07 March 2012

त, थ



त the fifteenth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठि अक्षरमालाच पंध्रावां व्यंजन.

तकरार n  dispute. an issue. controversy. विवाद. uis शेदारल घरचाच बांधोटी थोड पुढे आलतरीन उगेच कसाला तकरार म्हणून मझ मित्र त्यंच विरोध केलल॑ नाही.

तक्काळि n  tomato. संपाकाला उपयोग कराच एक फळ. uis दक्षिण-अमेरिकाच मूल-झुडूप तक्काळीला पाव्हून यूरोपाच लोके ते एक विष फल म्हणींगट्ले. नंतरेच कळ्ळ॑ ते एक चोखोट भाजी म्हणून. Note. from Tamil. 

तगट n  metal sheet. धातूंत/लोहेंत केलते पत्तल साधन. तगड.

तगड n  metal sheet. धातूंत/लोहेंत केलते पत्तल साधन. तगट. uis (1) जुने काळास्क अत्ता अग्गीन छप्पराच व॑र कवल घालणे नाही. तज बद्दिल कवलाच आकारांतेच तगडांत केलते साधन घालतात. (2) अगाऊच काळांत येत होतते मोटर कारांच तगड दांडग जाड होत॑. पण, अत्ता येयाच कारांत/मोटर-गाडींत तगट फार पत्तळ अस्त.
 
तज pron  his. ते मनुषाला संबंध झालते. ; त्याचा in sm.
 
तज pron  its. ते वस्तूला संबंध झालते ; त्याचा in sm. 

तज-तज adj  belonging to each of it respectively. अमुक-अमुक वस्तूच/कार्याच. uis तुम्ही दहादन सांगिट्लत्याला अग्गीन तज-तज गुण अणी उपयोग आहे तरीन, अत्ता सध्याला काहीं करणे नोको म्हणून मी सांगतों. 

तज-तज adj  belonging to each of those persons respectively (used in second person singular). अमुक-अमुक मनुषाच (एकवचन प्रयोग). uis (1) तज-तज कपाळांत काय लिवलाहेकी/लिव्हलाहेकी तेच होयाल जात. उगेच चिंता करून प्रयोजन नाही. (2) तज-तज काम तो-तोच करींगाm. वेगळ॑ कोणीन सहायाला येईनात.

तट n  shore of a river or sea. समुद्राच की नदीच की कांठ. uis समुद्राच तटांत असाच ठिकाण अग्गीन जातां-जातां "ग्ळोबल-वार्मिंग" होताना पाणींत बुडूनजाईल म्हणून सांगताt.
 
तट्टी n  a screen made of reed, cane, rattan etc. बेताच पर्दा ; ताटी in sm. uis उन्हाळाच महिनेंत खिड्कीला अग्गीन खस-तट्टी बांधून तला पाणी घालत असलतर खोली अग्गीन थोडक हिंस होईल.   

तडकणे vi  to trip over. to stumble. पांय अडकून पडणे. uis वाटेंत पडलसाच थोर धोंडा सरकिवून ठिवलनाहीतर कोणतरीन तडकून पडतील.

तडकणे vt  to block. अडव॑ करिवणे. uis मोठ-मोठ "डॅम" बांधून नदीच पाणी तडकून ठिवून नंतर कालवा वाटी कृषीला उपयोग करणेकी, "एलेक्ट्रिसिटी" उत्पन्न करणेकी सध्याला बर वाटते तरीन, जातां-जातां असल॑ काम प्रकृतीला फार नाश करेल म्हण्याचांत थोडकपणीन संदेह नाही.     

तडकून पडणे vt  to stumble and fall. लंबडून पडणे. पांय अडकून पडणे. uis अम्च देशांत पोणावांटा बीद उमाट-बधकळ अस्त. पाह्यिंगून चालल॑ नाहीतर अम्ही तडकून पडओं.

तडकून-पिडकून fig  to stumble along through blunder after blunder. चूकाव॑र चूक करूनतरीन सांभाळींगून जाणे. uis मंद-बुद्धीच पोर झालते-करतां वाचणेंत तो षाणपण काहीं दाखिवला नाहीतरीन, तडकून-पिडकून कसकी परीक्षा जिंतूनटाकला.  

तडमारणे vt  to become jittery. to become nervous. अस्वस्थ होणे. uis सांगाच विषय खर असलतर गोष्टि सुलभान तोंडांत्सून बाहेर येईल. तेच लटक सांगताना कोण असलतरीन तडमारतील. Note. from Tamil.
 
तडाग n  lake. सरोवर. एरी (Tamil). पाणीच कुंड. uis भारतांत थोर-थोर नदी अणी पर्वत आग्गीन आहेतरीन, थोर तडाग नाही. 
 
तत्काळ adv  at that time. immediately. तक्षण. समेच. सवेच. uis दिडीरशी ट्रेनाच प्रयाण कराला तत्काळ टिकट विकतात तरीन, ते पणीन एक दिवसाच पुढेच कराम. 

तत्त adv  there. तथे. तेथे. तिकडे. ते ठिकाणी. ते ठामी ; तिथे/तेथे in sm. 

तत्त-तत्त adv  in all those places respectively. तथे-तथे. तेथे-तेथे. तिकडे-तिकडे. अमुक-अमुक ठिकाणी. 

तथे adv  there. तत्त. तेथे. तिकडे. ते ठिकाणी. ते ठामी ; तिथे/तेथे in sm. 

तथे-तथे adv  in all those places respectively. तत्त-तत्त. तेथे-तेथे. तिकडे-तिकडे. अमुक-अमुक ठिकाणी. 

तत्तारी adj  (a person) given to improper conduct. ओंगळ॑/वंगळ॑ वागणार. uis तिज दाल्लाच तत्तरिपण सोसाल होयनास्क तिन माहेराला परतून/पर्तून गेली.

तत्व n  principle. essence of the matter. मूल अर्थ. uis श्री मध्वाचार्यांच द्वैत तत्वाच एक मुख्य आधार आहे पंचभेद.

तत्वज्ञान n  philosophy. ब्रह्मज्ञान. uis हिंदू धर्माच अग्गि मुख्य तत्वज्ञानाचीन आधार ब्रह्मसूत्र अणी उपनिषद हे दोनीन आहे. 
  
तत्वज्ञानी n  philosopher. तत्वज्ञानाच पंडित. uis भारताच दुसर राष्ट्रपती सर्वेपल्ली राधाक्रिष्णन एक थोर तत्वज्ञानी होते.

तत्क्षण adv  instantly. तत्काळ. समेच. सवेच ; तत्क्षणी in sm. uis मी साळेच खोलीच आंत वेघत असताना पंतोजी मझ॑ लोंकाला हाक्का मारत असाच ऐकलों. तक्षण मला काहीं सुचल नाही. नंतर॑ विचारताना कळ्ळ॑, घरांत कराला देलते अभ्यास तो पूरा केल नाही म्हणून.  

तथास्तु adv  so be it. तसेच होवून दे.

तद्दि n  that day. ते दिवसी. uis मझ जामाई/जावांई वराडाच नंतर पह्यिलंदा अम्च घराला येत होते. तद्दि म्हणताना एकदम पाऊस-पाणी होत॑ अणी मझान एरपोर्टाला जायाला झाल नाही.

तद्दि-तद्दि n  on those respective days. ते ते दिवसी. uis परीक्षांत बेष करणार लेंकरे अग्ग्यासांकडीन एक चोखट/चोखोट गुण आहे. साळेंत तद्दि-तद्दि शिकिवाच पाठ नंतरशाला ठिवनास्क तद्दि-तद्दीच अभ्यास करूनटाकतील. 

तद्दिच-तद्दिच adj  relating to those respective days. तद्दि-तद्दीच. ते ते दिवसाला संबंध झालते. uis (1) तो पोर वाचणेंत फार शाहणा/षाणा म्हणून ऐकलों. विचारतान कळ्ले, साळेंत शिकिवाच तद्दिच-तद्दिच पाठ तद्दि-तद्दि वाचून मनांत कराच दंडक तला आहे म्हणून. (2) बॅकांत तद्दिच-तद्दिच हिषोब/इषोब त्येनी तेच दिवसीच 'टेली' करून त्येंच वरला आफीसराकडे पाठिवामते पडते.

तद्रूप n  of identical form. सद्रूप. एकसार्खल रूपाच. एकसार्खल आकाराच. uis समाजवादी पार्टीच मुलायसिंघ यादवाच लोंक अखिलेश यादव तद्रूप तजस्स्केच आहे.

तप n  penance. तपस. तपस्या.  

तपस n  penance. तपस्या. तप. uis साधारण मनुषाला अर्ध घंटा एक ठिकाणी बसून ध्यान कराला होत नाही. ऋषी-मुनी वर्षोंन-वर्षी कस तपस करत होतेकी, 

तपस्या n penance. तपस. तप.

तपस्वी n  an ascetic. योगी. 

तपाल n  mail. post. कागदपत्र ; टपाल in sm. uis लोके इन्टरनेटांत ई-मेल पाठिवला आरंभ केलानंतर तपाल वाटी कागद पाठिवणे उदंड उणे झालाहे. 

तपेला n  a small round shaped metal container. तप्पेला. एक ल्हान पात्र ; तपेली in sm. uis सीसेच (शीशेच) तपेलांत कराच साराला तजेच प्रत्येक रूच अस्त.

तपोबळ n  power acquired through penance. तपस करून सिद्ध झालते बळ॑. uis तपोबळांत सिद्ध केलते शक्ती प्रयोग करून विश्वामित्र महर्षी त्रिशंकु महाराजाला जीव समेत स्वर्गलोकाला पाठिवाला केलते प्रयत्न विफल झाल. 

तपोवन n  hermitage in a forest. सन्यासींच राणांतल कुटीर. uis श्रीक्रिष्णा अणी बलरामा संदीपनी ऋषींच तपोवनांत त्यंच ब्रह्मचार्याच वेळी होते. 

तप्पेला n  a small round shaped metal container. तपेला. एक ल्हान पात्र ; तपेली in sm. uis अगाऊच काळांत संपाक घरांत तप्पेल तप्पेल पाणी संपाकाला करतां आडांत्सूंन शेंदून ठिवत होते. 

तबला n  a type of percussion musical instrument. एक रीती ढोळ. uis प्रसिद्ध विद्वान अल्ला राखा सितार विद्वान रविशंकराच बरोर तबला वाजिवत होते. 

तमाशा n  fun. मजा. uis उगे तमाशाला बोललों तरीन, मझ॑ बोलणे ऐकून तला फार राग आल.

तमाशा n  joke. विनोद. हास्याच एक ल्हान बोली. uis कुष्वंत सिंगाच तमाशा पुस्तकांत सांता-बांता यांचव॑र भरून तमाशा खाणी आहे. 

तमाशा n  ridicule. मष्किरी. uis अम्च पट्णांत असाच साळेला खेडे गामांतून नव॑ होऊन आलते पोरांला कोणतरीन तमाशा करलतर दंड मिळेल म्हणून साळेच मुख्य पंतोजी अग्गिदनासीन कळिवले. 

तमस n  the last of the three Gunas (characteristics). तीन गुणांत शेवटीच गुण. uis तमस गुण जास्ती असणारांस क्रोद (राग), अहंकार, असूया, आळस असलते नीच स्वभाव भरून असेल. 

तम्मा adv  then. तम्हा. ते वेळ ;  तेव्हा in sm. uis तू दोन वाराच पुढे चेन्नैला गेलास्की, तम्मा काय झाल ?

तम्माच adv  a while ago. तम्हाच. थोड वेळाच पुढे. uis तो तम्माच पर्तून गेला. अण्की इकडे राखून ओठाकून/होठाकून प्रयोजन काहीं नाही.
 
तम्माच adv  just then. तम्हाच. ते वेळीच. uis उदंड वेळ झालकी म्हणून मी पळून-पळून तिकडे जाऊन पावताना तीन घंटे झाल्होत. पण, तम्माच तो पणीन तिकड आलते !

तम्मा-तम्मा adv  as and when. तम्हा-तम्हा. एक एकीन होत असताना. uis साळेंत शिकिवाच पाठ अग्गीन तम्मा-तम्मा अभ्यास करलतर, शेवटीच परीक्षाच वाचणे सुलूभ होईल.

तम्मा-तम्मा adv  then and there. तम्हा-तम्हा. एक-एक होत असतानेच. uis विषय नाहीस्क तुला तो उणे सांगताना कां उगे बसल्होतास ? अत्ता रडून प्रयोजन नाही. तम्मा-तम्मा बरोरल उत्तर देलसाम. 

तम्मा-तम्मा adv  at periodic intervals. तम्हा-तम्हा. वेळा-वेळी. uis तम्मा-तम्मा तला ढकळेत असाम. नाहीतर काय कामीन तो करना.

तम्मापर्यंत adv  till then. तम्हापर्यंत. ते पर्यंत. uis सिनिमा आरंभ होयाला अण्खीन दोन घंटेच वेळ आहेकी, तम्मापर्यंतीन तू काय कराल जातोस ?

तम्मापसून adv  from then on. तम्हापसून. ते वेळ पसून. uis तम्मापसून मी इकडेच होतों. तू येयाला कां एवढ॑ वेळ झाल॑ ?

तम्हा adv  then. तम्मा. ते वेळ ;  तेव्हा in sm. uis नवराच जातक दाखिवाला जोत्स्याकडे गेलास्की, तम्हा काय झाल॑ ? 

तम्हाच adv  a while ago. तम्माच. थोड वेळाच पुढे. uis तम्हाच सांगट्लों तुला, तला सहाय करून एक उपयोगीन नाही म्हणून. ऐकलास नाही, अत्ता अनुभव करामतेच.
 
तम्हाच adv  just then. तम्माच. ते वेळांतेच. uis मी तिकडे जाऊन पावलोंकी, तम्हाच तो पणीन तिकडे आलते. 

तम्हा-तम्हा adv  as and when. तम्मा-तम्मा. एक एक होत असतानाच. uis मी तुला सांगिट्लते अग्गीन तम्हा-तम्हा केलसाम. अत्ता काय कराला जातोस ?

तम्हा-तम्हा adv  then and there. तम्मा-तम्मा. एक-एक होत असतानाच. uis मान-मर्यादा नाहीस्क तज तोंडांतून अग्गीन ऐकत बसल्होतासकी, तम्हा-तम्हा पर्तून देणेचकी, कां उगे बसल्होतास ? 

तम्हा-तम्हा adv  at periodic intervals. तम्मा-तम्मा. वेळा-वेळी. uis अवघड पोरास्क हिंडत आहे तो. तम्मा-तम्मा बुद्ध सांगट्लतरेच बरोरल वाटेला येईल म्हणून तज बापाकडे सांगिट्लों.

तम्हापर्यंत adv  till then. तम्मापर्यंत. ते पर्यंत. uis मी तिकडे येयाला अण्कीन थोडक वेळ होईल. तम्हापर्यंतीन तू तिकडेच थांबशीलका/असशीलका/राहशीलका  ?

तम्हापसून adv  from then on. तम्मापसून. ते वेळ पसून. uis अत्ता दहा बडिवत आहे. सहा घंटेलाच अग्गिदनीन घराला गेलेकी. तम्हापसून इकड बसून काय करत आहेस तू ? 

तयार adj  ready. तय्यार. uis दहा घंटे झाल॑. तुम्ही तयार म्हणजे जाऊया.

तयार adj  willing. संमत. संमत असाच. uis तुम्ही सांगास्क कराला मी तयारेच.
 
तयार adj  prepared state. करून ठिवलते स्थिती. uis संपाक तयार आहे. तुम्ही केम्हा पह्जेतरीन जेवूया. 

तयार adj  completed. पूरा केलते. पूरा झालते. uis बंग्ळूराच मेट्रो-रेलाच काम गेल महिनेंतच तयार झाल होत॑. पण उद्घाटन कराला प्रधानमंत्री आल नाहीत म्हणून उगे आहेत. 

तयार adj  made. निर्माण केलते / करलते. uis भारतांत तयार केलते "टाटा नॅनो" बंडी भूलोकांतच सगळच्यांपक्षा उणे मोलाच आहे.

तयारी n  readiness. आरंभ कराला योग्य असणे. 

तयारी n  willingness. संमत/सम्मत असणे.

तयारी n  preparation. तय्यारि.

तयारी n  completion. पूरा करणे.

तय्या-तक्का नाचणे fig  to hop around in confusion. to become jittery. मनाच गोंधळामळे तरपडणे. uis आवश्य नाहीस्क तो तज शेदारल॑ घरचाकडे जमीनाच भांडणे आरंभ करला. कचेरींत केस हरला मात्र नहो, हातांत होतते जमीनाच अर्ध भाग पणीन सोडूनदेमते पडल॑. अत्ता काय करणे म्हणून तय्या-तक्का नाचत आहे.

तय्यार adj  ready. तयार. uis वराडाल जायाला वेळ झाल. अर्सा्च सोमोर/समोर ओठाकून/होठाकून शृंगार केलते पुरे, लोकुर तय्यार होऊन बाह्येर/बाहेर उत्तरशील का ?

तय्यार adj  willing. संमत केलते. संमत असाच. uis मी दहा दिवसांत चेन्नैला जाणार. मझ बरोर येयाला तय्यार असलतर मला फोण करून कळिवतोस का ?

तय्यार adj   prepared state. तयार. uis घरच संपाक अण्कीन तय्यार झाल्होत नाही म्हणून मी होटलांत टिफिन खावूनटाकून ऑफीसला गेलों.

तय्यार adj  completed. पूरा केलते. पूरा झालते. uis देऊळाच जीर्णोद्धारणाच काम तय्यार झाल म्हणून नंतरल॑ कार्यक्रम म्हण्जे, पुनर्प्रतिष्टापाना लोक्करच/लोक्कुरेच होईल.

तय्यार adj  made. निर्माण केलते. केलते. करलते. uis सुताराकडून मी अत्ता-अत्ता एक नव॑ कुर्सी तय्यार करीवलों.

तय्यारी n  readiness. आरंभ कराला योग्य असणे.
 
तय्यारी n  willingness. संमत असणे.

तय्यारी n  preparation. तयारी.

तय्यारी n  completion. पूरा करणे.

तर ind  used as a suffix to a verb as an expression to lend much significance and force. एक क्रीयापदाच अर्थ स्पष्ट कराला क्रीयापदाच शेवटी जोडाच गोष्ट/शब्द. uis (1) वेळ उदंड झाल॑. अम्च काम संपलतर समेच/सवेच निघूया. (2) तुला होईलतर, अण्कीन एकदपा मला पाह्याला येताना एक लॅप-टोप कंप्यूटर आणशीलका ? (3) गाडींतून उतरतांतरून मझ नातू मला भेटींगून "आजा" म्हणून घट्टि वरडला. (4) हे उक्काडा/ऊब मला सोसाला होत नाही. घर जावून पावलांतरून मी हिंस पाणींत आंघोळी कराला जातों. Note. used to fill out a word or sentence without adding much to the sense.

तर adv  then. in that case. तस असलतर. तस म्हणजे. uis (1) तुम्हाला हे काम कळना म्हणींगतों. तर एक बाजूला सरकांत, मीच करतों. (2) भिंतींत आणि (खिळा) बडिवताना जागृतान कराम. नाहीतर चुकून बोट चेंदरून जाईल.
 
तर n  a manner. रीती ; तर्हा in sm. uis तज चोखोटालाच कोण्त उपदेश देलों म्हणजेनीं तज विरुद्धच तो केम्हाहीं करल॑. विचित्र तराच मनुष तो. 
 
तर n  type. sort. विध॑ ;  तर्हा in sm. uis कॉफीच बीं दोन तराच आहे. एक चपटा अणी एक सगळ॑ आकाराच.
 
तर तर n  different types. तरातर. विध-विध. वेगळ-वेगळ तराच/रीतीच. uis अम्ही लेंकरे अस्ताना दीपावळीच समय अमच बापा दहा रुपेला पट्टाकी घेईंगून येतील. ते काळांत दहा रुपे म्हणजे थोर. शब्दाच, फूलाच अस भरून तर तराच पट्टाकी दहा रुपेला मिळत होत ते काळांत. 

तरतर करणे vt   to act feverishly. to act under nervous excitement. आतर भोगणे ; तरतरी in sm means quickness, briskness, liveliness, sharpness, smartness, eagerness  etc. uis मझ लोंक कोठ गेलतरीन तरतर करतो. तला स्वस्थ एक ठिकाणी बसाला होईना.

तरपड n  shaken by distress, pain etc. कष्टाच अवस्था भोगणे ; तडपड/तरफड in sm. uis  हे वर्ष अग्नि नक्षत्राच दिवसी मी चेन्नैंत॑ जाऊन सांपडींगटलों. तिकडल॑ भयंकर ऊबांत॑ मी तरपडून गेलों.

तरपड n  fretting and fuming. अवस्था भोगणे ;  तडपड/तरफड in sm. 
 
तरपडणे vi  to be shaken by distress, pain etc.मनाला शांती नाहीस्क॑ अस्वस्था भोगणे ;  तडफडणे/तरफडणे in sm.

तरातर adj  of different varieties. वेगळ-वेगळ दिनसाच (जिनसाच). तर-तर. uis खेडे गामांत होयाच संतेला गेलतर ग्रामप्रदेशांत राह्याच लोकांस पह्जते तरातर सामग्री अग्गीन पाव्हूया.

तरीन adv  still. yet. nevertheless. even then. (झाल) तरीं ; तरी/तरीपण in sm. uis तुज चोखोटालाच सांगतों तरीन, बरोर योचना करून हे विषय पुढे काढींगून जा. 

तरीन adv  at the least. उणे पक्षा. uis देवपूजाला गंधोदक करताना तुळसीदळ मिळ्ळ नाहीतर तुळसीकाष्ट तरीन घालूया.    

तरंग n  wave. लाटा ; तरंग/लाट in sm. uis तमिल नाडांत बंगाळ उपसमुद्राच कांठशी असाच तरंगमपाडी पट्णाच नावाच अर्थ आहे, "तरंगाच गाणे", म्हणजे "समुद्र लाटाच गाणे". Note. in 1620 CE the Danes (Dutch) established a trading post here and called it Tranquebar, from the Tamil name Tarangam Padi, meaning The Place of the Singing Waves.    

तरंगणे vi  to float (in a liquid). (पाणींत/द्रव्यांत) बुडनास्क असणे. uis पंजाबी लोक॑ संपाकांत फ़ार तेल वापारतात. त्यंच भाजि तेलांत तसच तरंगत आस्त.
 
तरुण adj  youthful. young. यौवन. युव.

तरुणी adj  woman in her youth. युवती. 

तरून decl a declension of तर. तराच विकार गोष्ट. तरूं. uis बंडींतून उतरतांतरून कोठसूनकी एक कुत्र येऊन मला चावल॑. Note. see तर (ind),  above.

तर्क n  debate. चर्चा. uis साळेंच मध्ये होयाच क्विज़ अणी तर्काच पोटींत अम्च साळेला पह्यिलच स्थान मिळूनदे म्हणून अम्ही तीघे पोरांस तर्क कराच अभ्यास भरून देत होते, 

तर्क n  arguments. वाद. वाग्वाद. uis बरोर तर्क कराला कळनाते वकीलाकडे अम्च केस देलसताने. अत्ता काहीं कराला होईना.

तर्कशास्त्र n  logic. युक्तीवाद. uis पुरातन एथन्स पट्णाच महान व्यक्ती सॉक्रटीस तर्कशास्त्रांत थोर पांडित्य घेटलतेनी होते.   

तर्कज्ञान n  rational wisdom. तर्कबुद्धी. 

तर्जुमा n  translation. एक भाषांतून वेगळ॑ एक भाषांत परिवर्तन करणे. भाषांतर. अनुवाद. uis रबीन्द्रनाथ ठागोराला त्यंच गीतांजलीच इंग्ळीष तर्जुमाला नोबल पुरस्कार मिळ्ळ॑. 

तर्पण n  oblation or offering of water to departed souls. पितृलोकांस पाणी द्याच विधी. uis चटकश्राद्ध कराला सौकर्य नाहीते कित्येक दन नुस्त तर्पण देऊनटाकणे आहे. 

तर्बूज n  musk melon. तरबूज. दर्बूज़. दरबूज़. खरबूज़. खर्बूज. uis अगाऊच काळांत उन्हाळाच समय मत्र तर्बूजाच पंडू येत होत॑, पण अत्ता अग्गीन वर्ष पूरा मिळत अस्त.

तल n surface. तळ. uis मी गेल वार घेट्लते मेज बरोर नाही. तज व॑रच कट्टा सम तलांत नाही, म्हणून पर्तून/परतून देऊनटाकाला जातों.

तलवार n  sword. कत्ति (Tamil). uis 1799 वर्षी झालते मैसूर युद्धांत टिप्पू सुल्तानाच मृत्यु झाल॑ अणी त्यंच तलवार ईस्ट इंद्या कंपनीच स्वाधीनांत आल॑. अत्ता ते तलवार ब्रिटीष म्यूसियमांत आहे.    

तला pron  for him. अमुक मनुषाला. uis मी तुला देलते दोन हदार/हज़ार रुपेंत एक हदार/हज़ार तला दे अणी एक हदार तू ठींग.

तला pron  for that. ते करतां. uis सौकर्य असलतर मात्र मला येऊन पाह्यलतर पुरे, तला म्हणून येणे नोको.

तला-तला pron  for each respectively. अमुक अमुक वस्तूला/कार्याला. uis तला-तला म्हणून देलते पैसे ते-ते कार्याला मात्र खर्च करलतरर॑ पुरे. एकालेक चुकून खर्च करलतर, नंतर हिषोब/इषोब गोंधळ होऊनजाईल.  

तला-तला pron  for each of those persons respectively (used in second person singular). अमुक अमुक मनुषाला (एकवचन). uis तला-तला म्हणून प्रत्येक प्रत्येक सौकर्य कराला मझान झाल नाही. असाच सौकर्यांत कसतरीन सांभाळींग्यून/समाळींग्यून जायाला सांग त्यास.  

तळणे vt  to fry (in oil, ghee etc.). तेलांत नाही,र तूपांत तळून तय्यार करणे. uis अर्ध वाळलते लाह्येंच वड्या तळाच पुढे तसेच कच्चा असतानाच खायाला रूच असेल.

तळपांय n  sole of foot. भोईला लागून असाच पायेंच भाग ; तळपाय  in sm.uis डयबीटिस असणार लोके तळपांयांत "कॉर्न" येईनास्क पाह्यींगाम. कां म्हणजे, नंतर ते व्रण होऊन गँगरीन झालतर पांय कापामते पडूनजाईल. 

तळहात n  palm of the hand. मूठाच आंतल भाग. uis एकेक मनुषालीन तळहातांतल रेखा वेगळ॑ वेगळ॑ अस्त. 

तळहाताच घावाला (फोडाला) अरसा कसाला ? fig  a saying implying "why look for a reason, excuse or alibi when the fault is obvious". "चूक व्यक्त होऊन दिसताना कसाला कारण हुडुकाm ", हे अर्थाच एक म्हN. Note. the literal meaning being, "why need a mirror to look at the injury in your palm ?"

तळहाताच वर राग भोगून धुवनास्क गेला म्हण fig. a saying implying "getting away from responsibility by citing some lame excuse". "जवाबदारींतून चुकींगाला संबंध नाहीते कारण सांगणे" हे अर्थाच एक म्हण॑. Note. the literal meaning being, "getting away without washing your hands because of anger against your palms".  
 
तवक n  a specially designed plate for pan-supari etc. एक प्रत्येक रूपाच पान-सुपारीच ताट ; तबक in sm. uis अगाऊच काळांत वराडाला अलते लोकांस जेवलापिरी तांबूल तवकांत ठिवून देत होते. 

तवा n  a shallow frying pan. तळाच पात्र/भांडि. तेल तवा. uis उडीदाच पीठाच बज्जी कराला लोखुंडाच/लोखंडाच/लोहेच तवांत तेल भरून घालून, त्यांत बुडिवून तळाम.  

तवा n  a plate like vessel for making dosa etc. धिरडेच तवा. uis अत्तच "नोन-स्टिक" तवा भरून प्रचार झालाहे तरीन, धिरडे कराला लोखुंडाच तवाच बर॑. 

तस adv  thus. ते प्रकार ; तसा in sm. uis ल्हान वयेंतूनच तज स्वभाव मला अवडल॑ नाही. थोर होताना शुद्ध अवघड होईल म्हणून मी म्हणट्लों. तसच झाल॑.

तस-अस adv  some how. by hook or by crook. कसतरीन. कसकी. अस-तस. uis तला वाचणेंत ध्यानेच नाही तरीन, तस-अस परीक्षा जिंतूनटाकला. अत्ता पुढे काय कराला जातो की. 

तस-तस adv  in such and such (different) manners/ways etc. अमुक-अमुक विधांत. uis हे काम तस-तस कराम म्हणून मला सांगून देलतर, पुढे मी ते काम अपाप करींगतों.

तसल॑ adj  of that kind. of that type, sort or manner. तसलते. तसलच. ते मादरीच. ते प्रकाराच. ते रीतीच. uis ते दुकानांत अम्ही पाह्यलते दोन विध तांदूळांत पन्नास रुपेच तांदूळ बर॑ होत नाही. तसल॑ तांदूळ अण्की इथपर घे नोको.

तसेच conj  a conjunction indicating "and". अणी. अण्कीं. अण्खीं. uis (1) तपालांत आज मला दोन कागदीन तसेच, एक पार्सलीन मिळ्ल॑. (2) कापडाच दुकान अम्च घराच जवळेच आहे. बाहेर/बाह्येर उत्तरून तसेच डावीकडे गेलतर पुरे, समोर/सोमोर दिसेल.

तहशील n  sub-division of a District. तहसील. जिल्लाच एक भाग. uis एक एक जिल्लांतीन तीन चार तहशील असेल.

तहशीलदार n  official in charge of a thahshil. तहसीलदार. तहसीलाच अधिकारी. uis भरून लांच घेतो म्हणून अम्च तहशीलदाराला बदलिवूनटाकले, पण नव॑ म्हणून आलतो तजपक्षा भरून लांच घेतो म्हणून ऐकलों.

तहसील n  sub-division of a District. तहशील. जिल्लाच एक भाग. uis भारत देशांत सहा हज़ार/हदाराच व॓र तहसील आहे. 

तहसीलदार n  official in charge of a thahshil. तहशीलदार. तहसीलाच अधिकारि. uis तहसीलदाराच काम करून देतों म्हणून एक दलाल मझ मित्राच लोंकाकडून दहा लाख रुपे घेऊन नंतर पुढे काहीन करला नाही.

तंजावूर मराठी n  a dialect of Marathi spoken by the descendents of Maharashtrians who had migrated to Southern parts of India, in particular to Thanjavur. महाराष्ट्रांतून दक्षिणाकडे, प्रत्येक होऊन, तंजावूराला प्रवास करून तिकडेच स्थिर वास केलते लोकांच भाषा. हे मराठीच एक उप-भाषा/बोली-भाषा आहे.  
      
तंटा n  mischief. trouble. उपद्रव. नच्च. uis मला तू सहाय करणे नोको, तंटा करनास्क असलतर पुरे.

तंत्र n  technique. कराच विध. uis अमेरिकाच रैट भाऊंडे हेनीच विमान उडिवाच तंत्र पह्यिल-पह्यिल॑ करून दाखिवलते.    

तंपूरा n  a stringed musical instrument. तंबूरा. तांताच एक रीताच संगीताच वाद्य ; तंबोरा/तंबुरी/तंबुरा in sm. 

तंबडकापूस n  hibiscus flower. जास्वंद. जस्वंदीच फूल. रक्तकापूस. दासवाला (Kannada). uis कर्णाटकाच समुद्रकांठ प्रदेशांतीन केरळ राज्यांतीन तंबड्कापूसाच झाड अपाप वाढत अस्त.
   
तंबड॑ n  red. एक रंग ; तांबडा in sm. uis दक्षिण अमेरिका भूखंडांत पह्यिलंदा टोमॅटो पंडूला पाह्यलते यूरोपाच लोके तज तंबड रंग पाव्हून ते  एक विष फळ म्हणींगट्ले.

तंबाकू n  tobacco. पोगे एले (Tamil) ; तंबाखू/तंबाकू in sm. uis तंबाकू वापरलतर कॅन्सर येईल म्हणून सूचना प्रती सिगरेट डब्बांतीन असाम म्हणून सरकाराच नियम आहे. 

तंबीठ n  a preparation made of flours, sugar and spices used in pooja as base for wicks. पूजाच वात/बत्ति ठिवाला पीठ, साखरे अणी वेळा असलते घालून कराच पदार्थ ; तपीठ in sm. uis नागपंचमी सणाच दिवसी नागराजाच पूजाला तंबीठाच आरती करणे आहे.

तंबूरा n  a stringed musical instrument. तंपूरा. तांताच एक रीताच संगीताच वाद्य ; तंबोरा/तंबुरी/तंबुरा in sm. 

ताक n  buttermilk. दहींत पाणी घालून/मिळिवून कराच एक नित्तळ पानीय. uis उन्हाळाच दिवसी ताकांत हिंग घालून नाही, करेपाक कापून घालून पीयाला बेष असेल. 
 
ताकत n  strength to resist. विरोध कराच शक्ति. uis 1962 च भारत-चीन युद्धांत भारताला पराजय ओपींगाच अवस्था झाल॑. हेला मुख्य कारण काय होत॑ म्हणजे अम्च सेनाला बरोरल॑ आयुध की, अभ्यास की होत नाही अणी तजमळे बरोरल॑ ताकत पणीन होत नाही, हेच.

ताकपाणी n  buttermilk. दहींत पाणी घालून/मिळिवून कराच एक नित्तळ पानीय. uis ताकपाणींत लिंबू अणी अले घालून पीयाला बेष असेल.     

ताकपाणी fig  a poor man's subsistence food. गरीबांच उपजीवनाच जेवण. uis रिटैर होताना येयाच पैसे पूराईं व्यापारांत घालून नष्ट झालतर, नंतर ताकपाणीला वाट नाहीस्क होऊन जाईल.

ताकपाणी fig  a very simple meal. एक फार साधारण जेवण. uis तुम्ही गांवांत राहजोरी अम्च घरांत जेवाला येऊया. प्रमाद होऊन काहीं मिळना तरीन ताकपाणी कंडिप होऊन मिळेल. 

ताजा adj  fresh. नव॑. uis ताजा समाचार ऐकाम/ऐकांव म्हणजे टी. वी. काहीं पाहणे/पाह्णे नोको, अम्च शेदारीकडे विचारलतर पुरे, तोंड झांकनास्क एका मागे एक समाचार सांगेत असेल !  

ताट n  dining plate. जेवाच ताट. uis घरांत जेवताना ताटांत जेवतों तरीन, बाह्येर/बाहेर कोठतरीन जेवताना केळीच पानांत जेवालाच मला अवडेल.

ताट n  plate. ताट. uis कढिवलते पाणीच पात्र ताटांत झांकून ठिवल नाहीतर, तजांत काय तरीन पडूया. 

ताड n  the palmyra tree. ताडाच झाड. ताडीच झाड. uis पाऊस उणे पडाच ठिकाणी नारळीच झाडापक्षा ताडाच झाड जास्ती असेल.  

ताडपत्र n  palmyra leaf used for writing. ताळिपत्र. लिव्हाला/लिवाला उपयोग कराच ताडाच पान. uis ताडपत्रांत लिव्हलते/लिवलते जुने जुने ग्रंथ अग्गीन तंबड॑ कापडांत गुंडाळून ठिवलतर किडाच उपद्रव नाहीस्क असेल. Note. In earlier times ताडपत्र was used extensively for writing with a metal stylus. 
  
ताडी n  toddy. an intoxicating drink made from extract of palmyra tree. ताडांतून केलते नशाच दारू. uis प्रति वर्षीन ताडीच व्यापार कराला म्हणून कॉन्ट्राक्टर लोकांस द्याच अनुमतींतून सरकार कोटान-कोटी रुपे संपादन करतात अणी तजमळे ताडी विरुद्ध नियम कद्दीन आणिवनात म्हणून लोकांस कळेल. 

ताडीच झाड n  palmyra tree. पनै-मरम (Tamil). uis (1) ताडीच झाडांतून "टॉडी" काढाच विना तजांतून नुंग पणीन मिळते. (2) ताडीच झाडाच खाले बसून दूध पीलतर लोके पातेदेनाते. "टॉडी" पीतो म्हणूनेच सांगतील. Note. टॉडी is the anglicized form of ताडी.    

तातोबा n  grandfather. आजोबा. आजा. uis मझ नातूंडे मला आजोबा म्हणून बलावाच ऐकून अम्च शेदारी राहणार अय्यंगारीच घरच लेंकरे त्यंच आजाला तातोबा म्हणून बलावाला आरंभ केले. Note. adaptation akin to आजोबा, from the Tamil word ताता (grandfather).

तात्पर्य n  inclination or interest or desire (to do a thing). (कायतरीन कराला असाच) उद्देश. uis गाम गाम हिंडून व्यापाराच काम कराला तला तात्पर्य असलतर मात्र ते कामाला मिळाला सांग. हिंडाच कामाला तात्पर्य नाहीतर उगे असणेच चोखो/चोखट.  
   
तान n thirst. जीव्हाळा. पाणीच दाह ; तहान/तान्ह in sm. uis पाणी मिळनाते समय तान वाटनास्क असाला चाहा/चाय पीलतर थोडक आश्वास येईल.

ताप n  heat. उष्ण. ऊन. uis ग्रीष्म ऋतूच वेळी डेल्हींत सोसाला होईनाते एवढ॑ ताप असेल. 

ताप n  temperature on account of fever. जेरामळे येयाच आंगाच ताप. uis लेंकरांस जेर/जर/ज्वर आलतर ताप उदंड जास्ती दाखिवल॑ तरीन ते लोक्कुर/लोकुर उत्तरून पणीन जाईल.

तापडणे vt  to pat gently. थापडणे. थापटणे. तळहात हळ्ळु लागिवणे ; थापडणे/थापटणे in sm. uis पळा-पळी खेळत अस्ताना खाले पडून घाव लागींगून मझ नातू रडत मझकडे आला. नंखर तापडून देलाव॑र रडणे राह्त केला.

तापणे vi  to become very hot. भयंकर ऊन होणे. uis हे वर्षी बंगळूरांत भयंकर ऊन होत॑. तापणे सोसाला होईनास्क पहिलंदा/पह्यिलंदा आम्ही निजाच खोलींत ए.सी. घेऊन घाट्लों.   

तापत्रय n  sufferings. कष्टि भोगणे. uis त्यांस उदंड/उजंड वर्षापसून डयबीटिस आहेतरीन वेळा-वेळी औषध/ओखद घ्या करतां अत्ता पतोरी काहीं तापत्रय झालनाही. Note. the literal meaning being, "three types of ताप or sufferings". तीन प्रकारच ताप म्हणजे देहाच, देवाला संबंध झालते अणी भौतिक (physical). 

तापा n  latch. bolt. कोंडि. कडी. uis रात्री निजाच वेळी अग्गि कवाडालीन बरोर तापा घालाच काम मझ लोंकाच.  Note. from Tamil.

तापिवणे vt  to heat. ऊन करणे ; तापवणे in sm. uis पाणी बेष तापिवून हिंस पाणी घालून विसण करून आंघोळी करलतर बेष असेल.

ताम्र n  copper. तांबे. तांबूसा. uis ताम्राच लोटांत पाणी पीलतर आंगाला चोखोट/चोखट म्हणतात.

तार n  Metal wire. तांत. तंती (Tamil). uis अमेरिकांत राह्याच/राहाच लोंकाच घराला अम्ही गेलतम्हा कापड वाळिवाला मी एक तार तज घराच मागे बांधलों अमेरिकांत कोणीन अस करनात म्हणून तो ते काढूनटाकला.  

तार n  telegram. तांत. तंती (Tamil). uis जुने काळांत अग्गीन घरांत एक तार आल म्हणजे ते वाचजोरी अग्गिदनांसीन मनांत बडबड होत असेल.  

तारतम्य n evaluating on a comparable scale. discernment. एकाच बरोर अण्कि एकाच गुण तोलून पाह्णे/पाहणे. uis मध्व संप्रदायांत तारतम्य सिद्धांताला भरून प्रामाण्य आहे. हे तारतम्या प्रकार नारायणाच नंतर लक्षीदेवी, तज नंतर, मुख्यप्राणा अस आहे.

तारीख n  date. दिवसाच संख्या. uis हे महिना पांच तारीखला मझ चुलत भाऊच लोंकाच वराड आहे.  

तारुण्य n  youth. यौवन. uis पोरींस जिंनास्टिक्सांत जिंताला किती तारुण्यविणी असतातकी तेवढीन चोखोट/चोखट. 

ताला n  lock. किलुप. uis ल्हान असताना मझ बहिणी/बहीण तिज ओंठांत किलुप चेंपून घालूनटाकली. नंतर एक डॉक्टराचकडे जाऊन ते काढलों.

तालुका n  sub-division of a District. जिल्लाच एक भाग. तालूक. uis साधारण होऊन एक जिल्लांत चार पांच तालुका तरीन अस्त.

तालूक n  sub-division of a District. जिल्लाच एक भाग. तालुका. 

ताळ n  musical beat or time. संगीताच ताळ ; ताल in sm. uis संगीत कचेरीच मध घटम वाजिवत अस्ताना तज बरोर भरून दन ताळ घालाच पावुया/पाह्वूया.  

ताळ n  clap. तळहात मारून शब्द करणे. टाळी ; टाळी in sm. uis विंबिळडन टेन्निस खेळ होत अस्ताना कोणतरीन एक खेळणार एक पोइंट जिंतलतर समेच खेळ पाह्त असणार अग्गीन ताळ बडिवाच ऐकूया.  

ताळ घालणे fig  sycophancy. मस्का बडिवणे. uis तो तज व॑रला आफीसराच ताळ घालणार मनुष. तज स्वंत विचार असलतरपणीन तला सांगाला धैर्य असना.

ताळमेळ n  music played in synchrony with an event. एक कार्यक्रमाला अनुसार वाजिवाच वाद्य. uis अम्च कॉलेजांत हे वर्ष झालते वार्षिक उत्सवांत आधुनिक वाद्य-गोष्टी अणी कर्नाटक संगीताच वाद्य-गोष्टी हे दोनीन मिळिवून करलते ताळमेळ फार बेष होत॑.  

ताळिपत्र n  palmyra leaf used for writing. ताळी. ताडपत्र. लिव्हाला/लिवाला उपयोग कराच ताडाच पान. uis अत्ता पणीन भारतांत भरून ठिकाणी ताळिपत्रांत लिव्हलते जुने जुने ग्रंथ पाह्याला मिळेल. 

ताळंपू  n  screw pine flower. केवडा. केवडाच फुल. केतकी फूल. uis ताळंपूच झाड असाच ठिकाणि सर्प/सरप येईल म्हणून सांगणे आहे. Note. from Tamil. 
 
तावणे vt  to heat (a liquid). (द्रव्य) ऊन करणे. पोळिवणे. uis दूध तावाला ठिवूनटाकून इकडे तिकडे वेगळ॑ कायकी करत असताना ते व॑र उतून येऊन चूलाच विस्तू भिजूनगेल.

तासणी n  an adze. a filing or sawing instrument, used by carpenters etc. सुतार लोक उपयोग कराच एक उपकरण. uis थोडक दिवसाच पुढे घरांत काय की कांम होत म्हणून मी अर्बन कंपनीला त्यंच ॲप वाटे बलावलों. समेच येऊन काम संपिवून गेले. पण तेनी गेलांपिरी पाहताना त्यंच एक तसणी सोडूनटाकलसाच पाह्यलों.    

तासणे vt  to file cut or sharpen with a serrated blade, adze etc. तासणी वाटे नीट करणे. uis मोंड झालते उपकरणा वाटे तासण कराला होईना म्हणून मे एक नव तासणी घेट्लों.  

तांडव n  cosmic dance of Siva. शिवाच नृत्य. uis शिवाच तांडव नृत्य हे ब्रह्मांडाच उत्भव अणी नाश हे दाखिवाच म्हणून सांगतात.  

तांडव n  a robust dance, normally done by male dancers. साधारण होऊन दाद्ग्ये कराच एक जोर नृत्य. 
     
तांत n  metal wire. तंती (Tamil). कांब ; तांत/तंतू in sm. uis अमेरिकाला गेलांतरून मी मझ लोंकाच घराच मागेपटीस कापड वाळिवाला म्झणून दोन तांत बांधलों.

तांत n  telegram. तंती (Tamil). uis वराडालकी  मुंजालकी जायाला होईनातर, जुने काळांत लोके तांत पाठिवून त्यंच आशीर्वाद देत होते. पण, हे काळांत ई-मेल की वाट्साप की पाठिवून विषय संपिवूनटाकतात.
    
तांत्रिक adj  relating to thanthra. तंत्राला संबंध झालते. uis यजुरवेदांत तांत्रिकाच विषीन विशद होऊन देलाहे. 

तांत्रिक adj  occult. मंत्रतंत्र. uis अर्धरात्री स्मशानांत बसून तांत्रिक शास्त्र अभ्यास करलतर शक्ती वाढल म्हणतात.   

तांत्रिक adj  a person practicing the occult. मंत्रतंत्र अभ्यास करणार. uis हे जवळ न्यूस-पेपरांत वाचलों, एक चुम्मण पोरीच मृत्यूच कारण एक तांत्रिक होता म्हणून. निधि हुडकाला मंत्र-तंत्र प्रयोग करून नरबली द्या करतां ते पोरीला वध करला म्हण॑. 
  
तांदूळ n  rice. साळीच दाणा. uis कस भारताच उत्तर भागांत गहूं जास्ती खातातकी, तस दक्षिणांतीन पूर्वांतीन असणार तांदूळ जास्ती वापरतात. 

तांबे n  copper. ताम्र. तांबूसा. uis तांबे, सोन॑ अणी रुपे हे तीनीन रसायनशास्त्रांत एकच वर्गाच आहे.  

तांबे n a round and short water jug. चोंबु (Tamil). पाणी काढाला/ठिवाला उपयोग कराच एक ल्हान पात्र ; तांब्या in sm. uis अगाऊच काळांत नाहणींत आंघोळी कराला तांबे वापरत होत, पण हे काळांत प्ळास्टिकाच मग वापरतात॑.

तांबूल n  betel leaves, betelnuts, lime and coconuts offered to guests at functions. सणाच दिवस आलते लोकांस विडाच पान, सुपारी, चुन्ना/चुणा, नारळे हे तेवढीन द्याच पद्धत. uis कोणाचतरीन वराडाला गेलतर पर्तून येताना तांबूल काढींगनास्क येताने म्हण्तील.

तांबूल n  betel leaf with betelnut and lime ready for chewing. विडा. बीडा. uis दिवसोडी तांबूल खायाच दंडक असणारांच दांत काळ॑ अस्त अणी काय करलतरीन ते डाग जाईना.

तांबूसा n  copper. तांम्र. तांबे. uis तांबूसाच लोटांत पाणी पीलतर आंगाला फार चोखोट/चोखट म्हणतात. 

तिकडच adj  relating to that place. ते ठिकाणाच॑. ते ठामाच॑. तथेच॑. तत्तच॑. uis हे जवळ अम्ही बालीला जाऊन आलों. तिकडच॑ हिंदू धर्मांत॑ विग्रहपूजा नाही म्हणून पाव्हून मला आश्चर्य वाटले.  

तिकडून adv  from there. तिकडसून. ते ठिकाणांतून. ते ठामांतून. तत्सून. तथून. तेथून. uis अम्ही बालीला जाताना कोलालंपूरला जाऊन, तिकडून बालीला गेलों. 

तिकडे adv  there. ते ठाम. ते ठांव. तथे. तेथे. तत्ते ; तिथे in sm. uis मरुभूमींत राह्यणार/राहणार लोके पाणीच खर्च फार श्रद्धांत कराम, कां म्हणजे, तिकडे पाऊस उदंड उणे पडते म्हणून. 

तिकडे-तिकडे adv  in all those places respectively. तथे-तथे. तत्ते-तत्ते. तेथे-तेथे. अमुक-अमुक ठामी. uis मरुभूमींत तिकडे-तिकडे पाणीच व्यवस्था अस्त. तसलते ठिकाणाला "ओआसिस" म्हणतात.
 
तिक्कट adj  spicy hot. तिखट. एक रीतीच रूच. uis मिर्शिंगा अणी मिरे हे दोनीन तिक्कट असलतरीन ते दोनाचीन तिक्कट वेगळ॑ वेगळ॑ अस्त. Note. better तिखट. 
 
तिक्कटचट्णी n  a spicy hot powdered preparation. एक तिखट तोंडलावण/तोळ्लावण. तिखटचट्णी. तिक्कटमीठ. तिखटमीठ. uis तिक्कटचट्णी, डांगर, अंबटभाजी असलते पदार्थ अग्गीन सगळ॑ दक्षिणी मराठी लोकांच घरांतीन सर्वसाधारण होऊन करणे आहे. 

तिक्कटमीठ n  a spicy hot powdered preparation. एक तिखट तोंडलावण/तोळ्लावण. तिखटचट्णि. तिक्कटचट्णि. तिखटमीठ. uis वाळलते खोब्रेंत करलते तिक्कटमीठ हिरव॑/हिर्व नारळींत करलते तिक्कटमीठाच बरीस जास्ती दिवस हाळ होईनास्क राह्यील/राहील. 

तिखट adj  spicy hot. तिक्कट. एक रीतीच रूच. uis हे वर्षी अम्ही घाट्लते आवक्काय लोण्च गेलंदा घाट्लतेच बरीस तिखट जाति होवूनगेल॑. 

तिखटचट्णी n  a spicy hot powdered preparation. एक तिखट तोंडलावण/तोळ्लावण. तिक्कटचट्णी. तिक्कटमीठ. तिखटमीठ. 

तिखटमीठ n  a spicy hot powdered preparation. एक तिखट तोंडलावण/तोळ्लावण. तिखटचट्णि. तिक्कटचट्णि. तिक्कटमीठ. 

तिज pron  her's. ते बायकोच. ते पोरीच ; तिचा in sm. uis तिज ते पुस्तक वाचूनटाकून मला देतोसका ?  

तिज-तिज pron  belonging to each one of her respectively (used in second person singular). अमुक अमुक स्त्रींच/पोरींच. uis ते पोरींस कायतरीन कष्ट असलतर, ते कस समाळाम म्हणून सांगून देशीलका ? तज नंतर तिज-तिज प्रश्न तिन-तिन समाळींगाम.

तिडकणे vi  to have a sharp shooting pain. तीव्र वेदना होणे. रुचाच सूळ होणे. uis तिडकाच दांतसूळामळे मला काल रात्री पूरा झोंप आल नाही.  

तिडका n  a sharp shooting pain. तीव्र वेदना. रुचाच सूळ ; तिडक/तिडकी in sm. uis संपाकाला भाजीपाला चिरत असताना चूप चुरी लागून झालते तिडका अण्कीन गेल नाही.

तिथी n  a day in the calender. पंचांगांत एक दिवस.
 
तिथी n  a day on which death ceremony is performed. श्राद्धाच दिवस. uis तिथी कराच दिवसाच पुढल॑ रात्री अणी तद्दीच रात्री, हे दोन वेळीन नुस्त पल्हार खातों. 

तिन pron  she (third person singular pronoun). एक बायकोला नाही, एक पोरीला उद्देश करून सांगाच गोष्ट (तीसरपुरुष एकवचन सर्वनाम).
; ती in sm. uis तिन काय सांगिट्ली की, ते मला कळ्ना. मला कळ्ळतेस्क मी करत जातों.

तिप्पट adj  three times. treble. tripple. three fold. तीन गुणा. uis सरकाराच नव नियम प्रकार बाह्येरच/बाहेरच देशांतून आणिवाच कित्येक साधनाला कर तिप्पट गुणा वाढाला जाते म्हणून ऐकलों.  
 
तिरस्कार n  to refute disdainfully. तुच्छपणांत असंम्मत करणे. तुच्छपणांत विरोध करणे. uis कश्मीरांत होत असाच गलाटा तिकडल॑ लोकांच स्वातंत्र्य समर म्हणून पाकिस्थान सांगाच अम्च सरकार तिरस्कार करलते बरोरेच. 

तिरुपति क्षवर fig  a figure of speech meaning a job abandoned at half-way stage. अर्ध करून सोडलते काम. अर्धगच्चाच काम. अर्धम-पर्दाच काम. अर्धवटाच काम. uis तो केम्हाहीं असेच. तला कायतरीन एक काम देलतर तिरुपति क्षवर करून पळून जाईल. नंतर वेगळ॑ कोणाल तरीन बलावून ते काम पूरा करिवामते पडते. 

तिरंगा n  triclour of India's national flag. भारताच गुढीच/झंडाच तीन रंग. uis भारताच तिरंगाला अपमान करणारांस बरोरल शिक्षा द्याच विषीन सरकाराच नियम आहे. 

तिलक n  a mark made on the forehead with sindhoor etc. कपाळांत लावाच कुंकू. टिका ; टिलक in sm. uis बायका पोरी कपाळांत तिलक लावनास्क असताने म्हणून अम्च संप्रदायांत आहे तरीन अत्ताच कळांत भरून पोरीनी ते परवा करनाक हिंडत आहेत.
  
तिसर adj  third. दुसरेच नंतरल क्रम ; तिसरा in sm. uis अत्ता तीघदने खोलीच आंत वेघून आलेकी, त्यांत दोघदने कोण म्हणून मला कळल॑, पण तिसर मनुष कोण म्हणून कळत नाही.

तिंडाट्टम fig  vexatious and jittery situation. तरपडाच अवस्था/स्थिति. uis एक चोखोट/चोखट उद्योगांत होतते ते मनुष आवश्य नाहीस्क ते काम सोडूनटाकला. अत्ता उपजीवनाला थोर तिंडाट्टम झालाहे. Note. from Tamil.
  
तीघे adj  three people. तीन दन (दण). तीन जन (जण) ; तिघे in sm. uis दुपारच जेवणेला होटलांत वेघताना उदंड वेळ झाल्होत, पण अम्ही तीघेच म्हणून पाव्हून/पावून होटलवाले जेवण वाढाला सम्मत करले. Note. the terms दोघे, तीघे (and not दोन, तीन) are invariably to be used when referring to people

तीन adj  three. दोनाच नंतरल संख्या. uis कुंतीला तीन लेंकरे होते अणी माद्रीला दोन लेंकरे होते.

तीर्थ n  holy water used in puja. देवाला अभिषेक केलते पाणी. शुद्धोदक. तीर्थोदक. गंधोदक. uis केसर, पचकर्पूर/पचकापूर, तुलसीदळ, चंदन(गंध), दशांग हे अग्गीन घालून कराच अभिषेकाच तीर्थाला चोखोट/चोखट वास असेल.

तीर्थ n  holy river. holy water body. पुण्य नदी. पुष्करणी. uis माघ महिनेच माघ-स्नान कोण्त तीर्थांतीन करूया. कारण, ते दिवसी/तद्दी पुण्य स्थलांत असाच सगळ॑ स्नान कराच स्थलांतीन गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी अणी कावेरी हे नदींच आवाहन अस्त.     

तीर्थप्रसाद n  consecrated food, along with तीर्थ given to devotees in a मठ/Mutt/Matha or temple. तीर्थाच बरोर भक्त लोकांस मठांत की  देऊळांत की मिळाच नेवेद्य करलते जेवणेच प्रसाद. uis बंगळूरांत पेजावरश्रींच पूर्णप्रज्ञ विद्यापीठांत कित्ती भक्तजन आले तरीन त्यांस अग्गीन तीर्थप्रसाद मिळेल.   

तीर्थयात्रा n  pilgrimage. वेगळ॑ वेगळ॑ देवस्थान दर्शन कराला निघाच यात्रा. तीर्थाडन. uis हिमालय पर्वत वलांडून जामते कैलास-मानसरोवर तीर्थयात्रा करणार अग्गिदनीन केंद्र सरकाराच अनुमती घेऊनच सराम/सरांव, कां म्हणजे ते पुण्यक्षेत्र चैनांत आहे.  

तीर्थस्नान n Hindu religious ritual of bathing in a sacred river or a temple tank. हिंदु संप्रदाया प्रकार एक पुण्यनदींत नाही, देऊळाच पुष्करणींत कराच स्नान. uis गंगा स्नानाच पक्षा थोर तीर्थस्नान भारतांत वेगळ॑ कोण्तीन नाही म्हणून विश्वास करणार भरूनदन आहेत. 

तीर्थक्षेत्र n  temple visited during a pilgrimage. तीर्थयात्राच वेळी दर्शन कराच देऊळ. पुण्यक्षेत्र. uis अम्च देशांत विनोदयात्रा कराच बरोर तीर्थक्षेत्र पणीन दर्शन कराच लोके भरून आहेत. 

तीर्थंकरा n  the 24 revered ascetics in Jainism. जीन (जैन) धर्माच 24 मुख्य मुनी लोक॑. uis वर्धमान महावीर जीन धर्म परंपरानुसार चोवीसवां (24 th) तीर्थंकरा होते.      

तीर्थाडन n  pilgrimage. तीर्थयात्रा ; तीर्थाटन in sm. uis जुने काळांत बद्रीकाष्रमाच तीर्थाडनाला जाणे म्हणजे ते एक थोर विषय होत॑. तीर्थाडन यात्राच नंतर पर्तून येतील का म्हणून कोणालीन सांगाला होईनास्क होत॑.  

तीर्थोदक n  holy water used for Maha Abhisheka. गंधोदक. देवाला महा अभिषेक कराच पाणी. तीर्थ. uis देव पूजाच वेळी महा अभिषेकाला म्हणून तय्यार/तयार कराच तीर्थोदकांत केसर/कुंकुमपू, पचकर्पूर/पचकापूर, तुलसीदळ, चंदन(गंध) हे अग्गीन घालणे आहे. Note. while the निर्माल्य तीर्थ given first (once) to the devotee is to be spinkled over head, the तीर्थोदक given three times thereafter is to be consumed. 

तीळ n  sesame. संपाकाला उपयोग कराच एक बीं. uis तीळांतून काढाच तेलाला दक्षिणी मराठींत चोखोट-तेल म्हणून सांगतों. Note. the word चोखट तेल appears to be a direct transliteration from the Tamil word नल्लेण्णै, meaning "good-oil". The Tamil word itself appears to be morphed from एळ्ळेण्णै, "एळ्ळु" in Tamil meaning "sesame".  

तीळगूळ n  a mixture of sesame and jaggery bits exchanged between families/individuals during Sankranthi festival. तीळीन गूळीन मिळिवून मकर-संक्रांतीच दिवस द्याच पदार्थ. uis मकर संक्रांतीच सणाच दिवसी लोकांस मिळताना "तीळगूळ घ्या, गोड गोड बोला" अस सांगून तीळ-गूळाच मिश्रण देतों.  

तीव्र adj  profound. intense. गाढ. अगाध. मुम्मर. 

तीस adj  thirty. एकोणतीसाच नंतरल संख्या. uis तीस वर्षाच पुढे तीन लाखाला मिळत होतते धर अग्गीन अत्ता एक कोटी देलतरीन मिळणे कष्ट झालाहे. 

तुकडा n  a piece of a sweetmeat. टुकडा. गुळ्चीट पदार्थाच एक चूर. uis दीपावळी सणाच वेळी मैसूरपाक, बर्फी, दूधपेडा असलते तुकडाहीं खारासेव (कारासेव), मिक्स्चर वगैरा पदार्थीन अम्च अम्मा घरांत करत होते. पण हे काळाच नव॑ पिढीच लोके ते अग्गीन दुकानांतून घेऊन खातात.  

तुच्छ adj  contemptible. एळक्काराला लायक झालते. uis येतां येतां भारत अणी चैनाच मध्यल व्यवहार फार मोस होत आहे. उदंड तुच्छ रीतींत चैना भारताकडे वागाच हेला एक मुख्य कारण आहे. Note. एळक्कारम in Tamil means 'contempt' , 'ridicule'.  

तुझ pron. your's. तुला संबंध असाच ; तुझा in sm. uis चार दिवसा पसून हे पुस्तक म्झ घरांत पडलाहे. उद्या येताना पाह, तुझ म्हणजे काढींगून जा. 

तुटक॑ adj  broken. मोडक॑ ; तुटका in sm. uis हे जवळ अम्ही बालीला गेलतम्हा मझ नातूच अर्सा पह्यिल/पयिल दिवसेच तुटल॑ अणी कसकी दोरानीशी बांधून एकमादरी बरोर करींगट्ला. नंतर सात दिवसीन, म्हणजे बंगळूरला पर्तून येयापर्यंतीन ते तुटक॑ अर्सा घालींगत होता.  

तुटणे vi  to snap. मोडून छेद होणे. uis कष्मीरांत गुलमार्गांत एक केबल-काराच तांत तुटून, ते खाले पडून एक कुटुंबाच चारदनीन मरूनगेलते समाचार पेपरांत वाचलों. Note. typically a thread etc. 

तुटणे vi  to break into peices. मोडून छिन्नाभिन्न होणे. uis जपान राज्याच पुरातन मिंग राजवंशाच काळाच एक पोर्सलीन जाडी मझकडे आहे. ते खाले पडून तुटताने म्हणून अर्सांत करलते "षो-केसांत" दत्तन करून ठिवलोहें.    

तुडिवणे vt  to kick. पांयें वाटि बडिवणे. लाता मारणे. पांयें लागिवणे ; तुडविणे in sm. uis बीदींत जात होतते कोणकी एक पोर परीटाच गाढवाच मागे जाऊन तला सळिवत होता. दिडीरशी ते गाढव तज मागल॑ दोन पांयेहीं उचलून तुडिवलामळे पोराच गाळाच हड तुटल॑ अणी चार दांत पणीन तुटून पडूनगेल॑.

तुडिवणे vt  to step on. पांयें ठिवणे ; तुडविणे in sm. uis भोईंत कागदाच चूर पडलसलतर ते तुडिवताने म्हणून थोरळे सांगतील, कारण ते वाग्देवीच (सरस्वतीच) तुल्य म्हणून.

तुप्पाकी n  a gun. a firearm. तोप. तोफ. uis दुसर लोक-युद्धाच वेळी ऑटोमॅटिक-तुप्पाकी नहोत॑. म्हणजे, गोळी उडिवाला एक एक दपाहीं तुप्पाकीच ट्रिगर ओढामते/होढामते होत॑. पण अत्तच ए-के 47 तुप्पाकींत एकदपा ट्रिगर ओढलतर/होढलतर शंभरों-शंभर गोळी येईल. Note. from Tamil.   

तुम्च pron  your's. तुमच॑. तुम्हाला संबंध झालते ; तुमचा in sm. uis बाह्येर/बायेर पाऊस पडत आहे. मझकडे एक छत्रीच आहे-ते-करतां तुम्ही तुम्च छत्री आणींगांत.

तुम्च-तुम्च pron  belonging to each one of you. तुम्च एकेक दनांचीन. uis तुम्च-तुम्च विषय तुम्ही-तुम्ही पाह्यींगांत, मला ते अग्गीन पाह्याला वेळ नाही. Note. plural third person (collective). 

तुम्हाला pron  for you. तुम्च उद्देशाला म्हणून असाच. uis तुम्हाला काय पह्जेकी ते तुम्हाला पूर्त आणींगांत. मला नोको. 

तुम्ही pron  you all (in a plural sense). (second person plural pronoun). अनेक लोकांला उद्देश करून बलावाच रीती (दुसरपुरुष बहुवचनाच सर्वनाम). uis तुम्ही अग्गिदनीन इकडेच असांत. मी मात्र जाऊन येतों.
 
तुम्ही pron  you (while addressing a person with respect). मर्यादान एकांस बलावाच रीत. uis तुम्हाला आंगाला होईनातर इकडेच बसांत. मी जाऊन ते आणतों. Note. singular, second person. 

तुम्ही-तुम्ही pron  each one of you. तुम्ही एकेक दनीं.  uis तुम्ही-तुम्ही तुम्च-तुम्च काम करींगांत, मला हाताचान होईना. Note. singular as well as plural, second person.

तुरंग n  jail. तुरंगा. कारागृह. कैद. दंड मिळ्लत्यांस बंध करून ठिवाच ठिकाण. बंधखाना. uis दक्षिण-आफ़्रिकाच नेता नेल्सन मॅनडेला सत्तावीस वर्ष तुरंगांत असलांपिरी बाह्येर/बाहेर येताना पूरा देशीन उत्साहाच आर्भाटांत त्यांस स्वागत करले. 

तुरंगा n  jail. तुरंग. कारागृह. दंड मिळ्लत्यांस॑ बंध करून ठिवाच ठिकाण. बंधखाना. कैद. uis अमेरिकांत तुरंगा चालिवाच काम प्रैवेट लोकांस ओपिवलाहेत म्हणून तिकडे हे एक थोर बिसिनस झालाहे. 
 
तुरीच दाळ n  a pulse. thoor dhal. तूर दाळ. uis सस्याहारी लोकांस आंगाला प्रोटीन मुख्य होऊन तुरीच दाळांतून मिळते.

तुरीचपूड n  a mix of roasted and powdered grams and dhals for eating with cooked rice. भाताचपूड. भाताच बरोर कालिवून खायाच वेगळ॑-वेगळ॑ दाळाच भाजून पूड केलते पदार्थ. uis दिवसोडी सार सांभार खाऊन, एक दिवस वेगळ॑ एक खाम म्हणून वाटताना भातांत तुरीचपूडीन तेलीन मिळिवून खाणे बर असेल.  
   
तुला pron  for you. तुझ करतां. तुला म्हणून. uis सायनकाळी/संध्याकाळी मी दुकानाला जाताना तुला कायतरीन पह्जे म्हणजे आणतों.
 
तुला n  the zodiacal sign of Libra. एक नक्षत्र राशीच नाव ; तूळ in sm. uis चित्ता (चित्रा), स्वाति अणी विशखा हे तीन नक्षत्रहीं तुला राशीला संबंध झालते नक्षत्र आहे, 

तुला n  a weighing balance. भार/वजन पाह्याच यंत्र. uis घरोघर येऊन जुने पेपर घेणारांकडे हे काळांत "डिजिटल-तुला" अस्त अणी त्यामळे बरोरल॑ वजन करतील म्हणून अम्ही म्हणींगताने, कां म्हणजे असलते तुलांत पणीन उणे वजन दाखिवास्क चोरटपण कराला होईल.   

तुलाभार n  weighing oneself or a devotee against an item offered as oblation to God. नवस करून स्वंत/एकांच भाराच तुल्य एक वस्तू देवाला अर्पणा करणे. uis गुरुवायूर श्रीक्रिष्ण क्षेत्रांत लेंकरांच तुलाभार कराला कद्दी पाव्हो भरून गुंप अस्त.

तुल्य adj  equal, comparable. सम. अग्गि विधांतीन एकसारख असाच. uis "तू मझ तुल्य" म्हणून सांगून हनुमानाला श्रीरामा भेटींगाच दृश्य अठींगट्लतर अ्म्चम्च॑ मनांत अत्यंत भक्तीच भाव उतून येते. 
 
तुळसी n  holy basil. तुलसी. एक ल्हान पवित्र झाड/झुडूप ; तुलसी/तुळस in sm. uis (1) पूजाला म्हणून तोडाच तुळसी पाणींत विसलताने, अस सांगणे आहे. (2) पवित्रता अणी भक्तीच चिन्ह म्हणून तुळसी झाडाला हंदू धर्मांत एक श्रेष्ठ स्थान आहे.

तुळसीकाष्ट n dried tulasi stem. वाळलते तुळसी पेड. uis देवपूजाला गंधोदक करताना तुळसीदळ मिळ्ळ नाहीतर तुळसीकाष्ट तरीन घालूया. 

तुळसीदळ n  tulasi leaf. तुळसीच पाला/पान. uis दिवसोडी एक दोन तुळसीदळ पाणींत घालून पीलतर आंगाला चोखो/चोखट म्हणतात.

तुळसीदळ n  shoots and two leaves immediately below it in a tulasi plant. तुळसी झाडाच नव होऊन झालते पालाईं (अंकूरीं) तज खाले असाच दोन पालाहीं. uis देवपूजाच वेळी गंधोदक-तीर्थ करताना तज बरोर एक दोन तुळसीदळ पणीन घालणे आहे.

तुळसीपूजा n  pooja  performed by ladies to tulasi. बायके तुळसीला कराच पूजा. uis दिवसोडी तुळसीपूजा कराच बायका घराला शोभा देतात.

तुळसीमणी n  beads made of dried tulasi stems. तुळसी काष्टांत केलते मणी. uis तुळसीमणीच माळ घालींगणे एक चोखोट चिन्ह म्हणून देवनिष्ठा कराच भरून दादिगे वापरतात.  

तुळसीमाला n  necklace made of tulsi beads. तुळसी मणींत केलते माळ. uis दुकानांतून तुळसीमाला घेताना बरोर पाह्यींगून घेम, कां म्हणजे, ते तुळसीमणींतून केलतेचका, नाही वेगळ॑ कोण्तकीका म्हणून सांगाला होईना.  

तू pron  you. दुसर एक व्यक्तिला एकवचनांत बलावाच रीति. uis अम्ही तिकडे जायाला जात नाही. तू पह्जेतर जा. Note. second person singular. 

तूक n  weighing. भार/वजन पाह्णे/पाहणे. तूकम घालणे. uis अम्च घरांत काल आलते जुने पेपरवला बरोर तूक घाट्लाका म्हणून मला संदेह आहे, कां म्हणजे गेल महिना तेवढेच पेपर बारा किलो होत, पण यंदा दहा किलोच होत.

तूकम n  weight. वजन. भार. uis  घरांत येऊन जुने पेपर घेणार लोकांकडे वागताना अम्ही दत्तन/जत्तन असाम. कां म्हणजे, तूकम करताना एमारिवाला पाह्तील. Note. from Tamil. 

तूकम-घालणे vt  to weigh. भार/वजन पाह्णे/पाहणे. Note. from Tamil.

तूकम घालणे fig  to assess or to seize up (a person etc.). (एकाला) इषोबाच डोळेवाटी पाह्णे/पाहणे. एकाला पाव्हून तज स्वभाव इषोब करणे. uis अम्च ऑफीसाला नव होऊन आलते अधिकारी अग्गिदनासीन बरोर तूकम घालून पाह्यल/पायल नंतरेच कायतरीन जवाबदारी त्यांस देईल म्हणून वाटते. Note. from Tamil. 

तूप n  ghee. clarrified butter. विघरिवून कढिवलते लोणि. uis साराला तूपाच फोड्णी घाट्लतर घम्मशी (खम्मशी) वास येईल॑.

तूपकेळ n  guava fruit. पेरु. बेरू. जाम. जांब. uis दक्षिणी मराठीच कित्येक लोके पेरूला तूपकेळ म्हण्तात, पण अण्की कित्येकदन सीताफळाला तूपकेळ म्हणतात. 

तूपकेळ n  custard apple. सीताफळ. uis तूपकेळ म्हणजे पेरूकी सीतफळकी, काय असलतरीन खायाला बेष गुळ्चीट अस्त ! 

तूर दाळ n  a pulse. thoor dhal. तुरीच दाळ. uis दोन वर्षाच पुढे किलोला पन्नास रुपे होतते तूर दाळ अत्ता ऐंशी रुपेच व॑र विकत आहे.

तृण n  grass. गवत. गौत. uis पश्चिम बंगाळाच मुख्य मंत्री ममता बनर्जी त्यंच नव पार्टी आरंभ करताना तला "तृणमूल कॉंग्रस" म्हणून नाव ठिवाला मुख्य कारण काय म्हणजे, त्यंच पार्टी साधरण लोकांच बरोर मिळून असून त्यंच कष्टाला अग्गीन समाधान द्याच उद्देश आहे म्हणून कळिवाला होत॑. Note. तृण, means grass and मूल means root 

तृण fig  next to nothing. फार थोड. अल्प. नंखर. uis कंप्यूटराच विषयीन तला एक तृण पणीन कळना तरीन फार कळ्लत्यास्क करींगतो.

तृतीया adj  third. तीनाच क्रम संख्या.

तृतीया n  third day of lunar fortnight. चांद्रमान पक्षाच तिसर दिवस. uis वैशाख महिनेच शुक्लपक्षाच तृतीया दिवसी येयाच अक्कतीजाच सणाला "अक्षय तृतीया" म्हणून पणीन सांगतात.

तृप्त adj  satisfied. satiated. contented. संतृप्त. संतुष्ट. uis पोट भरून जेऊन तृप्त होऊन बसलाहे तो अत्ता !

तृप्ती n  satisfaction. content. संतृप्त. संतोष. uis तृप्ती झाल नाहीतर अण्कीन थोड खा कां.

ते pron  that. दूर असाच एक साधनाला उद्देश करून सांगाच गोष्ट (एकवचन). uis तिकड असाच ते पुस्तक मला आणून देतोस का ? Note. applied to neuter gender, singular. 

ते pron  those. दूर असाच एकापक्षा जास्ति साधनांला उद्देश करून सांगाच गोष्ट (बहुवचन). uis मागल॑ बीदींत असाच दाळ-तांदूळ दुकानला पाष्टे मी गेलसतम्हा चार किलो तांदूळ, एक किलो दाळ, एक लिटर चोखो-तेल अणी शंभर ग्राम हिंग एवढ्यालीन पैसे देऊनटाकून आलों. तू अत्ता तिकड जाताना ते अग्गीन आणशीलका ? Note. applied to neuter gender, plural, along with अग्गीन/अस्कीन.

तेजस n  luster. वैभवाच प्रकाश. uis स्वामी विवेकानंदाच तोंडांतल तेजस पाह्तानाच अम्हास कळते तेनी एक महान मनुष म्हणून.

तेजस्वी adj  lustrous. वैभवाच प्रकाशाच. uis मध्वाचार्यांच चित्र पाह्तानच अम्हास कळते, तेनी एक तेजस्वी मनुष म्हणून. 

तेढा adj  crooked. वंकड. वक्र. आढा-तेढा. uis तजकडे वागताना थोड दत्तन असाम, कां म्हणजे, तज स्वभाव बर॑ नाही, तेढा मनुष तो.

ते-ते pron  each of those individual things. प्रती एकीन. uis एक-एक प्रश्नालीन तू अडव॑ येणे नोको, ते-ते विषय कसतरीन अपाप राहूनजाईल. Note. applied to neuter gender, singular and plural 

तेथे adv  there. तथे. तत्त॑. तिकडे. ते ठिकाणी. ते ठामी ; तिथे/तेथे in sm. uis टी.वींत अग्गीन पाह्ताना सगळ॑ विधांतीन चैना उदंड बेष वाढलते राज्यास्क दिसते, पण, तेथे जाऊन पाह्यलतरेच निज काय म्हणून कळेल.  

तेथे-तेथे adv  in all those places respectively. तथे-तथे. तत्त-तत्त. तिकडे-तिकडे. अमुक-अमुक ठिकाणी. uis होळी सणाच दिवसी मझ नव पंढ्र अंगींत बीदींतल॑ पोरे रंग बडिवले. घराला येऊन बेष धुवलांपिरी पणीन रंग पूरा गेल नाही, तेथे-तेथे तंबड रंग अत्ता पणीन आहे. 

तेनी pron  those people (third person plural pronoun). त्यनी. ते लोके (तीसरपुरुष बहुवचनाच सर्वनाम). (1). मझ लेंकीच बरोर तीन पोरी सिनिमाले गेले. जायाच वेळ तेनी ऑटो धरींग्यून गेले, पण वापस येताना बस्सांत आले. (2) एकच स्कूटरांत तीन पोरे सवारी करत होते म्हणून पोलीस त्यांस राहते कराला प्रयत्न करताना तेनी चुकून पळून गेले. Note. applicable to both genders of humans, gender-wise and collectively ; but not to non-humans. For non-humans (and inanimates) ते is used sigularly, plurally, both gender-wise and collectively. 

तेनी-तेनी pron  each-for-himself individually. त्यंच-त्यंच पाड. (1) मी अत्ता काहीन कराला जत नाही. तेनी-तेनी काय काय कराला जातात की कराला सोड. (2) ऐ.पी.एल. क्रिकटांत मोत्तम दहा टीम (मंडळी) आहे. त्यांत एक दोन टीमाच मॅनेजमेन्ट बदलूनगेलाहेतरीन, आरंभांत तेनी-तेनी ठिवलते नाव तसेच राहलाहे/राह्यलाहे. Note. (1) पाड in Tamil means 'unto itself'. (2) It is used in a singular sense. Where there are different groups of people, then each group is treated as an individual group.

तेपर्यंत adv  till then. ते वेळ पर्यंत. तम्हा पर्यंत. ते पतोरी. ते पावेतोरी ; तोपर्यंत in sm. uis लोकसभा एलक्षनाच वोटिंग आज संपल॑. तज परिणाम सोमवार कळेल. तेपर्यंतीन अत्तच सरकार पुन्हाहीन येईलका म्हणून सांगाला होईना. 

तेरमा n  the third day after today. आज सोडून तीन दिवस नंतरल दिवस. तेरमा दिवस. उद्या-नाही-तेरमा. तेरमाशी ; तेरवा in sm. uis भारताच प्रधान मंत्री मोदीजी आज इसरेलांत आहेत. तेरमा जर्मनींत अस्तील.

तेरमा n  the third day before today. आज सोडून तीन दिवस मागल॑ दिवस. तेरमा दिवस. काल-नाही-तेरमा. तेरमाशी ; तेरवा in sm. uis तेरमा आलते परीक्षाच रिसल्ट पाव्हून तला फार संतोष झाल, कां म्हणजे चोखोट मार्क घेऊन जिंतला म्हणून.  

तेरमाशी n  the third day after today. आज सोडून तीन दिवस नंतरल दिवस. तेरमा दिवसी. उद्या-नाही-तेरमा. तेरमा. uis उद्या तुला येऊन पाह्याला मला सौकर्य नाही, तेरमाशी आलतर घरांत असशीलका ?

तेरमाशी n  the third day before today. आज सोडून तीन दिवस मागल॑ दिवस. तेरमा दिवसी. काल-नाही-तेरमा. तेरमा. uis मी तेरमाशी तला हुडुकींगून गेलों तरीन पाह्याला झाल नाही. 

तेरा adj  thirteen. बाराच नंतरच संख्या. uis त्यंच शिष्यांच बरोर क्रिस्तू शेवटल॑ जेवणे करताना तेरा लोके होते म्हणून क्रिस्तुधर्मांत तेरा संख्याला अपशकुन म्हणून सांगतात.
 
तेरा-पेरा n  helter-skelter. disorderly. गजबिज. घंदरा-घोळा. इकडे-तिकडे. अवंदर (Kannada). uis नेसींगटलते कापड भोईवर तेरा-पेरा पडलसाच पाव्हून तज माय ते पूरा गुंडाळून व॑र काढून ठिवले.

तेरावां adj  thirteenth. तेरावां क्रमाच संख्या. uis तेरावां संख्या अपशकुनाच म्हणून साधारण होऊन होटलांत अग्गीन तेरावां संख्याच खोली अस्त नाही.

तेल n  oil. तैल. uis खायाच पदार्थ तेलांत तळाच पक्षा नुस्त भाजून खालतर आंगाला चोखोट म्हणतात.

तेलकट adj  oily. greasy. तेलाच चिकट. आवश्या पक्षा अधीक तेल असणे. uis होटेलांत भाजी, पूरी, वडे, धिरडे वगैरा अधीक तेलकट अस्त. तेलकटाच पदार्थ खालतर सुलुभांत जीर्ण होईना म्हणून वये झालते लोके अप्रूपविणीच होटलाल जायाच.
 
तेलघाणा n  oil mill. तेल काढाच यंत्र. तेलाच गिरणी. uis जुने काळांत तेल काढाला तेलघाणा अग्गीन होत तरीन, हे काळांत तसलते व्यवस्था फार अप्रूप झालाहे. तज बद्दिल थोर-थोर फाक्टरींत तेल उत्पत्ती करतात.   

तेलतवा n  frying pan. तेल तावून पदार्थ कराच भांडी. uis नोन-स्टिक तेलतवा वापराला सुलूभ अस्त तरीन आंगाला ते चोखोट नहो म्हणून सांगतात.

तेलवाला n  oilman. तेली. तेल विकणार मनुष. uis सूपर-मार्कटांत की दुकानांत की जाऊन पॅकटांत मिळाच तेल घेणेमळे हे काळांत अग्गीन घरो-घर येऊन तेल विकाच तेलवाले दिसाल पणीन मिळना. 

तेली n  oilman. तेल विकणार. तेलवाला. uis बैल बांधलते भुवरांत तेल काढून घरो-घर येऊन तेल विकाच तेलींस हे काळांत दिसाल पणीन मिळना. 

तेवढ॑ adj  that much. एक कार्य, अथवा, एक वस्तु कित्ति आहे म्हणून सांगाच॑ ; तेवढा in sm. uis अम्ही क्रिकेट मेट्च पाह्याला जायापुढ॑ स्टेडियमांत॑ फार गुंप असल॑ म्हणींगट्लों. पण, तिकड जाऊन पाह्यलावर गुंप तेवढ॑ काहीं न्होते म्हणून कळ्ल॑.

तेवढ॑ adj  so many. that many. सर्व. uis तेवढ॑दनीं तला उपदेश देल होते तरीन, तो कोणालीन सांगनास्क हे चूक काम केला.

तेवढीन adv  all that. all those. ते सग्ळीन. uis जेवून उठताना ताटांत काहीं उरिवताने, तेवढीन सावडून खाऊनटाकूनेच उठाम.

तेवीस adj  twenty-three. बावीसाच नंतरच संख्या. uis बंगळूरांत अम्ही राह्याच/राहाच गिरिनगरांतून बन्नेरघट्टा नॅशनल-पार्क तेवीस किलोमीटर दूर आहे म्हणून निघलों. पण ते तीस किलोमीटराच व॑र  आहे म्हणून जाऊन पावताना कळ्ळ॑ !

तेहतीस adj  thirty-three. बत्तीसाच नंतरच संख्या. uis बंगळूरांत अम्ही राह्याच गिरिनगरांतून बन्नेरघट्टा नॅशनल-पार्क कृत्य तेहतीस किलोमीटर दूर आहे.

तैल n  ayurvedic oil. आयुर्वेदाच तेल. uis आयुर्वेद औषधाच/ओखदाच कोण्त तैलहीं चोखट वासाच अस्त.

तैल n  oil. तेल. uis कुत्तालम, होगेनेक्कल असलते ठिकाणी आंग पूरा तैल लावींगून व॑रून पडाच नदीच पाणींत स्नान करालकी, नाही नुस्त मालीश करालकी आलते भरून लोके गुंप गुंडालींगून ओठाकलसाच पाव्हूया.     

तो pron  he (third person singular pronoun). ते मनुष.(तीसरपुरुष एकवचन सर्वनाम). uis तो मला अवमान/अपमान कराला प्रयत्न करलतर मी तला उगे सोडना.

तोट्टि n  an earthen flower-pot. ल्हान झाड-झुडूप रोवाच कुंडि. uis मला बागाच काम कराला भरून अवडल तरीन, घरांत असाच बागांत दीडशे तोट्टि आहे-ते-करतां दिवसोडी पाणी घालून घालून देव दिसूनजात मला ! Note. from Tamil. 

तोट्टि n  a masonary tub (for storing water etc.). (पाणी धरून ठिवाच) सिमेंटाच टब. uis भट्टींत बरोर तय्यार झाल नाहीते वीट अग्गीन विघरूनदे म्हणून भिंत बांधाच पुढे ईट/वीट/विटकर अग्गीन पाणी भरलते तोट्टींत बेष बुचकळून भिजिवणे आहे. Note. from Tamil. 
 
तोड n  diamond stud. कानांत घालाच वज्राच आभरण. uis "ब्ळू जॅगर" वज्रांत करलते तोड फार अप्रूप म्हणून तज मोल पणीन उदंड अस्त.

तोडणे vt  to pluck. उप्पडून/उपडून काडणे. uis गेल वार अम्च घरांतल बागांत उगलते गुलाबीच फूल पाह्याला फार बेष होत॑. पण बीदींत जात होतते कोणकी एकली मझ डोळेच समोरच ते तोडींगून गेली.

तोडणे vt  to break. मोडणे. चूर करणे. uis चोखट/चोखोट वासाच चंपकाच झाड अम्च घरांत आहे तरीन, सगळे फूलीन व॑रच फांटांत असाकरतां, फांटा तोडनास्क ते अग्गीन तोडणे नंखर प्रयासे.

तोडफोड n  demolition. मोडून विनाश करणे. uis अफघानिस्थानाच बामियानांत डोंगूरांत कोरून होतते भगवान बुद्धाच थोर विग्रह तालिबान लोके तोफनीशी (तोफ/तोप प्रयोग करून) तोडफोड करून सत्यनाश करले.  

तोड्लावणे n  side dish. तोळ्लावणे. तोंडलावणे. जेवणेला रूच द्याच पदार्थ ; तोंडीलावणे in sm. uis एकदा अम्ही कोडैकनालाला जाताना वाटेंत दिंडिगलांत एक होटलांत पाष्टेच पल्हार खाया करतां बंडी राह्ते करून उत्तरलों. तिकडे इड्ळीच बरोर खायाला नारळीच चट्णी, कांदाच चट्णी अणी मोळगापोडी-तेल अस तीन विधाच तोंड्लावणे देले. 

तोढा n  a thick pulling-rope used for lifting water from a well, canal etc. ओढा. आड, कालवा यांतून पाणी शेंदाला उपयोग कराच चरांट. uis आडांतून पाणी शेंदाला बालदीला (बादलीला) बांधलते चरांटाच तोढा खजून खजून तुटाच स्थितीला आल-ते-करतां आज संध्याकाळीच पुढेच एक नव॑ चरांट घेयींगून येम म्हणून म्हणींगटलोंहें. Note. (1) properly ओढा. 2. from ओढणे. 

तोणतोणा n  a food preparation similar to कढी, but with lots of greens in it. पालक नाही, चवळीच पाला नाही, दंडाच पाला असलते घालून कराच कढी सार्खल॑ एक कालवण. uis तोणतोणांत कित्येकदन तुरीच दाळ पणीन घालणे आहे. पण तोणतोणा वृताच संपाकाला केलतर, जिरे मिरे घालून, दाळ नाहीस्क करतील. 

तोतर adj  stammer. तोंतर. तोतरून बोलणार. बोलताना शब्द अडचण होऊन येणे. uis तोतरपण कां येते, ते राह्ते कराला उपाय कायतरीन आहे का, हे दोन प्रश्नालीन बरोरल उत्तर नाही.  

तोप n  gun. cannon. तोफ. युद्धाच एक शस्त्र. युद्धाच एक आयुध. uis बिजापूर किल्लांत असाच "मालीक-ए-मैदान" तोप भूलोकांतेच सग्ळ्यांचीन पक्षा थोर तोप म्हणून सांगतात. 
   
तोप्पे n  pot-belly. paunch. थोर झालते पोट. तोंडे (Tamil). uis थोर तोप्पे असणारांस लवून षूसाच लेस बांधाला पणीन कष्ट होईल. Note. from Tamil.

तोफ n  gun. cannon. तोप. युद्धाच एक शस्त्र. युद्धाच एक आयुध. uis दुसर लोक-युद्धांत सिंगपूराच व॑र जपानाच सेना आक्रमण करताना तिकडे होतते तोफ ब्रिटीषांस बरोर युद्धाला आणिवाला झाल नाही, कारण, ते अग्गीन स्थिर होऊन समुद्राला पाव्हून ठिवल्होते अणी जपानाच सेना मागेपटीसून आक्रमण करले, हेमळेच.      

तोरण n  festoons of mango leaves, flowers etc. hung over doors. अंबाच पान, फूल असलते अलंकाराकरतां कवाडाच व॑र लोंबून घालाच. uis गणेश उत्सवाच वेळी तोरण बांधाला म्हणून विकाच अंबाच झाडाच पान भयंकर मोल अस्त म्हणून अम्ही दोन दिवसाच पुढेच ते घेऊन ठिवणे आहे.

तोल n  weighing. weight. भार. वजन. uis अम्च घरच॑ मागे असाच भाजी-पाला दुकानांत फूलकोबी कित्येकदपा तोल करून विकतो, अणी कित्येकदपा तोल करनास्क एक-एकाला एवढ॑-एवढ॑ मोल म्हणून सांगून विकतो.  

तोलणे vt  to weigh. भार कित्ति आहे हे पाह्णे/पाहणे. वजन पाह्णे/पाहणे. uis जांभळ फळ भयंकर मोल झालाहे-ते-करतान दुकानांतून ते घेताना तोलणे बरोर करतोका म्हणून बेष पाह्यींगाम. 

तोला n  a unit of measure for weighing gold and silver. सोनेचीन रुपेचीन वजन कराच एक माप ; तोळा in sm. uis एक तोला सुमार साडे-अक्रा ग्राम वजन अस्त. 

तोळ्लावणे n  side dish. तोड्लावणे. तोंडलावणे. जेवणाला रूच द्याच पदार्थ ; तोंडीलावणे in sm. uis पाष्टे टिफिनाला पोंगलाचच॑ बरोर तोळ्लावींगाला 'सुंडेकायी' गोज्जु असलतर कित्ति रूच असेल !  Note. this DM word follows a Sanskrit rule, where, if ण्ड is followed by ल/ळ, then the ण्ड is dropped. Hence तोंड+लावणे becomes तोळ्लावणे.

तोंड n  face. मुख. uis तोंडाच सौदर्याच पक्षा मनाच सौदर्य बेष असाम.

तोंड n  mouth. मुखाच एक अवयव. uis केम्हा पाव्हो/पावो तोडांत बोट ठींगून अस्तो तो. पाह्ताना कंठाला वाटते मला.  

तोंड कवळणें fig  to put words into mouth. तोंडांत काडी ठिवणे. दुसरेंच गोष्ट अण्कि एकला सांगिट्ला म्हणून करिवणे. uis मझपाड मी उगे बसल्होतों तरीन, झालते अवघड विषयाला अग्गीन मीच कारण म्हणून अग्गिदनालीन कळिवास्क मझ तोंड कवळूनटाकला तो.   

तोंड घालणे fig  to interfere unnecessarily. आवश्य नाहीस्क मध्ये पडणे. uis बीदींत दोघदनेंच मध्ये थोर भांडा-भांडी होत असतना आवश्य नाहीस्क तज मध्ये तोंड घाट्ला अणी तलाहीं बेष मार-पीट मिळ्ळ॑.  

तोंड दाखिवणे fig  to face upto something (as if nothing has happened). धैर्यांनिशी समोर पाह्णे. uis मझ लेंकीच वराडांत "रिसप्षनाला" कोणाचकी  शिपारीशांत गाणेच कचेरी एर्पाड केलोतों. पण, कचेरी केलत्या ते कार्यक्रम चित्रवध करून मझ मान काढूनटाकला. मला नवराच घरच लोकांला तोंड दाखिवाला होईनास्क झाल॑. 

तोंड पाह्त बसणे fig  to keep staring  like a dumb loutish person at someone. ढेंगास्क दुसरेला पाह्त बसणे. uis विषय कळ्ळते मनुषास्क तो पणीन पंडितांच बरोर चर्चा कराला गेला तरीन, नंतर नुस्त तोंड पाह्त बसामते पडल॑.    
     
तोंड बांधणे fig  to gag. बोलाल सोडनास्क उगे बसिवणे. uis गेलंदा मॅनेजमेन्ट अणी स्टाफ-यूणियनाच मध्ये झालते बोलींत अम्च जेनरल-मॅनेजर सुमार एक घंटे संतत बोलत होते. कां एवढ बोललांत म्हणून मी नंतर विवारताना तेनी सांगिट्ले "यूणियन लोकांकडे चर्चा कराच विषयाच एक थोर पट्टी होत॑ अणी पह्यिले निश्चय झालते प्रकार मीटिंगाला एक घंटेच समयेच होत, अणी यूणियनाच तोंड बांधाला म्हणून मी तस संतत बोलून वेळ हाळ केलों" म्हणून सांगिट्ले.     

तोंड लांब करणे fig  to get peeved and show the displeasure. असंतोष दाखिवणे. uis अनावश्य काम करलतेला मी तला बेष शिवादेलों म्हणून अत्ता तो तोंड लांब करींगून बसलाहे.

तोंड ल्हान होणे fig  to feel peevish. to cut a sorry figure. चूक केलते करतां संकोच वाटणे. uis कोणाला पाह्यलतरीन परवा करनास्क अहंकारांत हिंडत होत-ते मनुष, अत्ता तोंड ल्हान करींगून बसलाहे. विचारताना कळ्ळ॑, तज घरांतेच कोणीन तला परवा करत नाहीत म्हणाच विषय बाह्येर सगळ्यांसीन कळूनगेल॑ त्यामळे अस झाल म्हणून.     

तोंड वंकड करणे fig  to sneer. एळक्कार दाखिवणे. उणीवता दाखिवणे. uis कोणतरीन चोखोट उद्देशांत तला काहीं उपदेश देलतर ते बरोरल रीतांत स्वीकार कराला तला कळना. तोंड वंकड करींगून बसतो.

तोंड वाळणे vi  to feel thirsty. जिव्हाळा होणे. तान होणे. दाह होणे. uis उन्हाळाच दिवसी केम्हाहीं तोंड वाळत असलतर चाय पीलतर ते उणे होईल.

तोंडलावणे n  side dish. तोळ्लावणे. तोड्लावणे. जेवणाला रूच द्याच पदार्थ ; तोंडीलावणे in sm. Note. see remark against "तोळ्लावणे / thoLlaavaNe". 

तोंडाच मांड्या fig  pointless utterances withhout any action. काम काहीन करनास्क प्रयोजन नाहीते बोली. uis थोर उदार मनाच मनुष म्हणून दाखींगाला भरून दान-धर्म कराच विषीन बोलतील तरीन लोकांस कळूनगेले, तेनी बोलाच अग्गीन नुस्त तोंडाच मांड्या म्हणून.  

तोंडाला आलते fig  unthinking utterances. योचना करनास्क कराच बोली. uis दुसरेंच मन्न दुखिवून बोलाच दंडक तला आहे म्हणून कळींगून पणीन, मी तला पाह्याला गेलतम्हा कोण्तकी एक ल्हान विषय काढींगून तोंडाला आलते बोलाच ऐकून मला फार बेजार वाटल॑. 

तोंडाला बडिवलास्क बोलणे fig  to retort rudely. अवमान/अपमान करास्क उत्तर देणे/बोलणे. uis कोण्त विषय काढल तरीन तोंडाला बडिवलास्क अवमान/अपमान करून बोलतो म्हणून तजकडे बोलाल मला थोडकपणीन अवडना. 

तोंडांत काडी ठिवणे fig  to put words into mouth. तोंड कवळणे. दुसरेंच गोष्ट अण्कि एकला सांगिट्ला म्हणून करिवणे. uis अम्ही भाऊ-भावंडेंच मध्ये आलते मनथापाला अग्गीन अम्च शेदारलाच कारण. केम्हा पाह्वो स्वंत बुद्धी नाहीते मझ थक्टा भाऊच तोंडांत काडी ठिवून ठिवूनच तस झालते. 

तोंडे  n  pot-belly. paunch. थोर झालते पोट. तोप्पे (Tamil). uis अमेरिकाला जावून उतरतांतरून तिकडल॑ कस्टंस अधिकारीच तोंडे पाव्हून मला हांसू हांसू आल॑. Note. from Tamil.  

तोंतर n  stammer. तोतर. बोलताना शब्दाच अडचण होणे ; तोतर in sm.uis तोंतरपण कां येते, ते राह्ते कराला उपाय कायतरीन आहे का, हे दोन प्रश्नालीन बरोरल उत्तर नाही.  

त्याग n  sacrifice. स्वताला नोको म्हणून सोडून देणे. uis स्वार्थ लोकांस त्याग म्हणाच गोष्टाच अर्थ कळलका म्हणून संदेह आहे मला.  

त्याग n  resignation. काम सोडणे. उद्योग सोडणे. uis लांच घेतो म्हणून आरोप आलकीनी (आलकी नाही) कामांतून त्याग देऊन पळाला पाह्यलत्याला समेच धरून किलुपांत घालूनटाकले. 

त्यागपत्र n  resignation letter. काम सोडतों म्हणून लिव्हून द्याच पत्र. uis अत्ता-जवळ॑ बहुजन-समाजवादी कक्षीच अध्यक्ष मायावती राज्यसभांत त्यागपत्र देतें म्हणून घोषणा करतानाच उपराष्ट्रपती ते स्वीकार करूनटाकले.    

त्यागी n  one who has given up worldly matters. वैरागी. uis तो अपाप त्यागी म्हणून सांगींगतो. पण निज होऊन पाह्यलतर कुप्पा कुप्पा पैसे करून तेवढीन स्विस बॅन्कांत लप्पून ठिवलाहे.

त्रयोदशी adj  thirteenth day of each lunar fortnight. एक पक्षाच तेरावां दिवस. uis हिंदू पंचांगाच प्रकार प्रति पक्षांतीन एक त्रयोदशी आहे.   

त्रास n  vexation. मनाच कष्ट. 

त्रास n  trouble. कष्ट. उपद्रव. तंटा.

त्रिकाल n  morning  noon and evening. पाष्टे, दुपार, सायंकाळी हे तीन वेळ. uis बाली देशांत सगळ॑ साळेंतीन सकल विद्यार्थीनीं त्रिकाल गायत्री मंत्र सांगणे आहे मात्र नोहो, कित्येक टी.वी. अणी रेडियो स्टेशनांत पणीन त्रिकाल गायत्री मंत्र प्रसार करणे आहे.

त्रिमूर्ती n  Hindu triumvirate of Brahma Vishnu and Siva. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर. uis बाली देशांत हिंदू धर्म आचरण करणार लोके ब्रह्मा, विष्णू शिव अस तीन प्रत्येक प्रत्येक देवांच पूजा करत नाहीते, पण त्रिमूर्तीच पूजा करणे आहे. 

त्रिवेणि संघम n  confluence of Ganga Yamuna and Saraswati rivers. गंगा, यमुना, सरस्वती हे तीन नदीहीं मिळाच ठिकाण. uis त्रिवेणि संघमांत सरस्वती नदी गुप्त-गामिनी रूपांत गंगा यमुनाला मिळते म्हणतात.

त्रिशंकु स्वर्ग fig  a figure of speech meaning "neither here nor there". इकडीन नाही तिकडीन नाही म्हणाच अवस्था. uis इकडल॑ चोखोट काम सोडूनटाकून तो गळ्फाला गेला. पण, सहा महिनेंत तिकडल॑ काम बरोर पडल नाही म्हणून वापस येऊनगेला. अत्ता एकडीन नाही तिकडीन नाही म्हणून त्रिशंकु स्वर्गांत बसलाहे.
    
त्रिशूल n  trident. त्रिशूल आयुध. uis त्रिशूल महादेवाच आयुध म्हणून हिंदू धर्मांत विश्वास करतात.

त्रेचाळीस n  forty-three. बेचाळीसाच नंतरल॑ संख्या.

त्रेतायुग n  second of the four yugas. चार युगांत॑ दुसर॑ युग. अवतार. uis वामन अवतार, परशुराम अवतार अणी श्रीराम अवतार अस॑ तीन अवतार महाविष्णू त्रेतायुगांत॑ काढले.

त्रेपन n  fifty-three. बावन्नाच नंतरल॑ संख्या.

त्रेसष्ट n  sixty-three. बासष्टाच नंतरल॑ संख्या.

त्रैलोक्य n  three worlds of Earth Heaven and Hell. भूमी, स्वर्ग, नरक, हे तीन लोक.

त्र्याऐंशी n  eighty-three. ब्याऐंशीच नंतरल॑ संख्या. 

त्र्याण्णव n  nintey-three. ब्याण्णवाच नंतरल॑ संख्या.
 
त्र्याहत्तर n  seventy-three. बाहत्तराच नंतरल॑ संख्या. 



थ the sixteenth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठि अक्षरमालाच सोळावां व्यंजन. 

थळ-थळ adj  shining. lustrous. झळक. uis योग, प्राणायाम अणी ध्यान करणारांच तोंड केम्हीन थळ-थळ अस्त. 

थाटणे vt  to display with intention to impress. दुसरेंच प्रशंसाला म्हणून काढून दाखिवणे.

थाटून-ओठाकणे vt  to draw oneself to full height. आंग व॑र ओढून/होढून ओठाकणे/होठाकणे. थाटून-होठाकणे. uis पह्यिलेच सात फ़ुट उंच अणी भीमाकार आंग आहे तला. म्हणून, लोकांस भें दाखिवाकरतां थाटून ओठाकाच आवश्यच नाही.

थान n  woman's breast. स्तन. uis बायकांस थानाच कॅन्सर आलतरीन बरोरल वेळी, म्हणजे कॅन्सर आल॑ म्हणून कळून समेच, ऑपरेशन करींगून, आवश्याजोक्त ओखद/औषध घेवून डॉक्टराच निर्देश बरोर आचरण करलतर आंग बरोर होईल.  

थान देणे vt  to breast feed. to suckle. लेंकराला मायेच दूध देणे. ढोसणे. ढोंचणे. पाजिवणे. uis हे काळाच भरून नव॑ युवतीलोके लेंकरांस थान देणे सोडून, दूधाच पंप प्रयोग करून दूध बाह्येर काढून बोट्टलांत घालून लेंकरांस देतात. 

थाप n  a gentle pat. ताप. तळहाता वाटि हळ्ळु मारणे.

थापटणे vt  to pat gently. तापडणे. थापडणे. तळहात हळ्ळु लागिवणे.
 
थापडणे vt  to pat gently. तापडणे. थापटणे. तळहात हळ्ळु लागिवणे. uis पळा-पळी खेळत अस्ताना खाले पडून घाव लागींगून मझ नातू रडत मझकडे आला. नंखर थापडून देलाव॑र रडणे राह्ते केला.

थापडणे vt  to rub gently. to massage lightly. हळ्ळु चोळणे. हळ्ळु रगडणे. uis एक वारापसून मझ पाठ लचक धरून होत॑. आज थोडक अमृतांजन लावून थापडला नंतर बर॑ झाल॑.  

थांबणे vt  to stay. to put up (in). to reside. राहणे. असणे. uis अम्च गामाला तुम्ही आलाहेंत म्हणून मला कळ्ळ॑. कोठ थांबलाहेंत म्हणून कळिवलतर मीच येऊन तुम्हाला पाह्तों.

थांबणे vt  to wait. राखणे. uis जुने काळांत थोर-थोर स्टेशनांत ट्रेन पंध्रा मिनिट तीस मिनिट थांबत होत॑, पण अत्ता अग्गीन पोणावांटा स्टेशनांतीन दोन दोन मिनिट थांबते.

थांबिवणे vt  to detain. राखिवणे ; थांबवणे in sm. uis मी बॅन्कांत रीजनल-मॅनेजर म्हणून काम करत अस्ताना एकदपा गुलबर्गाला गेल्होतों. पर्तून येयाच ट्रेन धराला स्टेशनाला येताना वेळ होऊनगेल॑ तरीन तिकडले स्टेशन-मास्टर ट्रेनाला पंध्रा मिनिट मझकरतां थांबिवून ठिवले !  

थिंगाणा n  jumping around boisterously. अट्टहास करून उडी मारणे. uis उन्हाळाच महिनेच साळेच सुट्टी येताना अम्ही लेंकरे अग्गिदनीन, म्हणजे चुलत भाऊ-भाऊंडे पणीन, आजा-आजीच घराला जावुओं. तिकड॑ अम्च वरडा-वरडी अणी थिंगाणा सोसाला होईनास्क आजा-आजी कष्टि भोगतील. 

थुंकणे vt  to spit. तोंडांतल॑ थुंका बाहेर थुंकणे. uis बसून असाच ठिकाणेंतच भोंताले थुंकत असाच लोकांस पाह्यलतर कंटाळा येईल मला.

थुंका n  spittle. लाळ. uis पायरीच कोनेंत पान खाऊन थुंकलते थुंका पडलसाच पाव्हून अम्च सोसैटीच अधिकारीलोके तिकड अग्गीन देवाच पेट/पट लोंबिवून घाट्ले तरीन ते परवा करनास्क ते पेटाच आजू-बाजू पणीन लोके थुंकाला आरंभ करले.

थेंब n drop of a liquid. द्रव्याच बिंदू. ठिमका. uis मझ डोळेच असुखाला दिवसाला तीन दपा दोन दोन थेंब औषध घालाल डॉक्टर सांगिट्ले.   

थैली n  bag. पिशवी. uis "एल.जी" हिंगाच हिरव॑/हिर्व रंगाच थैली अम्च ल्हानपणांत भरून प्रसिद्ध होत॑.

थोड adj  a little. थोडक॑ ; थोडा/थोडका in sm. uis बरोर तीन बडिवताना येतों म्हणून सांगट्ला तरीन तो अण्खीन आल नाही. थोड वेळ राहून/राखून पाह्मणे, येऊया.

थोड-थोड adv nearly. जवळ-जवळ. थोडक-थोडक. uis मझ चुलतभाऊ पाह्याला थोड-थोड मझस्कच असेल.

थोड-थोड adv  little by little. थोडक-थोडकक॑. uis पोळत-पोळत असाच कॉफी पीणे म्हणजे मला होईनाच होईना. थोड-थोड फुंकून निविवून पीलतरच होईल.

थोडक adj  a little. थोड. नंखर ; थोडा/थोडका in sm. uis बस्सांत जाताना एकलाकडे थोडक सरकून बैस म्हणून सांगताना तो मला मारालाच येऊनगेला. 

थोडक-थोडक adv  nearly. थोड-थोड. जवळ-जवळ. uis एक दिवस मी ट्रेनाच टिकट घ्याला क्यूंत ओठाकलसताना/होठाकलसताना कोणकी एक मनुष मला पाव्हून मी थोडक-थोडक पाकिस्थानाच अध्यक्ष परवेज़ मुषरफास्क आहें म्हणट्ला.

थोडक-थोडक adv  little by little. थोड-थोड. uis ते काम पूरा एकच दिवस काराम म्हणून काहीं नाही. एक-एक दिवसीन थोडक-थोडक करलतरीन पुरे.

थोडक्यांत adv  before/within a little while from now. थोड वेळाच आंत. uis आंगाला बर॑ नाही म्हणून डॉक्टराला पाह्याला म्हणून त्यंचकडे बसून एक घंटे झाल॑. मझ पक्षा पुढे आंत गेलत्या थोडक्यांत बाहेर/बाह्येर येईल म्हणून वाटते.
 
थोर adj  big. great. मोठ. uis गेल महिना आलते थोर वारे-पाऊसांत अम्च घरच॑ समोर/सोमोर होतते थोर झाड पडूनगेल॑.

थोरळा adj  elder. वयेंत मोठ ; थोरला in sm. uis अम्चकडे अत्ता दोघदने  बोलूनटाकून गेलेकी, त्यांत थोरळा कोण ?

थोराड adj  very large. very stout. strapping. फार मोठ. उदंड थोर.

थोर्वीपण n  feeling of superiority. मोठ मनूष अस वाटींगणे. uis त्यंच घरचे पूराहीं उदंड/उजंड वाचलतेनी पण, तेनीच सग्ळच्यां पक्षा षाणे म्हणून त्यांस थोर्वीपण आहे.
 
थोर्वीपण n  dignified (behaviour). nobility. गांभीर्य. uis तेनी एवढे थोर उद्योगांत असून पणीन सगळ्याकडीन थोर्वीपणांतेच वागणे. 

No comments: