07 March 2012

श, ष






श the thirty-second consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच बत्तीसवां व्यंजन॑.

शक n  doubt. शंका. संशय. संदेह.

शक n  an era. a period starting from an epoch making event, from which the years are counted. कालाच मोजणे आरंभ कराला योग्य असाच संभव पसून इषोब कराच समय.

शकल॑ n  a small quantity. थोड. थोडक॑.

शकुन n  omen. शुभ अथवा अशुभ चिन्ह.

शकुनी fig  a scheming person. वक्र बुद्धीच मनुष. Note :- after Duryodhana's uncle in Mahabharata.

शके adv  in the year. since the start of the year or era. शक आरंभ झाला पसून.

शक्तिशाली adj  powerful. strong. बलवंत.

शक्ती n  strength. बळ.

शत n  hundred. शंभर.

शतक n  a century. शंभर वर्षाच काळ॑.

शतक n  one hundred. शंभर (संख्यांत॑).

शतमाकड॑ n a very mischivous boy. फार खोडीखोर पोर. Note:- the prefix शत, meaning "hundred", implies extreme.

शतम्हातारा n  ripe old man. फार वय॑ झालत॑ म्हातारा. Note:- the prefix शत, meaning "hundred", implies extreme.
very old.

शतरंज n  chess. चतुरंग. Note :- derived from the four components (चतुर+अंग) of the ancient army ie, cavalry, elephant brigade, camel brigade and foot soldiers.

शतविद्र॑ adj  very ugly. फार विद्रूप॑. Note:- the prefix शत, meaning "hundred", implies extreme.

शताब्दी n  completion of one hundred years. centenary. शंबर वर्ष होणे. Note :- अब्द means 'year' and शत means 'hunderd'.

शत्रु n  enemy. विरोधि. वैरि.

शत्रुता n  enmity. विरोधपण॑.

शनि n  name of a demi-God. शनिभगवान. शनेश्वर.

शनि n  planet Saturn. एक ग्रहाच नाव.

शनिदशा n  bad times. दुर्भाग्याच वेळ.

शनिवार n  Saturday. शुक्रवाराच नंतरल॑ दिवस.

शनेश्वर n  name of a demi-God. शनिभगवान. शनि.

शपथ n  oath. प्रतिज्ञा.

शब्द n  noise. ध्वनि.

शब्द n  word. गोष्ट. वाक्. पद.

शब्दकोश n  dictionary. शब्द अथवा पदाच अर्थ द्याच ग्रंथ. निघंटू.

शब्दयोगी अव्यय n  preposition (gram). गोष्टाला जोडून याच अव्यय (व्याकरणांत॑).

शब्दरचना n  syntax. एक वाक्यांत॑ गोष्ट/शब्द/पद जोडाच रीती. वाक्यरचना.

शब्दसमूह n  phrase. शब्दसमूह.

शब्दालंकार n  figure of speech (gram). वाक्याला, नाहीतर॑, गोष्टाला शोभा आणिवाच प्रयोग (व्याकरणांत॑).

शमन n  extinguishing. विजून शांत होणे.

शयन n  lying down in an horizontal position. निजणे.

शरण n  protection. अभय.

शरणागति n way or method to salvation at God's feet. देवाकडून शरण मिळाच गति.

शरणागति n to surrender totally and seek protection.

हरला नंतर अभय विचारणे.

शरदऋतु n  Sharad, name of a season. एक ऋतूच नाव.

शरबत n  a cold drink made up of fruit juices. पंडूच, अथवा, वेगळ॑ वनस्पतीच हिंस पानीय. uis उन्हाळा दिवसी शरबत पीलतर॑ मनाला फार तृप्त असत॑, पण बाहेर बीदींत विकाच शरबत घेवून पीलतर घसा बसाच साध्यता आहे !

शरशयन n  in Mahabharata Bhishma's bed of arrows shot through his body. महाभारतांत॑ भीष्म पितामहा आंगाला टोंचलते अस्त्रांच व॑र निजलते अवस्था.

शर॑ n  arrow. अस्त्र.

शरीर n  body. आंग. देह.

शरीरदंड n  corporal punishment. मृत्यु शिक्षा.

शल्य n  nuisance. उपद्रव. तंटा.

शव n  dead body. corpse. मढ. प्रेत.

शवयात्रा n  funeral procession. स्मशान यात्रा.

शवसंस्कार n  cremation ceremony. obesquies. स्मशानांत शवाला कराच संस्कार.

शवासन n  name of a yoga posture. योगांत॑ एक आसनाच नाव.

शशिधर n  Lord Siva. शंकर महादेव.

शशी n  Moon. चंद्र.

शस्त्र n  a weapon of war. युद्धाच आयुध. uis लोकांच विकासाबरीस सर्व देशीं शस्त्राव॑र जास्त ध्यानीं खर्चीन करत आहेते.

शस्त्रकार n  a manufacturer of weapons. शस्त्र तय्यार करणार. uis हे भूमंडलांत बाकि व्यापारींबरीस शस्त्रकार कंपनीवालेच भरून पैसा कराच॑.

शस्त्राभ्यास  n  practicing the use of weapons. शस्त्र उपयोगाच अभ्यास. uis अमेरिका भारताच बरोर आणि पाकीस्तानाच बरोर पणीं शस्त्राभ्यास कराचाला महत्व मला अर्थ होतनाही.

शहाणा adj  clever. wise. smart. शाणा. षाणा.

शहाणपण॑ n  intelligence. shrewdness. wisdom. शाणपण॑. षाणपण॑. चातुर्य. uis ते दादिगाच शहाणपणामळे लेंकीला पह्जते सोनेच वस्था सर्वहीं पुढेच तय्यार करून ठींगूनटाकले. अत्ता सोनेच मोल कित्ति वाढल॑तरीन त्यांस चिंता नाही.

शंकर n  Lord Siva. महादेव.

शंकरपाळि n  a fried sweet preparation.एक विधाच तळ्लते  गुळ्चीट पदार्थ ; शंकरपाळे in sm.

शंकराचार्या n  founder of the Advaita philosophy in Hinduism. Adishankara. हिंदुधर्माच अद्वैद तत्वज्ञान प्रचार केलते आध्यगुरु. आधिशंकरा.

शंकराचार्या n  Pontiffs of the four Mattas (monasteries) established by Adishankara. आधिशंकरा स्थापनाकेलते चार मठांच मठाधिपती.

शंकराभरण॑ n  name of a raga in music. संगीतांत॑ एक रागाच नाव.

शंका n  doubt. संदेह. संशय. शक.

शंख n  conch-shell. एक रीतीच समुद्र जीवीच कवच.

शंखपुष्प n  a bell shaped flower considered a favourite of Lord Ganesha. गणेषाला प्रीय असाच एक फूल. uis अम्च घराच शेजारल॑ पार्कांत शंखपुष्पाच झुडूप असणामळे पाष्टे टळाला येणार सर्वदनीं ते फुल तोडिंगून जातात॑.

शंभर n  one hundred. एकशे.

शंभर n  a hundred. शंभराच संख्या. Note :- however, to express a multiple of a hundred शें takes the place of शंभर. eg. एक शंभर is एकशें, दोन शंभर is  दोनशें, तीन शंभर is तीनशें etc.

शंभू n  Lord Siva. महादेव.

शाकांबरि n  Goddess Shakambari. Goddess Durga in her benign aspect. दुर्गादेवीच शांत रूप. बनशंकरि. वनशंकरि.

शाखा n  branch of a tree. झाडाच पेड.

शाखा n  a branch office or set up, working away from the main office. प्रधान कचेरींतून वेगळ॑ ठामांत॑ स्थापना केलते एक उप-कचेरि.   

शाखा n  section. विभाग.

शाणपण॑ n shrewdness. smartness. शहाणपण॑. षाणपण॑. चातुरपण॑. uis ते दादिगाच शहाणपणामुळे लेंकीला पह्जते सोनेच वस्था सर्वीं पुढेच तय्यार करून ठींगूनटाकले. अत्ता सोनेच मोल किती वाढलतरीन त्यांस॑ चिंता नाही.

शाणा adj  shrewd. clever. wise. smart. शहाणा. षाणा. चतुर॑.

शाणी n  a grinding wheel used for sharpening knives etc. चाकू (सुरी) बरोर कराच (तीक्ष्ण कराच) एक उपकरण॑. चाणी/साणी (Tamil). uis शाणी घालून सुरी बरोर करणार मनुष अत्ताअग्गीन फार अप्रूप झालाहे.

शाप n  curse. शाप.

शापमोचन॑ n  release from a curse. शापांतून मुक्ति होणे. uis कित्येक घरांत लेंकरे ल्हान वयेंत मरणकी नाहीतर एक दोन लेंकरांस॑ वेड असाचकी पाव्हुया. हे सर्वहीं कोणाचकी शापामळे आहे म्हणून थोरळे सांगतील॑. हे सग्ळ दुरवस्थांतून चुकाला शापमोचन काय कराम म्हणून कळलतर॑ तज जोक्त परिहार करूया.

शारदा n  Sharada, Goddess Saraswati. सरस्वती देवी.

शाल n  shawl. कंबळाच अंगोस्त्र (अंगवस्त्र).

शाला n  a school. साळे. शाळे. विद्यालय. uis अम्च देशांत 'पब्लिक' शाला म्हण्जे, 'फीस' जास्त असाच अणी भाग्यवंत पोरे वाचाच शाला म्हणून अर्थ आहे. तेच 'अमेरिकांत' पब्लिकशाला म्हण्जे उणे वर्गाच पोरे जायाच शाला आहे.

शाळे n  school. शाला. साळे. विद्यालय ; शाला/शाळा in sm.

शाश्र्वत adj  perpetual. durable. permanent. निरंतर॑. uis शाश्र्वत होऊन कोणतरीन निरोगी/संतोषांत असणे फार अप्रूपच॑.

शास्त्र n  scriptures. धर्म.

शास्त्र n  science. विज्ञान.

शास्त्रज्ञ n  scientist. शास्त्रज्ञ. uis प्ळूटो एक ग्रह नोहो म्हणून शास्त्रज्ञ निश्चय केल्यावर अत्ता सूर्यमंडलांत॑ नौ ग्रहांचबद्दिल आठ ग्रहच आहे अस॑ सांगतात॑.

शास्त्री n  one well versed in Sastras. शास्त्राच पंडित.

शास्त्रीय adj  scientific. शास्त्राला संबंध झालते.

शांत adj  calm. शांत.

शांत adj  appeasement. समाधान॑.

शांत adj  noiseless. निशब्द.

शांत adj  tranquil. शांत.

शांत adj  serene. शांत.

शांति n  calmness. शांतपण॑.

शांति n  appeasement. समाधान॑.

शांति n  noiselessness. निशब्द.

शांति n  tranquility. शांतपण॑.

शांति n  serenity. शांतपण॑. 

