत गार्गी वाचक्नावी अणी यज्ञवल्क्य ह्यांच मध्ये झालते तत्वज्ञानाच तर्क फार प्रसिध अणी गाढ अर्थाच आहे. Ety from Samskrtam's उप implying "near", नि implying "down" and षद implying "sitting".
उपनेत्र n spectacles. डोळेच अर्सा ; चष्मा in SM. uis अत्ता अस्कीन गाजाच / अर्साच उपनेत्र घालाच बदल रेसी-लेन्साच उपनेत्र घालणे प्रसिद्ध झालाहे. Note. the word अस्कीन is a morphed form of अस्गीन which itself is a complex word of अस॑ and अग्गीन. Ety from Samskrtam's उप implying "near and assisting" and नेत्र meaning "eye".
उपन्यास n a religious discourse. तत्वज्ञानाच भाषण. uis रिटैर झालानंतर कित्येक वये झालते लोके सायंकाळी-सायंकाळी उपन्यासाच कार्यक्रमाला जाणे आहे. Ety from Samskrtam.
उपभाषा n dialect. एक भाषाच वेगळ एक रूप. लोकबोली. uis तंजाऊर मराठी पुणे मराठीच एक उपाभाषा आहे. Ety from Samskrtam.
उपमान n an illustrative comparison. तारतम्य उदाहरण. uis अम्च जीवन कस॑ चालत आहे म्हणजे, तज उपमान चार डोंगूरावर वेघून-उतराच कसकी तसेच आहे. थोड वेळ व॑र वेघताना श्रम अस्त॑, नंतर उत्तराच वेळ सुख वाटते, म्हणजे, वेघणे-उतरणे जीवनांत बदलून-बदलून येते. Ety from Samskrtam.
उपयोग n use. वापर. प्रयोगाला आणिवणे. uis कसालतरीन उपयोग होईल म्हणून मझ आजा जुने रट्टाच डब्बा काहीतरीन मिळ्ळ्तर ते काढून परणेच व॑र दत्तन ठिवतील. Note. परणे is a loan word from Tamil meaning a loft or attic. Ety from Samskrtam.
उपयोग n usefulness. प्रयोजन. uis तो अम्च काम करना म्हणून मला वाटते. तजकडे बोलून उपयोग नाही.
उपयोग n need of. आवश्यकता. uis लोकुंडाच / लोखंडाच डब्बाच आंत तो भरून ल्हाण ल्हाण सामान दत्तन ठिवलाहे. तज उपयोग केम्हा येईल, हे देवालाच कळेल.
उपयोग n utilisation. प्रयोग करणे. uis तला इंग्ळीषाच भरून गोष्ट कळेलतरीन ते गोष्टांच बरोरल॑ उपयोग कराला कळना.
उपरणी n cloth covering torso of a man. आंगाच व॑रच॑ भागाच व॑र पांघरून / पांघरिवून नेसाच कापड. उपरण. अंगवस्त्र. अंगोस्त्र. अंगूस्त्र. अंगोस्तर ; उपरणे / उपरणा in SM. uis (1) जुने काळांत केरळमाच॑ देऊळांत ब्राह्मण लोकांस मात्र उपरणी नेसींगून आंत जायाला सोडत होते, पण अत्ता कोणालीन तस सोडत नाहीत. (2) कोणाल तरीन धोति दान देताना तज बरोर उपरण पणीन देणे आहे.
उपराट n contrary. विरुद्ध. उलटा ; उफराटा in SM. uis मझ बहिणीच लोंकाला काय निर्देश देलतरीन उपराट कामेच करेल.
उपराट n inverse, meaning opposite in relation, nature, method etc. वाम. उलटा (स्वभाव, रीत इत्यादि) ; उफराटा in SM. uis तो ल्हाण लेंकरू अंगरखा उपराट घालिंगून / नेसिंगून गुंडि बरोर घालाला तरपडत होता. Note. like "inside out, upside down, contrary, opposite relation" etc.
उपराट n reverse, meaning opposite (direction etc). उलटा (दिशा इत्यादि) ; उफराटा in SM. uis (1) उर्दू, अरबी, फार्सी असल॑ भाषा उपराट लिव्हतील. म्हण्जे, उजवीकडून आरंभ करून डावीकडे संपवतील. (2) तीन वये असताना मझ नातूला संख्याक्रम उपराट सांगाला येत होत॑ ; म्हणजे, शंभरांत आरंभ करून एक पर्यंतीन सुलुभान सांगत होता. Note. like "
उपराट n obverse. मागे पटीस ; उफराटा in SM. uis हे कागदांत दोन पटीसीं छापलाहे. मी मझ अर्सा आणाला विसरलों. तुला विरोध / आक्षेप नाहीतर उपराट भागांत छापलते वाचून सांगशीलका ?
उपवन n a grove of shade trees. सावळी झाडाच स्थळ. uis कार्तिक महिनेंत धात्री-हवन करून, नंतर एक उपवनाच सावळी ठिकाणी बसून तीर्थ-प्रसाद घ्याच पद्धतीला वनभोजन म्हणून सांगतों. Note. Dhatri Havana is performed as a symbolic wedding of Dhatri (तुलसि) with Lord Krishna during the month of Kartika.
उपवास n religious fasting. धार्मिक निष्ठाच उपवास करून अनशी पोटांत असणे. उपास. uis अम्ही एकादशी दिवस पूरा उपवास करणे आहे.
उपवास n fasting. अनशी पोटांत असणे. उपास. उपाशी असणे. uis पोटाला बर॑ नाहीस्क ढाळणे वगैरे झालतर, एक दिवस उपवास बसणे चोखोट.
उपसणे vt to bale out water from a pond etc. to ladle out milk, ghee, oil etc from a vessel. उसपणे. उसणे. पाणी, दूध, तूप असलते द्रव्य व॑रून ढकळून काढून घालणे ; उपसणे in SM. Note. उसपणे is a phonetic jumbling of उपसणे and thence to उसणे.
उपसर्ग n prefix. गोष्टाच पुढे (आरंभांत) जोडाच अक्षर, नाहीतर / अथवा, अक्षरसमूह. uis लोकांच नावाच पुढे "श्री" "श्रीमती" अस॑ जोडणे उपसर्गाच उदाहरण आहे.
उपहार n light refreshment. पल्हार. पलहार. फलहार. लघु आहार. लघु भक्षण. uis प्रयाण करताना पोट भरून जेवा्च पक्षा काहीतरीन उपहार खाणेच चोखोट. Note. उप + आहार = उपहार. फल + आहार = फलहार / पल्हार.
उपहास n ridicule. मष्किरी. परिहास. अपहास. uis वेगळांस पाह्यिलतर उपहासांत बोलाच वंगळ॑ / ओंगळ॑ दंडक तला आहे.
उपाकर्म n the annual ceremony of wearing a new sacred thread. वर्षावर्षी न॑व जानव घालाच सण. श्रावणी. आवणी-अविट्टम (Tamil). uis मझ लोंक अमेरिकांत उद्योगांत आहे तरीन वर्षावर्षी चुकनास्क उपाकर्म करणे आहे. Note. हे सण श्रावण महिनेंत कराच म्हणून हेला श्रावणी म्हणतों.
उपाध्यक्ष n a person who is second in charge of an educational or teaching establishment. साळे / शाळे / विध्यालयाच प्रधान अध्यक्षाच जवळ-खालेच पदवींत असणार अध्यक्ष. uis मी वाचत होतते साळेच उपाध्यक्ष वीस वर्ष ते पदवींत होते अणी मुख्य-अध्यक्षाच पदवि खाली झालकी-नाही वेगळ॑ कोणालकी मुख्य-अध्यक्षविणी नियुक्त केले म्हणून समेच राजिनामा / उद्योगत्याग करूननटाकले.
उपाध्याया n a religious teacher. धर्मगुरू. धर्मपंडित. uis मझ सासराच / ससराच एक गाढमित्र थोर धर्मपंडित होते. आध्यात्मिक विषयांत फार पांडित्य घेट्लते उपाध्याया होते म्हणून त्यांस अनेक बहुमान बिरुद मिळ्ळ॑.
उपाय n a plan. an idea. योजना. uis बरोर आलोचना करून एक चोखोट उपाय निश्चय केलांपिरी आरंभ कराच कोण्त कार्यईं / विषयीन पराजय होईना.
उपाय n a remedy. a solution. सुधाराच योजना / वाट. uis एक नव॑ बिसिनस आरंभ करतों म्हणून हाति असाच पैसे पूरा खर्च करूनटाकून भयंकर कष्टांत पडलाहे तो. अत्ता त्यांतून चुकाला काहीं उपाय आहे का म्हणून चिंता करेत आहे.
उपाय n a strategy. युक्ति मार्ग. uis बरोरल॑ उपाय प्रयोग केलतर एक महाशक्तीला पराजय कराला होईल म्हणून हे जवळ झालते युद्धांतून अम्हाला समजते.
उपाशी adj starving. empty stomach. उपासी. भूकांत असाच स्थिती. खाली पोट. अनशी पोट. uis एकादशी दिवसी पूरा उपाशी असून द्वादशी पाष्टे लोक्कर पारणे करणे आहे.
उपास n religious fasting. धार्मिक निष्ठाच उपवास करून अनशी पोटांत असणे. उपवास. uis शनिवार शनिवार मी उपास करून रात्रिच वेळ काहितरीन पल्हार खायीन.
उपास n fasting. अनशी पोटांत असणे. उपवास. uis गुरुवार गुरुवार रात्रीच जेवण नाही मला, उपास असतों.
उपासना n worship. पूजा. आराधना. uis उद्योगांत असताना त्यांस धार्मिक विषयांत श्रद्धा द्याला वेळ होत नाही, पण रिटैर झालानंतर देवकार्य, पूजा-पद्धती अणी उपासना कर्म असलत्यांत फार उत्साह दाखिवाला आरंभ करले.
उपेक्षा n abandon. आवश्य नाही म्हणून सोडूनटाकणे. uis वाघ, सिंह असलते राणाच मृगाला त्यंच पिल्लूंत कोण्त तरीन वांचना म्हणून वाटलतर तला दूध पणीन देईनास्क उपेक्षा करूनटाकल.
उपेक्षा n neglect. पालन करनास्क सोडूनटाकणे. परवा करनास्क सोडूनटाकणे. uis बरोर पालन करनास्क उपेक्षा करले म्हणून वय झालते तज माय-बाप दोघीन एक वृद्धाश्रमांत जाऊन मिळींगटले.
उप्पडणे vi to pluck out. to pull out. ओढून / होढून बाहेर काढणे ; उपटणे in sm. uis अम्ही दोघे बहिणीहीं ल्हान असताना भांडणे आरंभ करतानाच एकालेक केंस उप्पडत होतों.
उप्पडून काढणे fig an idiom implying "to ferret out" (information etc. against one's wish). दूसरेकडून काहीं विवर॑की वेगळ विषय कायतरीनकी निर्बंधांत ओढून / होढून काढणे. uis ते बायकोकडे मात्र मी बोलाला जाईना. कां म्हण्जे, बोलाला आरंभ करतानच मझकडून अम्च घरच॑ विवर पूरा उप्पडून काढणे विना तिला वेगळ एक उद्देशीं नाही.
उप्पिट n a light refreshment made from rava. उप्पुमा. रवांत केलते एक पल्हार. uis मला सादा उप्पिटाच पक्षा कांदा घाटलते उप्पिट अवडेल. Note. from Kannada, उप्पु (salt) + हिट्टु (flour).
उप्पेरि n fried vegetable chips. तळलते भाजीपालाच पत्तळ चीर. uis नेंद्रन केळेच उप्पेरीला बरोरल रूच येम / येंव म्हण्जे खोब्रीच तेलांत तळलतर मात्र होईल. Note. from Malayalam.
उबारा n sultriness. ऊब. उष्ण. uis रात्रीच वेळ आकाश वांबाळा / वामाळा असलतर उबारांt घाम सुटून झोंपीला तंटा होईल.
उब्बस n overpowering and debilitating mental state. मनाला उदंड कष्टकी, संकटकी वाटणे. ऊर चेंपास्क मनाला वाटणे. uis त्यंच लोंक पुन्हा परीक्षांत हरला म्हणून ऐकून तेनी उब्बस करींगून बसले.
उभयान्वयी अव्यय gram conjunction. दोन वाक्य अथवा दोन गोष्ट जोडाच अव्यय (व्याकरण ).
उमटणे vi to feel like vomiting. to feel nauseating. वांति येयास्क वाटणे. ओंकारा येणे. uis उमटास्क वाटलतर लिंबुपाणींत मीठ घालून पीलतर थोडक आश्वास येईल.
उमाठ n elevation. height. उंच ठिकाण. व॑रच स्थळ ; उमाठा / उमाट in sm. uis अंदमान-निकोबार द्वीप समूहांत सुनामीच पाणी येताना तिकडल॑ आदिवासी लोके पूरा उमाठ प्रदेशाला पळून जाऊन त्यंच जीवन रक्षा करींगट्ले.
उमाठ-बधकळ adj up and down. व॑र-खाले. uis अम्च देशांत पोणावांटा बीद उमाठ-बधकळ असते. प्हायींगून चालल॑ नाहीतर अम्ही तडकून पडओं.
उम्मा n kiss. मुक्का. चुंबन. uis ल्हान लेंकरांस प्हायिलतर उम्मा द्यालाम / घालांव म्हणून वाटेल तरीन अम्ही ते करताने. कां म्हण्जे, अम्हाला पडसा खोंकळा काहीतरीन असलतर लेंकरांस ते येउया.
उरणे vi to remain unused. उपयोग करनास्क बाकी राहणे. uis अम्च रात्रीच जेवण झालांपिरी भात काही तरीन उरून असलतर कुत्राला ते घालणे आहे.
उरलते adj that which remained unused. उपयोग करनास्क बाकी राह्यलते. uis संपाकीण तिज काम पूरा करून निघून गेलांपिरी उरलते काम कायतरीन असलतर ते मझ बाईल करेल.
उरळि n a heavy large mouthed vessel with well rounded periphery but a small base, used for cooking kheer etc. खीर वगैरा कराला उपयोग कराच थोर तोंड अणी ल्हान उंचाच जेड / जड पात्र. uis मझ आजीच घरांत अप्पि पायसम उरळींतच करणे. Note. from Malayalam.
उरळेगड्डे n potato. आलू गड्डे. uis उरळेगड्डेच भाजी, उरळेगड्डे्च बोंडा, उरळेगड्डेच उप्पेरि, उरळेगड्डेच फ्रेंच-फ्रैस हे तेवढीन मला उदंड अवडेल.
उरिवणे vt to save. to leave something aside (for a latter time). बाकी ठिवणे. नंतरशाला काढून ठिवणे ; उरवणे / उरविणे in sm. uis मझ आजी बज्जि कराला कालिवलते उडिदाच पीठ थोड तरीन उरिवून नंतर तजांतून डांगर करतील.
उलटा adj reverse. उपराट. uis एकदपा मी कारांत बांगळूराच बळेपेटाच ल्हान-ल्हान गल्लींत जाऊन सांपडींगट्लों. वापस येयाला पूरा वाटीन उलटा पळिवत येमते पडल॑.
उलटा adj obverse. उपराट. uis कंप्यूटरांत प्रीन्ट कराच कागदाच उलटा पटीस खाली असते म्हणून मी ते कागद फाटून टाकनास्क, पुन्हा तज उलटा भाग उपयोग करतों.
उलटा adj upside down. व॑र-खाले. uis विक्रम-वेताळ खाणींत विक्रमादित्याला वेताळ विचाराच प्रश्नाला अस्कीन बरोरल॑ उत्तर देतांतरूं ते समेच उडून जाऊन स्मशानांतल सिंसपा-झाडांत उलटा लोंबून पडेल.
उलटा adj inside out. आंतल॑ बाहेर. uis ते ल्हान पोर केम्हाहीं बनियन उलटा घालतो.
उलटा-फुलटा adv topsy turvy. व॑र-खाले ; उलटपालट / उलटापालट / उलटासुलटा in sm. uis खोलीच आंत सामान बरोर जोडून ठिवाला तला सांगतल्होतों तरीन मी जाऊन पाह्ताना सग्ळीन उलटा-फुलटा पडलसाच पाह्यलों.
उल्लास n delight. joy. pleasure. आनंद. uis मृगशालांत हरणाच ल्हान पिल्लू इकडे-तिकडे पळून उडीमाराच पाह्ताना काय उल्लासांत अस उडीमारतका म्हणून अम्हाला वाटूनजाईल.
उशीर n delay. देर. वेळ होणे. uis जपानांत ट्रेन उशीर होऊन जाऊन पावलतर तुम्हाला टिकटाच पूरा पैस वापस मिळेल.
उष्टवण n feeding ceremony when solid food is given first to a baby. अन्नप्राशन. अन्नमुहूर्त. उष्टावण. लेंकरांला पह्यिलंदा भात द्याच सण ; उष्टावण / उष्टवण in sm. अम्ही मुंबईंत असताना अम्च लेंकीच उष्टवण जोगेश्वरींत असाच श्री राघवेन्द्रस्वामी मठांत करिवलों.
उष्टावण n feeding ceremony when solid food is given first to a baby. अन्नप्राशन. अन्नमुहूर्त. उष्टवण. लेंकरांला पह्यिलंदा भात द्याच सण ; उष्टावण / उष्टवण in sm. uis साधारण होऊन उष्टावण होयाच पर्यंतीन ल्हान लेंकरांस घट्टि पदार्थ काहीं द्याच दंडक नाही.
उष्ट॑ n half eaten food left in the leaf or plate. पानांत अथवा ताटांत अर्ध खाऊन सोडलते जेवण॑ / पदार्थ / भात ; उष्टा / उष्टे in sm. uis कित्येक मठांत जवणे झालांपिरी हात धुवाला जाताना उष्ट तुडिवनास्क प्हायींगून जामतेस्क अस्त.
