07 March 2012







द the seventeenth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच सत्रावां व्यंजन॑. 

दगा n  deceit. dishonest behaviour. कपट. कपटांत॑ वागणे. uis किराणा/मळिगे अण्खी भाजीपाला विकणार भरून दन॑ झोकींत दगा करतात. तूकम करून द्याचांते पांच पर्सन्ट (5%) पतोरी उणे अस्ते.

दगा करणे vt  to deceive others. एमारिवणे. uis  नेता लोकांमधे उदंडदन दूसरांना/दूसरेंला दगा करून व॑र आलते लोकीहीं असतात॑. त्यंचकडे जागृतान वागाम॑.

दगा पावणे vi  to be deceived by others. एमत्तम होणे. uis  हे काळांत जागृतांत॑ असल तरीं अम्ही दूसरें कडे दगा पाव्हूया.

दगाखोर n  a cheat. a fraud. लबाड मनुष. uis दगाखोर असून पैसे करून, दान-धर्म करणे महत्वाच गोष्ट नहो.

दखलपट्टी n  an alienated person. a person who is kept out. सरकिवून ठिवलते मनुष. uis  म्हातारा/म्हातारी झाला व॑र लोंक-सून अणी लेंक-जामाई तेन्हाला दखलपट्टी करूनटाकतील म्हणून संदेह असाच लोक 70/75 वर्षाच वय होतां-होतां वृद्धाश्रमांत मिळाच विषीन योचना करतील॑. Note. from Kannada.

दटावणे vt  to intimidate. to browbeat. to admonish (in a harsh tone). दाबणे. र्रागांत॑ हाक्का मारणे/शिवा देणे ; दटाविणे in sm. uis  ल्हान लेंकरांना दटावल तर रडूनटाकतील. कारण, ते वेळाला अम्च घसा मोट्ठ॑ होण मळे तेनी भींगून जातात॑. तसच, कोण तरीन त्यंच मित्र असल तर त्यंच समोर अवमान झालास्क त्यांस॑ वाटल॑.

दड-दड adv  imajery of things tumbling down or happening in a quick cascade. दड-दड. uis मझ॑ बरोर ऑफीसांत काम करणार एकले एक दिवस पायरी उतरताना पांये चुकून दड-दड्शी पडून थोर घाव लागींगट्ले.

दडपणे vt  to stuff. दबिवणे. uis गेल महिना मझ॑ बहिणीच नातूंडे अमेरिकांतून अम्च॑ घराला आलतम्हा खायाला धिरडे देलों. उजव॑ हाताच बोटावाटे चूर चूर करून खायनास्क॑ धिरडे दोन हातांत धरींगून तोंडांत दडपाच पाव्हून अम्ही अग्गीन हांसलों. तिकड॑ "सब्वे" दुकानांत मिळाच थोर "सॅन्डविच" दोन हातावाटे तोंडांत दडपून दंडक झाल-ते-करतां तस खातात म्हणींगट्लों. 

दडपणे vt   to compress. to press down. दबिवणे. uis उंशींत आवश्यापक्षा जास्ती कापूस दडपून ठिवलते करतां मला गळाच लचक झालाहे.

दत्त adj  adoption. दुसरेंच लेंकरांला  स्वंत करून वाढिवणे. uis दत्त काढाला सरकार भरून नियम आणिवलाहेते मळे पह्यिलेस्क॑ दत्त काढणे अत्ता तेवढ॑ सुलूभांन होईना.

दत्त n  name of a Hindu god. Lord Dattatreya. एक हिंदू देवाच नाव. दत्तात्रेया. uis मार्गशीर्ष महिनेंत याच पौर्णमी दिवस दत्त-जयंतीच सण येत॑. 

दत्तन n  care. जत्तन. सांभाळ. रक्षण. uis मी बॅन्कांत कामांत अस्ताना दर दोन तीन वर्षांत मझ॑ ट्रान्स्फ़र होत होत॑. ते वेळी अग्गीन घरच॑ सामान एक गामांतून अण्कीएक गामाला दत्तन काढींगून जाणे मोठ प्रश्न होत॑. Note:- an example of inter-use of द and ज.

दत्तन n  caution. सांभाळून असणे. जत्तन. uis  घरांत॑ येऊन जुने पेपर घेणार लोकांकड॑ वागताना अम्ही दत्तन असाम॑. कां म्हणजे, तूकम करताना एमारिवाला पाह्तील॑.

दत्तपत्र  n  adoption deed. दत्ताच प्रमाण पत्र. uis सरकाराच नियम प्रकार लेंकराला दत्त काढाच पुढे सरकाराच नियम-विभाद तय्यार करलते दत्तपत्र सही कराला पह्जे.

दत्तपुत्र n  adopted son. दत्त काढलते लोंक. uis अम्च॑ सोयरीकांत एक दंपतीला वराड होऊन उदंड वर्ष होऊनपणीन लेंकरे झाल॑ नाही म्हणून अनाधाश्रमांतून एक ल्हान पोराला दत्त काढले. पंध्रा वर्ष होजोरी ते पोराला कळ्ळ॑ नाही तो एक दत्तपुत्र म्हणून. कळणेच तला मन्नाच फार गोंधळ होऊन, नंतर॑ उदंड दिवस मनशास्त्र वैद्यांच चिकित्सा काढामते पडल॑.

दत्तपुत्री n  adopted daughter. दत्त काढलते लेंक. uis दत्तपुत्राच पक्षा दत्तपुत्री असणे चोक्कोट म्हणून कित्येकांस अभिप्राय आहे.

दन n  people. दने. जन. जने. लोके. व्यक्ती ; जण in sm. uis अम्ही पंध्रा दन एक दिवसच॑ विनोदयात्राला जायाकरतां चार हदार रुपेला एक बस भाडेला काढलों.

दपा ind  a particle used as a conjunction ( with numerals etc.) to denote number of times, counts etc. दफा. दा. एक कार्य किती वेळ झालाहे हे दाखिवाला जोडाच गोष्ट॑. eg. एक दपा/एक दफा/एक दा (once), दोन दपा/दोन दफा/दोन दा (two times), किती दपा/किती दफा/किती दा ? (how many times ?), कित्येक दपा/कित्येक दफा/कित्येक दा (once in a while, sometimes),  गेलं दपा/गेलं दफा/गेलं दा (last time), यं दपा/यं दफा/यं दा (this time) etc.

दफा ind  a particle used as a conjunction ( with numerals etc.) to denote number of times, counts etc. दपा. दा. एक कार्य कित्ति वेळ झालाहे हे दाखिवाला जोडाच गोष्ट॑. eg. एक दफा/एक दपा/एक दा (once), दोन दफा/दोन दपा/दोन दा (two times), कित्ति दफा/कित्ति दपा/कित्ति दा ? (how many times ?), कित्येक दफा/कित्येक दपा/कित्येक दा (once in a while, sometimes),  गेलं दफा/गेलं दपा/गेलं दा (last time), यं दफा/यं दपा/यं दा (this time) etc.

दबिवणें vt  to suppress. दडपणे ; दबविणें inSM. uis मझ॑ ऑफीसांत काम करत होतता एकला उघड-उघड॑ पैसा गिळत होता. तला एवढ॑ धैर्य होत॑ म्हणजे, चोरीच काम दबिवाला पणीन वाटल॑ नाही.

दबिवणे vt  to repress. to put down by force. पुढे अथवा वर येईनास्क॑ करणे. uis दक्षिण आफ्रिकाच श्वेत-सरकार तिकडल॑ स्थानीय नीग्रो लोकांस अनेक वर्ष अपारतैड संप्रदायांत दबिवून ठिवल्होते तरीन, नंतर॑ नेल्सन मंडेलाच नेतृत्वांत झालते समरामळे ते नीच संप्रदाय काढूनटाकामते पडल॑. 

दबिवणें vt  to force down. to compress. to press down. चेंपून दडपणे ; दबविणें uis उंशींत आवश्यापक्षा जास्ती कापूस दबिवून ठिवलते करतां मला गळाच लचक झालाहे.

दबिवून ठिवणे vt  to gag. बोलाला सोडनास्क॑ करणे. uis ऑफीसांत होयाच पैसेच घोटाळा विषीन मला अग्गीन कळल म्हणून बाह्येर कोणाकडीन सांगताने म्हणून मला दबिवून ठिवलाहेत॑.

दबिवून ठिवणे id  to suppress facts. विषय बाहेर येईनास्क॑ करणे. uis एक-एकदपाहीं नव॑ कक्षीच सरकार येताना जुने सरकार दबिवून ठिवलते घोटाळा अग्गीन बाह्येर काढून त्यंच व॑र सी.बी.ऐ. केस चालिवणे सर्व साधारण झालाहे. 
 
दभणा n  a packing needle used for stitching gunny or any thick cloth. गोणि अथवा जाड कापड॑ शिवाला उपयोग कराच एक मोट्ठ॑ सूंई ; दाभण in sm. uis एकदफा दभणा वापरून नंतरशाला असूनदे म्हणून दत्तन काढून ठिवतोंतरीन, पुढच॑ आवश्याला कित्ती हुडकलतरीन ते मिळना.

दम n  breath. श्वास. uis दम सोडनास्क॑ पाणीच आंत एक मिनिटाच व॑र राह्याला कोणालीन कष्ट होईल॑.

दम n  guts. spirit. confidence. मनाच शक्ती. uis पाह्याला तस॑ वाटना तरीन तजपक्षा जोर असणारांच बरोर भांडाला तला भरून दम आहे.

दमडी n  a coin of olden times, of very small value. दंबडी. फार ल्हान मोलाच जुने कालाच एक नाण्य.

दयनीय adj  pitiable. परिताप वाटाच॑. दया वाटाच॑. uis सोमालिया देशांत क्षाम येऊन लोकांस खायाला काहीं मिळनाते दयनीय अवस्था पाव्हून संयुक्त राष्ट्र त्यांस आवश्याजोक्त॑ सहाय करत असतात॑. 

दया n  compassion. pity. कारुण्य॑. कृपा. uis ल्हान वयेंतूनच मझ॑ लेंकीला मूकप्राणींच व॑र दया दाखिवाच स्वभाव आहे.

दयालू adj  compassionate. दयावंत॑ ; दयाळू in sm.
   
दयावंत॑ adj  compassionate. दयालू.

दयाशील॑ n  compassionate disposition. दया दाखिवाच स्वभाव.

दर pref  a particle implying 'each' or 'every'. प्रति.

दरएक adj  each one. प्रत्येक. एक-एकीं. uis जेवाच पान मांडाच पुढे दरएक पानीन बरोर पाणींत पुसून ठिवाम॑.

दरगा n  moslem place of worship. मुसलमानेंच पवित्र ठिकाण. uis बीदीच मध्य अडचण होऊन बांधलते दरगा सरकिवाम॑ म्हणून कॉर्परेषनाच अधिकारीलोके कितिकी दपा दरगा-समतीला सांगूनपणीन अत्ता पतोरी ते तिकडेच आहे. 

दर-दर adv  imagery of being drawn roughly. बळांत॑ होडींगून जायाच दाखिवाच गोष्ट॑. uis माखींगून आंघोळ कराला येइना म्हणून रडत होत ते लेंकराला तज माय दर-दर होडींगून नाहणीकडे गेली.

दरबार n  royal court. राजसभा. uis विजयनगर साम्राट क्रिष्णदेवरायांच दरबारांत तेनालि रामन विदूषक म्हणून होते.

दरबूज़ n  musk melon. एक रीतीच फळ. दर्बूज. तरबूज. खरबूज़. uis उन्हाळाच समयांत दरबूज़ खाल्लतर॑ पोटाला हिंस॑ होईल म्हणून सांगतात॑.

दरवेळ॑ adv  every time. प्रति वेळ. एक एक वेळीं ; दरवेळी in sm. uis घर सोडून बाह्येर जाताना बाह्येरच कवाड बरोर झांकट्लाहे का म्हणून दरवेळीन मझ॑ नातू मला सय॑ करिवतो.

दरिद्र adj  poverty stricken. उदंड उणे पैसा असाच अवस्था ; दरिद्री in sm. uis अम्च॑ हिंदू संस्कारांतल॑ कोण्त जुने खाणी पाह्यलतरीन "दरिद्र ब्राह्मण" म्हणून अस्त॑ विना, "पैसावंत ब्राह्मण’ म्हणून अस्त॑ नाही.

दरिद्रपण॑ n  poverty. दरिद्रावस्था. uis दरिद्रपणांत कष्टी भोगत होतते सुदामा त्यंच कष्ट कळिवाला संदीपनी ऋषीच गुरुकुलांत त्यंच परम मित्र होऊन होतते श्रीकइष्णाला जाऊन पाह्यलेतरीन, सांगाला आलते विषय सांगट्लेच नाही.

दरिद्रवासी fig  a stingy person. कंजूस मनुष. uis पह्यिले पसूनच एक दरिद्रवासी तो. तजकडे जाऊन चंदा विचारलतर॑ एक दंबडी पणीन तुला मिळना.

दरिद्रावस्था n  state of poverty. penury. दरिद्रपणाच अवस्था. uis दीक्षा काढाच पुढे श्री राघवेन्द्रस्वामी त्यंच गृहस्थाश्रमाच वेळी फार दरिद्रावस्थांत होते. 

दर्जी n tailor. शिंपी. कापड शिवणार. uis अम्च॑ समोरल॑ घरचे त्यंच लेंकीच वराडाला नवरीच कापड पूरा घरांतच शिवूनटाकले. नंतरच कळ्ळ॑ तेनी दर्जी लोके म्हणून.

दर्बूज n  musk melon. एक रीतीच फळ. तर्बूज. तरबूज. खरबूज़. uis वनिलाच रस मिळिवलते दर्बूजाच मिल्क-षेकांत नंखर॑ मीठ घालून पीयाला बेष असल॑. 

दर्भ n a type of grass used in religious ceremonial rituals. श्राद्धाला उपयोग कराच एक रीतीच गवत॑/गौत/तृण॑. uis श्राद्ध करताना बोटांत घालाच पवित्र दर्भांतूनच कराच.

दर्शन n  paying obeisance to Gods in a temple. देऊळांत॑ देवाला कराच दर्शन. uis तिरुपति स्रीनिवासाला दर्शन कराला साधारण होऊन दोन घंटेच व॑र होईल तरीन गेलंदा अम्हास अर्ध घंटेंत दर्शन मिळ्ळ॑.

दर्शन n  sight. डोळे वाटी पाह्णे.

दलाल n  broker. (काम) व्यवस्था/एर्पाड करून देणार. uis असाच चोखोट काम सोडूनटाकून भाडेच घर एर्पाड कराच दलालाच काम करत आहे तो.

दलाली n  brokerage. (काम) व्यवस्था/एर्पाड करून देणाराला द्याच पैसा. uis "नो-ब्रोकर.कॉम" म्हणाच वेबसैटांत दलाली काहीं काढनात॑ म्हणून सांगतात तरीन, तीन-चार हदार रुपे देलतरच॑ तजांत रेजिस्टर कराला होईल॑.

दलाली n  broker's business. दलालाच काम. uis बंगळूरांत हदारों-हदार फ्ळाटाच बिसिनस होयाचमळे तज बरो दलालीच बिसिनस पणीन वाढत आहे.

दलित adj  depressed or down trodden (in society). समाजांत॑ दुर्बल असणार. uis दलित वर्गांत मिळ्लते लोकांस सरकाराकडून भरून प्रोत्साहन अणी सहाय मिळते तरीन, ते दुरुपयोग करणार पणीन आहेत॑.
 
दलितवर्ग n  depressed class in the society. समाजांतल॑ दुर्बल वर्ग. uis गेल वार भारताच चौदावां राष्ट्रपती म्हणून सत्यप्रतिज्ञा घेट्लते श्री रामनाथ कोविंद दलितवर्गांत मिळ्लते दुसर॑ राष्ट्रपती आहेत॑.

दल्ला n  husband. दाल्ला. पति. यजमान. uis स्वंत दल्लाला सोडूनटाकून वेगळ॑ कोणाचकी बरोर पळूनगेलतीन॑ म्हणून तिज बरोर संपर्क ठिवाला कोणीन तय्यार नाहीते.

दळ n  an organisation of a group of people set up with a stated agenda.  प्रत्येक आदेशाच व॑र स्थापना केलते लोकांच (जनांच) मंडळ. uis राष्ट्रीय जनता दळ, हे पार्टी बीहार देशाच बाहेर जास्ति प्रसिद्ध नाही.

दळ n  petal of a flower. फूलाच दळ. uis चोखोट गुलकंद कराला "एड्वर्ड" रोजाच दळच लायक॑.

दळ n  a sprig or a tender shoot of a plant. रोपाच नव॑ पान. uis बायका तुळसीपूजा करतात तरीन, शास्त्राप्रकार तुळसी दळ तोडाला त्यांस॑ योग्यता (अर्हता) नाही.

दळणे vt to dry-grind. to powder. पाणी मिळिवनास्क॑ पूड करणे. uis अगाऊच काळांत संपाकाला पह्जे तेवढ॑ मसालाच पूड जांतांत॑ दळत होते. हे काळांत॑ बायके हे काम मिक्सींत॑ करतात.

दवडिवणे vt  to drive away. to chase away. दौडिवणे. हांकून दूर पळिवणे. uis अम्च घराच जवळ माकडाच काट/तंटा जास्ति आहे. थोर "पट्टाळमच"/सेनाच येत अस्त॑. तला दवडिवाला म्हणून चार लोकांना काठि ठींगून/काठीनीशी होठाकिवामते अस्ते.

दवणा n  a small fragrant plant used in puja. दवना. पूजाला वापराच वासाच एक ल्हान झाड. uis दवणाच घम्मग वास धरतांतरून मला कळ्ळ॑ त्यंच घरांत पूजा झालाहे म्हणून.

दवना n  a small fragrant plant used in puja. दवणा. पूजाला वापराच वासाच एक ल्हान झाड. uis देवघरांत वेघलकीनी (वेघल की नाही) दवनाच खंम्मग वास नाकाला बडिवल॑.

दशक n  decade. दहा वर्षाच काळ॑. uis भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशक झालाहे.

दशमी n  tenth day of the lunar fortnight. चंद्रमान पक्षांत॑ दहावां दिवस. uis दर एक महिनेंत दोन दशमी असत॑.

दशा n  state. condition. स्थिति. uis (1) तला अत्ता शुक्र दशा बडिवलाहे वाटते. कोण्त काम आरंभ केल तरीन कुप्पा-कुप्पा पैस करतो. (2) पाप, तझ भाऊला शनि दशा चालत आहे वाटते. काय शिवल तरीन नष्ट होत आहे.

दशावतार n  the ten incarnations of Lord Vishnu. महाविष्णूच दहा अवतार॑. uis महाविष्णूच दशावतारांत॑ शेवटल॑ अवतार, म्हणजे, कल्की अवतार अण्कीन याच आहे म्हणून सांगतात तरीन अत्ता हे भूलोकांत होत असाच अक्रम अणी अनाचार हे अग्गीन पाव्हून अम्हाला वाटते, कल्की अवतार अत्ताच होत आहे म्हणून !

दशांश n  tenth part. दहांत॑ एक भाग. uis एक मैल म्हणजे एक दशांश सहा किलोमीटर लांब म्हणून अर्थ.

दसरा n  the Dasara festival of Vijayadasami. विजयदशमीच सण. uis मैसूर दसरा उत्सवांत॑  चामुंडीदेवीच उत्सवमूर्तीला हत्तीच अंबारीच आंत ठिवून मिरविणकी कराच दृश्य पाह्याला लक्षान-लक्ष जन असतील॑. 

दहनशक्ती n  capacity to digest. जीर्णशक्ती. uis वय॑ होतान-होतान अम्च॑ दहनशक्ती उणे होत जाईल म्हणून पोट भरून जेवनास्क॑ थोडक उणे जेवलतर॑ आंगाला चोक्कोट. 

दहन॑ n  cremation. मृतदेह/मढ॑ जाळणे. uis मृतदेहाला दहन कराला हे काळांत "इलक्ट्रिक क्रिमटोरियम" वापराच जनच जास्ती.

दहन॑ n  burn. जाळणे. uis खांडव-वन दहन करलते उप-कथा महाभारतांत आहे. 

दहन॑ n  digestion. पोटांत॑ जेवण जीर्ण होणे. uis रात्रीच वेळ पोट भरून जेवलतर॑ दहन होईना म्हणून वराडाच पुढल॑ दिवसच॑ रात्री होयाच जानवासाच जेवण मी करना.

दहा n  ten. नौवाच नंतरच संख्या. uis रावणासुराला दहा मुख आहे म्हणून तला दशमुख म्हणूनीन नाव आहे.

दहीं n  curds. विरदलते (विरजलते) दूध. uis (1) उन्हाळाच महिने दहीं भात खायाच पक्षा ताक भात भात खाल्लतर॑ आण्गाला चोक्कोट. (2) हिंवाळाच महिनेंत॑ दूध विरदून दहीं होम॑ म्हणजे नंखर जास्ती दहीं घालून ढवळलतर॑ पुरे.

दहींवडा n  a preparation of vada in curds. उडिदाच वडा दहींत॑ घाट्लते. uis दहींवडा खाताना तजांत थोडक बूंदी घालून खाल्लतर॑ बेष असल॑.

दक्षिण n  south. एक दिक्/दिशाच नाव. उत्तराच विरुद्ध दिक्/दिशा. uis द्राविड वर्गाच भाषा दक्षिण भारतांत जास्ती बोलतात॑.

दक्षिणा n  monetary offerings to a priest for performing a religious ritual. पूजाकार्य कराला आचारेला द्याच पैसाच अहेर.uis जुने काळांत आचारेंस दहा दहा रुपे दक्षिणा म्हणून देत होतते ठामी हे काळांत शंभर शंभर रुपे देमतेस्क आहे.

दक्षिणायन॑ n  the period of six months ending with Makara Sankaranti, covering the apparent movement of the Sun towards the south. मकर संक्रांती पर्यंतीन सूर्य दक्षिणाला सरकास्क दिसाच सहा महिना. uis महाभारत युद्धांत॑ भीष्म पितामहा दक्षिणायन होया पर्यंतीन शर-शयनांतच होते.

दक्षिणी adj  relating to the south. southerly. दक्षिणाला संबंध झालते. uis दक्षिण प्रदेशांत बोलाच मराठीला अम्ही दक्षणी मराठी म्हणून सांगतों.

दंग adj  surprised. astonished. wonderstruck. आश्चर्य. uis अम्ही जपानाला गेलतम्हा ते देशाच एक मनुष फार बेष मरठी बोलाच ऐकून दंग वाटल॑ मला.

दंड n  a stick. baton. एक ल्हान काठि. लाठि. uis साधारण होऊन तोड-पीड अक्रम कराच गुंपाला अक्रमाच ठांव (ठाम) सोडून दौडिवाला (दवडिवाला) पोलीस लोक॑ दंडाच प्रयोग करून पाह्तील॑. तजमळे अक्रम नियंत्रण झाल नाहीतर॑, नंतर॑ टीयर-गॅसाच की गोळाच की प्रयोग करतील॑.

दंड n  punishment. शिक्षा. दंडना. uis पाकिस्थानाच पूर्व प्रधान-मंत्री भुट्टोला मृत्यु दंड देऊन फासींत घालून मरि्वूनटाकले.

दंड n  plenty. enough and more. उदंड. उजंड. भरून. फार. Note:- दंड appears to be a short form of उदंड. uis इंदोनेश्या एक मुस्लीम राज्य झालतरीन तिकडे दंड हिंदू देऊळ आहेत्याला कारण काय म्हणजे, तीन चार शतकाच पुढे ते देशांत पोणावांटा जन हिंदू धर्म आचरण करत होते, हेच.

दंड n useless. कामाला प्रयोजन नाहीते. दंडम (Tamil). Note. from Tamil. uis सांगिट्लते काम बेष करून देतों म्हणून मझ॑ तोंडाच समोर लबाड सांगिट्ला म्हणून नंतरच कळ्ळ॑ मला. तो विचारलते पैसे उचलून देलते पूरा दंड झाल॑.

दंडक n  custom. संप्रदाय. परंपरा प्रकार कराच कार्य. uis अम्च दंडका प्रमाण थोरळेंकडे मर्यादांत॑ बोलाम॑.

दंडक n  practice. usage. कराच रीती. uis दिवसोडि संध्यावंदन कराच दंडक तुम्हाला आहेका ?

दंडना n  punishment. penalty. शिक्षा. दंड. uis अमेरिका, इंग्लंड असलते देशांत न्याय कचेरींत "ज्यूरी" संप्रदाय आहे. हेज प्रकार "ज्यूरी" लोकांस अपराधी चूक करला म्हणून वाटलतर॑, तलजोक्त॑ न्यायाधीश दंडना देतील॑.   

दंडपिंड fig  an useless person who expects to be supported by others. दूसरेंच व॑र टेंकून असाच एकालीं प्रयोजन नाहीते मनुष. uis मला उदंड कळ्ळते एक मनुष जन्म पूरा दुसरेंच आश्रयांतच काळकांडले. त्यंच बाप वांचून असजोरी बापाच घरांत होते अणी तज नंतर॑ लोंकाच घरांत होते. दंडपिंड म्हणाचाला हेनीच चोक्कोट उदाहरण॑.     

दंत n  elephant's tusk. ivory. हत्तीच दंत. uis हत्तीच दंताला उदंड मोल आहे म्हणून हदारों-हदार हत्तीला मरिवून तज दंत चोरून विकाच कामांत भरून लोके आहेत॑. 

दंतचूर्ण n  tooth powder. दांत घासाच पूड. uis प्रसिद्ध "नंजनगूड" दंतचूर्णच नाव नंजनगूड म्हणाच गामांतून आल॑. 

दंतवैद्य n  dentist. दांताच वैद्य. uis दंतवैद्यांकडे जाणे म्हणजे कोणालीनच थोडक भें वाटल॑.

दंतवैद्य n  dentistry. दांताच वैद्य शास्त्र. uis मझ॑ भाची दंतवैद्य शिकली तरीन अत्ता यागाभ्यासाच एक केंद्र उघडली आहे. 

दंपती n  husband and wife. दल्ला-बाईलांच जोडी. uis वराड करिवाला पाटांत बसाला दंपती लोकांसच अधिकार आहे म्हणून आहे.

दंबडी n  a coin of olden times, of very small value. दमडी. फार ल्हान मोलाच जुने कालाच एक नाण्य. uis अत्ता व्यापार-व्यवहाराला दंबडी वापरत नाहीत तरीन, "मझ॑कडे दंबडी पणीन नाही" म्हणून बोलताना उगे सांगणे आहे.

दंव॑ n  dew. देम॑. हीमामळे होयाच पाणीच ल्हान ल्हान बूंद ; दव/दंव in sm. uis अरुणोदि पाष्टे सूर्य उदय होयाच समयांत झाड-झुडूप, तृण असलत्यांत अग्गीन दंव॑ पडलसाच पाव्हूया.

दा ind  a particle used as a conjunction ( with numerals etc.) to denote number of times, counts etc. दपा. दफा. एक कार्य कित्ति वेळ झालाहे हे दाखिवाला जोडाच शब्द. eg. एक दा/एक दपा/एक दफा (once), दोन दा/दोन दपा/दोन दफा (two times), किती दा/किती दपा/किती दफा ? (how many times ?), कित्येक दा/कित्येक दपा/कित्येक दफा (once in a while, sometimes), गेलं दा/गेलं दपा/गेलं दफा (last time), यं दा/यं दपा/यं दफा (this time) etc.

दाईज n  a relative who is entitled to a share in an inheritance. आस्ताच भागांत॑ (वांटा व॑र) अधिकार असाच सोयरीक. दाईद. दायीद. दायाद. दाईर. uis अम्च॑ काळाच नंतर॑ दाईजां मध्ये आस्ताच व॑र भांडणे होताने म्हणजे अम्ही वांचून अस्तानच "विल" तय्यार करून ठिवणे चोक्कोट. 

दाईद n  a relative who is entitled to a share in an inheritance. आस्ताच भागांत॑ (वांटा व॑र) अधिकार असाच सोयरीक. दाईज. दायीद. दायाद. दाईर. uis मझ॑ सोयरीक एकलेंच कुटुंबांत गेल तीन पिढी पसून आस्त वांटलेच नाही. अत्ता दाईदां मध्ये ते कस॑ वांटणे म्हणून भांडा-भाडी होत आहे. 

दाईर n  a relative who is entitled to a share in an inheritance. आस्ताच भागांत॑ (वांटा व॑र) अधिकार असाच सोयरीक. दाईद. दायीद. दायाद. दाईज. 

दाखिवणे vt  to show. डोळेला कळिवणे ;  दाखविणे/दाखवणे in sm. uis अम्ही बेलगामांत असताना शनिवार शनिवार "बालक्रिष्णा" थियेटरांत॑ इंग्ळीष सिनिमा दाखिवाच मध्य-मध्ये जाऊन पाह्त होतों. 

दाखिवून देणे id  to expose. रहस्य दुसरेंला कळिवणे. uis कपट सन्यासी नित्यानंदाच अवघड काम पोलीसाला दाखिवून देलते तजेच एक चेला म्हणून सांगतात॑.

दाटे n  crowd. a throng. गुंप ; दाटी/दाट in sm. uis  "कुमरन" अणी "नल्ली" असल॑ दुकानांत सदा दाटे अस्ते. दुपारा पणीं तथे लुगड॑ घेजोरी पुरे-पुरे वाटून जाते.

दाडि n  beard. गालांत॑ वाढाच केंस ; दाढी in sm. uis तुरकडे लोके मीशा ठीवंगनास्क॑ दाडि मात्र ठीवंगून अस्तील॑.

दाडीवाला n  a man with a beard. दाडि असाच मनुष ; दाढीवाला in sm. uis लेंकरूविणी असताना मला दाडावालांस पाह्यलतर॑ अनाय भें वाटत होत॑.

दाणे n  grain. धान्य. धान ; दाणा in sm. uis अम्ही लेंकरे जेवून उठताना ताटांत एक दाणे पणीं उरिवताने म्हणून अम्च॑ आजी केम्हाहीन सांगतील॑.

दाणे n  a seed. anything resembling a single seed, grain or corn. बीं, मक्का जोळा असलत्याच एक दाणे. uis मक्काच बुट्टा कोळसाच विस्तूंत॑ नुस्त भाजून लिंबू पिळून मीठ लावून खाताना एक एक दाणे खायाला कित्येक लेंकरांस अवडल॑. 

दाणे n  a single bead or pearl. नगांतल॑ एक मोती. uis एकदाणेच माळांत॑ वेगळ॑ विध-विधाच पोती विना सोनेच एक दाणे पणीन ओवून असल॑.

दाणे n  a pomegranate pip. दाळिंबाच बीं. uis अत्ता याच "हैब्रिड" दाळिंबाच दाणेंत बीं असत नाही.

दादगा n  a man. दादिगा. दाद्ग्या. पुरुष. मनुष.

दादा n  elder brother. अण्णा. वडील भाऊ. 
                                       
दादागिरी n  bullying. धमकी देणे. uis कॉळेजांत नव होऊन मिळलते ते पोराला कसलते दादागिरी दाखिवलतरीन समाळींगून जायाच सामर्थ्य आहे म्हणून तला कोणीन तंटा कराला झाल नाही.

दादिगा n  a man. दादगा. दाद्ग्या. पुरुष. मनुष. uis अग्गि रेल्वे-स्टेशनांतीन टिकट घ्याला दादिगांसीन बायकांसीन वेगळ॑-वेगळ॑ पंक्ती असत॑ म्हणून कित्येक दादिगालोके त्यंच बायकांला बायकांच पंक्तींत होठाकीवून टिकट घेऊनटाकतात॑.     

दादिगा n (gram)  male. पुल्लिंग. uis गेल वार अम्च घर्च कुत्र पिल्लू घाटले/प्रसवले. त्यांत॑ दोन दादिगा कुत्रेईं दोन बायको कुत्रेईं होते.

दाद्ग्या n  a man. दादिगा. दादगा. पुरुष. मनुष. 

दान n  charity. दान-धर्म. uis कुंतीपुत्र कर्ण दान देणेंत थोडकीन संकोच दाखिवनात॑ म्हणून त्यांस "दानशूर कर्ण" म्हणून सांगतात. 

दान n  donation. उदारांत॑ द्याच पैसा. बक्षीस. uis श्रिंगेरी मठ बंगळूरांत हेजवळ आरंभ करलते कॅन्सर हॉपिटल बांधाला अनेक लोके दान करलाहेत॑.

दानधर्म n  charitable acts. दान द्याच॑. uis मझ॑ पणजा भरून दानधर्म केलाहेत म्हणून त्रावनकोर संस्थानाच महाराजा त्यांस "उदारशिरोमणी" म्हणून बहुमान केले.

दानशील adj  generous minded. दान द्याच स्वभाव. दानशूर॑. uis ल्हानपणांतूनच स्वार्थ स्वभाव नाहीस्क॑ वाढिवलत्यांस दानशील मन्न अपाप येणेंत संदेहच नाही.

दानशूर॑ adj  generous minded. दान द्याच स्वभाव. दानशील. uis महाभारत युद्ध आरंभ होयाच पुढे एक गरीब ब्राह्मणाच रूपांत॑ येऊन देवेन्द्र दानशूर कर्णाकडून त्यंच कवच-कुंडल दान विचारून घेऊनगेले.

दाबणे vt  to intimidate. to browbeat. to admonish (in a harsh tone). दटावणे. रागांत॑ हाक्का मारणे/शिवा देणे.

दाबणे vt  to press. to compress. चेंपणे.

दाभणा n  a large needle used for stitching gunny-sacks etc. गोणी शिवाला उपयोग कराच एक मोट्ठ॑ सूंई ; दाभण in sm. uis उदंड उपयोगाच साधन म्हणून दाभणा दत्तन काढून ठिवतोंतरीन आवश्याच वेळेला ते लोक्कुर मिळना !

दाय n  inheritance. वारस॑. uis तला भरून दाय मिळ्ळतरीन अवघड स्वभावाच मनुष झालतेकरतां मिळ्ळते पूरा लोक्कुरच हाळ करूनटाकला.

दायकट्टम n  an indoor game similar to Ludo. लूडो सार्खल॑ एक खेळ. Note :- from Tamil.

दायभाग n  share of inheritance. दाय अथवा वारसांतल॑ भाग.

दायाद n  a relative who is entitled to a share in an inheritance. आस्ताच भागाच व॑र अधिकार असाच सोयरीक. दाईद. दाईज. दायीद. uis संपादलते पैसे पूरा कंजूसविणी खर्च करनास्क॑ ठीवींगल्होता म्हणून अग्गि सोयरीकीन तला मष्किरी करत होतेतरीन मराच वेळी अग्गिदनीन अम्हीच तज दायाद म्हणून सांगींगून भांडाला आरंभ करले.

दायीद n  a relative who is entitled to a share in an inheritance. आस्ताच भागाच व॑र अधिकार असाच सोयरीक. दाईद. दाईज. दायाद.

दार n  door. कवाड. द्वार. uis देऊळाच आंत वेघाच दाराच दोन पटीसीन द्वारपालकांच प्रतिमा असल॑.

दार n  passage. means of access. वाट. 

दार fig  an option or choice (for a getaway, action etc). गेत॑. वाट. uis गेल॑ वर्ष मला पैसाच उदंड (उजंड) कष्ट झाल॑. वेगळ॑ दार नाही म्हणून तो सांगाच बड्डीला पैसा रीणांत काढामते पडल॑.
   
दारिद्य n  poverty. दरिद्रपण. uis दारिद्य अवस्थांत वाढलत्यांस पैसाच मोल केम्हीन विसरना. 

दारु n  liquor. मद्य. नशाच द्रव्य. uis सरकाराच नियमाप्रकार साळेंच जवळ दारूच दुकान उघडताने म्हणून आहे.

दाल्ला n  husband. दल्ला. पति. यजमान  ; दादला/नवरा in sm.

दाळ n  split pulse. दाळीच दाणे ;  डाळ in sm. uis गेल वर्ष दाळाच मोल एकदम वाढल॑ तरीन हे वर्ष थोडक उणे झालाहे.

दाळ-तांदूळ n  grocery. संपाकाच सामग्रि. मीठ-मिरे. जिरे-मिरे. किराणा. uis थोर-थोर सूपर-मार्कट उघडलतर॑ ल्हान-ल्हान दाळ-तांदूळाच दुकान झांकाला साध्यता आहे म्हणून "वालकार्ट" सार्खल॑ दुकानाला अम्च॑ देशांत उघडाला सरकार सोडत नाहीत॑.

दाळिंब n  pomegranate. एक रीतीच पंडू ;  डाळिंबी in sm. uis हे जवळ बीं नाहीते दाळिंब भरून उणे मोलाला मिळत आहे.