शांति n  a homa performed to ward off evil effects. शांतिहोम.

शांतिहोम n  a homa performed to ward off evil effects. शांति. uis गृहप्रवेश कराच वेळ शांतिहोम करणे दंडक आहे.

शिकणे vt  to learn. वाचणे-लिव्हणे कळींगणे. शिक्षण करणे.

शिकरण॑ n  mashed bananas/mango with milk or curds and sugar. तावून घट्टि केलते दूधांत॑, नाहीतर, नुस्त॑ दहींत॑ साखरे मिळिवून, अंबा/केळ कोळून तय्यार कराच एक तोळ्लावण॑. uis चप्पाती बरोर अंबाच शिकरण॑ तोळ्लाविंगाला फार रूच अस्त॑.

शिकिवणे vt  to teach. शिकिवून देणे ; शिकवणे/शिकविणे in sm.

शिक्का n  seal. stamp. मुद्रा.

शिखर n  mountain peak. डोंगूराच एकदम वर्च स्थल॑.

शिजणे vi  to get cooked. सिजणे. शिजून तय्यार होणे.

शिजिवणे vt  to cook. सिजिवणे. शिजिवून काढणे.

शिडकणे vi  to become peevish. to whine. चिडकणे.

शिडक॑ adj  irritable. चिडणार ; शिडका in sm.

शिडकोर adj  peevish. irritable. hot-tempered. लोक्कर र्राग येणार. चिडकोर.

शिडणे vi  to get irritated. चिडणे.

शिडिवणे vi  to irritate. चिडिवणे ;  चिडविणें/चिडवणे in sm.

शिणगारण॑ vt  to apply make-up. to indulge in (personal) beautification to make one attractive to others. दुसरेला आकर्ष कराला स्वताला सौदर्य करींगणे ; शृंगारणे in sm. uis अत्तच पोरींस॑ बाहर निघा पुढे शिणगार करींगाला एक-दीड घंटा वेळ पह्जे.

शिपाई n  a soldier. सिपाही. सेनाच शिपाई. uis हे काळच भांडणांत शिपाईंच शाहणपणा बरीस त्यंच शस्त्र कित्ति नव आहे म्हणाचेच जास्ति महत्व.

शिपाई n  a police constable. सिपाही. पोलीसवाला.

शिपारशी n  recommendation. उपयोग/लाभ होया करतां दुसरेंच श्रद्धाला आणिवणे.

शिरस्तेदार n  head clerk in a court of law. कचेरीच (न्यायालयाच/कोर्टाच) मुख्य गुमास्ता. Note :- such nomenclature is hardly used nowadays. 

शिरा n  muscles. आंगांतल॑ मांस॑. 

शिरा n  arteries. veins. आंगांत॑ रक्त पळाच अवयव॑.  uis  मी ल्हान असताना मझ माय॑ सांगतील "शिरा थाटिंगून कशालरे वरडतोस॑" काय सांगामकी जवळ येऊन हळू सांगकां. अम्ही कोणहीं किंबड॑/किवड॑ झालों नाही".

शिरा n  nerve. शिरा.

शिरा n  guts. bowel. शिरा. 

शिरा n  veins or fiber of a leaf, plant etc. झाडाच, पानाच नार॑ (Tamil). uis  अम्ही झाडाला घालाच पाणी/ पाऊसाच पाणी अणी तज बरोर असलते "एरुवू" झाडाच शिरावाटे फांटाला जाऊन पावत॑ अणी फांटासून पालाच शिरावाटे तेवढ॑ भागालीन पावत॑.

शिला n  a stone. धोंडा.

शिला n  a stone memorial. धोंडांत॑ केलते स्मारक॑.   

शिलास्थापन॑ n  foundation stone laying ceremony. एक नव वास्तु/बांधणीच काम आरंभ करा पुढे ते भूमींत॑ एक मुख्य धोंडाला स्थापना कराच सण॑.

शिल्प n  a stone statue. धोंडांत॑ केलते विग्रह॑.

शिल्पकला n  handicraft. हातांत केलते कला वस्तु.

शिल्पविद्या n  the science or art of sculpturing. शिल्पशास्त्र.

शिल्पशास्त्र n  the science or art of sculpturing. शिल्प विद्या.

शिल्पी n  an artisan who works on stone. धोंडांच शिल्पकला करणार.

शिळ॑ n  stale food. जुने होऊन खायाला योग्य नाहीते पदार्थ ;  शिळा in sm.

शिळ॑ adj  stale. जुने होवून नासलते. हाळ झालते ; शिळा in sm.

शिव n  Lord Siva. महादेव.

शिवणे vt  to touch (with hand). (हातावाटी) लागिवणे. स्पर्श करणे.

शिवणे vt  to stitch. सूईं-दोरांत॑ कापडा शिवणे.       

शिवणे vt  to do tailoring work. वस्त्र करणे.

शिवरात्रि n  a religious ceremony for Lord Siva. महादेवाच एक मुख्य पूजाच सण.

शिवलिंग n  Shivaling, the linga form of Lord Siva. पूजा कराला उपयोग कराच शिवाच लिंगप्रतिमा.

शिवा n  scolding. हाक्का मारणे ; शिवी in sm.

शिवा देणे vt  to scold. हाक्का मारणे.

शिवा खाणे vi  to get scolded. शिवा मिळणे.

शिशु n  child. लेंकरु.

शिशुविहार n  a kindergarten. ल्हान लेंकरांच खेळ-साळे.

शिष्ट adj  residual. बाकी असाच॑. उरलते. अवशिष्ट.

