07 March 2012






भ the twenty-fourth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच चोवीसवां व्यंजन॑.

भका-भका adv  gulp (food) into mouth in a jiffy. भगा-भगा. लोक्कुर-लोक्कुर तोंडांत भरींगणे. 

भक्त n  a devotee. देवाव॑र भक्ति असणार॑.

भक्तवत्सला n  the Lord who considers His devotees very dearly. भक्तांच वर प्रीति असाच देव.

भक्तिभाव n  feeling of deep devotion. मनांत॑ गाढ भक्ति असणे.

भक्तिमार्ग n  the path to god-realisation through devotion. भक्तींतून ब्रह्मज्ञान मिळाच मार्ग.

भक्तियोग॑ n salvation through devotion. भक्ति वाटे मोक्ष होणे.

भक्ति n  devotion. देवाच वर दाखिवाच गाढ निष्ठा.

भगवत् adj  relating to God. भगवानाला संबंध झालते.

भगवति n  Goddess. देवि.

भगवंत॑ n  the Supreme God. परमात्मा. भगवान.

भगवान n  the Supreme God. परमात्मा. भगवंत॑.

भगा-भगा adv  gulp (food) into mouth in a jiffy. भका-भका. लोक्कुर-लोक्कुर तोंडांत भरींगणे.

भगीरथ प्रयत्न fig  an enormous effort. अपार श्रम. मोठ॑ प्रयत्न. ब्रह्मप्रयत्न॑.

भजन n  devotional song. hymn. देवाच स्तोत्र.

भजन n  chanting of devotional songs or hymns in a group. सग्ळीन मिळून सांगाच देव स्तोत्र.

भट n  a brahmin priest.  ब्राह्मण वैदिक. पुरोहित.

भट्टि n a kiln. a furnace. चुला. चुळा. uis चिक्कट माति अच्चांत घालून ओल॑ विटकर करलावर ते भट्टींत जळीवलतर॑ तला घट्टिपण॑ अणी तंबड रंग येते.

भत्ता n  an extra payment. an allowance. बाटा. धर्माच वर जस्ती द्याच पैसा.

भद्र n  safe. जत्तन. दत्तन.

भद्रकाळि n  Goddess Durga in her fierce form. उग्ररूपाच दुर्गा देवि. uis भद्रकाळीच देऊळांत साधारण म्हणून जानव नाहीते लोक॑ बक्राच बलि देतील.

भद्रकाळि fig  a term used to describe a woman of fierce disposition. भयंकर स्वभावाच एक बायकोला सांगाच शब्द. uis तिन॑ काय बायको !, तिला भद्रकाळी म्हणून सांगाम॑. तिज बरोर भांडणेंत॑ कोणालीं जिंताला होयना ! मात्र न्हो, चार दादिगांना एकच वेळ तिजान॑ माराला होईल॑.

भय n  fear. भें.

भयाभक्ति n  God-fearing and religious. भक्ति स्वभाव. uis ब्राह्मण जातीच लोकांमधे नव्वद प्रतिशत भयाभक्ति असणार लोक॑ असतात॑ ; कारण ल्हानपणांतून मायबाप तेना वाढिवाच पद्धत तस अस्ते.

भयंकर adj  fearful. dreadful. horrible. भें वाटिवाच. भें वाटाच॑.

भरजरि adj  woven with a lot of gold and silver threads. भरून सोने अण्खी रुपेच जरीच काम केलते. uis अत्तलीकडे भरजरीच कांजीवरम लुगड वराडा करतां घेम म्हण्जे वीस-पंचवीस हदार रुपे निश्चय होईल॑.

भरड adj  coarsely ground. पूरा बरीक होयनास्क॑ र्रवा सार्ख करणे. दळणे. uis साधारण होऊन डयबटिक रोगीलोके भरडलते गहूंच गंजि पीणे आहे.

भरडणे vt  to grind coarsely. भरडून रुब्बणे. uis घेटलते चार किलो गहूंते दोन किलो नंतरसाला ठींगून, दोन किलो अत्ताच भरडून आणाला गिरणीला पाठिवलें.

भरड पळणे vt  to scram. to bolt. to get away fast. एकदम लोक्कर पळून जाणे. 

भरडा n coarsely ground grain (eg. of rice ). भरडलते धान्य. uis एकादशीच दिवस॑ मझ आजी तांदूळाच भरडा घालून गंजि करींगतील॑. ते पणीं रात्रीच वेळाला मात्र. दिवस अस्कीन उपाशि असतील॑.

