22 June 2009

दक्षिणी मराठी व्याकरण॑ - अध्याय V


Chapter V

अध्याय V


 Verb - क्रियापद

Please read the following sentences and note the underlined words. खाले लिव्हलसाच वाक्य वाचून त्यंत॑ खाले रेखा-होढलते गोष्ट पाह्न्त॑.


Sentence
वाक्य
I drank tea
मी चाय पीलों
She felt sad
तिला संकट वाटल॑
Today morning it rained
आज पाष्टे पाऊस पडल॑
He runs fast
तो लोक्कर पळतो
I shall come tomorrow
मी उद्या येतों


The underlined words denote an action, an experience, an occurrence or a state. Such a word is called a Verb. खाले रेखा-होढलते गोष्ट एक कृती, अनुभव, संभव अथवा स्थिती विषयीं सांगते. तसल॑ गोष्टाला क्रियापद म्हणतों.


Transitive and Intransitive Verbs - सकर्मक अणी अकर्मक क्रियापद

Transitive Verbs are those which require an object (कर्म) to bring out the correct meaning of the sentence ; eg. in the sentence "I drank tea", the verb "drank" refers directly to the object "tea" and so it is a Transitive Verb. However, in the sentence "He runs fast", the verb "runs" does not have an object and hence it is an Intransitive Verbवाक्याच अर्थ पूरा कळिवाला कर्माच (object's) आवश्य असलतर॑, तसल॑ क्रियापदाला "सकर्मक क्रियापद" म्हणतों. उदाहरणाला, "मी चाय पीलों", हे वाक्यांतल॑ क्रियापद "पीलों" हेला ते वाक्याच अर्थ पूरा कळिवाला "चाय" हे कर्माच आवश्य असाकरतां तला सकर्म क्रियपद म्हणतों. तसच, वाक्याच अर्थ पूरा कळिवाला कर्माच आवश्य नोकोते क्रियापदाला "अकर्मक क्रियापद" म्हणतों. "तो लोक्कर पळतो", हे वाक्यांत॑, "पळतो", हे एक अकर्मक क्रियापद आहे, कां म्हण्जे, हे वाक्याच अर्थ पूरा कळिवाला हेला कर्माच आवश्य नाही.  


Compound Verbs and Helping Verbs - संयुक्त क्रियापद अणी सहायक क्रियापद

Please read the following sentence. खालच॑ वाक्य वाचांत॑.

तिन॑ गाणे सांगत आहे

The word सांगत is derived from the धातु (root) सांग and by itself conveys an incomplete meaning. Such expressions are called धातुकारण, ie, root-based or root-derived. The meanings of such धातुकारण expressions are completed with the help of Helping Verbs or सहायक क्रियापद. In the above example आहे is the Helping Verb. When धातुकारण and सहायक क्रियापद combine we get a संयुक्त क्रियापद or Compound Verb. "सांगत" हे वाचून अम्हाला तज पूर्ण अर्थ कळत नाही. हेला अम्ही "धातुकारण" अस सांगतों. पण, तज बरोर "आहे" जोडलतर॑, म्हणजे, "सांगत आहे" अस म्हणटलतर॑ अम्हाला पूर्ण अर्थ कळते. म्हणजे, धातुकारण अणी सहायक क्रियापद हे दोनीं जोडून संयुक्त क्रियापद होत॑.

Let us see some examples of the Compound Verb and Helping Verb. संयुक्त क्रियापदाचीं सहायक क्रियापदाचीं अण्खी थोड उदाहरण॑ पाव्हूया.

वाक्य
Sentence
धातुकारण
Root derivative
सहायक क्रियापद
Helping Verb
संयुक्त क्रियापद
Compound Verb
मी जेवत आहें
जेवत
आहें
जेवत आहें
तू वाचत आहेस॑
वाचत
आहेस॑
वाचत आहेस॑
लेंकरू रडत आहे
रडत
आहे
रडत आहे
मी सिनिमा पाह्त होतों
पाह्त
होतों
पाह्त होतों




Subject, Object and Predicate - कर्ता, कर्म अणी कार्य

Before proceeding further let us understand the grammatical meanings of Subject (कर्ता), Object (कर्म) and Predicate (कार्य).

Subject is the word, phrase or clause in a sentence which indicates the person or thing that performs the action. एक वाक्यांत॑, क्रीया अथवा काम करणाराला उद्देश करून सांगाच गोष्टला नाहीतर॑, गोष्ट-समूहाला कर्ता म्हणतों. "रामदूत हनुमंत सीतादेवीला लंकापुरीच अशोकवनांत॑ पाह्यिले", हे वाक्यांत॑ कर्ता आहे "रामदूत हनुमंत".