शिष्टाचार n  social etiquette. संसारांत चोखोट वागणे.

शिष्य n  a disciple. गुरुजीच अनुयायी. 

शिष्य n  student. विद्यार्थि.

शिष्यगण॑ n  a group of disciples. शिष्य लोकांच गुंप.

शिसे n  the metal lead. एक विधाच धातू. सीस.

शिसेच तप्पेल n  a round cooking vessel made of lead. शिसेंत करलते गोळ आकाराच तप्पेल. सीसांत करलते गोळ आकाराच भांडि. Note:- (1) these vessels are normally used for making sar on account of the  unique taste they impart to it. (2) शिसें / सीस  is lead.

शिक्षक n  teacher. पंतोजी.

शिक्षण n  education. विद्याभ्यास. वाचणे-लिव्हणे.

शिक्षा n  punishment. दंड.

शिक्षा n  teaching. educating. शिकिवणे. विद्याभ्यास करिवणे.

शिंकणे vi  to sneeze. पडसामुळे, नाहीतर॑, नाकाला उपद्रव होताना जोरांत॑ वार॑ बाहेर सोडणे.

शिंकरणें vt  to blow nose to remove mucus from nostrils. शेंबूड बाहेर काढाला जोरांशी श्वासाच वार॑ बाहेर करिवणे. 

शिंग n  horns. कित्येक मृगांच डोस्के वर असाच हडाच अवयव. कोंबु (Tamil).

शिंतडणे vt  to sprinkle. शिंपडणे.

शिंतडणे vi  to fall in drops. to sprinkle. शिंपडणे.

शिंतोडे n  light drizzle of a few rain drops (from a few passing clouds).  शिंपडून पडाच पाऊस. एक-दोन बूंदाच बरीक पाऊस ; शिंतोडा/शिंतडा in sm. uis शिंतोडे पडताना गांवाला निघताने म्हणून सांगणे आहे.

शिंप n  seashell. चिप्पि. uis अम्ही ल्हान अस्ताना अम्च घर समुद्राच जवळ होत॑. तम्हा नित्य संध्याकाळी समुद्राकडे जावून शिंप हुडुकून काढणे अम्च एक खेळ होत॑.

शिंपडणे vt  to sprinkle. शिंतडणे.

शिंपी n  tailor. दर्जी.

शिंपी n  a person belonging to the shimpi caste. शिंपी वर्गांत॑ मिळालते एक मनुष.

शिंबडणें vt  to blow nose. नाकांत्सून शिंबडा जोरान टाकणे. नाक शिंबडणे.

शिंबडा n  mucus from the nose during an attack of common cold. पडसामुळे नाकांतून गळाच द्रव्य. शेंबूड. uis पडसा आलतर शिंबडा पुसिंगाला कागदाच 'टिश्यू' उपयोग करापक्षा रूमाल उपयोग करणे चोखोट.

शीघ्र adv  quickly. लोक्कर. लोक्कुर.

शीघ्र adj  quick. लोक्कर. लोक्कुर.

शीडी n  ladder. एणी (Tamil).

शीडे  n  a fried snack of small balls of rice flour and gram. तांदूळाच पीटांत॑ केलते ल्हान-ल्हान गोळीच आकारच तळ्लते एक पदार्थ. Note :- from Tamil. uis गोकुलाष्टमीच दिवसी शीडे करणे पद्धत॑ आहे.

शीणभाग n  fatigue. tiredness. सुस्त. भागोत. नित्राण. श्रमामुळे थकणे.

शीत n  a grain of cooked rice. शिजलते एक तांदूळाच धान्य. शीतकणे.

शीतकण॑ n  a grain of cooked rice. शित ; शीतकण in sm.

शीतकाळ n  winter season. हिमाळाच काळ. 

शीतला n  small pox. देवी. शीतला रोग. uis अम्च देशांतून शीतला रोग पूर्त निघून गेलाहे म्हणून सरकार दृढ आहेत॑. शीतला असास्क कोणालतरीं कळून त्यनी सरकाराला कळिवलतर॑ त्यना सरकाराकडून इनाम मिळल॑.

शीतलादेवी n  goddess of small pox. शीतला रोगाच देवी.

शीतशिळे n  cooked rice which has become cold and spoiled . हिंस॑ होवून हाळ झालते भात.

शील n  habitual behaviour. रूढि. वागाच रीति.

शील n  natural disposition. स्वभाव.

शीवेकाई n  soapnut, the powder of which is used in place of soap while having an oil bath. शीवेकायी. शिकेकाई (Kannada). तेलांत माखिंगून आंघोळ करताना आंगांतून तेल घासून उतरिवाला उपयोग कराच एक बींच पूड. Note :- from Tamil. uis अगाऊ अस्कीन माखिंगताना लोक शीवेकाईच पूढ घासिंगत होते. पण, अत्ता लोक॑ 'षेंपू-बॉडीवाष' वापरतात॑.

शुक्र n  the planet Venus. एक ग्रहाच नाव. कांसें

शुक्रदशा n  fortunate times. भाग्याच काल.

शुक्रवार n  Friday. गुरुवाराच नंतरल॑ दिवस. uis शुक्रवार मीठ घ्याला चोक्कोट वार॑ म्हणून सांगणे आहे.

शुक्ल n  white. पंढ्र रंग.

शुक्लपक्ष n  the white fortnight leading to the Full Moon. पौर्णमी पर्यंतल॑ चौदा दिवस.

शुचि adj  clean. शुद्ध.

शुत्ति  n  hammer. हतोडि. Note :- from Tamil. uis  अम्च गामांत प्लंबर, इलेकट्रीषन हेनी अस्कीन कामाला येताना हात हलींगून येतात. पह्जते साधन एकहीं आणत नाहीते, "कट्टिंग प्लैर" आणलतर, शुत्ति आणनात. तेच ठींगून शुत्तीस्क॑ उपयोग करतील॑. हेनी केम्हा सुधरतीलकी ?

शुद्ध adj  clean. शुचि असाच. शुचि झालते.

शुद्ध adj  correct. चूक नाहीते.

शुद्ध adj  pure. पवित्र.

शुद्ध adj  unadulterated. उणे गुणाच मिळिवनाते.

शुद्धांग adv  in the purest sense. शुद्ध विना वेगळ॑ कोण्तीन नाही म्हणाच अर्थ. Note:- this usage is generally made to indicate and in combination with "the utter absence of" a thing, sense, feelings etc. uis पहिल॑ पहिल॑ तेनी डेल्हींत॑ असताना त्यांस हिन्दी शुद्धांग कळ्ळ॑होत नाहीतरीन, फार लोक्कुरेच हिन्दी बोलाला शिकींगटले.     

शुद्धी n  cleanliness. शुद्ध होवून असणे.

शुद्धीकरण॑ n  ritual purification. धर्माच अनुसार पवित्र करणे.

शुद्धोदक n  pure sacred water used in puja. पूजाला उपयोग कराच श्रेष्ठ पाणी.

शुभ adj  auspicious. मंगल॑.

शुभ n  an item or event marking auspicious end of a programme. एक कार्यक्रमाच शेवटीच मंगल भाग.

शुभ n  last of the series of the daily ceremonies conducted after death of a person. शवसंस्काराच नंतर दिवसिडि कराच कार्यक्रमांत शेवटि कराच कार्यक्रम॑. 

शुभकार्य n  auspicious function. देव पूजा, वराड, मुंज, आराधना, सण॑ असलते मनाला संतोष द्याच कार्य.

शुभम n  the last song in a kacheri. गाणेच कचेरींत॑ शेवटलते गाण॑.

शुभलक्षण॑ n  auspicious aspect. चोखोट लक्षण॑.

शुभविवाह n  an auspicious wedding. एक चोखोट वराड.

शुभ n  an item or event marking auspicious end of a programme. एक कार्यक्रमाच शेवटीच मंगल भाग. uis कोणीं मरून त्यंच अंत्य कार्यक्रम पूरा झालांपिरी शेवटीच दिवस कराच कार्यक्रमाला "शुभ॑" अस॑ सांगतात॑.

शुभांगी n  a beautiful woman. एक सुंदर स्त्री. uis मझ बहिणीच एक मित्राच नाव शुभांगी. नावा जोक्त॑ पाह्याला पणीं तिन॑ फार सुंदर आहे.

शुरु n  begin. start. आरंभ.

शुश्रूषा n  nursing. diligent and watchful waiting upon or service. सेवा. uis  हॉस्पिटलांत॑ एक ॲपरेषन झालनंतर तिकडल॑ नर्स लोकांच शुश्रूषा पणीं चोखोट असलतर अम्हाला मनाच त्रूप्ति होईल॑.

शूद्र n  Sudra, the fourth caste in Hinduism. हिंदु धर्मांतल॑ एक वर्णाच नाव.

शूद्र adj  a person belonging to the Shudra caste. शूद्र जातीच एक मनुष.

शूद्रीण॑ n  a woman belonging to the Sudra caste. शूद्र वर्गांतल॑ एक बायको.

शूद्रीण॑ n  a maid-servant. कामवाली.

शून्य n  the numeral zero. पूज्य अंक. पूज्य संख्या. Note. the earliest recorded date of "zero" has been identified as around the 3rd century AD recently (Sep 2017) by a research team in Oxford University by carbon dating the Sanskrit birch bark manuscript discovered in Bakhshali village in present day Pakisthan. The manuscript tells that the work was compiled by "a brahmin the son of Chajaka, for the use of Vasiṣṭha's son Hasika". 

शून्य n  vacuum. void. एकीहीं नाहीते ठिकाण.

शून्याकाश n  inter-stellar or inter-planetary space. outer space. नक्षत्रांच मध्द्यल॑ ठिकाण. अंतरीक्षाच बाहेरच ठिकाण. 
 
शूर॑ adj  valiant. निर्भय. वीर॑.

शूरपण॑ n  valour. वीरपण॑.

शूल n  spear. युद्धाच एक उपकरण॑.

शूलम n  the inauspicious direction to be avoided for the first outbound journey of the day, from one’s  home or temporary residence. दिशाशूलम. घरांत्सूनकी, सद्या राह्यलसाच ठिकाणांत्सूनकी निघाच दिशा. दिवसाच पह्यिलच॑ यात्रा हे दिशाला असणे अशुभ म्हणून आहे. Note :- this direction varies from day to day. 

शूळ n  pain. सूळ. वेदना. दुखणे ; शूळ/शूल in sm.

शृंगार n  romance. प्रीति भाव.

शृंगारशास्त्र n  science or art of love. काम शास्त्र.

शृंगारी n  enchantress. कामिनी.

शेकणे vt  to warm oneself before a fire. विस्तूंत आंग उनु करींगणे. uis उत्तर भारतांत हिमाळाच दिवसी इकडे-तिकडे लोके विस्तु घालिंगून हात पांय शेकींगत बसाच पाव्हुया.

शेकणे vt  to foment (with a hot or cold pack for sprains etc). आंग-सूळांतून चुकाला उनुपाणींत॑ (अथवा "ऐस" पाणींत॑) बुचकळून पिळलते कापड॑ दुखाच ठामी चेंपून लावणे. uis मादांतकी गळांतकी लचकलतर॑ "होट्वाटरबॅगांत" उनु पाणी घालून शेकलतर॑ बर॑ वाटल॑.

शेकणे vt  to apply warmth. ऊन लागिवणे. uis हींवाळाच (हीमाळाच) दिवसी अम्च॑ आजा पेटिवलते सगडीच ऊनांत दोन तळहातीन बोटीन शेकणे कराच पाव्हून मी त्यांस मष्किरी करत होतों, पण अता मझ॑ वयेपणांत (म्हातारपणांत॑) मी पणीन तेच करेत आहें.     

शेगडि n  coal fired stove. सगडि. कोळसाच चूल. uis सोवळेच संपाकाला अत्तपणीं कोळसाच शेगडि उपयोगांत आहे. देवाच नैवेद्याला शेगडींत केलते संपाकच असाम॑.

शेजार n  neighbourhood. शेदार. आजूबाजूच ठिकाण.

शेजार n people of the neighbourhood. शेदार. आजूबाजूच लोक॑.

शेजारल॑ adj  that which is in the neighborhood. शेजारच॑. शेदारल॑. शेदारच॑.

शेजारी n  a neighbour. शेदारी. बाजू घरच॑ मनुष.

शेजारी adv nearby. शेदारी. बाजूला. बाजूंत॑.

शेजारीण॑ n  a female neighbour. शेदारीण॑. बाजू घरच बायको.

शेजारी पाजारी n  neighbourhood and acquaintances. शेजारच कळ्लत॑ लोक. uis अम्ही ल्हान असताना घरांत एकदा माकडपण॑ करत असताना मझ बापा वरडले. ते वेळी मझ माय म्हण्टले " कशाला वेड-वंकड वरडतांत, शेजारी-पाजारी लोक॑ अम्हाला गावठी लोक॑ म्हणींगतील॑".

शेट n  a moneyed person. a wealthy merchant. सेट. एक पैसावंत मनुष. एक पैसावंत व्यापारि. uis चेन्नैंतल एक शेट प्रतिवर्षी तिरुपतीला जाऊन धर्म दर्शनाच पंक्तींत (लैनांत) सात-आठ घंटे ओठाकून/होठाकून देवाच दर्शन करून येतात. पैसे देवूनकी सिफारिश घेऊनकी त्यांस॑ दर्शन करणे सुद्ध म्हणून अवडना.

शेण n  dung. गोबर.

शेणपाणी n  getting the entrance to a house ready for rangoli by sweeping and then sprinkling and smearing with thin cow dung water. रांगोळी घालाला घराच समोर बरीक शेणपाणी शिंपडून तय्यार करणे. सडा सरिवणे. uis खेडेगामांतीन ल्हान-ल्हान पट्णांतीन अत्तापणीं रांगोळी घालाला पाणींत मिळिवलते शेणांतच शेणपाणी कराच. पण, मोट्ठ॑ पट्णांत नुस्त पाणी घालून भोई तय्यार करतात.

शेणपाणी n  cleaning and then mopping the floor with thin cow dung water at the spot where food has been eaten. जेवलते ठिकाणी शेण्पाणी घालून शुद्ध करणे. uis जेवलते ठिकाणी शेणपाणी घालून पुसलतर॑ सोवळेला (सवळेला) मात्र न्हो, आरोग्याला पणीं चोखोट म्हणून थोरळे सांगतील॑.

शेणपोतेर॑ n  a rag used for mopping the floor after smearing with cow dung water. शेणपाणी शिंपडल॑ नंतर॑ भोईं पुसाच चिंधि ; शेणपोतेरे in sm. uis अगाऊच काळांत लोकांस खाले बसून जेवाच दंडक असताना, पान मांडाच पुढे खाले शेणपोतेरा वाटे पुसणे दंडक होत॑.

शेणपोतेर॑ fig  a term used sarcastically for describing a very dull looking saree or dress. पाह्याला बरोर नाहीते कापडाला मष्किरींत सांगाच एक गोष्ट. uis मझ जुन॑ 'टी-षर्ट' पाह्यलतर॑ मझ बाईलीला राग पेटिंगल॑. "हे कोणकी देलते शेणपोतेरास्क आहे. हे घालिंगट्लतर॑ मी तुम्च बरोर बाहेर येईना" म्हणून तिन॑ सांगल॑.

शेत n  agricultural land. जमीन. क्रिषी कराच जनीन. uis शेत असणार ब्राह्मण लोक॑पणीं चोखोट कामवाले मिळाच कष्टामळे, अथवा, कामवालेंच उपद्रवामळे त्यंच शेत भाडेला देवूनटाकून तजांसून काय मिळतकी ते घेयींगून संतोषांत असतात॑.

शेदार n  neighbourhood. शेजार. आजूबाजूच ठिकाण.

शेदार n  neighbour. शेजार. बाजुघर्च मनुष.

शेदारल॑ adj  that which is in the neighborhood. शेदारच॑. शेजारल॑. शेजारच॑.

शेदारी adv  nearby. शेजारी. बाजूला. बाजूंत॑.

शेदारीण॑ n  a female neighbour. शेजारीण॑. बाजू घरच बायको. 

शेवगा n  drumstick. एक रीतीच भाजीपाला.

शेवटल॑ adj  of or belonging to the end. शवेटीच॑.

शेवटी n  the end. (एकाच॑) अंत ; शेवट in sm. uis हे पंक्तींत शेवटी बसलाहत मनुषाला सांभार वाडल॑ नाही वाटत॑.

शेवटी n  thereafter. subsequently. नंतर. Note :- The word शेवटी is used by DMs more often to mean "thereafter or subsequently" than the original meaning "at the end". uis मी सांगाच पूरा सांगणे झाल॑. शेवटी तो काय केला, हे मला कळना.

शेवटीच॑ adj  of or belonging to the end. शेवटच॑. शेवटल॑ ;  शेवटचा in sm.

शेवटीशेवटी adv  towards the end. शेवटी होतां-होतां.

शेवटोर॑ adv  till the very end. शेवटोरि. शेवट पतोरि. शेवटी पर्यंतीन.

शेवटोरी adv  till the very end. शेवटोर॑. शेवट पतोरि. शेवटी पर्यंतीन.

शेवंति n  marigold. पिवळ॑, नाहीतर॑, काषाय रंगाच एक फूलाच नाव.

शेवाळा n  moss. सूर्याच प्रकाश बरोर पडनाते ओल॑ ठिकाणि भोईंला चिकटून वाढाच हिर्व रंगाच एक वनस्पति. पाशि (Tamil). uis (1) जुने काळांच घरांतल॑ नाहणींच मोरी मध्य-मध्य "ब्ळीचिंग-पौडर" घालून धूवनातर॑ तिकडे शेवाळा धरूया. (2) अत्तलीकडे शेवाळांतून 'वैटमिन' तय्यार कराला आरंभ केलाहेतेत॑.

शेवाळा n   water algae. एकच ठिकाणि राह्याच (म्हण्जे, वाहनात॑) घाणक॑ पाणीव॑र पसरून वाढाच हिर्व रंगाच एक वनस्पति. uis अम्च खेडेगामांतल॑ देऊळाच कुंडांत॑ उदंड दिवसांसून भरून पडलसाच शेवाळा पाव्हून अम्हालच कंटाळा वाटत आहे.

शेष n  left over. remaining. बाकि राह्यलते. उरलते.

शें suff  a numerical suffix placed at the end of एक, दोन, तीन etc to indicate "hundreds". शंभराच अर्थ द्या करतां, एक, दोन, तीन असलत्याच शेवटि लावाच एक प्रत्यय. ; शे in sm.

शेंगा n  a common name for podded vegetables. गवारीशेंगा, मांडवशेंगा असलते भाजीपालाच साधारण नाव.

शेंडा n apex. edge. end. अग्र. Note :- the word शेंडि, meaning "tuft of hair" is from this.

शेंडाच पान n the narrower end portion of banana leaf. केळीच पानाच रुंद उणे असाच अग्र भाग. 

शेंडी n  tuft of hair on the head tied into a knot. डोस्केच केंस बांधून ठिवलते.

शेंडीनक्षत्र n  comet. पूंसनक्षत्र. धूमकेतु.

शेंदणी n  a rope used for drawing water from a well. आडांतून पाणी शेंदाला उपयोग कराच चरांट.

शेंदणे vt  to draw up water or a liquid. पाणी, अथवा, दुसर॑ द्रव्य दोरा वाटी व॑र होढणे/ओढणे. Note :- typically from a well.

शेंदणें n  bucket used for drwaing water from a well. बालदि. बादलि.

शेंबूड n  mucus from the nose (during an attack of common cold). (पडसामुळे) नाकांतून गळाच पाणी/द्रव्य. शिंबडा. uis पडसा आलतर॑ शेंबूड पुसिंगाला कागदाच 'टिश्यू' वापरणा पक्षा रूमाल उपयोग करणे चोखोट.

शैली n  a style. a mode. रीत॑. विध॑. तर॑.

शैव adj  relating to Lord Siva. महादेवाला संबंध झालते.

शोक n  grief. sorrow. दुख. संकट.

शोक विचारणे vt  to offer condolences (on occasion of death). (मरण समय) संकट व्यक्त करणे.

शोदा n  scamp. scoundrel. rouge. सोदा. लबाड मनुष.

शोदापण॑ n  roguishness. सोदापण॑. लबाडपण॑.

शोध n  search. investigation. scrutiny. अन्वेषण. हुडकणे. uis सी.बी.ऐ वाले सरकाराच सूचना प्रकार चूक केलते लोकांच शोधना करतात॑, पण त्यंचमधेच कित्येकदन अक्रम करणार आहेत. त्यना कोण शोधतील॑ ?

शोधन n  cleansing or refining (by straining thru' a sieve/cloth). (झरडींत, नाहीतर, फडकांत॑) शुद्ध करणे. uis  श्रीखंड कराला दहीं एक पत्तळ कापडांत बांधून लोंबत सोडतील॑. तजांत्सून पाणी शोधून काढलावर ते फडकांत असाच घट्टि पदार्थ (चक्का) काढून तज बरोर साखरे, केसर वगैरा मिळिवून श्रीखंड करतील॑.

शोभा n  splendour. lustre. कांति. वैभव.

शोळे n  the fleshy edible carpel of fruits like orange and other citrus fruits. पांकुळी. ऑरंज, सात्तुकुडी (मोसंबी) असलते पंडूच आंतल॑ खायाच भाग. Note :- from Tamil.
शोंबेरिपण॑ n  laziness. प्रयत्न कराला इष्ट नसणे. आळस. Note :- from Tamil.
शोंबेरी adj  lazy. प्रयत्न कराला इष्ट नसणार. आळसी. Note :- from Tamil.

शौर्य n  courage. valour. शूरपण॑. uis कित्येकदपा शौर्य असाच बरीस विवेक असणच॑ चोखोट. उदाहरणाला रात्रीच वेळ जास्ति वागे नाहीते ठिकाणी कोणतरीं चूरी दाखिवून चोराला पाह्यलतर॑ ते समयाला तो विचाराच देवूनटाकून येणेच बर॑.

श्मशान n  burning ghat. प्रेत जळिवाच ठिकाण. स्मशान. uis हे काळांत जास्ति-जास्ति लोक॑ प्रेत श्मशानांत॑ जळिवापक्षा इलेक्ट्रिक क्रिमटोरियमांत जळिवतात.

श्मशान n  burial ground. graveyard. cemetery. प्रेताला भोईच आंत समाधि कराच ठिकाण. स्मशान. uis लोकांच संख्या वाढतां-वाढतां श्मशानाला ठिकाण पुरे होईना. असल॑ संदर्भांत॑ तेवढे जातीच लोकनीं "इलेक्ट्रिक" श्मशानच उपयोग करामते पडेल॑.

श्याम adj  dark blue. गडद नील॑.

श्रद्धा n  intense attention. गाढ निष्टा.

श्रम n  effort. labour. परिष्रम.

श्रम n  difficulty. कष्ट. आयास.   

श्रमदान n  voluntary labour offered free. दुसरेंच उपकाराकरतां नपैसेला कराच काम.

श्राद्ध n  annual death ceremony. वार्षिक॑. वर्षा-वर्षी कराच पित्रुकार्य.

श्रावण n  Shravana, the fifth month of the Hindu year. हिंदु पंचांकांत॑ पांचवां महिना.

श्रावणी n  the ceremony of changing the sacred thread annually. उपाकर्म. वर्षा-वर्षी जानव॑ बदलिवाच सण॑. uis (1) कोठ-कोठ रायर-मठ आहेकी तथे अस्कीन सर्व-श्रावणी चालिवतात॑. (2) मठाला जायाला वेळ नाहीते कित्येक लोक॑ घरांतच एक "वी-सी-डी" ठींगून श्रावणी करींगतात.

श्री adj  a form of salutation for men, being the short form of Shreeman. दादिगेंच/दाद्ग्येंच नावाच पुढे लिव्हाच एक बहुमान॑ गोष्ट. "श्रीमानाच" एक ल्हान रूप.

श्री n  Goddess Lakshmi. लक्ष्मी देवी.   
     . 
श्रीकांत n  Lord Vishnu. महाविष्णु.

श्रीखंड n  a sweet and sour dish made from curds, sugar and spices. दहींतून केलते एक अंबट-गुळ्चीट पदार्थ. uis अवसरांत॑ श्रीखंड पह्जतर॑ 'अमुल'  कंपनीच श्रीखंड घेऊया. ते फारच स्वादिष्ट अस्ते.

श्रीमती adj  a form of salutation addressed to women, meaning "one who is endowed with prosperity and wealth". बायकांच नावाच पुढे लिव्हाच एक बहुमान॑ गोष्ट. हेज अर्थ आहे "ऐश्वर्यवती".
श्रीमान adj  a term of respectful salutation addressed to men, meaning "one who is endowed with prosperity and wealth". दादिगेंच/दाद्ग्येंच नावाच पुढे लिव्हाच एक बहुमान॑ गोष्ट. हेज अर्थ आहे "ऐश्वर्यवान".

श्रेष्ठ adj  reverential. आदरणीय.

श्रेष्ठ adj  best. उत्तम॑.

श्लोक n devotional poem. भक्ति गाण॑.     

श्वास n  breath. नाकावाटी आंत॑ काढाच वायु.

श्वास धरणे n  breathlessness. श्वास कराला कष्ट होणे.

श्वास धरणे vt  to hold breath. श्वास काढून आंतच ठींगणे.

श्वासोच्छास n  respiration. नाकावाटी वायू आंत॑ काढणेहीं बाहेर सोडणेहीं. 







ष the thirty-third consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच तेहतीसवां व्यंजन॑.

षष्टि n  sixty. साठ.

षष्टि n  the sixth day in each fortnight of the Hindu calendar. हिंदु पंचांगांत॑ प्रति पक्षांतल॑ सहावां दिवस.

षष्ट्यब्दिपूर्ति n  celebration of sixty year  in a man's life. एक मनुषाला साठ वर्ष पूरा होताना कराच सण. सष्ट्यब्दपूर्ति. Note :- षष्ट+अब्द+पूर्ति = sixty+years+completion.सष्ट्यब्दिपूर्ती is acorrupted form.

षाणा adj  smart. clever. wise. shrewd. शहाणा. शाणा. चतुर॑.

षाणपण॑ n  smartness. shrewdness. cleverness. शहाणपण॑. शाणपण॑. चातुरपण॑. uis ते दादिगाच/दाद्ग्याच षाणपणामळे लेंकीला पह्जते सोनेच वस्था सर्वीं पुढेच तय्यार करून ठींगूनटाकले. अत्ता सोनेच मोल कित्ति वाढलतरीन त्यांस॑ चिंता नाही.

षोडशोपचार n  a puja performed in sixteen step-by-step stages. सोळा पायरी प्रकाराच देवपूजा.

No comments: