16 June 2009

दक्षिणी मराठी व्याकरण॑ - अध्याय III


Chapter - III
अध्याय - III



Pronouns - सर्वनाम॑
In this section we shall discuss about Pronouns and how they are used in Dakshini Marathi.  हे विभागांत॑ दक्षिणि-मराठींतल॑ सर्वनामा विषयीं चर्चा करूया अणी सर्वनामाच प्रयोग कस॑ करतों, हे पाव्हूया.
Please read the following two sentences carefully.  खाले लिव्हलते दोन वाक्य श्रद्धांत॑ वाचा.
" सुरेश एक चोखोट पोर आहे. तो तज माय-बाप सांगाच काम पूरा नीट करतो ".
In the second sentence the word "तो" has been used in place of "सुरेश" appearing in the first sentence. The word "तो" is called a Pronoun. In other words a Pronoun can be defined as a word which stands for a Noun. पह्यिलच वाक्यांतल॑ "सुरेश" हे गोष्टाच बद्दिल दुसर॑ वाक्यांत॑ "तो" हे गोष्ट प्रयोग झालाहे. "तो", हे एक सर्वनाम आहे. म्हण्जे, एक नामाच बद्दिल वेगळ॑ एक गोष्ट प्रयोग केलतर॑, ते दुसर॑ गोष्टाला अम्ही सर्वनाम अस॑ म्हणतों.

There are six basic pronouns in Dakshini Marathi. These are मी, तू, ते, हे, कोण and काय. These six pronouns assume different inflected forms in sentences based on case, gender, class, number etc., called "declensions". दक्षिणी मराठींत॑ मी, तू, ते, हे, कोण अणी काय अस॑ सहा मूलविधाच सर्वनाम॑ आहे. वाक्यांत॑ प्रयोग करताना विभक्ती, वचन॑, लिंग हे आधाराजोक्त॑ हेज रूप वेगळ॑-वेगळ॑ बदलते. हेला 'विकार" अस॑ म्हण्तों.
The following sentences tell us how these basic pronouns appear.  वक्यांत॑ हे सर्वनाम कस॑ प्रयोग होत॑ म्हणून पाव्हूया.
Noun usage
Pronoun usage


मझ॑ नाव आनंदराव
मी दक्षणी मराठी बोलतों.

रवी, इकडे ये
मी सांगापर्यंतीन तू कोठीन जाताने

बीदींत॑ एक वेड कुत्र हिंडत आहे
ते तिकडून जा जोरी मी घरांतून बाहेर उतरना

सद्याला मझकडे एक पुस्तक आहे
रामाला पाह्याला जाताना हे तला देशील का ?

बाह्येर पोर पळत आहे
कोण म्हणून पाह्तोस का ?

त्यंच मध्ये थोर भांडणे झाल॑
झालते काय, ते पूर्त मला सांग

Categories of Pronouns - सर्वनामांच प्रकार॑     
There are five main categories of Pronouns in Dakshini Marathi. These are shown below. दक्षिणी-मराठींत॑ खाले दाखिवलते प्रकार पांच मुख्य प्रकाराच सर्वनाम आहे.
1)   Personal - पुरुषरूप॑
2)   Demonstrative - प्रमाणरूप॑
3)   Interrogative - प्रश्नरूप॑
4)   Indefinite - अव्यक्तरूप॑
5)   Reflexive - स्वतरूप॑

Personal Pronouns - पुरुषरूप॑ सर्वनाम॑:-
Pronouns which refer to self, the person(s) spoken to, and the persons referred to, are called Personal Pronouns. Both singular and plural personal pronouns are expressed in First Person, Second Person or Third Person.  Examples of these are given below.  बोलणारांच दृष्टींतून, बोलणार स्वता, कोणाकडे बोलतोंकी तेनी, अणी कोणाचविषयीं बोलतोंकी तेनी, हे तीनांलीं पुरुषरूप॑ सर्वनाम॑ अस॑ म्हणतों. दक्षिणी-मराठींत॑ पहिल॑पुरुष, दुसर॑पुरुष अणी तिसर॑पुरुष अस तीन प्रकाराच पुरुषरूप॑-सर्वनाम आहे. हेज उदाहरण॑ खाले देलाहे.


प्रकार
Category
लिंग
Gender
एकवचन॑
Singular
बहुवचन॑
Plural


दक्षिणी-मराठी
English
दक्षिणी-मराठी
English
पहिल॑पुरुष
first person
नपुंसक॑
neuter
मी
I
अम्ही
we
दुसर॑पुरुष
second person
नपुंसक॑
neuter
तू
you
तुम्ही
you
तिसर॑पुरुष
third person
पुल्लिंग masculine
यो (इकडे असणार)
he (who is here)
हेनी (इकडे असणारे)
they (men who are here)
तिसर॑पुरुष
third person 
पुल्लिंग masculine
तो (तिकडे
असणार)
he (who is there)
तेनी (तिकडे
असणारे)
they (men who are there)
तिसर॑पुरुष
third person
स्त्रीलिंग feminine
हिन॑ (इकडे असणारी)
she (who is here)
हेनी (इकडे असणारे)
they (women who are here)
तिसर॑पुरुष
third person
स्त्रीलिंग feminine
तिन॑ (तिकडे असणारी)
she (who is there)
तेनी (तिकडे असणारे)
they (women who are there)
तिसर॑पुरुष
third person
नपुंसक॑
neuter


हेनी
they (people who are here)
तिसर॑पुरुष
third person
नपुंसक॑
neuter


तेनी
they (people who are there)


A few sample sentences involving some of the above Personal Pronouns are given below. 
पुरुषरूप-सर्वनाम प्रयोग केलते कित्येक वाक्य खाले देलाहे.



English  word
दक्षिणी-मराठी गोष्ट


English sentence

दक्षिणी-मराठी वाक्य
this man (here)
यो
(masculine, singular)
this  man  says he does not want to leave from here
इकडून जायना म्हणून यो  सांगतो
these men (here)
हेनी
(masculine, plural)
these  men  say they do not want to leave from here
इकडून जायना म्हणून हेनी  सांगतात
this woman (here)
हिन॑
(feminine singular)
this  woman  says she does not want to leave from here
इकडून जायना म्हणून हिन॑  सांगती
these women (here)
हेनी
(feminine
 plural)
these  women  say they do not want to leave from here
इकडून जायना म्हणून हेनी  सांगतात
that man (there)
तो
(masculine, singular)
that  man  says he does not want to come here
तो  इकडे येईना म्हणून सांगतो
those men (there)
तेनी
(masculine, plural)
those  men  say they do not want to come here
तेनी  इकडे येईना म्हणून सांगतात
that woman (there)
तिन॑
(feminine singular)
that  woman  says she does not want to come here
तिन॑  इकडे येईना म्हणून सांगती
those women (there)
तेनी
(feminine
 plural)
those  women says they do not want to come here
तेनी  इकडे येईना म्हणून सांगतात
these people (here)
हेनी
(neuter
plural)
these  people  say they do not want to leave from here
इकडून जायना म्हणून हेनी  सांगतात
those people (there)
तेनी
(neuter
plural)
those people  say they do not want to come here
तेनी  इकडे येईना म्हणून सांगतात


Demonstrative Pronouns - प्रमाणरूप॑ सर्वनाम॑ :-
A word indicating which person or thing is referred to, is a Demonstrative Pronoun. The following are a few examples of their usage. एक प्रत्येक व्यक्तीला नाहीतर साधनाला उद्देश करून सांगाच गोष्टाला प्रमाणरूप॑-सर्वनाम म्हणतों. हेज कित्येक उदाहरण॑ खाले दाखिवलाहे.



English  word
दक्षिणी-मराठी गोष्ट


English sentence

दक्षिणी-मराठी वाक्य

this
हे
(singular, neuter)


This  is my room

हे मझ खोली आहे

these



हे
(Plural,
neuter)

These  three or four  toys lying on the floor belong to my grandson

भोईवर पडलसाच हे  तीन-चार बावोली मझ॑ नातूच आहे

that

ते
(singular neuter)


That  is my book



ते  पुस्तक मझ॑ आहे


those



ते
(Plural
neuter)


Those  three dogs are creating a big nuisance in the road

ते  तीन कुत्रहीं बीदींत॑ मोट्ठ॑ उपद्रव करत आहे

it
ते &   हे (singular, neuter)

I did not read  it  fully


मी ते पूरा वाचलों नाही
मी हे  पूरा वाचलों नाही


Interrogative Pronouns  - प्रश्नरूप॑ सर्वनाम॑ :-
Pronouns which suggest a question or introduce an element of interrogation in sentences are called Interrogative Pronouns. The following are a few examples of their usage in Dakshini Marathi. एक वाक्यालात॑ प्रश्नाच रूप द्याच सर्वनामाला प्रश्नरूप सर्वनाम अस म्हणतों. हेज कित्येक उदाहरण॑ खाले दाखिवलाहे.

दक्षिणी-मराठी शब्द

English  word


English sentence
दक्षिणी-मराठी वाक्य
कोण

who

Who are you ?
कोण तू ?
तू कोण आहेस॑ ?


कोणाच॑


whose

Whose book is this ?


I don't know whose book this is.
हे पुस्तक कोणाच॑ आहे ?

हे पुस्तक कोणाच॑ म्हणून मला कळ्ना.

कोणाकडे
 to whom
To whom shall I complain about that man ?
तज विषयीं कोणाकडे मी आरोप करूं ?

कोणाला


to whom


To whom shall I hand over his bag ?

मी हे पिशवी कोणाला देऊं ?
कोणाला

for whom
For whom was that telephone call ?
ते टेलिफोण कोणाला होत॑ ?
कोणा करतां
for whom
For whom am I writing this Dakshini Marathi grammar ?
कोणा करतां मी हे दक्षिणी-मराठीच व्याकरण॑ लिव्हतों  ?

काय
what
What are you going to do in the coming week ?
याच वार तुम्ही काय कराला जातांत॑

कां
why
Why did he not come to my house yesterday ?
काल॑ तो कां मझ घराला आला नाही ?

कोठ॑
where
Where shall I keep this wet umbrella ?

हे ओल॑ छत्री मी कोठ॑ ठिऊं ?
कोठून/कोठसून
where from
Where from did you buy this sweetmeat ?
हे तुकडा तू कोठून/कोठसून घेट्लास॑ ?

केम्हा
when
When are you going to come to my house ?
मझ घराला तू केम्हा येतोस॑ (याला जातोस॑) ?

कस॑
how
I don't know how to answer this question
हे प्रश्नाच उत्तर कस॑ देणे म्हणून मला कळ्ना.

कोण्त॑
which
Which train did you catch while going to Chennai yesterday ?  
काल॑ चेन्नैला जाताना तू कोण्त॑ ट्रेन धरलास॑ ?



Indefinite Pronouns - अव्यक्त सर्वनाम
A pronoun which does not refer to a particular person or thing is called an Indefinite Pronoun. एक प्रत्येक व्यक्ती नाहीतर॑, वस्तूला उद्देश करनाते सर्वनामाला अव्यक्त सर्वनाम अस म्हण्तों. हेज कित्येक उदाहरण॑ खाले दाखिवलाहे.

दक्षिणी-मराठी शब्द

English  word

English sentence
दक्षिणी-मराठी वाक्य

तेवढ॑दन॑

everybody /everyone

If our country is to prosper,  then everyone should put in his best effort
अम्च देश उद्धार होम॑ म्हण्जे तेवढदनीं त्यंचकडून कित्ती कराला होईलकी ते कराला पह्जे


कोणाला

for anyone / for anybody

If you keep the door open then it will not be a problem for anyone to walk in
कवाड उघड॑ ठिवलतर॑ कोणाला पह्जेतरीन कष्ट नाहीस्क॑ आंत॑ वेघून याला होईल

कोणकी
somebody / anybody
Just a while ago somebody knocked on the door
थोड वेळाच पुढे कोणकी कवाड बडिवले

कोण(तरीन) / कोणीं
somebody / anybody

If somebody says anything, are  you going to believe it  ?
कोण तरीन / कोणीं काय तरीन सांगट्लतर॑ तुम्ही ते विसंबाला जातांत का ?

काय
what
What you said a little while ago  was correct
तुम्ही थोड वेळाच पुढे काय सांगट्लांत की/ सांगलांत की, ते खरेच  



Reflexive Pronouns - स्वतरूप॑ सर्वनाम॑ 
When a pronoun which is the object of a verb is also the subject in the sentence, then such a pronoun is called a Reflexive Pronoun. The effect of this is to emphasise the meaning of the action on the pronoun. A few examples are given below.
एक सर्वनामाच कर्ता (म्हण्जे, उद्देश) अणी कर्म (object) हे दोनीं एकच असलतर॑, ते सर्वनामाला स्वतरूप सर्वनाम अस॑ म्हणतों. म्हणजे, सर्वनाम स्वता तज व॑रेच क्रीयाच परिणाम आणिवते. हेज कित्येक उदाहरण॑ खाले दाखिवलाहे.

दक्षिणी मराठी गोष्ट

English word

Sentence
वाक्य
मी स्वता

myself
I shall go there and fetch her myself
मी स्वता तिकडे जाऊन तिला बलायींगून येतों

तला स्वता

himself

By himself, he can do very little
तला स्वता जास्ती काहीं कराला होईना

स्वता अम्ही

our self

Only if we do something  ourselves, can we get out of this difficult predicament

हे अवघड स्थितींतून चुकाम॑ म्हण्जे, स्वता अम्ही काहीतरीन करलतरच होईल
स्वता तुम्ही

yourself
If you are to pass this examination, you have study this chapter by yourself
तुम्हाला हे परीक्षा जिंताम॑ म्हण्जे, हे अध्याय स्वता तुम्ही वाचलतरच होईल


Declensions of Personal Pronouns - व्यक्तीरूप॑ सर्वनामांच विकार
As said earlier Pronouns undergo variations in forms to reflect case, number and gender. These are called "declensions". A table detailing the Declensions of Personal Pronouns is given below. वचन॑, लिंग, विभक्ती हेज आधारा जोक्त॑ सर्वनामाच वेगळ॑-वेगळ॑ रूप आहे. हेला सर्वनामाच " विकार" अस॑ म्हण्तों. व्यक्तीरूप॑-सर्वनामांच विकार खाले दाखिवलते प्रकार आहे.


Case
विभक्ती

1st Person


2nd Person

3rd Person




Masculine


Singular


Plural

Singular

Plural

Singular

Plural





Nominative

(where the Pronoun is the subject of a verb)








मी (I)
मी हे पुस्तक वाचलों
अम्ही (we)
अम्ही हे पुस्तक वाचलों
तू (you)
तू हे पुस्तक वाचलास॑
तुम्ही (you)
तुम्ही हे पुस्तक वाचलांत॑
तो (he)
तो हे पुस्तक वाचला
तेनी (they)
तेनी हे पुस्तक वाचले


 
Feminine
मी (I)
 मी हे पुस्तक वाचलें
अम्ही (we)
अम्ही हे पुस्तक वाचलों
तू (you)
तू हे पुस्तक वाचलीस॑
 तुम्ही (you)
तुम्ही हे पुस्तक वाचलांत॑
तिन॑ (she)
तिन॑ हे पुस्तक वाचली
तेनी (they)
तेनी हे पुस्तक वाचले

  


Neuter

   
 
 
   
  
ते (that)
एक कुत्राला बांधून घाटल॑ नाही. ते चावना
ते (अस्कीन)
(those)
दोन कुत्राला बांधून घाटलाहे. ते चावना








Accusative

(where the Pronoun is the object of an action)



Masculine

मला (to me)
मला ते खाणी अवडल॑ नाही
अम्हाला
or
अमास॑
 (to us)
अम्हाला ते खाणी अवडल॑ नाही

तुला (to you)
तुला ते खाणी अवडल॑ नाही

तुम्हाला
or
तुमास॑
(to you)
तुमास॑ ते खाणी अवडल॑ नाही
तला (to him)
तला ते खाणी अवडल॑ नाही

 त्यनाला / त्यांस॑
(to them)
त्यांस॑ ते खाणी अवडल॑ नाही


 

Feminine
मला (to me)
मला ते खाणी अवडल॑ नाही
अम्हाला
or
अमास॑
 (to us)
अम्हाला ते खाणी अवडल॑ नाही

तुला (to you)
तुला ते खाणी अवडल॑ नाही

तुम्हाला
or
तुमास॑
(to you)
तुमास॑ ते खाणी अवडल॑ नाही
तिला (to her)
 तिला ते खाणी अवडल॑ नाही

 त्यनालात्यांस॑
(to them)
त्यांस॑ ते खाणी अवडल॑ नाही

  



Neuter

 
   


 

  
तला (to it)
लेंकरू उगे रडत पडलाहे. तला भूक लागते म्हणून वाटते


त्यनाला / त्यांस॑
(to them)
नौ घंटे पुढे लेंकरांस॑ झोंपी घालूनटाकाम॑. त्यांस॑ उद्या लोक्कर उठामते आहे










Dative

(where the Pronoun is the indirect object of the verb)



















Masculine

मलाम्हणून
(on account of   me)
 मलाम्हणून तू ते काम करण॑ नको
अम्हालाम्हणून
(on account of us)
अम्हालाम्हणून तू ते काम करण॑ नको
तुलाम्हणून(on account of  you)
तुलाम्हणून मी हे पुस्तक घेटलों
तुम्हालाम्हणून
(on account of   you)
तुम्हालाम्हणून मी हे पुस्तक घेटलों
तलाम्हणून
(on account of  him)
तलाम्हणून मी हे पुस्तक घेटलों
त्यांस॑म्हणून/तेनालाम्हणून
(on account of  them)
तेनालाम्हणून मी हे पुस्तक घेटलों

 


Feminine
मलाम्हणून
(on account of   me)
मलाम्हणून तू ते काम करण॑ नको
अम्हालाम्हणून
(on account of us)
अम्हालाम्हणून तू ते काम करण॑ नको   
तुलाम्हणून 
(on account of you)
तुलाम्हणून मी हे पुस्तक घेटलों
तुम्हालाम्हणून
(on account of   you)
तुम्हालाम्हणून मी हे पुस्तक घेटलों
 तिलाम्हणून
(on account of her)
तिलाम्हणून मी हे पुस्तक घेटलों
त्यांस॑म्हणून/तेनालाम्हणून
(on account of  them)
तेनालाम्हणून मी हे पुस्तक घेटलों

   



Neuter





तलाम्हणून/ तलाकरतां
( on account of it)
मी एक कुत्र घेटलों. तलाम्हणून एक सांखळी घेमते पडले
तलाम्हणून/ तलाकरतां
( on account of them)
मी दोन कुत्र घेटलों. तलाम्हणून दोन सांखळी घेमते पडले






Possessive

(where the Pronoun  has a  possessive character) 









Masculine

मझ ( mine)
मझ घर इकडून दूर आहे
अम्च (ours)
अम्च घर इकडून दूर आहे
तुझ (yours)
तुझ घर इकडून दूर आहे
तुम्च (yours)
तुम्च घर इकडून दूर आहे
तज (his)
तज घर इकडून दूर आहे
त्यंच (their)
त्यंच घर इकडून दूर आहे



Feminine
मझ (mine)
मझ घर इकडून दूर आहे
अम्च (ours)
अम्च घर इकडून दूर आहे
तुझ (yours)
तुझ घर इकडून दूर आहे
तुम्च (yours)
तुम्च घर इकडून दूर आहे
तिज (hers)
तिज घर इकडून दूर आहे
त्यंच  (their)
त्यंच घर इकडून दूर आहे


  


Neuter




  
तज
(its)
लेंकरू रडत आहे. तज बावोली कोठ गेल॑ ?
त्यंच
 (their)
लेंकरे रडत आहेत॑. त्यंच बावोली कोठ गेल॑ ?













Locative

(where the Pronoun  suggests location) 







Masculine

1. मझवर
(on me)
छाडी सांगट्लों म्हणून मझवर आरोप घालनाकांत॑


2. मझान॑
(by & thro'  me)
मझान॑ काय कराल होईलकी ते मी करतों
 1. अम्चवर
(on us)
छाडी सांगट्लों म्हणून अम्चवर आरोप घालनाकांत॑


2. अम्चान॑
(by & thro' us)
अम्चान॑ काय कराल होईलकी ते अम्ही करतों

1. तुझवर
(on you)
छाडी सांगट्लास म्हणून तुझवर आरोप येईना


2. तुझान॑
(by & thro'  you)
तुझान॑ काय कराल होईलकी ते तू कर॑
1. तुम्चवर
(on you)
छाडी सांगट्लांत म्हणून तुम्चवर आरोप येईना


2. तुम्चान॑
(by & thro' you)
तुम्चान॑ काय कराल होईलकी ते तुम्ही  करा/करांत॑

1. तजवर
 (on him)
छाडी सांगट्ला म्हणून तजवर आरोप येईना



2. तजान॑
(by & thro'  him)
तजान॑ काय कराल होईलकी ते तो करूनदे

1. त्यंचवर
 (on them)
छाडी सांगट्ले म्हणून त्यंचवर आरोप येईना



2. त्यंचान॑
(by & thro'  them)
त्यंचान॑ काय कराल होईलकी ते तेनी करूनदेत॑






Feminine
1. मझवर
(on me)
छाडी सांगट्ले म्हणून मझवर आरोप घालनाकांत॑


2. मझान॑
(by & thro'  me)
मझान॑ काय कराल होईलकी ते मी करतों
1. अम्चवर
(on us)
छाडी सांगट्लों म्हणून अम्चवर आरोप घालनाकांत॑


2. अम्चान॑
(by & thro'  us)
अम्चान॑ काय कराल होईलकी ते अम्ही करतों
1. तुझवर
(on you)
छाडी सांगट्लीस म्हणून तुझवर आरोप येईना


2. तुझान॑
(by & thro'  you)
तुझान॑ काय कराल होईलकी ते तू कर॑
1. तुम्चवर
(on you)
छाडी सांगट्लांत म्हणून तुम्चवर आरोप येईना


2. तुम्चान॑
(by & thro' you)
तुम्चान॑ काय कराल होईलकी ते तुम्ही  करा/करांत॑

1. तिजवर
(on her)
छाडी सांगट्ली म्हणून तिजवर आरोप येईना



2. तिजान॑
(by & thro'  her)
तिजान॑ काय कराल होईलकी ते तिन॑ करूनदे

1. त्यंचवर
 (on them)
छाडी सांगट्ले म्हणून त्यंचवर आरोप येईना


2. त्यंचान॑
(by & thro'  them)
त्यंचान॑ काय कराल होईलकी ते तेनी करूनदेत॑
  






Neuter






1. तजवर
(on it)
लेंकरू खोडी काही करनास्क॑ बसलाहे. तजवर आरोप घालनाकांत॑

2. तजांन॑
 (by & thro' it)
तझांन॑ झालते एवढे कापडाच गांठोड ते गाढव   उचलींगून जात होत॑
1. त्यंचवर
 (on them)
लेंकरे खोडी काही करनास्क॑ बसलाहेत॑. त्यंचवर आरोप घालनाकांत॑

2. त्यंचान॑ (by & thro' them)
त्यंचान॑ झालते एवढे कापडाच गांठोड ते दोन  गाढवीं   उचलींगून जात होत॑   



No comments: