07 March 2012







म the twenty-fifth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच पंचेवीसवां व्यंजन॑.

मऊ adj  soft. मृदु. मौ. uis (1) मखमलाच नाहली-ऊंशीच॑ गौसण उदंड मऊ अस्ते. (2) सहा, सात महिनेच ल्हान लेंकरे शिवाला फार मऊ असतात॑.

मऊ fig  mild (mannered). tender (disposition). सौम्य (स्वभावाच). मौ.

मकर॑ n  name of a zodiacal sign. मकर राशि. 

मकरसंक्रमण॑ n  the passage of the Sun from Sagittarius to Capricorn. सूर्य धनुरराशींतून मकरराशीला सरकाच॑. uis जॅनुअरी महिनेंत॑ (पुष्य मास) होयाच मकरसंक्रमण॑ फ़ारच विशेष अस्त॑.

मकरसंक्रांति n  a Hindu festival associated with the movement of the Sun towards the northern hemisphere. उत्तरायनाला संबंध झालते एक हिंदु सण ; मकरसंक्रांत/मकरसंक्रांती in sm. uis मकरसंक्रांतीच सणाला अम्ही वाण वांटून, तीळगूळ, बोर॑, ऊंस अणि ओले हळद सवाष्णींस/सवाशणींस/सुवासिनींस देतों.

मक्का n  maize. corn. मक्काजोळा. एक धान्य ; मका in sm. uis सगडींत॑/शेगडींत॑ भाजलते मक्काच वर॑ लोणी, मीठ अण्खी मिरे लावून खायाला फार बेष अस्ते.

मखमल n  velvet. एक रीतीच मौ कापड॑. uis संगीताच/गाणेच कचेरि आरंभ होयापुढे सभांत॑ गाणे सांगणार बसाच वेदीच समोर तंबड मखमलाच पर्दा बांधून होत॑.

मगज़ n  pulp (of a fruit etc.). मगस. पंडूच आंतल॑ मऊ भाग.

मगन॑ adj  fully absorbed or immersed in. पूर्ण श्रद्धांत॑ बुडून बसणे ; मग्न in sm. uis अत्ता तंजावूर मराठी 'डिक्ष्णरी'/निघंटुच कामांत॑ मी कंपूटरा समोर बसलतर॑ तजांत मगन॑ होऊन जातों. वेळ जायाच कळतच नाही.

मगस n  pulp (of a fruit etc.). मगज़. पंडूच आंतल॑ मऊ भाग.

मग॑ adv  that being the case. तस॑ असलतर. uis "अहो, तुम्ही आज बाहेर जाणारका ? मग॑, अम्ही तुम्च॑ घराला उद्या फोण करून येतों". 

मग॑ adv  then. thereupon. ते नंतर. तज नंतर. uis मग॑ काल सणाच दिवसी तो संपाकी तुम्च घराला आलाच नाही की. नंतर तुम्ही काय केलांत?

मघा n  name of a star. एक नक्षत्राच नाव. uis लेंक्राच जन्म, मघा नक्षत्रांत झाल॑. अदृष्ट केलतीन॑ ! कां म्हण्जे, हे एक महा-नक्षत्र म्हणून सांगतात.

मघाशी adv  a while ago. some time back. थोड वेळाच पुढे. uis मघाशी अम्च॑ पुरोहित घराला आलोते/आल्होते/आले होते. लोंकाच मुंजीला तेनी एक चोखोट मुहूर्त हुडुकून पाव्हून देले.

मजल॑ n  a storey in a building. माडी ; मजला in sm. uis "राम निवास" बिल्डिंगांत॑ अम्च घर सहावां मज़लांत॑ उजव॑ पटीस आहे.

मजा n  fun. तमाशा. तमाषा. uis  काल रविन्द्र नाट्य मंदिरांत चाललते नाटक फ़ार मजा म्हणून होत॑.

मजूरी n  periodic wages. केलते कामाला तम्हा-तम्हा द्याच धर्मा. uis दिवसों-दिवसा सामानाच मोल वाढत असामळे नित्य मजूरी घेणार कामवालांस॑ त्यंच कुटुंब सांभाळणे फार कष्ट झालाहे.

मझ॑ pron  mine. मला संबंध असाच॑ ; माझा in sm. uis मझकडे भरून पुस्तक आहे.

मट्टा n  coconut frond. the composite (dry) leaf of a coconut tree. नारळीच झाडाच पान. मट्टा. uis नारळीच झाडाच मट्टा केम्हाईं कोणाच आंगावरीं पडना. तसच नारळ॑ पणीं खाले पाव्हून पडल॑ म्हणून सांगणे आहे.

मठ॑ n  a hermitage. ऋषींच आश्रम. मेठ. uis स्वर्गलोकाच अप्सरा मेनका तिज लेंकीला कण्वऋशींच मठांत सोडून गेली. ते लेंकरु शकुंतला होती.

मठ॑ n  a religious place associated with the samadhi of a saint. यतीलोकांच बृंदावन असाच एक पुण्य ठिकाण. मेठ. uis श्री राघवेंद्रस्वामींच मठ तुंगभद्रा नदीच कांठशी, मंत्रालयम गांवांत आहे.

मठ॑ n  headquarters of a (Hindu)religious order. धर्म संस्थाच मुख्य स्थल. मेठ. uis कर्नाटका प्रांताच उडुपी पट्नांतल॑ मध्वसंप्रदायाच आठ मठ श्री मध्वाचार्या तेनी अस्तानच स्वता स्थापना केले.

मठाधिपति n  spiritual head of a Mutt. मठाच मुख्य गुरु. uis अत्ताच मंत्रालयमाच मठाधिपतींच नाव स्वामि सुयतीन्द्रतीर्था आहे.

मडके n  an earthen pot. मातीच पात्र. uis उन्हाळांत मडकेच पाणी पीलतर घसाला हिंस॑ अणि हित अस्त॑.

मड॑ n  a dead body. corpse. मढ॑. प्रेत. शव ; मढे/मडें in sm. uis संत होयाच पुढे, तुळसीदास एकदा अंधारांत नदींत तरंगत असाच/मेतकून जातहोतते लांकड म्हणिंगून, एक मडाच वर बसून त्यंच बाइलीच गांमाल गेले !

मड्डि adj  dull headed. stupid. बुद्ध नाहीते. मंद बुद्धीच॑. uis थोड पणीं विवर नाहीते मड्डि पोर तो. तज मित्र तेवढेदनीं तला मष्किरि करतात म्हणून पणीं तल कळत नाही.

मढ॑ n  a dead body. corpse. मड॑. प्रेत. शव ; मढे/मडें in sm.

मण n  a maund, an old measure of weight (aprox. 37kgs). जुने काळच वजन पाह्याच एक माप (सुमार 37 किलो वजन). uis 1975 वर्षी एक मण चोखोट वर्गाच तांदूळ पंध्रा रुपे  होत॑. तेच अत्ता एक हदार पांचशें रुपे झालाहे. म्हण्जे, गेल पसतीस वर्षांत माघाई शंबर वांटा वाढलाहे. 

मणतक्काळि  n  a small fruit of violet colour which after salting and drying is eaten fried. name of the shrub which bears it. जांभळ रंगाच एक ल्हान पंडू (हेला मीठींत॑ वाळिवून तळून खाणे आहे). हे द्याच झुडूपाच नाव. uis गोड्डुपिट्ळेंत मणतक्काळि नाहीतर॑ सुंडेकाय (चुंडेकाय) तळून घालणे आहे. Note. (1) of Tamil origin. (2) "Black Nightshade" in English, मोकोय in Hindi, लघुकवली in Marathi, Botanical name, Solanum nigrum. 

मणि n  a bead. a gem. खडा. uis श्रीरामाच पट्टाभिषेकाच नंतर सीता तिज़ गळेंतसून एक मणीच माळ काडून हनुमंताला देली.

मणि n  a gem. एक रत्न. uis राजाच सोनेच किरीटांत॑ भरून मणि बसिवल्होते.

मणी suff  a word-suffix to mean "in like manner". "सारख॑/मादरी" हे अर्थ द्याच प्रत्यय. मिणी. विणी. वणी. uis उरळेगड्डेच भाजि करताना ते ल्हान-ल्हानमणी चिरून करलतर॑ रूच बेष असल॑. Note :-  an example of inter-use of व and म, as well as the mispronunciation of व/वि and म/मि.

मत॑ n  religion. धर्म. uis अम्च देशांत॑ एवढ॑ वेगळ॑-वेगळ॑ मताच लोक असूनपणीं, त्यंच मधल॑ भांडा-भांडी नियंत्रण सोडून जायनास्क॑ असाच पाव्हू मला आश्चर्य वाटत॑.

मताभिमान n  one who stands staunchly by his religion or sect. स्वंत मताचवर अभिमान असणार. uis मुसलमान आणि क्रिस्तव लोकांस्क हिंदु लोक मताभिमानी नाहीते अस मला वाटते.

मत्ता n  jewelry. माळमत्ता.

मत्स्य॑ n  fish. मासोळी. uis समुद्रांत॑ कित्तिकी वेगळ-वेगळ प्रकारच/विध-विधाच मत्स्य॑ अस्ते.

मत्स्यावतार n  the first of the ten incarnations of Lord Vishnu. महाविष्णूच दहा अवतारांत॑ पहिलच अवतार. uis हयग्रीव नावाच एक राक्षसाच संहार करास्त्व, श्री महाविष्णु मत्स्यावतार काढल्होते/काढले होते. द्रमिळ देशाच राजा सत्यव्रत॑ नदींत तर्पण सोडत अस्ताना, हातांत एक चुम्ण मासोळीच रूपांत हे अवतार काढले.

मद्य n  liquor. दारु. uis घरामागे असाच बीदी वाटे बाहेर जाऊ नको. तिकडे एक मद्य विकाच दुकान आहे. नोकोते लोकांच वाग अस्त.

मद्यपान n  drinking of liquor. दारु पीणे. uis मद्यपान करणे एक उदंड वंगळ दंडक आहे. तसलते लोकां बरोर सहवास ठींगताने.

मधल॑ adj  in the middle. मध्य असाच॑. मधला in sm. uis तिकडे समोर तीन पोरे होटाकलाहेतकी, त्यांतल॑ मधल॑ पोरच मझ भाऊ.

मधुकर n  honey bee. मेध॑माशा. uis वर्षा-वर्षी उन्हाळांत॑ मधुकर अम्च॑ खिडकी बाहेर तज कूडु/घर बांधत॑.

मधुर॑ adj  sweet. गुळ्चीट. uis अंबाच रस फ़ार मधुर॑ आणि रूच अस्त. महाराष्ट्रांतीन गुजरातांतीन लोक॑ हे रसांत॑ पूरी बुचकळींगून खातात॑.

मधू n  honey. मेध॑. uis देवाच पूजा करताना, पंचामृतांत मधू एक मुख्य अभिषेकाच पदार्थ अस्त॑.

मध्य n  centre. मध्य भाग॑. uis ब्रह्मांडाच मध्य स्थल कोठ॑ आहे,  हे विषय भूलोकांत॑ कोणालींच सांगाला होइना.

मध्यरात्रि n  midnight. रात्रीच मध्य वेळ. uis श्रावण महिनेच अष्टमि तिथीला, रोहिणि नक्षत्रांत॑ श्री कृष्णाच जन्म मध्यरात्रि झाल॑.

मध्यान्ह n  midday. noon. मध्य दिवस. दुपार. uis कामाला जावंते/जामते असाकरतां, भरून दाद्ग्येंस मध्यान्हाच संध्यावंदन कराला सौकर्य मिळत नाही.


मध्यें adv  in the middle or at the centre. मध्य भागांत॑. uis मनाली गावांत॑ दोन उंच डोंगूरां मध्ये बियास नदी वेगान वाह्याच दृश्य पाह्याला फ़ारच बेष असत॑.

मध्यें adv  in between. amongst. amidst. मध्यें. uis  देऊळाच उत्सवाच गुंपांत॑ लेंकरू हरपून गेला म्हणून तज माय बाप तरपडत होते. पूरा ठिकाणी हुडकला नंतर॑ हरिकथा कालक्षेपाच गुंपांत॑ बायकांच मध्यें जावून बसलसाच पाह्यलों.

मध्यें adv  inside. within. आंत॑. uis भरूनदा मी मझ॑ मोबाईल फ़ोन अल्मारी मध्ये ठिऊनटाकून घर पूरा हुडकत अस्तें.

मध्यें पडणे vt  to interfere. to come in the way. अडव॑ पडणे. uis कित्ति सांगटलतरीन तो ऐकना. मी बोलताना मध्य पडणे म्हण्जे तला उदंड अवडत॑ वाटते. 

मध्यें-मध्यें adv  at intervals of time. now and then. तम्हा-तम्हा. वेळावेळी. uis (1) उन्हाळांत॑ मध्ये-मध्ये भरून पाणी पीत असांव/असाम॑, नाहींतर आंगांत॑ उष्ण जास्ति होऊनजाते. (2) मोतेच माळांत॑ मध्ये-मध्ये पवळेच मणि बसिवलतर, ते अण्खिन/अंकीन सुंदर दिसल॑.

मध्व॑ adj  relating to Madhwa philosophy or Madhwa traditions. माध्व॑. माध्व॑ सिद्धांत अथवा माध्व॑ परंपराला संबंध झालत॑.

मध्वा n  Madhwacharya. one of the names by which  Shri. Madhwacharya, the founder the philosophy of dualism is known. मध्वाचार्या. द्वैत सिधांताच आदि यति श्रि मध्वाचार्यांच एक नाव.

मध्वा n  a person who belongs to the Madhwa sect. मध्वा संप्रदायाच मनुष.

मनगट n  wrist. तळहाताच जवळच भाग.

मनपूर्व adv  deliberately. (मनाला पूरा) कळींगून ; मनःपूर्वक in sm. Note:- मनःपूर्वक in sm means "whole-heartedly/sincerely/deliberately". uis तज लेंकीच वराडाला मला तो पत्र पाठिवला नाही. अम्च मध्य थोड दिवसापुढे कायकी मनस्ताप झाल॑ म्हणून तो मनपूर्व मला वराडाला बलावला नाही.   

मनमोहन adj  that which captivates the mind. मनाला आकर्ष कराच॑. uis हिमालय पर्वताच जवळ॑ असाच 'धरमताल' म्हणाच ठिकाणी एक बौद्धाष्रम आहे. तिकडे जाऊन आलते लोक तिकडल॑ प्रकृति सौदर्य पाव्हून, ते एक फारच मनमोहन ठिकाण आहे अस॑ म्हणतात॑.

मनशास्त्र n  psychology. study of mental behaviour. मनुषाच॑ मनाला संबंध झालते शास्त्र. uis मानसिक रोग असलते/असाच लोकांस॑ मनशास्त्र वाचिंगिटलते डॉक्टरांकडे बलाइंगून गेलतर कंडिप उपयोग होईल. येतां-येतां हे आधुनिक काळांत॑ मनशास्त्र वैज्ञानिकांच आवश्य जास्ति होत आहे.

मनशांति n  peace of mind. मनाच शांति. मनसमाधान॑. uis एक मनुषाकडे भरून पैशेंकासाच सौकर्य असून पणीं मनशांति नाहींतर॑ तज संपत्तीच काहीं प्रयोजन नाही.

मनसमाधान॑ n  mental satisfaction. मनाच समाधान॑. मनशांति. uis एकावर एक कष्ट येतां मनसमाधाना करतां लोक॑ पूजा, भजन, ध्यान, परिहार नाहीतर सेवा करतात॑.

मनसाक्षि n  one's own mental conscience (to do the right thing). स्वंत॑ मनांत॑ खरे म्हणून वाटाच॑. uis चूक असाच काम करताना अम्च मनसाक्षि अम्हाला अवश्य अडिवते. हे वेळेंत अम्ही अम्च मनसाक्षि सांगास्क वागलतर चोखोट.

मनसोक्त॑ adv  as per heart's wish. मनाला अवडास्क॑. मनाजोक्त॑. uis देवाच दयान॑ अम्च लेंकीला मनसोक्त॑ नवरा मिळून तिन॑ संतोषांत सासुरवाडी संसार करत आहे.

मनसोक्त॑ adv  to heart's content. मनाला तृप्ति होया पर्यंत॑. मनाजोक्त॑. uis हेवंदा आश्चर्यांत तिरुपतींत गुंप नहीत असलतांमळे अम्हाला मनसोक्त वेंकटरमणाच दर्शन कराला झाल॑.

मनस्ताप॑ n  remorse. anguish. चूक केलत्यामळे मलाला लागाच संकट॑. uis बाजू घर्च दाल्ला-बाईलां मध्य कायकी भांडा-भांडि झाल म्हणून मी ऐकलों. अत्ता दोघीं मनस्तापांत॑ बसलाहेते.

मनस्ताप॑ n  grievance. grudge. मनांतल॑ विरोध॑. uis बाप मेलानंतर॑ दायादां मध्य आस्त वांटलत्यांते धक्टा भाऊला थोडक॑ उणे मिळ्ले म्हणून तो थोर मनस्ताप करींगून बसलाहे.

मनस्थिति n  state of mind. मनाच स्थिति. uis अम्च वरला आफीसर अत्ता उदंड र्रागान आहे. तज मनस्थिति बदलजोरी अम्च प्रश्न काहीनच तजकडे सांगताने ; नाहीतर शिवा पडल॑ !

मन॑ n  mind. मन्न॑. मनस. uis ल्हान लेंकरांच मन॑ कोवळ अणी निर्मळ/निर्मल असून त्यांत कलमश असत नाहीं. तजमळेच त्यनी/तेनी सदा संतोषांत अस्तात.

मनाजोक्त॑ adv  as per heart's wish. मनाला अवडास्क॑ ; मनाजोगा in sm. uis शेवटल॑ लेंकरू असून लाड जास्ती झालतांमुळ॑, तज मनाजोक्त॑ अग्गीन (अस्कीन) चालावं/चालाम॑ म्हणींगतो. सांगिटलते गोष्ट ऐकना म्हणतो.

मनाजोक्त॑ adv  to heart's content. मनाला तृप्ती होयापर्यंत॑ ; मनाजोगा in sm. uis परिक्षा संपल्यानंतर/वारला नंतरे पोरे गोआला जाऊन मनाजोक्त॑ समुद्राच कांठ्शी मजा करून आले.

मनावणे vt  to win over. to persuade. (दूसरेंच) मन्न (अम्ही सांगास्क॑) बदलिवणे. uis मझ बहीण फार अहंकारि स्वभावाच॑. तिन॑ एक निर्णय घेटली म्हण्जे तिला कोणाचानीं मनावाला होईना.

मनांत adv  in the mind. मनाच आंत. uis  थोर कंपनींत लोक्कर काम मिळाम म्हणून तो देऊळांत होटाकून मनांतच प्रार्थना करत होता.

मनांतच गुंडाळणे fig  to mull over repeatedly. to fret over repeatedly. विचार/चिंता मनांतच ठींगून तरपडणे. uis लेंक सांगनास्क वेगळ जातीच पोराला वराड करींगटलते तेनाला सुद्धांग अवडल॑ नाही. ते विषय त्यंच मनांतच गुंडाळत आहे. तजमळच तेनी कोणाकडीन बरोर बोलनात आहेते.

मनांत-होणे vi  to register in the mind. to understand. समजणे. कळणे. uis आज शाळेंत/साळेंत शिकिवलते पाठ फ़ार कष्ट होत॑. पुस्तक चारदा वाचलां नंतरच मला ते मनांत झालते.

मनु n  the primordial father of the human race in Hinduism. हिंदु धर्मांतल॑ आदिपुरुष॑. uis मनु ब्रह्मा स्रिष्ट केलते, हिंदु धर्मंतल॑ पहिल/आदि पुरुष॑ आहे. मनूच धर्मपत्नीच नाव शतरूपा असून, तेनी दोघीं मिळून हे मानव जातीच उत्पन्न केले.

मनुवाद n  the laws laid down by Manu. मनुस्मृती.

मनुष n  man. मनुष्य. uis मी पाष्टे पासून तज वाट पाह्त आहें, म्हण्जे तो मनुष॑ अण्खिन आलाच नाहीं.

मनुष n  a person. एक व्यक्ति. uis सिनिमा थियटराच कौंटराच मागे कोणीं दिसत नाही. आंत मनुष कोणतरीन आहेतका पाह.

मनुष्यबळ n  physical help by way of number of people to help. सहाय कराला असाच लोक. uis ते घरचे व्यापारांत आहेत करतां त्यंच घरांत मुंज-वराड कराला तेनास॑/त्यांस मनुष्यबळ केम्हीन अस्ते. अम्चस्क कष्टि भोगणे नको.

मनुस्मृति n  the laws laid down by Manu. मनुवाद॑. uis ब्रह्माच मानस पुत्र मनु मनुस्मृति म्हणाच ग्रंथांत॑ एक गृहस्ताचीं एक गृहिणीचीं दिनाचार्य कस असावं/असाम॑, तेनी कस-कस वागींगावं/वागींगाम॑ हे स्पष्ट केलाहे.

मनोगत॑ n  trend of thinking. योचना जायाच वाट. uis मनशास्त्र शिकलते लोके दूसरेंकडे बोलताना त्यंच मनोगत फार सूष्मांत॑ पाह्याला प्रयत्न करतील॑. 

मनोत्स्व॑ n  enthusiasm. मानसिक॑ उत्साह. uis पंचेऐंशी वर्ष झालासल तर पणीं मझ सासूच मनोत्स्व॑ थोड पणीं उणे झाल नाही. तेनी असाच ठिकाणी सदा संभ्रम अस्त॑.

मनोद्देश n  intent/design/purpose (of thinking). चिंताच/योचनाच उद्देश. uis कित्येक राजनीती दळ बाहार बोलाच एक विध अस्ते अणी तेनी कराच काम तज विरुद्ध अस्ते. त्यंच मनोद्देश काय म्हणून अम्हाला अर्थ होत नाही.

मनोधर्म n  mental disposition. मनाच स्थिति. uis प्राणायाम अणी ध्यान, हे योगीलोकांच नित्यकर्म असलतांमळे, त्यंच मनोधर्म सदा शांत अणी संपूर्ण अस्त॑.

मनोधैर्य n  mental strength. will power. मनोबळ. मनशक्ति. uis कष्टाच समयांत॑ प्रार्थना करताना देवाकडे मनोधैर्याच आशिर्वाद पहिल॑ विचाराम॑. मनोधैर्य अस्लतर कष्ट सोसींगून त्यांत्सून बाहेर याच वाट अम्हाला दिस्त॑.

मनोनुकूल adv  suited to one's liking or thinking. मनाजोक्त॑. मनासोक्त॑. uis मी काम करतहोतते कंपनींतल॑ वरच अधिकारि प्रति वर्ष चालाच "सेल्स मीटिंग" त्यंच मनोनुकूलाच दिवस अणी ठिकाणि ठिवत होते. ते वेळाला त्यंच मित्राच कुटुंबांत ते ठिकाणी मुंज की वराड की होयाच आहे म्हणून आफीसांत॑ सग्ळांसीन कळत होते. स्वंत जेबांतून पैसे वेच करून जाणे अवडनात करतां तेनी अस करत होते.

मनोनुकूल adv  as suiting one's mind/thinking. मनाजोक्त॑. मनासोक्त॑. uis तुला काय अवडतकी तुज मनोनुकूला प्रकर करत जा. मला कां विचारतोस॑ ?

मनोबळ n  mental strength. will power. मनाच॑ शक्ति. सहनशक्ति. मनोधैर्य. uis आजोबाच मुशारा/धर्मा फ़ार उणे असून घरांत भरून लेंकरे असल तर पणीं, आजीच मनोबळामुळे तिज संसार बेष चालले अणी तिज लेंकरे अस्गीं बेष वाचून पुढे आले.

मनोभाव n  natural attitude of the mind. मनाच स्वाभाव. uis परोपकार अणी त्यागाच मनोभाव असलतेनी हे लोकांत फ़ार अपरूप झालाहते. पोणावंटा लोक॑ मतलबी अणी स्वयंसेवी अस्तात॑.

मनोरमा n a woman who is a source of mental happiness. मनाला संतोष आणणारी स्त्री. uis अमच॑ घरच॑ सून फ़ार चोखोट स्वभावाच पोरी. तिज नाव मनोरमा म्हणून तिज माय-बाप बरोरच ठिवले !

मनोरंजन n  entertainment. amusement. मनाला कौतुक देणार. uis तीस वर्षापुढे टीवींत 'दूरदर्षन' मात्र येत होते. तम्हा लोक॑ पुस्तक वाचणे, बंधूलोकांना कागद लिव्हणे अस उपयोगी काम करतहोते. अत्ता टीवींत दोन्शें चान्नल येणामळे मनोरंजनावर अम्ही असलते वेळ पूराहीं व्यर्थ करत आहों अणी उपयोगी काम करणे सोडूनटाकलाहों.

मनोरंजितम n  name of a flower. एक दिनस फूलाच नाव. Note. from Tamil.

मनोविकार॑ n  emotional feeling. भावना.

मनोहर adj  attractive. आकर्षण॑ कराच॑.

मन्न॑ n  mind. मन॑. मनस.

मन्न॑ n  will. मनाला वाटणे.

मन्न॑ n  liking. आग्रह. इच्छा.

मन्मथ n  the Hindu deity of love, the 'churner of desire'. कामदेव.

मन्मथ fig  personification of a handsome male. पाह्याला सुंदर असाच मनुष. uis त्यंच लोंक उदंड वाचून चोखोट कामांत आहे. मनुष पणीं पाह्या मन्मथास्क आहे. तला वराड करींगाला पोरी लैनांत ओठाकतील॑ !

मन्वंतर॑ n  an epoch. युग॑.

मम pron  my. mine. मझ॑. uis होम कराच वेळी अम्ही संकल्प करला नंतर आचारे/पुरोहित मंत्र सांगतील॑ अणी प्रत्येकदा "मम" म्हणून अम्ही सांगामते अस्ते. तज अर्थ काय म्हण्जे "होय॑, मझ॑ (सम्मत॑), मीच, मलाच" अस आहे.

ममता n  affection. प्रीति.

मय suff  a suffix indicating pervasiveness or repleteness. "भरून आहे" अस दाखिवाच शब्द. uis पावसाळाच दिवसी चेन्नैंत अम्च नव प्लाट पाह्याला निघलों. ते थोर चूक होऊन गेले. दोन किलोमीटर दूर मातीच रोड होते. तजमळे एकदम चिक्कोलमय. टॉक्सी वाटांत राहूनगेले. अम्हाला कसाला गेलों म्हणून वाटूनगेल॑.

मयक्कम n  fainting. a swoon. मूर्च्छ. बोध नाहीस्क॑ होणे. Note. from Tamil.

मयिल n  peacock. peahen. मयूर. मोर. Note. from Tamil.

मरतक॑ n  emerald. एक रत्न. हिर्व पाच. पाचू. 

मरण n  death. मृत्यु.

मरणकाल॑ n  last days of life. अंतिमकाल॑.

मरणे vi  to die. मृत्यु होणे.

मराठा n  a person belonging to the Maratha community. मराठा जातीच मनुष॑.

मराठी n  Marathi language. मराठी भाषा.

मरामत n  repairs. हाळ झालते बरोर करणे.

मरुभूमि n  sandy desert. वाळूच विजन प्रदेश.

मर्म n  hidden secret. essence. रहस्य अर्थ.

मर्मस्थान॑ n  vital spot in an organism or body. आंगाच अवयवांत॑ मुख्य स्थळ॑.   

मर्यादा n  decorum. decency. विनय॑ स्वभाव॑.

मर्यादा n  respect. बहुमान॑. आदर॑.

मलई n  cream of milk. दूधाच साये.

मलम n  ointment. मल्लम. घावाच वर लावाच ओखद॑/औषध.

मलमपट्टि n  plaster on a wound. घावाच वर मलम लावून तज वर बांधाच पट्टि.

मलमल n  muslin. मऊ कापूसाच कापड॑.

मलविसरजन॑ n  defecating. परसाकडे जाणे.

मल॑ n  filth. मळ॑. मळक॑. गलीज.

मल॑ n  excreta. गू.

मला pron. for me. स्वताला. मलाच॑.

मलिन॑ adj  soiled. dirty. मळक॑ झालते. ओंगळ॑/वंगळ॑ झालते.

मल्लम n  balm. medicinal ointment. मलम. सूज, फोड॑ हेजवर लावाच ओखद॑. 

मल्लयुद्ध॑ n  wrestling. कुस्ति.

मल्लिका n  jasmine. मल्लीच फूल. मोगराच फूल. मल्लिपू (Tamil).

मल्लीपू n  jasmine flower. मोगराच फूल. मल्लीच फूल. Note. from Tamil.

मल्हारी n  an incarnation of Lord Siva. शिव महादेवाच एक अवतार.

मळक॑ adj  dirty. soiled. मळ झालते. गलीज झालते ; मळका in sm. uis कित्येकदन त्यंच घर मळक॑ ठींगाच पुरनाम्हणून घराच बाहेर पणीं कुप्पा टाकून गलीज कराच पाह्ताना मला संकट वाटते. 

मळणे vi  to get soiled. मळ होणे. गलीज होणे.

मळमळणे vi  to have a vomiting sensation. to feel nausea. वांत यास्क॑/करास्क वाटणे. uis मला होटलांत जेवणे म्हण्जे थोडपणीं अवडना. थोड दिवसा पुढे होटेलांत जेवून पोटांत मळमळत॑ होते. एकदा वांत केलावर बरोर झाल॑/होऊनगेल॑.

मळ॑ n  filth. गलीज. मेळ. मळक॑.

मळिगे n  grocery. संपाकाला आवश्य असाच पदार्थ. दाळ-तांदूळ. जिरे-मिरे. मीठ-मिरे. किराणा.

मळे prep. on account of. कारणा करतां. मुळे.

मशी n  ink. लिव्हाच मशी.

मशी n  lampblack (applied in the eye). मसी. काजळ.

मशीद n  masjid. मुसलमानांच प्रार्थना मंदिर.

मष्करी n ridicule. buffoonery. परिहास. अपहास. मस्करी ; मस्करी in SM
मसाला n  ingredients used for imparting better taste to food. संपाकाच पदार्थांला जास्ति स्वाद आणिवाला उपयोग कराच पदार्थ.

मसाला adj  spicy or colourful. आकर्षण कराला जास्ति मिळिवाच॑. uis दारा सिंगाच मसाला सिनिमा पाह्याला मला उदंड अवडल॑.

मसाला fig  fancyful spin (of talk). आवश्या पक्षा जास्ति (जोडून सांगणे). uis तला जास्ति काईं/काहीं कळना तरीन, उगे मसाला घालून बोल्ण्यांत॑ उणे काहीं नाही !

मसी n  lampblack applied eyes. मशी. काजळ.

मसी n  writing ink. लिव्हाच मसी.

मसूर n  a type of lentil/pulse (considered by some as inferior to tur dhal). एक रीतीच दाळ (तूर दाळाच पक्षा थोड उणे गुणाच). uis तूरीच दाळीच मोल अत्ता किलोला सत्तर रुपे आहे. गेल वर्ष शंबर रुपे पतोरी झाल्होत॑. पुन्हा तेच विधानी मोल वाढत असलतर अम्ही मसूरदाळच उपयोग कराम॑.

मसूरी n  small pox. देवी.

मस्करी n  ridicule. buffoonery. परिहास. अपहास. मष्करी ; मस्करी in SM

मस्का n  butter. लोणी.

मस्का fig  sycophancy. कार्य साध्य होयाला दुसरेला स्तुति कराच॑.

मस्का बडिवणे id  to indulge in sycophancy. to curry favours. कार्य साध्य होयाला दुसरेंला स्तुती करणे.

मस्त adj  of puffed up mental state. to become haughty. डोस्के फुगलते स्थिति. डोस्के फिरलते स्थिति. दुरहंकाराच स्थिति. डोस्के चढलते स्थितीच. uis अत्ता अस्कीन तो थोडपणीं सांगाच ऐकत नाही. तज चक्कोटालाच अम्ही सांगतों म्हणून तला वाटत नाही. मस्त  धरून बसलाहे.

मस्त adj  plentiful. भरून. उदंड. uis हे वर्षी अम्च देशांत 150% (दीड वांटा) जास्ति पाऊस पडलाहे. तजमळे सर्व डेमांतीं, सरोवरांतीं मस्त पाणी भरलाहे. देवाच दयान॑ याच एक वर्षाला पाणीच प्रश्न/कष्ट असना !

मस्त n  a mental condition in an elephant which makes it very aggressive. हत्तीच मस्त.

मस्तक n  head. डोस्के. uis (1) मोटर सैकल सोडणार/पळिवणार 'हेलमेट' कां घालिंगत नाहीत म्हणून मला अर्थ होत नाही. त्यंच मस्तक दत्तन ठींगा करतांच म्हणून त्यांस/तेनास॑ कां कळत नाही ? एक वेळ त्यंच डोस्के खालि आहेकी कायकी ! (2) देऊळांत उत्सवाच दिवसी देऊळाच हत्तींच मस्तकांच वर बांधून असाच झळकाच पट्टा पाह्याला फार बेष/बेश अस्ते.

मस्तक n  skull. कपाळ.

मस्ति n  insolence. perverted audacity. गर्व. अहंकार. फुगलते डोस्के.

मस्ति fig  mischievousness tending towards rowdiness. दुष्टपणाच खोडी नाहीतर॑ चेष्टा. uis चार लेंकरांबरोर खेळताना ते पोर मात्र अग्गिदनालीं उजंड सळिवत असतो. तला मस्ति लागलाहे वाटत॑.

महत्व n  greatness. माहात्म्य॑. महिमा.

महत्व n  importance. मुख्यत्व॑. मुख्यता.

महर्षी n  great saint.  श्रेष्ट/महा ऋषी.

महंत n  head of a religious sect or order. मठाधिपति. uis अत्तलीकड लटक/खोटे आश्रम अणी डोंगी महंत गामांत फार झालाहे. त्यंच दृष्टि पैसे वरीं बायकां वरीं अस्ते.

महा adj  great. श्रेष्ट.

महाकाव्य n  an epic poem. एक श्रेष्ट काव्य.

महात्मा n  a great soul. थोर मनाच मनुष.

महादेव n  Lord Siva. भगवन शंकर.

महादेवि n  Goddess Durga. दुर्गा देवि.

महाद्वार n  main entrance to a temple. देऊळाच मुख्य कवाड.

महाद्वीप n  continent. भूखंड.

महान adj  great. noble. थोर मनाच. श्रेष्ट.

महानवमि n  ninth day of navaratri festival. नवरात्रि सणाच नौवां दिवस.

महानक्षत्र॑ n  birth star with greater attributes. चोखोट गुण॑ असाच एक जन्म नक्षत्र.

महानुभाव adj  magnanimous person. great person. eminent person. श्रेष्ट मनुष.

महापाप n  a great sin. cardinal sin. घोर पाप. uis गरीबांला दगा करणे/एमारिवणे एक महापाप आहे.

महापुरुष n  a great person. an eminent person. महानुभाव. श्रेष्ट मनुष.

महापूजा n  the main puja in a temple. देऊळाच मुख्य पूजा.

महाप्रयास n  great effort. मोट्ठ॑ प्रयत्न.

महाप्रळय॑ n  great deluge. संततधार र्रिचिवाच पाऊसांत होयाच सर्वनाश ; महाप्रलय in sm.

महाभारत n  the great epic of Hinduism. हिंदु धर्माच एक महाकाव्य/पुराण.

महायुद्ध n  world war. विश्व युद्ध.

महायुद्ध n  great war.  एक मोट्ठ॑ युद्ध.

महार n  name of a caste. एक जातीच नाव.

महार n  a person who belongs to the mahar caste. महार जातीच मनुष.

महारथि n  a mighty warrior. मोट्ठ॑ योद्धा.

महाराजा n  a sovereign king. साम्राट.

महाराणि n  queen consort of maharaja. महाराजाच पत्नि. पट्ट-राणि.

महाराणि n  a sovereign queen. स्वता राज्य कराच राणि.

महाराष्ट्रा n  name of one of the states in India. भारतांत॑ एक राज्याच नाव.         

महाराष्ट्री n  precursor of present day Marathi language. मराठी भाषाच एक प्रचीन रूप.

महारष्ट्रीय adj  belonging to Maharashtra. महाराष्ट्राला संबंध झालते.

महारोग n  leprosy. कुष्ट रोग. महाव्याधि.

महाल n  a mansion. a palace. एक मोट्ठ॑ बंगळा. uis मझ एक मित्र 'यू.केंत' थोर डोक्टर म्हणून आहेते. तेनाला एक 'एकर' जमीनांत दहा 'बेडरूमाच' एक घर आहे. त्यंच घराला एक महाल म्हणूया.

महालय n  the dark  fortnight during Badrapada month during which departed souls are propitiated. पूर्वजांस/पितृलोकांस॑ श्राद्ध कराच भाद्रपद महिनांतल॑ कृष्णपक्ष॑. महालय पक्ष॑.

महालक्ष्मि n  Goddess consort of Lord Vishnu. महाविष्णूच सपत्नि देवि.

महावाक्य n  sayings from the Vedas. वेदवाक्य.

महाविद्यालय n  college. डिग्रि (बिरुद) क्ळास पर्यंत॑ असाच शिक्षण॑ संस्था.

महाविष्णु n  Lord Vishnu. नारायण.

महावीर adj  mighty warrior. मोट्ठ॑ योद्धा.

महावीर n  name of the founder of Jainism, he being of the 24 main saints of Jainism. जीन धर्माच 24 तीर्थंकरांत॑ एक. जीन धर्म हेनीच स्थापना केलते.

महाव्याधि n  leprosy. कुष्ट रोग. महारोग.

महाशिवरात्रि n  a festival in honour of Lord Siva. शिव भगवानाला संबंध झालते एक मोट्ठ॑ सण॑. 

महासागर n  ocean. मोट्ठ॑ समुद्र॑.

महिना n  month. मास. तीस दिवसाच काळ॑.

महिमा n  greatness. glory. थोर्वि. थोरविपण॑.

महिला n  woman. स्त्री. बायको.

महेश्वर n  Lord Siva. शिव. शंकर.

महोत्सव n  a grand festival. एक थोर उत्सव.

मंगल adj  auspicious. शुभ॑. मंगळ.

मंगलकार्य n  a sacred function. एक शुभ॑ कार्य. मंगळकार्य.

मंगलमूर्ति n  the benevolent God. Lord Ganesha. श्री गणेष. मंगळमूर्ति.

मंगलवाद्य n  auspicious music. मंगळवाद्य. शुभगाणे. uis जुने काळांत अस्कीन सणाच दिवसी पाष्टे वाजंत्रि होत होते. अत्तच काळांत॑ सणाच दिवसी घरांत॑ अम्ही मंगलवाद्याच 'सीडी' ठिवतों/घालतों. तजमळे मनाला एक विधाच आनंद वाटते.

मंगलारति n  arati performed at the end of a puja. मंगळारति. पूजाच शेवटि कराच आरति.

मंगलाष्टक॑ n  slokas recited as blessings at the time of marriage, thread ceremony etc. मंगळाष्टक॑. वराड, मुंज॑ असले कार्यक्रमांत॑ सांगाच अनुग्रह श्लोक.

मंगळ n  the planet Mars. एक ग्रहाच नाव. मंगल.

मंगळ adj  auspicious. शुभ॑. मंगल.

मंगळकार्य n  a sacred function. एक शुभ॑ कार्य. मंगलकार्य.

मंगळमूर्ति n  the benevolent God. Lord Ganesha. श्री गणेष. मंगलमूर्ति.

मंगळवाद्य n  auspicious music. मंगलवाद्य. शुभगाणे.

मंगळवार n Tuesday. सोमवाराच नंतरल॑ दिवस.

मंगळसूत्र n  a necklace made of gold beads and black beads signifying the marital status of a woman. गरसोळि. मंगलसूत्र.

मंगळारति n  arati performed at the end of a puja. मंगलारति. पूजाच शेवटि कराच आरति. uis मंगळारति दोन हातावाटे लावींगणे चोक्कोट न्हो.

मंगळागौरि n  name of a pooja performed by married ladies during Shravana month. श्रावण महिनांत॑ वराड झालते बायका कराच एक सणाच नाव. मंगलागौरि.

मंगळागौरि n  Goddess Parvathi. पारवति देवि. मंगलागौरि.

मंगळाष्टक॑ n  slokas recited as blessings at the time of marriage, thread ceremony etc. मंगलाष्टक॑ . वराड, मुंज॑ असले कार्यक्रमांत॑ सांगाच अनुग्रह श्लोक.

मंगूस n  mongoose (which feeds on snakes etc.). (सर्प वगैरा प्रांणींला खायाच) एक ल्हान प्राणि. मुंगूस.

मंच n  a stage. पीठ. रंगमंच. वेदि.

मंजरि n  a blossom. bud. मोहर. मोग्गु (Tamil).

मंजुळा adj  melodious. pleasing to the ear. ऐकाला मधुर॑ असाच॑.

मंटप n pavilion. मंडप.

मंटप n a small covered structure used for keeping Gods' idols. मंदासन॑. मंडप.

मंडप n  pavilion. मंटप.

मंडप n  a small covered structure used for keeping Gods' idols. मंदासन॑. मंटप.

मंडल n  an assembly. a group. सभा. मंडळ. मंडळी.

मंडळ n  an assembly. a group. सभा. मंडल. मंडळी.

मंडळी n  an association of people. a society. संघ. समुदाय. समागम. मंडल. मंडळ.

मंडि n  soft soapstone. एक विधाच मौ धोंडा. Note:-  the vessels made of the soft  मंडि stones were used for specific purposes in olden times.

मंडि n  a soapstone cooking vessel. बळपाच पात्र.

मंडि n  thick residue of a liquid. एक द्रव्याच बुडांत॑ असाच घट्टि उरलते भाग. राड.

मंडि सांबार भात n a preparation made by cooking rice, dhals and sambhar masala in a vessel made of soapstone vessel. तांदूळीं दाळीं सांबार मसालाहीं मिळिवून मंडीच भांडींत॑ कराच एक पदार्थ.

मंडी n  an open whole-sale market for for fruits, vegetables, grains etc. मोत्त व्यापाराच बाज़ार ; मंडई in sm. uis अम्ही वाराला नाहीतर दहा दिवसाला एक दिवस मंडीला जाऊन अम्हाला पाह्जते भाजीपाला घेऊन येतों.

मंतर॑ n  a sacred hymn. देव पूजाच मंत्र.  मंत्र. uis कित्येक आचारे लोक॑ मंतर सांगणाचपक्षा होम संपलावर पात्र, दाळ-तांदूळ, दक्षिणा असकीं गट्टा करणांत जास्ति ध्यान देतात॑.

मंत्र n  a sacred hymn. देव पूजाच मंतर॑.  मंतर॑.

मंत्र n  a spell. a charm. तंत्र प्रयोग कराला सांगाच वचन॑.

मंत्रतंत्र n  charms and spells seeking favours from spirits and demigods. black magic. उपदेवतांस॑ प्रीति कराला सांगाच मंत्र.

मंत्रपुष्पांजलि n  offering of a handful of flowers to Gods while reciting mantras. पूजाच वेळी देवाला फूलाच अंजली देणे.

मंत्रप्रयोग n  sorcery. मंत्रतंत्र करणे.

मंत्रवादि n  magician. जादूगर.

मंत्रवादि n  sorcerer. मंत्र प्रयोग दुरुपयोग करणार.

मंत्रशक्ति n power of mantras. मंत्राच शक्ति.

मंत्रालय n  ministerial offices. मंत्रियांच कचेरि.

मंत्रालया n  name of the town where Sri. Raghavendra Swamy's brindavana is located. श्रि राघवेन्द्रस्वमींच ब्रिन्दावन असाच गांवाच नाव.

मंत्राक्षता n  consecrated rice, smeared with turmeric and kumkum powder. पूजा, वराड॑ असल॑ शुभ कार्याला उपयोग कराच हळदी-कुंकू लावलते तांदूळ. uis अम्ही मंत्राक्षता करताना हळद अणी कुंकू हे दोनीं मिळिवतोतरीन कुंकू मिळिवनाते मंत्राक्षतापणीन मी बंगळूरांत कित्येक घरांत पाह्यलोंहें.

मंत्रि n  minister. मंत्रि.

मंत्रिमंडळ n  ministerial cabinet. मंत्रियांच कॅबिनेट. मंत्रियांच संपुट॑.

मंथन n  churning. घुसळणे. uis क्षीरसागर मंथन करताना आलते विष गिळनास्क॑ कंठांतच राह्यल-ते-करतां महादेवाच कंठ नील रंग झाल॑ अणी त्यांस॑ "नीलकंठ" अस नाव आल॑.

मंद adj  dull. stupid. मड्डि. बुद्धि जास्ति नाहीते.

मंदबुद्धि adj  dull witted. मड्डि. बुद्धि जास्ति नाहीते.

मंदस्मित n  smile. मंदहांसू .

मंदहांसू n  smile. मंदस्मित.

मंदासन॑ n  puja mantap. पूजाच मंडप. पूजाच मंटप.     

मंदिर n  temple. देऊळ.

माईंगणे vt  to ask for and procure. माहींगणे. मागींगणे.

माईंगणे vi  to receive. to obtain. माहींगणे. मागींगणे. uis मझकडून एक लाख रुपेच र्रीण घ्याला आलते मनुष नंतर॑ एक हदार(हजार) रुपे माईंगून गेला.

माकड n  monkey. वानर॑. Note :- the प्राकृत form of मर्कड.

माकड चेष्टा n  monkey tricks. माकडाच खोडि.

माकड चेष्टा fig  mischievous antics. तंटाच खोडि.

माकडाच हाति फूलाच माळ॑ say  a saying meaning "responsibility with one with a destructive attitude". "विनाशबुद्धीच मनुषाच जवाबदारी", हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being, "garland in onkey's hands". 

माखणे vt  to smear. to daub. लिंपणे. लेपणे.

माखणे vt  to have an oil bath. तेल लावून स्नान/आंघोळि करणे.

माखिवणे vt  to give one an oil bath. दूसरेला तेल लावून आंघोळी करिवणे.

माखिंगणे vt  to have an oil bath. तेल लावून स्वता आंगोळ करणे.

मागणे vt  to demand. to ask for. विचारून घेणे ; मागणे in SM.

मागच॑ adj  that which is at the back side or behind. at the back. मागे पठीसच. मागल॑ ; मागचा in sm.     

मागपठीस n  back side. पाठीच मागे.

मागल॑ adj (that which is) behind. मागे असाच. मागच॑ ; मागला in sm. uis मझ भावाच मागल॑ घरचा तज बांधोटी मझ भावाच घरचे भोंतालभिंतींसून पांच फ़ुटपणीं सोडनास्क बांधलाहे. हे नियमा प्रकार विरुद्ध आहे.

मागिवणे vt  to place a demand. to order. to ask for and procure. (एक वस्तु) मागिवून घेणे ; मागवणे in sm. uis मी विचारींगून गेलते पुस्तक दुकानांत नहोत॑म्हणून (न्होत॑म्हणून) दुकानदार मला ते प्रत्येकहोवून मागिवून देला.

मागींगणे vi  to receive. to obtain. माहींगणे. माईंगणे. uis मझकड॑ अनावश्य बोलाला आलत्या मनुषाला मी दोन रपाटा देलों. तोंड झांकींगून ते मागींगून गेला.

मागून adv  afterwards. subsequently. माग्हून. नंतर॑. मावून ; मागाहून in sm.

मागून adv from behind. मागे पठीस कडून. मागेपठीसून. माग्हून.

मागे prep  behind. मागे.

मागे adv  back side. मागे पटीस.

मागे adv  at the back of. मागे.

मागे prep in time past. मागल॑ वेळी. मागे पसून.

मागेपुढे adv  at about. either before or after. मागेकी पुढेकी कृत्य नाहीस्क॑. uis हैदराबादास्क 'ट्राफिक' असाच ठिकाणी कोणतरीन दोन-तीन कामावर बाहेर गेलतर॑ पर्तून घर येऊन पावणे सांगिटलते वेळाला होणे संदेहच॑. मागेपुढे होईल॑.

मागेपुढे adv forward and backward, in both directions. मागेहीं पुढेहीं, दोनीकडीं.

मागेपुढे fig  (to have) rough idea (before hand). ' कोठे/काय' अस॑ (पुढेच कळणे). uis तो पोर वाचणांत॑ षाणा काहीं न्हो. अत्ता आस्ट्रेलियाला वचाला जाम॑ म्हणून बसलाहे. तिकडल॑ अत्तच परिस्थिति काय म्हणून मागेपुढे कळनास्क॑ तज मायबापाच प्राण काढत आहे.

माग्हून adv  afterwards. subsequently. नंतर॑. मागून. मावून ; मागाहून in sm.

माग्हून adv  from behind. मागे पठीस कडून. मागेपठीसून. मागून.

माघ n  costly. dear. म्हाग. जास्ति मोलाच. सवंगाच विरुद्ध. uis अधीक जरी घाटलते लुगड॑ फार जेड असत॑ अणी, तसच माघ पणीं असत॑.

माघ  n  name of the eleventh month in the Hindu calendar. हिंदु पंचांगांत॑ अक्रावां महिनाच नाव.

माघपसून adv  since a while ago. थोड दिवसाच पुढ॑ पसून ; मघापासून in sm.

माघाई n  cost of living. dearness of goods. सामानांच वाढाच मोल ; महागाई in sm. uis अम्च देशांत खायाच पदार्थांच माघाई अत्ता 16  % (सोळा प्रतिशत) आहे. हेज अर्थ काय म्हण्जे 'होलसेल' व्यापारी लोके सामान लप्पून ठिवून मोल वाढाला सोडतात॑. तजांत अम्च नेता लोकांच हात पणीं असूया म्हण्तात.

माज n  waist. माद. कमर.

माट्टि n  an ear ornament worn by women, hanging from top to bottom of the ear. कानाच व॑रून खाले पर्यंतीन लोंबून घालाच बायकांच एक आभरण॑.

माठ n  a type of edible green leaf.  माठाच पाला/भाजि. पात्ति कीरै (Tamil). uis  अम्च घरांत माठाच भाजि करणे अप्रूप होऊन गेलाहे/झालाहे. 

माठोडा n  a side dish of cooked dhal and methi/fenugreek leaves or cluster beans or plantain flowers. शिजिवलते दाळाच बरोर मेथीच-पाला, गोवारिशेंगा नाहीतर केळीचफूल मिळिवून/घालून कराच एक तोळ्लावण॑-भाजि (तोंडलावण॑-भाजि). Note:-  माठोडा was a subsistence food of the poor class of Maharashtrians in the dry parts of the Deccan, prone to scanty rains. Though it appears to have derived it's name from the edible leaf माठ, in the present times  माठोडा-भाजि is rarely made from माठ. 

माडि n  an upper storey in a house or a building. घराच अथवा बांधणीच वरच॑ भाग/मजल॑.

माणिक n  ruby. तंबड॑ रंगाच एक रत्न.

माता n  mother. अम्मा. माय॑.

माति n  soil. माति.

मातृभाषा n  mother-tongue. मायभाषा.

मातृभूमी n  motherland. स्वंत देश.

मातृभोजन n  the ceremonial meal that a young brahmin boy has with his mother on the day of his upanayanam. मुंजीच दिवस जानव घालाच पुढे मुंजीच नवराईं तज मायीं एकच पानांत कराच जेवणे. uis अगाऊच काळांत मुंज झाला वर ब्रह्मचारि पोरांला गुरुकूलाला पाठिवत होते. अणी हे पोरे वेद, उपनिषद हे सर्वीं शिकून बारा वर्षाच नंतर॑ घराला परतून येत होते. तजामळे मातृभोजनाच मुख्यता होते. पण अत्ता मुंजीच नंतरपणीं पोर घरांतच असतात॑ ! Note:- he is not supposed to eat in this manner along with is mother after that day.

मात्र adv  exclusively. पूर्त. केवळ. uis अम्ही भाऊ-भावंडे पांचदन॑ आहों तरीन अमच॑ चुलतभाऊच लेंकीच वराडाला मला मात्र बलावल॑होते.

मात्र adv only. पूर्त. केवळ. uis ते परीक्षा लिव्हाला शेवटी वीस लेंकरे उरल॑होते. त्यांत मझ॑ नातू मात्र जिंतला.

मात्रा n  a medicinal tablet. ओखदाच (औषदाच) गोळी. ओखदाच गुळिगा. 

माद n  waist. माज. कमर. Note :- another example of the inter-use of द and ज in TM.

मादरि n similar type. एकच रीतीच॑. एक विधाच॑. Note :- from Tamil.

माधवा n  Lord Krishna. श्रिकृष्ण.

माधुरि n  sweetness. गुळ्चीट.

माध्व॑ adj  relating to Madhwa philosophy or Madhwa traditions. मध्व॑. माध्व॑ सिद्धांत अथवा माध्व॑ परंपराला संबंध झालत॑. uis माध्व॑ परंपरांत अस्लतेनी द्वैत सिद्धांतावर पातेरा ठिंगतात॑. "एक जीवात्माला हे भूलोकाच अनुभव केवळ माया न्हो, पण ते एक खर॑ अनुभव आहे", अस॑ माध्व॑/मध्व॑ सिद्धांत सांगत॑.

माध्वा n  name of a sub-caste of brahmans following the philosophy established by Shri. Madhwacharya. माध्व॑ सिद्धांत अनुसरण॑ कराच ब्रहमण उप वर्ग.

माध्वा adj  one who belongs to the brahmin sub-sect of Madhwas. मध्वा उपसंप्रदायांत॑ मिळलते एक ब्रह्मण.

मान n  a deer. हरण. Note :- from Tamil. 

मान n  respect. reverence. honour. regard. बहुमान. मर्यादा. आदर॑.

मान n  the posterior part of the neck. गळाच मागल भाग. uis  मझ शेदारल॑/शेजारल॑ घरचा वेड-वंकड वाटांतीं/लांच घेऊनीं उदंड पैसे केला. अत्ता सांपडींगट्ल नंतर॑ तोंड बाहेर दाखिवाला नाहीस्क॑ मान लवींगून जामस्क॑ आहे.

मानणे vt  to obey. अनुसरण करणे. मान करणे.

मानणे vt  to admit. संम्मत करणे. मान करणे.

मानभंग n  treating with disrespect. dishonoring. अपमान.

मानमर्यादा n  self respect. स्वंत मर्यादा. uis अमच मानमर्यादा राखिवाम॑म्हणजे आवश्यनाहीस्क॑ वेगळ॑ लोकांच विषयांत॑ अम्ही मध्य पडताने.

मानव n  man. mankind. मनुष. मनुष कुल. uis मृग, पक्षि, हे सर्व जीवजंतू तेनाला अपाय असलतर नाहीतर त्यंच भूक वारिवाला करतां दूसर॑ जीवाला आक्रमण करल॑. पण, मानव जात एकच स्वार्था करतां दूसरांला मरिवाच॑.

मानसिक adj  mental. relating to the mind or intellect. मनाच॑. मनाला संबंध झालते. uis अत्तच काळांत जीवनाच दबावामळे (स्ट्रेस) वीस-पंचवीस प्रतिशत लोकांना मानसिक रोग येत आहे. पोरपणा पसून (ल्हान वया पसून) ध्यान कराला शिकिवलतर॑ हे स्थित॑ येईनास्क पाह्यिंग्युया.

मान्य adj  respectable. आदर॑ असाच॑. आदरणीय.

मान्य adj  approved. recognised. acceptable. (अधिकारांतून) स्वीकार केलते. ओपिंगट्लते.

मान्य adj  acceptable. स्वीकार कराला योग्य असाच॑.

मान्यता n  respectability. आदर॑.

मान्यता n  approval. संम्मति. अनुमति.

माप n  measurement. एक वस्तूच लांब॑, उंच॑, विस्तार॑, भार॑ हे कित्ति आहे म्हणून पाह्णे. अळत्तम (Tamil).

माप n  forgiveness. pardon. क्षमा. माफ. Note :- from Tamil. 

मापणे  vt  to measure. माप करणे. अळत्तम करणे.

माफ n  forgiveness. pardon. क्षमा. माफी. माप (Tamil).
     
माफी adv  forgiveness. pardon. क्षमा. माप (Tamil). माफ.
 
मामा n  mother's brother. अम्माच भाऊ.

मामांग n  the auspicious time of Magha star during the month of Maagh in the year when Jupiter is in Simha rasi. सिम्ह राशींत गुरु असाच वर्षी माघ महिनेंत॑ याच मघा नक्षत्राच समय.

मामी n  mama's wife. मामाच बाईल.

मामूल n  ordinary course. साधारण रीत॑. uis मामूलहोऊन मी बस्सांतेच ओफीसाला जाणेतरीन, आज वेळ झालतेकरतां अटोरिक्षा धरींगून जायाल जातों.

मामूल n  customary usage or practice. साधारण होऊन कराच रीत॑. uis अम्ही हे गांमाला नव॑म्हणून ते दूधवालाला कळना. मामूल काय म्हणून तलाच विचारून तेच मादिरि दूधाला पैसे दिवसोडि देमकी, नाही महिना-महिना देमकी, हे निश्चय करूनटाक. 

मामूल fig  tips. petty bribe. ल्हान लांच॑. uis सब-रेजिस्ट्राराच ओफीसांत॑ एक फैल एक विभागांतून अण्खिएक विभागाला सरकिवाम॑ म्हण्जे मामूल देउनेचसराम॑.

मामूली adj  ordinary. plain. nothing extraordinary. सर्वसाधारण॑. uis गेल वर्ष चाललते आइ.पी.एलाच एलमांत॑ एक दोन खेळणारांस॑ उदंड जास्ति रोक्कमांत॑ कित्येक फ्रांचैसी लोक॑ घेटलेतरीन, त्यंच खेळ उदंड मामूली होत॑.

मामूली adj  normal. सामान्य. साधारण॑. uis हे वर्ष मण्सूणाच पाऊस मामूली असेल म्हणून मीटियरोलजि विभागाच सूचना आहे.

माय n  mother. अम्मा. 

मायआजा n  maternal grandfather. अम्माच बापा. uis मझ मायआजा कन्नडा होते अणी मझ मायआजी तंजाऊर मराठी बोलणारी होते.

मायआजी n  maternal grandmother. अम्माच अम्मा.

मायबाप n  parents. अम्मा-बापा.

मायभाषा n  mother-tongue. मातृभाषा.

मायम n  drugs which cause fainting. मूर्च्छ आणिवाच नशाच साधन॑. Note :- from Tamil.

माया n  illusion. भ्रम॑.

माया n  unreal. illusory. निज नाहीते. असत्य. uis श्री मध्वाचार्यांच द्वैत॑ सिद्धांता प्रकार हे ब्रह्मांड॑ एक माया न्हो, पण ते निज/सत्य आहे.

मायावि n  conjurer. जादूगर.

मार n  a beating. a thrashing. बडिवणे.

मारखाऊ adj  one who gets thrashed often. सदा मार मिळणार.

मारणे vt  to thrash. to beat. to strike. बडिवणे.

मारणे vt  to kill. मरिवणे.

मारपीट n  a shower of thrashings. भरून मार मिळणे.

मारवाडि n  a person belonging to Marwad. मारवाडाच मनुष.

मारवाडि coll a shylock. a person who lends money at usurious rates. उदंड जास्ति व्याजांत/बड्डींत॑ पैसा र्रीण देणार.

मारवळ काढणे vt  whiplash to leave marks on the body. झाटीच मार देऊन आंगांत खूण करिवणे. Note :- वळ means a mark made by a lash of the whip. 

मारामारि n  a big  fight. एक मोट्ठ॑ भांडणे.

मारामारि n  rioting. न्यायाच विरुद्ध॑ मारून-तोडून कराच मोट्ठ॑ गलाटा.

मारुति n  son of Maruth. Hanuman. मारुताच लोंक. हनुमान. हनुमंत॑.

मार्कंडेय n  name of an ancient sage. प्राचीन काळाच एक ऋषीच नाव.

मार्कंडेय n  a Gothra named after the Sage Markandeya. मार्कंडेय ऋषीच नावांतल॑ एक गोत्राच नाव.

मार्ग n  way. path. वाट. बीद॑.

मार्ग fig  escape route. चुकिंगाच वाट. uis आफीसांत॑ कायकी गोळ-माळ काम करून तो सांपडींगट्ला. अत्ता चुकाला काय मार्ग आहे म्हणून वर-खाले पाह्त आहे.

मार्गशीर्ष n  the ninth month of the Hindu year. हिंदु पंचांगांत॑ नौवां महिना.

मार्तांड n  Sun. सूर्य. अरूण. भानु.

माल n  goods or wares of commerce. व्यापाराच वस्तु.

मालक n  owner. यजमान.

मालति n  jasmine. मोगराच फूल. 

माला n  garland. हार॑. माळ॑.

मालाकार adj  garland shaped. मालाच आकारांत असाच॑. 

मालि n  gardener. बाग पाह्यींगणार॑.

मालिश n  body massage. आंग रगडणे.

माळ॑ n  garland. हार॑. माला.

माळमत्ता n  wealth in the form of jewellry. आभरणाच संपत्त॑.

माळमत्ता n  gold and silver ornaments. सोनेच रुपेच आभरण॑. नग॑. नेग. वस्त. वस्था.

मावणे vi  to reach (with hand etc). (हाताला) मावणे. uis कवाडाच वरच॑ कोंडि तुला हातांत मावलतर॑, घालशीलका ?

मावणे vi  to fit adequately. बरोर असणे/बसणे. uis (1) हे अंगी तुला मावेलका ? (2) एवढे पाणीईं भांडींत॑ मावेलका ?

मावशी n  mother's sister. अम्माच बहीण॑. मावुशी.

मावसबहीण॑ n  maternal aunt's daughter. मावशीच लेंक॑. मावुशीच लेंक. मावुसबहीण॑.

मावसभाऊ n  maternal aunt's son. मावुसभाऊ. मावशीच लोंक॑. मावुशीच लोंक.

मावसा n  maternal aunt's husband. मावुसा. मावशीच दाल्ला. मावुशीच दाल्ला. uis मझ मावसे दोघदनीं मझ बरीस पांच-सात वर्षाणी/वर्षांत धकटे आहेते. तसच मझ एक मामा पणीं मझ पक्षा आठ वर्षाणी धकटा आहे. कारण, मझ माय त्यंच घरांत आठ भाऊ-बहीणी मधे वडील लेंक म्हणून उजली अणी मी अम्च घरांत वडील होऊन उजलों. तस दोन पीढींत पंध्रा-वीस वर्षाचा व्यत्यास आलतामळे अस झाल॑.

मावुशी n  mother's sister. अम्माच बहीण॑. मावशी.

मावुसबहीण॑ n  maternal aunt's daughter. मावशीच लेंक॑. मावुशीच लेंक. मावसबहीण॑.

मावुसभाऊ n  maternal aunt's son. मावसभाऊ. मावशीच लोंक॑. मावुशीच लोंक.

मावुसा n  maternal aunt's husband. मावसा. मावशीच दाल्ला. मावुशीच दाल्ला.

मावून adv  afterwards. subsequently. मागून. माग्हून. नंतर॑ ; मागाहून in sm.

माशा n  house fly. एक ल्हान उडाच प्राणि ; माशी in sm.

माशा बडिबणे id  to spend time doing nothing. प्रयोजन नाहीस्क॑ वेळ हाळ करणे. माशा मारणे.

माशा मारणे id  to spend time doing nothing. माशा बडिबणे. प्रयोजन नाहीस्क॑ वेळ हाळ करणे.

माशाच कोपी fig  copying blindly. योचना करनास्क 'कोपि' कराच. uis मझ 'सेक्रटरीला' कोपी करून आणाला तीन 'पेज' देलों. तिन॑ माशाच कोपी करून आणलि ! कायरे म्हण्जे, मी तिला 'कोपि' कराच विषय देताना दोन 'पेजांत॑' एकच विषय असाच पाहिलों नाही. तिन॑ पणीं पाहिनास्क पुन्हा ते तसेच कोपी करून आणली. Note:- this expression is a direct translation of " ई अडिच्चां कोपी" (Tamil).

मास n  month. महिना.

मासामासी adv  every month repeatedly. दर महिना. प्रति महिना. महिना-महिना.

मासिक n  a monthly magazine. दर महिने प्रकाशण होयाच मागजीन पुस्तक॑.

मासिक n  a monthly ritual related to death ceremony. महिना-महिना कराच श्राद्ध.

मासिक adj  relating to monthly periodicity. एक महिनाच कालावधिला संबंध झालते.

मासोळि n  fish. मत्य.

माहात्म्य n  greatness. महिमा. महत्व.

माहींगणे vt  to ask for and procure. माईंगणे. मागींगणे. uis दोन निमिषांत॑ दुकानाला जावून काडीच-पेटी माहींगून येतों म्हणून गेलते मनुष अत्ता पर्यंतीन आला नाही.

माहींगणे vi  to receive. to obtain. माईंगणे. मागींगणे. uis मझ॑ शेदारलाकडे अनावश्य बोललते आटो-रिक्षावाला बेष शिवा माहींगून गेला.

माहेरा n  a married woman's mother's home. वराड झालते बायकोच अम्माच घर ; माहेर in sm.

मांगल्य n  sanctity. auspiciousness. मंगळ॑. पवित्र.
मांजा n  a kite-string coated with gum and powdered glass. गोंदीं पूड केलते अर्साहीं लावलते पतंगाच दोरा.

मांडणे vt  to lay out in proper order. to arrange properly. नीट व्यवस्थांत॑ ठिवणे. 

मांडणे vt  laying out plates or leaves properly for serving food. जेवाच॑ पान बरोर पंक्तींत॑ ठिवणे.

मांडव n  a canopy. पंदल. छप्र॑.

मांडव n  a pandal prepared for spreading of vegetable creepers. भाजीपाला झाडाच वेल/वल्ली पसरून मिळाला तय्यार केलते पंदल.

मांडवपूजा n  pooja performed to pandal before a wedding or thread ceremony. वराड नाहीतर॑ मुंजीच पुढे मांडवाला (पंदलाला) कराच पूजा. छप्र पूजा. 
 
मांडवशेंगा n  a type of avarekai grown on pandal. पंदल-अवरेक्कायी (Tamil). Note :- शेंगा grown on a मांडव (pandal).

मांडि n  thigh. गुडिघाच वरल॑ भाग.

मांडि n  the proper posture of sitting. बसाच बरोरल॑ रीत॑. बसाच बरोरल॑ आसन॑. मांडि घालींगून बसाच॑ ; मांड in sm.

मांडि घालणे vt  to sit cross-legged. to sit in the proper posture. पांय मुजलींगून बसणे. बरोरल॑ रीतींत बसणे. पाल्खीमांडि बसणे. पाल्खेमांडि बसणे ; मांड घालणे in sm. uis भोंई व॑र बसताना तिन॑ केम्हाईन पांय लांब करींगूनच बसती. बरोर मांडि घालींगून बैस म्हणून कित्ति दपा सांगट्लतरीन ऐकना म्हणती.

मांत्रिक adj  a person who cures diseases by reciting mantras while administering herbal medicines alongside. मंत्रतंत्रांत रोग बरोर करणार. uis मानसिक रोगाला अम्च देशांत अत्तापणीं लोक॑ मांत्रिकांकडे जातात॑. ते सार्थक होईलका, नाहीका, म्हणाच मला कळत नाही. Note:- मांत्रिक in sm means 'that which is related to मंत्र'.

मांद n  mumps (generally afflicting children). एक व्यादीच नाव (साधारण होऊन लेंकरांस याच॑).

मांद n  elephantiasis. डांचाच उपद्रवामुळे पांयेला याच एक रोग. Note :- from Tamil.

मांदर॑ n  cat. एक प्राणि ; मांजर in sm. Note :- an eample of inter-use of द & ज.

मांस n  meat. flesh. मांस.     

मिठाई n  sweetmeat. गुळ्चीट पदार्थ. तुकडा.

मिणी suff  a word-suffix to mean "in like manner". "सारख॑/मादरी" हे अर्थ द्याच प्रत्यय. मणी. विणी. वणी. uis उरळेगड्डेच भाजि करताना ते ल्हान-ल्हानमिणी चिरून करलतर॑ रूच बेष असल॑. Note :-  an example of inter-use of व and म, as well as the mispronunciation of व/वि and म/मि.

मित॑ n  within limits (of decorum etc). परिधीच आंत (वागणे/असणे).

मित॑ adj  moderate. conservative or sober (disposition). सात्विक॑ (स्वभावाच॑).

मितमिंचणे vt  to cross the limits (of decorum etc). साधारण वागाच परिधी वलांडणे. uis  तेनी बांधोटीच कॉणट्राक्टांत॑ मितमिंचून पैसे संपादलाहेते. Note:- the root word of मिंचणे is from Kannada meaning 'going beyond'.

मित्र n  friend. स्नेहि. स्नेहित.

मित्रद्रोह n  betrayal of a friend. मित्राला द्रोह कराच॑.

मिथुन n  the zodiacal sign of Gemini. एक राशीच नाव.

मिनाकारी n  enameled art work. a type of artwork prepared by enameling brass or any suitable metal item. एकदम बरीक होऊन पूड केलते गाज (अर्सा) बेष/बेश जळिवून विघरिवून पितळ अथवा वेगळ॑ धातूच साधना वर लिंपून कराच एक सौंदर्य वस्तु. मीनाकारी. uis हैदराबादांत 'लेपाक्षी' (सरकाराच॑) दुकानांत पित्तळांत मिनाकारी/मीनाकारी केलते सुंदर वस्तु मिळते. हे सर्वीन मोरादाबादांतून येतका नाही यथेच/एथेच/इथेच तय्यार होतका हे मला कळ्ना.

मिरगुंडा collo  a term of endearment for a playful child. खेळकोर लेंकरांला लाडान बलावाच एक गोष्ट.

मिरवणूक n  a religious pageant or procession through the streets. गांवाच बीद वाटे जायाच देऊळाच उत्सवयात्रा. मिरविणकी.

मिरविणकी n  a religious pageant or procession through the streets. गांवाच बीद वाटे जायाच देऊळाच उत्सवयात्रा.  मिरवणूक. uis वर्षा-वर्षी तुरकडांच ईद अणी अम्च॑ गणेश-चतुर्थी हे दोन सणीन सुमार एकच दिवसी यामळे अमच॑ मिरविणकी (मिरवणूक) मुसलमान लोके अधीक होऊन राह्याच वाटे गेलतरे धोंडा-माराच अक्रम होईल म्हणून पोलीस बंदोबस्ताच व्यवस्था केम्हाहीन असते. 

मिरशिंगा n  green chilli.  संपाकाला उपयोग कराच एक तिक्कट फळ. मिर्शिंगा. मिर्सिंगा. Note :- मिरशेंग in sm means 'a pod of chilli'. शेंगा is any podded leguminous vegetable. In मिरशिंगा / मिरशेंगा the seeds are arranged similar to the seeds of a podded leguminous vegetable and so the appellation "शिंगा / शेंगा" to मिरे. Also, black pepper is known as मिरे in DM, while it is the "podded" green chilli which has the appellation "शेंगा". 

मिरासदार n  one who holds hereditary rights or office or public employment, usually with lands attached. जमीन संबंध झालते सरकार कचेरीच अधिकार परंपरांतून असणार. Note :- such positions have since been abolished.

मिरिवणे vt  to take out a religious procession. देऊळाच उत्सवयात्रा काढणे ; मिरवणे/मिरविणे in sm.

मिरे n  black pepper. संपाकाला उपयोग कराच एक तिक्कट बीं ; मिरी in sm.

मिरे-जिरे n  grocery. दाळ-तांदूळ. मीठ-मिरे . संपाकाच सामग्रि.

मिर्शिंगा n  green chilli. संपाकाला उपयोग कराच एक तिक्कट फळ. मिरसिंगा. मिरशिंगा. Note :- see Notes under मिरशिंगा.

मिर्सिंगा n  chilli. संपाकाला उपयोग कराच एक तिक्कट फळ. मिर्शिंगा. मिरशिंगा. Note :- see Notes under मिरशिंगा.

मिळणे vi  to get (in hand). हाताला येणे.

मिळणे vi  to be found (after a search). (हुडकला नंतर) सांपडणे. 

मिळणे vi  to meet. समोर पाह्णे. भेटणे.

मिळणे vi to get mixed. to get added. मिळणे.

मिळिवणे vt  to mix. मिळून ठिवणे. मिळिवून ठिवणे ; मिळवणे/मिळविणे in sm.

मिळिवणे vt  to add. जोडणे.

मिळिवणे vt  to accumulate. to acquire. संपादणे.

मिळून-झुलून adv  staying together and cordially. सौहार्दांत॑ मिळून राहणे. मिळून-मिसून.

मिळून-मिसून adv  staying together and cordially. सौहार्दांत॑ मिळून राहणे.  मिळून-झुलून. uis लेंकरे थोरळे झाल नंतर मिळून-मिसून असाम॑ म्हणून तेवढ॑ माये-बापांलीं आशा वाटाणे साधरणच॑.

मिश्र adj  mixed. एकालेक मिळून असाच॑.

मिश्रण n  mixture. (वगळ॑ वेगळ॑ पदार्थ) मिळिवलते. मिश्र झालते.

मिश्री n  large crystalline sugar. lumped sugar. खडेसाखरे. uis गणेशाला मिश्री नेवेद्य करजोरि मझ॑ नातु राखून असल॑. होतांतरूं एक निमिषांत॑ काढींगून पळून जाईल॑.
 
मी pron  I. mee. myself. मी.

मीठ n  salt. लवण॑.

मीठ-मिरे n  grocery. दाळ-तांदूळ. मिरे-जिरे. संपाकाच सामग्रि.

मीन॑ n  the zodiacal sign of Pisces. एक राशीच नाव.

मीमांसा n  name of a school of Hindu philosophy. एक हिंदु तत्वज्ञान परंपराच नाव.

मील n  mile. एक मैल लांब.

मीशा n moustache. वरच ओंठांत॑ वाढाच केंस.

मुकटा n  a cloth worn as part of ritual purity. सोवळेच वस्त्र. मुगटा. Note:- usually made of silk.

मुकाम n  a place of temporary residence. camp. मुक्काम. थोड काळ राह्याच ठिकाण. डेरा.

मुक्का n  kiss. उम्मा. चुंबन॑ ; मुका in sm. 

मुक्काम n  a place of temporary residence. camp. मुकाम. थोड काळ राह्याच ठिकाण. डेरा.

मुकुट॑ n  a crown. किरीट॑.

मुक्त adj  liberated. freed. सुटलते.

मुक्ति n liberation. salvation. मोक्ष.

मुक्तिमार्ग n  way to salvation. मोक्षाच वाट.

मुख n  face. तोंड.

मुख n  mouth. तोंड.

मुखवटा n  face of a deity drawn on a holy vessel, paper etc. for religious purposes. पूजाच कलशांतकी कागदांतकी होढलते देवीच नाहीतर॑ देवाच मुख॑. मुखोटा.

मुखवटा n  mask. मुखोटा.

मुखवटा n  countenance. facial features. facecut. तोंडाच रूप. मुखोटा. uis हे भूमंडलांत सात लोकांच मुखवटा एकसार्ख असल॑ म्हणून सांगण आहे. तीन वेगळ-वेगळ ठिकाणि मलाच कोणकी येऊन वेगळ लोकांच नाव सांगून ते मनुष मीचका म्हणून विचारलाहेत॑.

मुखस्थुति n  flattery. sycophancy. स्वंत कार्य होया करतां तोंडा समोर प्रशंसा करणे. मस्का बडिवणे. uis मुखस्थुति करणाराना पातेदेताने. त्यंच काम झालवर अम्चविषीन लटक पणीं सांगतील॑.

मुखांतर॑ adv  through or via a medium. through  or via a third source. वेगळ॑ एकां वाटे. uis एवढ॑ दिवस मझ॑ भाऊ केलतते वंगळ काम मला कळ्ल॑ होत नाही. दोन दिवसाच पुढ॑ ते विषय मझ॑ लोंक  मुखांतर॑ मला कळ्ल॑.

मुखोटा n  face of a deity drawn on a holy vessel, paper etc. for religious purposes. पूजा कराकरतां कलशांतकी कागदांतकी होढलते देवीच नाहीतर॑ देवाच मुख॑. मुखवटा.

मुखोटा n  mask. मुखवटा.

मुखोटा n  countenance. facial features. facecut. face of an idol. तोंडाच रूप. मुखवटा.

मुख्य adj  main. प्रधान. प्रमुख.

मुख्यप्राणा n  Vayu Dev. प्राणेश. वायु देव.

मुख्यमंत्रि n  chief minister. मंत्रिमंडळांत॑ मुख्या.

मुगटा n  a cloth worn as part of ritual purity. सोवळेच कापड (वस्त्र). मुकटा. Note:- usually made of silk.

मुग्गट adj  musty. damp and decayed. भिजून कुजलते.

मुग्गट-घाण॑ n  damp and musty smell. ओल॑-कुजक॑ वास. uis कॉरपरेषनाच कुप्पा-बंडी दोन दिवस र्रोडांतून कुप्पा/कचडा काढनास्क असलतर॑ वार्रेंत मुग्गट घाण येते.

मुजडणे vt  to fold. घडि घालणे. मुदडणे. मुजलणे. Note:- an example of inter-use of ज & द. दुमडणे in sm.

मुजलणे vt  to fold. घडि घालणे. मुजडणे. मुदडणे.

मुटमुटु बसणे vt  to wait silently. उगे (निशब्दांत॑) थांबणे/असणे. uis तीस वर्षा पुढल॑ गोष्ट हे. 'मंत्रालयमरोड' स्टेषनांत पाष्टे-पाष्टे उतरून श्री राघवेन्द्रस्वामीच ब्रिंदावनाला जायाच बस्सा करतां उदंड वेळ राखलों. एक झाडा खाले काय करणे म्हणून कळनास्क॑ मुटमुटु बसलोतों. जवळ एक मठ होते, पण तथे गेलतर॑ कोठ बस निघून जातकी म्हणून अम्हाला भें वाटत होते. दोन घंटा वेळ राखला नंतर अम्च बस आल॑ अणी अम्ही निघून गेलों.

मुटमुटु पाह्णे vt  to gaze blankly in silence. उगे लक्ष्य देनास्क॑ पाह्णे. uis बाजू घरच एक पोराला वेड धरल॑. तला पाह्याला अम्ही हॉस्पिटलला गेलों. तिकडे तो खोलीच एक कोनेंतून अम्हाला उगे मुटमुटु पाह्त बसाच पाह्ताना मला फार संकट वाटले.

मुट्टे n  egg. अंडा. uis दिवसोडि कोंबडेच एक मुट्टे खालतर॑ आंगाला चोखोट म्हणतात॑. Note :- from Tamil.

मुट्ठाळ adj  dull witted. बुद्ध नाहीते. Note :- from Tamil.

मुट्ठाळपण॑ n  foolishness. idiocy. बुद्ध नाहीस्क वागणे.  Note :- from Tamil.

मुठका n  fistful. the amount a closed fist would hold. एक मूटांत धराला होयाच एवढे. uis कंचि परमाचार्या सांगतील 'नित्य एक मुठका तांदूळ गरीब लोकां करतां वेगळ काढून ठिवून नंतर घरच॑ संपाक आरंभ करा'. हे संप्रदाय अत्तापणीं फार लोक॑ करताहते.

मुतणे vt  to urinate. मूत सोडणे. uis अम्च देशांत॑ लोक रोडांत॑/बीदींत॑ कोठ पाह्ल॑ तरीन मुताला संकोच भोगतेच नाहीत॑.

मुत्ति n  penis. दाद्ग्येंच मुताच अवयव. uis ल्हान पोरे चड्डीकी विजारकी नेसनास्क॑ नावगेन हिंडत असलतर अम्ही त्यांस॑ "तुझ मुत्ति कापूनटाकन" अस भें दाखिवून विजार नेसिवाला करिवतों.

मुदडणे vt  to fold. घडि घालणे. मुजडणे. मुजलणे. Note:- an example of inter-use of ज & द. दुमडणे in sm.

मुदि n  a ring worn in the finger. बोटांत॑ घालाच अंगोठि.

मुद्दा adj  lump (usually roughly spherical in shape, like a lump of dough). सुमार गोळाकाराच आकार, पीठाच मुद्दास्क॑.

मुद्रण॑ n  printing. प्रिन्ट करणे. छापणे.

मुद्रणालय n  printing press. प्रिन्ट कराच प्रेस्स.

मुद्रा n  a seal. मुद्रा. छाप.

मुद्रा n  impression. stamp. छाप.

मुद्रा n  caste marks placed on the face and torso by Madhwa brahmins using mudra seals. माध्वा ब्राह्मण तोंडांतीं आंगांतीं घालाच मुद्राच चिन्ह. 

मुद्रा n  expressions and emotions displayed through facial or hand movements in a classical dance. नृत्य अभिनयाच एक भाग.

मुद्राधारण॑ n  the religious ritual in which the pontiff of a Madhwa mutt affixes "shankh" and "chakra" marks on the arms and torso of devotees. मध्वसंप्रदायाच मठाधिपति भक्तलोकांच हातांतीन आंगांतीन शंख चक्राच मुद्रा घालाच पद्धत॑.

मुद्राधारण॑ n  affixing of caste marks of Madhwa Brahmins in their body. माध्वा ब्राह्मणांच आंगावर घालाच मुद्रा.

मुद्रिका n  a seal-ring. मुद्राच मुदि.

मुनि n  an ascetic. ऋषि. सन्यासि. 

मुन्सिफ n  a civil judge of lower rung. munsiff. मुनसिफ़ कचेरीच न्यायपालक॑ ; मुनसफ़ in sm.

मुम्मर adj  intense. गाढ. तीव्र.

मुयल n  a rabbit. hare. एक ल्हान प्राणि. Note :- from Tamil.

मुरगळणे vt & vi  to twist, wrench, wring, wriggle. मुरडणे.

मुरड imp  twist. पीळ.

मुरडणे vi to twist and wriggle. पिळणे.

मुरडा n  griping colic pain in the stomach. पोटसूळ. पोटाच मुरडा.

मुरणे vi  to mellow. to sober. नियंत्रण नाहीस्क॑ असला नंतर शांत होणे. uis शिवा देवून शिवा देवून अम्च कामवालि अत्ता थोड मुरलीहे. नाहीतर तिन॑ फारच नाचत होति. 
 
मुरमुरा n  a preparation with parched and beaten rice. पोहेंत॑ केलते एक पदार्थ. चुरमुरा. चुरमोरे. चिरमोरे.

मुरली n  flute. मुरळि. वेणू. पुल्लांकुळल (Tamil) ; मुरली in sm.

मुरळी n  flute. मुरली. वेणू. पुल्लांकुळल (Tamil) ; मुरली in sm.

मुरळीधर n  Lord Krishna. मुरलीधर. भगवान क्रिष्णा ; मुरलीधर in sm.

मुरारी n  Lord Krishna. भगवान क्रिष्णा.

मुळी n  root of a plant. झाडाच भोई खाले असाच भाग. वेर (Tamil). uis  फुलाच झाडीमधे आवश्य नाहीते झुडूप की, गवत की वाढलासलतर॑ ते मुळींत्सून उप्पडून टाकाम॑. नाहीतर ते फुलाच झाडीला घालाच पोषाक-पाणी/वळम (Tamil) होडूनटाकल॑/ओढूनटाकल॑ अणी चोखोट झाड थोड दिवसांत वाळून जाईल.

मुळें prep. on account of. because of. मळें. स्तव. करतां.

मुळ्ळा n  a Muslim priest. मुसलमानांच धर्मगुरु.

मुळ्ळंगि n  radish. एक भाजीपालाच नाव ; मुळा in sm. uis मुळ्ळंगीच पराठा फार रूच अस्ते. ते अम्च आरोग्याला पणीं चोखोटच, पण करणे थोड श्रमच॑ !

मुशारा n  salary. wages. धर्मा. uis प्रती वर्ष अम्ही कामवालीच मुशारांत दोनशें रुपे वाढिवतों. तस करून पणीं तिला काहीं तृप्त नाही.

मुषडु adj  uncommunicative and not sociable in nature. समुदायांत॑ वागणे जास्ति करनात॑ (लोके). uis अम्च 'बिल्डिंगांत' अर्ध लोक॑ मुषडु आहेते. बाकी अर्धदन जंभीष्ट लोके ! Note :- from Tamil.

मुसकट n  muzzle. तोंडाच अग्र भाग. मुस्कट.

मुसकट घालणे vt  to cover the face with sheet (while sleeping). पांघरुणंतून तोंड झांकींकून निजणे. मुस्कट घालणे.

मुसकणे vt  to cover the face with sheet (while sleeping). मुस्कट घालणे. झोंपी जाताना पांघरुणंतून तोंड झांकणे.

मुसके n  a cloth guard for the mouth (of animals). प्राणींच तोंडाला बाधाच कापड. मुस्के.

मुसळ n  a long and thick pounding rod made of wood or iron used in a 'उख्खळ॑'. धान्य कांडाच लांकड. ओलक्के (Tamil). uis (1) अम्च घरांत असाच उख्ख्ळ लोखंडाच॑. तज मुसळ पणीं लोखंडच॑. मझ बाईल तजांत॑ अत्ता पणीं थोडम्हणून  पह्जेते मसाला कांडते. (2) फ्लाटांत॑ राहणार॑ उख्ख्ळीं मुसळीं उपयोग केलतर॑ खालच॑ घरच लोकांला घरांत॑ बसाला होयनास्क॑ तेवढ॑ तंटा होईल॑ !

मुस्कट n  muzzle. तोंडाच अग्र भाग. मुसकट.

मुस्कट घालणे vt  to cover the face with sheet (while sleeping). पांघरुणंतून तोंड झांकींकून निजणे. .मुसकट घालणे.

मुस्के n  a cloth guard for the mouth (of animals). प्राणींच तोंडाला बाधाच कापड. मुसके.

मुस्लिम n  Muslim. follower of Islam. इस्लाम धर्म आचरण करणार.

मुहूर्त n  the auspicious forty eight minutes while conducting a marriage or thread ceremony. एक वराड अथवा मुंज॑ करताना मुख्यहोवून असाच अठ्ठेचाळीस मिनिटाच/निमषाच वेळ॑.

मुहूर्त fig  opportune time. संदर्भाच वेळ. uis तो केम्हाईं मी आफीसाला अवसरांत॑ निघाच वेळांतच मला पाह्याला/पायाला येईल॑. तला वेगळ॑ मुहूर्त मिळत नाहीका ?  Note:- generally used in a derisive manner.

मुहूर्त fig  fit time. most suitable time. संदर्भाच वेळ॑. uis एक नव काम आरंभ करणे म्हण्जे चोखोट मुहूर्त पाव्हून करणे बर असल॑.

मुंक्यान॑ adv  mutely. silently. without responding or uttering a sound. quietly. गपचुप ; मुकाट्यां/मुकाट्यानीं/मुकाट्यानें in sm.  uis  अम्ही अत्ता कहीं करनास्क॑ मुंक्यान॑ असून जाऊम्हण॑. ते संकट अपाप सरकून जाईल॑.

मुंगूस n  mongoose (which feeds on snakes etc.). (सर्प वगैरा प्रांणींला खायाच) एक ल्हान प्राणि. मंगूस. 

मुंग्या n  ant. एक ल्हान प्राणि ; मुंगी in sm. Note:-  in TM the plural form मुंग्या is used in place of the singular form मुंगी.

मुंग्या येणे fig  to have a tingling sensation of a limb. मुंग्या धरणे. हात नाहितर॑ पांयेला याच एक विधाच चुरचुरणे. uis उदंड वेळ पाल्कीमांडि (पाल्खीमांडि) घालींगून बसलतर॑ मला समच उठाला होयना. पांयेंला मुंग्या येते. थोड पांय लांब करून हलिवला नंतरच उठाला होते.

मुंज n  thread ceremony of a Brahmin boy. उपनयनाच सण. मुंजी.

मुंजी n  thread ceremony of a Brahmin boy. उपनयनाच सण. मुंज.

मुंड करणे vt  to shave the head. डोस्के क्षौर करणे. मोट्टे बडिवणे. मुंडन करणे.

मुंडन n  shaving of the head. डोस्केच क्षौर.

मुंडास n  turban. डोस्केला बांधलते कापड ; मुंडासे in sm. uis ग्रामांत असणार लोक॑ ऊनामळे मुंडास बांधींगतील॑. कारण, तेनी दोन-तीन मैल जमीनाच मध्येसून चालताना सावली अस्त॑ नाही अणी दुपारच ऊन टाळू वर बलकट बडीवत अस्ते.

मूक adj  dumb. mute. बोलाला होयनाते.

मूकपण॑ n  dumbness. बोलाला होयास्क॑ असाच अवस्था.

मूका n  a dumb man. बोलाला होयनाते मनुष.

मूकी n  a dumb woman. बोलाला होयनाते बयको.

मूग n  a type of pulse. एक रीतीच धान्य. मुगादाळ. मूंग.

मूटा n  bundle. गांठोड॑. Note :- from Tamil.

मूटा n  heap. मूटा. गुंप ; ढीग/ढिगर/ढिगार/ढिगारा in sm. uis उन्हाळाच वेळ झाडाच वाळलते पान भरून पडून अम्च घरच भोंताले गलीज झाल होते. कामवालीला सांगून ते पूरा झाडून एक मूटा करिवून कुप्पा-लॉरि येताना काडींगून जायाला एर्पाड केलों. Note :- from Tamil. In DM ढिगारा means a haystalk.

मूटा बांधणे fig  to wind-up. बंध करून संपिवणे. 

मूटा-मूटा fig  a large quantity. कुप्पा-कुप्पा (fig). uis दहा वर्ष एक कामपणीं नाहीस्क बसलते ते मनुषाला नंतर अदृष्ट बडिवल॑. कसकी गळ्फांत॑ जावून मूटा-मूटा पैसा करींगून आला.

मूठ n  fist. बोट झांकलते हात. मुष्ठि.
 
मूठ n  fistful (of grain etc). एक मूठ (भरून).

मूढ adj  foolish. stupid. मुट्ठाळ (Tamil).
 
मूत n  urine. मूत्र.

मूतखडा n kidney stones. calculus in the urine. मूत्रपिडांत होयाच ल्हान धोंडा सार्खल साधन. मूत्रखडा. uis कित्येक लोकांच आंगलक्षण॑ मूत्रखडा सुलभान उत्पत्ती होते. अस समस्य असणार टोमेटो अणी वाळूक खाणे उणे कराम॑.

मूत्र n  urine. मूत.

मूत्रपिंड n  kidney. किड्नि. uis डैबेटिस अणी 'है बी.पी' उदंड वर्ष असलतर॑ मूत्रपिंड नासाल वाट आहे. हे विषयांत केम्हाईन जाग्रत होऊन असणे चोखोट.

मूर्ख adj  foolishly stubborn. हट्टाच मुट्ठाळपण॑.

मूर्खपण॑ n  foolish stubbornness. हट्टाच मुट्ठाळपण॑.

मूर्च्छ n  fainting. a swoon. बोध नाहीस्क॑ होणे.

मूर्ति n  idol. देवाच विग्रह॑.

मूर्ति n  statue. प्रतिमा.

मूल n  the first or root (cause etc). पहिलच (कारणे). uis सभेंत तो सदस्य वरडा-वरडी केलत्याला मूल कारण अम्च अद्यक्षामळे म्हणुया. तेनी तला अवमान केलतामळे हे पह्जती झाले.

मूल n  original. असल.

मूल n  (financial) capital. बंडवाळ॑.

मूल n  basis. आधार.

मूल n  a child, either girl or boy. बाळ॑.

मूल n  bride. वराडच नवरि.

मूलग्रंथ n  the original text. source book. आधि ग्रंथ. uis संस्कृत कळनाते लोकांस॑ वेद अणी उपनिषद हेज मूलग्रंथ वाचाला होयनाते करतां हेज इंग्रेजींतल॑ तर्जुमा वाचून संतोष भोगाम॑. संस्कृतांतल॑ मूलग्रंथ वाचणांतीं इंग्रेजींतल॑ तर्जुमा वाचणांतीं उदंड व्यत्यास अस्ते म्हणून सांगाच आवश्येच नाही !

मूलपत्र n original or primary document. मुख्य प्रमाण॑. uis अत्तलीकडे 'कलर फोटोकापी' कराच सौकर्य आलावर ब्रोकरलोके खोट॑ मूलपत्र तय्यार कराला आरंभ केलाहते. कोणालीन पाह्तेदयाला नाहीस्क झालाहे.

मूलपाह्णे n  one of the stages in a marriage during which the bride is seen and felicitated with gifts of colourful artifacts. वराडाच वेळी नवरीला पाव्हून तिला आदर कराच एक पद्धत॑. Note :- मूल means, 'child' and in मूलपाह्णे, it means 'the bride'.

मूलपीठ n  original seat of a religious order. एक मठाच प्रधान स्थान॑.

मूलस्वभाव n  original behaviour. पहिलेंत्सून असाच स्वभाव॑.

मूला n  the nineteenth birth star. एक नक्षत्राच नाव. मूला नक्षत्र.

मूलाधार n  main reference. original document. back document. मुख्य आधार.

मूले n  corner. कोने. Note :- from Tamil.

मूळ॑ n root. भोईं खाले वाढाच झाडाच भाग ; मूळ in sm.

मूषिक n  mouse. उंदीर.

मूषिक वाहना n  Lord Ganesh. गणेश.

मृग n  animal. पशू. प्राणी.

मृगशाला n  zoo. मृगालय. वन्यमृगांला प्रदर्शन कराला ठिवलते ठिकाण.

मृगशिरा n  name of a star. एक नक्षत्राच नाव.

मृगालय n  zoo. मृगशाला. वन्यमृगांला प्रदर्शन कराला ठिवलते ठिकाण.

मृणालिनि n  lotus. कमळीच फूल॑.

मृत adj  dead. मरण॑ झालते. मेलते. मरलते.

मृतदेह n  dead body. मढ॑. शव. मृतशरीर.

मृतशरीर n  dead body. मढ॑. शव. मृतदेह.

मृतसंजीवनि  n  name of a mythical herb capable of bringing the dead to life. मेलत्यांस पुन्हा जीव द्याच शक्ति असाच एक वनस्पति. संजीवनि.

मृत्तिका n  earth/soil having (Hindu) scriptural significance. हिंदु शास्त्रा प्रकार महत्व असाच विशेष माति. uis श्री राघवेंद्रस्वामींच मृत्तिका घरांत असलतर॑ भूत, पिशाश, शत्रू यांच कोणाचीं उपद्रव असना.

मृत्यु n  death. मरण.

मृत्यु n  Lord Yama. यमदेव.

मृत्युदंड n  death penalty. मरण शिक्षा.

मृत्युपत्र  n  a will. मेलानंतर आस्त कस कस वाटाच हे लिव्हलते एक प्रमाण॑.

मृत्युलोक॑ n  Earth. भूलोक॑.

मृदंग n a percussion instrument. एक वाद्याच नाव. मृदंगम.  Note :- from Tamil.

मृदु adj  soft. मऊ.

मृदु adj  gentle. tender (natured). सौम्य.

मेख n  a peg. a nail. आणि (Tamil). uis भाडेला घर देलतर लोक॑ कोठ पह्जेतरीन मेख बडीवून भिंत तेवढीन नाश करतात॑. स्वंत घरांत एक मेख बडिवाला हेच लोके चारदा योचना करतील॑.

मेखळणे vt  to fix a peg. मेख लावणे.

मेघ n  cloud. वांब.

मेज n  table. टेबल.

मेजणे vt  to count (something). मोजणे.

मेजणे vt  to measure. माप करणे. मोजणे.

मेठ n  a hermitage. मठ॑. ऋषींच आश्रम.

मेठ n  a religious place associated with the samadhi of a saint. मठ॑. यतीलोकांच बृंदावन असाच एक पुण्य ठिकाण. 

मेठ n  headquarters of a religious order. मठ॑. धर्म संस्थाच मुख्य स्थल.

मेड n  a raised land. एक उंच जमीन ; मेंड in sm.

मेण n  wax. मेलुग॑ (Tamil). uis लंडनांत मॅडम टुस्साड्स म्यूसियमांत॑ लोकप्रसिद्ध झालते कित्येक लोकांच मेणांतून केलते प्रतिमा दर्शनाला ठिवलाहेत॑. ते पाह्याला खरे मनुषांस्कच अस्ते. शिवून पाह्यलतर मात्र ते तेवढीन जीव नाहीते प्रतिमा म्हणून सांगाला होईल.

मेणकागद n  wax coated paper. मेण लिंपलते (लावलते) कागद. uis बिसकेट, पेस्ट्री, अस॑ चिकटाच पदार्थ 'पेकिंग' कराला मेणकागद उपयोग करतात॑. 

मेणवात n  wax candle (lamp). मोंबत्ति. मेण वाताच दिवा. uis अम्ही दीपावळीला तेलाच दिवा चार लावून बाकि सर्व मेणवात लावतों. अत्ता असाच तेलाच मोलाला तेवढे दिवाहीं तेलाच म्हण्जे खर्च जास्ति होईल॑.

मेतकण॑ vi  to float (on water etc.). (पाणीच वर) बुडनास्क असणे. Note :- from Tamil.

मेतकूट n  a type of side dish made of powdered rice, dhals, fenugreek etc. मेथकूट. मेथि तांदूळ अण्खी दाळ हे सग्ळीन पूड करून तयार कराच॑ एक पदार्थ.

मेथकूट n  a type of side dish made of powdered rice, dhals, fenugreek etc. मेतकूट. मेथि तांदूळ अण्खी दाळ हे सग्ळीन पूड करून तयार कराच॑ एक पदार्थ.

मेथि n  fenugreek leaves. एक पालाभाजि.

मेथि n  fenugreek seeds. मेथीच बीं.

मेध n  honey. मेधमाशा फूलाच सुधांतून कराच रस॑ ; मध in sm.

मेधमाशा n  honey bee. मेध उत्पादन॑ कराच माशा ;  मधमाशी in sm.

मेधावि adj  leader. मुख्य (मनुष). uis (1) करसेना, वायुसेना अण्खि नवसेना हेजांतून कोण जास्ति वर्ष ते-ते सेनांत॑ मेधावि पदांत॑ होतेकी, तेन्हाला देशाच सेनाच मुख्य मधावि म्हणून निश्चय करणे आहे. (2) तज वागणे पाह्यलतर॑ तज मनांत तो एक थोर मेधावि आहे अस म्हणीगट्लाहेस्क॑ वाटते. अम्च कम्मिट्टींत॑ तो अम्चस्क एक साधारण मेंबर म्हणाच विसरलाहे वाटते. Note:- from Tamil. मेधावी in sm means 'intelligent, smart'.

मेरटणे vt  to intimidate. to threaten. धमकी देणे. Note :- from Tamil. 

मेलते adj  dead. मरून गेलते. मरलते. मृत्यु झालते.

मेळ n  dirt. मळ. गलीज.

मेळम n  orchestra (usually) of naadaswaram. (नादस्वरमाच) वाजंत्री. uis वराडांत गरसोळी बांधाच (मुहूर्ताच) वेळ "घट्टी मेळम" वाजिवतील॑. तज कारण, कोणतरीन शिंकलतर॑, रडलतर॑ ते अपशकूनाच शब्द कोणाच कानालीन पडताने म्हणून अस सांगणे आहे. Note :- from Tamil. 

मेळा n  carinival. exhibition. a fair. उत्सव. प्रदर्शन॑.

मेळा n  a gathering. संमेळन॑.

मेवणा n  sister's husband. बहीणीच दाल्ला. मेव्हणा ; मेहुणा in sm. Note :- (1) if he is the older sister's husband he is referred to as भावोजि. (2) if he is younger sister's husband he is referred to as मेवणा/मेव्हणा.

मेवणा n  wife's brother. बाईलीच भाऊ. मेव्हणा ; मेहुणा in sm.

मेवणी n  wife's sister. बाईलीच बहीण. मेव्हणी ; मेहुणी in sm. Note :- (1) if she is older in age she is referred to as वहिणी. (2) if she is younger in age she is referred to as मेवणी/मेव्हणी.

मेव्हणा n  sister's husband. बहीणीच दाल्ला. मेवणा ; मेहुणा in sm. Note :- (1) if he is the older sister's husband he is referred to as भावोजी. (2) if he is younger sister's husband he is referred to as मेवणा/मेव्हणा.

मेव्हणा n  wife's brother. बाईलीच भाऊ. मेवणा ; मेहुणा in sm.

मेव्हणी n  wife's sister. बाईलीच बहीण. मेवणी ; मेहुणी in sm. Note :- (1) if she is older in age she is referred to as वहिणी. (2) if she is younger in age she is referred to as मेवणी/मेव्हणी.

मेष॑ n  zodiacal sign of Ram. एक राशीच नाव.

मेस्त्रि n  a foreman. काम करणारांच नेता.

मेस्त्रि n  bricklayer. ईटाच काम करणार.

मेस्त्रि n  a carpenter. सुतार.

मेहंदि n  a plant dye used for decorating hands and feet. हातांतीं पांयेंतीं तंबड॑ रंग लावाला उपयोग कराचे एक वनस्पतीच पान. मेंदि.

मेंगू adj  docile. meek. साधु मनुष. अप्पावि ; मेंग in sm means "a weak, silly, imbecile person". uis  हे काळांत मेंगू असणाराना तेवढेदनीं दगा करतील॑. सदाहीं अम्ही जाग्रतान असाम॑.

मेंदि n  a red coloured plant dye used for decorating hands and feet. मेहंदि. (हातांतीं पांयेंतीं तंबड॑ रंग लावाला उपयोग कराच) एक वनस्पतीच॑ पान.

मैदा n  a fine wheat flour. गहूंतून कराच मऊ पीट.   

मैदान n  a playing field. खेळाच जमीन.

मैदान n  an open ground. उघड॑ असाच एक जमीन.

मैना n  a bird of the starling family. mynah. एक रेतीच पक्षि.

मोक्कळ॑ adj  open. unbound. उघड स्थितींत असाच ; मोकळा in sm.

मोक्कळ॑ adj  not sticking together (usually applied to cooked rice). उतिर (Tamil). चिकटनास्क॑ वेगळ॑ वेगळ॑ असाच ; मोकळा in sm. uis  नव तांदूळांत भात करतम्हा मोक्कळ भात पह्जे म्हणजे पाणी उणे घालाम॑. नाहीतर मुद्दा होईल.

मोखीन॑ adj   reserved. taciturn. grave. आवश्य नाहीस्क॑ नबोलणार. गंभीर. uis  तेनी फार वाचिंगट्लतनी झालतरीं उदंड मोखीन॑ आहे.

मोगरा n  jasmine. मल्लिपू (Tamil).

मोगर॑ n  mustard. कडुगु (Tamil). मोगरि. मोहरि. राई.

मोग्गु  n  bud of a flower. उगनाते फूल॑. मोहर॑. मोट्टु (Tamil). Note :- from Kannada. 

मोचन n  liberation. freedom. स्वातंत्र्य. uis अम्च देश 1947 वर्षी स्वतंत्र झालतरीन अत्ता पतोरि दरिद्रपणांतून सुटल नाही. अत्तापणीं पन्नास प्रतिशताच वर लोके दरिद्र आहेते. तजांत पोणावांटा लोकांना एक वेळच जेवाला मिळते.

मोजणे vt  to count (something). अंखांत॑ इषोब करणे. मेजणे.

मोजणे vt  to measure. माप करणे. मेजणे.

मोजा n  a pair of socks or gloves. हात अणी पांयेला घालाच कापडाच, नाहीतर, कांबळाच एक प्रत्येक रूपाच पिशवि. uis उक्काडा असाच ठिकाणी रुईच (कापूसाच) मोजा घालिंगणच चोखोट. नाहीतर अम्च काताडाला 'अलर्जीच' तंटा होयाला संभव आहे.

मोजून बोलणे id  to indulge in measured cautious talk. फार योचना करून इषोबांत॑ बोलणे.   

मोट n  a load or a large bundle (of rice, grains, cotton etc.). (तांदूळ, धान्य कापूस असल॑ साधनाच) एक थोर गांठोड/मूटा.

मोटार n  a motor car. मोटार बंडि.

मोट्टे n  bald head. केंस नाहीते/केंस पूरा झडलते डोस्के. Note :- from Tamil. 

मोट्टे n  fully shaved head. पूरा क्षौर केलते डोस्के. Note :- from Tamil.

मोट्टे n  closely cropped head. फार ल्हान होऊन कापलते केंसाच डोस्के. Note :- from Tamil.

मोट्टे बडिवणे vt  to crop the hair on the head closely. डोस्केंतल॑ केंस फार ल्हान होऊन कापणे. Note :- from Tamil. 

मोट्टेमाडि n  a terrace of a building. घरच नाहीतर, बांधणीच वरच माडीच वरल उघड ठिकाण. धाबें. Note :- from Tamil.

मोट्टु n  bud of a flower. blossom. मोहर॑. मोग्गु (Kannada). Note :- from Tamil.

मोठपण॑ n  grandeur. थोरपण॑. थोरवी. 

मोठपण॑ n  large heartedness. थोर मनाच॑.

मोठ॑ adj  large. big. थोर ; मोठा in sm.

मोड imp  break. तोड.

मोडक॑ adj  broken. मोडलते.

मोडक॑-तुटक॑ adj  scrap. मोडून उपयोग नाहीस्क॑ झालते. मोडक॑-फोडक॑.

मोडक॑-तुटक॑ adj  broken and damaged. मोडून हाळ झालते. मोडक॑-फोडक॑.

मोडक॑-फोडक॑ adj  broken and damaged. मोडक॑-तुटक॑.

मोडणे vt  to break. मोडूनटाकणे. तोडूनटाकणे.

मोडा n  a stool made of rattan or reeds. बेतांत॑ केलते बसाला उपयोग कराच एक साधन॑.

मोडी n  an archaic form of Marathi script. जुने काळच एक मराठी लिपी.

मोण-मोण n  grumble. चिरढ॑ करणे. uis मझ बाईल पाष्टे वेळ पूजा-पुनस्कार कराच अवसरांत अस्ताना शेजारल॑ घरची वेळनावारी वंब माराला/छाडी बोलाला येणे दंडक आहे. दाक्षण्य भोगुन मझ बाईल पणीं तिला काहीं सांगना. नंतर मोण-मोण करते !

मोती n  pearl. समुद्रांतल॑ चिप्पींतून मिळाच॑ एक गोळ रत्न. Note:- चिप्पी in Tamil means 'sea shell'.

मोतीचूर n  a sweet laddu similar to boondhi laddu but with smaller particles. गुंजालाडूस्क एक वेगळ लाडु. हेजांतल बूंदि गुंजालाडूंतल पक्षा ल्हान अस्ते. uis हैदराबादांतल॑ मोतीचूर लाडू फार विशेष आहे. यथे मिळाच लाडू नीट स्वादिष्ट असल॑ अणि दीपावळीला उदंड लोके ते घेतील॑.

मोतीबिंदु n  cataract of the eye. डोळेच एक रोग. uis अत्तलीकडे मोतीबिंदुच 'सरजेरी' उदंड सुलुभांत करतात॑. 'इन्ट्रा-ओकुलर लेन्स' घालनामळे 'सरजेरी' केलते डोळेला एक वारा नंतर॑ उपनेत्र/अर्सा नाहीस्क अथवा हेज पुढे घालिंगटलते अर्सा वाटे पाह्याला होते.

मोत्त-व्यापार n  whole sale business. मोत्तम होऊन व्यापार करणे. Note :- from Tamil.

मोत्तम n  in total. in all. अग्गीन मिळून. Note :- from Tamil. 

मोदक॑ n  a type of sweetmeat. एक गुळ्चीट पदार्थ. कोळकट्टे (Tamil).

मोने n  a sharp point. कांटा अथवा सूईंच रुचाच अग्र भागास्क॑ असाच काहीं एक वस्तु. Note:- from मुनै of Tamil.

मोर n  peacock. मयिल (Tamil). मयूर.

मोरचून-पाह्णे vt  to stare belligerently. र्रागांत॑ पाह्णे. uis रेल्वे स्टेशणाच प्ळाट्फोरमांत॑ एक खाली कुर्सींत॑ मी मझ पाड उगे बसलस्ताना एक मोट्ठ॑ पेटी उचलींगून येत होतता मला मोरचून पाह्त गेला. Note :- from Tamil.

मोरचंग n  a musical instrument played close to the mouth. मोरसिंग. ओंठाच जवळ ठिवून वाजिवाच एक वाद्य.

मोरसिंग n  a musical instrument played close to the mouth. मोरचंग. ओंठाच जवळ ठिवून वाजिवाच एक वाद्य ; मोरशिंग in sm.

मोरी n  a waste-water drain. gutter. उपयोग करून टाकाच पाणीच गट्टर.

मोर्चा n  a (political or similar) procession. (जनतंत्राच, नाही असलते) मिरवणी.

मोल n  cost of an item. price. एक साधन घ्याला देमते पैसा.

मोल n  value. महत्व॑.

मोल-घालणे vt  to assess. to evaluate. मोल निश्चय करणे.

मोळगापोडि n  a type of dry and powdered chutney. एक विधाच चट्णीपूड. Note :- from Tamil. 

मोळम n  a length of aprox from elbow to tip of the middle finger. कोंपूर पसून मध्यल॑ बोटाच अग्र पतोरीच लांब॑. Note:-  from Tamil. Usually this unit of measure is used for the sale of lengths of tied flowers.

मोस॑ adj  of inferior quality or type. चोखोट नाहीत॑. uis येतां-येतां राष्ट्रीयांत॑ मिळणारांच वागणे फार मोस॑ होत आहे. Note :-  FromTamil. 

मोस॑ n  confidence trick. betrayal. एमात्तम (Tamil). uis मला कळ्लते एकला तज बरोर बिसिनस कराला मझ मागे उदंड दिवसा पसून हिंडत होता. शेवटी, मी मझ चोखोट कामांतून रिसैन करून, एक चोखोट बंडवाळानिशी तज बरोर मिळ्लों. सहा महिनाचांतच तो पूरा पैसेनिशी नापत्ता होऊन पळून गेला. मला एवढे मोस कधीनीं झालत नाही. Note :-from Tamil.

मोसंबि n a type of citrus fruit. सात्तुकुडि (Tamil).

मोह n  fascination. acute desire. अत्यंत/फार अवडणे.

मोहन adj  captivating. मनाला आकर्ष कराच॑.

मोहर n a gold coin of an earlier historical perod. पुरातन चरित्र काळाच सोनेच नाण्य.

मोहर n  flower bud. मोगर॑. उगनात॑ फूल. फूलाच मंजरि.

मोहरणे vi  to blossom. मोहर येणे. फूल उगणे. 

मोहरम n  the first month of the Muslim year. मुस्लीम वर्षाच पहिलच महिना.

मोहरि n  mustard. कडुगु (Tamil). राई. मोगर॑. मोगरि.

मोहिनि n  enchantress. मनाला आकर्ष करणारि. कामिनि.

मोक्ष n  release from births and deaths for the Athma. आत्माला जनन-मरणांत्सून मुक्ति मिळणे.

मोंड adj  blunted (cutting edge of a knife etc.). मोंड. कापाच शक्ति उण॑ झालते. 

मोंड adj  unreasonably stubborn or obstinate. मनाच मूर्खपण॑.

मोंडपण॑ n  unreasonable stubbornness or obstinacy. मूर्खपण॑.

मोंबत्ति n  wax candle (lamp). मेणवात. मेण वाताच दिवा.

मौ adj  soft. मृदु. मऊ. uis (1) मखमलाच नाहली-ऊंशीच॑ गौसण उदंड मौ अस्ते. (2) सहा, सात महिनेच ल्हान लेंकरे शिवाला फार मौ असतात॑.

मौ fig  mild (mannered). tender (disposition). सौम्य (स्वभावाच). मऊ.

मौन n  silence. गुपचुप. बोलनास्क॑ असणे.

मौनवृत॑ n  vow of silence. मौनाच वृत.

मौलवि n  a Muslim jurist. मुस्लीम धर्मशास्त्राच पंडित.

मौवाळिक adj  soft spoken. सौम्यांत॑ बोलणार. uis अम्च आफीसांत एक षाणा "एनजीनीयर" आहेते. तेनी फारच मौवाळिक. तेवढे वरले असणारीं त्यंच वाटे झालतेएवढ॑ काम होडाला पाह्तील॑. तेनीहीं नित्य आठ/नौ घंटे पतोरी काम करत अस्तात॑. पाह्यलतर पाप वाटते. Note:- मवाळ in sm is a figure of speech meaning "of soft/ mild/bland demeanour or disposition" etc.

मैश n  he-buffalo. दादिगा म्हैश. म्हैश ; म्हैसा in sm.

मैश n  she-buffalo. बायको म्हैश. म्हैश ; म्हैस in sm.

म्ळेच्छ॑ n  a derogatory reference to a person who does not follow Hinduism. हिंदु धर्म आचरण करनाते वेगळ॑ धर्माच मनुषाला तुच्छ होऊन सांगाच एक शब्द.

म्हण n  a saying. a proverb. विशेश अर्थ असाच एक गोष्ट. uis "विनाश काले विपरीत बुद्धी" अस एक म्हण आहे.

म्हणे conj  a conjunction used for emphasising a verb. विशेष महत्व द्याला एक क्रीयपदाच बरोर जोडाच शब्द. eg. बोलम्हणे (let us talk), उठम्हणे (let us get up). etc.

म्हणणे vt & vi  to say. to utter. to talk. सांगणे. बोलणे.

म्हणिवणे vt  to cause to speak. बोलिवणे.

म्हणींगणे vt  to assume. अनुमान करींगणे. मनांत॑ ठींगणे.

म्हणून adv  because. on account of. ते काराणा करतां.

म्हणून adv  therefore. ते करतां.

म्हणून adv as a result. तज॑ मळे.

म्हण्जे adv  that means. that is to say. एकाच अर्थ काय म्हणून सांगणे.

म्हाग adj  costly. माघ. मोल जास्ति असाच. सवंगाच विरुद्ध.

म्हातार॑ adj  aged. वय झालते ; म्हातारा in sm.

म्हातारा n  old man. वृद्धवय झालते मनुष॑.

म्हातारी n  old woman. वृद्धवय झालते बायको.

म्हातारे कोतारे n  elderly and aged persons. वय झालते लोक॑. uis  रेस्टोरेंटाला जेवाला गेल तर॑ म्हातारे-कोतारे अस्कीन तिकडे बसलसाच पाहुया. त्यंच नातुंडाना पाहींगा करतां येतात म्हणून मला संदेह आहे ; कारण, नावाला कायकी थोड रूच पाह्तात विना तेनी जास्ती काहीं खात नाहीते.

म्हातारपण॑ n  old age. वृद्धवय झालते स्थिति. 

म्हैश n  he-buffalo. दादिगा म्हैश. मैश ; म्हैसा in sm.

म्हैश n  she-buffalo. बायको म्हैश. मैश ; म्हैस in sm.

No comments: