य
य the twenty-sixth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच॑ सव्वीसवां व्यंजन॑.
यजमान n husband. दाल्ला. दल्ला.
यजमान n owner. मालक.
यजमानीन॑ n a female owner. स्त्री यजमान. uis 'हेरिटेज' दूधाच कंपनीच येजमानीन॑ श्रीमति भुवनेश्वरी (श्री चंद्रबाबु नायुडूच बाईल) आहे. तेनी नावाला मात्र न्हो, पण खर॑ म्हणून ते कंपनीच तेवढे कामीन सांभाळतात म्हणे. अस अम्च देशांत उदंड बाईका थोर-थोर कंपनीच यजमानीन॑ म्हणून आहेत॑.
यजमानीन॑ n wife of the owner. यजमानाच॑ बाईल. uis अम्च घरच॑ जवळ असाच दाळ-तांदूळाच दुकानवाला नावाला मात्रच ते दुकानाच मालक म्हणून सर्वालीं कळल॑. रीणांत काहीं साधन अम्हि विचारलतर॑ "तुम्ही यजमानीनाला विचारा" अस॑ ते दुकानवालाच सांगतो !
यजुर्वेद n the second of the four Vedas. चार वेदांत॑ दुसर॑ वेद.
यजुर्वदी n a follower of Yajurveda. यजुर्वद संप्रदाय अनुसार करणार.
यती n an ascetic. संन्यासी.
यत्तन n effort. work. endeavour. प्रयत्न. uis मनुषाच यत्तन अर्ध, देवाच यत्तन अर्ध म्हणणे आहे. पण, मला वाटाच काय म्हण्जे मनुषाच यत्तन 99% अणी देवाच अनुग्रह 1% असाम॑. कारण, देव अम्हाला मनुषाच जन्म देलतेच एक थोर कार्य म्हणून सांगूया.
यथा adv ditto. तसलते.
यथाकाल adv appropriate time. योग्य वेळ.
यथाक्रम adv regular order. क्रमाप्रकार.
यथापद्धती adv as usual. यथा प्रमाण॑ ; यथापद्धती/यथापद्धत in sm.
यथापद्धती adv as per practice. दंडका प्रमाणे.
यथाप्रकार adv as before. पुढ॑ सार्ख. व॑रच प्रकार.
यथाप्रती adv as per original. पह्यिलचस्क॑.
यथार्थ adj true. खर॑.
यथार्थ adj real. वास्तव॑.
यथार्थ adj proper. योग्य.
यथार्थता n truthfulness. खर॑पण॑.
यथाविधी adv as per rules. शास्त्रा प्रमाण॑.
यथाशक्ती adv as per one's ability. स्वंत॑ श्रमाजोक्त॑.
यथाशास्त्र adv as laid down in scriptures. शास्त्रा प्रकार.
यथास्थिती adv original state. पह्यलच॑ स्थिती.
यथे adv here. this side. in this place. हे ठिकाणी. एथे. इकडे. इथे.
यथे-तथे adv hither and thither. एथे-तथे. इकडे-तिकडे. इथे-तथे.
यथेल॑ adj relating to this side. हे पटीसच॑. एथेल॑. इकडच॑. इथेल॑. हे बाजूच॑.
यथेल॑-तथेल॑ adj of various places. इकडल॑ तिकडल॑. एथेल॑-तथेल॑. इकडच॑-तिकडच॑. इथेले-तथेल॑.
यथून adv from here. एथून. इकडून. इथून.
यथेच्छ adv as per one's wish. to the satisfaction of one's wish. to heart's content. यथेष्ट. इष्ट प्रकार. मनाजोक्त॑.
यथेष्ट adv as per one's wish. to the satisfaction of one's wish. to heart's content. यथेच्छ. इष्ट प्रकार. मनाजोक्त॑. uis संकोच भोगनाका. यथेष्ट जेवांत॑ !
यथेष्ट adv plenty. भरून. उदंड. उजंड. uis (1) योचना करनाकांत॑. गुंजालाडू यथेष्ट आहे. अस्गिदनालीं चार-चार वाढाला पह्जे तेवढे आहे. (2) हे वर्ष पाऊस/पौस बेष झाल॑. नदींत॑ पाणी यथेष्ट गळत/वाहत आहे.
यथेष्ट adv unreservedly. बाधा नाहीस्क॑. अडचण॑ नाहीस्क॑. uis तेनी एक फार उदार मनुष॑. दान धर्म यथेष्ट केलाहेत॑.
यथोचित adv befittingly. योग्याजोक्त.
यनी pron these people. हे लोके (सर्वनाम॑, बहुवचन॑). येनी. हेनी.
यम n Lord Yama. God of Death. यमदेव. मृत्युदेव. कालदेव.
यम fig extreme. फार. उजंड॑. uis अमच शेदारल घरच पोर यम तंटा करतो. तज बापाकड सांगून काय प्रयोजनीं झाल नाही.
यमगंडम n a specified period of one and a half hours of each day during which any activity leads to failure or destruction of the end result. प्रत्येक दिवसाचीं दीड घंटेच अशुभ काळ. हे काळांत कराच काम व्यर्थ होईल म्हणून आहे. uis एक मुख्य कार्य कराच पुढ॑ राहुकाळकी, यमगंडकी असनास्क पाह्यींगण॑ बर॑. Note :- this period changes from day to day.
यमदूत n messenger of Death sent by Yama to take away the life of the dying. मराच लोकांच॑ जीव काढाला यमदेव पाठिवाच॑ सेवक.
यमधर्म n Lord Yama. यमदेव.
यमपुरी n the abode of Lord Yama. यमलोक.
यमबाधा fig extreme pain. थोर दुखणे. uis मझ बाईलीला गुडघाच 'ऑपरेषन' झाला नंतर॑ दहा-पंध्रा दिवसाला यमबाधा झाल ; पांय सरकीवाला देव दिसून गेल॑.
यमलोक n the domain of Lord Yama. यमपुरी.
यमलोक n the place where the souls of the dead depart to. मराच लोकांच॑ जीव पावाच ठिकाण.
यमी n name of Lord Yama's sister. यमदेवाच बहिणीच नाव.
यमीण॑ fig a derisive term to describe an incorrigible woman. अवघड स्वभावाच बायको.
यवढ॑ adj this much, so much (implying magnitude or quantity). येवढ॑. एवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑ ; एवढा in sm. uis (1) तला पैसाच कष्ट आहे म्हणून उदंड दिवसा पसून मला कळ्ल॑ होत तरीन, यवढ॑ कष्ट होत म्हणून म्हणींगटळोंच नाही.(2) सद्याला मझकड॑ पैसा यवढ॑च आहे. अण्खीन जास्ती पह्जतर॑ नंतर॑ पाठिवून देतों.
यवढ॑ adj this much , so much etc (implying multitude or number). येवढ॑. एवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑ ; एवढा in sm. uis आजच कार्यक्रमाला अम्ही दोनशे जण येतील म्हणून तज जोक्त पल्हाराच व्यवस्था केलोतों. पण, योचना केलत्यापक्षा पन्नास जण अधीक आलेतेकरतां सद्याला आलते यवढ॑ लोकांस॑ पल्हार वाढलांपिरी आवश्या प्रकार केवढ पह्जकी तेवढ॑ पल्हाराच व्यवस्थाला पुन्हाहीं सांगून पाठिवलों.
यवढ॑-तेवढ॑ adj approximately. roughly. जवळ-जवळ. एवढ॑-तेवढ॑. uis तुला ते पूरा कळनातरीन, तज विषयीं यवढ॑-तेवढ॑ तरीन कळ्लासलतर॑ अम्च काम कसतरीन चालिवुया म्हणून मला वाटत॑.
यवंदा adv this year. हे वर्षी. हेवंदा. यंदा. uis गेलंदा बोर-आड खांडाला प्रयत्न करून पाणी आल॑ नाही म्हणून यवंदा मी सादा आड खांडाला निश्चय केलों.
यवंदा adv this time. हे दपा. हेवंदा. यंदा. uis ते गांवाला जायाच वाट उदंड हाळ जालाहे. गेल महिना तिकड गेलतम्हा मझ बंडी "पंक्चर" होऊनगेल॑/झाल॑. ते करतां यवंदा मी तिकडे जाताना मझ स्वंत बंडींत जायनास्क॑ बस धरींगून गेलों.
यशवंत adj meritorious. कीर्तिमान. यशस्वी.
यशस्वी adj meritorious. कीर्तिमान. यशवंत.
यक्ष n a demi-god of very low status. ल्हान स्थितीच एक उपदेवता.
यक्षिणी n female of the yaksha species. यक्ष वर्गाच बायको.
यज्ञ n an elaborate religious ceremony. याग. होम.
यज्ञकुंड n a fire-pit for offering oblations. होमकुंड. आहूती सोडाच अग्निकुंड.
यज्ञशाला n the place meant for performing yagnya. यज्ञाच ठिकाण.
यज्ञोपवीत n the sacred thread. जानव.
यंत्र n machine. उपकरण॑.
यंत्र n an amulet of a copper plate engraved with tantric symbols worn on the body or hung at the entrance of a home to ward off evil. दृष्टि लागनास्क असाला, नाहीतर, भूत-प्रेत-पिशाचांच॑ उपद्रव होईनास्क असाला तंत्राच चिन्ह होढलते/ओढलते ताम्रेच पदक/टांक. uis हे आंगावर घालणे, नाहीतर, घराच उंबराव॑र ठिवणे आहे. घराला दृष्ट लागनास्क॑ असाला कित्येक लोक॑ घराच बाह्येर 'श्री श्क्ती' यंत्र अडकीवतात॑.
यंदा adv this year. यंदपा. हे वर्षी. हेवंदा. यवंदा. uis घरच अंबाच झाडांत॑ गेलंदा पक्षा यंदा फूल उदंड उणे सोडलाहे/झालाहे.
यंदा adv this time. this occasion. यंदपा. हे दपा. हेवंदा. यवंदा. uis गांवाला जायाच वाट उदंड हाळ जालाहे. गेल महिना तिकडे गेलतम्हा मझ बंडी "पंक्चर" होऊनगेल॑/झाल॑. ते करतां यंदा मी तिकड जाताना मझ स्वंत बंडींत जायनास्क॑ बस धरींगून गेलों.
या n come hither. आदरांत॑ (अम्च॑कडे) बलावणे. यावा. यांत॑. येंत॑.
याग n an elaborate religious ceremony. यज्ञ. होम॑.
यागशाला n enclosure where yaga is performed. याग कराच स्थल.
यात्रा n a trip. (वेगळ॑ गावाला) जाण॑.
यात्रा n a pilgrimage. तीर्थ यात्रा. तीर्थाडन॑.
युक्त adj proper. योग्य. उचित.
युक्ती n an idea. एक योचना. योजना.
युक्ती n a trick. उपाय॑.
युग n an an epoch. an age. एक फार मोट्ठ॑ काळ॑.
युग n one of the four yugas. कृत, त्रेता, द्वापर, अणी, कलि, हेजांत एक युग.
युग-युगांतर॑ n till the completion of several yugas, ie, almost in perpetuity. संपनातेएवढ॑ वेळाच समय.
युगादि n start of a new year. उगादि. गुढीपाडवा. गुडीपाडवा. Note :- here युग denotes a year.
युगांतर॑ n end of an epoch. end of an age. end of a very long period. युगाच अंत. उदंड लांब काळाच समय.
युद्ध n a war. a battle. (दोन सैन्या मध्ये होयाच॑) युद्ध. रण.
युद्धभूमी n battle field. रणभूमी. युद्धाच॑ मैदान.
युव adj young. youthful. तरुण वयाच॑.
युवती adj a maiden. यौवन स्त्री.
युवराजा n crown-prince. राजाच काळानंतर॑ राजा होणार राजकुमार.
ये pron this (applied to both animate and inanimate). हे. जवळ असाच एक साधनाला, अथवा, जीवीला उद्देश करून सांगाच सर्वनाम॑ (एकवचन॑).
ये pron these (applied to both animate and inanimate). हे. जवळ असाच एकापक्षा जास्ती साधनांला अथवा जीवींला उद्देश करून सांगाच सरवनाम॑ (बहुवचन॑).
येजवळ adj recently. समीपांत॑. हेजवळ॑. uis सी.पी.ऐ.(माओ) पक्ष॑ पुन्हा-पुन्हा त्यंच स्वाधीना खाले असाच प्रदेशांत॑ रेलवे-ट्राकाला उडीवून नाश कराच एक मोट्ठ॑ चिंताच विषय झालाहे. हे आफत्तांतून चुकिवाला येजवळ॑ केंद्र सरकार र्रेलवेच अपाय उणे करिवाला उपयोग होयाच एक उपकरण॑ उपयोग कराला निश्चय केलाहेत॑.
येणार-जाणार pron all and sundry (people). नियंत्रण॑ नाहीस्क॑ तेवढेदनीं.
येणे vi to come. वेगळ॑कडून इकडे येणे.
येणे-जाणे n to-and-fro visits. (दोघेकडूनीं) येतजात असणे.
येणे-जाणे fig keeping in touch. being on friendly terms. संपर्कांत॑ ठींगणे/असणे. uis ते संभवाच नंतर॑ त्यंच मधे येणे-जाणे असास्क मला वाटत नाही.
येतां-जातां adv while moving to and fro casually. उग॑ येत जात असताना. जातां-येतां ; येता-जाता in sm. uis मझ लेंक तिज उजलादिवसाला म्हणून एक डब्बा चॉक्लेट फ़्रिड्जांत॑ ठिवल होति. तिज भाऊ तिला कळ्नास्क॑ येतां-जातां 'फ़्रिड्ज' उघडून ते पूरा काढून खाऊनटाकला !
येतां-येतां adv of late. हे समीपांत॑. हे जवळ॑. uis कित्तीदपा सांगटल तरीन तो सांगाच गोष्ट ऐकना. येतां-येतां तला पाह्यिलतर॑ मला पेटींगून येते.
येथून adv from here. इकडून. इथून.
येथे adv here. इकड॑. हे ठिकाणी. इथे ; येथे/इथे in sm.
येनी pron these people. हेनी. हे लोके (सर्वनाम॑, बहुवचन॑). यनी.
येवढ॑ adj this much, so much (implying magnitude or quantity). यवढ॑. एवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑ ; एवढा in sm.
येवढ॑ adj this much, so much etc. (implying multitude or number). यवढ॑. एवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑ ; एवढा in sm.
येवढ॑-तेवढ॑ adj approximately. roughly. जवळ-जवळ. एवढ॑-तेवढ॑. uis तुला ते पूरा कळनातरीन, ते विषय यवढ॑-तेवढ॑ तरीन कळ्लासलतर॑, अम्च काम कसतरीन चालिवुया म्हणून मला वाटत॑.
येवा-जावा n social intercourse. येणे-जाणे. जावा-येवा. uis वराडाच संमंधाचव॑र मनस्थाप झाल॑ नंतर॑, त्यंचमधे येवा-जावा नाही म्हणून मी ऐकलों.
येवा-देवा n income and expenditure. receipts and payments. याचद्याच. पैसाच संपादण॑ईं खर्चीं. uis व्यापारकी, घरकी, बरोर चालिवाला अम्हाला येवादेवाचव॑र चक्कोट/चोखोट नियंत्रण असाम॑. प्रति वर्ष, अणी प्रति महिना एक 'बडजेट' घालून खर्चांत॑ अठोपण फार अवश्य आहे.
यो pron this man. हे मनुष॑.
योग n conjunction. मिळून येणे. संयोग॑.
योग n good luck. भाग्य.
योग n opportunity. अवसर.
योगनिद्रा n a yogic posture of complete relaxation. संपूर्ण विश्रामाच एक योगासन॑. uis योगासन अणी प्राणायाम केलाव॑र, वीस निमिषाला योगनिद्रा करलतर॑ आंगांत एक विधाच हलकपणीं उत्साहपणीं येते.
योगक्षेम॑ n maintenance. उपजीव कराच॑.
योगा n yoga exercises. योगा.
योगाभ्यास n regular practice of yogic asanas. योगाच अभ्यास. uis नित्य योगाभ्यास करणारांस॑ रोगरागी जास्त येईना, अणी तेनी बुद्धींत पणीं हुशार असतील॑.
योगासन॑ n yoga postures. योगाच आसन॑.
योगिनी n a lady with yogic powers. बायको योगी.
योगी n one with yogic powers. योगशक्ती असणार.
योग्य adj suitable. लायक. uis ऐ.ऐ.टीला मिळाला योग्य होम॑ म्हण्जे, एक सुलुभ काम नोहो. अपार बुद्धीवंत असून पणीं रात्रीं-दिवसा वाचून तरच ते होईल॑.
योग्य adj deserving. worthy. लायक असाच॑.
योग्य adj proper. right. बरोरल॑.
योग्य adj qualified. eligible. लायक असाच॑.
योग्यता n suitability. worthiness. eligibility. योग्यता. uis मझ मित्र संकटांत॑ बसलोते. विचारताना कळ्ल॑, त्यंच लोंकला ऐ.ऐ.टींत॑ मिळाला योग्यता झाल नाही म्हणून.
योचना n thought. विचार. uis मी सांगाच सांगणे झाल॑. बरोर योचना करून तू काय पह्जे तरीन करींग॑.
योचना n worrying thought. चिंता. uis गेलंदा मी मझ मित्राला पाह्ताना तेनी म्हण्ट्ले, "मझ लोंक बरोर वाचतनाही. तेच मला योचना झालाहे".
योजना n plan. उपाय.
योजना n scheme. एक कार्यक्रम कस करणे, हे व्यक्त होऊन कळिवाच॑.
योजना n a measure of length of roughly four miles. जवळ-जवळ चार मैलाच दूर.
योद्धा n warrior. a combatant. वीर॑. शूर॑. Note :- from युद्ध.
यौवन n youth. युव वयेच॑.

No comments:
Post a Comment