भरण n  governance. (राज्य) भरण कराच॑.

भरणि n  name of a birth star. एक नक्षत्राच नाव. 

भरणे vt & vi  to fill. to fill-up. पूर्ण करिवणे. भरिवणे. uis (1) दिवसास्क॑ नाहणींतल॑ पाणीच हंडा भरणे अम्च बापाच काम होत॑. (2) दूरच॑ प्रयाण कोण्ततरीन करापुढे बंडींत॑ पेट्रोल भरींगणे चोक्कोट॑.

भरणे vt  to fill in (a form etc.). लिव्हून पूर्त करणे. uis "ओटर ऐ.डि." करिवाला मी तीन-चार दपा फॉम भरून देलोंतरीन एलक्शनाच दिवस पतोरी मला ते मिळ्ळ नाही.

भरणे vt  to pay in (money). पैसा बांधणे. uis हे वर्षाच बाकि भरामते इनकम-टाक्स, जूलै पंध्राच पुढे भराम॑.

भरणे vt & vi  to fill out (in size etc.). थोर आकाराच होणे. uis आठ महिनेच गरवारीण॑ झालतरीन तिज पोट तेवढ॑ भरलास्क॑ दिसतनाही.

भरणे vi  to fill up. भरणे. uis अम्च घरच॑ आडांत पाणि केम्हाईं भरून असल॑.

भरणे vt & vi  to gather in full. गुंप भरणे. uis अत्ता होत असाच एलक्श्नांत॑ बी.जे.पीच नरेन्द्र मोडी बोलाच ठिकाणि अग्गीं लोक॑ भरून अस्तात॑.

भरतखंड n  Bharath. भारत.

भरतनाट्य n  bhrathanatyam dance. एक कला नृत्य.

भरती prep instead of. बद्दल. Note:-  in sm  भरती means 'addition'. The DM word appears to be a morphed meaning of 'in addition to'.

भरती prep in addition to. in complement to. भरतीच॑.

भरपेट adv (to eat) to one's fill. (to eat to satiation). पेट भरापरंत (जेवणे). uis ते दहा दिवसीन खायाला पीयाला अम्ही जास्ती बाह्येर कोठीन गेल॑ नाही, कां म्हणजे दोन मामीहीं भरपेट खायाला पीयला मला देत होते.   

भरपूर  adj  plentiful. भरून. उजंड॑. उदंड॑.   

भरलते adj  that which is filled. भरून असाच॑.

भरिवणे vt  to fill-up. भरणे.

भरिवलते adj  filled. भरलते. 

भरीत n  a preparation made of brinjal. वांगींतून केलते एक विधाच पदार्थ.

भरीत n  rayatha. a curd salad. रायत॑.

भरीस n  over and above. in addition to. बरीस. बेरीस. पक्षा. Note :- from the root भर/भरणे.

भरून decl  plenty. declension of भरलते. उदंड॑. उजंड॑.

भरून decl  filled-up. declension of भरलते.

भवन n  a (large) building. bungalow. बंगळा. 

भवन n  abode. house or place of dwelling. राहाच ठिकाण. uis अत्ता सध्या "सीमाच आफीस" एक भाडेच ठिकाणी आहे. चार-पांच वर्षांत "सीमाच" खांस/स्वंत भवन बांधुया म्हणून सदस्यांच विचार आहे.

भवानि n  Goddess Parvati. पार्वतीदेवि.

भविष्य n  future. पुढे होयाच.

भविष्य काळ॑ n  (gram) future tense. नंतर होयाच क्रिया विषयीं सांगाच क्रियापदाच काळ॑.

भविष्यज्ञान n  knowledge of what the future portends. भावींत॑/भविष्यांत॑ होयाच कार्यांविषीं ज्ञान असणे. uis कुंडलिनी शक्ति जागृत असाच सिद्ध पुरुषांस॑ भविष्यज्ञान येत॑. हेज मुख्य उदाहरण कंची परमाचार्य अहेत. तेना पाह्याला गेलते लोक॑ त्यंच-त्यंच मनाच संकटकी, नाहीतर मनांतल॑ कष्टाच विचारकी, नाहीतर त्यंच काहीं वेगळ॑ संदेहां विषीन विचाराच पुढेच आचार्यांच समोर बसलतम्हाच तज परिहार कायकी ते लोकांच मनांत अपाप सुचल म्हणून ऐकलोंहें.

भव्य adj  respectful. noble. आदराला योग्य असाच॑.

भस्म n  sacred ashes. विभूति.

भस्म n  ashes. जळून उरलते भस्म. राख.

भक्ष n  sweetmeat. गुळ्चीट पदार्थ. तुकडा. Note :- from भक्षण. uis मझ॑ भाऊच लेंकीच वराडांत जेवण॑ प्रमाद होत॑. मुहूर्ताच जेवणांत पांच विधाच भक्ष केलोह्ते.

भक्षण n  food. जेवण॑.

भक्षण n  dietery food. पथ्याच पदार्थ. uis " डैबेटीस" असणार लोकांच भक्षण थोड वेगळ अस्ते. तजांत साखरे शुद्ध म्हणून अस्ताने अणी भात उणे असाम॑. भाजीपाला भरून असूया.

भंग n  disruption. breach. छेद होणे. राहून जाणे. uis विश्वामित्र मुनीच तपस भंग कराला स्वर्ग-सुंदरी मेनका एक कामिनीच रूपांत॑ आली.

भंडार n  treasury. खजाना.

भंडार n  a large warehouse. सामग्रि दत्तन ठींगाला बांधलते एक थोर बांधणि.

भाऊ n  brother. सहोदर॑.

भाऊज n  brother's wife. भाऊच बाईल. भावज॑ ; भावजई/भावजय in sm. uis मझ॑ भाऊजाला तंजाऊर मराठी फार इष्ट. कॅनडांत राहणारि झालतरीन तिन॑ लेंकरांच अणी दाल्लाच बरोर अम्च मराठींतच बोलते.

भाऊबीज॑ n  a Hindu festival of brothers and sisters falling on the second day of shuklapaksh of Kartika month. कार्तिक महिनांतल॑ शुक्लपक्षाच द्वितीय दिवसी पडाच भाऊ बहीणांच सण॑.

भाऊ-भाऊंडे n  brothers, collectively. भऊ लोक ; भावंडे/भाऊभावडे/बहीण-भावंडे in sm means siblings  (brothers and sisters).

भाऊंडे n  brothers. भाऊ लोक ; भावंडे/भाऊभावडे/बहीण-भावंडे in sm means siblings  (brothers and sisters).

भाकर n roti made of jowar (sorghum). जोवाराच रोटि. भाकरि. uis एक वया नंतर रात्रीच वेळ नुस्त भाकर-भाजी खाऊन ताकपाणी पीलतर॑ आंगाला चोखोट.

भाकरी n  roti made of jowar (sorghum). जोवाराच रोटि. भाकर.

भाग n  a share. वाटा. वांटा.

भाग n  a portion. भाग.

भाग n  division. वाटा. वांटा.

भाग n  role (in a drama etc). नाटक सिनिमा असलांतल॑ पात्र.

भागणे vi  to be exhausted. to be tired. भगोत होणे. सुस्त होणे. नित्राण होणे.

भागवत॑ n  name of one of the Puranas. भगवत पुराण॑.

भागोत n  tiredness. fatigue. सुस्त. नित्राण. शीणभाग.

भाग्य n  luck. good fortune. भाग्य.

भाग्य n  fate. गत. गेत.

भाग्यवंत adj  fortunate. भाग्यशालि. भाग्यवान. 

भाग्यवान adj  fortunate. भाग्यवंत. भाग्यशालि.

भाग्यशालि adj  fortunate. भाग्यवंत. भाग्यवान.

भाग्यहीन adj  unlucky. unfortunate. दुर्भाग्य. निर्भाग्य. uis कित्येक लोक भाग्यहीन म्हणूया. जन्म पूराहीं कष्टि भोगून काम केलतरीन तेना कोण्त विधाच सुखहीं मिळत नाही.

भाचा n  nephew. brother's or sister's son. भाऊच नाहीतर॑ बहिणीच लोंक.

भाची n  niece. brother's or sister's daughter. भाऊच नाहीतर॑ बहिणीच लेंक.

भाजणे vt  to roast. एक पदार्थ तवांत॑ तेल घालनास्क॑ पलटून-पलटून पोळिवणे.

भाजणे vt  to singe. एक पदार्थ विस्तूच वर पलटून-पलटून पोळिवणे.

भाजि n  a vegetable curry. भाजीपालांत॑ केलते पदार्थ.

भाजीपाला n  vegetables. संपाकाच भाजीईं पालाईं.

भाजीवाला n  a vegetable seller. भाजीपाला विकणार॑.
भाडे n  rent paid for use of a building. दुसरेच खोलि, घर अथवा दुकान उपयोग कराला (वापराला) द्याच पैसा.

भाडे n  fare paid for use of a hired vehicle. भाडेच बंडि उपयोग कराला द्याच पैसा. 

भाडे n  charges paid for the use of an hired item. भाडेच साधन॑ वापराला द्याच पैसा.

भाडेवाला n  tenant. खोली, घर अथवा दुकान भाडेला काढणार ; भाडेकरू in sm.

भात n  cooked rice. शिजिवलते तांदूळ.

भातखाऊ n  a shameless glutton. लाज नाहीस्क॑ भरून खाणार.

भातखाऊ fig  a person who is an idle parasite in a house. एक कामीन करनास्क॑ घरांत नुस्त बसणार.

भात-पाणी n  subsistence food. उपजीवनाला पह्जते जेवण॑. uis ब्रिटीष्यांचकडून स्वातंत्र्य मिळून साठ वर्षाच वर झालतरीन अम्च देशांत॑ अत्तापणीं भात-पाणीला तरपडाच (तरफडाच) लोकांच संख्या उणे काहीं नाही.

भाताचपूड n  a mix of roasted and powdered grams and dhals for eating with cooked rice. तुरीचपूड. भाताच बरोर कालिवून खायाच वेगळ॑-वेगळ॑ दाळाच भाजून पूड केलते पूड पदार्थ. 

भाद्रपद n the sixth month of the Hindu calendar. हिंदु पंचांगांत॑ सहावां महिना.

भानु n  Sun. सूर्य. भास्कर. रवि. आदित्य.     

भानुवार n  Sunday. रविवार. अयितवार. आदित्यवार.

भार n  weight. वजन॑.

भार n  a responsibility. जवाबदारि. 

भारत n  India. भारत देश.

भारतमाता n  Mother India. भारत देशाला एक देवीच रूपांत॑ पाह्णे.

भारती n  Vayudeva's consort. मुख्यप्राण वायुदेवाच पत्नि. uis पूजाच वेळी, तसेच संध्या-वंदन करताना संकल्पांत॑ "भारती रमण मुख्यप्राणांतर्गत श्री लक्षीनारायण" म्हणून सांगणे आहे. हेज अर्थ आहे, भारतीच पती (म्हणजे, मुख्यप्राण वायुदेव) अंतर्गत (आंत असाच) श्री लक्षीनारायण, अस॑.

भारती n  Goddess of speech. Goddess Saraswati. वाक् देवि. सरस्वति देवि.

भारतीय adj  Indian. भारताच॑.

भाव n  emotion. मनांतल॑ विचार॑. भावना.

भावज॑ n  brother's wife. भाऊज. भाऊच बाईल. uis मझ॑ भावजाला तंजाऊर मराठी फार इष्ट. कॅनडांत राह्यणारी झालतरीन तिन॑ लेंकरांच अणी दाल्लाच बरोर अम्च मराठींतच बोलते. ; भावजई/भावजय in sm.

भावना n imagination. मनांतल॑ कल्पना.

भावा n husband's elder brother or elder sister's husband. भावोजी.

भावार्थ n  moral or purport of a story etc. अनुमान करून काढलत॑ यथार्थ अर्थ. uis पंचतंत्र अणी जातक खाणी वाचाला सरळ असत॑तरीन, त्यांतल॑ भावार्थ लेंकरांस बरोरल॑ विधान कळिवणे थोरळेंच कर्तव्य आहे.

भावी n future. भविष्य.

भावोजी n husband's elder brother. दाल्लाच वडील भाऊ ; भवोजी/भाऊजी in sm. 

भावोजी n elder sister's husband. अक्काच दाल्ला ; भवोजी/भाऊजी in sm.

भावोली n a doll. बावोली ; भावली/बाहुली in sm.

भावोली-घालणे vt  to draw a picture. to paint a picture. पट ओढणे/होढणे. uis  मझ॑ पणजी फार चांग्ळ॑/उदंड बेष भावोली घालतील म्हणून मझ अजी सांगाच मी ऐक्लोंहे. पण ते पट सर्वीं कोठ गेलकी कोणालीं अत्ता सय नाही.

भाशिंग॑ n a decorative thread with embellishments worn by the bride (and sometimes by the groom) around their foreheads during their wedding. बाशिंग. वराडाच वेळी नवरा-नवरि त्यंच कपाळांत गुंडाळून बांधाच अलंकार केलते दोरा.

भाषण॑ n  speech. प्रसंग.

भाषा n  language. बोली. 

भाषांतर n  translation. एक भाषाच लेख अण्खीएक भाषांत॑ करणे. तर्जुमा. अनुवाद. uis महाकवी काळीदास यांस पुरातन भारताच सगळ्यांचीनपक्षा श्रेष्ठ कवी म्हणून सांगतात॑ अणी त्यंच नाटक-लेख अग्गीन अनेक भाषांत भाषांतर पणीन झालाहे.

भाष्य n  commentary. exposition. विवरण॑. टिप्पणि.

भास्कर n  Sun. सूर्य. आदित्य. रवि. भानु.

भांग n  hemp. a type of drug. नशाच एक वनस्पति.

भांग n  parting of hair on the head of women. बायकांच डोस्केच केंस दोन भाग कराच॑.

भांडकोर adj  quarrelsome. rebellious. भांडखोर. बांढखोर. सदा भांडाच स्वभाव असणार. uis अम्ही एकदपा 'कोलकत्तांसूंन' येत असताना 'टाटानगर' स्टेषनांत दहादन वेघले. त्यंचकडे रिसरवेषण न्होते तरपणीं तेनी निजलते लोकांना उठीवून त्यंच सीटावर अस्कीन बसले. "टीटीचान॑" काहींनच कराला झाल नाही. "हे भांडखोर लोकांला सांभाळा होयना" अस सांगून "टीटी" उतरून गेले.

भांडखोर adj  quarrelsome. सदा भांडाला तयार होवून असणार॑. भांडकोर. बांढखोर. 

भांडण n  fight. quarrel. dispute. भांडाभांडि. 

भांडणे vi  to quarrel. to fight. भांडण होणे.

भांडाभांडि n  fight. भांडण ; भांडाभांड in sm.

भांडि n  cooking vessels. संपाकाच पात्र.

भिकाळ n  begging for alms during the thread ceremony of a Brahmin boy. भिक्षाळ. मुंज झालते वटू मागाच भीक (हे मुंजाच सणाच भाग आहे). uis ल्हान पोरांना मुंज केलतर॑ तेनी भिकाळ मागाला संकोचनाते. पण, तेरा-पंध्रा वर्षाच पोरे मुंज करींगून भिकाळ विचाराला फार लाजिंगतील॑. Note:- the usual chant for this is "भवति भिक्षां देही".

भिकाळ n  alms obtained during the thread ceremony. मुंजींते भीक मागून मिळ्लते साधन॑. भिक्षाळ.

भिजणे vi  to get wet. ओल॑ होणे.

भिजिवणे vt  to wet. to moisten. ओल॑ करिवणे.

भिजिवणे vt  to soak in water. to wet. (पाणींत॑) बुचकळून ओल॑ करणे.

भिन्न adj  divided. वांटून असाच.

भिन्न adj  parted. separated. वेगळ॑ वेगळ॑ झालते.

भिन्न adj  distinct. different. प्रत्येक.

भिरकावणे vt  to throw away. दूर टाकणे ; भिरकावणे/भिरकाविणे in sm.

भिक्षा n  alms. भीक. भिकाळ. भिक्षाळ.

भिक्षाळ n alms. भिकाळ. भिक्षा. भीक.

भिक्षु n  a religious mendicant who seeks alms and gifts. भिक मांगून उपजीवन कराच सन्यासि.

भिंत n  wall. भिंत. ईटाच एक बांधोटि.

भीक n  alms. भिक्षा. भिक्षाल. भिकाळ.

भीक मांगणे vt  to beg. भिक्षा मांगण॑.

भीकारिपण॑ n  stinginess. कंजूसपण॑.

भीकारि adj  one who begs. भीक मांगणार॑.

भीकोंडी adj  easily scared. timid. lacking in courage. lacking in confidence. diffident. भीखोंडी. लोक्कर भें वाटाणार॑. स्वंत शक्तीवर धैर्य/विश्वास नाहीते.

भीखोंडि adj  easily scared. timid. lacking in courage. lacking in confidence. diffident. भीकोंडि. लोक्कर भें वाटाणार॑. स्वंत शक्तीवर धैर्य/विश्वास नाहीते.

भीड n  bashfulness. modesty. बीड. संकोच.

भीड n  crowd. गुंप॑.

भीती n  fear. भें.

भीम n  name of one of the Pandavas. पांडवांत॑ एकले.

भीमाकार adj  gigantic. मोट्ठ॑ रूपाच॑.

भीरंगी n  cannon. युद्धाच एक मोट्ठ॑ आयुध॑. तोफ. uis अफघानिस्थानात॑ तालिबान भीरंगींतून बामियान बुद्धाच मोट्ठ॑ विग्रहाला नाश केलते लोकसंस्कृती अण्खी इतिहासा वर केलते एक मोट्ठ॑ अपराध आहे. Note. from Tamil. 

भीष्म n  name of a patron prince in Mahabharata. the grandsire of kaurava clan. कौरव वंशाच पितामहा.

भीष्मप्रतिज्ञा n  an inviolable and solemn pledge. दृढ प्रतिज्ञा.

भींगणे vi  to get scared. भें वाटणे ; भिणे in sm.

भुका n  a type of fragrant powder applied during auspicious occasions. बुका. शुभ संदर्भांत लावाच एक विधाच सुगंध पूड. uis अम्ही क्रिष्णगिरी पांडुरंग-विठ्ठलाच देऊळाला गेलतेम्हा देवाच प्रसादाच बरोर पंढरपूरांतून आणिवलत॑ बुका पणीन देले.

भुका भेटणे n  a ritual during a wedding when the भुका powder is applied mutually on each other between the groom's and bride's families. बुका भेटणे. वराडाच वेळी नवरा अणी नवरीच घरचे एकएर्क्यांचीन आंगाला बुका लावाच पद्धत॑. Note. this denotes the happy and auspicious coming together of the two families.

भुज n  arm. hand. हात. भुज. कर॑. हस्त॑.

भुजंग n  the devine snake Ananth on which Lord Vishnu reclines. महाविष्णु शयन कराच दिव्य सरप अनंत.

भुजंग n  a snake (usually cobra). सरप॑ (नाग सरप॑).

भुजंगासन n  a yogic posture imitating the raised hood of the cobra. योगाच एक आसन (नाग सर्पाच फणास्क असाच॑). uis नित्य भुजंगासन केलतर मादाच दुखणे (सूळ) असना. आंग पणीं गून पडनास्क थाटून असल॑.

भुट्टा n  ear of a corn. मक्का जोळाच खायाच भाग.

भुरकट adj  dull in appearance. dull coloured. रंग गेलतास्क॑ असाच॑. uis मझ॑ बहीण पांच हदार रुपे घालून रेशमाच लुगड घेटली. तिला ते कस अवडलकी कळत नाही. पाह्याला अत्ताच भुरकट आहे. तेवढे मोलाच लुगडास्क वाटत नाही !

भुरशी n  mould or fungus formed due to dampness. बुरशी. बुरसी. बुरटा.

भुर्का n   a veil over the head and face (worn by Muslim women). बुर्का.
बुर्खा. मुसलमान बायके डोस्केच वरून पूरा आंग झांकून असासक॑ नेसाच कापड॑. uis घराच जवळ एक 'सूपर मारकेट' आहे. तथे कित्येक बायके भुर्का घालिंगून/नेसींगून येऊन ल्हान-ल्हान सामान चोरतात॑ म्हणून मी ऐकलों. तथेल॑ मेनेजाराला विचारताना त्यंचान काहीं कारला होयना अस सांगटले.

भुवन n  world. भूलोक.

भूक n  hunger. पोटाला जेवण॑ पह्जे अस वाटाच॑. 

भूक-तान॑ n  hunger and thirst. भूकीं दाहीं.

भूकाळु adj  one who craves for food. सदा खाणेच वर ध्यान असणार. uis तेवढालीं अम्च मन्नेच कारण. रिकामी असलतर॑ भुकाळु असतील॑. तेच लोकांना उदंड काम देलतर॑ खायाच-पीयाच॑ विसरून कामांतच ध्यान देतील॑.

भूकंप n  earthquake. भूचलन॑. भूमीच आंतल॑ शक्तीमुळे भोई हलणे.

भूखंड n  continent. महाद्वीप (उदा: आफ़्रिका, जंबुद्वीप॑).

भूगर्भ n  the interiors of the earth. भूमीच आंतल॑ भाग.

भूगर्भशास्त्र॑ n  geology. भूगर्भा विषयाच शास्त्र॑.

भूगोळ n  the globe of the earth. भूमंडल॑. भूमिच गोळ ; भूगोल in sm.

भूचक्र n  popular name of a fire cracker. भोईंत फिराच एक पटाकि.

भूत n  a spirit of a dead person. पिशाच.

भूतकाळ n  the past period. मागे गेलते काळ.

भूतकाळ n  (grammar)  past tense. (व्याकरण॑) पुढे झालते क्रीया विषयीं सांगाच क्रियापदाच काळ॑.

भूत-धरणे vi  to be possessed by a an evil spirit. भूताच बाधा होणे.

भूत-प्रेत n  evil spirits. पिशाच, ब्रह्मराक्षस हे रीतीच दुर्देवता. 

भूतबंगळा n  haunted house. भूत धरलते घर.

भूदान n  gift of land. जमीन दान द्याच॑.

भूपती n  king. राजा.

भूमध्यरेखा n  equator. भूमध्यरेखा. uis भूमध्यरेखाच जवळ असाच प्रदेशांत॑ सूर्याच उष्ण जास्ति अनुभव होईल.

भूमाच जेवण॑ n  janavasa feast. जानवासाच जेवण॑.

भूमंडल॑ n  earth's globe. भूगोळ. भूमी.

भूमि n ground. भोई.

भूमि n  earth. भूलोक॑.

भूमिका n  a role or part in an event like drama, cinema etc. एक नाटक नाहीतर॑ सिनिमांत खेळाच भाग.

भूमिपुत्र n  son of the soil. natives of the land. पिढी-पिढी पसून एकच गावांत॑ राहणार.

भूमिपूजा n  ceremony marking the start of a new building construction. एक नव घर बांधाच पुढे ते घर बांधाच भूमीला कराच पूजा.

भूर adv away, outside, beyond. बाहेर दूर. Note :- baby-talk used while talking with infants.

भूलोक n  earth. भूमि. भूमंडल॑.

भूषण n  embellishment. अलंकार. शोभा.

भूसेना n  infantry. पायसेना.

भूंस n  chaff. husk. bran. कोंडा. दाणेच वरच हलक॑ चिप्पा ; भूस in sm.

भृगू n  name of an ancient sage. एक ऋषीच नाव.

भेटणे vt  to embrace. आलिंगन॑ करणे. भेटिंगणे. Note :- भेटणे in sm normally means 'to meet'. In DM the usual word for 'meeting' is मिळणे.

भेटिंगणे vi  to embrace. आलिंगन॑ करणे.

भेद n  separateness. difference. distinguishing. वेगळपण॑.

भेल n  a tree sacred to Lord Siva. बिलवा वृक्ष. बिल्वा वृक्ष. बेल वृक्ष. शिव देवाला महत्व असाच एक वृक्ष.

भेळ n  a mixture of munchies. एक खायाच पदार्थ.

भेळपूरी n  a mixture of munchies. एक खायाच पदार्थ. 

भें n  fear. भय. भीती.

भेंकणे vt  to throw tantrums while crying. to bawl out while crying. रडताना मोठ वरडा-वरडी करणे. भेकणे in sm. Note :- the word भेंकणे is almost always used in conjunction with रडणे, for example, रडणे-भेंकणे, रडून-भेंकून, रडत-भेंकत.

भेंडा fig  an indecisive person. भेंडी. लोक्कुर निश्चय काढनाते मनुष.

भेंडी n  lady's finger. okra. एक भाजीपाला.

भेंडी fig an indecisive person. भेंडा. लोक्कुर निश्चय काढनाते मनुष.

भैरव॑ n  Lord Siva. शिव.

भैरवि n  a musical note. संगीताच एक राग.

भोई n  the ground. earthern floor. floor of a house etc. भोहें. भोयें ; भुई in SM

भोईंचणे n  ground nut. भोंचणे. भोंईंच खाले मूळांत॑ वाढाच एक शेंगा ; शेंगा in sm.

भोहें n  the ground. earthern floor. floor of a house etc. भोयें. भोई ; भुई in SM

भोका n  a male cat. tomcat. दादिगा मांदर॑. बोका.

भोका n  a loutish uncouth person. बोका. ढेंग. दांडगा-भोका.

भोग n  enjoyment. सुख॑ भोगणे.

भोग n  endurement. experience of pleasure or pain. सुखाचीं दुखाचीं अनुभव होणे.

भोगणे vt  to enjoy. सुख॑ अनुभव करणे.

भोगणे vt  to endure. सहन॑ करणे.

भोगणे vt  to experience. अनुभव करणे.

भोगी adj  one who enjoys. epicurian. सुख अनुभव करणार. 

भोगी n  a day before Makarasankranti. मकरसंक्रांतीच पुढच दिवस.

भोजन॑ n  meals. food. जेवाच पदार्थ.

भोमरा n  spinning top. फिराच एक बावोली. भोवरा. बोंबरम (Tamil).

भोमरा n  any spinning contraption. भोवरा. एकच ठिकाणी वृत्ताकारांत फिराच यंत्र. uis कर्नाटकांत अत्तपणीन खेडेगामांत बैल बांधलते भोमरांत्सून ऊंसाच रस पिळून काढाच पाव्हूया.

भोमरा n  eyebrow. भोवरा. भौमा. भौमाइ. डोळेच व॑र कपाळांतल॑ केंस ; भुवई /भुवया /भंवई /भिंवई /भोंई in SM.  Note :  here the implied meaning of भोवरा/भोमरा is "a curl or ring of hair" and hence applied to eyebrow).

भोवरा n  spinning top. फिराच एक बावोली. भोमरा. बोंबरम (Tamil).

भोवरा n  any spinning contraption. भोमरा. एकच ठिकाणी वृत्ताकारांत फिराच यंत्र. uis अगाऊच काळांत तेली लोके भोवरांत बैल बांधून तेल काढत होते.

भोवरा n  eyebrow. भोमरा. भौमा. डोळेच व॑र कपाळांतल॑ केंस;  भुवई /भुवया /भंवई /भिंवई /भोंई in SM.  in SM. Note : here the implied meaning of भोवरा/भोमरा is "a curl or ring of hair" and hence applied to eyebrow)

भोंईं n  floor of a house. भोई. भोयें. भोहें. घराच भोंईं.

भोंईं n  ground. earth. भूमी. भोयें. भोहें ; भुई or भोई in sm.

भोंकळणे vt  barking of dog. कुत्राच वरडा ; भुंकणे in MM.

भोंचणे n  ground nut. भोईंचणे. भोंईंच खाले मूळांत॑ वाढाच एक शेंगा ; शेंगा in sm.

भोंताल-भिंत॑ n  compound wall. बांधणीच अथवा जमीनाच भोंताले असाच भिंत॑.

भोंताले adj  all around. एक ठिकाणाच चार पठीसीं ;  भोवताली/भोवती in sm.

भोंपळा n  pumpkin. एक भाजीपाला ; भोपळा in sm.

भोंवार n  the circular walk/path taken by the bullocks while working in a traditional oil mill. तेलघाणेंत॑ बैल चालाच वृत वाट. uis उदंड वर्षा पुढे अम्च ल्हान गामांतल॑ भोंचणेच, खोब्राच, तिळाच अस विध-विधाच तेल काढाला एक तेलघाणा होत॑. तथे काम कराच बैल दोनीं पूरा दिवस भोंवारांत॑ चालाच पाह्यलतर मला संकट वाटत होते. अत्ता असल॑ काम सर्वीं 'मिषीनांत/ मिल्लावाटे' करतात.

भौमा n  eyebrows. भौमाइ. भोवरा. भोमरा. डोळेच वर्च भागांतल॑ केंस ; भुवई/भंवई/भिंवई/भोंई/भोंवई in sm.

भौमाइ n  eyebrows. भौमा. भोवरा. भोमरा. डोळेच वर्च भागांतल॑ केंस ; भुवई/भंवई/भिंवई/भोंई/भोंवई in sm. uis  कित्येक बायके त्यंच भौमा/भौमाइ पूर्त काढूनटाकून "ऐब्रो पेनसिल" वाटे लैन घालींगतात॑.

भ्रम n  mental confusion. incoherence of mind. daze. मनाच गोंधळ.

भ्रमण॑ n  revolution. orbiting. फिरणे. प्रदक्षिणा.

भ्रष्ट adj  excommunicated. thrown out. स्वंत॑ जातींतून बाहेर काढूनटाकलते.

भ्रष्टाचार n  corruption. लांच घेणे/देणे.

भ्रांत n  madness. वेड॑.

भ्रूभंग n  a frown. शिडक (तोंड). uis मझ बापाला र्राग आलतर शिवा देनात॑. र्राग आलते खूण त्यंच भ्रूभंग पाव्हून अम्ही कळींगुया तेनाला अम्ही कराच अवडल॑ नाही म्हणून.

No comments: