ख
ख the second consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच अक्षरमालाच दुसर व्यंजन.
खचणे vi to wear out. खजणे. झिजणे. uis उदंड वर्षापुढे बांधलते नदीच कांठांतल॑ खजलते पडतोरे तुडिवलतर निसराच स्थितींत आहे.
खजणे vi to wear out. खचणे. झिजणे.
खजानजि n treasurer. खजानाच जवाबदारिच मनुष.
खजाना n treasury. धनाच भंडार ; खजिना in sm. uis भारतांत कोण्त राज्यांतीन एक नव सरकार येताना जुन॑ सरकार खजाना खाली करून ठिवलाहेत म्हणून सांगणे सहजेच.
खडसाखरे n lump sugar. खडेरूपाच घट्टि साखरे. खडेसाखरे ; खडीसाखर in sm.
खडा n gem. खडे. रत्न. uis तो नौ खडाच मुदी घालींगटलसाच मी पाह्यलों.
खडा n pebble. एक ल्हान धोंडा. खडे.
खडा n a small lump or bit of. थोडच थोड. खडे. uis नरसिंह जयंती दिवसी मठांत वाढलते मंडिसांभारभाताला एक खडा मीठ उणे होत॑.
खडी n squirrel. कडी ; खार in sm. uis सेतू बंधनाच वेळी सहाय केल॑ म्हणून श्रीरामा खडीला थापडून देलत्यामळे तज पाठींत तीन रेखा आल॑ म्हणून रामायणांत एक उप-कथा आहे.
खडे n gem. खडा. रत्न.
खडे n pebble. एक ल्हान धोंडा. खडा.
खडे n a small lump or bit of. थोडच थोड. खडा.
खडेसाखरे n lump sugar. खडेरूपाच घट्टि साखरे. खडसाखरे ; खडीसाखर in sm. uis खडेसाखर खालतर गळांत सांपडींगेल म्हणून ल्हान लेंकरांना ते खायाला मझ बाईल सोडना.
खड्ग n dagger. उणे लांबाच तलवार.
खड्डा n a hole or depression. a pit. गार. बधकळ.
खता-लागणे vi to rust. लोहेंच/लोखंडाच वर्च भागाला वार॑ पाणी लागून होयाच हानी ; गंजणे in sm. uis समुद्राच कांठशी असाच बिलडिंगांत/बांधणींत खिड्कीच कांब, घरांतल लोखंडाच/लोकुंडाच सामान पूर्त लोक्कर/लोक्कुर खता लागून नासते.
खनि n mine. विध-विध प्रकारच धातू भूमींतून खांडून काढाच ठिकाण. uis भारताच एकच-एक सोनेच खनि कर्णाटकांतल॑ रायचूरच॑ जवळच हट्टींत आहे.
खपली n thick dried skin over a wound. खापर. वाळलते घावाच व॑र झालते जाड चर्म/काताड. uis उदंड दिवसाच नंतर वाळून येत होतते घावाच खपली उकरून पुन्हाहीं व्रण करींगट्लाहे.
खम्मग adj pleasant smell or flavour. चोखोट वास,नाही स्वाद. घम्मग ; खमंग/घमघमाट in sm. uis (1) वेळा घालून कराचमळे घरांत खीर करताना खम्मग वास येईल . (2) उन्हाळाच काळांत रात्रीच वेळ मझ खोलीच खिडकी वाटी येयाच मोगराच फूलाच खम्मग वास मला उदंड अवडेल.
खरकट n food left in the main dish after eating a portion of it from another dish. भांडींत उरलते उष्ट करनाते पदार्थ. uis हे काळाच भरून पोरींना खरकटाचीन उष्टेचीन व्यत्यास कळना.
खरकटी adj vessels used for cooking to be washed. संपाक केलांपिरी धुवामते भांडि.
खरजूर n dates. मरुभूमींत वाढाच एक झाडाच फळ ; खजूर in sm. uis वाळलते खजूर पाह्यलतर झुरळेस्क आहे म्हणून मझ भाचा ते खायिनाच खायिना.
खरबूज़ n musk melon. एक रीतीच फळ. दरबूज़. uis उन्हाळाच दिवसी खरबूज़ाच पानक पीलतर आंगाला हिंस वाटेल.
खरड n residue sticking on the inside bottom of a vessel immediately after cooking. चूलांतून उतरीवलते भांडीच बुडांत चिकटून असाच पदार्थाच राड. संपाकाच भांडींत बूड बसलते पदार्थ. कषंडी. uis मला तूपाच खरड, भांडींतल॑ भाजीच/उप्पीटाच खरड हे तेवढीन खायाला उदंड अवडेल.
खरडणे vt to scrape. चिकटलते उकरून काढणे. uis लोणी ताऊन तूप केलते तेलतवांतून खरडून काढाच पदार्थाला अम्ही "कषंडी" म्हणतों. ते सार भाताच बरोर कालिवून जेवलतर प्रमाद रूच अस्त॑.
खर॑ adj real. actual. true. वास्तव. सत्य. निज॑ ; खरा in sm. uis हॉळिवूड नटी मेरिलिन मण्रोच खर॑ नाव नोर्मा जीन मोर्टनसन म्हणून होत॑.
खर्च n expenditure. पैसाच वेच. uis साळे उघडाच समय लेंकरांच पुस्तक घ्यालीन नव कापड शिवालीन खर्च जास्ति होईल म्हणून मी तला म्हणून प्रति वर्ष बारा महिनेच एक "रेकरिंग डेपोसिट अक्कौन्ट" बॅन्कांत उघडणे आहे.
खर्च adv expend. use up. वापरून/उपयोग करून उणे होणे. uis "मंडिसांभारभात जास्ति कर नको म्हणून तुला मी तम्हाच सांगटलों. पाह, एवढ॑दनाच जेवण झालांपिरी पणीन केलत्यांत अर्ध खर्च होयनास्क उरलाहे".
खर्चवेच n expenditure in general. unspecified expenditure. अमुक कार्याला म्हणून सांगाला होईनाते वेच. uis बाह्येरच गामाला जाताना खर्चवेचाला म्हणून प्रत्येक होऊन पैसे हातराखणेला ठींगणे चोखोट/चोखट.
खळबळणे vt to rinse after washing clothes, vessels etc. कापड धुवला/धूला नंतr पाणींt बुचकळून बुचकळून शुद्ध करणे. uis कित्ति सांगिट्ल तरीन अम्च कामवाली कापड बरोर धुवत/धूत न्होती. अर्धगछ खळबळून घालणामळे सोपाच वास कापडांत केम्हाहीं येत होत॑. सांगून-सांगून पुरे झाल॑. नंतर वेगळ॑ गेत नाहीस्क अम्ही एक वाषिंग-मषीन घेटलों.
खलास adj finished. spent up. समाप्त होणे. संपणे. वारणे.
खवणे vi to have allergic irritation/itching of the tongue/throat/skin etc due to contact with certain vegetables/leaves/cactus etc. कित्येक सूरण/पेरंडे/कवीठ हेजामळे कंड होणे ; खवखवणे in sm. uis कित्येक सूरण/पेरंडे/खवीठ खालतर तोंड/घसा खवणे होईल. ते एक विधाच अलर्जी म्हणूया.
खस n a type of grass whose fragrant roots are used for making screens to ward off summer heat. एक वर्गाच गौत/गवत. हेज मूळांतून कराच पर्दा उन्हाळांत ऊन सांभाळाला उपयोग होत॑.
खसखसा n poppy seeds used in cooking. संपाकाला उपयोग कराच एक बीं ; खसखस in sm. uis खसखसाच खीर पीलतर मला घसाच कंड होईल.
खसतट्टि n screen made from khas roots. खसाच मूळांतून केलते तट्टि/पर्दा. uis मी गुलबर्गांत बॅकाच मॅनेजर म्हणून अस्ताना, ऊन्हाळाच चार महिनेहीं ऑफीसाच सगळ॑ खिड्कींतीन खस-तट्टी बांधून पाणी बडिवाच एर्पाड करूनटाकलों. हेजमळे ऊन सांभाळणे मात्र नहो, दिवस पूरा काम करणार क्ळार्क /काष्यर असलते लोके ऑफीसांतच बस्तील अणी तजमळे काम पणीन थोडक जास्ति होत होत॑ !
खंजिरा n a small percussion musical accompaniment. संगीताच कार्यक्रमांत उपयोग कराच एक ल्हान वाद्य ; खंजिरी in sm.
खंड n itch. कंड. खाज. uis दोन दिवसांतसून मला घसाच खंड होतहोत॑. नंतर, मीठाच पाणी गुळुगुळु/खुळखुळ केलांपिरी थोडक उणे झाल.
खंड n section or division. भाग. विभाग. कांड.
खंड n continent. भूखंड.
खंडना n refutation. rebuttal. तर्क करून विरोध करणे ; खंडन in sm.
खंडाद्रि n a medicinal paste made for administering to a recently delivered mothers. बाळंतीणांला खायाला द्याच जीर्णाच लेह्य. uis बाळंतीणाला खंडाद्रि देलतर तिला जीर्ण शक्ति वाढते अणी वायूच उपद्रव उणे होते. ल्हान लेंक्रांलापणीं खंडाद्री देणे आहे.
खंत-भोगणे vt to regret. to feel remorse. मनांत संकट/दुख वाटणे. मनांत वाईट वाटणे.
खंत n regret. remorse. मनांतल॑ संकट. दुख.
खाकि n brownish yellow or brownish green colour. काक्कि. पिवळ॑ रंगाच बरोरकी हिरव॑ रंगाच बरोरकी ब्रौण रंग मिळिवलते एक प्रकारच रंग. uis पोलीस अथवा सैन्यांच लोकांच यूणिफोम खाकि रंगाच कापडेंत अस्त.
खाज n itch. कंड. खंड. uis कंबळीपूचीच रोम अम्च आंगाला लागलतर उदंड वेळ खाज होत असेल.
खाजणे vi to itch. कंड होणे. खंड होणे. uis कंबळिपूचीला शिवून झालते खाजणे सोसाला होयनास्क ते लेंकरू रडाला आरंभ केला.
खाजिवणे vt to scratch. खाजिवणे ; खाजविणे/खाजवणे in sm.
खाडा n herbal decoction. कषाय. काढा. uis आयुर्वेदाच ओखदाच/औषधाच खाडा कित्येकदपा कडू असल तरीन तला एक मादरी चोखोट/चोखट वास अस्त.
खाणे vt to eat. जेवण करणे. जेवणे.
खाणे met to embezzle. एमारिवून पैसा करणे. पैसा खाणे. पैसा गिळणे. पैसा हडप करणे. uis "सरकाराच पैसेचकी, खावून गेलतर जाऊनदे" अस कित्येक लोक म्हणींगतात. असेच सोडूनटाकलतर खजाना खाली होईल अणी अम्च कर/टॅक्स अग्गीन वाढेत जाईल म्हणून तेनाला अर्थ होत नाही.
खाणे-पीणे n items for eating and drinking. खायाचीं पीयाचीं पदार्थ. uis सुमीच वेळ अम्ही रामेश्वरमांत होतों. दोन दिवस खाणे-पीणे काहीं मिळनास्क कष्टि भोगलों.
खाणे-पीणे करणे adv to eat and drink. to consume food items. खायाच पदार्थ खाणे. uis "तुम्ही खाणे-पीणे करींगून येया पर्यंतीन मी इकडेच अस्तों. पण, लोक्कुर यांत".
खाणी n story. कथा ; कहाणी in sm. uis "गॉण वित द विंन्ड" हे सिनिमा तेच नावाच पुस्तकांत सांगटलते खाणींतून नंखर पणीन सरकनस्क काढलतेकरतां पुस्तक वाचलतेयांस/वाचलत्यांस सिनिमांतल एक-एक दृश्यहीं पुस्तकांत लिवलत्यास्कच वाटेल.
खाणी-बडिवणे fig to bluff. लबाड सांगणे. uis तो मनुषाला थोडपणीं विसंबाला नाही. शुद्ध खाणी बडिवतो.
खाद n sumptuous food. तृप्त जेवण.
खादी n cotton cloth made in handloom. हॅन्ड्लूमांत/हातमागांत केलते कापूसाच/रूईच कापड. uis महात्मा गांधि सत्याग्रहाच कार्यक्रमांत/आंधोळनांत विदेशांत केलते कापडाच बदिल खादीच कापड उपयोग कराला भारतवसींला प्रेरणा केले. Note. हातमाग is handloom in Marathi.
खापर n slate tiles. tiles. घराच छप्पर घालाच एक साधन/वस्तू. कवल. Note. J.T. Molesworth's A Dictionary of Marathi & English (1857) gives the meaning of खापर as 'tile'
खापर n thick dried skin over a healed wound. खपली. वाळलते घावाच व॑र झालते जाड चर्म/काताड ; खपली in sm. uis उदंड दिवसाच नंतर वाळून येत होतते घावाच खापर उकरून पुन्हाहीं व्रण करींगट्लाहे.
खामी n deficiency. damaged. उणे पडणे uis (1) अम्च पोरीला काय खामी आहे म्हणून तेनी संबंध ओपिंगाला सम्मत केल नाहीत ? (2) मझ काकाला डोळेच खामी आहे. तजमळे तेनी रात्रीच वेळ कोठीन जात नाहीत.
खार n salt. मीठ. लवण. uis खारा-लस्सी म्हणजे मीठ घाट्लते लस्सी म्हणून अर्थ. पण, मीठाच बूंदी अणी मीठाच सेवाला अम्ही साधरण होऊन कारा-बूंदी, कारा-सेव म्हणून सांगतों. मला विचारलतर खारा-बूंदी, खारा-सेव म्हणून सांगाम/सांगांव.
खारट adj having excess salt. मीठाच स्वाद जास्ति असणे. uis आज अम्च घरच कालवण खारट आहे. संपाकीण चूकांत दोन दपा मीठ घालूनटाकली की कायकी !
खारा adj saltish. savoury. मीठाच स्वाद. uis मला सादा लस्सीच पक्षा खारा-लस्सी अवडेल.
खाराबूंदि n a fried savoury made of channa flour. काराबूंदि. चणाच पीठांत केलते एक मीठस्वादाच तळलते पदार्थ. काराबूंदि. uis खाराबूंदींत जास्ती भोंचणे/भोंईंचणे घाटलतर तज रूच वेगळ॑ होऊनजात॑.
खाराभात n a saltish snack made of rice or rava. काराभात. भातांत अथवा रवांत केलते एक मीठस्वादाच पदार्थ. काराभात. uis कित्येक होटलांत मिळाच खराभातालीं उप्पीटालीं एकच स्वाद अस्त॑.
खारालस्सि n saltish buttermilk. कारालस्सि. ताकांत केलते पीयाच एक मीठस्वादाच पानीय.
खारासेव n a fried savoury made of channa flour. कारासेव. चणाच पीठांत केलते एक मीठस्वादाच तळलते पदार्थ. कारासेव. uis खारासेवांतल॑ मिरेच स्वाद मला फार अवडेल.
खालपट adj slopping (land). उतार (जमीन/भोई). एक पटीस खाले उतरून असाच (जमीन). uis अम्च बिल्डिंग/बांधणी अम्च "एरियांतच" खालपट असाच ठिकाणंत आहे. तजमळे थोर पाऊस/पौस आलतर पाऊसाच/पौसाच तेवढे पाणीईं अम्च घरापटीस एक नदीस्क येत अस्त. चोखोट/चोखट वेळ एक थोर मोरी असामळे पाणी पूरा तजांतसून बेष बडींगून जात॑.
खाली adj empty. vacant. काहीं नाहीते ठाम, अवस्था अस॑. uis डब्बांतल॑ लाडू पूरा तो खाला. अत्ता ते डब्बा खाली आहे.
खाली बसणे fig to be unemployed. to be idle. काम नाहीस्क/करनास्क उगे असणे. स्वस्थ बसणे. रिकाम बसणे. uis होतते चोखोट काम सोडूनटाकून अत्ता तो खाली बसलाहे.
खाले adv below. down. under. खाले ; खालीं/खाली in sm. uis ट्रेनांत जाताना मझ नातू केम्हाहीं वरच॑ बेर्तांतच निजल॑. खाले असाच बेर्तांत निजना.
खालेव॑र adv topsy-turvy. upside down. उळटा ; खालवर in sm. Note. व॑र-खाले पाह्यणे (fig) means "to be perplexed".
खालून adj from below. खालेसून. खाले असून. uis "प्रति वेळीन पायरी/पडतोरे उतरून खाले येयाला होयना म्हणून मला कायतरीन पह्जेतम्हा ते सामान खालून वर भिरकावून दे" अस मी मझ बाईलीला सांगणे आहे.
खावून-जाणे vi to (physically) waste away. to go down in health. to get emaciated. आंगाला बर॑ नाहीस्क होऊन रोडे होणे. आंगाला क्षीण येणे. uis तज आंग खावून गेलास्क आहे. रोग कंट्रोलांत/नियंत्रणांत ठिवला नाही वाटते.
खांक n arm pit. कांख. कक्ष. हात आंगाला मिळाच स्थळ ; काख in sm. uis थोरळे बायका "स्लीवलेस" चोळी नेसींगून खांक दाखिवणे त्यंच वयेला अवमर्यादा केलास्क अस्त.
खांडणे vt & vi to dig (on a surface/ground). एक स्थलांत कुंड काढणे. खोदणे. uis शंभर फूट खांडूनपणीं पाणी आल नाही म्हणून आड खांडणे राहते कराला सांगटलों.
खांडणे vt & vi to hew. फाडणे. uis करनाटकाच बेळ्ळारी जिल्लांत थोड्क पणीन नियंत्रण नाहीस्क लोकुंडाच/लोखंडाच खनीच कामामळे पूरा जिल्ला खांडून सत्यनाश झालाहे.
खांदा n shoulder. गळाच खालच भाग.
खांब n a pillar. a post. स्थंभ. uis प्रहळादाच व॑र झालते रागांत हिरण्यकशिपू तज राजवाडांतल॑ एक खांबाला गदांतसून जोर होऊन बडिवून फाडताना तजांतसून नरसिंहदेव घोर रूपांत प्रत्यक्ष झाले.
खिडकि n window. भिंतींत वांरे-उजाड येयाला कराच एक व्यवस्था. Note. (1) उजाड in DM means ’light' whereas it is उजेड in sm. (2) उजाड in sm means desolate, barren, uninhabited.
खिळा n nail. आणि (Tamil). uis भिंतींत खिळा बडिवताना चुकून सुत्तील/हात्तोडी मझ बोटाला नीट बडींगट्लों !
खिळी n bolt. latch. कोंडि. तापा (Tamil). uis रात्रीच वेळ अम्च बाजू्च/शेजारच/शेदारच घरच खिडकीच खिळा कसकी उघडींगून चोर्टा घरांत घूंसला.
खिळी n a metal or wooden cross-bar for securing a door. कवाड दत्तन झांकून ठिवाला लोकुंडांतकी/लोखंडांतकी लांकडांतकी केलते अडव॑-पट्टी. uis घरांत चोर्टा पडला नंतर अम्ही मागलेहीं पुढलेहीं कवाडाला लोहेच खिळी घाटलों !
खिसमिस n raisins. dried grapes without pips. किसमिस. वाळलते द्राक्षे. uis साधारण म्हणून नित्य देवाच नैवेद्याला/नेवेद्याला अम्ही खिसमिस अणी खडेसाखरे ठिवतों.
खिसा n a pocket in a shirt, pants etc. जेब. जोब.
खिंडार n a small gap. a small crack. एक ल्हान छेद. uis कित्येक ल्हान लेंकरे केम्हीन खिंडारांत बोट घालतील. तथे/तेथ किडू असाला संभव आहेत करतां जाग्रतान असाम/असांव. Note. खिंडार in sm means "a large breach, break, gap, or opening ; a lane or pass between fields" etc.
खीर n a sweet thin porridge. एक गुळ्चीट पीयाच पदार्थ. पायसम. uis सणाच संपाक म्हण्जे खीर असूनच अस्त.
खुणावणे vt to indicate by a sign. खूण करून कळिवणे. uis दुकानांत मला एक ’डिसैनाच' रेशमाच लुगडे फार अवडल॑. मझकडे पैसे उणे पडल॑ म्हणून ते खुणावून वेगळ॑ ठिवाला सांगून आलें.
खुळुखुळु n gargle. गुळु-गुळु. पोटांत उतरिवनास्क गळांत पाणी लागिवणे. uis दोन दिवसांतसून मला घसाच कंड होतहोत॑. नंतर, मीठाच पाणी खुळुखुळ केलांपिरी थोडक उणे झाल॑.
खुशी n pleasure. delight. कुशी. संतोष. आनंद.
खुंटी n a wooden peg (fixed to a wall) for hanging cloth, bags etc. कापड, पिशवी असलते अडकिवून लोंबिवाला भिंतींत असाच एक कट्टाच साधन॑ ; खुंटी/खुटी in sm. uis ल्हान ग्रामांत असणार त्यंच धोतर/धोती, लुगड, पॅन्ट-षर्ट तेवढीन भिंतीत असाच एक खुंटींत अडकिवून ठिवतील.
खुंटी व॑रल॑ कावळा fig an idiom meaning "a person in a great hurry for everything". "अग्ग्यालीन/सग्ळ्यालीन अवसर भोगाच मनुष", हे अर्थाच एक शब्दालंकार. Note. The literal meaning being, "a crow on a peg".
खूण n a mark of identity. बरोर कळींगाला सहाय कराच चिन्ह.
खेडाळू adj rustic (person, behaviour etc). खेडेगामाच (मनुष, स्वभाव अस॑) ; खेडाऊ/खेडोळ/खेडावळ/खेडाळ/खेडाळू/खेडवल/खेडवळ/खेडवाल/खेडवाळ in sm. uis "एम्यूसमेंट पार्कांत" येणार किती-किती खेडाळू लोक॑, चार-पांच वर्षाच पोरींना कोठ पह्जे तरीन मुताला बसिवतात. Note. all the variations mention here are listed in J.T.nMolesworth's A Dictionary of Marathi & English (1857).
खेडे n village. ग्राम प्रदेश. uis अम्च देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षाच वर झालाहे तरीन अत्तापणीन पोणावांटा खेडेंत शुद्ध केलते पीयाच पाणी मिळत नाही.
खेत n farm. क्रिषि कराच भूमि. शेत ; खेत/शेत in sm.
खेती n agriculture. क्रिषि ; खेती/शेती in sm.
खेद n regret. remorse. पश्चात्ताप. दुख.
खेप n (this) time, occasion, instance, turn, trip etc. हे वेळ. हे दपा. यंदा. uis "हे खेप मला पैसे द्याला सोड, अण्खीएक खेप तू दे". (2) "हे खेप अम्ही अमेरिकाला जाऊन सूनाच बाळांतपणे पाह्यींगतों, तुम्ही नंतर जांत"
खेळ n game. play. खेळ. क्रीडा.
खेळकोर adj playful. खेळ अणी विनोद स्वभावाच ; खेळकर in sm.
खेळणे vi to play. खेळणे. uis दोन वर्षाच पुढे साय्ना नेहवाल बॅडमिनटनांत विश्वांत दुसर॑ स्थानांत होते. पण, गेल वर्षी ल्हान-ल्हान घावांमळे त्यंच खेळण्यांत थोड कम्मी पडले.
खेळणे n toy. खेळाच सामग्री/सामान. बावोलि. भावोलि. uis कित्येक लेंकरांना त्यंच खेलणे चूरपणीन मोडनास्क दत्तन ठींगाच दंडक ल्हानपणांतूनच अस्त.
खेळ-तमाषा n fun and frolic. मस्तीच खेळ. uis परीक्षाच वेळ येत आहे, खेळ-तमषा अग्गीन सरकिवून ठिवूनटाकून पुस्तक काढून वाचाला बैस अत्ता.
खेळिवणे vt to make someone play. दूसरेंला खेळिवणे ; खेळवणे/खेळविणे in sm.
खेळिवणे id to make an ass of someone. वेगळांला बुद्दु करणे. uis तजबरोर बोलतानकी संपर्क ठींगतानकी दत्तन असाम॑. कां म्हण्जे, वेगळ्यांस॑ खेळिवाच स्वभाव तला आहे.
खेव n a hidden scheme to cause mischief. लप्पून/गूढ होऊन कराच उपद्रव खोडीच उपाय. uis संपाकघराच मागेच भाजीपाला अण्खी फूलाच झाडाला दिवसोडी आडांतून/आडांसून पाणी शेंदून घालाच काम मझ डोस्के वर ढकळाला मझ भाऊंडे केलते खेव मला थोडक पणीन अवडल॑ नाही.
खो-खो n name of a game. एक खेळाच नाव.
खोजा n eunuch. नपुंसक. दादिगांचीं बायकांचीं अवयव असाच लोके. अलि (Tamil).
खोटा adj counterfeit. नकली. uis सुमार पन्नास वर्षापुढे, म्हण्जे एकोणीसशे साठां मध्ये (1960 या मध्ये) कोयंबतूरांत झालते खोटा नोटाच खाणी ते काळाच एक थोर विषय होत॑.
खोडी n mischief. prank. चेष्टा. चिलमिष. uis साधारण होवून बायका पोरींच पक्षा दादिगा पोरे जास्ति खोडि करतील.
खोडीकोर adj mischievous (person). सदा खोडी करणार ; खोडकर in sm.
खोदणे vt to dig. खांडणे.
खोबरे n dried copra. वाळलते नारळ. खोब्र. कोवरे. खोवरे. बुडबुडा. uis सोलनाते वाळलते नारळाच आंत खोबरे "बुड-बुडा" अस शब्द करा करतां तला "बुड-बुडा" म्हणून पणीन सांगतों.
खोबरे n coconut kernel. हिरव॑/हिर्व नारळाच आंतल॑ पंढ्र रंगाच पदार्थ. खोब्र. कोवरे ; खोबरे in sm. uis इड्ळीलीन सादा-दोसेलीन/धिरडेलीन खोबरेच चट्णी तोळ्लावींगून/तोंडलाहींगून खालतर बेष असेल.
खोब्र n dried copra. खोबरे. खोवरे. कोवरे. वाळलते नारळ. बुडबुडा.
खोब्र n coconut kernel. हिरव॑/हिर्व नारळाच आंतल पंढ्र रंगाच पदार्थ. खोबरे. कोवरे ; खोबरे in sm.
खोलगा n a bin for storing grains. धान्य दत्तन ठींगाच थोर डब्बा. Note. खोलगा ordinarily means a pit or a hollow or a cavity.
खोलि n room. खोलि. uis गेल वार चेन्नैला एक वराडाला जाऊन अवस्था भोगून गेलों. वराडाच छत्रांत मला मिळ्लते खोलींत ए.सी. की फॅन की/ फंका की होत नाही, अणि तिकडल॑ विपरीत उन्हाळांत तरपडून गेलों.
खोवणे vt to insert and tuck in. घूंसिवून अटकिवून ठिवणे ; खोचणे/खोसणे in SM uis (1) तिज नणंदाला पाह्याला जाया्च पुढे तिन दोन मोळम फूल घेऊन केसांत खोवींगून गेली. (2) पूजाला बसाच पुढे कासोटा मागे पठीस बरोर खोवींगट्लाहेसका म्हणून पाह्यींग.
खोवरे n dried copra. कोवरे. खोबरे. खोब्र. वाळलते नारळ. बुडबुडा.
खोवा n a sweet preparation of milk thickened to a semi-solid state. कोवा. दूध घट्टि करून तय्यार कराच एक गुळ्चीट पदार्थ ; खवा in sm.
खोंकणे vi to cough. खोंकळा येणे ; खोकणे in sm. uis ओखद/औषध पीवून पणीन खोंकणे राहील नाहीतर समेच एक चोखोट/चोखट डोक्टराच कडे/वैद्याच कडे जाऊन एक्स-रे काढींगणे चोखोट.
खोंकळा n cough. घसांत होयाच उपद्रवामळे होयाच असुख ; खोकला/खोखला in sm. uis खोंकळा आलतर दुसरेंस तंटा होयनास्क असाला अम्च तोंडासमोर एक रुमाल धरींगणे चोखोट.
खोंचणे vt to pierce with a sharp end. टोंचणे. uis कोणा्च व॑र केस चालत होतकी तो एक दिवस न्यायादीशाला सूरी घेऊन खोंचूंटाकला अणी चुकून पळाला पाह्यला. झालतर तला धरले.
ग
ग the third consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच अक्षरमालाच तिसर व्यंजन.
गज n elephant. हत्ति.
गज n one yard. वार. तीन फुट लांब. uis हे काळांत वराडाच वेळांत पणीन बायका नौ गजाच लुगड नेसणे अप्रूप/अपरूप झालाहे.
गजकांप n violent or uncontrollable shivering. नियंत्रण नाहीस्क कांपणे.
गजकांप fig utter fearfulness. फार भींगणे.
गजगज n the hustle and bustle (of a crowded place). कचकच. गजबिज. (गुंपाच) हंगामा. uis चेनै उसमान रोडांत अणी तथे असाच लुगडाच, वस्ताच दुकानांत वर्ष पूराहीं गजगज गुंप असाच पाव्हून मझ लोंक (तम्हाच अमेरिकांसून आलहोता) म्हणट्ला "बापा हे दुकान-बीद पाह्यलतर अस वाटते येथ॑ कायीन पैसेच उणे नाही, अण्कि भारत देश "रिसेषनांतून" बाहेर येऊन गेलाहे."
गजबिज n a mess. disorderly state. गजगज. रंदा. रंधा. घंदरा-घोळा. तेरापेरा. कचां-पिचां (Tamil) ; गजबज in sm. uis ल्हान लेंकर असाच घरांत सामान ठिवलते ठिकाणि असाला वाट नाही. घर गजबिजच असेल.
गजराज n a large dominating male elephant. alpha-male elephant. हत्तींच राजा/मुख्या.
गजल n a genre of Hindustani music. एक प्रकारच हिन्दुस्थानि संगीत. uis गेल वर्षी प्रसिद्ध गजल सांगणार जगजीत सिंह वारलते ऐकून (मेलते ऐकून) मला फार दुख (खंत) वाटल॑.
गजवस्त्र n a decorative item made of cotton, placed shoulder to shoulder on God's idol. देवाच विग्रहाला घालाच कापूसांत केलते अलंकाराच माळ. uis गजवस्त्र घेम/घेंव म्हणजे अम्ही बंग्ळूरांत पेजावरश्रींच पूर्णप्रज्ञ विद्यापीठाच समोरल/सोमोरल दुकानांतूनच घेणे. तिकडल॑ गजवस्त्र शुद्ध रूईंतून केलासल म्हणून अग्गिदनालीन थोर विश्वास आहे.
गजानन n Lord Ganapati. गणपति. गणेश.
गट्टा n bundle. bale. गांठोड. मूट्टा (Tamil). uis कित्येक आचारे लोके मंत्र सांगणाच पक्षा होम संपलावर पात्र, दाळ-तांदूळ, दक्षिणा असकीं गट्टा करणेंत जास्ति ध्यान देतात.
गडगडणे vi to thunder. पाऊसाच मेघाच/वांबाच गर्जना. घडघडणे. uis अधीक गडगडलतर पाऊस येइना म्हणून सांगणे आहे. तसेच अधीक बोलणार कामाळू असनात.
गडगडा n thunder. पाऊसाच मेघाच/वांबाच गर्जना. घडघडा ; गडगडाट in sm.
गडद adj dense. गडद. uis एकदपा अम्ही गडद राणावाटी जात असताना वाटाच मध्ये एक थोर हत्ति ओठाकल होत॑. एक घंटा झालांपिरी ते वाट सोडून सरकल॑.
गडद-अंधार n pitch dark. भयंकर अंधार. uis (1) एकदपा कारांत बाह्येरल॑ गामाला जाताना वाटेंत कार राहून गेल॑. रात्रि नौ घंटे असेल. बाह्येर गडद अंधार होत॑. कारण, ते ल्हान गामाला जायाच वाटेंत एक दिवापणीं न्होत॑. अम्ही देवाला नवसींगत होतों. दहा निमिष झाल असेल, सोमोर/समोर एक लॉरि आल॑. तो राहत करून कायकी केला. समेच अम्च बंडी स्टार्ट झाल॑ अणी अम्ही कोठ जामकी तिकडे जाऊन पावलों. (2) मी ल्हान असतम्हा अम्ही एक खेडेगामांत राह्त होतों. तिकडे बीदीच दिवापणीं न्होत॑. अमावस्याच रात्री अम्च गावांत गडद अंधार असते म्हणून अम्हाला रात्रीच वेळी बाह्येर जायाला अम्च माय-बाप सोडत न्होते.
गडप n swallow. गिळणे. हडप.
गडप n misappropriate. embezzle. swindle. हडप. पैसा गिळणे.
गडप करणे vt to embezzle. to swindle. पैसे गिळणे. पैसे हडपणे.
गडप करणे fig to embezzle. to swindle. पैसे हडप करणे. पैसे गिळणे. एमारिवून पैसा करणे. पैसा गडपणे. uis कोण्त॑ व्यापार आरंभ केलतरीन अम्च पूरा ध्यान त्यांत असाम॑. अम्च ध्यान चुकलतर॑ खाले काम करणार याच पैसे पूरायीन गडप कराला प्हातील॑.
गडपणे vt to embezzle. to swindle. पैसा गिळणे. एमारिवून पैसा करणे. पैसा हडपणे.
गडबड n tumult. turmoil. अमक्कळ (Tamil). uis मला कोण्त थोर हॉस्पिटलांतीं जायाला अवडना. कां म्हणजे तिकडे सदाहीं गडबड अस्ते.
गडबडि n haste. hurry. अवसr. uis थोर डॉक्टr लोके सदाहीनच गडबडींत असतात. रोगींच बरोर समाधानांत बोलाला त्याना वेळ कोठ मिळते ?
गड्डा n a hardened boil or swelling in one's body. आंगांत येयाच घट्टि ऊत ; घड्डा in sm. uis अम्च आंगांत कोठ गड्डा आलतरीन ते औषध/ओखद घालून पणीं उणे होयनातर कॅन्सर म्हणून बदलाला संभव आहे. तजकरतां वेळाला स्क्रीनिंग करींगणे चोखोट/चोखट.
गड्डा n a lump. घट्टि झालते.
गड्डे n tuber. भोईच खाले मूळांत वाढाच गड्डे ; गड्डा in sm. uis डैबेटीस असणारांना गड्डे खालतर त्यंच आंगांतल॑ बाधा जास्ति होईल म्हणून वैद्यांच (वैद्य लोकांच) अभिप्राय आहे.
गण n a group. एक गुंप.
गणपति n Lord Ganesh. गणेश.
गणपति पूजा n a puja invoking Lord Ganapathi usually performed at the beginning of a programme. एक कार्यक्रम आरंभ कराच पुढे कराच गणेशाच पूजा.
गणेश n Lord Ganesh. गणपति.
गणेश चतुर्थि n a festival or puja honouring Lord Ganesh performed during Bhadrapada month. भाद्रपद महिना कराच गणपतिपूजा. विनायक चतुर्थी. गणेशोत्सव.
गणेशोत्सव n a festival or puja honouring Lord Ganesh performed during Bhadrapada month. भाद्रपद महिनेंत कराच गणपति पूजा.
गति n destiny. end result or condition. गेत.
गति n course. path. way. वाट.
गदा n mace. जुने काळाच युधाच एक आयुध. uis महाभारतांत दुर्योधना गदा प्रयोगांत एक थोर योद्धा होते.
गदाधर n one who wields a mace. गदा उपयोग करणार.
गदायुद्ध n a fight between two warriors wielding maces. दोन गदाधारींच मध्ये होयाच युद्ध.
गद्य n prose. वाक्यांत लिवलते लेख.
गपचुप adv silently. quietly. शब्द नाहीस्क. चुपचाप. मुंक्यान ; गुपचुप in sm. uis उदंड वेळ वरडा-वरडी करत होतते पोर तज बापाला पाह्लकी-नाही गपचुप होऊन गेला.
गपचुप adv unobtrusively. कोणालीन कळिवनास्क॑. चुपचाप ; गुपचुप in sm. uis अम्च एक मित्र गपचुप जमीन घेऊन नव॑ घर बांधले. हे विषय अम्हाला त्यंच घरप्रवेशाच आमंत्रण पत्र आलेवरच कळ्ळ॑.
गप्पा n gossip. अरटे (Tamil). हरटे (Kannada)
गरगर adj crispy. crackling. uis होटेलांत्सून आणाच मेदुवडा नीट गरगर अस्त. घरांत कराच तेवढ॑ बेष/बेश असत नाही. "सोडा" घाट्लतर गरगर होईल म्हणून सांगतात.
गरज n to put up with. to make shift with. गरद.
गरद n to put up with. to make shift with. गरज. uis (1) मला पाष्टे पसून पोटसूळ आहे तरीन, गरद नाही, हॉस्पिटलाला जा्यनास्क सांभाळाल होईल. (2) मला भूक लागत आहे तरीन, गरद नाही, खायाला अत्ता काहीं नको. (3) उद्या पाष्टे य़ेऊन पाह्याला होईना तरीन गरद नाही, सायंकाळी येऊन पाह मला. Note. (1) in DM गरद is almost always used along with ’नाही’ in the suffix. (2) in sm in addition to the meaning "to put up with. to make shift with" the word गरज also means "need or want, exigency, pressing necessity, urgent occasion, to spare, to save, reserve etc, vide J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857). (3) the words गरद and गरज are another example of inter use of द and ज.
.
गरळ n white coloured spit of an infant soon after the feed. लेंकरांला दूध देला नंतर त्यंच तोंडांतून कित्येकदा येयाच पंढ्र रंगाच द्रव्य. uis एक वर्षाच आंत असाच लेंकरांना दूध पाह्जिवला नंतर (थान देला नंतर) त्यंच पाठीमागे थापडून देऊन ढेंकारा आणिवलतर गरळ बाह्येर येईना.
गरसोळी n a necklace with black-beads, gold-beads and cup shaped small gold pendant signifying marital status of a woman. मंगळसूत्र. मांगल्य सूत्र. वराड झालते बायकांच गळांतल॑ काळीपोती अणी सोनेच मणीच माळ. uis काळीपोती गरसोळीच एक मुख्य भाग आहे. Note. (1) गरसळी (sm) is a metathesised form of गळा and सरी (necklace), with ळ and र interchanging their positions. गरसळी became गरसोळी of DM. (2) J.T. Molesworth's A Dictionary of Marathi & English give these variations of the word : गरसळी / गरसोळी / गळसरी / गळसर / गळेसर / गळेसरी a necklace of four to eight strands with glass and gold beads (also with a single bead) and does not particularly refer to मंगळसूत्र. In olden days it had पुतळी (an old gold coin valued at that time, cira 1850s, about four rupees)
गरी n the edible fleshy part of a fruit. गरे. पंडूच खायाच भाग ; गरा/गर in sm. uis फणसांत दोन विध आहे. खाताना गरी जीव्हांत गुंडाळाc अणी गुंडाळनाते.
गरीब adj poor. दरिद्र. uis अम्च सरकारांच प्रकार भारतांत 30% लोक गरीब आहेत (दिवसाला 32 रुपेच आंत संपाद्य असणार). हे ऐकून कोणालीन हांसू एईल. कारण असाच माघाईला शंबर रुपे संपाद्य असलतरीन एक मनुषाला वांचाला होईना.
गरुड n Lord Vishnu's vahana. महाविष्णूच पक्षिवाहनाच नाव.
गरुड n eagle. एक थोर पक्षि.
गरे n the edible fleshy part of a fruit. गरी. पंडूच खायाच भाग ; गरा/गर in sm. uis फणसांत दोन विध आहे. खाताना गरे जीव्हांत गुंडाळाच॑ अणी गुंडाळनाते.
गर्जना n a big roar with rolling and swelling reverberations. प्रतिध्वनीशी उतून येयाच मोठ वरडा/ओरडा. uis (1) सिंहाच गर्जना दोन तीन किलोमीटर पर्यंतील ऐकेल. (2) सिंहाच गर्जनाच शब्द तज ऊरांतूनेच प्रतिध्वनीशी उतून येयास्क अस्त. Note. the word for shouting in sm is ओरडणे.
गर्जना n a big sound with rolling and swelling reverberations. प्रतिध्वनीशी उतून येयाच मोठ शब्द. uis जनतंत्र दिवसाच घोषयात्र्रला राष्ट्रपती येताना वीसाव॑र-एक दपा/दफा तोफाच गोळी उडिवून त्यांस मर्यादा करणे आहे. तोफाच हे जर्जना ऐकताना अम्हाल रोमांच वाटेल.
गर्भ n foetus. an embryo. पोटांतल॑ जीव.
गर्भकोश n womb. गभाशय.
गर्भग्रह n sanctum sanctorum in a temple. देऊळांत देवाच विग्रह प्रतिष्टा केलते ठिकाण. uis दक्षिण भारतांत असाच देऊळांत साधारण म्हणून कोणालीन गर्भग्रहांत घूंसाला सो्डनात. पण, वेगळ॑ कित्येक ठिकाणि, भक्त लोकांना देवाच मूर्ती शिवून पूजा कराला पणीन सोडतील म्हणून ऐकलोहें.
गर्भपात n abortion. miscarriage. गर्भ गळून पडणे. गर्भ नास होणे.
गर्भवति n pregnant woman. गर्भिणि. गर्वारीण.
गर्भाशय n womb. गर्भकोश.
गर्भिणि n pregnant woman. गर्वारीण. गर्भवति.
गर्व n arrogance. haughtiness. दुरहंकार. झंभ. uis मनांत गर्व आलतर ते मनुषाला अधोगत लोक्कुरच येईल.
गर्व n pride. अभिमान. uis विश्वनाथन आनंद चतुरंगांत विश्वांतच सर्व श्रेष्ट खेळणार म्हणून घोषणा झालते भारतांत अम्ही सगळ्यांसीन एक गर्वाच विषय म्हणूनच सांगाम.
गर्वार n pregnancy. रर्भ धारण. गर्भ होणे. जर्भाच भार येणे ; गर्भार in sm. uis गर्वार झालांपिरी बायका रात्रीच वेळ जास्त मनुषांच येणे-जाणे नाहीत ठिकाणि जाताने म्हणून जुने काळांत सांगत होते.
गर्विष्ट adj arrogant. दुरहंकारि. uis उणे वयेच/वयाच लोकांना व्यापारांत ऐश्वर्य आल॑ म्हणजे कित्येकदपा गर्विष्ट होतील.
गलाटा n ruckus. tumult. अमक्कळ (Tamil). आरभाट. वरडा-वरडि. हंगामा. Note. from Tamil.
गलाटा n agitation. गलाटा. uis आंध्राप्रदेशांत तेलंगाना गलाटामळे आज चार ट्रैन-गाडी रद्द केले. Note. from Tamil.
गलीज n dirt. मळ॑. uis अम्च देशांत वाचलते लोक पणीन त्यंच घराच बाह्येर कुप्पा टाकून गलीज कराच पाह्ताना संकट वाटते.
गल्लि n lane. alley. रूंद उणे असाच वाट. सांध. सांधि. uis हैदराबादांत कित्येक ठिकाणि दोन गज रुंदाच गल्लि पणीन आहे. तेथ आटोरिक्षा जायाला पणीं वाट असना.
गळका fig easy going. disorganized. व्यवस्था नाहीते. तेरा-पेरा असाच. uis शेदारल॑ घरच गळके लोके. त्यंच घर नीट ठींगनात. नित्य संपाक काय करतात की नाही की, उगे-उगे एकादाड अम्चकडे सामान (दूध, दहीं, भाजीपाला) विचारत असतात.
गळणी n a strainer. sieve. जरडी. अरिप्पु (Tamil). uis पंडूंत्सून रस पिळून काढून गळणींत घालून तेच पाणी पीयाच बरीस पूर्त रस पीणेच बर॑. कारण, गळणींत राह्यलते भागांत 'फ़ैबर' अणी 'वैटमिन्स' अस्त..
गळणे vi to leak. to drip. निथळणे. (द्रव्य) गळून पडणे. uis घर बांधताना वरल॑ 'स्लाब' घालाच समय सिमेंट अणी 'वाटरप्रूफ केमिकल' मिळिवून घाटलतर पाऊसाळांत गळना.
गळणे vi to spill. (द्रव्य) ओतून पडणे.
गळा n throat. neck. कंठ. घसा. uis म्हातारपणांत (साठ वर्षा वरल॑ लोक॑) निजताना पत्तळ ऊंशि ठींगनातर गळा लचकुया.
गळा-कापणे fig to bore. घोळ घेणे. घोळ घेऊन प्राण काढणे (fig) ; गळेकापू/गळेकाटू (n) in sm. uis शेदारल॑ घरचा एथे येऊन गळा कापतो. तला वेगळ काम-धंदा नाही म्हणून वाटते.
गळा-कापणे fig to harass. फार तंटा/उपद्रव करणे. उपद्रव करून प्राण काढणे (fig) ; गळेकापू/गळेकाटू (n) in sm. uis अत्ता नव होऊन आलते आफीसर अम्हाला तवढेदनांच गळा कापाला म्हणून आलाहेकी कायकी. श्वास सोडाल होईनास्क काम घेत आहे.
गवडिशेंगा n cluster beans. गवारीशेंगा. गोवारीशेंगा. कोत्तवरनकाय (Tamil). गेवडिशेंगा. गोर्धनशेंगा. गोवर्धनशेंगा. uis अम्च लेंकीला गडिशेंगाच भाजी अवडत होत नाही, पण अत्ता येतां येतां उदंड अवडेत आहे. Note. the words गवडिशेंगा, गेवडिशेंगा. गोर्धनशेंगा and गोवर्धनशेंगा are almost never used in DM.
गवत n grass. तृण. uis पटणांत वाढिवाच गायीलीन म्हैशीलीन खायाला गवत देणे म्हणजे होईनाते काम ते. तेच, खेडेगामांत असाच गाय म्हैशीला पाउसाळाच वेळी भरून गवत मिळेल. Note. in sm both गवत and घास mean grass, hay or straw, while in DM घास means hay or straw.
गवन adj attention. ध्यान. लक्षा. लक्ष्य. uis वाचणेंत आवश्याजोक्त गवन देत होत नाही तो. यंदा परीक्षांत हरलांपिरी पणीं करलते चूक ओपींगाला तय्यार नाहीस्क आहे. Note. from Tamil.
गवसण n pillow/mattress cover. ऊंशीला/अंथरूणाला धूळ लागून मळक॑ होयनास्क असाला घालाच पिशवीस्क असाच साधन. गौसण ; गवसणी in sm.
गवारीशेंगा n cluster beans. गोवारीशेंगा. कोत्तवरनकाय (Tamil). गवडिशेंगा. गेवडिशेंगा. गोर्धनशेंगा. गोवर्धनशेंगा. uis पोळत भाताच बरोर गवारीशेंगाच पिट्ळेईं, तोळ्लावाला लाह्येंच वड्याईं असलतर जेवणे प्रमाद असेल ! Note. the words गवडिशेंगा, गेवडिशेंगा. गोर्धनशेंगा and गोवर्धनशेंगा are almost never used in DM.
गवेषण n research. शोधन. अन्वेषण. uis आकाशांत कस नील रंग येत म्हणून गवेषण करून घोषणा करलत्याला सर.सी. वी. रामनाला नोबल-पुरस्कार मिळ्ळ॑.
गव्हल्लर n cowherd. गोल्लर. गाय पाहींगणार ; गव्हळा/गवळा/गवळी in sm. uis गव्हल्लर लोक दूधांत पाणि मिळीवणे त्यंच कुलधर्म, अस तेवढदनीं म्हणींगतात.
गहूं n wheat. एक धान्य ; गहू in sm. uis आटा, मैदा, रवा अणी सूजि ते तेवढीन गहूंत्सून करतात.
गंगा n Ganges. गंगा नदि.
गंगाजल n Ganga water. गंगा नदीच पाणि.
गंगाजल n Ganga water kept in small copper vessels in pooja room. देवघरांत ल्हान तांबेंत ठिवलसाच गंगा जल ; गंगाजळी in sm means ’a vessel for holding sacred water'. uis कोणतरीन घरांत मरलतर (वारलतर) त्यंच तोंडांत घाला करतां घरांत गंगाजल ठींगाच पद्धते आहे.
गंगाळ n a large (brass) vessel for storing water. घंगाळ. घंघाळ. हंडा. पाणि धरून ठिवाच एक मोठ पात्र. uis थोर-थोर पट्णांत राह्याच हे काळाच नव पिढीच लोकांना गंगाळाच आवश्य नाही. कां म्हण्जे, त्यंच ल्हान-ल्हान नाहणींत गंगाळ ठिवालापणीं ठिकाण असत नाही अणी नळींत केम्हाहीं पाणी येतपणीं अस्त.
गंगावन n artificial hair. an extra bunch of hair inter-plaited to a woman's plait or chignon. वेणी, नाही बिछोडा हेज बरोर जोडाच केंस (क्षौरी/क्षवरी). uis एक वयेच नंतर बायकांला केंस झडेल. तम्हा गंगावन मिळिवून वेणि/बिछोडा घालिंगतील.
गंगास्नान n the ritual bathing on Deepavali day. दीपावळीच दिवस कराच सणाच स्नान. uis अम्च घरांत दीपावळीच पह्यिलेच रात्रीच गंगास्नानाच पाणि ताविवाच हंडा बेष घासून तला हळद-कुंकू लावून, पाणि भरून ठिवणे आहे.
गंगोत्रि n the place where Ganga emanates. गंगा नदि उद्भव होयाच ठिकाण.
गंजी n rice-gruel. भातांतून कराच एक पत्तळ पदार्थ ; कांजी in sm. uis भात शिजिवून ओतून काढलते गंजींत भरून पोषक अस्त म्हणून ते पीणे आंगाला फार चोखोट/चोखट. Note. from Tamil.
गंजी वेळणे vt to strain excess water from cooked rice. शिजिवलते भातांतून जास्ति पाणि/वेळवणी निदान ओतून टाकणे. uis जुने काळांत भात शिजिवल॑ नंतर भांडीच तोंडावर कापड बांधून गंजि-वेळणे करत होते.
गंजी वेळणे fig to side track the issue. विषय बदलिवून श्रद्धा वेगळे कडे करिवणे.
गंठ n a calamity foretold in the horoscope. जातकाप्रकारच दुर्घटना. uis मझ जातकाप्रकार 65 वर्ष 9 महिनेला मला एक गंठ होत॑. मी गेल॑ नवेंबर 15 तारीखाला आंगाला फार होयनास्क झालों. नंतर पाह्यलतर खर॑ म्हणून ते मझ जातकांतल॑ गंठाच वेळ होत.
गंध n sandal paste. चंदनाच पेस्ट/खळ/चिकटवण. uis आजच॑ दिवस पणीन अधिकारांत असणार लोके गंधाच लांकूड/लांकड चोर्टणांत विदेशाला विकून पैसे संपादतात म्हणून मला संदेह आहे. Note. in sm खळ and चिकटवण for paste.
गंध n scent. perfume. चोखोट/चोखट वासाच द्रव्य.
गंधरा घोळा adj disorderly. haphazard. गजबिज. तेरा-पेरा.
गंधर्व n a class of celestial demi-gods. स्वर्गलोकांतल एक वर्गाच उपदेवता लोक.
गंभीर adj grave. majestic. गौरवांत असाच. uis चाळीस-पन्नास वर्षापुढे पंतोजी, डोक्टर असल॑ उद्योगांत असणार लोके गंभीर्विणी वागतील. असल॑ उद्योगांला समुदायांत गंभीरपणाच चिन्ह होत॑.
गंभीरपण n majesty. गंभीराच स्थिति. गांभीर्य. ; गांभीर्य in sm.
गाई n cow. गाय. uis हिंदु धर्मांत गाईला एक महत्व स्थान आहे.
गाईच गोठा n cowshed. गाईला बांधून ठिवाच ठिकाण. uis स्विट्सरलॅन्डांत गाईच गोठा कित्ति निट अस्त म्हण्जे, अम्ही पणीन तथे संसार करूया !
गाडि n vehicle. बंडि.
गाढ adj sound. deep. अगाध. uis ते लेंकरु गाढ झोंपांतून दिडीरशी उठला वाटते. उठलकी नाही, रडाला आरंभ केला.
गाढ adj profound. अगाध. uis अत्तच॑ उत्तरादि मठाच स्वामीजीला वेदपाठांत अणी आध्यात्म विषयांत गाढ ज्ञान आहे.
गाढ adj deep. तीव्र. मुम्मर. uis गाढ तपस्या करून भस्मासुर ब्रह्मदेवा कडून अपार शक्ति संपादला.
गाढव n ass. donkey. एक मृग.
गाढव चरिवणे fig to fritter away time in some worthless activity. प्रयोजन नाहीते काम करून वेळ हाळ करणे. गाढव हांकणे (fig). कावळा हांकणे (fig). uis पूर्त ध्यान देवून वाचाच काळी बरोर वाचनास्क गाढव चरिवलतर शेवटी काम काहीं मिळनास्क भाताला कष्टि भोगामते पडेल.
गाढव हांकणे fig to while away time doing worthless things. प्रयोजन नाहीते काम करून समय हाळ करणे. गाढव चरणे (fig). कावळा हांकणे (fig).
गाढवाच कानाला किन्नर fig a metaphor implying "that which appeals only to an idiot". मुठ्ठाळाला मात्र अवडाच विषय/कार्य. Note. किन्नर, a class of celestial musicians.
गाढवाला कळेलका कापूराच वास fig a proverb meaning an idiot will not understand a fine and delicate thing. "एक नाजूक विषय/कार्य मुठ्ठाळाला समजना" अस सांगाच एक म्हण. Note. The literal meaning being,"will a donkey ever know the smell of camphor/कर्पूर ?"
गाण n mortgage. pledge. पैसे रीण काढाला वस्तू दुसरेंस ओपिवणे ; गहाण in sm.
गाण ठिवणे vt to mortgage. to pledge. गाहण ठिवणे . पैसे रीण काढाला वस्तू दुसरेंस ओपिवणे ; गहाण ठेवणे in sm.
गाणे n song. music. संगीत. गीत. uis जुन॑ पटाच (सिनिमाच) गाणे आजच॑ दिवस पणीं लोकांना फार अवढते. गाणेच गोष्टींत भरून अर्थ असामळे असुया.
गाणे सांगणार n musician. गाणे सांगणार. uis अगाऊच काळांत नाटकांत काम करणार / डाव घालणार (अभिनय करणार) स्वता गाणे सांगतील. हे काळांत काय म्हणजे, गाणे सांगणार/गाणे सांगणारीणे पदराच मागे ोठाकून/होठाकून गाणे सांगतात अणी डाव घालणार त्यंच तोंड मात्र गाणेजोक्त हलीवतात.
गाम n village. गांव. uis भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षाच वर झाल तरीन अत्ता पणीं भरून गामांत शुद्ध केलते पीयाच पाणी मिळत नाही.
गाम n town. city. गांव. टौण (English).सिटी (English).
गाम n native place. स्वंत स्थल.
गाय n cow. गाई.
गायत्रिमंत्र n a prayer forming part of Sandhya Vandana. संध्या वंदनाच एक भाग. uis संध्यावंदन करताना उणे पक्षा अक्रा दपा गायत्रिमंत्र कराम/करांव.
गार n a small dent. एक ल्हान पोंचा अथवा टोंचा ; गार in sm.
गार n a hole or depression. a pit. खड्डा ; गार in sm.
गाराण n complaint. grievance. आरोप करणे ; गाराणे in sm uis बॅन्कांत उद्योगांत असणारांस धर्मा अण्खी वेगळ॑ सौकर्य कित्ति देल तरीन प्रति दोन-तीन वर्षालीन त्यंच गाराण घेऊन हरताल करतात.
गाल n cheek. डोळेच खालच भाग.
गालपोंचा n dimple in the cheek. गालाच गार. uis गालपोंचा असणारी पोरी अद्रिष्टवंत असतील म्हणून सांगणे आहे. हे कित्ति खर, कित्ति लटक म्हणून मला कळना.
गालाच गार n dimple in the cheek. गालपोंचा ; गालावरील खळी/गालगुच्चा in sm. uis बायकापोरीना गालाचगार॑/गालपोंचा पडलतर॑ त्यंच चांगळपण॑ अण्खीन जास्त होते.
गालि n abuse. शिवा. Note. the corresponding word for शिवा in sm is शिवी
गावठी adj rustic. rural. खेडेगांवाच.
गाहण ठिवणे vt to pledge. to mortgage. गाण ठिवणे. अडमानम ठिवणे. गाहण or गाहाण in sm. uis मारवाडीकडे गाहण ठिवलते लोके पोणावांटा ते वस्तु सोडून देमस्क पडते. कारण त्यंच व्याज फारच जास्त अस्ते. व्याज भरजोरी कर्ज घेटलते लोकाना देवदिसून जाते.
गांजणे vt & vi to harass. to torment. to put pressure. गांदणे. पीडा करणे. पीडा होणे. uis मी ऐकलते काय म्हण्जे, अमेरीकांतून येणार कित्येक नवरे, त्यंच वराड झालसलतर पणीन दूसर वराड करींगतात. नंतर तथे गेलावर हे पोरीला नीट गांजताते. ते करतां बरोर विचारींगूनेच पोरींला बाह्येर गामाला पाठीवाम/पठिवांव..
गांजा n a type of addictive drug. एक नशाच पदार्थ. uis वर्षानुवर्ष युद्धांत सांपडींगून असाच अफघानिस्थानांत गांजाच क्रिषींतून तिकडल॑ तालीबान युद्धाच आयुध घ्याला पह्जते पैसा करतात.
गांठ n a knot. घट्टि असाच गुंता/बांध ; गाठ in sm. uis ग्रीक (यवन) इतिहासांत "गोर्डियन नोट" अस एक गांठ एकच कापांत तोडून, अलक्सांडर महाराजा त्यंच शक्ति अणी शूरपण दाखिवले.
गांठ n a bag-purse. a money-bag. पैसाच ल्हान पिशवी. uis कित्ति संपाद्य असल तरीन, कित्येक लोके अधीक वेच करनास्क पैसे गांठ घालून त्यंच बेंक बॅलन्स वाढाच पाह्त संतुष्ट होतात.
गांठोड n a bundle. मूटा (Tamil) ; गाठोडे in sm. uis जुने काळांत परीट लोकांच (धोबी लोकांच) गाढव धुवाच कापडाच गांठोड उचलींगून जायाव दृश्य सर्वसाधारण होत.
गांडीव n Arjuna's bow. अर्जुनाच धनुष.
गांदणे vt & vi to harass. to torment. to put pressure. गांजणे. पीडा करणे. पीडा होणे.
गांधे n swelling or rashes of the skin at a number of places due to an insect bite or allergy. किडा चावून अथवा "अलर्जी मळे" आंगांत वेगळ॑-वेगळ॑ ठिकाणी येयाच सुजलते पोंपडा ; गांध in sm uis कित्तिकी दपा ओखदाच/औषधाच अलर्जी मळेकी, नाही कोण्त तरीन जंतु चावूनकी आंगांत पूरा गांधे होत॑. म्हणजे, आंगावर उदंड ठिकाणी खाज होयाच तंबड रंगाच सुजलते पोंपडा/पोपडा झालस्त.
गांभीर्य n majesty. गंभीरता. गंभीरपण.
गांव n village. ग्राम. गाम.
गांव n town. city. गाम. पट्ण॑.
गांव n native place. स्वंत स्थळ.
गिधाड n vulture. एक मांसाहारी पक्षी ; गिधड, गिधाड, गीद, गीध, गृध्र in sm vide J.T. Molesworth's Dictionary, Marathi and English (1857)
गिजबड n congested and cluttered. उणे ठामांत व्यवस्था नाहीस्क असणे. uis अम्च घरांत फ़रनीचर जास्त असामळे घर गिजबड वाटते. कित्येक सामान विकूनटाकल तर थोड विस्तार असास्क वाटेल.
गिड्डपण n small height. उणे उंच. uis शंबर वर्षाच पुढे जप्पानांत लोके गिड्ड-गिड्ड होते. अम्च देशांत पणीन लोकांच उंच पांच फुट सहा इंचाच वर होतनहोत. आंगांत प्रोटीन उणे झालत्यांमळे गिड्डपण होत म्हणून विवर कळ्ळावर आहारांत प्रोटीन अधीक मिळिवाला आरंभ केले. तज नंतर लोकांच गिड्डपण उणे होत आहे म्हणतात.
गिड्ड adj short. उंच नाहीते ; गिड्डा in sm.
गिरणी n a mill. grinding stone or machinery. चक्की. धान्य/धान पूड कराच यंत्र. uis फॅक्टरींत तय्यार केलते आटा घ्याच बद्दिल अम्ही गहूं घेऊन गिरणीला पाठिवून पूड करिवतों.
गिरि n a mountain peak. डोंगूराच शिखर. पर्वताच शिखर. Note. डोंगर for ’mountain' in sm.
गिल्लि दंडा n a game played with a short and a shorter stick. एक ल्हान अणी तजपक्षा ल्हान काटीनीशी खेळाच एक खेळ. uis जिल्लि-दंडा खेळ्लतर डोळेले गिल्लि लागून घाव होयाला साध्यता आहे.
गिळणे vt to swallow. गळांतूं (जेवण॑/पाणी) पोटाला उतरिवणे. uis जेर, पडसा-खोंकळा नाहीस्क असताना आहार गिळाला श्रम झाल तर॑, समच 'स्कॅन' काढून 'कॅन्सर' नाही म्हणून निश्चय करींगणे बर॑.
गिळणे fig to embezzle. एमारिवून पैसा करणे (एमारिवणे-Tamil). पैसा गडपणे. पैसा हडपणे. uis पटणाच बीद बरोर कराच कामांत बंगळूर कॉरपरेषनांत काम करणार उद्योगी लोक बेष पैसा गिळले म्हणून भरून आरोप आहे.
गिळालीन नाही थुंकालीन नाही fig a proverb meaning to be caught in a predicament. काय करणे म्हणून कळनाते अवस्था. Note. the literal meaning being, 'unable to either swallow or to spit out'.
गिंडि n a water vessel with a spout. नाक असाच एक पाणीच पात्र.
गीता n Bhagawat Gita. भगवत गीता.
गुचकी n hiccup. गोचका. उचका. उचकी. uis चूळ भरींगून पाणी सात दपा थोडक थोडक गिळलतर गुचकी राह्यील म्हणतात.
गुच्छा n a bouquet. bunch of flowers. फूलाच गुच्छा.
गुजगुज n whispering to one another. बोलणेंत दुसरेंला मिळिवनास्क एकालेकांकडे उणे शब्दांत बोलणे. uis मझ बहिणीच लोंकीन सूनीन कोण्त सोयरीकांच घरच सण, नाही, वेगळ॑ काईं कार्यक्रमाला गेलतरीन, वेगळ॑ दुसरेंकडे बोलणे की हांसणे की करनास्क एक कोनेंत बसून गुजगुज बोलत असतील.
गुजगुजणे vi & vt to whisper. गुजगुज बोलणे.
गुजरी n scrap business. उपयोग नाहीते लोकुंडाच अथवा वेगळ॑ धातूच व्यापर.
गुजरी n a place where old second hand items are bought and sold. उपयोग करून जुने झालते वस्तू विकाच ठिकाण. uis बांगळूरांत पोणावांटा गुजरीच दुकानहीं तुरकडेच चालिवतात.
गुट्टि n a medicine given to infants. ल्हान लेंकरांस द्याच ओखद/औषध.
गुडघा n knee. गुडिघा. पांयेंच एक भाग ; गुडघा in sm. uis हे काळांत 50 % लोकांना, प्रत्येक्विणी बायकांस 45-50 वर्षाच वय झाल तर गुडघाच वेदना फार जास्त अस्त. पोणावांटा लोके गुडघाच 'ओपरेषन' करींगतात. Note. better गुडिघा.
गुडिघा n knee. पांयेंच एक भाग. गुडघा. ; गुडघा in sm. Note. better गुडिघा.
गुडी n flag. गुढी. झंडा. पताका. Note. better गुढी.
गुडी n a decorated pole erected in front of the house on the lunar New Year's day. गुढी. गुडीपाडवाच सणाला घराच समोर/सोमोर बांधाच अलंकार केलते काठी. uis अगाऊच काळांत गुडीपाडवाच दिवसी मझ आजा घरच॑ बाह्येर गुडी बांधत होते. पण, अत्ता अग्गीन मी देवघरांतेच मंदासनांत गुडी बांधूनटाकतों. Note. better गुढी.
गुडीपाडवा n festival of lunar New Year's day. चंद्रमान नव वर्षाच सण. गुढीपाडवा. Note. better गुढीपाडवा.
गुडु-गुडु n noise resembling gudu-gudu. गुडु-गुडु शब्द.
गुडु-गुडु पांडि n name of a nomadic tribe. एक ठिकाणी स्थिर होऊन राह्यनास्क इकड॑-तिकड॑ हिंडून फिराच एक वर्ग. बंजारा. Note. from Tamil.
गुढी n a decorated pole erected in front of the house on lunar New Year's day. गुडी. चंद्रमान नव वर्षाच सणाला घराच समोर बांधाच अलंकार केलते काठी. uis अगाऊच काळांत गुडीपाडवाच दिवसी मझ आजा घरच॑ बाह्येर गुडी बांधत होते. पण, अत्ता अग्गीन मी देवघरांतेच मंदासनांत गुढी बांधूनटाकतों.
गुढी n flag. गुडी. झंडा. पताका.
गुढीपाडवा n festival of lunar New Year's day. चंद्रमान नव वर्षाच सण. गुडीपाडवा. uis गुढीपाडवाच दिवसी 'सीमा भवन', हैदराबादांत गुढी बसिवून, नव॑ पंचांग तज बरोर ठिवून एक पुरोहित तज पूजा करतील. नंतर पंचांग श्रवण (नव वर्षांत काय मुख्य चोखोट/वंगळ होईल की तज व्याख्यान) करतील.
गुण n virtue. चोखोट स्वभाव. चोखोटपण. uis मनुषाला वाचणे, चांगुलपण, ऐश्वर्य हे सर्वाबरीस सात्विक गुण असणेच अधीक अवश्य. ते नाहीतर वेगळ॑ सर्वीन व्यर्थेच म्हणून मझ अभिप्राय.
गुण n the three types of qualities inherent in all things created by God as per Hindu dharma. हिंदु धर्माच अनुसार/प्रकार परमात्मा निर्माण केलते सगळ वस्तूंतीन (जीव असाचीन नसाचीन) असाच तीन विधाच गुण. Note. the three gunas are Sathvik/सात्विक, Rajas/रजस and Tamas/तमस.
गुणदोष n merits and demerits. strength and weakness. योग्यता निश्चय कराच गुणईं दोषीन. uis काय तरीन एक थोर विषय/कार्य नव॑ होऊन आरंभ कराच पुढे तज गुणदोष पाव्हून, ते अम्हाला बाधा कस करेल, हे पाह्णे चोखोट/चोखट.
गुणवंत adj a person of excellent character. चोखोट स्वभाव असणार.
गुणा adv multiplied by. गुणना कराच क्रीया.
गुणा n product of multiplication. एक संख्याला अण्खीएक संख्यांतून गुणा करून मिळाच संख्या ; गुणांक in sm.
गुदाम n warehouse. गोदाम. माल दत्तन ठिवाच एक मोठ खोलि. uis मझ मामाला पह्यिल॑-पह्यिल॑ बॅन्कांत काम मिळताना त्यांस एक गुदाम पाह्यींगाच (सांभाळाच) जवाबदारी देले, म्हणजे गोडौण-कीपराच काम.
गुन्हा n knavery. offence. transgression. fault. अपराध. अन्याय. दोष.
गुपचुप adv stealthily. secretly. unobtrusively. कोणालीन कळिवनास्क. uis अम्च कार्यक्रम बेष चालताने म्हणून अम्च विरोधी पक्षांतून कोणकी कार्यक्रम चालत असतान गुपचुप आंत घूसलते विवर अम्हाला मिळ्ल॑.
गुपचुप adv quietly. silently. शब्द नाहीस्क. uis अवमान सोसाला होईनास्क तो गुपचुप उतरून बाह्येर गेला.
गुप्त adj not prima facie seen. hidden. व॑रून दिसनास्क असाच. गूढ. uis गंगा, यमुना अणी सरस्वति हे तीन नदीईं वाराणसींत मिळाच स्थलाला ’त्रिवेणि-संघम’ म्हणतात. पण, सरस्वति नदीच प्रवाह वरून दिसना. भूमीच खालेसून गुप्त होऊन हे प्रवाह होत॑ अणी ते करतां हे नदीला ’गुप्त-गामिनी’ म्हणतात.
गुफा n cave. गुहा. uis विशाकपट्नमांत्सून दोनशें किलोमीटर दूर असाच "बोर्रा केव्स" गुफा एक पाह्याजोक्त ठिकाण आहे, अस ऐकून मी अणी मझ बाईल थोड वर्षा पुढे तेथ गेलहोतों.
गुमास्ता n clerk. क्ळार्क (English). uis रोबर्ट क्लैव पह्यिल॑-पह्यिल॑ भारताला येताना ईस्ट इंदिया कंपनींत एक गुमास्ता होऊन आले, पण वापस इंगलंडाला जायाच वेळी भारताच गवर्णर-जेनरल म्हणून गेले.
गुरु n guru. teacher. आचार्या. पंतोजी.
गुरु n the planet Jupiter. गुरु ग्रह. uis सूर्यमंडलांतल॑ आठ ग्रहांत सगळ्यांचीन पक्षा मोठ आहे गुरु ग्रह.
गुरुकुल n hermitage where brahmacharis are educated. ब्रह्मचारींस शिकिवाच आश्रम. uis अत्तलीकडे फार ठिकाणी वेगळ-वेगळ मठाच अधिकारी गुरुकुल अण्की साधारण साळे हे दोन्हीं मिळिवून चालीवत आहेत. लेंकरांना गुरुकुलांत पाष्टे वेद शिकिवितात अणी दुपारी साधारण शिक्षा देतात.
गुरुकृपा n blessings of the guru. गुरूच आशिर्वाद.
गुरुत्व n reverence for the guru. reverence to elders. गुरुला दाखिवाच मर्यादा. थोरळेंस दाखिवाच मर्यादा. uis अत्ताच काळाच कित्येक गुरूंच नीच रीतीच वागणे पाह्ताना त्यंच व॑रल॑ गुरुत्व उणे होत जाणेंत आश्चर्य काहीं नाही.
गुरुदक्षिणा n respectful offerings made to guru for having imparted knowledge. ज्ञानदान केलते गुरूला द्याच संभावना. uis जुने काळांत, म्हणजे ऐतिहासिक काळांत, विद्यादान व्यापार म्हणून न्होत॑ म्हणून गुरुकुलांतून वापस येयाच वेळी ब्रह्मचारी लोके गुरूला मर्यादा कराला त्यंच त्यंच शकीजोक्त गुरुदक्षिणा देत होते. पण, हे काळांत विद्याभ्यास नुस्त एक व्यापारास्क झालाहे अणी गुरुदक्षिणाच बद्दिल साळेच फीस भरूनटाकतात.
गुरुद्रोह n treachery against guru. गुरूला कराच द्रोह. uis क्ळासांत पंतोजी कष्टि भोगून शिकिवलांपिरी पणीन, परीक्षा लिवताना "कोपी" केल तर, ते एक नीच ्विषय/कार्य म्हणूनच सांगट्लतर मात्र पुरना, ते एक गुरुद्रोह केलते समान म्हणून सांगट्ल तर पणीन चूक असना.
गुरुवार n Thursday. बुधवाराच नंतर येयाच दिवस. बृहस्पतिवार. ब्रेस्तवार.
गुरू adj long sound or note. लांब स्वर. दीर्घ स्वर. लघुच॑ विरुद्ध स्वर.
गुलकंद n rose petals cooked in thick sugar syrup. साखरेच पाकांत शिजिवून तय्यार केलते रोजाफूलाच/गुलाबाच दळ॑. uis एड्वर्ड रोजाफूलाच/गुलाबाच गुलकंदाला तजेच एक चोखोट वास अस्त.
गुलाब n rose flower. रोजाफूल.
गुलाब जामूण n a type of sweet preparation. एक प्रकारच गुळचीट पदार्थ. uis गुलाब जामूण कराला पह्जते सामग्री पूरा मांडींगून बसापक्षा तजेच तय्यार असाच पीठ घेऊन करणे सुलुभ अस्त.
गुलाबी adj rosy. pink. गुलाबाच रंगाच.
गुलाम n slave. अडिमे (Tamil).
गुलिक काल n a specified period of one and a half hours of each day during which if any activity is started it leads to its repetition. प्रत्येक दिवसाचीं दीड घंटेच काळ. हे समयांत/काळांत कोण्त काम आरंभ केलतर ते काम पुन्हाहीं करामते पडेल म्हणून आहे. Note. this period changes from day to day. It is an auspicious time for starting activities like building a house, acquiring an asset etc. But marriage should not be conducted during this period for obvious reasons. And a dead body should not be taken out of the house to the cremation ground during Gulika.
गुळमट adj sweetish. गुळ्चीट रूच.
गुळिगा n a medicinal tablet. a pill. ओखदाच/औषधाच मात्रा. uis ल्हान लेंकरांना गुळिगा गिळाला होयना म्हणून तेच ओखद/औषध गुळ्चीट लेह्य रूपांत देणे आहे.
गुळु-गुळु n gargle. पोटांत उतरिवनास्क गळांत पाणी धरूनठिवून गळा शुद्ध करणे ; खुळखुळ in sm. uis दोन दिवसांतसून मला घसाच कंड (खाज) होतहोत॑. नंतर, मीठाच पाणी गुळु-गुळु केलांपिरी थोडक उणे झाल॑.
गुळु-गुळु n gurgling noise. गुळु-गुळु शब्द ; खुळखुळ in sm. uis अम्ही राणाच आंत चालून जात असताना बाजूच कोठकी एक नदीच गुळु-गुळु शब्द ऐकत होत॑.
गुळूंब n a swelling (particularly on the forehead/head) due to an impact. (कपाळ अथवा डोस्केंत) घावामळे होयाच सूज ; गुळुंब/गुळुंभ/गुळूम/गुळुंबा/गुल्म in sm,vide J. T. Molesworth's A Dictionary, Marathi and English (1857). uis ल्हान लेंकरे चालाला शिकताना कित्येकदा मागेपठीस पडून सूळ सोसाला होईनास्क रडतील, अणी डोस्केला गुळूंब होईल. ते वेळाला रूमालांत बर्फ//ऐस गुंडाळून तज वर शेकलतर दुखणे समेच उणे होईल.
गुळ्चीट adj sweetish. साखरेच स्वाद. गुळ्मट. uis मधुमेघाच रोग (डयाबीटिस) असणारांना गुळचीट पदार्थ अधीक खाम/खांव म्हणून वाटणे सहज असलतरीन, तसल॑ समयांत मन्न घट्टि करींगून (मन्न दृढ करींगून) खायनास्क असाम/असांव.
गुळ्मट adj sweetish. साखरेच स्वाद. गुळ्चीट.
गुहा n cave. गुफा. uis मध्व यती श्री जयतीर्था यांच गुरू श्री अक्षोभ्यतीर्थ हेनी/ह्यानी मलखेडाच जवळ/बाजू असाच यरगोळा गुहांत उदंड दिवस ध्यान करून तत्वज्ञानाच अगाध पांडित्य संपादले.
गुंजा n small red seed of the Red Sanders (Red Sandalwood) tree. रक्तचंदन वृक्षाच बीं. तंबड॑-चंदन वृक्षाच बीं ; गुंज in sm. uis केरळांt ल्हान लेंकरूच रूपांt असाच श्रीक्रिषणाच देऊळांत अग्गीन देवाला फार इष्ट होईल म्हणून गुंजाच संभावना द्याच पद्धत आहे. Note. Red Sanders or Red Sandalwood tree in not aromatic like the normal sandalwood tree. Being rare it is in the endangered list and is very expensive because of great demand in China and East Asia for making aphrodisiac drugs and classical Chinese hardwood furniture.
गुंजा n small red seed with a black dot one end. of Abrus precatorius creeper ; रती in sm. रती गुंजा वेलाच तंबड॑ बीं. uis (1) रती वेलाच गुंजाच वजन फार सूक्ष्म अस्त म्हणून जुने काळांत सोनार लोके सोनेच वजन त्यांत करत होते. (2) रती गुंजाच बींच एक अग्र भागांत काळ रंगाच बिंदू पह्याल मिळेल. Note. (1) 96 rati seeds weigh 1 tola. (2) this is a very poisonous seed and can be fatal if swallowed after chewing well.
गुंजा n sit-ups while holding ears with fingers as an offering to Lord Ganesha. गणेशाला घालाच गुंजि. uis गणेश चरुर्थीच पूजा झाल नंतर अम्ही लेंकरे अग्गीन दहा दहा गुंजा देवाला घालत होतों.
गुंजा n sit-ups. बसकी. बस्की. uis (1) व्यायाम करताना दोन हातीन पुढे करींगून दहा पंध्रा गुंजा घालाम/घालांव. (2) मझ मित्र मझ बरोर पोटी घालून शंभर गुंजा घाटला.
गुंजालाडू n a ball shaped sweetmeat. बूंदीलाडु. एक प्रकारच गुळ्चीट लाडू. uis सुलुभ अस्त म्हणून सणाच संपाकी लोक गुंजालाडूच बरोर खाराबूंदी पणीन करणे आहे.
गुंजि n sit-ups. गुंजा. बसकी. बस्कि.
गुंडा n a rowdy. समाज विरुद्ध मनुष. समाजांत दादागिरि करत हिंडाच मनुष. समाजाला दटावण करणार॑. केडी. uis बांगळूरच पोलीस मद्य-मद्य गांवाच गुंडा लोकांस अग्गीन धरून किलुपांत॑ घालणे आहे. Note. केडी / K.D. is an acronym for Known Depredator in police records. Now a days this nomenclature has been replaced by History Sheeter.
गुंडाळणे vt to wind around. गुंडाळणे. uis मjh पांयेच हड मोडलतम्हा प्ळास्टर घालाच बद्दिल तज वर एक पट्टि नीट गुंडाळून सोडले.
गुंडाळणे vi to coil around. गुंडाळणे. uis एक दिवस अम्च घरच मागे पटीस नळीच पाणी थेंबून थेंबून पडेत असाच ठिकाणी एक चोखोट सर्प गुंडाळून पडलसाच पाह्यलों.
गुंडाळणे vt to roll up. लोळिवून गुंडाळणे. uis अम्ही लेंकरे असतम्हा पलंगांत निजाच बद्दिल अण्थूण/अंथरूण भोईंत पसरून निजत होतों अणी पाष्टे उटल-की-नाही त्यंच-त्यंच अण्थूण/अंथरूण तेनी-तेनी गुंडाळून पलंगाच वर ठिवत होतों.
गुंडाळणे vt to bundle up. मूटा बांधणे. uis नेसींगटलते कापड भोईच वर तेरा-पेरा पडलसाच पाव्हून तज माय ते पूरा गुंडाळून वर काढून ठिवले.
गुंडाळणे fig to wind up. संपिवणे. uis अम्च बीदींत एक नव वाणीच दुकान उघडताना अम्हाला उदंड संतोष वाटल॑. पण, व्यापार बरोर चालत नाही म्हणून तीन-चार महिनेंतेच तेन्ही बिसिनस गुंडाळींगून गेले.
गुंडाळणे fig to hang around. एकच ठिकाणी हिंडत-फिरत असणे. जवळपासच फिरत असणे. uis (1) "तो कां इकडेच गुंडाळत अस्तो. तला वेगळ॑ काम नाहीका ? (2) कोण्त क्षेत्राल गेलतरीन काम नाहीते ब्रोकर-लोक॑ कसतरीन पैसे उपडाम म्हणून अम्च मागेच गुंडाळत असतील.
गुंडाळणे fig to embezzle. एमारिवून पैसा करणे. uis यंदा कोणाला अम्च वोट देम की कळत नाही. येणार लोक पूरा पैसा बेष गुंडाळींगून जातात.
गुंडि n button. बटण. uis साठ-सत्तर वर्षाच पुढे गुंडि घालाला अंगींत तला म्हणून नुस्त डोबूर होत॑. तजांतून सोनेच गुंडि वेगळ म्हणून घालत होतों. अत्तलीकड॑ घेतानेच अंगींत प्लास्टिक गुंडि शिवून अस्त.
गुंडी n a metal vessel for cooking small quantities of food. गुंडु. एक ल्हान भांडि. uis रात्रीच वेळ शीताच गुंडींत थोडक॑ पाणी घालून ठिवून, पुढ॑च दिवसी पाष्टे नंखर मीठ घालून खालतर आंगाला चोखोट म्हणतात.
गुंडु n a metal vessel for cooking small quantities of food. गुंडी. गुंडु-पात्र. एक ल्हान पात्र. एक ल्हान भांडि.
गुंडु-पात्र n a metal vessel for cooking small quantities of food. गुंडी. गुंडु. एक ल्हान पात्र. एक ल्हान भांडि.
गुंतणे vi to get entangled. अडकणे. एकालेक सांपडिंगणे. uis ते पोरीला भरून केंस होत-ते-करतां वेणी घालाला केंस विंचरताना प्रति वेळीन केंस गुंतून जात होत म्हणून शेवटी केंस "बॉप" करूनटाकले.
गुंता n tangle of hair, rope etc. केंस, दोरा असलते लोक्कर उकलून काढाला होयनास्क गुंतून असाच अवस्था. uis केंस लांब असलतर सुलभान गुंता होवुया म्हणून की काय की, साळे कॉळेजाला पाष्टे अवसरांत जाताना वेणी घालींगाला उदंड वेळ होईल म्हणून उदंड बायका पोरी त्यंच केंस कापिंगून ’बॉप’ करींगतात.
गुंप n crowd. भरून लोकांच भीड. uis हैदराबादांत कोण्त प्रदर्शन/एक्सिबिषन असल तरीन कोठकींत्सून/कोठसूनकी गुंप येऊन जाते. बंडी पार्किंग कराला पणीन ठाम मिळत नाही. Note. from Kannada.
गुंप n heap. ढीगारा. एकच ठिकाणी जोडून ठिवणे. uis कॉरपरेषनांतून अम्च बीद झाडाला येयाच मनुष वाळून पडलसाच पान पूरा एक गुंप करून ठिवूनटाकून जातो. नंतर एक वार॑ बडिवताना ते अग्गीन पुन्हा इकडे-तिकडे उडून जात॑. Note. from Kannada.
गुंप-गुंडाळणे vt to mill around. गुंप करणे. uis बीदींत एक ॲक्सिडंन्ट (अपघात) झालतर, ते मनुषाला केवढ॑ लोक्कुर ॲस्पत्रीला बलाईंगून जाम म्हणून पाह्यनास्क लोके तिकड नुस्त गुंपगुंडाळत तमाषा पाह्त असतील.
गू n excrement. stool. faeces. जीर्ण करून विसर्जन कराच साधन. Note. गू refrers to excrement of heterovorous beings including men, not to be confused with शेण (dung) of herbivorous animals.
गूडु n nest. प्राणींच अथवा पक्षींच राह्याच ठिकाण. Note. from the Tamil कूडु. uis अम्च घरच॑ समोरल॑/सोमोरल॑ झाडांत कावळाच तीन गूडु आहे.
गूढ adj secretive. mysterious. रहस्याच. गुप्त.
गूढन्ना n sweet pongal. गुळ्चीट पोन्गल. गोढन्ना. Note. from Marathi and Kannada (गोढ meaning sweet in Marathi and अन्ना meaning cooked rice in Kannada)
गून n (body's) forward-bent posture. hunch-back. आंग पुढे वांकून असाच स्थिति. uis उदंड लोकांना 75-80 वर्षाच नंतर गून पडत॑. तज कारण अम्च पाठींतल॑ मुख्य हड झिजून जाणे मळे म्हणून वैद्ध लोक सांगतात. Note. from Tamil.
गून घालणे vt to hold the body in a forward-bent posture. आंग पुढे वांकिवणे. Note. from Tamil.
गूनि adj a (natural) hunch-back. a person with a deformed back. स्थिर होऊन आंग पुढे पटीस वांकून असणार. Note. from Tamil.
गूळ n jaggery. साखरेच कच्चा रूप. uis साखर उत्पन्न करताना अम्च आरोग्याला बरोर पडनाते तीन-चार विधाच रसायन (केमिकल) उपयोग करतात. ते करताना साखरीच बरीस गूळ अम्च आरोग्याला चोखट/चोखोट म्हणतात.
गृह n house. घर.
गृहप्रवेश n ceremony conducted before occupying a house. घरांत राहाच पुढे कराच पूजा. uis गृहप्रवेशाच सणांत एक गाईला घरांत घूसिवून तज पूजा करणे आहे.
गृहशांति n a ceremony conducted for the benediction of a home. वास्तुशांति. uis मझ मित्राच कुटुंबांत एक दोन ओंगळ/वंगळ विषय झाल. घर वास्तु प्रकार नाही म्हणून, तेनी नंतर एक गृहशांति केलांपिरी सग्ळीन बरोर झाल.
गृहस्थ n a family man. कुटुंब चालिवणार.
गृहस्थाश्रम n the second of the four ’ashramas' in a man's life. एक मनुषाच चार आश्रमांत दुसर आश्रम.
गृहणि n housewife. the lady of the house. घर चालिवणार स्त्री.
गेत n destiny. end result or condition. गत. गती. uis अम्च देशांत दिवसास्क अनाचार वाढत आहे विना चोखोट काहीं होयास्क दिसत नाही. अस होत गेलतर देशाच गेत काय होईल म्हणून कोणालीं सांगाला होईना.
गेत n course. path. way. गत. वाट. गती. uis गेल वर्ष चैनाच शास्त्रज्ञ मंगळ ग्रहाला पाठिवलते उपग्रहाच गेत बरोर इषोब करून निश्चय करना-ते-करतां ते अत्ता मंगळ ग्रह वलांडून सूर्यमंडलाच बाह्येर जात आहे.
गेरू n a red-ochre colour. कावि रंग. uis सन्यासी लोकांच वेष गेरू रंगाच अस्त.
गेरू n a red-ochre coloured paste/liquid used along with rangoli on festive occasions. सणाच दिवसी रांगोळीच बरोर उपयोग कराच एक तंबड॑ रंगाच घट्टी द्रव्य. uis सणाच दिवसी लोक त्यंच त्यंच (तेन्च तेन्च) उंब्राच पुढे रांगोळी घालताना रांगोळीच पंढ्र रेखाच बरोर गेरूच रेखाईं घालाच दंडक आहे. अस घालणामळ॑ घरांत विशेष होत म्हणून अम्च विश्वास. Note. this is supposed to signify auspiciousness.
गेल॑ v preterite of the verb 'जाणे'. gone by. निघून गेल॑. ’जाणे', हे क्रीयापदाच भूतकाळ ; गेला in sm. uis मी गेल॑ सहा वर्षांत मझ गांमाला गेलोंच नाही.
गेल॑ v preterite of the verb 'जाणे'. moved away. सरकून गेल॑. ’जाणे', हे क्रीयापदाच भूतकाळ ; गेला in sm. uis रात्रिपूरा बीदींत वरडत होतते कुत्र पाष्टे होयाच पुढे वेगळ कोठकी गेल॑.
गेल॑ fig lost on account of omission or commision, slip-up etc. हातांतून चुकून जाणे. uis अत्ता काय सांगूनीं प्रयोजन नाही. गेलते गेल॑ अस म्हणींगून उगे बसणेच चोखोट/चोखट.
गेलंदपा adv last time. गेलंदफा. गेलंदा. मागले वेळी. uis गेलंदपा बोर-आड खांडाला प्रयत्न करून पाणी आल नाही म्हणून यंदा (यवंदा) मी सादा आड खांडाला निश्चय केलों.
गेलंदफा adv last time. गेलंदपा. गेलंदा. मागल॑ वेळी.
गेलंदा adv last year. गेल वर्ष. uis गेलंदा ऐ.ए.एस परीक्षा लिव्हून/लिवून चोखो/चोखट "रॅन्क" आल नाही म्हणून मझ लोंक पुन्हा हे वर्ष ते परीक्षा लिवाला/लिव्हाला निश्चय केला.
गेलंदा adv last time. गेलंदपा. गेलंदफा. माग॑ वेळी.
गेवडिशेंगा n cluster beans. गवारीशेंगा. कोत्तवरनकाय (Tamil). गवडिशेंगा. गोवारीशेंगा. गोर्धनशेंगा. गोवर्धनशेंगा. Note. the words गवडिशेंगा, गेवडिशेंगा. गोर्धनशेंगा and गोवर्धनशेंगा are almost never used in DM.
गोकर्ण n a small vessel shaped like a cow's ear used for feeding small quantities of medicine, water etc. to infants. ल्हान लेंकरांला पाणी, औषध/ओखद असल॑ द्रव्य द्याला उपयोग कराच एक ल्हान वाटि. गायीच कानाच आकारांत अस्त हे. uis अम्ही अम्च लेंकरांना गोकर्णांत औषद/ओखद देवून वाढिवलों तरीन, तेनी थोरळे होऊन त्यंच लेंकरांला 'ड्रोप्पर' वाटेच औषद देतात विना, गोकर्णांत द्याला ओपिंगना म्हणतात.
गोकुल n the place where Lord Krishna grew up. श्रीक्रिष्ण वाढलते गांव.
गोकुलाष्टमि n Lord Krishna's birthday. क्रिष्णाष्टमि. जन्माष्टमि. श्रीक्रिष्णाच जन्म दिवस. श्रीक्रिष्ण उजलते दिवस. श्रावण महिनेच क्रिष्णपक्षाच अष्टमीच दिवस. uis गोकुलाष्टमि सणांत लिंबु अण्खी पैसेच नाण्य अर्घ्य सोडाच पद्धति आहे.
गोचका n hiccup. उचका. उचकी. गुचकी. uis गोचका आल तर॑ एक चूळ पाणी सात भाग करून गिळल तर शांत होईल/राहून जाईल.
गोज्जु n a sweet and sour side dish. गुळ्चीट-अंबट रूचाच एक तोळ्लावणे/तोंड्लावणे. uis पाष्टे पाष्टे पल्हाराला पोंगलाच बरोर तोंड्लाविंगाला 'सुंडेकायी' गोज्जु असल तर कित्ति रूच असेल ! म्हणून ते खाणारांसच॑ कळेल॑. Note. from Kannada.
गोटकर्णि n an indoor game with seeds. पल्लांकुळि (Tamil).
.
गोटा n a hard seed of a fruit. फलाच घट्टि बीं. गोट्टि. कोट्टा.
गोटी n glass marbles used for playing 'marbles'. गोली. uis मझ पोरपणांत गोटी उदंड खेळलोंहें. ते खेळणमळे अम्च डोळेच सूक्ष्म शक्ति वाढत॑.
गोटी-मित्र n bosom pal. गाढ मित्र. प्राण मित्र. आत्म मित्र. uis रिलैन्स मधे एक थोर आफीसर मझ "गोटी मित्र" आहे.
गोट्टि n a hard seed of a fruit. फलाच घट्टि बीं. गोटा. कोट्टा. uis आवक्काय लोणच्याला गोट्टिनिशी अंबा चिरून घालणे आहे.
गोठा n cow shed. गायीला/गाईला बांधाच ठिकाण. गाईच गोठा. गोशाला. uis मझ बापाच घरच॑ गाईच गोठांत होतते तीन चार गायालीन वांसरूलीन पाह्यिंगाला म्हणून एक पोराला तेनी ठींगट्लोते.
गोठा n a thatched enclosure. a thached hut. छप्पराच झोपडी.
गोड्डुपिट्ळे n a gravy like food preparation eaten with cooked rice. एक रीतीच कालिवण. गोढ्ढुपिट्ळे. uis गोड्डुपिट्ळेंत मणतक्काळि, नाही सुंडेकाय तळून घालणे आहे.
गोढन्ना n sweet pongal. गुळ्चीट पोन्गल. गूढन्ना. Note. from Marathi and Kannada (गोढ meaning sweet in Marathi and अन्ना meaning cooked rice in Kannada)
गोढसार n a thin soup like food preparation eaten with cooked rice. एक पत्तळ कालिवण. uis (1) दोन दिवस वराडाच जेवण जेवल तर तिसर दिवसी नुस्त गोढसार-भात असलतरे पुरे म्हणून मनाला वाटेल. (2) संपाकघरांतून चोखोट गोढसाराच वास येत आहे ! (3) दाळीच चट्णीच भाताच बरोर गोढसार तोळ्लावींगून खायला उदंड बेष असेल.
गोढ्ढुपिट्ळे n a gravy like food preparation eaten with cooked rice. एक रीतीच कालिवण. गोड्डुपिट्ळे.
गोणिचीला n gunny sack. packing sack made of jute/hemp fibre. गोणींत केलते एक मोठ पिशवी ; गोण/गोणा/गोणी/गोणता in sm. uis 'प्लास्टिक वोवन बॅग' आला नंतर गोणिचीलाच उपयोग फार उणे झालाहे.
गोणी n gunny cloth. coarse cloth made of jute /hemp fibre. गोणीच कापड ; गोणी/गोणा/गोणताट/गोणपट/गोणपाट in sm. uis ओल॑ पांये पुसींगाला म्हणून भरून लोके त्यंच घराच बाहेर अण्खीं नाण्हींच कवाडाच समोर गोणी मुदडून (मुजडून) घालणे आहे.
गोत n gothra. गोत्र. Note. archaic form of the word gothra.
गोत n a mixed thing. मिळून असाच.
गोताच भाजि n a preparation of mixed vegetables. वेगळ-वेगळ भाजिपाला चिरून घालून केलते एक पदार्थ. Note. prepared on the bogi festival before Sankranthi.
गोत्र n tribal lineage tracing to ancient Saints. गोत. जुने काळाच (म्हणजे वेद काळाच) श्रेष्ट महर्षींच नावच कुल. uis (1) वसिष्ट, कौंडिन्य, मैत्रावरुणा हे ऋषींच नावाच तीन गोत्रहीं एकच प्रवराच आहे. (2) एकच गोत्रांत असणारांच मध्ये वराड होताने म्हणून आहे.
गोत्र n tribe. वर्ग. जात. गोत.
गोदान n ritual gift of a cow. गाय दान देणे. uis माय/बाप वारून/मरून पांचवा महिने कराच श्राद्धाच बरोर एक ब्राह्मणाला गोदान देलतर वारलते आत्माला वैतरणी नदी वलांडाच शक्ति मिळते म्हणून अम्च हिदू संप्रदायांत आहे.
गोदाम n godown. warehouse. माल दत्तन ठींगाला म्हणून बांधलते मोठ खोलि. गुदाम.
गोधडी n a thick saree with a rich lavish gold border. सोनेच जरीघाट्लते घट्टी लुगडे. Note. in sm गोधडी means a mult-coloured quilt.
गोधडी n rich cloth worn by the wealthy. पैसावंत लोके नेसाच आडंभर कापड.
गोपाला n Lord Krishna. श्रीक्रिष्ण.
गोपिका n women folk of cowherds who were great Krishna bhaktas. श्री क्रिष्णाच वर गाढ भक्ती असाच गाय वाढिवणारांच बायके. गोप स्त्रीं. uis रामावताराच वेळी सहाय करलते अनेक वानरांसीन श्रीरामा देलते आशीर्वादामळे द्वापरयुगांतल अवतारांत तेनी अग्गीन श्रीकृष्णाच प्रीय सखींच रूपांत गोपिका स्त्रींच जन्म काढून आले म्हणून अम्च धर्मशास्त्रांत आहे.
गोपीचंदन n yellowish clay paste used for caste marks. जाताच आधारा प्रकार आंगाला लावाच पिवळ॑ माती. uis मध्व संप्रदायाच लोके कोण्त पूजा कराच पुढेहीं/पुढेनीं गोपीचंदनाच मुद्रा अवश्य घालिंगतील.
गोपुर n towering structure built over the entrances of temples. देऊळाच आंत वेघाच वाटेच वर उंच आकारांत बांधून असाच मोठ व्यवस्था. uis तमिलनाडांत उजंड/उदंड ठिकाणी देऊळांच मोट-मोठ गोपुर पाह्याला मिळेल.
गोमय n smeared cowdung. लिंपलते गायीच शेण.
गोमुख n a plate shaped like a cow's face used in puja. पूजाला उपयोग कराच गाईच तोंडाच रूपाच ताट.
गोमूत्र n cow's urine. गाईच मूत. uis गोमूत्राला कित्येक औषधाच गुण आहे म्हणतात.
गोर॑ adj fair complexioned. गोर॑ काताडाच ; गोरा in sm. uis चांगुळपण॑ उणे असलतरीन परवा नाही, वराडाच पोर/पोरी गोर॑ असलतर, पाह्यणारांच डोळेला तेनी चांगळेच दिसतील.
गोरा n a white man. गोर॑ काताडच लोकांच वंशाच मनुष.
गोरा adj fair complexioned man. गोर॑ काताडाच मनुष.
गोरा-भुरका adj very fair and pinkish complexion. गोर॑ काताडाच. uis तो नवरा गोरा-भुरका आहे. तोंड उघडजोरी तेवढदनीं तला "इंग्रेज़ी" म्हणींगतील. बोलाल आरंभ केलतर तज स्वच्छ मराठी ऐकून लोकांना खर॑ कळून जाईल.
गोरी adj fair complexioned woman. गोर॑ काताडाच बायको/स्त्री.
गोरोचन n a traditional medicine prepared from cow's urine. गोमूत्रांतून केलते एक आयुर्वेद ओखद/औषध. uis आयुर्वेदा प्रकार गोरोचन अम्च आंगाला फार चोखट/चोखोट. बाळंतीण॑ बायकांला हे देणे आहे.
गोर्धनशेंगा n cluster beans. गवारी शेंगा. गोवारीशेंगा. गोवर्धनशेंगा. कोत्तवरनकाय.
गोलमाल n inappropriate acts bordering on frauds. लबाड काम. uis ऑफीसांत कायकी गोलमाल काम करून तो सांपडींगट्ला. अत्ता चुकाला काय मार्ग आहे म्हणून वर-खाले पाह्त आहे.
गोलमाल n mess. confusion. गोंधळ. uis अम्च कार्यक्रमांत तला मिळिवलतर तेवढीन गोलमाल करूनटाकून जाईल म्हणून तम्हाच म्हणटलों. तसेच झाल॑.
गोलि n small glass marbles. गोटि. गाजांत/ग्ळासांत केलते गोळ आकाराच ल्हान गोळि. uis गोलि-सोडा बॉट्टलाच आंत कस गोलि घालतात, हे मला उदंड दिवसापसून उत्तर मिळनाते प्रश झालाहे.
गोलि n a game played with marbles. गोलिच खेल. uis भूमींत तीन ल्हान डोंबूर काढून खेळाच गोलीच खेळ अत्त अग्गीन फार अप्रूप झालाहे.
गोलुस n an anklet, normally of single or double ply. एक की दोन की पदराच घुंगरु. Note. from Tamil.
गोल्लर n cowherd. गाय/गाई पाह्यींगणार.
गोळ n sphere. गोलीच आकार. गोळाकार ; गोळा in sm.
गोळाकार adj spherically shaped. गोलीच आकाराच. uis भूलोक गोळाकार आहे-ते-करतां पूर्वांत असाच भारताकडे जायाला पश्चिमाकडून गेलतर होईल, अस निश्चय करून पंध्रावां शतकांत क्रिस्टफर कोलंबस पोर्तुगलांतून अट्लांटिक समुद्रावर पश्चिमाकडे निघले.
गोळि n medicinal tablets. pills. ओखदाच/औषधाच मात्रे. uis ल्हान लेंकरे ओखदाच/औषधाच गोळि गिळताना गळांत सांपडींगनास्क पाह्यींगाम॑.
गोळि n bullets. तोपाच (तोफाच) गोळि. uis डुक्राचीन गायीचीन मांसांतून काढलते तेल लावलते गोळि हिंदुधर्मा्चीनचीं इस्लामाचीन विरुद्ध आहे म्हणून सिपाहीलोकांच मनांत झालते विचार 1857 वर्षी ईस्ट इंदिया कंपनीच विरुद्ध झालते स्वातंत्र युद्धाच एक मुख्य कारण होत॑.
गोवर्धनशेंगा n cluster beans. गवारीशेंगा. कोत्तवरनकाय (Tamil) गोवारीशेंगा. गोर्धनशेंगा. .
गोवरा n dried cake of cow dung used as a fuel. गोवर. गोवरी. चूल पेटिवाला उपयोग कराच वाळिवलते गयीच शेण ; गोवरी/गोंवरी/गोवर in sm. uis खेड गामांत/गावांत लांकड अणी गोवरा जळीवून सगडींते/शेगडींते संपाक कराच फार स्वादिष्ट अस्त, कारण हळू शिजीवणामळे पदार्थाच रूच आवश्याजोक्त बरोर अस्त.
गोवारीशेंगा n cluster beans. गवारीशेंगा. कोत्तवरनकाय (Tamil). गोवर्धनशेंगा. गोर्धनशेंगा. गवडिशेंगा. uis गोवारीशेंगाच भाजि थोड कडु असेल तरीन तज रूच मला उदंड अवडेल.
गोशाला n a cow pen where a large number of cows are maintained. भरून गायाला/गाईला संरक्षणा कराला म्हणून बांधलते गायीच गोठा. uis उडुपीच जवळ नीलावरांतीन कोडवूरांतीन श्री पेजावर मठाच ल्हान-स्वामीजी गायांला संरक्षणा कराला म्हणून दोन थोर गोशाला बांधलाहेत.
गोष्ट n an utterance. बोली. uis तो मझकडे एक गोष्ट पणीन सांगनास्क गेलते मला इष्ट झाल नाही.
गोष्ट n word. गोष्ट ; शब्द in sm.
गोष्ट n language. भाषा. uis तो अरवा येत आहे. अम्ही बोलाच तला कळनास्क असाला अत्ता अम्च गोष्टांतेच बोलुम्हणे.
गोष्ट देणे vt to give assurance. to promise. वचन देणे.
गोहत्या n cow slaughter. गाईला मरिवणे.
गोंडा n tassel. tuft. bunch. पुंज. पुंजका. uis भरतनाट्य नृत्य करत असताना मझ वेणीच अग्र भागांत बांधून होतते गोंडा उकलून पडूनगेल॑ ! Note. generally the tassel tied at the end of the plaited hair of a lady.
गोंद n sticking gum. चिकटाच/चिकटिवाच पदार्थ. डिंक. uis दुकानांत घ्याच गोंद दोन विधाच अस्त. प्ळास्टिक ट्यूबांत भरलते द्रव्य अणी "गम-स्टिक".
गोंधळ n a boisterous song festival in praise of Goddess. मोठ वरडावर्डींतून सांगाच देवी स्तुतीच गाणे. uis तंजाऊर मराठी लोकां मध्ये अत्तपणीन कित्येक सणकार्यक्रमांत गोंधळ सांगणे आहे.
गोंधळ n ruckus. bedlam. अमक्कळ (Tamil). uis दोन पक्षांच मध्ये थोर भांडाभांडीच गोंधळ झाल-ते-करतां, गेल महिनाच सभांत काय निर्णययीन काढाला झाल नाही.
गौरव n honour. respect. मर्यादा. आदर. uis विश्व क्रिकटांत सग्ळ्यांचींपक्षा जास्ति रण केलतहेनी सचिन टेंडूळस्कर म्हणाच अम्च देशाला एक गौरवाच गोष्ट आहे.
गौरि n Goddess Parvati. पार्वती देवि.
गौसण n pillow/mattress cover. गवसण. ऊंशीला/अण्थूणाला/अंथरूणाला धूळ लागनास्क असाला घालाच पिशवीस्क असाच साधन ; गवसणी in sm.
ग्रह n planet revolving around the Sun or a star. सूर्याला अणी नक्षत्राला प्रदक्षिणा कराच एक गोळ मंडल. uis प्ळूटो एक ग्रह नहो म्हणून शास्त्रज्ञ निश्चय केल्यावर अत्ता सूर्यमंडलांत नौ ग्रहांच बद्दिल आठ ग्रहच आहे अस सांगतात. Note. not to be confused with गृह meaning ’house/home'.
ग्रहचार n malevolent astrological influence of planets. ग्रहाच स्वाधीनामळे होयाच वंगळ/ओंगळ अवस्था. uis त्यांस काय ग्रहचार की, हात ठिवलते तेवढ॑ व्यापारांतीन फार नष्ट झाल॑.
ग्रहण n eclipse. भूमि, चंद्र, सूर्य हे तीनीं एकेच पंक्तींत येताना सूर्य अथवा चंद्र दिसनास्क होयाच. uis पुरातन काळ पसूनच अम्च ऋषी-मुनी लोके सूर्यग्रहण अणी चंद्रग्रहण असलत्यां विषीन बरोर कळींगून होतत्यामळे प्रति वेळीन ग्रहण येयाच दिवस अणी समय बरोर सांगत होते.
ग्रहण n comprehension. समजणे. मनांत होणे. uis अम्च देशांत लेंकरांना पह्यिले धरींगुन विषय ग्रहण कराच शक्ति बरीस अठवण करींगाच शक्ति वाढिवाला शिकिवून देतात.
ग्रहणशक्ति n capacity to understand or comprehend. समजाला पह्जते शक्ति.
ग्रहबळ n the support of one's astrological stars/planetary position. राशिबळ. uis (1) अम्च उद्योग बदलीवाच पुढे अम्च ग्रहबळ कस आहे म्हणून पाह्यिंगणे चोखोट. नाहीतर, असाच काम जाऊन बिदींत ओठाकांमते/होठाकांमते पडेल. (2) अम्च गृहमंत्रीच ग्रहबळ बेष आहे म्हणून कळते. थोर न्यायालयांत पणीन त्येंचवर कित्ति 'एविडेन्स' देलतरीन त्येना काहीं कराला झाल नाही.
ग्रहशांति n propitiation of planets. ग्रहांला कराच शांतिपूजा. Note. not to be confused with गृहशांति, meaning ’ritual purification of house'.
ग्रंथ n an ancient tome. जुने काळांत लिवलते/लिव्हलते महत्व विषयांच पुस्तक. uis अम्च देशांत पुरातन काळांत ताडपत्रांत/ताळिपत्रांत लिवलते/लिव्हलते महत्वाच हजारों-हजार ग्रंथ बरोर पाह्यिंगना-ते-करतां नाश होत आहे, म्हणून ते अग्गीन "डिजिटैस" कराच श्रम अत्ता सर्काराकडूनीं, तसेच, वेगळ संस्थां कडूनीं होत आहे.
ग्रंथालय n library. पुस्तकालय. वाचनालय. लोकांस वाचाकरतां ग्रंथ मिळिवून ठिवलते स्थापना. uis इतपर/इथपर तेवढ॑ देशांतीन 'इंटरनेट' ग्रंथालयच येणार. अगाउस्क थोर बांधणी/बिलडिंग असना. तेवढ॑दनांसीन त्यंच त्यंच (तेन्च तेन्च) कंपूटराच मूल्यान कोण्त ग्रंथपणीन वाचाला होईल.
ग्राक n customer. ग्राकि. घेणार. ग्राहक (Hindi). Note. from Hindi ग्राहक & Tamil.
ग्राकि n customer. ग्राक. घेणार. ग्राहक (Hindi). Note. from Hindi ग्राहक & Tamil.
ग्राम n village. खेडेगांव. uis अमेरिका, यूरोप असल॑ देशांतल॑ ग्राम अग्गीन स्वच्छ असेल. तिकडल॑ बीद, वार॑-पाणी हे सगळीं नीट असेल, अणी तिकड भाग्यवंत लोके थोर-थोर घर बांधिगट्लास्तील. हेज बरोर पाह्ताना अम्च देशाच ग्रामांच स्थिति फार मोस म्हणूनेच सांगाम/सांगाव.
ग्रामदेवता n goddess revered by a particular village. गांवाच देवी.
ग्रामप्रदेश n rural areas. खेडे प्रदेश.
ग्रीष्म n summer season. उन्हाळाच ऋतु/काळ.
घ
घ the fourth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच चौथ व्यंजन.
घटका n a period of twenty four minutes. चोवीस मिनिटाच काळ. घटिका. घडी.
घटना n incident. an happening. वृतांत. uis पाकिस्थानांतून आलते मुस्लीम तीव्रवादींच बरोर झालते घटनांत अम्च सैन्याच एकलेहीं चार तीव्रवादीहीं मरले म्हणून कळ्ळ॑.
घटना n an episode in T.V. टी.वी-च॑ विषय भाग. टी.वींत प्रचार होयाच धारावाहीच एक भाग.
घटनाधारा n serial episodes in T.V. टी.वींत प्रचार होयाच धारावाही.
घटमुट adj robust and healthy. घटमुट. बलाष्टिक ; घटमूट in sm. uis मझ मित्राच बापाला 100 वर्ष संपलाहे तरीन, त्येनी/तेनी अत्तपणीन घटमुट आहेत. दिवसोडि पाष्टे एक घंटेच वाकिंग करूनटाकून ’हैकोर्टाला' जाऊन त्यंच वकीलाच काम करणेंत त्यांस थोडक पणीं श्रम होत नाही.
घटमुट adj sturdy. hardy. घटमुट. uis हे मध्ये बंगळूर कॉरपरेषन कित्येक बीदांच रुंद जास्ति कराम म्हणून घटमुट असाच झाड अग्गीन फाडून टाकाला निर्णय केलत्याच विरुद्ध पट्णाच अग्गि रेसिडन्ट्स वेल्फ़ेर असोसियेषनीं मिळून एक थोर प्रकटन केले.
घटिका n a period of twenty four minutes. चोवीस मिनिटाच काळ. घटका. घडी. uis उजंड दिवस मी म्हणींगट्लों घटिकाच अर्थ ’डोळे बडीवाच समयाच वेळ’ म्हणून. पण, अत्ता कळ्ल॑, एक घटिका म्हणजे 24 निमिषाच वेळ म्हणून.
घट्टि adj firm. हलनास्क असाच ; घट्ट in sm. uis कुर्सीच एक पांय मोडून गेलाहे. ते बरोर करापतोरी एक मोठ दोरांत घट्टि बांधून ठिवलतर कोणीं कळनास्क तजांत बसलतर पडनाते.
घट्टि adj compact. पक्का असाच. घटमुट असाच ; घट्ट in sm. uis घर बांधताना पाया घट्टी असास्क पाह्यींगाम.
घट्टि adj thick (not dilute). नित्तळ नाहीते ; घट्ट in sm. uis घट्टि दूधांत अधीक सायें असणेमळे ते पीणे अम्च आंगाला वायीट आहे म्हणून पत्तळ दूध घेणेच उत्तम.
घट्टि adj strong. बळ असाच. बळकट ; घट्ट in sm. uis ईजिप्टांत चार पांच हदार/हज़ार वर्ष पुढे बांधलते पिरमिड अत्तपणीं घट्टि आहे.
घट्टि adj loud (noise). मोठ (शब्द). uis लेंकरू झोंपी जात आहे घट्टि बोलनास्क असशीलका ?
घठम n an earthen pot used as a percussion musical accompaniment. संगीताच वाद्यविणी उपयोग कराच मडके. uis गाणेच कचेरी होत असताना घठम बडिवणार ते मघ्य-मध्य उचलून व॑र भिरकावून त्यंच षानपण दाखिवतील ! Note. from Tamil.
घडघडणे vi to thunder. पाऊसाच मेघाच/वांबाच गर्जना होणे. गडगडणे. uis अधीक घडघडलतर पाऊस येइना म्हणून सांगणे आहे. तसेच, अधीक बोलणार कामाळू असनात.
घडघडा n thunder. गडगडा. पाऊसाच मेघाच गर्जना. वांबाच गर्जना.
घडिगार n clock. watch. वेळ दाखिवाच उपकरण॑ ; घड्याळ in sm. uis ते घडिगार बरोरल॑ वेळ दाखिवत नाही वाटते. दाहा मिनिट मागे दाखिवत आहे. Note. from Hindusthani & Tamil.
घडी n a fold. मुजलून/मुदलून ठिवाच॑. uis इस्त्रि केलते फडकी घडीनीशी पेटींत ठींगून ट्रेनांत की / प्लेनांत की गेलतर॑ घडी पूर्त नासुन जाऊन पुन्हा इस्त्रि करामते पडते.
घडी n a period of twenty four minutes. चोवीस मिनिटाच काळ. घटका. घटिका.
घडीघडी adv time and again. often times. frequently. पुन्हा-पुन्हा. uis चुकून पणीन तज कडून काहीन घेऊन आणताने. वाचूनटाकून देतों म्हणून तज एक पुस्तक काढींगून आलों. तेवढेच, ते वाचून संपिवाजोरी पुस्तक परतून दे म्हणून घडी-घडी विचारून मझ प्राण काढला.
घडी घालणे vt to fold. मुजलणे. मुदलणे. uis अम्ही ल्हान असताना वाळलते फडकी काढून घडी-घालून (करून) कपाटांत ठिवाच काम मीच करत होतों. Note. मुजलणे/मुदलणे appears to be an obsolete word in sm. दुमटणें in sm means ’to double over, to fold'.
घडी-मोडणे vt to unfold. मुजलून असाच उघडणे.
घन n heavy. भार. जेड ; घन/घण in sm.
घनश्याम n Lord Krishna. श्रीक्रिष्णा. Note. घन indicates dense and श्याम indicates dark blue of a cloud loaded and ready to pour.
घम्मग adj pleasant smell. खम्मग. चोखोट वास. घम-घम वास. खमंग/घमघमाट in sm. uis (1) खीरांत कुंकुमपू (केसरीच फूल) घाट्लतर खिराला चोखोट रंगीन घम्मग वासीन येईल. (2) उन्हाळाच दिवसांत चेन्नै/मदुरै पटीस गेलतर बिदींत पणीन मोगराच फुलाच घम्मग वास येत असेल..
घर n house. राहाच/राह्याच ठिकाण. आलय.
घर करणे vt to set up house. घरांत कुटुंब चालिवणे. uis कोण्तेक मनुषालीन (प्राणीला/पक्षीला पणीन) स्वंत घर करणे म्हणाच त्यंच जीवनात एक मुख्य लक्ष्य अस्त.
घरघूस n a type of large rodent. bandicoot. एक प्रकाराच मोठ उंदीर.
घरघूशी fig a home bird. an introvert. a person who is shy of company. दुसरेंच बरोर जास्ति वागनाते मनुष. uis घरघूशी लोकांना बाहेर/बाह्येर अधीक जाणे की, चार लोकां बरोर मिळणे की अवडना. असलते लोक॑ "मार्केटिंग" लैनांत घूसताने. तेना एक "कंपूटर" देवून तज वाटे काय काम होत की ते करीवुया.
घरच॑ adj belonging to the house or household. घराला संबंध झालते ; घरचा in sm. uis कित्येक लोके कामवालांस पणीन त्यंच/तेन्च घरच॑ लोकांस्क पाह्यींगतील.
घरजामाई n son-in-law staying in the house of in-laws. सासुरवाडींत राह्याच/राहाच जामाई ; घरजावई in sm. uis नवरा हुडकणार लोकांला लेंक विना वेगळ लेंकरे कोणीन नाहीतर घरजामाई होयाला कोण तय्यर आहेत की असलते नवराला पहिल/पह्यिल हुडकतील. हेच अगाऊच रीत होत॑.
घरदार n the entire household family. घर अणी कुटुंब हे दोनालीन उद्देश करून सांगाच एक गोष्ट. uis तला घरदार काहीं/काईं नाही म्हणून वाटत॑. नुस्त अवघडास्क हिंडत आहे.
घरप्रवेश n house warming ceremony. गृहप्रवेश. वास्तुपूजा. एक नव घरांत राहाच/राह्याच पुढे कराच पूजा.
घरवसा n cobwebs. अष्टपाद/आठपांयेंच जंतु (कोष्ट/कोळी) घराच आंत छताच खाले बांधाच जाल ; घरोसा/घेरोसा/घरंव/घरू/घेरू/जाळें/सुतेरा/कोळष्टक/कोश in sm. uis अधीक दिवस/महीने एक खोली झांकून ठिवलतर॑ छताच खाले घरवसा बांधून असाला साध्य आहे. Note. the different names in sm are as per J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857).
.
घरोघर n each and every house. प्रति घरांतीन. प्रति घरालीन. uis (1) कित्येक दन म्हणींगतात त्यंच घरांत मात्र घडीघडी भांडणे होत अस्त म्हणून. पण वास्तवांत घरोघर हेच खाणी. (2) सन्यासाश्रम घेटलतर, त्यंच स्वंत वस्तू काहीन असताने. घरोघर जाऊन भीक मागूनेचच॑ जेवाम. हे काळांत अस करणार लोके फार उणे आहेत.
घसा n sound from the throat. गळांतून येयाच शब्द. uis वय झालतामळे/झालत्यामळे लता मंगेशकराच घसा बदलून गेलाहे. त्यांस त्यंच घसावर पूर्त नियंत्रण/अठोपण असास्क दिसत नाही.
घसा n throat. gullet. गळा. कंठ. uis चघळाला कष्ट असाच पदार्थ खाताना घसाला जाऊन सांपडींगनास्क पाह्यींगाम.
घसा धरणे vi to have throat problem. घसाला होय़ाच तंटा. uis फ्रिड्जाच हिंस पाणी पीऊन दोन दिवसा पसून मला घसा धरलाहे.
घसा फाडणे fig to shout or talk at the top of one's voice. मोठ शब्दांत वरडून/ओरडून बोलणे. uis अम्ही कोणीन किवड॑ नोहो. कां तो घसा फाडून वरडतो/ओरडतो ?
घसा बसणे vi to have problem in vocalising. गळांतून शब्द बाहेर येईनास्क होणे. uis गाणे/संगीत सांगणार लोके त्यंच घसा बसनास्क असला हिंस पाणी पीणे की हिंस पदार्थ खाणे की करताने.
घंगाळ n a large (brass) vessel for storing water. घंघाळ. गंगाळ. हंडा. पाणी धरून ठिवाच एक मोठ पात्र ; घंगाळ, घंघाळ in sm. uis (1) अम्च जुने घरांत थोर थोर घंगाळ होत॑. अम्ही नव फ्लाटाला सरकताना ते तेवढीन गुजरीला विकलों. एक दोन तरीन उरिवलसल तर शो-पीस म्हणून ठिवलासुया. (2) अगाऊच काळांत आडाच पाणी शेंदून न्हाणींत एक थोर घंगाळांत भरून ठिवून हंडाच चूल पेटिवून आंघोळीच पाणी तय्यार करत होते.
घंघाळ n a large (brass) vessel for storing water. घंगाळ. गंगाळ. हंडा. पाणी धरून ठिवाच एक मोठ पात्र ; घंगाळ, घंघाळ in sm. uis थोर-थोर पट्णांत राह्याच हे काळाच नव॑ पिढीच लोकांस घंघाळाच आवश्य नाही. कां म्हण्जे, त्यंच ल्हान-ल्हान नाहणींत घंघाळ ठिवाला पणीन ठिकाण अस्त नाही अणी नळींत केम्हाहीं पाणी येत पणीन अस्त.
घंटा n hour. साठ मिनिट. uis तुझ करतां मी एक घंटा इकडे वाटपाह्त होतों. पण, तू आल नाहीस म्हणून वापस निघून गेलों. Note. singular, the plural being घंटे.
घंटानु-घंटे n for hours together. घंटोन-घंटे. uis तुझ करतां घंटानु-घंटे तिकडेच राखून असच उद्देश नाही मला. मी तिकडे जाऊन पावतानेच येयास्क असलतर ये, होईनातर येणेच नोको.
घंटे n bell. घंटे. एक वाद्य. uis जुने काळास्क ट्रैन निघाच पुढे तीन दपा घंटे बडिवाच/वाजिवाच दंडक अत्ता अग्गीन रेल्वे स्टेषनांत करत नाहीत.
घंटे n time on the clock. घडिगार दाखिवाच वेळ. uis घरच॑ बायको बाहेर/बाह्येर हिंडत असल तर घरांत असणार हेच सांगतील "घंटे झाल॑ आठ, भाताला नाही वाट" ! Note. घडिगार (Tamil) means clock, whereas in sm it is घड्याळ.
घंटे n hour(s). साठ मिनिट. uis मी तीन घंटे तज करतां तिकडेच राखून बसलों तरीन तो आलाच नाही.
घंटोन-घंटे adv for hours on. उदंड वेळ. घंटानु-घंटे. uis अत्तलीकडे तिरुपतींत 60 वर्षाच वर असणारांना दिवसाला तीन-चारदा महाद्वारांत्सूनेच दर्शनाला सोडतात. तजमळे म्हातारे लोके घंटोंन-घंटे पंक्तींत/क्यूंत ओठाकाच/होठाकाच आवश्य नाही.
घागर n a vessel for storing water. पाणी धरून ठिवाच एक मोठ पात्र. uis नळ नाहीते खेडेंत पांच-सहा बायके मिळून जवळ असलते कुंठ/नदींत आंग दुहून, घागरींत पाणी धरींगून हांसत-बोलत घराला येयाच दृश्य पाह्याला/पायाला बेष अस्त.त॑.
घाट n mountain range. डोंगूराच पंक्ति. uis भारताच पश्चिमांत असाच सह्याद्रि घाटाच पूर्वभागांत पाऊस उणे पडाला एक मुख्य कारण घाटाच उंचामळे पाऊसाच वांबाला (मेघाला) पूर्वीकडे येयाला होयना-ते-करतां आहे.
घाट n a mountain pass. a break in a mountain range. डोंगूराच मध्ये असाच वाट. uis कोयंबतूरांतून गुरुवायूराला जायाच वाट सह्याद्रीच मध्ये असाच घाटावाटी जात॑. हे घाटांत॑ केरळ राज्याच पालघाट गांव आहे.
घाट n steps leading to a river bank or a tank. नदि नाही, कुंठाच बाजू उतराच पायरी (पडतोरे). uis वाराणसींत गंगा नदीच कांठांत/कांठशी भरून घाट असाच अम्हाला पाव्हूया/पावूया. Note. the word पडतोरे is not very common in DM. It is derived from पडि meaning "steps" in Tamil and तुरै meaning "by the side of a water body" also in Tamil
घाट n burning ghat, ie, the place where dead bodies are cremated. चिता धाट. स्मशान.
घाट n oppressive feeling because of strong smell or thick fumes. घोळ वासामळे अथवा घट्टि वाफामळे होयाच तंटा. uis अमेरिकांत असणार गोरे लोकांना अम्च संपाक उदंड घाट वाटेल म्हणतात. तम्हाप्णीन थोड लोके रूच भोगून अम्च जेवण जेवतात.
घाण n stench. घोळ वास. वंगळ॑/ओंगळ॑ वास. uis चेन्नैंत अनेक ठिकाणी कूवम नदीच घाण वास येत अस्त. .
घाण adj obnoxious. foul smelling. घोळ वासाच. uis बंगळूरांतून रात्रि निघाच ’चेन्नै एक्प्रेस’ बेसिन-ब्रिड्ज स्टेशनांत येऊन पावतां तरून कूवम नदीच घाण वास आरंभ होईल. ते घाण वासांतूनच अम्हाला कळून जात॑, चेन्नै येऊन पावलों म्हणून !
घाणका adj an unhygienic man. आंग अशुद्ध असाच मनुष. uis बस्सांत जात असताना मझ बाजू एक घाणका बसल्होता.
घाणक॑ adj unhygienic (smell). अशुद्ध (वास). uis अम्च समोर/सोमोर बसल॑ होतत्याच षूसांतून तज पांय बाहेर/बाह्येर काढला-कि-नाही, घाणक॑ सॉक्साच वास कोणालीन सोसाला होईनास्क अम्ही अग्गीन मिळून तला बेष शिवा देलों.
घाणा n oil mill. तेलाच चक्कि. तेलाच गिरणि.
घाबरणे vt to get scared. भींगणे. भें वाटणे. uis बीदींत पोलीस कोणाल तरीन ओठाकिवून/हो ठाकिवून कायतरीन विचारणा केलतर पोणावांटा लोकेहीं घाबरतील (भींगतील). तज कारण पोलीसाच वर भरून दनास पातेरा नाहीत्यामळे आसूया.
घाम n sweat. perspiration. आंगाच काताडांतून सुटाच पाणी. uis समुद्राच कांठशी असाच सर्व गामांतीन घाम जास्त सुटेल. पण, तसलते ठिकाणी भूक नीट लागेल अणी ते आंगाला चोखट म्हणून मी ऐकलोंहें.
घाम-सुटणे vi to sweat. to perspire. घाम सोडणे. घाम गळणे.
घालणे vt to put (atop, on, etc.). (एकाच वर) ठिवणे. uis हे फूलाच माळ ते विग्रहाच गळावर घालूनटाक.
घालणे vt to thrust into. to put into. आंत ठिवणे. uis (1) हे पुस्तक ते पेटीच आंत घालूनटाक. बाहेर/बाह्येर ठिवलतर धूळ बडिवून हाळ होईल. (2) उगे बोट नाका्च आंत घाल नको. पाहणारांस कंटाळा वाटेल.
घालणे vt to wear. नेसणे. uis आजेच शिवींगून आणलते अंगी आजेच घालून हाळ कर नको.
घालणे vt to set out or lay out. घालणे. uis (1) मला भूक लागत आहे. लोक्कर ताट घालशील का ? (2) मला उदंड झोंप येत आहे. लोक्कर अण्थूण/अंथरूण घालशील का ?
घालणे vt to put on. to activate. घालणे. uis बसाच पुढे टी.वीच स्विट्च घालशीलका ?
घाव n physical injury. wound. आंगाला काहीं लागून होयाच फोड. uis कित्येकदा ॲक्सिडेन्ट होऊन खाले पडून बाहेर/बाह्येर घाव लागनास्क असूया. पण, आंगाच आंत घाव लागल॑ असेल तर ते अण्खीन थोर समस्या होऊया.
घाव लागणे vi to get wounded. घाव होणे.
घास n hay. straw. dried harvested paddy stem. पीक काढल॑ नंतर कापून वाळिवलते तांदूळाच गौत. गवत. वैक्कोल (Tamil). uis (1) कित्येक खेडेगामांत गायीला म्हैशीला पह्जते वाळलते घास बरोर मिळिवून थोर ढीगारास्क बांधून ठिवलस्तात. (2) कागद उरपत्ते कराला घास पण एक "रामेटीरियलास्क"/आरंभ वस्तूस्क उपयोग होत॑. Note. in sm both घास and गवत mean grass, hay or straw.
घासणे vt to scrub. घांसणे. मळक॑ रगडून काढणे.
घांट n bell. घंटा. घंटे. झांकट.
घांस n a mouthfull (morsel of food etc.). तोंडांत भराच एवढे(भात/जेवाच पदार्थ) ; घास in sm. uis अम्च देशांत कितिकी लेंकरे एक घांस भात पणीन मिळनास्क भूकांत कष्टि भोगत आहेत. हे विषय अम्च लेंकरांना कळीवून जेवताना एक शीत पणीन टाकताने म्हणून तेना शिकिवाम. Note. from ग्रास of Samskrth.
घांसणे vt to scrub. घासणे. मळक रगडून काढणे. uis तेलतवाच चिक्कटपण/तेलखट जायाला "विम" घालून अम्ही लोक्कुंडाच "स्टील-उलांत॑" घांसतों. पण, कित्येकदा लोक्कुंडाच चूर येथ-तेथ पडून संपाकाच पदार्थांच बरोर मिळनास्क पाह्यींगाम.
घुरका n snoring. झोंपी जाताना अपाप येयाच श्वासाच मोठ शब्द. घोरटे ; घोरणे in sm. uis कित्येक लोके घुरका सोडाला आरंभ केलतर वेगळ लोके ते खोलींत निजून झोंपी जायाला होयनाते-एवढ॑ शब्द करतील.
घुसळणी n a churning rod. रवि.
घुसळणे vt to churn with a churning rod. रवींत मंथन करणे. uis दिवसास्क मझ बाईल दूधाच साये फिड्जांत काढून ठिवून, नंतर एक दिवस तजांत थोडक दहीं विरदणाला घालून, दुसर दिवसी रवींत घुसळून लोणी करेल.
घुसिवणे vt to push or sneak something or someone in. दुसरेला आंत घुसिवणे ; घुसवणे/घुसविणे in sm. uis मीनीं मझ लोंकीन क्रिकट पाह्याला गेलते दिवसी भयंकर गुंप होत॑. मला आंत घूंसाला झाल नाही तरीन तिकड॑ कोणालाकी धरून मझ लोंकाला स्टेडियमाच आंत घुसिवलों.
घुंगरू n a foot adornment with small bells worn by dancers. नर्तकांच पायेंत बांधाच ल्हान-ल्हान घंटेच एक आभरण.
घुंघुरडा n a bumble bee. एक विधाच उडाच प्राणी ; घुंघुरदा/घूंगरट in sm. uis घुंघुरडा डोळे्च जवळ येताना अम्हाला कोठ डसते की / टोंचतकी म्हणून भें वाटते. पण अम्ही तला काहीं करनास्क असलतर तेहीं अम्हाला शिवनास्क उडून जाईल.
घूंसणे vt to push in. बळ उपयोग करून आंत वेघणे ; घुसणे in sm. uis सिकंदराबादांत 'जेनरल बजारांत तेवढ॑ विधाच सामान सवंगान मिळेल तरीन तेथ आंत घूसाला सर्व तीन फुटाच सांधीच आहे. तेमळे ते दुकानांत वेघणे थोड कष्टेच. Note. वेंघणे in sm means 'to climb up' whereas वेघणे in DM means 'to climb' and 'to enter'.
घूंसणे vt to sneak in. कोणालीन कळनास्क आंत वेघणे. uis अम्च सभांत तंटा करेल म्हणून तला सरकिवून ठिवाला अम्ही कित्ति प्रयत्न केलतरीन तो कसतरीन आंत घूंसून आवश्य नाहीते तर्क आरंभ करेल.
घेणे vt to buy. पैसा देवून स्वंत करींगणे. uis "घरांत थोडपणीन तांदूळ नाही. दुकान-बीदीला जावून मी दहा किलो तांदूळ घेऊन येतों". Note. (1) in sm विकत घेणे means 'to buy' (2) in DM the word विकणे is used only in relation to 'selling' and never in relation to 'buying'.
घेणे vt to get. घेणे. uis तो अन्याय तंटा करत होता. दोन मार घेटला नंतर उगे बसला.
घेणे vt to accept. स्वीकार करणे. uis अम्च गामाच नव तहशीलदार लांच घेणार मनुष म्हणून सगळ्यांसीन कळेल.
घेणे vt to take in hand. to grasp. हातांत धरणे. uis मझ दोन हातीन दुखत आहे. थोड वेळाला तू हे पेटी मझकडून घेशील का ?
घेणे vt to take up. हाती घेणे. uis अत्ताच तझकडे भरून जवाबदारी आहे. ते पुरना म्हणून अत्ता तो एक नव काम हाती घेटलाहे.
घेणे suff used as a reinforcing verb of another verb, eg. करूनघेऊन (करींग्यून), जेवणघेऊन (जेवींग्यून) etc. akin to टाकणे in करूनटाकणे, खाऊनटाकणे and सोडणे in करसोडणे (करसुडणे), खाउसोडणे (खावुसुडणे) etc. एक क्रीयापदाच शेवटि मिळिवाच अण्किएक क्रीयापद (पह्यिलच क्रीयापदाच अर्थाला अण्कीन शक्ति द्या करतां). Note. the suffixing of verbs like घेणे, टाकणे or सोडणे to another verb creates a complex verb.
घेणेदेणे n transactions. हेपटीस-तेपटीस होयाच व्यापार. देणेघेणे. uis अम्च जातींत वराडांत घेणदेण जास्त नाही. पण, कम्मा-रेड्डी, गौडा, मार्वाडी असलते जातींत वराडांत घेणेदेणे म्हणाच कोटोन-कोटी रुपेच व्यवहार आहे.
घेरी n giddiness. vertigo. डोस्के-फिरणे. डोस्केच चक्कर. uis 2001 मार्चांत मला असलास्क-असून घेरी आलहोत॑. सायंकाळी पांच घंटेंतून रात्रि बारा घंटे पर्यंतीन अवस्था भोगलों. हॉस्पिटलांत मिळिवून "हेपारीन ड्रिप्स" देलावर मझ डोस्के-फिरणे राहले.
घेवडा n beans. घेवडा शेंगा. एक भाजीपाला.
घोटाळा n mess-up. गोंधळ.
घोडा n horse. mare. colt. filly. pony. एक प्राणि. uis घोडाच रेसांत पैसे घालणार कोणहीं जिंतून बाहेर/बाह्येर आलते नाही. घाटलते पैसे पूर्त जाऊन कंगाल झालेवरेच ते वेड॑ दंडक सुटेल.
घोडा n a tall stool. एक उंच स्टूळ (English).
घोडाबंडि n horse carriage. जटका. टांगा.
घोर adj fearsome. भयंकर. अघोर. uis हिरण्यकशिपूला हत्या कराला स्तंभाच आंतून प्रत्यक्ष झालते नरसिंह देवाच घोर रूप शांत कराला प्रह्ळादाला मात्र झाल.
घोर adj palpably deep or dense. घोर. uis (1) नळ-दमयंतीच खाणींत॑ एक शापामुळे दमयंति एक घोर वनांत॑ सांपडींगून वाट चुकून फार तरपडले.(2) गंगाला आकाशांतून भूमीला आणिवाला भगीरथ महाराजा घोर तपस करामते पडल॑.
घोरटे n snoring. झोंपी जाताना नाक/घसांतून येयाच मोठ श्वासाच शब्द. घुरका. uis घोरटे उणे कराला नाकावर घालाच "प्लासटरास्क" अत्तलीकड विकतात.
घोरणे vi to snore. घोरटे सोडणे. uis साधारण म्हणून वय होतां-होतां घोरणे अधीक होईल. म्हातारे झोंपी जाताना जास्त घोरतील.
घोषणा n announcement. proclamation. अग्गिदनालीन कळिवाला कराच वार्ता/समाचार. uis हैदरबादांत राहाच दक्षिणी मराठी बोलणार लोकेंच संघ "सीमा" कार्यक्रम काय असलतरीन अम्ही पंध्रा दिवसाच पुढेच तज घोषणा करतों. तरीन, जास्ति सदस्य येत नाहीत.
घोळ adj disagreeable. unpleasant. कंटाळा वाटाच. ओंगळ. वंगळ.
घोळ n disorderly state of affairs or things. गोंधळाच अवस्था. uis गेल वार मोठ पाऊस अलहोत-ते-दिवस अम्ही भाजीपाला घ्याला संतेला गेलों. संतेच ठिकाण एकदम घोळ होऊन पडल होत-ते-करतां काहीं घेइनास्क पर्तून येऊन गेलों.
घोळ n extreme botheration. थोर तंटा.
घोळ-घेणे vt to irritate or bother (by repeated arguments etc). पुन्हा-पुन्हा (तर्क करून) तंटा करणे. फार उपद्रव करणे ; घोळवणे/घोळविणे in sm. uis (1) कित्तिदपा सांगटल तरीन तो ऐकना. मला पाह्ताना अग्गीन उगे आवश्य नाहीस्क तर्क करून मला घोळ-घेत अस्तो. (2) कोणाच घरांत तरीन एक चखोट कार्यक्रम होत आहे म्हणून कळ्ल तर॑, समेच हिजरा लोक घोळ-घेऊन पैसे उप्पडाला येऊन ओठाकतात/होठाकतात.
घोंट n a gulp. गीळ. घोंटा ; घोट in sm. uis उन्हाळाच दिवसी बाहेर/बाह्येर बिदींत जाणारांना एक घोंट हिंस पाणी देलतर त्येनी तृप्त भोगतील. पैसे असणार एक घोंट ताक पाणी देऊया.
घोंटा n a gulp. एक गीळ. घोंट ; घोट in sm.
घ्या interj take this. हे घेंत॑. हे घ्या. uis कोणाला कर्ज अवश्य नाहीकी त्यंचकडे बॅन्क लोके येऊन "कर्ज घ्या" म्हणून वर-वर घोळ घेतात.
ङ
ङ the fifth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच पांचवां व्यंजन.
No comments:
Post a Comment