07 March 2012

ल, ळ







ल the twenty-ninth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच एकोणतीसवां व्यंजन॑.

लगेच adv  (from) then on. (तेम्हा) पसून. लगेत.

लगेत adv  (from) then on. (तेम्हा) पसून. लगेच. Note :- in sm लगेच means ""immediately".   

लगाम n  bridle. घोडाला नियंत्रण॑ कराला तज तोंडांतून बांधून काढलते एक ल्हान लोकुंडाच तुकडा.

लग्न n  auspicious moment for a marriage or thread ceremony. वराडाच अथवा मुंजाच मुहूर्ताच वेळ॑ ; Note:- लग्न in sm means 'marriage'.

लग्नपत्रिका n  marriage invitation card. वराडाला बलावाला तय्यार कराच आमंत्रण कागद. uis कित्येक पैसावंत लोके त्यंच आडंबर दाखिवा करतां लग्नपत्रिका वर मात्र एक दोन लाख रुपे वेच कराला योचनाच करनात॑.

लघु n  light. not heavy. small. थोडच॑. ल्हान. uis वय होतां-होतां अम्च जीर्ण शक्ति उणे होत जायाच सहजच॑. ते करतां साठ-सत्तर वर्षाच वय झाला नंतर रात्रीच वेळ लघु आहार घेण चोखोट म्हणून सांगतात.

लघु n  a short vowel (in grammar). (व्याकरांत॑) एक हृस्व स्वर॑.

लघुभोजन n  light refreshment. snacks. पल्हार॑. फल्हार॑. uis चेन्नै 'शरवणाभवनांत' लघुभोजन म्हणून पंच्यात्तर रुपेला एक ल्हान मसालदोसाईं, दोन इड्लिईं, थोड उपमाईं थोड केसरिभातीं देतो. रात्रीच वेळ तज पक्षा खायाला मला होयना.

लचक n  muscular spasm or sprain or catch. आंग धराच॑. मांसाच लचक. uis हायशि होढून आंगमोडा देत असताना मला गळाच एक पटीस लचक धरल॑.

लचकणे vi  to get a sprain. आंग धरणे. मांसाच लचक होणे.

लज्जा n  shame. लाज.

लज्जा n  coyness. संकोचपण॑. 

लटकणे vi  to dangle. to hang. अटकून लोंबणे.

लटक॑ adj  false. lie. असत्य. लबाड. खरे नाहीते ; लटका in sm. Note :- in Sanskrit लटक/लटिक means "untrue", "rascally".

लटक॑-लबाड॑ adj  crooked. deceitful. वक्र बुद्धीच॑.

लटक सांगणे vt  to spread canard and lies (about a person etc). (एकां विषी) लबाड सांगणे.

लटकिवणे vt  to dangle. to hang. लोंबिवणे ; लटकावणे/लटकविणे in sm.

लड्डु n  a preparation of sweet ball. एक गुळचीट गोळ पदार्थ. लाडु. 

लता n  a creeper. वल्ली. वेल. वळ्ळी (Tamil).

लप्पणे vi  to hide. कोणालीन दिसनास्क॑ ठिवणे/असणे ; लपणे in sm.

लप्पिवणे vt  to hide. to conceal. कोणालीन दिसनास्क॑ ठिवणे ; लपवणे/ लपविणे in sm.

लप्पून-चुपून adv  stealthily. secretly. गूढ होऊन. रहस्य होऊन ; लपूनछपून in sm.

लबलब॑ n ceaseless chatter. लबोलबो. थांबनास्क॑ बोलणे. राहत॑ करनास्क॑ बोलणे. 

लबाड adj  untrue. lie. खरे नसाच॑.

लबाडी n  a lie. untruth. खरे नसाच॑.

लबोलबो n ceaseless chatter. लबलब॑. थांबनास्क॑ बोलणे. राहत॑ करनास्क॑ बोलणे.

लमंडणे vi  to topple. to upset. लवंडणे. लंबडणे. पालते पडणे.

लमंडणे vt  to tumble down (to rest on a mattress etc.). निजाला लवून पडणे. लवंडणे. लंबडणे.

लय n  rhythm. ताळ॑.

लय n  dissolve (in a liquid). (एक द्रव्यांत॑) विघरणे. 

लय n  dissolution of the Universe. ब्रह्मांडाच अवसान॑.

ललाट n  the space between the eyebrows on the forehead. दोन फापणीच मध्य कपाळांतल॑ ठिकाण. uis ध्यान कराच समय डोळे झांकून अम्च मनाच धृष्टि ललाटा वर स्थिर ठिवाम॑ म्हणून सांगतात॑. पण, ते सांगाच एवढ सुलुभ न्हो म्हणून करून पाह्यलते लोकांसच कळल॑ ! 

ललित adj  of simple elegance. फार योग्यताहीं सौंदर्यपणीं असणे. लावण्य़. सरळ॑.   

ललित n  simple elegance. फार योग्यताहीं सौंदर्यपणीं असाच॑. लावण्य़. सरळ॑.

ललितकला n  fine arts. नृत्य, गाणे, काव्य, चित्र ओढणे असल॑ कला.

ललिता n  Goddess Parvati. पार्वती देवि.

ललिता n  a woman of delicate charm and beauty. चोखोट स्वभाच सुंदर स्त्री.   
   
ललितांबिका n  Goddess Parvati. पार्वती देवि.

लवण n  salt. मीठ.

लवणे vt  to bend forward. to bow.  मादाकडे आंग वांकिवणे/पुढे करणे.

लवणे vt  to lower the body by bending the knees. गुडिघा वांकिवून आंग खाले करणे.

लवणे vi  to demean oneself in front of others. to cringe. दूसरेंच समोर स्वंत अभिमान॑ उणे करास्क॑ वागणे.

लवलेश॑ n  an iota. scant. smallest or least quantity. थोडकापसून थोडक॑.

लवंग n  clove. a cooking spice. वाळलते एक रीतीच फूलाच मोहर॑. संपाकाच एक मसाला.

लवंगपट्टा  n  cinnamon bark. संपाकाला उपयोग कराच एक वनस्पति. पट्टा ; दालचिनी in sm. Note :- the लवंग here does not refer to clove.

लवंडणे vi  to topple. to upset. लमंडणे. लंबडणे. पालते पडणे.

लवंडणे vt  to tumble down (to rest on a mattress etc.). निजाला लवून पडणे. लमंडणे. लंबडणे.

लविवणे vt  to bend at the waist. मादाकडे आंग वांकिवणे. आंग खाले करणे.

लविवणे vt to lower the body by bending the knees. गुडिघा वांकिवून आंग खाले करणे.

लवून adv by bending. by bowing. मादाकड॑ आंग वांकिवून/पुढे करून.

लवून adv by lowering the body by bending the knees. गुडिघा वांकिवून आंग खाले करून.

लवून adv demeaning oneself in front of others. cringing. दूसरेंच समोर स्वंत अभिमान॑ उणे करास्क॑ वागणे.

लवून-थाटून adv  repeated action bowing down and straightening-up. पुन्हा-पुन्हा लवणे उठणे. uis मादाच वेदना असणारांस॑ लवून-थाटून काम करणे चोखोट न्हो.

लसण n  garlic. लसूण. वेळ्ळुळ्ळि (Tamil). पूंडु (Tamil).

लसूण n  garlic. लसण. वेळ्ळुळ्ळि (Tamil). पूंडु (Tamil).

लस्सी n  a type of buttermilk. एक रीतीच ताक.

लक्ष n  one lac. एक लाख. शंभर हजार. शंभर हदार.

लक्षा n  attention. श्रद्धा. uis  येतां-येतां तो पोर वाचणेंत थोडक पणीं लक्षा देत नाहीस्क॑ वाटते. परीक्षांत उदंड उणे मार्क घेईंगून येत आहे.

लक्षण॑ n  of cultured and pleasing deportment. लक्षण॑.  uis  पैसाच विषयांत॑ ते नवरी एक साधारण कुटुंबांतून आलतीन तरीन पाह्याला उदंड लक्षण आहे म्हणून नवराच घरच्यांस॑ ते संबंध इष्ट झाल॑.   

लक्षण॑ n  indication. evidence. सूचना.  uis  तो मझकडून दहा हदार रुपे र्रीण घेईंगून गेला. आज पर्यंतीन ते पैसा परतून मिळाच लक्षण॑ काहीं दिसत नाही.

लक्षाधिपति n  a very wealthy person. मोट्ठ॑ पैसावंत॑. लक्षाधीश॑.

लक्षाधीश॑ n  a very wealthy person. मोट्ठ॑ पैसावंत॑. लक्षाधिपति.

लक्षानुलक्ष॑ adj  several lacs. लक्षाच वर लक्ष॑. अनेक लक्ष.

लक्ष्मी n  Goddess Lakshmi. Mahalakshmi. लक्ष्मी देवि. महालक्ष्मी.

लक्ष्य n  aim. लक्ष्य.

लक्ष्य n  target. बडिवाला उद्देशआहेत॑ (दूर असाच॑) एक वस्तु.

लक्ष्य n  attention. लक्ष्य॑.

लक्ष्य n  intention. उद्धेश.

लंकेच पार्वति fig  a woman without any ornaments or ostentation. आडंबर नाहीते बायको.

लंगडणे vi  to limp. पांये बरोर नाहीते करतां कष्टि भोगून चालणे.

लंगड॑ adj  lame. बरोर चालाला होयनासक॑ असाच॑ अवस्था ; लंगडा in sm.

लंगोटि n  loincloth. कौपीन॑. चड्डिच बद्दल नेसाच कापडाच पट्टि.

लंघन॑ n  fasting. उपवास. अनशी पोटांत असणे.

लंबडणे vi  to topple. to upset. लवंडणे. लमंडणे.

लंबडणे fig  to flop (onto a mattress etc.). निजून आराम करणे. लवंडणे. लमंडणे.

लंबडिवणे vt  to topple. to upset. ढकळून लवंडिवणे. 

लंबोदर॑ n  Lord Ganesha. गणेश.

लाख n  one lac. एक लक्ष. शंभर हदार (हजार).

लाख n  sealing wax.  पाठिवणाराच चिन्ह कागदाच वर लावाला उपयोग कराच तंबड॑ रंगाच एक वनस्पतीच मेण. तंबड मेण.

लाखपति n  a person having lakhs of rupees. लक्षाथिपति. uis हे काळांत पोणावांटा उद्योगांत असणार लोके लाखपति असतात॑, कारण पैसेच मोल उणे झालाहे अणी तेवढेदनालीं पुढे काळाच पक्षा धर्मा उणे पक्षा दहा वांटा वाढलाहे.

लाखपति n  a very wealthy person. एक मोट्ठ॑ पल्लमदार. पैसावंत मनुष. uis हे गेल॑ दहा-पंध्रा वर्षांत॑ अम्च देश फार पुढे झालाहे-ते-करतां देशांत॑ लाखपतींच संख्या उदंड वाढलाहे.

लागणे vi  to hit or touch involuntarily. कळनास्क॑ बडिवणे अथवा शिवणे. बडिवणे.

लागणे vi  to impact(touch) or affect(material and non-material things). लागणे. बडिवणे. 

लागणे vi  to be required. पह्जस्क॑ पडणे.

लागणे vi  to feel (bad) in the mind. (बर॑ नाही म्हणून) मनांत॑ वाटणे.

लाज n  shame. लज्जा.

लाज n  modesty. संकोचाच लाज.

लाज n  bashfulness. संकोचाच लाज.

लाज n  embarrassment. लाज. uis अम्ही तंजावूर मरठी लोक॑ पूणे मराठी लोकां समोर अम्च भाषा बोलताना लाज वाटींगाच आवश्य काहीं नाही. खरहोवून लाज वाटामत॑ काय म्हणजे, अम्हाला अम्च भाषांत॑ लिव्हालीं वाचालीं होतनाही म्हणाचच. 

लाजणे vi  to be bashful. लाज होणे.

लाजमर्यादा n  humility and modesty. विनयीं संकोचीं. लाज-लज्जा.
 
लाजलज्जा n  humility and modesty. विनयीं मर्यादाहीं. लाजमर्यादा.

लाजाळू n  a type small shrub whose leaves close on touching. touch-me-not shrub.

शिवताना पान झांकींगाच एक झुडूप. तोट्टाशिणंगी झाड (tamil).

लाजाहोम॑ n  a ritual in a wedding in which parched rice is offered to the sacred fire. वराडाच वेळी होमकुंडांत॑ लाहेंच आहुति कराच पद्धत॑. Note :- लाजा is a less known word for लाह्यें (लाहें) and among Tanjore Maharashtrians it finds use in the wedding ritual of लाजाहोम॑ in which लाजा (ie, लाह्यें / लाहें) is offered to the sacred fire.

लाजिवणे vt  to put to shame. लाज आणिवणे.

लाजींगणे vi  to be abashed. संकोच वाटणे.

लाटणी n  rolling-pin. पीठ लाटाला उपयोग कराच साधन॑.

लाटणे vt  to roll out with a rolling-pin. लाटणींत॑ लोटून काढणे.

लाटा n  wave (of water). (पाणीच) लाटा ; लाट in sm.

लाठि n  a thick stick. baton. दंडा. दंड. एक जाड काठि. uis साधारण होऊन तोड-पीट अक्रम कराच गुंपाला अक्रमाच ठांव (ठाम) सोडून दौडिवाला पोलीस लोक॑ लाठीच प्रयोग करून पाह्वून, तज मळे अक्रम नियंत्रणांत॑ आल नाही तर मात्रच टीयर-गॅसाच की गोळाच की प्रयोग करणे.

लाठीमार n  lathi charge. baton charge. एक गुंपाला नियंत्रण कराला लाठीच प्रयोग करणे.

लाड n  affection. स्नेह.

लाडक॑ adj  beloved. जास्ति लाड मिळणार ;  लाडका in sm.

लाडका adj  a darling boy. लाडाच पोर.

लाडकी adj  a darling girl. लाडाच पोरी.

लाडीगोडी n  coquetry. flirting. विशेष कार्य नाहीस्क॑ लाडाच गोष्ट करणे.

लाडीगोडी n  pointless silly talk. विशेष कार्य नाहीस्क॑ बोलणे.

लाडु n  a preparation of sweet ball. एक गुळचीट गोळ पदार्थ. लड्डू.

लाण adj  small. ल्हान. चुम्मण॑ ; लहान in sm.

लाण-थोर adj  big and small. ल्हान-थोर. ल्हानीं थोरीं ; लहानथोर in sm.

लाणपण॑ n  childhood. ल्हानपण॑. लेंकुरूपण॑. बाळपण॑.

लाणपण॑ fig  mean mindedness. petty mindedness. ल्हानपण॑. ल्हान मनाच॑.

लात n  a kick. लात्ता.

लातखाऊ n  regularly kicked about. सदा लात्ता खाणार ; लाथखाऊ in sm.

लात्ता n  a kick. लात. पायेवाटी जोरहोऊन तुडिवण॑ ; लाथ/लात in sm.

लाभ n  profit. खर्च पूरा झाला नंतर॑ उराच पैसा. आदायाचीं खर्चाचीं व्यत्यास॑.

लाभ n  benefit. gain. प्रयोजन॑.

लाभकाळ n  profitable times. प्रयोजनाच काळ. चोक्कोट काळ.

लाभगुण॑ n  advantage. प्रयोजन॑.

लाभदृष्टि n  profit minded. सदा लाभाच चिंता करणे.

लाभदृष्टि n  an eye for gain. प्रयोजन कोठसून येते म्हणून पाह्त असणे.

लायक adj  suitable. योग्य. 

लायक adj  worthy. योग्य.

लाली n  lullaby. लेंकरांला झोंपी घालताना सांगाच गाणे. Note :- from लालन meaning "endearing".

लाळ n  saliva. जिव्हांतून सुटाच॑ द्रव्य. 

लावणी n  a genre or variety of Marathi ballad. एक रीतिच मराठी जनगीत॑.

लावणे vt the "action" form of लागणे. "लागणेच" क्रीया रूप. 

लावणे vt  to smear. लेपन करणे.

लावणे vt  to plant (a sapling or plant). (रोप अथवा झाड) रोवणे. 
 
लावण्य॑ n  comeliness. कोमळ सौदर्य.

लासणे vt & vi  to cauterize. to scald or get burnt with a hot metal. पोळत असाच कायतरीन आंगाला लागून व॑रून घाव होणे.

लासिंगणे vt  to get cauterized. to get scald or burnt with a hot metal. पोळत असाच कायतरीन आंगाला लागून वरून घाव करींगणे.

लाहें n  blown and puffed parched rice or corn. pop-rice. pop-corn.  लाह्यें. भाजून फुगिवलते तांदूळ. भाजून फुगिवलते धान्य. अरळ (tamil). लाही in sm.

लाह्यें n  blown and puffed parched rice or corn. pop-rice. pop-corn.  लाहें. भाजून फुगिवलते तांदूळ. भाजून फुगिवलते धान्य. अरळ (tamil). लाही in sm. Note :- (1) लाह्यें is the plural of लाही, and in TM the plural form alone is used. लाजा is a less known word for लाह्यें and among Tanjore Maharashtrians it finds use in the wedding ritual of लाजाहोम॑ in which लाजा (ie, लाह्यें) is offered to the sacred fire. (वराडाच वेळी होमकुंडांत॑ लाह्येंच आहुति कराच पद्धत॑). (2) पोहें (or पोहा) on the other hand is the flattened parched rice known as अवल in Tamil.
     
लांकड॑ n  firewood. चूलाच लांकड॑ ; इंधन/जळण in sm. uis लांकडाच चूलांत॑ संपाक केलते पदार्थाच रूच तेवढा बरीस (कोळसाच अणी "गेसाच॑" चूलांत॑ कराच बरीस) नीट अस्ते.

लांकड॑ n  wood. कापलते अथवा फाडलते  झाडाच फांटा/पेड ; लाकूड in sm uis. (1) बांगळूराच बाजूच चन्नपट्णा लांकडाच बावोलीला प्रसिद्ध आहे. (2) लांकडाच कवाडीं खिड्कीईं उदंड॑ मोल झालाहे म्हणून अत्ता थोर-थोर "बिल्डेर्स" फ्लाटाच मोट्ठ॑-मोट्ठ॑ बांधणींत॑ लांकडाच आलोचनाच करत नाहीते.

लांच n  bribe. कार्य साध्य होयाला न्यायाला विरुद्ध द्याच पैसा ; लाच in sm.

लांचखाऊ adj  corrupt. काम करून द्याला अयोग्य वाटांत॑ पैसा घेणार.

लांदर n  a glass covered lantern (usually the ones hung from ceilings). रांदल. अर्सांत॑ झांकून असाच एक दिवा (छप्परांतून लोंबून घालाच॑). Note :- from "lantern". Also called "रांदल", which is is a metathesised or mispronounced form of "लांदर".

लांदर n  a portable hurricane lantern. रांदल. वार॑-पाऊसांत॑ विजनास्क अर्सांत॑ झांकून असाच वाताच दिवा (उचलींगून जायाला सौकर्य असाच॑). Note :- from "lantern". Also called "रांदल", which is a mispronunciation of "लांदर".


लांब n  length. लांब ; लांबी in sm. uis अम्च जामाई येतात म्हणून अम्ही एक नव पलंग घेटलों. पण, ते आवश्या जोक्त लांब न्होते म्हणून कळ्ला नंतर॑ पर्तून दुकानाला पाठीवून टाकलों. 
 
लांबरुंद adj  adequately large or spacious. पह्जते एवढे मोट्ठ॑.

लांबोळ adj  (that which is) long. लांबाच॑.

लिपी n  script. अक्षर लिव्हाच रीत॑.

लिवणे vt  to write. अक्षर॑ ओढणे/होढणे. अक्षर॑ काढणे. लिव्हणे ; लिहणे in sm.

लिवणे-वाचणे n  state of being a literate. लिवालीं वाचालीं कळाच॑. लिव्हणे-वाचणे.

लिव्हणे vt  to write. लिवणे ; लिहणे in sm.

लिंग n  feminine gender, masculine gender and neuter gender. स्त्रीलिंग, पुरुषलिंग अणि नपुंसक लिंग.

लिंग n  penis. दादिगेंच/दाद्ग्येंच मुताच अवयव॑.

लिंग n  Shivaling. शिवाच चिन्ह.

लिंग (grammar)  n  male, female and neuter. (व्याकणांत॑) पुल्लिंग॑, स्त्रीलिंग॑ अणी नपुंसक लिंग॑.

लिंपणे vt  to daub. to smear. लेपणे. लेपन करणे. माखणे.

लिंबू n  lemon. एक अंबट फळ.

लिची n  a type of fruit. एक रीतीच फळ.

लीला n  divine play or prank. देवाच खेळ.

लुगडे n  sari. सारी.

लुंगि n  a coloured dhoti with designs on it. रूप-रंगाच धोती.

लूट n  plundering. चोरी.

लूट n  plundered booty. लूटून केलते संपाद्य.

लेख n  a written document. लिव्हलते कागद.

लेख n  a written article. लेखन. गद्यांत॑ लिव्हलते कार्य/विषय.

लेखक n  scribe. a writer. author. लेखन अथवा पुस्तक लिव्हाच मनुष.

लेखन n  writing. लिव्हणे. 

लेखन n  an article. गद्यांत॑ लिव्हलते कार्य/विषय.

लेखनसामग्री n  stationary. लिव्हाला पह्जते साधन॑.

लेखिका n  an authoress. (पुस्तक) लिव्हाच स्त्री.

लेप n  a thin mattress. a quilt. नाहिली. एक पत्तळ अंथरूण. पत्तळ अण्थूण ; लेप/लेपडी in sm.

लेप n  coating. daubing. लेपन॑.

लेपणे vt  to daub. to smear. लेपन करणे. लिंपणे. माखणे.

लेपणे vt  to coat. to smear. लेपन करणे. लिंपणे.

लेपन n  coating. daubing. लेप.

लेवदेवी n  borrowing and lending. पैसाच घेणे-देणे.

लेश n  a very small portion. एक ल्हान भाग. थोडक॑. थोड.

लेह्य n  a semi-solid ayurvedic medicine consumed by licking. चाटून खायाच एक आयुर्वेदाच ओखद ; लेह/लेह्य in sm.

लेंक n  daughter. पुत्रि. लेंकी.

लेंकरू n  a child. बाळ. लेंकुरु. एक ल्हान लेंक अथवा लोंक ; लेकरू in sm.

लेंकरे n  children. संतान॑.

लेंकरेबाळ॑ n  offspring. घरच लेंकरे. संतान॑ ; लेकरेबाळे in sm.

लेंकी n  daughter. पुत्रि. लेंक.

लेंकुरु n  a child. बाळ. लेंकरू . एक ल्हान लेंक अथवा लोंक ; लेकरू in sm.

लेंकुरूपण॑ n  childhood. ल्हानपण॑. बाळपण॑ ; लेकुरपण in sm.

लेंड n  droppings of excreta, like those of rats etc. उंदीर असलते प्राणींच गू. लेंडी.

लेंडी n  droppings of excreta, like those of rats ets. उंदीर असलते प्राणींच गू. लेंड. 

लोक॑ n  people. जन॑. जण॑. दन॑. दण॑. 

लोककथा n  folk tale. जनकथा. परंपरांतून सांगत याच कथा. 

लोककल्याण n  people's welfare. जन कल्याण॑. लोकांच सुख॑. समुदायाच सुख॑.

लोकगीत॑ n  folk song. जन गीत॑. परंपरांतून सांगत याच गाणे.

लोकचर्चा n  public debate. जन चर्चा. लोकांच मध्येल॑ चर्चा.

लोकतंत्र n  democracy. जनतंत्र.

लोकनीति n  civil justice. देशाच नीति.

लोकनृत्य n  folk dance. परंपरांतून करत याच नृत्य.

लोकप्रसिद्ध n  world famous. भूलोकांत॑ प्रसिद्ध झालते.

लोकप्रीय n  popular among the masses. लोकांला अवडलते.

लोकप्रियता n  popularity. सगळांच कडीन प्रीय झालते.

लोकबोली n  dialect. एक भाषाच वेगळ॑ एक रूप. उपभाषा.

लोकर adv  quickly. fast. soon. shortly. early. urgently. promptly. immediately. जल्दि. थोडच वेळांत॑. जास्ति वेळ होयाच पुढे. समय हाळ करनास्क॑. अत्ताच॑. लोक्कर. लोकुर. लोक्कुर.

लोकसभा n  Lok Sabha. the lower House in Indian Parliament. केंद्र-संसदाच एक सभा.

लोकसंख्या n  population. जनसंख्या.

लोकसाहित्य n  folk literature. (साधारण लोकांच) परंपरांतून याच साहित्य.

लोकसेवा n  service to the people. लोकांस सेवा करणे. जनसेवा.

लोकुर adv  quickly. fast. soon. shortly. early. urgently. promptly. immediately. जल्दि. थोडच वेळांत॑. जास्ति वेळ होयाच पुढे. समय हाळ करनास्क॑. अत्ताच॑. लोक्कर. लोकर. लोक्कुर.

लोकुंड n  iron. लोखंड. लोखुंड. लोहें.

लोकोद्धार॑ n  welfare of the masses. जनताच उद्धार॑. 

लोक्कर adv  quickly. fast. जल्दि. लोकर. लोकुर. लोक्कुर ; लवकर in sm. uis वराडांच छत्रांत लोक्कर-लोक्कर वाढतील॑. तम्हाच तीन-चार पंक्तीला वाढाला साध्य होईल.

लोक्कर adv  soon. shortly. थोडच वेळांत॑. लोकर. लोकुर. लोक्कुर.  uis बांगळूरच ट्रैन पाष्टे सहा घंटेला येमते होते. अत्ता सहा बडिवून पांच मिनिट झाल॑. ते लोक्कर येवून पावल म्हणून वाटते.

लोक्कर adv  early. जास्ति वेळ होयाच पुढे. लोकर. लोकुर. लोक्कुर. uis चेन्नै-बांगळूर 'शताब्दि' एक्स्प्रेस ट्रैन सहा घंटेला चेन्नैंतून निघते. ते धराम॑ म्हण्जे, पाष्टे लोक्कर उठून स्टेषनाला जाम॑.

लोक्कर adv  urgently. समय हाळ करनास्क॑. लोकर. लोकुर. लोक्कुर. uis मला अत्ताच जामते आहे. मझ काम थोड लोक्कर करून देलतर मोट्ठ॑ उपकार होईल.

लोक्कर adv  promptly. अत्ताच॑. लोकर. लोकुर. लोक्कुर. uis ते काम तला विचाराच पुढेच तो लोक्कर करून देला.

लोक्कर adv immediately. अत्ताच॑. लोकर. लोकुर. लोक्कुर. uis आफीसाला जायाला वेळ झाल॑. लोक्कर निघांत॑.

लोक्कर-लोक्कर adv  hurriedly. जल्दि-जल्दि. लोक्कुर-लोक्कुर.

लोक्कुर adv  quickly. fast. soon. shortly. early. urgently. promptly. immediately. जल्दि. थोडच वेळांत॑. जास्ति वेळ होयाच पुढे. समय हाळ करनास्क॑. अत्ताच॑. लोक्कर. लोकर. लोकुर.

लोखंड n  iron. लोहें. लोकुंड. लोखुंड.

लोखुंड n  iron. लोहें. लोकुंड. लोखंड.

लोटणे vt  to topple and roll over. ढकळून लोळिवणे.

लोटा n  tumbler. पाणी पियाला उपयोग कराच एक ल्हान पात्र.

लोट्टु-लोस्कु interj an expression implying dithering or stumbling or uncertain action. तडमारून तडमारून कराच विषया विषीन सांगाच एक गोष्ट॑. Note. from Tamil.

लोणचे n  salted pickles of mango, lemon or other vegetables. मीठांत॑ घालून तय्यार केलते अंबा, लिंबू अथवा वेगळ॑ भाजीपाला. Note:- लवण means 'salt'. लोणचे appears to be derived from this word ; most probably, लवणाचे, becoming लोणचे.

लोणी n  butter. दूधाच सायेंतून काढाच पदार्थ ; नवनीत/लोणी in sm.

लोभ n  greed. avarice. अत्याग्रह.

लोभी adj  greedy. अत्याग्रहि.

लोलक n  ear drops. कानात॑ लोंबून घालाच एक आभरण॑. जुमकी.

लोलक n  pendant of an ornament. आभरणांत॑ लोंबून असाच एक भाग.

लोळ n  rolling over and over. लोळून लोळून जाणे.

लोळणे vi  to roll over. लोळणे. लोटून जाणे.

लोळ पडणे vi  to be in a tossed about state or condition.  काहीं उद्देश नाहीस्क॑ इकड॑-तिकड॑ पडलसाच/पडून असाच अवस्था. uis वाचाच पुस्तक इकड॑-तिकड॑ लोळ पडलसाच पाव्हूनच सांगूया तो पोराला वाचणेंत॑ थोडक॑ पणीं श्रद्धाकी लक्षाकी नाही म्हणून.

लोळिवणे vt  to cause to roll. लोळाला सोडणे ; लोळवणे/लोळविणे in sm.

लोहार n  ironsmith. blacksmith. लोखुंडाच काम करणार.

लोहें n  iron. लोखुंड. लोकुंड. लोखंड ; लोह or लोहो sm. uis संपाक करताना फोड्णी घालाला साधरण होऊन लोहेंच पळीच उपयोग कराच॑.

लोंक n  son. पुत्र.

लोंबणे vi  to hang. to suspend. लटकून लोंबणे.

लोंबिवणे vt  to hang. to suspend. लटकिवणे.

ल्हान adj  small. लाण. चुम्मण॑ ; लहान in sm.

ल्हानपण॑ n  childhood. लाणपण॑. लेंकुरूपण॑. बाळपण॑.

ल्हानपण॑ fig  mean mindedness. petty mindedness. लाणपण॑. ल्हान मनाच॑.






ळ the thirtieth consonant of Dakshini Marathi. दक्षिणी मराठीच तीसवां व्यंजन॑.
There are no words in Dakshini Marathi starting with ळ.

No comments: