07 March 2012







प  the twenty-first consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच एकवीसवां व्यंजन॑.

पईलवान n  wrestler. कुस्ति करणार. पहिलवान. पहलवान. पैलवान. मल्लयुद्ध करणार.

पकड n  pincers for lifting cooking vessels. चिमटा. हिडिकि (Kannada).

पकोडा n  a fried snack. एक तळलते पदार्थ.

पक्का adj  perfect. एकदम चोखोट॑.

पक्का adj  ripe. पिकलते.

पक्का adj  well seasoned. पक्का.

पक्व adj  mature. पक्का झालते. कच्चा नाहीते.

पक्व adj  fit for use. उपयोगाला तय्यार झालते. uis सोवळेच काठी कराला बरोर लायक असाच हिरव॑ बेत विस्तूच हलक॑ ज्वालाच वर पर्तीवून पर्तीवून दाखिवून सोकिवून पक्व करणे आहे. 

पखवाज n  a type of drum. एक रीतीच ढोळ.

पगडा n  dots on the dice indicating numbers, from one to six. पगडांतल॑ एक पसून सहा पर्यंतल॑ बिंदूच चिन्ह. 

पगडा n  a board-game using dice. पगडाच खेळ.

पगडी n  rental deposit for house, shops etc. घर नाहीतर/अथवा दुकान भाडेला काढताना द्याच रोक्कम पैसा. 

पगार n  salary. धर्मा. मुषारा.

पचकर्पूर n  camphene, used as a spice. एक विधाच मसाला. पचकापूर.

पचकापूर n  camphene, used as a spice. एक विधाच मसाला. पचकर्पूर॑.

पच्चडि n  salad-in-curds. दहीच एक तोंडलावण॑ (तोळ्लावणे). रायत. भरीत. Note:-  भरीत also means a preparation made from slightly burnt brinjal.

पज्जते adj  that which is wanted. पह्जते. आवश्य आहे अस मनाला वाटाच॑.

पज्जत्ति n  humiliation. dishonour. फजिति. अवमान/अपमान.

पज्जे vi  required. पह्जे. आवश्य आहे ; पाहिजे in sm.

पज्जेम्हणून adv deliberately. पह्जेम्हणून. कळींगून॑.

पज्जेस्क॑ adv  as per desire. as per requirement. पह्जेस्क॑. पह्जेते प्रकार. पज्जते प्रकार.

पट n  cinema film. चित्रपट. सिनिमा. पेट. uis हे काळांत॑ याच पटांतल॑ अश्लीलीं असभ्यहीं पाह्यलतर॑, तसलते पट एक कुटुंब पूरा बसून पा्ह्याला लायक नाहीते म्हणून सांगूया.

पट n  framed picture. चित्र. पेट. uis "डिजिटल फ्रेम" आल नंतर घरांत॑ भिंतीवर पट/पेट अडकिवणे उणे झालाहे.

पट n  a sketch. a drawing. हातांत होढलते(ओढलते) चित्र. पेट. uis एकशे वर्ष पुढे राजा रवि वर्मा होडलते/ओढलते पट अत्तपणीं देशांत॑ उदंड प्रचारांत आहे.

पटार n  a sound (created while slapping). (रपाटा होढताना/ओढताना/देताना होयाच) शब्द. फटार. पळार.

पटीस adv  by the side. बाजु. 

पट्ट-घालणे vt  to apply a medicinal paste (eg. of vibhuthi on the forehead for runny nose and of tamarind on any other limb for pain relief). मलम पट्टि बांधणे ( उदाहरण: पडसाला कपाळांत॑ विभूति लावणे अण्खी आंगाच वेगळकड॑ सूळ/सूज असलतर चिंचाच पट्टि बांधणे). uis  मझ माय मला पडसा/खोंकळा असतम्हा/असताना वीभूतिच पट्ट घालतील. दूसर दिवसच नाकांसून पाणी गळणईं खोंकळाईं राहून जाते.

पट्टण॑ n  city. नगर॑.

पट्टण॑ n  Madras city. Chennai. मद्रास पट्टण॑. चेन्नै.

पट्टम n  kite. पतंग. Note :- from Tamil.

पट्टराणि n  queen consort. chief queen. राजाच मुख्य पत्नि.

पट्टा n  cinnamon bark. संपाकाला उपयोग कराच एक वनस्पति. लवंग पट्टा ; दालचिनी in sm.

पट्टा n  a document evidencing ownership of land. जमीनाच वर अधिकार दाखिवाच एक पत्र.

पट्टा n  a waistband of gold worn by women. बायका मादांत बांधाच एक आभरण॑. ओड्याणम (Tamil/Telugu). uis एक सोनेच पट्टा वीस तोला वजन असत॑. तज मोल उणेपक्षा चार लाख रुपे तरीन होईल.

पट्टा n  a flat strip. एक लांब चपटा, उण॑ रुंद आकाराच साधन॑. पट्टि.

पट्टाकि n  fire-crackers. पट्टास. फटाकि.

पट्टाणि n  sweet peas. एक भाजीपाला ; वाटाणा in sm. Note :- from Tamil.

पट्टापट्टि adj  criss-cross. अडवे-तिडवे ठिवलते पट्टि. 

पट्टाभिषेक n  coronation. राज्याभिषेक॑. राज्यभाराच पदवि देणे.

पट्टास n  fire-crackers. पट्टाकि. फटाका.

पट्टि n  a narrow flat strip. रुंद उणे, पण, लांब असाच एक पत्तळ वस्तु. पट्टा.

पट्णि n  starvation. अनशी पोट. Note :- from Tamil.

पठन n  reading. recitation. वाचणे.

पठाण n  a person of Pathan tribe. पठाण वर्गाच एक मनुष॑/व्यक्ति.

पडणे vi  to fall. to tumble. पडणे.

पडणे vi  to happen. होणे. uis (1) मझ॑ अत्तापुढे पडाच उजलादिवसाला मी गांवांत॑ (गामांत॑) असना. (2) घरांत॑ चोर्टा पडलानंतर॑ अम्ही मागलेईं पुढलेईं कवाडाला लोहेच खिळी घाटलों.

पडतोरे n  step(s) on the edge of a river bank, pond or temple tank. नदि, नाहीतर कुंडाच, नाहीतर पुष्करणीच कांठशीच पायरी. Note :- (1) Probably from the Tamil पडि+तुरै, implying, steps by the side of a water body. (2) पाडथर/पाडथरा/पाटथर/पाटथरा in sm. If the root word is of Tamil origin, then the SM word could be a morphed loan-word from Tamil.

पडतोरे n  the smooth and level stone of a door-step by the threshold of a house.  उंबराच बाजूच पायरी. Note :- पाडथर/पाडथरा/पाटथर/पाटथरा in sm. 

पडतोरे n  a flight of steps. steps. पायरी.

पडवळ n  snakegourd. पडवळी. एक भाजीपाला.

पडवळी n  snakegourd. पडवळ. एक भाजीपाला.

पडसा n  common cold. running nose. जलदोष. नाकाला याच एक रोग. नाकांतून पाणी गळणे ; पडसे in sm.

पडसावली n shadow. पडसोली. एकाव॑र उजाड/प्रकाश पडून होयाच सावली. Note :- care, सावली or साउली means "shade", ie, where the Sun's light or heat does not fall.

पडसोली n shadow. पडसावली. एकाव॑र उजाड/प्रकाश पडून होयाच सावली.

पडि suff a suffix of Tamil origin. अरव॑ भाषांतून आलते एक प्रत्यय. eg. नित्यपडि meaning, "as per every day". Note :- from Tamil. 

पडून पडून हांसणे fig  rolling with laughter. having fits of laughter. नियंत्रण नाहीस्क॑ हांसणे.

पण conj  also. too. पणीं. ईं.

पण conj  still. yet. तरीं.

पण conj  but. झालतर॑.

पण॑ suff  a suffix attached to a noun or an adjective to form an abstract noun. एक नाम॑ अथवा एक विशेषणाच शेवटी जोडून एक अव्यक्त नाम॑ कराच शब्द॑.   

पणजा n  great grandfather. बापाच अथवा अम्माच/मायाच आजा.

पणजि n  great grandmother. बापाच अथवा अम्माच/मायाच आजि.

पणत॑ n  great granddaughter, through male or female descent. नातूंच नाहीतर॑ नातांच लेंक (दादिगा नाहीतर॑ बायका वाटे). पणती.

पणती n  great granddaughter, through male or female descent. नातूंच नाहीतर॑ नातांच लेंक (दादिगा नाहीतर॑ बायका वाटे). पणत॑.

पणतुंडे n  great grandchildren. नातूंच नाहीतर॑ नातांच लेंकरे.

पणतू n  great grandson, through male or female descent. नातूंच नाहीतर॑ नातांच लोंक (दादिगे नाहीतर॑ बायका वाटे). uis दादिगा वंशजांत॑ नातूच लोंक, म्हणजे, पणतू उजलतर॑ पणजाला कनकाभिषेक करणे आहे.

पणस n  jack fruit. फणस. एक फळाच नाव.

पणि n  a comb. फणि. केंस विंचराच साधन॑. विंचरणी.

पतंग n kite. पट्टम (Tamil). uis दुसरे पोरे पतंग आकाशांत॑ उडिवताना तज दोरा कापाला कित्येक वक्र बुधीच पोरे प्रयत्न करतील॑. हे कामाला तेन्ही मांजाच दोरा प्रयोग करणे आहे.

पताका n  flag. ध्वज॑. गुढि. कोडि (Tamil).

पतिव्रता n  a dutiful and chaste wife. एक पवित्र पत्नि.

पति n  husband. दल्ला. दाल्ला.

पतोरि prep. till then. पर्यंत॑. पर्यंतीन ; पावेतो in sm.

पत्तळ adj  thin and flat. बरीक हलक॑ चपटा ; पातळ in sm. uis जुनेकाळांत॑ मिळतहोतते पात्र/भांडि अस्कीन घट्टि होते. अत्ता मिळाच नुस्त पत्तळ अस्ते.

पत्तळ adj  watery. dilute. नित्तळ. पाणीस्क॑. पाणी सार्ख ; पातळ in sm. uis आज दुपारा जेवलते होटलांत॑ जेवण॑ बरच होतनाही. सांभारीं सारीं पत्तळ होते. दाळ आवश्याजोक्त घाट्ल नाही वाटते.

पत्तळ adj  faint. बरीक. uis  क्रिष्णतुळसिच पान पत्तळ जांबळ॑ रंगाच अस्ते.

पत्ता n  address. अड्रस. विलासम (Tamil). एक घर, दुकान अथवा कचेri कोण्त॑ ठिकाणी आहेम्हणून कळिवाच विवर॑.

पत्ता n  leaf. पान.

पत्ता n  playing card. खेळाच पत्ता.

पत्र n  postal letter. तपालाच कागद॑.

पत्रावळि n  dried leaves of a particular type stitched together to form a circular dining leaf. एक रीतीच वाळलते पानांत॑ शिवून केलते जेवाला उपयोग कराच पान ; पत्रावळ in sm.

पत्नि n  wife. बाईल.

पथ्य n  restricted or special diet due to health reasons. आरोग्याला आवश्यप्रकार कराच/खायाच विशेष जेवण॑. uis तो येतां-येतां विपरीत फुगत आहे. पथ्याच जेवण॑ करून वजन उणे करींगणे तलाच चोक्कोट.

पथ्य n  the regimen of diet. खाणे पीणेच बरोरल॑ व्यवस्था.

पद n  a word. गोष्ट. वाक्. शब्द.

पद n  metrics in a poem. poetic meter. पद्याच पद.

पद n  a foot. पांय.

पद n  a foot step. पाऊलि.

पद n  a foot print. पाउलि. पायेंच छाप/मुद्रा.

पद n  a position or rank in an office. पदवि.

पद n  proper method. बरोरल॑ रीत॑. uis साराच पुड करताना काय-काय घालामकी ते अग्गीं बरोरल॑ इषोबांत घालून बरोरल॑ पदांत॑ भाजून पूड केलतर॑ घम-घम वासाच सार होईल॑.

पदक n  an ornamental pendant. (माळांत॑) लोंबून घालाच एक आभरण॑.

पदक n  medal of honour. प्रशंसाच मुद्रा.

पदयात्रा n  a walkathon for a cause. एक प्रत्येक कार्याकरतां कराच एक लांब चालणे/प्रवास॑.

पदर n  the decorated border or end of a saree or dhoti. लुगडच अथवा/नाहीतर धोतीच शेवटि भागांत॑ अलंकारांत॑ ओवलते भाग.

पदर n  a fold of a cloth. कापडच एक घडि.

पदर n  strand of necklace. माळाच पदर.

पदरफेणि n  a type of sweet preparation. एक रीतीच गुळ्चीट पदार्थ. फेणि.

पदवि n  position of power. rank. station. title. एक थोर स्थान॑. पद॑.

पदाधिकारि n  an office bearer. उद्योगाच अधिकारि.

पदार्थ n  a thing. एक वस्तु. एक साधन॑.

पदार्थ n  an eatable. खायाच पदार्थ.

पद्धत॑ n  traditions. a course of practice. संप्रदाय. पद्धति. परंपरांत्सून याच रीत॑. uis गेल पन्नास/शंभर वर्षापसून अलोपति चिकित्सा प्रसिद्ध झालाहे तरीन, कित्येक रोगांला अमचेच देशी पद्धतांतच, म्हण्जे, आयुर्वेद वैद्यांकड गेलतरच बोरोर होईल.

पद्धति n  a formal method. संप्रदाय. पद्धत॑.

पद्म n  lotus. कमळीच फूल. तामरै (Tamil).

पद्मनाभा n  Lord Vishnu with lotus on his navel. बोंबींत॑ (नाभांत॑) पद्म रूपाच महाविष्णु.

पद्मा n  Goddess Lakshmi. महालक्ष्मि.

पद्माकर n  Lord Vishnu. महाविष्णु.

पद्मासन॑ n  a posture in Yoga. योगाच एक आसन॑.

पद्मिनि n  lotus plant. कमळीच फूलाच झाड.

पद्य n  a verse. कविता लिव्हाच रीत॑.

पद्य n  poetry. कविता.

पनैमरम n  palmyra tree. ताडीच झाड. uis पनैमरमांतून "टोडि" काढाच विना तजांतून नुंग॑ पणीं मिळते. Note :- from Tamil.

पन्नास n  fifty. पांच गुणा दहा.

पन्हा n  a certain width of cloth. कापडच एक प्रत्येक रुंद॑.

पपई n  papaya. पपया पंडु.

पपया n  papaya.  पपई पंडु.

परकोर n  a long skirt worn by girls. माज अण्कि पांये दिसनास्क॑ पोरीलोके नेसाच एक वस्त्र ; परकर in sm.

परकोर n  petticoat. बायके नेसाच आंतल॑ एक वस्त्र ; परकर in sm.

परकोर n  sepal. the greenish stem by which brinjal hangs from the plant. वांगीच देठ. कानचोळी. 


परकोरपदर n  a half-saree worn by girls. परकोर दावणि (Tamil). uis हे काळांत॑ सलवार-कमीज़ाच जास्ति उपयोगामुळे बायकापोरींच मध्ये परकोरपदर नेसाच दंडक फार उणे झालाहे.

परटीण n washerman's wife. परीटाच बाईल. धोबीण॑. धोबीच बाईल.

परणे n  loft. attic. सद्याला उपयोग नसाच वस्तु दत्तन/जत्तन ठिवाला छप्पराच खालीं खोलीच वरीं असाच स्थळ. uis  कसालतरीन उपयोग होईल म्हणून मझ॑ आजा जुने र्रट्टाच डब्बा मिळ्लतर॑ ते काढून परणेच वर घालतील॑. Note :- from Tamil.

परत adv  again. पुन्हा. पुन्हाईं. परतूनीं. पर्तूनीं.

परत adv  reverse. उलटा.

परतणे vt  to return. पर्तणे. वापस येणे. पर्तून(परतून) येणे .  uis तो रेल्वे-स्टेषनाला जाऊन पावजोरी, ट्रेन निघून गेल होत॑. परतून घराला येऊन उद्या-नंतरच ट्रेनांत गेला.

परतणे vt  to turn back. पर्तणे. मागेपटीस फिरण॑. uis एक दिवस मी बीदींत॑ चालत अस्ताना पुढे एकले जातहोते. तेनी मझ मित्रका नाहीका म्हणून मला संशय होत. तरीं, त्यंच नाव हळू वरडून बलावलोंकी-नाही, तेनी समच परतून पाह्यले.

परतिवणे vt  to reverse. to turn around. पर्तिवणे. मागे-पुढे फिरिवणे. उलटा करणे ; परतवणे/परतविणे in sm. uis ते कागदाच मागे काय लिवलाहे म्हणून परतिवून पाह.

परतिवणे vt  to turn upside down. पर्तिवणे. उलटा करणे ; परतवणे/परतविणे in sm. uis अम्च घरांत प्रति एक घंटेला परतिवून ठिवाच एक जुने काळच "हवर-ग्ळासाच" घडिगार होते.

परतिवणे vt  to flip through (a book etc.). पर्तिवणे. (पुस्तकच) पान पुढे-पुढे करणे ; परतवणे/परतविणे in sm.  uis फोटो-आल्बमाच एक-एक पानीं परतिवून-परतिवून पाहाचपक्षा, कंप्यूटरांत॑ स्लैड-षो पाहणे सुलुभ अस्ते ! 

परतिवणे vt  to turn over. to flip over. पर्तिवणे  ; परतवणे/परतविणे in sm. uis धिरडेच पीठ तवांत चिकटून बरोर परतिवाला झाल नाही-ते-करतां आज पाष्टे मी केलते धिरड॑ करपून गेल॑.

परतून adv  once again. पुन्हा. पर्तून. परतूनीं ; परत in sm.

परतून परतून adv  again and again. repeatedly. पुन्हा-पुन्हा. पर्तून पर्तून ; परत-परत in sm.

परतूनीं adv  again. पुन्हाईं. पर्तूनीं.

परदेश n  foreign lands. विदेश.

परदेशि adj  relating to a foreig land. वेगळ॑ देशाच (मनुष). विदेशाच (मनुष).

परम adj  highest or best in order, value etc. सर्वापक्षा श्रेष्ट.

परमगुरु n great spiritual teacher. गुरुश्रेष्ट.

परममर्यादा n  great honour/respect. राजमर्यादा. uis रामनवमि महोत्सव कार्यक्रमांत एकदा राज्याच "गवरनराला" मुख्य अतिथि म्हणून बलावल्होते. ते दिवसी त्यांस॑ परममर्यादा/राजमर्यादा करून स्वागत केले. दारांतून पूर्णकुंभासहित वेद पारायण करत तेना आंत बलांय्गून आले.

परमा n  the day-after tomorrow. उद्याच नंतरल॑ दिवस. उद्या-नाही-परमा ; परवा in sm. Note:- परमा in sm denotes "sexually transmitted decease".

परमा n  the day-before yesterday. कालच पुढेच दिवस. काल-नाही-परमा ; परवा in sm.

परमाणु n  atom. एक वस्तुच ल्हानाचपक्षा ल्हान अंश॑. अणु.

परमात्मा n  Supreme Soul. परब्रह्मा.

परमादिवस n  the day-after tomorrow. उद्याच॑ नंतरल॑ दिवस. उद्या-नाही-परमा. परमाशि. 

परमादिवस n  the day-before yesterday. कालच पुढेच दिवस. काल-नाही-परमा. परमाशि.

परमानंद n  supreme bliss. परम आनंद॑. परम सुख॑.

परमान्न n  rice-kheer presented in oblations. देवाला नेवेद्य कराच भाताच खीर. पाल पायसम. Note:- said to be a favourite of Lord Krishna. uis मझ मित्र घरांत घूसतानच विचारले "आज तुम्च घरांत सणाला काय पंचपक्ष परमान्न केलाहेंत का ?"

परमार्थ n  the ultimate truth. सर्वश्रेष्ट सत्य॑.

परमावधि adv  maximum possible. अत्यंत॑.

परमाशि n  the day-after tomorrow. उद्याच॑ नंतरल॑ दिवस. उद्या-नाही-परमा. परमादिवस. 

परमाशि n  the day-before yesterday. कालच पुढेच दिवस. काल-नाही-परमा. परमादिवस.

परलोक n  the other world. the world of departed souls. मृत्यू नंतर प्राप्त होयाच ठिकाण. Note :- as opposed to इहलोक, this world.

परवा n minding. पर्वा. uis अम्च परिचय उजंड वर्षांतून आहे तरीन, काल बीदींत तो मला पाह्ताना परवा करनास्क॑ डोस्के ते पठीस करींगून गेला.  निवृत्ती

परवा n  caring (about). heed. (showing) concern. पर्वा. परवा करणे.

परवाकरणे vt  to show concern. to be mindful. पर्वा करणे. दुसरेंच स्थितीवर चिंता करणे. श्रद्धांत॑ पाह्यींगणे.

परवानाही u  "it is alright". "it is ok". "not bad". "never mind". चालेल. Note :- this usage is identical with the Tamil usage परवा इल्लै. The word परवा is common to many Indian languages.

परशु n  battle axe. युद्धाच एक आयुध॑.

परशु n  Lord Parasuram's weapon. परशुरामाच आयुध॑.

परसा n  stools. जीर्ण होऊन बाहेर आलते (विसर्जन॑ झालते) पदार्थ. Note:- the word परस or परसू means "an enclosure in the back yard of a house". Hence going to the backyard to answer the call of nature is spoken of in DM as परसाकडे जाणे/परसापटीस जाणे. From this, the word परसा is derived in DM to mean "stools".

परसाच खोलि n lavatory used for defecation. हगाच खोलि. परसाकडे. परसापटीस.

परस्त्री n  a woman other than one's wife. स्वंत॑ बाईल नाही, वेगळ॑ बायको.

परस्थान n  alternate or another departure point in lieu of home (so as to avoid the ill effects of a departure at an inauspicious time). अपशकुन होईनास्क॑ असाला स्वंत घरांतून निघनास्क॑ वेगळ॑ कडून निघाच ठिकाण.

परस्पर adj  mutual. reciprocal. एकालेक. अन्योन्य.

परंतु conj  but. yet. nevertheless. पण. तरीन.

परंपरा n  tradition. जुने कालांतून याच पद्धत॑.

परंपरागत॑ adj  traditional. परंपरांतून याच.

पराक्रम n  attack. आक्रमण.

पराख पाह्णे vt  looking out aimlessly. काहीं उद्धेश/गवन॑ नाहीस्क॑ पाह्णे. uis एकदपा बेंगळूरांत मझ लोंक रोडाच सिग्ननलाकडे ओठाकून पराख पाह्त असताना कोणकी तझ "पर्स" बडीवूनटाकला.

पराजय n  defeat. हरणे.

परात n  a large plate used for setting/making sweets like barfi, mysore pak etc. बर्फ़ी, मैसूरपाक असल॑ पदार्थ कराच एक थोर ताट.

पराधीन adj  dependent on others. दूसरेंच आश्रयांत असणे. दूसरेंच सहाय आवश्य असाच परिस्थिति. uis अम्ही फार म्हातारे झालावर पराधीन होऊन जातों. असाच खोलींतून नाह्णीला/परसूला जायाला पणीं दुसरेंच सहाय पह्जेस्क अस्ते.

पराधीन adj  under the sway or control of others. दूसरेंच नियंत्रणांत असणे. uis अंच देश जवळ-जवळ दोनशे वर्ष ब्रिटनाच पराधीनांत होते.

परापरा adj  the rasping or grating sound produced (due to tearing paper, cloth etc). (कागद, कापड फाटताना होयाच) गरगरा शब्द. uis ल्हान लेंकराना विध-विध शब्द ऐकाला अवडल॑. समाचार पत्र हाती मिळलतर॑ समच ते कुसकरून फाटून परापरा शब्द करतील॑.

परामर्श n  enquiry. विचारणा करणे. uis  मझ बाईलीच "पासपोर्ट अप्लिकेषन" पाटिवून दोन महिने होत आहे. पण अत्तपतोरी "पोलीस" परामर्श कराला आलेनाहीते. फारच उशीर करतात॑.

परायधन n  other's wealth. दूसरेंच धन. uis परायधनावर केम्हाहीं आशा भोगताने. कसतरीन तसलते चूक वाट अम्ही  काढींगटल तरीन अम्चकढे ते राह्यिना.

परिक्रमा n  circumambulation in a temple. देऊळांतल॑ प्राकार. देऊळाच भोंताले प्रदिक्षणा कराला असाच वाट ; परिक्रम in sm.

परिचय n  mutual introduction. एकालेक कळींगणे.

परिचय n  acquaintance. एकालेक कळून असणार.

परिचय n  familiarity through use, practice etc. वागून, नाही, अभ्यास करून कळ्ळते.

परीटीण॑ n  washer woman. washerman's wife. कापड धुवणारी बायको ; परटीण in sm.

परिणाम n  consequence. effect. परिणाम.

परिणाम n  end result. product. शेवटि झालते फल॑.

परिणाम n  conclusion. परिणाम.

परिणाम n  change in condition, form, state etc. परिणाम.

परिताप n pity. दया. uis मुसलमानांच बक्रीद सणाला म्हणून विकाकरतां बांधून ठिवलसाच बक्रा पाह्यलतर॑ अम्हास परिताप वाटेल॑. 

परिधि n  limit. सीमा.

परिपालन n  taking care of. giving support. सुरक्षा देणे. uis अत्ता अम्च देशांत पोलीसाच परिपालन काहीं असास्क वाटत नाही. गुंडे लोकांच राज्य आहे. नेतालोक अणी गुंडे दोघीं मिळून सरकाराच जमीन-पैसे हडप करत आहेते. हे व्यवहार कोणतरीं बाहेर कळीवलतर॑ तेना मारूनटाकाला तेनी एक निमिषपणीं योचना करनात.

परिपूर्ण adj  in full measure. संपूर्ण. परिपूर्ती.

परिमळ॑ n  fragrance. चोखोट वास. सुगंध.

परिवर्तन n  transformation. change in character, nature etc. असाच स्थितींतून व्यत्यास होणे.

परिवार n  family members. कुटुंबांतल॑ लोक॑.

परिवार n  descendants. वंशज.

परिवार n  retinue. followers. सदा बरोर येणार लोक॑.

परिशुद्ध n  pure. पवित्र.

परिश्रम n  effort. प्रयत्न.

परिषद n  a conference. a congregation. सभा. मंडळ.

परिष्करण॑ n  changing for the better. असाच स्थितींतून बदलिवून चोक्कोट करणे. 
         
परिष्करण॑ n  renovation. पुन्हा नव॑ करणे.

परिसर n  environment. surroundings. भोंतालच॑ ठिकाण.

परिसंचना n  a ritual done before partaking of food. जेवाच पुढ॑ कराच एक पद्धत॑. 

परिस्थिति n  situation. condition. असाच स्थिति.

परिहार n  remedy. उपाय.

परिहास n  ridicule. मष्किरि. अपहास. उपहास.

परीट n  washerman. धोबि.

परीक्षा n  examination. परीक्षण॑.

परीक्षण॑ n  examination. परीक्षा. परिशोधन॑.

परोपकार n  philanthropy. उदारपण॑.

परोपकारि adj  a person with a helping nature. दुसरेंला सहाय कराच मन्न असणार.

पर्तणे vt  to return. परतणे. वापस येणे. पर्तून(परतून) येणे  ; परतणे in sm. uis तो रेल्वे-स्टेषनाला जाऊन पावजोरी, ट्रेन निघून गेल होत॑. पर्तून घराला येऊन उद्या-नंतरच ट्रेनांत गेला.

पर्तणे vt  to turn back. परतणे. मागेपटीस फिरण॑ ; परतणे in sm. uis एक दिवस मी बीदींत॑ चालत अस्ताना पुढे एकले जातहोते. तेनी मझ मित्रका नाहीका म्हणून मला संशय होत. तरीं, त्यंच नाव हळू वरडून बलावलोंकी-नाही, तेनी समच पर्तून पाह्यले.

पर्तिवणे vt  to reverse. to turn around. मागे-पुढे फिरिवणे. उलटा करणे. परतिवणे ; परतवणे/परतविणे in sm. uis (1) ते कागदाच मागे काय लिवलाहे म्हणून पर्तिवून पाह. (2) चूली वरच धिरडे फाटनास्क॑ बेष पर्तिवांव॑ म्हण्जे तवाच भोंताले आवश्या प्रकार तेल घालून, नंतरच पीठ घालुया.

पर्तिवणे vt  to turn upside down. परतिवणे. उलटा करणे ; परतवणे/परतविणे in sm. uis अम्च घरांत प्रति एक घंटेला पर्तिवून ठिवाच एक जुने काळच "हवर-ग्ळासाच" घडिगार होते.

पर्तिवणे vt  to flip through (a book etc.). परतिवणे. (पुस्तकच) पान पुढे-पुढे करणे ; परतवणे/परतविणे in sm.  uis फोटो-आल्बमाच एक-एक पानीं पर्तिवून-पर्तिवून पाहाचपक्षा, कंप्यूटरांत॑ स्लैड-षो पाहणे सुलुभ अस्ते ! 

पर्तिवणे vt  to turn over. to flip over. परतिवणे ; परतवणे/परतविणे in sm. uis (1) धिरडेच पीठ तवांत चिकटून बरोर पर्तिवाला झाल नाही-ते-करतां आज पाष्टे मी केलते धिरड॑ करपून गेल॑. (2) चूली वरच धिरड॑ फाटनास्क॑ बेष पर्तिवांव॑ म्हण्जे तवाच भोंताले आवश्या प्रकार तेल घालून, नंतरच पीठ घालुया.

पर्तून adv  once again. पुन्हा. परतून. परतूनीं ; परत in sm.

पर्तून पर्तून adv  again and again. repeatedly. पुन्हा-पुन्हा. परतून परतून ; परत-परत in sm.

पर्तून पाह्यनास्क॑ असणे id  to ignore deliberately. पह्ज॑म्हणून अवगणना करणे. uis मोट्ठ॑ मनुष झालांपिरी तो तज जुने मित्रांस॑ पर्तून पाहाला पणीं तय्यार नाही म्हणून मी ऐकलों.

पर्तूनीं adv  again. पुन्हाईं. परतूनीं.

पर्दा n  a curtain. हेपटीस-तेपटीस दिसनासक॑ असाला अडवे बांधाच एक कापड.

पर्दा n  a veil. बुर्खा.

पर्यंत prep. till then. पतोरि. पर्यंतीन.

पर्यंतीन prep. till then. पतोरि. पर्यंत.

पर्याय n  a procedure (for effecting a ceremonial change). अधिकार बदलाला कराच एक व्यवस्था/कार्यक्रम. uis उडुपि श्रीक्रिष्णाच देऊळांत प्रति दोन वर्षाला पर्याय अस्ते. हेजमुळे ऊडुपींत असाच आठ मठाधिपतीलीं देऊळ चलिवाला अवसर/संदर्भ मिळते. श्री मध्वाचार्य त्यंच काळांतच केलते व्यवस्था हे.

पर्व n  a section of an (epic) book. (पुराण) ग्रंथांत॑ एक भाग. 

पर्वत n  a mountain. एक मोट्ठ॑ डोंगूर.

पर्वा n  concern. care. परवा.

पर्वाकरणे vt  to show concern. to be mindful. परवा करणे. दुसरेंच स्थितीवर चिंता करणे. श्रद्धांत॑ पाह्यींगणे.

पर्वानाही u  "it is alright". "it is ok". "not bad". "never mind". चालेल. Note :- this usage is identical with the Tamil usage परवा इल्लै. The word परवा/पर्वा is common to many Indian languages.

पलट imp  turn over. उल्टा करिवाच ; पालट in sm.

पलटणे vt  to turn over. उल्टा करिवणे ; पालटणे in sm.

पलहार n  snacks. light refreshments. उपहार. पलाहार. फलहार. फलाहार. लघु-भोजन॑. लघु-भक्षण॑.  Note:- फल+आहार.

पलंग n  cot. निजाला उपयोग कराच एक साधन॑.   
 
पलाहार n  snacks. light refreshments. उपहार. पलहार. फलहार. फलाहार. लघु-भोजन॑. लघु-भक्षण॑.  Note:- फल+आहार.

पलीकडे adv  on the farther side. yonder. दूर पटीस. Note :- opposte of अलीकडे.

पलीकडे adv  at a prior or remorter date or period. previously. गेल॑ समय. अगोदर काळ. जुने काळ. Note :- opposte of अलीकडे.
   
पल्लक n  palanquin. डोली. पालखि. पाल्खि. Note :- from Tamil. 

पल्लम n  money. wealth. पैसा. धन. Note:- the word पल्लम is derived from  फल्लम/फलम, a small gold coin which was used circa 3 centuries back. It was at that time worth about three rupees.

पल्लमदार n  wealthy person. पैसावंत॑.

पल्लांकुळि  n  a game played with small red berry like seeds and a wooden board with several cup like depressions. गोटकर्णि. एक खेळाच नाव. Note :- from Tamil. 

पल्लु n  the end portion of a saree with the decorated weave. लुगड॑च शेवटीच अलंकार केलते भाग. लुगड॑च पदर ; पल्लव in sm.

पळणे vi  to run. to flee. पळून जाणे.

पळणे vi  to flow (eg, water). प्रवास करणे. Note :- from Tamil (ओडर तण्णि, flowing water). uis अम्ही लेंकरे अस्ताना नदींत स्नान करत होतों. पण, पाऊसाळाच समयांत नदीच पाणी जोर होऊन पळत असेलकरतां, थोरळे अम्हाला नदीच बाजूपणीं जायाला सोडनाते.
 
पळा-पळि n  running around. running hither and thither. इकडे-तिकडे पळणे ; पळापळ in sm.

पळार n  a sound (created while slapping). (रपाटा होढताना/ओढताना/देताना होयाच) शब्द. फटार. पटार. uis ते पोर उदंड चेष्टा करत होता. तला पळारशी दोन रपाटा होढलांपिरी शांत झाला. Note :- from Tamil.

पळि n  ladle. जेवाच पदार्थ भांडींतून काढाला उपयोग कराच एक साधन॑.

पळिच n  dazzling brightness. झळक॑. फळिच.

पळि पंचपात्र n  a set of a small spoon and tumbler used for pooja. पूजाला उपयोग कराच एक ल्हान उद्धरणीहीं पात्रहीं. पळि-पंचोत्र.

पळि पंचोत्र॑ n  a set of a small spoon and tumbler used for pooja. पळि-पंचपात्र.

पळिवणे vt  to chase. दूसरेंस॑ एक ठांमांतून पळिवणे ; पळवणे/पळविणे in sm.

पळिवणे vt  to drive (a car, cart etc). गाडि अथवा बंडि हांकणे.

पळ्ळम n  a depression in a surface.  पळ्ळम. तळांतल॑ खालच॑ भाग. Note :- from Tamil.

पवन n  a unit of measure (equal to eight grams) for weighing gold and silver. सोन॑ अण्खी रुपेच वजन पाह्याच एक माप (आठ ग्रामाच तुल्याच॑). uis मध्यम वर्गाच लोक पणीं पंध्रा-वीस पवन सोनेच वस्था वराडांत घालतात॑. अत्तच मोलाला तेच तीन लाख रुपे होऊन जाते. Note :- from Tamil.

पवन n  Lord Hanuman's father's name. श्री हनुमानाच बापाच नाव.

पवळा n  coral. एक रत्न. पवळी ; पोवळा/पोवळीं/पोवळें in sm.

पवळी n  coral. एक रत्न. पवळा. uis कित्येक नक्षत्राला पवळीच आभरण होऊन येईना म्हणून सांगण आहे, पण ते कित्ति खरे म्हणाच मला कळना.

पवित्र adj  holy. परिशुद्ध.

पवित्र n  holy darba grass twisted and worn in finger during a religious ritual. पूजाच वेळी बोटांत घालाच दर्भाच साधन॑.

पशु n  animal. मृग॑.

पशुपति n  Lord Siva. भगवान शंकर.

पश्चाताप॑ n  repentance. remorse. केलते कार्य चूक म्हणून संकट वाटणे.

पश्चिम n  west. सूर्य अस्तमन होयाच दिक्.

पसरणे vt  to spread (all over). विखुरणे. uis मताच (धर्माच) नावांत॑ समुदायांत॑ उपद्रव पसरणांला थोडपणीं दया दाखिवताने.

पसरणे vi  to spread (all over). विखुरून असणे. uis समुद्रांत मिळाच ठिकाणि गोदावरि नदि सुमार दोन किलोमीटर पतोरी (पर्यंतीन) पसरून प्रवाह कराच दृश्य पाह्याला अतिशय असत॑. 

पसारा n  spread out. scattered. पसरून असाच. uis एक दिवसी मझ खोलींत मी अफीसाच कागद, पुस्तक सर्वीं खाले घालून तेवढीन वेगळ-वेगळ 'सेट' करत अस्ताना मझ माय येऊन म्हण्ट्ले " हे काय पसारा करींगून बसलाहेस॑. ते-ते दिवसीच 'फ़ैल' करींगाला होयनाका ?"

पसून prep  a preposition implying "from (a place/time etc.)". "(एक ठिकाण/वेळ) सोडून पुढे" असलते अर्थ द्याच शब्दयोगि अव्यय ; पासून in sm.

पहलवान n  wrestler. कुस्ति करणार. पहिलवान. पईलवान. पैलवान. मल्लयुद्ध करणार.

पहिलच॑ adj  that which was/is first. पह्यिलच॑. प्रथम होतते.

पहिलवान n  wrestler. कुस्ति करणार. पैलवान. पईलवान. मल्लयुद्ध करणार.

पहिले adj  in the beginning. at first. पह्यिले. आरंभाच वेळि ; पहिला in sm.

पहिले adj  first. पह्यिले. प्रथम स्थान ; पहिला in sm.

पहिलेच adv in the beginning itself. पह्यिलेच. आरंभातेच. पुढेच.

पह्जते adj  that which is wanted. पज्जते. आवश्य आहे अस मनाला वाटाच॑.

पह्जत्ति n  humiliation. dishonour. पज्जत्ति. अवमान/अपमान.

पह्जे vi  it is required. पज्जे. आवश्य आहे ; पाहिजे in sm.

पह्जेम्हणून adv deliberately. पज्जे म्हणून. कळींगून॑.

पह्जेस्क॑ adv  as per desire. as per requirement. पज्जेस्क॑. पह्जेते प्रकार. पज्जते प्रकार.

पह्यिलच॑ adj  that which was/is first. पहिलच॑. प्रथम होतते.

पह्यिले adv  in the beginning. at first. पहिले. आरंभाच वेळि ; पहिला in sm.

पह्यिले adj  first. पहिले. प्रथम स्थान ; पहिला in sm.

पह्यिलेच adv in the beginning itself. पहिलेच . आरंभातेच. पुढेच.

पक्ष n  a side. एक भाग.

पक्ष n  a political party. एक राष्ट्रीय संघटना/पार्टि.

पक्ष n  half a lunar month. चांद्रमान महिनाच अर्ध भाग.

पक्ष n  a period covering the second half of Bhadrapada month on which death ceremony is conducted for ancestors. भाद्रपद महिनाच क्रिष्णपक्षांत॑ कराच पितृश्राद्ध॑.

पक्षपात n  partiality. partisan attitude. पारपक्ष. एक पक्षाविषीं चोखोट म्हणींगणे. एक पक्षाला मात्र सहाय करणे.

पक्षा adv  in addition to. more than. अधीकाच स्थिति. भरीस ; पेक्षा in sm.

पक्षि n  bird. पांखरू.

पंक्ति n  a row. an arrangement in a line. पंक्ति.

पंक्ति n  a round or a turn in the seating arrangements for dining during a festival. सणाच जेवणेंत॑ पान मांडाच अवसर॑.   

पंखा n  a fan. विजणा. विजना.

पंचकच्छ n  dhoti worn in a particular manner. कासोटा.

पंचगव्य n  a mix of five products for which the cow is the source. गाई पसून मिळाच पांच पदार्थाच मिश्रण. Note:- दूध, दहीं, तूप, गोमूत्र अणी शेण हेज मिश्रण.

पंचपात्र n  a small cylindrical vessel used in pujas. पंचोत्र. पूजाला उपयोग कराच एक ल्हान पात्र. Note:- पंचपात्र उद्धरणी and प्याला  form a set.

पंचपाळ॑ n  a combination  vessel of five containers used in the kitchen. संपाकघरांत॑ वापराच॑ जोडून असाच पांच वाटीच पात्र. Note:- depending on the size, it is used for different puposes like storing small quanities of spices, serving side dishes etc.

पंचमी n  the fifth day of a lunar fortnight. क्रिष्णपक्षाचहीं शुक्ळ्पक्षाचहीं पांचवां दिवस.

पंचलोह n  an alloy of five metals of copper, brass, tin, lead and iron. तांबे, पितळ, कथील, शिसें अणी लोखंड हे पांच धातूंच मिश्र. Note :- this alloy is used generally to make small idols. Basically it is bronze with the additional metals.

पंचवाळा n  a combination vessel of five small cups to keep haladi kunku, mantrakshata  etc. कुंकू, हळेद॑, मंत्राक्षता असलत॑ ठिवाच॑ पांच लहान वाटीच॑ पात्र. कचवाळे. कचवाळा ; कचोळे in sm.

पंचा n  an un-tailored white cloth worn to cover the lower portion of a man's body. पंचे. धोति. धोत्र. वेष्टि. वेष्टक.

पंचामृत n  a mix of sugar, honey, ghee, curds and milk offered in abhisheka to God. साखरे, मेध, तूप, दहीं, दूध अण्खी पंडु-फळ॑ हे सग्ळीन मिळिवून केलते अभिषेकाच पदार्थ.

पंचायत n  an administrative council of a village. खेडे गांवाच न्यायमंडळ॑.

पंचांग n  the Hindu almanac. the Hindu calendar. तिथी, वार॑, नक्षत्र॑, योग॑, करण॑ हे पांचाच अधारांते केलते ग्रंथ.

पंचे n  an un-tailored white cloth worn to cover the lower portion of a man's body. पंचा. धोति. धोत्र. वेष्टि. वेष्टक.

पंचेंद्रिय n  the five sense organs (ear, eye, nose, tongue and skin). मनुषाला बाहेरच॑ विषय कळाला सहाय कराच॑ पांच अवयव॑ (कान, डोळे, नाक, जिव्ह॑, चर्म हे पांच).

पंचोत्र n  a small cylindrical vessel used in pujas. पंचपात्र॑. पूजाला उपयोग कराच एक ल्हान पात्र. Note:- पंचोत्र॑/पंचपात्र उद्धरणी and प्याला  form a set.

पंडित n  scholar. विद्वान.

पंडु n  ripe fruit. पिकलते फळ॑.

पंडु म्हातारि n  a ripe old woman. उजंड वय॑ झालते म्हातारि.

पंढ्र॑ n  white colour. पंढ॑ रंग (काळ॑च विरुद्ध रंग) ;  पांढरा in sm.

पंढ्र॑ adj  white coloured. पंढ्र॑ रंगाच॑. uis दिवा लावलांपिरी मीठ, दूध, दहीं, ताक, लोणी, तांदूळ॑ असलते पंढ्र॑ पदार्थ घेताने म्हणून सांगणे आहे.

पंढ्र॑-केंस fig  an old person with grey hair. वय होऊन केंस पिकलते लोक. uis पिकल॑ केंसाच लोक॑ त्यंच केंसाला काळ॑ रंग लाविंगगाच सर्वसाधारण झालाहे. तजामुळे वय झालते एकलांस पाव्हून तेनी एक "पंढ्र-केंस" अस सांगणे थोड कष्ट झालाहे !

पंत n  teacher. पंतोजि.

पंतोजि n  teacher. पंत.

पंतोजीण॑ n  a lady teacher. बायको पंतोजि.

पंद n  a ball used for playing. पंद. गोळ आकाराच एक खेळाच साधन॑. Note :- from Tamil. uis लेंकरे रब्बराच पंद घेऊन पूर्त जोरांत॑/जोर होऊन "क्रिकट" खेळाच पाह्याला संब्रम अस्ते. चारदन॑ "औट" वरडणे, चारदन॑ "नाही" म्हणून त्यंच बरोर तर्क करणे, हे अस्कीन पाह्यलतर अम्च ल्हानपणाच सय येते.

पंदल n  a canopy. मांडव. छप्र॑. Note :- from Tamil.

पंध्रा n  fifteen. चौदाच नंतरल॑ संख्या ; पंधरा in sm.

पाउणे n  three-fourths. एकाला पाव उण॑. पौणे. मुक्काल (Tamil)  ;  पाऊण in sm.

पाऊल n  foot print. foot mark. पाऊली. पांयेच मुद्रा. uis गोकुलाष्टमीच दिवस बालकृष्णाच पाऊली तांदूळाच पीटांतून घरच उंब्रा पसून देवघर पतोरि घालणे आहे.

पाऊल n  the sole of the foot. भोंईला लागून असाच पांयेच भाग. पाऊली.

पाऊल n  a step. a (short) stride. चालताना एक दपा पांय पुढे काढून ठिवाच॑. पाऊली.

पाऊल n  one foot in length. बारा इंच लांब.

पाऊली n  foot print. foot mark. पाऊल. पांयेच मुद्रा.

पाऊस n  rain. मेघांतून/वांबांतून पडाच पाणी. पौस.

पाऊसाळा n  rainy season. पावसाळा. पौसाळा. पाऊसाच काळ॑.

पाक n  sugar syrup. पांक. कढीवून उणे केलते साखरेच पाणी.

पाखडणे vt  to sift husk or small waste bits from grain or rice using a sifting pan. तांदूळांतून नाहीतर, धान्यांतून सूपावाटे कणे वेंचून सरकिवणे.

पाच n  emerald. हिर्व खडा.

पाज n  wind. fart. पास. पाद.

पाजणे vt  to break wind. to fart. पादणे. पास सोडणे. पाज सोडणे.

पाजिवणे vt  to suckle. to breast feed. (मायाच) दूध देणे. थान देणे. ढोसणे. ढोंचणे. uis  ल्हान लेंकरांना (एक वर्ष पतोरीच) मायाच दूध पाजिवणेच फार उत्तम म्हणून "विश्व स्वास्थ संस्था" सूचना देलाहते.

पाजिवणे vt  to make one imbibe a liquid. एक द्रव्य पीयाला देणे/पीविवणे. uis हे काळांत सरकारि आफीसराना पाजिवून तेना "दक्षिणा" देलतर अम्हाला पह्जते काम सुलुभांत होईल.

पाट n  a wooden plank used for sitting at floor level. भोंई व॑र बसाला उपयोग कराच लांकडांत॑ केलते एक साधन॑.

पाट n  a writing slate. लिव्हाच पाट.

पाटक॑ n  a piece of torn cloth. पाटक॑ कापड॑. फडक॑. फाटक॑.

पाटक॑-तुटक॑ adj  ragged and broken. frayed and broken. that which has become junk. फाटक॑-तुटक॑.

पाटकपण॑ fig  petty behaviour. slipshod behaviour. mean behaviour. फाटकपण॑. अल्पपण॑. सोदापण॑.

पाटणे vt  to tear. फाटणे.

पाटा n the flat surfaced base or bottom stone, on top of which a cylindrical stone is rolled for grinding small quantities of masala. पाटा-वरवंटाच खालचे भाग.

पाटा-वरवंटा n  a combination of a flat stone and a stone roller for grinding small quantities of masala. पाटावरुवंटा. संपाकाच मसाला वाटाच॑ घट्टि धोंडांत॑ केलते पाटाईं, तसच, व॑र लोळिवाच वरवंटाईं (वरुवंटाईं). Note :- (1) व॑रून लोळिवाच धोंडाला "वरवंटा", नाहीतर, "वरुवंटा" म्हणतों. (2) The word वरवंटा is derived from वर (top) and वाटणे (to grind). The bottom stone being flat, is called पाटा.
   
पाठ n  back side of the torso. आंगाच मागल॑ भाग.

पाठ n  lesson. शिकाच विद्या.

पाठशाला n  school. शाळे. साळे. विद्यालय॑.

पाठिवणे vt  to send. पाठिवणे ; पाठवणे/पाठविणे in sm.

पाठीमागे adv  at the back. मागेपठीस.

पाठीमागे adv  (act) behind the back. कळिवनास्क॑ (करणे). रहस्यांत॑ (करणे).

पाठीवर adv  on the back side of the torso. पाठींत॑.

पाडणे vt  to fell (a tree etc). (झाड) कापून घालणे. फाडणे.

पाडणे vt  to demolish. फाडणे.

पाडणे vt  to split. लांब चूर करणे. फाडणे.

पाडणे vt  to hew. व॑रून खांडणे. फाडणे.

पाडणे vt  to dig. खांडणे. फाडणे.

पाडवा n  the first day of each lunar fortnight. पक्षाच पहिलच(पह्यिलच॑) दिवस.

पाड॑ conj  a conjunction of Tamil origin, indicating the state of "being by itself, without disturbing another". पाड॑. Note :- from Tamil. uis (1) रेल्वे स्टेषणाच प्ळाट्फोरमांत॑ एक खालि कुर्सींते मी मझपाड बसलस्ताना एक मोट्ठ॑ पेटि उचलींगून येत होतता मला मोरचून पाह्त गेला. (2) तो अत्ता उदंड रागांत॑ आहे. तला तजपाड थोड वेळ सोडलतर॑ अपाप राग उत्तरल॑.

पाणी n  water. जल.

पाणी जवळ॑ असाम॑, सोयरीकांना दूर असाम॑ say  a saying meaning "keeping water by your side is more benificial than cultivating your relatives". "सोयरीकांपक्षा पाणी हातराखणेला ठींगणे चोक्कोट" हे अर्थाच एक म्हण.

पाणे vt  to see. डोळेला पडणे. पाह्णे ; पाहणे in sm.

पाणे vt  to look after. to take care. पाह्णे. बरोर पाहींगणे/पाह्यींगणे. सांभाळणे.

पात n  lengthy leaf (like in onion shoots, coconut fronds, sugarcane, ferns etc.).  लांबोळ आकाराच पान (कांदा, नारळ॑, ऊंस॑ असलत्याच पान).

पाताळ n the nether world. नरक.

पाते n  a plant bed. पात्ति (Tamil). पाणी घालाच सौकर्याकरतां झाडाच भोंताले माति सरकिवून कराच व्यवस्था. uis "फ्लाट्सांत" असणामुळे मडकाच तोट्टींत तेवढदनीं फुलाच झाड वाढिवतात. घराच भोंताले ठाम/ठांव असलतर पह्जते पाते करून पंडूच झाड ठिवुया/लावुया/रोवुया.

पातेजणे vt & vi to trust. विसंबणे. विश्वास ठिवणे/असणे. पातेदणे.

पातेदणे vt & vi  to trust. विसंबणे. विश्वास ठिवणे/असणे. uis ताडीच झाडा खाले बसून दूध पीलतर लोके अम्हाला पातेदनाते. "टोडी" पीतो म्हणींगतील॑ !

पातेरा n  reliability. विश्वास कराला लायक असाच. uis तज वागणे पाह्यलतर॑ तो एक पातेरा मनुष आहे वाटते.

पातेरा n  assurance. आश्वास.

पातेले n  a broad-bottomed cooking vessel. खाले रुंद असाच संपाकाच भांडि.

पात्ति  n  a plant bed.  पाते. पाणी घालाच सौकर्याकरतां झाडाच भोंताले माति सरकिवून कराच व्यवस्था. Note :- from Tamil.Though Marathi word is पाते, DMs prefer to use the Tamil word पात्ति.

पात्र n  vessel. भांडि.

पात्र n  role (in a drama or play). नाटकांतल॑ पात्र/भूमिका. भाग.

पात्र-भांडि n  vessels. cooking utensils. संपाकाच भांडि.

पाद n  foot. पांय.

पादणे vt  to break wind. to fart. पाजणे. पास सोडणे.

पादपीठ n  a foot stool. पांय ठिवाच एक मोडा. uis (1) गिड्डे असणार सोफ़ा व॑र/ कुर्ची व॑र बसलतर॑ पाऊल भोंई पतोरी मावना म्हणून पादपीठ ठिवणे दंडक आहे. (2) अगाऊच राजेलोक सिम्हासनांत बसताना त्यंच एक पांय पादपीठा व॑र ठिवून बसणे आहे. अस बसलतर त्यंच गांभीर्य थोड जास्ति दिसल म्हणून असूया !

पादपूजा n  worshipping a saint or elder after cleansing his feet. यतींस॑ अथवा थोर्ळेस॑ पांय शुद्ध केला नंतर कराच पूजा.

पादुका n  wooden footwear. लाकडांत॑ केलते चप्पल.

पाद्रि n  a christian clergyman. क्रिस्तु मताच(धर्माच) एक गुरु.

पान n  leaf of a plant or tree. झाडाच पत्र. पाला.

पान n  a leaf on which food is served. जेवाच पान.

पान n   betel leaf (Piper betle). विडाच पान.

पान n  page of a book. पुस्तकाच एक कागद.

पान n  a playing card. खेळाच पत्ता.

पानक n  sweet lemon juice. लिंबुपाणी.

पानसुपारि n  betel leaf with nut ready to chew. बीडा. विडा.

पाप n  sin. दोष.

पाप adj  innocent (person). अप्पावि. Note:- from Tamil पावम.

पापड n  a flat fried preparation of flours (mostly of udid). (उडिदाच) पीठांत॑ केलते एक तळाच पत्तळ पदार्थ.

पापडाच खीर n  a type of sweet porridge. एक रीतीच खीर. अप्पि पायसम. अप्पीच खीर.

पापिष्ट adj  sinful. दुष्ट. पापी.

पापी n  a person who has sinned. पाप केलते व्यक्ति. पापिष्ट मनुष.

पायजामा n  a loose fitting lower garment covering the legs separately. pyjama. पैजामा. एक लांब विजार/निजार.

पायरि n  a flight of steps. steps. पडतोरे. uis अम्च॑ घरांत पायरि वेघून ओंटा वलांडून, नडुवीईं वलांडून गेलतर॑ लांब-रुंद अंगण मिळेल॑.
 
पायसम n  a sweet porridge like preparation. खीर.

पाया n  foundation of a building. घर बांधताना भूमीच खाले धोंडानिशी बांधाच भाग. अस्तिवार.

पारणे n  the early morning food taken on dwadashi day. द्वादशि दिवस खायाच पह्यिलच जेवण॑.

पारपक्ष n  partiality. पक्षपात॑. uis  कोण्त मायालीन त्यंच लेंकरा व॑र एकसार्ख प्रेम असल॑. तेनी केम्हीन पारपक्ष करनात॑.

पारवण॑ n  rice balls offered to the departed souls during death ceremonies. पिंड. Note :-  most likely, a  phonetic modification of प्रदान ; from पिंड-प्रदान (offering of पिंड). 

पारवा n  pigeon. एक पक्षि. पारवे  ; पारवा in sm is a blue pigeon, the general term being कबूतर. In Tamil it is पुरा.

पारवे n  pigeon. एक पक्षी. पारवा ; पारवा in sm is a blue pigeon, the general term being कबूतर. In Tamil it is पुरा. 

पारा n  watch and ward. guard duty. rounds by watchmen at night. चौकीदारच काम ; पहारा in sm. uis मध्यम वर्गाच लोक राह्याच ठिकाणि अत्तापणीं 'गूर्खा'  त्यंच लाठि बडीवत रात्रीच वेळ पाराला येतात॑. हे कामा कर्तां तेनी प्रति घरांतून महिनाला पन्नास-शंबर रुपे वसूल करणे पणीं आहे.

पारंपरीक adj  from generations. hereditary. परंपरा-परंपरांतून याच. uis त्यंच घरच॑ पारंपरीक भाग्यवंत लोके. त्यंच संबंध करींगाला अम्हाला अधृष्ट असाम॑.

पारंपर्य n  tradition. परंपरांतून अथवा जुने काळंतून याच. uis चोखोट संस्कराच लोक॑ त्यंच घर्च पारंपर्य त्यंच कुटुंबाच लेंकरांला शिकिवणांत॑ उदंड श्रद्धा दाखिवतील॑.

पारंपर्य n  successive generations. पिढीच पारंपर्य. uis (1) 'नाटटुकोटै चेटियार्स' पारंपर्य व्यापारि असतात॑, अगाऊ तेनि 'बर्मा, मलया' असल॑ देशाला जाऊन थोर व्यापारि झाले होते. अत्तापणीं त्यंच लेंकरे 'फ़ोरनांत' वाचून कोयमबत्तूर-ईरोड जवळ थोर-थोर फाकटरी चालीवतात॑. (2) कित्येक लोक॑ दूसरेंकडे संपर्क कराच पाह्यलतर, त्यंच कुटुंबाच लोक॑ पारंपर्य होऊन चोखोट विधांत वाढलाहेत अस कळते.

पार्सफडकी n  soiled/already worn-clothes. उपयोग करून धुवनाते कापड. uis कित्येकदन॑ दिवसाला तीनदा आंघोळ करतील, पण पार्सफडकी घालींगून बाहेर जातील॑. त्यंच स्वभाव तस असत॑.

पारायण॑  n  reading of a religious book. देवाच ग्रंथ/पुस्तक वाचणे.

पारिजात॑ n  a sacred flower with white petals and coral coloured stem. पंढ्रेईं पवळाच रंगीं असाच एक पवित्र फूल.

पार्सवायू  n  paralysis. आंग हलिवणाला बाधा होयाच एक महारोग ; अर्धांगवायू in sm. uis पार्सवायू याला एक मुख्य कारण "है बी.पि" म्हणतात. "बी.पि" बरोर नियंत्रण केलतर॑ पोणावांटा पार्सवायू राह्ते करूया. अम्च रक्त घट्टि होयामळे पणीं पार्सवायू येईल म्हणतात॑. अम्च रक्तांतल "कोलेसटरोळ, ट्रै-ग्लिसेरैड्स" बरोर नाहीतर॑ रक्त घट्टि होत॑. ते पणीं नियंत्रण करून दिवसोडि एक "बेबी आस्पिरीन" घेटलतर पार्सवाय़ू येनास्क पाह्यींगुया.

पाल n  a house lizard. एक ल्हान प्राणि.

पालक n  a type of edible greens. एक रीतीच भाजीच॑ पाला.

पालकी n  a palanquin. पालखी. पाल्की. पाल्खी. डोली. पल्लक (Tamil). 

पालखी n  a palanquin. पालकी. पाल्खी. पाल्की. डोली. पल्लक (Tamil).

पालम n  bridge. नदि अथवा समुद्राच व॑र बांधलते वाट. सेतु. Note :- from Tamil.

पालन n  rearing-up. bringing-up. वाढिवणे. पाह्यींगणे.

पालन n  observance. आचरण॑.

पाला n  edible greens. कीरे (Tamil). पाला. uis अम्च घरांत॑ वाराला तीन दिवस तरीन पालाच भाजीकी, पालाच अंबटभाजीकी करणे आहे.

पाला n  leaf. पान. uis मझ आजा-आजीच घरांत दिवसोडि केळीच पालांतच जेवणे.

पाला n  newly formed pair or bunch of leaves. दळ॑. नव होऊन सोडलते पानाच जोडि. uis  बायका तुळसीच पाला (तुळसी दळ॑) तोडणे शास्त्राप्रकार विरुद्ध आहे.

पालाचभाजी n  green leafy vegetables. भाजी कराच पाला ; पालेभाजी in sm. uis पालाच भाजी आंगाला चोखोट अस सांगतात, कारण, पाला खालतर रक्ताच 'हेमोग्लोबीन' वाढते अस आरोग्यशास्त्र सांगत॑.

पालाचभाजी n  cooked greens. पालाच भाजी.

पाल्की n  a palanquin. पालखी. पालकी. पाल्खी. डोली. 

पाल्कीमांडी n  sitting cross legged. पाल्खीमांडी. पाल्केमांडी. पाल्खेमांडी. गुडिघा मुजलून बसणे. सुखासन॑.

पाल्केमांडी n  sitting cross legged. पाल्खेमांडी. पाल्खीमांडी. पाल्कीमांडी. गुडिघा मुजलून बसणे. सुखासन॑.

पाल्खी n  a palanquin. पालखी. पाल्की. पालकी. डोली. पल्लक (Tamil).

पाल्खीमांडी n  sitting cross legged. पाल्कीमांडी. पाल्केमांडी. पाल्खेमांडे. गुडिघा मुजलून बसणे. सुखासन॑. uis (1) पाल्खीमांडी घालींगून जेवाला बसलतर॑ अधीक भात पोटांत॑ जाईल॑. (2) गुडिघा दुखणारांस॑ पाल्खीमांडी घालून बसाला कष्ट होईल॑. Note :- (1) the word appears to be derived from how one sits in a पाल्खी ie, cross legged. (2) In SM पाल्तीमांडी means sitting on the floor by folding legs and putting together on one side.

पाल्खेमांडी n  sitting cross legged. पाल्खीमांडी. पाल्कीमांडी. पाल्केमांडे. गुडिघा मुजलून बसणे. सुखासन॑.

पाल्थे n  turn over. पर्तून पडणे. पलटून पडणे ; पालथा in sm.

पाल्थे घालणे vt  to turn over. पलटून घालणे. उल्टा करणे.

पाल्थे पडणे vt   to turn over on the stomach (as infants do). (पांच/सहा महिनेच लेंकरे) पोटावर पलटून पडणे. पाल्ते घालणे. uis  तीन-चार महिनेच लेंकरे पहिल॑ पाल्त-पडतील, नंतर पांय लोटून पुढे सरकाला पाहतील, नंतरच र्रांगतील॑.

पाल्थे पडणे id  to try all possible ways. stand on one's head (as a ruse to attain someting). ब्रह्म प्रयत्न करणे. uis  तो काय पाल्ते पडलतरीन तला "प्रमोषन" मिळाल जात नाही. तज पक्षा षाणे बसलाहते.

पाळणा n  wooden box type cradle. लेंकरांस निजिवाला उपयोग कराच लांकडाच झोळी.

पाळणा सांगणे vt  to sing a lullaby. लाली सांगणे. लेंकरांला झोंपीच गाणे सांगणे.

पाळणे vt  to support. to nourish. to foster. to feed. सांभाळणे. पालन करणे.

पाळणे vt  to fulfill or observe an oath, prayer etc. to see through or carry through a prayer etc. देवाला नवस करलते पूर्त करणे.   

पाव n  one-fourth. काल (Tamil). एकाच चार भगांत॑ एक भाग. अर्धाच अर्ध.

पाव n  one-fourth of a unit of measure of weight, volume etc. मापाच पाव.

पावणे vt & vi  to reach (a place). एक ठिकाणी जावून मिळणे. पोंचणे.

पावणे vt & vi  to convey. पोंचणे.

पावसाळा n  rainy season. पाऊसाच काळ॑. पौसाळा. पाऊसाळा.

पाशी n  moss. शेवाळा. सूर्याच ऊन अणी प्रकाश पडनाते ओल॑ ठिकाणी भोंईला चिकटून वाढाच हिर्व रंगाच एक ल्हान वनस्पति. Note :- from Tamil. uis  जुने काळांच घरांतल॑ नाहणींच मोरी मध्य-मध्य "ब्ळीचिंग-पौडर" घालून धूनातर॑/धूवनातर॑ तिकडे पाशी धराला साध्यता आहे.

पाश्चात्य adj  western. पश्चिम देशाकडल॑.

पाष्टे n  morning hours. पास्टे. पाहटे. दिवसाच आरंभाच वेळ. दुपाराच पुढेच वेळ. Note:- पहाट in sm means 'dawn'. पाष्टे or पास्टे appears to be derived from the old SM word पाहटे (meaning, morning), the ह being substitued with ष or स in TM.

पाष्टे पाष्टे n  early in the morning. पाष्टे फार लोक्कर. पास्टे-पास्टे. uis मझकडून कायकी तला होमते आहे वाटते. नाहीतर॑, पाष्टे-पाष्टे मी दांत घासाच पुढेच मला पाह्याला आलासना.

पास n  wind. fart. पाज.

पासोडी n  a thick bedsheet. पासोळी. जाड असाच चदर.

पासोळी n  a thick bedsheet. पासोडी. जाड असाच चदर ; पासोडी in sm. 

पास्टे n  morning. पाष्टे. पाहटे ; पहाटे in sm, meaning early morning.

पाहटे n  morning. पास्टे. पाष्टे ; पहाटे in sm, meaning early morning. 
 
पांक n  syrup (of sugar). पाक. कढिवून उणे केलते साखरेच पाणी. uis अम्च देशांतल॑ पोणावांटा गुळ्चीट पदार्थाला गुलाब-जामून होऊनदे, हलवा होऊनदे, साखरीच पांक पहिले (पह्यिले) करूनच नंतर बाकि काम अस्ते.

पांकुळी n  the fleshy edible carpel of fruits like orange, jackfruit etc. ऑरंज, फणस असलते पंडूच आंतल॑ खायाच भाग. पांखोळी.

पाकोळी n  a bat. flying fox. उडाच एक प्राणी. वाघूळ.

पांखरू n  bird. पक्षी.

पांखरू n  any winged creature. उडाच प्राणी. 

पांखवळा n  a type of gooseberry. अवळाच एक जात. अरे नेल्लिक्कायी (Tamil).

पांखोळी n  the fleshy edible carpel of fruits like orange, jackfruit etc. ऑरंज, फणस असलते पंडूच आंतल॑ खायाच भाग. पांकुळी.

पांघरणे vt  to cover with a sheet. पांघरिवणे. व॑रून कापड घालणे.

पांघरिवणे vt  to cover with a sheet. पांघरणे. व॑रून कापड घालणे. 

पांघरूण n  a sheet used for covering. पांघरिवाच कापड. पांघरिवण॑. uis अर्धरात्री उठून पाह्ताना लेंकरूच व॑र पांघरूण कस॑कस॑की गुंडाळून पडलसाच दिसल॑.

पांच n  five. चाराच नंतरल॑ संख्या.

पांचजन्य n  Shri. Krishna's conch. श्री क्रिष्णाच शंख.

पांचशे n  five hundred. पांच गुणा शंभर.

पांडव n  sons of King Pandu of Mahabharatha. महाभारतांतल॑ पांडुराजाच पुत्रलोक॑.

पांडि n  hopscotch (normally played by girls). बायका पोरींच एक खेल. Note :- from Tamil.

पांपणी n  eyelid. डोळे झांकाच काताड ; पापणी in sm.

पांय n  foot. पाद. पाऊल ;  पाय in sm. 

पांय n (the full) leg. (पूरा) पांय ; पाय in sm. 

पांय n  foot of a table, chair, cot etc. कुर्सी, मेज, पलंग असलतेच पांय ; पाय in sm.

पांयगुण॑ n  luck brought in by a person stepping into the house. कोण्हीं घरांत आलामळे होयाच भाग्य अथवा चोखोट शकुन. uis त्यंच सूनाच पांयगुण किती चोखोट म्हण्जे, तिन॑ वराड करींगून येणच तिज दाल्लाला एक थोर उद्योग मिळ्ळ॑.

पांयठण n  a step ladder with one or two steps. एक-दोन पायरीच एणि. uis अत्तलीकड॑ तेवढ॑ संपाकघरांतीं भिंतीव॑र 'केबिनेट्स' अस्ते. तजांतून सामान काढाला एक पांयठण पह्जेस्क अस्ते.

पांयपुसणे n  a doormat. foot mat. पांयपुसे.

पांयपुसे n  door mat. foot mat. पांय पुसाला उंबराच बाजु घलाच एक ल्हान चांपा. पांयपुसणे. uis थोर-थोर बंगलांत घरांत निजाच खोलींत पणीं त्यंच पलंगाकडे मखमलाच पांयपुसे अस्ते.

पांय मांडींगून बसणे id  to put up one's feet. to be idling. to be doing nothing. काहीं उपयोगाच काम करनास्क बसणे. पांय लांब करींगून बसणे. uis मझ बाईल वरडली "कायहो, पांयमांडींगून बसलतर॑ कस चालल॑, पैसे र्रीणांत॑ घेऊन तरीन एक 'फ़्लाट' घ्याला वाट पांह्त॑, मोल दोवसों-दिवसा वाढत आहे."

पांय लांब करींगून बसणे id to put up one's feet. to be idling. to be doing nothing. काहीं उपयोगाच काम करनास्क बसणे. पांय मांडींगून बसणे.

पांयवाट n a narrow unpaved pathway. उणे रुंदाच एक कच्चा बीद॑. अडवाट. uis अत्तापणीं कित्येक खेडेंत डांबर नाहीते पांयवाटच॑ अस्ते. तसल॑ पांयवाटांत॑ तिकडल॑ पोरांला 'मोटरसैकल' पळिवंगून जायाला थोडपणीं श्रम अस्त नाही !

पांयां व॑र गंजि ओतींगणे id  to invite troubles by doing things in haste. to shoot oneself in the foot. अवसर-अवसरांत कायतरीन करून, नंतर॑ कष्ठी भोगणे.

पांयें धरणे fig  to fall at somebody's feet to seek a favour. कार्य साध्य होयाला कोणाच तरीन पांयें धरणे.

पांयेंत पडून विचारणे fig  to beseech humbly. उदंड/उजंड विनयांत विचारणे.

पिकणे vi  to ripen. पंडु होणे.

पिकलते adj  ripe. पंडु झालते.

पिकिवणे vt  to ripen. पिकिवून काढणे.  ओरे घालून पिकिवणे ; पिकवणे in sm.

पिचका adj  squeezed. चेंपलते. पिचक॑.

पिचका-पिचका adj  sticky. चिकटाच॑. uis कित्ति सांगट्लतरीन ऐकनास्क॑, ते लंकरू गोंदाच डब्बा उघडून डोस्केव॑र घालींगून केंस पूरा पिचका-पिचका करींगट्ला.

पिचक॑ adj  niggardly. insignificant. very small. slight. कंजूसपण॑. uis तो कसल॑ दुकानदार ! अम्ही तजकडे एक हदार रुपेच सामान घेट्लतरीन॑ पिचक॑ पन्नास रुपे उणे कराला खाले-व॑र पाह्तो ! Note:- पिचका in sm means cracked, split, slit. In a figurative sense in sm it also means  slight, feeble, flimsy etc.

पिचक॑ adj  squashed or crushed out of shape. चेंपून विकार झालते. पिचका. uis आज मला फार बेजार वाटल॑. कां म्हण्जे, पाष्टे मी मझ मोटर-कार मागे काढताना मागल॑ चक्र एक मांदराच वर वेघून तज दोन पांय पिचक॑ झाल॑. ते मांदर भंडीच चक्राच खाले लप्पून बसलते मला कळ्ळ॑ नाही.

पिच्चणे vt  to tug apart. to tear apart. to pluck out. to open up. उप्पडणे. Note :- from Tamil. uis लोक॑ कष्टि भोगून चोखोट 'गिफ़्ट' काकदांत त्यंच-त्यंच आहेर 'पॅकिंग' करून आणतात॑. पण ते काढिंगणार माकडाच हाति फूलाच माळ मिळलतस्क॑ एक निमिषांत॑ ते पिच्चून उघडूनटाकतात॑. हे पाह्ताना एवढ॑ श्रम भोगून 'पॅकिंग' कराच आवश्य आहेका अस वाटून जात॑. Note:- पिचणें in sm means 'to crack, to split, to open out, to burst out' etc

पिट्ळे n a sambhar like preparation. एक कालिवण ; पिठले in sm.

पिडारि fig  a figurative expression for a very ill kempt or unclean person. पाह्याला ओंगळ(वंगळ॑) अणी अशुद्ध आकाराच मनुषाला सांगाच एक गोष्ट. Note:- the expression पिडारि is from पिंडारि, a clan of freelancing plunderers of the 19th century.

पिढी n  genealogical descent or succession. वंशच वारस.

पिढी n  generation. पिढी.

पिढींसूं adv  from generations. hereditarily. परंपरांसूं. uis ते घरचे कितिकी पिढींसू भाग्यवंत लोक॑. एक काळांत तेना एक हदार एकर जमीन होते.

पिण्णाक n oil cake. पेंड. तेल पूरा पिळून काढल॑ नंतर उरलते बींच शिष्ट. Note :- from Tamil.

पितृ n  departed ancestors. पूर्वज.

पितृकर्म n  religious duties towards one's ancestors. श्राद्ध॑. uis माय बापांच वार्षिक पितृकर्म चुकनास्क करणे अम्च कर्तव्य आहे.

पितृ-देवता n  devathas in charge of departed souls. पितृ-आत्मांच देवता.

पितृपक्ष n  the second fortnight of the month of Bhadrapada during which ceremonies are conducted for departed ancestors. भाद्रपद महिनाच कृष्णपक्षांत पितृ लोकांस कराच श्राद्ध संप्रदाय.

पितृलोक n  the region of manes/ancestors. पितृ-आत्मांच/पूर्वजांच लोक. uis घरांत काहींतरीं चोखोट कार्य (वराड, मुंज अस॑) कराच पुढे नांदि बसिवतों. ते समय अम्हि पितृलोकांतून अम्च पितृना निमंत्रण देवून घरच कार्यक्रम बेष चालिवाला प्रार्थना करतों.

पित्तळ n  brass. पिवळ॑ रंगाच एक मिश्रधातु.

पित्त n  bile. जेवण जीर्ण कराला सहाय कराच एक द्रव्य.

पित्त n  a disorder due to improper digestion. बरोर जीर्ण होयना करतां याच एक दोष.

पित्ताशय n  liver. पित्त उत्पन्न कराच अवयव.

पित्राजुत adj  ancestral. पूर्वजां कडून आलते.

पिपळ n  pipal tree. अश्वथ झाड.

पिरी suff  a suffix implying 'there after'. "झाल नंतर॑/झाल व॑र", हे अर्थ द्याच एक प्रत्यय (उदा: जेवलांपिरी, केलांपिरी etc.). Note:- this appears to be derived from the Tamil word "पिरकु", meaning "there after".

पिल्लु n  newly born young one of an animal or bird. उजून जास्ति दिवस झाल नाहीते एक प्राणि.

पिळणे vt  to twist and squeeze. to wring. पिळून काढणे. गुंडाळून चेंपणे. मुरडून चेंपणे.

पिळणे vt  to milk a cow, buffalo, goat. गाय, म्हैश, बक्रा असलतेच दूध पिळणे. दूध धार काढणे.   

पिळा n   a woman's hair intertwined and twisted with a thin towel after a hairbath in order to dry it. आंघोळीच नंतर वाळा करतां चौकांत॑ गुंडाळलते केंस. uis हे काळांत "हेरड्रैयर" मिळ्ळ तर॑ पणीं बायका पिळा घालिंगतात॑. कारण, "ड्रैयरांतून" याच ऊब वार॑ केंस झडिवते म्हणून तेना वाटते.

पिळून-काढणे fig  to harass no end. take through the wringer. प्राण काढास्क॑ तंटा करणे.

पिवळ॑ n  yellow colour. पिवळ॑ रंग ; पिवळा in sm.

पिशवी n  cloth bag. कापडाच थैली.

पिशाच n  devil. ghost. भूत.

पिसणे vt  to grind to a powder. पीठ करणे.

पिस्ता n  pistachio. वाळिवून खायाच एक वर्गाच बीं. Note :- पिस्ता belongs to the cashew family.

पिंड n  rice ball offered as oblation to ancestors. पितृलोकांस॑ श्राद्धाच वेळ द्याच भाताच गोळा.

पिंडप्रदान n  offering of rice balls as oblation to ancestors. पितृलोकांस॑ श्राद्धाच वेळ भाताच गोळा देणे.

पी imp  drink. द्रव्य गिळणे.

पीक n  a crop. a harvest. जमीनांतून काढाच धान्य, फल असल॑ पदार्थ. uis अतीवृष्टीमुळे दाळीच पीक तेवढीन हेमधे नासूनगेलाहे म्हणून कालेच मला कळ्ळ॑. सर्व दाळीच मोलीं पुन्हा वाढत आहे.

पीकोर n  drunkard. पीखोर. दारू पीयाच दंडक सोडाल होयनाते मनुष.

पीखोर n  drunkard. पीकोर. दारू पीयाच दंडक सोडाल होयनाते मनुष.

पीटणे vt  to beat. to thrash. मारणे. मार-पीट करणे.

पीठ n  flour. पूड केलत॑ धान्य/धान. धान्याच/धानाच चूर्ण.

पीठ n  cooking batter. पाणींत कालिवून संपाकाला तय्यार केलते पीठ.

पीठ n  an exalted location of a saint pontiff. एक मठाधिपतीच पुण्यस्थान.

पीठ n  throne. सिंहासन.

पीठ-प्रभावळि n a circular decoration behind the head in a throne or पीठ. प्रभावळि.

पीठाधिपति n  pontiff of a Mutt. पीठाच मुख्य यति. मठाधिपति.

पीठारोहण॑ n annointing as the pontiff of a Mutt. मठाच पीठाधिपति म्हणून घोषणा होण॑.

पीठारोहण॑ n ascending the throne for coronation. सिंहासनांत बसून पट्टाभिषेक होणे.

पीडा n  trouble. torment. distress. कष्ट. (मनाच) तंटा. Note:- generally the word पीडा is used in the context of mental torment. uis त्यंच लेंक वेगळ॑ मताच/धर्माच एक पोराला वराड कराला निश्चय केली. ते वराडाच विरुद्ध॑ तिज माय-बाप सांगट्लते गोष्ट एकीन ऐकाला तिने तय्यार न्होती. शेवटी तिज माय-बाप "तिने काय पह्जतरीन करींगूनदे अम्च॑ पीडा वरलतर पुरे" अस सांगून उगे बसून गेले.

पीढ n  a raised platform for ceremonial or special occassions. थोड उंचांत बांधलते एक विशेष स्थळ॑.

पीणे vt  to drink. द्रव्य गिळणे. 

पीणे fig  to consume liquor. दारू पीणे.

पीतांबर॑ n  yellow silk cloth. पिवळ॑ रंगाच रेशमाच कापड.

पीळ n  a twist. मुरड॑.

पुटक॑ adj  cracked. फुटक॑. फुटलते.

पुटकुळी n pimples. तोंडाच काताडाला याच ल्हान-ल्हान फोड.

पुटणे vi  to break up. फुटणे. मोडणे. चूर-चूर होणे.

पुटणे vi  to crack. to snap. फुटणे. तुटणे.

पुटणे vi  to coagulate (milk) while boiling. फुटणे. (दूध) तावताना फुटणे.

पुटणे vi  to burst open (after swelling). फुटणे. सुजून फुटणे.

पुटाणे n  dried and roasted chana. फुटाणे. वाळिवून भाजलते चणा. uis अगाऊ (टीवी याच पुढे) पट्टणांत (चेन्नैंत) अम्च पूरा कुटुंब॑ ऐतवार संध्याकाळि "मरीना-बीचाला" जाऊन, भोंचणे अणी पुटाणे खाऊन थोड वेळ तिकड बसून बेष समुद्राच वार॑ खाऊन वापस घराला येत होतों.

पुडका n  a small packet or bundle. पुडा. पुडी. पोट्लम (Tamil).

पुडा n  a small packet or parcel. पुडी. पुडका. पोट्लम (Tamil). uis "कोरीयर" बरोर उणे खर्चांते ल्हान-थोर पुडा सर्वीं तपालावाटे पाठीवाला पोस्टल डिपार्ट्मेन्ट व्यवस्था केलाहते अस मी आजच॑ "न्यूस पेपरांत" वाचलों.

पुढच॑ adj  (that which is) earlier (in time). पुढे झालते. पुढल॑.

पुढच॑ adj  that which is to follow in future. पुढल॑. नंतरल॑.

पुढच॑ adj  that which is in the front portion or part. पुढल॑. 

पुढल॑ adj  (that which is) earlier (in time). पुढे झालते. पुढच॑. uis गेल सोमवार देऊळांत "क्रिष्णावतार" कीर्तनाच सहावां अध्यायाच कीर्तन होत॑. तज पुढल॑ दिवसी पांचवां अध्यायाच कीर्तन होत॑.

पुढल॑ adj  that which is to follow in future. पुढच॑. नंतरल॑. uis महाविष्णूच दहा अवतारांत नौ अवतार झालाहे. पुढल॑ अवतार, म्हण्जे, कल्की अवतार याच आहे.

पुढल॑ adj  that which is in the front portion or part. पुढच॑. uis बंडींत सवारी करताना मला मागल॑ "सीटांत" बसाच पक्षा पुढल॑ "सीटांत" बसणेच बर॑ वाटत॑.

पुढलेंदा adv  the coming year. याच वर्ष.       

पुढ॑ n  front. (मागे नाही) पुढ॑ ; पुढा in sm. uis थोरळेंच समोर पांय पुढ॑ करींगून बसताने.

पुढ॑ prep  earlier than something (in time). कसाचतरीन पुढच वेळी. uis तु मला हे विषय पुढ॑ सांगट्ळासलतर मी तुला पाह्याला आलसना.

पुढ॑ prep  ahead (forward) of something. कसाचतरीन पुढ॑. uis (1) बैलबंडीच पुढ॑ मी चालून जात होतों. (2) दूर प्रयाण करताना बस्सांत॑ पुढ॑ बसाला मला केम्हाहीं थोड भें अस्ते.

पुढ॑ prep  in front of (something). (कसाचतरीन) समोर. uis मी घरांतून उतरलोंकीनाही मझ पुढ॑सूं एक काळ मांद्र अडव॑ पळून गेल॑.

पुढ॑ adv  ahead of something (in time). afterwards. (कसाचतरीन) नंतरल॑ समयांते. uis (1) सध्याला मी सांगाच पूरा ऐकींघे (ऐकून घे). पुढ॑ काय होतकी ते नंतर पाव्हुया. (2) पुढ॑ हे होईलकी नाहीकी, कोणाला कळल॑ ?

पुढ॑ adv  in advance (of something). (कायतरीन होयाच) पुढ॑. uis ते काम ओपिंगाच पुढ॑च तो कंट्राक्टर मझकडून दहा हदार रुपे विचारला.

पुढ॑पटीस adj  at the front. पुढ॑ भागंत॑. समोर. सोमोर.

पुढ॑मागे n  at about. either just before or just after. मागेपुढ॑. uis हैदराबादास्क 'ट्राफिक' असाच ठिकाणि कोण्त तरीन दोन-तीन कामावर बाहेर निघून गेलतर॑, पर्तून घर येऊन पावणे सांगिटलते वेळाला होणे संदेहच॑. पुढ॑मागे होईल॑.

पुढेमागे fig  (to have) rough idea (before hand). ' कोठे/काय' अस॑ (पुढेच कळणे). uis तो पोर वाचणांत॑ षाणा काहीं न्हो. अत्ता आस्ट्रेलियाला वचाला जाम॑ म्हणून बसलाहे. तिकडल॑ अत्तच परिस्थिति काय म्हणून पुढेमागे कळनास्क॑ तज मायबापाच प्राण काढत आहे.

पुण्य n  religious merit. चोखोट कृत्य करून मिळाच फल॑.

पुण्यवंत adj  virtuous (person). पुण्यवान. पुण्य मिळिवलते (मनुष). uis एक निधन जालते घराला गेलास्ताना लोके बोलींगत होते "ते म्हातारी पुण्यवंत असाम॑, एक दिवसपणीं आंगाला बर नाहीस्क निजनास्क॑ जाऊन पाऊन गेले. दूसरांना कष्ठ देनास्क जाऊन पावले."

पुण्यस्थल॑ n  holy place. पवित्र टिकाण. पुण्यक्षेत्र.

पुण्यक्षेत्र n  holy place. पवित्र टिकाण. पुण्यस्थल॑.

पुण्यात्मा n  blessed soul. great soul. पुण्य केलते मनुष. महात्मा.

पुण्यावचन॑ n  purification ceremony. शुद्ध कराच पूजा. पुण्याहवचन॑.

पुण्याहवचन॑ n  purification ceremony. शुद्ध कराच पूजा. पुण्यावचन॑.

पुत्तु n  ant-hill, occupied by snake. सरप/सर्प राह्याच मुंग्याच वाल्मीक. Note :- from Tamil. uis ते अडवाटांत॑ सर्पाच पुत्तु भरून असाकरतां अम्ही तस॑ जाणच नाही.

पुत्र n  son. लोंक.

पुत्रकामेष्टि n  a religious rite performed for obtaining a son. लोंक उजाला कराच एक होम॑/यज्ञ.

पुत्रधर्म n  filial duty. पुत्राच कर्तव्य.

पुत्रसंतान॑  n  male offsprings. लोंक.

पुत्रि  n  daughter. लेंक. लेंकी.

पुदीना n  pudina. mint. पदार्थ कराच एक पाला.

पुनरुद्धार n  restoration. पुन्हा उद्धार करणे.

पुनर्जन्म n  rebirth. दुसर॑ जन्म. पुन्हा होयाच जन्म.

पुनर्वसू n  name of a star. एक नक्षत्राच नाव.

पुनर्विचार॑ n  reconsideration. पुन्हा विचार करणे.

पुनर्विवाह n  remarriage. पुन्हा वराड करणे.

पुनव n  full moon. पुनवे. पुनेव. पौर्णमी. पूर्णिमा ; पुनव/पुनींव/पुन्येव in sm.

पुनवे n  full moon. पुनेव. पौर्णमी. पूर्णिमा ; पुनव/पुनींव/पुन्येव in sm.

पुनर्स्थापन॑ n restoration. re-construction. जीर्णोद्धार॑.

पुनेव n  full moon. पुनवे. पुनव. पौर्णमी. पूर्णिमा ; पुनव/पुनींव/पुन्येव in sm. uis सामान्यहोऊन सत्यनारायण पूजा पुनेव दिवसी ठींगतीले.

पुन्हा adv  again. अण्खीन एकदा/कदपा/एकदफा. 

पुन्हा-पुन्हा adv  repeatedly. पुन्हाहीं-पुन्हाहीं.

पुनाहीं-पुनाहीं adv  repeatedly. पुन्हा-पुन्हा.

पुरणे vt  to suffice. पूरे होणे.

पुरणे vt  to bury.  भोईच आंत झांकून घालणे. पुरिवणे.

पुराण n  the 18 ancient scriptural tomes of Hinduism (Brahma, Padma, Vishnu, Siva, Linga, Garuda, Narada, Bhagavatha, Agni, Skanda, Bhavishya, Brahma Vaivartta, Markandeya, Vamana, Varaha, Matsya and Kurma). हिंदु धर्माच अठ्रा महाग्रंथ (ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव, लिंग, गरुड, नारद, भागवत, अग्नि, स्कंद, भविष्य, ब्रह्मवैवर्त्त, मार्कंडेय, वामन, वाराह, मत्स्य अण्खी कूर्म).

पुराण adj  ancient. पुरातन॑. 

पुराणिक n  a scholar in puranas. हिंदु धर्मांच पांडित्य असणार॑.

पुरातन adj  ancient. फार जुने. पुराण.

पुरावस्तु n  archeological items. जुने काळाच संस्कृतीच वस्तु.

पुरिवणे vt  to bury. भोईच आंत झांकून घालणे. पुरणे. uis श्राद्ध॑, पितृपक्ष हे अग्गीन करलापिरी पिंड गाईला देम॑ म्हणून आहेतरीन, गाय आल॑ नाहीतर॑ भोईंत॑ पुरिवणे पणीन आहे.

पुरुष n  male. पुरुष.

पुरुषत्व n  manliness. पुरुष गांभीर्य. uis पुरुषत्व म्हण्जे त्यंच बायलीला दबीवून ठिवणकी, बायकाना उणविता करणकी न्हो. कसलते संकटांसूनीं बायकांला सुटीवणे, त्यंच राखणे करणे, हे कराच मनुषाला पुरुषत्व आहे म्हणून सांगूया.

पुरुषोत्तम n  Lord Vishnu. महाविष्णु.

पुरे adv  enough. पुरे.

पुरे-पुरनास्क॑ adv  (being) barely sufficient. आवश्यापक्षा थोड उण॑ पडास्क॑. uis गेल वार मझ मित्राच लेंकीच वरडांत॑ दूसर॑ पंक्तींत जेवाला बसलत्यांस॑ भात पुरे-पुरनास्क॑ झाल॑. पुन्हा अवसर-अवसरांत॑ भाताला ठिऊन ते वाडजोरि अम्हाला तसच पानाच पुढे उष्ट हातांत॑ दहा पंध्रा मिनिट बसांमते पडल॑.

पुरे-पुरे adv  more than enough. आवश्यापक्षा जास्ति.

पुरे होणे met  to be fed up. बेजार होणे.

पुरोहित n  priest. पूजाकार्यक्रम कराच आचारे.

पुल्लिंग n  masculine gender. व्याकरणांत॑ तीन लिंगांत॑ एक. पुरुष लिंग.

पुष्कराज n  topaz. आभरणाच एक खडा/रत्न. पुष्पराग. 

पुष्करिणि n  a temple tank. देऊळाच सरोवर/कुंड.

पुष्टि n  nourishment. आरोग्याला आवश्य आहते/पह्जते शक्ति.

पुष्प n  flower. फूल॑.

पुष्पकविमान n  chariot of Lord Kubera, capable of flight. कुबेराच उडाच विमान/रथ.

पुष्पराग n  topaz. एक रत्न. पुष्कराज. uis पुष्पराग बसीवलते सोनेच पेटे/सांखळी अत्तच मोलाला उण॑ पक्षा एक लाख रुपे तरीन होईल.

पुष्पवृष्टि n  a shower of flowers. फूलाच वृष्टि.

पुष्पहार n  a garland of flowers. फूलाच माळ॑.

पुष्पांजलि n  flowers offered from the cup of both palms. दोन हात मिळिवून ठिवून फूल॑ अर्पणा कराच॑.

पुष्य n  name of a star. एक नक्षत्राच नाव.

पुस imp  wipe. पुसून शुद्ध करणे.

पुस imp  rub out. पुसून शुद्ध करणे.

पुसका adj  enfeebled. flimsy. debilitated. हलक॑. फुसका. बळ नाहीते. 

पुसका adj  hollow inside. आंत॑ काहीं नसाच॑. पोकळ॑. फुसका.

पुसणे vt  to wipe.पुसूनटाकणे.

पुसणे vt  to dust. धूळ पुसणे. 

पुसणे vt  to rub out. पुसूनटाकणे.

पुस्तक n  book. पुस्तक. ग्रंथ.

पुंगी n  a wind (musical) instrument. फुंगी. फुंकून वाजिवाच एक वाद्य.

पूचि n  a maggot or worm. किडा. अळा. कृमि. Note :- from Tamil.

पूचि n  an insect. पूचि. कीडा. कृमि. Note :- from Tamil.

पूचि n  intestinal worms. पोटाच पूचि/कृमि. Note :- from Tamil.

पूजा n  worship of Gods. देवाला कराच आराधना.

पूजाघर n  puja room in a house. देवघर. पूजाच खोलि.

पूजापाठ n  reading of religious books. पूजापुस्तक॑ वाचणे. पारायण॑.

पूजापुनस्कार n  worship and the associated religious procedures. पूजा अण्खी पूजाला संबंध झालते कार्यक्रम ; पूजापुरस्कार in sm. uis मझ काकाच घरांत नित्य साळिग्राम पूजा करुन तीर्थ घेटला नंतरच जेवतीले. अम्च घरांत॑ तस न्हो. सणाच दिवस मात्र अम्ही साळिग्रामाच पूजा करतों. वेगळ॑ साधारण दिवसांत अस्कीन देवाच दिवा लावून श्लोक॑ सांगणे विना, जास्ति पूजापुनस्काराच पद्धत नाही.

पूजासामग्रि n  items used for performing puja. पूजा कराला उपयोग कराच साधन॑.

पूज्य adj  respectful. आदरणीय.

पूज्य n the numeral zero. पूज्य संख्या. शून्य.

पूट अंबा n  baby mangoes just appearing in trees. नव विणी झाडांत सुटलते ल्हान कोवळ॑ अंबा. uis ताकभाताच बरोर पूट अंबाच लोण्चे खायाला भरून रूच असेल. Note :- पूट करणें or घेणें in SM means "to estimate and purchase the coming crop of fruit-trees (esp. of the jack, mango, and tamarind). पूट देणें To sell the coming crop".

पूड n  powder. पुडि. पोडि. चूर्ण.

पूडफुटाणि n  smithereens. चूर-चूर (होणे). चुक्कु-नूर. uis अर्सांत॑/"ग्ळासांत॑" केलते एक नव घडिगार मी घेऊन एक वार झाल नाही. तजपुढे ते खाले पडून पूडफुटाणि झाले.

पूडफुटाणि n (to be) lost for ever. सत्यनाश (होणे). uis  दहा-पंध्रा वर्षा पुढे उदंड लोक "वी.अर.एस" घेऊन त्यंच हाती आलते पंध्रा-वीस लाख रुपे पाह्तांसून एकदम खुशी झाले. पण व्यापार करतों म्हणूनकी, अनाव्श्य खर्च करूनकी दोन-तीन वर्षांत ते पैसे पूडफुटाणि होऊन गेले. नंतर तेनी जेवालाच कष्टि भोगत होते.

पूरण n  sweet stuffings in a sweet. पूरणपोळि, सोमाशा असल॑ पदार्थांत॑ भराच गुळ्चीट पदार्थ. पूर्ण.

पूरणपोळि n  a sweet pancake like preparation. पूरण घालून केलते एक गुळ्चीट पदार्थ.

पूरा adj  complete. full. पूर्ण. पूर्ती. पूर्त. uis पूरा काम करूनटाकून मला येऊन पा.

पूरा adv  fully. completely. totally. संपूर्ण. पूर्ण. uis तुझ॑ जेबांत काय काय आहे की, ते पूरा दे मला.

पूर्ण n  sweet fillings in a sweetmeat. पूरण. एक पदार्थाचांत॑ भराच गुळ्चीट पदार्थ. uis मैदाच पूर्णाच पक्षा खोब्रीच पूर्ण बर॑ असल॑.

पूर्ण adj  full. भरलते. uis आज अम्च॑ घरांत पूर्ण कलश ठिऊन पूजा होत॑.

पूर्ण adv full. पूर्ण. uis आज त्रयोदशी. म्हणजे, चंद्र पूर्ण होयाला अण्कीन दोन दिवस आहे.

पूर्णचंद्र n  full moon. पौर्णमीच चंद्र.

पूर्णाहुति n  final oblation to deities while performing a homa. होमाच शेवटि देवांला कराच अर्पण॑.

पूर्णिमा n  full moon. पौर्णमि. पौर्णिमा. पुनव. पुनवे. पुनेव. 

पूर्त adv  exclusively. मात्र. केवळ. uis त्यांस॑ डयबीटीस आहे वाटते. कां म्हणजे गुळ्चीट पदार्थ पूर्त सोडून बाकी सग्ळीन (तेवढीन) खाल्ले.

पूर्त adv  only. मात्र. केवळ. uis (1) ते परीक्षा लिव्हाला शेवटी वीस लेंकरे उरल॑होते. त्यांत मझ॑ नातू पूर्त जिंतला. (2) अम्च घरांत काल॑ सत्यनारायण पूजा होत॑. बलावलते अग्गिदनीं आले तरीन, शेदारच॑ (शेजारच॑) लोके पूर्त आल॑ नाहीत॑.

पूर्त adv  in entirety to itself/oneself. पूर्त. uis तज मागे पडाच आवश्य नाही. तज पूर्त तो नीट वाचींगेल॑.

पूर्त adv  entirely. totally. fully. संपूर्ण होऊन. uis तो सांगाच पूर्त लटक॑ विना वेगळ॑ काहीं असना.

पूर्त adv  completed. readied. पूरा झालते. uis तू करत होतते काम पूर्त झालतर॑ इकड॑ येशीलका ?

पूर्ती n  completeness. संपूर्णपण॑. uis मी करत असाच काम पूर्ती होयाला अण्खीन तीन चार दिवस होईल॑.

पूर्व n  east. सूर्य उदय होयाच दिशा/दिक्.

पूर्व adj  former. earlier. पुढे (झालत॑). प्राचीन.

पूर्वकर्म n  consequences of deeds done in the earlier lives. गेलते जन्मांत॑ केलते कार्यांच कर्म.

पूर्वकाल n  ancient times. पुरातन काल.

पूर्वकाल n  earlier times. जुने काल. अगाऊच काल.

पूर्वज n  ancestor. पूर्वज.

पूर्वजन्म n  previous birth. पुढ॑च जन्म.

पूर्वस्थिति n  former state. former condition. पुढ॑च स्थिति.

पूर्वाश्रम n  any of the earlier stages in the four ashramas ordained in a man's life. ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ अणि सन्यास अस एक मनुषाच जीवनांतल॑ आश्रमांत अमुक आश्रमाच पुढे याच आश्रम॑.  uis सन्यासाश्रम घ्याच पुढे श्री राघवेंद्रस्वामीच पूर्वाश्रम नाव "वेंकटनाथा" म्हणून होत॑.
 
पूर्वीक n  ancestry. lineage. वंश. कुल-गोत्र. uis मझ बापा म्हणाले "तज पूर्वीक काय, तज आजा, पणजा, अण्खीन किती थोर कामांत होते, हे सर्वीन कळणास्क॑ तू ओळरू नको/डोस्क नाहीस्क बोल नको/बोलूको".

पूर्वीच॑ adj  former. earlier. पुढच॑.

पूर्वीपसून adv earlier onwards. पुढ॑ पसून ; पूर्वीपासून in sm.

पूर्वीसारख॑ adv  like in the past. पुढ॑ कस होतकी तस॑.

पूं n  pus. पिकलते फोडांतून याच पिवळ॑ रंगाच मळक द्रव्य ; पू in sm.

पूंस n  tail. प्राणींच एक अवयव ; पुच्छ/शेपूट in sm. Note :- though the Marathi word शेपूट was in use in earlier times in DM as शेंपूट, this seems to have fallen out of use and instead the word पूंस which has it's root in the Sanskrit पुच्छ has gained currency with DMs. The word पुच्छ is rarely used in SM. This is a rare case where SM has retained the old word, while DM has dropped it.
 
पूंस गुंडाळिंगून बसणे id  to sit quietly without creating any problem. तंटा/उपद्रव करनास्क॑ उगे बसणे.

पूंसनक्षत्र n  comet. धूमकेतु. शेंडीनक्षत्र.

पूंस लांब करणे id  to create or start some unwanted trouble. आवश्य नाहीते तंटा आरंभ करणे.

पूंस लांब करणे id  to show off as a smart alec (unnecessarily). (आवश्य नाहीस्क) षाणपण॑ दाखिवणे.

पैजामा n  a loose fitting lower garment covering the legs separately. pyjama. पायजामा. लांब विजार/निजार.

पेट n  cinema film. चित्रपट. सिनिमा. पट.

पेट n  framed picture. चित्र. पट.

पेट n  a sketch. a drawing. हातांत होढलते (ओढलते)चित्र. पट.

पेट n  a blaze of fire. विस्तूच जाळ॑.

पेटणे vi  to ignite. to catch fire. विस्तू लागून जळणे.

पेटा n  a round cap. एक विधाच टोपि ; फेटा in sm.

पेटारा n  a rattan or reed basket with a lid. झांकणि असाच बेताच बुट्टि. टोकरी. uis पट्णाच 'मेरीना बीचांत॑' सुंडल विकणार॑ त्यंच सुंडल, भोंचणे, कडले हे सग्ळीन एक पेटारांत॑ ठींगून एकडे-तिकडे चालाच समुद्राच वार॑ खयाला जाणारांस पाव्हुया.

पेटि n  a trunk, either of metal or of wood. लोकुंडाचकी लांकडाचकी पेटि.

पेटि n  a card board packet or box. रट्टाच पेटि.

पेटि n  a large box. संदूक. थोर पेटि.

पेटि n  any small container like that of match-box, letter box, a box for keeping keys etc. ल्हान पेटि.

पेटि n  a rail carriage. रैल गाडीच पेटि.

पेटिवणे vt  to set fire. to ignite. विस्तु लावणे ; पेटवणे/पेटविणे in sm.

पेटिवणे n  fuel. material used for setting fire. विस्तु पेटिवाला उपयोग होयाच वस्तु. इंधन॑.

पेटी-पेटारा n  bag and baggage. household goods packed in boxes and bamboo baskets. पेटींतीन बेताच बुट्टींतीन सांभालून ठिवलते घरच सामान. uis उत्तर-प्रदेशांतीन बीहारांतीन वर्षा-वषी याच जलप्रळयाच समय तिकडल॑ खेडेच लोके त्यंच पेटी-पेटारा उचलींगून गाम सोडून पळाच दृश्य पाह्यलतर॑ मनाला कष्ट वाटल॑.

पेटींगणे vi  to ignite. (अपाप) जळणे. uis उन्हाळाच काळांत॑ डोंगूराच वर्च राण अपाप पेटींगणे भरून दपा अम्ही पाह्यलाहों.

पेटींगून येणे id  to flare up in anger. उदंड राग करींगणे. uis कित्तिदपा सांगटलतरीन तो सांगाच गोष्ट ऐकना. येतां-येतां तला पाह्यिलतर॑ मला पेटींगून येते.

पेटे n  necklace. गळाच माळ ; पेटी in sm. uis अत्तच मोलाला एक वज्राच पेटे घ्याला उण॑ पक्षा दोन/तीन लाख रुपे तरीन होईल. तस घेट्लतरीन घालिंगाला/घरांत ठिवाला भींगाम॑.

पेड n  trunk of a tree. झाडाच पेड. झाडाच घट्टि असाच भाग.

पेढा n  a sweet preparation made by condensing milk. दूधपेढा.

पेरु n  guava fruit. पेरुच फळ॑. जाम. जांब.

पेरंडे fig  a nagging person. मनाला उब्बस करणार॑. Note:- from Tamil, in which पेरंडे means "a cactus which causes itch on contact".

पेला n  a small container used in puja. प्याला.

पेंड n  oil cake. पिण्णाक (Tamil). बींतून  तेल पूरा पिळून काढल॑ नंतर उरलते चक्का. पेंडे.

पेंडे n  oil cake. पिण्णाक (Tamil). बींतून  तेल पूरा पिळून काढल॑ नंतर उरलते चक्का. पेंड.

पै n  a coin of one pie. एक पैच नाण्य.

पैलवान n  wrestler. कुस्ति करणार. पईलवान. पहिलवान. पहलवान. मल्लयुद्ध करणार.

पैशेंकास n  wealth. पैसेंकास॑. धन॑. संपत्त॑. uis एक मनुषाकडे भरून पैशेंकासाच सौकर्य असूनपणीं मनशांति नाहींतर तज संपत्तीच काहीं प्रयोजन नाही.

पैसा n  money. पल्लम.

पैसा n cash. रोक्कम.

पैसा n  wealth. धन॑. संपत्त॑.

पैसा n  paisa, a coin of the smallest value. फार उण॑ मोलाच एक नाण्य.

पैसाखावू adj  bribe taker. लांच घेणार. पैसा उप्पडणार.

पैसा गिळणे id  to embezzle. to swindle. गडप करणे. एमारिवून पैसा करणे. हडप करणे. uis कोण्त॑ व्यापार आरंभ केलतरीन अम्च पूर्त ध्यान तजांत असाम॑. नाहीतर, अम्च ध्यान चुकलतर॑ खाले काम करणार याच पैसे पूराहीं गिळाला पाह्तील॑.

पैसावंत॑ n  a rich person. पैसावाला.

पैसावाला n  a rich person. पैसावंत॑.

पैसेंकास॑ n  wealth. पैशेंकास॑. धन॑. संपत्त॑.

पैंजण n  an anklet. पांयेला बांधाच एक आभरण. कोलुस (Tamil).

पोकळ॑ adj  hollow or loosely tied/packed. पुसक॑.

पोकळा n  a leafy vegetable. एक विधात पाला. uis दक्षिणी मराठी लोकेंत॑ कित्येकदन॑ मोळैकीरेला पोकळा म्हणतात॑ अणी दुसर॑ कित्येकदन॑ अरैकीरेला  पोकळा म्हणतात॑.

पोकिरि n  scoundrel. scalawag. rascal. scamp. सोदा. Note :- 1) from Tamil. 2) पोखरणे in SM means "to rob, to fleece".

पोक्त adj  suitably experienced. well considered. बरोर अणी योग्यविणी अनुभवी झालते. uis नवरात्रीच सणाच वेळी पोक्त ब्राह्मण-सवाष्णी दंपतींस बलावून जेवण॑ घालणे अणी आहेर द्याव पद्धती हे काळांत फार अप्रूप (अपरूप) झालाहे.

पोखार n  a covered hollow cavity (in walls, trees etc, usually caused by the gnawing of insects, rodents etc.). अळा, कीडा असलते चावून झालते. (साधारण होऊन भिंत, झाड असल्यांत॑).   

पोखार fig  lightly. slightly. not deep. superficially. व॑रून. जास्ति जोर नाहीस्क॑ ; पोखर/पोखार in sm. uis तला मोटर बैकांतून खाले पडून पोखार म्हणून घाव लागलाहे.

पोगणी n swimming. पोवणी. पोहणी. नीचल (Tamil).

पोगणे vt  to swim. पोवणे. पोहणे. नीचल करणे (Tamil).

पोचणे vi  to reach. जावून पावणे. पोंचणे.

पोचा n  a dent (in a vessel etc). पोंचा. (पात्र/भांडि) चेंपून झालते विकार॑. 

पोट n  stomach. अंगाच एक अवयव. जेवण जीर्ण करिवाच अवयव. 

पोट n  pot belly. विकार रूपाच मोट्ठ॑ पोट. तोप्पे (Tamil).

पोटखर्च n  expenses for bare necessities. उपजीवनाला पह्जते खर्च ; पोटखर्ची in sm.

पोटजाळ fig  jealousy. envy. असूया. uis मला भूटान-लोट्टरींत॑ एक कोटि बडिवल॑ म्हणून ऐकून शेदारल॑ घरचाला पोटजाळ झाल॑.

पोट ढवळणे n  (to have) loose bowels. ढाळणे.

पोटपूजा fig  looking after one's own epicurian welfare. इद्रीयांच आस्वाद स्वार्थपणांत घेणे.

पोट भरणे id  to satisfy one's desire. मनाच तृप्त होणे. uis पांडवांच सत्यनाश झाला विना दुर्योधनाच पोट भरना म्हणून पूरा निश्चय झालावर तेनी एक महायुद्धाला तय्यारि आरंभ केले.

पोट वाळीवणे fig  to remain hungry by ignoring other activities. वेगळ॑ कार्य करनास्क अनशी पोटांत॑ असणे. uis मझ माय वरडली "तस पोट वाळीवून कसाला काम करत आहेस॑. पोटाकरतांच न्होका अम्ही उद्योग कराचेच॑ ?"

पोटशी n  a small cloth pouch that is tucked in at the waist by ladies. पोटाकडे खोवून ठिवाच ल्हान पिशवी.

पोटसूळ n  stomachache. पोट दुखणे ; पोटशूळ in sm.

पोटाच ढवळ॑ n  nausea. वांत यास्क॑ होणे.

पोटाच वाट n ways to take care of bare necessities of life. means for subsistance. काळ कांडणाला पह्जते वाट. कष्टि भोगून उपजीवन कराच वाट.

पोटाला बडिवणे id  to deprive one of everything. दुसरेला एकदम नाश करणे.

पोटि  n  competition. दुसरेपक्षा षाणाम्हणून दाखिवाच॑. Note :- from Tamil. uis मझ॑ मित्र मझबरोर पोटि घालून शंभर गुंजी/गुंजा घाटला.

पोट्टु  n  dot (on the forehead). (कपाळांतल॑) ठिमका. कुंकू. Note :- from Tamil.

पोट्रे n  calf muscle. गुडिघाच खालच भागांतल॑ मांस॑ ; पांयाच पोट्री in sm. uis अधीक चालनाते लोक असलास्क-असून उदंड पायरी वेघलतर त्यंच पोट्रे दुखल॑.

पोट्लम  n  a small (paper) packet made impromptu. (कागदांत॑) तक्षण गूंडाळून बांधलते एक ल्हान पुडका. पुडा. पुडी. Note:- from Tamil. As against मूटा which is a larger impromptu package.

पोणावांटा n  mostly. अधिकपक्ष॑. Note:-  (1) The word appears to be derived from पाउणे meaning 'three-fourths' and वांटा meaning 'share'. A similar uasage in Tamil is मुक्कालवाशी (मुक्काल+वाशी). (2) In sm  पाऊणवांटा means "three fourths" and "the greater quantity, majority" (fig).

पोणावांटा n  a majority of. a large number of. असाचांत॑ जास्ति भाग.

पोण्णि n  garnishing with mustard, jeera etc in hot oil. फोड्णि. मोहरेहीं जीरेहीं तावलत॑ तेलांत॑ घालून संपाकाच पदार्थांत॑ घालाच॑. Note :- better फोड्णी, rather than the Tamilised version पोण्णि.

पोण्णीच-भात n  a type of rice preparation with garnishings. फोड्णीच-भात. फोड्णी घालून केलते एक रीताच भात/पदार्थ.

पोणीच-सार n  a type of dilute rasam. गोड-सार. गोढ-सार. फोड्णीच-सार.

पोणीच-सांभार n  a type of sambhar. एक रीताच सांभार. फोड्णीच-सांभार.

पोती n  bead (of glass, gold, stone etc.). (काच, सोन॑ नाहीतर खडेच) मणी ; पोत in sm.

पोतेरे n  a wet mop. (घरच) भोई पुसाच ओल कापड. uis बकटांतल॑ पाणींत 20 सी.सी. फिनैल (फिनैल बोट्टलच झांकणींत॑ मावाच तेवढ॑) मिळिवून तजांत पोतेरे कापड बेष बुचकळून पिळून काढून सारिवाम॑ म्हणून कित्तीदपा सांगटलतरीन अम्च॑ कामवालि नित्य नुस्त पाणींतच भोंई सारिवते.

पोर n  a boy. दादिगा (दाद्ग्या) पोर.

पोरपण॑ n  boyhood. तरुणपण॑.

पोरवडा n  a group of children. लेंकरांच एक गुंप॑ ; पोरोडा/पोरवडा in sm. uis नित्य संध्याकाळि चार वाजतांसून मझ नातूच मित्र पोरवडा समोरल॑ मैदानांत येऊन 'फ़ुट्बाल' खेलतील. त्यंच मध्ये भांडिंगाच दृश्य पाह्याला तमाषा अस्ते.

पोराटिकपण॑ n  childhood pranks. ल्हान पोरांच चेष्टपण॑.

पोराटिक॑ adj  childlike. लेंकरा सार्खल॑ (वागणे). uis मझ लोंकाच वय 35 वर्ष झाल तरीन तिने अत्तहीं पोराटिक॑ आहे.

पोरि n  girl. बायको पोरि.

पोरे n  children. लेंकरे.

पोळणे vi  to become very hot. एकदम ऊन होणे.

पोळणे vi  to scald. लासणे.

पोळिवणे vt  to make very hot. फार ऊन करिवणे.

पोळी n  a flat sweet preparation. लाटून कराच एक गुळ्चीट पदार्थ. Note:-  पोळी in sm also means 'chapati'.

पोळींगणे vt  to get heated or scald  on oneself. अपाप लासींगणे.

पोवणी n swimming. पोगणी. पोहणी.

पोवणे vt  to swim. पोहणे. पोगणे.

पोहणी n swimming. पोवणी. पोगणी.

पोहणे vt  to swim. पोगणे. पोवणे.

पोहा n  beaten parched rice. भिजिवून कुटून चपटा केलते तांदूळ. पोहे.

पोहे n  beaten parched rice. भिजिवून कुटून चपटा केलते तांदूळ. पोहा.

पोंचणे vt & vi  to reach. जावून पावणे. पोचणे.

पोंचिवणे vt  to convey (to another place). (दुसरेकडे) घेवून जाणे. पोचिवणे ;  पोचवणे/पोचविणे in sm.

पोंचा n  dent on a surface. तळावर झालते एक ल्हान टोंचा.  uis अम्ही गेल रविवार पोंचा पडलते पात्र पूरा दुकानाला घेऊन जाऊन बरोर करींगून आलों.

पोंपडा n  blisters. आंगावर याच पू/नित्तळ द्रव्य भरलते सूज॑/फोड॑. uis कढत पाणी आंगाव॑र पडून समच तज व॑र हिंस पाणी घाट्लतर॑ पोंपडा होईल. तज व॑र 'बर्णाल' असल॑ मल्लम लावलतर॑ पोंपाडा लोक्कर वाळून बर॑ होईल.

पौणे n  three-fourths. पाउणे. एकाला पाव उणे. मुक्काल (Tamil) ; पाऊण in sm.

पौराणिक adj  related to Puranas. पुराणाला संबंध झालते. uis पौराणिक विषया व॑र मला जास्ति ज्ञान नाही तर पणीं, तज महत्व कित्ति म्हणाच मला कळल॑.

पौर्णमि n  full moon day. पौर्णिमा. पूर्णिमा. पुनेव. पुनवे. 

पौर्णिमा n  full moon day. पौर्णमि. पूर्णिमा. पुनेव. पुनवे. 

पौष n  poushya month of the Hindu calendar. पौष्य महिना.

पौष्य n  poushya month of the Hindu calendar. पौष महिना.

पौस n  rain. मेघांतून/वांबांतून पडाच पाणी. पाऊस.

पौसाळा n  rainy season. पाऊसाच काळ॑. पावसाळा. पाऊसाळा.

प्याला n  a small container used in puja. पेला.

प्रकट n  become manifest. स्पष्ट दिसून देणे.

प्रकार n  kind. sort. class. type. रीत॑. वर्ग.

प्रकार n  manner. mode. way. रीति. विधान॑. पद्धत॑.

प्रकाश n  brightness. luster. उजाड.

प्रकाशन n  publication. पुस्तक, लेख असलते छापून प्रसिद्ध करणे.

प्रकृति n  natural manifestation. निसर्गांतल॑ मूल रूप.

प्रकृति n  nature. निसर्ग.

प्रकोप n  excess. predominance. अधीक. अधिक. भरून. जास्ती. उदंड. उजंड. uis हे वर्षी बंगळूरांत उन्हाळाच महिनेंत प्रकोप ऊन होत॑. 

प्रख्यात adj  renowned. famous. विख्यात. प्रसिद्ध॑. प्रशस्थ. uis 'बाड्मिंटन' खेळांत॑ भारताच साइना नेहवाल एवढ॑ ल्हान वयेंतेच, म्हण्जे वीस वर्षांतेच एक प्रख्यात खेळनारि झालि आहे.

प्रचार n  currency. चालू.

प्रचार n  prevalence. प्रसार. प्रसिद्ध॑.

प्रचार n  propaganda. प्रचार. 

प्रजा n  subjects of a country. राज्याच लोके.

प्रणय n  love. प्रेम.

प्रणाम n  salutation. नमस्कार.

प्रताप n  greatness. majesty. गांभीर्य. थोरवी. थोरपण॑. uis महाराष्ट्राच चरित्रांत॑ शिवाजीच प्रताप सग्ळांच पक्षा मोट्ठ॑ आहे.

प्रति  pref  severally. each and every. प्रत्येक-प्रत्येक.

प्रति  pref  as opposed to. अनुकूलाच विरुद्ध.

प्रतिकूल adj  contrary. उलटा. विरुद्ध.

प्रतिक्रिया n  response. a reaction. प्रतिसाद. 

प्रतिदिवस adv  every day. daily. दिवसोडि.

प्रतिध्वनी n  echo. पडसाद. स्वता आवर्त होऊन याच शब्द.

प्रतिनिधी  n  representative. अमुक कामा करतां स्वताच बदिल पाठिवलते वेगळ॑ एक मनुष.

प्रतिपक्ष n  the opposite party. विरुद्ध पक्ष. 

प्रतिबिंब n  reflection. अर्सा, पाणी असलत्यांत दिसाच छाया. पडछाया.

प्रतिमा n  idol. मूर्ति. विग्रह.

प्रतिमा n  statue. मूर्ति. विग्रह.   

प्रतिवर्ष adv  annually. every year. वर्षावर्षी. एक एक वर्षांतीन.

प्रतिशत n  per cent. प्रति शंभरांत॑. एक एक शतांतीन.

प्रतिष्ठा n  an installed idol. स्थापना केलते विग्रह.

प्रतिष्ठापना n  establishment. स्थापना.

प्रतिष्ठापना n  installation. स्थापना.

प्रतिज्ञा n  pledge. आणै (Tamil). सत्य करून सांगणे.

प्रतीक्षा n  expectation. प्रतीक्षा. (आशांत) वाट पाह्णे. परिणाम काय होईल म्हणून वाट पाह्णे.

प्रत्यक्ष adj  visibly manifest. डोळेला पडणे.

प्रत्येक adj  each and every. प्रति एक. एकेक. अमुक अमुक.

प्रत्येक adj  a separate (one). वेगळ॑ होऊन असाच (एक).

प्रत्येक adj  a specific (one). अमुक.

प्रत्येक-प्रत्येक adj  each separately. each differently. एकेएकीं वेगळ॑-वेगळ॑.

प्रथम adv  first. पहिलच॑. पह्यिलच॑.

प्रथा n  general practice or custom. general usage. रूढी.

प्रदर्शन॑ n  display. दाखिवणे. 

प्रदर्शन॑ n  exhibition. a fair. मेळा.

प्रदक्षिणा n  circumambulation from the left side, ie, with the central object always on right side. डावीकडून भोंताले चालून फिरणे. म्हणजे, प्रदक्षिणा कसाला करतों की, ते केम्हाहीं उजव॑कडे ठींगून. Note :- दक्षिण is South. With East as the cardinal direction (on account of Sun rise from there) for one facing East, दक्षिण will be on his right. Hence दक्षिण also means 'right'. In "प्रदक्षिणा" प्र means 'moving or going' and so "प्रदक्षिणा" means "moving with the central object always in the right side".
   
प्रदेश n  a region. देशाच एक भाग. प्रांत.

प्रधान adj  principal. मुख्य.

प्रधान adj  important. मुख्य.

प्रपंच n  the world. भूलोक.

प्रपंच n  the universe. ब्रह्मांड.

प्रबल adj  strong. powerful. mighty. बळशाली. सामर्थ्यशाली.

प्रभा n  luster. splendour. तेजस.

प्रभाकर n  the sun. सूर्य.

प्रभाव n  glory. ऐश्वर्य. 

प्रभाव n  power. might. शक्ति.

प्रभावळि n halo. radiance behind the head. डोस्केच मागल॑ शोभा. पीठ प्रभावळि.   
       
प्रभु n  lord. master. स्वामि.

प्रमाण n  measure or rule of accordance. आधाराजोक्त असणे. uis ते पोराच स्वभाव काय म्हण्जे, तला कोण काय सांगटलतरीन ते प्रमाण करना. तला काय वाटतेकी तसच करेल॑. 

प्रमाण n  proof. आधार॑.

प्रमाद adj  excellent. बेष. uis लोणि ताऊन तूप केलते तेलतवा खरडून काढलते कषंडि सार भाताच बरोर कालिवून जेवलतर॑ प्रमाद रूच अस्त॑.

प्रमुख adj  main. chief. मुख्य.

प्रमोद n  jubilation. उत्साहाच आह्ळाद.

प्रयत्न n  effort. परिश्रम॑. श्रम.

प्रयाण n  journey. यात्रा. सवारि. प्रवास.

प्रयास n  difficulty. कष्ट.

प्रयास n  exertion. प्रयत्न. श्रम.

प्रयोग n  bringing into use. utilising. applying. वापरणे. uis गणेश उत्सवाच वेळी झालते हिंदु-मुस्लीम गलाटा टीयर-गॅस प्रयोग केल विना शमन होयना म्हणून पोलीस दहादपा (दहा रौंड) टीयर-गॅस षेल (गोली) सोडले/फुटिवले.     

प्रयोग n  implementing. applying. कामाला आणिवणे. uis अम्च देशांत॑ होतअसाच अन्याईं अक्रमहीं चोक्कोट नियम नाहीतेकरतां न्हो (नहो), पण नियमांच प्रयोग बरोर करनातेकरतां आहे.

प्रयोजन n  usefulness. उपयोग.

प्रयोजन n  practical purpose or necessity. need. गरद. जरज. आवश्य.

प्रळय n  deluge. मोट्ठ॑ पौस/पाऊस येवून (भूलोकाच) पूरा नाश होणे ; प्रलय in sm.

प्रळय n  complete dessolution of the Universe. ब्रह्मांडाच विनाश.

प्रळयकाल n  time of total destruction. ब्रह्मांड अंत होयाच समय॑ ; प्रलयकाल in sm.

प्रवचन n  religious discourse. धर्माच भाषण॑.

प्रवर॑ n  being in the status of the three related gotras. सहगोत्राच संबंध म्हणून असाच तीन गोत्र॑.  uis  वसिष्ट, कौंडिन्य, मैत्रावरुणा हे ऋषींच नावांतल॑ तीन गोत्रहीं एकच प्रवराच आहे.

प्रवर्ति n  activity. action. प्रवृत्ति. क्रीया. काम. 

प्रवर्तन n  activity. काम.     

प्रवास n  travel. trip. यात्रा. प्रयाण. सवारि. Note :- normally used in relation to foreign travel.

प्रवाह  n  flow. current (of water). (पाणीच) वाहणे. uis  "डॅमाच" खाले पाणीच प्रवाह फार जास्त/भयंकर अस्त॑. तथे कोठतरीं उतराला प्रयत्न केलतर पाणी बडींगून जाईल.

प्रवीण adj  well-versed. expert. पंडित्य असाच॑.

प्रवृत्ति n  activity. action. प्रवर्ति. क्रीया. काम.

प्रवेश n  entrance. आंत॑ जायाच वाट.

प्रवेश adv  to enter. आंत॑ जाणे. आंत वेघणे.

प्रवेशद्वार n  an entrance to a temple. देऊळाच आंत जायाच/वेघाच वाट.

प्रवेशद्वार n  entrance. आंत॑ जायाच/वेघाच वाट.

प्रशस्ति n  fame. renown. कीर्ति. प्रसिद्धि.

प्रशंसा n  praise. स्तुति.

प्रशांत n  tranquility. serenity. शांत.

प्रश्न n  question. विचार कराच॑. सवाल. uis इषोबाच परीक्षांते पन्नास प्रश्न होततांते मी चाळीस प्रश्नाला बरोर उत्तर देलों. बाकि दहा प्रश्नाच उत्तर चुकल॑. 

प्रश्न n  worrisome problem. अवघड समस्या. uis बाजु घरांत॑ नव कोणकी अवधड लोक॑ आलाहते. ते अत्ता अम्हाला एक थोर प्रश्न झालाहे.

प्रसन्न adj  delighted. pleased. संतोष(होणे).

प्रसन्नता n  satisfaction. संतोष.

प्रसव n  birth. उजणे. जन्म. बाळंत॑.

प्रसवकाल n  time of delivery. उजाच वेळ.

प्रसवणे vt  to deliver. जन्म देणे. उजिवणे.

प्रसव वेदना n  delivery pains. लेंकरू उजाच वेळ पोटाला होयाच दुखणे.

प्रसंग n  public speech. भाषण.

प्रसाद n  food offered to Gods. देवाला नैवेद्य केलते पदार्थ.

प्रसाद n  blessings. कृपाच अनुग्रह.

प्रसार n  spread. widespread. विस्तार. पसरून असाच॑.

प्रसार n  broadcast/telecast through radio or television. टेलिविशन नाहीतर॑, रेडियो वाटे कराच प्रसार. प्रक्षेपणा.

प्रसिद्धि n  fame. renown. reputation. प्रशस्ति. कीर्ति. थोर नाव.

प्रसिद्ध॑ adj  famous. renowned. reputed. well known.  कीर्ति/प्रशस्ति/प्रसिद्धि झालते.

प्रक्षेपणा n  brodcast. telecast. रेडियो अथवा टेलिविषनावाटी प्रसार कराच. प्रसार.

प्रज्ञा n  consciousness.the state of mental alertness. मनाला बोध असाच स्थिति. ज्ञान. uis गेल वर्षी नवंबरांत मला 'हॉस्पिटलांत' वेंटीलेटर घालून ऐ,सी.यूंत ठिवलास्ताना मला पसतीस घंटे पतोरी प्रज्ञा न्होत॑. मी मूर्च्छांत असताना मझ बाईलीं मझ भाऊईं फार भींगट्ले. Note:- प्रज्ञा in sm means 'genius, sharpness of intellect' and also 'understanding'.

प्राकार n  passage used for circumambulating in a temple. देऊळांत प्रदिक्षणा कराला असाच वाट.

प्राकृत adj  natural. प्रकृतीला संबंध झालते. निसर्ग.

प्राकृत n  an unrefined version of Sanskrit. संस्कृत भाषाच अशुद्ध रूप॑.

प्राकृत adj  an unrefined language. असंस्कृत भाषा. वाचलनीहीते लोक बोलाच भाषा.

प्राचीन adj  ancient. फार/उजंड/उदंड जुन॑.

प्राण n  life. जीव.

प्राण n  soul. आत्मा.

प्राण fig  dear as life. (एकावर) फार इष्ट ठिवणे. uis मझ अण्णाला अंबा म्हण्जे प्राण॑. पण, ते खालतर त्यांस॑ आंग पूरा पोंपडा येईल म्हणून अंबा खातच नाहीत॑. 

प्राण काढणे id   to oppress. to harass badly. फार तंटा करणे.  प्राण खाणे. प्राण घेणे. मनाला फार उब्बस करणे. uis कित्येक लेंकरांस॑ दुकानांत बलाईंगून गेलतर॑ "हे घेऊनदे-ते घेऊनदे" म्हणून हट्ट करून प्राण काढूनटाकतील॑. दुकानांतून बाहेर येजोरि अम्हाला पुरे-पुरे होऊन जाईल.

प्राणखाऊ adj  (that which or a person who) oppresses one to the limit. फार तंटा कराच॑. uis पाह्ताना अस्कीन तो मला रीण विचारत अस्तो. द्याला होयना म्हणून कित्तीदपा सांगटलतरीन मला सोडना म्हण्तो. तो एक प्राणखाऊ झालाहे.

प्राण खाणे id  to oppress. to harass badly. फार तंटा करणे. प्राण काढणे. प्राण घेणे. मनाला फार उब्बस करणे.

प्राण घेणे id  to oppress. to harass badly. फार तंटा करणे. प्राण काढणे. प्राण खाणे. मनाला फार उब्बस करणे.

प्राण ठिवणे id  to set one's heart/mind on a thing. (एकावर) अत्यंत मोह ठिवणे.
 
प्राणत्याग n  self-immolation. आत्महत्या.

प्राणप्रतिष्ठा  n  the rite of consecrating God's idol. विग्रहांत देवाला आवाहन॑ करणे.

प्राणमित्र n  a friend as dear as life. गाढ मित्र. प्राणस्नेहित. uis अंबरनाथ (मुंबई) राहणार मझ एक प्राणमित्र दोन वर्षा पुढे एक थोर रोगांत॑ मेले. तेनी मेलते ऐकून उदंड दिवस पतोरी मला मनांत फार दुख॑ होते.       

प्राणसंकट n  extreme distress. मनाला फार संकट वाटणे.

प्राणस्नेहित॑ n  a friend as dear as life. गाढ मित्र. प्राणमित्र.

प्राणायाम n  regulated breathing done as a part of religious rites or yoga exercise. पूजाकार्यक्रम अथवा योगासनाला संबंध झालते श्वासाच नियंत्रण॑.

प्राणार्पण॑ n  sacrificing life. प्राणत्याग.

प्राणि n  animate thing. एक जंतु. जीव असाच प्राणि.

प्राणेश n  Lord Hanuman. प्राणदेव. श्री हनुमान. हनुमंत॑.

प्राधान्य n  prominence. importance. priority. महत्व. मुख्यत्व. प्रधान स्थिती.

प्राप्त adj  attained. मिळालते. मिळ्ळते.

प्राप्ती adv  to attain. to obtain. मिळणे.

प्राबल्य n predominance. प्राधान होऊन असणे.

प्राय n  age. वय.

प्रायश्चित्त n  atonement. पाप सुटाला कराच कार्य.

प्रराब्द n  pre-ordained fate or destiny. कर्मफल॑ ; प्रारब्द in sm.

प्रारंभ n  beginning. आरंभ.

प्रार्थना n  prayer. देवाला कराच विनंति.

प्रांत n  a region. a geographical area. एक प्रदेश. uis अम्च भारत देशाच लोक॑ बाहेर गामांत मिळल तर पणीं तेनी भारतांत कोण्त॑ प्रांताचे म्हणून विचारून कळींगतील॑ अणी एकच प्रांताचे असलतर॑ त्यंच मध्ये जास्ति येणे-जाणे करतील॑. हे अम्च लोकांच स्वभाव आहे.

प्रांत n  boundary or border of a region. एक प्रदेशाच भोंतलच सीमा.

प्रीय adj  beloved. स्नेह (झालते).

प्रीति n  love. affection. प्रेम. स्नेह.

प्रेत n  dead body. मढ॑. शव. मृत देह.

प्रेतभूमि n  burning ghat. स्मशान.

प्रेम n  affection. love. प्रीति. स्नेह.

प्रेरणा n  encouragement. प्रोत्साहन॑.

प्रोत्साहन॑ n  encouragement. प्रेरणा.

प्रोक्षणा n  sprinkling of sacred water on one's head. डोस्के व॑र तीर्थ अथवा पूजाच पाणी शिंपडाच. uis घरांत साळीग्रामाच, नहीतर, देवीच (टांकाच) अभिशेक केला नंतर ते पाणी घरच तेवढ॑दनीं प्रोक्षण करींगण॑ उदंड उत्तम॑.

प्रोक्षण॑ vt  to sprinkle the sacred water on one's head. डोस्के व॑र तीर्थ अथवा पूजाच पाणी शिंपडणे.

प्रौढ adj  proud and dignified. mature (in thought). dignified (behaviour). गांभीर्य (स्वभाव). uis विश्वामित्र ऋषि श्रीरामालीं लक्ष्मणालीं त्यंच याग भंग करणार राक्षसांकडून रक्षा कराला त्यंच आश्रमाला बलायींगून गेलस्ताना श्रीराम सोळा वर्षाचेच होते. तरीन त्यंच प्रौढ रीतीच वागणेईं स्वभावीं पाव्हून आश्रमांतल॑ ऋषींना फार आश्चर्य वाटले. हेनी एक साधारण बालक न्हो, दैवीक अणी सात्वीक मनाच॑ आहेते म्हणून आश्रमांतल॑ सर्व ऋषींलीं कळ्ळ॑.

प्हाणे vt  to see. डोळेला पडणे. पाणे ; पाहणे in sm.

प्हाणे vt  to look after. to take care. पाणे. बरोर पाहींगणे/पाह्यींगणे. सांभाळणे.

प्हाहींगणे vt  to look after. to take care. पाहींगणे. सांभाळणे.

No comments: