03 February 2010

Idioms - Figures of Speech - Proverbs and Sayings




Figures of Speech, Idioms



अडव॑ पात्र fig  an hurdle. अडचण॑. अडव॑ याच.

अतीवृष्टी fig  excess of a thing (beyond normal requirements). आवश्यापक्षाउदंड॑ जास्ती (होणे). uis साधारण म्हणूनच मला दुसरेला सहाय कराच बुद्ध॑ नाहीतामुळे दुसरेपणीं मला सहाय कराला येतनाहीत॑. पण,कित्येकदपा कोणतरीन मला सहाय कराला आरंभ करतानेच॑ "तो एक शोंबेरी.एवढे केलते पुरे.अतीवृष्टी दाखिवाच आवश्य काहीं नाही"अस सांगतात.

अतीवृष्टी-अनावृष्टी fig  either too much or too little. उदंडजास्तीनाहीतर उदंड उणे. uis फार लोक त्यंच जीवन बरोर चालत अस्ताना देवाच पटाला नमस्कार पणीं करनात॑. हेनीच कष्ट काळ आलतर॑, नित्य देवूळ-गोपूरम्हणून हिंडतील॑. असलते स्वभावाला अतिवृष्टि-अनावृष्टि म्हणून सांगणे आहे.

अन्याय fig  disproportionate to reason or law. uis मझ नातू अन्याय तंटा करतो म्हणून मझ लोंक तला सदाहीं शिवा देत असतो.

अपस्वर॑ fig  unpleasant utterance. uis कोणीं एक चोखोट कार्य बोलतानामध्य पडून अपस्वरास्क॑ बोलाच वंगळ॑ स्वभाव तला आहे.

अर्धक्षवर॑ fig  a job left half done. अर्ध करून सोडलत॑ काम/कार्य/विषय. uis हे कॉर्परेशन लोक॑ एक कामीं बरोर करनात॑. मझ घराच समोरल॑ बीदींत॑ डांबर घालाच काम अर्धक्षवर॑ करून घाट्लाहत॑.

अवतार fig  an unseemly dress or appearance. अवघड वेष-भूष. uis अम्ही लेंकरे कोणतरीन त्यांस अवडनाते वेष-भूष घालींगून बसलतर॑ अम्च॑ आजीम्मा सांगतील॑, "काय अवतार घालींगून बसलाहेस॑" म्हणून.

अवधूत fig  irresponsible person. जवाबदारी सोडून बसलते व्यक्ती. uis तो अत्ता-अत्ता सन्यास घेटला अस ऐकून मला आश्चर्य काहीं झाल॑नाही. कुटुंबाच जवाबदारी सांभाळणे तला एक मोट्ठ॑ प्रयासम्हणून अस्किदनालीन कळेल॑. नुस्त अवधूतास्क॑ हिंडणेच तला इष्ट.

उकरून काढणे id  to provoke or dig out a fight. आवश्यनाहीस्क॑ एक भांडण॑ आरंभ करणे. uis बाजू घरच॑ नव सून एक चोखोट पोरी झालतरीन तिज सासू सदा तिला सळिवून भांडणे उकरून काढाला पाह्त असते.

उचलून घालणे fig  to be shocked by sudden nasty surprise. एकदम भेहीं आश्चर्यहीं होणे. uis उदंड दिवसा पसून आंगाला बर॑ होत नाही म्हणून मला कळ्ल॑ होत तरीन तज रोडे झालते आंग पाव्हून मला उचलून घाट्ल॑. तो एवढ॑ मोस॑ झालाहे म्हणून मला विश्वास करालच झाल नाही.

उठणे-बसणे id to behave in a very humble or servile manner. स्वंत॑ अभिमान नाहीस्क॑ वागणे. uis जयललिता राज्य करताना तिज खाले काम करत होतते मंत्रीलोक तिज आज्ञा ऐकून उठणे-बसणे कराच विषयांत थोडकपणीन लाज नाहीस्क परस्पर सामर्थ्य दाखिवाच दृश्य प्हाऊन अम्हालाच कंटाळा येत होत॑.

उठूनबसणे id a dormant thing becoming active again. re-emergence (of a situation). (एककार्य) पुन्हाप्रत्यक्षहोणे. (एककार्य) पुन्हावरयेणे. uis हैदराबादांत तेलेंगाणा विषय पुन्हा उठून बसलाहे. एकपठीस श्रीकृष्णा कमीषण त्यंच रिपोर्टांत काय लिव्हणारकी अम्हाला कळना. अण्खीएकपठीस 'गद्दर' (नाक्सलैट लोकाना प्रेरणा देणार) त्यंच नव पार्टी आरंभकेलाहे अणी त्यंच मुख्य उद्देश 'तेलेंगाणा' स्थापना कराचच॑.

उप्पडून काढणे id  to ferret out (information etc. against one's wish). दूसरेकडून काहीं विवर॑की वेगळ॑ विषय कायतरीनकी निर्बंधांत॑ होढून/ओढून काढणे. uis  ते बायकोकडे मात्र मी बोलाला जाईना. कां म्हण्जे, बोलाला आरंभ करतानच मझकडून अम्च घरच॑ विवर पूरा उप्पडून काढणे विना तिला वेगळ॑ एक उद्देशीं नाही.

एक-दोन fig  very few (in numbers). उदंड उणे संख्याच. uis (1) गेल महिना पूरा फार ऊब होत॑.आज कायकी एक-दोन बूंदाच शिंतोडे पडले. (2) अम्च खेडेगामाच साळेंत॑ बरोर शिकिवनात॑ म्हणून अग्गिदनालीं कळले. हे वर्षाच एस.एस.एल.सी परीक्षांत॑ कायकी एक-दोन लेंकरे जिंतलतर तेच जास्ती म्हणूया.

एकादशी ब्राह्मण॑ fig  a term of ridicule or otherwise to indicate a niggardly Brahman or an impoverished brahman.  uis मझ॑ चुलतभाऊला उदार मन्न॑ थोड पणीं नाही. अम्च सोयरीकां मध्ये तला एक एकादशी ब्रह्ममण म्हणून सांगणे आहे.

कपाळसूळ fig  troublesome botheration. तंटाच शल्य. तंटाच उपद्रव. uis बंग्ळादेशांत॑ बदलून-बदलून येत असाच सरकार भारताला एक कपाळसूळ झालाहे. कारण, त्यांत॑ एक सरकार भारताच विरुद्ध॑ अक्रम कराच आतंगवादी लोकांला प्रेरणा देत असत॑.

कपाळाच लिपी fig  pre-destined fate. कर्म. प्राराब्ध. कपाळाच विधि. Note:- प्रारब्ध means 'fate' in sm whereas it is प्राराब्ध in DM.

कपाळाच विधी fig  pre-destined fate. कर्म. प्राराब्ध. कपाळाच लिपी. uis अवघड वाटांतून तला चुकिवाला कित्ति प्रयत्न केलतरीन काहीं प्रयोजन झाल॑ नाही. नंतर॑, काय होयाल जात की, ते तझ॑ कपाळाच विधि म्हणून सोडूनटाकलों.

कळून-कळनास्क॑ fig  stealthily. secretly. कोणालीन कळनास्क॑/कळिवनास्क॑. uis ते कंपनींत॑ कळून-कळनास्क॑ एवढे थोर मोस॑/'फ्रोड' कस झालकी मला अर्थ होतनाही.

कळ्ळते माकड॑ fig  a known devil. तंटा करणार म्हणून पुढेच कळ्ळते मनुष.

काळ कांडणे id to eke out subsistence. कष्टी भोगून उपजीवन करणे. काळलोटणे. uis तला एक निश्चय काम काहीं नाही. इकडून-तिकडून काय काम मिळतकी ते करून काळकांडत आहे.

काळ कांडणे id  to while away time. समय बरोर उपयोग करनास्क॑ व्यर्था बसणे. काळलोटणे. uis वीसा-स्टांपिंगाला म्हणून चेन्नैतल॑ यु. एस. कोणसलेटाला जाऊन मझ॑ पास-पोर्ट देऊन दहा दिवस झाल॑. त्यंच निश्चय काय म्हणून कळाला इन्टर-नेटांत॑ दिवसोडी पाह्त आहें. अण्खी किती दिवस अस॑ काळकांडाम॑ म्हणून कळत नाही.

काळ लोटणे id  to eke out subsistence. काळकांडणे.कष्टी भोगून उपजीवन करणे.

काळ लोटणे id  to while away time. काळकांडणे. समय हाळ करणे. uis मझ एक मित्र सत्तर वर्षाच असतील॑. फार दिवसानंतर मिळाले.मी त्यना विचारलों "कस आहेंत"? त्यनी उत्तरदेले "कायकी, काळलोटत आहें".

कावळा हांकणे id   to while away time doing worthless things. प्रयोजन नाहीते काम करून समय हाळ करणे. गाढव हांकणे. uis केम्हा गेलतरीन मुनिसिपालिटी आफीसांत उदंड दन॑ काम-धंदा नाहीस्क॑ कावळा हांकत॑ बसलसाच पाव्हूया.

कांठावर बसणे id  to be mentally very distressed. मनाच फार कष्टांत असणे. uis मझ मित्र कांठावर बसलाहते अस मी ऐकलों. लेंकरे कोण्हीं बरोर वाचणे-शिकणे केलनाहीत॑ अस मला नंतर॑ कळ्ल॑.

कांब मोजणे id  to be behind bars. to be jailed. तुरंगांत बसणे. कैदांत जाणे. uis मला कळ्लते एक मनुष ल्हनपणांतेच विपरीत बुद्धी दाखिवत होता, पण जातां-जातां ते कुबुद्धींत॑ जाऊन पावल॑. अत्ता तो पाळयमकोट्टै जैलांत॑ कांब मोजत बसलाहे.

किच्चडि fig  mixed up mess. गोंधळाच अवस्था.

कुप्पा-कुप्पा fig  a large quantity. immesurable quantity. मूटा-मूटा. भरून. उदंड॑. उजंड॑. Note :- from Tamil. uis दहा वर्ष एक कामपणीं नाहीस्क रिकाम होऊन बसलत॑ मनुषाला नंतर अदृष्ट बडिवल॑. कसकी गळ्फांत॑ जाऊन कुप्पा-कुप्पा पैसा संपादींगून आला.

कुंठ काढणे id  an idiom meaning "(a guest) determined to stay put". "उजंड दिवसाला राह्याला निश्चय करणे", हे अर्थच अ शब्दालंकार. Note :- The literal meaning being, "to dig up a pond (as an indication of ensuring long term source of water).

कुंथणे fig  to fret and fume. मनांतेच ठींगून तरपडणे.

खाणि बडिवणे fig  to bluff. लबाडसांगणे. uis तो मनुषाला थोडपणीं विसंबाला नाही. शुद्ध खाणी बडिवतो.

खाली-बसणे fig  to be unemployed. to be idle. काम नाहीस्क॑/करनास्क॑ उगे असणे.स्वस्त बसणे.

खुंटी व॑रल॑ कावळा fig  an idiom meaning "a person in a great hurry for everything". " अग्ग्यालीन (सग्ळ्यालीन) अवसर भोगाच मनुष", हे अर्थाच एक शब्दालंकार. Note :- The literal meaning being, "a crow on a peg".

खेळिवणे fig  to make an ass of someone. वेगळांला बुद्दु करणे. uis तजबरोर बोलतानकी संपर्क ठींगतानकी दत्तन असाम॑. कां म्हण्जे, वेगळ्यांस॑ खेळिवाच स्वभाव तला आहे.

गजकांप fig  utter fearfulness. फार भींगणे.

गडप करणे fig  to embezzle. to swindle. पैसा गिळणे. एमारिवून पैसा करणे. हडप करणे. uis कोण्त॑ व्यापार आरंभ केलतरीन अम्च पूर्त ध्यान तजांत असाम॑. नाहीतर, अम्च ध्यान चुकलतर॑ खाले काम करणार याच पैसे पूराहीं गडप कराला पाहतील॑.

गळका fig  easy going. disorganized. व्यवस्थानाहीते. तेरा-पेराअसणे. uis शेदारल॑ घरचे गळक॑ लोके. त्यंच घर नीट ठींगनात॑. नित्य संपाक करतात॑की- नाहीकी, एकादाड अम्चकडे सामान (दूध, दहीं, भाजीपाला) म्हणून विचारत असतात॑.

गळा कापणे id  to bore. to harass. फार तंटा/उपद्रव करणे.प्राण-काढणे(met) ; गळेकापू/गळेकाटूin sm. uis (1)शेदारल॑ घरचा एथे येऊन गळा कापतो.तला वेगळ काम-धंदा नाहीम्हणून वाटते. (2) अत्ता नव होऊन आलते आफीसर अम्हाला तवढेदनांच गळा कापाला म्हणून आलाहे वाटते. श्वास सोडाल होईनास्क॑ काम घेत आहे.

गंजी वेळणे id  to side track the issue. विषय बदलिवून श्रद्धा वेगळेकडे करिवणे.

गाढव चरणे id  to fritter away time in some worthless activity. गाढव हांकणे. प्रयोजन नाहीते काम करून वेळ हाळ करणे. कावळा हांकणे. uis पूर्त ध्यान देवून वाचाच॑ काळी बरोर वाचनास्क गाढव चरलतर॑ शेवटी काम काहीं मिळनास्क भाताला कष्टी भोगामते पडेल॑.

गाढव हांकणे id  to while away time doing worthless things. गाढव चरणे. प्रयोजन नाहीते काम करून समय हाळ करणे. कावळा हांकणे.

गिळणे fig  to embezzle.एमारिवून पैसा करणे.

गुंडाळणे fig to hang around. एकच ठिकाणी फिरत असणे.जवळपासचफिरतअसणे. uis  (1) "तो कां इकडच गुंडाळत अस्तो. तला वेगळ॑ काम नाहीका ? (2) कोण्त क्षेत्राल गेलतरीन काम नाहीते ब्रोकर-लोक॑ कसतरीन पैसे उपडाम॑ म्हणून अम्च मागेच गुंडाळत असतील॑.

गुंडाळणे fig to embezzle. एमारिवून पैसा करणे.

गेल॑ fig  lost on account of omission, slip-up etc. हातांतून चुकून जाणे. uis अत्ता काय सांगूनीं प्रयोजन नाही. गेल॑ म्हणींगून उग॑ बसणेच चोक्कोट॑.

घरघूशी fig  a home bird. an introvert. a person who is shy of company. दुसरेंकडे जा वागनात॑ मनुष. uis  घरघूशी लोकांना बाहेर अधीक जाणेकी,चार लोकांबरोर मिळणेकी अवडना. असलते लोक॑ विकाच/"मार्केटिंग"लैनांत घूसताने. तेना एक "कंपूटर"देवून तजवाटे काय काम होतकी ते करीवुया.

चढणे fig  to get drunk. दारु पीवून नियंत्रण चुकणे.

