फ
फ the twenty-second consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच बावीसवां व्यंजन॑.
फकीर n fakir. a Muslim mendicant. मुस्लीम साधु.
फजिति n disgrace. discomfiture. ignominy. पज्जत्ति. अपमान.
फट n a tear. a split. फाटून असाच॑. पाट.
फटाकि n cracker. पट्टाकि. पटाका.
फटार n sharp/smart (jerk, jolt, slap, smack etc). पटार. पळार. झट. uis परीक्षाला वाचत असताना झोंपि जात असाच पाव्हून तज बाप तज डोस्केला फटारशि एक थाप देले.
फडकून-पाह्णे vt to have a cursory or careless glance. अलक्ष्य होऊन पाह्णे. uis अम्च घरांत भांडणे झाला नंतर मझ काका वरडत॑ बाहेर निघून जावून फार वर्ष झाल॑. एवढ॑ पतोरि (पर्यंतीन) घरापटीस फडकून पणीन पाह्ले नाहीते.
फडकि n stitched clothes in general (of male and female). शिवलत॑ कापड. uis दीपावळीला अम्हाला तेवढदनालीं नव फडकि घेम म्हण्जे उण॑पक्षा दहा हदार रुपे तरीन होईल.
फडक॑ n a piece of torn cloth. पाटक॑. पाटक॑ (फाटक॑) कापड॑. uis मझ लोंक तेथसून वरडला "पंखा पुसाला एक फाटक॑ फडक॑ असलतर॑ द्या".
फणस n jack fruit. पणस. एक फळाच नाव.
फण॑ n hood of a cobra. नाग सर्पाच॑ उगडलते डोस्के ; फणा in sm.
फणाल n collapse. bust. सत्यनाश. Note :- from Tamil.
फणाल n bankrupt. दिवाल. Note :- from Tamil.
फणाल होणे vt to collapse to bankruptcy. to go burst. सत्यनाश होणे. दिवाळि होणे. Note :- from Tamil.
फणि n a comb. पणि. केंस विंचराच साधन॑. विंचरणी ; फणी/कंगवा in sm.
फतवा n a religious judgment given in Islam. इस्लाम धर्मांत द्याच निर्णय.
फल n fruit. पंडु. फळ.
फल n consequence. result. effect. परिणाम.
फलश्रुति n benefits or rewards accruing due of observance of shastras. शास्त्रानुसार जीवन करामुळे याच चोखोट फल. uis विष्णु सहस्रनाम॑, ललिता सहस्रनाम॑, नारायणीयम असल॑ देव स्तुति सांगताना/पारायण करताना, ते केलतर तज फलश्रुति काय मिळल म्हणून तजांतच शेवटि याच श्ळोकांत अस्ते.
फलहार n snacks. light refreshments. उपहार. पलहार. पलाहार. फलाहार. लघु-भोजन॑. लघु-भक्षण॑. Note:- फल+आहार.
फलाणा pron a certain person. a so and so person. such and such a person. एक प्रत्येक व्यक्ति. अमुक व्यक्ति. uis मझ मित्र 'सी.बी.ऐंत॑' काम पाह्णार म्हण्ट्ले "सरकारि आफीसर तेवढदनीं पैसे खाणार म्हणून सांगिटलतर॑ मला काय कराला होईल ? फलाणा आफीसर लांच घेतो म्हणून स्पष्ट होऊन सांगिट्लतर॑, तला धराला एक वाट कराला होईल. हे विवर॑ मिळ्ळ॑ नाहीतर॑ काहीं कराला होईना".
फलाहार n snacks. light refreshments. उपहार. पलहार. फलहार. पलाहार. लघु-भोजन॑. लघु-भक्षण॑. Note:- फल+आहार.
फलित n that which has yielded profit or fruits of the effort. फल अथवा प्रयोजन झालते. uis तो जोत्स्य सांगिटलते तेवढ॑ परिहारहीं अम्ही केलों तरीन ते कोण्तीन फलित झाल नाही.
फल्लम n money. wealth. पल्लम. धन. पैसा. uis फल्लम असणारांकडे पुन्हा व॑र-व॑र फल्लम येऊन पडत अस्ते. Note:- फल्लम, also called फलम was a small gold coin in use during historical times. The more commonly used word पल्लम (meaning money/wealth) appears to be a derivative of this.
फळ॑ n fruit. पंडु. फल.
फळा n wooden plank. board. कट्टाच फळा. फळी.
फळिच n dazzling brightness. झळक॑. पळिच. uis "प्राणायाम अणी योग" केल तर॑ अम्च तोंड, आंगाच काताड सर्वीं फळिचसी असल॑ म्हणून अनुभवी लोक सांगतात॑.
फळिच n glare. जास्ति उजाडामळे डोळेला होयाच श्रम॑.
फळी n wooden plank. board. कट्टाच फळी. फळा.
फाटकपण॑ fig petty behaviour. slipshod behaviour. mean behaviour. पाटकपण॑. अल्पपण॑. सोदापण॑. uis कसाला अम्ही फाटकपणाn वागाम॑, वेच जास्त झालतरीन एक चोखोट हॉलांत अम्च समारंभ ठींगूया. येणार सर्वाना एक ल्हान 'मेमेंटो' पणीं देऊया.
फाटक॑ adj torn. पाटक॑. पाटून असाच॑.
फाटक॑-तुटक॑ adj ragged and broken. frayed and broken. that which has become junk. मोडक॑-तुटक॑. पाटक॑-तुटक॑. uis वास्तु प्रकार फाटके-तुटके सामान कोण्तीन घरांत असताने. ते तम्हा-तम्हा टाकाम॑.
फाटणे vt to tear. पाटणे.
फाडणे vt to fell (a tree etc). (झाड) कापून घालणे. पाडणे.
फाडणे vt to demolish. पाडणे. uis मोट्ठ॑-मोट्ठ॑ पट्णांत॑ जमीनाच मोल उदंड वाढलांमुळे, जुने घर अस्कीन फाडून फ्लाट बांधून विकाच बिसिनस भरून लोक॑ करत आहेत॑.
फाडणे vt to split. लांब चूर करणे. पाडणे.
फाडणे vt to hew. व॑रून खांडणे. पाडणे.
फाडणे vt to dig. खांडणे. पाडणे.
फापणी n eyelids. पांपणी ; पापणी in sm. uis कित्येक लोकाना एक वय नंतर त्यंच फापणी झांकलास्क अस्ते. ते एक विधाच "नरवस" रोग आहे. औषद/ओखद घेटलतर बर होईल.
फार adj a lot. plenty. भरून. उदंड॑. उजंड. दंड॑.
फाल्गुन॑ n name of a month in Hindu calendar. हिंदु पंचांगांतल॑ एक महिनाच नाव. फाल्गुण॑.
फांटा n a branch of a tree. पेडाच भाग ; फाटा/फांटा in sm. uis फांटा कापतों म्हणून "इलेक्ट्रिसिटी-वाले" झाडेच कापुनटाकतात॑. एक-एक झाड वीस-पंच्वीस वर्ष जुने म्हणून त्यांस॑ अर्थ होतनाही.
फिकर n concern. पर्वा करणे. अक्करे दाखिवणे. uis अम्च व॑र त्यास॑ फिकर असलतर॑ नव॑ ठिकाणि अम्हाला अस सोडुनटाकून जातीलका ?
फिरकी n the male-screw of a nose or ear stud or ornament. नथ/नेथ अथवा तोड/कानाच आभरण॑ दत्तन धरून ठिवाच साधन॑. uis अत्तच सोनेच मोल असाचाला एक फिरकी पणीं दोन-तीन हदार रुपे होईल.
फिरणे vi to rotate. एकेच ठामांतून सरकनास्क॑ फिरेत असणे.
फिरणे vt to walk around and come back again to the same spot. फिरून-फिरून आरंभ केलते ठिकाणीच येणे. uis एक नव ठिकाणि जायाच पुढ॑ बरोरल॑ 'अड्रेस' अण्खी खुण/'लांड्मार्क' विसरनास्क॑ अम्चकडे ठींगाम॑. नाहीतर॑ हुडकाच 'अड्रेस' मिळनास्क॑ फिरुन-फिरुन आलते ठामीच पुन्हा-पुन्हा गुंडाळणे होईल.
फिरणे vt to take a stroll. नुस्त॑ चालाला जावून येणे.
फिरिवणे vt to rotate a thing. फिराला सोडणे ; फिरवणे/फिरविणे in sm.
फिरिवणे fig to take one for a ride. to mislead. एमारिवणे.
फिरुन adv (to go in a) roundabout (way). (to) skirt around. (to go or move) circuitously. वलांडून जाणे. फिरींगून जाणे. uis अत्ता 'वन-वे' झालावर त्यंच घराला जायाला भाजीपाला मारकेट अस्कीन फिरींगून जाम॑. वेगळ एक जवळच॑ वाट आहे, पण त्यांत॑ पूरा धोंडा-गुंडू असाकरतां 'आटोरिक्षावाले' ते वाटी येईनाते.
फुगणे vi to get bloated. आकार मोट्ठ॑ होणे.
फुगणे vi to swell. सुजणे.
फुगणे vi to put on weight. आंगाच भार॑/वजन जास्ति होणे.
फुगिवणे vt to inflate (by blowing etc.). (फुंगून) मोट्ठ करिवणे ; फुगवणे/फुगविणे in sm.
फुगिवणे fig to pump up a person's ego. अहंभाव चढिवणे.
फुटक॑ adj cracked. broken. burst. पुटक॑. फुटलते.
फुटणे vi to break up. पुटणे. मोडणे. चूर-चूर होणे.
फुटणे vi to crack. to snap. पुटणे. तुटणे.
फुटणे vi to coagulate (milk) while boiling. पुटणे. (दूध) तावताना फुटणे.
फुटणे vi to burst open (after swelling). पुटणे. सुजून फुटणे.
फुटाणे n dried and roasted chana. पुटाणे. वाळिवून भाजलते चणा.
फुलाच झाड n a flower plant. फूलाच झाड. uis अम्च शेदारल॑ पार्कांत/बागांत॑ विध-विध फुलाच झाड वाढिवताते. पाह्याला फार सुंदर असा करतां टळाला येणार सग्ळीं तोडिंगून जात अस्तात॑.
फुलारि n a florist. flower vendor. फूलवाला. फूलवालि. uis हैदराबादांत फुलारि आणाच मोगराच फूल शुद्ध वास असत नाही, पण मोल मात्र फार जास्ति अस्ते.
फुसका adj hollow. आंत खालि असाच॑. पोकळ॑. पुसका.
फुसका adj enfeebled. flimsy. debilitated. हलक॑. बळ नाहीते. पुसका.
फुंक imp blow air from mouth. तोंडावाटे वार॑ भरिवणे.
फुंक imp play a wind musical instrument. फुंगी वाजिवणे.
फुंकणी n a blow pipe used for stocking fire in a stove which uses coal or wood as fuel. सगडीच॑/शेगडीच॑ विस्तूला वार॑ घालाच साधन॑.
फुंकणे vt to blow with the mouth. तोंडा वाटी वार॑ घालणे.
फुंकणे vt to play a wind (musical) instrument by mouth. तोंडा वाटी फुंकी वाजिवणे.
फुंकणे vt to smoke cigarette, beedi etc. चुट्टा पीणे.
फुंगी n a wind (musical) instrument. पुंगी. फुंकून वाजिवाच एक वाद्य.
फूलपात्र n a small utensil of a certain design used for puja items. पूजाला उपयोग कराच एक प्रत्येक आकाराच पात्र. uis अत्तच॑ काळांत नुस्त तूपाला-तेलाला फूलपात्र उपयोग करतात॑. बाकी सर्व पूजा सामग्रहीला 'प्लास्टिक' डब्बाच ठींगतात॑ !
फूल-पत्रि n flowers and leaves offered in a puja. पूजाला उपयोग कराच फूलीं पत्रीं. uis गणेश चतुर्थीला यथे मिळाच फूल-पत्री नुस्त राणांतून वेंचिंगून आलतास्क॑ अस्ते. पैसा देऊन कुप्पा घ्यास्क अस्ते !
फूलपांखरूं n butterfly. चिटपांखरू. चित्तपांखरू. Note :- the word पांखरू is a rustic/archaic form of पक्षि and the word चिटपांखरू or चित्तपांखरू is a rustic/archaic form of चित्र+पक्षि. uis फुलाच झाड असाच ठिकाणि फूलपांखरूं अवश्य पाह्वूया. देवाच सृष्टि कित्ति प्रमाद म्हण्जे, ते फूलपांखरूंच 'डिसैन' अणी रंग वेगळ॑ कोठीन अम्हाला पाह्याला मिळना. पाह्णार दंग होऊन बसतील॑.
फूलवात॑ n a self standing type of cotton wick. खालच भाग थोड विस्थार असामुळे अपाप ओठाकलसाच कापूसाच वात॑. uis अम्च गामांत फूलवात॑ मिळनाकरतां बेंगळूराला जाताना अस्कीन अम्ही हे घेऊन आणतों.
फूल॑ n flower. पुष्प.
फेडणे vt to get rid of. to doff. to untie. to loosen. to unfasten. (उकलून) दूर भिरकावणे. काढून टाकणे. uis अत्तलीकडे 'सिनिमा अवार्ड' प्रोग्रामांत बायका पोरी डान्साच नावांत रंगमंचावरेच फडकी फेडतात॑. पाह्याला कंटाळा अस्ते. Note:- the word is normally used in a derogatory sense.
फेडणे vt to fulfill a vow. नवस पूरा करणे. uis तिरुपतीला जाणार पोणावांटा लोक॑ नवसिंगालकी नवस फेडालकी जातात॑. नवसिंगटलते काम झालावर नवस फेडनास्क॑ असलतर॑ देव अम्हाला अवश्य सय करीवतो.
फेडणे vt to repay (a debt). रीण वारिवणे.
फेणी n stringy lumps of a fried side dish usually made of rice flour. तळून खायाच एक मादरीच वडा.
फेरा n a walk or stroll on a close-looped path or walkway. फिरून याच वाटांत॑ चालाच॑.
फेरा घालणे vt to walk or stroll in a close-looped path or walkway. फिरून याच वाटांत॑ चालणे. uis अम्च घरा जवळ असाच पार्कांत॑/बागांत॑ एक फेरा म्हणजे पांचशे मीटर अस्ते. दहा फेरा घाटलतर पांच किलोमीटर होते. नित्य तेवढ॑ चाललतर॑ आंगाला उदंड चोखोट.
फेंस n foam. नोरे (Tamil). uis मीठ पाणींत सोप/साबून घालून फडकी धुवलतर॑ फेंस येईना. फडकी पणीं बरोर धुवलासना.
फोटो n photograph. कॅमरांत॑ काढाच पेट/पट.
फोड n an infected wound. पोड. व्रण॑ (रण॑) झालते फोड.
फोडक॑ adj split. broken. फुटलते. पुटलते.
फोडणे vt to break. मोडणे. फुटणे.
फोडी n a piece of cooked vegetable in sambhar, pitle etc. सांभार, पिट्ळे असल्ते कालिवणांतल॑ भाजीच चूर.
फोड्णि n spluttered mustard, jeera etc in oil for garnishing. कडुगीं (मोहरईं) जीराईं तेलांत॑ तावून संपाकाच पदार्थांला घालाच. पोण्णि ; फोडणी in sm.
फोड्णीच-भात n a type of rice preparation. भातांत॑ फोड्णी घालून केलते एक पदार्थ. चित्रान्ना (Kannada).
फोड्णीच-सार n a type of dilute rasam. गोड-सार. गोढ-सार. पोणीच-सार.
फोड्णीच-सांभार n a type of sambhar. एक रीताच सांभार. पोणीच-सांभार.
ब
ब the twenty-third consonant of Dakshini Marathi. दक्षिNee मराठीच तेवीसवां व्यंजन॑.
बकपक्षी n the bird heron or egret. एक रीतीच पक्षी. uis मासोळीला धरून खायाला म्हणून शेतीच जमीनांत होटाललसाच भरून बकपक्षींला तिकडे पाह्याला मिळल॑.
बकासुर॑ fig a voracious eater. इषोब नाहीस्क॑ खाणार. uis पानांत वाढलते भात बक-बका गिळाच पाव्हून तला अग्गिदनीं "बकासुरा" म्हणून मस्किरी करत होते.
