ध
ध the eighteenth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठिच अठ्रावां व्यंजन॑.
धकणे vi to get tired. नित्राण होणे. सुस्त होणे. शिणभाग होणे.
धक्का n stampede. push and pull of a crowd. धक्का मुक्कि. गुंपांत सांपडींगून होयाच कष्ट.
धक्का मुक्कि n stampede. push and pull of a crowd. धक्का. गुंपांत सांपडींगून होयाच कष्ट.
धक्टा adj younger. वयेंत॑ ल्हान ; धाकटा in sm.
धक्टपण॑ n young age. ल्हान वय॑.
धनिया n coriander seeds. संपाकाला उपयोग कराच एक रीतीच बीं ; धणा/धणे in sm.
धन n wealth. संपत. आस्त॑.
धनवान adj wealthy. पैसावंत॑. पल्लमदार.
धनु n zodiacal sign of Sagittarius. एक राशीच नाव. धनुष राशि.
धनु n bow. धनुष॑.
धनुर्मास॑ n the month during which the sun is in the constellation of Sagittarius. केम्हा सूर्य धानुर राशींत॑ अस्ते की ते महिनाच नाव॑.
धनुष n zodiacal sign of Sagittarius. एक राशीच नाव. धनु ; धनुष्य in sm.
धनुष n bow. धनु. अस्त्र सोडाच आयुध॑. विल (tamil) ; धनुष्य in sm.
धन्य adj gratified. मनाला तृप्ति होणे.
धन्यवाद n thanks. कृतज्ञता.
धन्वंतरि n physician of the gods. देवलोकाच वैद्य॑.
धमकि n threat. गुंडागिरि. मेरटल (Tamil).
धमकि देणे vt to bully. to threaten. गुंडागिरी करणे ; धमकावणे in sm.
धरणे vt to hold. हातांत॑ धरींगणे. uis मी भिंतींत॑ एक नव पेट अडकिवाला जतों. आणि बडिवापर्यंतीन हे पेट धरींगशीलका ?
धरणे vt to catch. हातांत॑ धरींगणे. uis गेल वर्ष झालते क्रिकेट वर्ल्ड-कप सेमी-फैनलांत॑ सचिन टेंडूळकर देलते पांच केचीं पाकिस्थान पक्षांत॑ खेळणार॑ धरनास्क॑ सोडूनटाकले.
धरणे vt to capture. to take hold of. बळ प्रयोग करून स्वाधीन करणे. uis (1) जुने काळांत॑ मैसूर संस्थानांत॑ (अत्तच॑ कर्नाटका राज्य) र्राणाच हत्तीला खेढ्ढा संप्रदायांत॑ धरत होत॑. पण, ट्रावनकोर संस्थानांत॑ (अत्त॑च केरळा रज्य) तलाम्हणून र्राणांत॑ कुंठ काढून हत्तीला धरत होते. (2) इसवी 1714 वर्षी मुगळांच सेनापति साद-उद-उळ्ळा खान हेनी रजपुत योधा राजा तेज़ सिंह यांस॑ (तमिलांत॑ राजा देसिंग म्हणतात॑) युद्धांत॑ हरिवून जिंजी कोटे धरले.
धरून adv catching hold of. हातांत॑ धरींगून॑.
धरून adv inclusive of. commencing from. मिळींगून.
धर्णा n sit-in strike. हट्टांत॑ बसून मागणे.
धर्म n religion. मत॑.
धर्म n righteousness. moral merit. धर्म.
धर्म n sacred obligation. धर्म.
धर्म n alms. भीक. भिक्षा. भीकारीला द्याच दान.
धर्म n sacred duty. धर्माच कर्तव्य॑.
धर्म n law. नियम॑.
धर्मपत्नि n dutiful wife. कुटुंब निष्ठा बरोर कराच पत्नि.
धर्मयुध॑ n righteous war. धर्म रक्षा कराला कराच युध॑.
धर्मराज्य n righteous rule. नियमाप्रकार राज्य चालिवणे.
धर्मशाला n a charitable inn. लोकांस॑ धर्मांत॑ द्याच खोलीच वसति.
धर्मशाला n wayfarer's inn. प्रयाण करणांराच उपयोगाला वाटेंतल॑ वसतीच खोलि.
धर्मशास्त्र n theology. धर्मच शास्त्र.
धर्मशील॑ adj pious. religious. धर्म स्वभावाच.
धर्मसंकट n mental distress. मनाच थोर संकट.
धर्मसंकट fig very painful. extremely unpleasant. फार कष्ट/संकट होणे. uis थोर लोकांच समारंभाला जाणे मला धर्मसंकट अस्ते. कां म्हण्जे, तेवढेदनीं पदवी पाहून तजजोक्त वागाच पाहलतर॑ मला ते सोसाला होयना.
धर्मक्षेत्र n sacred place or land. पुण्य स्तल.
धर्मा n salary. मुशारा. संबळम (Tamil).
धर्मा n wages. कूलीच पैसा.
धर्मा n alms. भिक्षा. भीक.
धर्मात्मा n virtuous person. पुण्य जीवन करणार॑.
धर्मिष्ट adj virtuous. पुण्याच.
धर्मोदक n a ritual associated with death ceremonies in which a volunteer parts with some of his "puNya" to the deceased. मेलत्यांस अम्च॑ पुण्याच थोड भाग दान कराच एक आचरण॑. मृत्यु कर्माच एक भाग.
धर्मोपदेश॑ n moral instructions. धर्माविषीन कराच उपदेश॑.
धर्मोपदेश॑ n sacred instructions and advice relating to Sandhya-vandana imparted by father to a son at the time of the sacred thread ceremony. मुंजीच समय लोंकाला बाप कराच संध्या-वंदनाच पुण्य उपदेश.
धाट n crowd. लोकांच गुंप. धाड. दाट.
धाड n crowd. लोकांच गुंप. धाट. दाट.
धाड n (making) difficulties about trivials. ल्हान विषय थोर प्रश्नविणी दाखिवणे. uis तला काय धाड॑ ? सध्याला वेगळ विषयाच वोर श्रद्धा असूया तरीन कां तज बापाला त्यंच व्यापारंत॑ सहाय करनास्क॑ बसलाहे ?
धातु विशेषण॑ n participle (gram). क्रियाधातूंतून आलते विशेषण॑.
धातु n element. मूल वस्तु.
धातु metal. धातु.
धातु n root of a verb (gram). क्रियापदाच मूळ रूप.
धान n grain. धान्य. दाणे.
धान्य n grain. धान. दाणे.
धाबें n terrace of a house. मोट्टे माडि.
धामधूम n pomp and splendor. जोर आर्भाट. uis अम्च॑ शेदारच घरच॑ लोके त्यंच लेंकीच वराड धामधूमशी केले. तेनीच गामांतल॑ मोठ पैसावंत लोके म्हणून दाखिवाला की काय की.
धामधूम n wild hustle and bustle. tumultuous uproar. थोर अमक्कळाच स्थिति.
धार n a thin stream (of milk or any liquid). (दूधाचकी तसल॑ दुसर॑ द्रव्याचकी) धार. uis दूधाच धाराला म्हणून एक प्रत्येक भांडि मझ॑ आजीच घरांत॑ होत॑.
धार काढणे vi to milk (a cow, buffalo, goat etc.). गाईच, बक्राच, नाहीतर॑ म्हैशीच दूध पिळून काढणे. uis धार काढाच पुढे वांसरूंला गाईच दूध थोड पिविवलतर॑ (पीयाला सोडलतर॑), नंतर॑ ते गाय बेष दूध देईल॑.
धारणा n understanding. मनांत॑ कळींगणे.
धारबडा adj large and strong. well built. थोर अणी घट्टि.
धाराळ॑ n unreserved. बाधा नाहीस्क॑. Note :- from Tamil. uis "तुम्चकडे भरून पुस्तक आहे म्हणून ऐकलों. वेळ मिळताना अग्गीन तुम्च घराला वाचाला येऊयाका" म्हणून तेनाला विचारताना तेनी म्हणट्ले, "संकोच भोगनको, धाराळ होऊन ये".
धाराळपण॑ n large heartedness. थोर मनाच वागणे.
धार्मिक॑ adj pious. rule abiding. धर्माच प्रकारल॑.
धास्तिकपण॑ n fear on account of awe. भें (भ्रम मुळे याच).
धिक्कार n disregard. disdain. अवगणना. परवा करनास्क असणे.
धिक्कारणे vi to reject disdainfully. अवगणना करणे. परवा करनास्क असणे.
धिम्मस n a heavy wooden mallet used for compacting soil or earthern floor. मातीच भोंईं बेष बडिवून घट्टि कराच लांकडाच उपकरण॑. धिम्मस कट्टे ; धुमस in sm.
धिरडे n dosa. दोसा (Tamil).
धिंगाणा n boisterous revelry. वरडा-वरडि मस्तीच खेळ.
धीट adj bold. fearless. धैर्यवंत॑. uis वृषभ राशी वाले धीट स्वभावाच असतील॑ अणी पोरी असलतर॑ चांगळ॑ असतील॑ म्हणून सांगणे आहे.
धुमकणे vt to jump around boisterously. अमक्कळांत हुडिमारणे.
धुवणे vt to wash (in water). (पाणींत॑) शुद्ध करणे ; धुणे in sm. uis बाहेर कोठ जावून आलतरीन पांये धुविंगुनच घरांत घूसांव॑.
धूप n smoke. fumes. पोगे (Tamil).
धूप n incense. चोक्कोट वासाच॑ एक साधन॑.
धूपारति n a puja ritual of worshiping god through incense smoke. धूपाच आरति.
धूमकेतु n comet. पूंस नक्षत्र. शेंडि नक्षत्र.
धूळ n dust. एकदम बरीक मात्ति.
ध्रूव n polar regions of the Earth. भूमीच एकदम उत्तरांतीं दक्षिणांतीं असाच प्रांत.
ध्रूव-नक्षत्र n Pole-star. उत्तर ध्रूवाच वर असाच नक्षत्राच नाव॑.
धैर्य n courage. भें नाहीस्क॑ असणे. धीरता.
धैर्य n confidence. आत्म विश्वास. uis मझ॑ लेंकीला " ड्रैविंग लैसन्स" मिळून तीन महिने झाल॑तरीन, अपाप बंडि पळिवाला अण्कीन तिला धैर्य नाही.
धैर्यशालि adj courageous. धैर्य असणार.
धोति n an un-tailored white cloth worn to cover the lower portion of a man's body. पंचे. पंचा. धोत्र. वेष्टि. वेष्टक.
धोत्र n an un-tailored white cloth worn to cover the lower portion of a man's body. पंचे. पंचा. धोति. वेष्टि. वेष्टक.
धोबि n washerman. परीट.
धोबिघाट n washermens' wharf. धोबिलोक नदीच नाहीतर॑ कुंठाच कांठांत॑ कापड धुवाच ठिकाण.
धोबीण॑ n washerwoman. परटीण॑.
धोंडा n stone. जमीनांतल॑ एक घट्टि साधन॑.
धोंडा n a boulder. थोर धोंडा.
धोंडा n small stone particles. ल्हान-ल्हान धोंडा्च चूर.
धोंडा n pebble. धोंडा.
ध्यान n meditation. एकावर मनांतच गाढ श्रद्धा देणे.
ध्यान n attention. श्रद्धा. लक्षा. uis थोर पंडित लोक प्रवचन देताना पूरा ध्यान देऊन ऐकून घेटलतर॑ अम्च बुद्धि विकास होईल.
ध्वज n flag. गुढि. कोडि (Tamil). पताका.
ध्वजस्थंभ n flagstaff. ध्वज बांधाच खांब॑.
ध्वनि n sound. शब्द.
ध्वंस n destruction by bludgeoning. बळ उपयो करून नाश करणे.
न
न the twentieth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठिच वीसवां व्यंजन॑.
नकटीच लग्नाला सहस्र विघ्न say a saying implying, "innumerable problems will crop up when a person not fully equipped attempts any thing". चातुर्य नाहीते मनुष काय काम कराला आरंभ करलतरीन भरून अडचण येईल, हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being "a thousand hurdles for a marriage of a snub-nosed (ugly) girl".
नकलि adj counterfeit. duplicate. अस्सल नासाच॑. खोटा.
नको imp do not. नोको.
नख॑ n nail of hands and feet. हाताचीं पायेचीं बोटाच अग्र भागांत असाच पत्तळ हड॑. नंख.
नखस्तुति n name of a short hymn in praise of Lord Narasimha. नरसिंह देवाला प्रशंसा कराच एक स्तुतीच नाव॑. Note :- the नख॑ or नंख refers to the Lord's nails.
नग n ornaments. नेग. आभरण. वस्त. माळ-मत्ता.
नगद n ready money. cash on the spot. रोक्कम पैसे ; नक्त/नगद in SM. Note:- in sm "रोख" for ready money. uis अम्च॑ देशांत॑ एक घर/फ़्लाट घेम॑ म्हण्जे 50% नगद द्याला तय्यार असाम॑. उद्योगांत असणारांस॑ हे साध्येच नाही.
नगर n town. city. पट्ण॑.
नगरपालिका n town municipality. नगर भरणकराच स्थापना.
नग्न adj naked. नावगे. नागवे. Note :- नावगे is a misspelling of नागवे, but both forms are in currency in DM. निजार & विजार, रांदल & लांदर, इंगळा & विंगळा are some other such examples in DM.
नच्च॑ n harassment. pestering. (ल्हान विषयाच) उपद्रव. तंटा. Note :- from Tamil.
नडवी n a passage from the entrance of the house to the वसरी(ओसरी) and/or central court-yard. नडुवी. घरच ओंटांतून वसरीकडे/अंगणाकडे जायाच वाट. uis नडवींत अंथरींगून निजणे घराला फार अपशकुन॑ म्हणून सांगण आहे, कारण घरांतल॑ लोके कोणतरीन मरलतरच नडवींत निजिवतील॑.
नडुवी n a passage from the entrance of the house to the वसरी(ओसरी) and/or central court-yard. नडवी. घरच ओंटांतून वसरीकडे/अंगणाकडे जायाच वाट.
नट n actor. नड. अभिनय करणार.
नटी n actress. नडी. अभिनय करणारि.
नटेश n Lord Siva. शंकर भगवान.
नणंद n husband's sister. दाल्लाच बहीण. Note:- the term वहिणी is used to address a नणंद who is the husband's elder sister. The term वहिणी is also used for addressing elder brother's wife.
नणंदा n husband's sister's husband. co-brother. नणंदाच दाल्ला.
नथ n nose ring worn by ladies. नेथ. नाकाच आभरण॑. नथणी.
नथणी n nose ring worn by ladies. नथ. नेथ. नाकाच आभरण॑.
नदि n river. नदि.
नपुंसक n eunuch. खोजा. अली.
नमस्कार n an Indian way of salutation. नमस्ते.
नमस्ते n an Indian way of salutation. नमस्कार.
नरक n hell. the nether world. पाप केलत॑ लोकांच आत्मा जायाच ठिकाण॑.
नरकचतुर्दशि n a Hindu festival falling on the fourteenth day of the second fortnight of Aswij month. अस्विज महिना क्रिष्णपक्ष॑ चतुर्दशि दिवसाच सण॑.
नरडी n gullet. throat. गळाच आंतल॑ भाग. नरडी.
नरडी n trachea or the windpipe in the throat. नरडी.
नरडी चेंपणे id to be forced under great duress (to do something). गाढ श्रमांत॑ पडणे. uis गेल महिना पूरा मला ऑफीसांत॑ नरडी चेंपास्क काम होत॑.
नरबली n human sacrifice. मनुषाला बली द्याच यज्ञ.
नरवटी n a half shell of coconut without the kernel. किसलते नारळीच अर्ध वाटी ; नरटी/नरोटी/नरवटी/नरंवटी/नरोटें/नरंवटें/नरवटें/नरेटी in sm. Note:- in today's sm only नरटी is current.
नरसिंह॑ n an incarnation of Lord Vishnu as half lion and half man. महाविष्णूच अर्ध सिंह॑ अर्ध मनुष रूपाच अवतार॑.
नर॑ n male of a species. एक प्राणीच पुरुष वर्ग.
नर॑ n a man. एक पुरुष॑. एक दादिगा.
नरेंद्रा n king. राजा.
नर्तकि n a female dancer. नृत्य करणारि. नाचणारि.
नर्तक॑ n dancer. नृत्य करणार. नाचणार॑.
नर्तन॑ n dance. नृत्य.
नळका n water tap. नळी. नळ॑.
नळ॑ n water tap. नळी. नळका.
नळिनि n lotus. कमळीच फूल.
नळी n water tap. नळका. नळ॑.
नवग्रह n the nine planets of Indian astrology (sun, moon, mars, mercury, jupiter, venus, saturn, rahu and ketu). जोतिषांतल॑ नौ ग्रह (सूर्य, चंद्र, मंगळ॑, बुध॑, गुरू, शुक्र॑, शनी, राहू अण्खी केतू).
नवग्रह met indication of discord amongst members of an organization or family. एक कुटुंब॑ नाहीतर एक संघटनांत॑ अभिप्राय व्यत्यास असाच स्थिति सांगाच गोष्ट. Note :- each member being in his own orbit, indifferent and maleficent to each other.
नवधान्य n the nine types of grains offered in the worship of Navagrahas नवधान. नवग्रहपूजाला उपयोग कराच नउ रीतीच धान्य (चणादाळ, गहूं, कुळीथ अथवा हुरळी-Kannada, मुगाचदाळ, तांदूळ, पंढ्रशेंगा, काळेतीळ, काळेचणा अण्खी उडीद). Note :- the nine grains are bengal gram, wheat, horse gram, green gram, rice, white beans, black sesame, chicpeas and black gram. (चणादाळ, गहूं, कुळीथ अथवा हुरळी-Kannada, मुगाचदाळ, तांदूळ, पंढ्रशेंगा, काळेतीळ, काळेचणा अण्खी उडीद).
नवमि n ninth day of a lunar fortnight. एक पक्षाच नव्वां दिवस॑.
नवरत्न n the nine precious stones associated with the navagrahas (ruby, pearl, red coral, emerald, yellow sapphire, diamond, blue sapphire, hessonite and cat's eye). नवग्रहाला संबंधझालत॑ नौ रत्न (माणिक, मोती, पवळा, मरकत, yellow sapphire, वज्र, इंद्रनील, गोमेदक अण्खी cat's eye).
नवरा n bridegroom. वराडाच॑ पोर. Note:- नवरा is normally used in sm to means 'husband', though it also means 'bridegroom' in sm.
नवरात्रि n a Hindu festival of nine nights. नौ रात्रीच एक हिंदु उत्सव ; नवरात्र in sm.
नवरि n bride. वराडाच पोरि.
नवस n a vow to God. कार्य साध्य होयाला देवला प्रर्थना करून, कार्य झाल नंतर॑ नवस केलते वस्तु अर्पणा कराच॑.
नव॑ adj new. नवीन ; नवा/नव in sm.
नव॑तोंड n new face. stranger. परिचय नाहीते मनुष. कळनाते मनुष.
नवाब n Nawab. मुसलमान राजा.
नवीन adj new. fresh. नव॑.
नशा n intoxicated state. डोस्केला चढणे.
नशा n intoxicating drug or liqour. नशा आणिवाच साधन॑.
नष्ट n loss. नष्ट. हातांतून चुकणे.
नसणे vi not to be. न असणे.
नहाणे n first onset of female menses. स्त्रींच नवयौवनाच पहिलच विटाळ॑. uis अगाऊच काळांत॑ नहाणे आलते पोरीला नव॑ रेशमाच परकोर-चोळि नेसिवून अक्षण करून गांवांच थोरळे आशीर्वाद करतील॑. हे घरांत एक नवरि आहे म्हणून कळीवाच एक विध॑ आहे.
नहो adj no (not that). नोहो. न्हो.
नक्षत्र n star. नक्षत्र.
नक्षत्रमंडल n sphere of the stars. नक्षत्राच मंडल॑.
नंख n nail of hands and feet. हाताचीं पायेचीं बोटाच अग्र भागांत असाच पत्तळ हड॑. नख॑.
नंखर॑ adj very little. just a pinch of. (उजंड॑)उदंड॑ थोडक॑. दोन बोटाच नंखा वाटी चिमटून काढाच एवढ॑ ; नखभर in sm. Note :- The etymology of नंखर is नंख (nail) + भर = नंखभर. In DM नंखभर has morphed into नंखर॑.
नंखर॑ adj a little bit of. to a little extent. थोडक॑.
नंखुरडा n a septic finger or toe near the nail. a whitlow. नंखाच जवळ आलते बोटाच व्रण(रण॑). नंखाच जवळ आलते पिकलते फोड.
नंतर॑ adv afterward. मागहून. मागून. मावून.
नंदादिवा n a light kept burning perpetually in front of God's idols. देवाच विग्रहाच समोर सदा लाऊन ठिवाच दिवा. अखंड दिवा.
नंदि n sacred bull of Lord Siva. महादेवाच बैलवाहन॑.
ना conj a conjunction to a verb indicating negation. विसम्मत धाकिवाला क्रीयापदाला जोडाच एक शब्द. eg. "will not do" - करना ; "will not talk" - बोलना etc.
नाई adv no. not. नाही. नायी. निषेधाच शब्द.
नाक n nose. श्वास काढाच अवयव॑.
नाका n a road junction. दोन तीन बीद मिळाच ठाम.
नाका n check post. नाकाबंधि.
नाका n a toll gate. कर॑ वसूल कराला वाटेंतल॑ ठाणा.
नाकाबंधी n check post. नाका ; नाकेबंधी in sm.
नाकावरच॑ राग fig extreme anger. थोर राग.
नाग n cobra snake. नागसरप. चोक्कोट सरप. नागाराजा.
नागकन्या n snake nymph (mythical). सर्प कन्या.
नागदोष n curse on account of killing a snake, particularly the cobra. सरपाला मरिवलतर॑ याच पाप, प्रत्येक होऊन नागराजाला मरिवलतर॑.
नागपंचमी n the fifth day of the first fortnight of Shravan month. Festival of Naga puja. श्रावण मास शुक्लपक्ष पंचमि दिवसाच नागपूजा.
नागबंद n an ornament shaped like a twisted snake worn on the upper arm. नाग रूपाच वंकी.
नागरीक n citizen. देशवासी.
नागसरप n cobra snake. नाग. चोक्कोट सरप. नागाराजा.
नागा घालणे vt unauthorised absence from work. अनुमति नाहीस्क॑ कामाला येनास्क॑ असणे. uis हे काळाच कामवाले सदाहीं नागा घाटलतरीन त्यंच धर्मांतून पैसे कापलतर॑ ते एक मोट्ठ॑ संभव होईल. Note :- from Kannada/telugu.
नाच n dance. नृत्य.
नाचणे vt to dance. नृत्य करणे.
नाचणे met to jump about excitedly. आवेशांत॑ स्थिर बसनाक असणे. uis हे वर्षी साळेच सुट्टि येताना मलेष्याला अम्ही जातों म्हणून कळलांपरी मझ लोंकाच नाचणे पाह्मतेच !
नाचिवणे met to make someone hop around. to harass. तंटा करून एकाला अस्वथ करणे.
नाजूक adj delicate. सौम्याच हलकपण॑.
नाजूकपण॑ n delicate minded. मऊ मनाच॑.
नाटक n drama. play. रंगभूमींत॑ कराच नटनकथा.
नाटक fig an unreal drama put up to mislead. खरे काय म्हणून दाखिवनास्क॑ असाला कराच वागणे.
नाटणी n transplantation of crops. शेतींत रोप पुन्हा रोवणे.
नाटि adj native. local. खेडच. Note :- from Tamil.
नाटि adj non-hybrid. naturally occurring. मूल सृष्टीच. Note :- from Tamil.
नाडा n a cotton tape. नाडि. कापडाच पट्टि.
नाडि n a cotton tape. नाडा. कापडाच पट्टि.
नाडि n heart pulse. हृदयाच ताळ॑.
नाडि ज्योत्स्य n name of a school of astrological prediction. एक ज्योत्स्य परंपराच नाव.
नाडि परीक्षा n diagnosis through feeling the pulse. नाडींत॑ बोट ठिवून रोगाच परीक्षा/परिशोधना करणे.
नाण्य n coin. लोहेंत केलते चिल्लर पैसा ; नाणे in sm.
नात n grand daughter. लोंकाच अथवा लेंकीच लेंक.
नातसून n granddaughter-in-law. नातूच बाईल.
नातू n grandson. लोंकाच अथवा लेंकीच लोंक.
नातें n relation. relationship. सोयरे.
नातेंसंबंध n relationships. सोयरसंबंध.
नातोंड n a grandchild. नातू अथवा नात ; नातवंड in sm.
नातोंडे n grandchildren. नातू-नातें (बहु वचन).
नाथ n lord. प्रभु. यजमान.
नाद n a musical note. संगीताच स्वर.
नादब्रह्म n the Supreme Being in the form of primordial sound. ओंकारब्रह्म.
नादस्वरम n a wind musical instrument. फुंकून वाजिवाच संगीताच एक उपकरण॑. Note :- from Tamil.
नानाप्रकार n various methods or ways. वेगळ॑ वेगळ॑ रीती. विध विध रीती. नानाविध.
नानाविध n various manners or ways. several. नानाप्रकारच. वेगळ॑ वेगळ॑ रीती. विध विध रीती.
नापत्ता adj untraceable. हुडुकूनीं मिळनाते.
नापत्ता adj missing. हरपलते.
नाभि n the navel. बोंबि ; Note:- in sm the word for बोंबि is बेंबी.
नाम n name. नांव.
नामकरण॑ n naming ceremony. लेंकरांला नाव ठिवाच/घालाच सण॑.
नाममंत्र n chanting of Gods' names. देवाच नाव जप करणे. देवमंत्र.
नाम-संकीर्तन॑ n singing of devotional songs. भक्तीसंगीत॑ सांगणे.
नाम॑ n caste mark worn by of Tamil brahmins on their forehead. तमिल ब्रह्मण लोके कपाळांत॑ लावाच जताच चिन्ह. नामम. Note:- from Tamil.
नाम॑ n noun (gram). व्यक्ति, प्राणि, साधन॑, ठिकाण, अणी मनाच कल्पनाला याच गुण-धर्म, असलतेला उद्देश करून सांगाच गोष्ट॑.
नाम घालणे id to cheat. टोपि घालणे. एमारिवणे. Note:- from Tamil.
नामम n caste mark worn by of Tamil brahmins on their forehead. तमिल ब्रह्मण लोके कपाळांत॑ लावाच जताच चिन्ह. नाम॑. Note:- from Tamil.
नायक n leader. नेता.
नायक n hero in a drama or cinema. नाटक अथवा सिनिमाच हीरो.
नायकि n heroine in a drama or cinema. नाटक अथवा सिनिमाच मुख्य नटी. नायिका.
नायलि n a mattress. नाहलि. न्याह्लि. अंथरूण. अण्थूण. लेप ; न्यहाली in sm.
नायिका n heroine in a drama or cinema. नाटक अथवा सिनिमाच मुख्य नटी. नायकि.
नायी adv no. not. नाही. नाई. निषेधाच शब्द. Note:- the word "नायी" which is more commonly used in DM than "नाही" appears to be the archaic form of "नाही" ; the root being "नये".
नार n plant fiber. कित्येक वनस्पतींत॑ दोरास्क असाच साधन॑. Note :- from Tamil.
नारळ॑ n coconut. नारळी झाडाच बीं. ओल॑ खोब्र. ओल॑ खोवर॑. ओल॑ कोवर॑.
नारळीचदूध n coconut milk. नारळांतून काढलते दूध.
नारळीचभात n an eatable made of coconut and rice. भातांत॑ वाळक॑ खोब्र अथवा ओल॑ नारळ॑ किसून घालून केलत॑ एक पदार्थ. खोब्रीच भात.
नारायण n Lord Vishnu. महाविष्णु.
नाला a drain. a sewer. नाळा. मोरि.
नालायक adj good-for-nothing. unfit. न लायक. अयोग्य॑. कसालीं प्रयोजन नाहीते.
नाळा n a drain. a sewer. नाला. मोरि.
नाव n name. नांव. व्यक्ति अथवा वस्तूच नाव.
नाव n fame. renown. कीर्ति. नांव.
नावगे adj naked. वस्त्र/कापड नेसनास्क॑ असणे. उघड आंगांत असणे. नागवे. नग्न ; नागवा in sm. Note :- see remarks against नग्न.
नावग॑ होणे id to lose all assets. to be bankrupt. आस्त पूरा नष्ट होणे. uis बरोर योचना करनास्क॑ एक मोट्ठ॑ व्यापारांत॑ घूसून तला तेवढीन नष्ट झाल॑. अत्ता नावग॑ होऊन बसलाहे.
नाश n destruction. ruin. नाशनष्ट. विनाश.
नाशनष्ट n unproductive loss. total loss.total waste. विनाश.
नासक॑ adj spoiled. rotten. नासझालत॑. कुजक॑ ; नासका in sm.
नासणे vi to spoil. to rot. हाळ होणे.
नासाडा n damage. हानि. नासाडी ; नासाडी in sm.
नासाडी n damage. हानि. नासाडा ; नासाडी in sm.
नासिवणे vt allowing to get spoiled. नाशहोयाला सोडणे.
नास्तिक॑ adj atheist. देव नाही म्हणणार.
नास्तिकपण॑ n a philosophy which denies existence of God. देव नाही अस सांगाच तत्वज्ञान॑. नास्तिकवाद॑.
नास्तिकवादि adj an atheist. देव नाही अस म्हणणार.
नाहणे vt to have an oil bath. तेल माखून आंघोळ करणे.
नाहणी n bath room. स्नान कराच खोलि.
नाहलि n a mattress. नायलि. न्याह्लि. अंथरूण. लेप ; न्यहाली in sm.
नाहिली n a thin bedding. लेप. पत्तळ अंथरूण. पत्तळ अण्थूण.
नाही adv no. not. नायी. नाई. निषेधाच शब्द. Note:- the word नायी/नाई appears to be the prakrith form of "नाही".
नाहीतर॑ conj if otherwise. ते नसलतर॑.
नाहीतर॑ conj or. की.अथवा.
नाहीतरीं adv in any case. काय झालतरीन.
नांगर n plough. शेताच जमीन तय्यार कराच एक उपकरण॑.
नांगरणार n agricultural field hand. peasant. ryot. कुणबि. शेती जमीनांत काम करणार.
नांगरणे vt to plough. नांगरून जमीन तय्यार करणे.
नांदि n worshipping one's ancestors before any important family function like marriage, thread ceremony etc. वराड, मुंज असल॑ शुभ कार्यक्रम आरंभ कराच पुढ॑ पितॄंला कराच पूजा.
नांदि बसिवणे vt consecration relating to nandi. नांदीच आवाहन॑ करणे.
नांव n name. नाम.
नि conj also. and. पणीं. uis (1) तला काहीं कळना. तो त्यंचकडे बोलाला जाताना मीनि तज बरोर जातों. (2) बंडींतून उतरलोंकिनि मी तडकून पडलों.
निकाट imp get away ! get lost ! ठिकाण सोडून जा !
निकाटणे vi to get away. to move out. to scram. to get lost. ठिकाण सोडून जाणे ; निकटणे/निकाटणे in sm. Note:- used when a person who is unwanted moves out.
निगा n care. attention. having an eye on. tending. श्रद्धा ठींगणे. गवन ठींगणे. बेष पाह्यींगणे. uis रोडावर भाजी-पाला, पंडू-फल अस विकणार बायके त्यंच ल्हान 3-4 वर्षाच लेंकराना पणीं बाजूला ठींगून बसलासतात॑. कोणतरीं ग्राहक आलतर त्यंचकडे व्यापार करेत॑ त्यंच लेंकराव॑र पणीं एक निगा ठींगतात॑.
निघणे vi to start. जायाला आरंभ करणे. uis गावांला निघताना घरचकडे "जातों" म्हणून सांगताने. "जावून येतों" म्हणून सांगांव॑.
निघंटु n a dictionary. शब्दकोश. शब्द अथवा पदाच अर्थ द्याच ग्रंथ.
निज॑ adj real. actual. true. खर॑. सत्य. वास्तव॑.
निजणे vi to lie down. शयन करणे. uis सायंकाळीच वेळ निजणे आंगाला चोखोट न्हो.
निजार n shorts. knickers. विजार. गुडिघा पतोरी झांकाच पायजामा ; इजार in sm. Note:- (1) इजार indicates long trousers in sm. (2) निजार and विजार are considered as misspellings of इजार, arising out of their use amongst the ill-educated and rustic. It is also probable that such misspellings crept into the language before written Marathi was standardised in early 19th century. Other similar examples are विंगळा and इंगळा, meaning "live coal", लांदर and रांदल, meaning "hurricane lantern" नागवे and नावगे meaning, "naked" etc.
निजिवणे vt to put to sleep. झोंपाला घालणे ; निजवणे/निजविणे in sm.
नित्तळ adj clear and dilute (liquid). non-turbid dilute (liquid). पत्तळ शुद्ध (द्रव्य) ; नितळ/निथळ in sm.
नित्य adv daily. दिवसोडि.
नित्यकर्म n daily duties. daily chores. दिवसास्क॑ असाच काम.
नित्यानंद adj ever-joyful. केम्हाहीं आनंद असणे.
नित्य प्रमाणे adv as per daily routine. दिवसास्क॑.
नित्राण n drained out feeling. the feeling of exhaustion. फार श्रमामुळे होयाच सुस्त. शीणभाग. भाग होणे. Note :- त्राण means 'strength'/'stamina'
निथळणे vi to trickle. to drip. ओहळणे. नंखर-नंखर गळणे. uis रात्रि पूरा नाहणींतल॑ नाळांतून पाणी निथळाच शब्द ऐकून मला थोडकपणीं झोंप आल नाही.
निथळणे vi to ooze. ओहळणे. नंखर-नंखर गळणे. uis कर्ज/र्रीण देलते पठान घरांत घूसाच पाव्हून मझ॑ मित्राला दिग्भ्रम होऊन आंग पूराहीन घामांत निथळाला आरंभ झाले.
निदान॑ adv slowly, not being in a hurry. सावकाश.
निद्र॑ n sleep. झोंप.
निधन n death. मरण॑. मृत्यु. uis चुलत सोयरांचपटीस कोणाच तरीन निधन झालतर॑ अम्हाला दहा दिवसाच सूतक करामते पडल॑.
निधि n hidden or burried treasure. लप्पून ठिवलत॑ संपत्त॑.
निधि n a Finance Company. पैसाच व्यवहाराच स्थापना.
निपटणे vt to apply by scraping or rubbing with fingers or hand. बोट अथव हाता वटे घासून लिंपणे. Note. usually with reference to a liquid or a paste. uis सरदारजी लोके त्यंच दाढी मीशाला मध्य मध्य तूपकी दहींकी निपटून पळपळा करींगतील॑.
निपुण adj skilful. expert. प्रवीण. कुशल.
निप्पट adj stark. पूराच-पूरा. एकदम. uis कित्येक लोक॑ त्यंच लेंकरांस॑ तीन-चार वये पतोरी (पर्यंतीन) कापड काईं घालनस्क॑ निप्पट नावगेंत (नागवेंत) हिंडाला सोडाच पाव्हून मला कंटाळा वाटते.
निबंधना n a restraing or limiting condition or clause. अडचणाच अथवा निरोधाच गोष्ट.
निब्र॑ adj grown hard. निब्बर॑ कोवळ॑ नाहीते ; निबर in sm.
निब्बर॑ adj grown hard. निब्र॑. कोवळ॑ नाहीते ; निबर in sm.
निमंत्रण॑ n invitation. आमंत्रण॑. आमंतन॑. एक कार्यक्रमाला बलावणे.
निमित्त n causative factor. a reason. कारण. uis (1) समुदायांत॑ कायतरीन बरोर नाही म्हण्जे कसा निमित्त ते झाल॑ हे कळलतर ते बरोर करणे सुलुभ असल॑. (2) निमित्त नाहीस्क हे भूलोंकांत कोंण्तीन होयना. तेवढालीन निमित्त अस्ते. अम्च हे जन्म पणीं गेल कितिकी जन्माच कर्मफल आहे. (3) बरोर वाचनाते करतां तो परीक्षांत॑ हरला. उगे ते निमित्त झाले हे निमित्त झाले अस कयकायकी लटके-फुटके सांगून तज माय-बापाला एमारिवत आहे.
निमिष॑ n a minute. एक निमिषाच समय/वेळ.
निमिष॑ n an instant. एक क्षण॑.
निम्मति n peace of mind. tranquility of the mind. मनाच शांति. मनाच समाधान॑. स्वस्थ. Note :- from Tamil.
नियम॑ n rule. law. नियन॑.
नियंत्रण॑ n control. नियंत्रण॑.
नियुक्त adj appointed. नियोग केलते.
नियुक्त adj authorised. अधिकार मिळालते. अधिकार देलते.
नियोग n appointment. एक कार्याला निश्चय करणे.
नियोजन॑ n planning. योजना.
निरपराधी adj innocent. अपराध॑ केल नाहीते.
निरंतर॑ adv constant. incessant. continual. शाश्वत॑.
निराधार adj baseless. unsubstantiated. आधार नाहीते.
निराशा n despair. disappointment. feeling of let down. आशाठिवलते होयनास्क॑ असणे. विषाद. मनाला बेजार वाटणे. निरास.
निरास n despair. disappointment. feeling of let down. निरास. मनाला बेजार वाटणे. निराशा.
निराहार॑ adj fasting. अनशे पोटाच॑.
निरीक्षण n examining closely. सूक्ष्म होऊन प्हाणे.
निरुंद adj narrow. not broad. उणे रुंदाच.
निरोध n prevent. कराला सोडनास्क॑ देणे.
निरोप n permission to leave. जायाला अनुमति. uis अम्च॑ ओफींसांत वर्लाच निरोप नाहीस्क॑ कोणीं बाहेर जायाल नाही.
निर्गुण॑ adj attribute less. गुण काहीं नसाच॑.
निर्णय n decision. निश्चय.
निर्दय॑ adj cruel. दया नाहीते. क्रूर॑.
निर्देश n instructions. order. आज्ञा.
निर्दोष॑ adj innocent. दोष नाहीते.
निर्दोषि adj innocent (person). दोष नाहीते (व्यक्ति).
निर्धन॑ adj impoverished. दरिद्र॑.
निर्बल॑ adj weak. infirm. powerless. शक्ति नाहीते. बळ नाहीते. दुर्बल.
निर्बंध॑ n compulsion. होवूनच सराम॑ अस असाच॑. uis तुम्ही ते कार्यक्रमाला जावूनच सराम॑म्हणून निर्बंध काही नाही. असौकर्य काही होयनातर॑ जांत॑, नाहीतर नोको/नको.
निर्बंध॑ n resolution. दृढ मनाच.
निर्बंध॑ n restrain. control. निर्बंध.
निर्बंध॑ n enforcement. निर्बंध.
निर्भय॑ adj fearless. भें नाहीत॑.
निर्भाग्य adj unlucky. unfortunate. भाग्य नाहीते.
निर्मल॑ adj pure. पवित्र. शुद्ध.
निर्माण adv create. उत्भव करणे.
निर्माल्य॑ n stale flowers and offerings which have been removed from the idol of a deity. देवाच विग्रहांतून काढलते फूलेहीं वेगळ॑ अर्पण॑ केलतेहीं.
निर्मूल॑ n eradication. पूरा नाहीस्क॑ करणे.
निर्वाह n maintenance. to look after. सांभाळणे. राखून ठिवणे.
नीलांजन n an oil or ghee lamp used in puja or for arathi. पूजाला अणी आरतीला उपयोग कराच तूपाच ल्हान समी.
निवणे vi to cool down. ऊन उणे होणे.
निवलते adj that which has cooled down. निवून असाच॑.
निवारण n prevention. होयाला सोडानास्क॑ असणे. बाधा घालणे.
निवास n dwelling place. abode. राहाच ठिकाण. आलय॑.
निवासस्थळ n place of residence. राहाच ठिकाण. निवास स्थान.
निवासस्थान n place of residence. राहाच ठिकाण. निवासस्थळ.
निवासि n one who resides. राहाच व्यक्ति.
निविवणे vt to allow a thing to cool down. ऊन उणे करिवणे. ऊन उणे होयाला सोडणे ; निववणे/निवविणे in sm.
निवृत्त adj rendered inactive. प्रवृत्ति राहत॑ केलते.
निवृत्ति n situation of inactivity. प्रवृत्तीच विरुद्ध॑. Note:- in conversations this term is normally used to indicate a situation where inactivity is not the option. eg. ते काम मी संतोषांत न्हो केलते. वेगळ॑ निवृत्ति नाही म्हणून करामते पडले. uis तला अहंकारीं झंपीं उदंड आहे-ते-करतां कोण्त उद्योगांत॑ असलतरीं थोड दिवसांतेच तला कामांतून काडूनटाकतात॑. वेगळ॑ निवृत्ति नाहीस्क॑ अत्ता भीक मागेत आहे.
निशब्द॑ adj silence. निश्शब्द॑. गुपचुप. शब्द॑ नाहीस्क॑ असणे.
निशागंधि n tube rose. रात्रि उगाच॑ एक फूलाच नाव.
निशी prep along with. together with.concurrent with. बरोर. सह॑. uis (1) "श्राद्ध॑ करा पुढे नीट आंघोळी करींगून सोवळेनिशी या" अस आचारे मला सांगिटले. (2) सांभार वाढताना फोडीनिशी वाढाला तला सांग.
निश्चय॑ n certainty. निश्चय॑. uis तू मला पाव्हून बोलाच निश्चय म्हण्जे मी सांगाच ठिकाणि याला तय्यार असाम॑. तिकड बसून बोलुम्हणे.
निश्चय॑ n determination. मनाच दृढपण॑. uis मझकडे काय बोलामते म्हणून तुज मनांत बेष निश्चय असलतर॑ मला येऊन पा.
निश्चय॑ n agreement. ओप्पंदम. uis तज लेंकीच वराडाच गोष्टाचवर उदंड बोलणे होत होत॑. नंतर॑ वराडाच निश्चय झालकी नाहीकी, हे मला कळ्ना.
निश्चय॑ adv certainly. without fail. positively. surely. पक्का होऊन. कंडिप होऊन. uis (1) जास्ति योचना करनाका, गांव सोडून जायाच पुढ॑ निश्चय मी तुम्हाला येऊन पाह्तों. (2) मी सांगाच तुम्हाला विसंबाला होत नाही वाटत॑. संदेह काईं नोको, निश्चय होऊन देलते गोष्ट मी करून दाखिवतों. (3) अत्तलीकडे भरजरीच कांजीवरम लुगड॑ वराडा करतां घेम म्हण्जे, एकाला मात्र वीस-पंचवीस हदार रुपे निश्चय होईल॑.
निश्चितार्थ n betrothal. wedding engagement. वराडाच पुढे करींगाच ओप्पंदम.
निश्शब्द adj silent. निशब्द. गपचुप. शब्द॑ नाहीस्क॑ असाच॑.
निषिद्ध adj prohibited. denied. disallowed. निषेध केलते. निषेध झालते. uis अम्च॑ संप्रदाया प्रकार सगोत्र वराड निषिद्ध आहे.
निषेध n denial. prohibition. condemnation. विरोध. संमत करनास्क असणे.
निष्कलंक adj spotless. stainless. pure. निर्दोष. निर्मळ. शुद्ध॑.
निष्ठा n firm adherence to integrity, faith, trust etc. गाढ श्रद्धा. गाढ अनुसरण॑.
निष्पक्ष adj impartial. पक्षपात नसाच॑.
निष्फल॑ adj fruitless. unproductive. futile. व्यर्थ.
निसणे vt cleaning and picking out the bad portions of vegetables or their skins. भाजीपालांतून शुद्ध॑/चोक्कट भाग वेंचून काढणे. Note:- नीस is the picked out good portions. uis (1) थोर समारंभाच संपाक करताना पाला/शेंगा असल भाजी निसाला एक मनुषाला तीन-चार घंटाच वेळ होईल॑. (2) मझ॑ आजीच अम्माला (पणजीला) एक दंडक होत॑. दुकानांतून भाजीपाला आणल तर॑, तजांतून निसून काढलते अग्गीन परतून दुकानवालालेच वापस देऊन तेच वजनाला अण्खीन थोडक॑ दे म्हणून निर्बंध करतील॑.
निसरडा adj slippery. निसरूडा. निसराच॑.
निसरणे vi to slip. to skid. (पांयें) चुकून पडणे.
निसरूडा adj slippery. निसरडा. निसराच॑.
निसर्ग n nature. प्रकृती.
निसर्ग n natural state or form. प्रकृतींतल॑ मूल रूप॑.
निसार adj trivial. अल्प विषयाच.
निक्षेप n deposit. placing. समर्प ठिवणे.
निंदा n condemn. censure. बरोर नाही म्हणून सांगणे.
निंब n neem tree. कडुलिंबाच झाड. निंबाच झाड.
नीघ imp start. जायाला आरंभ होण॑. निघाला आरंभ होणे.
नीच adj base. low. एकदम उणे स्थितीच॑.
नीचल n swimming. नीचल. पोगणे. पोवणे. Note :- from Tamil.
नीट adj proper. योग्य. uis तुझ॑ वागणे नीट आहे म्हणून मला वाटत नाही.
नीट adj correct. बरोर. uis कायतरीन विचारल॑तर॑ तो नीट उत्तर देईना म्हणून तला काहीं विचाराच मी सोडूनटाकलों.
नीट adj straight. सरळ. बरोर. uis नीट बैस म्हणून तिला केम्हाहीं सांगत असाम॑.
नीट adj suitable.योग्य. uis मी रेडी-मेड दुकानांतून अंगी जास्ती घेईना, पण अपरूपांत॑ एक दोन नीट असलतर॑ घेईन॑.
नीट adj orderly. क्रम प्रकार. uis ऊनांत वाळिवाला घाट्लत॑ कापड अग्गीन बरोर वाळल॑तर॑ एकएकदनांच कापड॑हीं वेगळ॑ वेगळ॑ विणी नीट मुजलून/मुदलून आंत ठिवूनटाक.
नीट करणे vt to put in order. to repair. बरोर करणे.
नीट करणे fig to take a person to task. एकाला वाटेला आणिवणे.
नीती n justice. न्याय.
नीरज n lotus. कमळीच फूल.
नीरे n pleats of a saree or dhoti. लुगडे अथवा कासोटा पदराच मुजल्लते घडी ; निरी in sm. uis कासोटा नेसताना लुगडेच कांठ बरोर दिसास्क॑ नीरे घाटलतर॑ पाह्याला बेष असेल.
निर्पाणी adj watery. very thin. dilute. नित्तळ. uis तुरीदाळीच मोल उदंड वेघला नंतर॑ होटेलांत अस्कीन सार/सांबार निर्पाणी करतात॑.
नील n blue colour. नील रंग.
नुस्त॑ adj mere. उगे ; नुसता in sm.
नुस्त॑ adv merely. उगेच॑ ; नुसता in sm.
नुंग n palmyra fruit. पनै/ताडि झाडाच फळ॑/पंडू ; ताड गोळा in sm. uis नुंग॑ मला फार अवडल॑. तजांतल॑ रस गुळ्चीट अणी स्वाद अस्त॑. Note :- from Tamil.
नृत्य n dance. नाच.
नृत्यांगण॑ n a stage for dance. नृत्याच वेदि. रंग मंच.
ने conj a conjunction to a verb indicating imperative negation. 'नको' अस॑ अर्थ द्याला क्रीयापदाला जोडाच एक गोष्ट॑. eg. "should not do it" - करताने ; "should not talk" - बोलताने etc.
नेग n ornaments. नग. आभरण॑. वस्त. माल-मत्ता.
नेता n leader. नायक. लोकांच नेतृत्व घेणार.
नेतृत्व n leadership. नायकत्व॑.
नेत्र n eye. डोळे.
नेथ n nose ring worn by ladies. नथ. नाकाच आभरण॑. नथणी.
नेवेद्य n food offered to Gods. नैवेद्य. पूजाच वेळी देवाला अर्पण कराच पदार्थ.
नेस imp wear (cloth). कापड॑ आंगा वर घालणे/गुंडाळणे.
नेसणे vt to drape clothes on body (like saree, dhoti, kasota). कापड॑ आंगावर घालींगणे/गुंडाळींगणे.(लुगड॑, धोती, कासोटा अस॑).
नेसिवणे vt to drape clothes on another person. वेगळेंस॑ कापड॑ घालिवणे ; नेसवणे in sm.
नेंद्रन n a variety of banana. एक रीतीच केळ॑. uis तज बरोरल॑ रूच पह्जे म्हण्जे नेंद्रन केळेच उप्पेरि खोब्रीच तेलांत तळलतर॑ मात्र येईल. Note :- from Malayalam.
नैवेद्य n food offered to Gods. पूजाच वेळि देवाला अर्पण कराच पदार्थ. नेवेद्य॑.
नोको imp no. do not. नको.
नोरे n foam. फेंस. uis मीठ पाणींत सोप/साबून घालून फडकी धुवलतर॑ नोरे येईना. फडकी पणीं बरोर धुवलासना. Note :- from Tamil.
नोहो adj no. न्हो. नहो.
नोंडणे vt to dig and scratch. उकरणे. Note :- from Tamil.
नोंडणे id to meddle around. मध्य पडणे. uis (1) 'लीवाच' दिवस आलतर॑ मझ लोंक काहींतरीं नोंडेत॑ असतो. नाहीतर॑ तला वेळ जाईना. (2) दोघे पोरे खेळींगत असताना एकला दुसराकडे म्हणतो "तुज लेगो ठींगून तू खेळींगे. मझ लेगो काढून नोंडूको". From :- from Tamil.
नोंडणे id to needle somebody. कोणालतरीन तंटा देणे. From :- from Tamil.
नौ n nine. आठाच नंतरल॑ संख्य ; नऊ in sm.
नौशे n nine-hundred. नौ गुणा शंभर ; नऊशे in sm.
न्याय n justice. नीति.
न्यायनीति n equity and justice. न्याय अणि नीति.
न्यायसभा n electoral assembly where laws are passed. विधान सभा.
न्यायस्थ n a just/upright person. थोर मनाच मनुष. uis कित्येक भाग्यवंत लोक॑ न्यायस्थ पणीं असतात. त्यंचकडे जमीनांत काम करणारांना, वराडाला म्हणून, लेंकरांना वाचीवाला म्हणून, व्याज घालनात॑ अणी जमीन अडमान॑ ठिवनास्क॑ कर्ज/र्रीण देतात॑. असलते चोखोट लोकांना ते गांवाच लोके देवाच समान म्हणींगतात॑.
न्यायाधीश n a judge. न्याय कचेरीच अध्यक्ष. जड्ज.
न्याह्लि n a mattress. नाहलि. नायलि. अंथरूण. लेप ; न्यहाली in sm.
न्हाणी n bathroom. नाहणी. स्नानाच (आंघोळाच) खोलि.
न्हाणे vi to take bath. नाहणे. स्नान करणे. आंघोल करणे.
न्हो adj no. नोहो. नहो.
No comments:
Post a Comment