07 March 2012

च, छ, ज, झ, ञ




च the sixth  consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठी आक्षरमालाच सहावां व्यंजन. 

चक्कर n  a circle. a round. a ring. चक्र. वृत्त. 

चक्कर n  an aimless walk. कोठीन जायाच उद्देश नाहीस्क उगे चालणे. uis दोन दिवसापसून तो अम्च घराच जवळेच चक्कर मारत/बडिवत आहे. कां म्हणून कळत नाही.

चक्कर n  vertigo. डोस्के फिरणे. uis एक दोन महिने पसून डोस्केच चक्कर येत आहे म्हणत आहे तो. कां डॉक्टराचकडे जाऊन दाखिवताने ?  

चक्कर बडिवणे adj to loiter around. उद्देश नाहीस्क फिरणे. uis मी पाष्टे पसून पाह्त आहें. तो अम्च घराच समोरच/सोमोरेच चक्कर बडिवत आहे. 

चक्का n  separated milk solids. दूधांतून काढाच घट्टि पदार्थ. uis दूधाच चक्कांतून रसोगोळ्ळा करणे आहे.

चक्कि n   flour mill. पीठाच गिरणी. uis चपात्ति कराला म्हणून महिना महिने अम्ही पांच किलो गेहूं कामवाळीकडून चक्कीला पाठिवून पूड करून ठिवणे आहे.

चक्कोट adj  good. fine. excellent. ओंगळाच विरुद्ध. चोक्कोट. चखोट. चोखोट. चोखट ; चोखट/चखोट in sm. Note. better चोखट or चोखोट. चोख in old Marathi as well as in some tribal languages of central India means "clean, pure, apt, good" etc. uis चक्कोट गोष्ट सांगून ऐकनातr तला दोन रपाटा घालून (ओढून/होडून) वाटेला आणीवाम.

चक्कोट तेल n  gingili oil. sesame oil. तीळाच तेल. चोक्कोट/चखोट/चोखोट/चोखट तेल. uis देवाच दिवा चक्कोट तेलांतेच लावाम/लावांव म्हणाच पद्धताच आधार काय म्हणून कळत नाही. Note. better चोखट तेल. This word appears to be a direct transliteration from the Tamil word नल्लेण्णै, meaning "good-oil". The Tamil word itself appears to be morphed from एळ्ळेण्णै, "एळ्ळु" in Tamil meaning "sesame".    

चक्र n  wheel. चक्र. uis महाभारत युद्धांत कर्णाच रथाच चक्र चिक्कोलांत सांपडून असताना शस्त्र प्रयोग करून अर्जुना त्यांय वध केले.

चक्रवर्ति n  emperor. साम्राट. uis चक्रवर्ति चन्द्रगुप्त मौर्य भारताच इतिहासांत पहिले-पहिलेच चक्रवर्ति होते.

चक्रव्यूह n  one of a type of battle formations of infantry, cavalry, elephant corps and chariot corps in  ancient armies. जुने काळांत युद्धभूमींत करसेना, अश्वसेना, हस्तसेना अणी रथसेनाच गुंप तय्यार कराच विध-विध व्यवस्थांत एक. uis महाभारत युद्धांत अभिमन्युला चक्रव्यूह छेद करून आंत वेघाला कळ्ल॑ होत विना कस तजांतून बाहेर/बाह्येर कस येणे, हे कळ्ल॑ होत नाही.

चक्रायुध॑ n  the discus weapon. चक्राच आकाराच एक आयुध. uis श्रीक्रिष्णभगवान चक्रायुध प्रयोग केलतर तजांतून कोणालीन चुकाला होईना.

चक्रांकित n  a type of white coral carapace found in shallow seas and having small circular scars formed by a marine crustacean community. This is venerated like saligram by Vaishnavites. वैष्णव संप्रदायांत साळिग्रामास्क पूजाला उपयोग कराच पंढ्र रंगाच समुद्रांत मिळाच साधन. हेज वर चक्र आकाराच ल्हान-ल्हान चिन्ह अस्त.

चक्ळि n  a fried snack of concentric ring shape. एक तळलते पदार्थ ; चकली in sm. uis सार भाताच बरोर चक्ल्या कि टेंगूळ की मिळींगून जेवलतर तज रूच प्रमाद अस्त.

चखोट adj  good. fine. excellent. ओंगळाच विरुद्ध. चक्कोट. चोक्कोट. चोखट. चोखोट ; चोखट/चखोट in sm. Note. better चोखट. चोख in old Marathi as well as in some tribal languages of central India mean "clean, pure, apt, good" etc

चघळणे vi  to chew. दांतावाटि रगडून चावणे. uis खाले मागल॑ दोन दांत काढूनटाकला नंतर मला बरोर चघळून खायाला होत नाही.

चटपट adv  hurriedly. लोक्कर-लोक्कर. जल्दि-जल्दि. uis बाहेरच/बाह्येरच गामांत (विदेशांत) असणार लोक तेंच-तेंच (त्यंच-त्यंच) काम स्वता करून दंडक असणामळ कोठतरीन  निघाम म्हणजे चटपट निघून वेळाला जावून पावतील.

चट्णि n  chutney. तोळ्लायींगाच एक पदार्थ. तोंडलावण. uis अम्ही एकदपा तिरुनलवेलीला गेलस्तम्हा तिकडल॑ एक होटलांत इड्ळीच बरोर चार विधाच चट्णि खालों.

चड्डि n  underwear. आंत नेसाच विजार. uis तमिल नाडूच तिरुप्पूरांतून मिळाच चड्डि बनियन चोखोट/चोखट गुणाच अस्त. 
 
चढणे vt  to climb. वेघणे. 

चढणे fig  to get drunk. दारु पीवून नियंत्रण चुकणे. uis तो भरून पीऊनटाकून आलाहे वाटते. वेड वंकड बोलाच ऐकून वाटते बेष चढलाहे म्हणून.

चढिवणे fig  to instigate. (दुसरेंच) मन्न फिरिवणे ; चढवणे/चढविणे in sm. uis तो असलते काम करना म्हणून मला कळेल. कोणकी तला चढिवून देलसतील म्हणून वाटते.

चणा n  bengal gram. एक रीतीच दाळ. uis बज्जि कराला चणाच पीठ वापरतील.  

चतुरवैद्य adj  a person who has mastered the four vedas. चतुर्वेदी. uis फार वर्षाच पुढे चेन्नैंत चतुरवेद नारायणाचार म्हणून एक थोर आचारे होते. त्यनी खर॑ म्हणून चार वेदीन वाचिंगट्ल होते.

चतुर clever. smart. षाणपण.

चतुरंग n  chess. एक रीतीच खेळ. सतरंग. uis चतुरंगाच खेळ पहिले-पहिले भारतांत आरंभ झाल म्हणून सांगतात.

चतुर्थी n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीन चौथां दिवस/तिथी. चौत. चौती. चौथ. चौथी. uis भाद्रपद महिनेंत शुक्लपक्षाच चतुर्थी दिवसी गणपतिपूजा येते. 

चतुर्दशी n  fourteenth day of each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीन चौदावां दिवस/तिथी. uis प्रति महिनेंतीन दोन चतुर्दशी येईल.    

चतुर्भुज n Mahavishnu, the God with four hands. चार हाताच महाविष्णु.

चतुर्वेद n  the four vedas. चार वेद.

चदर n  bed sheet. bed cover. पांघरिवणे. अण्थूणाच/अंथरूणाच व॑र घालच/पांघरिवाच कापड. चादर. uis कोळ्हापूरांत मिळाच चदर घट्टि अस्त अणी ते अण्थूणाच व॑र पांघरिवालीन, तसेच अम्च आंगाला पांघरिवालीन बरोर अस्त. 

चपटा adj  flat. thin surfaced. सपाट. uis उदंड (उजंड) दिवसास्क मी दत्तन ठींगटल होतते पित्तळ लोहेंच एक विग्रहाच वर एक मोठ धोंडा पडून ते चपटा होऊन गेल॑.

चपलि n  chappal. sandals. चालताना पांयेंत घालाच साधन. uis आज पाष्टे दुकानबीदीला गेलसतम्हा मझ चपलीच पट्टि तुटल॑. चोखोट काळ, डोळेच समोरच एक चमार बसल होत-ते-करतां समेच (सवेच) ते बरोर कराला झाल.

चपात्ति n  chapati. गहूंच पीटांच पत्तळ रोटि. uis रात्रीच वेळी भात जेवाच सोडूनटाकून मी अत्ता अग्गीन चपात्तीच खोतों.

चप्रासि n  peon. ऑफीसांतल॑ उणे स्थितीच उद्योगी ; चपराशी in sm. uis मझ बॅन्कांत चप्रासीच कामांत मिळून रिटैर होताना जेनरल मॅनेजर झालते संभव मला कळेल. 

चमचा n  spoon. ल्हान पळि. uis लोखुंडाच चमचा लोणचेंत घाटलतर लोणचे विटून जाईल म्हणून तज बद्दिल लांकडाच चमचा वापरणे आहे.

चमचा fig  a term used derisively for a sycophant. मस्का बडिवणार. uis "चमचा" म्हणून त्यांस कां बलावतों म्हणून मला एक ल्हान पोर हे कारण देला. नेता सांगाच बरोर आहे की, नाही आहे की, दोनीन ओपाला तय्यार असणार लोके हेनि. म्हण्जे, बरोर सांगिट्लतरीन "च-म-च", उलटा सांगिट्लतरीन "च-म-च", हेच कारण॑ ! 

चमचागिरि n  sycophancy. मोठ लोकांना संतोष करिवून स्वंत कार्य साध्य करणार. uis ऑफीसांत चमचागिरि करून करून एवढ॑ पतोरि तो प्रोमोषन घेत होता. अत्ता एक नव॑ अधिकारि आलांपिरी तज हे काम चालना म्हणून वाटते.

चमार n  a cobbler. चंभार. चांभार. चपलि, बूट असले साधन करणार. मोचि.

चमार n  one who belongs to the chamar cast. चंभार. चांभार. चमाराच जातीच मनुष. 

चरखा n  a spinning wheel to spin cotton yarn. चर्खा. कापूसांतून दोरा कराच/काढाच यंत्र. uis स्वातंत्र्य समराच "स्वदेशी" आंदोलनाच समय महात्मा गांधि लोकांला चरखाच प्रयोग कराला प्रेरणा केले.

चरण n  foot. पांय.

चरणे vt  to graze cattle. चारणे. गाय, म्हैश, बक्रा असलत्येला गौत/गवत खायाला सोडणे. 

चरस n  a type of addictive drug. नशाच एक वस्तू. uis उत्तर भारतांत कित्येक सन्यासी लोके चरस, भांग असलते नशाच पदार्थ वापरणे आहे तरीन दक्षिणांतल सन्यासींस हे दंडक नाही.

चराचर adj  animate and inanimate creations. उत्पन्न झालते सर्वीन (जीव असाचीं जीव नसाचीं).

चरांट n  a thick rope. ओढा. घट्टि दोरा. जाड दोरा. रस्सी. uis (1) आडांतून पाणी शेंदाला वाळीला/बादलीला/बालदीला बांधलते चरांटाच ओढा खजून खजून तुटाच स्थितीला आल-ते-करतां आज संध्याकाळीच पुढेच एक नव॑ चरांट घेयींगून येम म्हणून म्हणींगटलोंहें. (2) शिकिवून तय्यार करलते, म्हणजे अभ्यास झालते हत्तीच सहायांत राणाच हत्तीला धराला घट्टि चरांट उपयोग करतात. Note. the word ओढा refers to the thick rope used for pulling (eg, a bucket of water from a well).

चरित्र n  history. इतिहास. uis  तंजावूराच चरित्रांत मराठांच राज सुमार 185 वर्ष होत॑.  

चरीवणे vt  shepherding. taking the cattle out for grazing. गाय, म्हैशीला चरणाला घेऊन जाणे. uis (1) मझ बापा केम्हाईं सांगतील "तू बरोर वाचनातर गाय चरीवालाच लायक होशील". (2) खेड गावांत गाय, बक्रा चरीवाच पाव्हूया. मझ नातू अमेरिकांत्सून आलतम्हा तला गाय चराच पाव्हून सांगाला होयनाते एवढे आनंद झाल.

चर्खा n  a spinning wheel to spin cotton yarn. कापूसांतून दोरा कराच/काढाच यंत्र. चरखा. uis स्वातंत्र्य समराच "स्वदेशी" आंदोलनाच समय महात्मा गांधि लोकांला चर्खाच प्रयोग कराला प्रेरणा केले.

चर्चा n  discussion. debate. वाद. वादविवाद. uis ते दोघीन दीड घंटे कोण्तकी विषया्च व॑र चर्चा करत होते.

चर्म n  skin. काताड. uis चर्माच रोग आलतर ते थोडक्यांत बरोर होयना म्हणतील. 

चलचित्र n  cinema. सिनिमा. चित्रपट. uis भूलोकांत भारताच पक्षा चलचित्र काढाच देश वेगळ कोण्तीन नाही. 

चहाडि n  carrying tales. mischievous talk. छाडि. वंब (Tamil).

चहाडि-सांगणे vt  to indulge in mischievous talk. to carry tales. छाडि सांगणे. वंब बोलणे. uis पोणावांटा आफीसांत लोके दूसरांच वर चहाडि सांगून वांचणे सहज झालाहे.

चंचल adj  fickle minded. घट्टि/दृढ मन्न नसाच. uis ध्यान करणे/देवाच नामसंकीर्तन करणे, हे सर्वीन अम्च मन्न चंचल होयनास्क दृढ असाला साधक करेल.

चंडाळ n  name of a caste. एक वर्गाच नाव. 

चंडाळ adj  one belonging to the chandala caste. चंडाळ वर्गांत उजलते मनुष. uis त्यंच सत्यनिष्ठा पालन करा करतां राजा हरिशचंद्राला एक चंडाळाच वेष घालामते पणीं पडl#.  

चंडाळ घाण fig  horrid smell. घोळ घाण. uis तीन दिवसाला अम्ही मैसूराला गेलोतों. पर्तून येऊन घर उघडताना नाहणींतून चंडाळ घाण बडिवत होत॑. एक उंदीर ते खोलींत मरून पड्लसाच पाह्यलों.   

चंदन n  sandal wood. गंध. uis इन्दिरा गांधी अणी राजीव गांधी मेलतम्हा सरकार लाखों-लाख वेच करून चंदनाच लांकडांत (लांकूडावाटे) तेना (त्यांस) दहन केले. 

चंदा n  money collected through contributions for any programme. कोण्त तरीन कार्यक्रमाला लोकांकडून जमा केलते (विचारून मिळिवलते) पैसा. uis गणेश चतुर्थीला पुढे-मागे कळनाते लोक चंदा घ्याला येऊन जातात. उदंड दन ते पैसेंत दारू पणीं पीतात म्हणून ऐकलोंहें.

चंद्र n  moon. भूमीच उपग्रह.

चंद्रकांत n  moonstone. एक रीतीच नगाच खडा.

चंद्रकोर n  crescent moon. अमावस्याच तीन चार दिवस पतोरीच चंद्र.

चंद्रग्रहण n  lunar eclipse. चंद्राचीन सूर्याचीन मध्य एकच पंक्तींत भूमी येताना भूमीच सावली चंद्राच वर पडून चंद्र अदृश्य/अद्रिश्य/दिसनास्क होयाच. uis हिंदु संप्रदाय प्रकार चंद्राला राहु गिळताना चंद्रग्रहण होत म्हणींगतों. 

चंद्रबिंब n  moonbeam. चंद्राच किरण.

चंद्रमंडल n  the realm of the  Moon. चंद्राच स्थल. uis विज्ञानी लोकांस चंद्रमंडलाला जाऊन येयाला झाल तरीन, एवढ॑ पतोरी (पावतोरी) "कॅनसर रोग" कां येत म्हणून सांगाला होत नाही !

चंद्रमान n  calculations based on the movement of the Moon. चंद्राच भ्रमणाच आधारांत कराच इषोब. चांद्रमान. uis चंद्रमान पंचांगांत प्रति महिनेंतीन चौदा चौदा दिवसाच दोन पक्ष अस्त.

चंद्रमौलि n  Lord Siva. भगवान शिव.

चंद्रशेखर n  Lord Siva. भगवान शिव.

चंद्रिका n  moon light. चंद्रप्रकाश.

चंद्रोदय n  moon-rise. चंद्राच उदय. uis कन्याकुमारींत कित्येक दिवस चंद्रोदय अणी सूर्योदय हे दोनीं एकच वेळ पाव्हुया/पावूया.

चंपक n  a type of flower/tree. चांपा. संपंगि (Tamil). uis बंगळूरांत बसवनगुडि, मल्लेस्वरम असलते जुने ठिकाणि रात्रीच वेळी बीदींत लावलते चंपक झाडांत्सून येयाच चोखोट/चोखट वास बंगळूराच एक प्रत्येकता आहे.

चंभार n  a cobbler. चांभार. चमार. चपलि, बूट असले साधन करणार. 

चंभार n  one who belongs to the chamar cast. चांभार. चमार. चमाराच जातीच मनुष. 

चंभारीण n  cobbler's wife. चांभारीण. चंभाराच बायको.  

चाकर n  servant . कामवाला. uis "ऐ.ए.एस" झाल नंतर जन्म पूराहीं घरांत नौकर-चाकर असतील. त्यंच जीवन अगाऊच जागीरदारां बरीस उणे काहीं नाही. Note.usually mentioned together 'नौकर-चाकर'

चाकरी n drudgery. hardwork. कष्टाच काम. uis अम्च अदृष्ट बर नाहीतर कित्ति चाकरी केलतरीन वर जायाला होईना.

चाकु n  knife. सुरी. uis मोंड झालते चाकुनिशी कायतरीन कापाला प्रयत्न केलतर हाताला लागून घाव लागूया.

चाकोत n  a type of edible greens. एक रीतीच पालक. uis चाकोता पालाच नुस्त भाजी तजांतून केलते अंभटभाजी पक्षा बेष अस्त. 

चाटणे vt  to lick. जिव्हाला लागिवणे. uis बोटाच वाटे तूप चाटून खाणे म्हणजे तला एक प्रत्येक स्वाद अस्त ! 

चाणी n  a grinding wheel used for sharpening knives etc. चाकू (सुरी) बरोर कराच/तीक्ष्ण कराच/शूर्प कराच एक उपकरण. साणा. शाणी. uis चाणी घालून सुरी बरोर करणार मनुष अत्ताअग्गीन फार अप्रूप झालाहेत. 

चातुर्मास n  a period of four months from the ekadasi of the bright fortnight of Ashadh to the ekadasi of the bright fortnight  Kartika. आषाढ शुक्लपक्षाच एकादशींतून कार्तिक शुक्लपक्षाच एकादशी पर्यंतल॑ चार महिने.

चान्न n  moon. चंद्र. 

चाय n  tea. चाय. uis चाय पीणे पहिल॑-पहिल॑ चैनांत झाल म्हणून सांगतात.

चादर n  a bed sheet. अण्थूणाच/अंथरूणच वर अंथराच कापड. चदर. uis कोळ्हापूरांत मिळाच चादर घट्टि अस्त अणी ते अंथ्रूणाच व॑र पांघरिवालीन, तसच अम्च आंगाला पांघरिवालीन बरोर अस्त. 

चार n  four. तीनाच नंतरल॑ संख्या.

चार n  a spy. शत्रूच रहस्य कळाला गूढ काम करणार.

चारणे vt  to graze cattle. चरणे. (गाय, म्हैश॑, बक्रा) गौत/गवत खाणे. uis "सिटींत" गायीला, म्हैशीला चाराला ठिकाणच नाही. ते पाप कचडा-डब्बाच जवळ ओठाकून पान, कुजलते भाजी, कागद हे पूराहीं वेंचून काहींतरीन मिळ्तका/मिळेलका म्हणून पाह्त अस्त.

चाल n  gait. चालाच रीत. uis प्रसिद्ध चित्रकार एम.एप्फ़. हुसैन "गज-गामिनी" म्हणून एक सिनिमा काढले/निर्माण करले. हे नाव हत्तीच चाल हेज आधारावर ठिवलते आहे. 

चालणे vi  to walk. (पांयेंत) पुढे जाणे. uis समुद्राच कांठशीच वाळूच वर चालणे पांयाला श्रम अस्त.

चालणे vi  to be in process. होत असणे. चालू असणे. uis हे काळांत टीवींत चालू असाच कोण्त धारावाहीईं पाह्याला योग्य नाहीत झालाहे.

चालिवणे vt  to conduct. to manage. काम करिवणे ; चालविणे/चलवणे in sm. uis भरून दपा एक नव स्थापना आरंभ करापक्षा ते पुढे बरोर चालिवणेच थोर काम अस्त.

चालू adj  that which is current, in force, in action, in operation etc. सध्याला होत असाच.

चालू slng  of easy morals or ethics. not tied down by rules of conduct. करार कंडिप नाहीते. uis दादिगांच/दाद्ग्याच बरोर मान-मर्यादा पाह्यनास्क वागाच बायकोला "चालू" म्हणून सांगणे आहे.

चाळ n  a building with many apartments in a narrow lane. एक गल्लींतल॑ ल्हान-ल्हान घरांच वठारा/वाडा. uis थोर-थोर पटणांत पैसेच सौकर्य उजंड उणे आहते लोक चाळांत राहाच पाव्हुया.

चाळीस n  forty. एकोण्चाळीसाच नंतरल॑ संख्या. uis चाळीस वर्षाच उणे वय असणार लोक "बै-फोकल" अर्सा घालींगाच फार अपरूप अस्तात. 

चावडि n  Police station. पोलीस ठाणा.

चावणे vt  to bite. दांतांतून चावणे. uis "वरडाच कुत्र चावना" अस इंग्ळीषांत एक म्हण आहे.

चावि n  key. किलसात. uis चावि हरपून गेल तर तेच मादरीच अण्खीन एक चावि करींग्या पक्षा किलुप बदलिवणेच चोखोट.     

चावि देणे vt  to wind. चावि फिरिवून चालू करणे. uis मझ॑ घरांत एक "ग्रान्ड-फादर क्लोक" आहे. तला तीन वाराला एक दपा चावि देम॑.

चावी देणे fig  to instigate. चढिवणे. uis पांडवांच विरुद्ध तम्हा-तम्हा अन्याय कराला दुर्योधनाला चावी देणेच शकुनीच मुख्य काम.

चांगल॑ adj  good. nice. चांगळ॑. चोखोट. चोखट. बर॑ ; चांगला in sm. 

चांगलपण n  goodness. चांगळपण. चांगुलपण. चोखोटपण. uis थोर मनाच लोकांच चांगलपण दुरुपयोग करून पैसे मिळिवाला कितिकी दन अस्तात.

चांगुलपण n  goodness. चांगलपण. चोखोटपण.  

चांदी n  silver. रुपे. uis सोनेचीन चांदीचीन दुकान मुंबईच ज़वेरी-बज़ारांत भरून आहे.

चांद्र adj  lunar. चंद्राला संबंध झालते.

चांद्रमान n  calculations based on the movement of the moon. चंद्राच प्रदक्षिणाच आधारांत कराच इषोब. चंद्रमान. uis चांद्रमान पंचांगांत तेतीस महिनेला अधिकमास येईल.

चांद्रमास n  lunar month. एक पौर्णमि अथवा एक अमावस्यांतूं नंतरच पौर्णमि अथवा अमावस्या पर्यंतल॑ एक महिना.

चांपा n  a mat made of reed grass . एक रीतीच बरीक बेतांत केलते चटई. uis उन्हाळाच दिवसी पलंगाच व॑र अंथरूणंत निजाच पक्षा भोईवर चांपा अंथरींगून निजल तर हायशी असेल. Note. in DM  बेत means cane or rattan and in sm it is called वेत.

चांपा n  a type of flower/tree. चंपक. संपंगी (Tamil).  

चांभार n  cobbler. चंभार. काताडाच काम करणार.

चांभारीण n  cobbler's wife. चंभारीण. चांभाराच बाईल. 

चिकट adj  sticky. चिकट होणे. uis तेलाच भांडी बरोर घासना तर ते शिवताना चिकट वाटेल.

चिकटणे vi  to stick to. चिकटून असणे. uis उन्हाळांत बहेर/बाह्येर गेलतर घाम सुटून कापड आंगाला चिकटणे मला थोडक पणीं अवडनाच अवडना.

चिक्टिवणे vt  to stick. चिकटिवणे. गोंद/डिंक लावून चिकटिवणे ;  चिकटविणें/चिकटवणे in sm. uis राष्ट्रीय पार्टींच तंटा फार झालाहे. कोठ कोठ ठाम मिळते की तिकड अग्गीन त्यंच नोटीस चिक्टिवून परिसर पूरा विकार करूनटाकतात.  

चिकार adj  plenty. उदंड. उजंड. भरून.

चिकित्सा n  medical treatment. औषध/ओखद देवून आंग बरोर करणे. uis अम्च शेदारल॑ घरच॑ म्हातार मनुषाला स्ट्रोक येऊन हॉसपिटलाला बलाईंगून गेले. दहा दिवस तिकड ऐ.सी.यूंत ठींगून नंत्र पाठिवसोडले. कराच अग्गीन करणे झाल, अण्की इथपर काय चिकित्सा देलतरीन वांचाला होईना म्हणून सांगूनटाकले.  

चिकित्सालय n  hospital. हॉस्पिटल. 

चिक्कट n  sticky. चिकटून अस्णे. 

चिक्की n  a sweet made of jaggery, nuts, gram etc. एक गुळ्चीट पदार्थ ;  चिकी in sm. uis मुंबईच जवळच लोणावालांत चोखोट/चोखट चिक्की मिळेल. ते चिक्कीच नावच "लोणावाला चिक्की" म्हणतात. 

चिक्कू n  sapota fruit. एक फळाच नाव.uis चिक्कूच पंडू अधीक खाल तर पोटसूळ येईल म्हणतील.

चिक्कोल n  slush. wet mud. चिखोल. मातीहीं पाणीहीं मिळून झालते मउ साधन ;  चिखल in sm. uis दोन-तीन महिना पसून बांगळूरांत कॉरपरेषन लोके तेवढ॑ बीदीं खांडून ठिवलाहेत. पाऊसाळांत घरांतून बाह्येर उतराला होयनाते एवढ॑ चिक्कोल झालाहे. 

चिक्कोलाच-फोड n  fungal infection of the toe joints. ओले अथवा चिक्कोला मळे पांयेंच बोटाच मध्ये येयाच फोड ; चिखल्या in sm. uis पाणींत/मातींत अधीक काम करणारांन चिक्कोलाच-फोड येणे सहजच.

चिखोल n  slush. wet mud. चिक्कोल. uis दोन-तीन महिना पसून बांगळूरांत कॉरपरेषन लोके तेवढ॑ बीदीं खांडून ठिवलाहेत. पाऊसाळांत घरांतून बाह्येर/बाहेर उतराला होयनाते एवढ॑ चिखोल झालाहे. 

चिचुंदरी n  shrew. उंदीरास्क एक ल्हान प्राणि. चिचुंद्री. चुचुंद्री. चिचोंदरी. चिचोंद्री ; चिचुंदरी/चिचुंद्री/चिंचुद्री in sm. uis पाह्याला/पायाला सुमार एक सार्खच असलतरीन उंदीरहीं चिचुंदरीहीं दोन वेगळ॑ वेगळ॑ वर्गाच प्राणी आहे. Note. The other sm variations in spellings are as per J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857).

चिचुंद्री n  shrew. उंदीरास्क एक ल्हान प्राणि. चिचुंदरी. चुचुंद्री. चिचोंदरी. चिचोंद्री ; चिचुंदरी/चिचोंदरी/चिचोंद्री in sm. चिचुंद्री एक रूक्ष प्राणी आहे. चार-चार घंटेला पोट भरिवल नाहीतर भूकांत मरून जाईल म्हणून वेगळ॑ ल्हान प्राणींला खायाच प्रयत्नांत तज श्रद्धा सदाहीं अस्त. Note. The other sm variations in spellings are as per J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857). 

चिचोंदरी n  shrew. उंदीरास्क एक ल्हान प्राणि. चिचुंद्री. चिचुंदरी. चुचुंद्री. चिचोंद्री ; चिचुंदरी/चिचुंद्री/चिंचुद्री in sm. uis साधारण होऊन चिचोंदरी मनुषांच घरांत घूंसून संपाक खोलींत नाश-नष्ट करना. अम्च घरांत घूंसलतरीन वेगळ॑ प्राणींला खाया करतां मात्र येईल. Note. The other sm variations in spellings are as per J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857).    

चिचोंद्री n  shrew. उंदीरास्क एक ल्हान प्राणि. चिचुंद्री. चिचुंदरी. चिचोंदरी. चुचुंद्री ; चिचुंदरी/चिचुंद्री/चिंचुद्री in sm. uis चुकाला वेगळ॑ वाट नाही म्हणताना तजपक्षा मोठ जंतूला आक्रमण कराला चिचोंद्री प्रयत्न करेल. Note. The other sm variations in spellings are as per J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857).

चिटपांखरू n  any tiny bird. एक ल्हान पक्षी. Note. चिट means small and पांख means "wings" or पक्षी.    

चिटपांखरू n  any small flying insect. ल्हान उढाच किडा. Note. (1) चिट means small and पांख means "wings" or पक्षी. (2) the term पांखरू is freely applied to butterflies, moths and similar winged creatures vide J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857)   

चिटपांखरू n  an expression denoting utter stillness or solitude. एकदम विजन स्थळाला (ओस स्थळाला) उद्देश करून सांगाच एक गोष्ट. Note. from चिट (still, silently) and पांखरूं (a bird). uis देऊळाच सदस्य लोके मला त्यंच एक कार्यक्रमाला मुख्य-अतिथी म्हणून बलावले. पण, मी जाऊन पाह्ताना तथ॑ चिटपांखरू पणीं होत नाही.         

चिट्टि n  small notings in a paper. कागदांत लिव्हलते/लिवलते ल्हान विषय ; चिठ्ठी in sm. uis डोक्टर लिव्हून/लिवून देलते ओखदाच/औष्धाच चिट्टि हरपून गेलते मळे मला पुन्हा एक दपा डोक्टराकडे जामते पडल॑.

चिट्टि n  a list (of any thing). विषयांच चिट्टि. uis संपाकाला आवश्य आहेते सामग्री अग्गीन बाजू असाच दुकानांतूनच अम्ही घ्याच॑. महिना महिनेला चिट्टि लिव्हून पाठिवलतर॑ ते अग्गीन दुकानाच पोर घरांतच आणून घालूनटाकल॑. 

चिट्टि  n  a type of small (monthly) savings normally practiced by housewives and encouraged by shop keepers to obtain interest free finance. दुकानवाले (साधारण होऊन बायकेंला) महिना-महिने पैसे मिळिवून सामान घ्याला प्रोत्साह करिवाच एक पद्धती. uis (1) 5/6 तेतीच/तारीखाच नंतर पैसे हातांत उरेल का म्हणून त्यंच मनांत भें अस्त म्हणून मध्यम वर्गाच बायके जास्त म्हणून चिट्टि बांधतात.  (2) कां म्हणून कळना, बायकांस चिट्टींत मिळणे म्हणजे फार उत्साह अस्त. Note. from Tamil. 

चिडक॑ adj  peevish. शिडक॑ ; चिडका in sm. uis तज चिडक॑ तोंड पाहतानच कळते तला कोण की अपमान केले म्हणून. 

चिडकोर adj  peevish. irritable. hot-tempered. लोकुर राग येणार. शिडकोर. चिडखोर ; चिडखोर in sm.

चिडणे vi  to get irritated. राग येणे. शिडणे. 

चिडिवणे vt  to irritate. राग आणिवणे. शिडिवणे ;  चिडविणें/चिडवणे in sm.

चिता n  funeral pyre. प्रेताला जळिवाच विस्तु.

चिताभस्म n  funeral ashes. चितांतूं काढलते भस्म. uis शव-संस्कार झाल नंतर चिताभस्म समुद्रांतकी नदींतकी मिळिवणे आहे.

चिताभूमी n  cremation ghat. स्मशान. uis दिवसों-दिवस बंगळूर पट्णाच जनसंख्या वाढत आहे अणी त्यामळे नव॑ फ्ळाटांच संख्याहीं वाढत आहे. परिस्थिती एवढ॑ मोस॑ झालाहे म्हणजे, चिताभूमींत बांधलते फ्ळाट पणीं घ्याला लोके तय्यार आहेत.  

चित्र  n  picture. पेट. पट. uis शंभर वर्षाच पुढे राजा रविवर्मा ओढलते/होढलते चित्र अत्ता पणीन उजंड प्रचारांत अहे म्हणताना त्यंच चित्रकला कित्ती थोर होत म्हणून कळींगुया.

चित्रकला n  the art of drawing or painting. पट ओढाच/होढाच कला. uis वर्षा-वर्षी बंगळूरांत कुमार-कृपा बीदींत चालाच चित्रकला प्रदर्शन उदंड प्रसिद्ध झालाहे अणी त्यांत भाग काढाला पूरा देशांतून कलाकार/चित्रकार येतात. 

चित्रकार n  painter of pictures. पेट/पट ओढणार/होढणार.

चित्रगुप्त n  celestial account-keeper for Yama. पाप पुण्य हे विषयांच इषोब ठिवाच यमदेवाच एक अधिकारी. uis कायस्थ, माथूर असलते वर्गांत असणार लोके चित्रगुप्ताच वंशांत मिळ्लतेनी म्हणतात.

चित्रपट n  a cinema. सिनिमा. चलचित्र. 

चित्रवध n  massacre. decimation. अनेकांस क्रूर होवून मरिवणे. uis महाभारत युद्ध झालांपिरी पांडवांच सैन्याला अश्वत्थामा रात्रीच वेळ त्यनी झोंपींत असताना चित्रवध केले.

चित्रवध fig  reduce to naught or gibberish. सत्यनाश. uis मझ लेंकीच वराडांत "रिसप्षनाला" कोणाच की  शिपारीशांत गाणेच कचेरी एर्पाड केलोतों. पण, कचेरी केलत्या ते कार्यक्रम चित्रवध करून मझ मान-मर्यादा काढूनटाकला. मला नवराच घरच लोकांला तोंड दाखिवाला होयनास्क झाल॑.

चित्रा n  name of one of the 27 stars of Hindu astrology. हिंदु ज्योतिष शास्त्रांतल॑ 27 नक्षत्रांत एक नक्षत्राच नाव. uis अम्च लोंकाच जातका प्रकार तज नक्षत्र चित्रा अणी राशी तुला आहे.

चित्रान्ना  n  a type of rice preparation. भातांत केलते एक पदार्थ. फोड्णीच भात. uis पाष्टेच पल्हाराला/फल्हाराला चित्रान्ना म्हणून मझ बाईल मला सांगतानाच मला वाटले, रात्रीच उरलते भातांत ते केलसेल म्हणून ! Note. from Kannada.
 
चित्राहुति n  food kept for devas on the right side of the leaf before partaking of food. जेवाच पुढे देवतांला म्हणून पानाच उजवकडे ठिवाच भाताच घांस. uis चित्राहुति करताना "चित्राय नम:, चित्रगुप्ताय नम:, यमाय नम:, सर्व भूतोभ्यो नम:" अस सांगून जेवाच पानाच उजव पटीस तीन-चार कणे भात ठिवणे आहे.

चिदानंद n  intellectual bliss. ज्ञानाच आनंद. ब्रह्मानंद.

चिन्मय adj  of pure intelligence. शुद्ध ज्ञान. 

चिन्ह n  a sign. a mark. a symbol. खूण. अडयालम (Tamil). uis कपाळांतल॑ नामाच चिन्ह पाव्हून/पावून तमिल अय्यंगारां मध्ये तेनी तेनकिळैका वडकिळैका म्हणून सांगाला होईल.

चिपळ्या n  the two small wooden sticks or flats used for clapping and accompanying a musical discourse. हरिकथा कालक्षेप (कीर्तन) करताना वाजिवाच लांकडाच ल्हान वाद्य.
चिप्पा n  peel or rind of a fruit or vegetable. फलाच नाही भाजीपालाच सालपट. uis केळे सोलून चिप्पा बीदींत घाट्ल तर लोक ते तुडिवून निसरून पडतील.

चिप्पि n  seashell. शिंप. uis अम्ही ल्हान अस्ताना अम्च घर समुद्राच जवळ होत॑. तम्हा नित्य संध्याकाळी समुद्राकडे जावून चिप्पि हुडुकून काढणे अम्च एक खेळ होत॑. Note. from Tamil.

चिमट n  pinch. दोन बोटाच मध्ये चेंपणे. चुमट ; चिमूट/चिमट in sm. uis ते पोर अन्याय खोडी करत होता म्हणून मी तला एक चिमट देलों.

चिमट n  a pinch (of anything). दोन बोटा वाटे चिमटून काढाच एवढ॑. नंखर. चिमटा. चुमटा. uis आज केलते भाजीला एक चिमट मीठ उणे आहे.

चिमटणे vt  to pinch. चुमटणे. दोन बोटा वाटे चेंपणे.

चिमटा n  a pinch (of anything). दोन बोटाच मध्ये चिमटून काढाच एवढ॑. नंखर. चिमट. चुमटा. uis ताकपाणीला एक चिमटा मीठ घाट्लतर रूच अण्खीन बेष असेल.

चिमटा n  pincers. tongs. चिमटी. हिडिक्कि (Kannada). uis विदेशाला जाताना अम्च लोक मुख्य म्हणून घेऊन जायाच भांडींच बरोर चिमटा अवश्य असेल.

चिमटी n  pincers. tongs. चिमटा. हिडिक्कि (Kannada).  

चिमणा n  a cute little boy. चुमणा.

चिमणी n  sparrow. चुमणी. uis अम्च घराच बाल्कनींत तुळसीच रोप आहे. तज शेदारीच एक मातीच परातांत अम्ही पाणी ठिवतों. दिसोडी पाष्टे (पाहटे) दोन चिमणी येऊन आंघोळी करून तुळसीच बीं तोडून उडून जात॑. ते दोघीं गेल जन्मांत ब्राह्मण असलासाम !

चिरड॑ n  irritation. annoyance. मनाच तंटा. uis तो पुन्हा-पुन्हा सांगिट्ल तेच सांगत अस्तो. ऐकून मला चिरड॑ येते.

चिरड॑ n  derisive or disdainful attitude. उणीवता. एळक्करम (Tamil). uis अरुणोदि उठून दंडक झालते लोकांला उशीर होऊन उठाच लोकांना पाह्यिल तर चिरड॑ अस्त.

चिरडी n  a piece of cloth (shorter than a sari) used by poor women to cover themselves. दरिद्र बायके नेसाच लुगडाच पक्षा ल्हान असाच एक कापड. uis ग्रामांत काम मिळनास्क तथेल॑/तेथल॑ दरिद्र लोक पट्ट्णाला येऊन रोडाच कोनेंत संसार करणे, अणी त्यंच बायका चिरडी नेसून असणे, लेंकरे नावगान हिंडणे, हे सर्वीन पाह्याला फार कष्ट वाटते. देव म्हणणर एकला आहे का नाही का म्हणून संदेह पणीं येते.

चिरणे vi  & vt   to cut into pieces. to slice. कापून ल्हान-ल्हान फोडी करणे. uis आवक्काई लोणचे करताना अंबा गोट्टीनिशी चिरून घालणे आहे.

चिरमोरे n  a  snack made of parched-rice, mixed with assorted fried and roasted munchies. चुरमोरे. भाजलते पोहेंत॑ विध-विध पदार्थ तळून घालून केलते मिक्स्चर (English). uis चिरमोरे खायाला बेष असेलतरीन, जास्ती खाऊनटाकलतर॑ पोटाला तंटा होईल. 

चिरलते बोटाला चुण्णा लावनाते मनुष fig  a miserly person. कंजूस मनुष. हिमटा मनुष. 

चिरंजीवि n  immortal. अमर. uis हिंदु पुराणांत सात चिरंजीवी आहेत.

चिरोटी n  a sweet poori like preparation of several layers made of chiroti rava. एक प्रत्येक रवांत केलते पूरीस्क असाच एक गुळ्चीट पदार्थ ; चिरोटी/चिरोटा/चिरोंटी in sm. uis चिरोटीच बरोर साखरेच पूड अणी बादाम-दूध मिळिवून खाणे आहे. 

चिल्लर n  small coins. change. ल्हान मोलाच पैसाच नाणय/नाण्य. uis एटीएम, गूगळ-पे असलते अग्गीन आला नंतर चिल्लर नाण्य मिळणे फार कष्ट झालाहे. Note. नाणय in DM for coins and in sm it is नाणी.

चिल्लरखर्च n  stray expenses. इकडे-तिकडे कराच ल्हान खर्च. uis भाजीपालावालाकडून मिर्शिंगा, करेपाक नाही कोथिंबीर/कोत्तमल्लि घ्यालाकी, नाही, संपाकाला वेगळ॑ अवसरांत पह्जते कायतरीन घ्यालाकी म्हणून मझ बाईल संपाक घरांत केम्हीन चिल्लरखर्चाला म्हणून थोड पैसे ठींगेल.

चिवडा n  a snack of a mixture of fried munchies. मिक्स्चर. uis उत्तर भारतांत कराच चिवडांत दाळ-मोठ अणी बडीशेप/सोंफ हे अग्गीन असामळे तज रूच मला अवडना.    

चिंच n  tamarind fruit used in cooking. संपाकाला उपयोग कराच एक रीतीच फळ. uis दक्षिण भारतांत संपाकाला चिंच फार उपयोग करतील.

चिंच-मीठ adj  sour/tangy and salty. अंबट अणी मीठाच रूच. uis आज अम्च घरांत केलते संपाक सप्पक होत॑. चिंच-मीठ नंखर उणे होत वाटते.

चिंचोणी n  tamarind seeds. चिंचोणे. चिंचाच बीं ; चिंचोका in sm. uis चिंचोणी भाजून खायाला बेष असेल.

चिंचोणे n  tamarind seeds. चिंचोणी. चिंचाच बीं ; चिंचोका in sm. uis उडुपीच जवळ असाच पाजक क्षेत्रांत श्री मध्वाचार्या उजलते घरांत गेलते सगळ॑ भक्तजनांसीन ते घराच मागे वाढलते चिंच झाडाच बीं, म्हणजे चिंचोणे देतील. हेज मागे श्री मध्वाचार्यांच बाळपणांत झालते एक थोर पुण्य कथा/खाणी आहे.  

चिंतना n  contemplation. thinking. विचार. uis झालते अग्गीन जाऊनदे. पुढे येयाच वेळांत असलते नष्ट होताने म्हणजे बेष चिंतना करूनेच सराम/सरांव.  

चिंता n  worry. anxiety. संकट योचना. uis लोंक बरोर वाचनास्क अवघड पोरांच बरोर हिंडत आहे म्हणून मझ मित्राला थोर चिंता झालाहे.

चिंता n  thinking. pondering. योचना करणे. uis तो कां अस बोलला म्हणून कित्ती चिंता करून पाह्यल तरीन मला समजल नाही.

चिंतामणि n  wishing stone. म्हणींगाच वस्तू द्याच एक रत्न. 

चिंधि n  a rag. tattered cloth or garment. फाटक कापड. वातर. uis कुर्सी, पलंग, चौरंग असलते साधन पुसाला म्हणून केम्हाहीं/केम्हीन दोन तीन चिंधि अम्च घरांत असेल.

चीटी n  printed cotton cloth. छापलते कापूसाच कापड ; चीट in sm. uis हे काळांत थोर नगरांत चीटीच "नैट-गौण" अणी चोळी हे अग्गीन कामवाले पणीन घालींगनात. खेडे गांवांत (गामांत) अत्ता पणीन चीटी घेणार आहेते. Note. (1) used in the old days for frocks/blouses. (2) "chintz" in English, from चिंट of Gujarati.

चीनी n  sugar. साखरे.  

चीर n  a crack. a split. (बाहेरच भाग मात्र) लांब आकारांत फुटून असणे. uis 'सिमेंट प्लास्टर' कराला उपयोग कराच वाळूंत माती असल तर थोड दिवसाच नंतर भिंतीत चीर येईल.

चुकणे vi  to err. to commit faults or errors. चूक होणे. uis ते ल्हान पोरी उदंड षाणी (शाणी) वाटते. एक वारांतच तिन॑ विष्णु-सहस्रनाम पूरा चुकनास्क सांगाला शिकींगटली.  

चुकणे vi  to stray or deviate. वाट चुकणे. uis घरच मांदराला किती दूर जावून सोडल तरीन, चुकनास्क ते परतून घराला येऊन पावेल. 

चुकणे vi  to miss (aim, target, destination etc). लागनास्क/पावनास्क होणे. uis (1) अंबाच झाडांत पिकलते तीन अंबा होत॑. मी तीन दपा भिरकावलते धोंडा तीन दपाईं चुकनास्क ते तीन अंबालीन लागले. (2) वाट चुकनास्क जायाला कळ्ळ तर तू यांस अत्ताच बलाईंगून जा.   

चुकणे vi  to evade. to escape. सुटून पळणे. uis पोलीस ठाणांतून तो चोरटा चुकून पळून गेलते विषय अन्वेषण करतान कळ्ळ॑, पोलीस लोकेच तला सुटिवलते म्हणून.

चुकिवणे vt  to make some one commit a mistake. दूसरेकडून चूक करिवणे. uis इषोबच/हिषोबाच एक प्रश्न मी बरोर करत अस्ताना मझ बाजू बसणार मध्य पडून मला चुकिवला.

चुकिवणे vt  to set some one free/escape. सुटिवणे. uis जैलांत/कैदांत घाटलते नक्सलैट्सांला तिकडून चुकिवाला "ह्यूमन रैट्स" लोके कराच प्रयत्न पाह्यलतर मला फार बेजार वाटते. Note. (1) in sm सुटणे (vi) means 'to get loose from bonds' , 'to go off (like a bomb)'. In DM सुटिवणे (vt) means 'setting free'. (2) चुकवणे/चुकविणे in sm means 'to evade' , 'to avoid', 'to shun'.

चुकूनपिकून adv  by blundering inadvertence. inadvertently. not by design. by chance. चुकूनमाकून. अप्पून-तप्पून (Tamil).

चुकूनमाकून adv  by blundering inadvertence. inadvertently. not by design. by chance. चुकूनपिकून. अप्पून-तप्पून (Tamil) ; चुकूनमाकून/चुकूनवाकून in sm.  uis मला कळून तो वाचणेंत शाणा (षाणा) काहीं नहो. कस की चुकूनमाकून परीक्षा जिंतला.

चुक्कुनूरु  adj  broken-up and scattered. छिन्नाभिन्न. चूर-चूर होऊन इकडे-तिकडे होणे. uis ते ल्हान पोर विपरीत चेष्टा करतो. कोण्त बावोली हातांत मिळ्ल तरीन ते चुक्कुनूर करनातर तला मनस्समाधान येइना. Note. from Tamil. 

चुचुंद्री n  shrew. उंदीरास्क एक ल्हान प्राणि. चिचुंद्री. चिचुंदरी. चिचोंदरी. चिचोंद्री ; चिचुंदरी/चिचुंद्री/चिंचुद्री in sm. uis पाह्याला सुमार एक सार्खच असलतरीन उंदीरहीं चुचुंद्रीहीं दोन वेगळ॑ वेगळ॑ वर्गाच प्राणी आहे. Note. The other sm variations in spellings are as per J.T. Molesworth's A Dictionary of Marathi English (1857).

चुट्टा n  cheroot. a type of rolled-up country cigar. गुंडाळून केलते देशी सिगरेट. uis अम्च घरच॑ गृहप्रवेशाच कार्यक्रम होत अस्ताना चौदा वर्षाच मझ चुलत भाऊ माडीवर जाऊन सिगरट फुंकत होता. ते पाव्हून मझ आजा वरडले, "चुट्टा पिट्टा पीलतर तुज सालपट सोळूनटाकेन" म्हणून ! Note. The word "चुट्टा" appears to be a shortened form of the Tamil word "shuruttu" (शुरुत्तु) or the Malayalam word चुरुट्टु, meaning "a roll (of tobacco)". The etymology of the English word "cheroot" is शुरुत्तु / चुरुट्टु. 

चुणा n  lime paste. चुण्णा uis विडाच पान खाताना चुणा जास्ति लावलतर जिव्ह॑ जळेल. 

चुण्णा n  lime paste. चुणा. uis जुने काळांत घर बांधाला सिमेन्टाच बद्दिल चुण्णा वापरत होते.

चुपचाप adv  silently. गपचुप. uis बाजू घरच मनुष कायकी विषय काढींगून अम्चकडे भांडाला आला. नंतर चूक तजच म्हणून कळ्ळांपिरी चुपचाप डोस्के लवींगून उतरून गेला.

चुमट n  a pinch. बोटा वाटी चेंपणे. चिमट ; चिमूट/चिमट in sm. 

चुमटणे vt  to pinch. चिमटणे. दोन बोटाच मध्ये चेंपणे. uis तो मला खेळांत चुमटलते अत्ता पणीं दुखत आहे.

चुमण adj  small. ल्हान ; चुमणा in sm. uis चुमण वयेंतूनच "मॅंडलिन" श्रीनिवास त्यंच अद्भुत सामर्थ्य भूलोकाला दाखिवले अणी "जीनियस" म्हणून प्रशस्ति घेट्ले.  

चुमणा adj  small (boy). ल्हान पोर. uis चुमणा पोर म्हणून तुला यंदा सोडतों. केलते खोडीला दोन रपाटा ओढल/होढल असाम/असांव.

चुमणी adj  small (girl). ल्हान पोरी. चिम्मी. चिमणी. uis चुमणी पोरी म्हणून असतानच तिन॑ मूकप्राणींच व॑र अपार स्नेह दाखिवत होती. 

चुमणी n  sparrow. एक ल्हान पक्षी. चिमणी. uis झाड उणे झालामळे की "बिल्डिंगस"/बांधणी अधीक झालामळे की पट्णांत (सिटींत) चुमणींच संख्या उदंड उणे झालाहे. 

चुरचुरणे vi  to tingle. मुंग्या येणे. uis पाष्टे झोंपींतून उठताना उजव॑ हाताच कोंपुर पलंगांत लागून चुरचुराला आरंभ झालते, एक घंटे पर्यंतीन सुटल नाही. अत्ता कायकी थोड उणे झालाहे.   

चुरमुरा n  a  snack of parched rice mixed with assorted fried and roasted munchies. चिरमोरे. चुरमोरे. मुरमुरा. uis बाह्येरच गामाला निघताना अम्च आजी चुरमुरा काढींगून येयाला विसरनाच विसरना. 

चुरमोरे n  a  snack of parched rice mixed with assorted fried and roasted munchies. चिरमोरे. चुरमुरा. मुरमुरा. uis देशस्थ लोकांच घरांत कराच चुरमोरेस्क वेगळ कोठीन मिळना.

चुरी n  knife. सुरी. चाकू. कत्ती (Tamil) ;  सुरी in sm. uis प्लेनांत तीन इंचाच चुरी पणीन घेऊन जायाला अनुमती देत नाहीत/सोडत नाहीत. 

चुलत adj  relatives from the paternal side. बापाचकडेल॑ सोयरीक लोके. uis चुलत सोयरांच पटीस कोणाचतरीन निधन/मरण झालतर अम्हाला दहा दिवसाच सूतक करामते पडेल.

चुलतआजा n  father's father's brother. बापाच बापाच भाऊ.

चुलतबहीण n  paternal uncle's daughter. काकाच लेंक. uis मझ बापा त्यंच (तेंच) घरांत तेवढ॑ दना बरीस वडील असणामळे मझ एक चुलतबहीण मझ बरीस चाळीस वर्ष धक्टी/धकटी आहे ! 

चुलतभाऊ n  paternal uncle's son. काकाच लोंक. uis मझ एक चुलतभाऊ अत्ताच इन्जनीरिंगांत मिळालाहे. तो मझ बरीस पन्नास-व॑र-दोन (52) वर्ष चुमणा आहे.

चुळा n  a large earthen fire place. एक मोठ विस्तूच चूल ; चुला in sm. uis वीट कराच चुळा एकदपा पेटिवलतर उदंड दिवस ते जळत असेल.

चुंडेकाय  n  name of an edible seed used in preparations of sambhar and sun-dried fritters. एक ल्हान झुडूपाच बीं. हे सांभार, काचराच-वड्या (संडिगे) असल॑ पदार्थांत उपयोग होत॑. सुंडेकाय. uis गोड्डुपिट्ळेंत कांगोण्या (मणतक्काळी) नाही, चुंडेकाय/सुंडेकाय तळून घालणे आहे. Note. from Tamil.

चूक n  a wrong thing. a mistake. चूक. uis केलते चूकाला प्रायश्चित्त कराच पक्षा, ते बरोर करणेच चोखोट/चोखट..

चूक n  error. चूक. uis इषोबाच/हिषोबाच परीक्षांत मझ नातु नुस्त एक चूक केलत्यामळे शंभराला शंभर मिळ्ळ॑ नाही.

चूक n  blunder. चूक. uis 1962 च भारत-चीन युद्धांत अम्च देशाला थोर पराजय झाल. अम्च प्रधानमंत्री जवहरलाल नेहरू चीनाला आवश्याच पक्षा अधीक विसंबून अम्च सेनाला बरोरल तय्यारींत ठींगनाते चूकामळे अम्हाला हे पराजय सोसांवते/सोसामते पड्ल॑.   

चूक n  fault. चूक. uis नवरीच थोरळा भाऊच मूर्खपणामळे हे वराड राहून गेल॑. पूरा चूकीन तजेच.

चूक adj  mistaken. incorrect. uis तंजाऊर मराठी पुणे मराठीच एक अशुद्ध रूप आहे अस एक चूक अभिप्राय लोकांस आहे.

चूक सांगणे vt  to find fault. आरोप करणे. uis हे वराड राहून गेलत्याला अम्ही अग्गीन जवाबदारी आहों. अत्ता कोणालीं चूक सांगून प्रयोजन नाही.

चूडामणि n  crest jewel. किरीटांतल॑ रत्न.

चूप adj  sharp. कूर्प. शूर्प. uis अम्च घरच सुरी तेवढीन मोंड झालाहे. साणावाला आलतर ते अग्गीन तला देऊन चूप करिवाम/करिवांव. Note : चूप is from Kannada and कूर्प is from Telugu. 

चूर n  a fragment. a bit. तुकडा. uis मला तिरुपती लाडूच एक ल्हान चूर देलतर पुरे, कां म्हणजे मला डयबीटीस आहे. 

चूरचूर n  pieces. shattered bits. मोडून चुक्कुनूर झालते. uis बरोरल॑ श्रद्धा दाखिवनास्क अर्सा हाती काढताना चुकून खाले पडून चूरचूर झाल.  

चूर्ण n  ayurvedic medicines in powder form. पूड केलते आयुर्वेद ओखद/औषध. uis साधारण होऊन आयुर्वेदाच ओखद/औषध चूर्ण, लेह्य अणी कषाय अस तीन रूपांत अस्त.

चूल n  fireplace for cooking. stove. oven. संपाकाच विस्तू पेटीवाच चूल. uis जुने काळांत लांकडाच चूल पेटिवणे म्हणजे एक थोर तापत्रयाच काम होत॑. भिजलते लांकड म्हणजे अण्खीन कष्ट.

चूळ n  mouthful (of water). (पाणींत) भरलते तोंड. uis  गोचका (विक्कल) आलतर एक चूळ पाणी सात भाग करून गिळलतर शांत होईल.

चूळ भरणे vt  to fill one's mouth with water for rinsing. तोंड भरून पाणी काढून तोंड शुद्ध करणे.

चेतना n vitality. जीवशक्ती.

चेला n  disciple. शिष्य. चेळा. 

चेला n  side-kick. a helper. उणे स्थितीच सहायक. चेळा. uis कपट सन्यासी नित्यानंदाच अवघड काम पोलीसाला दाखिवून देलते तजेच एक चेला म्हणून सांगतात.

चेष्टा n  mischief. prank. विनोदाच खोडी. चेष्टप्ण. uis मझ लोंक चार-पांच वर्षाच वये अस्ताना उजंड चेष्टा करत होता. पण अत्ता थोर्ळा झाल व॑र चेष्टपण अग्गीन सोडून उदंड/उजंड मर्यादान आहे.

चेष्टपण n  mischievousness. विनोदाच खोडी. uis येतां येतां तज चेष्टपण जास्ती होत आहे. लाड जास्ती होऊनगेल की कायकी.

चेंचणे vt  to pound or crush roughly. चेंचरणे. ठेंचणे. uis वरुवंटांत चेंचून कराच हिर्व/हिरव॑ चिंचाच टेंचा (तोक्कु) भातांत तेल घालून कालिवून खायाला बेष असेल.

चेंचणे vt  to crush and cause to bruise. चेंचरणे. चेंपून घाव करणे. चेंदरणे. 

चेंचरणे vt   to squeeze. to compress. चेंचणे. 

चेंडु  n  bouquet of flowers. फूलाच गुच्छ. काठीनीशी मिळिवून बांधलते विध-विधाच फूल. Note. from Tamil.

चेंदरणे vt  to crush and cause to bruise. चेंपून घाव करणे. चेंचणे. uis भिंतींत आणि (खिळा) बडिवताना जागृतान कराम. नाहीतर चुकून बोट चेंदरून जाईल.

चेंपणे vt   to squeeze. to compress. चेंचणे ;  चेपणें in sm. uis आवश्य नाहीस्क पिकलते फोडाला चेंपून पू काढ नको म्हणून सांगूनीं तो ऐकला नाही. अत्ता ते एक थोर व्रण (रण) झालाहे.

चैत्र n  first month of the Hindu year. पंचांगांतल॑ पहिलच/पह्यिलच महिना. 

चोक्कोट adj  good. fine. excellent. ओंगळाच/वंगळाच विरुद्ध. चक्कोट. चखोट. चोखोट. चोखट ; चोखट/चखोट in sm. uis दुसरेंस अम्ही चोक्कोट केलतर एक दिवस तज चोक्कोट परिणाम येऊनेच सरेल. Note. (1) better चोखट or चोखोट. (2) चोख in old sm and in some Central Indian tribal languages means "clean, pure, apt, good" etc. 

चोक्कोट तेल n  gingili oil. sesame oil. तीळाच तेल. चक्कोट तेल. चखोट तेल. चोखोट तेल. चोखट तेल. uis देवाच॑ दिवा चक्कोट तेलांत॑च लावाम म्हणाच पद्धताच आधार काय म्हणून कळत नाही. ते सवंग होत म्हणाकरतांकी कायकी. Note. (1) better चोखोट/चोखट तेल. (2) This word appears to be a direct transliteration from the Tamil word नल्लेण्णै, meaning "good-oil". The Tamil word itself appears to be morphed from एळ्ळेण्णै, "एळ्ळु" in Tamil meaning "sesame".  

चोक्कोट सरप n  cobra snake. नाग सरप. नागराजा. Note. (1) better चोखट/चोखोट सरप/सर्प. (2) this is a direct transliteration from the Tamil नल्ल-पांबु, meaning "good snake".  

चोखट adj  good. fine. excellent. ओंगळाच/वंगळाच विरुद्ध. चोक्कोट. चक्कोट. चखोट. चोखोट ; चोखट/चखोट in sm. uis एक दिवस अम्च मित्राच लेंकीच भरतनाट्यम अरंगेट्रमाला गेल होतों. फारेच बेष होत॑. विचारताना कळ्ळ॑, तिज गुरु एक चोखट विध्वान होते म्हणून. Note. (1) better चोखट. (2) चोख in old sm and in some Central Indian tribal languages means "clean, pure, apt, good" etc. 

चोखोट adj  good. fine. excellent. ओंगळाच/वंगळाच विरुद्ध. चोखट. चखोट. चोक्कोट. चक्कोट ; चोखट/चखोट in sm. uis चोखोट वेळ, थोर रिचिवाच वार॑-पाऊस आरंभ होयाच पुढे अम्ही घराला येऊन पावलों. Note. (1) better चोखोट. (2) चोख in old sm and in some Central Indian tribal languages means "clean, pure, apt, good" etc. 

चोचो n  name of a vegetable. चौचौ. एक भाजीपालाच नाव. uis (1) मेक्सिको राज्यांतून वेगळ॑ देशाला प्रचार झालते हे भाजीपालाला ते राज्यांत "चयोटे" म्हणतात. भारतांत हेला चौचौ म्हणून पणीन सांगतात. (2) चौचौच खर नाव चोचो म्हणून भरूनदनांला कळना.

चोपाळा n  an indoor swing with a large flat wooden plank, hung by four chains. चोंपाळा. जोपाळा. झोपाळा. घरच आंत चार सांखळींतून छतांतून लोंबून घालाच लांब रुंद लांकडाच पालणा/ झूला. uis चोपाळा जोरान ढकळून खेळलतर ल्हान लेंकरांस तजांत बसाला भें वाटेल. Note. चोपाळा has its origin in चौ or चो meaning चार and पांये, legs. In olden times चोपाळा had four wooden legs and when removed off the chains it could be kept on the floor for other purposes. 

चोरटा n  thief. चोर्टा. चोर्टपण करणार. uis (1) मझ बापा चोरटा आलास्क सोप्पन/स्वप्न पडून अर्ध रात्री झोंपींत वरडतील. (2) पोलीसवाले ल्हान चोर्टेंना धराला तैयार असतात, पण थोर-थोर चोर्टेंच जवळ जायाला भींगतात. कारण त्येंचकडे पदवींत असणार लोके त्येंच परिचयाच असतात.

चोरणे vt  to steal. दूसरेंच वस्तू त्यास/तेनाला कळनास्क काढणे. uis चोरणे, लटक सांगणे असलत्या पक्षा नीच कार्य वेगळ॑ काहीनच नाही.

चोरी n  theft. चोर्टपण. uis भारत देशांत रिकाम असणारांच संख्या वाढल॑ त्या मळे चोरी अणी डकायटी जास्त होत आहे.

चोर्टपण n  thievery. चोरी. uis 'एल.पी.जी’ ग्यासाच व॑र निर्बंध असणामळे ग्यास डिस्ट्रिब्यूटर चोर्टपणान सिलिंडर जास्त मोलाला विकतात. 

चोर्टपण n  thieving metality. चोरी कराच स्वभाव. uis तला कित्ति तरीन उपदेश देऊन पणीन चोर्टपणाच बुद्द अण्खीन सोडला नाही म्हणून ऐकून मला उजंड संकट झाल॑.

चोर्टपण n  deceit. एमारिवाच स्वभाव. uis रेजिस्ट्रार आफींसांत काम करणार गुमास्ता तेथल॑ आधार-पत्र (डाकूमेन्ट) बदलीवून चोर्टपणान एकलेंच भूमि दूसरेंना विकतात.

चोर्टा n  thief. चोरटा. चोर्टपण करणार. 

चोर्टा पडाच वेळ fig  very early in the morning when all are deep in slumber. पाष्टे-पाष्टे अग्गिदनीं गाढ झोंपांत असाच वेळ. ब्रह्म मुहूर्ताच वेळ.  

चोर्टाला विंचू चावलतेस्क fig  like the condition of a guilty person  or, despite extreme provocation to himself, dare not retort lest his guilt is found out. चूक केलते मनुष तज चूक वेगळ॑ कोणाच गवनांतीन येईनास्क असाकरतां तोंड उघडाला होयनाते अवस्थांत सांपडींगाच स्थिती.  

चोवीस adj  twenty-four. तेवीसाच नंतरल॑ संख्या. uis भारत देशांत इतपर कोण्त ठामहीं चोवीस घंटे ’करंट’ असाला संभव नाही. कारण, करंटाच उतपत्ती अवश्या बरीस 40% उण॑ आहे.

चोळणे vt  to rub with hand. हाता वाटे रगडणे/घासणे. uis मला दोन दिवसा पसून उजव डोळे कंड होत होते. रत्री झोंपींत मला कळनास्क ते चोळून चोळून अत्ता तंबड झालाहे.

चोळि n  blouse. बायके थान झांकून नेसाच वस्त्र. uis हे काळाच फॅषनाच (अलंकाराच) चोळि शिवाला शंपीलोक (दर्जीलोक) उणेपक्षा एक हदार/हज़ार रुपे काढतात म्हणून ऐकून मला विश्वास होत नाही. 

चोळून-मारणे fig  to squeeze the hell out someone. फार उपद्रव देणे. uis साधारणविणी ऑफीसांत व॑रला धिकारी काम जास्त घेटलतर "चोळून मारतो" म्हणून सांगणे आहे. पण, वेगळ॑ विधांत पाह्यतर ते अम्च चोखोटालाच म्हणींगाम. कारण, तजमळे नव-नव काम शिकाला अवकाश मिळते.

चोंपाळा n  an indoor swing with a large flat wooden plank, hung by four chains. चोपाळा. जोपाळा. झोपाळा. घरच आंत॑ चार सांखळींतून लोंबून घालाच लांब रुंदाच लांकडाच पालणा/ झूला. uis अम्ही जोर होऊन चोंपाळांत खेळत असताना मझ धक्टी बहीण/बहिणी समोर आली अणी चोंपाळाच पाट तिज कपाळाला लागून मोठ ऊत आल॑. नंतर ते ऊताच व॑र बर्फा/ऐस चेंपून शांत करिवले.  Note. चोंपाळा has its origin in चौ or चो meaning चार and पांये, legs. In olden times चोंपाळा had four wooden legs and when removed off the chains it could be kept on the floor for other purposes. 

चोंबु n  a small vessel for carrying or pouring water etc. तांबे. पाणी भरून टिवालकी ओतून घालालकी वापराच एक ल्हान पात्र ; चंबु in sm. uis जुने काळांत नाहणींत आंघोळी कराला तांबेच चोंबु वापरत होते, पण अत्त हे काळांत प्ळास्टिकाच मग वापरात.

चौक n  a square. चौक. चार पटीसीन एकच लाब(रुंद) असाच आकार.

चौक n  a thin handloom cloth towel. आंग पुसींगाच एक पत्तळ खादीच कापड. uis प्रयाण करताना जाड "टर्की-टवल" काढींगून जायाच पक्षा पत्तळ चौक काढींगून जणे सौकर्य असेल.

चौकंडी n  a village square used as a meeting place. खेडेगांवाच चतुराकाराच बसून बोलाच ठिकाण.  

चौकी n  a police station. पोलीस ठाणा. uis बंगळूरांत मध्य मध्य रौडी लोकांस पोलीस चौकीला ओढींगून/होढींगून जाऊन किलुपांत घालणे आहे.

चौकीदार n  watchman. रक्षण करणार. uis हे मध्ये ए.टी.एमाच चौकीदारांस मारून पीटून त्यांतल पैसे चोराच अक्रम जास्ती झालाहे म्हणून प्रति ए.टी. एमालीन चौकीदार असाम/असांव म्हणून पोलीस सगळ॑ बॅंक अधिकारींसीन निर्देश देलाहेत.

चौघे pron  four persons. चार दन. चौघे. uis ए.टी.एमाला चौकीदार ठिवलतर काय प्रयोजन ? चौघ दन येऊन तला ध्वंस केलतर काय कराला होईल ? Note. दोघ दन, तीघ दन and चौघ दन  are the correct expressions and not दोन दन, तीन दन and चार दन. 

चौचौ n  name of a vegetable. एक भाजीपालाच नाव. चोचो. uis मेक्सिको राज्यांतून वेगळ देशाला प्रचार झालते चौचौच खर नाव चोचो म्हणून भरूनदनास कळना. ते राज्यांत हेला "चयोटे" म्हणतात.

चौ-चौ fig  mixed haphazardly. गजबिज. घंदरा-घोळा. uis घरच सामान पूरा घंदरा-घोळा होऊन पडलहोत म्हणून पाष्टे  ऑफीसाला जायाच पुढे मझ लोंकाला ते पूरा बरोर काढून ठीव म्हणून सांगूनटाकून गेलों. सायंकाळी येवून पाह्ताना ते पूरा तसेच चौ-चौ म्हणूनच होत॑.

चौत n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीन चौथां दिवस/तिथी. चौती. चौथ. चौथी. चतुर्थी.

चौती n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौथां दिवस/तिथी. चौत. चौथ. चौथी. चतुर्थी.

चौथ n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौथां दिवस/तिथी. चौत. चौती. चौथी. चतुर्थी.

चौथी n  fourth day of the each lunar fortnight. प्रत्येक पक्षाचीं चौथां दिवस/तिथी. चौत. चौती. चौथ. चतुर्थी.    

चौदा adj  fourteen. तेराच नंतरल॑ संख्या.

चौरंग n  a square stool. चौक आकाराच स्टूळ.





छ the seventh consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठी अक्षरमालाच सातवां व्यंजन.

छक्का n  a playing card with a value of six. सहाच संख्याच खेळाच पान.
  
छक्का n  dice with six showing up on it. खेळाच डैसांतल॑ (English) सहाच चिन्ह. uis लूडो खेळताना दोन छक्का घाट्लतर अण्कीन एक दपा डैस लोळिवाला अधिकार मिळेल.

छक्का n  a hit for a six in cricket. क्रिकेट खेळांत सहा रण्णाच एक मार. uis भाराताच कॅपटन महेन्द्र सिंग धोनी गेल वर्ष पतोरी भरून छ्क्के मारत होते. पण अत्ता तज कॅप्टनसी छ्क्काला जायाच स्तिथींत आहे !

छत n  ceiling. घराच छप्पर. uis अधीक दिवस/महीने एक खोलि झांकून ठिवलतर छताच खाले अष्टपाद कीडाच घरवसा/घरोसा बांधून असाच साध्य आहे.

छत n  awning. canopy. छप्पर.

छत्र n  a large hall for conducting marriages etc. वराड, मुंज असलते कार्यक्रम कराला उपयोग कराच एक मोठ बांधणि. uis चेन्नैंत वराडाच छत्र पह्जे म्हणजे सहा-नौ महिने पुढेच बुक/निश्च्य करामते पडते अणी दिवसाला तीन-चार लाख रुप्पे तज भाडे अस्त. 

छत्रपति n  emperor. साम्राट. uis छत्रपति शिवाजी महाराज न्होते मण्जे मुगल राजेलोक मध्य अणी दक्षिण भारत पूराहींन कब्ज़ा केलसतील (युद्ध करून जिंतालास्तील). 

छत्रि n  umbrella. कोडे (Tamil). uis उन्हाळा असून दे, पाऊसाळा असून दे, केरळांतल॑ लोके बाहेर/बाह्येर जायाच वेळी छत्रि अवश्य घेऊन जातील.

छप्पर n  thatched  canopy. पंदल. छत. uis छप्पर बांधताना बरोर वाटम देनास्क बांधलतर, पाऊसाच पाणी लोकुर गळून जायनास्क खोलीच आंत उतरेल.

छप्पर n  roof. घर अथवा बांधणीच व॑र असाच बांधोटी. कूरै (Tamil). uis हे काळांत पोणावांटा घराला कॉण्क्रीटाच छप्पर घालतात तरीन, समुद्राच कांठशीच प्रदेशांतीं जास्ति पाऊसाच प्रदेशांतीं अत्ता पणीन कवलाच/कौलाच छप्पर घालतात.

छप्परपलंग n  a canopied cot. a four-poster cot. छप्पर/डांचपर्दा बांधाला सौकर्य असाच पलंग.   

छाडि n  mischievous talk. वंबु॑ (Tamil)  ; चहाडी in sm. 

छाडि-सांगणे vt  to indulge in mischievous talk. to carry tales. वंब-बोलणे ; चहाडी-सांगण॑ in sm. uis एक-एक ऑफीसांतीन दहा टक्के/प्रतिशत (10 %) लोके त्येंच काम काहींन करनास्क नुस्त छाडि सांगून वांचणार असतील. 

छाती n  chest. bosom. ऊर. .

छाती n  woman's breast. थान. स्तन. 

छाप n  impression. stamp. मुद्रा. uis कित्येक लोकांना अधीक वाचणे नाही तरीन त्यंच हस्ताक्षर छापलत्यास्क अस्त. 

छापणे vt  to print. मुद्रण करणे. uis मझ लोंक ल्हान असताना नित्य एक वस्तू घ्याला नच्च करेल. तला मी सांगेन "इथपर अम्ही पैसे छापल तरेच वांचाला होईल".
 
छापणे vt  to stamp. मुद्रा घालणे. uis डाक घरांत अवसरान छापाच वेळी कित्येक तपाल-स्टॅम्पाच व॑र मुद्रा पडना. तसल॑ तपाल-स्टॅम्प ओल करून काढून पुन्हा उपयोग कराला होईल.

छापा n  stamping. मुद्रा घालाच. uis सर्व दुकानांतीन असाच झोकीच यंत्रीं / ’तरासीं’ सर्काराच नियमाजोक्त प्रति वर्षीन ’इनस्पेक्शन’ करिवून छापा करीवाम.

छाया n  image. छायारूप.

छाया n  reflection. प्रतिबिंब. पडसावळि. uis केरळ राज्यांत आरनमुळा गामांत लोहेंतून एक प्रत्येक रीतीच अरसा करतात. हेजांत दिसाच छाया, गाजाच अर्सांत दिसाच छायास्क अस्त.

छायाचित्र n  photograph. फोटो.

छांदस n  very specific on likes and dislikes. अवडणे न अवडणे हे विषयांत दृढ मन्न असणे.  uis म्हातारे लोकाना खाणे-जेवणाच छांदस जास्ति अस्त. प्रति वेळीन प्रत्येक-प्रत्येक पदार्थ करांव/कराम, नीट तूप-तेल घालून तळलते भाजी असांव/असाम, दुपारच "टिफ़्फ़िनांत" गुळ्चीट ठिवाम/ठिवांव. अस विचारचाला अंतेच असना. Note. from Telugu, Tamil.

छि interj  an expression of denial in a manner of putting down. अवडनाते कायतरीन विषीं तुच्छ कळिवाच गोष्ट. uis तेनी मला विचारले "तू केम्हातरीन एकदा दारू पीशील न्हो का" ? मी म्हटलों  "छि!  मी सुद्ध म्हणून दारू शिवत नाही, तुला अस विचाराला धैर्य कस आल॑" ?.

छिन्नाभिन्न adj  broken-up and scattered. चुक्कुनूरु. चूर-चूर होऊन एकडे-तिकडे होणे ; विच्छिन्न in sm. uis मिरासदार आजोबा मेला नंतर त्यंच कुटुंब छिन्नाभिन्न होऊन गेल॑. वडील लोंक बाहेर/बाह्येर देशांत राहून गेला, दूसराला वाचणे नाही अणि पूर्त पैसे उडीवला, दोघ लेंकीनीं विधवा झाले. अस त्यंच कुटुंब छिन्नाभिन्न झाल.

छीछी interj  an expression indicating vehement denial. जोरांत निषेध करताना (ओपनास्क अस्ताना) सांगाच एक गोष्ट. uis "छीछी, तो असल॑ मनुष न्हो. तो तज बायिलीला कद्दीन दगा करून दूसरे बायकांच बरोर वागे ठींगना".

छेद n  a gap. a break. a crack. a separation. छेद.







ज the eighth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच आठवां व्यंजन॑.

जगत n  world. भूलोक.

जगत n  Universe. विश्व. ब्रह्मांड. 

जगतगुरु n  mentor of the world. जगत्ताच गुरू. 

जगतगुरु n  a title by which Shri. Shankaracharya is known. श्रि. शंकराचार्याच पदवी.

जगदांबा n  Goddess Durga. जगदांबिका. दुर्गा देवि. पार्वति देवि.

जगदांबिका n  Goddess Durga. जगदांबा.

जगदीश n  Lord Shiva. शिव. परमेश्वर. जगदीश्वर.

जगदीश्वर n  Lord Shiva. जगदीश.

जगदोद्धार n  salvation of the world. जगत्ताच मुक्ति ; जगदुद्धार in sm. 

जगन्नाथ n  Lord of the Universe. जगत्ताच स्वामि.

जगन्नाथ n  Lord Vishnu. महाविष्णु. uis ओडीस्सांत असाच पुरी गामांत श्रीजगन्नाथांचे जुन॑ देऊळ आहे. तेथ प्रति वर्ष कार्तिक मासांत थोर रथ यात्रा चालीवतात॑.

जगन्निवास n  the Lord who is present everywhere in the universe. सर्वव्यापि भगवान.

जटका n  horse carriage. घोडाबंडि. टांगा. uis साठ वर्षा पुढ॑ अम्ही ल्हान असताना ’मंत्रालयम रोड’ स्टेषनांत उतरून बाहेर ओठाकलहोतते जटका बंडींत॑ मंत्रालय मठाला गेलों.

जटा n  matted hair. गुंता होवून चिक्कटलते केंस. uis काले टीवींत कुंभ मेळांत स्नान करणार लोकाना दाखीवत होते. तजांत साधू-संत लोक॑ जटा सहीत होते.

जटारी n  Lord Shiva. शिव. जट धारी.

जड adj  heavy. भार. जेड. uis ज॑ड वस्तु अम्च मादावर (माजावर) उचलून ठिवलतर, मादाच लचक होऊया.

जड n  dead body. मृत देह. मड॑. मढ॑.

जड n  inanimate thing. जीव नाहीते वस्तु. uis श्री मध्वाचार्यांच द्वैत तत्वांत॑ जड, आत्मन् अणी ब्रह्मन् हे तीनाचीं मध्ये पांच विधाच भेद आहे.

जडभरत॑ fig   an extremely lazy person. an indifferent person. शोंबेरी (tamil). आलस मनुष. uis वयाच पोर/पोरी म्हणजे झट-झट काम शिकून काम नीट कराम॑. जडभरतास्क असलतर काहीं प्राप्त कराला होईना.

जण॑ n  people. दन॑. जन॑. लोके.

जत्तन n  proper care. दत्तन ; जतन in sm. uis ल्हान लेंकरु असतां पसून तिला तिज सामान अग्गीन जत्तन ठींगाच स्वभाव होत॑.   

जत्तन n  caution. सांभाळून असणे. दत्तन. uis  घरांत॑ येऊन जुने पेपर घेणार लोकांकडे वागताना अम्ही जत्तन असाम॑. कां म्हणजे, तूकम करताना एमारिवाला पाह्तील॑.

जनकथा n  folktale. लोक कथा. uis श्रीमति सुधामूर्ती कन्नडांत जनकथा पुस्तक लिव्हलाहेत॑. अत्ता तज इंग्रेजी अनुवादन (तर्जुमा) पणीं मिळते.

जनगणना n  census survey. जनमोजी. लोकसंख्या किती आहे म्हणून पाह्णे. लोकांच संख्या काढणे. uis (1) भारतांत॑ प्रति दहा वर्षी जनगणनाच कार्यक्रम होत असत॑. (2) 2011 वर्षांचा जनगणना प्रकार अम्च जनसंख्या एकशेंवीस कोटी आहे म्हणतात॑.

जनजागृति n  public awareness. लोकांच चोक्कोट होणे विषीन जागृतांत असणे. uis अम्च देशांत लोके बीदींत थुंकणे, मुतणे असल॑ कंटाळा काम करनात असाला समाज सेवा संघटना जनजागृतीच कार्यक्रम आरंभ कराम॑.

जनतंत्र n  democracy. लोकतंत्र. uis हे भूलोकांत॑ सर्व राज्याबरीस थोर जनतंत्र भारतांत॑ असून पणीं, येथ॑ गरीबपण॑ उजंड जास्त आहे. हेज एक मुख्य कारण अमच॑ देशांत॑ वाचणे-लिव्हणे नाहीते लोक अधीक असण्यामुळ॑ आहे. 

जनता n  the public. लोके. uis बीहार, उत्तर प्रदेश असलते राज्यांत पुन्हा-पुन्हा गूंडा लोके एलक्सन जिंतून याच पाह्ताना तिकडल॑ जनता शुद्ध मड्डि लोके म्हणूनच सांगाम॑. 

जनता fig  ordinary type. साधारण रीतीच. uis गरीब-रथ रेलबंडि जनता वर्गांच असलतरीन, तेजांतल॑ सौकर्य बेषच आहे.

जनन॑ n  birth. जन्म. उजणे. uis जनन॑-मरण हे चक्रव्यूहांतसून बाहेर पडाला एकच मार्ग आहे. सदाहीन देवाच नाम स्मरण करून अम्च देव भक्ति वाढींगणे.

जननी n  mother. माय. अम्मा. माता.

जनशक्ती n  people's strength. लोकांच॑ शक्ती.

जनसहाय n  people's help or assistance. लोकांच॑ सहाय.

जनसंख्या  n  population. लोकसंख्या. uis 2001 वर्षांत अम्च देशाच जनसंख्या शंभर कोटी होत॑.

जनसेवा n  service to the public. लोकांच सेवा. लोक सेवा. uis अम्च नेता लोके जनसेवा कराच वेष घालून एलक्शन जिंततात॑. पण, पदवि घेटला नंतर पैसे संपादाला काय-काय वाट आहे म्हणून पाह्त असतात विना, वेगळ॑ काहीनच करत नाहीत॑.

जनसौकर्य n  civic amenities. लोकांस सौकर्याकरतान असाच॑ व्यवस्था (संविधान).

जन॑ n  people. दन॑. लोके ; जण in sm. uis भगवान श्री क्रुष्ण यदुकुलांत तेवढ॑ लोकांच बरोरीं एकसार्ख खाऊन-जेऊन, खेळून, वाढलते पाह्ताना, जन॑ जाती मत भेद-भाव पाह्ताने म्हणाचाला हेच एक उदाहरण॑ म्हणून अम्हाला कळते.

जनार्दन n  Lord Vishnu. महाविष्णु.

जन्म n  birth. प्रसव॑. जनन॑. उजणे. uis अमेरिकाच नियम प्रकार तिकड कोण जन्म होतातकी तेनि अग्गीन ते देशाच नागरीक होतील॑. अमच॑ देशांतून तिकडे कामाव॑र जायाच भरून दन॑ हे नियम उपयोग करींगून त्यंच लेंकरांस तिकड॑ जन्म द्याच सहज झालाहे. 

जन्मजन्मांतर॑ adv  for all births to come. for ever. till eternity. काळांतर पर्यंतीन (पतोरीन/पावेतोरीन). uis अम्च हिंदु धर्मानुसार गायीला ’गोमाता’ म्हणतों. तजामुळ गोहत्या केलतर॑ तज पाप॑ अम्हाला जन्मजन्मांतर॑ गुंडाळत असेल.

जन्मदिवस n  birth day. उजलादिवस. उजलते दिवस. uis श्री क्रिष्णाच जन्मदिवसाच सणाला अम्हि जन्माष्टमि म्हणतों.

जन्मभर adv  all through the life. जन्म पूरा. आजीव(वन॑). uis बरोर/पूर्त योचना करनास्क अम्हि एक वाईट काम केलतर॑ जन्मभर तज परिणाम अम्च मनाला टोंचत असेल॑.
जन्मभूमि n  native land. स्वंत देश. उजलते देश. uis स्वंत जन्मभूमीच व॑र प्रेम नाहीते स्वार्थ लोके पैसेला देशद्रोह कराला पणीन तय्यार असतात॑.

जन्मसाफल्य n fulfillment of one's objectives in life. जन्मांत॑ उद्धेश केलते सगळीन साफल्य होणे.

जन्मस्थान n  place of birth. उजलते गांव. uis (1) अमेरीकाचे अध्यक्ष बराक ओबामाच जन्मस्थान होनलुलू, हवाई आहे. (2) भूलोकांत कोठ॑ अम्हि उद्योग करून ’सेटल’ झालतरीन अम्च-अम्च जन्मस्थानाला परतून येताना एक प्रत्येक तृप्ति/संतोष वाटेल॑.

जन्मस्वभाव n  inborn disposition. उजतान पसून आलते स्वभाव. uis अरवेंत, म्हणजे, तमिळांत एक वचन आहे, तज अर्थ आहे "पाळणांत दिसाच स्वभाव, अथवा जन्मस्वभाव स्मशान पतोरि (पावतोरि) असेल".

जन्माष्टमि n  festival celebrating the day of  Lord Krishna's birth. श्रिक्रिष्ण उजलते दिवसाच पूजाच सण॑. क्रिष्णाष्टमि. गोकुलाष्टमि. uis जन्माष्टमीला दिवसाच वेळ उपवास करून रात्रि बारा घंटेला (अर्धरात्रि) पूजा करून अर्घ्य सोडाम॑. नंतरच नेवेद्य केलते पदार्थ फलार करुया. पण, अम्हि उजंड लोके दिवसाच उपवास करत नाही अणी रात्रि नौ-दहा घंटेलाच पूजा संपीवतों.

जप n  silent prayer. मनांतच देवाला ध्यान करणे. uis संध्यावंदन कराच वेळी गायत्रि मंत्र जप कराच बरोर ’अष्टाक्षर मंत्र’ तज तीन वांटा जपाम॑ म्हणून थोरळे सांगतात॑.

जपमाळ॑ n  rosary. जपाच आवर्तन संख्या मोजाला उपयोग कराच मणीच माळ॑. जपमाला. uis अम्च-अम्च जवाबदारि पूर्त केलावर प्रति निमिष देवाच नामस्मरण करत असाम॑. तेम्हा हातांत एक जपमाळ॑ उपयोग असेल.

जप्त adj  attached by court. कचेरिवाटी जप्त होणे. uis ’किंग फ़िषर एरलैन्स’ हेना देलते कर्ज परतून येईनास्क, समीपांत सगळ॑ बॅन्कीन मिळून तज मुख्य मालक विजय मल्या हेंच आस्त/ पैसे-कास जप्त कराला कोर्टाला अर्जी (निवेदन) देलोते.

जप्ति n  attachment of assets. वस्तु विकाच निरोध करून कचेरिवाटि निर्णय होणे.

जबरदस्त adj  forceful. powerful. mighty. उदंड॑ शक्तीच॑.

जबरदस्ति n  coercion. compulsion. जबरदस्तांतून कराच॑. दटावून करिवणे.

जमखान n  a thick cotton floor spread. भोईच व॑र पसराच एक घट्टि कापडाच चदर. uis अम्च देशांत कित्तिकी गरीब लोकानकडे अंथरींगाला जमखान पणीं असत नाही. हे पाव्हून माला फार दुक्ख वाटत॑.

जमा n  collection. मिळिवणे. uis सहा महीनेला एकदपा अम्हि सर्वदनीं दहा घराला जाऊन जुन॑ फडकी, जुन॑ जमखाण, जुन॑ पांघरूण॑ (पांघरिवण॑) हे सर्वीं जमा करून भीकारी लोकांना/ उजंड गरीब लोकांना वांटाच समुदाय सेवा करूया.

जमाना n  an era. a period. काल. काळ.

जमीन n  land holdings. आस्ताच भूमि. uis जमीन-जुमला असणार पोणावांटा लोके जानव नाहीत लोकच॑ असतात॑. ब्राह्मण लोकांकडे वाचणे अस्त, पण पैसे-कास मिळिवाच शाणपण (षाणपण) तेवढ॑ असत नाही.

जमीन n  agricultural lands. क्रिषीच भूमि. uis आंध्रांत कृष्ण-गोदावरी नदींच कांठशी असाच (डेल्टा एरियासांत) जमीनांत साळीच पीक वर्षाला दोन-तीन येत॑.

जमीन n  ground. भूमि. uis चेन्नै, अहमदाबाद अस॑ कित्येक पट्णांत अत्ता जमीनाच मोल॑ पांच वर्षाच पुढ॑ होततेपक्षा तीन वांटा वाढलाहे.

जमीनदार n  land holder. landlord. जमीनाच आस्त असणार. uis हे काळांत अम्च नेतालोकेच जमीनदार जालाहेत॑. गरीब कुणबीलोकांस॑, नांगरणार लोकांस॑ अग्गीन उजंड (उदंड) जास्त व्याजांत॑ र्रीण (कर्ज) देऊन, र्रीण वारिवाला होयनास्क होताना अडमानम ठिवलते जमीन त्यंच नावांत करींगतात.

जमेदार n  head constable. मुख्य सिपाही ;  जामदार in sm.

जमेदार n  head peon. मुख्य चप्रासी ; जामदार in sm.

जय n  victory. विजय. जिंत. uis कोण्त्येक युद्धालीं जायाच पुढे शिवाजी महाराज त्यंच मायाला अणी गुरूला नमस्कार करून त्यंच आशीर्वाद घेऊन निघतील॑. तजमुळे त्यांस प्रतीवेळ जय प्राप्त होत होत॑.

जय n  success. विजय. जिंत. uis मझ लोंक, परीक्षा लिव्हाला जायाच पुढ॑, तज आजीला नमस्कार कराला विसरनाच विसरना. तेंच तोंडावाटे ’नीट लीव्हे’ म्हणून तला ऐकाम॑. आजीच आशीर्वाद मिळ्लतर॑ कंडिपहोऊन परीक्षांत॑ जय होईल म्हणून तला विश्वास आहे.

जयघोष n  victory celebrations. विजयाच उत्सव. uis दोन दिवसाच पुढे राहूल गांधीला कोंग्रेसच॑ उप-अध्यक्ष म्हणून नियम केलांपिरी कोंग्रेस कार्यकर्ता लोके सगळीं जयघोषणा करून विपरीत फटाके सोडले.

जयध्वज॑ n  victory banner. victory flag. विजयाच ध्वज. uis पाकिस्थानाच विरुद्ध झालते कार्गिल युद्धांत "टैगर हिल" आक्रमण करून जिंतून ते शिखराच व॑र भारताच त्रिरंगाच जयध्वज अम्च॑ सैन्य उडिवले.

जयवंत adj  victorious. विजयी.

जयश्री n  bounteous victory. समृद्ध विजय.

जयस्तंभ n  pillar commemorating a victory. विजय स्मारकाच स्तंभ. विजयस्तंभ. uis पंध्रावां शतकांत माळवा अणी गुजरात राज्याच मुस्लीम सुलतांनाला आक्रमण करून त्यांस युद्धांत हरिवलत्याच स्मारक म्हणून चित्तोरगढांत महाराणा कुंभा एक जयस्थंभ स्थापना केले.

जयंति n  birth anniversary of great persons. महान व्यक्तींच जन्माच वार्षिक दिवस. पुण्यतिथी. uis पन्नास-साठ वर्षानंतर लोके नेता लोकांच जयंती सये ठींगतील. पण, अम्च हिंदू देव-देवींच जयंती विसरतील॑ अस मझ अभिप्राय आहे.

जर n  fever.  जेर. आंगाला बर नाहीस्क॑ असताना याच ताप ;  ज्वर in sm. uis टैफोयिड आलतर॑, दिवसोडी दुपारच नंतर॑, म्हणजे, सायनकाळीच वेळ जर येईल.

जरडि n  kitchen sieve. झरडि. दाळ-तांदूळ, पीठ, धान्य असलत्यांतून कणे वेगळ॑ करून काढाच बरीक जाळीच उपकरण॑. uis जरडींत घालून प्रत्येक करलते साखरेच पूड चिरोटाच व॑र घालून खातों.   

जरा n  old age. म्हातारपण॑.

जरा n  infirmity or debility on account of old age. म्हातारपणामळे याच आंगाच क्षीण.

जरी n  gold or silver thread work. कापडांत॑ सोनेच, नाहीतर॑ (अथवा) रुपेच दोरांत॑ ओवून केलते अलंकार. uis अधीक जरी घाटलते लुगड॑ फार जड असत॑ अणी माघ पणीं असत॑. 

जल n  water. पाणी. नीर (Tamil).

जलजंतु n  a marine animal. पाणींत॑ राहाच प्राणि. uis समुद्र अणि नदीच कांठशी असाच फॅकटरींच पोल्लूषनामळे जलजंतू सर्वईं मरत आहे.

जलतरंग n  a percussion musical instrument with different levels of water in different containers. वेगळ॑ वेगळ॑ वाटींत॑ पाणी प्रत्येक प्रत्येक उंचांत॑ भरून वाजिवाच एक संगीताच वाद्य. uis जलतरंग दोन तराच असत॑. एकांत 22 वाटी असत॑ अणि कित्येकांत॑ 15 वाटी असत॑.

जलदोष n  common cold. running nose. पडसा. नाकाला याच एक रोग. नाकांतून पाणी गळणे.

जलप्रळय n  deluge. प्रळय ; जलप्रलय in sm. uis क्रिस्तु धर्माच बैबिलांत॑ नोहाच खाणींत॑ एक मोठ॑ जलप्रळयाच विवरण॑ आहे. 

जलसमाधि n  immersion of a dead body in water.  पाणींत॑ समाधि होणे. uis दक्षिण देशांत मराठी भजन प्रसिध केलत॑ श्री हरिदासगिरी दहा वर्षाच पुढे बद्री यात्राला गेले अणि तिकडे त्यंच जलसमाधी झाले.

जलसा n  a musical programme. गाणेच कार्यक्रम.

जलाशय n  lake. pond. reservoir. तडाग. पाणीच कुंड.

जळकपण॑ n  jealousy. पोटजाळ. असूया. uis बाजू घरचीच दल्ला बिसिनसांत॑ भरून पैसा करतो म्हणून तिला उदंड जळकपण॑ आहे तरीन बाह्येर सांगत नाहे, एवढच॑.

जळका fig  a jealous person. पोट-जाळाच मनुष. uis  मझ एक जवळच सोयरीक फार जळका मनुष. मझ "पर्सांतून" हदार रुपेच नोट चार काढलतर॑ तला पोटांत संकट होयाच अम्हाला सुलभान कळल॑.

जळणे vi  to burn. to be on fire. to blaze. विस्तु पेटणे. uis प्रतिवर्ष उन्हाळाच समय कॅलिफोर्णियांतहीं आस्ट्रेलियांतहीं र्राणाच प्रदेशांत॑ अपाप विस्तु पेटून जळाच समाचार अम्ही ऐकतों.     

जळणे vi  to have a burning sensation. जळास्क॑ (आंगांत॑) वाटणे. uis (1) विडाच पानांत॑ चुण्णा जास्ति लावलतर॑ जिव्ह॑ जळल॑. (2) आजच॑ जेवण॑ उजंड तिखट होत॑. जेवलांपिरी मझ पोट जळत आहे. 

जळणे vi  to give off light as in an electric bulb. जळून प्रकाश देणे. uis  ते दिवा जळत नाही.

जळणे vi  to rankle. गेलते विषय विसरनास्क॑ मनांतच अठींगून संकट भोगणे. uis पांच वर्षाच पुढ॑ मझ मित्र त्यंच घर विकले. घर घेट्लते मनुष एक वर्ष झालानंतर॑ तेच घर चार वांटा पैसेला विकले. हे ऐकून मझ मित्राला वाटलते जाळ हे पर्यंतीन संपल॑ नाही.

जळणे vi  to be jealous. जळकपण॑ वाटणे. असूया वाटणे. पोटजाळ होणे. uis भाग्यवंत लोके वराडांत जेवणाकरतां एक प्लेटाला दोन-तीन हदार वेचतात॑ म्हणाच ऐकून मझ॑ मन्न जळते.

जळिवणे vt  to set fire. विस्तु लाविवणे. विस्तु लागिवणे. uis हैदराबादांत ’तेलेंगाणा’ पह्जे म्हणून हरताल करताना गुंडेलोके ’सिटीबस” जळीवून नष्ट करीवतात॑. तझमुळे लोकांस फार श्रम पणी होत॑ आहे.

जवळ adv  close by. बाजू. समीप॑. जवळपास. uis बंगळूरांत॑ अम्ही राहाच ठिकाणी घराला आवश्य असाच सगळीन जवळच मिळत॑.

जवळच॑ adj  that which is from nearby. बाजूकडच॑. uis अम्च घरांत्सून ’बिरलामंदिर’ जास्ति दूर नाही, जवळच आहे. दोन किलोमीटर पणीं असना.

जवळच॑ adj  closely related. जवळ संबंधाच. uis जवळच॑ सौरीकांतच मझ लेंकील वराड करून देलोंहे.

जवळजवळ॑ adv  approximately similar. somewhat similar. थोड थोड एकसारखच॑. थोड थोड एकमादरीच॑. uis मझ लोंक-सून जवळजवळ एकच वयेचच॑. तेंच दोघें मधे दोन महिनेच व्यत्यासपणीं नाही.

जवळपास adv  in the vicinity. close by. आजूबाजू. शेदारी. शेजारी. uis थोड दिवसापुढे मैसूरांत राहणारी मझ बहिणी गांमाच बाहेर एक घर बांधली. तज जवळपास एक ल्हान दुकान पणीं नाही.

जवळि n  textiles. नेसाच कापड. uis चोक्कोट उद्योग काहीं मिळ्ळ नाही म्हणून तो अत्ता एक जवळीच दुकान उघडलाहे म्हणून ऐकलों.

जवळून prep  from nearby. बाजूकडून. uis ल्हान-ल्हान गल्लींत॑ (सांधींत॑/सांदींत॑) "फुट-पात" असत नाही. मोटर-बैक सोडींगून जाणार अम्च पायांच जवळून जातात॑. कोठ व॑र वेघीवतातकी म्हणून भें वाटते.

जवान n  youngster. तरुण वयच. uis मला अत्ता गॅस सिलींडर उचलाला होत नाही. मी जवान होतों म्हणजे उच्चललासन.

जवान n  soldier. सैनिक. सिपाही. uis सियाचिन ग्ळेसियरांत॑ सोसाल होयनाते हींमांमुळ॑ अम्च सेनाच कितिकी जनावलोके मेलाहेत॑ (वारलाहेत॑).

जवाब n  answer. उत्तर. बदिल. uis रेलवेला काय कागद पाठवलतरीन "अम्हाला तुम्च अर्जी मिळालाहे, अम्ही तजवर विचार करत आहों" अस॑ नुस्त एक जवाब येते विना, नंतर काहीनच होत नाही.

जवाबदार n  one who is answerable. one who is responsible. विचारलतर उत्तर देमते मनुष. uis गामांत काय बलात्कार झालतरीन तेला अम्च प्रयोजन नाहीते ’क्रिमिनल जसटिस सिसटेम’ मुख्य जवाबदार आहे.

जंगल n  forest. राण. uis अंदमान-निकोबार द्वीपांत राह्याच आदिवासी लोके तिकडल॑ जंगळाच फार आंत राह्या करतां उदंड अप्रूप होऊनच त्यांस पाह्याला होईल॑.

जंगली adj  uncivilised. असंस्कृत. 

जंत n  a kitchen implement used for dry coarse grinding of pulses etc. जांत. जंतर. धान्य भरड पूड कराला धोंडांत॑ केलते संपाक-घरच एक ल्हान चक्कि. uis (1) दिवसोडि जंत॑ उपयोग केल तर॑ हातालीन तसेच आंगालीन व्यायाम मिळेल म्हणाचाला संशयच नाही. (2) रामदेव महाराज अत्ता पणीं त्यंच योगासनांत॑ "जंतावाटे दळाच आगम॑/कार्यक्रम॑"  एक व्यायाम म्हणून ठिवलाहत॑. Notes:- (1) this is a two layered flat disc shaped hand grinder made of granite. The lower layer is stationary and the upper part is rotated around a vertical  axis fixed in the center of the lower stone.  (2) जंत, जांत, जंतर etc are vulgar (असंस्कृत) forms of यंत्र.

जंतर n  a kitchen implement used for dry coarse grinding of pulses etc. जांत. जंत. धान्य भरड पूड कराला धोंडांत॑ केलते संपाक-घरच एक ल्हान चक्कि.
 
जंतु n  a  living being. a creature. एक प्राणि. uis अम्च हिंदु धर्मानुसार सर्व जंतूहीं देवाच सृष्टी आहे, तजकरतां तेना एकविधाच हिंसाहीं देताने.

जंबुद्वीप n  a continental land mass referred in Hindu scriptures. हिंदु पुराणाप्रकारच एक भूखंड. uis (1) जंबुद्वीप सहित॑ भूलोकांत॑ सात द्वीप (म्हणजे, खंड) आहे. (2) कोण्त पूजा कराच पुढेहीं संकल्प करताना पूजा कराच ठिकाणाच विवरण देताना जंबुद्वीपाच नाव सांगणे (काढणे) आहे. 

जंबू n  a plant yielding sweet and sour purple coloured fruit. जांभळ/जांभूळ/जांबूळ फळाच झाड.

जंबूफळ n  a sweet and sour purple coloured fruit of jambu tree. अंबटीं गुळ्चीटीं असाच जंबू झाडाच फळ॑. जांभळ/जांभूळ/जांबूळ. uis डयबीटिस असणार जंबूफळ खाल्लतर॑ आंगाला चोक्कोट म्हणतात॑.

जंभ adj  haughty. conceit. hypocrisy. दुरहंकार. ढोंग. Note :- morphs of दंभ or डंभ. (द and ज being inter-used in DM). uis पाह्याला सादारण म्हणून असलतरीन मनांत तला भरून जंभ आहे म्हणून मला कळल॑.

जंभ बडींगणे vt  to indulge in self praise. स्वताला थोर मनुष म्हणून सांगींगणे. uis चोक्कोट षाणपण॑ की सामर्थ्य की नाही तरीन जंभ बडिवणेंत मात्र थोडक पणी उणे नाही तो.

जाईटा n  jacket. जायीटा. Note :- from English. 

जाऊ n  husband's brother's wife. दल्लाच भाऊच बाईल. देराच बाईल. uis ते बायकोच जाऊ तिज सख्ख॑ बहिणी आहे म्हणून एवढ॑ (येवढ॑/यवढ॑) अन्योन्य आहेत॑.

जागणे vi  to awake. झोंपींतूं उठणे. uis रात्रि मला निजाला साडे अक्रा-बारा होत करतां मला पाह्टे (पाष्टे) सात घंटे पुढ॑ जागणे म्हणजे होत नाही (होतनी).

जागरण n  wakeful state. झोंपी जाईनास्क असण॑. uis ल्हान असताना मी शिवरात्रीच जागरण करत होतों, पण मझान अत्ता ते होत नाही.

जागपण॑ n  state of wakefulness. जागे असाच स्थिति.

जागा n  accommodation. राहाच ठिकाण. uis अम्ही असाच चुम्मण॑ घरांत अम्हालाच जागा पुरे होत नाही. तजामधे मझ चुलत बहीण कुटूंबासहीत गाम पाह्याला येऊनगेली.

जागा n  place. ठाम. ठांव. ठिकाण. uis अम्च॑ कुटुंबांत सहादन आहेत॑. ल्हान बंडींत जागा पुरे होतनाही म्हणून अत्ता-अत्ता मी एक टोयोटा इन्नोवा बंडि घेट्लों.

जागा n   location. स्थळ॑. uis हैदरबादांत॑ मझ॑ लेंक एक प्ळाट घेट्ली. ते जागा गच्चीबौळींत आहे अणि फार बेष आहे.

जागिवणे vt  to wake up someone. झोंपींतून उठिवणे. uis हैदराबादांत पोणावांटा ठिकाणी पाष्टे (पाहटे) तुरकडेंच ’अल्हा हो अकबर’ वरडा लोकांना गाढ झोंपांतून जागिवत म्हणाच खर॑ आहे.

जागीर n  hereditary rights for collection of tax from certain villages. कित्येल गांवांतून कर वसूल कराला परंपरांतून याच अधिकार ; जाहगीर in sm. 

जागीर n  villages and lands  which are received as jagir. जागीर होवून मिळ्लते गावीं जमीनीं ;  जाहगीर in sm. uis वेदाजी भास्कर पंत यांस बिजापूर सुल्तान इसवी 1640 वर्षी आरणीच जागीर देले. तेम्हा पसून इसवी 1948 वर्षी मद्रास प्रांतांत केम्हा ज़मीनदारी/जागीरदारी व्यवस्था राहते केलेकी ते पर्यंत म्हणजे, जवळ-जवळ तीनशे वर्ष आरणी जागीर होत॑.

जागीरदार n  holder of a jagir. जागिराच आधिकार असणार ;  जाहगीरदार in sm. uis  आरणी जागीरदारांच वंश मध्व ब्राह्मणांच आहे. उत्तरादि मठाच तेवीसवां मठाधिपती म्हणून होतते श्री सत्य विजय तीर्थ यांच मूल ब्रिंदावन आरणींतल॑ सत्य विजय नगरमांत इसवी 1737 वर्षी आरणीच दहवां जागीरदार श्रीनिवास रावसाहेब स्थापना केले. 

जागृत adj  alert. श्रद्धांत असणे. हुशारांत॑ असणे. uis बाहेर देशाला प्रयाण करताना अम्च ’पासपोर्ट, क्रेडिट कार्ड’ हे सर्व जागृतान॑ पाह्यिंगाम॑.

जागृता n  alertness. श्रद्धांत असाच स्थिति. जाग्रतांत॑ असाच स्थिति. uis  काय ’बरग्लरी इनसूरन्स’ केलतरीन अम्ही अम्च जागृता सोडून देनास्क॑ असाम॑.

जागृति n  alertness. हुशारि.

जागेझोंप n  drowsiness. अडनीद॑.

जाच n  harassment. नच्च करणे. सळिवणे. uis  अगाऊ अस्गीन सासू घरचे सूनाला जाच करतात॑ म्हणून अम्ही ऐकलोहों. अत्तच काळांत उपराठ जालाहे. सून सासूला सळीवतात॑.

जाड adj  thick. घट्टि. पत्तळ नसाच. uis  फुड कॉरपरेषन ओफ इंदिया वर्षा-वर्षी घ्याच पीक दत्तन/जत्तन ठिवाला त्यंचकडे आवश्याप्रकार गोदाम नाही म्हणून मूटा मूटा तांदूळीं गेहूंहीं जाड टारपाळीनांत॑ झांकून उघड ठिकाणी ठिवतात॑.

जाड adj  stout. घट्टि. बरीक नसाच. uis  अम्ही गुरुवायूर देऊळाला गेलसताना तिकडल॑ हत्तीला मागल॑ दोन पांयेहीं जाड चरांटांत॑ बांधून एक झाडाच खाले होठाकिवलसाच पाह्यलों.

जाड adj  obese. दांडग॑. uis  अमेरिकांत॑ एरोप्ळेनांत॑ जाम॑ म्हण्जे उदंड जाड असणारजन॑ दोन-दोन टिकट घेटलतरच प्ळेनांत॑ वेघाला सोडतील॑.

जाडि n  a porcelain jar. बरणि. uis अगाऊच काळांत उन्हाळाच दिवसी बाज़ारांत॑ हिरव॑ अंबे याला आरंभ होतांत्सून एक वर्षाला पह्जेते लोणचे घालून जाडींत भरून ठिवत होते. अत्तलीकड॑ हे काम कराला कोणालाहीन समय की उत्साह की दिसत नाही.

जाणे vi  to go. पुढे सरकणे. uis बद्रीक आश्रमाला जाणे म्हणाच थोर यत्तन आहे. पण तेथ गेलावर परतून याला मन्न ओपना म्हणून लोक सांगतात. Note:- (1) from 'यान' of Samskrith. (2) यत्तन is a morphed version of यातना, meaning torment. 

जात n  caste. वर्ग. जाति. uis (1) वेगळ॑-वेगळ॑ जात प्रारंभ केलते मूल कारण गामांत काम बरोर चालाम॑ म्हणून. पण, नेतालोके तज दुरउपयोग करत आहेत॑. (2) थोड वर्षानंतर वराड कराचा पुढ॑ जात-भेद पाह्यिनात॑. दादिगा पोराला बायको पोरे मिळलतर॑ पुरे म्हणतील.

जात n  race. वर्ग. जाति. uis भूलोकांत॑ गोरे, सावळे, मंगोळियन, नीग्रो अस॑ वेगळ॑-वेगळ॑ लोके असलतरीन मनुष वर्ग एकच म्हण्तात॑.

जातक n  horoscope. कुंडली. uis जातक पाव्हून वराड करून पणीं हे काळांत कित्येक दंपतींच वराड भ्रष्ट होऊन जात॑. तला एक मुख्य कारण, दाल्ला-बाईलीं मधे तेंच पदवी अणी तेंच धर्मा (मुशारा) हे सर्वावर गर्व येऊनजात॑.
जातां-जातां adv  as it gets along. as things go by. पुढे जात/होत असताना. uis तो फार चोखोटा म्हणींगतीस तू. जातां-जातां तज स्वभाव कळताना तू मला विसंबशील॑.

जातां-येतां adv  during (all) casual visits. येतां-जातां. उगे जात येत असताना. uis मझ लेंक तिज उजलादिवसाला म्हणून एक डब्बा चोक्लेट फ़्रिड्जांत॑ ठिवलोती. तिज भाऊ तिला कळनास्क॑ जातां-येतां 'फ़्रिड्ज' उघडून ते पूरा काढून खाऊनटाकला !

जाति n  species. प्रणींच अथवा वनस्पतींच वेगल॑-वेगळ॑ वर्ग. uis अम्च हिंदु धर्मानुसार हे भूमंडलांत॑ 86,00,000 जातीच प्राणि/जीवात्मा आहे.

जातिभेद n  castism. जाताच आधारांत वेगळ॑-वेगळ॑ असणे. uis अम्च देशांत सर्व राष्ट्रीय पार्टीच नेतालोकीन जातिभेद करून पदवि धराला प्रयत्न करत असतात॑.

जातिभ्रष्ट adj  to excommunicate. to render one an outcaste. जातींतून बाहेर काढूनटाकणे. uis अत्तापणीं राजस्थानांत एक जातीच पोर दुसरे जातीच पोरीला वराड करींगटलतर॑ ’खाप पंचायत’ तेना जातिभ्रष्ट करतात॑.

जात्रा n  a religious fair in a village or town. गावांच देऊळाच उत्सव. uis बादामींतल॑ बनशंकरीदेवी देऊळांत॑ प्रतिवर्ष पुष्य महिना शुक्ल पक्षांत॑ होयाच नवरात्रि उत्सवाच वेळी चालाच जात्रांत॑ आजू-बाजूच खेडेंतून भरून जन येवून देवीला दर्शन करून जातात॑.

जादा adj  extra. surplus more. जास्ति. अधिक. भरून.

जादु n  magic. इंद्रजाल.

जादूगर n  magician. जादु करून दाखिवणार ; जादूगार in sm.

जानव n  sacred thread worn after upanayana by brahmins signifying initiation into religious duties. उपनयनाच नंतर ब्राह्मण लोके नेसाच पवित्र दोरा. यज्ञोपवीत. uis नुस्त जानव घालींगतांतरून ब्राह्मण म्हणून सांगींगाच अधिकार येईना. ब्राह्मणाला तज नित्य अणी नैमित्तिक कर्म कराच निर्बंधन असत॑, अणी ते बरोर करणारांलाच ब्राह्मण म्हणूया.

जानव n  sacred thread worn by the brahmin, kshatriya and vysya castes. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातींच लोके नेसाच पवित्र दोरा. uis (1) ब्राह्मण जातीच पद्धति प्रकार तीन दोरीच (एक ब्रह्मगांठाच) जानव ब्रह्मचारी घालींगाम॑, गृहस्त लोक॑ सहा दोरीच (दोन ब्रह्मगांठाच) जानव घालींगाम॑ अणी साठ वर्षावर असणार लोक॑ नौ दोरीच (तीन ब्रह्मगांठाच) जानव घालींगाम॑. (2) ब्राह्मण, क्षत्रिय अण्खी वैश्य हे तीघ्यालीं जानव आहेतरपणीं साधारणहोऊन ब्राह्मणांला मात्र "द्विज" म्हणून सांगतात॑.

जानवासा n  wedding ceremony performed before muhurtha by the groom's party.  वराडाच मुहूर्ताच पुढ॑ नवराच लोके कराच एक कार्यक्रम. uis दक्षिण भारतांत अत्तपणीं प्रति वराडांत, मूल पाह्णे, जानवासा हे सर्व असत॑. पण मुंबई-पुणेच पटीस जानवासा करत नाहीत॑.

जान्हवी n  Ganges. गंगा नदि.

जाम n  guava fruit. जांब. पेरु. uis जाम पंडूंत ’वैटमिन सी’ भरून असत॑ अणी वेगळ॑ पंडूबरीस ते सवंग पणीं असत॑.

जामाई n  son-in-law. जावांई. लेंकीच दल्ला/दाल्ला ;  जावई in sm.

जामीन n  cash security given to a Court for getting a release from arrest. कैदांतूं बाहेर उतराला कचेरींत॑ बांधाच पैसा. जाम्य. uis न्याय कचेरींत अपराधी म्हणून घोषणा केलत्यांस॑ पैसेच जामीन द्याला म्हणून बिसिनस कराच कित्येक लोके आहेत.

जामीन n  personal security given to a Court for getting a release from arrest. कचेरीला द्याच मनुषाच जाम्य. कचेरीला द्याच मनुषाच वाग्दान. जाम्य. uis कित्येकदपा अपराधींस॑ पैसेच जामीनाच बद्दिल स्वंत वाग्दानाच जामीनांत पणीन बाह्येर सोडणे आहे.

जामीन होठाकणे vt  to stand as a surety. दूसरेला जाम्य मिळाला होठाकाच मनुष (जामीन). जाम्य ओठाकणे.  जाम्य होठाकणे.

जाम्य n  an order for a surety issued by a Court for release from arrest. कैदांतूं बाहेर उतराला कचेरीच निर्देश.
 
जाम्य n  cash security given to a Court for getting a release from arrest. कैदांतूं बाहेर उतराला कचेरींत॑ बांधाच पैसा. जामीन. uis न्याय कचेरींत अपराधी म्हणून घोषणा केलत्यांस॑ पैसेच जाम्य द्याला म्हणून बिसिनस कराच कित्येक लोके आहेत.

जाम्य n  personal security given to a Court for getting a release from arrest. कचेरीला द्याच मनुषाच जाम्य. कचेरीला द्याच मनुषाच वाग्दान. जामीन. uis कित्येकदपा अपराधींस॑ पैसेच जाम्याच बद्दिल स्वंत वाग्दानाच जाम्यांत पणीन बाह्येर सोडणे आहे.

जाम्य होठाकणे vt  to stand as a surety. दूसरेला जाम्य मिळाला होठाकाच मनुष (जामीन). जाम्य ओठाकणे. जामीन होठाकणे.

जायफळ n  nutmeg. जाकायी. uis  जायफळ आयुर्वेद औषदांत उपयोग करतात. ते ओघाळून थोड दुधांत मिळिवून पीलतर॑ आंगांतल दुखणे उणे होईल॑. तजांत॑ "'स्टीरोयड" काहींतरीन असुयाकी म्हणून मला संदेह आहे.

जायीटा n  jacket. जाईटा. Note :- from English.

जालरा n  a musical accompaniment, shaped like a shallow circular tray with a set of jingles on it's brim. संगीताच एक वाद्य.   

जाळ n  flame. ज्वाला. uis ’होलीच’ पुढच दिवसी रात्री लोक त्येंच-त्येंच घरांतल उपयोग नाहीते सामान बिदींत ठिवून जळीवणे आहे. कित्येकदा ते जाळ॑ थोर होऊन शेदारी-पादारी असाच घरांतल वस्तूलापणीं पेटींगाच संभव असत॑.

जाळ n  burning sensation. जळास्क वाटणे. uis (1) एक वये नंतर अधीक तळलते पदार्थ रात्रीच वेळ खायलतर पोटांत/ उरांत जाळ वाटल॑. तजकरतां पालाच भाजी (आलकलैन फुडस) खाणे चखोट. (2) कढत पाणी पडून आंग पोळींगटलतर॑ दोन-तीन दिवस पतोरी मल्लम लाहींगाम॑. तेम्हापणीं जाळ सुलभान (सुलूभांत॑) जाईना. 

जाळणे vt  to burn. to ignite. जळिवणे. विस्तू पेटिवणे. uis समाधानहोऊन हरताळ करतों म्हणून ’टी.आर.एस’ कार्यकर्ता पोलीसाकडून अनुमती घेतात॑ अणी तेंच लोकाना ’सिटीबस’ जाळाला सूचना देतात॑.

जाळि n  grille. trellis. जालि.  लोहेंच नाहीतर॑ लांकडाच पट्टी अडव॑-अडव॑ ठिवून करिवलते साधन॑. uis (1) फ्ळाटांत॑ राहणार कित्येक लोके घरांत॑ ठाम (ठांव) पुरना म्हणून त्यंच बाल्कनीला जाळि घालून झांकणे आहे. (2) पंध्रा-वीस वर्षाच पुढ॑ बांधलते कित्येक घरांत॑ परसाकडेच खोलींत॑ सिमेन्टांत केलते जाळीच खिडकी पाव्हूया. 

जाळि n  grating. जालि. uis केरळांत लांकडाच पुडीच सगडी उपयोग करतहोते. तजांतल जालि/जाळि कोळसाच सगडींतल जाली बरीस बारीक असत॑. 

जावळ॑ n  baby hair before it is removed. चौळे. ल्हान लेंकरांच पह्यिलेंदा कढाच केंस.

जावळ॑ n  tonsure ceremony. ल्हान लेंकराच केस पहिलेंदा कढाच सण॑. uis उजंड (उदंड) लोकांच घरांत लेंकर॑ एक-दीड वर्ष होतांत्सून (होतांतरून) तिरूपती, नाहीतर, वेगळ कोण्तीन क्षेत्रांत जावळ॑ दाखीवाच पद्धत/ दंडक असत॑.

जावांई n  son-in-law. जामाई. लेंकीच दल्ला/दाल्ला ;  जावई in sm. uis तीस-चाळीस वर्ष झालानंतरपणीं कित्येक लोक तेंच (त्यंच) सासुरवाडी जाताना संपूर्ण जावांईपण॑ करींगतात॑ !

जावून-जावून ind  at the end of it all. अस्कीन झालानंतर. uis माय-बाप नाहीत पोर म्हणून मी तला फार उपदेश देलों. पण, तीस वर्ष होयापुढे तो तज आस्त पूरा हाळ करूनटाकला. जावून-जावून असका करणे म्हणून तला विचारलतर॑ मझवरच र्राग करतो.

जास्ति adj  more. अधीक. अधिक. भरून. uis आजच॑ संपाकांत॑ अग्गि पदार्थांतीन मीठ जास्ति होत॑.

जास्ति-जास्ति ind  at the maximum. अधीकपक्षा. uis मझ भाऊ घेटलते घराला तो दोन कोटि रुपे देला. मला विचारलतर॑ ते घराला तेवढ॑ देमते होत नाही. जास्ति-जास्ति देड (दीड) कोटींत बेरम करून घेटलासूया. 

जास्वंद n  hibiscus flower. तंबडकापूस. रक्तकापूस. दासवाला (Kannada). 

जांगिरि n  a type of sweet preparation. खायाच एक गुळ्चीट पदार्थ ;  जांगीर in sm.

जांत n  a kitchen implement used for dry coarse grinding of pulses etc. जंत. जंतर. धान्य भरड पूड कराला धोंडांत॑ केलते संपाकघरच॑ एक ल्हान चक्कि. uis (1) दिवसोडि जांत॑ उपयोग केलतर॑ हातालीन तसेच आंगालीन व्यायाम मिळेल म्हणाचाला संशयच नाही. (2) रामदेव महाराज अत्ता पणीं त्यंच योगासनांत॑ "जांता वाटे दळाच आगम॑/कार्यक्रम॑"  एक व्यायाम म्हणून ठिवलाहत॑. Notes:- (1) this is a two layered flat disc shaped hand grinder made of granite. The lower layer is stationary and the upper part is rotated around a vertical  axis fixed in the center of the lower stone. (2) जंत, जांत, जंतर etc are vulgar (असंस्कृत) forms of यंत्र.

जांब n  guava fruit. जामाच पंडू. पेरु. uis पाऊसाळाच काळांत हैदराबादांत चोखोट अणी थोर जांब/जाम पंडू मिळत॑. सवंग पणीं अस्त॑.

जांभळ n  dark purple colour. जांभळ रंग ; जांभळा/जांबळा in sm.

जांभळ n  a sweet and sour purple coloured fruit or it's tree. अंबटीं गुळ्चीटीं असाच जंबू झाडाच फळ. जंभूळ/जांबूळ in sm. uis डैबटीस असणार जांभूळ पंडू खायलतर॑ रक्तांतल॑ साखरे/ ग्लूकोस उण॑ करिवते.

जांभाई n  yawn. झोंप येताना तोंड उघडून सोडाच दीर्घ श्वास ;  जाभई in sm.

जिनस n  variety of wares or commodities. दिनस. वेगळ॑-वेगळ॑ व्यापारच साधन॑ ; जिन्नस in sm. uis अम्च घराच जवळ उघडलते नव॑ कापडाच दुकानांत॑ भरून जिनसाच सारी आहे. Note :- an example of inter-use of द and ज in DM.

जिब्बा n  a loose upper garment worn by men. जुब्बा ; झब्बा in sm.

जिम्मेदार n  one who is responsible. जवाबदार. uis मझ मित्राला तज बापा सांगूनटाकले ’अम्ही सांगाच ऐकनास्क॑ तू तुज इष्ट प्रकार (इष्टानुसार) वागलतर॑ परिणाम काय होतकी तला तूच जिम्मेदार असशील॑, ते सये असून दे".

जिरे n  cumin seed. संपाकाला रूच वाढिवाला उपयोग कराच एक बीं. uis सणाच संपाक जेवलानंतर ते दिवसी रात्री जिरे-मिरेच सार भात घेटलतर पोट हलक॑ असल॑.

जिरे-मिरे n  grocery. संपाकाच सामग्रि. मीठ-मिरे. दाळ-तांदूळ. किराणा. uis अम्ही ल्हान असताना घरच॑ संपाकाला आवश्य असाच अग्गीन बाजू होतते चेट्टियाराच जिरे-मिरेच दुकानांतून घेत होतों. 

जिलेबी n  a type of sweet preparation. एक खायाच गुळ्चीट पदार्थ ; जिलबी in sm. uis उत्तर भारताच लोके जिलेबि बरोर रबडी/ बासुंदी तोळलाहींगून (तोंडलावींगून) खातात॑.

जिल्ला n  district. राज्याच एक प्रांत ;  जिल्हा in sm. uis अम्च भारतांत असाच कित्येक जिल्ला यूरोपांतल॑ कित्येक देशाच बरीस थोर असेल.

जिवती n  a goddess worshipped on the sixth day of a childbirth. लेंकरु उजून सहा दिवस होताना पूजा कराच देवीच नाव. दिवती. Note. the correct name of the Goddess is जिवती, but as one more example of inter-use of ज and द, दिवती also has gained currency in DM. uis 1. श्रावण महिनेंत प्रति शुक्रावारांतीन लेंकरांच क्षेमाकरतान जिवती देवीला पूजा करणे आहे. 2. दिवती पार्वतीदेवीच अंश म्हणून विश्वास आहे.

जिवती n  a protective amulet or talisman tied around the neck of a six day old infant, after propitiating Goddess Jivathee. दिवती. सहा दिवसाच लेंकरूच गळांत बांधाच जिवती देवीच टांक.uis जिवती  गळांत अडकिवलते लेंकरास अपमृत्यु होईना म्हणून विश्वास करतात॑.   

जिवतीपूजा n  a pooja performed for propitiating Goddess Jivathee on the sixth day of childbirth to ward off its untimely death. दिवतीपूजा. लेंकरु उजून सहा दिवस होताना तला अपमृत्यु होताने म्हणून जिवतीदेवीला कराच पूजा. uis अम्च॑ घरांत जिवतीपूजा कराच दंडक नाही.

जिष्णु adj  the ever victorious Mahavishnu. सर्वत्र जिंताच महाविष्णु.

जिंत pp   win. conquer. दूसराला हरिवाच ; जित in sm.

जिंतणे vt  to win. to conquer. जीत पावणे. दूसराला हरिवणे ; जिंकणे in sm. uis तीसर॑ विश्व-युद्ध आलतर॑ कोण्त  देशहीन जिंतणे म्हणाच असना. अणु-अस्त्र उपयोग कराचा संभव असणामुळ॑ पूर्त भूमंडळ नाश होऊन जाईल.

जी iterj  a term indicating respect. बहुमान दाखिवाला सांगाच एक शब्द.

जीत n  victory. जय.

जीभ n  tongue. जीव्ह॑. तोंडाच आंतल॑ एक अवयव  ; जिव्हा/जीभ in sm.

जीर्ण n  digestion. जेवाच पदार्थांतूं ऊर्जा काढाच॑. जेवाच पदार्थ पोटांत॑ दहन होयाच॑ ; जिरणे in sm. uis (1) जेवलते बरोर जीर्ण होयनास्क वायू झालतर॑ एक-दोन "जेलूसिल" मात्रा खाल्लतर॑ ते बरोर होईल. (2) साठ वर्षानंतर जेवण॑ सुलभांत जीर्ण होयाला जेवलानंतर स्वस्थ एक ठिकाणी बसनास्क टळणे बर॑ म्हणून सांगणे आहे. 

जीर्ण adj  worn out. जुन॑ होऊन झिजलते. uis वर्षा-वर्षी उपाकर्म करताना जीर्ण झालते जानव बदलून नव जानव घालींगतों.

जीर्णोद्धार॑ n  restoration. पुनर्स्थापन॑. uis तमिल-नाडांत॑ भरून देऊळ पाह्याला फार बेष असलतरीन त्यांत पोणावांटा देऊळीं जीर्णोद्धार करनास्क हाळ होत आहे. 

जीव n  life. प्राण. uis मनुष्य वर्गाला सोडून वेगळ॑ तेवढ॑ प्राणीलाहीन ’तोंड नाहीत जीव’ म्हणून सांगतों. कारण, तेना संकट झालतर॑ दूसरांकड सांगाच शक्ति असतनाही.
जीव चालिवणे vt  to sustain life. वांचाच प्रयत्न करणे. uis एवढ वर्षा नंतर पणीं तला एक चोखोट काम मिळल॑ नाही. कस जीव चालिवतोकी, देवालच कळल॑.

जीवजंतु n  living things. प्राणि. uis भूलोकांत असास्क जीवजंतू सूर्याला फिराच वेगळ॑ कोण्त गृहांतीन नाही.

जीवती n  a goddess worshipped on the sixth day of a childbirth. लेंकरु उजून सहा दिवस होताना पूजा कराच देवीच नाव. जिवती. दिवती.

जीवती n  a protective amulet or talisman tied around the neck of a six day old infant, after propitiating Goddess Jivathi. सहा दिवसाच लेंकरूच गळांत बांधाच जिवती देवीच टांक. जिवती. दिवती.

जीवदान n  being of help in saving someone's life. प्राण वांचिवणे. uis डॉ. देवी शेट्टी यांचस्क थोर-थोर वैद्य लोक॑ कितिकी गरीब लेंकरांना पैसे काढनास्क॑ हृदयाच ’औपरेषन’ करून तेना (त्यना) वांचीवतात॑. असलते महान वैद्य जीवनदान देतात॑ म्हणून सांगूया.

जीवन n  life. आयुष. uis कित्ति थोर जोत्स्य असलतरीन जातक पाव्हून आयुष कित्ति आहे म्हणाच त्यंचान सांगाला होईना.

जीवनपद्धति n  lifestyle. जीवन कराच रीति. uis हेकाळाच/हेकाळ्च युव पीढीच जीवनपद्धति काहींनच बर नाही. एकच ठिकाणी बसलासणे, अवेळा खाणे, रात्रि जाग असून दिवसा झोंपी जाणे, अधीक "फास्ट-फुड्स" खाणे,  दारू पीणे, हे सर्व वेड दंडक त्यंच आंगाला वाईट करल॑.

जीवनभर adv  throughout life. आयुष पूरा. जीवभर. uis जीवनभर ’मदर तेरेसा’ बिदींत पडलते गरीब, रोगी अणी वृद्ध लोकांच हिता करीतां काम केलहोते.

जीवनमुक्ति n  liberation from future births. पुढे याच जन्मांतूं मुक्ति. uis अम्च पाप अणी पुण्याच इषोब केम्हा पूर्त संपून जात की तेम्हा अम्हाला जीवनमुक्ति मिळल॑ म्हणून अम्च शास्त्रांत/वेदांत लिवलाहे.

जीवनोपाय n  means of livelihood. जीवन कराच वाट.

जीवशास्त्र n  biology. जीवासंबंधाच शास्त्र.

जीवंत adj  alive. living. जीव असाच॑ ; जीवित in sm.  uis गंधलांकूड (गंध लांकड) चोर्टा ’वीरप्पनाला’ जीवंत धरूनपणीं पोलीसवाले तेला पह्जे म्हणून सोडूनटाकले म्हणतात॑.

जीवात्मा n  the sentient soul. आत्मा. uis अद्वैत सिद्धांतानुसार जीवात्मा अणी परमात्मा एकच आहे, लोकांच मनाला वेगळ म्हणून वाटत॑. पण, द्वैत सिद्धांतानुसार जीवात्मा केम्हाहीं परमात्मा बरीस वेगळच आहे.

जीवी n  a living thing. प्राणी. uis समुद्राच अगाध आंत सूर्यप्रकाश पावनाते ठिकाणी राह्याच जीवी विषीन अम्हाला अत्ता पणीं जास्ति विवर नाही.

जीव्ह n  tongue. तोंडाच आंतल॑ एक अवयव. जीभ ; जिव्हा/जीभ in sm. uis जीव्ह पोळींगास्क कढत दूध की काफी की पीलतर॑ अम्च घसाला अणी पोटाला नासाडा होईल.

जीव्ह गळणे fig  to salivate on account of unalloyed eagerness to eat a tasty item. रूचाच एक पदार्थ खांव॑ म्हणून वाटून जीव्हांतून लाळ सुटणे. 

जीव्हाळा n  thirst. जीव्ह॑ वाळणे. दाह. तान. पाणी पियास्क॑ वाटणे. uis जीव्हाळा लागजोरी पाणी पीनास्क असणे अम्च आंगाला वाईट करल॑ म्हणून वैद्य लोकांच अभिप्राय आहे. तेवढजोरी अम्च आंग ’डीहैड्रेट’ होईल म्हणून सांगतात॑.

जुन॑ adj  old. प्राचीन॑. पुरातन॑. नव नाहीते ;  जुना in sm. uis जुने काळांत ‘फरनीचर’ रोसवुड नाहीतर॑, बर्मा टीकांत्सून करतहोते, अणी ते टिकाऊ पणीं असण॑.

जुन॑ डोळे नव॑ तमाशा say  a saying like 'new wine in old bottle'. 'कळ्लते विषयेच पुन्हा’ हे अर्थाच एक म्हण. Note :- the literal meaning being, 'old eyes, but new fun or drama'.

जुब्बा n  a loose upper garment worn by men. जिब्बा. दादिग्यांच एक प्रकारच कापड॑ ; झब्बा in sm. uis घरांत असताना/वागताना पयजामा-जुब्बा घालींगटलतर॑ ’फ्रीसि’ असत॑, ते ’डीसेंट ड्रेस’ म्हणून पणीं सांगूया.

जुमकी n  a type of ear drop (ornament) worn by women. लोलक. uis (1) जुमकी घालींगटलतर॑ वये उण॑ सांगास्क तोंडाच रूप बदलत॑. (2) सुमार तीस वर्षापुढ॑ बायका पोरे जुमकी घालींगत होते. नंतर "औट-ऑफ-फाषन" म्हणून ते सोडूनटाकले. अत्ता पुन्हा ते फाषनांत आलाहे. 

जूता n  footwear. चपली. uis मुंबई/ कोलकत्ता मादरी पट्टणांत कोणतरींन पोर ’पोकरीपण’/ तत्तारीपण केलतर॑ बायका तेना जूता (चपली) घेऊन मारतील॑.

जेड adj  heavy. जड. भार. वजन असाच. uis जेड उचलताना अम्च पाठ (पाठे) सरळ ठींगाम॑, नाहीतर॑ मादसूळ (माजसूळ) आरंभ होउया.

जेब n  a pocket in a dress. जोब. खिसा. नेसाच कापडांत शिवलते पिशवी. uis कित्येक लोके ट्रैनांत प्रयाण कराला म्हणून तेंच पेंट-षर्टांत आंतलपटीस एक जेब शीविंगतात. तजांत पैसे-टिकट ठिवलतर॑ जत्तन (दत्तन) असत॑.

जेर n  fever. जर. आंगाला बर नाहीस्क॑ असताना याच ताप ;  ज्वर in sm. uis आंगाला बर नाहीस्क असताना जेर असलतर॑ काहीं इनफ़ेकषन झालाहे म्हणींगुया.

जेवण n  meal. जेवाच भात/पदार्थ. uis सणाच जेवण केळीच पानांत॑ वाढणे आहे.

जेवणघर n  dining room. जेवाच खोलि. uis पोणावांटा घरांतीं जेवणघर घरच॑ मागे पटीस असामुळे बाहरच कवाड कोणतरीन बडिवलतर ते ऐकणे थोड कष्ट असत॑.

जेवणे vi  to lunch. to dine. to sup. वाढलते भात खाणे. जेवाच पदार्थीं खाणे. uis अम्च घरांत॑ पाष्टे (पास्टे) पल्हार कराच दंडक नाहीते-करतां, अक्रा घंटे होयाच पुढेच जेवणे होऊन जात॑.

जैजैशी adv with pomp and gaiety. आर्भाटांत. 

जोकणे vt  to weigh. जोखणे. जेड पाह्णे. तूकम पाह्णे ; जोखणे in sm. uis जुने पेपर घेणार लोके घराला येऊन पेपर जोकताना अम्ही बरोर पाह्यींगनास्क असलतर॑ कित्येकदपा मोस करूनटाकतील॑.

जोक्त adj   befitting. suited. बरोरल॑ योग्याच ; जोगता in sm. uis अम्ही वेगळ्यांस बरोर कस वागतोंकी, ते जोक्त तेनी पणीं अम्च बरोर वागतील॑.

जोखणे vt  to weigh. जोकणे. जेड पाह्णे. तूकम पाह्णे.

जोगी n  ascetic. योगी. uis कित्येक जोगींच थोर जटा पाह्यतर॑ लेंकर भींगतील॑.

जोगीण॑ n  female ascetic. योगिनी.

जोजो n  lullaby to put  babies to sleep. लेंकरांला झोंपी गालताना सांगाच गाण॑. लाली. uis कित्येक लेंकरांस॑ झोळींत निजिवून कित्ती जोजो सांगट्लतरीन झोंप येईना. पण, तसलते लेंकरांस॑ हाती काढींगून जोजो सांगट्लतर॑ समेच झोंप येईल.

जोजो n  sleep (said for children). झोंप (लेंकराला संबंध).

जोजो करणे vt  to sleep. झोंपी जाणे. Note:- usually said of children. uis लेंकरानो, एवढ वेळ खेळलते पुरे, अत्ता लोक्कुर जेवूनटाकून जोजो कराला जांत॑.

जोडणे vt  to put together. to join. मिळिवून ठिवणे. uis (1) तज भाऊच पुस्तक भोईवर तेरा-पेरा पडलसलतर॑ ते अग्गीन तोच अपाप जोडून ठिवेल॑. (2) कोण्त सामान मोडलतरीन "अरलडैट" लावलतर ते पुन्हा जोडाल होईल.

जोडणे vt  to add. दोन अथवा जास्ति संख्या इषोब करून मिळिवणे. uis अत्ताच लेंकरांस॑ "कॅलकुलेटर" वापरून एवढ॑ अभ्यास होऊनगेले म्हणजे, दोन चुम्मण॑ संख्या कागदांत लिव्हून जोडाला सांगिट्लतर॑ पणीन चूक करतात॑.   

जोडणे vt  to pair-up. जोडी करणे. uis जमीन नांगरताना केम्हाहीं उजव॑ पटीस बांधाच बैलाला उजव॑ पटीसच बांधाम॑, अणी, डाकीकडे बांधाच्याला डावीकडेच बांधाम॑. अस॑ जोडल॑ नाहीतर॑ बरोर नांगराला होईना.   

जोडणे vt  to co-relate. संबंध करून सांगणे. uis कोण काय सांगटलतरीन तल जोक्त जोडून कायतरीन सांगाच स्वभाव तला आहे.

जोडवी n  silver rings worn on the toes by married women. वराड झालते बायकेंच अंगटाच बाजूच नाहीतर तज बाजूच बोटांत घालाच रुपेच आभरण॑. मेट्टी (tamil) ; जोडवे  in sm.

जोडा n  footware. chappals. चप्पलि.

जोडी n  a pair. एक वर्गाच दोन ;  जोड in  sm. uis दोन दिवासाच पुढ॑ मी देऊळाला गेलतम्हा मझ॑ एक चप्पली कोणकी पह्जे म्हणूनकी, नाही, कळनास्ककी घालींगून गेले. नंतर॑ मी चमाराकड॑ जावून एक नव॑ जोडी करींगटलों.

जोडी n  a married couple. दाल्ला बाईल ; जोड in  sm.

जोतिष n  astrologer. भविष्य सांण्गणार. जोत्स्य ;  ज्योतिषी in sm. uis जोतिषांमद्ये बी.वी.रामन फार प्रिसिद्ध होते.

जोतिष n  astrology. भविष्यशास्त्र. जोत्स्य. uis मझ॑ मेवणाला जोतिषाचवर फार विश्वास आहे. आलते एक-एक जातकीं मिळून आलनाही म्हणून त्यंच लेंकीच वराड उदंड देर होवून झाल॑.

जोतिषशास्त्र n  astrology. भविष्यशास्त्र. जोतिष. जोत्स्य ;  ज्योतिषशास्त्र in sm. uis जोतिषशास्त्रांत॑ थोर पांडित्य अणी प्रशस्थी घेटलते बी.वी. रामन  हे विषयाच व॑र भरून पुस्तक पणीन लिव्हलाहेत॑.

जोत्स्य n  astrologer. भविष्य सांण्गणार. जोतिष. जोत्स्य. uis नवरीच घरचे पोरीच जातक कालेच अम्हास देलते. अण्की इथपर ते अम्च॑ जोत्स्याला दाखीवून, पोराच जातकाच बरोर बेष जोडते म्हणून ऐकलांपिरीच नंतरच॑ गोष्ट अग्गीन होम॑. 

जोत्स्य n  astrology. भविष्यशास्त्र. जोतिष. uis तो एक लबाड मनुष. जोत्स्य बेष येत म्हणून घरच॑ बाह्येर एक बोर्ड घालींगून कुप्पा-कुप्पा पैसा करत आहे.

जोपाळा n  an indoor swing with a large flat wooden plank, hung from the ceiling by four chains. चोपाळा. चोंपाळा. झोपाळा. घरच आंत॑ छतांतून चार सांखळींत लोंबून घालाच लांब रुंदाच लांकडाच पालणा/ झूला. uis अम्ही जोर होऊन जोपाळांत खेळत असताना मझ॑ धक्टी बहीण॑ समोर आली अणी जोपाळाच पाट तिज गाळाला बडिवून मोठ्ठ घाव लागून रक्त गळाला आरंभ झाल॑.

जोब n  a pocket in a dress. जेब. खिसा. नेसाच कापडांत शिवलते पिशवी. uis पोणावांटा "टी-षर्टांतीन" जोब असना म्हणून टी-षर्ट घेम म्हणजे भरून दुकानांत हुडुकून पाह्यलतरेच मिळल॑.

जोर n  force. शक्ति. बळ॑. uis परमाशी आलते थोर वार॑-पाऊसांत॑ अर्साच खिडकी जोर होऊन बडिवून चूर-चूर होऊन गेल॑. 

जोर-दाखिवणे n  to show off. to bully. शक्ति अथवा प्रभाव दाखिवणे. uis तला विषय काहीं कळनातरीन जोर-दाखिवणांत उण॑ काहीं नाही.

जोरदार adj  strong. powerful. शक्तीशाली.

जोरि suff  a verb suffix indicating "till then", "untill" etc. पर्यंतीन, पतोरी, पावेतोरी अस॑ अर्थ द्याच क्रीयापदाच प्रत्यय. uis (1) हे काम पूरा करजोरि मला निम्मतींत॑ बसाला होईना. (2) बरोरल॑ अड्रस मझकडे न्होत तरीन मी त्यंच घर हुडुकींगून गेलते चूक झाल॑ म्हणून मला नंतर वाटले. एक विधान ते ठिकाण जावून पावजोरि मला देव दिसून गेले.

जोळा n  sorghum. एक प्रकारच धान्य. जोवार. uis उत्तर-कर्नाटकाच जेवणांत॑ साधारण होऊन जोळाच रोट्टि अस्त॑.

जोळ्ळु n  saliva dribling from infants mouths. ल्हान लेंकरांच तोंडांतून गळून पडाच लाळ. Note. from Tamil. uis लेंकरांच तोडांतून जोळ्ळु गळाच सहजच॑. पणे, वय झालते कित्येक म्हातारे झोंपी जाताना त्यंच तोंडांतून जुळ्ळु पडाचीन सहजच॑.

जोवार n  sorghum. एक प्रकारच धान्य. जोळा. uis महाराष्ट्रांतीन कर्नाटकाच उत्तर भागांतीन जोवारांत केलते भाकरीच रोटीच बरोर तोळ्लाईंगाला / तोळ्लावींगाला लसूण घाट्लते शेंगाच चट्णी ठींगतील॑.

जौरसी n  sago. साबुदाणा. सागू. uis (1) आंगाला बर॑ नाहीस्क असताना जौरसीच गंजी पीलतर॑ पोटाला हायशी असत॑. (2) मझ॑ आजी घालाच जौरसी-वडामाच रूचाच जवळ॑ वेगळ॑ कोण्तीन येईना.  Note. from Tamil.

ज्येष्ट n  third month of the Saka year. हिंदु पंचांगांत॑ तीसर॑ महिना.

ज्येष्ट adj  elder. थोरळे. uis दशरथ महाराजाच ज्येष्ट पुत्र होऊन श्रीरामा उजले.

ज्वाला n  flame. विस्तूच जाळ. uis वाळलते पान, कुप्पा हे अग्गीन झाडून गुंप करून विस्तू पेटिवताना बरोर पाह्यींगाम॑. नाहीतर॑ विस्तूच ज्वाला आजू बाजू पसरून थोर नाशनष्ट होईल॑.

ज्वालामुखी n  volcano. अग्निपर्वत. uis भारताच एकच एक ज्वालामुखी अंदमान-निकोबार द्वीपांत आहे.





झ the ninth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच नवां व्यंजन॑.

झगडा n  fight. clash. भांडाणे.

झट adv  in a trice. एक क्षणांत. तक्षण॑. फार लोक्कर.

झट-झट adv  hurriedly. फार लोक्कर.

झटका n  sudden jerk. दिडीरशी हलणे.

झडणे vi  to wither. to waste. क्षीण होणे. वाळ्णे. रोडे होणे. uis यंदा अम्च॑ घरच॑ अंबाच झाड भरून फूल सोडलतरीन, पोणावांटा अग्गीन झडून पडल॑.

झडणे vi  to fall or shed continuously. संतत पडणे.  uis (1) पाऊस झडताना मातींतून याच वास मला अवडल॑.  (2) हे काळांत भरून दादिग्यांस ल्हान वयंतच केंस झडाच पाह्तों. काय कारण म्हणून कळत नाही.

झडीभूती n  roots of medicinal herbs. आयुर्वेद झाडाच मूळी. uis  आयुर्वेद औषदांत अणी सिद्धा ओखदांत हिमालय पर्वतावर उगाच झडीभूती फार उपयोग करतात॑.

झळक n  glitter. dazzle. एकदम प्रकाश होणे. uis (1) कन्याकुमारीच समुद्राच जवळ मिळाच काळ॑-माति ठिवून रुपेच सामग्रि घांसलतर॑ ते बेष झळकेल॑. (2) "ब्ळू-जागर" वज्र झळकास्क॑ वेगळ॑ कोण्त वज्र्हीं झळकना म्हणून मझ॑ अम्मा सांगतील॑.

झळकणे vi  to glitter. to dazzle. एकदम प्रकाश होणे.

झरटणे vi  shrink. shrivel. आंकृति अथवा रूप ल्हान होणे. झरटून जाणे. uis (1) अम्हाला कळलते एक 65 वर्षाच बायको सहा महिने रोगांत निजून शेवटी मेले. मराच पुढे त्यनी पांच फुट चार इंच उंच होते. पण, मराच वेळ॑ आंग फार झरटून गिड्डे अण्खी बरीक होऊन गेलहोते. (2) कित्येकदनास॑ म्हातार वयेंतपणीं आंग झरटलते लक्षण काहीनच अस्त नाही. साठ वर्षा झालतर पणीं पोरास्क॑/पोरीस्क॑ दिसतील॑.

झरडि n  sieve. जरडि ; चाळणी in sm. 

झंझट n  trouble. तंटा.

झंडा n  flag. गुढी. पताका. कोडि (Tamil).

झाड n  tree. plant. वृक्ष.

झाड n  chandelier. दीपवृक्ष.

झाडणे vt  to sweep. झाडू मारणे. केरसोणींतून कुप्पा काढणे.

झाडणे fig  to scold vehemently. to give a dressing down. बेष शिवा देणे. बेष हाक्का मारणे. uis  कामवाली समोर-समोर बोलली म्हणून आज मझ बाईल तिला नीट झाडली.

झाडणी n  a broom. झाडू. केरसोणि.

झाडी-झुडूप n  a shrub. एक ल्हान झाड ; झुडूप in sm. uis  झाडी-झुडूप अधीक असाच ठिकाणी सरप असाल साध्य आहे. तेकरतां ल्हान लेंकरांना तेथ॑ हिंडाला सोडताने.

झाडू n  broom. केरसोणि. झाडणी.

झाडूवाला n  sweeper. झाडणार.

झालतर॑ adv  if possible. साध्य होईलतर॑. uis उजा (उद्या) तुज घराला याला होईलका म्हणून निश्चय होऊन सांगाला होईना. झालर॑न येतों.

झालतर॑ conj  but. still. yet. तरीं. uis कोणावर केस चालतहोतकी तो एक दिवस न्यायादीशाला सूरी घेऊन खोंचूंटाकला अणी चुकून पळाला पाह्यला. झालतर तला धरले.

झालतेपूर्त adv  as far as possible. to the extent possible. to the extent accomplished. कित्ति होत की तेवढ॑. uis झालतेपूर्त जेवणे मधे पाणी पीनात असणे चोक्कोट. 

झाल॑ preterite of होणे. होल॑ ; झाला in sm.

झालांपिरी adv  after completion. झाल॑ नंतर॑.

झांकट n  a hand-held round and flat gong made of alloy of metals, beaten with a wooden mallet during puja at the time of 'आरती’. घांट. आरतीच वेळ वाजिवाव/बडिवाच मिश्रलोहेंच घांट. uis  नवरात्रींत मझ बाप देवपूजा करताना मंगळारतीच वेळाला मीच झांकट बडीवणे. मझ भाऊलीं मलीं तजांत केम्हाहीं पोटी होतहोत॑.

झांकणे vt  to put on a lid. झांकणी घालणे ; झाकणे in sm.

झांकणे vt  to close. झांकून ठिवणे ; झाकणे in sm.

झांकणे vt  to shut down. बंद करणे. 

झांकणी n  lid. cover. झांकाच साधन॑.

झांपड n  onset of sleep induced by tiredness. stupor. drowsiness. सुस्तामुळे डोळे झांकणे. uis आजीला दिवस पूरा हिंडलतामुळे एकदम झांपड आल॑. त्यंचांन बसाला झालनाही. उपाशी निजूनगेले.

झिजणे vi  to wear out. उपयोग करून-करून कामाला योग्य नाहीस्क॑ होणे.

झिजिवणे vt  to wear away. उपयोग करून-करून योग्यनाहीस्क॑ करून ठिवणे ; झिजवणे/झिजविणे in sm.

झिम्कि n  ear drops (ornament) worn by women. कानात॑ लोंबूनघालाच एक आभरण॑. लोलक. झुमकि.

झिंपरे adj  disheveled hair. केंस विंचरणास्क॑ सोडणे ; झिंपरी in sm. uis झिंपरे डोस्के ठींगून बाहेर जाणे बर॑ न्हो.

झुकणे vt  to stoop. डोस्के लवणे.

झुडूप n  a bush. a shrub. एक ल्हान झाड.

झुम n  the feeling of goose pimples on account of a great feeling. एक थोर विकाराच अनुभवामुळे होयाच मनाच स्थिती. रोमांचाच स्तिती.  uis  "मझ भाऊच तुल्य तू आहेस" अस सांगून श्रीराम हनुमंताला भेटींगून आलिंगन कराच रूप अठींगट्लतर अम्च मनांत॑ हे दोघेंच वर असाच भक्तीच विकार॑ जास्ती वाढते. आंग पूरा झुमशी होत॑. 

झुमकि n  ear drops. झिम्कि. लोलक. 

झुरळे n  cockroach. एक प्राणि. झुरळ.

झुलणे vt  to sway the body. आंग हलिवणे. uis (1) तो अण्खीन दोन "पेग" पणीं पीलसना, अत्ताच झुलत आहे. आज रात्रि कार कस सोडाला/पळिवाला जातोकी कळना ! (2) देऊळाच हत्ति हलत-झुलत चालून जायाच पाह्याला बेष अस्ते. (3) अम्च रोडांत एक सरकारी आफीस आहे. तथे काम करणार लोके हलींगून-झुलींगून अक्रा घंटेला येत असतात॑.

झुलणे vt  to swing. झूलांत॑ खेळणे. uis अम्ही ल्हान अस्ताना उन्हाळाच समय साळेच/शाळेच दोन-तीन महिनाच सुट्टि आलकिनी समेच घरच मागले अंबाच झाडांत॑ एक झूला बांधून दिवस पूरा झुलणे करत होतों.

झुलणे vt  to nod in sleep. झोंपांत॑ डुक्ळी देणे. uis रात्रि "टी.वी" पाह्त॑ मझ भाऊ झोंपांत॑ झुलत असतो. हळ्ळु उठीवून आंत जाऊन निजाला सांगिटलतर॑ तला र्राग येते.

झुळूक n  gentle breeze. मंद वार॑. सावकाश याच वार॑. uis चेन्नैंत अधीक उक्कडलतरीन सायंकाळीच वेळ समुद्राच कांठशी असाच सर्व ठामीं चोखोट झुळूक येईल अणी लोकांस॑ तिकडल॑ विपरीत ऊबांतून थोड चुकाला अवसर मिळते.

झूला n  swing. चोपाळा. पालणा ; झुला in sm.

झेंडा n  flag. कोडी (Tamil).

झोकणे vt  to weigh. तोलणे. वजन पाह्णे ; जोखणे in sm.

झोकणे fig  to estimate or take the measure of a person. एक मनुषाच षाणपण॑ तूकम घालणे (tamil).   

झोकी n  measured by weight. तोलून वजन करणे ; जोखी in sm.uis  किराणा अण्खी भाजी-पाला विकणार झोकींत दगा करतात॑. 5% पतोरी उणे असाला वाट आहे. Note:-  झोका (n)  in sm means "a swing. an oscillation".

झोपडपट्टि n  slum. चेरी (Tamil).

झोपडी n  hut. गोठा.

झोपाळा n  an indoor swing with a large flat wooden plank, hung from the ceiling by four chains. चोपाळा. चोंपाळा. जोपाळा. घरच आंत॑ चार सांखळींतून छत्तांत्सून लोंबून घालाच लांब रुंद लांकडाच पालणा/ झूला. uis अम्ही जोर होऊन झोपाळांत खेळत असताना मझ॑ धक्टी बहीण॑ समोर आली अणी झोपाळाच पाट तिज गाळाला बडिवून मोठ्ठ घाव लागून रक्त गळाला आरंभ झाल॑.

झोळी n  cloth hammock for infants. लेंकरांला झोंपी घालाला उपयोग कराच कापडेच झूला ; झोला in sm.

झोंप n  sleep. निद्र ;  झोप in sm.

झोंप-मोडणे vi  to have one's sleep broken. अर्ध झोंपांतून उठणे. uis काल॑ अर्ध रात्रि कोणकी थोर वरडा-वरडी करत अम्च "बिल्डिंगांत" आले वाटते. मझ झोंप मोडल॑ अणी तज नंतर॑ उदंड वेळ मला झोंप आल नाही.

झोंपाळू adj  a person prone to excessive sleep. साधारणापक्षा फार जास्त झोंपी जाणार ; झोंपाळू/झोपाळू/झोंप्या/झोंपाळ/झोंपाळ्या in sm. uis अम्च देशांत कित्येक पट्णांत/सिटींत दुपारी एक घंटेला दुकान झांकतील॑. पुन्हा चार घंटेलाच उघडतील॑. असल॑ दुकानदारांना झोंपाळू लोके म्हणून सांगण काहीं चूक नाही म्हणून मला वाटते.

झोंपाळू fig  an extremely lazy person. फार आळसीच मनुष. uis तला तीन चार चोखट चोखट काम  मिळ्ळतरीन, तजांतून तेवढीन काढूनटाकले. तो एक झोंपाळू म्हणून नंतर मला कळ्ळ॑.

झोंपिजाणे vi  to sleep. झोंपणे.




ञ the tenth consonant in the DM alphabet. दक्षिणी मराठीच दहावां व्यंजन॑.

No comments: