स
स the thirty-fourth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच चौतीसवां व्यंजन॑.
स prep together with. सह. सहित॑. बरोर. uis (1) साधारण होऊन वराडाच नाहीतर मुंजाच आमंत्रण॑ पत्रांत॑ "सपरिवार या" अस लिव्हलसेल॑. (2) अम्च॑ संप्रदाया प्रकार सगोत्र वराड निषिद्ध आहे.
सकर्मक क्रियापद n transitive verb (gram). वाक्याच अर्थ पूरा कळिवाला कर्माच (object's) आवश्य असाच क्रियापद.
सकल adj all. entire. संपूर्ण. सगळ॑. अस्कीन. अग्गीन.
सकाळ n morning. पाष्टे. पास्टे. Note:- the word पाष्टे or पास्टे appears to be derived from the old SM word पाहटे (meaning, morning), the ह being substituted with ष or स in DM.
सकाळि adv in the morning. पाष्टेच वेळि.
सक्क॑ adj direct (kith and kin). related in full measure. properly full. स्वंत संबंधाच (व्यक्ति). सख्ख॑ ; सख्खा/सगा in sm.
सख्ख॑ adj direct (kith and kin). related in full measure. properly full. स्वंत संबंधाच (व्यक्ति). सक्क॑ ; सख्खा/सगा in sm. uis अम्ही भाऊ-भाऊंडे तीघदनांसीं अम्च आजीच वाढिवलते. त्यांत॑ एकला मझ॑ सावत्र भाऊ होता. अण्कि एकला मझ॑ सख्ख॑ भाऊ.
सगडी n a stove fired by charcoal. शेगडी. कोळसाच चूल. uis (1) सोवळेच संपाकाला अत्तपणीं कोळसाच सगडी उपयोगांत आहे. (2) देवाच नैवेद्याला सगडींत केलते संपाकच असाम॑.
सगोत्र adj belonging to the same Gothra. एकच गोत्रांत॑ मिळालते.
सगोत्र वराड n marriage between persons of the same Gothra. एकच गोत्रांतल॑ दोघेंच वराड. Note :- such weddings are taboo in Hinduism.
सगळ॑ adj entire. all. सकल॑. पूरा. संपूर्ण ; सगळा in sm.
सगळ॑ adj whole. unbroken. full as it is. पूर्ति असाच॑ ; सगळा in sm.
सगळीन adj everything. अग्गीन. अस्कीन. अस्गीन.
सडा सारिवणे vt to spinkle the floor or wall with thin cow-dung water and cleaning. सारिवणे. नित्तळ शेण पाणींत॑ भोई, नाहीतर॑, भिंत पुसून शुध करणे.
सण n religious festival. सेण.
सणवार n festival day. सेणवार. सणाच दिवस.
सतरंग n game of chess. एक खेळाच नाव. चतुरंग.
सतावणे vt to tease. to vex. to harass. सळिवणे.
सति n a chaste and devoted wife. पतिव्रता.
सति n a wife who has burnt herself in the funeral pyre of her husband. दाल्लाच चितांत॑ स्वता जळून मेलते स्त्री.
सत्कार n welcome homage. आदरांत स्वीकार करणे.
सत्तर n seventy. सात गुणा दहा.
सत्त॑ n nutritive content. essence. पोषक अंश. Note :- from Tamil. uis तांदूळ "पॉळीष" केलतर॑ तज सत्त॑ पूरा जाईल म्हणून "ब्रौण-रैस" खाणारांच संख्य हे मध्ये वाढत आहे.
सत्य n truth. वास्तवपण॑.
सत्य adj true. real. खर॑.
सत्यनाश n total ruin. total destruction. सर्वनाश. संपूर्ण हाळ होणे.
सत्यनाश n total fiasco. पूरा निष्फल होणे. पूरा व्यर्थ होणे.
सत्यपरीक्षा n test to ferret out the real truth. कठोर परीक्षा.
सत्यप्रतिज्ञा n a swear by truth. सत्याच वर वाग्दान देणे. सत्य वचन॑.
सत्यप्रतिज्ञा n swearing in ceremony (for Ministers etc). प्रतिज्ञा करून पदवि घेणे (मंत्रि लोकांच).
सत्यवान n an honest person. a truthful person. एक सत्यशील मनुष.
सत्यशील adj one who practices the truth. सत्य स्वभावाच मनुष.
सत्य हरिश्चंद्र fig a derisive term for a person who claims to be an honourable man. सदा सत्यशील म्हणून अपाप सांगींगणार मनुषाला मष्किरींत सांगाच एक गोष्ट. Note :- from the mythological story of King Harischandra, a true pratitioner of adhering to the word he had given.
सत्याग्रह n name of a political strategy adopted by Mahatma Gandhi. महात्मा गांधि आरंभ केलते एक राजकीय प्रस्थानाच नाव.
सत्याग्रहि n a person who follows the sathyagrha method. सत्याग्रह आचरण कराच मनुष.
सत्रा n seventeen. सोळाच नंतरल॑ संख्या ; सतरा in sm.
सदा adv always. केम्माईं. केम्मीं. केम्हाहीं. केम्हीं.
सदानंद adj ever happy. सदा आनंद असणार॑.
सदाशिव n Lord Siva. महादेव.
सद्गुण॑ n virtue. उत्तम गुण॑. चोखोट गुण॑.
सद्गुरू n honourable spiritual leader. उत्तम गुरु.
सद्रूप॑ n of identical form. एकसार्ख असाच॑. तद्रूप॑.
सद्या adv at present. for the present. for the time being. for now. हे वेळीला. सध्या.
सध्या adv at present. for the present. for the time being. for now. हे वेळीला. सद्या.
सनद n a charter, an edict, a commission or a warrant of authority etc issued by the governing authority. प्रत्येक विषयाव॑र सरकार देलते प्रमाण पत्र. सनदापत्र.
सनदापत्र n a charter, an edict, a commission or a warrant of authority etc issued by the governing authority. प्रत्येक विषयाव॑र सरकार देलते प्रमाण पत्र. सनद.
सनातन adj eternal code of ethics from time immemorial. पुरातन कालांतून याच निरंतर॑ असाच धर्मशास्त्र.
सन्निधान n Godly presence. देवाच आवाहन असणे.
सन्निधि adv nearby presence of God. देव जवळ असणे.
सन्मान n respect. homage. आदर॑.
सन्मार्ग n virtuous way. चोखोट रीतीच वागणे.
सन्यासि n an ascetic. ऋषि. मुनि.
सपरिवार adv with family. कुटुंब समेत. सहपरिवार.
सपाट adj flat, plain or level surfaced. चपटा. सम तळ. uis (1) हैदराबादांत मझ वडील भाऊच आर्किटेक्ट बांधलते घरच॑ भोंईं वर-खाले आहे. भोंईं सपाट नसाकरतां झाडूमाराला कष्ट होत॑ म्हणून वहिणी सांगट्ले. (2) तळ॑ व॑र-खाले होतते एक जमीन मला उणे मोलांत॑ मिळ्ल॑. घर बांधाच पुढे जमीन सपाट कराला सहा लाख होऊया म्हणून आर्किटेक्ट सांगतो.
सपोटा n name of a delicious fruit. एक गुळ्चीट फलाच नाव. चिक्कू. Note:- "sapota" is a Spanish word of South American Aztec origin.
सप्त n seven (ordinal number). सात.
सप्तऋषि n the seven ancient sages of Hinduism (Marichi, Atri, Angirasa, Pulastya, Pulaha, Ritu and Vasishta). हिंदु धर्माच सात महाऋषीं (मारीची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, ऋतु अणी, वसिष्ट).
सप्तऋषि n name of a small cluster of seven stars named after the Saptharishis. सप्तऋषींच नावांतल॑ नक्षत्राच एक ल्हान समूह.
सप्तपदि n a Vedic ritual forming part of the wedding ritual, during which the bride and the groom take seven steps around the sacred fire. वराडाच कार्यक्रमांत॑ वेदानुसार कराच एक पद्धत॑ (अग्नीच भोंताले सात पाऊल काढाच).
सप्तमि n the seventh day of each lunar fortnight of Hindu calendar. हिंदु पंचांगांत॑ प्रत्येक पक्षांत॑ याच सातवां दिवस.
सप्पक adj of insipid taste. bland taste. रूच/स्वाद उणे असाच॑ ; सपक in sm.
सप्पक-पिट्ळे n a liquid preparation eaten with cooked rice. भाताच बरोर खायाच एक कालिवण॑.
सभा n a meeting convened to discuss issues. सभा.
सभागृह n a hall used for meetings. सभा चालिवाला उपयोग कराच ठिकाण/खोलि.
सभाध्यक्ष n the person who presides over a meeting. सभाच अध्यक्ष. सभा चालिवणार. सभापति.
सभापति n the person who presides over a meeting. सभा चालिवणार. सभाध्यक्ष.
सभांगण॑ n an open place for holding meetings. सभा चालिवाला उपयोग कराच एक उघड॑ ठिकाण.
सम adj equal. तुल्य.
सम adj like. सार्ख.
सम adj similar. सार्ख.
सम adj identical. सार्ख.
समज n comprehension. अर्थ होणे. ग्रहण.
समजणे vt to understand. to comprehend. अर्थ कळींगणे. मनांत॑ होणे.
समजिवणे vt to advise. to make one understand. समजून कळिवणे. कळिवून देणे ; समजावण॑/समजाविण॑ in sm.
समजिंगणे vi to realise by oneself. अपाप कळिंगणे.
समदृष्टि n viewing with impartiality. पक्षपात नाहीस्क॑ पाह्णे. निष्पक्ष असणे.
समभाग n equal share. तुल्य भाग.
समभाव n same attitude. एक सार्खल॑ वागणे. तुल्य होऊन वागणे. uis गरीब-भाग्यवंत, थोर कामांत॑-ल्हान कामांत॑ असणार अस तेवढ॑दनाचीं बरोर समभावांत वागणार स्वामि/आचार्य लोकच खर॑ ज्ञानि म्हणूया. नाहीतर॑, तेना नुस्त ढोंगी स्वामि म्हणाम॑.
समय n time. वेळ.
समय n occasion. वेळ.
समय संजीवि fig a person who acts just in time. समय होतान मात्र कार्य कराच मनुष.
समयाजोक्त॑ adv as per timely convenience. समयाच अनुकूल प्रकार. समयानुचित.
समयाजोक्त॑ adv as per opportunity. वेळा जोक्त॑. वेळा प्रकार॑. समयानुचित.
समयानुचित adv as per timely convenience. as per opportunity. समयाच अनुकूल प्रकार. वेळा जोक्त॑. वेळा प्रकार॑.
समयाप्रकार adv as per timely convenience. समया जोक्त॑. वेळा प्रकार॑. समयानुचित.
समर॑ n war. युद्ध. uis भारताच पह्यिलच स्वातंत्र्य समराला झान्सीच राणि लक्ष्मीबाई नेतृत्व देले.
समरूप adj of same appearance. पाह्याला एकेच रूपाच॑. एकसार्खल॑ आकाराच॑.
समर्थ adj capable. कार्य सिद्ध कराला शक्ति असणे.
समर्थ adj clever. षाणपण॑. शाणपण॑.
समर्पण॑ n making over with reverence. भक्ति अथवा भव्यांत॑ अर्पण॑ करणे.
समर्पण॑ n dedication. अर्पण॑.
समश्या n a problem. a knotty issue. (विवादाच) प्रश्न ; समस्या in sm.
समसमान॑ adj equal. तुल्य. सरिसमाच॑.
समसमान॑ adj identical. एक सार्खल॑. सरिसमानच॑.
समागम n a coalition or association of people. लोकांच संघ. लोकांच समूह. uis फेस-बुकांत "मराठी देशस्थ मध्व समागम" हे नावाच तंजावूर मराठी लोकांच संघांत एकहदारचारशें मेंबरलोक॑ आहेत॑.
समाचार n news. वार्ता. विवर॑. विषय.
समाचार पत्र news paper. वार्ता पत्र.
समाज n society. समुदाय.
समाजकार्य n social work. लोकसेवा. समाजा कर्तां कराच काम.
समाजशास्त्र n sociology. समाजा विषयीं विवरण द्याच शास्त्र.
समाजसेवा n social work. समाज उद्धार होयाला कराच काम.
समाधान n pacification. मनाच॑ शांति.
समाधान n contentment. तृप्ति.
समाधि n a state of intense meditation when all senses are dormant and mental activity ceases. ध्यानाच एकदम गाढ स्थिति (हे स्थितींत॑ सगळ॑ इंद्रीयईं मन्नीं पूरा शांत होत॑).
समाधि n a tomb of a Saint. यतींच इहलोक शरीर सांभाळून ठिवाच स्थल.
समान adj even. सम.
समान adj equal. तुल्य. सम.
समान adj like. एक सार्खल॑. सम.
समानता n evenness. समपण॑.
समानता n equality. तुल्यपण॑.
समानता n likeness. सार्खपण॑.
समापन॑ n end. समाप्ति.
समाप्त adj finished. पूर्ति होणे. संपणे.
समाप्ति n completion. संपणे. वारणे.
समाराधना n a religious propitiation. धर्माच प्रकार कराच एक संभावनाच पूजा.
समारंभ n a festival. function. उत्सवाच कार्यक्रम.
समाळणे vt to manage. सांभाळणे. uis अत्ताच पह्यिलंदा मझ लेंक तिज दोन लेंकरांलीं ठींगून ट्रैनांत जायाच॑. तिला ते समाळाला होईलकी कायकी.
समाळणे vt to endure. सोसणे. सहन करणे. uis हे वर्ष उन उदंड जास्ति आहे. अण्कीन दीड महिना कस तरीन समाळींगून बसलतर॑, नंतर॑ पाऊसाळा आरंभ होईल॑.
समाळणे vt to maintain. पाह्यींगणे. सांभाळणे. uis अम्ही एवढ॑ मोट्ठ॑ घर बांधलस्ताने. समाळाला फार कष्ट झालाहे.
समाळणे vt to look after. पाह्यींगणे. सांभाळणे. uis यंदा अम्ही गामाला जाताना अम्च कुत्राला तुम्चकडे सोडूनटाकून गेलतर॑ तुम्हाला ते समाळाला होईलका ?
समाळणे vt to protect. रक्षा करणे. सांभाळणे. uis तो एक मोट्ठ॑ कंजूस म्हणून अग्गिदनालीं कळल॑. तज पैसा समाळणे, हे विना तला वेगळ॑ काम काहीं नाही.
समिति n committee. मंडळ. मंडळि.
समी n a self standing lamp of brass or silver with one to five wicks. कुत्तुविळक्कु (Tamil) ; समई in sm. uis अगाऊच काळांत वराडांत दोन थोर रुपेच समी देणे आहे. अत्ता असाच रुपेच मोलाला तेच उण॑अपक्षा एक लाख रुपे होऊन जाईल. Note:- it is lit in front of God or during an inaugural function.
समीप॑ adv close by. nearby. जवळ॑.
समीप॑ adj nearby. जवळच॑.
समीपांत॑ adv recently. हे जवळ॑. uis सी.पी.ऐ.(माओ) पक्ष॑ पुन्हा-पुन्हा त्यंच स्वाधीना खाले असाच प्रदेशांत॑ रेलवे-ट्राकाला उडीऊन नाश कराच एक मोट्ठ॑ चिंताच विषय झालाहे. हे आफत्तांतून चुकिवाला समीपांत॑ केंद्र सरकार रेलवेच अपाय उणे करिवाला उपयोग होयाच एक उपकरण॑ वापराला निश्चय केलाहेत॑.
समुदाय n community. समूह. समागम.
समुद्र n sea. सागर.
समुद्रांत॑ हिंग विघरिवलातास्क॑ say a saying meaning, "a futile job". "व्यर्थ काम", हे अर्थाच एक म्हण॑. Note :- the literal meaning being, "like trying to dissolve asafoetida in the ocean".
समूह n a community of people. a group of people. समुदाय. समागम.
समूहगाणे n a group song. सगळीन/अग्गिदनीं मिळून सांगाच गाणे.
समृद्धि n bounteousness. धारळ वाढणे.
समृद्धि n prosperity. ऐश्वर्य.
समेच adv immediately. promptly. instantly. सवेच. तेच वळांत॑. तक्षण॑ ; सवेचि/सवेच in sm.
समेत prep along with. सहित.
समेत adj concomitant. adjoined. मिळून असाच.
समोर adv in front of. सोमोर. पुढे पटीस.
समोरच॑ adj relating to the front. सोमोरच॑. समोरला संबंध झालते.
समोरल॑ adj relating to the front. सोमोरल॑. समोरला संबंध झालत॑.
समोर-समोर adv face-to-face. सोमोर-सोमोर. एकालेक समोर.
समोरून adv from the front. सोमोरून. पुढेसूं. पुढे पटीसांतून.
सम्मत॑ n acceptance. रुजू. uis अम्ही एवढ॑ पतोरि पाठिवलते कोण्त॑ संबंधीन मझ लेंकीला सम्मत नाही. तिज वराड केम्हा होतकी म्हणून अम्हाला चिंता वाटलाहे.
सम्मत॑ n consent. अनुमति.
सम्मत॑ n agreement. एकालेक ओपींगणे. अन्योन्य ओपींगणे.
सम्मत॑ n concurrence. संम्मत॑.
सम्मान n respectful gifts or offerings. आदरांत द्याच आहेर.
सम्राट n emperor. चक्रवर्ति. साम्राट.
सये n remembrance. सय. मागे झालते विषय मनांत॑ सुचिंगणे. अठवणे. स्मरण.
सर n a string of an ornament, flowers etc. फूल, मणी खडे असलत्याच एक माळ.
सर n rain. पाऊस.
सर n a gush of water. पाणीच जोर प्रवाह.
सर n akin to. सारख॑. सार्ख. uis ते पोरीच गाळ तंबडसर आहे म्हणजे, तिज गाळाच रंग तंबड रंगासार्ख आहे म्हणून अर्थ.
सर ind a particle from सरणें (like in करूनच सरांव॑). पुढे संपिवणे.
सरकणे vi to shift. एक ठामांतून वेगळ॑ ठामाला होणे.
सरकिवणे vt to shift. एक ठामांतून वेगळ॑ ठामाला करणे ; सरकवण॑/सरकविण॑ in sm.
सरकार n government. राज्यभार कराच अधिकार.
सरकारी adj relating to the Government. सरकाला संबंध झालते.
सरणे vi to go on or proceed suitably to the end. (पुढे) बरोर संपणे. uis कोण्त तरीन एक काम हाति काढलतर॑ ते नीट करूनचसराम॑ म्हणून मला आहे.
सरदार n chieftain. मुख्या. नेता.
सरदार n a Sikh gentleman. सिख धर्माच एक मनुष.
सरदारीण॑ n a Sikh lady. सिख धर्माच एक स्त्री.
सरप॑ n snake. सर्प.
सरबत n a sweet flavoured drink consumed for cooling the body. सर्बत. आंग हिंस॑ होयाला पीयाच एक पानक.
सरस्वति n Goddess of learning and speech. वाग्देवि.
सरळ॑ adj uncomplicated. सरळ॑. सीधा.
सरळ॑ adj guileless. straightforward. सरळ॑.
सरायि n trousers. leggings. लांब विजार.
सरासरि adv in a rough estimate. सुमार इषोबाच/हिषोबाच.
सरासरि n average or mean (in arithmetic). (इषोबांत॑) मध्य वर्गाच / प्रकाराच.
सरासरि adj ordinary. common. साधारण प्रकाराच. सामान्य प्रकाराच.
सरी adj okay. बर॑. Note :- from Tamil.
सरीसमान॑ adj comparable (on account of equality). एकसार्ख असाच॑.
सरोज n lotus. कमळीच फूल॑.
सरोजिनि n lotus plant. कमळीच वेल.
सरोद n name of a stringed musical instrument. तंतीच एक वाद्य.
सरोवर n a lake. तडाग.
सर्ग n a section of a book. a chapter. a canto. ग्रंथाच भाग. खंड.
सर्प n snake. सरप॑.
सर्बत n a sweet flavoured drink consumed for cooling the body. सरबत. आंग हिंस॑ होयाला पीयाच एक पानक.
सर्बराय n take care. शुश्रूषा. पालन. uis कुत्र घरांत वाढिवणे म्हणजे मला तेवढ॑ अवडना, कारण, तला सर्बराय करत बसनातर घरांत इकडे तिकडे झडून पडलसाच तज केंस लेंकरांच आरोग्याला हानी करेल.
सर्व adj all. सगळ॑. पूरा. अग्गीन.
सर्वत्र adj entire. all. पूरा.
सर्वत्र adj everywhere. सर्व ठिकाणीन॑.
सर्वनाम॑ n pronoun (gram). एक नामाच बद्दिल प्रयोग कराच वेगळ॑ एक गोष्ट.
सर्वनाश n total destruction. पूरा नाश. सत्य नाश.
सर्वव्यापि adj the all pervading God. सगळ॑ ठामीं असणार॑ देव. विश्वव्यापि.
सर्वश्रेष्ठ॑ adj the very best of all. सर्वांतीन श्रेष्ट. सर्वोत्तम.
सर्वसंमत॑ adj acceptable to all. सग्ळासीं संमत असाच॑.
सर्वसाधारण॑ adj very ordinary. उदंड॑ साधारण॑. मामूलि. सर्वसामान्य.
सर्वसाधारण॑ adj nothing unusual. very normal. very common. प्रत्येक काही नाहीते. सर्वसामान्य. uis जुने काळांत॑ धोबीलोकांच गाढव धुवाच कापडाच गांठोड उचलींगून जायाव दृश्य सर्वसाधारण होत॑.
सर्वसामान्य adj very common. सगळ॑कडीन असाच॑. सर्वसाधारण॑.
सर्वसेवा n name of a pooja ritual offered by devotees in a temple. देऊळांत॑ भक्तजन॑ करिवाच एक पूजाच नाव.
सर्वज्ञ adj all-knowing. सर्व विषयीं कळलते मनुष.
सर्वाधिकार n total power. पूरा अधिकार.
सर्वाधिकारि n the person will full powers. सर्व अधिकारीन असाच मनुष.
सर्वांग n full body. पूरा आंग. संपूर्ण शरीर.
सर्वोत्तम adj best of all. सर्व श्रेष्ठ.
सलवार-कमीज़ n salwar-kameez, a type of dress worn by women. सलवार-कमीज़.
सलाम n salutation (used normally by a Musalman). नमस्कार (मुसलमान लोक॑ साधारण॑ होवून सांगाच॑).
सळिवणे vt to tease. to vex. to harass. नच्च करणे. जाच करणे. सतावणे. uis अगाऊ अस्कीन सासू घरच सूनाला सळिवाच अम्ही ऐकलोंहे. अत्तच काळांत उपराठ जालाहे. सून लोक॑ सासूंला सळीवतात॑.
सळिवणे vi to rankle. मनाला तंटा वाटणे.
सवरन n a unit of measure (equal to 7.322 grams) for weighing gold. सोनेच वजन पाह्याच एक माप (7.322 ग्रामाला तुल्याच॑). uis जुने कालांत॑, म्हण्जे तीस चाळीस वर्षा पुढे, सोनेच माळमत्ताच वजन एवढ॑-एवढ॑ सवरन अस सांगत होते. हे दंडक ग्रामाच उपयोग आरंभ झाला नंतर हळ्ळू-हळ्ळू लोके सोडूनटाकले. Note:- from English to Tamil to DM. The word सवरन is derived from the British sovereign gold coin of 7.322 gram weight.
सवळा n sixteen. सोळा.
सवंग adj less expensive. cheap. उणे मोलाच॑.
सवा adj one and a quarter. सव्वा. एकाच वर पाव.
सवा adj a quarter more that a given number (usually 100, 1000). सव्वा. शंभर, हदार (हजार) असलते संख्यांच वर तज पाव जास्ति, म्हण्जे, सव्वाशे, सव्वाह्जार, अस॑.
सवारि n a trip. a journey. प्रयाण॑. यात्रा.
सवारि n a ride in a car/ vehicle, on a horse, elephant, donkey etc. बंडींत॑ नाहीतर॑ घोडा, हत्ति, गाढव असल॑ प्राणींच वर बसून कराच प्रयाण॑. Note:- स्वार in sm means 'a mounted state' and स्वारी in sm means 'rider on an animal'.
सवाल n question. प्रश्न.
सवाशणि n a married woman. सवाषणि. सवासिनि. सुवासिनि. सुमंगलि. दाल्ला वांचून असाच बायको ; सवाशीण/सवाष्ण/सवाष्णीण/सुवासिनी in sm. The etymology appears to be सह+वासिनि, meaning one who stays along with, ie, सह वास करणारी.
सवाषणि n a married woman. सवासिनि. सुवासिनि. सुमंगलि. दाल्ला वांचून असाच बायको ; सवाशीण/सवाष्ण/सवाष्णीण/सुवासिनी in sm.
सविता n Sun. सवित्र. सूर्य.
सवेच adv immediately. promptly. instantly. समेच. ते वळांतच. तक्षण॑ ; सवेचि/सवेच in sm.
सव्य adj contra of right, ie, left. उजव॑च विरुद्ध॑, मण्जे डाव॑. वाम. uis देऊळांत॑ प्रदक्षिणा करताना अम्च॑ सव्यकडून कराम॑. म्हणजे, देवाच विग्रह अम्च॑ उजव पटीस असाम॑.
सव्य adj reverse. उलटा. uis पितृपक्ष अणी माय बापाच श्राद्ध करताना आचरे अम्हाला "जानव॑ सव्य करा" अस सांगणे आहे. म्हण्जे, जानव॑ डावीकडे करा म्हणून अर्थ.
सव्य adj contrary. उपराट.
सव्वा adj one and a quarter. सवा. एकाच वर पाव.
सव्वा adj a quarter more that a given number (usually 100, 1000). सवा. शंभर, हदार (हजार) असलते संख्यांच वर तज पाव जास्ति, म्हण्जे, सव्वाशे, सव्वाह्जार, अस॑.
सष्ट्यब्दपूर्ति n celebration of sixty year in a man's life. एक मनुषाला साठ वर्ष पूरा होताना कराच सण. Note :- this is a corrupted form of षष्ट्यब्दपूर्ति. षष्ट+अब्द+पूर्ति = sixty + years + completion.
ससरा n father-in-law. सासरा. दाल्लाच अथवा बाईलीच बाप.
ससा n rabbit. hare. मुयल (Tamil).
सस्य adj relating to plants. वनस्पतीला संबंध झालते.
सस्याहारि adj vegetarian. नुस्त सस्य खाणार.
सह prep together with. सह. सहित॑. बरोर. uis साधारण होऊन वराडाच नाहीतर मुंजाच आमंत्रण॑ पत्रांत॑ "सह कुटुंब॑ या" अस लिव्हलसेल॑.
सहकार n co-operation. एकालेक सहाय कराच॑.
सहकारि adj co-operative. एकालेक सहाय करून चालिवाच॑.
सहकुटुंब adj with the family. कुटुंब सहित॑. सह परिवार.
सहज॑ adv casually. as a matter of course. just like that. साधारण होऊन. प्रत्येक कारण नाहीस्क॑.
सहन॑ n endurance. patience. सोसणे.
सहनशक्ति n capacity for tolerance. capacity for endurance. सोसींगाच शक्ति.
सहपरिवार adv with family. कुटुंब समेत. सपरिवार.
सहवास n association. मिळून असणे. बरोर राह्णे.
सहवासदोष॑ n evil influence. सहवासामुळ॑ होयाच दोष/अवघडपण॑.
सहस्र n a thousand. एक हदार. एक हज़ार.
सहस्रनाम॑ n a thousand names of God. देवाच एक हदार नाव.
सहा n six. पांचाच नंतरल॑ संख्या.
सहा महिनेच जांभाई say a saying meaning "a long period of laziness". "उजंड दिवसाच आलस॑" हे अर्थाच एक म्हण॑. Note :- the literal meaning being, "a six month yawn".
सहाय्य n help. उपकार. सहाय.
सहित॑ prep along with. बरोर. सह. स.
सही n signature. सही.
सहोदर॑ n brother. भाऊ. Note:- सह means 'co-' and उदर means 'abdomen' ie, born of the same womb.
सहोदरि n sister. बहीण.
संकट n sadness. मनाच दुख॑.
संकल्प n volition. मनांत॑ विचारणा करणे.
संकल्प n an enunciation of purpose preparatory to performing a religious rite. पूजा कार्यक्रम॑ कराच पुढे सांगाच पूजाच उद्धेश.
संकोच n bashfulness. विनय भावाच लज्जा. बीड.
संकोचण॑ vi to feel abashed. संकोच भोगणे. संकोच होणे.
संक्रांति n movement of sun or planet from one sign of the zodiac to another. सूर्य अथवा एक ग्रह॑ एक राशींतून अण्किएक राशीला सरकाच॑.
संख्या n number. numeral. अंक.
संगठन n an organisation. एक स्थापना.
संगम n confluence of rivers. नदींच मिळणे.
संगीत n music. गाण॑.
संगीतसभा n music academy. संगीताच स्थापना.
संग्रह॑ n collation. aggregation. एक ठामि करणे.
संघ n an association of people. समूह. समागम.
संघटना n an organisation. संस्था.
संचार n to and fro movement of people. लोकांच चाली. लोकांच येणे-जाणे. uis मनुषांच संचार नाहीस्क अथवा उणे संचार असाच ठिकाणि बायका एकट जाणे बर असना.
संजीवनि n name of a mythical herb capable of restoring life to the dead. मरलत्यांला पुन्हा जीवन द्याच एक दिव्य वनस्पति. मृतसंजीवनि.
संडिगे n a sun-dried and fried snack. ऊनांत॑ वाळिवून तळून खायच एक पदार्थ. वड्या. वडा. वत्तल (Tamil) ; सांडगा in sm. Note :- from Kannada.
संत n saint. साधू.
संतत adv continuosly. constantly. निरंतर॑. Note. सतत in SM.uis चार दिवसा पसून अम्च॑ गांवांत संततधार पाऊस रिचिवत आहे.
संततधार adj continuosly pouring (rain). निरंतर॑ पडाच (पाऊस). Note :- धार here means 'a stream of a liquid'; like in धार काढणे, meaning 'streaming or milking cow'.
संतति n progeny. लेंकरेबाळ॑. संतान॑.
संतान॑ n children. लेंकरेबाळ॑. संतति.
संताप n anguish. गाढ दुख॑.
संतृप्त adj satisfied. तृप्त.
संते n a market usually conducted on any particular day of a week where vegetables and other agricultural products are sold. shandy. भाजीपालाहीं जमीनांत॑/शेतांत॑ वाढिवाच वेगळ॑ उत्पन्नीं विका करतां वाराला एक प्रत्येक दिवसी चालिवाच दुकान-बीद॑. Note :- from Tamil.
संतोष n delight. आनंद.
संतोष n satisfaction. समाधान॑.
संदर्भ n situation (of an incidence or occurrence). context. (एक कार्याच/विषयाच) परिस्थिती. uis गेल वार अम्ही चेन्नैला गेलोतों. ते संदर्भांत॑ तिकडून भुवनगिरीला जावून श्री राघवेन्द्रस्वामींच अवतार स्थळ दर्शन करून आलों.
संदर्भ n (contriving or planning a) context or opportunity. एक कार्य संभव होयाला कराच प्रयत्न॑. uis मझ लोंक काम हुडकत आहे. तुम्च आफीसच मोट्ठ॑ आफीसराला मिळाला एक संदर्भ करून देलतर॑ तला उदंड उपकार होईल.
संदूक n box. trunk. एक मोट्ठ पेटि. uis (1) चाळीस/पन्नास वर्षा पुढे लोक॑ लोक्कुंडाच/लोखंडाच संदूक उपयोग करत होते. पण, अत्ता "प्लास्टिकाच सूट्केस" घेतात॑. (2) मिलिटरी जवानांकडे अत्तीन लोक्कुंडाच संदूक अस्ते.
संदेश n message. दूसरेकडे पाठीवाच वार्ता.
संदेह n doubt. शंका.
संदेह n suspicion. संशय.
संधि n a union. मिळणे.
संध्या n evening. सूर्यास्तमानाच वेळ. सायंकाळ॑.
संध्या n a vedic ritual propitiating the Sun god. सूर्यभगवानाला कराच एक ध्यान॑. संध्या वंदन॑.
संध्यावंदन॑ n a vedic ritual propitiating the Sun god. संध्या.
संध्याकाळ॑ n evening. सूर्यास्तमानाच वेळ. सायंकाळ॑. uis संध्याकाळी नंख कापताने म्हणून सांगणे आहे.
संन्यास n renunciation of the worldly things to focus on God. इहलोकभोग सोडून देवाकडे श्रद्धा देणे.
संन्यासि n one who has renounced the world. an ascetic. यति.
संपणे vi to come to an end. वारणे. समाप्त होणे. Note:- in sm वारणे means 'to die.'
संपत्त॑ n wealth. धन. आस्त॑. स्वत॑ ; संपत्ती in sm.
संपर्क n social contact. संबंध.
संपंगी n a type of flower or its tree. चांपा. चंपक. Note :- from Tamil.
संपाक n cooking. जेवण॑ तयार करणे. ; स्वयंपाक in sm.
संपाकघर n kitchen. संपाकाच खोलि ; स्वयंपाकगृह/स्वयम्पाकघर in sm.
संपाकविध n recipe. संपाक कराच विध.
संपाकी n a male cook. संपाक करणार.
संपाकीण॑ n a female cook. संपाक कराच बायको.
संपादन॑ vt to earn. संपाद्य करणे.
संपादन॑ vt to acquire. to get. मिळिवणे.
संपादन॑ n earnings. मिळिवून ठिवाच॑ (पैसा).
संपाद्य n earnings. मिळिवलते (पैसा).
संपुट n a casket for keeping puja items. पूजा सामग्रि ठिवाच पेटि. संपुष्ट.
संपुष्ट n a casket for keeping puja items. पूजा सामग्रि ठिवाच पेटि. संपुट.
संपूर्ण adj complete. पूरा.
संप्रदाय n custom. practice. रीत॑. पद्धत॑.
संप्रदाय n a religious practice. धर्म परंपरागत.
संबंध n relationship. संमंध.
संबंध n alliance. वराडाच संबंध. संमंध.
संबंध adj concerned. संमंध.
संबंधी n son's parents-in-law. लोंकाच सासू सासरा/ससरा. संमंदी. व्यांही-विहीण॑. Note :- from Tamil.
संबंधी n daughter's parents-in-law. लेंकीच सासू सासरा/ससरा. संमंदी. व्यांही-विहीण॑. Note :- from Tamil.
संभव n possibility. likelihood. साध्यता. Note:- असंभवाच विरुद्ध॑.
संभावना n respectful offering. बहुमानांत॑ द्याच॑. uis अम्च घराला सदा याच पुरोहित अमुक-अमुक पूजाला एवढ॑-एवढ॑ पैसे देवुनचसराम॑ म्हणून कधीहीं विचारलते नाही. पूजा झालवर निघाच वेळ अम्ही द्याच संभावनापणीं डोळेवाटी बरोर पाह्यनास्क॑ पिशवींत॑ घालींगून निघतील॑.
संभावना n contribution (to a cause). donation. (पैसे अथवा सामग्रि एक कार्यक्रमाला) द्याच॑. uis वर्षा-वर्षी होयाच गणेश उत्सवाच वेळ बीदींत॑ मंटप बांधून गणेशाला बसिवाला पूरा बीदीच लोकांकडून संभावना घेणे आहे.
संभाषण॑ n conversation. लोकांमधल॑ बोलणे.
संभ्रम n mental agitation. मनाच गोंधळ॑.
संभ्रम n impetuous ardor or enthusiasm. जोराच उत्साह.
संमंदी n son's parents-in-law. लोंकाच सासू सासरा/ससरा. संबंधी. व्यांही-विहीण॑. Note :- from Tamil.
संमंदी n daughter's parents-in-law. लेंकीच सासू सासरा/ससरा. संबंधी. व्यांही-विहीण॑. Note :- from Tamil.
संमंध n relation. सोयर॑.
संमंध n connection. संबंध.
संमंध n marriage alliance. वराडाच॑ संमंध. संबंध.
संमेळन॑ n a gathering. a meeting. लोकांच॑ मिळण॑ ; संमेलन in sm.
संरक्षण॑ n protection. रक्षा करणे. सुरक्षा करणे.
संवत्सर॑ n a year in the sixty year cycle in the Hindu tradition. साठ वर्षाच हिंदु कालचक्रांत एक वर्ष.
संशय n doubt. संदेह. शंका.
संसार n worldly affairs. भूलोकांत जीवन चालिवाच विषय.
संसार n the world. इहलोक.
संसार करणे vt to run a family. कुटुंब चालिवणे. uis स्विट्सरलॅन्डांत गाईचगोठा कित्ति निट अस्ते म्हण्जे, अम्ही पणीं तथे संसार करूया !
संस्कार n a rite or ceremony ordained by religious custom. धर्म प्रकारच॑ संप्रदाय.
संस्कृत n Sanskrit language. संस्कृत भाषा.
संस्कृत adj refined. cultured. शुद्ध केलते.
संस्था n an institution. an establishment. एक स्थापना. संस्थापना.
संस्थान n a State in a federal set-up. राज्यांतल॑ एक प्रदेश.
संस्थान n a princely state. राजा भरण कराच राज्य.
संस्थापना n an institution. an establishment. एक स्थापना. संस्था.
संहार n destruction. annihilation. विनाश. सर्वनाश.
संहारण vt to destroy fully. पूरा नाश करणे.
संक्षिप्त adj concise. उणे गोष्टांत॑ पूरा विवर॑ देणे.
साउलि n shade. सूर्याच ऊन/प्रकाश पडनाते ठिकाण. सावलि. Note :- care, पडसावलि means "shadow", formed by an object ie, पडलते सावलि.
साखरलिंबू n sweet lemon. गुळ्चीट लिंबू.
साखरीच अच्च॑ n edible sugar-dolls made from sugar syrup. कल्बूत. साखरीच बावोली. साखरेच पाकांतून केलते बावोलीच आकारांतल॑ पदार्थ.
साखरीच बावोली n edible sugar-dolls made from sugar syrup. कल्बूत. साखरीच अच्च॑. साखरेच पाकांतून केलते बावोलीच आकारांतल॑ पदार्थ.
साखरे n sugar. ऊंसाच रसांतून केलते गुळ्चीट पदार्थ ; साखर in sm.
सागर n ocean. sea. समुद्र.
सागू n sago. साबुदाणा. चौवरिशी (Tamil).
सागू n a type of masala gravy curry. मसालाच एक नित्तळ भाजि. Note :- normaly eaten with chapati, as सागू-चपाति.
साठ n sixty. सहा गुणा दहा.
साडि n sari. लुगड॑.
साडू n wife's sister's husband. co-brother. बाईलीच बहीणीच दाल्ला.
साडे adj half over (used in numbers three and above). तीन अण्कि तीनच वर्च संख्याच बरोर अर्ध जोडून सांगाच॑.
साण n a whetstone used for taking out sandal paste from sandalwood. साणा. गंध ओघळून काढाच धोंडा ; शाण/साण/साणा in sm. uis मी ल्हान पोर असताना मझ बापा पूजा कराच पुढे मीच॑ आंघोळीच नंतर साणावर गंध ओघलणे.
साण n grindstone. शाणि (Tamil).
साणा n a whetstone used for taking out sandal paste from sandalwood. साण. गंध ओघळून काढाच धोंडा ; शाण/साण/साणा in sm.
साणा n grindstone. शाणि (Tamil).
सात n seven. सहाच॑ नंतरल॑ संख्या.
सात्तुकुडि n a type of citrus fruit. मोसंबि. Note :- from Tamil.
सात्विक॑ adj the first of the three Gunas (characteristics). तीन गुणांत॑ पह्यिल॑च गुण॑. Note :- the other two gunas are रजस and तमस.
सादा adj plain. simple. सामान्य. साधारण॑ ; साधा in sm.
सादा दोसा n plain dosa. सादा धिरडे.
साधक adj causative. that accomplishes. साध्य कराच.
साधक n any liquid preparation like sambhar, saar etc eaten by mixing with cooked rice. कालवण.
साधन॑ n a thing. एक वस्तु. सामान. सामग्रि.
साधना n a self imposed intense religious ritual. निष्टांत॑ कराच एक उपासना.
साधारण॑ adj plain. simple. सादा.
साधारण॑ adj general. सामान्य.
साधारण॑ adj normal. साधारण॑.
साधु adj simple and proper. अप्पावि (Tamil).
साधु n ascetic. sage. संत. सन्यासि.
साधुशील॑ adj simple minded. सरळ मनाच॑.
साधेवि n a part of upanayana and wedding function, during which ladies who follow ritual prescriptions are honoured. मुंज की वराड की करताना सोवळ॑ आचरण कराच बायकांला कराच आदर॑.
साध्य adj achievable. feasible. possible. होईल अस॑ वाटाच॑.
साध्यता n possibility. होयाच संभव असाच॑.
सानिध्य n godly presence. देवाच सन्निधान.
साफल्य॑ n fruition. उद्धेश सार्थक होणे.
साबुदाणा n sago. सागू. चौवरिशी (Tamil).
सामग्रि n materials. सामान.
सामर्थ्य n competency. capability. करून दाखिवाच शक्ति.
सामर्थ्यशालि adj capable (person). सामर्थ्य असणार॑.
सामवेद॑ n Samaveda, the third of the four Vedas. चार वेदांत॑ तिसर वेद॑.
सामाजिक॑ adj social. समाजाला संबंध झालते.
सामान n goods. things. साधन॑. सामग्रि.
सामान n worker's implements or tools. कामाच उपकरण॑.
सामान्य adj common. general. साधारण॑.
सामान्य adj so-so. ordinary (nothing special). साधारण॑.
सामुदायिक adj relating to the society. समूहाला संबंध असाच॑. सामूहिक॑.
सामूहिक॑ adj relating to the society. समूहाला संबंध असाच॑. सामुदायिक॑.
साम्राज्य n empire. एक चक्रवर्तीच राज्य. वेगळ॑-वेगळ॑ राज्याला मिळिवून केलते एक मोट्ठ॑ राज्य.
साम्राट n emperor. चक्रवर्ति. साम्राज्याच महाराजा. सम्राट.
साये n cream of milk. तावलते दूध निवताना वर्च भागांत॑ होयाच घट्टि पदार्थ ; साई/साय in sm.
साये n cream on curds. दहींतल॑ साये ; साई/साय in sm.
सायंकाळ॑ n evening. संध्याकाळ॑. सूर्यास्तमानाच वेळ.
सार n a liquid preparation eaten with cooked rice. भाताच बरोर कालिवून जेवाच एक कालिवण॑/कालवण॑.
सारथि n charioteer. रथ हांकणार. रथ पळिवणार.
सारस्वत n a sub-sect of Konkani speaking Brahmins. कोंकणी बोलाच ब्रह्मणांच एक उपवर्ग.
सारस्वत adj a person belonging to the saraswat sub-sect. सारस्वत उपवर्गांत॑ मिळालते एक मनुष.
सार॑ n essence. मूल अर्थ.
सारंगपाणि n Lord Vishnu. महाविष्णु.
सारांश n essential meaning. मूल अर्थ.
सारांश n summarised essence. संक्षिप्त॑ अर्थ.
सारिवणे vt to spinkle the floor or wall with cow-dung water and cleaning. सडा सारिवणे. शेण पाणींत॑ भोईं, नाहीतर॑, भिंत पुसून शुध करणे.
सारिवणे vt to mop. (घरच॑) भोईं ओलकरून पुसणे. uis अत्त्लीकड॑ कामवालि लोक॑ बरोर झाडणे-सारिवणे करतनाहीत॑. त॑ काम नुस्त व॑र-वरून करतात॑.
सारी n sari. लुगड॑.
सार्ख adj similar to. सम॑. एकसार्ख. एकेच मादरीच॑ ; सारखा in sm.
सार्थक n fruitfulness. effectiveness. सफल. uis ते दिवसी अम्ही तथे गेलते सार्थक झाल॑. वरल॑ आफीसराला पा्व्हून अम्च कष्ट सांगाला झाल॑.
साल n bark of tree. झडाच सालपट.
सालपट n peeled skin of man or beast. चर्म. काताड. मनुषांच अथवा मृगांच चर्म/काताड.
सालपट n leather. मृगांच चर्म/काताड.
सालपट n skin, peel or rind of a fruit, vegetable etc. चिप्पा.
सालपट n bark or rind of a tree or plant. साल. वृक्षाच/झाडाच सालपट.
सालपापड n papad made out of rice. तांदूळाच पापड.
साळ n paddy. rice with husk. साळि. चिप्पा असाच तांदूळ.
साळाभोळा n a simpleton. an artless person. साधु मनुष. अप्पावि (Tamil). uis तेवढ॑ लेंकरेहीं दहा/बारा वर्षा पतोरी साळेभोळे असतात॑. तज करतां लेंकरे देवाच समान म्हणून थोरळे सांगतील॑.
साळि n paddy. साळ. भूसानिशीच तांदूळ. uis आंध्रांत कृष्ण-गोदावरी नदींच कांठशी असाच जमीनांत साळीच पीक वर्षाला दोन-तीन येते.
साळिग्राम n a pebble shaped black coloured marine fossil revered for Lord Vishnu's presence in it. महाविष्णूच सान्निध्य असाच एक काळ॑ रंगाच पुरातन॑ समुद्र जीवीच धोंडा सार्खल॑ अवशेष ; शालिग्राम in sm.
साळे n a school. शाला. शाळे. विद्यालय ; शाला/शाळा in sm. uis अम्च देशांत 'पब्लिक' साळे म्हण्जे, 'फीस' जास्त असाच॑ अणि भाग्यवंत पोर॑ वाचाच साळे म्हणून अर्थ आहे. तेच, 'अमेरिकांत' उणे वर्गाच पोरे वाचाच साळेला पब्लिक साळे म्हणतात॑.
सावकार n a wealthy person. पैसावंत॑. पल्लमदार.
सावकाश adj slow. हळ्ळु-हळ्ळु. निदान॑.
सावकाश adv gradually. निदान॑ होवून.
सावडणे vt to gather by scrapping or scooping. सावडून मिळिवणे. uis हातावाटि सावडून जेवण॑ देलतर॑ कित्येक लेंकरे ते खायना म्हणून हट्ट करणे आहे.
सावत्र adj a term used for indicating relationship through a step-mother. (स्वंत॑ अम्मा न्हो, पण) बापाच दुसर॑ बाईलीच लेंकरे अण्कि सोयरीक यांस॑ सांगाच गोष्ट॑.
सावत्र-अम्मा n step-mother. (स्वंत॑ अम्मा न्हो, पण) बापाच दुसर॑ बाईल.
सावत्र-बहीण n half-sister. (स्वंत॑ अम्मा न्हो, पण) बापाच दुसर॑ बाईलीच लेंक.
सावत्र-भाऊ n half brother. (स्वंत॑ अम्मा न्हो, पण) बापाच दुसर॑ बाईलीच लोंक.
सावत्र-मामा n step-mother's brother. (स्वंत॑ अम्मा न्हो, पण) बापाच दुसर॑ बाईलीच भाऊ.
सावत्र-मावशि n step-mother's sister. (स्वंत॑ अम्मा न्हो, पण) बापाच दुसर॑ बाईलीच बहीण॑.
सावधान adj carefully. attentively. दत्तन. जत्तन. जागृत होऊन.
सावलि n shade. सूर्याच ऊन/प्रकाश पडनाते ठिकाण. साउलि. Note :- care, पडसावलि means "shadow", formed by an object.
सावळ॑ adj medium complexioned. पंढ्र॑ अणि काळ॑ रंगाच मद्यल॑ रंगाच काताड ; सावळा in sm.
साष्टांग adv with the eight cardinal points in the front side of a human body. मनुषाच पुढे भागाच आठ मुख्य अंश लागून.
साष्टांग-नमस्कार n obeisance by ensuring that eight parts of the body touch the floor. देहाच आठ अंग (भाग) भोईंला लागून कराच नमस्कार. Note:- स+अष्ट = with eight.
सासरवाडि n wife's parent's house. सासुरवाडि. बाईलीच बाप-मायेंच घर.
सासरा n father-in-law. ससरा.
सासुरवाडि n wife's parent's house. सासरवाडि. बाईलीच बाप-मायेंच घर.
सासू n mother-in-law. दाल्लाच अथवा बाईलीच अम्मा.
सासेरा n husband's father's house. दाल्लाच बापाच घर. Note :- as against माहेरा, meaning mother's house (for the married woman).
साहचर्य n associated circumstances. संबंध झालते परिस्थिति.
साहित्य n literature. पारंपरीक होऊन लिव्हून असाच॑ ग्रंथ. कविता असल॑ सांस्कारिक लेख॑.
साहित्यप्रेमि n a person with passion for literature. साहित्य फार अवडणार.
साहित्यसंमेळन n literary meet/discussions. साहित्यकारांच चर्चा ; साहित्यसंमेलन in sm.
साहेब n gentleman. बहुमानाला योग्य असाच/झालते मनुष.
साक्षात adv in person. स्वता.
साक्षात adv actually. खर॑ होवून.
साक्षि n witness to an event. संभव पाह्यिलते मनुष.
सांखळी n a chain. कडी ; साखळी in sm.
सांखळी n a thin silver chain with an array of tiny bells worn around the ankles by ladies or children. बायकांच अथवा लेंकरांच पांयेंत घालाच ल्हान-ल्हान घंटे लोंबून असाच रुपेच सांखळीच आभरण. Note :- not to be mistaken with घुंगरू, which is a much larger adornment worn by dancers.
सांगणे vt to say. to express. to communicate. बोलणे. बोलून व्यक्त करणे. संभाषण करणे.
सांज n a sweet preparation. sojji. शिरा.
सांडणे vi to spill. (द्रव्य) चुकून पडणे.
सांडणे vt to cause to spill. चुकून खाले घालणे.
साध॑ n a narrow lane or alley. गल्लि. रूंद उणे असाच वाट. सांधि. uis हैदराबादांत कित्येक ठिकाणि दोन गज रुंदाच सांध॑ पणीं आहे. तेथ आटोरिक्षा जायालापणीं वाट असत नाही.
सांध॑ n a narrow opening, crack, fissure, gap, cranny etc. सांधी. सांदी.
सांधी n a narrow opening, crack, fissure, gap, cranny etc. सांध॑. सांदी.
सांधी n a narrow lane or alley. गल्लि. रूंद उणे असाच वाट. साध॑. सांदी.
सांधीगोंधि n nooks and corners. कोने-कोने ; सांधीकोंदी in sm.
सांपडणे vi to get caught. सांपडिंगणे ; सापडणे in sm.
सांपडणे vi to attain. प्राप्त होणे. मिळणे ; सापडणे in sm.
सांपडणे vi to be found out. to be discovered. लप्पून असलते अथवा हरपून गेलते मिळणे ; सापडणे in sm.
सांपडींगणे vi to get caught. सांपडणे. uis हे वर्ष अग्नि नक्षत्राच दिवसी मी चेन्नैंत॑ जाऊन सांपडींगटलों. तिकडल॑ भयंकर ऊबांत॑ मी तरपडून गेलों.
सांप्रदायिक॑ adj traditional. customary. संप्रदाया प्रकाराच॑. परंपरा प्रकाराच॑.
सांब n Lord Siva. शंकर भगवान.
सांबार n a liquid preparation eaten with cooked rice. भाताच बरोर मिळिवून जेवाच कालिवण॑/कालवण॑.
सांब्राणि n an aromatic resin extracted as a sap from the barks of certain trees the burning of which causes fragrant smoke. जळताना चोखोट वासाच धूप सोडाच एक वनस्पतिच रस॑. Note :- a benzoic resin.
सांभाळणे vt to manage. to maintain. to take care of. to support. समाळणे. uis (1) अम्ही एवढे मोट्ठ॑ घर बांधलस्ताने. सांभाळाला फार कष्ट झालाहे. (2) अत्ताच पह्यिलंदा मझ लेंक तिज दोन लेंकरांलीं ठींगून ट्रैनांत जायाच॑. तिला ते सांभाळाला होईलकी कायकी.
सांभाळणे vt to endure. to bear with. सोसणे. समाळणे. uis हे वर्ष ऊन उदंड जास्ति आहे. अण्खीन दीड महिना कस तरीन सांभाळींगून बसलतर, नंतर॑ पाऊसाळा आरंभ होईल॑.
सांभाळणे vt to look after. पाह्यींगणे. समाळणे. uis यंदा अम्ही गामाला जाताना अम्च कुत्राला तुम्चकडे सोडूनटाकून गेलतर॑ तुम्हाला ते सांभाळाला होईलका ?
सांभाळणे vt to protect. रक्षा करणे. समाळणे. uis तो एक मोट्ठ॑ कंजूस म्हणून अस्किदनालीं कळल॑. तज पैसा सांभाळणे, हे विना तला वेगळ॑ काम एकीन नाही.
सिजणे vi to get cooked. शिजणे. शिजून तय्यार होणे.
सिजणे fig to feel the oppressive sultriness of the Sun's heat. ऊभाच फार तंटा होणे. उक्कडून भाजणे. उकडून भाजणे. शिजणे. Note :- उक्कडून भाजणे or उकडून भाजणे itself is a figurative expression.
सिजिवणे vt to cook. शिजिवणे. शिजिवून तय्यार करणे.
सिद्धांत n truth which has been established. खर॑ म्हणून स्थापना झालते अनुमान.
सिद्धांत n great philosophical treatise. थोर तत्वज्ञानाच म्हण॑.
सिपाहि n a soldier. शिपाई. सेनाच सिपाहि. जवान.
सिपाहि n a policeman. शिपाई. पोलीसवाला.
सिंधु n ocean. sea. समुद्र.
सिंधु n the river Indus. सिंधू नदी.
सिंह n lion. एक उग्र मृग.
सिंहगर्जना fig resonant and majestic voice. गंभीर घसा.
सिंहासन n throne. राजाच आसन॑.
सीताफळ n custard apple. एक रीतीच फळ. दूधकेळ॑. uis जास्ती पिकलत॑ सीताफळाच चिप्पा इकड॑-तिकड॑ फुटून असते म्हणून खायाच पुढे ते बरोर धुवांव॑ (धुवाम॑).
सीमंतम n a ceremony performed when a lady is seven months pregnant. एक बायको सात महिना गरवार अस्ताना कराच एक शुभ कर्यक्रम॑. Note :- from Tamil.
सीस n the metal lead. एक विधाच धातू. शिसे.
सीसाच तप्पेल n a round cooking vessel made of lead. सीसांत करलते गोळ आकाराच भांडि. शिसेंत करलते गोळ भांडि. Note:- (1) these vessels are normally used for making sar on account of the unique taste they impart to it. (2) शिसें / सीस is lead.
सुख n comfort. स्वस्थ असणे. आरामांत॑ असणे.
सुखान्वेषण n kind enquiries. सौख्य विचार करणे.
सुचणे vi to occur to one's mind. वाटणे. मनांत॑ येणे.
सुचिवणे vt to suggest. to remind. मनाला सये करिवणे ; सुचवणे/सुचविणे in sm.
सुचींगणे vt to suggest to oneself. अपाप मनांत॑ वाटींगणे. अठींगणे.
सुजणे vi to swell. फुगून थोर होणे.
सुटक॑ adj detached. सुटून असाच॑ ; सुटका in sm.
सुटणे vi to get detached. to break free. सुटून जाणे. वेगळ॑ होणे. भिन्न होणे.
सुटिवणे vt to release. वेगळ॑ करिवणे. भिन्न करिवणे.
सुट्टा n loose coins. loose change. चिल्लर नाण्य॑.
सुट्टी n leave from work. कामांतून विश्राम.
सुतार n carpenter. लांकडाच काम करणार.
सुत्ति n hammer. सुत्तील. हातोडि. Note :- from Tamil.
सुदर्शन n Lord Vishnu's discus. महाविष्णूच चक्रायुध.
सुद्धांग adv entirely. altogether. पूराच-पूरा. uis कोणालीन सांगनास्क॑ लेंक वेगळ॑ जातीच पोराला वराड करींगटलते त्यनाला सुद्धांग अवडल॑ नाही.
सुधा n divine nectar. अमृत.
सुधा n the nectar in a flower. फूलांतल॑ सुधा.
सुधारणे vi to improve. to recover. to come to a proper state. चोखोट स्थितीला येणे. नीट होणे. uis येतां-येतां पाकिस्थानाच गेत फार वंगळ॑ होताहे. ते राज्य केम्हा सुधारलकी देवालच कळल॑.
सुधारणे vt to improve. to get to a proper state. नीट करिवणे. uis तुज लोंकाला मझकड॑ पाठीवून दे. एकच महिनांत॑ मी तला सुधारून परतून तुजकड॑ पाठीवून देतों.
सुधीर adj courageous. धैर्यशालि.
सुपारि n betel nut. विडाचपानाच बरोर खायाच एक बीं.
सुप्रभात n morning. पाष्टे. पास्टे.
सुप्रभातम n an early morning devotional song to wake up a deity in a temple. देऊळांत॑ पाष्टे देवाला उठिवाला सांगाच एक भजन॑.
सुबेदार n a rank in the army. सुभेदार. सेनांत॑ एक अधिकारि.
सुभेदार n a rank in the army. सुबेदार. सेनांत॑ एक अधिकारि.
सुमन n flower. फूल. सुमा.
सुमंगलि n a married woman. सवाशणि. सवाषणि सवासिनि. सुवासिनि. सवाषणि. दाल्ला वांचून असाच बायको.
सुमा n flower. फूल. सुमन.
सुमार n an unspecified quantity, number etc. estimated on conjecture. स्पष्ट आधार नाहीस्क॑ ऊह केलते (अंश, संख्या). uis (1) यंदा अंबाच झाडांत॑ फूले सुमार सोडलाहे. (2) साळेंत देलते जेवण॑ खाऊन सुमार लेंकरे पोटसूळांतून अवस्था भोगत आहेत॑. (3) काय विषय म्हणून मला कळत नाही, सुमार दिवसा पसून तो मझकडे बोलाच सोडूनटाकलाहे.
सुमार adj so-so. moderate (quality etc). average. साधारण॑. सामान्य. uis आज जेवलते होटलाच जेवण॑ मला तेवढे काहीं अवडल॑ नाही. सुमार होत॑.
सुरई n a vessel with a screw-lid used for carrying water etc. सुरही. पाणी भरून टिवाच फिरिवून झांकाच झांकणीच एक पात्र. कूजा. चंबु.
सुरभि n name of a divine cow. एक दिव्य गाईच नाव.
सुरळीत॑ adj smooth. comfortable. easy. unobstructedly. दत्तन अणि सौकर्य होऊन. सरळ॑. uis आजा-आजीला पाह्याला अमेरिकांतून अम्ही त्यंच गांवाला गेलोतों. परतून निघाच वेळ॑ त्यांस॑ नमस्कार करताना " देवाच दयान॑ तुम्ही सुरळीत॑ गाम जाऊन पावांम॑" अस आशीर्वाद केले.
सुरहि n a vessel with a screw-lid used for carrying water etc. सुरई. पाणी भरून टिवाच फिरिवून झांकाच झांकणीच एक पात्र. कूजा. चंबु.
सुरक्षण॑ n protection. रक्षा.
सुरंग n tunnel. गुहा.
सुरिकिता n wrinkles (of the skin). वयामळे काताडाला कुसकरून होयाच विकारपण॑. uis वये झालतर॑ पह्यिल॑ गळा, नंतर॑ गाल, अस एक-एक अंगांतल भाग सुरिकिता पडते. योगाभ्यास केलतर॑ सुरकिता थोड ढकळूया म्हणतात.
सुरि n knife. चुरी. चाकू. कत्ति (Tamil).
सुरेखा adj charming. lovely. सुंदर.
सुरेश n Lord Vishnu. महाविष्णु.
सुर्मा n a type of eye make-up. डोळेला लावाच एक प्रकारच काजळ.
सुलभ adj easily attainable. जास्ति प्रयास नाहीस्क॑ मिळाच॑. सुलूभ.
सुलक्षण n auspicious indication. चोक्कोट कार्याच॑ चिन्ह.
सुलूभ n easy. प्रयास नाहीस्क॑ (मिळणे/होणे). सुलभ.
सुलोचना adj one with beautiful eyes. सुंदर डोळे असणारि.
सुवर्णा adj golden. सोनेंत॑ केलते.
सुवासिनि n a married woman. सवाषणि. सवाषणि. सवासिनि. सुमंगलि. दाल्ला वांचून असाच बायको ; सवाशीण/सवाष्ण/सवाष्णीण/सुवासिनी in sm.
सुशीला adj of good character. चोखोट स्वभाव असणारि.
सुस्त n tiredness. fatigue. भाग (होणे). शीणभाग. नित्राण. Note :- from Kannada.
सुस्त adj lazy. आळसी.
सुस्ति n laziness. आळसीपण॑.
सुंई n needle. कापड शिवाच सूंई. सूची ; सुई in sm.
सुंई n a common term for an injection. सूंई. ओखद टोंचून घालाच सुंई. सूची. uis उण॑ वर्गाच अणी खेडाळू लोकांस॑ सुंई घालाच वैद्यच षाणा म्हणींगतात॑.
सुंठ n dried ginger. वाळिवलते आलें (अलें).
सुंडल n boiled and spiced pulse. उसळ. Note :- from Tamil.
सुंडेकाय n a small green coloured berry eaten fried after salting and drying. name of the shrub which bears it. हिर्व रंगाच एक ल्हान भाजी (हेला मीठ लावून वाळिवून तळून खाणे आहे). हे द्याच झुडूपाच नाव. Note :- from Tamil. uis गोड्डुपिट्ळेंत मणतक्काळि, नाहीतर॑, सुंडेकाय तळून घालणे आहे.
सुंदर adj beautiful. पाह्याला चोखोट असाच॑.
सुंदरि adj a beautiful woman. एक सुंदर स्त्री.
सूक्त n a religious hymn. धर्म मंत्र.
सूचना n indication. suggestion. hint. सूचना. पूरा कळिवनास्क॑ विषय सांगणे.
सूची n needle. सूंई. सुंई.
सूज n swelling. फुगून मोट्ठ॑ होणे. सुजून असणे.
सूजि n a wheat product used for cooking. गहूंतून कराच संपाकाच पदार्थ. uis आटा, मैदा, रवा अणी सूजि ते तेवढीन गहूंत्सून करतात॑.
सूतक n a period of ten days of abstinence on account of death in the family or of a relative of the same gothra. मरण झाल नंतरल॑ ओवळाच दहा दिवसाच काळ. Note :- the corresponding ten day period after a birth in the family is called वृद्धि.
सूत्र n method. formula. पद्धत॑. कराच रीति.
सूत्र n a trick. a ploy. एमारिवाच युक्ति.
सूत्र n aphorisms contained in Brahmasuthras. ब्रह्मसूत्रांतल॑ वचन॑. Note :- here सूत्र means it root meaning, ie, "thread".
सून n daughter-in-law. लोंकाच बाईल.
सूप n a sifting pan made from reed strips used for sifting rice, grains etc. तांदूळ अथवा धान्यांतून कणे पाखडून सरकिवाला उपयोग कराच एक साधन॑.
सूपवान n a gift of grains, coconut, glass bangles, sari & blouse piece given to a married lady enclosed in a pair of सूप. धान्य, नारळ॑, गाजाच कांकण॑, लुगड॑-चोळि हे तेवढीन एक सूपांत॑ ठिऊन दान होऊन सवाष्णीला/सवाशणीला वान द्याच पद्धत॑. सूपान. सूपाण.
सूपाण n a gift of grains, coconut, glass bangles, sari & blouse piece given to a married lady enclosed in a pair of सूप. सूपवान. सूपान.
सूपान n a gift of grains, coconut, glass bangles, sari & blouse piece given to a married lady enclosed in a pair of सूप. सूपवान. सूपाण.
सूरण n yam. एक गड्डेच नाव. सूरण गड्डे ; सुरण in sm.
सूरी n knife. सुरी. चाकू. चुरी. कत्ति (Tamil).
सूर्य n Sun. सूर्य. रवी. भानू.
सूर्य n Sun God. सूर्य भगवान. सूर्यदेव.
सूर्यकांति n sun flower. एक फूलाच नाव.
सूर्यकिरण n rays of the Sun. सूर्यबिंब.
सूर्यग्रहण n solar eclipse. सूर्याच ग्रहण. एकेच पंक्तींत॑ भूमीचीं सूर्याचीं अडव॑ चंद्र येताना सूर्य दिसनास्क॑ होयाच॑.
सूर्यदेव n Sun god. सूर्य भगवान.
सूर्यनमस्कार n a religious ritual for worshipping the Sun god. सूर्य भगवानाला कराच एक पूजा पद्धत॑.
सूर्यप्रकाश n sun light. सूर्याच उजाड.
सूर्यमंडल n the solar system. सूर्यहीं सूर्याला प्रदक्षिणा कराच आठ ग्रहहीं अनेक उपग्रहहीं मिळ्लते समूह.
सूर्यास्तमन॑ n Sun set. सूर्याच अस्तमन॑ ; सूर्यास्त in sm.
सूर्योदय n Sun rise. सूर्य उदय होणे.
सूळ n pain. वेदना. दुखणे ; शूळ/शूल in sm.
सूळी n a prostitute. रांडे. वेश्या.
सूक्ष्म adj minute. एकदम बरीक.
सूक्ष्म adj subtle. सूक्ष्म.
सूंई n needle. सूची. सुंई. कापड शिवाच सूंई ; सुई/सूची in sm.
सूंई n a common term for an injection. सुंई. ओखद टोंचून घालाच सुंई. सूची.
सृष्ट adj created. निर्माण केलते. स्रिष्ट.
सृष्टी n anything created by God. देव केलते. स्रिष्टी.
सेट n a wealthy merchant of a non-dravidian caste. दक्षिण देशाच बाहेरच एक थोर व्यापारि ; शेट in sm.
सेण n religious festival. सण उत्सव.
सेणवार n festival day. सणवार. सेणाच दिवस. सणाच दिवस.
सेतु n bridge. नदि अथवा समुद्राच व॑र बांधलते वाट. पालम (Tamil).
सेना n army. सैन्य.
सेनानी n commander of an army. सेनापती.
सेनापती n commander of an army. सेनाप्रमुख. सैन्याच नेता. सेनानी.
सेमिया n vermicelli. पाह्याला दोरास्क॑ असाच खायाच एक पदार्थ.
सेमियाखीर n a porridge like sweet preparation made with vermicelli. सेमायाच खीर. सेमिया पायसम.
सेमियापायसम n a porridge like sweet preparation made with vermicelli. सेमायाच खीर.
सेमियाफेणि n name of a sweetmeat. एक गुळ्चीट पदार्थाच नाव.
सेवा n voluntary service. नपैसेला कराच काम.
सेवे n rice noodles. तांदूळाच शेव.
सैन्य n army. सेना.
सोकिवणे vt to bring to a usable condition. पक्व करिवणे. उपयोगाला तय्यार करून घेणे. uis सोवळेच काठी कराला बरोर लायक असाच हिरव॑ बेत विस्तूच हलक॑ ज्वालाच वर पर्तीवून पर्तीवून दाखिवून सोकिवून पक्व करणे आहे. Note :- सोकावणे or सोकणे in MM means "to get addicted or habituated.
सोकिवणे fig to bring under control through strict measures. बरोर नियंत्रण करून वाटेला आणिवणे. uis ते पोराच माकडचेष्टा प्हावून, बरोर पूंस गुंडाळींगून बसनातर तुला सोकिवूनटाकतों म्हणून तज बापा सांगिट्ले.
सोज्जि n a sweet preparation of rava. सांज. रवांत॑ केलते एक गुळ्चीट पदार्थ ; सोजी in sm.
सोडणे vt to let go. हातांतून सोडून देणे. uis ते पात्रांत॑ तावलते पाणी होत म्हणून तला कळ्ल नाही. पात्र उचलताना हात/बोट लासलामुळे तो ते सोडूनटाकला.
सोडणे vt to leave (behind). सोडणे. uis (1) तो लेंकीला साळेंत॑ सोडून आला. (2) अम्ही हे गांव सोडून जायाला निश्चय केलों.
सोडणे vt to depart. निघून जाणे. uis अम्च बंडी उद्या पाष्टे सहा घंटेला सोडल॑.
सोडणे vt to launch. सोडणे. uis चंद्रमंडलाला जायाच एक रोकट काल॑ पाष्टे श्रीहरिकोटांतून सोडल॑ म्हणून टी.वींत॑ मी ऐकलों.
सोडणे vt to give up. सोडणे. uis पंध्रा वर्षाच नंतर॑ सिगरेट पीयाच दंडक सोडला म्हणून काल॑ बीदींत॑ पाह्ताना तो मला संतोषांत॑ सांगटला. Note :- also सिगरेट ओढणे, होढणे, फुंकणे.
सोडणे vt to set-off. सोडणे. लावणे. uis ल्हान वयेच अस्ताना तला दीपावळीच पटाकी सोडाला उदंड भें होत॑.
सोडणे vt to allow. to permit. अनुमति देणे. संम्मत करणे. संम्मत देणे. uis टिकट घेटलतर मात्र सिनिमा पाह्याला आंत सोडतील॑.
सोडणे vt to send forth (such as buds, flowers etc.). उगणें. सोडणे. uis हे वर्ष अम्च॑ घर्च अंबाच झाड भरून फूल सोडलाहे.
सोडणे vt to emit. to spew. सोडणे. uis अम्च घरच॑ मागे रात्रीच वेळ चोखोट वास सोडाच फूलाच झाड राणास्क॑ वाढलाहे.
सोडणे vt to let (alone). सोडणे. uis काय सांगटल तरीन तो ऐकाल जात नाही. तला उगे सोडूनटाक.
सोडणे fig to tell a lie. लटके सांगणे. uis तो बोलाच विसंबाला होयना. उगे सोडतो.
सोडणे suff used as a reinforcing verb of another verb, eg. करसोडणे, खासोडणे etc. akin to टाकणे in करूनटाकणे, खावूनटाकणे etc. एक क्रीयापदाच शेवटि मिळिवाच अण्किएक क्रीयापद (पह्यिलच क्रीयापदाच अर्थाला अण्कीन शक्ति द्या करतां). Note :- the suffixing of verbs like सोडणे or टाकणे to another verb creates a complex verb.
सोदा n scamp. scoundrel. rouge. शोदा. लबाड मनुष. पोकिरि (Tamil).
सोदापण॑ n roguishness. लबाडपण॑.
सोनार n goldsmith. सोनेच आभरण करणार.
सोनारीण॑ n goldsmith's wife. सोनाराच बाईल॑.
सोन॑ n gold. कांचन॑.
सोप्न n dream. झोंपांत॑ दिसाच माया संभव॑. स्वप्न. सोप्पन.
सोप्पन n dream. झोंपांत॑ दिसाच माया संभव॑. स्वप्न. सोप्न.
सोम n moon. चंद्र.
सोम n juice of the mythical soma plant drunk by the gods as an intoxicant. देवांच मद्य. सोमरस॑. सोम झाडांतून कराच पानीय.
सोमनाथ n Lord Siva. शंकर. महादेव.
सोमपान adv to drink the soma juice. सोमरस पीणे.
सोमरस n juice of the mythical soma plant drunk by the gods as an intoxicant. देवांच मद्य. सोम.
सोमवार n Monday. रविवाराच नंतरल॑ दिवस. Note :- named after Moon सोम.
सोमशेखर n Lord Siva. महादेव. शंकर.
सोमारि adj a lazy person. सोंबेरि. शोंबेरि. आळस मनुश. Note :- from Tamil.
सोमाशा n a stuffed fried sweetmeat. पूरण भरिवून तळलते एक गुळ्चीट पदार्थ.
सोमोर adv in front of. समोर. पुढे पटीस.
सोमोरच॑ adj relating to the front. समोरच॑. सोमोरल॑. समोरल॑. समोराला संबंध झालते.
सोमोरल॑ adj relating to the front. समोरल॑. समोराला संबंध झालत॑. सोमोरच॑. समोरच॑.
सोमोर-सोमोर adv face-to-face. अमोर-समोर. समोर-समोर. एकालेक समोर.
सोमोरून adv from the front. समोरून. पुढेसूं. पुढे पटीसांतून.
सोयरपण॑ n relationship. सोयरे. सोयरीकपण॑. नातें.
सोयरपण॑ n relationship through marriage. वराडा वाटी झालते संबंध. सोयरीकपण॑.
सोयर॑ n relationship. नातें. सोयरपण॑.
सोयरा adj one who is related. नातेंच मनुष. सोयरीकाच मनुष.
सोयरा adj one who is related through marriage. वराडा वाटी संबंध झालते मनुष.
सोयरीक adj relation through marriage. वराडा वाटी संबंध झालते.
सोयरे n relatives. सोयरीक लोके.
सोयरेधायरे n friends and relatives. सोयरेसंबंध. सोयरीक लोकेईं, कळ्लते लोकेईं.
सोयरेसंबंध n friends and relatives. सोयरेधायरे. सोयरीक लोकेईं, कळ्लते लोकेईं.
सोलणे vt to peel. काताड, सालपट अथवा, चिप्पा काढूनटाकणे.
सोळा n sixteen. पंध्राच नंतरल॑ संख्या. सवळा.
सोवळ॑ n purity in religious rituals. पूजाकार्यक्रमाला पवित्र असणे. ओवळ॑च विरुद्ध॑ ; सोवळा in sm.
सोवळ॑ n purity in day-to-day rituals. कार्यशुद्धि ; सोवळा in sm.
सोवळ॑ n items considered inherently pure and clean for religious rituals, such as silk dhoti, hide of a deer etc. रेश्माच धोती, क्रिष्णांजन॑ असल॑ स्वरूपांतेच सोवळ॑ असाच पूजाकार्यक्रमाच सामग्रि ; सोवळा in sm.
सोवळ॑ n items rendered ritually pure and fit for use in religious rituals after purification through cleansing in water. सोवळेच पाणींत॑ शुद्ध करून शुद्ध केलते पूजा सामग्रि ; सोवळा in sm.
सोवळ॑ adj ritually pure. सोवळेंत॑ असाच॑ ; सोवळा in sm.
सोवळ॑-ओवळ॑ adj a comprehensive term for ritual purity or otherwise. सोवळ॑ अणि ओवळ॑ हे दोनालीन मिळून सांगाच एक गोष्ट. Note :- this term is used while indicating the adherence or non-adherence of ritual purity (सोवळ॑) or non-purity (ओवळ॑).
सोवळी-बायको n a woman who follows a life of ritual purity at all times. सदा सोवळ॑ संप्रदायांत॑ असणारी बायको. Note:- generally this term denotes, a widow who follows this system. But it can refer to a married lady also, if she follows this system.
सोवळेच काठि n a stick used for spreading ritually pure clothes in the clothes-line. सोवळेच कापड वाळिवाला घालाला वपराच काठि.
सोसणे vt to endure. to bear. सहन करणे. सोसींग्यून बसणे. uis (1) मे महिनांत॑ चेन्नैच ऊन मला थोड पणीं सोसाला होईना. (2) एवढे दिवसीं तज मस्तीच वागणे सोसींगून बसलोतों. इत्तिपर (इथपर) मला ते सोसाला होईना.
सोसणे vt to tolerate. सहन करणे. uis तेनी तुज बाप झालत करतां तुज अवघडपण॑ सोसींगून बसलाहते. मझान॑ ते होयना.
सोसालकिपण॑ n endurance. सहन शक्ती. सोसाच शक्ती.
सोसुनक्कि n patience. सोसींगून बसाच स्वभाव. सोसाच शक्ती. सहन शक्ती ; सोसणूक in SM means "endurance".
सोंड n elephant's trunk. सोंडा. हत्तीच लांब नाक.
सोंडा n elephant's trunk. हत्तीच लांब नाक. सोंड.
सौकर्य n convenience. कराला सुलूभ असणे. कराला सुलभ असणे.
सौख्य n comfort. सुख असाच स्थिति. स्वस्थ.
सौख्य n welfare. क्षेम.
सौजन्य n free. उदार.
सौजन्य n (given away freely as a) complement. पैसे घ्यानास्क॑ उग॑ देणे.
सौभाग्य n good fortune. चोखोट भाग्य. चोक्कोट भाग्य.
सौभाग्यवति n a term used while address a married woman. वराड झालते बायकांला उद्देश करून सांगाच गोष्ट॑.
सौम्य adj gentle. सावकाश.
सौम्य adj mild. शांत॑.
सौर adj solar. सूर्याला संबंध झालते.
सौरमान॑ n calculations based on the movement of the Sun. सूर्याच भ्रमणाच आधारांत॑ कराच इषोब.
सौराष्ट्रा n a person belonging to the Sourashtra community of South India. दक्षिण भारताच सौरष्ट्रा समुदायाच व्यक्ति.
सौराष्ट्रा n name of the language spoken by the Sourashtra community. सौरष्ट्रा समुदायाच भाषा.
सौलभ्य n facility. ease of attaining. सुलुभ होऊन मिळणे.
सौहार्द n friendship. मैत्री. मित्रपण.
सौंदर्य n beauty. चांगळपण॑.
स्तन n woman's breast. थान.
स्तव conj on account of. because of. मुळे. मळे.
स्तंभ n pillar. column. post. खांब.
स्तुती n praise. प्रशंसा.
स्तूप n a Budhist monument. बौद्ध स्मारक॑.
स्तोत्र n a devotional hymn. देवाला प्रशंसा करून सांगाच श्लोक.
स्त्री n woman. बायको. महिला.
स्त्रीधन n dowry. वराडाच वेळी नवराला द्याच पैसा.
स्त्रीधन n money, jewellery and other property brought in by the bride from her parents at the time of her wedding. एक नवरि तिज वराडाच वेळी माहेराकडून आणाच आस्त॑.
स्त्रीलिंग n feminine gender. व्याकरणांतल॑ तीन लिंगांत॑ एक.
स्तर n standard. grade. a class. a level.वर्ग स्थिती.
स्थल n place. location. ठिकाण. स्थान.
स्थलपुराण॑ n mythological history of a temple. देऊळाच उत्भव माहात्म्याच खाणि.
स्थान n place. ठिकाण. स्थल.
स्थापक adj founder. स्थापना केलते मनुष.
स्थापना n establishment. installation. संस्थापना.
स्थिति n condition. situation. अवस्था.
स्थिर॑ adj steady. दृढ. uis काहीतरीन एक काम सांगटलतर॑ तो कामाचवर स्थिरहोऊन ध्यान देवून ते बरोर करना.
स्थिर॑ adj stable and firm. दृढ॑. स्थिर॑. uis तो एक स्थिर स्वभावाच मनुष न्हो म्हणून मला तम्हाच कळ्ळ॑ होत॑.
स्थिर॑ adj settled. निश्चय अथवा निर्णय झालते. स्थिर॑. uis एवढ॑ दिवस तो इकड॑ तिकड॑ मिळाच काम करत होता. पण, अत्ता एक महिना पसून एक स्थिर काम मिळ्लाहे.
स्थिर॑ adj permanent. स्थिर॑. uis वराडाच पुढे मी कोयंबतूरांत॑ काम करत असताना जेवणे-खाणे अग्गीन स्थिरहोऊन राघवेन्द्रस्वामि मठांत करत होतों.
स्थिर॑ adj fixed. दृढ॑. uis देऊळाच आंत, म्हण्जे, गर्भगृहांत॑ देवाच विग्रहाच स्थिर प्रतिष्ट झालसामळे, देऊळाच बाहेर मिरिवणीला उत्सव मूर्तीला घेऊन जाणे आहे.
स्थिर॑ adj lasting. enduring. स्थिर॑. uis चार पांच हदार वर्षापुढे बांधलते ईजिप्टाच पिरमिड अणी स्पिंक्स अण्कीन उदंड वर्ष स्थिरहोऊन असेल म्हणाच्यांत॑ संदेहेच नाही.
स्नान n bath. आंघोळ. आंघोळि. आंघूळि. नाहणे.
स्नेह n affection. प्रीति.
स्नेहपण॑ n friendship. एकाला अवडणे.
स्नेहि n friend. मित्र.
स्पटिक n crystal. स्पटिक.
स्पष्ट adj clear. व्यक्त. उघड॑. uis तुला काय मनांत आहेकी ते स्पष्ट करून लिव्हून दे.
स्पष्टपण॑ n clarity. स्पष्ट होवून असणे.
स्फोट n explosion. मोट्ठ॑ शब्दांत॑ फुटणे. विस्फोट.
स्मरणशक्ति n capacity to remember. मनांत॑ ठिवींगाला पह्जेते शक्ति. स्मरण कराच शक्ति.
स्मरण n recollection. मनांत॑ आणिवणे. अठींगणे. uis कष्टकाळ येताना मात्र देवाला अठींगापक्षा सदाहीं देवाला स्मरण करणे चोखोट॑.
स्मशान n cemetery. burial ground. श्मशान. प्रेताला भोईच आंत समाधि कराच ठिकाण.
स्मशान n burning ghat. प्रेत जळिवाच ठिकाण. श्मशान.
स्मारक॑ n memorial. एकांच स्मरणा करतां असाच स्थापना.
स्मार्त n name of a sub-caste of Brahmins who derive the name from Smrithis. स्मृति संप्रदाय आचरण॑ करणार ब्रह्मणांच एक उपवर्ग. Note. the स्मृति system relays on recollection of written scriptures as opposed to the श्रुति system where the scriptures are passed down from memory to memory of each generation of priests.
स्रासणे vi to be pierced by wood splinters. लांकडाच ल्हान चूर आंगाला लागून घाव होणे.
स्रिष्ट adj created. निर्माण केलते. सृष्ट.
स्रिष्टि n anything created by God. देव केलते. सृष्टि.
स्वच्छ adj clean. शुद्ध.
स्वजाति n one's own caste. स्वंत जाति.
स्वतंत्र adj on one's own. स्वंत॑ इच्छा प्रकार असणे.
स्वतंत्र adj free. मुक्त.
स्वतंत्रता n independence. freedom. स्वातंत्र्य.
स्वता adv by oneself. स्वयं. स्वंत होवून. अपाप ; स्वतः in sm.
स्वदेश n one's own country. स्वंत देश.
स्वदेशाभिमान n patriotism. स्वंत॑ देशाव॑र अभिमान असणे.
स्वदेशाभिमानि adj patriotic. स्वंत॑ देशाव॑र अभिमान असणार॑.
स्वदेशि adj of one's own country. स्वंत देशाच॑.
स्वधर्म n one's own duty. स्वंत कर्तव्य.
स्वप्न n dream. झोंपांत॑ दिसाच माया संभव॑. सोप्पन.
स्वप्न fig a futile wish or hope. wishful thinking. day dreams. एक व्यर्थ आग्रह.
स्वभाव n inherent disposition. स्वरूप गुण.
स्वभाव n behaviour pattern. वागाच रीति.
स्वयं adv by oneself. अपाप. स्वता.
स्वयंभू adj self manifested. स्वता उद्भव झालते.uis प्रतिष्टा केलते मूर्तीचपक्षा स्वयंभू मूर्तीला जास्ती श्रेष्ट आहे म्हण्तात॑.
स्वयंवर n a type of marriage where the bride selects the groom from an assemblage. नवराला स्वयं ओपींगून कराच वराड. वराडाला आलते नवरेंच गुंपांतून नवरीला इष्ट झालत्याला कराच वराड. Note :- this type of wedding was normally restricted to royalty in ancient times.
स्वयंसेवक n volunteer. स्वंत॑ इच्छा प्रकार लोकसेवा करणार.
स्वर n a musical note. संगीताच एक नाद.
स्वर n vowel. अक्षरमालांत॑ एक वर्ग अक्षर॑.
स्वराज्य n self governance by country. एक देश स्वंत होवून राज्य करणे.
स्वरूप n real form. वास्तव आकार. खर॑ रूप.
स्वरूप n true disposition. निज स्वभाव.
स्वर्ग n heaven. paradise. देव लोक. स्वर्ग लोक.
स्वर्गलोक n heaven. paradise. देव लोक.
स्वर्गवासि adj a deceased person. इहलोक सोडून गेलते मनुष. मेलते मनुष.
स्वर्गवासि n a departed soul. देह सोडून स्वर्गप्राप्त झालते आत्मा.
स्वर्ण n gold. सोन॑. कांचन.
स्वल्प adj a little bit. थोड. थोडक॑. नंखर॑.
स्वस्त adv comfortable. relaxed. स्वस्थ. आराम.
स्वस्त adv not engaged in doing anything. unemployed. स्वस्थ. रिकामा.
स्वस्त बसणे vt to sit unemployed. स्वस्थ बसणे. काम नाहीस्क॑ उगे बसणे. रिकामांत असणे.
स्वस्थ adv comfortable. relaxed. आराम. स्वस्त.
स्वस्थ adv not engaged in doing anything. रिकामा. स्वस्त.
स्वस्थ बसणे vt to sit unemployed. काम नाहीस्क॑ उगे बसणे. रिकामांत असणे.
स्वंत adj one's own. स्वताच॑.
स्वंत n one's relative. सोयरीक.
स्वागत n welcome. सत्कार.
स्वातंत्र्य n independence. freedom. स्वतंत्रता.
स्वाति n name of a star. एक नक्षत्राच नाव.
स्वाद n taste. रूच॑. रुचि.
स्वाद n flavour. रूचाच वास.
स्वादिष्ट adj tasty. delicious. स्वाद असाच॑. रूच असाच॑.
स्वाधीन॑ adj to take under control. अधिकारांत॑ काढणे. नियंत्रणांत॑ घेणे.
स्वाभाविक adj of natural disposition. मूलरीतींत॑ असाच॑.
स्वाभिमान n self respect. स्वताच अभिमान. रोष.
स्वाभिमानि adj self respecting. स्वंत अभिमानाला गौरव देणार.
स्वामि n god. देव.
स्वामि n lord. प्रभु.
स्वामि n master. मालक.
स्वारस्य n delightful to the sense. इंद्रीयाला आनंद वाटणे. रमणीय.
स्वार्थ n selfishness. स्वंत विषय मात्र योचना करणे. uis तो उदंड स्वार्थ स्वभावाच मनुष. कोणालीं उपकार करना.
स्वार्थि adj selfish. स्वंत विषय मात्र योचना करणार. uis तो एक स्वार्थि. कोणालीं उपकार करना.
स्वाहा n swallow. गिळणे.
स्वाहा fig to swindle. पैसा गिळणे. गडप करणे. हडप करणे.
स्वीकार n acceptance. अंगीकार. ओपींगणे. संम्मत करणे.
स्वीकार n welcome. स्वीकार.
स्वैर॑ adv undisturbed. तंटा नाहीस्क॑. स्वस्थ. स्वस्त.
No comments:
Post a Comment