र
र the twenty-seventh consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच॑ सत्तावीसवां व्यंजन॑.
रकत॑ n blood. रक्त. रगत॑.
रक्कम n an amount. a specified sum of money. ready money. cash on the spot. रोक्कम. रोकडा. नगद ; रोख in sm. uis अत्तलीकड उदंड/उजंड मठांत तेनी विचाराच॑ रक्कम देलतर॑ मुंज, पुण्यावचन॑, लेंकरांच उष्ठवाण॑ अस विशेष कार्यक्रम कराला ओपिंगतात॑. जेवणार लोकांच संख्यावर रक्कम उणे अधीक होउया.
रक्त n blood. रकत॑. रगत॑.
रक्तकापूस n hibiscus flower. जास्वंद. जस्वंदीच फूल. तंबडकापूस. दासवाला (Kannada).
रक्तदान n blood donation. रक्ताच॑ दान.
रगडणे vt to massage. बळानिशी चोळणे.
रगडणे vt to press and rub. बळानिशी चेंपून घासणे.
रगडा fig a figure of speech implying feeling of repression on account of pressure from someone, pressure of work. etc. uis कामाच रगडा सोसनास्क उदंडदन 'वी.आर.एस' घेतात॑. पण नंतर वेळ जाईनास्क अणी पैसे उणे पडताना काम राजिनामा केलते योचना करुन खंत॑ भोगतात॑.
रगत॑ n blood. रक्त. रकत॑. uis कित्येक लोकांस॑ रगत॑ पाह्यलतर॑ भींगून घेरी येते. अम्च कामवाली तजांत मिळालती एकली आहे. तजामळे तिन॑ रगत॑ परिक्षाला कधीन जाईना.
रगळा n ruckus. गलाटा.
रगळा n dispute. भांडणे.
रचना n a written composition of verses, write-ups etc. पद, कविता, वाक्य, लेख असलते लिव्हून मांडणे.
रचना n arrangement. preparation. व्यवस्था. तय्यर. uis एक कार्यक्रम बेष प्रचार होम॑ म्हणजे, तज रचनाव॑र भरून ध्यान देमते पडल॑. तला एक संघ करुन सदस्यांना वेगळ वेगळ जवाबदारि द्याला पह्जे.
रजई n quilt. कापूस भरलते एक घट्टि पांघरिवणे.
रजनि n night. रात्रि.
रजस n the second of the three Gunas (characteristics). तीन गुणांत॑ दूसर॑ गुण॑.
रजा n leave from duty. कामांतून सुट्टि.
रट्ट n card board. घट्टि कागद॑. uis कसालतरीन उपयोग होईल म्हणून मझ आजा जुने रट्टाच डब्बा काहीतरीन मिळ्लतर॑ ते काढून परणेच वर घालतील॑.
रड n crying. wailing. रेड. संकटामळे डोळेंतून पाणी येणे.
रडका n a cry-baby. habitual complainer. सदा चूक सांगणार॑.
रडका n a person given to crying. सदा रडणार.
रडकोर adj one given to incessant complaining. रडखोर.
रडखोर adj (one given to) incessant complaining. रडकोर.
रडगाणा n doleful crying. piteous moaning or whining. शोकाच रड.
रडगाणा fig troublesome complaining. तंटाच आरोप॑.
रडणे vt to cry. to wail. डोळेंतून पाणी गळत॑ संकट व्यक्त करणे.
रडणे भेंकणे vt to throw tantrums while crying. to bawl out while crying. रडताना मोठ वरडा-वरडि करणे ; रडणे-भेकणे in sm. Note :- the word भेंकणे is almost always used in conjunction with रडणे, for example, रडणे-भेंकणे, रडून-भेंकून, रडत-भेंकत.
रडतोंड॑ n a doleful face. संकटाच तोंड. रडूतोंड.
रडिवणे vt to make one cry. दुसरेला रडू आणिवणे ; रडवणे/रडविणे in sm.
रडू n wailing. crying. रड. डोळेंतून पाणी गळत संकट व्यक्त कराच॑.
रण॑ n battle. युद्ध॑.
रण॑ n an open septic blister. फुटलते फोड. व्रण॑. uis ल्हान पोरे फोड वाळत अस्ताना खाजींगून रण करींगतील॑.
रणधीर॑ adj firm in fighting. great warrior. रणशूर॑.
रणभूमि n battlefield. युद्धभूमि. युद्धाच मैदान. रंणांगण॑.
रणभेरि n war cry, trumpets etc to raise the frenzy of the soldiers. युद्धाच वेळी सैन्यांस उत्तेजन कराला वाजिवाच मोट्ठ॑ वाद्य.
रणशूर॑ adj brave and valiant in battle. रणधीर॑.
रणांगण॑ n battlefield. रणभूमि. युद्धरंग॑. युद्धाच मैदान.
रत्न n a precious stone. आभरणाच खडे.
रत्नाकर n ocean (containing precious stones). (रत्नाच खडे असाच) समुद्र.
रथ n a war chariot. युद्धाच एक वाहन॑.
रथ n a chariot. रथ.
रथ n a chariot used in temple festivals. देऊळांत॑ देवाच मिरिवणेला उपयोग कराच वाहन॑.
रथसप्तमि n the seventh day of the bright fortnight of Magha month. माघ मासाच शुक्ळपक्षाच सातवां दिवस. Note :- It marks the seventh day following the Sun’s northerly movement (Uttarayana).
रथोत्सव॑ n a temple procession with idols placed in a chariot. उत्सवमूर्तीच॑ मिरिवण॑.
रद्द adj cancelled. रद्द करणे. चालू असाच संपिवणे.
रद्दि n waste paper, cloth etc. उपयोग नाहीते कागद, कापड असलते.
रपाटा n a slap. a smack. उघड॑ हाताच मार. झटशी मारणे. फटारशी मारणे. uis एक दिवस एक प्रभल "मालांत" एक पोरी असलास्क-असून एक "सेल्स" पोराला गालावर रपाटा देली. नंतर कळ्ले, तो मनुष तिज बरोर कायकी अनावश्य चेष्टा कराला प्रयत्न केला म्हणून.
रपाटा ओढणे vt to give a smart slap or smack. रपाटा होढणे. रपाटा देणे. उघड॑ हातावाटी फटारशी एक मार देणे.
रपाटा देणे vt to give a smart slap or smack. रपाटा होडणे. उघड॑ हातावाटी फटारशी एक मार देणे.
रपाटा होढणे vt to give a smart slap or smack. रपाटा ओढणे. रपाटा देणे. उघड॑ हातावाटी फटारशी एक मार देणे. uis तो पोर अन्याय चेष्टा करत होता. मी दोन रपाटा होडला नंतर शांत झाला !
रमणीय adj delightful. आल्हाद॑ द्याच॑. रम्य.
रम्य adj delightful. आल्हाद द्याच॑. रमणीय.
रयत n marginal agriculturalists. उपजीवना करतां जमीनांत॑ काम करणार॑. कुणबि. नांगरणार.
रळेक n bastard son. वराड करनास्क॑ उजिवलते लोंक. रांडेच लोंक. Note :- from रांडलेंक or रांडल्योंक of SM.
रवा n granular powder of wheat or rice. गहूं अथवा तांदूळाच भरड/जाड पुडि. uis आटा, मैदा, रवा अणी सूजि ते तेवढीन गहूंत्सून करतात॑.
रविवार n Sunday. अयितवार. आदित्यवार. भानुवार.
रवी n churning rod. घुसळाच काठि. (दूध, दहीं असल॑ द्रव्य) ढवळाच काठि.
रवी n Sun. सूर्य.
रशमी n ray of light. रश्मी. प्रकाशाच किरण॑.
रस n juice. रेस॑.
रसम n rasam. a liquid preparation consumed by mixing with cooked rice. सार. Note :- from Tamil.
रसवांगि n a delicious item made with brinjal. वांगीच एक स्वदिष्ट कालिवण॑. uis रसवांगि कराला ल्हान वांगि उपयोग करणे आहे.
रसालू n a juicy variety of mango, the pulp of which is eaten normally by sucking out. एक रीतीच अंबा. uis आंध्रांत उन्हाळा दिवसी चोक्कट रसालू अंबा मिळत॑. तझ मोल 'बंगनपल्ली' अंबा बरीस/भरीस उणे असत॑. Note:- रसाळ in sm means "juicy, sappy, succulent".
रसीत n voucher showing receipt of money. रसीद. पैसे मिळ्लत्याला द्याच चिट्टि. रसीदि.
रसीद n voucher showing receipt of money. रसीत. पैसे मिळ्लत्याला द्याच चिट्टि. रसीदि.
रसीदि n voucher showing receipt of money. रसीद. रसीत. पैसे मिळ्लत्याला द्याच चिट्टि.
रस्सि n rope. cord. घट्टि दोरा.
रहस्य n secret. गूढ. जास्ति कळिवनास्क॑ असाच गोष्ट.
रहस्यकथा n detective story. रहस्यान्वेषण कथा.
रक्षक॑ n protector. savior. रक्षा करणार.
रक्षण॑ n protection. रक्षा. सांभाळणे. जत्तन ठिवणे. दत्तन ठिवणे.
रक्षण॑ vt to protect. रक्षा करणे. सांभाळणे.
रक्षा n protection. जत्तन. दत्तन.
रक्षा n an amulet of charm-string. राखी.
रक्षाबंधन n tying of an amulet around brother's wrist by sisters. भाऊच हातांत॑ बहिणलोके राखीच गांठ बांधाच सण.
रंग n colour. वर्ण.
रंग n a colouring substance. रंग द्याच॑ वस्तु. रंगाच॑ पूढ.
रंगनाथ n Lord Vishnu. महाविष्णु.
रंगप्रवेश n a dance debut. नृत्यांगणांत॑ पह्यलच॑ प्रदर्शन॑.
रंगभूमि n a stage for dance and drama. नृत्य, नाटक॑ कराच वेदि. रंगमंदिर.
रंगमंदिर n a stage for dance and drama. रंगभूमि. नृत्य, नाटक॑ कराच वेदि.
रंग-रूप fig an overall picture. the real picture. the true character. पूर्ण आकार/रूप. खर॑ स्वभाव. uis कितिकी सभा, कमिट्टी बाहेर असून पाह्याला गंभीर अस्त॑. तजांतल॑ सदस्य थोर पदवींत असणार लोक पणीं असतात॑. पण तजांत मिळाला नंतरच तज रंगरूप अम्हाला कळाला येते.
रंगीवणे vt to decorate/beautify with colours. रंग लावून अलंकार करणे.
रंधा n a mess. disorderly state. गजबिज. uis कित्येक संपाकी दाद्ग्ये घरांत दहा-पंध्रा लोकांना संपाक केलतर॑ पणीं ते संपाकघरांत किती रंधा करतील॑ म्हण्जे, अम्ही आंत घूसाला होईना.
रंधा n a carpenter's tool for planing wood. लांकड व्यवस्था कराला सुतारलोके उपयोग कराच एक उपकरण॑.
रंधा करणे vt to smoothen wood with a planer. रंधा मारणे ; रंधणे in sm. uis जुने कालांत॑ सुतार लोक॑ हाता वाटे रंधा मारत होते. पण अत्ता रंधा माराला मिषीन उपयोग करतात॑.
रंभा n name of a heavenly courtesan. स्वर्गलोकाच एक नर्तकि.
राअवळा n a type of small gooseberry. एक रीतीच ल्हान अवळा. uis पोंगलाच बरोर तोळ्लायींगून खायाला राअवळाच गोज्ज बेष असेल.
राई n mustard. मोहरि.
राक्कडि n a head ornament of women. राखडि. बायके डोस्केंत॑ खोवाच एक आभरण॑ ; राखडी in sm.
राख n ash. भस्म. uis काहींतरीं वस्तु जळलतर॑ ते राख होत॑. पण यज्ञकुंडांत जळलते वस्तूला अम्ही ऊदी म्हणतों अणी तज महत्व वेगळच॑ अस्ते.
राखडी n a head ornament of women. राक्कडि. बायके डोस्केंत॑ खोवाच एक आभरण॑ ; राखडी in sm.
राखण n protecting. keeping safely. रक्षांत ठिवणे.
राखणे vt to secure. to protect. to keep a watch. जागृतांत॑ ठींगणे. uis वेगळ॑ गांवाला जाताना घर पाह्यींगाला कोणालतरीन राखणे ठिवलतर पणीं चोरी होत॑ अस्ते. राखणे असणारेंच चोर्टेंबरोर मिळींगून हे काम करिवतात॑ अस लोकांच मध्ये एक विश्वास आहे.
राखणे vt to preserve. दत्तन/जत्तन ठींगणे. uis (1) लोण्चे बेष राखिवाम॑म्हण्जे मध्ये-मध्ये जाडि/बरणी उघडून ढवळून देत असाम॑. (2) अमच मानमर्यादा राखिवाम॑ म्हणजे आवश्यनाहीस्क॑ वेगळ॑ लोकांच विषयांत॑ अम्ही मध्य पडताने.
राखणे vt to wait. थांबण॑. होठाकणे. ओठाकणे. uis मी याला अण्कीन थोड वेळ होईल. मझ करतां तुम्ही राखनाकांत॑.
राखिवणे vt to detain (a person or thing). दूसरेंला थांबिवून ठिवणे. थांबिवणे. uis तजकडे मला एक विचारामते आहे. पण, मला याला अण्कीन थोड वेळ होईल. मी यापर्यंतीन तुम्ही तला कयतरीन सूत्रांत॑ राखिवाला होईलका ?
राखी n an amulet tied on the wrists of brothers by sisters on Sravan Pournami day. श्रावण पौर्णमीला बहिण भाऊला बांधाच रक्षाच दोरा.
राग n anger. कोप.
राग n musical mode. संगीत स्वराच॑ एक रीत॑.
रागिणि n a passionate woman. तीव्र/गाढ अनुराग दाखिवणारि स्त्रि.
रागिवणे vt to get angry. राग येणे.
रागिष्ट adj a person prone to anger. सदाहीं राग करींगाच मनुष. रागीट.
रागी n a type of millet. एक रीतीच धान्य/धान.
रागीट adj a person prone to anger. रागिष्ट. सदाहीं राग करींगाच मनुष. Note :- the word रागीट is a प्राकृत form of रागिष्ट.
राजकवि n court poet. राजदरबाराच॑ कवि.
राजकीय॑ adj political. राष्ट्रीयाला संबंध झालते.
राजकीय॑ adj relating to the country. राज्याला संबंध झालते.
राजकुमार n prince. राजाच लोंक.
राजकुमारि n princess. राजाच लेंक.
राजगिरि n a type of edible greens. एक रीतीच भाजीच पाला.
राजगुरु n royal advisor. राजाला उपदेश देणार गुरु.
राजगोपुरम n the main gopuram of a temple. देऊळाच मुख्य गोपुर॑. Note :- from Tamil.
राजत्व॑ n king like majesty. majestic. राज गांभीर्य.
राजत्व॑ n kingship. राजपदवि.
राजदरबार n royal court. राजाच दरबार.
राजदर्शन॑ n paying obeisance to a king. राजाला दर्शन करून मर्यादा देणे.
राजदूत॑ n king's envoy. राजा पाठिवलते दूत॑.
राजदूत॑ n an ambassador. देशाच प्रतिनिधि.
राजद्रोह॑ n treason. स्वंत॑ राज्याला विरुद्ध कराच काम.
राजधर्म n kingly duties. राजाच कर्तव्य.
राजधानि n capital city. राज्याच भरण केंद्र असाच प्रधान पट्ण॑.
राजनीति n a country's basic civic policy. civil code. एक राज्याच मुख्य व्यवहार नीति.
राजपत्नि n king's consort. queen. राणि.
राजपथ n a royal highway. राजमार्ग.
राजपीठ॑ n royal seat. throne. सिंहासन॑.
राजपुट n name of a warrior race of Rajasthan. राजस्थानाच एक वंश॑. रजपुत.
राजपुट n a person belonging to the Rajput race. राजपुट वंशाच मनुष.
राजपुरोहित n royal priest. राजाकुटुंबाच॑ पुरोहित.
राजभवन n President's or Governor’s official residence. राष्ट्रपतीच अथवा राज्यपालाच सरकारि घर.
राजभाषा n officially recognised language. सरकाराच मान्यता असाच भाषा. राष्ट्रभाषा. राज्यभाषा.
राजमुद्रा n royal seal. royal insignia. राजाच चिन्ह.
राजयोग n a type of yoga. एक विधाच योग.
राजयोग fig the period in one's life when one enjoys power and material wealth. uis मझ मित्राला अत्ता राजयोग॑ चालत आहे वाटते. तज पदवी, राहच ढंग हे सर्व पाह्यलतर॑ कोणालीं असच वाटल॑.
राजलक्षण॑ n marks of royalty. राजत्वाच चिन्ह.
राजवाडा n royal palace. राजाच निवासस्थान.
राजवंश n royal dynasty. राजाच कुल॑.
राजश्री n majesty. राजाच वैभव.
राजसूय n name of a religious sacrifice. एक यज्ञाच नाव.
राजहंस॑ n a type of swan. एक रीतीच हंस॑.
राजा n king. राज्य भरण कराच राजा.
राजाधिराज n king of kings. emperor. चक्रवर्ति.
राजाज्ञा n royal edict. राजाच आज्ञा.
राजिनामा n resignation. त्यागपत्र देणे.
राजी adj consenting. willing. agreeing. ready. संमत. तय्यार. uis उदंड दपा बोलला नंतर मझ मित्र उपअध्यक्षाच पदवि स्वीकार कराला राजी झाले.
राजीव n lotus. कमळीच फूल॑.
राजोपचार n a welcome befitting a king/royalty. राज मर्यादा. एक राजाला मिळासार्खल॑ मोट्ठ॑ उपचार. uis 'ऐ.ये.स' आफीसर अणी त्यंच कुटुंबाला देऊळांत॑पणीं राजोपचार मिळते.
राज्य n country. देश.
राज्य n a state within a country. राज्याच आंतल॑ संस्थान.
राज्यपाल n Governor of a State. राज्याच अथवा प्रांताच प्रमुख॑.
राज्यभार n ruling or governing a country/state. राज्य चालिवणे. राज्य भरण करणे.
राज्यभाषा n officially recognised language. सरकाराच मान्यता असाच भाषा. राष्ट्रभाषा. राजभाषा.
राज्यमंत्रि n minister of state. राज्याच उपमंत्रि.
राज्यसभा n name of upper House in the Parliament. संसदांच एक सभाच नाव.
राज्यसरकार n state government. संस्थानाच सरकार.
राज्याभिषेक॑ n coronation. पट्टाभिषेक॑.
राड n thick residue (of a liquid). sediment. एक द्रव्याच बुडांत॑ राहाच घट्टि भाग. मंडि.
रातराणि n a kind of flower which blooms in the night. रात्रिच वेळ उगाच एक फूल. निशागंधि.
राण n forest. वन॑ ; रान in sm.
राणकोंबड॑ n jungle fowl. राणाच कोंबड॑.
राणडुक्र॑ n wild boar. राणाच डुक्र॑.
राणमांदर॑ n jungle cat. राणांतल॑ मांदर॑.
राणि n king's consort. queen. राजपत्नि.
राणोराण n endless forest thick forest. गडद राण. uis 'श्रीसैलम' जायाच वाटांत दहा-पंध्रा किलोमीटराला राणोराण आहे. रात्रीच वेळ ते वाटी संचार कराला लोके भींगतील.
राताळू n sweet potato. गुळचीट असाच एक रीतीच गड्डे ; रताळे in sm.
रातोंरात adv overnight. in the middle of the night. रात्रि असतानच॑.
रात्रि n night. सूर्य अस्तमन॑ पसून उदय॑ होयापर्यंतल॑ वेळ.
रात्रिभर adv the full night. पूरा रात्रि ; रात्रभर in sm.
रात्रींदिवसीं adv day in and day out. पूरा वेळीं ; रात्रंदिवस in sm.
रात्रोंरात्रि n within a night. overnight. (एक) रात्रीच आंत॑. दिवस उगापुढे रात्रीच वेळ. uis काय समस्या झालहोतकी कळत नाही, अम्च माडीवर भाडेला असलते लोके रात्रोंरात्रि खाली करींगून वेगळ गामाला निघून गेले.
राधा n Lord Krishna's beloved. श्रिक्रिष्णांच सखि.
राबणे vi to be seasoned. सौम्य करून बरोरल॑ रूच आणिवणे. uis अंबाचकी लिंबूचकी लोण्चे करताना मीठ, मिर्शंगाच पूड, मसाला, तेल वगैरा घाळून थोडक दिवस जाडींत बांधून ठिवून राबणे करलतर तज रूच बेष होईल.
राम n one of the incarnations of Lord Vishnu. महाविष्णूच एक अवतार.
रामतुळसि n a type of holy basil with darkish leaves. सावळ॑ पानाच एक रीतिच तुळसि.
रामदूत n envoy of Lord Ram. Hanuman. रामदेवाच दूत. हनुमान. हनुमंत॑.
रामनवमि n the ninth day of the bright fortnight of Chaitra celebrated as Lord Rama's birthday. चैत्रमास शुक्ळपक्ष नवमि दिवस. श्रीरामचंद्राच उजलादिवस.
रामफळ n a type of fruit. एक रीतीच फळ॑.
रामबाण॑ fig silver bullet. a sure shot remedy. एकाला कंडिप बरोर करिवाच एक प्रयोग॑.
रामराज्य n the perfect country. एक फार उत्तम राज्य.
रामा n parrot. रावा.
रामायण n the epic Ramayana written by Valmiki. वाल्मीकी लिव्हलते रामावताराच ग्रंथ.
रायअवळा n a type of gooseberry. अरेनेल्लिकाय (Tamil).
रायत॑ n salad-in-curds. दहींच एक तोळ्लावण॑. भरीत॑. पच्चडि. Note:- भरीत also means a preparation made from outwardly roasted/singed brinjal.
राव n Rao, a salutation which is used as a type of surname. एकांस आदरांतून बलावाच एक शब्द. अत्ता अग्गीन "राव" म्हणून अडनाव ठींगतात॑.
रावजी n a respectful way of addressing a male. Raoji. दाद्ग्येंला बहुमानांत॑ बलावाच एक शब्द. uis कोणकी दोघदन॑ घरच॑ समोरच॑ बीदींत येऊन "रावजी घरांत आहेतका, अम्ही तेना फार अवसरांत॑ पाह्मते आहे" अस वरडाच मी ऐकलों. समच मझ बाप दुपारीच झोंप मोडून उठले अणी आलते अतिथींना आंत बलावले.
रावण n name of the king of Lanka in Ramayana. रामायणांत॑ लंकापुरीच राजा. रावणासुर.
रावणराज्य n a tyrannical rule. क्रूरपणांत॑ राज्य चालिवणे.
रावसाहेब n an honour conferred on eminent people in olden times/British times. जुने काळांत॑/ब्रिटिषांच काळांत॑ प्रमुख लोकांला देत होतते एक बहुमानाच पदवी. uis अम्च देश स्वतंत्र झालांपिरि 'रावसाहेब' पदवि लोकांला द्याच केंद्र सरकार रद्द केलाहेत॑. तजबद्द्ल 'पद्मश्री, पद्मभूषन, पद्मविभूषन, भारत रत्न अस सम्मान योग्य असणारांना प्रतिवर्ष देत आहेत॑.
रावसाहेब n an hereditary honorific affixed to the names of men of certain aristocratic families. परंपरागतांतून कित्येक थोर कुटुंबाच दाद्ग्येंच नावाच शेवटि जोडाच एक मर्यादा पदवि. uis मझ आजा (म्हण्जे अम्माच बापा) त्यंच नावाच शेवटि 'रावसाहेब' म्हणून ठींगत होते. तेनी आरणि जागीर वंशाच होते.
रावा n parrot. रामा.
राशि n one of the twelve signs of the zodiac. राशिचक्रांतल॑ बारा राशींत॑ एक राशि.
राशिचक्र n the twelve zodiacal signs arranged in a cyclic order. बारा राशींच चक्र.
राशीच पोरे say fortunate or lucky children. भाग्यवंत॑ पोरे. Note :- adapted from Tamil. uis कित्येक लेंकरे राशीच असतात॑. उजतांतून "कार", बंगळा, नंतर चोखोट साळेंत-काळेजांत वाचणे, थोर ठिकाणी चोखोट संबंध होऊन लोक्कर वराड, लेंकरे अस त्यांस॑ होत अस्ते. हे सर्वीन पाह्यलतर॑ त्यंच पूर्व जन्मांत पुण्य केलताच फल असाम॑ म्हणून वाटते.
राष्ट्र n country. nation. राज्य. देश.
राष्ट्रगीत n national anthem. देशाविषयीं अभिमान मनांत॑ आणिवाला सांगाच स्तुतीच गीत॑.
राष्ट्रतंत्र n diplomacy. राष्ट्रतंत्र.
राष्ट्रद्रोह n treason. राष्ट्राविरुद्ध वागणे.
राष्ट्रद्रोही adj a person who indulges in treason. राष्ट्रद्रोह करणार मनुष.
राष्ट्रध्वज॑ n national flag. देशाच॑ ध्वज॑. देशाच गुढि. देशाच कोडि (Tamil).
राष्ट्रपति n President of a country. राष्ट्राच अध्यक्ष.
राष्ट्रभाषा n officially recognised language. सरकाराच मान्यता असाच भाषा. राजभाषा.
राष्ट्रवाद n politics. राष्ट्रवाद.
राष्ट्रीय adj national. देशाला संबंध झालते.
राष्ट्रीय adj political. राष्ट्रवादाला संबंध झालते.
राहणे vi to stay in a place. एक ठिकाणि राहणे. uis अम्ही चेन्नैंत॑ जाताना अस्कीन मझ वडील भाऊच घरांतच राहणे.
राहणे vi to wait. थांबणे. uis मी याला अण्कीन थोड वेळ होईल. तुम्ही मलाकरतां राहणे नको.
राहणे vi to halt. ओठाकणे. होठाकणे. uis सिग्नल मिळ्ल॑ नाही म्हणून अम्च ट्रैन उदंड वेळ स्टेषनाच बाहेरच राहल॑ होत॑.
राहणे vi to remain. to maintain statusquo. to continue in a state. राहणे. uis अत्ता असाच परिस्थितींत॑ तो कोणाच गोष्टीन ऐकाला तय्यार असना. ते विषय तसच राहून्दे. नंतर मी तजकडे बोलून तला समजिवतों.
राहणे vi to discontinue. राहणे. uis त्यंच लोंक फार षाणा झाल तरीन, पैसेच कष्टांमुळे तज वाचणे एस.एस.एल.सी. झालकिनाही राहत॑ करूनटाकले.
राहु n name of a mythical demon. पुराणांतल॑ एक दैत्य.
राहुकाळ n a specified period of one and a half hours, each day, during which it is inauspicious to commence any activity. प्रत्येक दिवसाचीं दीड घंटेच अशुभ काळ. हे समयांत काहीं कार्य आरंभ करताने म्हणोन आहे. uis एक मुख्य कार्य कराच पुढ॑ राहुकाळकी, यमगंडकी असनास्क पाह्यींगण॑ बर॑. Note :- this period changes from day to day.
राहून जाणे id the apparent indications of a person slowing down in his movements due to age or ailments. वय अथवा आंगाच॑ दुर्बलामळे चालणे-वागणेच हळ्ळुपण॑ येणे. uis अम्च एक सोयरीक बायकोला दोन वर्षा नंतर॑ समीपांत पाह्यलों. त्यंच वय 80 वर्ष असेल॑. उदंड राहून गेलाहेत॑.
राक्षस n demon. असुर.
राक्षसविवाह n forced marriage. निर्बंधांत॑ करिवाच॑ वराड.
राक्षसि n female demon. असुर स्त्रि.
रांके n arrogance. गर्व. uis हेमधे पैसे आलते लोकांना/नव फल्लमदारांना रांके असत॑.
रांगणे vt to crawl. रांगणे. uis ल्हान लेंकरे लोक्कर-लोक्कर रांगत याच दृश्य पाह्याला फार चांग्ळ॑ अस्ते.
रांगणे vt to creep. रांगणे. uis नैजीरिया देशांत बंडि हांकताना बिदीच नियम तोडलतर पोलीसवाले कित्येर्क लोकाना 20 गज रांगाला सांगतील, तस अनुभव झाला नंतर॑ कोण्हीं पुन्हा तसल चूक करनात॑.
रांगणे fig to move very slowly. उदंड॑ हळ्लु पुढे सरकणे. uis हे रैल्वे-ट्रैन अत्ताच दोन घंटे उशीरांत॑ पळत आहे. हैदराबाद पावतां-पावतां रांगाला आरंभ केलाहे !
रांगोळि n a decorative/symmetric design drawn in front of a house as also in front of a puja mantap/puja room with white marble/stone powder to signify 'all is well inside'. घराच उंब्राच समोर रंगाच पुडींत॑ होढाच/ओढाच चित्र. uis दक्षिण भारतांत प्रति घराच उंब्रा समोर नित्य शेण लावूनकी नुस्त पाणींतूनकी सारीवून रांगोळी घालाच एक पद्धति आहे. तज अर्थ काय म्हण्जे ते घरांत सर्व क्षेमान॑ आहेत॑, अस॑.
रांडे n a woman of ill repute. prostitute. वेश्या. सूळी ; रांड in sm.
रांदल n a glass covered lantern (usually the ones hung from ceilings). लांदर. अर्सांत॑ झांकून असाच एक दिवा (छप्परांतून लोंबून घालाच॑). Note :- from "lantern" to "लांदर" to "रांदल".
रांदल n a portable hurricane lantern. लांदर. विजनास्क॑ असाला अर्सांत॑ झांकलते बत्तीच दिवा (उचलून काढींगून जायाला सौकर्य असाच॑). Note :- from "lantern" to "लांदर" to "रांदल".
रिकाम adj unemployed. without any work on hand. कामधाम नाहीस्क॑ असणे ; रिकामा/रिकामी in sm. uis तला अत्ता एक कामीं नाही. नुस्त रिकामच॑.
रिकाम adj empty (house etc). खाली (घर वगैरा) ; रिकामा/रिकामी in sm. uis तीन महिने पसून अम्च॑ व॑रच॑ फ़्ळाट रिकाम होत॑. नंतर॑ नो-ब्रोकर.कॉम वाटे कोणकी भाडेला आले.
रिकाम adj vacant (incumbency). खाली (ऑफीसांतल॑ स्थान वगैरा) ; रिकामा/रिकामी in sm. uis बंगळूर विश्वविद्यालयाच॑ उपकुलपतीच स्थान एक वर्ष रिकाम होत॑, नंतर॑ अत-अता नव॑ सरकाराच सत्यप्रतिज्ञा झाल॑व॑र कोणालकी नियुक्त केले.
रिकाम adj fruitless. resultless. व्यर्थ ; रिकामा/रिकामी in sm. uis गेल॑ ओलिंपिक खेलांत हॉकी मत्सरांत॑ चोखोट प्रदर्शन॑ दाखिवांव॑ म्हणून भारताच हॉकी संघ पूरा दोन वर्ष तय्यार करत॑ होते. पण खेळ संपताना बारा संघांत॑ भारत बारावां स्थानांत॑ आले. तयाराच श्रम पूरा रिकाम झाल॑.
रिकामपण॑ n unengaged state. स्वस्थ बसाच स्थिती. uis रिकामपण॑ अम्च मनालीं आरोग्यालीं चोखोट नहो. इंग्ळीषांत॑ "अन ऐडल मैन्ड ईस ए डेविल्स वर्कषॉप" म्हणून सांगाच फार खर॑ आहे.
रिकाम बसणे vi to sit idle. to be unemployed. to be without any work on hand. कामधाम नाहीस्क॑ असणे ; uis तला अत्ता एक कामीं नाही. नुस्त रिकाम बसलाहे.
रिचिवणे vt to pour forth in a rush or copiously. जोर होऊन ओतणे.
रिचिवणे vi to have a heavy down pour. मोट्ठे पाऊस/पौस होणे.
रिद्धिसिद्धि n prosperity and success. सुखसंपत्ति. uis अम्ही पह्यिलंदा बाहेरच गामाला नव॑ उद्योगाव॑र जाताना मझ आजा-आजी दोघीं वांचून होते अणी "तुम्हाला देव रिद्धिसिद्धि देवून आरोग्यान ठिवून्दे" अस आशीर्वाद केले.
रिपू n enemy. शत्रु. वैरी.
रिवाज n laid down procedure. custom. पद्धति. रीति. uis अम्च हिंदु धर्माच रिवाज काय म्हण्जे थोरळे कोणतरींन घराला आलतर पोर॑-पोरी त्यंच पांय शिवून नमस्कार करणे. पण, अत्तलीकडे फोरनांत उजलते लेंकरांना हे त्यंच माय-बाप शिकिवून देत नाहीत॑. तजमळे बाहेरल॑ गामांतल पोर॑-पोरी थोरलांना पाव्हून नुस्त "है" म्हणतात॑.
रिक्षा n a hand pulled passenger cart. हातावाटे होढाच/ओढाच सवारीच एक ल्हान बंडि.
रिक्षा n a cycle rickshaw. सैकिळ-रिक्षा.
रिक्षा n an auto-rickshaw. आटो-रिक्षा.
रीण n debt. loan. ऋण. कर्ज. उधार ; रीन in sm.
रीणकोर n a habitual or perpetual debtor. ऋणकोर. रीणांत॑ बुडून असणार. uis अम्च येवाजोक्त/वरुमाना प्रकार खर्च अठोपलतर॑ अम्ही रीणकोर होईनास्क असुया. एकदा रीण घ्याच दंडक झालतर॑ तजांतून सुठींगून येणे कष्ट होईल॑.
रीणदार n a creditor. ऋणदार. रीण देलता. uis रीणदारांकडे 36-48 % व्याजाला/बड्डीला पैसे घेटलतर॑ हे जन्मांत॑ ते राण वाराला साध्य नाही. तजमळे उदंडदन आत्महत्या करींगतात॑. आंध्राप्रदेश सरकार असल॑ "मैक्रोफ़ैनान्स कंपनीवालेंच" व्याजा वर परिधी/लिमिट घाट्लाहेत॑.
रीण-पाणी n the state of utter poverty. ऋण-पाणी. फार दरिद्रपणाच अवस्था.
रीत॑ n type. प्रकार. रीति. मादरि. विध॑.
रीति n type. प्रकार. रीत॑. मादरि. विध॑.
रुई n cleaned and deseeded cotton. carded cotton. बीं काढून शुद्ध केलते कापूस. uis देवाच दिवाला हाता वाटि शुद्ध केलते रुईच वात उपयोग करतात॑.
रुई n a plant belonging to the sollow-wort or milk-weed family of plants, the leaves of which are used in the ritual bath taken on Rathasaptami day. रुईच झाड. अर्क. अर्काच झाड (हे झाडाच पान रथसप्तमीच दिवस कराच सणाच स्नानाला येते) ; रुई/रुइटी in sm. uis हिंदु संप्रदयांत रुई एक विशेष झाड म्हणून आहे. रथसप्तमीच दिवस आंघोळि करताना हेज पान आंगावर ठींगून स्नान करणे आहे. तसच रुई झाडाच काठीच मध्यभागांतल॑ पंढ्र रंगाच "पित्तांतून" केलते देवाच विग्रह फार विशेष म्हणतात॑.
रुचणे vi to prick. to pierce. सूई, कांटा असल॑ काहीतरीं लागून घाव होणे ; रुतणे/रोचणे in sm ; Note:- रुचणे in sm means ' to like', अवडणे.
रुचि n taste. स्वाद. रूच॑.
रुचि n tasty flavour. चोखोट स्वाद. रूच॑.
रुजू n agreement. concurrence. संमत॑. सम्मत॑. uis ते पोराच माय-बाप तज रुजू नाहीस्क हदार रुपे व॑र असाच कोण्त सामानहीं घेनाते. कारण, त्यंच खर्च-वेच संपूर्ण म्हणून लोंकच पाह्यींगतो.
रुद्र n Lord Shiva. महादेव.
रुद्र n adj dreadful. terrible. भयंकर.
रुद्रवीणा n a type of veena. एक रीतीच वीणा.
रुद्राक्ष n seed of rudraksha tree. रुद्राक्ष झाडाच बीं. Note:- sacred to Lord Siva.
रुपे n money. cash. पैसा.
रुपे n silver. चांदि.
रुब्बणे vt to grind to a paste using a grinding stone. to wet grind. उखळांत॑ पदार्थाला रुब्बणे.
रुब्बु गुंडु n a grinding stone with a small central depression and a grinding stone sitting inside snugly. संपाकाच पदार्थ रुब्बाला घट्टी धोंडांत॑ केलते एक साधन॑. Note :- from Kannada.
रुमाल n handkerchief. हात, तोंड शुद्ध कराला प्रयोग कराच एक ल्हान कापड/चौक. uis पडसा असाच एकले उपयोग केलते रुमाल दूसरे उपयोग केलतर॑, पडसा त्यांसीं कंडिप येईल.
रुमाली रोटि n a thinly spread large roti made of maida. मैदांत केलते एक पत्तळ रोटि. uis उत्तर भारतीय संपाकांत॑ रुमाली रोटीईं तज बरोर दाळ-मक्खनीं फार प्रसिद्ध आहे.
रुसणे vi to sulk. to take offence. शिडकींगणे.
रुसींगणे vt to sulk. to take offence. शिडिकींगून बसणे. uis विचाराच॑ वस्तु मिळ्ना तर॑ मझ नातू कोणाकडीन बोलनास्क॑ रुसींगून दूर बसून जाईल॑.
रुंद n width. अडव॑ लांब ; रुंदी in sm.
रूच n taste. स्वाद. रुचि.
रूच n tasty flavour. रूचाच वास. रुचि.
रूढि n regular practice or observance. भरून दिवसा पसून असाच दंडक.
रूप n form. shape. आकृति.
रूप n countenance. बाहेर दिसाच लक्षण॑.
रेखा n drawn line. होडलते/ओढलते लैन.
रेखा n limit. सीमा. परिधि.
रेवति n name of a star. एक नक्षत्राच नाव.
रेशमा n silk. रेशमीच कीडांतून मिळाच दोरा.
रेशमी adj silken. रेशमाच॑.
रेशमीकीडा n silkworm. रेशमाच कीडा.
रेस n a type thin liquid preparation for consuming with cooked rice. एक रीतीच कालिवण॑.
रेस n juice. रस.
रेंटून बोलणे n sing-song manner of speaking. रागांत॑ बोलणे. रेंटणे
रेंटून बोलणे fig to talk sweetly so as to sound goody-goody. लाडी-गोडींत॑ बोलणे. uis त्यंच काम मात्र बेष करींगाला कित्येक लोक रेंटून बोलतील. एक पैसाच/कासाच उपकार कराच उद्देश त्यांस॑ असना.
रोकडा n cash in currency notes. रोक्कम. नगद. uis अत्तलीकडे काहींतरीं प्ळोट नाहीतर॑ फ्लाट घेम म्हण्जे अर्ध पैसे रोकडा देमस्क पडते. कोणीं पूर्त 'चेक' घेत नाहीते.
रोक्कम n an amount. a specified sum of money. ready money. cash on the spot. रक्कम. रोकडा. नगद ; रोख in sm. Note :- from Tamil.
रोग n disease. आंगाला याच असुख.
रोगरागी n diseases and ailments. रोगरागी ; रोगराई in sm.
रोगलक्षण॑ n symptoms of an illness. रोगाच लक्षण॑.
रोगिष्ट adj sickly. केम्हीन रोग याच अवस्था.
रोगि n patient. रोगच पीडांत॑ असणार.
रोजा n rose flower. रोजाच फूल. गुलाब.
रोटि n a type of chapati. एक रीतीच चपाति.
रोटि n bread. ब्रेड.
रोडक॑ adj lean. thin. emaciated. क्षीण झालते.
रोडका adj lean. thin or emaciated man. रोडे झालते/असाच मनुष.
रोडे n lean. thin. emaciated. आंग बरीक होणे. क्षीण ; रोड in sm.
रोडे होणे vi to become emaciated. आंग उतरणे ; रोडावणे in sm.
रोप n a sapling. बींतून वाढाला आरंभ केलते एक नव झाड. uis घरा समोर मी एक नारळीच रोप लावून दोन-तीन वर्षांत॑ ते नारळ॑ सोडाला आरंभ केल॑.
रोम n hair. केंस.
रोमांच n thrilling feeling causing hair in the skin to rise. उदंड॑ संतोष अथवा आह्ळादामुळे आंगांतल॑ केंस उठून ओठाकणे/होठाकणे. झुंशि होणे.
रोवणे vt to plant (a sapling or plant). (रोप अथवा झाड) लावणे ; रोपणे/रोवणे in sm. uis तीन चार महीना पुढे अम्ही एक अंबाच कोट्टा/गोट्टि घरांत असलते/होतते 'तोट्टींत' रोवून ते एक ल्हान रोप झाल॑. ते वाळूनजायाच पुढे बाह्येर मातींत रोवाम॑ म्हणून मनांत॑ अठींगट्लों तरीन, वेगळ॑ कामाच अवसरांत॑ मी ते विषय विसरूनच गेलों.
रोवणें vt to plant or place firmly. घट्टि लावणे. घट्टि ठिवणे. uis घरच॑ मागे पटीस पाणी पडून पडून शेवाळा धरून आहेतेकरतां ते वाटे चालून जाताना पांये बरोर रोवून ठिवनास्क चाल्लतर॑ निसरून पडूया.
रोवणे vt to penetrate. to pierce. to prick. टोंचणे. रुचणे. uis चपली घालनास्क बागांत चालून जाताना मझ तळपांयेंत कांटा रोवून अत्ता ते घाव पिकाला आरंभ झालाहे.
रोष n self opinion. self esteem. स्वाभिमान. uis घरचांकडून एवढे अवमान झालांपिरि रोष असणार कोणीं पुन्हा ते घरच॑ लोकां बरोर वागे ठींगनात॑. Note:- रोष in sm means 'anger, wrath'.
रोहिणि n name of a star. एक नक्षत्राच नाव.
No comments:
Post a Comment