ट
ट the eleventh consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच अक्रावां व्यंजन॑.
टक n a type stitching to reduce length of a dress. कापडाच लांब उणे कराच शिवणे. Note :- from English. uis चाळीस पन्नास वर्षापुढे ल्हान पोरींला परकोर शिवणे म्हणजे, उण॑पक्ष दोन टक तरीन घालूनच शिवत होते. तेनी वाढतां-वाढतां टक उकलून परकोराच लांब जास्ति कराला सौकर्य होईल म्हणून अस॑ करत होते.
टकळू adj baldheaded. केंस झडलते डोस्के. वळुके (Tamil) ; टकल्या in sm. uis मझ लोंक अमेरीकाला गेलानंतर टकळू झाला. तथे असणार फार लोकांस॑ केंस झडते म्हणून मी ऐकलों. कामाच "स्ट्रेस"/श्रम असुया.
टक्कर n clash. fight. भांडणे. uis त्यंच मध्ये कायकी टक्कर झालाहे वाटत॑. थोड दिवसापसून बोलणेच॑ सोडूनटाकलाहेत॑.
टक्कर n collision. एकालेक बडिवणे.
टपाल n mail. post. तपाल. डाक.
टळके n head. डोस्के. डोई. टाळके.
टळणे vt to avoid. to prevent. चुकिवणे. निवारण करणे. टाळणे.
टहलणे vt to stroll or pace up and down. चालणे ; टहलणें/टेहेलणें/टेहलणें in sm. uis अम्च शेदारी/शेजारी असाच बागांत॑ कित्येकदन पाष्टे-सायनकाळी चुकनास्क टहलाल येतात॑. तवढ॑दनालीन त्यंच आरोग्यावर चिंता आहे वाटत॑.
टंब्लर n a narrow cup, without handle, made of metal or glass used for drinking a liquid. लोटा. Note :- from English. uis दक्षिण भारतांत लोक॑ अधीक टंब्लर उपयोग करतात॑. उत्तर भारतांत नुस्त पाणी/लस्सी असलते पीयाला लोटा (थोर टंब्लर म्हणूया) उपयोग करतात॑. चहा, दूध, कॉफीला तेनी कप-सॉसर (कप-बसी) वापरातत॑.
टाकणे vt to throw away. to discard. उपयोग नाही म्हणून दूर भिरकावणे. uis अम्ही ल्हान असताना/असतम्हा अम्च बाप-माय कोण्तेक वस्तुहीं जत्तन (दत्तन) ठींगाला शिकविलोते. पण, हे काळाच लिंकरे कायतरीन घेट्ले म्हणजे थोडच दिवस उपयोग करुन दूर टाकून टकतात.
टाकणे vt to let go. to abandon. सोडून टाकणे. uis तजकडे जास्ति बोलून प्रयोजन नाही. सोडूनटाक.
टाकणे vt to drop. खाले घालणे. uis कॉफीच लोटा पोळत आहे, खाले टाक नोको.
टाकणे suff used as a reinforcing verb of another verb, eg. करूनटाकणे, खाऊनटाकणे etc. akin to सोडणे in करसोडणे, खावूसोडणे etc. एक क्रीयापदाच शेवटि मिळिवाच अण्किएक क्रीयापद (पह्यिलच क्रीयापदाच अर्थाला अण्कीन शक्ति द्या करतां). Note :- the suffixing of verbs like टाकणे or सोडणे to another verb creates a complex verb.
टाका n a small stitch. एक ल्हान शिवणे. uis अण्थूणाच कापूस इकड॑-तिकड॑ सरकून जायनास्क असाला मध्य-मध्य टाका घालणे आहे.
टाळके n head. डोस्के. डोई. टळके.
टाळणे vt to avoid. to prevent. चुकिवणे. निवारण करणे. टळणे.
टाळी n a clap. दोन तळहात मारतान होयाच शब्द. ताळ. ताळम (Tamil). uis (1) भाषण ऐकलावर टाळी मारालाम्हणून नेता लोक॑ गुंप-गुंप लोकांना पैसे देऊन बलाईंगून येतात॑. (2) "टाळी बाई टाळी, अम्मा केली पोळी, पोळील नाही तूप॑, बाळाल नाही भूक॑" अस॑ एक लेंकरांच गाणे आहे.
टाळू n palate. roof of the mouth. तोंडाच आंतल॑ व॑रच भाग. uis जेवताना भातांत होतते एक ल्हान काठी तज टाळूला लागून घाव झाल॑.
टाळू n front part of head, above the forehead. कपाळाच व॑रच भाग. uis ल्हान लेंकर॑ पह्यिल॑-पह्यिल॑ चालाला प्रारंभ करताना तडकून पडून कित्येकदपा त्यंच टाळूला बलकट घाव लागुया.
टांक n a small gold/silver/copper sheet with an embossed image of Goddess. देविच रूप असाच सोने, रुपे अथवा तांबेच एक ल्हान पदक. uis (1) अम्च॑ घरांत वराड, लेंकरू उजणे असलते शुभ कार्य होताना अम्च॑ कुलदेवता बनशंकरी देवीच एक नव॑ टांक घेऊन तला पूजा करून संपुष्टाच बरोर ठिवणे आहे. (2) अम्च॑ घरच॑ देव-संपुष्टांत अम्च॑ पूर्वज जोडलते वीस-तीस बनशंकरी देवीच टांक आहे.
टांक n an amulet or talisman got ready after propitiating a God or Goddess. देव, नाहितर॑, देवीच आवाहन केलते पदक. यंत्र. uis मघ्य-मध्य भूत येत म्हणून तिला एक मंत्रवादीकडे बलायींगून गेले. देवीच आवाहन केलते एक टांक चाळीस दिवसाला हातांत बांधून ठिवला ते मंत्रवादी.
टांगा n horse carriage. घोडा बंडि. uis हे काळांतपणीं मुंबईच "मरीन ड्रैवावर" अयितवारी संध्याकाळी टांगा सवारी करुया ! ते टांगाला "विक्टोरिया" म्हणतात.
टांचणि n a pin. सुंई. ऊशि (Tamil) ; टाचणी in sm.
टांचा n heel. टांचा. पांयेंच एक भाग. Note:- टाच/टांच in sm. uis फार वर्षा नंतर मी गेल महीना "टेन्निस" खेळाला पुन्हाहीं प्रारंभ केलों. पण, चार पांच दिवसापसून मझ टांचा एकदम दुखत आहे म्हणून मी अत्ता खेळणे सोडूनटाकलों. टांचा दुखणे लोक्कर राह्यील म्हणून वाटते.
टांचा घालणे vt to do a spot stitching. टाका घालणे. uis शिंपि लोक॑ मषीनावर शिवाचपुढ॑ टांचा-घालाच कामाला ल्हान-ल्हान पोरांना ठींगट्लास्तात.
टिकला n a spot. a mark. टिकली.
टिकली n a spot. a mark. टिकला.
टिकाऊ adj durable. lasting. फार काळ नाश होयनास्क॑ राहणे. uis टिकाऊ ‘फरनीचर’ पह्जम्हण्जे रोसवुड नाहीतर॑ बर्मा टीकांत्सून करलतरच होईल॑.
टिप्पणि n explanations by way of notes. elucidation. विवरण करून दाखिवणे. टीका. uis बंग्ळूरांत श्री. प्रभंजनाचार म्हणून एक थोर मध्व पंडित आहेत. तेनी कराच प्रवचन फार बेष असल॑, कां म्हणजे, एक-एक विषयीन बेष टिप्पणी करून अम्हास सजास्क॑ सांगतील॑.
टिरी n buttocks. पृष्ट. टीरी. ढुंग ; टीर/टिरी in sm. uis भोईंत पाणी पडलसाच तो पाह्यला नाही वाटते. वेगांत पळत येऊन निसरून टिरीव॑र पडला.
टीका n commentary. elucidation. टिप्पणि. विवरण करणे. uis श्री मध्वाचार्यांच मूल-ग्रंथांच॑ टीका लिव्हलते श्री जयतीर्थ यांस॑ "टीकाचार्या" म्हणूनपणीं सांगतात॑.
टीरी n buttocks. पृष्ट. टिरी. ढुंग ; टीर/टिरी in sm. uis भोईंत पाणी पडलसाच तो पाह्यला नाही वाटते. वेगांत पळत येऊन निसरून टीरीव॑र पडला.
टुकडा n a piece of a sweetmeat. तुकडा. गुळ्चीट पदार्थाच एक चूर. uis त्यांस डयबीटिस आहे वाटते. जेवताना वाढलते एक टुकडा पणीन तोंडांत घालीगट्ल नाहीत॑.
टेंकणे vt to place on a support. खाले पडनास्क॑ असाला एकाचवर लागिवून ठिवणे ; टेकणें in sm. uis मी कोनेंत टेंकून ठिवलते केरसोणी अपाप निसरून पडल॑.
टेंकणे vi to lean against. एकावर झुकून/वांकून असणे ; टेकणें in sm. uis कोनेंत टेंकून होतते केरसोणी अपाप निसरून पडल॑.
टेंकणे fig to repose or place (one's hopes or expectations). to rely upon. (एकावर) आधाराच आशा ठिवणे. आधार घेणे. uis अम्ही पैसेच सहाय कराला तय्यार आहोंम्हणून कळ्लतर॑ पुरे, कित्येक लोक अम्चवर पूरा टेंकाला पाह्तील॑.
टेंका n support or prompt to lean against. टेंकाला उपयोग कराच वस्तु. uis (1) कित्येक झाडाला ते थोर होयापर्यंतीं टेंका देवून बांधामते असत॑. (2) अम्च॑ घरच॑ मागपटीसच भोंताले-भिंताला टेंका देऊन ठिवल्होतों तरीन यंदा आलते थोर पाऊसांत ते खाले पडून गेल॑.
टेंगूळ n a fried snack. तळलते एक पदार्थ. uis नित्य दुपारी टेंगूळ खायाच अभ्यास/दंडक करींगटलतर॑ अम्च रंक्तांत॑ ’कोलेस्ट्रोल’ नीट वाढून ह्रुदयाचा रोग याला संभव आहे. Note. from Kannada.
टोकरी n a reed or wicker carry-basket lined with leather. काताड गुंडाळलते बेताच बुट्टि. uis कोठतरीन "पिकनिकाला" जाताना खायाच पदार्थ, पाणीच "बोट्ट्ल" हे सग्ळीन ठिवाला टोकरी उजंड सौकर्य असल॑.
टोपि n cap. ऊन लागनास्क॑ असाला डोस्केच व॑र ठिवाच साधन॑. uis पह्यिले-पह्यिले महात्मा गांधी टोपि घालींगट्लोते तरीन, शेवटी त्यनी टोपि घालींगाच दंडक सोडूनटाकले. तरीन, ते टोपीला गांधी-टोपी म्हणाच नाव प्रसिद्ध झाल॑.
टोपि घालणे id to cheat. नाम घालणे (met). एमारिवणे (from Tamil). uis तज बरोर मिळींगटलतर॑ बेष टोपि घालल॑ म्हणून कळींगूनपणीं मझ॑ मित्राच लोंक तज सहवास सोडाला तय्यर न्होता. असाच पैसे पूरा नाश झालांपिरी अत्ता रडत बसलाहे.
टोळ n grass-hopper. एक प्रकाराच किडा/कीडा.
टोंचणे vi to get pricked. रुचणे. uis फाटलते कापड शिवताना सूंईं बरोर धरनातर॑ बोटाला टोंचेल॑.
टोंचणे vi to get pierced. टोंचणे. रुचणे. uis कान टोंचणे नोको म्हणून तिन॑ हट्ट करींगून बसलाहे.
टोंचणे vt to prick. टोंचणे. रुचिवणे. uis (1) तो उदंड चेष्टा कराच पोर म्हणून वाटत॑. तज भाऊच बलूणाला पह्जम्हणून टोंचून फुटिवला. (2) चप्लि घालनास्क॑ बाह्येर गेलतम्हा मझ॑ पांयेंला कांटा टोंचल॑.
टोंचणे vt to pierce. टोंचणे. रुचिवणे. uis जुने कालांत॑ दादिगे पोरांस॑पणीं कान टोंचत होते.
टोंचा n a thick needle. एक घट्टि सूंई ; टोचा in sm.
टोंचा n a dent. पोंचा.
टोंचा n a puncture. a pricked hole. टोंचून केलते ल्हान द्वार॑.
टोंचून बोलणे fig to talk hurtingly. ऐकणारांच मन्न दुख करिवास्क बोलणे. uis बाजू घरचीकडे बोलाला मझ॑ बाईलीला अवडनाच अवडना, कां म्हणजे, तिन॑ टोंचून टोंचून बोलती म्हण॑.
ठ
ठ the twelfth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच बारावां व्यंजन॑.
ठसका n a sudden reaction from the nose, eyes or gullet due to wrongly swallowed food water etc. खायाच पदार्थ गळांत अडकताना होयाच तंटा.
ठसका-बसणे vi to choke on food particles/liquid going into the wind pipe instead of the gullet. खायाच पदार्थ घसांत॑ अडकणे. uis लेंकर अवसरान॑ जेवताना त्यना ठसका बसूया. ते समयांत त्यंच पाठीवर थापटलतर॑ (थापडलतर॑) अण्खीं त्यना व॑र पाह्याला सांगीट्लतर॑ ठसका राहूंन जाईल॑.
ठाणा n police station. पोलीसांच कचेरि.
ठाम n place. ठिकाण. स्थळ. ठांव. uis एकदपा मी मैसूरांतून बांगळूराला ट्रैनांत येताना मला बसाला ठाम मिळ्लच नाही. तीन घंटे तसच ओठाकून आलों.
ठाम n location. ठिकाण. स्थळ. ठांव. uis एक ल्हान रोपाला/झाडाला एक ठामांतून वेगळ॑ ठामाला सरकिवून रोवलतर॑ बरोर वाढनास्क॑ मरून जाऊया.
ठाम n position. पदवी. स्थिति. uis (1) मझ मित्राला अदृष्ट बडिवले म्हणून सांगूया. कां म्हण्जे, उदंड हुडकला नंतर तज लेंकीला एक चोखोट ठामांत॑ वराड करून द्याला झाले. (2) एवढ॑ वर्ष कष्टि भोगलानंतर तला अत्ता एक चोखोट काम मिळ्ले. तज योग्यता पाह्यिलतर हेजपक्षा चोखोट ठाम मिळणे कष्टच॑.
ठांव n place. location. position. ठिकाण. स्थळ. ठाम.
ठिकाण n place. ठाम. ठांव. स्थळ. uis अत्ता अम्च घर असाच ठिकाणांत्सून आंध्रप्रदेश विधान सौधा एक किलोमीटरच असल॑. असलतरीन वाहनांच गर्धीमुळ॑ (गुंपामुळ॑) मोटरांत याला दहा-पंध्रा निमिष होत॑.
ठिमकणे vi to drip. to trickle in small drops. थेंब थेंब गळणे ; ठिबकणे / ठिपकणे in sm.
ठिमका n drop of a liquid. द्रव्याच बूंद. थेंब. Note :- ठिपका/ठिबका in sm. uis सार भात कालिवताना केत्येकदन॑ एक दोन चमचा तूप घालींगतील तरीन, मला एक ठिमका तूप पणीन बरोर पडना.
ठिमका n dot in the forehead. बिंदीच ठिमका. पोट्टु (Tamil). uis पोरींना फ़ाषनाच बिंदी पह्जेस्क अस्त॑. त्यांस॑ कुंकु/चांद लाविंगे म्हणजे, अम्हाला रागिवताने म्हणून एक ठिमका ठींगतील॑ (ठिवींगतील॑). ते पणीं बरोर दिसनास्क असेल॑.
ठिवणे vt to keep. to place. एक ठिकाणि असाला सोडणे. ठिवणे ; ठेवणे in sm. uis लेंकरे असाच घरांत॑ ठिवलते सामान तज ठिकाणी असना. एक-एकीन तेरा-पेरा पडलसल॑.
ठीक adj correct. proper. right. चूक नाहीते.
ठीक adj okay. बर॑.
ठीकठाक adj prim and proper. perfect. एकदम बरोर.
ठींगणे vt to hold. to keep. धरींगून असणे. ठींगून असणे. uis अधीक पैसे घेऊन बाहेर जाताना हातांत ठींगून थोड दूर पणीं चालताने. काळ नासून गेलाहे.
ठेम n a drop. (पाणीच॑) एक बूंद ; थेम/थेमका/थेमटा/थेंब/थेंबका/थेंबटा/थेंबडा/थेंबुटा/थेंबोटा in sm. uis गेल वर्ष उन्हाळांत॑ अम्च "बोर-आडांत" एक ठेम पाणी पणीं न्होते. जूलै महीना पांच दिवस बेष पाऊस आलानंतरच आडांतून थोड तरीन पाणी "पंप" कराला झालते.
ठेंचणे vt to pound in a mortar and pestle. चेंचणे. चेंचून रगडणे ; ठेचणे in sm. uis पानकांत॑ वेळा नीट ठेंचून घाटलतर॑ चोक्कोट (चोखट) वास येईल॑.
ठेंचणे fig to give a hard time. कष्टि भोगिवणे. फार तंटा करणे. uis तो रिटैर होयाचपुढे तज वरला (एम.डी) तला फारच ठेंचला. शेवटीच तज कारण अम्हाला कळ्लते.
ड
ड the thirteenth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच तेरावां व्यंजन॑.
डचकणे vi to get startled. डचकणें. uis त्यांस॑ सोप्न पडताना की, काय की ल्हान लेंकरे झोंपींत डचकतील॑.
डबरा n a medium sized barrel shaped, open mouthed vessel used mostly for boiling and/or storing drinking water. डवरा (Tamil). पाणी धरून ठिवणे, तावणे हे अग्गीन कराच उघड तोंडाच पात्र. uis तावाला म्हणून डबरांत मी पाणी धरून ठिवलते कोणकी लोटून सांडलाहेत॑. अत्ता पुन्हाहीं आडांतून पाणी शेंदून ते भरून ठिवाम॑.
डब्बा n box. डब्बि. uis चक्ळि, टेंगूल असलते पदार्थ मौ (मऊ) होईनास्क असाम म्हणजे, एक डब्बाच आंत बेष झांकून ठिवलतर॑ पुरे.
डब्बि n box. डब्बा. uis लाह्येंच वड्या डब्बींत घालून बेष झांकून ठिवलतर॑ उदंड दिवस नास होईनास्क॑ असल॑.
डमरू n a small hour-glass shaped drum held between fingers. बोटांत॑ धरून बडिवाच एक ल्हान ढोळ. uis तांडव कराच शिवाच हातांत डमरू पणीन असत॑.
डमार n an onomatopoeia indicating a large noise. एक मोट्ठ॑ शब्द. शब्दाच गोष्ट. Note :- from Tamil. uis पाष्टे-पाष्टे पांच घंटेला संपाक घरांत॑ डमारशी एक शब्द ऐकोलों. जाऊन पाह्यलतर॑ विरदणाला (विरजणाला) ठिवलोतते दूधाच पात्र एक मांदर॑ खाले लोटून घाट्लते दिसले.
डवरा n a medium sized barrel shaped, open mouthed vessel used mostly for boiling and/or storing drinking water. डबरा. पीयाच पाणी तावालीं धरून ठिवालीं उपयोग कराच एक भांडि. Note :- from Tamil. uis पीयाच पाणी मिळणे कष्ट असाच प्रदेशांतल॑ लोकांच संपाकघरांत॑ एकाच वर एक डवरांत॑ पाणी धरून ठींगटलसाच पाव्हुया.
डवरा n a small vessel being part of the coffee/tea drinking set of "डवरा-टंब्लर". चाय/कॉफि पीयाला उपयोग कराच एक ल्हान पात्राच जोडींतल॑ एक पात्र. uis पोणावांटा घरांत घराला आलते लोकांस मात्र, ते वेळ पूर्त, डवरा-टंब्लरांत कॉफि/चाय पीयाला देतील॑. घरच लोक नुस्त टंब्लरांतच कॉफि-चाय पीतील॑. पोळत असलतर ते फुंकत॑ पीतील. Note:- It is used for cooling the hot beverage, by pouring back and forth from the tumbler. from Tamil.
डवरा-टंब्लर n a set of a small flat-bottomed open mouthed vessel and a tumbler used for drinking coffee or tea, usually made of steel or in olden days, of brass. लोटा-वाटि. चाय/कॉफि पीयाला उपयोग कराच एक ल्हान पात्राच जोडि. साधारणहोवून हे स्टीलाच असत॑, पण जुन॑ काळांत॑ हे पितळाच होत॑. Note :- from Tamil & English. uis कढत कढत कॉफि, डवरा-टंब्लरांत निवींगून पीलतर॑पणीं तज रूच तसच असेल॑.
डसणे vt to sting or to bite (by insects etc). सरप॑, विंचू, डांच असलते जंतू चावणे. uis विंचु डसलते ठिकाणी थोडक चुणा लावलतर॑ लोक्कुर बर॑ होईल म्हणतात॑.
डंक n vengeance. malice. डंक. बदला घ्याच स्वभाव ; डंख in sm. uis अम्च राष्ट्रमंत्रिमंडलांत कित्येक मंत्रीना ’आर.एस.एस’ लोकांवर॑ डंक आहे म्हणून मझ अभिप्राय. तजमुळ॑ कित्येक भ.ज.पा नेतांचवर काहींतरीं आरोप घालून त्यना ’सी.बी.ऐ’ वाटे अडकिवाला काय वाट आहे म्हणून पाह्त असतात॑.
डंकारोटी n a fried poori like preparation made of rava mixed with curds and spices. रवाच बरोर दहीईं मसालाईं मिळिवून पाह्याला पूरी सारख॑ असाच एक तळलते पदार्थ. uis डंकारोटी खायाला वेगळ॑ तोळ्लावींगाच काहीं नोको, कां म्हणजे तजच रूच बेष असत॑.
डंभाचारी adj ostentatious. showoff. असाच पक्षा जास्ती दाखिवणे/करींगणे. uis नव होऊन पैसे-कासांत॑ आलते लोके थोड डंभाचारीपण॑ दाखिवणे आहे.
डाक n post. mail. तपाल. कागद॑. uis ल्हान गामांत अत्तपणीं लोके डाकघराला जाऊन ’पोस्ट मास्टराच’ बरोर उगे कायतरीन बोलून त्यंच ’टैमपास’ करतात॑.
डाकबंगळा n government rest house. सरकाराच विश्राम घर. Note :- the word Dakbanglow has it's origin in the traveler's rest-house at the end of a each dak or post stage of the byegone era. uis अम्च देशाच स्वातंत्र्याच पुढ॑ गोरेलोक बांधलते डाकबंगळा सत्तर वर्षाच नंतरपणीं घटमुट (घट्टी-मुट्टी) आहे.
डाकु n dacoit. चोर्टा.
डाग n a stain. a spot. एक वस्तूच वर लागाच रंग. uis पंढ्र कापडाच व॑र कित्येक वनस्पतीच रस लागून होयाच डाग काय करल॑ तरीन (केलतरीन) जाईना. तज नंतर ते कापड पुसाच चिंदीस्कच उपयोग कराम॑ (करांव॑).
डाग n a blot. डाग. uis पैसेच विषयांत गडबड करल॑-ते-करतां तला केम्हा आफीसांत धरले की, तजनंतर तज उद्योगालाच एक डाग लागल॑ म्हणुया.
डाग n a mole. उजतान पसून काताडांत॑ असाच काळ॑ रंगाच चिन्ह.
डाग n freckles. तोंडाच काताडांत॑ याच ल्हान-ल्हान फोड.
डागणे vt to shoot with a fire-arm. तोफनीशी गोळी मारणे ; डागणें in sm. uis (1) हे काळाच लेंकरे "वीडियो गेम्स" पाव्हून, तोफ/रिवाल्वर असल खेळाच-सामान घेतात॑ अणी ते ठींगून डागणे/मरिवणे असल खेळ खेळतात॑. थोरळे झालावर त्यांस॑ "अहिंसा" म्हणाच शब्दाच अर्थ पणीं कळनास्क होऊन जाऊया. (2) ते मनुषाच तोंड पाह्तानाच मला पेटिंगून येत॑. तेला डागाम म्हणून वाटते.
डाव n ploy. bluff. लबाड. uis तू मझकडे डाव घाल नको, असाच वास्तव सांग.
डाव n a game of dice. डावाच खेळ.
डाव n a throw or roll of dice hoping for luck. भाग्य उद्देश करून डाव लोळिवणे.
डावखोर n gambler. डावखोर.
डावखोरा n a left-handed person. डाव॑ हातांत काम करणार. डावखुरा.
डाव॑ n left. उजव॑च उलटा भाग ; डावा in sm. uis ब्रिटिष कोमनवेल्तांतल॑ देशांत अग्गीन बीदीच डाव॑ पटीसांतच बंडि पळिवाच॑. वेगळ॑ देशांत अग्गीन उजव पटीसांत॑ पळिवतात.
डांगर n a gravy like side dish made from udid flour. उडिदाच पीटांत॑ केलते एक तोळ्लावण॑ (तोंडलावण॑) पदार्थ. uis डांगर देशस्थ मराठी लोकांच एक प्रसिद्ध कालवण (कालिवण) आहे.
डांच n mosquito. एक ल्हान उडाच प्राणि ; डांस in sm. uis डांच चावनास्क असाला दिवसोडि आंगांत "ओडोमोस" लावींगणे चोक्कोट न्हो (नहो).
डांबर n coal tar used for road laying. बीद तय्यार कराला वापराच काळ॑ रंगाच॑ वस्तु. uis वर्षा-वर्षी पावसाळाच पुढ॑ बीद बरोर करतों म्हणून कॉरपरेषन कंट्राक्टर लोके तजवर नुस्त डांबर घालतात. एक थोर पाऊस आलकी ते पूरा नाशून जात॑.
डांभिक adj & n hypocritical. डांभिक. डंभाचारि मनुष ; डांभीक/दांभिक/ढोंगी in sm. uis तज सहवास मी ठींगनाच ठींगना, कां म्हणजे, सांगाच एक कराच एक तसलते डांभिक मनुष तो.
डिक्कि n collision. एकालेक बडींगणे. uis हैदेरबाद एर्पोर्टांतून घराला जात अस्ताना मझ लेंकीच टॅक्सीला मागेसून एक मातीच लोरि डिक्कि बडिवल॑. देवाच दया, आंगाला एक चूरपणीं घाव लागल॑ नाही.
डिवणे vi to be hit or dashed by head by an cow, bull, buffalo etc. गाय, बैल, मैश असल॑ प्राणी डोस्केवाटी आंगाला बडिवणे. uis रोडांत चालून जाताना एक मैश/म्हैश मागेसून मझ आजीला डिवले. चोखोट वेळ॑, अधीक घाव झाल नाही.
डिंक n gum. गोंद. uis " क्विक-फ़िक्स" डिंकांत॑ कागद मात्र न्हो (नहो) वेगळ॑ कोण्त वस्तूपणीं चिकटीवाला होईल.
डिंकलाडू n a gummy medicinal ladu given to post natal mothers. बाळंतीणांला द्याच एक लेह्य.
डुक्कर॑ n pig. sow. डुक्र॑. वराह ; डुक्कर in sm. uis गलीज जास्ति असाच ठिकाणी डुक्कर॑ असल॑.
डुक्र॑ n pig. sow. डुक्कर॑. वराह. ; डुक्कर in sm. uis डुक्राच मांस खाणे इस्लाम धर्मांत निषेध म्हणून सांगतात॑.
डुक्ळि n a nod (during a nap while sitting). (बसून झोंपि जाताना) डोस्के अपाप झुकून पडाच ; डुकली/डुलकी in sm. uis दुपारच जेवण झालांपिरि मला जाग॑ राहणे म्हणजे थोर कष्टच. ते वेळी कॉळेजांत॑ पह्यिलच पंक्तींत बसलसलतरीन मी डुक्ळि देत असन॑.
डुक्ळि n a very brief nap. एक ल्हान झोंप. uis दुपारा मला झोंप येईना. दोन निमिष डुक्ळि देलतर॑ पुरे, हायशी होऊनजाईन॑.
डुक्ळि-देणे vt to nod during a nap while sitting. बसून झोंपि जाताना डोस्के अपाप झुकून पडणे.
डुबकि n a dip or plunge (in water). पाणींत॑ बुचकळणे.
डेरा n tent. डेरा. uis वीस तीस वर्षाच पुढे कुवैत, अबु-धाबी असलते देशांत॑ नुस्त डेरांत राहाच बदुईन अरबि लोक होते. अत्ता तिकड तेल उत्पन्न कराला आरंभ झाला नंतर ते गांम अग्गीन उजंड विकास झालाहे.
डेरा n camp. मुकाम. मुक्काम. uis टिपु सुल्तानाच सैन्य मलबार प्रांतांत डेरा बडिवलाहे म्हणून ऐकतानाच त्रावनकोर राज्यांत लोके फार भींगाला आरंभ केले.
डेरा बडिवणे fig to stay put for a long period, usually as an un-welcome guest. बलावनास्क॑ (आवंतन नाहीस्क) आलते अतिथि थोड दिवसाला एक ठिकाणि राहणे. मुकाम बडिवणे. कुंठ (कुंड) खांडणे. uis वर्षावर्षि साळेच सुट्टीच वेळि अम्च मामाच कुटुंब अम्च घरांत डेरा बडिवतील॑. याच महिनाच धर्मा या पतोरि वापस त्यंच गामाला जाईनात॑.
डोई n head. डोस्के. डोंबळे ; डोके/डोंबल in sm.
डोणा n a small cup usually made of dried leaf, used in olden days for serving a liquidy side dish like kheer etc. दोण. दोण्णे (Kannada). जुने काळांत खीर वगैरा वाढाला वाळलते पानांत केलते एक ल्हान वाटि. uis खीर, ऐस-क्रीम वगैरा डोणेंत देणे आहे. अत्तलीकडे "प्लास्टिक" डोणा उपयोग होत आहे. तज बद्दल कागदाच दोणेला "प्लास्टिक" कोटिंग देऊन ("प्लास्टिक" लिंपलत॑) उपयोग करलतर उण॑ "प्लास्टिक" वेच होईल॑. Note :- दोण is the प्राकृत form of द्रोण, which in Samsrkth means 'a tub'.
डोबूर n a tiny hole. perforation. एक ल्हान द्वार ; डोबरा in sm. uis आंघोळि कराच "षवराच" डोबूर ल्हान असलतर॑ पाणींत असाच खार/मीठामुळे ते झांकून पाणि बरोर पडाच राहणे सहजच.
डोलि n palanquin. डोळि. पालखी. पल्लक (Tamil).
डोलि n hammock. कापडाच झोळि. डोळि.
डोळि n palanquin. डोळि. पालखी. पल्लक (Tamil). uis जुन॑ काळांत थोर पैसावंत लोकांच बायके अग्गीन डोळींतच सवारि करत होते.
डोळि n hammock. डोलि. कापडाच झोळि. uis अम्हि ल्हान असताना साळेच उन्हाळाच दोन-तीन महिनेच सुट्टीच वेळि दिवसोडि घर्च मागपटीसच अंबाच झाडाच खाले बांधलते डोळींतच काळकांडत होतों.
डोळे n eye. डोळे ; डोळा in sm. uis मझप्रकार॑ अम्हाला देव देलते पांच इंद्रीयांत॑ डोळेच पहिलच स्थानांतल॑.
डोळे बडिवणे vt to wink mischievously. चेष्टपणांत॑ डोळे मारणे. uis मी ल्हान असताना अमच शेजारि एक पोरि होति. तिला येणार-जाणार पोरांस पाव्हून डोळे बडिवणेम्हण्जे मजा होत-होत॑.
डोळे मारणे vt to wink mischievously. चेष्टपणांत॑ डोळे-बडिवणे. uis कोण्त पोरींस पाह्यलतरीन डोळे माराच स्वभाव तला होत॑. पण, एक दिवस चार पोरी मिळून तला धरून ध्वंस केलांपिरी ते स्वभाव अपाप राहूनगेल॑.
डोळेला पाणी घालींगून असणे fig to keep a watchful eye. श्रद्धानीशी सांभाळणे. श्रद्धानीशी पालन करणे.
डोस्के n head. डोई. uis अफघानिस्थानांतल॑ तालिबान लोक॑ अमेरिकाच पत्रकार डानियल पेर्ळ यांच डोस्के कापाच "वीडियो" प्रचार करून त्यंच दुष्ट अणि क्रूर स्वभाव पूरा भूलोकाला दाखिवले.
डोस्के करींगणे vt to have a hair cut. डोस्केच केंस कापींगणे. हजामाकडे जाणे. uis अम्च॑ गामाला आलते नव॑ हजामकडे मझ॑ लोंकाला डोस्के-करींगाला पाठिवलों. पाप, उंदीर चावलत्यास्क॑ इकडे-तिकडे कापून सोडलते पाव्हून हांसामकी रडामकी राग करींगामकी कळ्ळ नाही.
डोस्के खाजींगणे id to be puzzled. प्रश्न विचित्र होऊन दिसणे. uis तो एक कार्यालीं प्रयोजन नाहीते मनुष म्हणून मला तम्हाच कळल॑. कायतरीन काम कराला सांगटलतर॑ एकीं कळनास्क दोस्के खाजींगून होठाकल॑ (ओठाकल॑).
डोस्के खाजींगणे id to display sheepish and subservient mentality. उणीवताच स्वभाव दाखिवणे. uis केलते चूक दूसरांस॑ कळूनगेले म्हणून अग्गिदनांचीं समोर तो दोस्के खाजींगून होठाकला (ओठाकणे).
डोस्के खाले ओठाकणे id to put in all methods to attain results. सर्वत्र प्रयत्न करणे. डोस्के खाले होठाकणे. uis डोस्के खाले ओठाकल तरीन तला ते काम मिळाला जात नाही. तज पक्षा षाणे लोके भरूनदन॑ आहेत॑.
डोस्के खाले होठाकणे id to put in all methods to attain results. सर्वत्र प्रयत्न करणे. डोस्के खाले ओठाकणे. uis तला वारसाच आस्त भरून होत॑. पण ते बरोर पाह्यींगनाते-करतां सगळीन कोण-कोणकी बडींगून गेले. अत्ता डोस्के खाले होठाकल तरीन तला ते काहीं मिळाल जात नाहि.
डोस्के पिच्चिंगणे id to go crazy. to go nuts. become disgusted. become desperate. to be at one's wit's end. काय कराच म्हणून योचना करींगून मनाला फार तंटा वाटणे. uis त्यंच लेंकीला कित्ति सांगूनपणीं तिन॑ बाहेर गामाच नवराच पह्जे म्हणून बसलि आहे. तिज हट्ट पाव्हून तेना डोस्क पिच्चिंगास्क आहे म्हणत होते.
डोस्के फिरणे vi to feel giddy. डोस्केच चक्कर होणे. uis डयबीटीस असणारांस॑ बरोरल॑ वेळी कायतरीन खाल्लनाहीतर॑ भूकामळे डोस्के फिराला आरंभ होईल॑.
डोस्के फिरणे id to become haughty. डोस्के फुगणे. दुरहंकारि होणे. मस्ति धरणे. uis असलास्क-असून तला कोठसूनकी भरून पैसा मिळ्ळ॑ म्हणून अता डोस्के फिराला आरंभ झालाहे. एवढ दिवस तज बरोर होतते लोकांस पाह्यलतर॑ पणीं फिरून पाह्याला तय्यार नाहीस्क॑ हिंडत आहे.
डोस्के फुगणे id to become haughty. डोस्के फिरणे. दुरहंकारि होणे. मस्ति धरणे. uis थोड दिवसापसून तला काय झाल म्हणून कळत नाही. लोंकाला चोक्कोट काम मिळ्लत॑ असूयाकी कायकी, कोणाला पाह्यलतरीन उजंड गर्वांत अस्तो. तला डोस्के फुगलाहे.
डोस्के फोडिंगणे id to worry no end. to break your head. फार योचना करणे. uis तो एवढ॑ दिवस अवघडास्क हिंडत होता. अत्ता ते अग्गीन सोडूनटाकून कस॑ चोक्कोट नाव घेणे म्हणून डोस्के फोडींगत योचना करत आहे.
डोस्के बडींगणे id to bemoan out of frustration. निराशा दाखिवणे. uis दुर्भाग्यांत बुडून बसलोहें म्हणून डोस्के बडींगत होता मझ॑ मित्र. कायरे म्हणून विचारताना कळ्ळ॑, दहा-दहा रुपेच शंभर लोट्टरी टिकट घेऊनपणीं एकालीन काहीं मिळ्ल॑ नाही म्हणून !
डोस्के व॑र बसणे id to boss over. to dictate terms. दुसरेंच व॑र अधिकार दाखिवणे. uis कामवालांना ठिवलत ठिकाणि ठिवाम॑ म्हणून एक अभिप्राय आहे. कां म्हण्जे, अधिक प्रेमान॑ वागलतर॑ तेनि अम्च डोस्के वर बसतील॑.
डोस्के वरून जाणे id to fail to understand. to be mystified. समजनास्क॑ असणे. uis मी एक ल्हान "जोक" सांगट्लों तला, पण तज तोंडांत हांसूच लक्षण पणीं नाही. मी सांगट्लते तज डोस्के वरून गेल॑ वाटते.
डोस्के हलिवणे id to agree without thinking. योचना करनास्क॑ संम्मत करणे. uis काय सांगट्ल तरीन डोस्के हलिवतो. स्वंत बुद्धी नाही वाटते तला.
डोस्के सूळ n head ache. डोस्के दुखाच॑. डोस्केला होयाच/याच वेदना. uis कित्येकदपा पोटांतल॑ वायूमळेहीं डोस्के सूळ येऊया. थोडक॑ उणु पाणी पीलतर॑ ते बरोर होईल.
डोस्के सूळ fig a chronic problem. एक निरंतर॑ प्रश्न. uis रिकामांत बसल्होतते तला आश्वास द्या करतां कोणाला कोणाला पाह्यलतर॑ एक काम मिळल म्हणून मी सांगट्लों. अत्ता कसतरीन एक काम करून द्या म्हणून मझ॑ मागेच पडलाहे. बरोरल॑ डोस्के सूळ झालाहे तो मला.
डोंकावणे vt to peep. to peep into. गळा लांब करून पाह्णे. डोकावून पाह्णे ; डोकावणे in sm. uis "अगे, शेजारल॑ घरची अम्ही अस्कीन बसून बोलत असताना दोन-तीन दपा डोंकावली. तिला कायतरीं पह्जेकी कायकी, विचार॑".
डोंगूर n mountain. पर्वत ; डोंगर in sm. uis भूलोकाच सगळच्यांपक्षा उंच डोंगूर हिमालया भारताच उत्तर भागांत आहे.
डोंगूर n hill. एक ल्हान पर्वत ; डोंगर in sm. uis बंग्ळूराच जवळ असाच "नंदी-हिल" डोंगूराला जाम॑ म्हणजे, शनिवार अणी अयितवार हे दोन दिवसीन जाताने. कां म्हणजे, ते दोन दिवसीन तिकड॑ भयंकर गुंप असल॑.
डोंबळे n the head. डोस्के ; डोंबल/डोंबलें in sm. Note :- said sarcastically.
डोंबुरा n a breach. a gap. डोंबूर. छेद.
डोंबुरा n a hole. डोंबूर. द्वार. ओटे (Tamil).
डोंबुरा n a cavity. डोंबूर.
डोंबूर n a breach. a gap. डोंबुरा. छेद.
डोंबूर n a hole. डोंबुरा. द्वार. ओटे (Tamil).
डोंबूर n a cavity. डोंबुरा.
ढ
ढ the fourteenth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच चौदावां व्यंजन॑.
ढकळ imp push. पुढे अथवा मागे सरकिवाच॑ ; ढकल in sm.
ढकळणे vt to push. बळ देऊन सरकिवणे. ढकलणे in sm. uis अर्ध वाटेंत मझ॑ बंडीच पेट्रोळ संपूनगेल॑. नंतर॑, दोन किलोमीटर दूर असाच एक पेट्रोळ-पंप पर्यंतीन ढकळामते पडल॑.
ढकळणे vt to put off. नंतरसाला (नंतरशाला) ठिवणे. uis हातांत काढलते एक कामीन तो पूरा करना. पुढे ढकळाला काय वाट आहे म्हणूनच केम्हाहीं तज डोस्केंत॑.
ढवळणे vt to stir. एक मऊ अथवा द्रव्य पदार्थाला आंतून हलिवणे. किंडणे (Tamil). uis लोणी विघरिवून तूप करताना पळीनिशी केम्हाहीं ढवळत असल नाहीतर॑ ते बूड बसून जाईल॑.
ढंग n loutish behaviour. ढेंग. ढेंगाच वागणे. uis तज ढंग वागणे पाव्हून कोणीन तला त्यंच जवळ करींगनात॑.
ढाळणे vi to have loose motions. बेदि (Tamil). Note:- in sm ढाळणे means 'to shed tears'. uis बीदींत विकाच पाणी-पूरी, भेल-पूरी असलते अग्गीन घेऊन खायनाच खयना मी, कां म्हणजे, ते अग्गीन खाल्लतर॑ निश्चय ढाळणे येईल मला.
ढाळास n Diarrhoea. पोटाच एक असुख॑/व्यादि. uis चार दिवसा पसून तो ऑफीसाला आलनाही. नंतर॑ कळ्ळ॑, तला ढाळास होत॑ म्हणून.
ढाळास-देणे fig to cause butterflies in the stomach. to scare someone. पोटांत॑ बड-बडा आणिवणे. दूसरेंला भें आणिवणे. uis परमा दिवसी मझ एक मित्र येऊन ढाळास देवुनटाकून गेला. तो सांगतो "याच वर्षापासून मुनिसिपालिटि "प्रोपरटी-टेक्स" तिप्पट कराला जातात॑".
ढिकळी n a small lump of cooked rice. ढिकोळी. ढिकुळी. शिजलते भाताच ल्हान मुद्दा. uis जुने काळांत, म्हणजे, कुक्कर अग्गीन याच पुढे तपेलांत भात शिजिवताना त्यांत ढिकळी बसल॑.
ढिकुळी n a small lump of cooked rice. ढिकोळी. ढिकळी. शिजलते भाताच ल्हान मुद्दा. uis भाताच ढिकुळी चघळाला बेष असल॑.
ढिकोळी n a small lump of cooked rice. ढिकुळि. ढिकळी. शिजलते भाताच ल्हान मुद्दा. uis भाताच ढिकोळी खाताना दत्तन असाम॑. कां म्हणजे, ते किडा-अळाच गूडामळेहीं असूय.
ढिमिकी देणे vt to stay away from school or office without permission. to play truant. to play hookey. ढुमिकी देणे. अनुमती नाहीस्क॑ शाळेला अथवा कचेरीला (ऑफीसाला) जायनास्क॑ असणे. uis शेवटीच परीक्षा लिव्हाला ते पोराला अनुमती देल नाहीते. विषय काय म्हणजे, भरून दिवस ढिमिकी देलते करतां तला हाजर उणे होत॑ म्हण॑.
ढीगारा n a pile. a heap. गुंप करून घाट्लते ; ढीग/ढिगर/ढिगार/ढिगारा in sm. uis घासाच ढीगाराच व॑र पाऊस पडलतरीन तज आंतल॑ भाग ओल॑ झालसना.
ढीला adj loose. slack. चिक्टून नसाच॑.
ढुमिकी देणे vt to stay away from school or office without permission. to play truant. to play hookey. ढिमिकी देणे. अनुमती नाहीस्क॑ शाळेला अथवा कचेरीला (ऑफीसाला) जायनास्क॑ असणे. uis काल साळेला येईनास्क॑ ढुमिकी देलते करतां आज तला क्ळासाच बाह्येर होठाकिवूनटाकले.
ढुशी n butting (with head). डोस्के वाटे बडिवणे. uis ल्हान लेंकरांला खेळिवताना "ढी ढी ढी....ढुशी !" अस॑ सांगून अम्च॑ डोस्के वाटी लेंकरांच पोटाला हळ्ळु बडिवतों.
ढुसकी n a thrust. a push. butting. ढुशी देणे. ढुशी करणे.
ढुंग n buttocks. टीरि. Note:- used more in an uncouth manner. uis जा, जा, निकाट इकडून. डुक्राच ढुंग खायालच तू लायक॑.
ढेंकारा n belching. पोटांतल॑ वायु तोंडांतून येणे ; ढेकर in sm. uis बेष आहे, बेष आहे म्हणून सांगून उडिदाच पीठाच बज्जी भरून खावूनटाकून अत्ता ढेंकारा देत बसलहे तो.
ढेंकूण n bed-bug. रक्त पीयाच एक ल्हान जंतु ; ढेकूण in sm. uis कित्येकदनास॑ ढेंकूण चावना.
ढेंकूण fig a derisive term for a Tamil Iyengar. अरव॑ अय्यंगार मनुषाला उद्देश करून मष्किरींत सांगाच एक गोष्ट॑. Note :- on account of the perceived notion that such a person behaves stingily on himself and his conversations are of similar nature while interacting with others.
ढेंग n a moron. a loutish person. a loutish pretender. ढंग. मंद बुद्धीच लबाड मनुष. uis ढेंग झालतरीन तला एक चोक्कोट स्वभाव आहे. कोण्त वस्तूहीं दत्तन ठींग म्हणून तजकडे ओपिवलतर॑ बेष पाह्यींगल॑.
ढोळ n a type of drum. एक रीतीच ढोळ.
ढोळक n a small drum. एक रीतीच ल्हान ढोळ.
ढोसणे vt to suckle. to breast feed a child. लेंकराला मायेच दूध देणे. ढोंचणे. थान देणे. पाजविणे.
ढोंग n hypocrisy. sham. लटक जंभ.
ढोंगी adj hypocritical. ढोंग करणार. डांभिक. uis गरीब, भाग्यवंत, थोर अथवा ल्हान कामांत असणार अस तेवढदनांचीं बरोर सम भावांत वागणार स्वामि/आचार्य लोकेच खर ज्ञानि म्हणूया. नाहीतर तेना नुस्त ढोंगी स्वामि म्हणाम॑.
ढोंसणे vt to suckle. to breast feed a child. लेंकराला मायेच दूध देणे. ढोसणे. थान देणे. पाजविणे.
ण
ण the fifteenth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच पंद्रावां व्यंजन॑.
No comments:
Post a Comment