उष्ट॑ n anything soiled or contaminated on account of it being kept in the mouth. तोंडांत लागिवलते साधन / वस्तू ; उष्टा / उष्टे in sm. uis नंख उष्ट॑ करनको म्हणून कित्तिदपा सांगिटल तरीन तो ऐकना. सदा बोट तोंडांतेच असेल.
उष्ट॑ adj unwashed (mouth and hand after eating). (खालांपिरी) धुवनाते ; उष्टा / उष्टे in sm. uis तो उष्ट॑ हातांत पाणीच नळ / कोळायी फिरिवत असाच मी प्हायलों.
उष्ट॑ adj tasted and left portion (of food). थोड खाऊन सोडलते (पदार्थ / जेवण / भात) ; उष्टा / उष्टे in sm. uis उष्ट॑ भात दूर टाकनास्क कुत्राला देऊया.
उष्ट॑-खरकट n a general term for half-eaten foods and used but unwashed plates or vessels in which food had been prepared. उष्ट॑ पदार्थ अणी खाल्ला नंतर विसलनाते भांडि. uis हे काळाच पोरींस उष्ट॑-खरकट म्हणजे काय म्हणून कळना. सोवळे-ओवळे प्हायाच घरांत वराड करींगून गेलतर कस॑ संसार करतील की.
उष्ण n heat (on account of Sun). (सूर्याच) ऊन. uis भूमध्यरेखाच जवळ असाच प्रदेशांत सूर्याच उष्ण जास्ती अनुभव होईल.
उष्ण n heat in the body's system. आंगाच उष्ण. uis कित्येक दनांस आंगांत जास्ती उष्ण झालतर उष्णाच पडसा येईल.
उसणे vt to bale out water from a pond etc. to ladle out milk, ghee, oil etc from a vessel. उसपणे. पाणी, दूध, तूप असलते द्रव्य व॑रून ढकळून शेंदून काढणे ; उपसणे in sm Note. from उसपणे, a phonetic jumbling of उपसणे and thence to उसणे.
उसपणे vt to bale out water from a pond etc. to ladle out milk, ghee, oil etc from a vessel. उसणे. पाणी, दूध, तूप असलते द्रव्य व॑रून ढकळून काढून घालणे ; उपसणे in sm. Note. उसपणे is a phonetic jumbling of उपसणे and thence to उसणे.
उसली n green gram cooked with spices. सुंडल (Tamil) ; उसळ in sm. uis मला पाष्टेच पल्हाराच बरोर उसली खाणे अवडेल.
उंच adj tall. गिड्ड॑ नाहीते. uis बास्कट-बाळ खेळणार अस्कीन साधारण होऊन उणे पक्षा सहा फ़ुट उंच असतील.
उंच adj heightened. उंच. uis हळ्ळु स्वरांत आरंभ करामते गाण॑ उंच स्वरांत आरंभ केलतर ते ऐकाला बर असना.
उंच n steep (ascent). उंच. uis जुने काळांत तिरुपती डोंगूरांत व॑र जायाच वाट फार उंच होत॑. ते करतां व॑र जायाला म्हणून उंच उणे असाच वेगळ एक नव वाट नंतर करले. खाले येताना ते जुने वाटा वाटी येउया.
उंच n height. उंच. uis (1) भूलोकांत एवरेस्ट शिखराच पक्षा उंच असाच शिखर वेगळ कोण्तीन नाही. (2) पाणीच भारामळे पाऊसाच वांब / मेघ थोड खाले असते. पण, साधारण मेघ पाऊसाच वांबापक्षा उंचांत असेल.
उंच n deep. depth. उंच ; खोल in sm. uis अच घरच॑ आडांत पाणी कित्ति आहे म्हणून प्हाम म्हणजे लवून प्हायलतरेच होईल. तसलते उंच आडांत उतरताना जागृत होऊन असाम / असांव. Note. (1) in DM उंच आड means a deep well, meaning a well with deep water. (2) उंच in this case is used in the reverse sense of "height". This usage is seen when telling about a well, pit etc.
उंच करणे vt to raise. to lift. व॑र करणे. uis कवाडाच कोंडी घालाम म्हण्जे हात उंच करल लतरेच होईल.
उंडा adj ball shaped. spherical. गोळ आकाराच. uis बूंदि लाडू ऊंडा असाम तरीन, उंडा बांधाच / धराच कामांतून चुकींगाला ते खारा-बूंदीस्क उतिर-उतिर (मोकळ) करणे पणीन आहे.
उंडासांभार n a type of sambhar with steamed balls of pulses and cerels. उंडाच सांभार. शिजिवलते दाळांत केलते उंडा घालून केलते एक रीतीच सांभार. uis उंडासांभार तंजावूर मराठी लोकांच एक विशेष कालिवण आहे.
उंदीर n rat. mouse. एक ल्हान प्राणी. uis घरांत उंदीराच तंटा उदंड झालाहे-ते-करतां अम्ही एक मांदर वाढिवाला निश्चय करलों.
उंबरा n threshold. कवाडाच खालच अडव॑ लांकड. uis वराड करींगून नवरी पह्यिलंदा दाल्लाच घरच उंबरा वलांडींगून आंत वेघताना उजव॑ पांय पह्यिले आंत ठिवाम / ठिवांव म्हणून सांगणे आहे.
उंबळणे vt to abort pregnancy. गर्भपात करींगणे. गर्भ राह्ते करणे. गर्वारपण राह्ते करणे ; उबळणें in sm. uis थोडक वर्षापुढे अयरलॅन्डांत भारत देशाच एक स्त्रीला स्वंत जीवन रक्षा करींगाला त्यंच गर्वार राह्ते कराच आवश्य होत॑ तरीन तिकडल॑ सरकार गर्भ उंबळणे धर्म-विरुद्ध आहे म्हणून सांगून अनुमती देल नाही अणी तजमळे शेवटी त्यंच जीवन बलि देमते अवस्थांत जाऊन पावल॑.
ऊ
ऊ the sixth vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच सहावां स्वर.
ऊठ imp stand up. उठून ओठाक / होठाक. uis ऊठ म्हणून तला भरूनदपा सांगिट्लों तरीन बसलते ठामांत बसूनच आहे तो.
ऊठ imp wake up. झोंपींतून जागे हो. uis पाष्टे सहा घंटेला यांत / येवा म्हणून तेनी तुम्हाला सांगिट्ल होते तरीन, अण्खीन तेनी उठले नाहीत. दोन घंटे थांबून / सोडून यांत, उठलसतील.
ऊत n boil and overflow. पात्रांतून तावून बाहेर येणे. uis दूध तावताना उतून बाहेर येइनास्क असाला एक प्रत्येक विधाच पात्र दुकानांत मिळत॑.
ऊद n frankincense. an aromatic gum resin of certain trees. कित्येक वृक्षांच सुगंध वास द्याच गोंद / डिंग. uis ऊदपत्तीच नाव ऊदांतून आल तरीन, भरून दनास ऊद म्हणजे कित्येक वृक्षांच सुगंध वास द्याच गोंद / डिंग म्हणून कळना. Note. this word is hardly used in DM desipte the word ऊदपत्ती being well known.
ऊदबत्ती n incense stick. अगरबत्ती. uis कित्येक लोकांस अगरबत्तीच वास लागलतर श्वास सोडणे कष्ट होईल म्हणून त्यांस ते बरोर पडना.
ऊदि n ash. जळून उरलते भस्म. uis गेल वार अम्च दुकानबीदींत एक थोर विस्तूच पेट झाल॑ अणी त्यांत एक वाणीच दुकान पूरा पेटून भस्म झाल॑. कोठ प्हायलतरीन ऊदि पडल होत॑.
ऊदि n sacred ash. यज्ञकुंडांत जळून मिळाच भस्म. uis यज्ञकुंडांत जळलते वस्तूला अम्ही ऊदि म्हणतों अणी तज महत्व वेगळेच अस्त.
ऊन n Sun's heat. Sun's warmth. सूर्याच उष्ण. uis हिंवाळाच / हिमाळाच दिवसी ऊनांत ओठाकाला / होठाकाला बेष असेल.
ऊन n heat. ऊन. uis निवलते चाय की कॉफी की पुन्हाईं ऊन करलतर तज रूच बदलून जाईल.
ऊब n sultriness. उबारा. उष्ण. uis हे वर्ष अग्नि-नक्षत्राच दिवसी मी चेन्नैंत जाऊन सांपडींगटलों. तिकडल॑ भयंकर ऊबांत तरपडून गेलों.
ऊब n steam. fumes. वाफ. uis चार दिवसा पसून मला पडसा आहे, अण्खीन गेल॑ नाही. डोस्केच व॑र एक कापड घालून तावून कढिवलते पाणीच ऊब स्वास धरून सोडलतर बर॑ होऊया.
ऊर n chest. breast. छाती. uis हेल्त-चेकप करताना ई-सी-जी काढणे म्हणजे मला थोडक प्रयास होइळ, कारण मझ ऊर पूरा केंस असाच करतां ई-सी-जी यंत्राच सेन्सर मझ ऊरांत कित्ती चेंपून ठिवल तरीन बरोर धरींगून बसना / राह्यीना. Note. (1) woman's breast is थान or स्तन. (2) छाती means "chest / breast" as well as, a woman's breast.
ऊर n heart. हृदय. uis सौत-आफ्रिकाच डॉक्टर क्रिस्त्यन बरनार्ड, हेनीच भूलोकांत पह्यिल-पह्यिल एक मनुषाच ऊर अण्खिएक मनुषाला ट्रान्सप्लान्ट ऑपरेषन करून वांचिवलते.
ऊर चेंपणे vi to have heart congestion. to have an heart attack. ऊरचेंपा होणे. uis (1) म्हातारपणांत काहीतरीं ऑपरेषन झालतर तजमळे अम्च रंक्तांत क्लॉट येऊन थोड महीना झाल नंतर तेच क्लॉट ऊरचेंपाच कारण होऊया. (2) अम्च देशांत॑ चिकित्सा पद्धति बेष वाढलाहे तरीन ऊर चेंपून मरणारांच संख्या अत्ता फार जास्त झालाहे.
ऊरचेंपा n heart attack. cardiac arrest. ऊर राहणे / धरणे. uis दहा दिवसापुढे एक मित्र ऊरचेंपा मळे मरूनगेले म्हणून ऐकून मला फार संकट वाटल॑.
ऊह n conjecture. अनुमान. uis मझ मावशीच लोंक तज काम सोडूनटाकला म्हणून मी ऐकलों. विचारताना तो मला सांगटलते काय म्हणजे, तला विदेशाला डेप्युटेषनांत जायाला इष्ट नाही-ते-करतां काम सोडला म्हणून. ते खर कारण म्हणून मला वाटत नाही. मला ते विसंबाला होत नाही. वेगळ कायतरीन गडबड झालामळे काम नाहीस्क बसलाहे, हे मझ ऊह आहे.
ऊं n head lice. डोस्केच केंसाच मद्ये असाच किडा ; ऊ in sm. uis साळेला जाणारी ल्हान पोरींच डोस्केंत ऊं येइनास्क प्हायींगाला / पाह्यींगाला मध्य-मध्य त्यंच केंस डेटोळ मिळिवलते पाणी घालून बेष धुवाम / धुवांव.
ऊंट n camel. मरुभूमीच एक प्राणी. uis मरुभूमींत यात्रा कराला ऊंट सार्ख योग्य प्राणी वेगळ कोणतीन नाही म्हणून जुने काळांत अरबी देशांत हे प्राबल्यांत होत॑.
ऊंशी n pillow. झोंपीजाताना डोस्के टेंकाला ठिवाच कापूस भरलते वस्तू / साधन ; उशी in sm. uis डोस्केच खाले बरोरल॑ उंचाच ऊंशी ठिवून निजल॑ नाहीतर गळासूळ येऊया.
ऊंस n sugarcane. ऊंस. साखरे तय्यार कराच गौताच / गवताच वर्गांतल॑ एक वनस्पति ; ऊस in sm. uis ऊंसाच रसात नंखर अल॑ चेंचरून घाट्लतर रूच बेष असेल.
ऋ
ऋ the seventh vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच सातवां स्वर.
ऋग्वेद n Rigveda, the first of the four Vedas. चार वेदांतल॑ पह्यिलच वेद. uis ऋग्वेद हिंदू धर्माच मात्र न्हो, मानव संस्काराच / सभ्यताच सगळ्याचीन पक्षा पहिलच ग्रंथ आहे.
ऋग्वेदी adj a sect that follows the doctrine of Rigveda. ऋग्वेद अनुसरण कराच वर्ग. uis ऋग्वेद आचरण करणारालीन यजुरवेद आचरण करणारालीन उपाकर्माच दिवस वेगळ-वेगळ असते.
ऋण n debt. loan. रीण. कर्ज. उधार. Note. रीन in sm.
ऋतु n seasons. वातावरणांत / हवामानांत येयाच उन्हाळा, पाऊसाळा, हीम्हाळा / हिंवाळा असल॑ व्यत्यासपण. uis संस्कृतांत वेगळ वेगळ ऋतूंला वसंत, ग्रीष्म, वर्ष, शरद, हेमंत, शिशीर अस सांगतात.
ऋषभ n sign of Taurus in the Zodiac. एक राशीच नाव. वृषभ. uis मनाच निम्मति, विश्वसनीय स्वभाव हे दोनीं ऋषभ राशीच लोकांच विशेष गुण आहे.
ऋषभ n bull. बैल. वृषभ. uis पुरावस्तु गवेषणांत मोहन-ज-दारो, हरप्पा हे ठिकाणांतून मिळ्लते भरून मुद्रांत ऋषभाच चिन्ह आहे. हेज अर्थ काय म्हणून अत्ता पणीन कोणालीन कळत नाही.
ऋषिपंचमी n a religious rite performed by ladies during the fith day of the bright fortnight of Bhadrapada month in honour of the wifes of the Sapta Rishis. भाद्रपद महिनेच शुक्लपक्षांत पंचमी दिवसी सवाषणी बायके कराच सप्तऋषींच पत्नींच पूजा. uis दीपावळी झाल-की-नाही, मागेच येयाच ऋषिपंचमीच सण बायकांला उदंड महत्वाच सण आहे.
ऋषि n rishi. saint. मुनि. सन्यासी. यती. uis वसिष्ट, मैत्रावरुण, कौंडिन्य हे ऋषींच नावांतल॑ तीन गोत्रहीं एकच प्रवराच आहे.
ए
ए the eighth vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच आठवां स्वर.
एक adj the numeral one. पहिलच संख्या. uis सरकारी ॲम्बुलन्स पह्जे म्हणून असलतर 109 ला (म्हणजे, एक-शून्य-नौ ला ) फोण करलतर पुरे, समेच येईल.
एक adv one alone. एक मात्र. uis आज पाष्टे मी सहा सीताफळ घेऊन आणून फ्रिड्जांत ठिवलों. अत्ता रात्रीच जेवण झालांपिरी फ्रिड्ज उघडून प्हाताना नुस्त एक होत॑. पांच सीताफळ कोण काढले म्हणून विचारताना अस्कि दनीन तोंड उघडनास्क गपचुप बसूनगेले.
एक-एक adv one-by-one. एक-एक विणी. एक झाला नंतर अण्खीन एक. एकेक. uis पाणीच तान / दाह वाटलते कावळाच खाणींत ते कावळा एक-एक धोंडा मडकेंतल पाणीच आंत घालून, पाणी वर आणिवल॑.
एक-एक adv one after the other. एकाच नंतर एक. एका मागे एक.
एक-एक दपा adv once in a while. एक-एकदा. केम्हा तरीन एकदा. uis फार श्रद्धांत एक काम कराम/करांव म्हणूम अम्ही म्हणींगटलतरीन एक-एक दपा ते चुकून जात॑.
एकच निघा n focus on only one thing. concentration. one track mind. एकाचवर निघा ठिवणे. uis एकच निघा ठिंगून वाचलतर कोण्त्येक विषयांत पणीं अम्ही पंडित होऊया. कारण अम्च बुद्धीच पूरा शक्ति तजवर सोडाला होईल.
एकट adj alone. दूसर / वेगळ कोण्तीन नाहीस्क असाच स्थिति ; एकटा in sm. uis अट्लांटिक महासमुद्र विमानांत पह्यिल-पह्यिल एकट वलांडलते मनुष चार्ल्स लिन्डबर्ग होते.
एकट adj solitary. single. दूसर / वेगळ कोण्तीन नाहीस्क असाच स्थिति. uis मैसूराच जवळ असाच नागरहोळे राणावाटे मी रात्रि बंडि पळींगून जात होत तम्हा वाटेच बाजू एक हत्ति एकट ओठाकल्होतते / होठाकल्होतते पाहलों.
एकटा pron a single person. एकला. uis अम्ही उडीसा राज्याच गोपलपूराच बाजू असाच समुद्राच कांठशी गेलों एक दपा / दफा. पह्यिल दृष्टींला कोणीन दिसल नाही तिकडे. पण नंतर पाह्ताना दूर कोणकी एकटा दिसल॑.
एकदम adv all at once immediately. एकदम. uis दिड-दिडशी मला कायतरीन प्रश्न विचारलतर एकदम मला उत्तर द्याला होईना.
एकदंत n Lord Ganesha. गणपती. uis गणपती त्यंच एक दंत मोडून तजांतून व्यासऋषीच महाभारत लिव्हले म्हणून हिंदू पुराणांत आहे. हेज नंतर एकच दंत उरलते-करतां गणपतीला एकदंत म्हणून नाव आल॑.
एकदा u once. one time. एकदपा. एकदफा. एकवेळ. uis (1) एकदा अम्ही बद्रीनाथाला गेलतम्हा भूकंपामळे डोंगूराच वर जायाच वाटेला फार नाश होऊन अम्च बंडि एक रात्रि पूरा तिकडच राहूनगेल॑. (2) वय होतां-होतां जेवण उणे करणे सहजच॑. पाष्टे एकदा जेवलतर पणीन आंगाला पुरे होईल.
एकदाणें n a necklace with one prominent gold bead in the middle of other different beads. दुसर विधाच पोतीच मध्य एकच सोनेच पोती ओवलते माळ.
एक-दोन (fig) very few (in numbers). उदंड उणे संख्याच. uis (1) गेल महिना पूरा फार ऊब होत॑. आज कायकी एक-दोन बूंदाच शिंतोडे पडूया म्हणून वाटते. (2) अम्च खेडेगामाच साळेंत बरोर शिकिवनात म्हणून अग्गिदनालीन कळेल. हे वर्षाच एस.एस.एल.सी परीक्षांत कायकी एक-दोन लेंकरे जिंतलतर तेच जास्ती म्हणूया.
एक पांयेंत ओठाकणे (fig) a metaphor implying "to be in a mental state of intense readiness to do a thing". "मनाला वाटाच तीव्र इच्छाच विषय कराला तयार होऊन असणे" हे अर्थाच शब्दालंकार. uis उदंड दिवसापसून तला अमेरिकाला जांव अमेरिकाला जांव म्हणून एक पांयेंत ओठाकलहोता. अत्ता वीसा मिळ्ळ की नाही, समेच / सवेच एरोप्ळेन टिकट घेम म्हणून बसलाहे. Note. the literal meaning being, "to stand in one leg".
एकर n acre. जमीनाच विस्तार सांगाच एक माप. uis चार-पांच वर्षांत जमीनाच मोल उदंड वाढलाहे. एकराला दहा हदार / हज़ार रुपे होतते जमीन अस्कीन अत्ता दहा लाखाला पणीन ध्याला लोक तय्यार आहेत.
एकला pron a person. एकटा. एक मनुष. एक पोर. uis गेलंदपा पाकिस्थानांत पेषावरांत झालते विस्फोट एकच एकलाच काम होत॑ म्हणून नंतर केलते अन्वेषणांत कळ्ल॑.
एकली pron a woman or girl. एक बायको / एक पोरी. uis जातकाच प्रश्नामळे, ते पोराच वराड उदंड दिवसा-पसून झाल नाही. शेवटी, एकच एकलीच जातक तज जातकाच बरोर मिळून अल॑ म्हणून मी ऐकलों.
एकवचन gram singular. एकच असाच स्थिति (व्याकरणांत). uis दक्षिणी-मराठींत एकवचन अणी बहुवचन अस दोन विधाच वचन आहे.
एकवेळ adv one time. once. एकदा. एकदपा. एकदफा. एकच वेळ. uis अत्ता अस्कीन मी एकवेळच जेवणे.
एकवेळ n a probability. maybe. एकवेळ. uis हे वर्ष दीपावळीला मझ लोंकीन सूनीन अमेरिकांतून कंडिप होऊन येतील म्हणून मला सांगाला होयना. एकवेळ आलतरीन येतील.
एकसरा adv in one go. at one stretch. एकस्र. एकच वेळी ; एकसर / एकसरां / एकसरी / एकसरे in sm uis विदेशांतून येयाच एरोप्लेन सग्लीन एकसरा येऊन उतरल॑ म्हणून काल रात्री बंगळूर एरपोर्टांत भयंकर गुंप होत॑. Note. एक (one) + सरा (line) = in one line or stream.
एकसरा adv suddenly. एकस्र ; एकसर / एकसरां / एकसरी / एकसरे in sm. uis एवढ दिवस कायीं करनास्क उगे बसलांपिरी अत्ता एकसरा पूरा काम संपिवाम म्हणजे ते कस होईल ? Note. एक (one) + सरा (line) = in one line or stream.
एकसारख adv identical in all respects. एकस्क. एकसार्ख. अस्कि प्रकारीं तुल्य असाच ; एकसारखा in sm. uis विषय कळनाते लोकांस वज्रयीन अमेरिकन डयमंडयीन प्हायाला एकसारख असेल, थोड पणीं व्यत्यास दिसना.
एकसारख adv in a uniform manner without variation. एकस्क. एकसार्ख. व्यत्यास काहीं नाहीस्क. समान ; एकसारखा in sm. uis एक वारा पसून डोंगूर प्रदेशांत चोखोट / चोखट पाऊस झाल होत-ते-मळे यंदा कुत्तालमांत पाणी एकसारख पडाच अम्ही पाह्यलों.
एकसार्ख adv identical in all respects. एकस्क. एकसारख. अस्कि प्रकारीन तुल्य असाच ; एकसारखा in sm. uis अम्च बाजू घराल नव होवून भाडेला आलते कुटुंबांत पाह्याला एकसार्ख असाच दोन अवळी-जवळी पोरी आहेत.
एकसार्ख adv in a uniform manner without variation. एकस्क. एकसारख. व्यत्यास काहीं नाहीस्क. समान ; एकसारखा in sm uis आज मी मझ बॅन्काला गेलस्ताना तिकड एक चर्चा होत असाच प्हायलों. कोणाच तरीन दोन सही / स्वाक्षरी / हस्ताक्षर अग्गि विधांतीन एकसार्ख आहे म्हणजे त्यांत एक कंडिपविणी नकली असेल म्हणून तेनी बोलींगत होते.
एक सोडून एक adv one after the other. एकाच नंतर एक. एकाच मागे एक. uis तला बोलाल सोडलतर अम्च प्राण काढूनटाकेल. एक सोडून एक खाणी बडिवत असेल.
एक सोडून एक adv alternately. पहिलच नंतर, दुसरच अस परतून परतून आवृत्ति होत असणे. uis हिंदू देऊळाच भोंताल-भिंतींत काषाय / गेरू रंगाच अणी पंढ्र रंगाच पट्टी एक सोडून एक ओढलसाच / होढलसाच पाव्हूया.
एकस्क adj identical. एकसार्ख. एकसारख. uis अमज़ोनांत आज मी घेट्लते अंगीईं गेल वार घेट्लते अंगीईं एकस्क आहे म्हणून त्यांत एक वापस कराम.
एकस्र adj at one go. at one stretch. एकसरा. एकच वेळी. uis काय काय काम करांवते / करामते आहेकी ते अग्गीन एक एक विणी सांग मला, एकस्र सांग नोको.
एकादशी n eleventh day after full or new moon. पौर्णमी अणी अमावस्या झाल नंतरल अक्रावां दिवस. uis महिनेला दोन दिवस एकादशी येईल, शुक्लपक्षांत एक दिवस अणी कृष्णपक्षांत एक दिवस.
एकादशी करणे adv to observe a day of fasting on ekadasi day. एकादशी दिवस उपवास करणे. uis अम्ही एकदपा पणीन चुकनास्क एकादशी करणे आहे. ते मळे मनाला शांत मात्र न्हो, आंगाल पणीन चोखोट वाटते.
एकादशी ब्राह्मण fig a term of ridicule or otherwise to indicate a niggardly brahman. एक हिमटा / कंजूस ब्राह्मणाला मष्किरींतून सांगाच गोष्ट. uis मझ चुलतभाऊला उदार मन्न थोड पणीन नाही. अम्च सोयरीकां मध्ये तला एक एकादशी ब्रह्ममण म्हणून सांगणे आहे.
एकादा adv sometimes. कित्येकदा. uis एकादा अम्ही कराच काम चूक होऊन जात॑. काईन कराला होईना, पुढे तस होईनास्क प्हायींगांव / प्हायींगाम.
एकापक्षा-एक adv one over another (viewpoint, attributes etc). एकापक्षा-एक. uis गेल वार अम्च सभांत यात्राला जायाच विषयावर चर्चा झाल॑. एकेकदनीं त्यंच-त्यंच अभिप्राय सांगाच ऐकलतर एकापक्षा-एक विचित्र होत अस मला वाटल॑. शेवटी ते सभेंत काहींनच निर्णय कराला झाल नाही.
एकालेक adv mutually one upon another (entangled). अन्योन्य (सांपडींगटलते). uis ते दोघीन चोखोट उद्योग सोडून त्यंचच बिसिनस आरंभ केले. ते बरोर चालत नाही वाटत॑. अत्ता एकालेक सांपडींगून अवस्था भोगत आहेत.
एकांत n solitude. कोणाचीन संबंध नसाच ठिकाण / स्थिती. uis सिंह अणी वाघ, हे दोनांतीन एक मुख्य व्यत्यास काय म्हणजे सिंह केम्हीन तज गुंपाच बरोर असेल अणी वाघ पोणावांटा वेळीन एकांत विणी असेल.
एकी slang urine. मूत. uis एकीच वास येईनास्क असाला परसाकडेच खोली बेष फिनैल घालून धुवाम / धुवांव. Note. derived from No. 1 or एक, a slang for urinating, similar to No. 2, for defacating.
एकी adv urinating. मुतणे. uis आठ वर्षाच वय झाल तरीन तो अत्ता पणीन अंथरूणांत / अण्थूणांत रात्रीच वेळ एकी करतो.