चढिवणे fig  to instigate. (दुसरेंच) मन्न॑ फिरिवणे ; चढवणे/चढविणे in sm. uis तो असलते काम करना म्हणून मला कळेल॑. कोणकी तला चढिवून देलसतील म्हणून वाटत॑.

चमचा fig  a sycophant. मस्का बडिवणार.

चंडाळ घाण fig  horrid smell. भयंकर घाण. uis तीन दिवसाला अम्ही मैसूराला गेलोतों. परतून येऊन घर उघडताना नाहणींतून चंडाळ घाण बडिवत होत॑. एक उंदीर ते खोलींत मरून पड्लसाच पाह्यलों.

चावी देणे id  to instigate. चढिवणे. uis पांडवांच विरुद्ध॑ तम्हा-तम्हा अन्याय कराला दुर्योधनाला चावी देणेच शकुनीच मुख्य काम.

चोर्टा पडाच वेळ fig  very early in the morning when all are deep in slumber. पाष्टे-पाष्टे अग्गिदनीं गाढ झोंपांत असाच वेळ.

जडभरत॑ fig  an extremely lazy person. an indifferent person. शोंबेरीमनुष (tamil). uis वयाच पोर/पोरी म्हण्जे झट-झट काम शिकून काम नीट कराम॑.  जडभरतास्क॑ असलतर॑ काहीं प्राप्त कराला होईना.

जनता fig  ordinary type. साधारण रीतीच. uis गरीब-रथ रेलबंडी जनता वर्गांच असलतरीन, तेजांतल॑ सौकर्य भेषच आहे.

जळका fig  a jealous person. पोट-जाळाच मनुष. uis मझ एक जवळच॑ सोयरीक फार जळका मनुष.मझ "पर्सांतून"हदार रुपेच चारनोट काढलतर॑ तला पोटांत संकट होयाच तज पार्वेंसून सुलुभान कळेल॑.

जीव्ह गळणे fig  to salivate on account of unalloyed eagerness to eat a tasty item. रूचाच एक पदार्थ खांव॑ म्हणून वाटून जीव्हांतून लाळ सुटणे.

झाडणे fig  to scold vehemently. to give a dressing down. शिवादेणे. हाक्कामारणे. uis कामवाली समोर-समोर बोलली म्हणून आज मझ बाईल तिला नीट झाडली.

झुकणे fig  to admit defeat. हारसंम्मत॑ करणे.

झोकणे fig  to estimate or take the measure of a person. एक मनुषाच षाणपण॑ तूकम घालणे (tamil).

झोंपाळू fig  an extremely lazy person. फार आळसीच मनुष. uis तला तीन चार चोखट चोखट काम  मिळ्ळतरीन, तजांतून तेवढीन काढूनटाकले. तो एक झोंपाळू म्हणून नंतर मला कळ्ळ॑.

टेंकणे fig  to repose or place (one's hopes or expectations). to rely upon. (एकावर) आधाराच आशा ठिवणे.आधार घेणे. uis अम्ही पैसेच सहाय कराला तय्यार आहोंम्हणून कळ्लतर॑ पुरे, कित्येक लोक अम्चवर पूरा टेंकाला पाह्तील॑.

टोपी घालणे id  to cheat. नाम घालणे. एमारिवणे (Tamil). uis तज बरोर मिळींगटलतर॑ बेष टोपी घाल॑ल म्हणून कळींगूनपणीं मझ॑ मित्राच लोंक तज सहवास सोडाला तय्यर न्होता. असाच पैसे पूरा नाश झालांपिरी अत्ता रडत बसलाहे.

टोंचून बोलणे fig  to talk hurtingly. मन्न दुख करिवास्क बोलणे.

ठेंचणे fig  to give a hard time. कष्टी भोगिवणे. फार तंटा करणे.

डेरा बडिवणे fig  to stay put for a few days, usually as an uninvited guest. बलावनास्क॑ (आवंतन नाहीस्क) आलते अतिथि थोड दिवसाला एक ठिकाणि राहणे. मुकाम बडिवणे. कुंठ (कुंड) खांडणे. uis वर्षा-वर्षि साळेच सुट्टीच वेळि अम्च मामाच कुटुंब अम्च घरांत डेरा बडिवतील॑. पुढेच महिनाच धर्मा या पतोरि वापस त्यंच गामाला जाईनाते.

डोळेला पाणी घालींगून असणे fig  to keep a watchful eye. श्रद्धानीशी सांभाळणे. श्रद्धानीशी पालन करणे.

डोस्के खाजींगणे id  to be puzzled. प्रश्न विचित्र होवून दिसणे. uis तो एक कार्यालीं प्रयोजन नाहीते मनुष म्हणून मला तम्हाच कळेल॑. कायतरीन कम कराला सांगटलतर॑ एकीं कळनास्क दोस्के खाजींगून होटाकेल॑.

डोस्के खाजींगणे id  to display sheepish and subservient mentality. उणीवताच स्वभाव दाखिवणे. uis केलते चूक दूसरांस॑ कळून गेलेम्हणून अग्गिदनांचीं समोर तो दोस्के खाजींगून होटाकला.

डोस्के खाले हो(ओ)ठाकणे id  to put in all methods to attain result. सर्वत्र प्रयत्न करणे. uis तला वारसाच आस्त भरून होत॑. पण ते बरोर पाहींगनाते-करतां सगळीन कोण-कोणकी बडींगून गेले. अत्ता डोस्के खाले होठाकलतरीन तला ते काहीं मिळाल जात नाही.

डोस्के पिच्चिंगणे id  to go crazy. to go nuts. become disgusted. become desperate. मनाला फार तंटा होणे. uis त्यंच लेंकीला किती सांगूनपणीं तिन॑ बाहेर गामाच नवराच पह्जे म्हणून बसली आहे. तिज हट्ट पाहून तेना डोस्क पिच्चिंगास्क आहे म्हणत होते.

डोस्के फिरणे id  to become haughty. डोस्के फुगणे. दुरहंकारी होणे. मस्ती धरणे.

डोस्के फुगणे id  to become haughty. डोस्के फिरणे. दुरहंकारी होणे. मस्ती धरणे. uis थोड दिवसापसून तला काय झालम्हणून कळतनाही. लोंकाला चोक्कोट काम मिळ्लत॑ असूयाकी कायकी, कोणाला पाह्यलतरीन उजंड गर्वांत अस्तो. तला डोस्के फुगलाहे.

डोस्के फोडिंगणे id  to worry no end. to break your head. फार योचना करणे. uis तो एवढ॑ दिवस अवघडास्क हिंडत होता. अत्ता ते अग्गीन सोडूनटाकून कस॑ चोक्कोट नाव घेणे म्हणून डोस्के फोडींगत योचना करत आहे.

डोस्के बडींगणे id  to bemoan out of frustration. निराशा दाखिवणे.

डोस्के वर बसणे id  to boss over. to dictate terms. अधिकार दाखिवणे. uis कामवालांना ठिवलत ठिकाणी ठिवाम॑ म्हणून एक अभिप्राय आहे. कां म्हण्जे, अधिक प्रेमान॑ वागलतर॑ त्यनी अम्च डोस्केवर बसतील॑.

डोस्के वरून जाणे id  to fail to understand. समजनास्क॑ असणे.

डोस्के सूळ fig  a chronic problem. एक निरंतर॑ प्रश्न.

डोस्के हलिवणे id  to agree without thinking. योचना करनास्क॑ संम्मत करणे.

ढाळास देणे fig  to cause butterflies in the stomach. to scare someone. पोटांत॑ बड-बडा आणिवणे. दूसरेंला भें आणिवणे. uis  परमा दिवसी मझ एक मित्र येऊन ढाळास देवुनटाकून गेला. तो सांगतो "याच वर्षापासून मुनिसिपालिटि "प्रोपरटी-टेक्स" तिप्पट कराला जातात॑".

ढेंकूण fig  a derisive term for a Tamil Iyengar. अरव॑ अय्यंगार मनुषाला उद्देश करून मष्किरींत सांगाच एक गोष्ट॑. Note :- on account of the perceived notion that such a person behaves stingily on himself and his conversations are of similar nature while interacting with others.

तय्या-तक्का नाचणे id  to hop around in confusion. मनाच गोंधळांत॑ तरपडणे.

ताकपाणी fig  a poor man's subsistence food. गरीबांच उपजीवनाच जेवण॑. uis रिटैर होताना याच पैसे पूर्त व्यापारांत घालून नष्टझालतरे अम्ही घरांत जेवाला होईनास्क ताकपाणी पिवू्न वांचामते पडेल॑.

ताकपाणी fig  a very simple meal. एक फार साधारण जेवण॑. uis तुम्ही गांवांत॑ राहजोरी अम्च घरांत॑ जेवाला येऊया. प्रमादहोऊन काहीं मिळनातरीन ताकपाणी मिळेल॑.

ताळ घालणे id  to be a sycophant. मस्का बडिवणे. uis तो तज वरला आफीसराच ताळ घालणार मनुष. तज स्वंत विचार असलतरपणीं तला सांगाला धैर्य असना.

तिरुपति क्षवर॑ fig  a figure of speech meaning a job abandoned at half-way stage. अर्ध करून सोडलते काम. अर्धगच्चाच काम. अर्धम-पर्दाच काम. अर्धवटाच काम. uis तो केम्हाहीं असेच॑. तला कायतरीन एक काम देलतर॑ तिरुपति क्षवर करून पळून जाईल. नंतर॑ वेगळ॑ कोणाल तरीन बलावून ते काम पूरा करिवामते पडत॑.

तिंडाट्टम (Tamil)  fig  vexatious and jittery state of mind.  मनाच तरपड होणे. uis एक चोखोट उद्योगांत होतते ते मनुष आवश्य नाहीस्क॑ ते काम सोडूनटाकला. अत्ता उपजीवनाला तिंडाट्टम झालाहे.

तूकम घालणे id  to assess or to seize up (a person etc.). (एकाला)इषोबाच डोळेवाटी पाहणे.एकाला पाहून तज स्वभाव इषोब करणे. Note :- from Tamil.

तृण॑ fig  next to nothing. फार थोड.अल्प॑. uis  कंप्यूटराच विषयीं तला एक तृणपणीं कळनातरीन फार कळ्लत्यास्क॑ करींगतो.

तोंड घालणे id  to interfere unnecessarily. आवश्य नाहीस्क मध्ये पडणे.

तोंड दाखिवणे id  to face up to something (as if nothing has happened). धैर्यांनिशी समोर पाहणे. uis मझ लेंकीच वराडांत॑ "रिसप्षनाला" कोणाचकी शिपारीशांत॑ गाणेच कचेरी एर्पाड केलोतों. पण, कचेरी केलत्या ते कार्यक्रम चित्रवध करून मझ॑ मान काढूनटाकला. मला नवराच घरच लोकांला तोंड दाखिवाला होयनास्क॑ झाल॑.

तोंड पाह्त बसणे id  to keep staring at someone like a dumb person . ढेंगास्क॑ दुसरेला पाह्त बसणे.

तोंडाला बडिवलास्क॑ बोलणे id  to retort rudely. अवमान करास्क॑ उत्तर देणे/बोलणे.

तोंडांत काडी ठिवणे id  to put words into mouth. दुसरेच गोष्ट एकाच वर घालणे (स्वंत गोष्ट दबिवून).

त्रिशंकू स्वर्ग fig  a figure of speech meaning "neither here nor there". एकडीन नाही तिकडीन नाही म्हणाच अवस्था. uis एकडल॑ चोखोट काम सोडूनटाकून तो गळ्फाला गेला. पण, सहा महिनांत॑ तिकडल॑ काम बरोर पडलनाही म्हणून वापस येऊनगेला. अत्ता एकडीन नाही तिकडीन नाही म्हणून त्रिशंकू स्वर्गांत॑ बसलाहे.

दबीवून ठिवणे id  to gag. बोलाला सोडनास्क॑ करणे.

दबिवून ठिवणे id  to suppress facts. विषय बाहेर येईनास्क॑ करणे.

दरिद्र वासी fig  a person who lives in circumstances not befitting his financial status. पैसा असून पणीं उणे स्थितींत॑ राहणार॑.

दंडपिंड fig  an useless person who expects to be supported by others.  दूसरेंचवर टेंकून असाच एकालीं प्रयोजन नाहीते मनुष.

दाखिवून देणे id  to expose. वेगळेंच रहस्य अण्कीएकलेला कळिवणे. uis नित्यानंदाच अवघड काम पोलीसाला दाखिवून देलते तजेच एक चेला म्हणून सांगतात॑.

दार fig  an option or choice (for a getaway, action etc). गेत॑. वाट. uis गेल॑ वर्ष मला पैसाच उदंड कष्ट झाल॑. वेगळ॑ दार नाही म्हणून तो सांगाच बड्डीला पैसा र्रीणांत काढामते पडल॑.

दिंडा fig  an expression for an uncouth person. एकहिरवटमनुष. uis मझ बाप वरडतील॑, "हळ्ळु पाव्हून काढींगून जा, तू काहीं दिंडा न्हो".

दृष्टि परिहार॑ fig  an object (usually ugly looking) used as a preventive for evil eye. दृष्टीलागनास्क असाला ठिवाच एक (विकार) रूप॑.

दृष्टि परिहार॑ fig  a person or a thing which looks ugly. विकार रूपाच मनुष नाहीतर वस्तू.

देव दिसणे id  to be driven to wit's end. पुढे काय करालीन सुचनाते मनस्थितींत होणे.

धर्मसंकट fig  very painful. extremely unpleasant. फारकष्ट/संकटहोणे. uis थोरलोकांचसमारंभालाजाणेमलाएकधर्मसंकटअस्ते. कारण, तेवढेदनीं पदवी पाव्हून तजजोक्त वागतील॑म्हणून मझ अभिप्राय.

नरडी चेंपणे id  to be forced under great duress (to do something). गाढ श्रमांत॑ पडणे. uis गेल महिना पूरा मला ऑफीसांत॑ नरडी चेंपास्क काम होत॑.

नाकावरच॑ राग fig  extreme anger. थोर राग.

नाचणे fig  to jump about excitedly. आवेशांत॑ स्थिर बसनाक असणे. uis हे वर्षी साळेच सुट्टी येताना मलेष्याला जातों म्हणून कळलांपिरी मझ लोंकाच नाचणे पाहमतेच !

नाचिवणे fig  to make someone hop around. to harass. तंटा करिवणे.

नाटक fig an unreal drama put up to mislead. खरे काय म्हणून दाखिवनास्क॑ असाला कराच वागणे.

नाम घालणे id  to cheat. टोपी घालणे. एमारिवणे. Note:- this usage appears to have it's origin in Tamil.

नावगे होणे id  to lose all assets. to be bankrupt. आस्तपूरानष्टहोणे. uis बरोर योचना करनास्क॑ एक मोट्ठ॑ व्यापारांत॑ घूसून तला तेवढीन नष्ट झाल॑. अत्ता नावगे होऊन बसलाहे.

नोंडणे (Tamil)  id  to meddle around. मध्यपडणे. uis (1) 'लीवाच' दिवस आलतर॑ मझ लोंक काहींतरीं नोंडेत॑ असतो. नाहीतर॑ तला वेळ जाईना. (2) दोघे पोरे खेळींगत असताना एकला दुसराकडे म्हणतो "तुज लेगो ठींगून तूखेळींगे. मझ लेगो काढून नोंडूको".

नोंडणे (Tamil)  id  to needle somebody. कोणालतरीन तंटा देणे.

पंढ्रकेंस fig  an old person with grey hair. वय होऊन केंस पिकलते लोक॑. uis पिकलकेंसाच लोके त्यंच केंसाला काळ॑ रंग लावींगाच सर्वसाधारण झालाहे. तजामुळे वय झालते एकलांस॑ पाव्हून तेनी एक "पंढ्रकेंस" अस सांगणे थोड कष्ट झालाहे !

पाल्ते पडणे id  try all possible ways. stand on one's head (as a ruse to attain something). uis  तो काय पाल्तेपडलतरीन तला "प्रमोषन" मिळाल जातनाही. तजपक्षा षाणे बसलाहते.

पांयें धरणे fig  to fall at somebody's feet to seek a favour. कार्य साध्य होयाला कोणाच तरीन पांयें धरणे.

पिडारि fig  a figurative expression for a very ill kempt or unclean person. पाह्याला ओंगळ॑ अण्खी अशुद्ध आकाराच मनुषाला सांगाच एक गोष्ट. Note:- the expression पिडारि appears to be from पिंढारी, a clan of free roaming plunderers of the 19th century.

पीणे fig  to consume liquor. दारू पीणे.

पेटींगून-येणे id  to flare up in anger. उदंड राग करींगणे. uis कित्ति दपा सांगटल तरीन तो सांगाच गोष्ट ऐकना.येतां-येतां तला पाह्यलतर मला पेटींगून येते.

पेरंडे (Tamil) fig  a nagging person. मनालाउब्बसकरणार॑. Note:- the tamil word  पेरंडे means "a cactus which causes itch on contact".

पैसा गिळणे id  to embezzle. to swindle. गडप करणे. हडप करणे. एमारिवून पैसा करणे. uis कोण्त॑ व्यापार आरंभ केलतरीन अम्च पूर्त ध्यान तजांत असाम॑. नाहीतर, अम्च ध्यान चुकलतर॑ खाले काम करणार याच पैसे पूराहीं गडप कराला पाहतील॑.

पोखार fig  lightly. slightly. not deep. superficially. वरून. जास्ती जोर नाहीस्क॑; पोखर/पोखार in sm. uis तला मोटरबैकांतून खालेपडून पोखारम्हणून घाव लागलाहे.

पोट जाळ fig  jealousy. envy. असूया. uis मला भूटान-लोट्टरींत॑ एक कोटी बडिवल॑ म्हणून ऐकून शेदारल॑ घरचाला पोटजाळ झाल॑.

पोट वाळीवणे fig  to remain hungry by ignoring other activities. वेगळ॑ कार्य करनास्क अनशी पोटांत॑ असणे. uis मझ माय वरडली " तस पोटवाळीवून कसाला काम करत आहेस॑. पोटाकरतांच न्होका अम्ही उद्योग कराचेच॑?"

पोट भरणे id  to satisfy one's desire. मनाच तृप्त होणे. uis पांडवांच सत्यनाश झाला विना दुर्योधनाच पोटभरना म्हणून पूरा निश्चय झालावर तेनी एक महायुद्धाला तय्यारी आरंभ केले.

पोटाला बडिवणे id  to deprive one of everything. दुसरेला एकदम नाश करणे.

प्रताप fig  boastfulness. झंभाच स्वभाव. uis तो दादिगा आलतर॑ तज प्रतापच सांगत असेल॑. अम्हाला बोलाला सोडना.

प्राण fig  dear as life. (एकावर) फार इष्ट ठिवणे. uis मझ अण्णाला अंबा म्हण्जे प्राण॑. पण,ते खालतर॑ त्यांस॑ आंग पूरा पोंपडा येईल म्हणून अंबा खातेच नाहीत॑.

प्राण काढणे id   to oppress. to harass badly. फार तंटा करणे. प्राणखाणे. प्राणघेणे. मनाला फार उब्बस करणे. uis कित्येक लेंकरांस॑ दुकानांत बलाईंगून गेलतर॑ "हे घेऊनदे, ते घेऊनदे" म्हणून हट्ट करून प्राण काढूनटाकतील॑. दुकानांतून बाहेर येजोरी अम्हाला पुरे-पुरे होऊनजाईल.

प्राण खाणे id  to oppress. to harass badly. फार तंटा करणे. प्राणकाढणे. प्राणघेणे. मनाला फार उब्बस करणे.

प्राण घेणे id  to oppress. to harass badly. फार तंटा करणे. प्राण काढणे. प्राण खाणे. मनाला फार उब्बस करणे.

प्राण ठिवणे id  to set one's heart/mind on a thing. (एकावर) अत्यंत मोह ठिवणे.

फाटकपणे fig  petty behaviour. slipshod behaviour. mean behaviour. अल्पपण॑. सोदापण॑. uis कसाला अम्ही फाटकपणान॑ वागाम॑, वेच जास्ती होईल तरीन एक चोखोट हॉलांत अम्च समारंभ ठींगुया. येणार सर्वाना एक ल्हान 'मेमेंटो' पणीं देऊया.

फुगिवणे fig  to pump up a person's ego. अहंभाव चढिवणे.

बकासुर॑ fig  a voracious eater. इषोब नाहीस्क॑ खाणार. uis पानांत वाढलते भात बक-बका गिळाच पाव्हून तला अग्गिदनीं "बकासुरा" म्हणून मस्किरी करत होते.

बक्रा fig  a scapegoat. a person who is made to take the blame for others. दुसरेंच दुषकर्माला जवाबदारी होणार. uis सत्राजित राजाच भाऊ प्रसेननाला एक सिंह मरिवलेतरीन, ते दोष क्रिष्णाच व॑र घालून क्रिष्णाला बक्रा करिवलते खाणी अम्ही गणेशचतुर्थीच वेळी सांगणे आहे.

बडवा fig  an abusive term for a person. शिवा द्याच एक शब्द ; भडवा in sm. The actual meaning being "a pimp. वेश्यांच दलाल" uis (1) तो एक चोर्टा बडवा. तला अम्च घराच जवळपणीं याला सोडताने. (2) उदंड वर्षा पुढे एकदा मुंबईंत ट्रैन वेघत असताना एक बडवा अम्च बरोर ट्रैनांत वेघत होतते एक पोरीच पदर होडाला पाहिला. मीईं/मीनीं अण्खि एकलाईं मिळून तला दोन रपाटा देलों/होडलों.

बडिवणे fig  to knock-off. to pilfer. to be afflicted unfavourably. बडिवणे. uis (1) एकदपा बेंगळूरांत मझ लोंक रोडाच सिग्नलाकडे ओठाकून पराखपाह्त असताना कोणकी तज "पर्स" बडीवूनटाकला. (2) अम्च घराला चोर्टाबडिवनास्क असाला इत्तपर एक चौकीदाराला ठिवला निश्चय केलों.

बडिवून सांगणे fig  to say or put across emphatically. जोर होऊन सांगणे. Note :- from Tamil usage अडिच्चु पेशरदु.

बणिया fig  a calculating person. सगळीन इषोब घालून पाहणार ; बनिया in sm.

बिरडे fig  a bluff master. a brag. एकलबाड मनुष. uis तो दादिगा सुद्ध बिरडे. तो बोलाचांत पंचहत्तरप्रतिशत(75%)काढूनटाकून अर्थ कळींगाम॑.

बुडणे fig  to be ruined. दिवाल होणे.

बुडून बसणे id  to be deeply immersed in an activity ( eg. like in studies). एक कार्यांत॑ उदंड॑ ध्यान देऊन असणे (उदाहरण॑-वाचणांत॑).

ब्रह्मांड॑ fig  gigantic. extremely large. उदंड थोर. uis  तमिल-नाडाच मुख्य मंत्रि जयलळिताच दत्त लोंकाच वराडाच एर्पाड ब्रह्मांड होते म्हणून थोर आरोप झाल॑.

भगीरथ प्रयत्न fig  enormous effort. अपारश्रम. मोठ॑ प्रयत्न.

भद्रकाली fig  a term used to describe a woman of fierce disposition. भयंकर स्वभावाच एक बायकोला सांगाच गोष॑. uis तिन॑ काय बायको ! तिला भद्रकाली म्हणून सांगाम॑. तिजबरोर भांडणेंत॑ कोणालीं जिंताला होयना ! मात्र न्हो, चार दादिगाना एकचवेळ तिजान॑ माराला होईल॑.

भातखाऊ fig  a person who is an idle parasite in a house. एक कामीं करनास्क॑ घरांत॑ नुस्त॑ बसणार.

भेंडा fig  an indecisive person. लोक्कुर निश्चय काढनाते मनुष. वळवळा मनुष.

मनांतच गुंडाळणे fig  to mull over repeatedly. विचार मनांतच ठींगून असणे. uis लेंक सांगनास्क॑ वेगळ॑ जातीच पोराला वराड करींगटलते तेनाला सुद्धांग अवडल॑ नाही.ते विषय त्यंच मनांतच गुंडाळत आहे.तजमुळेच तेनी कोणाकडीं बरोर बोलनातआहेत॑.

मस्का बडिवणे id  to indulge in sycophancy. to curry favours. कार्य साध्य होयाला दुसरेंला स्तुती करणे.

माकड चेष्टा fig  mischievous antics. तंटाच खोडि.

मागे-पुढे fig  (to have) rough idea (before hand). ' कोठे/काय'अस॑ (पुढेच कळणे). uis तो पोर वाचणांत॑ षाणा काहीं न्हो. अत्ता आस्ट्रेलियाला वचाला जाम॑ म्हणून बसलाहे. तिकडल॑ अत्तच परिस्थिती काय म्हणून मागे-पुढे कळनास्क॑ तज मायबापाच प्राण काढत आहे.

मामूल fig  tips. petty bribe. ल्हान लांच॑. uis सब-रेजिस्ट्राराच ओफीसांत॑ एक फैल एक विभागांतून अण्खिएक विभागाला सरकिवाम॑ म्हण्जे मामूल देउनेचसराम॑.

मार्ग fig  escape route. चुकिंगाच वाट. uis आफीसांत॑ कायकी गोळ-माळ करून तो सांपडींगट्ला. अत्ता चुकाला काय मार्ग आहे म्हणून वर-खाले पाहत आहे.

माशा बडिबणे id  to spend time doing nothing. प्रयोजन नाहीस्क॑ वेळ हाळ करणे.माशामारणे.

माशा मारणे id   to spend time doing nothing. माशाबडिबणे. प्रयोजन नाहीस्क॑ वेळ हाळ करणे.

माशाच- कॉपी fig  copying blindly. योचनाकरनास्क'कोपि' कराच. uis मझ 'सेक्रटरीला' कॉपी करून आणाला तीन 'पेज' देलों.तिन॑ माशाच-कोपी करून आणलि ! कायरेम्हण्जे, मी तिला ' कॉपि' कराच विषय देताना, दोन 'पेजांत॑' एकच विषय असाच पाह्यलों नाही. तिन॑पणीं पाह्यनास्क॑ पुन्हा ते तसेच कॉपी करून आणली. Note:- this expression is a direct translation of " ई अडिच्चां कॉपी" (Tamil).

मुहूर्त fig  opportune time. संदर्भाच वेळ. Note:- generally used in a derisive manner. uis तो केम्हाईं मी आफीसाला अवसरांत॑ निघाच वेळांतेच मला पाह्याला येईल॑. तला वेगळ॑ मुहूर्त मिळेत नाहीका?

मुहूर्त fig  fit time. संदर्भाचवेळ॑. uis एक नव॑ काम आरंभ करणे म्हण्जे चोखोट मुहूर्त पाव्हून करणे बर॑ असेल॑.

मूटा बांधणे fig  to wind-up. बंध करून संपिवणे. अटोपणे.

मोजून-बोलणे id  to indulge in measured cautious talk. फारयोचना करून इषोबांत॑ बोलणे.

यम fig  extreme. फार. उजंड॑. uis अमच शेदारल घरच पोर यम तंटा करतो. तज बापाकड सांगून काय प्रयोजनीं नाही.

यमीण॑ fig  a derisive term to describe an incorrigible woman. अवघड स्वभावाच बायको.

येणे-जाणे fig  being on friendly terms. keeping in touch. संपर्कांत॑ ठींगणे/असणे. uis ते संभवानंतर॑ त्यंच मधे येणे-जाणे असास्क॑ मला वाटत नाही.

रगडा fig  a figure of speech implying feeling of repression on account of pressure from someone, pressure of work. etc. मनाच पीडा. uis कामाच रगडा सोसनास्क॑ उदंडदन॑ 'वी.आर.एस' घेतात॑.पण, नंतर॑ वेळ जाईनास्क॑ अणी पैसे उणे पडताना काम राजिनामा केलते योचना करुन खंत॑ भोगतात॑.

रडगाणे fig  troublesome complaining. तंटाच आरोप॑.

रंग-रूप fig  an overall picture. the real picture. the true character. पूर्णआकार/रूप. खर॑स्वभाव. uis कितिकी सभा, कमिट्टी बाहेर असून पायाला/पाहाला गंभीर अस्त॑.तजांतल॑ सदस्य थोर पदवींत असणार लोक॑ पणीं असतात॑.पण, तजांत मिळालानंतरचतज रंग-रूप अम्हाला कळाला येते.

रामबाण॑ fig  silver bullet. a sure shot remedy. कंडिप गुण॑ होयाच एक प्रयोग॑.

राहून जाणे id  the apparent indications of a person slowing down in his movements due to age or ailments. वय अथवा आंगाच॑ दुर्बलामळे चालणे-वागणेच हळ्ळुपण॑ येणे. uis अम्च एक सोयरीक बायकोला दोन वर्षानंतर॑ समीपांत पाहलों.त्यंच वय 80वर्ष असेल॑. उदंड राहून गेलाहेत॑.

रांगणे fig  to move very slowly. उदंड॑ हळ्ळु पुढे सरकणे. uis  हे रैल्वे-ट्रैन अत्ताच दोन घंटे उशीरांत॑ पळत आहे. हैदराबाद पावतां-पावतां अंखीन र्रांगाला आरंभ केलाहे !

लंकेच पार्वती fig  a woman without any ornaments or ostentation. आडंबर नाहीते बायको.

लंबडणे fig  to flop (onto a mattress etc.). निजून आराम करणे.

ल्हानपण॑ fig  mean mindedness. petty mindedness. लाणपण॑. ल्हान मनाच॑.

वक्रदृष्टी fig  crooked way of looking at a thing. वक्रबुद्धींत॑ पाहणे.वंकड॑दृष्टी.

वळवळा fig  indecisive. निश्चयकाढनाते ; वळावळ in sm. uis तो मनुष उदंड वळवळा स्वभावाच॑. तो कोण्त॑ विषयांतीन लोक्कर निर्णय काढना. विषय ढकळेत असेल॑.

वंकड॑-तिंकड॑ fig  crooked. deceitful. लटक॑-लबाड॑. लटक॑-फुटक॑.

व॑र-खाले नाचिवणे id  to make someone dance to your tunes.  वेगळांच वर स्वाधीन ठिवून अम्ही सांगास्क॑ करिवणे. तय्या तक्का नाचिवणे.

व॑र-खाले पाह्णे id  to be perplexed. भ्रम होणे.

वाटेला येणे id  to fall in line.  सांगाच प्रकार ऐकणे.

शकुनी fig  a scheming person. वक्रबुद्धीच मनुष.

शेण-पोतेर॑ fig  a term used sarcastically or derisively for describing a very dull looking saree or dress received as a gift. uis मझ जुने 'टी-षर्ट'पायलतर॑/पाहलतर॑ मझ बाईलीला र्राग पेटींगेल॑."हे कोणकी देलते शेण-पोतेरास्क॑ आहे.हे घालींगट्लतर॑ मी तुम्च बरोर बाहेर येईना" म्हणून तिन॑ सांगेल॑.

समय संजीवी fig  a person who acts just in time. समय होतान मात्र कार्य कराच मनुष.

सत्य हरिश्चंद्र fig  a derisive term for a person who claims to be an honourable man. सदा सत्यशील म्हणून अपाप सांगींगणार मनुषाला मष्किरींत सांगाच एक गोष्ट.

सिंहगर्जना fig  resonant and majestic voice. गंभीर घसा.

सोकिवणे fig  to bring under control through strict measures. बरोर नियंत्रण करून वाटेला आणिवणे. uis ते पोराच माकडचेष्टा प्हावून, बरोर पूंस गुंडाळींगून बसनातर तुला सोकिवूनटाकतों म्हणून तज बापा सांगिट्ले.       
सोडणे fig  to tell a lie. लटक॑ सांगणे. uis तो बोलाच विसंबाला होयना.उगे सोडतो.

स्वप्न fig  a futile wish or hope. एक व्यर्थ आग्रह.

स्वाहा fig  to swindle. गडप करणे. गिळणे.

हजामत fig  a demeaning way of describing an (unproductive) act. प्रयोजन नाहीते कामाविषीं नीच रूपांत॑ सांगणे.

हलणे fig to get startled. आश्चर्याच झटका होणे. अल्लाडणे (Tamil) ; हालणे in sm.

हिषोब नाहीस्क॑ fig  unscrupulously. मर्यादा अवगणना करून. uis मला कळ्ळत॑ एकला चोखोट सरकारी उद्योगांत असताना हिषोब नाहीस्क॑ पसे हडप करून, नंतर॑ सांपिडींगटला. अता कांब मोजत आहे. 

हैदर-काळ fig  olden times. जुने काळ.

हैदर दंडू fig  old useless fellow. प्रयोजन नाहीते म्हातारा.




Proverbs, Sayings & Usages


अम्मा पुढे दिम्मा say  frog in the well. घरच बाहेरच विषय काईं (काहीं) कळनाते मनुष.

अवळा घालून बेल तोडणे prov  "to use a small fish to catch a big fish". to take small initiatives to achieve big results. उणे श्रमांत॑ थोर काम हेणे.

आज गिळणे उजा मिळना  say what one has today may not be there tomorrow. a bird in hand is worth two in the bush. आज हातांत्सून सुटलतर॑ पुन्हा कद्दीन मिळना.

आडांत घाटलते धोंडा  say  a thing  set aside irretrievably. हातांतून पूरा सोडूनटाकलते.

आल॑ खालते माकडाच तोंडास्क॑ (आहे) say  an expression meaning "(caught with) a perplexing and confused expression while doing something which turned out to be totally unnecessary and unpalatable". थोडकीन आवश्य नाहीते काम करत असताना सांपडींगून मनाच गोंधळ दाखिवणे.

आंगाला-येणे say  to be possessed (by good or evil spirit). देव नाहीतर भूत आंगाला येणे. uis मसूरी रोग आलतर, देवि आंगाला आले अस सांगणे आहे.

आंगाला-होणे say  to be exhausted after feeling ill. आंगाला नित्राण हेणे. uis मी चार दिवस डिंगू जेरांत निजून पडलोतों. आजच आंघोळी केलते. आंगाला होत नाही म्हणून काय काम करालीन सध्याला होईना.

उकलून सोडलत॑ गाढव say  a person who has been let loose to his own wayward and irregular ways. अवघड वाटेला सोडलत॑ मनुष. uis ल्हान वये पसून तज बाप माय तला बरोर वाढिवल॑ नाही म्हणून अत्ता एक उकलून सोडलत॑ गाढवास्क॑ हिंडत पडलाहे.

उष्ट हातांत कावळा हांकणे say  a saying for miserliness. कंजूसपण.

ओस बडिवलते गामांत॑ गाढवच॑ सवाषणी say  a saying which implies "only a worthless person will try to shine or strut around in an unwanted or pointless situation". "अर्थ नाहीते परिस्थितींत॑ एकालीन प्रयोजन नाहीते मनुष षाणपण॑ दाखिवाला प्रयत्न करेल॑", हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being, "lady-donkey in a desolate village".

एक सोडून एक u  one after the other. एकाच नंतर॑ एक.

कढी विटना, सोयरीक सुटना say  a saying meaning, "you can not get rid of your relatives. You have to live with them !" "सोयरीकांकडून सुटणे कद्दीन होयनाते विषय" अस॑ सांगाच एक म्हण.

किंबडाच कानांत किन्नर वाजिवलतास्क॑ say  a saying meaning, 'to indulge in a futile exercise of telling or advising a person who does not want to be advised'. The litteral meaning is 'playing music to a deaf person'.’ऐकाला तैय्यार नाहीते मनुषाला उपदेश देऊन प्रयोजन नाही’, असलते अर्थाच एक म्हण.

कुत्राच पूंसाला लांब करिवाला होईल का ? say. a saying meaning "old habits die hard". "जुन॑ दंडक सोडणे कद्दीन होईनाच होईना", हे अर्थाच एक म्हण.

कुंठाच व॑र राग करींगून धुवनास्क॑ गेला म्हणे say  a saying meaning 'inaction on flimsy grounds'. "अर्थ नाहीते कारण सांगून काईं करनास्क उगे बसणे", हे अर्थाच एक म्हण. Note :- The literal translation of this saying is " going away not bathing or cleaning oneself, after getting angry with the pond".

कोंपूराला लागलते सुख॑ say  an idiom meaning 'futile effort'. व्यर्थ श्रम॑, हे अर्थाच एक श्ब्दालंकार.

कोंपूराव॑र लावलत॑ गूळा सार्ख say  a saying which means "like an un attainable thing". कद्दीन मिळनात॑ एक वस्तू. Note. the literal meaning being "like jaggery placed in the elbow", meaning, one can never enjoy licking it.   

कोंबड॑ झांकून ठिवलतर॑ दिवस उगनात जाईल का ? say  a saying which means 'no irrelevant or petty action can stop a grand affair'. ’उजंड उणे विषयाच कोण्तालीन एक थोर कार्य राह्ते कराला होयना’ हे अर्थाच एक म्हण. 

कोळ्ळिकट्टे घेऊन डोस्के खाजींगणे say  a saying meaning "inviting troubles or problems voluntarily". स्वता उपद्रव आणींगणे. Note :- The literal meaning is 'to scratch one's head with a burning firewood'. कोळ्ळिकट्टे is Tamil word meaning 'burning firewood'.

गाढवाला कळेलका कापूराच वास॑ prov  a proverb meaning an idiot will not understand a fine and delicate thing. "एक नाजूक कार्य मुठ्ठाळाला समजना" अस॑ सांगाच एक म्हण. Note :- The literal meaning being, "will a donkey ever know the smell of camphor ?"

गिळालीन नाही थुंकालीन नाही prov  to be caught in a predicament. काय करणेम्हणून कळनाते अवस्था. Note :- the literal meaning being, 'unable to either swallow or to spit out'.

चिरलते बोटाला चुन्ना लावनाते मनुष say  a miserly person. कंजूस मनुष.

चोर्टाला विंचू चावलतेस्क prov  like the condition of a guilty person who, despite extreme provocation to himself, dare not retort lest his guilt is found out. चूक केलते मनुष तज चूक वेगळ॑ कोणाच गवनांतीं येईनास्क असाकरतां तोंड उघडाला होयनाते अवस्थांत सांपडींगाच स्थिति.

जुन॑ डोळे, नव॑ तमाशा say  a saying like 'new wine in old bottle'. 'कळ्लते विषयेच पुन्हा’ हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being, 'old eyes, but new fun or drama'.

तळहाताच घावाला (फोडाला) अरसा कसाला ? say.  a saying implying " why look for a reason, excuse or alibi when the fault is obvious". "चूक व्यक्त होऊन दिसताना कसाला कारण हुडुकाम॑ ", हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being, "why need a mirror to look at the injury in your palm ?"

तळहाताच व॑र राग भोगून धुवनास्क॑ गेला म्हणे say. a saying implying "getting away from responsibility by citing some lame excuse". "जवाबदारींतून चुकींगाला संबंध नाहीते कारण सांगणे" हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being, "getting away without washing your hands because of anger against your palms".

दांत चावींगून बसणे/असणे  say  to endure without any choice. to keep mum out of compulsion. वेगळ॑ वाट नाहीस्क॑ सोसींगून बसणे. uis अम्च लेंकरे वाचून पुढे येजोरी अम्ही दांतचावींगून हेच घरांत असाम॑. अधीक भाडे द्याच शक्ती तो अम्हाला नाही !

नाकाटीच लग्नाला सहस्र विघ्न prov  a proverb meaning "any effort by a dishonoured conceited person will run into several problems". "अवमान झालते जंभाच मनुष काय केल॑ तरीन भरून विघ्न मध्य येईल" अस सांगाच एक म्हण. Note :- नाक+काटणी = नाकाटणी / नाकाटी.

पडून पडून हांसणे  say  rolling with laughter. नियंत्रण नाहीस्क॑ हांसणे.

पर्तून पाह्यनास्क॑ असणे  say  to ignore deliberately. पह्ज॑म्हणून अवगणना करणे. uis मोट्ठ॑ मनुष झालांपिरी तो तज जुने मित्रांस॑ पर्तूनपाहालापणीं तय्यार नाही म्हणून मी ऐकलों.

पाणी जवळ॑ असाम॑, सोयरीकांनी दूर असाम॑ say  a saying meaning "keeping water by your side is more beneficial than cultivating your relatives". "सोयरीकांपक्षा पाणी हातराखणेला ठींगणे चोक्कोट" हे अर्थाच एक म्हण.

पांय मांडींगून बसणे  say  to put up one's feet. to be idling. to be doing nothing. काहीं उपयोगाच काम करनास्क बसणे. uis मझ बाईल वरडली "कायहो, पांय मांडींगून बसलतर॑ कस चालल॑, पैसे र्रीणांत॑ घेऊन तरीन एक 'फ़्लाट' घ्याला वाट पांह्त॑, मोल दोवसों-दिवसा वाढत आहे."

पांय लांब करींगून बसणे  say  to put up one's feet. to be idling. to be doing nothing. स्वथ बसणे. रिकाम बसणे. पांय मांडींगून बसणे.

पांयां व॑र गंजि ओतींगणे prov  to invite troubles by doing things in haste. shoot oneself in the foot. अवसर-अवसरांत कायतरीन करून, नंतर॑ कष्ठी भोगणे.

पांयेंत पडून विचारणे  say  to beseech humbly. उदंड विनयांत विचारणे.

पूंस गुंडाळिंगून बसणे  say  to sit quietly without creating any problem.तंटा करनास्क॑ उगे बसणे.

पूंस लांबकरणे  say  to create or start some unwanted trouble. आवश्य नाहीते तंटा आरंभ करणे.

पूंस लांब करणे  say  to show off as a smart alec (unnecessarily). (आवश्य नाहीस्क) षाणपण॑ दाखिवणे.

माकडाच हाति फूलाच माळ॑ say  a saying meaning "responsibility with one with a destructive attitude". "विनाशबुद्धीच मनुषाच जवाबदारी", हे अर्थाच एक म्हण.

राशीच पोरे say  fortunate or lucky children. भाग्यवंत॑ पोरे. Note :- adapted from Tamil. uis  कित्येक लेंकरे राशीच असतात॑. उजतांतून "कार", बंगळा, नंतर चोखोट साळेंत-काळेजांत वाचणे, थोर ठिकाणी चोखोट संबंध होऊन लोक्कर वराड, लेंकरे अस त्यांस॑ होत अस्ते. हे सर्वीन पाह्यलतर॑ त्यंच पूर्व जन्मांत पुण्य केलताच फल असाम॑ म्हणून वाटते.

वांसरु डिवून गाय मरणे say.  a saying, implying "an impossible occurance". "होयाला साध्य नाहीते कार्य", हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being, "the calf causing the cow's death by head-butting".

विनाश काले विपरीत बुद्धि prov  a proverb meaning "when in dire straits, one tends to act irrationally". "दुरवस्थांत असताना बरोर योचना करनास्क॑ काईं कराला साध्य आहे", हे अर्थाच एक म्हण.

समुद्रांत॑ हिंग विघरिवलातास्क॑ say  a saying meaning, "a futile job". "व्यर्थ काम", हे अर्थाच एक म्हण॑. Note :- the literal meaning, being "like trying to dissolve

सहा महिनेच जांभाई say  a saying meaning "a long period of lazyness". "उजंड दिवसाच आलस॑" हे अर्थाच एक म्हण॑. Note :- the literal meaning being, "a six month yawn".

हात उचलणे  say  to threaten. दटावणे.

हात ठिवणे  say  to handle a thing. एक काम हाताला काढणे. uis (1) हे घडिगार बरोर चालतनाही. आवश्य नाहीस्क॑ तजवर हात ठिवून ते पूरा हाळ करनोको. (2)मोडलते खिडकी बरोर कराला एक सुताराला मी सांगिटलोहें.तला किती पैसे देम॑म्हणून अण्खीन निश्चय झालनाही. मी बाहेर गेलसताना तो आलतर॑ मी परतून यापतोरी/यापर्यंतीन कामावर हात ठिवताने म्हणून तला सांगशीलका?

हात मुजलींगून बसणे  say  to sit still without helping. सहाय करनास्क॑ उगे बसणे. uis मी पूरा दिवस कष्टीभोगून काम कराच तो पाह्त बसलहोता.तला थोड तरीन मनांत॑ वाटलासलतर॑ हात मुजलींगून बसलासना.

हात लांब करणे  say to beg. भीक मागणे.

हात हलींगून येणे  say  to come unprepared. तय्यार होयनास्क येणे.

हिंग निघून जाणे say  to be drained out completely. to be rendered totally exhausted. पूरा पूरा नित्राण होणे. पूरा पूरा क्षीण होणे.