बक्रा n goat. ram. sheep. lamb. kid (both male and female). बकरा. uis मुसलमानांच बक्रीद सणाला म्हणून विकाकरतां बांधून ठिवलसाच बक्रा पाह्यलतर॑ अम्हास परिताप वाटेल॑.
बक्रा fig a scapegoat. a person who is made to take the blame for others. दुसरेंच दुषकर्माला जवाबदारी होणार. uis सत्राजित राजाच भाऊ प्रसेननाला एक सिंह मरिवलेतरीन, ते दोष क्रिष्णाच व॑र घालून क्रिष्णाला बक्रा करिवलते खाणी अम्ही गणेशचतुर्थीच वेळी सांगणे आहे.
बजरंग n a body as strong and pure as diamond. वज्रास्क॑ घट्टि अण्खी पवित्र असाच आंग. uis वज्रास्क॑ घट्टि अणी पवित्र आंग असाकरतां हनुमानाला बजरंगबली म्हणून नाव आहे.
बज्जि n a fried snack. एक तळलते पदार्थ. uis मिर्शिंगाच बज्जि, कांदाच बज्जि, उरळेगड्डेच बज्जी हे अग्गीन खायाला बेष रूच असलतरीन, इषोब नाहीस्क॑ भरून भरून खाल्लतर॑ आंगाला चोखोट नोहो.
बटवाडा n partition or division (of property etc.). (आस्ताच॑) वांटा. uis थोर-थोर व्यापारि अणी पैसावंत कुठुंबांत त्यंच मधे भांडणे येऊन आस्त॑ बटवाडा होत असाच साधारणच॑.
बडतिशेंगा n a type of beans. एक रीताच भाजी. uis बडतिशेंगाच सप्पक-पिट्ळेच रूच पडवलाच सप्पक-पिट्ळेच रूचाबरीस मला इष्ट॑.
बडबडा n flutter in the mind. मनाच तरपड॑. uis क्रिकेट खेळाच शेवटी-शेवटी अम्च॑ देशाच टीम जिंतेलका नाहीका म्हणाच स्थिती येताना मझ॑ मन्न॑ बडबडा होईल॑.
बडवा fig an abusive term for a person. शिवा द्याच एक शब्द ; भडवा in sm. uis (1) तो एक चोर्टा बडवा. तला अम्च घराच जवळपणीं याला सोडताने. (2) उदंड वर्षा पुढे एकदा मुंबईंत ट्रैन वेघत असताना एक बडवा अम्च बरोर ट्रैनांत वेघत होतते एक पोरीच पदर होडाला पाह्यिला. मीईं/मीनीं अण्खि एकलाईं मिळून तला दोन रपाटा देलों/होडलों.
बडवा n a pimp. वेश्यांच दलाल ; भडवा in sm.
बडवा n attender of a dancing girl. नाचवालींच कामवाला/सेवक ; भडवा in sm.
बडिव imp hit. मार.
बडिवणे vt to hit. मारणे ; बडवणे/बडविणे in sm means 'to thrash'. 'to cudgel'.
बडिवणे vi to get hit. लागणे. uis दुकानाला चालून जात असताना मझ मागेसून एक बंडी येवून मला बडिवले.
बडिवणे vi to impact (favourably). (अदृष्ट) लागणे. uis तो एक अदृष्ट केलते मनुष. भूटान लाट्टरींत॑ तला दोनदपा पन्नास/पन्नास लख बडिवल॑.
बडिवणे fig to knock-off. to pilfer. to be afflicted unfavourably. बडिवणे. uis (1) एकदपा बेंगळूरांत मझ लोंक रोडाच सिग्नलाकडे ओठाकून इकडे-तिकडे पाह्त असताना कोणकी तज "पर्स" बडीवूनटाकला. (2) अम्च घराला चोर्टा बडिवनास्क असाला इत्तपर एक चौकीदाराला ठिवला निश्चय केलों.
बडिवून सांगणे fig to say emphatically. जोर होऊन सांगणे. Note :- from Tamil usage अडिच्चु पेशरदु.
बड्डि n interest on loan. व्याज.
बणिया n name of a caste indulging in trade. Vysya caste. वैश्य जात.
बणिया adj a person belonging to the baniya caste. वैश्य जातांतल॑ एक मनुष.
बणिया fig a calculating person. सगळीन इषोब घालून पाह्यणार ; बनिया in sm.
बत्तासा n a sweet preparation normally made during sankranthi. संक्रांतीच सणाच वेळी कराच एक तुकडा.
बत्ति n a wick of a lamp. दिवाच वात.
बत्तीस n thirty two. तीसावर दोन. uis अम्च जीवनांत, लांब आयुष असून, शेवटल॑ दिवस पतोरि पूरा बत्तीस दांतीं पडनास्क॑ असणे फार अप्रूपच॑.
बदक n duck. वात (tamil).
बदल prep. in lieu of. for or in exchange of. instead. बद्दल. बदलि. एकाच ठामि अण्खि एक. uis (1) साधारण म्हणून कोण्त्येक दुकानांतीं घेट्लते वस्तु बदलि कराला दुपारीच वेळेच जाऊया. पाष्ट॑ गेलतर॑ दुकानवालेंस अवडना. (2) काल घेट्लते हिरव॑ रंगाच लुगडेच बदल अत्ता तिला पिवळ॑ रंगाच पह्जे म्हणे !
बदलणे vt to exchange. बदलून काढणे/घेणे. वेगळ॑ बदलून काढणे.
बदलाबदलि n mix-up. swap. अदलाबदलि. एकालेक बदलणे. uis सरकारि होसपिटलांत उजलते लेंकराना अदलाबदलि/ बदलाबदलि कराच विषय समाचार पत्रांत दंड दपा येऊन पणीं ते चेष्टा अत्ता पतोरि उणे झाल नाही.
बदलि n a substitute. एकाच ठिकाणि अण्खी एक. uis लांच घेट्ले म्हणून उद्योगांतून काढूनटाकलते मनुषाच बदलि अत्ता पर्यंतीन कोणीन आले नाही.
बदलिवणे vt to change. बदलून काढणे/घेणे. बदलणे. uis मला रात्री एकच ठिकाणी निजल तरच झोंप येईल॑. ठिकाण बदलिवलतर॑ झोंप येईना.
बदिल n reply. उत्तर. uis अम्च बीदींत॑ कुत्रांच तंटा सोसाल होत नाही म्हणून कॉरपोरषनाला कागद लिव्हू दोन महिने झाल तरीन अण्खीन मला तिकडून बदिल काहीनच आल॑ नाही. Note:- this Hindustani expression appears to have come into DM via colloquial Tamil.
बद्दल prep. in lieu of. एकाच ठामि अण्खीएक. बदल.
बधकल n a ditch. कुंड. कुळि (tamil). पळ्ळम (tamil). uis उमाट-बधकल असाच जमीन कित्येकदा चोखोट/उणे मोलाला मिळल॑. Note:- 'उमाट-बधकल', a TM expression meaning "uneven ground".
बनशंकरि n Goddess Banashankari. Goddess Durga in her benign aspect. दुर्गादेवीच शांत रूप. शाकांबरि. वनशंकरि.
बरणि n a porcelain jar. जाडि (Tamil).
बर॑ adj okay. बर॑.
बर॑ adj passable. (of) moderate (qualities). बर॑ ; बरा in sm. uis काल संध्याकाळी ऐकलते कचेरी मला अवडल॑ नाही. कायकी, बर॑ होत॑ म्हणून सांगूया विना बेष होत म्हणून सांगाला नाही.
बर॑ adj good. proper. बरी ; बरा in sm. uis काल संध्याकाळि पाह्यलते सिनिमा बर॑ होत॑. मला अवडल॑.
बर॑ adj not little, though not very much. बर॑ ; बरा in sm. uis तुम्हाला पाव्हून बरेच दिवस झाल॑ म्हणून फोण केलों.
बर॑ adj of proper welfare (health-wise etc). सौख्य॑. uis तुम्हाला थोड दिवस आंगाला बर॑ होत नाही म्हणून ऐकोलों. अत्ता बर॑ आहेंतका ?
बरी adj good. proper. बर॑. uis अम्ही गामाला जाऊन परतून याच दिवसी बंगळूरांत॑ बंध होत॑ अणी रेल्वे-स्टेशनांत टाक्सीकी ऑटोकी एकीन मिळ्ळ॑ नाही. बरी वेळ, अकस्मात अम्हाला कळ्ळत॑ एकले त्यंच टिकट बुक कराला स्टेशनाला अल्होते म्हणून परतून जाताना अम्हाला घरांत सोडूनटाकून गेले.
बरीक adj thin. slender. बरीक ; बारीक in sm. uis रायत करताना वाळूक जाड होऊन कापाच पक्षा बरीक होऊन किसलतर॑ जास्ति रूच असत॑.
बरीक adj fine (not coarse). बरीक. सूक्ष्म ; बारीक in sm. uis भाजलते कॉफीच बीं पूड करताना बरीक होऊन पूड केल॑ तर॑ डिकोक्ष्यन घट्टि होऊन पडेल॑.
बरीस n over and above. in addition to. बेरीज. पक्षा.
बरोबर prep along with. together with. सहित॑. बरोर.
बरोबर prep through. मुखांतर॑. बरोर.
बरोबर adj equal. alike. तुल्य. बरोर.
बरोबर adj exact. precise. accurate. बरोर.
बरोबर adj proper. योग्य. बरोर.
बरोबर adj fit. बरोर.
बरोबर adj just and good. बरोर. न्यायाप्रकार योग्य.
बरोबर adj regular. orderly. बरोर.
बरोबर adj correct. right. बरोर. चूक नाहीते.
बरोर prep along with. together with. सहित॑. बरोबर. uis हे वर्ष तुम्ही तंजाऊराला जाताना मी पणीं तुम्च बरोर येतों.
बरोर prep through. मुखांतर॑. बरोबर. uis "कोरीयर" बरोर उणे खर्चांते ल्हान-थोर पुडा सर्वीं तपालावाटे पाठीवाला पोस्टल डिपार्ट्मेन्ट व्यवस्था केलाहते अस मी आजच॑ "न्यूस पेपरांत" वाचलों.
बरोर adj exact. precise. accurate. कृत्य. बरोबर. uis बस्सांत कंडक्टराच कडून टिकट घेताना बरोरल॑ पैसा देयिनातर॑ तो चिल्लर परतून देयिना म्हणून मी जेबांत॑ केम्हाहीं चिल्लर ठींगनास्क॑ केद्दीन बाहेर उत्तरना.
बरोर adj proper. योग्य. बरोबर. uis (1) बरोर वाढिवलते लेंकरांकडे काहीतरीन एकदपा सांगटलतर पुरे, समेच ते करतील॑. (2) कंप्यूटर प्रोग्राम लिव्हताना ते बरोर आहेका म्हणून पाह्यींगनातर॑ नंतर॑ ते प्रोग्राम चालिवताना अम्ही उद्देश केलते प्रकार काम करना.
बरोर adj fit. बरोबर. uis तो एक अवघड मनुष. आवश्य नाहीस्क॑ अग्गिदनाकडीन भांडणार झालतरीन मनांत लागास्क॑ बरोरल॑ उत्तर देलतर॑ तोंड झांकींगून उग॑ बसेल॑.
बरोर adj just and good. न्याया प्रकार योग्य. uis पारलमेंटांत॑ सरकार आणिवलते " रैट टु एजुकेषन " बिल कित्येक लोक सुप्रीम कोर्टांत॑ विरुद्ध॑ केले तरीन, शेवटि ते एक बरोरल॑ विषयेच॑ म्हणून निर्णय झालते एक चोखोट कार्य झाल॑.
बरोर adj regular. orderly. बरोबर. uis तज वागणे बरोर नाही म्हणून मी तज सहवासच सोडूनटाकलों.
बरोर adj correct. right. बरोबर. चूक नाहीते. uis हे वर्ष झालते "नॅषनल सयन्स ट‘टॅलन्ट सर्च एक्ज़ामिनेषन" यांत॑ मझ॑ नातूला भारतांत॑ पहिल॑ नंबराच "रॅन्क" आल॑. ते परीक्षांत॑ पूरा प्रश्नालीं बरोरल॑ उत्तर देवून तला शंभरांत॑ शंभर मार्क मिळ्ले.
बरोर करणे vt to put in order. to rectify. नीट करणे. uis याच रविवार मी मझ॑ खोलि बरोर कराला जातों.
बरोर-पडणे vi to be fit. to be suitable. योग्य असणे. uis कोणालीं कळिवनास्क॑ अम्च॑ चुलतभाऊ वकीलाकड॑ जावून सांगिट्लते विषय मझ॑ भाऊंडे नंतर॑ ओपींगट्लेतरीं मला कायकी ते बरोर पडल॑ नाही.
बरोर-बरोर adj equal. alike. तुल्य. बरोबर. uis गेलंदा भारताच क्रिकट टीम आस्ट्रेलियाला गेलतम्हा दोन टीमीं बरोर असेल म्हणून अम्हाला वाटल॑. पण, झालते चार माचांत॑ चारांतीं अम्च टीम हरले.
बर्फी n a sweetmeat made of grated coconut, sugar etc. किसलते नारळीं साखरेईं घालून केलते एक गुळ्चीट पदार्थ/तुकडा. uis सणाच संपाक म्हणजे मझ॑ अम्मा खोब्रीच/नारळीच बर्फीईं ओमपुडीईं करूनच सरतील॑.
बलप॑ n slate pencil. बळप॑. (साळेच) पाटांत॑ लिव्हाच "पेनसिल". uis मी चौथ क्लास पतोरि (पावेतोरि/पर्यंतीन) बलप उपयोग केलोहें. पण, अम्च लेंकरांना बलप म्हणजे काय म्हणूनच कळ्ना.
बलप॑ n soapstone. मंडीच धोंडा. बळपाच धोंडा. uis जुन॑ काळांत मंडि-सांभार-भात बलपांत केलते भांडीत करत होते. ते करतांच तला "मंडि-सांभार भात" म्हणून नाव आलते.
बलवंत adj strong. powerful. बळ असाच॑.
बलवंत n compulsion. enforcement. निर्बंध करणे.
बलवान adj strong. बळ असणार. बलशाली. बळवंत॑.
बलशाली adj strong. बळ असणार. बलवान. बळवंत॑.
बलात्कार n rape. मानभंग. uis अम्च देशांत बायका पोरी रात्रीच वेळ एकट हिंडणे अपाय झालाहे. कोण कोठ बलात्कार कराला प्रयत्न करतीलकी सांगाला होयना.
बलावणे vt to call. to summon. याला सांगणे. याला निर्देश देणे. बोलावणे ; बोलवणे in sm.
बलाष्टिक adj strong. sturdy. घटमुट. दांडग॑. शक्तिशालि ; बलिष्ट in sm. uis कॉमन-वेल्थ गेम्सांत॑ आस्ट्रेलियाच हॉकी टीमांत खेळणार सर्वीं अम्च टीमांत खेळणारांपक्षा बलाष्टिक दिसले. खेळाच शेवटीपतोरी ते क्षीण झालतेस्क॑ दिसल॑ नाही.
बलि n a religious sacrifice. धर्माच प्रकार॑ कराच एक त्याग/बलि.
बलिदान॑ n offering of sacrifice. बली अर्पणा करणे.
बलिप्रतिपदा n the festival falling on the first lunar day during Deepavali. दीपावळि पाडवाच सण.
बळ n strength. शक्ति. बल॑ ; बल/बळ in sm.
बळकट॑ adj strong. firm. vehement. thumping. बळखट. फार जोराच. uis त्यंच घरच वराडांते जेवण॑ बळकट बेष होते. तेवढीन मिळून पन्नास विध पदार्थ होत॑.
बळप॑ n slate pencil. बलप॑. (साळेच) पाटांत॑ लिव्हाच "पेनसिल".
बळप॑ n soapstone. मंडीच धोंडा. बळपाच धोंडा.
बळवंत॑ adj strong person. बळ असणार. बलशालि. बलवान.
बसकी n sit-ups. बस्की. गुंजी. गुंजा.
बसक॑ adj squat. of a lower level in height. dwarfed. उंच उणे असाच ; बसकट in sm. uis बसून-उठणे कष्ट होतहोत तरीन वीस वर्षा पुढे बसक॑ 'सोफ़ा' एक फ़ेषण झाल होत॑.
बसणे vi to sit. बसणे.
बसिवणे vt to make one sit. दुसरेला बसिवणे ; बसवणे/ बसविणे in sm.
बसिवणे fig to render a person bankrupt. (एकाला) दिवाळि करणे.
बस्कि n sit-ups. बसकि. गुंजि. गुंजा.
बहिण-भावंडे n brothers and sisters, collectively. भाऊ-बहिण लोके. भावंडे.
बहिणी n sister. बहीण॑. सहोदरी.
बहिरागि n a class of religious mendicants. बैरागि.
बहिष्कार n banishment. समाजांतून बाहरटाकणे.
बहीण॑ n sister. बहिणी. सहोदरि.
बहुमान n respect. reverence. honour. regard. आदर॑. मर्यादा.
बहुवचन॑ sfs n the plural number. अनेकवचन॑.
बक्षीस n a reward given patronisingly. उदारांत॑ द्याच इनाम.
बंगला n a bungalow. बंग्ळा. महाल.
बंग्ळा n a bungalow. बंगला. महाल.
बंडल adj sham. bluff. लबाड.
बंडवाळ॑ n financial capital. मूल रोक्कम ; भांडवल in sm.
बंडि n motor-car. मोटर-गाडि.
बंडि n a bullock or horse cart etc. बैलबंडि/घोडाबंडि.
बंडि n a vehicle. वाहन॑.
बंडि n a hand cart. हातांत ढकळाच बंडि.
बंडिवाला n cart-man. बंडि हांकणार॑/पळिवणार॑.
बंद adj closed. झांकलते.
बंद adj blocked. पुढे जायाच वाट झांकणे.
बंदोबस्त n precautions. रक्षाच व्यवस्था.
बंध n a political call given for shut-down. हर्ताल.
बंधखाना n jail. तुरंग. तुरंगा कारागृह. दंड मिळ्लत्यांस॑ बंध करून ठिवाच ठिकाण.
बंधु n relatives. सोयरीक लोके.
बाई n a woman. बायको. स्त्री.
बाईल॑ n wife. पत्नि. वराड केलते बायको.
बाईलीचदास॑ n henpecked husband. बाईलीच गोष्ट सुटनास्क॑ ऐकांमते पडाच दाल्ला/दल्ला. uis कितिकी दादिगे बाईलींच चांगूलपण॑ पाहूनकी/पाऊनकी, त्यंच पैसे-कास पाहूनकी/पाऊनकी, नाहीतर त्यंच तोंडाला भींगूनकी, बाईलीचदास॑ होऊन जातात॑.
बाकि n that which has been left out. उरलते भाग. शिष्ट॑.
बाकि n balance change or cash. उरलते रोक्कम.
बाग n garden. park. उद्यान.
बाजरा n maize. एक धान्य. बाजरी.
बाजा n music by a band set. वाजंत्रींच कार्यक्रम॑. uis तेवढ॑ वराडांतीन मिरिविणकीच बरोर मोट्ठ॑ बाजा अण्खी सिनिमाच डॉन्स अस्ते. हे अत्तच फॉषन झालाहे.
बाजरि n maize. एक धान्य. बाजरा. uis दोन-तीन बाजरीच रोट्टि तूप लाऊन गूळाच बरोर खालतर॑ पोट भरून जाते. चार-पांच घंटेला भूक लागना !
बाजार n market. bazaar. बाजार. दुकान बीद॑. विध विधाच दुकानाच ठिकाण.
बाजू n a side. एक कडे.
बाजूबंद n a bracelet. हाताला बांधाच एक नग.
बाटा n an extra payment. an allowance. भत्ता. धर्माच वर जस्ति द्याच पैसा. Note :- This is a morphed version of the Hindusthani word "वाटा", meaning share.
बादली n bucket. बालदी. पाणी भरून ठिवाच भांडी ; बालडी/बालदी/बादली in sm.
बादाम n almond (seed or tree). एक विधाच झाड. तज बीं ; बदाम in sm. uis "कॅलिफोर्णिया आल्मड्स" म्हणून गेल वर्ष अम्च देशांत तिकडून आणिवलते बादाम विकाला श्रम होत॑. पण, अत्ता तज विषीन कोठीन काईं ऐकतों नाही. अम्च देशाच बादामाच सार्ख रूच तला न्होत॑ म्हणून अम्च लोक॑ ते घेणे सोडून टाकले की काय की.
बाधक adj the one which affects. बाधा करिवाच॑. uis तेनास॑ र्रीण देलते पैसे वेळाला परतून येईनातर॑ पणीं तजमळे मला सध्याला बाधक होयना. मझ॑ खर्चाला मी वेगळ॑ एर्पाड केलोंहें.
बाधा n affliction. हिंसा होणे. uis मझ॑ एक मित्राला चुम्मण वयेंतूनच आस्माच बाधा होत॑. पण, हैदराबादांत॑ जीव असाच ल्हान मासोळि गिळून आस्मा बरोर करणार वैद्याचकडे जाऊन ते चिकित्सा करलांपिरी आस्माच बाधांत्सून चुकींगट्ले.
बाधा n restriction. बाधा. uis दोन तीन वर्षाच पुढे मला पोटाच असुख होत॑. भरून डॉक्टरांला दाखिवलों. जेवाच कित्येक पदार्थ नोको म्हणून बाधा घाट्ले विना वेगळ॑ काईं झाल नाही. नंतर॑ कळ्ळते एक आयुर्वेद वैद्य एक चूर्ण देले. पाष्टे अनशी पोटांत मेधीन लिंबूच रसीन ते चूर्णाच बरोर मिळिवून घ्याला सांगट्ले. एकच वारांत बोरोर होऊनगेलों अणी जेवणेंत होतते बाधा सग्ळीन ते वैद्य राह्ते केले.
बाधा n possessed (by a spirit etc). आंगाला येणे. uis भूत धरलते लोकांस॑ नामक्कल नामगिरि देऊळांत बलाईंगून गेलतर॑ ते बाधा राहून जाईल म्हणतात॑.
बाप n father. बापा. पिता.
बापा n father. बाप. पिता.
बायकांच वेड॑ n womanizer. बायकांच वर वंगळ मोह असणार. uis उदंड सरकारि आफीसर लोक अणी अम्च नेतालोक बायकांचवेड॑ असतात॑. हे मधे "न्यूसपेपरांत" पणीं असल लोकां वर एक लेख आलहोते.
बायको n woman. बायिको. स्त्री.
बायको gram implies feminine gender in grammar. व्याकरणांत॑ स्त्रीलिंग दाखिवाच शब्द. uis गेल वार अम्च घर्च कुत्र पिल्लू घाटले/प्रसवले. त्यांत॑ दोन दादिगा कुत्रेईं दोन बायको कुत्रेईं होते.
बायिको n woman. बायको. स्त्री. बाई.
बार n times. (कित्ति) दा. दपा.
बारस॑ n ceremony for naming a child on the twelfth day of it's birth. उजून बारावां दिवस कराच लेंकरांच नामकरणच सण. uis बाहेरल॑ गामांत उजलते लेंकरांना एक महिना पतोरी आंघोळि करून घालत नाहीते. तज मुळे बारस॑ कराला होत नाही. अण्खीएक काय म्हण्जे, तथे लेंकरू उजतांत्सून नाव ठिवामते पडते. हे सर्व कारणामळे कित्येक दन॑ एक महिना नंतर पुण्यावचन मात्र करतात॑.
बारा n twelve. अक्राच नंतरल॑ संख्या.
बारावां n twelfth. अक्राच नंतरल॑ क्रम॑.
बारीक adj thin. slim. slender. बरीक. पत्तळ॑. uis दांडग॑ असणार बारीक होयाला भरून पैसे वेच करतात॑. अणी उपाशीहीं पडतात॑. तज बद्दल पहिलापसून खाणे-जेवणांत॑ थोड करार-कंडिप असलासलतर॑ नंतर श्रम भोगनास्क॑ असुया.
बालवाडी n kindergarten. play-school for children. ल्हान लेंकरांच वाचण॑ आरंभ करापुढेच साळे.
बालदी n bucket. बादली. पाणी भरून ठिवाच भांडी ; बालडी/बालदी/बादली in sm.
बाल॑ adj a young child. बाळ॑. ल्हान वयच लेंकरु.
बालाजी n Lord Srinivasa. स्रीनिवासदेव.
बाल्य n childhood. बाळपण॑.
बाळेदिंड n the internal white coloured stem of a plantain tree (a vegetable). केळीच-झाडाच आंतल॑ पंढ्र॑ रंगाच भाग (हेजांतून खायाच पदार्थ करतात) ; दांडा in sm. uis बाळेदिंड कापाला अनुभव असाम॑. कारण दोरा-दोरास्क॑ तजांतून चिकटाच नार येत अस्ते. हे नार बोटाला गुंडाळिंगनास्क॑ असाला कापाच पुढे हाताला तेल लावणे आहे. Note. from Kannada.
बाळपण॑ n childhood. बाल्य.
बाळ॑ n child. बाल॑. लेंकरु.
बाळंतपण॑ n delivery. child birth. प्रसव.
बाळंतिणी n a woman who has recently given birth. नव॑ होऊन प्रसवलते एक बायको.
बाळंतीण॑ n lactating mother. प्रसवून दूध पाजाच माय॑.
बाळंत॑ adj give birth to. प्रसवणे.
बावोलि n a toy. ल्हान लेंकरांच खेळाच साधन॑. भावोलि.
बावोलि n a doll. a small statue. a puppet. भावोली ; बाहुली/भावली in sm.
बावोलि होढणे vt to draw a picture. चित्र होढणे. पेट होढने. भावोलि होढणे.
बाशिंग n a decorative thread with embellishments worn by the bride (and sometimes by the groom) around their foreheads during their wedding. भाशिंग. वराडाच वेळि नवरा-नवरि त्यंच कपाळांत गुंडाळून बांधाच अलंकार केलते दोरा.
बासुंदि n a sweetmeat made from milk. दूधांत॑ केलते एक गुळ्चीट पदार्थ.
बाहेर adv & prep outside. आंत नाही, बाहेरच ठिकाण.
बाहेरगांव n outstation. बाहेरगाम॑. स्वंत गावांतून दूर असाच एक गाव.
बाहेरसून adv from the outside. externally. बाहेरून.
बाहेरून adv from the outside. externally. बाहेरसून. बाहेर असून.
बांध imp construct. बांधाच॑.
बांध imp tie. (दोरांत॑) बंदोबस्त करणे. तघडणे.
बांधणि n building. a civil construction. a civil work. वास्तु. बांधोटि.
बांधणे vt to construct. बांधणे.
बांधणे vt to tie up. बांधून घालणे. बांधून बंदोबस्त करणे.
बांधोटि n a civil construction. a civil work. वास्तु. बांधलते घर, बांधणि, भिंत असल॑ वास्तु. बांधणी in sm.
बांबू n bamboo. वेळू. गौताच वर्गाच एक उंच झाड.
बिछाणा n a mattress or anything to spread on the floor to sleep. निजाला अंथराच अंथरूण, जमखाण॑, चदर असल॑ काहीं एक ; बिछाना in sm. uis अम्च दंडकाप्रकार वराडाच छत्रांत रात्रि निजाला एक थोर बिछाणा घालून एक वसरींत तेवढ दादिगेहीं निजतील॑, अणी दुसर॑ वसरींत बिछाणा घालून बायके निजतील॑.
बिचोडा n a chignon. combed hair set in a lump at the back of a woman's head, a type of fashion adopted especially by older women. (थोरळे बायके) केंस विंचरून दोस्केच मागे बांधून ठिवाच संप्रदाय॑ ; बुचडा in sm.
बिब्बा n cashew-nut. काजू. Note:- 1) बिब्बा in sm means 'a marking nut'. 2) the words काजू and cashew are from Portugese caju.
बिरडे n a type of thin gruel. एक नित्तळ कालवण॑.
बिरडे fig a bluff master. a brag. एक लबाड मनुष. uis तो दादिगा सुद्ध भिरडे. तो बोलाचांत पंच्याहत्तर प्रतिशत (75%) काढूनटाकून अर्थ कळींगाम॑.
बिरुद n degree (in collegiate education etc.). उंच विद्याभ्यासाच एक पदवि.
बिलकुल adv entirely. पूरा.
बिलवा n a tree sacred to Lord Siva. बेल वृक्ष. भेल वृक्ष. बिल्वा वृक्ष. शिव देवाला महत्व असाच एक वृक्ष.
बिल्ला n a badge. टांकाच पदक॑.
बिल्वपत्र n leaf of the bilva tree. बिल्वा वृक्षाच पान. बेलपत्र.
बिल्वा n a tree sacred to Lord Siva. बेल वृक्ष. भेल वृक्ष. बिलवा वृक्ष. शिव देवाला महत्व असाच एक वृक्ष.
बिंदि n the round mark of vermilion applied on the forehead. कपाळांत॑ लावलते कुंकू.
बिंदु n a dot. a point. गोळ आकाराच एकदम ल्हान चिन्ह.
बिंब n disk of the Sun, Moon or a planet. सूर्य, चंद्र अथवा एक ग्रहाच चक्राकाराच रूप॑.
बिंब n a body which casts a reflection. प्रतिबिंब अथवा पडसावळीला कारण असाच वस्तु.
बीज n seed. फळाच आंतल॑ घट्टि भाग. बीं.
बीड n reverential modesty. भीड. संकोचाच आदर॑.
बीडा n betel leaf prepared for chewing. विडा. पान-सुपारि. तांबूल.
बीडि n a country cigarette. नाटि सिगरेट. एक ल्हान चुट्टा.
बीद n a lane. बीदि. गल्लि. उणे रुंदाच एक वाट.
बीद n road. बीदि.
बीदि n a lane. बीद. गल्लि. उणे रुंदाच एक वाट.
बीदि n road. बीद.
बीरो n cupboard. अलमारि.
बीळ॑ n a burrow. a hole in the ground (used by rats, snake etc). (उंदीर,सर्प असल॑ जंतूच) भोईंतल॑ एक ल्हान द्वार॑.
बीं n seed. फळाच आंतल॑ घट्टि भाग. बीज॑ ; बी in sm.
बुका n a type of fragrant powder applied during auspicious occasions. भुका. शुभ संदर्भांत लावाच एक विधाच सुगंध पूड. uis अम्ही क्रिष्णगिरी पांडुरंग-विठ्ठलाच देऊळाला गेलतेम्हा देवाच प्रसादाच बरोर पंढरपूरांतून आणिवलत॑ बुका पणीन देले.
बुका भेटणे n a ritual during a wedding when the बुका powder is applied mutually on each other between the groom's and bride's families. भुका भेटणे. वराडाच वेळी नवरा अणी नवरीच घरचे एकएर्क्यांचीन आंगाला बुका लावाच पद्धत॑. Note. this denotes the happy and auspicious coming together of the two families.
बुचकळणे vt to dip. to immerse. (पाणींत॑/द्रव्यांत॑) बुडिवून काढणे.
बुचका n a bunch of entangled hair coming loose while combing. विंचरताना याच केंसाच गुंता.
बुजणे vi & vt to fill up, to close up, to block up etc of an orifice, a small gap etc. ल्हान डोबूर, द्वार, छेद असलते भरून जाणे (भरणे).
बुटकुळि n a dip in water. ducking in water. पाणींत॑ आंग बुचकळून काढणे. बुडकी मारणे. बुचकळि. uis हरिद्वाराला गेलते लोक सांगतात॑, गंगा नदींत तीन बुटकळि घालजोरि हींमांत आंग कांपून जाते. पण केला वर एक विचित्र विधाच त्रृप्त/संतोष येत॑.
बुट्टा n corn cobb. सोलनाते मक्का.
बुट्टि n a reed, cane or plastic basket. बेतांत॑की प्ळास्टिकांतकी केलते बुट्टी.
बुट्टि n root of a medicinal plant. औषदाच झाडाच मूळ॑.
बुडकी मारणे vt a dip in water. पाणींत॑ आंग बुचकळून काढणे.
बुडणे vi to drown. to sink. पाणीच आंत॑ पडणे. पाणीच आंत॑ बुचकळून जाणे.
बुडणे fig to be ruined. दिवाल होणे. नाश पावणे. नष्ट होणे.
बुडबुडा n dry copra, still inside the coconut shell/husk. सोलनाते नारळाच आंतल॑ वाळक॑ खोब्र ; गुडगुडा in sm. Note:- बुडबुडा in sm means "a blister" or a "bubble."
बुडांत॑ adv at the bottom. आंत॑ खाले. बूड आंत॑.
बुडिवणे vt to drown. to scuttle. to sink. पाणीच आंत॑ घालणे. पाणीच आंत॑ बुचकळणे ; बुडवणे/बुडविणे in sm.
बुडिवणे fig to cause a person to be ruined. एकलांस॑ दिवाल करणे. एकलांस र्रीणांत बुडिवणे.
बुडून बसणे id to be deeply immersed in an activity ( eg. like in studies). एक कार्यांत॑ उदंड॑ ध्यान देऊन असणे (उदाहरण॑-वाचणांत॑).
बुढ्ढा adj an aged person. म्हातारा.
बुद्ध॑ n intelligence. intellect. बुद्धि. योचनाशक्ति.
बुद्धा n Bhagavan Budha. बुद्ध भगवान.
बुद्धि n intellect. intelligence. योचना शक्ती.
बुद्धिमान adj intelligent. wise. बुद्धिवंत॑. षाणा. शाणा. uis बाप-माय दोघीं नीट वाचिंगटलते लोके असलतर॑ लेंकरे उजतानाच बुद्धिमान असतात॑. हेला उदंड उदाहरण आहे.
बुद्धिवंत॑ adj an intelligent person. बुद्धिमान. षाणा. शाणा.
बुद्दु adj a foolish person. मुट्ठाळ (tamil). विवर॑ नाहीते मनुष॑.
बुध n the planet Mercury. सूर्याच जवळ असाच पहिलच ग्रहाच नाव.
बुध n the fourth of the Navagrahas. नवग्रहांत॑ चौथ॑ ग्रह.
बुधवार n Wednesday. मंगळवाराच नंतरल॑ दिवस.
बुब्बुळा n pupil of the eye. डोळेच काळ॑ भाग ; बुबूळ/बुबळ in sm. uis उपनेत्र (अर्सा) घालींगट्लतर॑ ते डोळेच बुब्बुळाला रक्षा पण करते. तजमळे कारखानांत अस्कीन "सुरक्षा चशमा" म्हणून तेवढ॑दनालीं देतात॑.
बुरटा n a vegetable disfigured because of blight, disease, fungus etc. रोगामळ॑ विकार झालते भाजी-पाला.
बुरशी n mould or fungus formed due to dampness. बुरसी. बुरटा. भुरशी. uis 'रेफ़्रिजिरेटर' नासून जाऊन एक दिवस काम करनास्क असलतर॑ आंत ठिवलते बुडबुडा, खोवर॑, अणी भाजी-पंडू सर्वीन बुरशी लागून टाकाम्ते पडते. कित्येक लोके ते बुरशी पुसूनटाकुन उपयोग कराला पाह्तीले. तस करणे आंगाला चोखोट न्हो.
बुरसी n mould or fungus formed due to dampness. बुरशी. भुरशी.
बुरा साखरे n palm sugar. brown sugar. ताडीच साखरे.
बुर्का n a veil covering the head and face (worn by Muslim women). बुर्खा. भुर्का. मुसलमान बायके तोंडाच वरून घालाच/नेसाच एक पर्दा. uis घरा जवळ एक 'सूपर मारकेट' आहे. तथे कित्येक बुर्का नेसलते बायके येऊन ल्हान सामान चोरतात॑ म्हणून मी ऐकलों.
बुर्खा n same as बुर्का/भुर्का ; बुरखा in sm.
बुलाख n a kind of nose-ring ornament worn by ladies. एक रीतीच नथ (नेथ).
बूचांडि slng a scare word (used on children) to describe a fearsome looking beggar, . भयंकर दिसाच भीकारि (लेंकरांला भें दाखिवाला संगाच एक गोष्ट). बूशांडि. Note. from Tamil.
बूशांडि slng a scare word (used on children) to describe a fearsome looking beggar. बूचांडि. Note. from Tamil.
बूड n bottom. bottom layer or part. खालच भाग॑.
बूड n sediment at the bottom. एक द्रव्याच खालच भागांतल॑ घट्टि पदार्थ. राड.
बूड बसणे vi the process of food items getting burnt and sticking to the bottom of a vessel while cooking. संपाकाचवेळी पदार्थाच घट्टि भाग जळून पात्राच/भांडीच खालच भागांत॑ चिकटून बसणे.
बूंद n a drop. बूंद.
बूंदि n a fried savory. खारा बूंदि.
बूंदि लाडु n a ball shaped sweetmeat. बूंदीच लाडु. गुंजालाडु.
बृहस्पति n the planet Jupiter. गुरु ग्रह.
बृहस्पति n guruof Devas. देवांच गुरू. वाचस्पति.
बृहस्पति fig a term of ridicule for a person with pretensions to scholarship. सग्ळीन कळल म्हणून स्वता सांगिंगाच मनुषाला मष्किरींत॑ बलावाच नाव.
बृहस्पतिवार n thursday. गुरुवार. ब्रेस्तवार.
बेच्चगे (kannada) adj lukewarm. कोमट. जास्ति ऊन नाहीत॑.
बेजार adj fed-up. tiresome. मनाला पुरे होणे.
बेटकोळि n frog. पाणींतीं भोईंतीं राहाच एक ल्हान प्राणि. मंडूक ; बेडूक/मंडूक in sm. Note:- बेटकुळी/बेडकुळी/बेंडकुळी/बेडकोळी in sm means 'a small frog'.
बेत n cane. rattan. wicker. reed. गवत वर्गाच बरीक काठीच एक झाड ; वेत in sm. Note :- बेत is used for making containers, light weight furniture etc.
बेंत n a plan, scheme, project etc. योजना. प्रकल्प. ; बेत in SM.
बेदि n loose motions. ढाळणे.
बेनामि adj falsified name. लटक नावाच॑.
बेरम n haggle for reduction in price. bargain. मोल उणे करिवाला बोलणे/तर्क करणे. uis बेताच॑ बुट्टि करून विकून रोडावर संसार कराच दरिद्र लोकांकडे मोटर-कारांत येवून उतरणार कितिकी पैसावंत लोक बेरम कराच पाह्यलतर॑ अम्हाला मनांत॑ कष्ट वाटते. Note. from Tamil.
बेरीस n over and above. in addition to. बरीस. पक्षा. uis तुम्ही उद्या देऊळाला पूजाला येताना एक नारळईं थोड फूल-पंडूईं अणलतर पुरे. हेज बेरीस वेगळ॑ काहीं आणणे नको. Note:- बेरीज in sm means "sum", "total", "addition".
बेल n creeper. वेल. वळ्ळि (tamil). कोडि (tamil). लता.
बेल n a tree sacred to Lord Siva. बिलवा वृक्ष. भेल वृक्ष. बिल्वा वृक्ष. शिव देवाला महत्व असाच एक वृक्ष.
बेलपत्र n leaf of the bilva tree. बेल वृक्षाच पान. बिल्वपत्र॑.
बेष adj good. excellent. fitting. proper. योग्य. चोक्कोट. चोक्कट. चोखोट. चोखट ; बेश in sm. Note :- the DM word बेष appears to be an example of hyper-emphasis of the SM word बेश. The root of the SM is from the Persian "baysh", meaning "great, of a greater degree, best, well, excellent" etc. In Old Marathi भेष means "good, fine".
बेसन n gram flour. चणाच पीट.
बैरागि n a class of religious mendicants who renounce the world to practice austerities. बहिरागि. वैरागि. इहलोकाला वैराग्य करून सन्यास काढलते संत.
बैल n bull. वृषभ.
बैल n bullock. नपुंसक॑ केलते बैल.
बैलबंडि n bullock-cart. बैलाच बंडि.
बोका n tom-cat. दादिगा मांद्र॑. मांद्राच वर्गांत॑ नर॑. भोका.
बोका n a loutish uncouth person. भोका. दांडगा-बोका.
बोट n a finger. हाताचीं पायेंचीं अग्र भागांतल॑ अवयव.
बोडक॑ adj bare. without the usual cover. मोकळ॑. uis गामाला जायापुढे अंबाच झाडाच एक-दोन फांटा कापाला मालीकडे सांगूनटाकून गेलों. परतून येऊन पाह्ताना झाडाच व॑रच भाग पूरा कापूनटाकलते दिसल॑. अत्ता झाड बोडक॑ दिसत॑. फ़िग
बोडक॑ adj shaven headed. bald headed. क्षौर केलते डोस्के. केंस पूरा झडलते डोस्के.
बोडका n a bald man. केंस नाहीते मनुष॑.
बोडकि n a shaven woman. केंस क्षवर केलते बायको.
बोडकी fig a widow. विधवा.
बोडणे vt to render the top portion to be uncovered. व॑रच भाग मोकळा करणे.
बोडणे vt to shave the head. डोस्के क्षवर करणे.
बोडणे fig to swindle a person of his money. एक मनुषाच पैसा पूर एमारिवून काढणे.
बोणी n the first cash sale of the day. दिवसाच पहिलच विकणे (रोक्कमांत॑) ; बोहनी in sm.
बोध n awareness. कळून असणे.
बोर n the jujube berry. एक रीतीच फल॑. बदरी फळ.
बोर ओतणे vt the ritual of pouring jujube berries and other goodies over childrensheads during Shankranthi festival. संक्रांतीच सणाच वेळी लेंकरांच डोस्केवरून बोरीं कुसरीं ओतणे. uis अम्ही ल्हान असताना अमच॑ आजीम्मा अमच॑ दोस्केच व॑रून बोर ओतणे करताना भोईंत॑ पडलत॑ अग्गीन वेंचून काढाला मझ॑ भाऊ-भावंडेंच लक्ष्य पैसे-नाण्य पंडू हेज व॑र होत अणी मझ॑ लक्ष्य नुस्त कुसरीच व॑र होत॑ !
बोल n speech. भाषण॑.
बोल imp speak. बोलाच॑.
बोलखट॑ adj talkative. वायाडि (tamil). uis ते बायको आले म्हण्जे घंटोन-घंटा बसून गामाच व्यवहार पूराहीं चर्चा करत असतील॑. तेनी एक मोट्ठ॑ बोलखट॑.
बोलणे vi to speak. बोलणे.
बोलणे n way of talking. बोलाच रीति.
बोलणे-चालणे n behaviour type. mannerisms. idiosyncrasies. वागाच रीत॑. व्यवहार कराच रीत॑.
बोला-बोलि n talks. discussions. विवाद.
बोलावणे vt to call. बलावणे. शब्द देवून याला सांगणे ; बोलवणे in sm.
बोलावणे vt to summon. बलावणे. याला निर्देश देणे. ; बोलवणे in sm.
बोलिवणे vt to make a person talk. दूसरेच तोंडांतून सांगिवणे.
बोली n a language. भाषा.
बोली n speech. भाषण.
बोली n a dialect. एक भाषाच वेगळ॑ एक रूप. उप-भाषा.
बोली n a saying. एक म्हण. एक गोष्ट. वचन॑.
बोली n manner of speaking. बोलाच रीति.
बोलीचाली n discussions/meetings to arrive at a settlement or decision. एक निर्णय अथवा संमत काढाला कराच चर्चा. uis अम्च कंपनीच कामगार प्रतिनिधी अणी मालकामध्ये बोली-चाली होत आहे. ते सुरळीत झालतर कारखाना पुन्हा उगडतील॑. नाहीतर अम्च गत काय होईल की अम्हाला कळना.
बोसी n a small vessel kept atop a larger water vessel for taking out required quantity of water for cooking etc. संपाकाला/पीयाला आवश्य तेवढे पाणी बाहेर काढाला पाणीच डवराच वर असाच एक ल्हान पात्र.
बोंता n a thin quilt without cotton stuffings. कापूस भरनाते एक पत्तळ लेप. Note. from Telugu.
बोंडा n a fried snack. a type of fritter. एक तळलते पदार्थ.
बोंडि n bankruptcy. दिवाळ.
बोंबाबोंब n a general outcry or protest. एकाचवर जोरांत॑ विरोध करणे. uis सरकार पेट्रोलाच मोल दहा प्रतिशत वाढिवलत्याला विरोध पक्षवाले बोंबाबोंब करून पूरा देशांत॑ हरताल केले. तेना हे अर्थ होत नाही अस करणामुळे साधारण मनुषाला अण्खीन जास्ति नष्ट होत॑ आहे म्हणून.
बोंबि n navel. belly button. नाभि ; बेंबी in sm.
ब्रह्मगांठ n knot in the sacred thread worn by brahmans. जानवांतल॑ गांठ.
ब्रह्मगांठ n a difficult knot. Gordian knot. कठिन गांठ.
ब्रह्मगांठ fig a very complicated problem. फार कठिन प्रश्न॑.
ब्रह्मचारि n a student of brama jnyaan. ब्रह्मज्ञानाच विद्यार्थि.
ब्रह्मचारि n a bachelor. वराड झाल नाहीते मनुष.
ब्रह्मचार्य n celibacy. दादिगे वराड करनास्क॑ असाच स्थिती.
ब्रह्मदेव n Lord Brahma. ब्रम्हा.
ब्रह्मप्रयत्न n great effort. herculean effort. मोठ॑ प्रयत्न॑. भगीरथ प्रयत्न॑.
uis मझ घराच समोरच बीदींतल॑ भयंकर ट्राफ़िक्कांमुळे र्रोडाच एक बाजूकडून दुसर॑ बाजूकडे चालून जाणे एक ब्रह्मप्रयत्न झालाहे.
ब्रह्मयज्ञ n studying and teaching of Vedas, being one of the five requirements of Gruhasthashrama. गृह्स्थाश्रमाच पांच लक्ष्यांत॑ एक लक्ष्य (वेद॑ वाचाचीं शिकिवाचीं).
ब्रह्मराक्षस n a Brahmin's ghost. ब्राह्मणाच भूत.
ब्रह्मसूत्र n an ancient philosophic treatise of Hinduism. हिंदु धर्माच एक पुरातन॑ तत्वग्रंथ.
ब्रह्महत्या n murder of a Brahmin. एक ब्रह्मणाला मर्रिवणे.
ब्रह्मज्ञान॑ n divine knowledge. तत्व ज्ञान॑. आध्यात्मिक ज्ञान॑.
ब्रह्मा n Lord Brahma. ब्रह्म देव.
ब्रह्मानंद n divine bliss. परमानंद. आत्म संतोष॑.
ब्रह्मास्त्र n a divine weapon of immense power of Lord Brahma's patronage. फार शक्तीच ब्रह्मदेवाच अनुग्रहाच दिव्य अस्त्र.
ब्रह्मांड॑ n Universe. विश्व लोक.
ब्रह्मांड॑ fig gigantic. extremely large. उदंड थोर. uis तमिल-नाडाच मुख्य मंत्रि जयलळिताच दत्त लोंकाच वराडाच एर्पाड ब्रह्मांड होते म्हणून थोर आरोप झाल॑.
ब्रह्मि n a creeper plant with pod growing in the foothills of mountains, the oil of which is reported to have medicinal qualities for reactivating the brain. आयुर्वेदाच एक वेल/वल्ली झाड. (हेज तेल बुद्धीला चक्कोट म्हणून सांगतात). uis आयुर्वेदिक औषद/ओखद विकाच कंपनी फारदन॑, ब्रह्मी तेल विकतात॑. पण ते किती पतोरी उपयोगी आहे म्हणाच संदेहच, कारण अस झडी-बुट्टींसू काढाच तेलाच शक्ती समय होतां-होतां उणे होऊन जाते.
ब्रह्मोत्सव n one of a major festivals conducted in Hindu temples. हिंदू देऊळांत कराच एक मोठ॑ उत्सव.
ब्रह्मोपदेश n scriptural teachings relating to Brahmajyan. ब्रह्मज्ञानाच उपदेश.
ब्रह्मोपदेश n sacred advice given to a son by his father at the time of the sacred thread ceremony. मुंजाच वेळी लोंकाला द्याच पुण्योपदेश.
ब्राह्मण n Brahmin, one of the four castes of Hinduism. हिंदू धर्मांच चार वर्णांत॑ एक वर्ण.
ब्रेस्तवार n Thursday. गुरुवार. बृहस्पतिवार.
ब्रिंदावन n name of a place associated with Lord Krishna. श्रीकृष्णाला संबंध असाच एक ठिकाणाच नाव. वृंदावन. Note :- The ब्रिंदा or वृंदा means तुलसी and so ब्रिंदावन means "a forest of तुलसी".
ब्रिंदावन॑ n Brindavan. a structure containing the mortal or immortal remains of a Madhva saint. मध्वा यतींच अवसान पुण्यस्थळ॑.
No comments:
Post a Comment