एकेक n one by one. एक झालानंतर अण्खीन एक. एका मागे एक. एक-एक. uis (1) तळून काढताना तीन-चार कच्चा पापड एकदम तावलते तेलांत घालाच पक्षा एकेक होऊन घाटलतर ते करपनास्क पाहींगुया. (2) पाणीच तान / दाह वाटलते कावळाच खाणींत ते कावळा एकेक धोंडा मडकेंतल॑ पाणीच आंत घालून, पाणी वर आणिवल॑.
एकेच-एक adj only one. एक मात्र. uis पिकाला म्हणून घासांत गुंडाळून ठिवलते दहा अंबांत नौ अंबा कुजून हाळ झाल॑. एकच-एक मात्र बरोर पिकून मिळ्ल॑.
एडवट n half or partially done in an imperfect manner. अर्ध केलते पणीन बरोर करनास्क सोडलते. अर्धवट. अर्धगच्छ. अर्धमपर्द (Kannada). पूर्त झाल नाहीते. uis तिरुपतींत नवसून केंस क्षौर / क्षवर कराला हजामाच समोर बसल तर, तो एडवट काम करून जायनास्क प्हायींगाम कारण, अम्हाला तसेच बसिवूनटाकून तो एक नव ग्राकीला हुडुकींगून गेल तर, तो परतून येयाच पर्यंतीन तिकडच बसामते पडेल.
एथे adv here. this side. in this place. हे ठिकाणी. इकडे. यथे. इथे. uis अम्च घरच प्रश्न फार अवघड स्थितींत जाऊन पावलाहे. ते बरोर कराला म्हणून तू एथे आलास म्हणजे पणीन प्रयोजन काहीं होईना.
एथे-तथे adv hither and thither. इकडे-तिकडे. यथे-तथे. इथे-तथे. uis मझ जेबांत ठींगट्ल होतते वज्राच तोडाच फिरकी कसकी खाले पडल॑. एथे-तथे हुडुकून पंणीन ते मिळ्ल॑ नाही.
एथेले adj relating to this side. हे पटीसच. इकडच. यथेल. इथेल. हे बाजूच. uis आजू-बाजू घरांत एकच कामवाले असताने. कां म्हणजे, अम्च एथेले एक-एक विशेषीन / विषयीन बाजू घराला तेनी कंडिप कळिवतील.
एथेले-तथेले adj of various places. इकडच-तिकडच. यथेले-तथेले. इथेले-तथेले. uis अम्ही ल्हान अस्ताना "विनोद पत्र" म्हणून संध्याकाळी संध्याकाळी छापाच एक समाचार पत्र होत॑. एथले-तथले काय काय समाचार मिळते की ते अगीन बरोर परिशोधन करनास्क छापाचेच तज काम.
एथून adv from here. इकडून. यथून. इथून. एथसून. यथसून. इथसून. uis एथून चेन्नै सुमार दोनशें मैल दूर आहे.
एणि n ladder. शिडी. शीडी. uis अत्ता अस्कीन घराच आंत वापराला अलुमिनियमाच एणि मिळते. Note. from Tamil.
एमात्तम n deception. cheating. वंचना. मोस. Note. from Tamil.
एमारिवणे vt to deceive. वंचना करणे. मोस करणे ; फसविणे in sm. uis घरांत येऊन जुने पेपर घेणार लोकांकडे वागताना अम्ही दत्तन / जत्तन असाम कां म्हणजे, तोलताना / तूक्कम करताना एमारिवाला पाह्तील. Note. from Tamil.
एरंडेल n castor oil. एक प्रकारच तेल. uis पोट शुद्ध करिवाला मद्य-मद्य एरंडेलाच तेल पीणे आहे.
एर्पाड n arrangement. व्यवस्था. uis तमिल-नाडाच मुख्य मंत्री जयलळिताच दत्त लोंकाच वराडाच एर्पाड ब्रह्मांड होत॑ म्हणून थोर आरोप झाल॑. Note. from Tamil.
एलम n auction. लोकां मद्ये पोटि करिवून कोण जास्ती मोल देतातकी त्यांस विकाच एक व्यवस्था ; लेलाम in sm. uis गेल वर्ष चाललते क्रिकटाच ऐ.पी.एल एलमांत एक दोन खेळणारांस उदंड जास्ती रोक्कमांत कित्येक फ्रांचैसी लोक॑ घेटले तरीन, त्यंच खेळ उदंड मामूली होत॑. Note. from Tamil.
एळक्कारम n disdain. उणे अभिप्राय. उणीवता. Note. from Tamil.
एव n income. आदाय. संपाद्य. वरुमानम (Tamil). uis मझ बापाला ते काळांत अधीक एव न्होत॑. तजांतच अम्ही सहा लेंकरांस वाचीवून व॑र आणीवले. तेनाला किती कष्ट असलासाम म्हणून मला अत्ता अर्थ होत आहे.
एवढ adj this much, so much (implying magnitude or quantity). येवढ. यवढ. केवढ आहेकि तेवढ ; एवढा in sm. uis (1) तला पैसाच कष्ट आहे म्हणून उदंड दिवसा पसून मला कळ्ल होत तरीन एवढ कष्ट होत म्हणून म्हणींगटळोंच नाही.(2) सद्याला मझकडे पैसा एवढेच आहे. अण्खीन जास्ति पह्जतर नंतर पाठिवून देतों.
एवढ adj this much , so much etc. (implying multitude or number). येवढ. यवढ. केवढ आहेकि तेवढ ; एवढा in sm. uis आजच कार्यक्रमाला अम्ही दोनशे दन येतील म्हणून तज जोक्त पल्हाराच व्यवस्था केलोतों. पण, योचना केलत्यापक्षा पन्नास जण अधीक आलेतेकरतां सद्याला आलते एवढ लोकांस पल्हार वाढलांपिरी आवश्या प्रकार केवढ पह्जकी तेवढ पल्हाराच व्यवस्थाला पुन्हाहीं सांगून पाठिवलों.
एवढ-तेवढ adj approximately. roughly. जवळ-जवळ. यवढ-तेवढ. uis तुला ते पूरा कळना तरीन, तज विषयीन एवढ-तेवढ तरीन कळ्लासलतर अम्च काम कसतरीन चालिवूया म्हणून मला वाटत॑.
एवढूस्क collo a little. उदंड थोडक. नंखर. यवढूस्क. इतकूस्क (collo) ; एवढासा in sm. uis खीर फार बेष आहेतरीन मला एवढूस्क वाढलर पुरे.
ऐ
ऐ the ninth vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अ॒क्षरमालाच नौवां स्वर.
ऐकणे n hearing. श्रवण. कानांत शब्द पडणे. uis येतां-येतां मला कानाच ऐकणे उणे होत आहे.
ऐकणे vt to hear. श्रवण करणे. uis दिवसोडि पाष्टे सात घंटेला मी रेडियोंत भक्ति गाणे ऐकणे आहे.
ऐकणे vt to follow instructions. निर्देशाच प्रकार करणे. uis (1) थोरळे सांगाच ऐकणे म्हणाच चोखट / चोखोट गुण तला ल्हानपणांत पसून आहे. (2) तसलते वंगळ / ओंगळ काम कर नोको म्हणून तला भरून दपा सांगट्लों तरीन ऐकना म्हणतो, मी काय करू ?
ऐक्य n unity. एक होऊन / मिळींग्यून असणे. uis अम्च मद्य ऐक्य असल तर धैर्यान कोण्त प्रश्नीं सांभाळाला होईल.
ऐक्यमत्य n unanimity. अस्किदनीन एक होऊन / मिळींग्यून असणे. uis दहावां शतकांत विदेशांतून आलते मुसलमानांच सैन्यांल की नाही, तसच सत्रावां शतकांत आलते ब्रिटनाच ईस्ट-इंद्या कंपनील की अम्च देशाला सुलुभांत आक्रमण करून स्वाधीन कराला झालत्याला एक मुख्य कारण अम्च इकडल॑ वेगळ वेगळ राजांच मघ्ये ऐक्यमत्य होत नाही म्हणाचेच.
ऐरावत n celestial elephant of Indra. इंद्राच हत्ती. uis क्षीरसमुद्र मंथन करताना मिळ्लते पंढ्र रंगाच ऐरावताला चार दंत आहे म्हणून हिंदू धर्म-इतिहास सांगते.
ऐश्वर्य n prosperity. fortune. richness. वैभव. uis लक्षमीदेवीच अनुग्रह कोठ-कोठ अस्त की तेथ अग्गीन ऐश्वर्य असेल.
ऐस imp wait. थांब. राह. राख. uis मी येया पर्यंतीन अण्खीन थोड वेळ तिकडेच ऐस. Note. the verb (intransitive) form of ऐस is असणे.
ऐंशी adj eighty. दहा गुणा / वांटा आठ. uis ऐंशी वर्षाच वय झालत्यांस अग्गीन आयकर (इनकम-टॅक्स) विभागांतून कित्येक सौजन्य मिळल.
ओ
ओ the tenth vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच दहावां स्वर.
ओखद n medicine. औषध. uis आंगाला बर नाहीत असतम्हा अम्ही स्वता ओखद घ्याच पक्षा डॉक्टराचकडे जावून ओखद घेणेच चोखोट.
ओखदवाणी n medical shop. ओखदाच दुकान. औषधवाणी. वैद्यवाणी. uis एवढ दिवस अम्च खेडेंत आयूर्वेद ओखद विकाच एक ओखदवाणी मात्र होत. अता अलोपती औषध विकाच एक दुकान नव होऊन उघडलाहे. Note. ओखद (medicine) + वाणी (merchant).
ओगाळणे vt to remove the spell from an evil-eye afflicted person. ओवाळणे. दृष्टि काढणे. uis दुसर लोकांच दृष्टि लागताने म्हणून ल्हान लेंकरांला मद्य-मद्य ओगाळणे आहे.
ओघळणे vt to grind-off / chip-off / scrape off small quantities. (एक वस्तूंतून) घासून अथवा थोड-थोड चूर करून वेगळ करणे. uis जायफळ / जाकाय आयुर्वेद औषदांत उपयोग करतात. ते ओघाळून थोड दुधांत मिळिवून पीलतर आंगांतल दुखणे उणे होईल. तजांत "'स्टीरोयड" काहीं तरीन असुया की म्हणून मला संदेह आहे.
ओठाकणे vt to stand up. होठाकणे. बसलते नाही, निजलते स्थितींतून उठणे. uis पंतोजी क्ळासाला वेघताना सगळ विद्यार्थीनीं उठून ओठाकणे आणी नमस्कार करणे आहे. Note. (1) The word appears to be from ऊठ and टाकणे and होठाकणे a phonetic variation of it. (2) होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे.
ओठाकणे vt to halt. होठाकणे. थांबणे. राखणे. uis एवढ दिवस अम्च गामांत / गावांत एक्सप्रस ट्रैन कोण्तीन ओठाकत होत नाही. हे महिना पसून चेन्नै-दादर एक्सप्रेस होठाकाला आरंभ झालाहे. Note. होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे.
ओठाकिवणे vt to make a person or thing stand or get up. होठाकिवणे. बसलते नाही, निजलते स्थितींतून उठिवणे. Note. होठाकिवणे is the hyper emphasized form of the correct ओठाकिवणे.
ओडु n tile. कवल. घराच छत घालाला वापराच एक वस्तू / साधन. uis (1) जुने काळास्क अत्ताअग्गीन छप्पराच व॑र ओडु घालणे नाही. तज बद्दिल ओडाच आकारांतच तगिडांत केलते वस्तू / साधन घालतात. (2) हे काळांत पोणावांटा घराला कॉण्क्रीटाच छत घालतात तरीन, समुद्राच कांठशीच प्रदेशांतीन जास्ती पाऊसाच प्रदेशांतीन अत्ता पणीन ओडाच छत घालतात. Note. from Tamil.
ओड्याण n ornamental waist belt for ladies made of gold. पट्टा. बायके मादाच व॑र बांधाच एक सोनेच आभरण. uis (1) जुने काळांत ओड्याण घालणे बायकांला अलंकाराच विषय होते. (2) जुने काळाच फोटोंत विना अत्ता वेगळ कोठीन बायका ओड्याण घालींगून असाच पाह्याला होईना. Note. from Tamil.
ओढणे vt to pull. होढणे. बळ प्रयोग करून स्वताकडे / आपणाकडे सरकिवणे. uis कोलकतांत अत्ता पणीन मनुष ओढींगून जायाच रिक्षा आहे. असलते लज्जाच विषय तिकडल॑ लोक कस॑ सोसतात की ! Note. होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
ओढणे vt to drag. होढणे. बळ प्रयोग करून एक ठिकाणांतून अण्खीएक ठिकाणाला सरकिवणे. uis कवाडाच जवळ असाच मेज खिडकीच बाजू ओढून घालाला जातों.
ओढणे vt to draw a picture or a line. होढणे. चित्र अथवा रेखा ओढणे. बावोली ओढणे ; ओढणे in sm. uis शंभर वर्षापुढे राजा रवी वर्मा ओढलते चित्र अत्ता पणीन प्रसिद्ध आहे. Note. होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
ओढणे vt to smoke a cigarette or beedi. होढणे. सिगरेट अथवा बीडी पीणे / फुंकणे. uis अमेरिकाच सुप्रसिद्ध लेखक मार्क ट्वैनाच हक्कळबरि फ़िन कादंबरींत हक्कळबरि फार ल्हान वयेंतून सिगरेट ओढाला आरंभ केला म्हणून आहे. Note. this usage seems to be from Malayalam (to pull smoke, പുക വലിക്കുകാ. ie, to pull smoke from one end of the cigarette).
ओढा n a thick pulling-rope used for lifting water from a well, canal etc. तोढा. चरांट. आड, कालवा यांतून / हेजांतून पाणी शेंदाला उपयोग कराच चरांट. uis आडांतून पाणी शेंदाला बालदीला / बादलीला बांधलते चरांटाच ओढा खजून खजून तुटाच स्थितीला आल-ते-करतां आज संध्याकाळीच पुढेच एक नव ओढा घेयींगून येम म्हणून म्हणींगटलोंहें. Note. (1) from ओढणे, to pull. (2) sometimes incorrectly तोढा.
ओतणे vt to pour out a liquid from a vessel. एक द्रव्याला भांडींतून ओतून खाले सोडणे. uis साराच नित्तळ भागीन तज मंडीनीं / राडीं वेगळ वेगळ कराम म्हणजे, ढवळनास्क ओतून काढलतर होईल.
ओपणे vt to accept. वोपणे. स्वीकार करणे ; ओपणे / वोपणे in sm uis मी सांगाच तो ओपला की काय की. तरीन, तजकडे अण्खीन एकदा बोलून पाह्तों.
ओपिवणे vt to hand over (responsibility or charge). to entrust or commit (with responsibility). वोपिवणे. दुसरेंकडे जवाबदारी देणे. uis एवढ वर्ष तो "गळ्फांत॑" असताना तज तीन लेंकरांचीन वाचिवाच / शिकिवाच जवाबदारी मी काढींगटलोतों. येयाच महिना तो वापस आलांपिरी जवाबदारी तला ओपिवाला जातों.
ओपींगणे vt to accept (responsibility) on oneself. वोपींगणे. जवाबदारी घेणे. uis तला कायतरीन तंटा / उपद्रव आलतर, तो अपाप तजांतसून चुकींगाम. तज जवाबदारी तू कसाला ओपींगतोस ?
ओपींगणे vt to agree. to accept. संम्मत करणे. वोपींगणे. uis ते चूक काम मीच केलों म्हणून ओपींगटलोंकी. कसाला उगे-उगे मला सळिवतोस ?
ओप्पंदम n agreement. एकालेक ओपिंगणे. एकालेक संम्मत करींगणे. uis पाकिस्थानाच सरकारीन ते राज्याच कित्येक आतंगवादीनीं (तालीबानीं) गूढांत ओप्पंदम केलाहेत म्हणून सांगतात. Note. from Tamil.
ओमपुडी n name of a fried snack containing ajwain (carom seeds). ओंवा / ओमा मिळिवून केलते एक तळ्ळते पदार्थ. uis सणाच संपाक म्हणजे मझ अम्मा खोबरीच / नारळीच बर्फीहीं ओमपुडीहीं सोडनास्क करतील.
ओमा n the spice ajwain (carom seeds). ओंवा ; ओवा in sm. uis दुकानांत मिळाच ओमपुडींत थोडकपणीन ओमा घाटलासना.
ओरपणे vt to slurp down liquidy food. to eat or drink with a slurping noise. to eat with finger licking noise. वरपणे. पत्तळ पदार्थ शब्द करून गिळणे. बोटावाटे (सावडून) शब्द करत जेवणे ; ओरपणे / वरपणे in sm. uis ओरपून ओरपून जेवलतर प्हाणारांस कंटाळा वाटल॑ म्हणून भरून दपा तला सांगिट्लों तरीन तो ऐकना म्हणतो.
ओरे घालणे vt to set fruits aside covered with hay etc for ripening. फळ घासांत अथवा गवतांत गुंडाळून पिकिवाला ठिवणे. Note. from Tamil.
ओल॑ adj wet. पाणींत भिजलते. वाळनाते ; ओला in sm. uis पाऊसांत भिजींगून तो डोस्के बेष ओल॑ करींगून आलाहे.
ओल॑ adj freshly green. हिरव॑. uis ओले मिरशिंगा वाटून घाटलते पदार्थ खालतर पोटाला होईनात्यांस वाळक॑ मिरशिंगा घाटलते पदार्थ खाणे थोड बर वाटेल.
ओले n individual leaves in a coconut frond. नारळी झाडाच मट्टाच प्रत्येक-प्रत्येक पान. uis ओलेच बुट्टि करून विकून रोडावर संसार कराच दरिद्र लोकांकडे मोटर-कारांत येवून उतरणार कितिकी पैसावंत लोक बेरम कराच प्हायिलतर अम्हाला मनांत कष्ट वाटते. Note. from Tamil.
ओळरणे vt to talk nonsense or gibberish. to blabber. अर्थ नाहीस्क बोलणे. व्यर्थ बोली करणे. uis तो बोलाच तलाच कळत की नाही की. अर्थ नाहीस्क कायकी ओळरेत आहे. Note. from Tamil.
ओवणे vt to string together. मोती, फूल असल्यांत असाच ल्हान द्वारांतूं दोरा काढणे. uis पारिजात फूलांतून दोरा ओवून काढणे सुलूभ असते.
ओवणे vt to pass thread through a needle. सूईंच द्वारांतून दोरा काढणे. uis वय झालांपिरी डोळेच शक्ती उणे झाल-ते-करतां मला सूईंच द्वारावाटी दोरा ओवणे फार कष्ट झालाहे.
ओवणे vt to stitch. शिवणे. uis तांदूळ की वेगळ धान्य की भरलते गोणिचीला दत्तन / जत्तन ठींगाम म्हणजे दाभणांत बेष ओवून ठिवाम.
ओवळ n items not considered ritually clean for religious purposes. सोवळेला येईनाते. सोवळ नाहीते ; ओवळा in sm. uis कित्येकदन कर्पूर / कापूर ओवळ म्हणून तज बद्दल रूईच / कापूसाच वाताच दिवांतून देवाच आरती करणे आहे.
ओवाळणी n cash gift given to ladies who perform the act of removing the spell cast by evil eye. ओवाळून दृष्टि काढाच बायकांस द्याच पैसा.
ओवाळणे vt to remove the spell from an evil-eye afflicted person. दृष्टि काढणे. ओगाळणे. uis दुसर लोकांच दृष्टि लागताने म्हणून ल्हान लेंकरांला मद्य-मद्य ओवाळणे आहे.
ओवाळणे vt arathi done by two ladies for bestowing blessings to people (not to gods) with haldi-kumkum-akshata mixed with water in a brass or silver plate (without a lamp). हळदी-कुंकू अक्षताच पाणीच ताटांत (विना समीच दिवा) लोकांला आशीर्वाद कराच एक विधाच ओवाळणे.
ओस adj desolate place. वोस. विजन स्थल / ठिकाण. जन संपर्क नाहीते ठिकाण. काईं नाहीते ठिकाण ; ओस / ओसाड in sm. uis (1) थोर थोर पट्णाच बाह्येर राहणे एक विधांत आंगाला चोखटेच. कारण, तिकडल॑ वार॑-पाणी बेष अस्त. पण, रात्रीच वेळ उदंड ओस अस्त. (2) वराडाच हॉळ एकदम ओस बडिवेत होत. वीस-पंचवीस लोकेच होते तिकडे ! Note वोस is an archaic spelling of ओस.
ओस बडिवलते ग्रामांत गाढवेच सवाषणी say a figurative saying which implies "in the absence of a suitable option anything is acceptable". "वेगळ॑ काहीं मिळ्ळ॑ नाही म्हणजे काय मिळते की त्यांतेच सांभाळांव॑" हे अर्थाच शब्दालंकाराच म्हण. Note. the nearest translation of the saying is "in a desolate village a donkey will strut around as the only married woman suitable to receive gifts in a ceremony ".
ओसाडे n misty or very thin drizzle. a spray. बरीक शिंतोडे. वसाडे. uis अम्च घरच॑ खिडकीच वरल॑ छज्जाला रुंद उणे असामळे थोड ओसाडे बडीवलतरीन आंत ओल॑ होत. खिडकी समच / समेच / सवेच झांकांमते पडते.
ओहळ n oozing. trickling. हळ्ळु गळणे. निथळणे. थेंबणे.
ओहळणे vi to ooze. निथळणे. हळ्ळु गळणे. uis उदंड ल्हान लेंकरांच तोडांतून लाळ ओहळून त्यंच अंगी ओल॑ होयनास्क असाला त्यंच गळांत एक रुमाल/"बिब" बांदणे आहे.
ओंकणे vi to vomit. वांति होणे. uis बसांन्तकी मोटर-कारांन्तकी डोंगूर प्रदेशांत प्रयाण केलतर मला ओंकणे येईल म्हणून तसलते प्रयाणाला जाताना ओंकाराच मात्रे हाती ठींगून असेन.
ओंकणे vt to vomit. वांति करणे. uis होटलांत कायकी खालत्यामळे मी आज चार दपा/दफा ओंकणे केलों.
ओंकार n the primordial sound in Hinduism "Om". हिंदु धर्माच आदिशब्द ("ओं").
ओंकारा n retching. vomoting. the feeling of nausea. वांति वाटणे ; ओकारी/ओकारा in sm. uis ओंकारा येईनास्क असाला घ्याच मात्रे गिळूनपणीं मला कित्येकदपा वांत येईल.
ओंगळ adj bad. disgusting. loathsome. कंटाळा वाटाच. वोंगळ. वंगळ ; ओंगळ/वंगळ in sm. uis हे काळाच कित्येक टीवी कार्यक्रम पाह्याला फार ओंगळ अस्त.
ओंटा n a roofed platform on either side of the main threshold of a house. तिण्णै (Tamil). उंबराच बाहेरच दोन पठीसीं बसाला बांधलते ठिकाण ; ओटा in sm. uis (1) वर्षा-वर्षी मझ आजा उगादि दिवसी घरच ओंटांत गुढी बांधतील. (2) अम्च आजाच घरांत दूध धारकाढून द्याच दूधवाला तज गायीलीं वांसरूंलीं ओंटाच खांबांत बांधत होता.
ओंटी n the cavity formed by holding the end (padar)of a sari with two hands in order to receive ceremonial gifts. वानदान/वायनदान घ्याला लुगडेच पदर पसरून धराच ; ओंटी/ओटी/ओटा in sm.
ओंटी n lower portion of the abdomen. पोटाच खालेच भाग ; ओंटी/ओटी/ओटा in sm.
ओंटी n rice/cereals, coconut, saree with blouse piece, turmeric, flowers, cash etc. used in the rite of ओंटीभरणे. ओंटी भराला उपयोग कराच धान्य/तांदूळ, नारळ॑, लुगड॑-चोळी, हळदी/हळेद, फूले अण्खी पैसा ; ओंटी/ओटी/ओटा in sm.
ओंटीभरणे n the ritual of filling up the lap of a pregnant lady with rice/cereals, coconut, sari with blouse piece, turmeric, flowers, cash etc.to ensure happy delivery. एक गर्भिणीच/गरवारीणाच ओंटींत॑ धान्य/तांदूळ, नारळ॑, लुगड॑-चोळि, हळदी/हळेद, फूले अण्खी पैसा घालून आशिर्वाद कराच एक विध॑.
ओंठ n lip. ओंठ ; ओठ in sm. uis (1)येतां-येतां आजीलोक पणीं ओंठींत लिप-स्टिक लावींगून हिंडतात ! (2) अत्तच नव फॅषन काय म्हणजे पोरी ओंठावर एक ल्हान सोनेच फिरकी घालिंगणे. आंगात कोठ-कोठ डोबूर करूयाकी तथे अस्कीन अस घालिंगाला आरंभ झालाहे.
ओंडा n a small thick wooden log. कोंडा. लांकडाच एक चूर ; कोंडका/ओंडा in sm.
ओंवा n the spice ajwain (carom seeds). ओमा ; ओवा in sm.
औ
औ the eleventh vowel in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच अक्रावां स्वर.
औचित्य n propriety. उचित असणे.
औदार्य n generosity. उदारपण॑. uis मझ॑ पणाजा फार औदार्य स्वभावाच होते म्हणून त्यांस॑ ट्रावनकूराच महाराजा "उदार-शिरोमणि" म्हणून एक पदवि देवून बहुमान केले.
औद्योगिक adj official. उद्योगाला संबंध झालते.
औपचारिक adj formal. उपचारपणाच वगणे.
औषध n medicine. ओखद. uis त्यांस॑ उदंड वर्षापसून डयबीटिस आहेतरीन, वेळावारी औषद घ्याकरतां अत्ता पतोरी काहीं तापत्र्य झालनाही.
औषधवाणी n medical shop. औषधाच दुकान. ओखदवाणी. वैद्यवाणी. Note. औषध (medicine) + वाणी (merchant) uis लेंकरू चार दिवसापसून जेरांत निजून पडलाहे. दुसर कोण्तीन औषधवाणी कडून वेगळ ओखद/औषध आणल तर॑ काय ?
अ॑
अ॑ the first swaradi in the DM alphabet represented by the vertical line symbol ॑. दक्षिणी मराठी अक्षरमालाच पहिलच स्वरादि. हेज चिन्ह आहे ॑.
अं
अं the second swaradi in the DM alphabet represented by the dot symbol ं. दक्षिणी मराठी अक्षरमालाच दुसर॑ स्वरादि. हेज चिन्ह आहे ं.
अः
अ: the third swaradi in the DM alphabet represented by the symbol ः. दक्षिणी मराठी अक्षरमालाच तिसर॑ स्वरादि. हेज चिन्ह आहे ः
No comments:
Post a Comment