Object is  the noun or pronoun in a sentence which is affected by the action of the verb. एक वाक्यांत॑, क्रियाच परिणाम पडाच/लागाच नाम॑ अथवा सर्वनामाला कर्म म्हणतों"रामदूत हनुमंत सीतादेवीला लंकापुरीच अशोकवनांत॑ पाह्यिले",  हे वाक्यांत॑ कर्म आहे "सीतादेवी".

Predicate is the word or words (usually a verb and its complement) in a sentence which tell us about the subject. एक वाक्यांत॑ कर्ता विषयीं सांगाच गोष्टाला कार्य म्हणतों. साधारण होऊन हे एक क्रियापद नाहीतर॑, क्रियापदीं तज बरोरल॑ गोष्टीं अस्ते. "रामदूत हनुमंत सीतादेवीला लंकापुरीच अशोकवनांत॑ पाह्यिले", हे वाक्यांत॑ कार्य आहे "लंकापुरीच अशोकवनांत॑ पाह्यिले",  अणी हे कार्यांत॑ क्रियापद आहे "पाहिले".

Let us now see a few more examples of  कर्ता, कर्म and कार्य in sentences where the verbs are Transitive or Intransitive. सकर्मक अणी अकर्मक क्रियापद प्रयोग झालते वाक्यांत॑ कर्ता, कर्म अणी कार्य हेज अण्खीन थोड उदाहरण॑ अत्ता पाव्हूया.

Sentences with Transitive Verbs
 सकर्मक क्रियापदाच वाक्य   


वाक्य
Sentence

कर्ता
Subject
कर्म
Object
कार्य
(हेजांत॑ क्रियापदाला खाले रेखा होडून आहे)
Predicate
(the verb in the predicate is underlined)
मी अंबा खातों
मी
अंबा
खातों
तो मझ॑ पैसा वापस देला
तो
मझ॑ पैसा
वापस देला
मी थोड वेळ बसाला जातों
मी
थोड वेळ
बसाला जातों
अनावश्य होऊन तू मझकडे बोल नको
तू
मझकडे
अनावश्य होऊन बोल नोको
रावण सीतादेवीला अपहरण॑ केला
रावण
सीतादेवीला
अपहरण॑ केला
कोणतरीन विचारलतर॑ मी नाही म्हणून सांग
कोणतरीन
मी
नाही म्हणून सांग


Sentences with Intransitive Verbs
 अकर्मक क्रियापदाच वाक्य


वाक्य
Sentence

कर्ता
Subject
कर्म
Object
कार्य
(हेजांत॑ क्रियापदाला खाले रेखा होडून आहे)
Predicate
(the verb in the predicate is underlined)
मी जाऊन-येतों
मी
-
जाऊन-येतों
तिला कळना
ति(ला)
-
कळना
ते कुत्र चावेल॑
(ते) कुत्र
-
चावेल॑
मला कळिवनास्क॑ बाहेर जावुनको
मला (कळिवनास्क॑)
-
बाह्येर जावुनोको
सूर्य अस्तमन॑ झाल॑
सूर्य
-
अस्तमन॑ झाल॑
डांच चावल॑
डांच
-
चावल॑
वेळ मिळताना ये
वेळ मिळताना
-
ये

 

Tense - काळ

Form of a Verb indicating the time of its action, relative to the time the statement is made, is called its Tense. The time of action could be in the past, present or future and the corresponding tenses are called Past Tense, Present Tense and Future Tense. भूतकाळ, वर्तमानकाळ आणी भविष्यकाळ अस क्रियापदाच तीन काळ आहे. पुढे झालते क्रीयाविषयीं सांगाच क्रियापदाला भूतकाळ म्हणतों. सद्या होत असाच क्रियाविषयीं सांगाच क्रियापदाला वर्तमानकाळ म्हणतों. तसच, नंतर होयाच क्रियाविषयीं सांगाच क्रियापदाला भविष्यकाळ म्हणतों.

A verb changes its form in the three tenses depending on the Person, Number and Gender of the Subject as shown below. खाले दाखिवला प्रकार॑ पुरुष, वचन॑ अणी लिंग हे तीघांजोक्त॑ काळाच रूप वेगळ॑-वेगळ॑ अस्ते.



लिंग Gender


पुरुष Person

भूतकाळ
Past Tense

वर्तमानकाळ
Present Tense

भविष्यकाळ
 Future Tense

एकवचन॑ Singular

बहुवचन॑ Plural

एकवचन॑ Singular

बहुवचन॑ Plural

एकवचन॑ Singular

बहुवचन॑ Plural






पुल्लिंग
Masculine










पह्यिल पुरुष First Person

मी वाचलों
अम्ही वाचलों
मी वाचत आहें


मी वाचतों


अम्ही वाचत आहों
मी वाचेन


मी वाचणार
अम्ही वचणार


दुसर॑ पुरुष Second Person

तू वाचलास
तुम्ही वाचलांत॑

तू वाचत आहेस

तू वाचतोस॑

तुम्ही वाचत आहेंत॑
तू वाचशील॑

तू वाचणार
तुम्ही वाचतील॑

तुम्ही वाचणार
तिसर॑ पुरुष Third Person

तो वाचला
तेनी वाचले


तो वाचत आहे
तेनी वाचत आहेत॑


तो वाचेल॑

तो वाचणार
तेनी वाचतील॑

तेनी वाचणार







स्त्रीलिंग
Feminine

पह्यिल पुरुष First Person

मी वाचलें
अम्ही वाचलों
मी वाचत आहें

मी वाचतें
अम्ही वाचत आहों
मी वाचेन

मी वाचणार
अम्ही वाचणार
दुसर॑ पुरुष Second Person

तू वाचलीस
तुम्ही वाचलांत॑
तू वाचत आहेस

तू वाचतीस॑
तुम्ही वाचत आहेंत॑
तू वाचशील॑
तुम्ही वाचतील॑
तिसर॑ पुरुष Third Person

तिन॑ वाचली
तेनी वाचले
तिन॑ वाचेत आहे

तेनी वाचत आहेत॑

तिन॑ वाचेल॑

तिन॑ वाचणार


तेनी वाचतील॑

तेनी वाचणार




Perfect and Imperfect Tenses - पूर्ण अणी अपूर्ण काळ

When the verb assumes an “action-completed form” it is said to exist in a Perfect Tense. A Perfect Tense can exist in a Past Perfect, Present Perfect or a Future Perfect form. Similarly when the verb assumes an “action-incompleted form” it is said to exist in an Imperfect Tense.  An Imperfect Tense also can exist in a Past Imperfect, Present Imperfect or Future Imperfect form. In a sentence the Perfect and Imperfect Tenses assume different forms depending on Gender, Person and Number of the Subject. Examples of these are given in the matrix shown below. 
पूर्ण झालते विषय सांगाच काळाला पूर्णकाळ म्हणतों. पूर्ण-भूतकाळ, पूर्ण-वर्तमानकाळ अणी पूर्ण-भविष्यकाळ अस॑ तीन प्रकारांत॑ हे अस्ते. तसच, पूर्ण झालनाहीते विषय सांगाच काळाला अपूर्णकाळ म्हणतों. हे पणीं अपूर्ण-भूतकाळ, आपूर्ण-वर्तमानकाळ अणी अपूर्ण-भविष्यकाळ अस॑ तीन रूपांत॑ अस्ते. कर्ताच लिंग, पुरुष, वचन॑ हेजाजोक्त॑ वाक्यांत॑ पूर्ण अणी अपूर्णकाळ॑ वेगळ॑-वेगळ॑ रूपांत॑ अस्ते. हेज उदाहरण॑ खाले देलाहे.



काळ॑ Tense



पहिल॑ पुरुष
1st Person


दुसर॑ पुरुष
2nd Person

तिसर॑ पुरुष
3rd Person


एकवचन॑
Singular
बहुवचन॑
Plural
एकवचन॑
Singular
बहुवचन॑
Plural
एकवचन॑
Singular
बहुवचन॑
Plural




पूर्ण-भूतकाळ
Past Perfect













पुल्लिंग
Masculine


मी वाचल्होतों
I had read


अम्ही वाचल्होतों
We  had read

तू वाचल्होतास॑
You had read


तुम्ही वाचल्होतांत
You had read

तो वाचल्होता
He had read


तेनी वाचल्होते
They had read



स्त्रीलिंग
Feminine
मी वाचल्होतें
I had read
अम्ही वाचल्होतों
We had read
तू वाचल्होतीस॑
You had read
तुम्ही वाचल्होतांत॑
You  had read
तिन॑ वाचल्होती
She had read
तेनी वाचल्होते
They had read

  
नपुंसक लिंग
Neuter




उंदीर चावल्होत॑
The rat had bitten
उंदीर चावल्होत॑
The rats had bitten




पूर्ण-वर्तमानकाळ
Present Perfect

पुल्लिंग
Masculine

मी वाचलों
I read

अम्ही वाचलों
We read
तू वाचलास
You read
तुम्ही  वाचलांत
You read

तो वाचला
He read
                
तेनी वाचले
They read


  स्त्रीलिंग
Feminine
मी वाचलाहें
I have read


अम्ही वाचलाहों
We have read
तू वाचली आहेस
You have read
तुम्ही  वाचलाहेंत॑
You have read
तिन॑ वाचलीहे
She has read
तेनी वाचलाहेत॑
They have read

  
नपुंसक लिंग
Neuter





उंदीर चावल॑
The rat bit
उंदीर चावल॑
The rats bit






पूर्ण-भविष्यकाळ
Future Perfect











पुल्लिंग
Masculine

तुम्ही येऊन पावाच पुढे मझ॑ जेवणे झालसल॑

तुम्ही येऊन पावाच पुढे अम्च॑ जेवणे झालसल॑
तेनी येऊन पावाच पुढे तुझ॑ जेवणे झालसल॑.
तेनी येऊन पावाच पुढे तुम्च॑ जेवणे झालसल॑

तुम्ही येऊन पावाच पुढे तो जेवणे करूनटाकल-सल॑

तुम्ही येऊन पावाच पुढे तेनी जेवणे करूनटाकलस-तील॑
 
स्त्रीलिंग
Feminine
तुम्ही येऊन पावाच पुढे मझ॑ जेवणे झालसल॑
तुम्ही येऊन पावाच पुढे अम्च॑ जेवणे झालसल॑
तेनी येऊन पावाच पुढे तुझ॑॑ जेवणे झालसल॑.
तेनी येऊन पावाच पुढे तुम्च॑ जेवणे झालसल॑.

तुम्ही येऊन पावाच पुढे तिन॑ जेवणे करूनटाकल-सल॑


तुम्ही येऊन पावाच पुढे तेनी जेवणे करूनटाकल-सतील॑
   

नपुंसक लिंग
Neuter




उंदीर चावेल॑
The rat will bite
उंदीर चावेल॑
The rats will bite






अपूर्ण-भूतकाळ
Past Imperfect















पुल्लिंग
Masculine

मी दिवसोडी
वाचत होतों
I used to read daily

अम्ही दिवसोडी वाचत होतों
We used to read daily

तू दिवसोडी वाचत होतास॑
You used to read daily
तुम्ही दिवसोडी
वाचत होतांत॑
You used to read daily
तो दिवसोडी वाचत होता
He used to read daily
तेनी दिवसोडी वाचत होते
They used to read daily



स्त्रीलिंग
Feminine
मी दिवसोडी
वाचत होतें
I used to read daily
अम्ही दिवसोडी वाचत होतों
We used to read daily
तू दिवसोडी वाचत होतीस॑
You used to read daily
तुम्ही दिवसोडी
वाचत होतांत॑
You used to read daily
तिन॑ दिवसोडी वाचत होती
She used to read daily
तेनी दिवसोडी वाचत होते
They used to read daily
  

नपुंसक लिंग
Neuter




उंदीर चावत होत॑
The rat was biting
उंदीर चावत होत॑
The rat was biting






आपूर्ण-वर्तमानकाळ
Present Imperfect


पुल्लिंग
Masculine

मी वाचत आहें
I am reading

अम्ही वाचत आहों
We are reading
तू वाचत आहेस॑
You are reading

तुम्ही वाचत आहेंत॑
You are reading
तो वाचत आहे
He is reading
तेनी वाचत आहेत॑
They are reading
 
स्त्रीलिंग
Feminine
मी वाचत आहें
I am reading


अम्ही वाचत आहों
We are reading
तू वाचत आहेस॑
You are reading

तुम्ही वाचत आहेंत॑
You are reading
तिन॑ वाचत आहे
She is reading
तेनी वाचत आहेत॑
They are reading
  
नपुंसक लिंग
Neuter




उंदीर चावत आहे
The rat is biting

उंदीर चावत आहे
The rat is biting

अपूर्ण-भविष्यकाळ
Future Imperfect




पुल्लिंग
Masculine

मी वाचत असन॑
I will be reading
अम्ही वाचत अस्तों /असओं
We will be reading

तू वाचत असशील॑
You will be reading


तुम्ही वाचत अस्तील॑
You will be reading
तो वाचत असल॑
He will be reading
तेनी वाचत  अस्तील॑
They will be reading

 
स्त्रीलिंग
Feminine
मी वाचत असन॑
I will be reading
अम्ही वाचत अस्तों /असओं
We will be reading

तू वाचत असशील॑
You will be reading

तुम्ही वाचत अस्तील॑
You will be reading

तिन॑ वाचत असल॑
She will be reading
तेनी वाचत  अस्तील॑
They will be reading

  

नपुंसक लिंग
Neuter




उंदीर चावत असल॑
The rat will be biting
उंदीर चावत असल॑
The rat will be biting


Declensions of Transitive and Intransitive Verbs.
सकर्मक अणी अकर्मक क्रीयापदाच विकार.

Transitive Verbs and Intransitive Verbs change their forms depending on the Gender and Number of the Subject as explained below. लिंग अणी वचनाजोक्त॑ दक्षिणी मराठींत॑ कित्येकदपा  सकर्मक अणी अकर्मक क्रीयापदाच विकार अम्हाला दिसून येत॑.

1) Transitive Verb सकर्मक क्रीयपद

When the Subject’s Gender is either Masculine or Feminine and the Number is Singular, then the Transitive Verb assumes the corresponding “Masculine” or “Feminine” form. But it assumes the same “pluralized” form for both Masculine and Feminine Genders when the Subject’s Number is Plural.

When the Subject’s Gender is Neuter, the Transitive Verb assumes a “Neuter” form for both 
Singular and Plural Numbers of the Subject.

कर्ता पुल्लिंग, स्त्रीलंग अणी एकवचनाच असताना तझजोक्त॑ सकर्मक-क्रीयपद "पुल्लिंग रूप" अणी "स्त्रीलंग रूप" अस॑ वेगळ॑-वेगळ॑ विकारांत असत॑. पण कर्ता पुल्लिंग, स्त्रीलंग अणी बहुवचनाच असताना सकर्मक-क्रीयपद एकच रीतीच "बहुवचन रूप" काढत॑.

एकवचन अणी बहुवचनाच कर्ता नपुंसकलिंगाच असलतर॑ सकर्मक-क्रीयपद एकच सारखल॑ "नपुंसक रूप" काढत॑.

Given below are a few examples of such usages.


Number & Gender of Subject
(कर्ताच वचन॑ & लिंग)

Sentence with Transitive Verb
(सकर्मक क्रीयपदाच वाक्य)



Remarks

एकवचन, पुल्लिंग
एक पोर इकडे आला

बहुवचन, पुल्लिंग
दहा पोरे इकडे आले

एकवचन, स्त्रील्लिंग
एक पोरी इकडे आली

बहुवचन, स्त्रील्लिंग
दहा पोरी इकडे आले

एकवचन, नपुंसक
एक कुत्र इकडे आल॑

बहुवचन, नपुंसक
दहा कुत्र इकडे आल॑
कुत्र is Neuter Gender. In Singular and Plural it is कुत्र.


2) Intransitive Verb अकर्मक क्रीयापद 

Irrespective of the Subject's Gender and Number the Intransitive Verb assumes "Neuter" form. In this respect there is similarity with the form assumed by Transitive Verbs in sentences where the Subject is of Neuter Gender with either of the Numbers.

पुल्लिंग स्त्रीलिंग अणी नपुंसक अस॑ तीन विधाच लिंगाच कर्ता एकवचांतकी बहुवचनांतकी असलतर॑, अकर्मक-क्रीयापद "नपुंसक रूप" काढत॑.  

Given below are a few examples of such usages.



Number & Gender of Subject
(कर्ताच वचन॑ & लिंग)

Sentence with Intransitive Verb
(अकर्मक क्रीयापदाच वाक्य)



Remarks
एकवचन, पुल्लिंग
तला जेर आल॑/आहे

बहुवचन, पुल्लिंग
त्यांस जेर आल॑/आहे

एकवचन, स्त्रील्लिंग
पोरीला जेर आल॑/आहे

बहुवचन, स्त्रील्लिंग
पोरींस जेर आल॑/आहे

एकवचन, नपुंसक
मांदराला जेर आल॑/आहे
मांदर॑ is Neuter Gender. In Singular and Plural it is मांदर॑.
बहुवचन, नपुंसक
लोकांस जेर आल॑/आहे





No comments: