व
व the thirty-first consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच एकतीसवां व्यंजन॑.
वकालत n advocate's duties. वकीलाच काम.
वकालत n advocate's office. वकीलाच कचेरि.
वकालतनामा n power of attorney in favour of an advocate. न्याय संबंध कार्य स्वंत होऊन करनास्क॑ वकीलाकडून करिवाला द्याच अधिकार॑.
वकील n advocate. legal pleader. न्यायतर्क करणार.
वक्र adj bent. crooked. वंकड॑.
वक्र fig dishonest. लबाडाच॑.
वक्रगति n crooked ways. dishonest methods. कुबुद्धीच वागणे.
वक्रतुंड n Lord Ganapathi. गणपति.
वक्रदृष्टि adj squint-eyed. डोळे पाह्याच॑ रीती वंकडे-तिंकडे असाच॑. वंकड॑ दृष्टि.
वक्रदृष्टि fig crooked or scheming way of looking at a thing. वक्रबुद्धींतून पाह्णे.
वक्रबुद्धि n crooked mentality. pervert. वंकड॑ बुद्धि. दुष्ट बुद्धि.
वचन॑ n oath. शपथ.
वचन n assurance. पातेरा. आश्वास.
वचन॑ n speech. बोली.
वचन॑ n a saying. एक गोष्ट.
वचन॑ n (grammar) number (singular, plural). संख्या (एकवचन॑, बहुवचन॑).
वजन॑ n weight. भार॑. जेड. जड॑.
वज्र n diamond. वैर॑. वैरम (Tamil).
वज्रपथ्य n a strict diet regimen. पूर्ण पथ्य. uis आयुरवेदिक चिकित्सा इंग्ळीष ओखदापक्षा आंगाला चोखोटच. पण, ते काढींगताना वज्रपथ्य असाम॑. नाहीतर॑, ते बरोर काम करना.
वज्रायुध n Indira's weapon. देवेंद्राच आयुध.
वटसावित्रि n a festival performed by married women on pournami day of jyeshta month. ज्येष्ट महिना पौर्णमीच दिवस सवाषणी बायके कराच व्रत॑.
वटवृक्ष n banyan tree. वटाच वृक्ष. वडाच वृक्ष.
वट॑ n Indian fig tree. banyan tree. वटाच झाड. वड॑.
वटू n a young Brahmachari. ल्हान वयेच एक भ्रह्मचारि.
वठार n an enclave or portion in a town. गामाच/गांवाच एक भाग.
वड॑ n Indian fig tree. banyan tree. वटाच झाड. वट॑.
वडा n a fried snack. तळून खायाच एक पदार्थ.
वडा n a sun-dried and fried snack. ऊनांत॑ वाळिवून तळून खायच एक पदार्थ. वड्या. संडिगे (Kannada). वडाम (Tamil). वत्तल (Tamil).
वडाम n a type of sun-dried crispy. ऊनांत॑ वाळिवून तळून खायाच एक रीतीच पदार्थ. वड्या. संडिगे (Kannada). वत्तल (Tamil). Note :- from Tamil. uis अम्ही ल्हान असताना अम्च अम्मा घरच# मोट्टे-माडींत॑ उघड॑ ठिकाणी वडाम वाळिवाला घालून, ते कावळा काढींगून जायनास्क॑ असाला अम्हाला बसिवत होते.
वडील adj elder. थोरळे.
वड्या n a sun-dried and fried snack. ऊनांत॑ वाळिवून तळून खायच एक पदार्थ. वडा. संडिगे (Kannada). वडाम (Tamil). वत्तल (Tamil).
वण॑ n pock marks on the face. freckles. तोंडांत॑ आलते व्रणाच चिन्ह. Note :- from the Sanskrit व्रण. uis पाप, ते पोरीला तोंडाच व॑र वण आहे. चुमणपणांत॑ "देवी" आलहोत॑ वाटते.
वण॑ n an infected wound. व्रण. पिकलते फोड. रण॑.
वणी suff a word-suffix to mean "in like manner". "सारख॑/मादरी" हे अर्थ द्याच प्रत्यय. विणी. मिणी. मणी. uis उरळेगड्डेच भाजि करताना ते ल्हान-ल्हानवणी चिरून करलतर॑ रूच बेष असल॑. Note :- an example of inter-use of व and म, as well as the mispronunciation of व/वि and म/मि.
वत्तल n a sun-dried and fried snack. ऊनांत॑ वाळिवून तळून खायाच एक पदार्थ. संडिगे (Kannada). वडाम (Tamil).
वत्सला adj affectionate. प्रेम असाच॑.
वध॑ n killing. मरिवणे.
वधू n bride. नवरी.
वधूपक्ष n brides party. नवरीच लोके.
वधुवर॑ n bride and groom. नवरा-नवरीच जोडि.
वनदेवता n a goddess of the forest. वनाच देवता.
वनमहोत्सव n a social celebration for planting of trees. वृक्ष लावाच/रोवाच एक समाज उत्सव॑.
वनमाला n a garland of wild flowers. राणाच फूलाच माळ॑.
वनमाली n Lord Krishna. श्रि क्रिष्णा.
वनवास n dwelling in a forest. वनांत॑ राहणे.
वनवास n banishment to forests. बहिष्कार करून वनाला पाठिवणे.
वनवासी n forest dweller. राणांत॑ राहणे.
वनशंकरी n Goddess Vanashankari. Goddess Durga in her benign aspect. बनशंकरी. दुर्गादेवीच शांत रूप. शाकांबरी.
वनस्पति n a tree. a plant. वृक्ष. झाड.
वन n forest. राण.
वनिता n woman. स्त्री. बायको.
वन्यमृग n an animal of the forest. राणाच मृग.
वय n age of a person or animal. एक मनुषाला, अथवा, प्राणीला कित्ति वर्ष झाल॑ म्हणून सांगाच॑.
वर n bride groom. वराडाच नवरा.
वर n boon. अनुग्रह.
वर n blessing. आशिर्वाद.
वर adv above. व॑र. वोर. (एकापक्षा) उंच ठिकाण. uis (1) आज आकाशांत मेघ साधारणा पक्षा व॑र दिसत॑. (2) ’लिफ्ट' व॑र जाऊन उदंड वेळ झाल॑. अम्हाला फार अवसर झाल ते करतां पडतोरे/पायरी वाटे तीसर॑ माडीला जाऊया.
वर adv at a hight. व॑र(असाच). वोर (असाच) uis आज वारे उदंड बडिवत आहे. ते कवाड झांकून वर असाच कोंडी घालूनटाक. पूरा दिवस झांकूनच असूनदे.
वर adv on top of. व॑र. वोर. uis ते मेजावर असाच पुस्तक आणून दे.
वर adv in a superior rank, position etc. व॑र. वोर. uis (1) मझ॑ जामाईच आफीसांत॑ त्यंचपक्षा व॑र कोणीं नाहीते. तेनीच तिकडल॑ मुख्य आफीसर. (2) अम्च आफीसांत॑ वरचा/वरला सांगास्क कराला, म्हण्जे मस्का बडिवाला, उदंडदन आहेत॑.
वर prep implying 'beyond time/extent'/'afterwards'. नंतर॑. व॑र. वोर. Note :- implied in an abstract sense. uis (1) दिवसोडि बरोर याच बस एवढ॑ पतोरी आल नाही. अण्कीन एक घंटा वर यथे राखून होठाकणे/ओठाकणे बरोर असना. 'टेक्सी' करींगुन जाणेच चखोट असल॑ म्हणून मला वाटते. (2) निज/वास्तव सांगाला तला मी भरून समय देलों. पण, तोंड उघडला नाही तो. हेज वर अण्कीन मी काय करू ? (3) वर्षावर झाल॑, मी मझ॑ स्वदेशाला जाऊन. (4) तो गेलावर मी पूरा सत्य तुला सांगतों. (5) सिनिमा झालावर अम्ही जेवाला एक होटलाला गेलों.
वर prep implying "depending on". व॑र. वोर. Note :- implied in an abstract sense. uis देवावर भार घालून अम्ही अम्च मायाला हॉस्पिटलांत मिळिवलों. ते त्यंच शेवटल॑ प्रयाण असल॑ म्हणून अम्हाला कळ्ल॑ नाही.
वर prep implying 'casting upon'. व॑र. वोर. Note :- implied in an abstract sense. uis तजवर आवश्य नाहीस्क॑ आरोप घाल नको.
वरकड॑ adj the others. the remaining ones. the rest. बाकि राह्यलते. बाकि उरलते. uis मझ॑ बापा 'गुंटूर' सोडून चेन्नैला ट्रान्सफर होऊन जाताना अम्च सामान पाठिवाला एक लॉरी व्यवस्था केल्होते, अणी तो मनुषाकडे सांगिटले "थोर-थोर सामान अस्कीन लॉरींत घालूनटाक अणी वरकड॑ सामान अम्च वॅनांत आणींगतों" म्हणून.
वरखर्च n out of pocket expenses. miscellaneous expenses. sundry expenses. व॑रखर्च. मुख्य खर्च सोडून (विना) कराच चिल्लर खर्च. uis ट्रेनांत अम्ही कोठ॑ गेलतरीन कूलीला, घरांतून स्टेषनाला जायाला-याला, टॅक्सीला, जेवणे-खाणेला, अस॑ वरखर्चाला उण॑पक्षा दोन हदार रुपे हातराखणे ठींगाम॑.
वर-खाले नाचिवणे id to make someone dance to your tunes. वेगळांच व॑र स्वाधीन ठिवून अम्ही सांगास्क॑ करिवणे.
वर-खाले प्हाणे id to be perplexed. भ्रम होणे.
वरच॑ adj that which is above or on top. वर असाच. वरल॑ ; वरचा in sm.
वरच॑ adj relating to the upper position. वरल॑ ठिकाणाला संबंध झालते ; वरचा in sm.
वरच॑ adj ditto as above. यथाप्रकार ; वरचा in sm. uis मझ नातूला सांगिटलों "मी केलते पाव्हून वरच॑ प्रकार तेवढ॑ इषोबीं/हिषोबीं मला करून दाखिव".
वरचेवर adv again and again. off and on. पुन्हा-पुन्हा ; वरच्यावर in sm.
वरडणे vt to shout. घसा थोर करणे. तोंडांतून मोट्ठ॑ शब्द करणे ; ओरडणे in sm.
वरडा n shout. घट्टी बोलणे. थोर शब्दांत बोलणे. घसा थोर करणे.
वरडावरडी n acrimonious and raucous fight. shouting match. थोर शब्दांत वरडून भांडणे.
वरण n a preparation made of cooked dhal. दाळाच एक सप्पक कालवण॑.
वरदक्षिणा n dowry. वराडाच वेळ नवरीच पक्षाकडून नवराला मिळाच पैसा.
वरदान n granting of a boon. वर देणे.
वरपणे vt to slurp down liquidy food. to eat or drink with a slurping noise. to eat with finger licking noise. पत्तळ पदार्थ शब्द करून गिळणे. बोटावाटे (सावडून) शब्द करत जेवणे ; ओरपणे in SM. uis वरपून वरपून जेवलतर॑ पाह्णारांस कंटाळा वाटल॑ म्हणून भरूनदपा सांगट्लतरीन तो ऐकना म्हणतो.
वरबढणे vt to scratch. खाजिवणे. खाजींगणे ; वरखडणें in sm.
वरबढणे vi to be scratched by an animal or a sharp edge. एक प्राणीच नंख/दांत अथवा काहीं एक भाग लागून आंगाला वरून घाव होणे. uis मझ लेंकीच घरांत दोन मांदर॑ आहे. एकाच बरोर खेळत असताना असलास्क-असून ते मझ हात वरबढूनटाकले. चोखोट वेळ तला "ॲन्टी-रेबीस इनजेकषन" देलहोत॑. नाहीतर॑ मला एक थोर "इनजकषन" घालिंगांम्ते पडलासल॑.
वरल॑ adj that which is above or on top. वर असाच. वरच॑.
वरल॑ खादी n snacks. munchies etc. नुस्त रूचाला खायाच पदार्थ. uis पाष्टेच नाश्ता, दुपारीच जेवण॑ अण्की रात्रीच जेवण॑ हेजा मधे बिस्केट, चकली, कारळी-पेणा असल॑ वरल॑ खादी घेत असणे आरोग्याला चोखोट न्हो म्हणतात॑. तज बद्धल पंडू-फल खाणे चोखोट.
वरलवर adv outwardly. superficially. overtly. नुस्त वरून. नुस्त बाहेर दिसास्क॑ मात्र.
वरला adj person in a higher position. वरचा. वरिष्ठ मनुष. uis वरला अधिकारि आफीसाला सदाईं वेळाला आलतरविना खाले असणार कोणीं वेळाला येईनात॑. तज करतांच श्री राजगोपालाचारी मुख्यमंत्री म्हणून असताना तेनी त्यंच आफीसाला एक घंटा पुढे येत होते अणी तसच, संध्याकाळी एक-दोन घंटा उशीर होऊन आफीसांतसून निघत होते.
वरवर adv repeatedly. पुन्हा-पुन्हा.
वरवरच॑ adj that which is visible superficially. नुस्त बाहेर दिसाच॑. वरून दिसाच॑.
वरवंटा n a cylindrical grinding stone rolled over a flat stone (called "पाटा") for grinding small quantities of masala. वरुवंटा. संपाकाच मसाला थोडच आवश्य असताना उपयोग कराच घट्टि धोंडांत॑ केलते एक लांबोळ वाटाच उपकरणा॑. हेला पाटाच वर लोटून वाटतों. Note :- (1) The word वरवंटा is derived from वर (top) and वाटणे (to grind). The bottom stone being flat, is called पाटा and the combination is पाटावरवंटा, ie, पाटा and वरवंटा.
वरश्वास n heavy breathing. panting. दीर्घ श्वास. श्रमांत॑ श्वास सोडणे/करणे. uis मला अत्ता-अग्गीन थोड पळल तर वरश्वास येते. "कार्डिओला" विचारलतर "हे वयाला एवढेच. पळताने, नुस्त चाललतर पुरे" अस म्हणट्ले.
वराड n marriage. विवाह ; वऱ्हाड in sm. Note. वऱ्हाड in sm also means "a wedding procession" or " a wedding assemblage".
वराडघर n a house where a wedding takes place. वराड चालिवाच घर/स्थळ॑.
वराड-वेव n wedding and related ceremonies or activities. वराडीन तल संबंध झालत॑ अग्गीन.
वराह n boar, the third incarnation of Maha Vishnu. महाविष्णुच तिसर॑ (वराहाच) अवतार.
वराह n boar. डुक्कर॑.
वरांदा n veranda. घराच पुढ॑ भागांतल॑ छत असाच उघड॑ ठिकाण.
वरीक adv only. merely.solely. मात्र. uis "मी लटक बोललों म्हणून वरीक सांग नको".
वरुणा n one of the Gods in Rigveda. ऋग्वेदांत॑ एक देवाच नाव ; वरुण in sm.
वरुमानम n income. पैसा मिळाच॑. आदाय. येव. Note :- from Tamil.
वरुवंटा n a cylindrical grinding stone rolled over a flat stone (called "पाटा") for grinding small quantities of masala. वरवंटा. संपाकाच मसाला थोडच आवश्य असलतर उपयोग कराच घट्टी धोंडांत॑ केलते एक लांबोळ वाटाच उपकरणा॑. (हेला पाटाच वर लोळिवून वाटतों). Note :- (1) The word वरवंटा is derived from वर (top) and वाटणे (to grind). The bottom stone being flat, is called पाटा and the combination is पाटावरवंटा, ie, पाटा and वरवंटा.
वरून adv implying 'from the upper part. from over. from above. from the top'. व॑रून. uis दुपारा मी निजलासताना मझ पांयेवरून एक विंचु गेल॑.
वरून adv implying 'from nearby or from the vicinity'. व॑रून. uis (1) अम्च गांवावरून एक नव रेलवे-लैन घालाल जातात म्हणून मी टी.वींत॑ ऐकलों. (2) मी सांगट्लास्क॑, कापड अटकिवून/लोंबिवून घालाला तो ते भिंतीवरून एक दोरा होढून/ओढून बांधला.
वरून prep implying "observation from premises to inferences". व॑रून. Note :- used in an abstract sense. uis संपाकाच रूचावरून मला कळ्ले, हे मझ बाईलेच केली म्हणून.
वरोपचार n the ritual welcoming and extending courtesies to the bridegroom. वराडाच नवराला मर्यादा करणे.
वर्ग n class. category. वर्ग. विभाग.
वर्ग n division. विभाग.
वर्ग n tribe or caste. जात॑.
वर्ग n a particular variety. एक प्रत्येक गुणाच. uis दहा वर्षाच पुढ॑ पर्यंतीन चोखोट वर्गाच तांदूळ किलोला पंध्रा रुपेला मिळत होत॑. तेच अत्ता साठ रुपे झालाहे.
वर्गीय adj relating to a caste, class, type etc. एक प्रत्येक वर्गाला संबंध झालते.
वर्ण n colour. रंग.
वर्ण n caste. race. जाति.
वर्णना n description. विवरणा.
वर्णभेद n racial discrimination. वर्णाच आधारांत॑ लोकास॑ वेगळ॑-वेगळ॑ ठिवणे.
वर्णाश्रम n the four castes (brahmana, kshatriya, vysya and sudra). ब्रह्मण॑, क्षत्रिया, वैश्या अणी शूद्रा असल॑ समुदायाच विभाग.
वर्तमान adj current. अत्ता होत असाच॑. चालू असाच॑.
वर्तमान adj prevalent. अत्ता होत असाच॑ (पद्धती).
वर्तमान n (grammar) present tense. (व्याकरण॑) सद्या होत असाच क्रिया विषयीं सांगाच क्रियापदाच काळ॑.
वर्तमानकाळ (grammar) n present tense. वर्तमानकाळ॑ (व्याकरणांत॑).
वर्मीष्ठ adj a selfish person whose speech is either probing or stinging. स्वंत कार्य मात्र पाह्यींगून टोंचून-टोंचून बोलाच एक मनुष. uis वाचलते अणी श्रम भोगणार लोके साधारणहोऊन वर्मीष्ठ असत नाहीत॑. षाणपण॑ अधीक नाहीस्क अणी कष्ठी भोगनास्क व॑र जायाला प्रयत्न करणारच साधारणहोऊन वर्मीष्ठ असाच.
वर्लावर॑ adv peripherally. superficially. व॑रून. uis काम बरोर शिकाम म्हण्जे, शिकाच वेळी वर्लावर॑ काम पाह्यलतर॑ पुरना. शिकाच कमावर पूर्त ध्यान ठीवलतरच होईल.
वर्ष n year. बारा महिनाच काळ॑.
वर्ष n rains. पाऊस.
वर्षऋतु n rainy season. वर्षकाल. पावसाळा. पाऊसाळा. पौसाळा.
वर्षकाल n rainy season. वर्षकाळ. पावसाळा. पाऊसाळा. पौसाळा. वर्षऋतु.
वर्षानवर्ष adv for years together. वर्षोंवर्ष.
वर्षभर adv throughout the tear. पूरा वर्ष.
वर्षाब्दी n completion of one year. एक वर्ष पूरा होणे.
वर्षारंभ n start of a new year. नव वर्षाच आरंभ॑. उगादि. युगादि.
वर्षावर्ष adv every year. प्रतिवर्ष. वर्षावर्षी. uis अम्च घराच जवळ असाच देवी क्षेत्रांत॑ वर्षावर्षी होयाच उत्सवाला मझ संभावाना चुकनास्क॑ मी देणे आहे.
वर्षोंवर्ष adv for years together. भरून वर्षाला. वर्षानवर्ष. uis कित्येक पोर॑/पोरी वर्षोंवर्ष 'सी.ए' परीक्षा लिव्हत असतात॑. तज पक्षा तेनी 'एम.बी.ए' केलतर॑ जिंतून कामाला येऊया.
वलय n a circular boundary. वृत्ताकाराच॑ परिधि.
वलय n circle. वृत्त.
वलांडणे vt to go across, circumventing. (कसालीं लागनास्क॑) फिरींगून जाणे ; ओलांडणें in sm.
वलांडणे vt to pass over. व॑रून जाणे ; ओलांडणें in sm.
वल्लभ n one who is dear (man). प्रीय.
वल्लभ n husband. दाल्ला. पति.
वळणे vi to turn. to change the course. (जायाच वाट) वांकून जाणे.
वळवळा n slippery and writhing (on touch). (शिवताना) निसराच ; वळावळ/वळवळ in sm. uis हलवा खायाला मझ॑ नातूला अवडना. कां म्हण्जे, ते शिवताना वळवळा अस्त॑ म्हणून तो सांगतो.
वळवळा fig indecisive. निश्चय काढनाते ; वळावळ/वळवळ in sm. uis तो मनुष उदंड वळवळा स्वभावाच॑. तो कोण्त॑ विषयांतीन लोक्कर निर्णय घेना, उग॑ ढकळत असल॑.
वळुके adj bald-headed. टकळू. केंस झडलते डोस्के. Note :- from Tamil.
वळ्ळि n creeper. वेल. लता. वल्लि. कोडि (Tamil).
वश॑ adj rendered under control. स्वाधीन॑ केलते.
वसति n staying arrangements or facilities. राह्याच व्यवस्था.
वसतीगृह n hostel. dormitory. राह्याच व्यवस्था असाच एक समूह गृह॑. छत्र.
वसरि n an open space in the central portion of a house. घराच मधल॑ ठामांतल॑ मोकळ॑ ठिकाण. ओसरी in sm. uis जुन॑ काळाच घरांत मधे आंगण अस्त॑. तज एक पटीस वसरि अस्त॑, अण्खीएक पटीस संपाकघर, तिसर॑ पटीस निजाच खोलि, चौथे पटीस देवघर अस॑ "प्लान"/व्यवस्था केलास्तील॑.
वसंत n spring season. हिंवाळाच/हिमाळाच नंतरल॑ ऋतु.
वसंतपंचमि n the fifth day of the shuklapaksha of Magha month. माघ मासांतल॑ शुक्ळपक्षाच पंचमीच दिवस.
वसाडे n misty or very thin drizzle. a spray. ओसाडे. बरीक शिंतोडे. uis अम्च घरच॑ खिडकीच वरल॑ छज्जाला रुंद उणे असामळे थोड वसाडे बडीवलतरीन आंत ओल॑ होते. खिडकी समच झांकांमते पडते.
वसिष्ट n name of a gothra named after sage Vasishta. वसिष्टऋषींच नावा वर एक गोत्राच नाव.
वसिष्टा n name of an ancient sage. एक महाऋषीच नाव.
वसु n name of a demi-god invoked especially during death rites. श्राद्धाला संबंध झालते एक देवताच नाव.
वसुधा n the Earth. वसुंधरा. भूमी.
वसुंधरा n the Earth. वसुधा. भूमी.
वसूल n revenue. receipts. मिळामते पैसे.
वस्त n gold and silver ornaments. सोनेच रुपेच आभरण॑. नग॑. नेग. माळ-मत्ता. वस्था.
वस्तु n an article. एक साधन॑.
वस्था n gold and silver ornaments. वस्त. नग. आभरण॑. माळ-मत्ता. uis अम्च शेदारल॑ घरची बीदींत॑ बंडीवालाकडून भाजीपाला घ्याला बाहेर येतानपणीं भरून वस्था घालींगते. तिज घरचे भाग्यवंत लोक म्हणून धाकिवाला असूया वाटते.
वस्त्र n cloth. कापड.
वस्त्र n dress. शिवलते कापड॑.
वस्त्र n a cotton garland like item used for decorating god's idol or picture. पूजाचवेळी देवाला अलंकार करिवाच कापूसांत॑ केलते मालाकाराच एक अलंकार साधन॑.
वस्त्रापहरण n removal of clothes from a person forcibly. बळ उपयोग करून दुसरेंच कापड उक्कलणे.
वहिनी n a term used for addressing husband's elder sister. दाल्लाच अक्का. वैह्नक.
वहिनी n a term used for addressing elder brother's wife. वडील भाऊच पत्नि.
वंकड॑ adj bent. crooked. वांकून असाच॑ ; वाकडा in sm.
वंकड॑-तिंकड॑ adj not alligned properly. अडव॑तिडव॑. uis अम्च घरच॑ भोंतालभिंते ("कांपौंड-वाल") वंकड॑-तिंकड॑ बांधलाहे. मेस्त्री काम बरोर केल नाही.
वंकड॑-तिंकड॑ fig crooked. deceitful. लटक॑-लबाड॑. लटक॑-फुटक॑.
वंकी n an ornament worn by ladies in the upper arm. वांकी. बायके हाताच व॑रच भागांत॑ घालाच आभरण॑ ; वाकी/वांकी/वाक in sm.
वंगळ॑ adj bad. disgusting. loathsome. कंटाळा वाटाच॑. ओंगळ॑. वोंगळ॑ ; ओंगळ/वंगळ in sm.
वंचना n cheating. deception. एमारिवणे. विश्वास तोडणे.
वंत suff a suffix attached to an abstract noun, signifying "possessor of a thing or an aspect". अव्यक्त नामाला जोडाच एक प्रत्यय. eg. भाग्यवंत, गुणवंत, बळवंत etc.
वंदना n a salutation. नमस्कार.
वंब n carrying tales. mischievous talk. छाडी. Note :- from Tamil. चहाडी in sm.
वंब-बोलणे vt to indulge in mischievous talk. to carry tales. छाडी सांगणे ; चहाडी सांगणे in sm.
वंश n lineage. race. कुल.
वंशज n progeny. संतती.
वंशवृद्धि n advancement of a family. वंश पुढे होणे. uis वंशवृद्धि करतां अम्च देशांत उदंड लोके पहिलच लेंकरु बायको नको म्हणून गर्भपात करींगतात. तजमळे उजाच लेंकरांच लिंग काय म्हणाच डॉक्टर लोके सांगताने अस॑ नियम सरकार केलहेत॑.
वंशवृक्ष n family tree. वंशाच लोकेंच सोयरीकपण दाखिवाच एक लेख.
वाईट adj bad. बर॑ नसाच. अयोग्य.
वाक् n speech. sound of word. गोष्ट॑. शब्द.
वाक्देवी n Goddess of speech, Sarasvathi. सरस्वतीदेवी. वाग्देवी.
वाक्य n sentence. अर्थ अथवा उद्धेश व्यक्त कराच शब्दसमूह॑.
वाक्यरचना n syntax. एक वाक्यांत॑ गोष्ट/शब्द/पद जोडाच रीति. शब्दरचना.
वाग n social behaviour. social interactions. दुसरेंच बरोर सामाजिक संपर्क करणे.
वागणे vi to behave (with others). to interact (with others). दुसरेंच बरोर सामाजिक संपर्क करणे.
वाग्दान n assurance. ओपींगून सांगणे.
वाग्देवी n goddess of speech. Goddess Sarasvati. सरस्वतीदेवी. वाक्देवी.
वाग्दोष n slip of tongue. चुकून बोलणे.
वाग्भेद n difference of opinion. एकएकांच मध्यच॑ वेगळ॑-वेगळ॑ अभिप्राय.
वाग्वाद॑ n arguments. तर्क.
वाघ n tiger. राणाच एक प्राणी. व्याघ्र.
वाघनंख n tiger's claw. वाघाच नंख ; वाघनख in sm.
वाचणे vt to read. लिव्हलते उच्चारण करणे.
वाचणे vt to study. शिकणे.
वाचणे-लिव्हणे n literacy. education. वाचालीं लिव्हालीं कळणे.
वाचस्पति n a name of Brahaspathi, the guru of the Gods. बृहस्पति. देवांच गुरू.
वाजणे vt to produce a musical sound. वाद्याच शब्द करणे.
वाजणे vi to strike time in a clock. to chime. घडिगार वेळ दाखिवाला कराच शब्द.
वाजवंत्र n a wind instrument. वाजंत्र. फुंकून वाजिवाच एक वाद्य.
वाजवंत्र n a band set. वाजंत्र. वाद्य वाजिवणारांच संघ.
वाजवंत्री n a वाजवंत्र player. वाजवंत्रीवाला. वाजवंत्र (वाजंत्र॑) वाजिवणार.
वाजवंत्रीवाला n one who plays a musical instrument. वाद्य वाजिवणार. वाजंत्रिवाला. वाजंत्री.
वाजिवणे vt to play a musical instrument. वाद्य वाजिवणे. वाद्य खेळणे ; वाजवणे/वाजविणे in sm.
वाजंत्र n a wind instrument. वाजवंत्र. फुंकून वाजिवाच एक वाद्य.
वाजंत्र n a band set. वाजवंत्र. वाद्य वाजिवणारांच संघ.
वाजंत्रिवाला n one who plays a musical instrument. वाद्य वाजिवणार॑. वाजवंत्रीवाला. वाजंत्री.
वाजंत्री n a वाजंत्र player. वाजंत्रीवाला. वाजंत्र (वाजवंत्र॑) वाजिवणार. वाजवंत्री. वाजवंत्रीवाला.
वाट n way. path. track. बीद॑.
वाट n method. मार्ग.
वाट n ploy. उपाय.
वाटखर्च n wayside expenses. वाटांतल॑ खर्च. यत्राच वेळी होयाच खर्च.
वाटणे vt to distribute. वेगळ॑-वेगळ॑ करून देणे. वांटणे.
वाटणे vt to divide. भाग करणे. वांटणे.
वाटणे vt to share. वांटणे. अन्योन्य भाग करींगणे.
वाटणे vt to grind to a paste in a flatbed stone with a roller stone. वरुवंटांतकी मिक्सींतकी वाटणे.
वाटणे vi to seem or appear as if. to feel in the mind. (एक कार्या कस असूया अस॑) मनाला लागणे.
वाटणे vi to feel (hurt) in the mind. मनाला टोंचून लागणे.
वाटप्हाणे vt to expect. प्रतीक्षा करणे. uis मला प्रमोषन येईल म्हणून मी वाटप्हात होतों.
वाटप्हाणे vt to await. थांबणे.
वाटम n slope. gradient. वाटम. Note :- from Tamil. उतार in sm. uis छप्पर बांधताना बरोर वाटम देनास्क॑ बांधलतर॑, पाऊसाच पाणी लोक्कुर गळून जायनास्क खोलीच आंत उतरल॑.
वाटा n share. भाग. वांटा.
वाटा n division. भाग. वांटा.
वाटा n multiple times. वांटा. किति गुण॑ (वाढलाहे) अस॑. uis तीस वर्षा पुढ॑ अम्च वराडांत॑ सोन॑ दहा ग्रामाला तीनशे रुपे होत. अत्त वीस हदार झालाहे. म्हण्जे सोनेच मोल तीस वर्षांत॑ जवळ-जवळ सत्तर वांटा वाढलाहे.
वाटी n a small bowl. एक ल्हान पात्र.
वाटी n half shell of a coconut with the kernel. खोब्र सहित असाच नारळाच अर्ध भाग. Note :- the word नरवट्टि (coconut shell) is from नारळाच वाटि.
वाटींगणे vt to divide and take. वाटून/वांटून काढींगणे. वांटींगणे.
वाटींगणे vt to feel in the mind. मनाला पडणे.
वाटेला येणे id to fall in line. सांगाच प्रकार ऐकणे.
वाटोणी n passing urine in the way side. वाटेंत मुतणे. Note :- from वाट and पाणी.
वाडा n an imposing complex of enclosed buildings of royalty. राजवाडा.
वाडिके n periodical regularity. स्थिर होऊन वेळावेळी होयाच. Note :- from Tamil. uis एवढ॑ दिवस अम्ही दूध केम्हा-केम्हा पह्जेकी तम्हा-तम्हा घेत होतों. अण्की इथपर वाडिके होऊन घ्याला निश्चय केलों.
वाढणे vt to serve food. दुसरेंस॑ जेवण॑ मांडणे.
वाढणे vi to grow. मोट्ठ॑ होणे.
वाढणी n a serving plate for food. पदार्थ वाढाच ताट.
वाढिवणे vt to grow. वढीवून मोट्ठ॑ करिवणे ; वाढवणे/वाढविणे in sm.
वाढिवणे vt to bring-up. to rear. पालन करणे ; वाढवणे/वाढविणे in sm.
वाण n fruits, light edibles, articles of decorations for ladies etc given to married ladies, couples or priests after a religious ceremony. पूजा, अथवा सणाच नंतर॑ सवाष्णींस॑, दंपतींस॑, नाहीतर॑, पुरोहितांस द्याच आहेर. वान. वानदान. वायनदान. uis नागप्रतिष्टाच पूजा नंतर॑ पांच दंपतीस॑ वाण देणे आहे.
वाणिज्य n commerce. trade. व्यापार.
वाणी n sound of speech, or talk. बोलीच शब्द.
वाणी n grocer. दाळ-तांदूळ, जिरे-मिरे असलत॑ सामग्री व्यापार करणार Note:- related words - वाणिज्य, बणिया. uis 1.सूपर-मार्केटाच हे काळांत॑ वाणींच दुकानांत अग्गीन व्यापार कम्मी होत आहे म्हणून ल्हान वाणी लोकांच संघटना सरकाराला आरोप करत आहेत॑. 2. अमच॑ घराच मागेपटीस एक थोर सूपर-मार्केट आहे तरीन दाळ-तांदूळ, जिरे-मिरे असलत॑ संपाकाच सामग्री अग्गीन शेदारल॑/शेजारल॑ वाणीच दुकानांतून घेणेच अम्हास सौकर्य. सवंग असत॑ अणी फोण करतांतरून समेच पाखडून शुद्ध केलते अग्गि सामानहीं घराला आणून घालूनटाकतो पणीं.
वाणी n merchant. व्यापारी. वाणिज्य करणार. Note:- related word - बणिया.
वात n a wick of a lamp. दिवाच बत्ति.
वात n rheumatism. वातरोग. वादरोग. वाद. हडाच एक रोग. वायवू.
वातर॑ n tattered cloth or garment. कापडाच चिंधी. फाटक॑ कापड/वस्त्र ; वातेरे in sm.
वातरोग n rheumatism. वादरोग. वाद. वात. हडाच एक रोग. वायवू.
वातावरण n atmosphere. वायुमंडळ.
वातावरण n climatic conditions. वातावरण.
वातावरण fig surrounding circumstances or conditions. भोंताल॑ असाच स्थिती.
वात्सल्य n affection. स्नेह. प्रेम.
वाद n debate. चर्चा. तर्क.
वाद n rheumatism. हडाच एक रोग. वायवू. वादरोग. वात. वातरोग. uis वाद येऊन कष्टि भोगणारांना मी पाह्यलोंहें. मझ॑ सासूला होत॑. त्यंच बोट मुदडाला/मुजडाला/मुजलाला होयनास्क, एक टंब्लर/लोटा धरींगाला होयनास्क तरपडतील॑.
वादप्रतिवाद n points and counter-points. discussions. वादविवाद॑. चर्चा. तर्क.
वादरोग n rheumatism. हडाच एक रोग. वायवू. वाद. वात. वातरोग.
वादविवाद n points and counter-points. discussions. वादप्रतिवाद॑. चर्चा. तर्क.
वादी n plaintiff. न्यायकचेरींत॑ आरोप अर्पणा करणीर.
वाद्य n a musical instrument. गाणेच॑ वाद्य. वाजिवाच उपकरण॑.
वाद्य n a musical ensemble. वाद्य वाजिवणारांच समूह. वाद्य-मेळ॑. मेळम (Tamil).
वाद्य-घोष n ceremonial music played with musical instruments. वाद्य-मेळ॑. मेळम (Tamil).
वान n fruits, light edibles, articles of decorations for ladies etc given to married ladies, couples or priests after a religious ceremony. पूजा, अथवा सणाच नंतर॑ सवाष्णींस॑, दंपतींस॑, नाहीतर॑, पुरोहितांस द्याच आहेर. वाण. वानदान. वायनदान.
वानदान n fruits, light edibles, articles of decorations for ladies etc given to married ladies, couples or priests after a religious ceremony. पूजा, अथवा सणाच नंतर॑ सवाष्णींस॑, दंपतींस॑, नाहीतर॑, पुरोहितांस द्याच आहेर. वान. वाण. वायनदान.
वानप्रस्थ n the third of the four stages in a Brahmin's life, spent on spiritual persuit in seclusion. एक ब्रह्मणाच चार आश्रमांत॑, तिसर॑ आश्रम॑. वानप्रस्थाश्रम.
वानप्रस्थाश्रम n the third of the four stages in a Brahmin's life, spent on spiritual persuit in seclusion. एक ब्रह्मणाच चार आश्रमांत॑, तिसर॑ आश्रम॑. वानप्रस्थ. Note :- हेजंत॑ तत्वज्ञान, भ्रह्मज्ञान असल॑ विषाया वर एकांततांत॑ श्रद्धा ठिवणे आहे. uis हे काळांत लोके कोण्त॑ आश्रमीं बरोर पाह्त नाहीते. ब्रह्मचार्य असाच वेळी ग्रहस्थाश्रम अनुभोगतात॑, तसच वानप्रस्थाश्रमांत शेवटल॑ काळांतपणीं ग्रहस्थाश्रमाला संबंध झालतेर विषय योचना करतात.
वानर n monkey. माकड. कपी. Note :- the word माकड is a प्राकृत form of the Sanskrit word मर्कड.
वानर n the mythical creatures of Hindu puranas and scriptures. हिंदु पुराणांतल॑ वानर. Note :- these beings, capable of speech and with human attributes and (some) with super human strenghts are said to be reincarnations Gopis of Lord Krishna's time.
वानरचेष्टा n monkey tricks. वानरास्क॑ कराच खोडि.
वापरणे vt to use. उपयोग करणे.
वापरणे vt to put to use. उपयोगांत आणणे.
वापस adv return. पर्तून. परतून.
वाफ n vapour. steam. आवी (Tamil).
वाम n left. डाव॑. सव्य.
वाम n reverse. contrary. उपराट. उलटा. सव्य.
वामन n an avatar of Lord Vishnu. महाविष्णूच एक अवतार.
वामाळा n overcast with hazy cloud. पत्तळ मेघ भरलते आकाश. वांबाळा. वांबाळी. Note :- from व्योम(sky, in Sanskrit) + मळ॑. Also, वांब means मेघ. But this usage is archaic in SM.
वायनदान n fruits, light edibles, articles of decorations for ladies etc given to married ladies, couples or priests after a religious ceremony. पूजा, अथवा सणाच नंतर॑ सवाष्णींस॑, दंपतींस॑, नाहीतर॑, पुरोहितांस द्याच आहेर. वान. वाण. वानदान.
वायवू n rheumatism. वात. वाद. वातरोग. वादरोग. हडाच रोग. uis वायवू येऊन कष्टि भोगणारांना मी पाह्यलोहें. मझ सासूला होत॑. त्यंच बोट मुदडाला/मुजलाला होयनास्क, एक टंब्लर/लोटा धरींगाला होयनास्क तरपडतील॑.
वायवू n any kind of gas problem. वायूच॑ बाधा.
वायाडि adj talkative. बोलगट॑. Note :- from Tamil. uis ते बायको आले म्हण्जे घंटोन-घंटा बसून गामाच व्यवहार पूराहीं चर्चा करत असतील॑. तेनी एक मोट्ठ॑ वायाडि.
वायु n air. वार॑.
वायुपुत्र n Hanuman. हनुमान. हनुमंत॑.
वायुमार्ग n aerial route. आकाशा वाटे.
वायुसेना n air-force. विमानसेना. व्योमसेना.
वार n a week. सात दिवसाच॑ वेळ.
वार n a day in a week. वारांत॑ एक दिवस.
वार n a yard. गज. (जवळ-जवळ तीन फुट लांब). uis हे काळांत॑ नौ वाराच लुगड॑ नेसाला उजंड उण॑ बायकांसच कळल॑.
वारणे vi to come to an end. संपणे.
वारणे vi to die. मरणे.
वारस n heir. दायीद. दायीज.
वारस n inheritance. दाय. Note:- वारसा/वारस in sm.
वारावार adv week-by-week. वारावार.
वारावार adv every week. प्रति वार.
वारिवणे vt to finish-off. समाप्त॑ करिवणे. संपिवणे.
वारूळ n an anthill. anthill occupied by snake. वाल्मीक॑. पंढ्र॑ मुंग्या करलते मातीच ढीगारा (हेजांत सरप॑ राहणे आहे). हुत्त॑.
वारे n air. वायु ; वारा/वारे in sm.
वारे n breeze. वारे.
वारे खाणे vt to enjoy a breeze. वारे-वासीला बसणे.
वारेपाणी n climate. climatic conditions (of a place). (एक ठिकाणाच) वारे, पाऊस, उन्हाळा, हीम्हाळा/हींवाळा हेज स्थिती.
वारेपौस n rain accompanied by gale. thunder storm. मोट्ठ॑ वारे अण्खी पाऊस मिळून होणे.
वारेवासी n enjoying the breeze. वारे खाणे.
वार्ता n news. समाचार. वर्तमान. विवर॑.
वार्तापत्र n news paper. समाचार पत्र.
वार्षिक॑ adj annual. वर्षावर्षी याच. प्रति वर्षाच॑.
वार्षिक॑ adj death ceremony conducted on the first death anniversary. मरून एक वर्ष नंतर॑ कराच श्राद्ध॑.
वाळक॑ adj dried. वाळलते ; वाळका in sm.
वाळका adj an emaciated man. रोडे झालते मनुष. क्षीण झालते मनुष ; वाळका in sm.
वाळणे vi to dry up. वाळक॑ होणे.
वाळणे vi (a wound) getting healed. (घाव/फोड/व्रण) वाळून बरोर होणे.
वाळा n an anklet. पांयेंत॑ घालाच एक आभरण॑.
वाळिवणे vt to dry. वाळिवून काढणे ; वाळवणे/वाळविणे in sm.
वाळू n river sand. नदीच माति.
वाळू n sand on the sea shore. समुद्राच कांठशीच माति.
वाळूक n cucumber. काकडी.
वास n smell. वास. Note :- the word वास normally means good smell in DM. For bad smell the word घाण is used.
वास n flavour. रूचाच वास. स्वादाच वास.
वास n staying. राहणे.
वास्तव adj real. actual. true. खर॑. सत्य. निज॑.
वास्तव n reality. actuality. खर॑. सत्य. निज॑. uis सरकार आसपत्रींत॑ गरीब लोकांस॑ पैसाच खर्च नाहीस्क॑ ओखदीं डॉक्टरांच॑ (वैद्यांच॑) सेवाहीं मिळेल म्हणून आहे, पण, वास्तव काय म्हण्जे भरून सरकारी आसपत्रींत॑ तिकडे जाणार गरीबांकडूनपणीं पैस उप्पडतात॑.
वास्तु n architecture. शिल्पकला.
वास्तु n a building. वास्तु. बांधणि.
वास्तुविद्या n Indian traditional treatise on positioning of buildings. वास्तुशास्त्र.
वास्तुशास्त्र n Indian traditional treatise on positioning of buildings. वास्तुविद्या.
वास्तुशास्त्र n science of architecture. वास्तुशिल्पाच शास्त्र.
वास्तुशांति n a ceremony conducted for the benediction of a home. गृहशांति.
वाहणे vi to flow (air, water etc.). (वारे, पाणी) पुढे अपाप सरकणे. प्रवाह होणे. uis मनाली गावांत॑ दोन उंच डोंगूरां मध्ये बियास नदी वेगान वाह्याच दृश्य पाह्याला फ़ारच बेष असत॑.
वाहन n vehicle. बंडि. गाडी.
वांकणे vt to bend. वंकड॑ करणे.
वांकणे vi to bend. वंकड॑ होणे.
वांकि n a womens' ornament worn on the upper arm. वंकि. वरच॑ हातांत घालींगाच बायकेंच एक आभरण.
वांग n mole. चर्माचवर उजतानाच असाच एक डाग.
वांगि n brinjal. एक भाजीपाला ; वांगे in sm. Note:- the green thorny brinjal used in सोवळेच संपाक is called दोरली/दोर्ली in DM/TM.
वांचणुक n livelihood. वांचून असाला करामते उद्योग॑. वांचुनिकी.
वांचणे vi to survive. जीव रक्षा करणे ; वाचणे in sm.
वांचणे vi to escape. सुटणे ; वाचणे in sm.
वांचिवणे vt to rescue. चुकिवणे.
वांचिवणे vt to rescue a life. जीव रक्षा करणे.
वांचींगणे vi to survive. जीव रक्षा करींगणे.
वांचींगणे vi to escape. चुकींगणे.
वांचुनिकी n livelihood. वांचून असाला करामते उद्योग॑. वांचणुक. uis काम कराला तय्यार असणारांस॑ उद्योग, अथवा, वेगळ॑ काहीं ल्हान व्यापर/व्यवसाय कराला अत्ता अम्च देशांत॑ भरून वाट आहे तरीन, उदंड लोक॑ भीक मागाच एक वांचुनिकीस्क॑ करींगट्लाहेत॑.
वांटणे vt to distribute. वेगळ॑-वेगळ॑ करून देणे. वाटणे.
वांटणे vt to divide. भाग करणे. वाटणे.
वांटणे vt to share mutually. वाटणे. अन्योन्य भाग करींगणे.
वांटा n share. भाग. वाटा.
वांटा n division. भाग. वाटा.
वांटा n multiple times. किति गुण॑ (वाढलाहे) अस॑. uis तीस वर्षा पुढ॑ अम्च वराडांत॑ सोन॑ दहा ग्रामाला तीनशे रुपे होत. अत्त वीस हदार झालाहे. म्हण्जे सोनेच मोल तीस वर्षांत॑ जवळ-जवळ सत्तर वांटा वाढलाहे.
वांटींगणे vt to divide and take. वाटून काढींगणे. वाटींगणे.
वांत n the matter vomited. वांती केलते पदार्थ. वांती.
वांत n vomiting. अजीर्ण झालते जेवण॑ तोंडावाटी बाहेर येणे. ओंकारा.
वांती n the matter vomited. वांती केलते पदार्थ. वांत॑.
वांती n vomiting. अजीर्ण झालते जेवण॑ तोंडावाटी बाहेर येणे. वांत॑. ओंकारा.
वांब n cloud. मेघ. Note :- from व्योम, meaning "sky" in Sanskrit. From व्योम to वाम to वांब.
वांबाळा n overcast with hazy clouds. overcast. cloudy. पत्तळ मेघ/वांब भरलते आकाश. वामाळा. वांबाळी. Note :- from व्योम(sky, in Sanskrit) + मळ॑. Also, वांब means मेघ.
वांबाळी n overcast with hazy clouds. cloudy. overcast. वांबाळा. वामाळा. Note :- from व्योम(sky, in Sanskrit) + मळ॑. Also, वांब means मेघ.
वांस n smell. वास.
वांसरू n a calf. young one of a cattle. गाईच/गायीच नाहीतर म्हैशाच पिल्लू ; वासरू in sm.
वांसरु डिवून गाय मरणे say. a saying, implying "an impossible occurrence". "होयाला साध्य नाहीते कार्य", हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being, "the calf causing the cow's death by head-butting".
विकट adj comical. हास्य.
विकट adj satirical. उपहास॑. अपहास.
विकटकवी n a poet who writes satirical or humorous poetry. हास्य अथवा उपहास/अपहास कविता लिव्हणार.
विकणे vt to sell. मोलाला देणे.
विकसन n expansion. थोर होणे. विकासन. विकास.
विकसन n development. उद्धार होणे. विकासन. विकास.
विकार adj ugly. पाह्याला बर॑ नाहीते. अघोर॑.
विकार adj change in form for the worse. आकार हाळ होणे.
विकार n emotion. मनाला होयाच गाढ अनुभव. uis "मझ॑ भाऊच तुल्य तू आहेस" अस सांगून श्रीराम हनुमंताला भेटींगून आलिंगन॑ कराच रूप अठींगट्लतर अम्च मनांत॑ हे दोघेंच व॑र असाच भक्तीच विकार॑ जास्ति वाढते. आंग पूरा झुमशी होत॑.
विकास n expansion. थोर होणे. विकासन. विकसन.
विकास n development. उद्धार होणे. विकासन. विकसन.
विकासन n expansion. थोर होणे. विकास. विकसन.
विकासन n development. उद्धार होणे. विकास. विकसन.
विकिवणे vt to cause to sell. दूसरेंस॑ विकाला करिवणे.
विकुरणे vt to spread or scatter around in a disorderly way. तेरा-पेरा पसरणे. विखुरणे ; विखुरणे, विखरणें, विकिरणे in sm. uis तला बारा वर्ष झलतरीन, अत्तापणीं जेवताना ताटांत वाढलते भातीं वेगळ॑ अग्गीनीं एकड॑-तिकड॑ विकुरूनच जेवतो.
विकृत adj perverted. विकृत॑.
विक्कल n hiccup. गोचका. Note :- from Tamil. uis विक्कल आलतर॑ एक चूळ पाणी सात भाग करून गिळलतर॑ शांत होईल.
विक्रम n valour. शौर्य. शूरपणे.
विखुरणे vt to spread or scatter around in a disorderly way. तेरा-पेरा पसरणे. विकुरणे ; विखुरणे, विखरणें, विकिरणे in sm.
विख्यात adj renowned. famous. प्रख्यात. प्रशस्थ. प्रसिद्ध॑.
विग्रह n idol. मूर्ति.
विग्रह n statue. विग्रह.
विघरणे vi to melt. (घट्टि साधन॑) द्रव्य होणे.
विघरणे vi to dissolve. द्रव्यांत॑ विघरणे. द्रव्यांत॑ मिळून/लय होवून अदृश्य होणे.
विघरिवणे vt to melt. (घट्टि साधनाला) द्रव्य करणे.
विघरिवणे vt to dissolve. द्रव्यांत॑ विघरिवणे. द्रव्यांत॑ मिळिवून दिसनास्क॑ करिवणे.
विघ्न n obstacle. अडचणे.
विघ्नेश्वरा n the god who removes all obstacles. Lord Ganapati. सग्ळ॑ विघ्नालीन परिहार द्याच देव. गणपती.
विचार n thought. योचना. uis कां अम्च॑ दक्षिणी मराठी पुनरुद्धार करताने ? अस॑ एक विचार मला आठ वर्षाच पुढ॑ आल॑.
विचार n application of thought. consideration. विचार. uis मझ॑ प्रश्नाला अत्ताच उत्तर देणे नोको. बेष विचार करून सांगिट्लतर पुरे.
विचार n a decision taken after consideration. योचनाच परिणाम. आलोचना करून काढलते निश्चय. uis मी बोलाच पूरा ऐकला नंतर॑, तज व॑र तुज विचार काय म्हणून मला सांग.
विचार n opinion. विचार. uis अम्ही काल॑ बोललते विषीन तज विचार काय म्हणून कळींगून मला सांगशील का ?
विचार n contemplation. deliberation. विचार. uis एवढ॑ दिवस देव नाही देऊळ नाही म्हणून सांगत होतते मनुष, अत्ता तत्वज्ञानाच व॑र बेष विचार करत बसलाहे !
विचार n worrysome thought. disquieting thought. मनाला संकट कराच योचना. uis अवघड पोरांच सहवासामुळे लोंक वंगळ वाटे जात आहे म्हणून त्यांस॑ थोर विचार झालाहे.
विचारणा n enquiry. अन्वेषण॑.
विचारणे vt to ask. to enquire. विचारणे.
विचारणे vt to question. प्रश्न करणे.
विचित्र adj weird. odd. queer. विलक्षणे.
विचित्र adj unusual. out of the ordinary. असाधारण॑.
विचित्रवीणा n a type of veena. एक रीतिच वीणा.
विजणे vi to extinguish light or fire. दिवा अथवा विस्तू शांत होणे ; विझणे in sm.
विजणा n a hand held fan, typically made from palm frond. विजना (ताडपत्रांत केलते). विशरी (Tamil).
विजन॑ adj uninhabited. लोकांच राह्णे नाहीते (ठिकाण). जन नाहीते ठिकाण.
विजना n a hand held fan, typically made from palm frond. विजणा (ताडपत्रांत केलते). विशरी (Tamil) ; विजणा/व्यजन/विंझणा/विंझण in sm. uis कोण्त तरीन कार्यक्रमाला जाताना एक विजना हातराखण॑ असण॑/ठींगणे चोखोट॑. कां म्हण्जे "पवर" केम्हा जात म्हणून सांगाला होयना.
विजय n victory. जिंत.
विजयदशमि n the tenth day of Ashwin month, celebrated as Dasara. अश्विन महिनाच दहावां दिवस. दसराच सण॑.
विजयलक्ष्मि n Goddess Lakshmi. लक्ष्मी देवी.
विजयस्तंभ n a pillar erected to commemorate victory. विजय स्मारकाच स्तंभ.
विजयध्वज n a flag or banner raised in victory. विजयाच नंतर॑ उंच कराच ध्वज॑/पताका.
विजया n the twenty seventh samvatsara in the Hindu tradition. सत्तावीसवां संवत्सर.
विजयोत्सव n victory celebrations. विजयाच आघोष.
विजा n lightning. वीज. गड-गडाच बरोर मेघांतून होयाच झळक दिवा ; वीज/वज्र in sm. uis दोन वाराच पुढे एकदम विजा झळकून थोर वारे-पाऊस आल॑. त्यामळे/तजमळे उदंड ठिकाणी अनेक थोर-थोर झाड खाले पडून गेल॑.
विजार n shorts. knickers. निजार. इजार. गुडिघा पतोरि झांकाच पायजामा ; इजार in sm. Note:- (1) इजार also indicates long trousers in sm. (2) विजार and निजार are considered as misspellings of इजार, arising out of their use amongst the ill-educated and rustic. It is also probable that such misspellings crept into the language before written Marathi was standardised in early 19th century. Other examples of similar type of cacoepy (mispronunciation) are विंगळा and इंगळा, (meaning "live coal"), लांदर and रांदल (meaning, "lamp"), नागवे and नावगे (meaning, "naked") etc.
विजिवणे vt to put out light or fire. दिवाला, नाहीतर॑, विस्तूला शांत करिवणे ; विझवणे/विझविणे in sm.
विटकर n brick. वीट. ईट. भिंत बांधाला उपयोग कराच माती जळिवून केलते साधन॑. Note :- many a time वि and इ are inter-used between the प्राकृत and the refined version of a language.
विटक॑ adj spoiled. विटलते. मळक॑. हाळ झालते ; विटका in sm.
विटणे vi to get spoiled on account of staleness. विटून जाणे. शिळे होऊन हाळ होणे.
विटाळ n menstrual discharge. बायकांच मासामासी याच अशुद्ध.
विटाळणे vi to get spoiled (especially food). विटून जाणे. हाळ होणे (प्रत्येक होवून, खायाच पदार्थ).
विटाळशी n a woman under menstruation. विटाळांत॑ असाच एक बायको. विटाळसी.
विटाळसी n a woman under menstruation. विटाळशी.
विठोबा n Lord Vitthal. विठ्ठल.
विठ्ठल n Lord Vitthal. विठोबा.
विडा n betel leaf prepared with betel nut etc, ready for chewing. बीडा. पान-सुपारि. तांबूल॑.
विडाच पान n betel leaf. विडाच पान.
विणी suff a word-suffix to mean "in like manner". "सारख॑/मादरी" हे अर्थ द्याच प्रत्यय. वणी. मिणी. मणी. uis उरळेगड्डेच भाजि करताना ते ल्हान-ल्हानविणी चिरून करलतर॑ रूच बेष असल॑. Note :- an example of inter-use of व and म, as well as the mispronunciation of व/वि and म/मि.
वितरण॑ n distribution. वाटणे. वांटणे.
वितरणे vi to distribute. वाटून देणे. वांटून देणे.
विदेश n foreign country. वेगळ॑ देश. परदेश.
विदेशयात्रा n foreign travel. परदेशाला जाणे. परदेशांत॑ कराच यात्रा.
विदेशवास n residing in a foreign country. विदेशांत॑ राहणे.
विदेशी adj relating to a foreign country. विदेशाला संबंध झालते. परदेशी.
विद्या n education. वाचणे-लिव्हणे शिकणे.
विद्यादान n imparting of free education. सौजन्यांत शिकिवणे.
विद्यापीठ n an institution of learning. विद्या शिकिवाच संस्था.
विद्याभ्यास n education. शिकणे.
विद्यारंभ n ceremony marking the start of education of a child. एक लेंकराच वाचणे आरंभ करताना करिवाच सण॑. अक्षराभ्यासाच सण॑.
विद्यार्थी n student. विद्य शिकणार॑. शिष्य.
विद्यालय n school. साळे. शाळे.
विद्यावंत adj scholarly. learned. पांडित्य असणार. विद्वांस.
विद्युतशक्ती n electricity. एलक्ट्रिसिटि.
विद्र adj ugly. विद्रूप. कुरूप ; विद्रा in sm. uis पोरे सावळे असल॑ तरीन, विद्र असल॑ तरीन, तेन्हाला येणार नवरी उजळ॑ असाम॑ म्हणून आशा भोगतात॑.
विद्रूप adj ugly. पाह्याला ओंगळ॑/वंगळ॑ असाच॑. कुरूप.
विद्रोह n enmity. वैरीपण॑. शत्रुता.
विद्वान n scholar. an erudite person. विद्यावंत. पंडित.
विद्वांस adj scholarly. learned. पांडित्य असणार. विद्यावंत.
विधवा n widow. दाल्ला/दल्ला मरलते/मेलते बायको. दाल्ला वारलते बायको.
विधवा-विवाह n widow re-marriage. विधवाच वराड.
विध॑ n manner. method. रीत॑.
विध॑ n a particular variety, kind or type. तर॑. प्रकार.
विध॑-विध॑ n of different methods, manners, types or varieties. वेगळ॑-वेगळ॑ रीती, प्रकार अथवा तराच॑.
विधान n a manner a mode. रीत॑. विध॑.
विधानपरिषद n legislative council. जनतंत्राच एक परिषद.
विधानमंडळ॑ n legislative body. जनतंत्राच एक मंडळ॑.
विधानसभा n legislative assembly. जनतंत्राच एक सभा.
विधि n that which is ordained. कर्म.
विधि n a law. नियम॑.
विधि n a sacred rite or observance. धर्मनिष्ठा.
विधि n fate. प्रारब्ध. गत॑.
विधि n judicial judgment. a ruling. नियमाप्रकार देलते आज्ञा.
विनती n humility. विनय स्वभाव.
विनय n humility. विनती.
विनंती n humble request. भव्यांत॑ विचारणे.
विना prep without (reason, cause etc). (कारण) नाहीस्क॑ ; विन/विना in sm. uis (1) एवढे मोट्ठ॑ चूकाच काम विना कारण तो काराला साध्यच नाही. (2) देवाच कृपा विना कोण्त कामहीं अमच्यान कराला होयना.
विना prep except. विना ; विन/विना in sm. uis तला एक काम सांगिटलतर॑, ते विना बाकी पूरा करतो !
विना prep other than. विना ; विन/विना in sm. uis विश्व बाडमिनटनात॑ दुसर॑ सर्व उत्तमस्थानांत॑ असाच सैना नेहवालाला तिज खेळावर असाच सामर्थ्यपण॑ विना उदंड॑ आत्मविश्वासपणीं आहे.
विनायक n Lord Ganapathi. गणपती. विघ्नेश्वरा.
विनायक चतुर्थी n a festival or puja honouring Lord Ganesh performed during Bhadrapada month. भाद्रपद महिना कराच गणपतिपूजा. गणेश चतुर्थी. गणेशोत्सव॑.
विनाश n annihilation. संहार.
विनाश n ruin. सर्व नाश.
विनाशकाल n ruinous times. विनाशाच वेळ॑.
विनाश काले विपरीत बुद्धि prov a proverb meaning "when in dire straits one tends to act irrationally". "दुरवस्थांत असताना बरोर योचना करनास्क॑ काईं कराला साध्य आहे", हे अर्थाच एक म्हण.
विनोद n playful humour. हास्याच चेष्टा.
विपत्त n calamity. दुर्घटना. आपत्त ; विपत्ती in sm.
विपरीत adj contrary. opposite. विरुद्ध. उलटा. uis (1) मी तला काय काम सांगटलतरीन तज विपरीतच॑ तो करल॑. (2) मी बोलाच्याला विपरीत बोल नोको.
विपरीत adj perverse. कुबुद्धीच॑. uis "विनाश काले विपरीत बुद्धि" अस॑ एक म्हण आहे. तसलते वेळांत कुबुद्धीच प्रकट बेष कळून जात॑.
विपरीत adj uncommon. असाधारण॑. uis हैदराबादांत वर्षाला अडीच महिने (एप्रिल पह्यिल॑ पासुन जून पंध्रा तारीख पतोरी) विपरीत॑ उष्ण/ऊभ अस्त॑.
विपक्ष n the opposing side. विरुद्ध कराच पक्ष. प्रतिपक्ष.
विफल adj fruitless. व्यर्थ.
विभा n lustre. तेजस.
विभा n beauty. सौंदर्य.
विभाग n divided portion. share. वाटलते भाग. वांटलते भाग.
विभाग n sections or departments in an office. कचेरींतल॑ वेगळ॑-वेगळ॑ भाग.
विभिन्न adj separated. वेगळ॑ झालते. भिन्न असाच॑.
विभूति n sacred ashes. भस्म.
विमल॑ adj pure. निष्कलंग. शुभ.
विमान n aeroplane. वायू वाहन॑. व्योम वाहन॑.
विमानम n the decorated gopuram atop the sanctum-sanctorum of a temple. देऊळाच गर्भगृहाच व॑रच गोपुर॑.
विमानसेना n air-force. वायुसेना. व्योमसेना.
विमुक्त adj freed. मुक्त झालते. सुटिवलते. स्वतंत्र.
विमोचन॑ n liberation. सुटिवणे. मोचन करणे.
विरजण n the substance used for converting milk to curds. विरजणाला दूधांत घालाच पदार्थ. विरदण. Note :- normally curds or buttermilk. Note :- An example of inter-use of ज and द in DM.
विरजण n curdled milk. विरजलते दूध. विरदण. दहीं. Note :- An example of inter-use of ज and द in DM.
विरजणी n the vessel in which milk is curdled. विरजनाच पात्र (भांडि). विरदणी. Note :- An example of inter-use of ज and द in DM.
विरजणे vi curdling. the process for milk getting converted to curds. विरदणे. दूध दहीं होणे. Note :- An example of inter-use of ज and द in DM.
विरदण n the substance used for converting milk to curds. विरजणाला दूधांत घालाच पदार्थ. विरजण. Note :- normally curds or buttermilk. An example of inter-use of ज and द in DM.
विरदण n curdled milk. विरजलते दूध. विरजण. Note :- An example of inter-use of ज and द in DM.
विरदणी n the vessel in which milk is curdled. विरजनाच पात्र (भांडि). विरजणी. Note :- An example of inter-use of ज and द in DM.
विरदणे vi curdling. the process for milk getting converted to curds. विरजणे. दूध दहीं होणे. Note :- An example of inter-use of ज and द in DM.
विराम n break. pause. cessation. विश्राम. सुट्टि.
विरुद्ध adj contrary. उलटा. प्रतिकूल.
विरूप adj deformed. कुरूप.
विरोध n hostility. शत्रुपण॑.
विरोध n opposition. विरुद्ध॑पण॑.
विरोधी adj that which is hostile. विरोध करणार.
विलक्षण॑ adj weird. queer. अवलक्षण॑.
विलायत n foreign country. विदेश. परदेश.
विलायती adj relating to a foreign country. विदेशाला संबंध झालते.
विलास n playful. खेळपण॑.
विलासम n address. पत्ता. Note :- from Tamil. uis आज दुपारा पोस्ट-मान आणून देलते कागदांत॑, ते पाठिवलते मनुषाच विलासम आहेका म्हणून पाह.
विळी n a blade mounted on a wooden board for cutting vegetables. भाजीपाला कापाला उपयोग कराच एक उपकरण॑.
विवर॑ n detaied information or news. विवर॑. uis अम्च वकीलाच घरांत॑ चोर्टा पडून तीन वार झाल॑. अत्ता पर्यंतीन पोलीसाला चोर्टांच विषयीं एक विवरीं मिळ्ल॑ नाही.
विवर॑ n awareness. knowledge. विवर॑. uis मझ सेलफोण बरोर कराला तजकडे देऊन दहा दिवस झाल॑. अण्खीन वापस मिळ्ळ॑ नाही. तला हे कामाविषयीं जास्ति विवर॑ नाही, अस॑ मला वाटते.
विवर॑ n common sense. विवर॑.
विवर॑ n astuteness. विवर॑.
विवरण n detailed explanation. विस्तार होवून सांगणे.
विवाद n controversy. वाद-विवाद. गोष्टीच भांडणे.
विवाद n argument. चर्चा.
विवाद n discussion. चर्चा.
विवाह n wedding. वराड.
विविध adj several. sundry. diverse. various. विध-विध॑. वेगळ॑-वेगळ॑ तराच॑. अनेक प्रकाराच॑.
विवेक n capacity for discrimination, discretion, judgment. तारतम्याच विवर॑.
विशद adj evident. clear. स्पष्ट.
विशाखा n name of a star. एक नक्षत्राच नाव.
विशाल adj expansive. विस्तार असाच॑.
विशिष्ट adj special. विशेष.
विशिष्टाद्धैत n qualified monotheism propounded by Shri. Ramanujacharya. श्री.रामानुजाचार्यां प्रचार केलते सिद्धांत.
विशुद्ध adj pure. निश्कलंक. पवित्र.
विशुद्धी n purity. पवित्रता.
विशेष adj special. प्रत्येक. विशिष्ट.
विशेष n important thing or news. विशेष कार्य. uis आजू-बाजू घरांत॑ एकच कामवाले असताने. कां म्हणजे, अम्च एथेले एक-एक विशेषीं बाजू घराला तेनी कंडिप कळिवतील॑.
विशेषण॑ n adjective (gram). एक नाम नाहीतर॑ एक सर्वनामाविषयीं काहीतरीन विवर॑ द्याच गोष्ट॑.
विशेषनाम n a proper noun (in grammar). (व्याकरणांत॑) वस्तू, स्थान, व्यक्ती हेंच नाव. uis तज नाव शंकर आहे म्हणताना 'शंकर' म्हणाच शब्दाला अम्ही विशेषनाम म्हणतों.
विश्राम n rest. स्वस्थ. विश्रांती.
विश्रांती n rest. स्वस्थ. विश्राम.
विश्व n the universe. ब्रहमांड.
विश्व n the Earth. भूलोक.
विश्वरूप n Lord Vishnu's form encompassing the entire universe and it's activities. ब्रहमांडाच सगळीन दाखिवाच महाविष्णूच एक महा रूप.
विश्वविख्यात adj world famous. लोक प्रसिद्धी झालते.
विश्वविद्यालय n University. उपरि शिक्षणाच स्थापना.
विश्वव्यापी adj all pervading God. सर्व ठिकाणांतीन असाणर देव.
विश्वसनीय adj believable. विसंबाला योग्य असाच॑.
विश्वस्थ adj reliable. विसंबाला होयाच॑.
विश्वात्मा n the supreme soul. universal soul. परमात्मा. uis वेद अणी उपनिषद वाचलतर॑ विश्वात्मा एकच म्हणाच अम्हाला अर्थ होईल॑. लोक॑ वेगळ॑-वेगळ॑ रूप देऊन, नाव देऊन तेच विश्वात्माला पूजा करतात॑.
विश्वास n belief. विश्वास.
विश्वेश्वर n Lord of the Universe. विश्वाच प्रभू. परमात्मा.
विष n poison. जीवाल हानी करून मरिवाच पदार्थ.
विषजंतु n poisonous creature. विष प्राणि.
विषप्रयोग n poisoning. विष देऊन मरिवाला प्रयत्न करणे.
विषप्राणि n poisonous creature. विषजंतु.
विषबाधा n afflicted by poison. आंगाला विषाच बाधा होणे.
विषमकाल॑ n difficult times. कष्टकाल॑.
विषम॑ n adversity. प्रतिकूल स्थिती.
विषय n topic. गोष्टींच विषय.
विषाद n dejection. मनाला संकट होणे.
विष्णु n Lord Vishnu. महाविष्णु.
विष्णुचक्र n the disc weapon of Lord Vishnu. महाविष्णूच चक्रायुध.
विष्णुचक्र n popular name of a fire cracker which rotates onthe ground. एक पटाकीच नाव.
विष्णुपाद n representative impression on a metal sheet, usually copper, of Lord Vishnu's foot, used in puja. पूजाला उपयोग कराला ताम्राच तगडांत॑ केलते महाविष्णूच पाऊलीच छाप.
विष्णुभक्त n a devotee of Lord Vishnu. महाविष्णूच भक्त.
विष्णुभक्ती n devotion to Lord Vishnu. महाविष्णूच व॑र असाच भक्ती.
विष्णुलोक n Vaikunta. वैकुंठ.
विसण करणे vt to mix cold hot water with hot water to make it lukewarm. उनु पाणीच बरोर हिंस पाणी मिळिवून निविवणे/कोमट करणे. uis अत्तलीकडे न्हाणींत 'मिक्सर-टॅप' म्हणून येते. ते उनुपाणी विसण कराच काम करते.
विसम्मत॑ n refusal. decline. सम्मत न देणे.
विसर n forgetfulness. सये नाहीस्क॑ असणे.
विसरणे vt to forget. मनांतून सुटणे. विसरून जाणे. अठिंगाला होईनास्क॑ होणे.
विसर्ग n the soft aspirate sound at the end of some consonants, indicated by : (two dots). कित्येक व्यंजनाच शेवटी जोडाच अर्ध "ह" शब्द. हेज चिन्ह आहे :
विसर्ग n relinquishment. त्याग.
विसर्जन n discard as unwanted. आवश्य नाही म्हणून टाकाच॑. उपेक्षा करणे ; विसर्जणे in sm.
विसर्जन n immersing (idol of Ganapati) in water. (गणपतीच विग्रह॑) पाणींत॑ सोडणे.
विसलणे vt to rinse or wash a vessel. भांडी धुवणे/धूणे ; विसळणे in sm.
विसंबणे vt to trust. to relay upon. विश्वास ठिवणे. पातेरा ठिवणे. पातेदन॑. पातेजन॑.
विसंबणे vt to believe. विश्वास करणे.
विसाण n cold water mixed with hot water to lessen the temperature. उनुपाणीच पोळणे निविवाकरतां घालाच हिंसपाणी. कोमट केलते पाणे. विसण केलते पाणी.
विसाणणें vt to reduce the temperature of hot water by mixing cold water. उनुपाणीच पोळण॑ निविवाकरतां हिंसपाणी घालून मिळिवणे.
विस्तार n spread or extent. विस्तार.
विस्तार n expansion. विस्तार.
विस्तु n fire. अग्नी ; विस्तव/विस्तू/विस्तो/विस्तेव in sm.
विस्तूचपेटी n matchbox. काडीचपेटी.
विस्फोट n explosion. स्फोट.
विस्मय n astonishment. आश्चर्य. दंग. uis चाळीस वर्षा पुढे मनुष चंद्रग्रहाला जाऊन आलते अठींगताना आजपणीं अम्हाला उदंड विस्मय वाटते.
विस्मरते adj forgetfullness. विसरपण॑ ; विस्मृती in SM.
विस्मृत adj forgotten. विसरून गेलत॑. विस्मरते झालत॑.
विस्मृती n forgetfullness. विस्मरते. विसरपण॑.
विहार n a dormitory for budhist priests. बुद्ध भिक्षूंच राहाच ठिकाण.
विहीण n son's or daughter's mother-in-law. लोंक अथवा लेंकीच सासू. व्यांहींच बाईल.
विक्षेप n launch of a vehicle. वाहनाला आकाशांत॑ अथवा पाणींत॑ सोडाच॑.
विज्ञान n science. शास्त्र.
विज्ञान n technology. शास्त्रीय ज्ञान.
विंगळा n live coal or charcoal. ember. जळाच कोळसा. इंगळा. Note:- this is a corruption of इंगळा.
विंचरणी n comb. फणी. Note :- फणी in SM denotes a comb made of serrated wood.
विंचरणे vt to comb. फणींत॑ केंस नीट करींगणे. uis संपाकखोलींतीं (संपाकघरांतीं) जेवाच ठिकाणांतीं बसून विंचरणे बर॑ नहो.
विंण॑ n littering. to give birth to a brood. प्रसव. पिल्लू घालणे. जन्म देणे. वेहणे. वेतणे ; विणें/वीण in sm. uis जुने काळांत॑ लोक॑ उंदीर पिल्लू घालास्क॑ आठ-दहा लेंकरांस विंण देत होते ! तम्हा माघाई/म्हगाई अत्तचा पक्षा उणे होत ते करतां तेवढ॑ लेंकरांसीन वाढीवून मोट्ठ॑ करिवाला विशेष कष्ट काहीं न्होत॑.
वीज n lightning. विजा. गड-गडाच बरोर मेघांतून होयाच झळक दिवा ; वीज/वज्र in sm.
वीट n burnt brick. ईट. विटकर.
वीणा n a stringed musical instrument. एक संगीताच वाद्य.
वीर adj valour. शूर.
वीर्य n valorous. शौर्य.
वीस n twenty. एकोणीसाच नंतर॑ याच संख्या.
वृत्त adj circular. वृत्ताकार. वलय आकार.
वृत्त n a line of poetry with specified number of units of stress. पद्य पदाच वृत्त.
वृत्ताकार n circular shape. वृत्त आकार.
वृथा adv unnecessarily. to no purpose. आवश्य नाहीस्क॑. व्यर्थ होऊन.
वृद्ध adj aged. म्हातारे.
वृद्धावस्था n old age. म्हातारपण॑.
वृद्धाश्रम n old age home. वृद्धालय॑.
वृद्धि n the ten day period of sequestering (quarantine) when a child is born. लेंकरु उजला नंतरच दहा दिवसच अशुधपण॑. Note :- the corresponding ten day period after a death in the family or of a relative of the same gothra is called सूतक.
वृद्धि n growth. advancement. अभिवृद्धी. उद्धार. uis अम्च आंगाच वृद्धिला अम्ही चोखोट जेवण॑ घेऊन व्यायाम करतों. तसच॑ अम्च धार्मिक वृद्धि करतां नित्य॑ देवाच ध्यान कराम॑.
वृश्चिक n zodiacal sign of Scorpio. एक राशीच नाव.
वृषभ n sign of Taurus in the Zodiac. एक राशीच नाव. ऋषभ. uis वृषभ राशी वाले धीट स्वभावाच असतील॑ अणी पोरी असलतर॑ चांगळ॑ असतील॑ म्हणून सांगणे आहे.
वृष्टी n rains. पाऊस. पौस.
वृक्ष n tree. झाड.
वृंदावन n name of a place associated with Lord Krishna. श्रीकृष्णाला संबंध झालते एक ठिकाणाच नाव. ब्रिंदावन. Note :- ब्रिंदा/वृंदा in Samskrth means तुळसी.
वृंदावन n a ceremonial structure with the holy basil plant in it. तुळसी झाडाच पीठ॑. तुळसीपीठ॑.
वेग n speed. लोक्कर (जाणे).
वेगळ॑ adj another. दुसर॑ ; वेगळा in sm.
वेगळ॑ adj separate. व्यत्यास होऊन असाच॑.
वेगळ॑पण॑ n difference. व्यत्यासपण॑.
वेगळ॑-वेगळ॑ adj not connected. एकाल एक संबंध नाहीते.
वेघणे vt to climb up. व॑रच भागाला जाणे ; वेंघणे / वेंघणें in sm.
वेघिवणे vt to lift and place in a higher place. उचलून व॑र्च ठिकाणी ठिवणे.
वेघणे vt to climb into. आंत घूंसणे. आंत प्रवेश करणे.
वेच n spend. खर्च.
वेच n expenses. खर्च.
वेचणे vt to spend. खर्च करणे.
वेचाच तेल n ground-nut oil, used for cooking. संपाकाला उपयोग कराच भोईंचणेच तेल.
वेचाळू adj a spendthrift. हिषोब नाहीस्क॑ भरून पैसे खर्च कणार.
वेड-करणे vt to drive someone crazy by mocking, teasing etc. दूसरेला मनाला तंटा करून वेडास्क करिवणे ; वेडाविणें in sm. uis कित्येक ल्हान वयाच पोरे तेनीच फार षाणे म्हणींगून थोरळांस॑ वेड॑ करतील॑. वडील असणार उपदेश देतात म्हणून त्यंच डोस्केला वेघत॑ नाही म्हणून वाटते.
वेडपण॑ n madness. मनाला बर नाहीस्क॑ असाच अवस्था. वेड॑ ; वेडेपणा in sm.
वेडसर adj crazy. behaving queer. वेडास्क वागणार. अल्प बुद्धी. uis त्यंच घरच॑ पोरी वेडसर आहे. तिला कस वाचीवून वराड कराला जातातकी अम्हाला कळत नाही.
वेड॑ n madness. मनाच एक असुख झालते. वेडपण॑.
वेड॑वंकड॑ adj irrational. perverse. विवर॑ नाहीस्क॑ असाच॑ ; वेडावाकडा in sm.
वेड॑वंकड॑ adj crazy. विचित्र वागणे.
वेडा adj mad. वेड॑ लागलते.
वेणी n plaited hair. विंचरून घडींत बांधलते केंस.
वेणीफणी n ladies cosmetic toiletries. बायकांच सौंदर्य करींगाच सामग्री. uis एक वराडाला जाताना छत्रांत असाम॑ म्हण्जे अम्च वेणीफणी काढींगून जाम॑. तथे जाऊन दूसरेंकडे हे-ते पह्जे म्हणून विचारणे बर॑ असना.
वेणू n a reed flute. मुरळी. मुरली. पुल्लांकुऴल (Tamil).
वेतणे vt to breed. to litter. to give birth. पिल्लू घालणे. वेहणें. विंण॑ देणे.
वेताळ n ghoul. पिशाच.
वेत्यास n difference. व्यत्यास. वेगळपण॑.
वेद n name of the earliest scriptures of Hinduism. Veda. हिंदु धर्माच आदिग्रंथ.
वेदना n pain. सूळ.
वेदरक्षण n preservation of vedas. वेद रक्षा करून ठिवणे. uis उदंड ठिकाणी अत्ता वेदरक्षणा समिती आरंभ केलाहेत॑. हींदू लोक॑ अत्ता तरीं जागृत होत आहेत॑.
वेदवाक्य n gospel truth. undisputed truth. सत्य वाक्य. सत्य वचन॑.
वेदान्त n a set of ancient Hindu scriptures forming the last part of the Vedas. वेदांच शेवटीच भाग.
वेदान्त n the theological part of the Vedas. वेदांच तत्वज्ञान॑.
वेदान्ती n a person who follows the vedantha philosophy. वेदान्ताच तत्वज्ञान आचरण करणार.
वेदाभ्यास n the study of the Vedas. वेद शिकणे.
वेदांग n the six sacred tomes forming part of the Vedas for enabling the study of Vedas. वेदाभ्यासाला म्हणून वेदांच बरोर जोडून असाच सहा विशेष ग्रंथ.
वेदी n dais. पीढ. वेदिका. मंच. uis कोण्त॑ कार्यक्रम झाल तरीन वेदींत बसून त्यंच थोरपण॑ दाखिवाला थोडपणीं संकोच करनाते लोकांस पाह्यतर॑ मला राग येईल.
वेदी n a stage for performing dance, drama etc. रंगभूमि. रंगमंच. मंच. uis गेल वर्ष अम्च गामांत चालिवाला निश्चय केलते नृत्याच कार्यक्रम शेवटी रद्द झाल॑. कारण काय म्हण्जे, कार्यक्रम चालिवणार लोक गामांत येऊन पाव्हून, "इकड एक चोखोट वेदी नाही, ते करतां नृत्य करणार कोणीं याला तय्यार नाहीते" अस सांगून वापस गेले.
वेदोक्त adj as declared in the vedas. वेदांत॑ घोषणा केलते. uis वेदोक्त पाह्यलतर॑ दादिगे/दाद्ग्ये नौ वर्षाला ब्रह्मचर्याश्रम॑, अठ्रा वर्षाला गृहस्थाश्रम॑ अणी पन्नास वर्षाला वानप्रस्थाश्रम॑ कराम॑. पण अत्तलीकडे कोणीं हे काहीं करत नाहीते.
वेल n creeper. बेल. वळ्ळि (Tamil). कोडि (Tamil). लता.
वेळ n time. समय. uis संध्याकाळी मला येऊन पाह्तों म्हणटलातरीन अत्ता पतोरी आला नाही. वेळ सहा झाल॑. इतपर तो येइना वाटते.
वेळ n duration of time. समयाच काळ. uis तला वाटपाह्त मी "बस-स्टॉपांत" अर्ध घंटेपसून होठाकलोहें. अण्खीन थोड वेळ झालांपिरी वापस घराला जायाल जातों.
वेळ n free time. स्वस्थ वेळ. uis मी अत्ता उजंड॑ (उदंड॑) कामांत आहें. एवढे कामामध्ये वेळ मिळतेकी नाहीकी. मिळ्लतर॑ तुला येऊन पाह्तें.
वेळ n occasion. instance. समय. दपा. uis तीन वेळ तो परीक्षा लिवलातरीं, तीन वेळीं हरला.
वेळ n delay. उशीर. uis मी अवसरांत॑ आफीसाला निघत असताना मझकडे उगे आवश्य नाहीते वंब बोलून मला वेळ करिवनको.
वेळ n late. वेळ. निश्चय केलते वळापक्षा जास्ती समय होणे. uis दिवसोडी आठ घंटेला आफीसाला मी निघेन. अत्ता नौ घंटे झाल॑ अणी तुजकडे वंब बोलत अण्खीन वेळ करिवाला मला इष्ट नाही.
वेळ n decanted water in which rice was cooked. शिजलते भातांतून वेळून काढलते पाणी.
वेळकाळ n at the time (of requirement). (आवश्य असाच) समय. uis कित्तीदपा सांगटल तरीन वेळकाळाला तो मनुष कोठ तरीन निघून जाईल. नंतर॑ वेगळ॑ कोणाल तरीन बलावून अम्च काम करामते पडते.
वेळकाळ n a (suitable) time or occasion. (बरोरल॑) समय uis डोस्केच केंस कापिंगाला दिवसीं वेळकाळीं पाहण॑ फार अवश्य आहे. मंगळवार, शुक्रवार, शनिवार हे दिवसी संध्याकाळी न्हावीकडे जाताने म्हणून सांगणे आहे.
वेळणे vt to strain excess water from a cooking vessel (typically to strain out "ganji" from cooked rice). शिजिवलते पदार्थांतून जास्ती पाणी निदान॑ ओतून काडणे. uis जुने काळांत॑ भात शिजिवला नंतर॑ भांडीच तोंडावर कापड बांधून गंजी-वेळणे करत होते.
वेळनावारी adv at an inconvenient time. at a wrong time. at an improper time. असौकर्याच वेळी. uis मझ बाईल पाष्टे वेळ पूजा-पुनस्कार कराच अवसरांत अस्ताना शेजारल॑ घरची वेळनावारी वंब माराला/छाडी बोलाला येणे दंडक आहे. दाक्षण्य भोगुन मझ बाईल पणीं तिला काहीं सांगत नाही. तिन॑ गेला नंतर॑ मोण-मोण करते !
वेळवणी n the water strained-out of a cooking vessel after cooking rice. भात शिजिवल॑ नंतर॑ ओतून काढाच पाणी.
वेळवारी n well before it is late. in good time. वेळेवारी. बरोरल॑ वेळी.
वेळा n cardamom. एलक्का (Tamil) ; वेलची in sm.
वेळाजोक्त adv as per timely requirement. समयाजोक्त. वेळाप्रकार. समयाप्रकार.
वेळाजोक्त adv as per opportunity. समयाजोक्त. वेळाप्रकार. समयाप्रकार.
वेळाजोक्त adv as per situation. समयाजोक्त. वेळाप्रकार. समयाप्रकार.
वेळाप्रकार adv as per timely requirement. समयाजोक्त. वेळाजोक्त. समयाप्रकार.
वेळाप्रकार adv as per opportunity. समयाजोक्त. वेळाजोक्त. समयाप्रकार.
वेळाप्रकार adv as per situation. समयाजोक्त. वेळाजोक्त. समयाप्रकार.
वेळावेळी adv from time to time. oftentimes. repeatedly. पुन्हा-पुन्हा ; वेळोवेळा in sm.
वेळेवारी adv well before it is late. in good time. वेळवारी. बरोरल॑ वेळी. uis (1) अम्ही ल्हान असताना संध्याकाळी वेळेवारी घराला परतून आलनाहीतर॑ अम्च अम्मा-बापा अम्हाला भयंकर शिवा देत होते. (2) त्यांस॑ उदंड वर्षापसून डयबीटिस आहेतरीन वेळावारी ओखद घ्याकरतां अत्तापतोरी काहीं तापत्र्य झालनाही.
वेळू n bamboo. बांबू.
वेळूच काठी n a bamboo stick used for spreading ritually washed clothes. सोवळेच काठी.
वेश्या n prostitute. रांडे.
वेश्याघर n brothel. वेश्यालय.
वेश्यालय n brothel. वेश्याघर.
वेश्यावृत्ती n prostitution. वेश्यांच काम.
वेष n dressing. वस्त्र.
वेष n disguise. कपट रूप.
वेष n odd or unusual dress. विचित्र वेष.
वेषघालणे vt to masquerade. एमारिवाकरतां वेगळे प्रकार वेष करींगणे.
वेषभूष॑ n grand dressing. ostentatious dressing. आडंबर वेषच अलंकार.
वेष्टक n an untailored garment worn by men to cover the lower body. वेष्टि. पंचा. पंचे. धोति. धोत्र.
वेष्टि n an untailored garment worn by men to cover the lower body. वेष्टक. पंचा. पंचे. धोति. धोत्र.
वेहणे vt to breed. to litter. to give birth. वेतणे. पिल्लू घालणे. विंण॑ देणे.
वेंचणे vt to pick or select one-by-one. एकेक होऊन काढणे ; Note:- in sm both वेंचणे and वेचणे mean 'to pick one-by-one' as well as 'to spend'.
वेंचून काढणे vt to pick and choose. पह्जे म्हणाच मात्र काढणे.
वैकुंठ n Vaikunth, the abode of Lord Vishnu. महाविष्णूच॑ निवासस्थळ॑. विष्णुलोक॑.
वैकुंठसमाराधना n a Hindu ceremony performed on the twelfth day after death. हिंदूधर्मा प्रकार मरून बारावां दिवसी कराच एक वैदिक पद्धत॑.
वैक्काल n canal. कालवा. कालवाई. कालवायी. नदीच पाणी वेगळेकडे परतून सोडाला बांधलते व्यवस्था. Note. वैक्काल is a metathesised or mispronounced form of कालवाई where वाई(वै) gets pronounced before का.
वैजयंती n black thulasi. कृष्णतुळसी.
वैजयंतीमाला n a necklace of Lord Vishnu with five precious stones diamond, ruby, topaz, pearl and sapphire. महाविष्णूच वज्र, तंबड माणिक, पुष्कराज, मोती अण्खी इंद्रनीलाच माळ. uis 99% लोकांस॑ वैजयंतीमाला म्हण्जे अगाऊच सिनिमा नटीच सय येईल॑. मला पणीं हे शब्दाच अर्थ अस असल॑ म्हणून अत्ताच कळ्ल॑ ! Note:- these five precious stones are referred as arising from the five elements as follows ; diamond from आकाश or ether, ruby from अग्नि or fire, topaz from वायु or air, pearl from जल or water, sapphire from पृथ्वी or earth.
वैडूर्य n a type of gem. एक रत्नाच नाव.
वैतरणी n name of a mythical river crossed by departed souls. मेला नंतर॑ जीवात्मा वलांडून जायाच एक पुण्य नदीच नाव.
वैदीक n pooja rituals. पूजाला संबंध झालते.
वैदीक n death ceremonies. श्राद्धाला संबंध झालते.
वैदीकी adj relating to the practice of vedic rituals. वेद शास्त्र. uis तीस-चाळीस वर्षा पुढे वैदीकपण॑ मात्र करून वांचुनिकी करणे फार कष्ट होत॑. पण, अत्ता वैदीकींत॑ महिनाला वीस-पंच्वीस हदार रुपे सुलुभांत संपादाला होत॑.
वैद्य n a medical doctor. डॉक्टर.
वैद्यवाणी n medical shop. औषधाच॑/ओखदाच॑ दुकान. औषधवाणी. ओखदवाणी. Note:- वैद्य ( medical doctor/medication) + वाणी (merchant).
वैद्यशास्त्र n medical science. चिकित्सा शास्त्र.
वैद्यालय n hospital. चिकित्सालय.
वैभव n grandeur. ऐश्वर्य.
वैर॑ n diamond. वज्र. Note :- from Tamil.
वैरागी n an ascetic who has renounced the world. बैरागी. अवधूत सन्यासी.
वैराग्य n renunciation. त्याग.
वैरी n enemy. शत्रु. रिपु.
वैरिपण॑ n enmity. विद्रोहपण॑. शत्रुपण॑.
वैशाख n the second month in the Hindu calendar. हिंदू पंचांगांत॑ दुसर॑ महिना.
वैश्य n Vysya, one of the four castes. वर्णाश्रमांत॑ एक वर्ण.
वैष्णव adj relating to Lord Vishnu. विष्णू्ला संबंध झालते.
वैष्णव n a person who follows Vashnavism. वैष्णव संप्रदाय आचरण करणार.
वैह्नक n husband's elder sister. वहिनी. uis वैह्नक घराच बरोर असलतर॑ दाल्ला-बाईली मधे थोड मनस्ताप होयाला संभव अस्त॑.
वैज्ञानिक adj scientific. विज्ञानाला संबंध झालते. शास्त्रीय.
वैज्ञानिक n a scientist. शास्त्रज्ञ.
वोपणे vt to accept. ओपणे. मान्य म्हणून स्वीकार करणे. uis मी सांगाच तो वोपलाकी कायकी. तरीं, तजकडे बोलून पाह्तों.
वोपिवणे vt to hand over (responsibility or charge). to entrust or commit (with responsibility). ओपिवणे. दुसरेंकडे (जवाबदारी) देणे ; ओपणे/वोपणे in sm. uis एवढे वर्ष तो "गळ्फांत॑" असताना तज तीन लेंकरांचीं वाचिवाच/शिकिवाच जवाबदारी मी काढींगटलोतों. याच महिना तो वापस आलांपिरी जवाबदारी तला वोपिवाला जातों.
वोपींगणे vt to accept (responsibility) on oneself. ओपींगणे. (जवाबदारी) घेणे. uis तला कायतरीन तंटा/उपद्रव आलतर॑, तो अपाप तजांसूं चुकींगाम॑. तज जवाबदारी तू कसाला वोपींगतोस॑ ?
वोपींगणे vt to agree. to accept. ओपींगणे. संम्मत करणे. uis ते चूक काम मीच केलों म्हणून वोपींगटलोंकी. कसाला उगे-उगे मला सळिवतोस॑ ?
वोस adj desolate (place). ओस. विजन॑ (स्थल॑). जन संपर्क नाहीते (ठिकाण). (काईं नाहीते) ठिकाण ; ओस/ओसाड in sm.
वोंगळ॑ adj bad. disgusting. loathsome. कंटाळा वाटाच॑. ओंगळ॑. वंगळ॑ ; ओंगळ/वंगळ in sm.
व्यक्त adj explicit. unambiguous. स्पष्ट.
व्यक्त adj clearly manifested. स्पष्ट होवून प्रकट झालते.
व्यक्तित्व॑ n individuality. प्रत्येकपणे.
व्यक्ती n an individual. एक मनुष.
व्यत्यास n difference. वेत्यास. वेगळपण॑. एक सार्ख नसाच स्थिती.
व्यत्यस्थ adj differentiated. भेद झालते.
व्यर्थ adj pointless. fruitless. unnecessary. वृथा. आवश्य नाहीस्क॑.
व्यर्थ adv fruitlessly. प्रयोजन नाहीते. उगेच॑. वृथा.
व्यवसाय n commerce. trade. business. व्यापर.
व्यवसायी n a trader. merchant. businessman. व्यवसाय करणार.
व्यवस्था n arrangement. एर्पाड (Tamil).
व्यवस्था n system. पद्धती.
व्यवस्थापन॑ n management (of an institution). स्थापना बरोर पाह्यींगणे.
व्यवस्थापना n an institution. एक स्थापना.
व्यवहार n conduct. वागाच रीति. uis गेल सात आठ महिना पसून भारताच बरोर चैनाच व्यवहारांत॑ फार व्यत्यास आलाहे. भारताला अवमान कराला मिळाच अवसर कोण्तीन चैना सोडत नाही.
व्यवहार n interactions. संपर्क. uis कोळेजाला मिळ्लानंतर॑ तला तीन चार नव मित्र मिळ्लाहेत॑. त्यंचकडे व्यवहार ठींगणे एवढ॑ चोखोट न्हो म्हणून मला वाटते.
व्यवहार n commercial dealings. business. trade. व्यापाराच संपर्क. uis युणैटड नेषनाच अंतर-राष्ट्रीय व्यवस्था प्रकार॑ वेगळ॑-वेगळ॑ राज्यांच मध्ये व्यापाराच व्यवहार डब्ळियु. टी. ओ (W T O) निश्चय केलते प्रकार कराम॑ अस॑ निर्देश आहे.
व्यसन॑ n dejection. sadness. संकट.
व्यंजन॑ n consonant. अक्षरमालांत॑ एक वर्गाच अक्षर॑.
व्याकरण n grammar. भाषांत॑ शब्द, गोष्ट, वाक्य असलतेला संबंध झालते नियम॑.
व्याज n rate of interest at which money is lent. बड्डि.
व्यादि n a disease. a sickness. रोग ; व्याधी in sm.
व्यापार n trade. business. commerce. व्यवसाय.
व्यापारी n merchant. trader. businessman. व्यापर/व्यवसाय करणार.
व्यायाम n physical exercise. कसरत.
व्याहीं n son's or daughter's father-in-law. लोंकाच अथवा लेंकीच ससरा ; व्याही in sm.
व्याहीं-विहीण॑ n parents-in-law of son or daughter. लेंक नाहीतर लोंकाच ससरा-सासू. संम्मंदि (Tamil).
व्यूह n an arrangement of an army in the battlefield. युद्ध॑भूमींत॑ सैन्याच एक व्यवस्था. Note :- of ancient times.
व्योम n sky. आकाश.
व्योमसेना n air force. विमानसेना. वायुसेना.
व्रण n an infected wound. पिकलते फोड. पिकलते घाव. रण॑. वण॑.
व्रत n religious penance. एक पूजा पद्धति.
No comments:
Post a Comment