ह
ह the thirty-fifth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठी अक्षरमालाच पस्तीसवां व्यंजन.
हक n a right or claim on something. हक्क. एकावर असाच अधिकार. uis कित्येक देऊळांत पूजा पद्धती अस्कीन चालिवाच हक कोणाला आहे म्हणून तर्क होत आहे मात्र न्हो, हे विषयाव॑र अस भांडणार लोके न्याय विचारींगून कोर्टाला पणीन गेलाहेत !
हक्क n a right or claim on something. हक. एकावर असाच अधिकार. uis स्वाधिकार अम्च हक्क / हक आहे.
हगणे vt to pass stools. जीर्ण झालते पदार्थ विसर्जन करणे. गू विसर्जन करणे. परसाकडे जाणे. परसा पटीस जाणे. uis तुम्च कुत्राला बांधून घाला. ते मझ घरासमोर हगून ठिवलाहे. Note. हगवण in sm means 'dysentery'.
हजाम n barber. केंस कापाचीं क्षौराचीं काम करणार. uis हजामाकडे जावून अलतर॑ स्नान करूनटाकून, जानव बदिलिवूनटाकूनच देवपूजाला बसांव, अ म्हणणे आहे.
हजामत n barber's profession. हजामाच काम.
हजामत fig a demeaning way of describing an (unproductive) act. प्रयोजन नाहीते कामाविषीन नीच रूपांत सांगणे. uis परीक्षा येत आहे. दिवस पूरा हजामत करनास्क स्कूळ पुस्तक वाच, जा !
हजार n thousand. हदार. शंभर गुना / वांटा दहा. सहस्र.
हट्ट n stubbornness. मनाला आलते सोडनास्क असणे.
हट्ट n insistence. होवूनेच सराम अस बसणे.
हट्टवाद n stubbornness. हट्टपण. मोंडपण.
हट्टवादी adj stubborn (person). हट्ट करणार. uis तू थोर हट्टवादी म्हणून मला कळेल, पण तुझ हट्ट्वाद काईं मझकडे चालना.
हडप imp swallow. गिळणे. गडप. Note. हडप in sm means "to flap, thrash or winnow grain etc"
हडप fig misappropriate. embezzle. swindle. गडप. पैसा गिळणे. uis कोण्त व्यापार आरंभ केलतरीन अम्च पूर्त ध्यान तेजांत असाम. नाहीतर, अम्च ध्यान चुकलतर खाले काम करणार याच पैसे पूराहीं हडप कराला पाह्तील.
हडपणे fig to swallow. गिळणे. गडपणे.
हडपणे fig to misappropriate. पैसा गिळणे. गडपणे.
हड n bone. अस्थि. अस्ति ; हाड in sm.
हतोडी n hammer. सुत्ति (Tamil). खीळा वगैरा बडिवाच लोखुंडाच / लोखंडाच उपकरण.
हत्ता n spank. तळहातावाटे हळ्ळु मारणे ; हत in sm.
हत्ती n elephant. गज. हस्तमृग.
हत्या n killing. मरिवणे.
हदार n thousand. हजार. शंभर गुना दहा. सहस्र.
हमाल n coolie. porter. कूलीच मनुष.
हमाली n wages paid to a coolie or porter. कूलि केलतेला द्याच पैसा.
हयग्रीवमंडी n name of a sweet dish. एक गुळ्चीट पदार्थाच नाव.
हयग्रीवा n Hayagreeva, Lord Vishnu with a horse-face. Hayavadana. हयवदना. घोडाच मुख-रूपी महाविष्णू. Note. हय is horse and ग्रीवा is neck or nape of the neck and by extension in this case, face.
हयवदना n Hayavadana, Lord Vishnu with a horse-face. Hayagreeva. हयग्रीवा. घोडाच मुख-रूपी महाविष्णूच. Note. हय is horse and वदन is face.
हरटे n gossip. idle talk. अरटे. अमुक विषय नाहीते बोली ; गप्पा in sm. Note. from Kannada, the Tamil version being अरटे.
हरटे-बडिवणे vt to gossip. हरटे मारणे. अरटे बडिवणे / मारणे. प्रत्येक विषय नाहीस्क बोलाच ; गप्पा मारणे in sm.
हरण n deer. मृग. मान (Tamil). Note. मृग means a deer as well as any quadraped.
हरणशिंग n antlers of a deer. हरणाच शिंग.
हरणे vi to fail. निष्फल होणे.
हरणे vi to get defeated. पराजय होणे.
हरताल n boycott. strike. नियम तोडून विरोध करणे ; हरताळ in sm.
हरपणे vt & vi to lose. हरपणे. ना पत्ता होणे. गायब होणे. uis ट्रेनांत जाताना तुझ सामान अग्गीन हरपनास्क प्हायींगे.
हरा n Lord Siva. शिवा. महादेव ; हर in sm.
हरिकथा n a type of narrative folk entertainment. कथाप्रसंग. कथाकालक्षेप.
हरिजन n depressed caste. दलित वर्ग. Note. a term coined by Mahatma Gandhi. The word is no longer current and "दलित / दळित" has taken its place.
हरिजन n a person of the depressed caste. दलित. उणे वर्गाच मनुष.
हरिवणे vt to fail. निष्फल करिवणे ; हारवणे / हारविणे in sm.
हरिवणे vt to defeat. पराजय करणे ; हारवणे / हारविणे in sm.
हरिचंदन n yellow sandal wood paste. पिवळ॑ रंगाच गंध / चंदन.
हलक॑ adj feeble. उणे शक्तीच.
हलक॑ adj flimsy. पुसका. फुसका.
हलक॑ adj of light weight. उणे वजनाच. जेड नाहीते ; हलका / हल्लक in sm.
हलणे vi to shake. ढकळून हलिवणे ; हालणे in sm.
हलणे vi to sway. सरकनास्क हेपटीस तेपटीस होणे.
हलणे fig to get startled. आश्चर्याच झटका होणे. अल्लाडणे (Tamil) ; हालणे in sm.
हलवा n a type of sweetmeat. एक गुळ्चीट पदार्थ.
हलिवणे vt to shake. ढकळून हलिवणे. असाच ठामातेच झटका देणे. होतते ठिकाणांतेच झटका देणे ; हालविणे / हलावणे / हलाविणे in sm.
हळकंद n turmeric tuber. हळेदाच कंद. हळकुंड. हळेदाच गड्डे. हळदीच गड्डे. Note. कंद means tuber or गड्डे.
हळकुंड n turmeric tuber. हळकंद. हळेदाच कंद. हळेदाच गड्डे. हळदीच गड्डे. Note. कंद means tuber or गड्डे.
हळद n turmeric. हळेद. हळदी.
हळद n rhizome or tuber of turmeric plant. हळेद. हळदी झाडाच गड्डे.
हळदी n turmeric. हळेद. हळद.
हळदी n rhizome or tuber of turmeric plant. हळद. हळेद. हळदी झाडाच गड्डे.
हळदीकुंकू n a social get-together where married ladies are invited and given turmaric and kumkum. सवाष्णी बायकांला घराला बलावून हळदीं कुंकूईं द्याच पद्धत.
हळेद n turmeric. हळद. हळदी.
हळेद n rhizome or tuber of turmeric plant. हळद. हळदी. हळदीच झाडाच गड्डे.
हळ्ळु adv slowly. निदानांत. सावकाश ; हळू in sm. uis (1) उजव॑ पांयेंत घाव लागल-ते-करतां मला हळ्ळु चालालेच होईल. (2) मझ काराच बॅटरी पूरा शमन झाल नाही म्हणून थोडक हळ्ळु ढकळून देलतर पुरे, इंजिन स्टार्ट होईल.
हळ्ळु adv gently. सौम्य होऊन ; हळू in sm. uis तजकडे हळ्ळु विचारलतर निज होऊन / खर॑ होऊन काय झाल म्हणून कळींगुया. रीण देलते पैसा तजकडू परतून मिळणे म्हणजे एवढ॑ हळ्ळु काईं होईना.
हळ्ळु adv softly. शांत होऊन ; हळू in sm. uis (1) बाजूच खोलींत जावून कित्ति हळ्ळु बोलल॑ तरीन हे खोलींत बसणार तला बेष ऐकल. (2) टी.वीच शब्द थोड हळ्ळु करनातर झोंपी जात असाच लेंकरू उठून बसेल.
हवन n oblation given to Gods through sacred fire. देवांस होमकुंडांत द्याच आहूती.
हवाला n held on charge. कैद.
हवाला n money transfer outside of legal routes. नियमाच विरुद्धांत पैसा पाठिवणे.
हवी n an offering (like ghee) fit for oblation in the sacred fire. होमकुंडांत घालाला योग्य असाच द्रव्य.
हस्ताक्षर n handwriting. हाता वाटी लिव्हाच शैली.
हंडा n a large metal vessel usually used for storing water. गंगाळ. घंगाळ. घंघाळ. पाणी ठिवाला उपयोग कराच एक मोठ पात्र. uis हंडा पाल्ते घालताने म्हणून सांगणे आहे.
हंस n swan. उत्तरा. एक पक्षी.
हाका n scoldings. शिवा. Note. हाक in sm means 'a shout'.
हाका-मारणे vt to scold. शिवा देणे.
हात n hand. arm. कर॑. भुज. हस्त.
हात उचलणे fig to threaten. दटावणे.
हातगुण n luck associated with use of hands. Midas touch. हातांत काढलते काम सार्थक होयाच भाग्य. uis त्यंच हातगुण एवढ॑ चोखोट म्हणजे, तेनी कय काम आरंभ केल तरीन ते फार चोखोट स्थितींत जाऊन पावते.
हात ठिवणे fig to handle a thing. एक काम हाताला काढणे. uis (1) हे घडिगार / घड्याळ बरोर चालत / पळत नाही. आवश्य नाहीस्क तजवर हात ठिवून ते पूरा हाळ कर नको. (2) मोडलते खिडकी बरोर कराला एक सुताराला मी सांगिटलोहें. मी बाहेर गेलसताना तो आलतर मी परतून येयाच पतोरी / पर्यंतीन कामावर हात ठिवताने म्हणून तला सांगशीलका ?
हात मुजलींगून बसणे fig to sit still without helping. सहाय करनास्क उगे बसणे. uis मी पूरा दिवस कष्टी भोगून काम कराच तो पाह्त बसल होता. तला थोड तरीन मनांत वाटलासलतर हात मुजलींगून बसलासना.
हातराखण n an item or money held for an emergency or as a stand-by. हातराखणे. अत्यावश्याला म्हणून वेगळ॑ काढून ठिवाच पैसे अथवा आवश्याच साधन.
हातराखणे n an item or money held for an emergency or as a stand-by. हातराखण. अत्यावश्याला म्हणून वेगळ॑ काढून ठिवाच पैसे अथवा आवश्याच साधन. uis मी पहिल॑-पहिल॑ घर सोडून नव उद्योगाला वेगळ॑ गामाला जाताना मझ बापा हातराखणाला असूनदे म्हणून हदार / हज़ार रुपे मझ पेटीच आंत ठिवले.
हात लांब करणे fig to beg. भीक मागणे. uis हात लाब कराला लाज वाटत नाही कायतरीं काम करून पैसे संपादाला वाट प्हा, जा.
हात हलींगून येणे fig to come unprepared. तय्यार होयनास्क येणे.
हात हलींगून येणे fig to come empty-handed. नुस्त हातांत येणे. uis दुकान-बीदी वाटे येताना मी तुला नंखर भाजीपाला अणी एक किलो तांदूळ हे दोनीन घेईंगून आण म्हणट्लों नाही का. मग कां हात हलींगून आलास ?
हाताखाले adv under the custody or control of. स्वाधीनां (असणे).
हाताचान होणे u a usage implying ability to do a thing. एक विषय कराच सामर्थ्य आहे म्हणून दाखिवाच प्रयोग. uis तज षाणपण प्हायलतर एवढ थोर काम कराला तला हाताचान होईल म्हणून वाटत नाही.
हातावढे adj a length measured from the tip of the middle finger to the elbow. मोळम (Tamil). हाताच लांब तेवढ॑. हाताच मध्यल॑ बोटाच अग्रंतून कोंपूर पर्यंतीन असाच लांब. Note. this measure of length is normally used by flower sellers while selling tied flowers.
हानि n damage. loss. नासाडा. नाश. नष्ट.
हानि n harm. अपाय.
हाय n relief. तंटांतून सुटणे. स्वस्थ होणे.
हायशी adv feeling of relief or satisfaction. हाय होवून असणे. स्वस्थ वाटणे ; हायसे / हायसें वाटणें in sm.
हार n garland. माळ.
हार n necklace. माळ.
हार n defeat. पराजय.
हाळ adv spoil. नाश.
हास्य n laughter. हांसू. हांस.
हांकणार n driver of a vehicle. बंडी पळिवणार.
हांकणे vt to drive. (बंडी) पळिवणे. uis आज मझ बंडी हांकणार ('ड्रैवर') आल नाही. अम्ही एक टॅक्सींत की आटोंत की जाऊया.
हांकणे vt to drive away. to chase away. दवडिवणे. पळिवणे. uis भीकारींच तंटा फार झालाहे. कित्ती हांकून पाठिवल तरीन पुन्हा-पुन्हा येत असतात.
हांस imp laugh. हांस. हास्य.
हांसणे vi to laugh. घसाच शब्दानिशी संतोष प्रकट करणे ; हसणे in sm.
हांसणे vt to make fun of. to ridicule. मष्किरि करणे. परिहास करणे ; हसणे in sm.
हांसिवणे vt to make someone laugh. दूसरेला हांसू आणिवणे ; हसवणे in sm.
हांसू n laughter. हांस.
हांसू n smile. स्मित हांस. मंद स्मित.
हिजरा n eunuch. नपुंसक व्यक्ती.
हिन॑ pron this woman / girl. हे स्त्री / पोरी.
हिमगिरी n the abode of Lord Siva, Mt.Kailas. कैलास पर्वत. Note. हिम (snow) गिरी (mountain peak)
हिमटपण n stinginess. miserliness. tightfistedness. कंजूसपण.
हिमटा adj stingy. miserly. niggardly. कंजूस.
हिमाचल n Himalaya mountains. हिमाद्री. हिमालया. हिमपर्वत.
हिमाद्री n Himalaya mountains. हिमपर्वत. हिमाचल. हिमालया.
हिमालया n Himalaya mountains. हिमपर्वत. हिमाचल. हिमाद्री.
हिमाळा n winter days. winter season. हिंवाळा. हीवाळा. हेमंत ऋतू. हिंस काळाच ऋतू ; हिवाळा in sm. uis उत्तर भारतांत हिमाळाच समयांत कापडाच पांघरविणेच बद्दिल कांबळेच पांघरिवणे पह्जते पडेल.
हिरडा n a dried nut used in Ayurvedic medicine. आयुर्वेदांत उपयोग कराच एक वाळलते फळ. uis हिरडा तोंडात ठींगटलतर खोंकळा नीट उणे होत॑.
हिरणे vt to seize forcibly. बळांत घेवून जाणे.
हिरण्य n gold. सोने. स्वर्ण.
हिरण्यगर्भ n the primordial golden egg in Hindu scriptures, attributed as the cause of the Universe. ब्रह्मांडाच उत्भवाला कारण झालते सोनेच अंडा.
हिरवट adj (a person who is) rude, coarse, uncouth, inconsiderate etc and hence difficult to get along with. अवघड (मनुष). uis चोखोट "बॉस" मिळाला देवून-ठिवलसाम. कित्तिकी दपा हिरवट मनुष "बॉसास्क" येतात. काम कित्ति बेष केल तरीन तेनी चूक हुडुकतील.
हिरव॑ n green colour. हिरव॑ रंग. हिर्व रंग ; हिरवा in sm.
हिरव॑ adj green coloured. हिरव॑ रंगाच. हिर्व रंगाच. हिरव॑ रंगाच.
हिरव॑ adj raw. unripe. कच्चा. पिकनाते.
हिर्व n green colour. हिर्व रंग. हिरव॑ रंग ; हिरवा in sm.
हिर्व adj green coloured. हिर्व रंगच हिरव॑ रंगाच. हिर्व रंगाच.
हिर्व adj raw. unripe. कच्चा. पिकनाते. हिर्व. हिरव॑.
हिषोब n mathematics. इषोब. गणितशास्त्र ; हिसाब / हिशेब / हिशोब in sm. uis (1) श्रीनिवास रामानुजन हिषोब शास्त्रांत अपार बुधिवंत होते. (2) साळेंत वाचाच वेळी मला उजंड अवडलते विषय हिषोब होत॑. Note. (1) the sm word starts with हि and so better to consider हिषोब as the preferred spelling. (2) इषोब could be considered as the under-emphasized form of the "correct" हिषोब.
हिषोब n accounts. इषोब. आदाय-खर्चाच विषय. पैसाच विषय. पैसा खर्च केलतीन पैसा आलतीन लिव्हून ठिवणे ; हिसाब / हिशेब / हिशोब in sm. uis हिषोबाच गोळमाळ करून पैसा गिळला म्हणून हे जवळ मझ ऑफीसांत एक थोर अधिकारीला कामांतून काढूनटाकले. Note. (1) the sm word starts with हि and so better to consider हिषोब as the preferred spelling. (2) इषोब could be considered as the under-emphasized form of the "correct" हिषोब.
हिषोब नाहीस्क fig unaccountedly. unscrupulously. इषोब नाहीस्क. मर्यादा अवगणना करून. uis मला कळ्ळते एकला चोखोट सरकारी उद्योगांत असताना हिषोब नाहीस्क पैसे गडप करून, नंतर सी.बी. ऐ. वालेंकडे सांपिडींगटला. अत्ता कांब मोजत आहे. Note. इषोब नाहीस्क is the under-emphasized form of हिषोब नाहीस्क.
हिषोबाच adj measured. restrained. इषोबाच. आवश्याच तेवढेच. आवश्याजोक्ताच. नियंत्रणांतल॑. uis तेनी उजंड मानमर्यादाच मनुष मात्र नहो, बोलतांपणीन हिषोबांतेच बोलतील॑. Note. इषोबाच is the under emphasized form of हिषोबाच.
हिंग n asafoetida. एक वनस्पती मसालाच नाव. हिंग वृक्षाच रस / गोंद.
हिंग निघून जाणे fig to be drained out completely. to be rendered totally exhausted. पूरा पूरा नित्राण होणे. पूरा पूरा क्षीण होणे.
हिंगाच डब्बा fig a person of bluff and bluster without any stuff in him. असाच पक्षा जास्ती दाखिवाच डंभाचारी मनुष.
हिंडणे vt to roam about. to wander. उगे फिरणे.
हिंदी n Hindi language. हिंदी भाषा.
हिंदुस्थान n India. भारत देश.
हिंदुस्थानी n the Hindusthani language, a mixture of Hindi and Urdu. हिंदी अण्खी उर्दूच मिश्रभाषा.
हिंदुस्थानी adj related to Hindusthan. हिंदुस्थानाला संबंध झालते.
हिंदू n the Hindu religion. हिंदू धर्म.
हिंदू adj a person belonging to Hindu religion. हिंदू धर्माच मनुष.
हिंवाळा n winter days. winter season. हिमाळा. हीवाळा. हींमाळा. हेमंत ऋतु. हिंस काळाच ऋतु ; हिवाळा in sm.
हिंवाळा n cold weather. हीमाळा. हिंस वातावरण ; हिवाळा in sm.
हिंस adj that which is cold. हीम वाटाच. हीम असाच. हींव वाटाच. हींव असाच.
हिंसा n trouble. तंटा. उपद्रव.
हीम n cold. chill. हिंस. हींव ; हिंव in sm.
हीम n snow. हींव. हीमामळे आकाशांतून पडाच पाणीच पंढ्र रंगाच घट्टि रूप. uis हिमालय पर्वताला नाव "हीम" अणी "आलय" हेजांतून आल॑.
हीमाळा n winter days. winter season. हिंवाळा. हिमाळा. हीवाळा. हेमंत ऋतु. हिंस काळाच ऋतु ; हिवाळा in sm.
हीवाळा n winter days. winter season. हिंवाळा. हिमाळा. हीमाळा. हेमंत ऋतु. हिंस काळाच ऋतु ; हिवाळा in sm.
हीं conj a conjunction indicating inclusiveness. ईं. नीं. uis (1) मी काल तुज घरांतून वापस येताना मझ मोबैल फोण सोडूनटाकलों. तू आज मला पाह्याला येताना तेहीं / तेईं काढींगून येशील का ? (2) मझ लेंकरे सिनिमाला जाताना मला पणीन ये ये म्हणून निर्बंध केले म्हणून मीनीं त्यंच बरोर निघलो. Note. as in तेहीं (तेईं) meaning 'that also'.
हींव n cold. chill. हीम ; हिंव in sm.
हींव n snow. हीम. हीमामळे आकाशांतून पडाच पाणीच पंढ्र रंगाच घट्टि रूप.
हुडणे vi to fly. उडणे. Note. better उडणे as हुडणे is the hyper-emphasised form of उडणे.
हुडीमारणे vt to leap. to jump. उडीमारणे ; उडीमारणे in sm. Note. better उडीमारणे as हुडी is an hyper-emphasised form of उडी.
हुडुकणे vt to search (for a lost thing). (हरपलतेला) हुडुकणे ; शोधणे in sm. Note. from Kannada.
हुशार adj mentally sharp, alert, clever etc. मन्न षाणपणांत असणे. uis नित्य योगाभ्यास करणारांस रोगरागी जास्त येईना अणी तेनी हुशारांत पणीन असतील.
हुंडी n donation box in a temple. देऊळांत भक्तलोके पैसेच संभावना द्याच / घालाच पेटी.
हृदय n heart. ऊराच आंतल एक मुख्य अवयव.
हे pron this. these (applied to both animate and inanimate, in singular and plural). ये. जवळ असाच एक साधनाला अथवा जीवीला उद्देश करून सांगाच सर्वनाम (एकवचन अणि बहुवचन).
हे जवळ adv recently. समीपांत. ये जवळ. uis सी.पी.ऐ.(माओ) पक्ष पुन्हा-पुन्हा त्यंच स्वाधीना्च खाले असाच प्रदेशांत॑ रेलवे-ट्राकाला उडीऊन नाश कराच एक मोठ चिंताच विषय झालाहे. हे आफत्तांतून चुकिवाला हे जवळ केंद्र सरकार रेलवेच अपाय उणे करिवाला साध्य होयाच एक उपकरण उपयोग कराला निश्चय केलाहेत.
हेनी pron these people. हे लोके (सर्वनाम, बहुवचन). यनी. येनी.
हेपटीस-तेपटीस adj mutual. अन्योन्य.
हेपटीस-तेपटीस adv this side and that side.
हेमंत n winter season. हिमाळाच / हिंवाळाच ऋतु.
हेमा n gold. सोने. स्वर्ण.
हेवंदा adv this year. हे वर्षी. यंदा. यवंदा. येवंदा uis घरच॑ अंबाच झाडांत गेलंदा पक्षा हेवंदा फूल उदंड उणे सोडलाहे.
हेवंदा adv this time. this occasion. हे दपा. यंदा. यवंदा. येवंदा. uis ते गांवाला जायाच वाट उदंड हाळ जालाहे. गेल महिना तिकडे गेलतम्हा मझ बंडी "पंक्चर" होऊनगेल॑ / झाल॑. ते करतां हेवंदा मी तिकडे जाताना मझ स्वंत बंडींत जायनास्क बस धरींगून गेलों.
हैदर-काळ fig olden times. जुने काळ.
हैदर-दंडु fig old useless fellow. प्रयोजन नाहीते म्हातारा.
हैराण adj distressed through fatigue or mental affliction. नित्राणामळे होयाच मनाच कष्ट.
होठाकणे vt to stand up. ओठाकणे. बसलत॑ / निजलत॑ स्थितींतून उठणे. Note. (1) the word ओठाकणे appears to be from ऊठ and ठाकणे and होठाकणे a phonetic variation of it. (2) होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे.
होठाकणे vt to halt. थांबणे. राखणे. uis एवढ॑ दिवस अम्च गामांत एक्सप्रस ट्रैन कोण्तीन होठाकत होत नाही. हे महिना पसून दादर एक्सप्रस होठाकाला आरंभ झालाहे.
होठाकिवणे vt to make a person stand or get up. ओठाकिवणे. बसलत॑ / निजलत॑ स्थितींतून एकाला ओठाकिवणे.
होढणे vt to pull. ओढणे. बळ उपयोग करून स्वताकडे सरकिवणे ; ओढणे in sm. Note. होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे.
होढणे vt to draw a picture or a line. ओढणे. चित्र काढणे. बावोली होढणे. रेखा काढणे ; ओढणे in sm.
होढणे vt to smoke a cigarette or beedi. ओढणे. सिगरेट अथवा बीडी पीणे / फुंकणे ; ओढणे in sm.
होणे vi to happen. to become. to come to pass. साध्य होणे. uis (1) मझकडून घेटलते रीण एक महिनेच आंत वारिवतों अस तो म्हणट्लाहे. मला कायकी ते होणे संदेहच. (2) ते दोन कुटुंबाच मध्ये मनस्थाप होवून उजंड दिवस झाल॑. अत्ता ते भांडणे बरोर होणे मला काय की संदेहेच.
होणे vi to be finished. to be ended. संपणे. वारणे. uis. ते काम आज संध्याकाळीच पुढे होणे संशयेच.
होणे vi to be. होणे. uis तो सांगाच पूरा निज होणे साध्येच नाही.
होम n oblation into the sacred fire. आहूती. हवन.
होमकुंड n a pit prepared for performing oblation in sacred fire. यज्ञकुंड.
होय adv yes. संम्मत दाखिवाला सांगाच गोष्ट. बर॑.
होल॑ pret a preterite of the verb होणे. over. done. झाल॑. "होणे" हे क्रीयापदाच भूत काळ. Note. (1) this is a peculiarly hybrid DM usage, formed by the combination of होणे and झाल॑. (2) preterites are the action-completed form of verbs. (3) better झाल॑.
होळी n name of a festival. एक सणाच नाव. होळीच सण.
क्ष
क्ष the thirty-sixth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठी अक्षरमालाच छत्तीसवां व्यंजन.
क्षण n a moment. an instant. ल्हानाच पक्षा ल्हान वेळ. एक निमिष.
क्षत्रिय n the warrior caste. one of the four castes of Hinduism. हिंदू धर्माच चार वर्णांत एक.
क्षत्रिय adj a person who belongs to the kshatriya caste. क्षत्रिय वर्णांतल एक मनुष.
क्षमा n forgiveness. pardon. माफी. अपराध माफ करणे.
क्षमा n patience. सहन कराच शील.
क्षय n tuberculosis. एक महारोग. क्षयरोग.
क्षयरोग n tuberculosis. एक महारोग. क्षय.
क्षयरोगी n a person afflicted with tuberculosis. क्षयरोग बाधा झालते मनुष.
क्षवर n tonsure. मुंडन ; क्षौर in sm. Note. better क्षौर.
क्षवर n shaving. दाढी काढणे ; क्षौर in sm. Note. better क्षौर.
क्षवरी n artificial hair. an extra bunch of hair inter-plaited to a woman's plait or chignon. गंगावन. क्षौरी. uis एक वयेच नंतर बायकांला केंस झडल. तम्हा क्षवरी / क्षौरी मिळिवून बिछोडा घालिंगतील.
क्षाम n famine. भयंकर उन्हाळामळेहीं पाणीच कष्टामळेहीं जमीनांतून धान्य कहीं उत्पादन होयनास्क असाच अवस्था.
क्षीण adj emaciated. रोडे झालते.
क्षीर n milk. दूध.
क्षीरसागर n the divine ocean of milk. दूधाच दिव्य समुद्र. क्षीराब्धी.
क्षेत्र n temple. देऊळ.
क्षेत्र n a sacred place. एक पुण्यस्थळ.
क्षेत्रद्वार n entrance to a temple. देऊळाच आंत जायाच वाट.
क्षेत्रपालक n stone carved statues positioned as door-keepers in a temple. द्वारपालक. देऊळाच आंत प्रवेश कराच वाट रक्षा कराला म्हणून वाटेच दोन बाजूकडीन / पटीसीन असाच शिलारूपी विग्रह. uis प्रति हिंदू देऊळांतीन प्रवेश कराच वाटेच दोन पटीसीन क्षेत्रपालकांच एक एक विद्रह अस्त.
क्षेत्राडन n pilgrimage. तीर्थाडन. तीर्थ यात्रा.
क्षेम n welfare. सुख. सौख्य.
क्षेमतांदूळ n a tiny packet of rice and dhal put into a suitcase / box (after a minute's prayer) before starting to pack items for a journey, meant to be "god's blessings for the journey". एक प्रयाणाच पुढे देवाला प्रार्थना करून / नवसींगून यात्राच सामानाच बरोर घालाच तांदूळाच एक ल्हान पोट्लम. uis अत्तापणीन प्रति प्रयाणाच पुढे मझ बाईल क्षेम-तांदूळ ठिवला नंतरेच सूटकेसांत फडकी ठिवेल.
क्षेम विचारणे vt to enquire of / about one's well being. सौख्य विचारणे. कुशलान्वेषण करणे. क्षेमलाभ विचारणे.
क्षेमलाभ विचारणे vt to enquire of / about one's well being. सौख्य विचारणे. कुशलान्वेषण करणे. क्षेम विचारणे.
क्षौर n tonsure. मुंडन. क्षवर.
क्षौर n shaving. दाढी काढणे. क्षवर.
क्षौरी n artificial hair. an extra bunch of hair inter-plaited to a woman's plait or chignon. गंगावन. क्षवरी.
ज्ञ
ज्ञ the thirty-seventh consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठी अक्षरमालाच सदतीसवां व्यंजन.
ज्ञान n knowledge. विषयाच अर्थ कळणे. बोध.
ज्ञान n awareness. कळणे. बोध.
ज्ञान n wisdom. बुद्धी.
ज्ञान n the state of not being unconscious. conciousness. the state of mental alertness. प्रज्ञा. बोध. मनाला बोध असाच स्थिती. uis गेल वर्षी नवंबरांत मला हॉस्पिटलांत वेनटीलेटर घालून ऐ,सी.यूंत ठिवलास्ताना मला पसतीस घंटे पतोरी ज्ञान नाहीस्क पडल्होतों. मी मूर्च्छांत असताना मझ बाईल अणी मझ भाऊ हे दोघीन फार भींगट्ले.
ज्ञानजीवी n enlightened soul. बुद्धी जीवी. ज्ञानी.
ज्ञानदीप n lamp of wisdom. ज्ञान. ज्ञानाच दिवा.
ज्ञानदृष्टी n divine vision. दिव्य दृष्टी.
ज्ञानदृष्टी n capability for seeing future events. ज्ञानशक्तीमळे भविश्यांत होयाल जायाच कळणे. भविष्याच ज्ञान.
ज्ञानमार्ग n the path to God-realisation through knowledge. ज्ञानाच वाटे ब्रह्मज्ञान मिळाच मार्ग.
ज्ञानवाद n the philosophy emphasising the path of knowledge to be the correct path to God-realisation. ज्ञानाच वाटे मात्र ब्रह्मज्ञान मिळेल, अस विश्वास कराच तत्वशास्त्र.
ज्ञानी n an enlightened person. a person with profound knowledge and wisdom. ज्ञान शक्ती असणार.
ज्ञानोदय n growth or development of wisdom. ज्ञान होणे. uis बेष ज्ञानोदय होईल म्हणून साळेला लेंकरांस अम्ही पाठिवतों. पण अत्ता हे काळांत ज्ञान पह्जे म्हणजे साळेच बरीस इन्टेरनेट चोखोट / चोखट म्हणून सांगूया !
No comments:
Post a Comment