दावणि n  half-sari worn by girls. परकोर-पदर. uis हे काळांत॑ सलवार-कमीज़ाच जास्ति उपयोगा मळे बायका पोरींच मध्ये दावणि नेसाच दंडक फार उणे झालाहे. Note. from Tamil.

दास n  man-servant. कामवाला.

दास n  a slave. अडिमे (Tamil).

दासि n  a maid-servant. कामवाली.

दासि n  a female slave. अडिमे (Tamil).

दाह n  thirst. तान. पाणी पीयास्क॑ वाटून जीव्ह वाळणे. जीव्हाळा. uis  पाणीच दाह वाटलते कावळाच खाणींत॑ ते कावळा एक-एक धोंडा मडकेंतल॑ पाणीच आंत घालून, पाणी वर आणिवले.

दाक्षण्य n  patronisation. (accommodating) politeness. मोट्ठ॑पणांत॑ दूसरेंकडे वागणे. मोट्ठ॑पणांत॑ दूसरेंला पाह्णे ; दाक्षिण्य in sm. uis मझकडे पैसा भरून नाही म्हणून तुम्ही मला दाक्षण्य दाखिवाच आवश्य नाही. मझ॑ विषय मीच समाळींगतों.

दाक्षण्य n  obligation from abashedness. संकोचाच स्थितींतून होयाच दाक्षण्य. uis वाचणेंत उदंड षाणा आहेतरीन, तज सामर्थां विषीन कोण तरीन बोलाला आरंभ करलतर॑ फार दाक्षण्य भोगून कोणाकडीन बोलनास्क॑ राहूनजाईल तो.     

दांडगा adj  a fat man. मोट्ठ॑ आंगाच मनुष. Note:- masculine gender. uis बंगळूरांतून डेल्हीला मी प्ळेनांत जाताना मझ॑ बाजूच सीटांत एक दांडगा मणुष बसल्होतामळे मला अवसर॑-अवसरांत॑ कुर्सींतून उठणे फार कष्ट झाल॑.

दांडगा-बोका n  a fat moron. एक दांडग॑ ढेंग॑. Note:-  बोका means a 'tom-cat'.

दांडगी adj  a fat woman. मोट्ठ॑ आंगाच बायको. Note:- feminine  gender. uis आंगाला हानी होयाच "रिफैन्ड फ़ुड" खाऊन खाऊन दांडगी झालते भरून बायकांस अमेरिकांत पाव्हूया.   

दांडग॑ adj  fat. मोट्ठ॑ आंगाच॑ ; दांडगा in sm means 'sturdy'. Note:- neuter gender. uis आफ़्रिकांतल॑ हत्ती भारताच हत्तीच पक्षा दांडग॑ अस्त॑.

दांत n  tooth. दांत ; दंत in sm. uis पाष्टे उठून दांत घासनास्क॑ काहीं खाऊन पीवून करताने.

दांत चावींगून बसणे/असणे id  to endure without any choice. to keep mum out of compulsion. वेगळ॑ वाट नाहीस्क॑ सोसींगून बसणे. uis अम्च लेंकरे वाचून पुढे येजोरी अम्ही दांत चावींगून हेच घरांत असाम॑. अधीक भाडे द्याच शक्ती तो अम्हाला नाही !

दांतसूळ n  tooth-ache. दांत दुखणे ;  दंतशूळ in sm. uis दांतसूळ सोसाला झाल नाहीतर॑ लवंग दांताला लागींगून ठिवलतर॑ थोडक उणे होईल.

दांपत्य n  marital status. वराड झालते स्थिती. uis दांपत्य जीवनाला प्राधान्य देनाते समुदाय लोक्कुरच अवघड स्थिलीला जाऊन पोंचल॑.

दिक् n  direction. दिशा. uis सूर्यनमस्कार पूर्व दिक् पाव्हूनच करणे, कारण तिकडून सूर्य उदय होत॑ म्हणून.

दिगंबर n  Jain munis of a particular sect who do not wear any cloth. नावगेंत॑ असाच संप्रदायाच जीन मुनीं. uis हे एकवीसां शतकांतपणीं नावगेन (नागवेन) असणार दिगंबर जीन मुनी आहेत म्हणून योचना करलतर॑ आश्चर्य वाटते.

दिग्भ्रम n  state of shock leading to not knowing where to turn to. भ्रम॑. Note:- from दिक् and भ्रमण. uis  कर्ज/रीण देलते पठान घरांत घूसाच पाव्हून मझ॑ मित्राला दिग्भ्रम होऊन आंग पूराहीन घामांत निथळाला आरंभ झाले.

दिग्विजय n  conquest of all world. भूलोक पूरा जिंतणे. uis पुरातन ग्रीसाच राजा अलक्सांडर दिग्विजय कराच श्रमांत त्यंच पूरा जीवन अर्पणा करले.

दिड-दिड n  hurry-burry.  दिडीर. uis  दिड-दिडशी मला काय तरीन प्रश्न विचारल तर॑ एकदम मला उत्तर द्याला होईना. Note. from Tamil.

दिडीर n  immediate. sudden. तक्षण॑. शीघ्र. Note. from Tamil. uis पाष्टे लोक्कुर-लोक्कुर ऑफीसाला पळामते लोके "एम.टी.आर"च॑ दिडीर इड्ळग॑, धिरडे, उप्पिट असलते पदार्थ केम्हाहीं घरांत ठीवींगून असतील॑.   

दिडीरशी adv  immediately. urgently. दिड-दिडशी. तक्षणांत॑. शीघ्रांत॑. Note. from Tamil. uis कोठतरीन वेगळ॑ गामाला दिडीरशी जाम॑ म्हणून असाच लोकांस ट्रेनांत टिकट मिळाला कष्ट होईल म्हणून भारतीय-रेल तत्काल टिकट विकतात॑.

दिनकर n  sun. सूर्य.

दिनस n  variety of wares or commodities. जिनस. वेगळ॑-वेगळ॑ रीताच व्यापारच साधन॑ ; जिन्नस in sm. uis अम्च घराच जवळ उघडलते नव॑ कापडाच दुकानांत॑ भरून दिनसाच सारी आहे. Note :- an example of inter-use of द and ज in DM.

दिर्वाण n  a small dish shaped lamp of brass or silver lit with a wick in front of God. देवाच समोर लावाच एक ल्हान वाताच दिवा. uis तूप-तेलाच मोल जास्ती होतां-होतां दिर्वाणाच आकार पणीं ल्हान होऊन येत आहे. अगाऊ रुपेच दिर्वाण लावणार अत्ता पित्तळाच/स्टीलाच लावतात॑. Note:-  an iron one is lit for "Saneshwara". 

दिवटी n  a torch of oiled cloth wound around at one end of long stick.  लांब काठीच अग्र भागांत॑ तेलांत भिजिवलते कापड गुंडाळलते विस्तूच दिवा. Note:- in olden times this was used during night processions or pageants. uis अगाऊच काळांत दिवटी वापरत होते तरीन, अत्ता अग्गीन तज बद्दिल पेट्रोमॅक्स दिवा वापरतात॑.

दिवती n  a goddess worshipped on the sixth day of a childbirth.  जिवती. लेंकरु उजून सहा दिवस होताना पूजा कराच देवीच नाव. Note. the correct name of the Goddess is जिवती, but as one more example of inter-use of ज and द, दिवती also has gained currency in DM. uis 1. श्रावण महिनेंत प्रति शुक्रावारांतीन लेंकरांच क्षेमाकरतान दिवती देवीला पूजा करणे आहे. 2.दिवती पार्वतीदेवीच अंश म्हणून विश्वास आहे.

दिवती n  a protective amulet or talisman tied around the neck of a six day old infant, after propitiating Goddess Divathee. जिवती. सहा दिवसाच लेंकरूच गळांत पूजा करून बांधाच दिवती देवीच टांक. uis दिवती  गळांत अडकिवलते लेंकरास अपमृत्यु होईना म्हणून विश्वास करतात॑.   

दिवतीपूजा n  a pooja performed for propitiating Goddess Divathee on the sixth day of childbirth. जिवतीपूजा. लेंकरु उजून सहा दिवस होताना तला अपमृत्यु होताने म्हणून दिवतीदेवीला कराच पूजा. uis अम्च॑ घरांत दिवतीपूजा कराच दंडक नाही.

दिवलावणे n  a small shallow receptacle or container for an oil-lamp with wick. तेल अणी वाताच एक ल्हान पात्र. uis अम्च॑ घरच॑ पूजा सामग्रींत दिवलावणे मात्र नहोत॑ म्हणून मझ॑ आजा एक दिवस त्यंच घरांतून ते आणून देले. 

दिवस n  a full day of 24 hours. चोवीस घंटेच एक पूरा दिवस. uis मझ॑ सासूबाई हॉस्पिटलांतून अम्च॑ घराला आलांपिरी अम्ही त्यास बरोर पाह्यींगाला म्हणून पूरा दिवसाला म्हणून एक नर्साला ठिवलों.

दिवस n  day time from sun rise to sun set. सूर्य उदय होवून अस्तमन॑ होयापर्यंतले वेळ॑. uis मझ॑ सासूबाई हॉस्पिटलांतून अम्च॑ घराला आलांपिरी अम्ही त्यास बरोर पाह्यींगाला म्हणून दोन नर्सांस ठिवलों, एकले पूरा दिवसाला अणी अण्की एकले पूरा रात्रीला म्हणून.

दिवस n  date. तारीख. महिनांत॑ एक प्रत्येक दिवसच क्रमांक. दिनांख. uis आज कोण्त दिवस, दहाका नाही अक्राका ?

दिवसभर adv  through the day. पूरा दिवस. uis अम्च गांमांतल॑ देऊळांत॑ वर्षा-वर्षी होयाच तीन दिवसाच उत्सवाला अम्च घरांतून एक दिवसाच पूजाच वेच चुकनास्क देण॑ आहे. ते दिवस घरच लोके तेवढदनीं दिवसभर देऊळांत राहून पूजाकार्यक्रम पूरा पाह्ण॑ आहे.

दिवसा adv  every day. प्रति दिवस. दिवसास्क॑. uis अम्च॑ घरच॑ बंडी पुसाला दिवसा येत होतते पोर एक दिवस मला विचारनास्क॑ बंडी काढींगून कोठकी फिराला गेला.

दिवसा-दिवसी adv  (through) each and every day. सोडनास्क॑ दरएक दिवसीं. सोडनास्क॑ एक-एक दिवसीं. दिवसास्क॑. uis दिवसा-दिवसी ते-ते दिवसाच पाठ शिकलतर॑ परीक्षाला वाचाला जास्ति श्रम होईना.

दिवसान-दिवस adv  for days together. सोडनास्क॑ भरून दिवस. दिवसोडी. uis दवसान-दिवस अम्च॑ घरच॑ समोरल॑ बागाला येत होतते माकडाच गुंप एक वारापसून कां आल नाही म्हणून विचारताना कळ्ळ॑, कॉरपरेशनाच माकड धरणार लोके तला अग्गीन धरींगून गेले म्हणून. 

दिवसाला adv  per day. प्रति दिवसाला. uis पोट बर॑ नाहीस्क असताना डोक्टर मला ओखदाच मात्रा लिव्हून देऊन, दिवसाला एक मात्रा दोन वाराला खायाला/गिळाला म्हण्ट्ले.

दिवसास्क॑ adv  each and every day (without fail). दिवसा-दिवसी सोडनास्क॑. दिवसोडि. uis दिवसास्क॑ एक घंटे योगाभ्यास केलतर॑ आंगालीं मनालीं फार चोखोट म्हणून सांगतात.

दिवसोडि adv  every day. दिवस सोडनास्क॑. प्रति दिवसीन. uis (1) अम्च घरांत जेवताना दिवसोडि तळलते पापड अस्ते. (2) अम्च घरांत॑ आलतर॑ काहितरीन मिळेल म्हणून कळींगून तो म्हातारा भीकारी दिवसोडि येत अस्तो.

दिवसों दिवस॑ n  (on a) day-by-day (basis). एक-एक दिवसास्क॑. uis दिवसोंदिवसी सामानाच मोल वाढत असामळे केलते कामाला तम्हा-तम्हा धर्मा घेणार कामवालांस॑ त्यंच कुठुंब सांभाळणे/चालिवणे फार कष्ट झालाहे.

दिवा n  lamp. उजाडाकर्तां लावाच दिवा. uis संध्याकाळी सूर्य अस्तमन होयाच पुढे देवघरांत दिवा लावून एक दोन श्लोक सांगाला अम्च॑ अम्मा शिकिवलते दंडक अत्त पर्यंतीन अम्ही सोडलों नाही.

दिवा n  light. उजाड॑. uis दिवा अस्ताना, म्हणजे, सूर्यास्तमन होयाच पुढे जाऊन येणे म्हणजे जा. अंधारांत मात्र पर्तून येनोको.   

दिवाकर n  sun. सूर्य.

दिवान n  prime minister of a kingdom. एक राज्याच प्रधानमंत्री/मुख्य अधिकारी ;  दिवाण in sm. uis मझ॑ आजाच आजा त्रावनकोर संस्थानांत दिवान म्हणून होते. 

दिवाल adj  bankrupt. रीणांत बुडलते. दिवाळि झालते. uis असाच चोखट काम सोडूनटाकून बिसिनसांत उतरून पूरा बंडवाळीन हाळ करून अत्ता दिवाल होऊन बसलाहे तो. 

दिवा लावणे vt  to light a lamp. to put on a light switch. समी लावणे. दिवा घालणे. uis दिवा लावलांपिरि सुईं(सूंईं) दोरा ओवताने, फडकी शिवताने अस॑ सांगणे आहे.

दिवाळी n  bankruptcy. रीणांत बुडलते अवस्था. uis अमेरिकाच अत्तच॑ प्रेसिडेन्ट तीन-चार दपा दिवाळीला अर्जी देलते मनुष म्हणून सांगतात॑.

दिव्य adj  divine. दिव्य. uis हिंदू धर्म आचरण करणार लोके तुळसी झाड दिव्य झाड म्हणून सांगतात॑.

दिव्यदृष्टी n  divine vision. श्रेष्ठज्ञानामुळे पुढे होयाच कळणे. ज्ञानदृष्टी. uis त्यंच दरिद्रपणांतून सुटालस कायतरीन सहाय मिळल म्हणून कुचेला श्रीक्रिष्णाला जाऊन पाह्यलेतरीन देवाला पाह्यलते संतोषांत तेनी काहीं विचारल नाही. पण कुचेलाच आग्रह श्रीक्रिष्णला त्यंच दिव्यदृष्टीमळे कळ्ळ॑.       
 
दिव्यदृष्टी n  occult power of seeing future events. ज्ञानदृष्टी. uis त्यांस दिव्यदृष्टी आहे म्हणून लोकांस भें दाखिवून स्वाधीनांत ठिवाच  कपट-सन्यासीलोके अम्च॑ देशांत भरूनदन॑ आहेत॑.       

दिव्यशक्ती n  supernatural power. दिव्यशक्ती. uis श्री राघवेन्द्रस्वामी त्यंच दिव्यशक्ती भरून लोकांस दाखिवलाहेत॑. ह्यांत ईस्ट-इंद्या कंपनीच सर तोमस मंन्रो यांस दर्शन देलते विषय मद्रास फोर्ट सेन्ट जोर्जा इकडल॑ गज़ेटांत प्रसिद्ध झालते अम्हास कळल॑.

दिव्यज्ञान n  divine knowledge. दिव्यज्ञान॑. uis स्वामी विवेकानंदाच बाल्यकाळ नाव नरेंद्रनाथ दत्ता म्हणून होत॑ अणी तेनी रामक्रिष्ण परमहंसाला पह्यिलंदा मिळतानाच रामक्रिष्णाला त्यंच दिव्यज्ञानामळे कळून गेले, हे पोर एक थोर महान होईल म्हणून. 

दिशा n cardinal direction. दिक्. uis भारताच दक्षिण दिशांत कन्याकुमारी पसून अन्टार्टिका भूखंड पर्यंतीन हंदु महासागरांत॑ कोंण्त द्वीपीन नाही.

दिसणे vi  to be visible. दृष्टीला पडणे. डोळेवाटी पाह्याला होणे. uis दोन दिवसापसून असाच वांबाळामळे उद्याच सूर्य ग्रहण दिसणे संशयच॑. 

दिसून-दिसनास्क॑ adj  (seemingly) unseen. (seemingly) undetected. लप्पून-चुपून. प्रत्यक्ष दिसनास्क॑. कोणालीन दाखिवनास्क॑. uis ते पोर अण्खी पोरी दिसून-दिसनास्क॑ मिळत आहेत वाटते. कारण, वराडाच गोष्ट काढलतर॑ तो सांगतो "बापा, मी वर वाचाम॑. अत्ता काहीं अवसर नाही. दो-तीन वर्षा नंतर पाव्हुमणे".

दिंड n  pith of a plant. दिंड. uis केळीच झाडाच आंतल भागाच दिंडांत॑ भरून नार असाकरतां ते डयबीटीसाला उदंड चोखोट म्हणतात.

दिंडा n  a narrow gateway. एक ल्हान दार. Note: usually referred to a gateway to the अंगण in the house. uis अंगणांत असाच तुळसी ब्रिन्दावनांत॑ अमच॑ अम्मा पूजा करताना अम्ही लेंकरे दिंडाच बाजूच॑ अडभिंताच व॑र बसून ते पाह्त असुवों.

दिंडा fig  an expression for an uncouth person. एक हिरवट मनुष. uis मझ बाप वरडतील॑, "हळ्ळु पाव्हून काढींगून जा, तू काहीं दिंडा न्हो".

दीड adj  one and a half. एकाच वर अर्ध. देड. uis दुकानाला जाऊन दीड किलो साखरेहीं अडीच किलो तांदूळीन घेईंगून येरे म्हणून तला सांगून  पाठिवलतर॑, अडीच किलो साखरेईं दीड किलो  तांदूळीन आणून ठिवलाहे !

दीडशें n  one hundred and fifty. शंभराच व॑र पन्नास. uis दीडशें वर्षाच पुढे ब्रिटीष ईस्ट इंद्या कंपनीचीं मुगळ सेनांचीं मध्ये बक्सरांत झालते युद्धांत॑ ब्रिटीष सेना झिंतून उत्तर भारत पूरा त्यंच स्वाधीनांत करींगटले. 

दीन adj  meek. humble. submissive. सौम्य. uis उजंड दीन स्वभावांत असलतरे अम्ही योचना कराच कित्येक विषय साध्य होईना म्हणून आवश्याजोक्त॑ दृढ होऊन पणीन असाम॑.

दीन adj  lowly. उणे स्थितीच॑. uis दीन स्थितींत असणारांस पाह्यलतर॑ अम्हाला परिताप येईल॑. 

दीन adj  poor. needy. दरिद्र. uis कुचेल ब्राह्मण सुधामा, त्यंच सहपाठीमित्र श्री क्रिष्णाला पाह्याला जाताना दीन अवस्थांत होते, पण परतून येताना धन-धान्य भरलत॑ घर पाव्हून त्यांस आश्चर्य झाल॑.         

दीप n  lamp. दिवा. uis देऊळाच उत्सवाच समय पूरा गोपुरीन दीपाच उजाडांत झळकत असल॑.

दीपस्तंभ n  a tall poll mounted with lamps. दिवाच उंच खांब. uis भरताच दक्षिणाकडे असाच देऊळांत अग्गीन गर्भगृहाच समोर दीपस्तंभ असल॑.

दीपस्तंभ n  lighthouse. समुद्राच बाजू उंच असाच बांधणींतल॑ दिवाच व्यवस्था. uis समुद्राच कांठशी असाच दीपस्तंभाच फिराच दिवा उजंड दूर  नावांत असणारांस दिसल॑. 

दीपावळी n  Hindu festival of lights. हिंदू धर्माच एक सण॑. uis दीपावळीच समय पट्टाकि सोडताना लेकरे फार जागृतान असाम॑, नाहीतर॑ त्यंच डोळेलाकी आंगालाकी रोकट लागून घाव होईल.

दीपोत्सव n  festive decorations of oil lamps in a temple. देऊळांत॑ तेलाच दिवा लावून कराच उत्सव. uis अनंतशयन देवस्थानांत॑ प्रति सहा वर्ष चालिवाच दीपोत्सवाच वेळी पूरा देऊळीन लक्ष दीपांत अलंकार करतील॑. 

दीर्घ adj  long. लांब. Note :- in space or time. 

दीर्घ adj  long note. दीर्घस्वर. लांब स्वर. गुरू. ह्रस्वाच विरुद्ध स्वर. uis "अ", हे ह्रस्व स्वर आहे अणी "आ", हे दीर्घ स्वर आहे.

दीर्घदृष्टी n  far-sight. पुढे भविष्यांत॑ होयाच विषीन योचना कराला होयाच बुद्धी. uis दीर्घदृष्टी असणार अनेक महर्षीच विषीन अम्च॑ हिंदू इतिहासांत आहे.

दीर्घश्वास n  deep breaths. दीर्घाच श्वास. uis मनाला फार तंटा होत असलतर॑ डोळे झांकींकून तीन चार दीर्घश्वास काढलतर॑ ते अपाप शांत होईल॑. 

दीर्घस्वर n  a long vowel. दीर्घ होवून उच्चार कराच स्वर॑. uis "अ", हे ह्रस्व स्वर आहे अणी "आ", हे दीर्घस्वर आहे.

दीर्घायुष n  long life. longevity. दीर्घ असाच आयुष. लांब वांचून असणार. uis भूलोकांत सगळच्यां पक्षा दीर्घायुष असाच समुदाय जपानांतल॑ ओकिनावा द्वीपांत राहतात॑.

दीक्षा n  formal initiation into sanyasa. सन्यास आश्रम आरंभ करणे. uis श्री राघवेंद्रस्वामीच दीक्षा तंजाऊरांत वडवारु नदीच कांठशी असाच मठांत इसवी 1625 वर्षी त्यंच गुरु श्री सिधींद्रतीर्थ हेनी करिवले.

दीक्षित n  one who has been initiated into a religious way of life. धर्म संप्रदाय आचरण करणार मनुष. uis दीक्षित म्हणजे धर्म संप्रदाय आचरण करणार मनुष म्हणून आहे तरीन ते नुस्त एक अडनावास्क॑ ठीवींगणार पणीन आहेत॑.   

दुकान n  shop. व्यापर कराच खोली. uis बंगळूरांत अम्च॑ घरांतून पांच निमिष दूरांतच॑ अम्हाला काय-काय पह्जेकी, ते अग्गीन विकाच भरून दुकान आहे.

दुकानदार n  shopkeeper. दुकानवाला. uis संपाकाला पह्जेते विध-विध सामग्री अग्गीन एक कागदांत लिव्हून घरच॑ मागेपटीस असाच दाळ-तांदूळाच दुकानाला पाठिवून देलतर॑, दहा पंध्रा निमिषांत ते अग्गीन एक पोराकडे दुकानदार पाठिवूनटाकतील॑.

दुकानबीद॑ n  market street. market. दुकानांच बीद॑. uis ल्हान-ल्हान पटणांत असास्क॑ बंगळूरांत अम्च॑ घराच बाजू दुकानबीद म्हणून नाहीतरीन, अम्हाला आवश्य असाच सगळीन मिळाच भरून दुकान जवळच आहे.     

दुकानवाला n  shopkeeper. दुकानदार. uis भाजीपालाच व्यापार बरोर होतनाही म्हणून, ते बिसिनस राह्ते करून एक ल्हान होटल आरंभ कराला ते दुकानवाला निश्चय करला.

दुख n  sadness. संकट. uis सोमालिया देशाच ल्हान लेंकरे भूकांत मराच पाह्ताना अम्हास फार दुख होत॑.

दुख n  pain. वेदना. uis एकदपा मी ल्हान असताना पांयेच बोटांत झालते  घाव पिकून उदंड दुख खाल॑ म्हणून तीन चार दिवस तरपडून गेलों. 

दुखणे vi  to pain. वेदना होणे. uis पिकलते घावाच दुखणे सोसाला होईनास्क॑ तीन चार दिवस तरपडून गेलों. 

दुखिवणे vt  to inflict pain. वेदना आणिवणे. uis ते दुष्ट पोराला बीदीच कुत्रेला धोंडा भिरकावून दुखिवणे म्हण्जे कायकी संतोष वाटते.

दुखिवणे vt  to cause mental anguish. दुसरेंला मनाच संकट आणिवणे. uis दुसरेंच मन्न दुखिवास्क॑ अम्ही काहीं करताने.

दुपट्टा n  a cloth worn around the shoulder. खांदाच वरून नेसाच कापड. शेला. शल्या (Kannada). uis मोटरसैकलाच मागल॑ सीटांत बसून जातम्हा ते पोरीच दुपट्टा मागल॑ चक्रांत गुंडाळून खाले पडली. देवाच दया थोर आफत काहीं झाल नाही.

दुपारा n  noon. after noon.  बारा वाजल नंतर पसून सध्याकाळाच पुढेच वेळ. uis दुपारा दोन बडिवताना येतों म्हणून सांगून तो येऊन पावताना संध्याकाळी सहा झाले.

दुप्पट adj  double as much. दुगुणा. uis बस्साच टिकटाच मोल दुप्पट करले म्हणून विरोध कक्षीच लोके थोर गलाटा करून सहा बस जळिवूनटाकते.

दुभाषी n  translator. interpreter. एक भाषाच बोली वेगळ॑ भाषाला करणार॑. Note :- from दु and भाषा. uis जुने काळांत एक भाषांतून अण्कीएक भाषाला भाषांतर कराच काम दुभाषी लोक करत होते, पण अत्तच कंप्यूटर युगांत॑ तत्समय अनेक भाषांत भाषांतर कराच व्यवस्था आहे. 

दुरदृष्ट n  bad luck. misfortune. दुर्भाग्य. uis खेळांत हरलतर॑ ते अम्च॑॑ दुरदृष्टामळे म्हणून सांगनास्क॑, जिंतलत्यांच षाणपणामळेच तस झाले म्हणून सांगणेच चोखोट॑.

दुरभिमान n  false pride. दुरहंकार. uis दुरभिमान असणार लोकांस अम्ही त्यंच चोखोटाकरतां काहीं उपदेश देलतर॑पणीं ते अवगणना करूम्हणे म्हणून वाटल॑.

दुरवस्था n  misfortune. दुर्भाग्याच स्थिती. uis दारिद्राच दुरवस्थांतून चुकाला कायतरीन वाट मिळल म्हणून गाढ विश्वास ठीवींगून कुचेला त्यंच बाल्यकाळ मित्र श्रीक्रिष्णाला पाह्याला गेले.

दुराग्रह n  evil desire. ओंगळ आग्रह॑. वंगळ आग्रह॑. uis दुराग्रहाच उदाहरण पाह्मे म्हणजे दुर्योदना पांडवांच बरोर कस॑ वागला म्हणून पाह्यलतर॑ पुरे.

दुराग्रही adj  one with evil or improper desire. ओंगळ आग्रह असणार॑. वंगळ आग्रह असणार॑. uis दुराग्रही लोके दुसरेंच बरोर कस॑ वागतील म्हणून पाह्मे म्हणजे  दुर्योदना पांडवांच बरोर कस॑ वागला म्हणून पाह्यलतर॑ पुरे.

दुराचार n  bad conduct. ओंगळ वागणे. वंगळ वागणे. uis सैरंध्रीच वेषांत विराट राजाच राजवाडांत राह्त होतते द्रौपदीच बरोर दुराचार करलतेमळे कीचकाला भीमसेना वध करले.

दुराशा n  evil desire. दुष्ट आग्रह. uis भारताच स्वाधीनांत असाच कश्मीर त्यंच स्वाधीनांत करुया म्हणाच पाकिस्थानाच दुराशा कद्दीन सार्थक होईना.

दुरुद्देश n  wrong intention. ओंगळ उद्देश. वंगळ उद्देश. uis दुरुद्देश ठीवींगून अम्ही काय कराला गेलतरीन एक दिवस तज परिणाम अम्हाला अनुभव करामते पडेलच पडेल॑.

दुरुपदेश n  evil advice. ओंगळ॑ उपदेश. वंगळ॑ उपदेश. uis अम्च॑ चोखोटच त्यंच मनांत आहे म्हणून लटक सांगून दुरुपदेश देणारांचकडून कित्ती दूर असतोंकी तेवढीन अम्हाला चोखोट॑.

दुरुपयोग n  improper usage. ओंगळ उपयोग. वंगळ उपयोग. uis अम्हाला विसंबींगून असणारांच चोखोटपण॑ दुरुपयोग कद्दीन करतानेच करताने.

दुर्ग n  fort. किल्ला. कोटे (Tamil). uis मुगळ साम्राज्याच बरोर युद्ध कराला म्हणून छत्रपती शिवाजी हेनी सह्याद्रि पर्वताच कित्येच डोंगूराच व॑र दुर्ग बांधले. 

दुर्गंध n  stench. घाण वास. uis पाऊसाळाच महिने आरंभ होयाच पुढे पटणांत असाच मोरी अग्गीन बरोर शुद्ध करनातर॑, नंतर॑ थोर पाऊस येताना परसाकडेच अणी तसच, वेगळ॑ घाणक॑ पाणी हे अग्गीन मिळून गाम पूरा दुर्गंध पसरल॑. 

दुर्गुण n  vice. दुष्ट स्वभाव. दुष्ट गुण. uis त्यंच लेंकीला नवरा हुडुकताना पीखोर, नशाच स्वाधीनांत असणार असलते दुर्गुण असाच पोर मिळताने म्हणून भरून नवसींगटले.

दुर्घटना n  mishap. आपत्त. अपघात. uis हे जवळ तीन चार रेल दुर्घटना झाल॑ म्हणून केंद्र रेल मंत्री त्यंच त्यागपत्र देले.

दुर्दशा n  misfortune. दुरवस्था. uis  एक काळांत ते घरचे राजास्क॑ होते. अत्ता त्यंच दुरदशा, जेवाला कष्टि भोगतात॑.

दुर्बल adj  weak. infirm. शक्ति नाहीते. uis अठ्रावां शतकांत ब्रिटीष ईस्ट इंद्या कंपनी अम्च॑ देशाला येताना मुगल साम्राज्य दुर्बल स्थितींत होततेकरतां पूरा भारत लोक्कुरच त्यंच स्वाधीनांत कराला झाल॑.

दुर्बुद्धी n  evil thoughts. ओंगळ विचार. वंगळ॑ विचार. uis देवाच स्मरण केम्हाहीं अम्च॑ मनांत असलतर॑ आवश्य नाहीते दुर्बुद्धीला तिकडे ठिकाणच असना.

दुर्भाग्य n  ill-luck. misfortune. भाग्य नाहीस्क॑ असणे. दुरदृष्ट. uis कराच काम बरोर पाह्यींगून करलतर॑, निष्फल झालते काम अम्च॑ दुर्भाग्यामळे झाले म्हणून सांगाच आवश्य असना.

दुर्लक्षण n  ill-omen. ओंगळ लक्षण. uis घर सोडून बाह्येर उतरताना काळ॑ मांद्र अडवे आलतर॑ ते एक दुर्लक्षण म्हणून सांगणार लोके आहेत॑.

दुष्ट adj  wicked. ओंगळ॑. वंगळ॑. uis वेगळ॑ लेंकरांस पाह्यलतर॑ चुमटणे, केंस धरून ओढणे, धोंडा भिरकावणे असलते चेष्टा अग्गीन करत होता म्हणून कोण्त मायेहीं ते दुष्ट पोराच बरोर खेळाला त्यंच लेंकरांला सोडत होत नाही. 

दुष्टबुद्धी n  evil mindedness. दुष्ट स्वभाव असणार॑. uis दुष्टबुद्धीच लोकांच बरोर सहवास ठीवींगट्लतर॑ अम्ही पणीन तसलते मनुषच म्हणून लोके म्हणींगतील॑.

दुष्टपण॑ n  wickedness. ओंगळ स्वभाव॑. वंगळ॑ स्वभाव ;  दुष्टपणा in sm. uis लेंकरे वाढताना त्यंच स्वभावांत कायतरीन दुष्टपणाच लक्षण दिसल॑की-नाही समेच ते बरोर करणे थोरळेंच जवाबदारी आहे.

दुष्परिणाम n  adverse effect. वंगळ॑ परिणाम. ओंगळ॑ परिणाम. uis  सूर्यग्रहण की चंद्रग्रहण की येताना संपाक करलते पदार्थाच भांडीच व॑र ग्रहणाच दुष्परिणाम येताने म्हणून दर्भाच चूर घालणे आहे. 

दुसर॑ adj  an alternate one. another one. a second one. वेगळ॑. अण्की एक ;  दुसरा  in sm. uis आज पाष्टे दुकानांतून आणलते पुस्तकांत दहा पंध्रा पान होत नाही म्हणून समेच पर्तून जाऊन दुसर॑ एक पुस्तक घेईंगून आलों. 

दुसर॑ adj  second in number etc. दुसर॑ संख्याच॑ ;  दुसरा  in sm. uis सिनिमा टिकट घ्याला ओठाकलते क्यूंत॑ कौन्टरांतून दुसर॑ असणारच मझ॑ लोंक.

दुसरंदा adv  a second time. once again. दुसर॑ वेळी. दुसरंदफा. दुसरंदपा. पुन्हा ; दुसर्यांदा in sm. uis मी सांगाच बरोर ऐकून घे, दुसरंदा सांगना.

दुस्तेपार n  early morning. dawn. अरुणोदि. uis शेतीजमीनांत काम करणार कुणबी, नांगरणार असलतेनी अग्गीन दुस्तपारीच कामाला जमीनांत उतरतील॑.

दूत n  emissary. envoy. प्रतिनिधि. uis रामायणांत युद्ध आरंभ होयाच पुढे बालीच लोंक अंगदाला श्रीराम रावणाकडे त्यंच दूत म्हणून पाठिवले.

दूध n  milk. क्षीर॑. uis म्हैशीच दूधाच पक्षा गाईच दूध आंगाला चोखोट म्हणून ल्हान लेंकरांस ते देणे आहे.

दूधकेळ॑ n  custard apple. सीताफळ. uis जास्ती पिकलत॑ दूधकेळेच चिप्पा इकड॑-तिकड॑ फुटून असते म्हणून खायाच पुढे ते बरोर धुवांव॑ (धुवाम॑). 

दूधपेढा n a sweet preparation made of condensed milk. दूधांतूं केलते एक गुळ्चीट पदार्थ. uis धारवाड पटणांत मिळाच दूधपेढा "मिश्रा पेढा" भरून दुकानवाले करून विकाकरतां हेजांत कोण्त असली कोण्त नकली म्हणून कळींगणे कष्ट झालाहे. 

दूधभोंपळा n  bottle gourd. शोरेकाई (Tamil). uis चप्पातीच बरोर खायाला दूधभोंपळाच कोफ़्ता-करी बेष असल॑.

दूधवाला n  milkman. दूध विकणार॑. uis दिवसोडि अम्च घरांत दूध घालाच दूधवालाला अम्ही वारा-वार इषोब करून पैसे देऊनटाकतों.

दूर adv  afar. दूर. uis बंगळूरांतून हैदराबाद किती दूर आहे ? 

दूरदृष्टी n  foresight. पुढे होयाच कळणे. uis कोण्ततरीन एक प्रकल्प हाती काढलतर॑ ते कस पुढे प्रयोजन होईल म्हणून कळींगाच दूरदृष्टी असलतरच ते काम सार्थक होईल॑.

दूरून adv  from far. दूर असून. दूर्सून. दूर ठामी कडून. uis एक घंटेच आंत मला येऊन पाह्तो म्हण्टला तरीन उदंड दूरून येमतेमळे बरोरल॑ वेळेला येईलकी नाहीकी म्हणून मला संशयच॑.

दृढ adj  firm. घट्टि. uis एक निर्णय काढलानंतर दृढ होऊन ते पालन करणे मुख्य.

दृश्य n  that which is visible. दिसाचं. uis प्रकृति सौदर्य भरून असाच बाली द्वीपांत एक एक दृश्यहीं फार मनोहर आहे.

दृष्टांत n  example. उदाहरण॑. uis धर्म अणी सत्य कसं पालन कराच, हेला एक दृष्टांत पह्जे म्हणजे युधिष्टिराच जीवन पाह्यलतरं पुरे. 

दृष्टी n  sight. डोळेवाटी दिसणे. uis पाष्टे उठलकी-नाही देवघरांत देवाच दृष्टी डोळेला पडणे चोखोट. 

दृष्टी काढणे vt  to remove evil eye through the ritual. ओवाळून दृष्टी परिहार करणे. uis लोकांच दृष्टी लागून वंगळ परिणाम होईनास्क असाला ल्हान लेंकरांस तम्हा-तम्हा दृष्टी काढणे आहे.
 
दृष्टी परिहार॑ fig  an object (usually ugly looking) used as a preventive for evil eye. दृष्टी लागनास्क असाला ठिवाच एक (विकार) रूप॑. uis कित्येकदन॑ घर नव होऊन बांधलांपिरी एक विकार विग्रहाला दृष्टी परिहारास्क॑ घरच॑ व॑र ठिवणे आहे.

दृष्टी परिहार॑ fig  a person or a thing which looks ugly. विकार रूपाच मनुष नाहीतर वस्तू. uis सिनिमांत मुख्य नायकाच बरोर दृष्टी परिहारास्क एक विनोद नटाला खाणींत कित्येकदपा मिळिवणे आहे. 

दृष्टी लागणे vi  to be afflicted with evil eye. अपशकुन लागणे. uis अम्च नातूच पह्यिलच उजलादिवसाला अग्गिदनांसीन बलावून बेष पार्टी करल॑  नंतर॑ आंग बरनाहीस्क झालत्याला कारण तला दृष्टी लागलतेमळेच म्हणून मझ॑ लेंक म्हणत होती.

दृष्टी लावणे vt  to apply a black mark (usually on the cheek of a child) as a preventive for evil eye. दृष्टी लागनास्क असाला (ल्हान लेंकरांच॑) गाळांत॑ काळ॑ डाग लावणे. uis ते लेंकराच गाळांत दृष्टी लावाला म्हणून एक माकडाच तोंड ओढून ठिवलते पाव्हून मला हांसू आल॑.
     
देऊळ n  temple. देवस्थान. uis अम्च॑ घराच जवळ वेंकटरमणाच॑, गणपतीच॑, आंजनेयाच॑, श्रीरामाच॑, ईश्वराच॑ अस पांच देऊळ आहे.

देखणे vt  to see. प्हाणे.

देखना n  not seen. vanished. डोळेला दिसनास्क॑ होणे.

देट n  stem or stalk by which the fruit or flower hangs from the plant. पंडु अथवा फूलाच देंठ. देठ.  uis फणस झाडांतून कापून तीन चार दिवस झालका नाहीका म्हणून कळाम म्हणजे तज देट पाह्यलतर॑ पुरे. तीन चार दिवस झालाहे म्हणजे देट वाळून असल॑.

देठ n  stem or stalk by which the fruit or flower hangs from the plant. पंडु अथवा फूलाच देंठ. देट. uis झाडांतून फणस कापून समेच देठाच व॑र कागद गुंडाळून बांधून ठिवनातर॑ तजांतून पंढ्र रंगाच चिकटाच रस गळून पडल॑. 

देड adj  one and a half. एकाच वर अर्ध. दीड. uis अम्ही दिवसोडी देड लिटर गाईच दूध घेतों.

देणगी n  a reward or a gift to one who has rendered a service or any gratification. सेवा, नाहीतर॑, उपयोगाच काम केलत्यांस द्याच आहेर. uis जुने काळांत, म्हणजे अम्च॑ आजा, पणजाच काळांत घरच काम कराला भरून कामवालेहीं कामवालीहीं होते. त्यांस महिना महिना धर्मा द्याच बद्दिल देणगी देत होते. 

देणे vt  to give. देवूनठाकणे. अर्पणा करणे. uis कोणालातरीन, दान द्याच असलतर॑ मन्न उघडून पूरा संतोषांत देणेच चोखोट.

देणे-घेणे n  financial dealings. पैसाच व्यवहार॑. uis ते भाऊ-भावंडे मध्ये कायकी मनस्थाप झालाहे वाटत॑. अत्ता त्यंच मध्ये देणे-घेणे काहीं नाही.

देम॑ n  dew. देंव॑. हीमामळे होयाच पाणीच ल्हान ल्हान बूंद ; दव/दंव in sm. uis अरुणोदी सूर्य उदय होयाच पुढे जमीनांतून देम॑ व॑र याच वेळ उदंड हिंस असेल॑.

देम्हाळा n  misty conditions. देमाच वातावरण. देंव्हाळा. 

देर n  husband's younger brother. दाल्लाच धकटा भाऊ ; दीर in sm. uis मझ॑ बहिणीला दोन देर आहेत्यांत एकले बंगळूरांतीन अण्कीएकले अमेरिकांतीन आहेत॑.

देव n  God. भगवान. uis हंदू धर्माच प्रकार देवाला प्रार्थना करलतरीन ते अग्गीन एकच देवाला जाऊन पावल॑.

देवकार्य n  activities connected with worship of God. देव निष्टा. uis मझ॑ सासरा पाष्टे देवकार्य करले विना वेगळ॑ काहीनच करनात॑. 

देवघर n  a room in a house where Gods are worshipped. पूजाच खोली. uis देवघर नीट लक्षण होऊन असलतर॑ घर पणीं लक्षण होऊन  असल॑.

देवता n  Goddess. देवी. Note :- normally a lesser god. uis केरळ संस्थानांत भरून ठिकाणी, प्रत्येक होऊन ग्राम प्रदेशांत देवतांच देऊळ पाह्याला मिळल॑.

देवदारु n  cedar tree. a type of coniferous tree. सूंईंच आकारांत असाच पानाच वृक्ष. uis हिमालया पर्वाताच खालच॑ प्रदेशांत देवदारू वृक्ष भारून पाह्याला मिळल॑.

देवदासी n  a temple dancer. देऊळांत॑ नृत्य कराच कुलांतल॑ स्त्री. uis  सरकाराच नियमाप्रकार देवदासी संप्रदाय राह्ते करलाहेतरीन अत्तापणीन कर्नाटकाच कित्येक जिल्लांत हे अनाचार संप्रदाय प्रचारांत आहे. 

देव दिसणे id  to be driven to one's wits end. पुढे काय करालीं सुचनास्क॑ होणे. uis बंगळूरांत कोण्तहीं सरकार ऑफीसांत जाऊन अम्च॑ काम कराम॑ म्हणजीनीं लांच देऊनच सराम॑ अणी अम्च॑ काम संपजोरी देवदिसूनजाईल॑.

देव दिंड collo  religious inclinations. देव भक्तीच स्वभाव. uis देव दिंड भरून असाच एक ब्राह्मण कुटुंबाच पोरी एक तुर्कडा पोराच बरोर पळूनगेली म्हणून मी हे जवळ ऐकलों.

देवनागरी n  name of Sanskrit script. संस्कृत लिपीच नाव॑. uis देव अणी नागरी हे दोन शब्द मिळून देवनागरी झाल॑.

देवपूजा n  worship of God by a householder. गृहस्थ कराच देवाच पूजा. uis मध्व संप्रदायाप्रकार देवपूजा करताना साळिग्राम अभिषेक करणे आहे.

देवप्रतिष्टा n  consecration of God's idol. विग्रहांत देवाला आवहन करून प्रतिष्टा कराच॑. uis वेलूर पटणांत असाच जलकंडेशर देऊळांत असाच शिवलिंगाला तुर्कडांच आक्रमाच वेळी बाहेर काढून भिरकवले अणी सुमार चारशें वर्ष ते देऊळांत पूजा झाल नाही. नंतर॑ इसई 1981 मार्च महिना सोळा तारीखला जलकंडेशराच शिवलिंग पुन्हा देऊळाच आंत देवप्रतिष्टा करले. 

देवभक्ती n  devotion to God. देवाच वर दाखिवाच भक्ती. uis वेगळ॑ कोण्त नाहीतरीन परवा नाही, पण देवभक्ती असलतर॑ पुरे म्हणून मझ॑ आजी सांगतील॑.

देवलोक n  heaven. स्वर्ग. uis देवलोकांत तज स्थानाला वेगळ॑ कोणतरीन येतीलका म्हणून देवेंद्राला केम्हाहीं भें होत॑.

देवसमाराधना n  a religious rite performed before a wedding or thread ceremony. वराड, मुंज॑ हेज बरोर जोडलते एक पद्धती. uis पोणावांटादनीन देवसमाराधना घरांतच करूनटाकून वराड अथवा मुंज छत्रांत करतात॑.

देवस्थान n  temple. देऊळ. देवालय. मंदिर. uis अत्ता अग्गीन अमेरिकांत हिंदू देवस्थान भरून ठिकाणी आलत्यामळे अम्च॑ धार्मिक कार्यक्रम कायतरीन तिकडे करिवाला थोडकीन प्रयास नाही.

देवालय n  temple. देऊळ. देवस्थान. मंदिर. uis जीन धर्म आचरण कराच लोकांच देवालयांतपणीन अम्च॑ हिंदू देवांच विग्रह अस्त॑, पण ते नुस्त उपदेवतांत स्थानांत अस्त॑.

देवी n  Goddess. स्त्री शक्तीदेवी. देवता. uis बादामींत असाच बनशंकरी देवीच अम्च॑ कुलदेवता. 

देवी n  small pox. वसूरी. uis एकदपा देवी आलत्यांस पुन्हा अण्कीएकदपा येईना.

देवुडा n  God. देव. Note:- normally used as an exclamation corresponding to "Oh my God!". uis अरे देवुडा ! तू अस करशील म्हणून मझ॑ मनांत थोडकपणीन होत नाही.

देवून-ठिवलते met  said of a person or a thing marked for good tidings or of good fortune etc. भाग्याच अनुग्रह असणे (अस अर्थ) ; Note:- of Tamil origin (कुडुत्तु-वैततु). uis तो एक देवून ठिवलते मनुष म्हणून सांगुया. कां म्हण्जे, तीन दपा काम गेलतरीन, समेच तला तीन नव-नव काम मिळ्ले !

देश n  country, nation. राज्य. uis अम्च॑ देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाल॑.

देशद्रोह n  treason. देशाला कराच॑ द्रोह. uis अम्च॑ देशाच वायुसेनाच  शेवटल॑ अध्यक्षाच व॑र देशद्रोहाच आरोपाच केस अत्ता होत आहे.

देशद्रोही adj  traitor. देशाला द्रोह करणार॑. uis शेवटीच मुगल साम्राट बहदूर शाह ज़फर यांस 1857च स्वातंत्र्य समराच नंतर॑ देशद्रोही म्हणून आरोप घालून देशभ्रष्ट करूनटाकले. 

देशभक्त adj  patriotic. देशाच वर अभिमान असण॑. uis तमिल कवी सुब्रमण्य भारती एक थोर देशभक्ट होते.

देशभक्ती n  patriotism. देशाच वर असाच स्नेह. uis तमिल कवी सुब्रमण्य भारती लिव्हलते देशभक्ती कविता अग्गीन आज पणीन उदंड लोकप्रीय आहे.

देशस्थ n  a sub-cast of Tanjore-Maharastrian Brahmins hailing originally from Desh region in Maharashtra. महाराष्ट्राच देश प्रांतांतून आलते तंजावूर-महाराष्ट्र ब्रह्मणांच एक उप-वर्ग. uis महाराष्ट्रांत मुख्य होऊन दोन विध ब्राह्मण आहेत॑, समुद्राच कांठ प्रदेशांत राह्याच कोकणस्थ अणी देश प्रदेशांत राह्याच देशस्थ.

देशस्था adj  a person belonging to the desastha sub-cast of Tanjore Maharashtrians. देशस्था उप-वर्गांतल॑ तंजावूर-महाराष्ट्र ब्रह्मण॑. uis तंजाऊराच मराठालोक पणीन तेनी देशस्थ आहेत म्हणून सांगींगतात॑.
 
देशाचार n  customs and manners of a province. एक प्रांतात आचरण कराच पद्धती. uis भारतांत अनेक प्रांत आहे अणी एक एक प्रांतांतीन त्यंच त्यंच देशाचार असत॑.

देशाभिमान॑ n  patriotism. देशाच वर दाखिवाच अभिमान॑. uis स्वंत देशाच व॑र देशाभिमान नाहीते मनुष, स्वता तज व॑रच अभिमान नाहीते मनुष म्हणूनच सांगाम॑.

देशाभिमानी n  a patriot. देशभक्ती असणार. uis भारताच स्वातंत्र समराच वेळी देशभक्ती आधार करून सुब्रमण्य भारती तमिलांत॑ भरून कविता लिव्हले. तेनी एक श्रेष्ट देशाभिमानी होते.

देशी adj  relating specifically to a country. indigenous to a country. एक देशाला संबंध झालते. uis भारताच अणु-आयुधाच (ॲटम-बॉबाच) मागे देशी "टेक्नोलजि" आहे म्हणून ऐकताना अम्हाला फार गौरवीं अभिमानीं वाटते.
 
देशी  adj  native to a country. home-grown. indigenous. देशाच आंतच झालते. एक प्रदेशाला मिळालते. uis गेल पन्नास/शंभर वर्षापसून अलोपती चिकित्सा प्रसिद्ध झालाहे तरीन, कित्येक रोगांला अमचेच देशी पद्धतांतच, म्हण्जे, आयुर्वेद वैद्यांकड गेलतरच बोरोर होईल.

देशी  adj  ethnic. एक प्रत्येक देशाच संस्काराला जोडलते. uis वर्षा-वर्षी अम्ही अमेरिकांतल॑ अमच लोंकाच घराला येणे आहे. तिकडे वेगळ॑ सौकर्य तेवढीन आहेतरीन सणाला पह्जते सामग्री सगळीन देशी दुकानांत विना वेगळ॑ कोठीन मिळना.

देह n  body. आंग. uis समुद्र वलांडून लंकापुरीला जायाच पुढे हनुमंत त्यंच देह फार मोठ करले.

देंठ n  stem or stalk by which the fruit or flower hangs from the plant. पंडु अथवा फूलाच देठ. देट. uis बिब्बाच फल म्हणून अम्हाला वाटच, खर होऊन तज देंठ आहे.

देंव॑ n  dew. देम॑. हीमामळे होयाच पाणीच ल्हान ल्हान बूंद ; दव/दंव in sm. uis अरुणोदी सूर्य उदय होयाच पुढे जमीनांतून देंव॑ व॑र याच वेळ उदंड हिंस असेल॑.

देंव्हाळा n  misty conditions. देमाच वातावरण. देम्हाळा.

दैवाधीन॑ n  God's grace. देवाच अधीन. देवाच अनुग्रह. uis मझ॑ बाईल तिज अत्या अणी मावशी यंच बरोर नैमिशारण्याला जाऊन पर्तून बंगळूरला येताना नागपूर स्टेशनांत ट्रेनांतून उतरून कायकी घेत असताना ट्रेन दिडीरशी निघले. ट्रेनांत वेघाला म्हणून कित्ती वेगान पळूनपणीन तिला कवाडाच कांब धरून आंत वेघाला झाल नाही. नंतर॑, दैवाधीन, कोणकी तिज हात धरून तस्च उचलून बंडीच आंत ओढून (होढून) घाटले.   

दोघीन adj  both people. दोघे दनीं. दोन लोकीं. uis सिनिमाला जाऊयाका म्हणून मी ते दोघ्यांसीन विचारताना, पह्यिले येत नही म्हणून सांगून, नंतर॑ दोघीन येतों म्हणट्ले !

दोघे adj  two people. दोन लोके. दोघदन॑. दोघजण॑. uis स्कूटरांत नियमाच प्रकार दोघे बसूया म्हणून असलतरीम, भरूनदपा तीघे बसून जायाच मी पाह्यलाहें.

दोड्की n  ridge gourd. एक रीतच भाजी-पाला ; दोडका in sm. uis दोड्कींत विध-विध पदार्थ करताततरीन मला दोड्कीच चट्णीच फार अवडाच॑.

दोण n  a small cup usually made of dried leaf, used in olden days for serving a liquidy side dish like kheer etc. डोणा. दोण्णे (kannada). जुने काळांत खीर वगैरा वाढाला वाळलते पानांत केलते एक ल्हान वाटि. uis  खीर, ऐस-क्रीम वगैरा दोणेंत देणे आहे. अत्तलीकडे "प्लास्टिक" दोण उपयोग होत आहे. तज बद्दल कागदाच दोणेला "प्लास्टिक" कोटिंग देऊन ("प्लास्टिक" लिंपलत॑) उपयोग करलतर उण॑ "प्लास्टिक" वेच होईल॑. Note :- दोण is the प्राकृत form of द्रोण, which in Samsrkth means 'a tub'.

दोन n  two. एकाच नंतरल॑ संख्या. uis स्वातंत्राच नंतर॑ ब्रिटीश-इंद्या भारत अणी पाकिस्थान अस॑ दोन वेगळ॑ वेगळ॑ देश झाल॑.

दोनशे n  two hundred. शंभर गुणा दोन. uis मराठांच तंजाऊर राज इसई 1675 पसून 1855 पर्यंत होत॑, म्हणजे, दोनशे वर्षाचपक्षा वीस वर्ष उणे.

दोन्हीं adj  (including) both of them. दोन्हीं ; दोन्ही in sm. Note. used in relation to items and non-humans. When people are involved the word is दोघीं. uis भारताच राष्ट्रगीत अणी बंग्ळादेशाच राष्ट्रगीत, हे दोन्हीं रबींद्रनाथ ठागोर हेनीच लिव्हलते.

दोरली n  a veriety of greenish thorny brinjal, used in ritually pure cooking. सोवळेच संपाकांत याच एक विधाच वांगी. हिरव॑ रंग अणी कांटा असाच वांगी. दोर्ली. uis मी दोरलीच वांगी पाव्हून उदंड वर्ष झाल॑.

दोरा n  thread. दोरी. uis पतंग उडिवाला गोंदीन पूड करलते अर्साहीं मिळिवलते मांजा दोरा वापरणे आहे. 

दोरा n  a type of amulet made of thread worn after performing certain poojas by Hindus. by women. कित्येक पूजा झालव॑र हातांत बांधाच दोराच कांकण. uis अनंतवृत करलानंतर॑ हातांत तंबड रंगाच दोरा बांधणे आहे. 

दोरी n  thread. दोरा. uis डोळे बरोर दिसनाते लोकांस सूंईंत॑ दोरी ओवून कापड शिवाला प्रयास होईल.

दोर्ली n  a veriety of greenish thorny brinjal, used in ritually pure cooking. सोवळेच संपाकांत याच एक विधाच वांगी. हिरव॑ रंग अणी कांटा असाच वांगी. दोरली. uis दोर्ली अत्ता जस्ती मिळतनाहीतरीन, सोवळेला याच वादिराजगुल्ला म्हणून मंगळूरांतांतून याच अण्कीएक विधाच वांगी मिळते.

दोष n  sin. पाप. uis अनावश्य होऊन दुसरेंस आरोप करलतर॑ अम्झाला दोष येईल.

दोष n blemish. imperfection. उणीवता. uis  ते पोरीच जातकांत॑ कायकी दोष असाम॑. तज बरोर कोण्त पोराच जातकीं मिळून येत नाही.

दोषारोप n  false accusation. लटके आरोप. uis अनावश्य होऊन दुसरेंच व॑र दोषारोप सांगट्लतर॑ अम्झाला पाप मिळल॑.

दोषी adj  guilty. दोष केलत्याला आरोप झालता. uis दोषी म्हणून मृत्युदंड मिळ्लते ते मनुष एक निरपराधी म्हणून नंतर कळ्ळ॑. 

दौडिवणे vt  to chase away. भरड पळिवणे. दवडिवणे. uis लंगडा म्हणून लटक॑ सांगून देऊळाच समोर भीकमागत होतत्याला गावांच लोके तिकडून दौडिवूनटाकले.

दौडिवणे vt  to drive a vehicle etc. भंडी वगैरा पळिवणे. uis बंडी बेष दौडिवाला कळल म्हणून सांगून अम्च॑ घराला ड्रैवराच कामाला आलत्याला बंडी पळिवाच लैसन्स पणीन नाही म्हणून कळ्ळकीनाही बेष हाक्कामारून / शिवा देवून पर्तून पाठिवूनटाकलों.     

द्रव n  juice. रस॑. uis द्राक्षेच द्रव थोड दिवस तस्च ठिवलतर॑ ते अंबट होऊन दारू सार्ख होऊनजाईल॑.

द्रव n  sap. कापलते वनस्पतींतून गळाच रस॑. uis कित्येक वनस्पतीच द्रव अम्च॑ आंगाला लागलतर॑ जळून फोड(व्रण) येईल.

द्रव adj  liquidy. द्रवरूपाच पदार्थ.  uis मेर्कुरी (पारा) एक धातू आहेतरीन, ते द्रव रूपांत असत॑.     

द्राक्षे n  grapes. एक गुळ्चीट फळ॑ ;  द्राक्ष in sm. uis बीं नाहीते द्राक्षे बज़ारांत भरून आलांपिरी बीं असाच द्राक्षेच व्यापार फार उणे झालाहे.

द्राक्षे n  khismis. वाळलत॑ द्राक्षे. uis देवपूजाच वेळी नेवेद्याला वेगळ॑ पंडू असलतरीन नसलतरीन नित्य अम्ही द्राक्षे ठिवतों.

द्रोह n  treachery. विश्वास तोडणे. uis भारताच इतिहासांत शत्रूंच बरोर मिळींगून स्वंत देशाला द्रोह करलते भरून खाणी आहे.

द्रोही adj  treacherous (person). द्रोह करणार. uis राम-रावण युद्ध आरंभ होयाच पुढे रावणाला सोडून श्रीरामाकडे आलते विभीषणा एक द्रोही होता  म्हणून कित्येकदन सांगतात॑.

द्वादशी n  twelfth day of each lunar fortnight. प्रत्येक पक्षांतल॑ बारावा दिवस. uis "द्वा" म्हणजे दोन अणी "दशी" म्हणजे दहावां, अस॑ द्वादशी म्हणजे बारावां म्हणून अर्थ.

द्वापरयुग॑ n  the third of the four yugas. चार युगांत॑ तिसर॑ युग॑. uis कुरुक्षेत्र युद्धाच नौवां दिवस द्वापरयुग संपले म्हणून महाभारतांत आहे.

द्वार n  hole. डोबुर. uis अम्च॑ समोरल॑ घरच॑ मांदर॑ केम्हाहीं त्यंच बाह्येरच॑ कवाडाच खाले असाच द्वार पाह्त बसलसेल, कां म्हणजे मध्य-मध्ये तजांतून उंदीर बाह्येर येईल म्हणून !

द्वार n  an orifice. a two way hole. द्वार. uis तोड की, लोलक की घालनास्क॑ उजंड दिवस तसच सोडलतर॑ कानाच टोंचलते द्वार झांकूनजाईल.

द्वार n  entrance. दार. आंत वेघाच वाट. uis जुने काळांत युद्धाच समय शत्रूसैन्याच हत्ती सुलुभान आंत वेघनास्क॑ असाला किल्लाच द्वार वंकडे-तिंकडे करून बांधत होते.

द्वारपालक n  one who guards the gate. द्वार रक्षा करणार. uis जुने काळांत थोर-थोर लोकांच घराच बाह्येर द्वारपालक होत. अत्ता तज बद्दिल "सेक्यूरिटी गॅर्ड्स" बसलसतात॑.

द्वारपालक n  stone carved statues positioned as door-keepers in a temple. देऊळात॑ वेघाच वाटी दोनबाजू असाच धोंडाच विग्रह॑ ;  द्वारपाल in sm. uis वैकुंठांत महाविष्णूच द्वारपालक म्हणून होतते जय-विजयांच शिलारूप विष्णूच देऊळांत पाह्याला मिळल॑.

द्विज n  twice-born. दोनदा जन्म झालते. uis पह्यिले मायाच गर्भांतून जन्म होऊन, नंतर॑ मनुष्य समुदायाला हितकार्य कराला म्हणून दुसरंदा जन्म घेणार, हे आहे द्विज गोष्टाच अर्थ.

द्वितीया n  second day of each lunar fortnight. प्रत्येक पक्षांतल॑ दुसर॑ दिवस. uis कस॑ तृतीयाला "तीज" म्हणून सांगतों की तस॑  द्वितीयाला "दूज" म्हणून सांगतात॑.

द्वीप n  island. भोंताले चारपटीसीं पाणी असाच एक स्थल॑. uis भूलोकांतल॑ सगळ्याचीन पक्षा मोठ द्वीप मडगास्कर आफ्रिका भूखंडाच पूर्व भागांत आहे. 

द्वैत॑ n  the doctrine of dualism. देव अणी ब्रम्हांड हे दोनीन वेगळ॑-वेगळ॑ म्हणून विश्वास कराच तत्वज्ञान॑. Note. the philosophy of dualism was founded by Shri. Madhwacharya. uis द्वैत संप्रदाय आरंभ करलते श्री मध्वाचार्याच जन्म इसवी 1238 वर्ष उडुपीच जवळ पाजकांत झाले.

No comments: