07 March 2012

इ,ई,उ,ऊ,ऋ,ए,ऐ,ओ,औ,अ॑,अं,अः




 

इ  the third vowel and the third letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच तिसर॑ स्वर॑. 

इकडच॑ adj  relating to this side. इक्कडच॑. इक्कडल॑. हे पटीसच॑. एथेल॑. यथेल॑. इथेल॑. हे बाजूच॑ ; इकडचा/इकडला in sm. uis  तुम्ही तुम्च काम पाह्यींगा. इकडच काम मी पाह्यींगतों.

इकडच॑ adj  relating to this place. इक्कडच॑. इक्कडल॑. हे ठिकाणीच॑ ; इकडचा/इकडला in sm. uis  इकडच लोक त्यंच काम पूरा करलांपिरी मी त्यना तुम्चकडे पाठीवून देतों.

इकडच॑-तिकडच॑ adj  of various unspecified places. इक्कडच॑-तिक्कडच॑. इक्कडल॑-तिक्कडल॑. एथेल॑-तथेल॑. यथेल॑-तथेल॑. इथेले-तथेल॑ (कोण्त॑ म्हणून व्यक्त करनाते) ; इकडचातिकडचा in sm. uis  तुम्ही काय केलांत, हे मला व्यक्त होऊन सांगा. उगे एकडच॑-तिकडच॑ गोष्ट काढून प्रयोजन नाही.

इकडून adv  from here. इक्कडून. एथून. एथसून. यथून. यथसून. इथून. इथसून. uis इकडून तुम्च गांम कित्ति दूर आहे ?

इकडून-तिकडून adv  from various unspecified places. इक्कडून-तिक्कडून. इक्कडसून-तिक्कडसून. व्यक्त होऊन सांगनाते वेगळ॑-वेगळ॑ ठामांतून (ठामांतसून). कोण्त॑ म्हणून व्यक्त करनाते वेगळ॑-वेगळ॑ ठिकाणांतून (ठिकाणांतसून/ठामांतसून/ठावांतसून) uis तला एक निश्चय काम काईं नाही. इकडून-तिकडून काय काम मिळतकी ते करून काळ खांडत आहे.

इकडे adv  here. this side. in this place. इक्कडे. हे ठिकाणि. हे ठामि. हे ठावीं. हे बाजू. एथे. यथे. इथे. uis मला हे पेटि उचलाला होत नाही. इकड येऊन मला थोड सहाय करशीलका ?

इकडे-तिकडे adv  hither and thither. इक्कडे-तिक्कडे. एथे-तथे. यथे-तथे. इथे-तथे. uis उकलून सोडलते घाडवास्क॑ तो इकड॑-तिकड॑ हिंडत आहे.

इच्छा n  wish. desire. आग्रह॑. अवड. इष्ट. uis मी सांगाच सांगणे झाल॑. इत्तिपर काय करतोस्की ते तुज इच्छा प्रकार करींग॑.

इच्छाप्रकार॑ adv  as per one's wish. इष्ट प्रकार. इच्छासार्ख. uis तज वागणे थोडकीन बर॑ नाही. इच्छाप्रकार तला सोडलतर॑ कंडिप तो अवघड होणारच.

इच्छाशक्ती n  will power. मनशक्ती. मनाच बळ. मनोबळ. uis जीवनांत॑  कठिन विषय काहीं करून दाखिवाम म्हणजे आंगाच श्रम मात्र नोहो, इच्छाशक्ती पणीन असलतरेच होईल.

इच्छासार्ख adv  as per one's wish. इष्ट प्रकार. इच्छाप्रकार॑. uis मला हे विषयांत॑ अभिप्रय काहीं नाही. तुम्च इच्छासार्ख करींगा.

इटीदंडा n  a type of play with two sticks, one about one foot long and the other about six inches. दोन ल्हान काठीनीशी खेळाच एक विधाच खेळ. गिल्लि-दंडा ; इटीदांडू in sm. uis ल्हान पोरे ईटीदंडा खेळताना फार जागृतान असणे चोखोट, कां म्हणजे त्यांतल॑ ल्हान काठी डोळेला लागून घाव होयाच साध्यता आहे. 

इडिकि n  tongs used in the kitchen. चिमटा. Note :- from Tamil. uis तावलते दूधाच पात्र चूलींतून उतरिवताना इडिकि उपयोग करून उचलून काढनास्क॑, हातांत मिळ्ळते एक चूर कागद मुजलून भांडी उतरिवाला पाह्यलों अणी पात्र चुकून कढलते दूध मझ॑ हात अणी बोटाला लागून लासले.   

इड्ळगे n  idli. steamed dumpling of rice and black gram flour. इड्ळि. इळ्ळगे. इड्ळे. Note :- (1) The earliest reference to the word "इड्डलिगे" is found in Vaddaradhane, the Kannada work of Sivakoti Acharya in 920 AD and probably also used by the ancestors of TMs and since then this archaic word seems to have vanished from Kannada and Marathi. इड्ळगे, इळ्ळगे and इड्ळे appear to be morphed forms of इड्डलिगे. (2) see http://www.deccanherald.com/content/490030/kitchen-chronicles.html for earliest ref to idli.

इड्ळे n  idli. steamed dumpling of rice and black gram flour. इड्ळि (Tamil). इड्ळगे. इळ्ळगे. uis  दक्षिणी मराठींत॑ इड्ळिला इड्ळे, इड्ळगे अणी इळ्ळगे अस॑ पणीं म्हणणे आहे.

इड्ळि n  idli. steamed dumpling of rice and black gram flour. इड्ळगे. इळ्ळगे. इड्ळे. तांदूळाच पीटीं उडिदाच पीटीं मिळिवून केलते एक खायाच पदार्थ. uis नुस्त तमिलनाडांत॑ मात्र न्हो, पूरा भारतांत॑ इड्ळि-सांभार प्रसिद्ध झालाहे.

इतक॑ adj so much. एवढ॑. Note:- इतका in sm. uis एतक॑ वेळ होऊन आलासकी, बंडी तम्हाच निघून गेल॑.

इतकूस्क॑ collo very little. उदंड थोडक॑. उदंड नंखर॑. एवढूस्क॑ . Note:- from इतक॑ uis खीर फार बेष आहेतरीन मला इतकूस्क॑ वाढलर पुरे.

इतपर adv  here afterward. अण्खि पसून. अत्ता पसून ; इत:पर in sm. uis  पाकिस्थानाच परिस्थिति एवढ॑ मोस॑ झालाहे म्हणजे, इतपर ते राज्याला काय होयाला जात की, हे कोणालीं सांगाला होईना.

इतिहास n  history. चरित्र. uis  (1) भारताच इतिहास सुमार पांच हदार वर्षा पुढेच, म्हण्जे, मोहन-ज-दारो, हरप्पा संस्कृतीच वेळांत आरंभ झाले म्हणूया. (2) मुंबाईच सात द्वीपीन पोर्तुगीस राजकुमारि कातरीन अणी इंग्ळीष राजा चार्ळ्स हेंच वराडाच वेळ चार्ळ्स यांस॑ वरदक्षिणा होऊन मिळ्ल॑, अस॑ इतिहास सांगत॑.

इथून adv  from here. इकडून. येथून. एथून. uis इथून चेन्नै सुमार तीनशे-वीस किलोमीटर दूर आहे.

इथे adv  here. इकड॑. हे ठिकाणी. येथे. एथे. uis  मला पाह्मे म्हण्जे दोन दिवसाच आंत॑ इथे येम॑. कां म्हण्जे, तज नंतर॑ मी गांवाला जाईन.

इथे-तथे adv  hither and thither. इकडे-तिकडे. यथे-तथे. एथे-तथे. uis हे जवळ सोनाराच दुकानांतून अमच॑ नाताच उजलादिवसाला म्हणून घेट्लते कांकण आणी लोलक कोठकी ठिवूनटाकून तीन चार दिवस इथे-तथे हुडुकून मिळापर्यंतीन तरपडूनगेलों.     
   
इनाम n  grant of land given in perpetuity. परंपरा-परंपराला जमीनाच व॑र असाच अधिकार. uis जुने काळांत॑ थोर-थोर देऊळांला इनाम होऊन मिळ्लते जमीन पूरा, भारताच स्वातंत्र्याच नंतर॑ सरकार वापस घेटलतांमुळे, अत्ता हे देऊळांला जुने सार्ख आदाय काहीं येत नाही.
   
इनामदार n  holder of an inam grant in perpetuity. इनामाच अधिकार मिळ्लते मनुष. uis भारताच स्वातंत्र्य झालानंतर॑ सरकार जमीनदारी संप्रदाय रद्द करले अणी तेमळे तम्हापसून जमीनदार, जागीरदार इनामदार असलते अग्गीन बंध झाल॑.

इप्पा n  madhuk tree. इप्पि. इप्पीच झाड. इलिप्पै (Tamil). Note :- oil extracted from the seeds of this tree is considered sacred for Lord Siva. It is used during Navarathi for lighting the sacred lamps to the goddess. It is called म्होंव in SM and इप्पे in Kannada.

इप्पि n  madhuk tree. इप्पा. इप्पीच झाड. इलिप्पै (Tamil). Note :- oil extracted from the seeds of this tree is considered sacred for Lord Siva. It is used during Navarathi for lighting the sacred lamps to the goddess. It is called म्होंव in SM and इप्पे in Kannada.

इप्पीच तेल n  the oil extracted seeds of the madhuk tree. इप्पीच झाडाच बींतून काढाच तेल. Note :- the oil is considered sacred for Lord Siva. It is used during Navarathi for lighting the sacred lamps to the goddess. It is called म्होंवाच तेल in SM and इलिप्पै एण्णै in Tamil.
 
इमाम n  a Moslem priest. इस्लामाच धर्मगुरु. uis शबरिमला देवस्थानाला जायाच वाटेंत फार जुने काळांत जिवंत होतते वावर म्हणाच मुसलमान इमाम ह्यंच एक मशीद आहे अणी ते दर्शन करलांपिरीच भक्तजन अय्यप्पस्वामीच देऊळाला जायाच॑. 

इळ्ळगे n  idli. steamed dumpling of rice and black gram flour. इड्ळे. इड्ळि. uis इळ्ळगे, इड्ळगे, इड्ळि, इड्ळे हे गोष्ट अग्गीन वेगळ॑ वेगळ॑  दिसते तरीन खायाच पदार्थ मात्र एकच॑, म्हणजे इड्ळीच॑ !

इषोब n  mathematics. हिषोब. गणितशास्त्र ; हिशेब/हिशोब in sm. Note:- इषोब is the under emphasized form of the correct हिषोब. uis  (1) श्रीनिवास रामानुजन इषोब शास्त्रांत॑ अपार बुधिवंत होते. (2) साळेंत वाचाच वेळी मला उजंड अवडलते विषय इषोब होत॑.

इषोब n  accounts. हिषोब. पैसाच विषय. पैसा खर्च केलतीं पैसा आलतीं लिव्हून ठिवणे ; हिशेब/हिशोब in sm. Note:- इषोब is the under emphasized form of the correct हिषोब. uis इषोबाच गोळमाळ करून पैसा गिळला म्हणून हे जवळ॑ मझ॑ आफीसांत॑ एक थोर अधिकारीला कामांतून काढूनटाकले.

इषोबाच adj  measured. restrained. हिषोबाच. आवश्याच तेवढेच. आवश्याजोक्ताच. नियंत्रणांतल॑. Note:- इषोबाच is the under emphasized form of the correct हिषोबाच. uis तेनी उजंड मानमर्यादाच मनुष मात्र नहो, बोलतांपणीं इषोबांतेच बोलतील॑.

इष्ट n  desire. आग्रह. इच्छा. अवड. uis ते गामाला जाऊनच सराम॑ अस॑ निर्बंध काहीं नाही. तुला इष्ट नाहीतर॑ जाणे नको.

इष्ट adj  desired. liked. अवडलते. uis (1) मनाला इष्ट झालते काम करून पैसा संपादून जीवन चालिवाच लोके अदृष्टवंत म्हणूनच सांगाम॑. (2) पितृपक्षाच वेळी पिंड ठिवताना इष्ट मित्रांस पणीन ठिवणे आहे. 

इष्टदेवता n  a God worshiped in a special one-to-one basis. एकांच प्रत्येक देव. uis पोणावांटादनासीन इष्टदेवता अणी कुलदेवता हे दोनीन एकच असत॑.

इष्टपत्नि n  a wife dear to heart. प्रीयपत्नि. uis होमपूजा वगैरा करताना इष्टपत्नि समेत होमकुंडाला आहूती देणे आहे.

इष्टमित्र n  a bosom friend. well liked friend. प्रीयमित्र. uis पितृपक्षाच वेळी पिंड ठिवताना इष्टमित्रांस पणीन ठिवणे आहे म्हणून असलतरीन, प्रतिवेळीन अमच॑ आचारे सांगतील॑, अमच॑ वर्गाच मित्रांस मात्र पिंड ठिवाम म्हणून.   

इष्टिका n  burnt brick. ईट. विटकर. वीट. भिंत/घर बांधाला उपयोग कराच जळून काढलते मात्तीच साधन॑. uis जुने काळांत घरांत होम कराम म्हणून असलतर॑, भोईंत वाळू पसरून तजव॑र इष्टिका ठिवून होमकुंड करत होते तरीन अत्ताअग्गीन लोखुंडाच होमकुंड उपयोग करणे आरंभ झालाहे. 

इसवी adj  Christian. क्रिस्तु धर्माच (मताच). uis भारताच उत्तर-पूर्वांतीन केरळ राज्यांतीन इसवींच लोके जास्ति आहेत॑. 

इसवी n  the Christian era. इसवी शक. uis इसवी 1947 वर्षी भारत स्वतंत्र झाल॑.

इस्त्रि n  ironing. कुसकुरून असलते कापड इस्त्रिपेटि उपयोग करून बरोर करणे. uis थोड पाणी वरून शिंपडून इस्त्रि केलतर॑ कुस्करून असाच कापड नीट होईल.       

इस्त्रिपेटि n  ironing box. इस्त्रि कराला उपयोग कराच पेटि. uis जुने काळांत॑ इस्त्रिचपेटि कोळसाच विस्तूंतून ऊन करत होते.

इस्तिफा n  resignation. राजिनामा. काम सोडणे. uis जुने काळांत॑ एक उद्योगांतून इस्तिफा द्याला लोक भींगतील॑. अत्ता नव जनरेषनाच पोरां प्रकार॑ कोणतरीन एक उद्योगांतून दोन तीन वर्षांच आंत॑ इस्तिफा देल नाहीतर॑, तला षाणपण॑ उणे आहे, अस॑ म्हणींगाम॑ !

इहलोक n  this world, as opposed to the other world. हे लोक. परलोकाच विरुद्ध॑ लोक. मृत्युलोक. uis  इहलोक वासांत॑ असाजोरी देवावर भक्ति असलतर॑ पुढे याच जन्मांत॑ चोखोट कर्माच अनुभव अम्हाला मिळेल॑.

इंदिरा n  Goddess Lakshmi. Goddess of wealth. लक्ष्मि देवी. uis इंदिरा म्हणून लक्ष्मीदेवीला उद्देश करून सांगताना ते गोष्टाच अर्थ आहे "ऐश्वर्य, वैभव".   
 
इंदु  n  Moon. चंद्र. सोम. uis इंदु म्हणाच गोष्टाच अर्थ आहे, "झळकाच बिंदु".

इंद्र n  Indra. king of gods. देवेंद्र. देवांच राजा. uis ऋगवेदाच काळांत इंद्र एक मुख्य देव होते तरीन नंतर॑ ते अग्र स्थान विष्णु अणी महादेव स्वाधीन करले.   

इंद्रजाल॑ n  magic. जादू. uis  हाताच चतुरपण॑ अणी पाहणारांच॑ मनोभावाच वर कराच तंत्र प्रयोग, हे दोनीनच इंद्रजालाच मुख्य आधार॑. 

इंद्रधनुष॑ n  rain bow. पाऊसाच वेळी सूर्य किरण तज व॑र पडून आकाशांत॑ दिसाच धनुषाच रूप. uis  इंद्रधनुष भूमीला शिवाच स्थळांत॑ सोनेच घागर असेल॑, अस॑ पश्चिम देशांच लोककथांत आहे.

इंद्रनील॑ n  sapphire. एक रीतीच खडा. uis आफ्रिका भूखंडाच बाजू असाच मडगास्कर द्वीप इंद्रनील उत्पाद कराच देशांत सगळ्याचीन पक्षा अग्र स्थानांत आहे.

इंद्रिय n  senses. the faculty by which external objects are detected. ऐकणे, रूच, वास, स्पर्श, दृष्टि हे पांचांचीन अनुभव द्याच शक्ति. uis  इंद्रीयांच वर  नियंत्रण असणांरांच वर बाहेरच अनावश्य आकर्षणाच परिणाम कद्दीहीं होयना.

इंद्रिय n  the five sense organs. श्रवण (ऐकणे), स्वाद (रूच), वास, स्पर्श, दृश्य (दृष्टि) हे पांचांचीन अनुभव द्याच शरीराच भाग, म्हणजे, कान, जीव्ह॑, नाक, चर्म अणि डोळे हे पांच भाग. uis पांच इंद्रियहीं नियंत्रणांत ठिवून समानवृत्तीच स्थिती आश्रय करणे फार उत्तम लक्ष्य आहे.   

इंधन n  fuel. जळाला सहाय कराच साधन॑. जळण. uis  पुनर उत्पादन होयनाते इंधन, म्हणजे, लांकड॑, कोळसा, पेट्रोळ, गॅस असल॑ इंधन उपयोग करून-करून पुढे याच शतकांत॑ भयंकर प्रश्न होयनास्क॑ असाम॑ म्हण्जे अणुशक्ति, वायुशक्ति , तसेच, सूर्य प्रकाशाच शक्ति असलत्यांतून विद्युतशक्ति कित्ति जास्तीच जास्ति कराला होईलकी तेवढ॑ करूनच सराम॑.   





ई  the fourth vowel and the fourth  letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच चौथ॑ स्वर॑.

ईट n  burnt brick. वीट. विटकर. इष्टिका. uis भट्टींत (चुलांत) कराच मातीच ईटाच बदिल अत्ता अग्गीन सिमेंटांत कराच हॉलो-ब्रिक उपयोगांत आलाहे. 

ईड n  a type of citrus tree and fruit thereof. लिंबुस्क॑ एक झाडीं तज पंडुईं. uis ईडाच लोणचे खायाला थोड कडू असेल॑. uis ईडाच लोणचे कित्येकदपा थोडक कडू असेलतरीन तज रूच मला उदंड अवडेल॑.

ईद n  a Mohammedan festival. मुसलमानांच सण॑. uis वर्षा-वर्षी तुरकडांच ईद अणी अम्च॑ गणेश-चतुर्थी हे दोन सणीन सुमार एकच दिवसी यामळे अमच॑ मिरविणकी (मिरवणूक) मुसलमान लोके अधीक होऊन राह्याच वाटे गेलतरे धोंडा-माराच अक्रम होईल म्हणून पोलीस बंदोबस्ताच व्यवस्था केम्हाहीन असते. 

ईश्वर n  God. देव. भगवान. uis ईश्वर म्हणाच गोष्टाच अर्थ भगवान अस॑ असलतरीन, सर्वसाधारण होऊन शिवाला उद्देश करून सांगाच गोष्ट झालाहे हे.

ईश्वर n Lord Siva. महादेव. भगवान शंकर. uis शिवरात्रीच सणांत अम्ही पूरा रात्री जागे असून ईश्वराच पूज वगैर करत असतों.

ईश्वरकृपा n  divine favour. देवाच दया. uis अमच॑ सामर्थ्यामळे अम्ही सगळीन करींगट्लों म्हणून मनांत॑ असलतरे तजपक्षा मूर्खपण॑ वेगळे कोण्तीन नाही, कारण ईश्वरकृपा नाहीस्क॑ अम्हाला काहीनच कराला होईना.

ईश्वरभक्ती n  worship of God. देवाच वर असाच भक्ती. uis आध्यात्मिक विषयांत ईश्वरभक्तीच बरीस वेगळे कोण्तीन नाही.

ईश्वरी n  goddess Parvathi. पार्वती देवी. uis हिमावत पर्वताच लेंक म्हणून ईश्वरीला पार्वती देवी म्हणून नाव आल॑.

ईश्वरी n  a female divinity. शक्ती. भगवती. uis केरळ संस्थानांत कोठ पाह्यलतरीन भगवती क्षेत्र असते अणी कोण्त देवीला पूजा करतात तिकडे म्हणून लोकांस विचारलतर॑ सांगतील॑ ते ईशरीच देऊळ म्हणून.

ईं conj  a conjunction indicating inclusiveness. हीं. नि. Note:- as in तेईं (तेहीं) meaning 'that also'.





उ  the fifth vowel and the fifth  letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच पांचवां स्वर॑.

उकडणे vi  to be sultry. उष्ण होणे. uis  गेल एक वारापसून ऊन उदंड जास्ति झालाहे. अण्कीन अस॑ उकडत असलतर॑ एक एर-कंडीष्णर घेऊनच सराम॑ वाटत॑.

उकड-तांदूळ n  par-boiled rice. उक्कड-तांदूळ. हलक॑ होऊन कोंडानीशी शिजिवून काढलते साळी. uis नुस्त तांदूळांत॑ कराच पक्षा उकड-तांदूळांत इड्ळी केलतर॑ बेष मौ (मऊ) होऊन येईल॑.

उकडून भाजणे fig  to feel the oppressive sultriness of the Sun's heat. ऊभाच फार तंटा होणे. uis बांगळूराच हायशी असाच वातावरणांत एवढ॑ दिवस राहलांपिरी चेन्नैला जायाला मला भें वाटते. रात्रीं-दिवसीं तिकड उकडून भाजत अस्त॑.
 
उकरणे vt  to scratch or scrape with a slight incision. खाजिवून काढणे. uis  ते लेंकरूला पांयेंच फोड येऊन दहा दिवस झालतरीन अण्खीन वाळल॑ नाही. केम्हाहीन फोडाला उकरून-उकरून वाळाला सोडतच नाही. 

उकरून काढणे id  to provoke or dig out a fight. आवश्य नाहीस्क॑ एक भांडणे आरंभ करणे. uis बाजू घरच॑ नव॑ सून एक चोखोट पोरी झालतरीन तिज सासू सदा तिला सळिवून भांडणे उकरून काढाला पाह्त असते.

उकलणे vt  to untie. to unpack. बांधलते उघडणे. uis  दुकानांतून मी साखर॑ घेऊन आणलों की नाही, मझ॑ नातू ते पोट्लम समच उकलून साखर॑ पूरा खाले सांडला.

उकलून सोडलत॑ गाढव say  a person who has been let loose to his own wayward and irregular ways. अवघड वाटेला सोडलत॑ मनुष. uis ल्हान वये पसून तज बाप माय तला बरोर वाढिवल॑ नाही म्हणून अत्ता एक उकलून सोडलत॑ गाढवास्क॑ हिंडत पडलाहे.     

उक्कड-तांदूळ n  parboiled rice.  rice that has been partially boiled in the husk. उकड-तांदूळ. कोंडानिशी अर्ध शिजिवून काढलते साळी. uis उक्कड-तांदूळीन हिरव॑ तांदूळीन मिळिवून रुब्बलते पीठांत इळ्ळग॑ करलतर॑ ते बेष मौ (मऊ) येईल. 

उक्कड-बसणे vt  to squat with both feet touching the floor. पांयतळ दोनीं जमीनाला/भोईंला ठिऊन गुडिघा मुजलून खाले बसणे ; उकिडवा/उकुडवा-बसणे in sm. uis उक्कडबसून जेवताने म्हणतील. कारण, ते लक्ष्मी देवीला अपमान केलास्क॑ होत॑ म्हणून.

उक्काडा n  sultriness. humid heat. उष्ण. ऊब. उबारा. uis उन्हाळाच महिनेंत॑ चेन्नैंत॑ सोसाला होईनाते एवढ॑ उक्काडा असत॑. समुद्राच जवळच ओल॑ वारामळ॑ असूया ते.

उखळ n  a stone mortar for pounding rice, spices etc. उसळांत॑ साळी, धान्य/धान असल॑ पदार्थ कांडाच धोंडाच साधन॑. उरळ (Tamil). uis समीपांतपणीं एक ल्हान गावांला गेलस्ताना उखळांत साळी कांडाच मी पाह्यलों.

उगणे vi  to bloom. (फूल)विकास होणे. मोहरणे ; उगवणें in sm. uis  कीडा चावून हाळ होयनास्क॑ असाला मोहर॑ उगाच पुढेच अंबाच झाडाला वेळा-वेळी ओखद बडिवणे आहे.

उगणे vi  to come forth (as when the day breaks ). प्रत्यक्ष होणे ; उगवणें in sm. uis दिवस उगतानच अवसर॑-अवसरांत॑ स्नान वगैरा करून लोक्कुर-लोक्कुर पल्हार खाऊन रेल-वे स्टेषनाला पळून गेल नाहीतर॑ मला ऑफीसाला बरोरल॑ वेळाला जाऊन पावाला होईना.

उगणे vi  to come forth (as when the sun rises). प्रत्यक्ष होणे ; उगवणें in sm. uis पाष्टे पाष्टे दिवस उगताना बागांत चालाल जाणे आरोग्याला चोखोट म्हणतील, कारण ते समयांत बागांतल॑ वारेंत ऑक्सिजन भरून असेल॑ म्हणून.       

उगे adv  simply. नुस्त तसच. uis मला तुम्च घराला हे अयितवार याच उद्धेश आहे. काहीं नाही, उगे तसच !

उगे adv  without a purpose. आवश्य नाहीस्क॑. उद्धेश नाहीस्क॑. uis मी ओफीसाल जायाच अवसरांत॑ तो मझकडे उगे बोलून मझ वेळ हाळ केला.

उगे adv  still. without moving. हलनास्क॑. uis (1) मला तो उगे बसाला सोडना. कायतरीन काम सांगत असल॑. (2) कुत्र चावाला येताना अम्ही पळनास्क॑ उगे असणेच चोखोट.

उगे adv  at rest. at ease. idly. आराम होऊन. uis पार्कांत॑ उगे बसाला मला उदंड अवडल॑.

उगे adv  silently. श्ब्द नाहीस्क॑. uis साळेंत॑ पोरे फार गलाटा करत होते. पण, पंतोजीला पाव्हूहून उगे झाल॑. 
 
उगे adv  without reason, need, cause, grounds etc. कारण नाहीस्क॑. uis उगे मला तंटा कर नको.

उगे adv  free (without charging). पैसा घेनास्क॑. uis हे अंगी दुकानवाला मला उगे देला.
 
उगे adv  without working or doing. काहीं करनास्क॑. uis उगे बसल॑ तर कोण्हीं तुम्हाला परवा करनात॑.
 
उगे adv  without speaking. बोलनास्क॑. uis मी तिला हाक्कामारताना तिन॑ उगे बसल होती.

उगे adv  without a profession or business. काम नाहीस्क॑. स्वस्थ. रिकाम. uis रिटैर झाला नंतर मी अत्ता उगे बसलाहें.

उगे-उगे adv  simply. just like that. नुस्त तसच. uis उगे-उगे लटक॑ बोल नको.

उगेच adv  for no reason. उगोच. कारण नाहीस्क॑ ;  उगीच/उगाच in sm. Note:- all meanings of उगे given here would apply contextually in the adjective form of the word also. uis तू घरांत असतोस म्हणजे तुला पाह्याला हेतों. विशेष काहीं नाही, उगेच.   

उगादि n  new year. गुढी पाडवा. uis उगादी सणाच दिवसी घराच बाह्येर गुढी बांधाच दंडक आहे.

उगोच adv  for no reason. उगेच. कारण नाहीस्क॑ ;  उगीच/उगाच in sm. uis जातां येतां उगोच तिला मष्किरी करत असतो तो.

उग्र adj  ferocious. भयंकर. uis  हिरण्यकशिपूला वध करून भयंकर आवेशांत॑ होतते नरसिंह देवाच उग्र रूप शांत कराला प्रह्ळादाला विना वेगळ॑ कोणालीन झाल॑ नाही.

उग्राणाच खोली n  store room. संपाकाच साधन (सामग्री) दत्तन ठिवाच खोली. uis जुने काळांत एक-एक घरांतीन उग्राणाच खोली होते, पण तज विषयीन अत्ता योचना करताना तज आवश्य होतका म्हणून वाटते.   

उघडणे vt  to open. उघडणे. uis मोट्ठ॑ वार॑-पाऊस येताना खिडकी उघड॑ ठिवलतर॑ कंडिप होऊन खोलीच आंत॑ पाणी बडिवल॑.
 
उघडणे vt  to remove the cover. झांकून असलते उघडणे. uis साखरेच डब्बि उघड ठिवतर॑ मुंग्या येणेंत॑ अतिशय काहीं नाही.

उघड॑ adj  bare. naked. आंगाच व॑र कापड नाहीस्क॑ असणे ; उघडा in sm. uis हिंवाळाच कळांत॑ उघड आंगांत॑ असलतर॑ मला निश्चय होऊन पडसा येईल.

उघड॑ adj  of transparent (intentions etc). स्वच्छ (उद्देश etc). uis आजूबाजूच देशाच बरोर पाकिस्थानाच वागणे उघड॑ नाही म्हणून भारताच सांगण॑ अत्ता-अत्ता अमेरिकाला कळत येत आहे.

उघड॑ adj open (land, space, things etc). उधड॑ स्थल, ठिकाण, साधन॑. मोकळ॑.  uis अम्ही ल्हान असताना अम्च अम्मा घरच॑ मोट्टे-माडींत॑ उघड॑ ठिकाणी वडाम वाळिवाला घालून, ते कावळा काढींगून जायनास्क॑ असाला अम्हाला बसिवत होते.

उचका n  hiccup. उचकी. गोचका. गुचकी. पोटांतूं आरंभ होऊन गळांतून अपाप एकदम याच एक शब्द. uis उचकाला शांत कराला एक चूळ (घांस) पाणी सात दपा थोड थोड गिळून पीलतर॑ पुरे अस॑ सांगणे आहे.

उचकी n  hiccup. उचका. गोचका. गुचकी. uis चूळ भरींगून पाणी सात दपा थोडक थोडक॑ गिळलतर॑ उचकी राह्यील॑ म्हणतात॑. 

उचटणे vt  to detach (anything stuck or fixed).  (चिकटून, अथवा, घट्टि धरून असाच वस्तूला) उकरून काढणे. uis धिरडे उचटून काढला नंतर तवाच बुडांत चिकटून असाच करपलते पीट खायाला मला उदंड अवडल॑.

उचटणी n  a wooden or iron ladle with a flat end used for turning around a dosa being  cooked on a hot-plate. तवांत॑ धिरडे परतिवाला उपयोग कराच पळी सार्खल॑ एक उपकरण॑. हेज एक अग्र चपटा अस्त॑. uis टेफलोन लिंपलत॑ तवांत॑ धिरडेला उचटणींतून परतिवून घालताना धिरडे निसरून चूलीच व॑र पडाला साध्य आहे म्हणून दत्तन असांव॑. 

उचलणे vt & vi  to lift up. वर करणे. uis मादसूळांत॑ अवस्था भोगत होतों ते मुळे मला ट्रैनांत॑ सामान उचलून व॑र ठिवाला झाल नाही. 

उचलून घालणे fig  to be shocked by sudden nasty surprise. एकदम भेहीं आश्चर्यहीं होणे. uis उदंड दिवसा पसून आंगाला बर॑ होत नाही म्हणून मला कळ्ल॑ होत तरीन तज रोडे झालते आंग पाव्हून मला उचलून घाट्ल॑. तो एवढ॑ मोस॑ झालाहे म्हणून मला विश्वास करालच झाल नाही.

उचित adj  proper. योग्य. uis अम्हाला एक विष्याच विषयीन बरोर कळनातर॑, तजव॑र चर्चा होत असताना तोंड झांकींगून उगे बसणे उचित.

उच्चार n  pronunciation. बोलाच रीती. uis तंजावूर मराठी बोलणरांच उच्चारांत॑ तमिलाच शैली फार मिळून आहे तरीन ते बरोर कराला कोणीं प्रयत्न करास्क॑ मला दिसत नाही.

उच्चारणे vt  to utter. to pronounce. बोलून कळिवणे. uis दक्षिणी मराठी लोके त्यंच भाषा बोलताना महाराष्ट्राच लोकांस ते बरोर समजनात्याला एक मुख्य कारण बोलाच रीती, म्हणजे उचारणे विचित्रविणी कानांत पडते  म्हणाचच॑. 

उच्छिष्ट adj  tasted food. उष्ट केलते पदार्थ. उष्ट॑.  uis येतान येतान मला कोण्त होटलांतीन जायाला अवडना, कारण तिकडल॑ पदार्था उच्छिष्टका नाहीका म्हणून सांगाला होईना.

उच्छिष्ट n  a person who mixes up remains of a food partly taken with fresh food. उष्ट-खरकट पाह्यनाते लोक॑. uis  हे काळाच पोर-पोरींला उष्ट-खरकट काय म्हणून कळत नाही. असल॑ उच्छिष्ट लोक खालते ताटांत उरलते पदार्थ बाकी खरकटा बरोर मिळवून "रेफ़्रिजिरेटरांत" ठिवतात॑.

उजव॑ adj  right side. उजवीकडे ;  उजवा in sm. uis "राम निवासांत॑" अम्च घर सहावां माडींत॑ उजव॑ पटीसांत॑  आहे.

उजणे vt  to be born. जन्म होणे. उदणे ; उपजणे in sm. uis मांदराच पिल्लू उजून सात आठ दिवसा नंतरच दोळे उघडल॑.

उजलादिवस n  birth day. उजलते दिवस. उदलादिवस. जन्म झालते दिवस. uis अम्च नातू जनुवरी पहिले दिवस उजला ते करतां, तज उजलादिवस कोणालीन विसराला होईना.

उजळ॑ adj  fair. bright. light complexioned. पाह्याला बेष गोर॑ असाच॑. uis पोरे सावळे असल तरीन, तेनाला येणार नवरी उजळ॑ असाम म्हणून आशा भोगतात॑.

उजंड॑ adj  plenty. उदंड॑. भरून. फार. uis  भारताच संस्कृति उदंड॑ पुरातन आहे. पांच हदार वर्षाच पुढ॑ मोहन-ज-दारो, हडप्पा असल॑ ठिकाणांतून खोदून काढलते पुरावस्तांतून हे अम्हाला कळते.

उजंड॑ adj  much. उदंड॑. भरून. फार. uis मी ल्हान असताना मझ॑ बापाकडून उदंड मार खालोहें.

उजंड॑ adj  abundant. plenty. very much. उदंड॑. भरून. फार. uis हे वर्ष अंबाच झाडांत॑ उदंड फूल॑ सोडलाहे.

उजा adv  tomorrow. उद्या. uis उद्या म्हणाच गोष्ट भरून दक्षिणी मराठी लोके उजा म्हणून उच्चारण करतात॑, पण हेजांत चूक काहीं नाही, कां म्हणजे द अणी ज हे दोन शब्दीन एकालेक बदलिवून उच्चार कराच दंडक यांस आहे.   

उजाड n  brightness. light. प्रकाश. दिवा ; उजेड in sm. uis चोक्कोट उजाड असाच ठिकाणी रोवलतरच॑  झाड बरोर वाढल॑. Note:- उजाड in sm means desolate, barren.

उजिवणे vt  to give birth to. to procreate. जन्म देणे. Note:- उजवणे/उजविणे in sm means (1) 'to get one married' and (2) 'to attain safe deliverance'. uis बरोरल॑ समयांत, म्हणजे चाळीस वार झाल नंतर॑ नैसर्गीक होवून लेंकरू उजणेच चोखोट म्हणतात॑, कारण सिसेरियन ऑपरेशन करून वेळाच पुढे उजिवलतर॑ नंतर॑ उजाच लेंकरांसपणीन तसच सिसेरियन करून उजिवामते पडेल॑. 

उठणे vi  to get up. to stand up. बसाच स्थितींतून ओठाकणे/होठाकणे. uis गुडिगा/गुडघा सूळामुळे, मला खाले बसलतर॑ लोक्कर उठाला होयना. काय तरीन धरींगून हळ्ळु उठालच होईल॑. Note:- the word ओठाकणे/होठाकणे  appears to have either become extinct in sm, or it was never used in sm. The root may be उठणे, 'to stand up'. 

उठणे vi  to wake up from sleep. झोंपींतूं जागणे. uis पाष्टे सहा घंटेच पुढ॑ उठाला मला होईनाच होईना.

उठणे-बसणे id  to behave in a very humble or servile manner. स्वंत॑ अभिमान नाहीस्क॑ वागणे. uis जयललिता राज्य करताना तिज खाले काम करत होतते मंत्रीलोक तिज आज्ञा ऐकून उठणे-बसणे कराच विषयांत थोडकपणीन लाज नाहीस्क परस्पर सामर्थ्य दाखिवाच दृश्य प्हाऊन अम्हालाच कंटाळा येत होत॑.

उठतांबसतां adv  at each and every stage. एक एक स्थितींतीन. एक एक वेळीं ; उठताबसता in sm. uis उठतांबसतां अग्गिदनालीन कायतरीन आज्ञा देत असाच एक वंगळ॑ स्वभाव तिला आहे. 

उठिवणे vt  to cause to get up or stand up. उठिवणे. उठविणे/उठवणे in sm. uis त्यंच घरच॑ कुत्र सदाहीं टीवीच समोरल॑ सेट्टींतेच निजून पडलसेल॑. तिकिडून तला उठिवणे म्हणजे ब्रह्मप्रयत्न करलतरीन होईना.

उठिवणे vt  to wake someone up from sleep. झोंपींतूं जागिवणे. uis झोंपींतून दिडीरशी उठिवलतर॑ लेंकरे रडणे साधारणच.

उठून ओठाकणे vi  to stand up. बसाच॑ स्थितींतूं ओ(हो)ठाकणे. उठून ओ(हो)ठाकणे. uis घराला कोणतरीन अतिथीलोके आलतरे उठून-ओठाकून त्यांस स्वागत कराच दंडक अम्हास आहे.
 
उठून होठाकणे vi  to stand up. बसाच॑ स्थितींतूं हो(ओ)ठाकणे. उठून हो(ओ)ठाकणे. uis बसलते ठामी बसींगून अग्गिदनालीन आज्ञा देत होतते मनुषाला उठून होठाक म्हणून सांगून दोन रपाट देलों मी.

उठून बसणे id  a dormant thing becoming active again. re-emergence (of a situation). (एक कार्य) पुन्हा प्रत्यक्ष होणे. (एक कार्य) पुन्हा व॑र येणे. uis हैदराबादांत तेलेंगाणा विषय पुन्हा उठून बसलाहे. एकपठीस श्री कृष्णा कमीषण त्यंच रिपोर्टांत काय लिवणार की अम्हाला कळना. अण्खीएक पठीस 'गद्दर' (नाक्सलैट लोकाना प्रेरणा देणार) त्यंच नव पार्टी आरंभ केलाहे अणी त्यंच मुख्य उद्देश 'तेलेंगाणा' स्थापना कराचच॑.

उडणे vi  to fly. आकाशांत॑ संचार करणे. हुडणे. uis नव॑ होऊन अंडा तोडून बाह्येर आलते पक्षींला उडणे समेच येईना, पण थोड दिवस झालांपिरी येईल॑.

उडिमारणे vt  to leap. to jump. हुडिमारणे. uis दुपारच॑ झोंपीच वेळी इकडे तिकडे उडीमारून धिंगाणा करत होतते पोरांस बेष शिवा देवून त्यंच त्यंच घराला पाठिवूनटाकलों.

उडिवणे vt  to fly. आकाशांत॑ सोडणे. uis दुसरे पोरे पतंग आकाशांत॑ उडिवताना तज दोरा कापाला कित्येक वक्र बुद्धीच पोरे प्रयत्न करतील॑. हे कामाला तेन्ही मांजाच दोरा प्रयोग करणे आहे.

उडिवणे vt  to set off (an explosion). विस्फोट करणे. uis दीपावळीच सणांत॑ पटाकी उडिवणे म्हण्जे पोरांस॑ फार मजा येईल.

उडी n  a leap. a jump. हुडी. uis ट्रिपल-जंप (म्हणजे हॉप-स्टेप अंड जंप) हेजांत दोन उडी अणी एक लांब पाऊल असते. 

उडीद n  a type of pulse. एक रीताच धान्य/धान. uis  उडीदाच पीठाच बज्जि, नाहीतर॑, डांगर खायाला फार रूच अस्त॑.

उणाक adj  of inferior (value/price). उणे स्थितीच॑ ; उणाख in sm. uis पाकिस्थानाच स्थिती पाह्ताना अत्तचपक्षा उणाक स्थितीला जाऊन पावताना ते देशाला काय होईल म्हणून अम्हाला योचना करून पाह्याला पणीन होत नाही. 

उणीवता n  deficiency. imperfection. कम्मीपण॑ ; उणीव in sm. uis वज्राच तोड घेताना वज्राला उणीवता कायतरीन आहेका म्हणून बरोर पाह्यींगून घेणे चोखोट॑.

उणीवता n  derisive or disdainful attitude. चिरड॑. एळक्करम (Tamil). uis अरुणोदि उठून दंडक झालते लोकांला उशीर होऊन उठाच लोकांना पाह्यिलतर उणीवता अस्त॑.

उणे adj  deficient. wanting. scanty. less. कम्मि ; उणा in sm. uis गेल वर्षाच पक्षा हे वर्ष पाऊस उणे होत॑.

उणे adj  inferior (in value etc.). उणे ; उणा in sm. uis टाटा मोटर्साच एक लाख रुपेच बंडि घेणे कायकी उणे म्हणून कितिकी लोक म्हणींगतात॑.

उणे adj  lowly. उणे ; उणा in sm. uis  उणे जातीच लोकांला पुढे आणिवाला सरकार भरून कार्यक्रम आरंभ केलाहेत॑.

उणे adj  less. कम्मि ; उणा in sm. uis (1) मझ॑ लोंक सहा फुट उंच आहे. पण, अम्च लेंकीच उंच पांच फुट सहा इंचच ; म्हण्जे, तिन॑ तिज भाऊच पक्षा सहा इंच उणे आहे. (2) अत्ता हैदरबादांत॑ ऊन उदंड आहे. ते पाह्ताना बांगळूरांत॑ ऊन फार उणे म्हणूण सांगूया.

उणे n  failing. imperfection. उणीवता ; उणे in sm. uis तुम्च मनांत॑ तुम्च लोंक वाचणांत॑ उदंड षाणा (शाहणा) म्हणून वाटूया. पण, अम्च लोंकपणीं वाचणांत॑ उणे काहीं नाही.

उणे n  minus. एक संख्यांतून अण्खिएक संख्या कम्मि करणे ; उणे in sm. uis तो ल्हान पोर इषोबांत॑/हिषोबांत॑ उदंड षाणा (शाहणा). कित्ति थोर असाच दोन संख्या देलतरीन निमिषांत॑ एकांतून अण्खिएक उणे करून बरोरल॑ उत्तर देईल॑.

उणे-करणे vt  to reduce. कम्मि करणे. uis तो येतां-येतां विपरीत फुगत आहे. पथ्याच जेवण॑ करून जेड उणे-करींगणे तलाच चोक्कोट.

उणे-करणे vt  to subtract. एक अंकांतूं वेगळ॑ एक अंक काढणे. uis श्रद्धा म्हणाच तला नाहीच नाही. इषोबाच (गणिताच) परीक्षांत एक प्रश्नाच उत्तर देताना अंक उणे कराच सोडून, जोडून सत्यनाश करला. 

उणेपक्षा n  at the least. कम्मिपक्षा. uis तला विसंबींगून मी मझ असाच काम सोडून तज बरोर बिसिनस आरंभ केलों. अत्ताच कळ्ल॑, तजकडे बंडवाळ सांगास्क॑ एवढ॑ काहीं नाही म्हणून. उणेपक्षा तो मला तज खर॑ स्थिति सांगट्लासलतर मी मझ काम सोडलासना.
   
उणे-पाह्णे vt  to find fault. चूक पाह्णे. uis  मी कित्ति चोखोट काम केलतरीन मझ व॑र उणेपाह्यलतरच तला समाधान होईल॑.
     
उणे-सांगणे vt  to talk ill of. to find fault with. अपवाद बोलणे. अपवाद सांगणे. दोष सांगणे. uis काहीं आधार नाहीस्क॑ दुसरेंला उणे-सांगणे तज एक ओंगळ (वंगळ॑) स्वभाव आहे.

उतणे vi  to swell.  सुजणे. फुगणे. uis आज पाष्टे तो अंबा तोडाला झाडाच व॑र वेघताना खाले पडला. घाव काहीं झालनाही म्हणून सांगट्ला. पण, अत्ता पाहताना हात उतून आहेस्क आहे. हड मोडलाहे वाटत॑.     

उतणे vi  to boil and over flow. तावून पात्रांतूं बाहेर येणे. uis दूध तावताना उतून बाहेर येइनास्क असाला एक प्रत्येक विधाच पात्र अम्ही गेल वार घेटलों.

उतरणे vi  to get down. व॑रून खाले येणे. uis तो नारळ॑ तोडाला झाडाव॑र वेघतानच मला कळ्ल॑, तला हे कामाच दंडक नाहीम्हणून. तो उतरून यापतोरी खाले पडलका म्हणून मला भें वाटत होते.

उतरणे vi  to alight. to disembark.  गाडींतून उतरणे. uis सामान पूरा उतरीवला नंतर तेनी गाडींतून उतरले.

उतरणे vi  to abate or subside. उण॑ होणे. कम्मी होणे. uis गेल॑ दहा दिवसा नंतर॑ आज पाष्टे तज जेर उतरल॑. एक-दोन दिवसांत॑ आंग बर॑ होईल वाटते.

उतरणे vi  to go down (in level).  कम्मी होणे. uis उन्हाळांतपणीं अम्च घरच॑ आडाच पाणी उतरना.

उतरणे vi  to look pulled down in health. आंग क्षीणहोऊन दिसणे. uis समीपांत मी राव-साहेबाना पाह्यलों. पाप, उजंड/उदंड उतरून गेलाहेत॑.

उतरणे vi  to decline or deteriorate. उण॑ स्थितीच होणे. uis दुसर॑ लोकयुद्धाच नंतर॑ अमेरिका एक "महाशक्ति" झाल॑. पण, अत्ता ते स्थिति उतराच लक्षण आहे.

उतरिवणे vt  to make one get down or come down. वरून खाले आणिवणे. uis हे पोराच चेष्टा सोसाला होत नाही. अंबाच झाडांतून उतरीवा पतोरी मला देव दिसून गेल॑.

उतरिवणे vt  to set down or put down. खाले ठिवणे. uis अवसर॑ करनाका. बंडींतून सामान पूरा उतरिवला नंतरच मला घराच आंत याला होईल.

उतरिवणे vt  to unload. सामान उतरिवणे. uis पूरा सामान उतरीवला नंतर मी कूलीवालाला पैसा देलों.

उतरिवणे vt  to alight or disembark. (गाडींतून) खाले येणे. uis मझ मायेला चालाला होईना म्हणून कळींगूनीं मी त्यांस॑ गाडींतून उतरिवा पतोरी तुम्ही कां एवढ॑ आतर॑ भोगलांत॑ ?

उतरिवणे vt  to make shorter. to reduce the height. उंच उणे करिवणे. uis घरच॑ भोंतालभिंतीच उंच जास्ति झालाहे. थोड उतरिवाम॑.

उतरिवणे vt  to abate. to reduce. उणे करिवणे. कम्मि करिवणे. uis तज जेर जास्ति झालाहे. एक नव॑ ओखद देऊन उतरिवाला पाह्तों.

उतरिवणे vt  to put down (tantrum, ego etc). उणे करिवणे. कम्मि करिवणे. uis तज अट्टहास जास्ति झालाहे. थोड उतरिवूंटाकून येतों.

उतरिवणे vt  to doff. to strip. कापड काढिवणे. uis अट्टहास राहत॑ केल नाहीसतर॑ तुज कापड॑ उतरीवूनटाकन॑ !

उतिर adj  not sticking together (eg, cooked rice). मोकळ॑. चिकटनास्क॑ वेगळ॑ वेगळ॑ असाच. Note :- from Tamil. uis नव॑ तांदूळांत भात करतम्हा उतिर-उतिर भात पह्जे म्हण्जे पाणी उणे घालाम॑. नाहीतर मुद्दा होईल.

उतिवणे vt  to boil-over (eg. milk). ताविवून बाहेर आणिवणे. uis गृहप्रवेशाच वेळी दूध ताविवून उतिवाच एक पद्धत॑ आहे.

उतून येणे vi  to boil and overflow. उतून पात्रांतून बाहेर येणे. uis गृहप्रवेश सणाच वेळी दूध तावून भांडीच बाह्येर उतून येम म्हणून आहे.

उत्कंठा n  anxiety. मनाच गाढ चिंता. uis गल्फ देशांत उद्योग मिळ्ळ॑ म्हणून गेलते पोराकडून कागदकी ए-मेलकी येऊन उदंड दिवस झाल॑ म्हणून तज बापाला फार उत्कंठा झालाहे.

उत्तत्या n  dried dates. वाळलते खर्जूर. uis दुधांत दोन उत्तत्या, मिरे, हळेद/हळदी हे सर्वीं घालून कढिवून नित्य पीलतर॑ अम्च रक्तला पुष्टी मिळल॑. मात्र न्हो, पडसा-खोंकळा हे अग्गीन सुलुभांन॑ येईना.

उत्तप्पम  n  a dosa like preparation. धिरडेस्क॑ एक खायाच पदार्थ. Note :- from Kannada/Tamil. uis  उत्तप्पम कराला म्हणून पीठ कालीवून ठिवणे थोड अप्रूपच. कां म्हण्जे, नुस्त पीठांत॑ उत्तप्पमाला पह्जते कांदा मिळिवलतर॑, तेच दिवस चूलीच व॑र शिजिवून काढलनाहीतर॑, पीठ लोक्कुर विटून हाळ होईल.

उत्तम adj  very good. excellent. उदंड॑ चोखोट. बेष. uis दरएक मायबापीं त्यंच लोंक/लेंक वेगळे लेंकरांस एक उत्तम उदहरणास्क॑ असाम॑ म्हणून आशा ठींगणे सहजच॑. 

उत्तर n  North. उत्तर दिशा. uis महाराष्ट्रा राज्य कर्नाटका राज्याच उत्तर भागांत आहे.

उत्तर n  answer. बदिल. जवाब. uis  इषोबाच/हिषोबाच परीक्षांत॑ मोत्तम पन्नास प्रश्नांत॑ मला अठ्ठेचाळीस प्रश्नाला बरोरल॑ उत्तर द्याला झाल॑.

उत्तरा n  name of a star or constallation in the Indian astrological system consisting of 27 such groupings in the zodiac. जोतिषशास्त्रांत एक नक्षत्राच नाव. uis उत्तरा नक्षत्राला उत्तरा-फलगुनी नक्षत्र म्हणूनपणीन सांगणे आहे.

उत्तरायन॑ n  movement of the sun towards north. सूर्य उत्तरदिशाला जायाच॑. uis अम्च देशाच उन्हाळाच ऋतु उत्तरायनाच वेळांत॑ होत॑.

उत्तरीय n  upper cloth covering torso of a man. आंगाच व॑रच भागांत॑ पांघरिवून नेसाच कापड. अंगवस्त्र. अंगोस्त्र॑. uis तिरुवनंतपुरमाच अनंतशयन देऊळाच गर्भगृहाच जवळ जाताना उत्तरीय नेसींगटलसलतर॑ ते काढून हाती धरींगणे, नाहीतर॑ मादावर बांधणे विना देवाच दर्शन कराला सोडनाते.

उत्तान द्वादशी n  the day of the religious festival conducted during Karthika month for celebrating the wedding of Tulasi with Lord Vishnu. कार्तिक महिनेंत कराच तुळसी-विवाह सणाच दिवस. uis उत्तान द्वादशीच सणांत तुळसीमंटपांत अवळाच काठी रोवून ठिवाच्याला कारण काय म्हणजे, विष्णूच सानिध्य असाच साळिग्रामशिलाच बदिल अवळा ठिवतों म्हणाचच॑. 
उत्पत्ति n  origin. आरंभ होणे. उरपत्ति (Tamil). uis विदेश व्यापार करताना सामग्रींच उत्पत्ति कोण्त देशांत॑ झाल॑, हे विषय अधिकारींस॑ लिव्हून कळिवाम॑, अस॑ एक नियम आहे.

उत्पत्ति n  production. उरपत्ति (Tamil). uis  भूलोकांतल॑ वेगळ॑ देशाच बरोर पाह्ताना दूधाच उत्पत्ति भारतांत॑ सगळ्यांच पक्षा जास्ति आहे.

उत्पन्न॑ n  produce. उत्पन्न॑. uis  हे वर्ष झालते चोखोट पाऊसामुळे शेतीच जमीनांत॑ उत्पन्न॑ बेष झालाहे.

उत्पादन॑ n  creation. production. निर्माण. uis आर्सलर-मिट्टल स्टील कंपनि भूलोकांतच॑ सगळांचीन पक्षा जास्ति लोकुंडाच उत्पादन करते.

उत्भव n  origin. आरंभ. uis  पावसाळाच वेळांत पाऊसाच पाणीहीं, उन्हाळाच वेळ हीम विघरून याच पाणीहीं असामुळे  हिमालय पर्वतांत॑ उत्भव होयाच सगळ॑ नदींतीं वर्ष पूराईं पाणी असल॑.

उत्सव n  festival. सण॑. uis वर्षा-वर्षी याच श्री राघवेन्द्रस्वामीच आराधना उत्सवाला मी मझ संभावना चुकनास्क॑ देणे आहे.

उत्सव-मूर्ति n  God's idol used for puja outside the sanctum sanctorum. गर्भग्रहाच बाहेर पूजा कराला उपयोग कराच देवाच विग्रह॑. uis उडुपी क्षेत्रांत॑ रथोत्सवाच समय देवाच उत्सव-मूर्तीला अलंकार केलते रथांत॑ बसिवून मिरिवणे कराच पाह्याला गंभीर अस्त॑.

उत्साह n  enthusiasm. उत्साह. uis  चेन्नैच मेरीना बीचाला बलाईंगून जोतों म्हणून सांगटल की नाही, रडत होतते लेंकरू उदंड उत्साहांत॑ तिकड जायाला तय्यार होयाला आरंभ केला.

उत्साह n  delight. उत्साह. uis उदंड दिवसापसून पह्जे म्हणून विचारत होतते बावोली लोक्करच मिळाला जात॑ म्हणून ऐकून तिला फार उत्साह झाल॑.

उदय n  rising of Sun, Moon or stars. सूर्य, चंद्र अथवा नक्षत्र आकाशांत॑ व॑र येणे. uis ध्रूव प्रदेशांत॑ अस्तमन॑ झालांपिरी सुमार सहा महिनाला सूर्याच उदय होईना.

उदणे vi  to be born. उजणे. जन्म होणे ; उपजणे in sm. uis मांदराच पिल्लू उदून सात आठ दिवसा नंतरच दोळे उघडेल॑.

उदलादिवस n  birth day. उजलादिवस. उजलते दिवस. जन्म झालते दिवस. uis अम्च नातू जनुवरी पहिले दिवस उजला ते करतां, तज उदलादिवस कोणालीन विसराला होईना.

उदंड॑ adj  a lot. उजंड॑. भरून. फार. uis  भारताच संस्कृति उदंड॑ पुरातन आहे. पांच हदार वर्षाच पुढ॑ मोहन-ज-दारो, हडप्पा असल॑ ठिकाणांतून खोदून काढलते पुरावस्तांतून हे अम्हाला कळते.

उदंड॑ adj  much. उजंड॑. भरून. फार. uis मी ल्हान असताना मझ॑ बापाकडून उदंड मार खालोहें.

उदंड॑ adj  abundant. उजंड॑. भरून. फार. uis हे वर्ष अंबाच झाडांत॑ उदंड फूल॑ सोडलाहे.

उदार adj  generous. थोर मनाच॑. धाराळ॑. uis मझ॑ पणजा उदंड उदार मनाच होते, ते करतां त्यांस॑ "उदार सिरोमणी" अस॑ एक बहुमानाच बिरुद ट्रावनकूर महाराजा 1924-आंत॑ देले.

उदास adj  depressed. dejected. मनाला वाटाच संकट.  मनाला वाटाच दुख. uis एक कार्य झाल नाही म्हणून मन्न उदास करींगून  बसापक्षा पुन्हा बेष प्रयत्न करून ते कार्य साध्य कराला पह्जे.

उदाहरण॑ n  an example. दृष्टांत. uis  बाळपणांत॑ माय-बापांच बरोर घरांत॑ वाढून त्यंच संरक्ष्ण॑ मिळ्ल॑ नाही तरीन, स्वंत श्रमांत॑ पुढ॑ याला होईल म्हणून करून दाखिवलते अमेरिकाच राष्ट्रपति बराक ओबामा हेला एक मोट्ठ॑ उदाहरण आहेत॑.

उद्घाटन॑ n  inauguration. समारंभ आरंभ करणे. कार्यक्रम आरंभ करणे. uis अम्च॑ साळेच नव॑ मैदानाच उद्घाटन कराला अम्ही विद्याभ्यास मंत्रीला एक आमंत्रण पत्र पाठिवलों.

उद्दे‌‌श n  intention. purpose. मनांतल॑ आवश्य. तात्पर्य. uis उदंड दिवस मझकड॑ बोलानास्क असून अत्ता तो मला मिळाला आलाहे. तज उद्देश काय मणून कळत नाही.

उद्धरण n  restoration. जीर्ण झालते वस्तु बरोर कराच॑. उद्धारण. uis  यंत्र, उपकरण॑, व्यवसाय/वाणिज्याला पह्जते सामग्रि वगैर निर्माण कराच कारखानांतून येत असाच धूपामुळे ताज-महळाच बाहेरच भाग पूरा पिवळ॑ रंगाच डाग झालते, उद्धारणाच नंतर॑ अत्ता पाह्याला थोड बर॑ झालाहे.

उद्धरणे vt  to restore. जीर्ण झालते वस्तु बरोर करणे. उद्धारणे. uis  कंबोडिया देशाच पुरातन हिंदु देऊळ, अंकोर-वात, तज जीर्ण स्थितींतून उद्धारण॑ करिवाला भारतांतून पुरावस्तु विभागाच अनेक लोक गेल्होते.

उद्धरणि n  a small spoon used in pooja. पूजाला उपयोग कराच चमचा. uis दिवसोडीच पूजाला मी एक तांम्रेच उद्धरणीनिं सणाच दिवसी रुपेच उद्धरणीनिं उपयोग करतों. Note:- पंचपात्र and उद्धरणि form the set.

उद्धार n  upliftment. उण॑ स्थितींतूं चोखोट स्थितीला आणणे. uis दलित वर्गाच लोकांला उद्धार कराला सरकार उदंड कार्यक्रम काढलाहे.

उद्धारण n  restoration. जीर्ण झालते वस्तु बरोर कराच॑. उद्धरण. uis हे जवळ॑ बंगळूरच जवळ असाच रामूहळ्ळी म्हणाच खेडेगांवांत श्रीरामाच देऊळ उद्धारण केलते प्रकल्पाला अमच॑ विहीण अध्यक्ष म्हणून होत॑.

उद्धारणे vt  to restore. जीर्ण झालते वस्तु बरोर करणे. उद्धरणे. uis रामूहळ्ळी श्रीरामाच देऊळ उद्धारणे कराला सुमार एक वर्षाच वेळीन वीस लाख रुपेहीं खर्च झाल॑, पण काम सार्थक झालकी म्हणून अग्गिदनासीन संतोष वाटल॑.

उद्भव n  coming into being. उत्पन्न होणे. uis हिमालया पर्वतांत गंगोत्रींतून गंगा नदीच उद्‌भव होत आहे.

उद्या n  tomorrow. आजच नंतरल॑ दिवस. उजा. uis काल मझ॑ मित्राला दुकान-बीदींत उदंड दिवसानंतर॑ मिळताना अमच॑ घराला कां अत्ताअग्गीन येतनाहीस म्हणून विचारत्याला बरोर बदिल देनास्क॑, उद्या कंडिप येतों म्हणून म्हणट्ला. 

उद्यान n  park. garden. बाग. uis गिरिनगरांत अमच॑ घराच दोन पटीसीन फार जवळ एकेक उद्यान आहे अणी दिवसोडी पाष्टे मी चालाल जाताना एक दिवस एक उद्यानाला जाणे अणी अण्किएक दिवस दुसर॑ उद्यानाला जाणे अस॑ करत असतों. 

उद्या-नाही-तेरमा n  the third day after today. आज सोडून तीन दिवस नंतरल॑ दिवस. तेरमा दिवस. उद्या-नाही-तेरवा. uis उद्या-नाही-तेरमा इषोबाच परीक्षा ठींगून आज तो एक सिनिमाला गेलाहे म्हणून ऐकून मला अस॑ वाटल॑, तला वाचणेंत तात्पर्य आहेकी नाहीकी म्हणून.   

उद्या-नाही-परमा n  day after tomorrow. आज सोडून दोन दिवस नंतरल॑ दिवस. परमा दिवस. उद्या-नाही-परवा. uis उद्या-नाही-परमा गांधि जयंती असाकरतां बॅन्काला सुट्टी असेल॑.

उद्योग n  employment. करेचीच काम. uis  हे काळांत बेष वाचलतरेच॑ एक उद्योग मिळेल॑, अस॑ काहीं नाही. देश उदंड विकास झालाहे, ते करतां एक मादिरीच काम कोणालीं मिळेल॑.

उद्योग n  occupation (for earning money). (पैसा संपादाला कराच) व्यापार-व्यवसायाच उद्योग. 

उद्योग n  business. धंदा. 

उद्योगछेद n  suspension from service. उद्योगांतून सध्याला सरकिवणे.

उद्योगत्याग n  resignation from service. उद्योगविराम. उद्योग सोडणे.

उद्योगनिवृत्त॑ n  retirement from employment.  उद्योगांतून निवृत्त होणे.

उद्योगरद्द n  dismissal from service. उद्योगांतून सरकिवणे.

उद्योगविराम n  resignation from service. उद्योगत्याग. उद्योग सोडणे.

उद्योगी n  employee. कामांत॑ असणार. uis केंद्र-सरकाराच उद्योगी लोकांस अग्गीन अत्ता चोखोट धर्मा अणी पेन्शन मिळते, जुने काळास्क॑ नोहो.

उधय n  white ant. पंढ्र मुंग्या ; उधई/उधय in sm. uis घरांत उधय वेघनास्क॑ असाला तम्ह-तम्हा नुस्त॑ व॑रून औषध (ओखद) बडिवलतर॑ पुरना, घरच॑ अस्तिवाराच (पायाच) खाले पर्यंतीन औषध पोंचास्क॑ भोई खोदून औषध घालाम॑. 

उधार n  transactions on credit or on trust. ऋणांत/रीणांत॑ कराच व्यापार. uis अम्च॑ घरच॑ बाजूच दाळ-तांदूळाच दुकानवाला सामान उधारांत देईनाच देईना.

उधार n  money owed on credit purchase. रीणांत घेट्लते सामानाच मोल. uis  मझ॑ मामाकडे एक चोखोट गुण होत॑. महिना-महिना धर्मा मिळतानच कोणाला-कोणाला पैसे देमते आहेकी ते समच देऊनटाकतील॑. त्यांस॑ उधाराच पैसा हात्ति ठींगणे अवडनाच अवडना.

उधार n  goods held on credit purchase. रीणांत घेट्लते सामान. uis  स्वंत बंडवाळ घालनास्क॑ उधाराच माल ठींगून व्यापर केलतर॑ तसल॑ माल देणार विपरीत बड्डि उप्पडतील॑.

उनु adj  heated. hot. ऊन केलते. uis उनु भातांत तूप अणी मीठ घालून कालिवून खायाला लेंकरांस भरून अवडेल॑.

उनुउनू adj  fresh and hot from the stove or oven. चूलांतून अत्ताच करून ठिवलते ; ऊनऊन/ ऊन्हऊन्ह/ उन्हून/ उन्हन in SM. uis खायाच पदार्थ उनु असल॑ नाही तरीन परवा नाही मला, कॉफी मात्र उनुउनू असांव॑ (असाम॑).

उनुउनू adj  quite recent. अत्ताच अलीकडे झालते ; ऊनऊन/ ऊन्हऊन्ह/ उन्हून/ उन्हन in SM. uis अत्ता उनुउनू आलते समाचारा प्रकार राहूल गांधी कॉनग्रस पार्टीच अध्यक्ष पदवींतून राजिनामा देले म्हणून ऐकलों.       

उनुपाणी n  hot water. ऊन केलते पाणी. uis उनुपाणींत आंघोळ/आंघोळी करून दंडक झलत्यांस॑ हिंस॑ पाणींत आंघोळ कराम॑ म्हण्जे थोड कष्ट होईल.

उन्हाळा n  hot weather. summer. ऊनाच वातावरण.  uis उन्हाळांत उत्तर भारतांत बडिवाच उनू-उनू वार॑ मला सोसाला होईना.

उपकथा n  story within a story. sub-plot. एक खाणीच आंतल॑ अण्कीएक खाणि. uis उज्जैन साम्राट विक्रमादित्याच वीर कथा "सिंहासन द्वत्रिंसिका" हे अक्रावां शतकांत॑ कष्मीराच सोमदेव लिव्हलते "कथासरितसागरा" हेजांतल॑ एक मुख्य उपकथा आहे.

उपकरण॑ n  instrument. काम कराला उपयोग कराच आयुध. uis घरांत॑ ल्हान-ल्हान काम अम्ही स्वता करींगाला हातोडी, स्क्रू-ड्रैवर असल॑ उपकरण॑ केम्हाईं ठींगणे चोखोट.

उपकरणी n  small utensils used in Deva Pooja. देवपूजाच ल्हान पात्र. uis अम्च॑ आजी फार सोवळेच होते अणी देवघराच सगळ॑ उपकरणीं वेघळ॑ कोणालीन हात लावाला सोडनास्क॑ तेनीच स्वता शुद्ध करून ठिवत होते.

उपकार n  help. सहाय. uis  एक हातांत॑ लेंकरूहीं, अण्कीएक हातांत॑ दुकानांत घेट्लते सामानीं ठींगून बस्सांत॑ ओठाकलसाच बायकोला पाव्हून अम्च॑ ठिकाण त्यांस॑ सोडून देलतर॑ ते त्यांस॑ एक मोट्ठ॑ उपकार होईल॑.

उपग्रह n  satellite.  ग्रहाला प्रदक्षिणा कराच एक ल्हान ग्रह. uis  शनिग्रहाच उपग्रह "टैटान", हेच सूर्यमंडलांत॑ सगळांचीं पक्षा थोर उपग्रह.

उपचार n  gracious treatment. आदरांत॑ वागणे. uis  कित्येक लोकांच वागणांतून, तेनी तेवढदनालीं उदंड मर्यादांत॑ उपचार करणार आहेत म्हणून अम्हाला कळते.

उपजीवन॑ n  subsistence. एकदम उणे पैसांत॑ (आदायांत॑) जीवन चालिवणे/काल कांडणे. uis एक चोखोट उद्योगांत होतते ते मनुष आवश्य नाहीस्क॑ ते काम सोडूनटाकला. अत्ता उपजीवनाला तिंडाट्टम झालाहे.

उपदेश n  advice. उपदेश. uis  महाभारतांत॑ विदुर॑ धृतराष्ट्राला कित्ति उपदेश देवूनीं शेवटि ते कोण्तीन तेनी पालन केल नाहीते.

उपद्रव n  trouble. तंटा. uis  भारतांत॑ जास्ति विकास झालनाहीते प्रदेशांत॑ माओवादींच उपद्रव उणे कराम॑ म्हण्जे तिकडल॑ लोकांच कष्ट काय म्हणून कळींगून ते प्रकारच विकासाच कार्यक्रम कराला पह्जे.

उपद्रव n  harassment. पीडा. तंटा. नच्च॑. uis  ल्हान-ल्हान कामाच आवश्या करतां सरकारी आफींसांत॑ जाणार लोकांला तिकडले उद्योगी लोक उपद्रव करनास्क असाला लोकायुक्त नियोग कराविषयीं अत्ता एक थोर चर्चा देशांत॑ होत आहे.

उपद्रव n  nuisance. तंटा. नच्च॑. uis  अम्च बाजु घरांत आलते नव॑ कुटुंबांत॑ दहा बारा लोके आहेत॑. रात्रि पूरा काय-कायकी शब्द होत असत॑. मला हे उपद्रव सोसाला होत नाही.

उपद्रव n  botheration. तंटा. नच्च॑. uis  झोंपी जाताना थोर घुरका सोडाच दंडक मला आहे. मझमुळे दुसरांस॑ उपद्रव होताने म्हणून मी केम्हाहीं वेगळ॑ एक खोलींतच झोंपी जायाच.

उपनगर n  satellite town. मोट्ठ॑ नगराच बाजु असाच एक ल्हान गांव. uis थोर-थोर पट्णांत॑ जमीनाच मोल उदंड जास्ति असाकरतां पैसावंत नाहीत जन॑, म्हण्जे मध्य वर्गाच लोक॑, उपनगरांत॑ घर करणे आहे.

उपनदि n  a tributary. मुख्य नदीच बरोर मिळाच नदि. uis  यमुना नदि गंगा नदीच एक उपनदि झालतरीन, ते स्वता एक मोट्ठ॑ नदि आहे.

उपनयन॑ n  thread ceremony. मुंज. uis  उपनयन झाल-की-नाही, ब्रह्मचारींस॑ दिवसोडि संध्यावंदन करिवांमते जवाबदरि थोरळे काढींगणे चोखोट.

उपनिषद n  philosophical works forming an important part of Hindu scripture. आरण्यक॑. हिंदु तत्वज्ञानाच कित्येक मुख्य ग्रंथ. uis बृहदारण्यक उपनिषदांत॑ विदेह राजा जनकाच राजसदसांत॑ गार्गी वाचक्नावी, यज्ञवल्क्यांच बरोर कराच तत्वज्ञानाच तर्क ते उपनिषदाच एक मुख्य भाग आहे.

उपनेत्र n  spectacles. अयनक. अर्सा ; चष्मा in sm.  uis  अत्ता अस्कीन गाजाच उपनेत्र घालाच बद्दिल प्ळास्टिकाच (रेसी-लेन्साच) उपनेत्र घालणे प्रसिद्ध झालाहे.

उपन्यास n  a religious discourse. तत्वज्ञानाच भाषण. uis रिटैर झालांपिरी वय झालते लोक सायंकाळी-सायंकाळी उपन्यासाच कार्यक्रमाला जाणे आहे.

उपभाषा n  dialect. एक भाषाच॑ वेगळ॑ एक रूप. लोकबोली.  uis तंजाऊर मराठी पुणे मराठीच एक उपाभाषा आहे.

उपमान n  an illustrative comparison. तारतम्य उदाहरण. uis अम्च जीवन कस॑ चालत आहे म्हण्जे, तज उपमान चार डोंगूरावर वेघून-उतराच कसकी तसच आहे. थोड वेळ व॑र वेघताना श्रम असत॑. नंतर उत्तराच वेळ सुख वाटते. वेघणे-उतरणे जीवनांत॑ बदलून-बदलून अस्त॑.

उपयोग n  use. कामाला याच॑. uis  कसालतरीन उपयोग होईल म्हणून मझ आजा जुने रट्टाच डब्बा काहीतरीन मिळ्लतर॑ ते काढून परणेच व॑र घालतील॑.

उपयोग n  usefulness. प्रयोजन. uis तो अम्च काम करना म्हणून मला वाटते. तजकडे बोलून उपयोग नाही.

उपरण n  cloth covering torso of a man. आंगाच वरच भागाव॑र पांघरून नेसाच कापड. उपरणी. अंगवस्त्र. अंगोस्त्र॑. अंगूस्त्र. अंगोस्तर॑ ; उपरणे/उपरणा in sm. uis  कोणालतरीन धोती दान देताना तज बरोर उपरण पणीं देणे आहे.

उपरणी n  cloth covering torso of a man. आंगाच वरच॑ भागाव॑र पांघरून नेसाच कापड. उपरण. अंगवस्त्र. अंगोस्त्र. अंगूस्त्र. अंगोस्तर॑ ; उपरणे/उपरणा in sm. uis जुने काळांत केरळच॑ देऊळांत ब्राह्मण लोकांस मात्र उपरणी नेसींगून आंत जायाला सोडत होते, पण अत्ता कोणालीन सोडत नाहीत॑. 

उपराट n  reverse. inverse. वाम. उलटा  ; उफराटा in sm. uis  उर्दू, अरबी, फार्सी असल॑ भाषा उपराट लिव्हतील॑. म्हण्जे, उजवीकडून आरंभ करून डावीकडे संपवतील॑.

उपराट  n  obverse. मागे पटीस ; उफराटा in sm. uis  हे कागदांत॑ दोन पटीसीं छापलाहे. मी मझ अर्सा आणाला विसरलों. तुला विरोध/आक्षेप नाहीतर॑ उपराट छापलते वाचून सांगशीलका ?

उपराट  n  contrary. विरुद्ध॑. उलटा ; उफराटा in sm. uis मझ॑ बहिणीच लोंकाला काय निर्देश देलतरीन उपराट कामच॑ करेल॑. टीनेजर पोरांस मानसिक विकास झाल नंतर॑ हे बरोर होईल म्हणून सांगतात॑.

उपवास n  religious fasting. धार्मिक निष्ठाच उपवास करून अनशी पोटांत असणे. उपास. uis अम्ही एकादशी दिवस पूरा उपवास करणे आहे.

उपवास n  fasting. अनशी पोटांत असणे. उपास. उपाशी असणे. uis पोटाला बर॑ नाहीस्क॑ ढाळणे वगैना झालतर॑, एक दिवस उपवास बसणे चोखोट॑.

उसपणे vt  to bale out water from a pond etc. to ladle out milk, ghee, oil etc from a vessel. उसणे. पाणी, दूध, तूप असलत॑ द्रव्य व॑रून ढकळून काढून घालणे ; उपसणे in MM. Note :- उसपणे is a  phonetic jumbling of उपसणे and thence to उसणे.

उपसर्ग n  prefix. गोष्टाच पुढे (आरंभांत॑) जोडाच अक्षर, नाहीतर॑, अक्षरसमूह. uis लोकांच नावाच पुढे "श्री" "श्रीमती" अस॑ जोडाच॑ उपसर्गाच उदाहरण आहे.

उपहार n  light refreshment. पल्हार. पलहार. फलहार. लघु आहार. लघु भक्षण॑. Note :- उप+आहार=उपहार. फल+आहार=फलहार/पल्हार. uis  प्रयाण करताना पोट भरून जेवा पक्षा काहीतरीन उपहार खाणेच॑ चोखोट.

उपहास n  ridicule. मष्किरि. परिहास. अपहास. uis  वेगळांस पाह्यिलतर॑ उपहासांत बोलाच वंगळ॑/ओंगळ॑ दंडक तला आहे.

उपाकर्म n  the ceremony of putting on a new sacred thread.  नव॑ जानव घालाच सण. आवणी-अविट्टम (Tamil).  uis  मझ लोंक अमेरिकांत॑ उद्योगांत आहे तरीन वर्षा-वर्षी चुकनास्क॑ उपाकर्म करणे आहे.

उपाध्यक्ष n  a person who is second in command or charge.  अध्यक्ष नसताना त्यंच जवाबदारी घेणार. uis मी वाचत होतते साळेच उपाध्यक्ष वीस वर्ष ते पदवींतच होते अणी अध्यक्षाच पदवी खाली झालकी-नाही वेगळ॑ कोणालकी नियुक्त केले म्हणून समेच राजिनामा देऊनटाकले.

उपाध्याया n  a religious teacher. धर्मगुरू. धर्मपंडित. uis मझ॑ सासराच एक गाढमित्र थोर धर्मपंडित होते अणी आध्यात्मिक विषयांत फार पांडित्य घेट्लते उपाध्याया म्हणून त्यांस तिरुपति संस्कृत विश्वविद्यालयांत वैस-चान्सलर म्हणून नियुक्त करले.

उपाय n  a plan. a scheme. an idea. योजना. युक्ति. uis  बरोर योचना करून एक चोखोट उपाय निश्चय केलांपिरी आरंभ कराच कोण्त कार्यहीं पराजय होयना.

उपाय n  a remedy. एक वाट. uis  कराच प्रयत्न पूरा करून अत्ता वेगळ॑ उपाय काहीं नाहीते करतां तो मझ॑ अभिप्राय विचाराला आलाहे.

उपाशी adj  starving. empty stomach. उपासी. भूकांत॑ असाच स्थिति. खालि पोट. अनशी पोट. uis  एकादशी दिवस पूरा उपाशी असून द्वादशी पाष्टे लोक्कर पारणे करणे आहे.

उपास n  religious fasting. धार्मिक निष्ठाच उपवास करून अनशी पोटांत असणे. उपवास. uis  शनिवार शनिवार मी उपास करून रात्रिच वेळ काहितरीन पल्हार खाईन.

उपास n  fasting. अनशी पोटांत असणे. उपवास. uis गुरुवार गुरुवार रात्रीच जेवणे नाही मला, उपास असतों.

उपासना n  worship. पूजा. आराधना. uis उद्योगांत असताना त्यांस धार्मिक विषयांत श्रद्धा द्याला वेळ होत नाही, पण रिटैर झालानंतर॑ देवकार्य, पूजा-पद्धती अणी उपासना कर्म असलत्यांत फार उत्साह दाखिवाला आरंभ करले.

उपेक्षा n  abandon. आवश्य नाही म्हणून सोडूनटाकणे. uis  वाघ, सिंह असल॑ राणाच मृगाला त्यंच पिल्लूंत कोण्त तरीन वांचना म्हणून वाटलतर॑ तला दूध पणीं देईनास्क॑ उपेक्षा करूनटाकल॑.

उपेक्षा n  neglect.  पाह्यींगनास्क॑ सोडूनटाकणे. परवा करनास्क॑ सोडूनटाकणे. uis  चोखोट स्थितींत असाच तीन लोंक असून पणीं वय झालते माय-बापाला बरोर पाह्यींगनास्क॑ उपेक्षा केले म्हणून तेनी एक वृद्धाश्रमांत॑ जाऊन मिळींगटले.

उप्पडणे vi  to pluck out. to pull out. पिच्चणे (Tamil). ओढून/होढून काढणे ; उपटणे in sm. uis  अम्ही दोघे बहिणीहीं ल्हान असताना भांडणे आरंभ करतानच एकालेक केंस उप्पडत होतों.

उप्पडून काढणे id  to ferret out (information etc. against one's wish). दूसरेकडून काहीं विवर॑की वेगळ॑ विषय कायतरीनकी निर्बंधांत॑ होढून/ओढून काढणे. uis  ते बायकोकडे मात्र मी बोलाला जाईना. कां म्हण्जे, बोलाला आरंभ करतानच मझकडून अम्च घरच॑ विवर पूरा उप्पडून काढणे विना तिला वेगळ॑ एक उद्देशीं नाही.

उप्पिट n  a light refreshment made from rava. उप्पुमा (Tamil). रवांत॑ केलते एक पल्हार. Note :- from Kannada, उप्पु(salt)+हिट्टु(flour). uis मला सादा उप्पिटाच पक्षा कांदा घाटलते उप्पिट अवडल॑.

उप्पेरि n  fried vegetable chips. तळलते भाजीपालाच पत्तळ चीर. Note :- from Malayalam. uis  नेंद्रन केळेच उप्पेरीला बरोरल॑ रूच येम॑ म्हण्जे खोब्रीच तेलांत तळलतर॑ मात्र होईल॑.

उबारा n  sultriness. ऊब. उष्ण. uis  रात्रीच वेळ आकाश वांबाळा/वामाळा असलतर॑ उबारांत॑ घाम सुटून झोंपीला तंटा होईल.

उब्बस n  overpowering and debilitating mental state. मनाला उदंड कष्टकी, संकटकी वाटणे. ऊर चेंपास्क॑ मनाला वाटणे. uis  त्यंच लोंक पुन्हा परीक्षांत॑ हरला म्हणून ऐकून तेनी उब्बस करींगून बसले.

उभयान्वयी अव्यय n  conjunction (gram). दोन वाक्य नाहीतर॑ दोन गोष्ट जोडाच अव्यय.

उमटणे vi  to feel like vomiting. to feel nauseating. वांति वाटणे. ओंकारा येणे. कोमटणे (Tamil).  uis  उमटास्क॑ वाटलतर॑ लिंबुपाणींत॑ मीठ घालून पीलतर॑ बर॑ होईल.

उमाट n  elevation. height. उंच ठिकाण. व॑रच स्थळ ; उमाठा/उमाट in sm. uis अंदमान-निकोबार द्वीपांत सुनामीच पाणी येताना तिकडल॑ आदिवासी लोके पूरा उमाट प्रदेशाला पळूनजाऊन त्यंच जीवन रक्षा करींगट्ले. 

उमाट-बधकळ॑ adj  up and down. व॑र-खाले. uis अम्च देशांत पोणावांटा बीद॑ उमाट-बधकळ असते. पाह्यींगून चालल॑ नाहीतर॑ अम्ही तडकून पडओं.

उम्मा n  kiss. मुक्का. चुंबन. uis  ल्हान लेंकरांस॑ पाह्यिलतर॑ उम्मा द्याला वाटलतरीन अम्ही ते करताने. कां म्हण्जे, अम्हाला पडसा खोंकळा काहीतरीन असलतर॑ लेंकरांस ते येउया.

उरणे vi  to remain unused. उपयोग करनास्क बाकी राहणे.  uis  अम्च रात्रीच जेवण॑ झालांपिरी भात काहीतरीन उरून असलतर॑ कुत्राला ते घालणे आहे.

उरलते adj  that which remained unused. उपयोग करनास्क बाकी राहलते.  uis  संपाकीण॑ तिज काम पूरा करून गेलांपिरी उरलते काम कायतरीन असलतर॑ ते मझ बाईल करल॑.

उरळि  n  a heavy large mouthed vessel with well rounded periphery but a small base, used for cooking kheer etc. खीर वगैरा कराला उपयोग कराच॑ थोर तोंड अणी ल्हान उंचाच॑ जेड/जड पात्र.  Note:- from Malayalam.  uis मझ॑ आजीच घरांत॑ अप्पि पायसम उरळींतच करणे.

उरळेगड्‍डे n  potato. आलू गड्‍डे. uis  उरळेगड्डेच भाजि, उरळेगड्डे्च बोंडा, उरळेगड्डेच उप्पेरि, उरळेगड्डेच फ्रेंच-फ्रैस हे तेवढीन मला उदंड अवडल॑.

उरिवणे vt  to save. to leave something aside (for a latter time). बाक्कि ठिवणे. नंतरशाला काढून ठिवणे ; उरवणे/उरविणे in sm. uis  मझ॑ आजी बज्जि कराला कालिवलते उडिदाच पीठ थोडतरीन उरिवून नंतर॑ तजांतून डांगर करतील॑.

उलटा  adj  reverse. उपराट. uis  एकदपा मी कारांत॑ बांगळूराच बळेपेटाच ल्हान-ल्हान गल्लींत॑ जाऊन सांपडींगट्लों. वापस याला पूरा वाटीं उलटा पळिवत येमते पडल॑.

उलटा  adj  obverse. उपराट. uis  कंप्यूटरांत प्रीन्ट कराच कागदाच उलटा पटीस खालि असते म्हणून मी ते कागद फाटून टाकनास्क॑, पुन्हा तज उलटा भाग उपयोग करन॑.

उलटा  adj  upside down. व॑र-खाले. uis  विक्रम-वेताळ खाणींत॑ विक्रमादित्य वेताळ विचाराच प्रश्नाला अस्कीन बरोरल॑ उत्तर देतांतरूं ते समच उडून जाऊन स्मशानांतल॑ सिंसपा-झाडांत॑ उलटा लोंबून पडल॑.

उलटा  adj  inside out. आंतल॑ बाहेर. uis  ते ल्हान पोर केम्हाहीं बनियन उलटा घालतो.

उलटा-फुलटा adv  topsy turvy. व॑र-खाले ;  उलटपालट/उलटापालट/उलटासुलटा in sm.  uis  खोलीच आंत॑ सामान बरोर जोडून ठिवाला तला सांगतल्होतों तरीन मी जाऊन पाह्ताना सग्ळीन उलटा-फुलटा पडलसाच पाह्यलों.

उल्लास n  delight. joy. pleasure. आनंद. uis मृगशालांत हरणाच ल्हान पिल्लू इकडे-तिकडे पळून उडीमाराच पाह्ताना काय उल्लासांत अस॑ उडीमारतका म्हणून अम्हाला वाटूनजाईल.

उशीर n  delay. देर. वेळ होणे. uis जपानांत ट्रेन उशीर होऊन जाऊन पावलतर॑ तुम्हाला टिकटाच पूरा पैस वापस मिळल॑.

उष्टावण॑ n  feeding ceremony when solid food is given first to a baby. लेंकरांला पह्यिलंदा भात द्याच सण ; उष्टावण/उष्टवण in sm.  uis  साधारण होऊन उष्टावण॑ होयापर्यंतीन ल्हान लेंकरांस॑ घट्टि पदार्थ काहीं द्याच दंडक नाही.

उष्ट॑ n  half eaten food left in the leaf or plate. पानांत॑, नाहीतर॑, ताटांत॑ अर्ध खाऊन सोडलते जेवण॑/पदार्थ/भात ; उष्टें in sm. uis  कित्येक मठांत॑ जवणे झालांपिरी हात धुवाला जाताना उष्ट॑ तुडिवनास्क॑ पाह्यींगून जानतेस्क अस्त॑. 

उष्ट॑ n  anything soiled or contaminated on account of it being kept in the mouth. तोंडांत लागीवून उष्ट॑ केलत॑ साधन॑ ; उष्टा/उष्टें in sm. uis  नंख उष्ट॑ करनको म्हणून कितीदपा सांगटल तरीन तो ऐकना. सदा बोट तोंडांतच असल॑.

उष्ट॑ adj  unwashed (mouth and hand after eating). (खालांपिरी) धुवनाते ; उष्टा/उष्टें in sm.  uis  तो उष्ट॑ हातांत॑ कोळाइ (नळ॑) फिरिवत असाच मी पाह्यलों.

उष्ट॑ adj  tasted and left  portion (of food).  थोड खाऊन सोडलते (पदार्थ/जेवण/भात) ; उष्टा in sm.  uis  उष्ट॑ भात दूर टाकनास्क॑ कुत्राला देऊया.

उष्ट॑-खरकट॑ n  a general term for half-eaten foods and unwashed used plates or vessels. उष्ट॑ पदार्थ अणि खालानंतर॑ विसलनाते भांडि. uis हे काळाच पोरींस॑ उष्ट॑-खरकट॑ म्हणजे काय म्हणून कळना. सोवळे-ओवळे पाह्याच घरांत वराड करींगून गेलतर॑ कस॑ संसार कराला जातातकी.

उष्ण n  heat (on account of Sun). (सूर्याच) ऊन. uis  भूमध्यरेखाच जवळ असाच प्रदेशांत॑ सूर्याच उष्ण जास्ति अनुभव होईल.

उष्ण n  heat in the body's system. आंगात॑ उष्ण. uis  कित्येकदनास॑ आंगांत जास्ति उष्ण झालतर॑ उष्णाच पडसा येईल.

उसणे vt  to bale out water from a pond etc. to ladle out milk, ghee, oil etc from a vessel. उसपणे. पाणी, दूध, तूप असलत॑ द्रव्य व॑रून ढकळून काढून घालणे ; उपसणे in MM. Note :- from उसपणे, a  phonetic jumbling of उपसणे and thence to उसणे.

उसली n  green gram cooked with spices. सुंडल (Tamil) ; उसळ in sm. uis  मला पाष्टेच पल्हाराच बरोर उसली खाणे अवडल॑.

उंच adj  tall. गिड्ड॑ नाहीते. uis  बास्कट-बाळ खेळणार अस्कीन साधारण होऊन उणेपक्षा सहा फ़ुट उंच असतील॑.

उंच adj  heightened. उंच. uis  हळ्ळु स्वरांत॑ आरंभ करामते गाण॑ उंच स्वरांत॑ आरंभ केलतर॑ ते ऐकाला बर॑ असना.

उंच n  steep (ascent). उंच. uis  जुन॑ काळांत॑ तिरुपतीच व॑र जायाच वाट फार उंच होत॑. ते करतां व॑र जायाला म्हणून वेगळ॑ वाट नंतर॑ केले. खाले येताना ते जुन॑ वाटा वाटी येउया.

उंच  n  height. उंच. uis (1) भूलोकांत एवरेस्ट शिखराच पक्षा उंच असाच शिखर वेगळ॑ कोण्तीन नाही. (2) पाणीच भारामळे पाऊसाच वांब॑ (मेघ) थोड खाले आसते. पण, साधारण मेघ पासुसाच वांबापक्षा उंचांत असते.

उंच  n  deep. depth. उंच ; खोल in sm. Note :- used in the reverse sense of "height". This usage is seen when telling about a well, pit etc. uis अम्च॑ घरच॑ आडांत पाणी पाह्मे म्हणजे लवून पाह्यलतरच होईल॑. तसलते उंच आडांत उतरताना जागृत होऊन असाम॑.   

उंच करणे vt  to raise. to lift. वर करणे. uis कवाडाच कोंडि घालाम म्हण्जे हात उंच केलतरच होईल॑.

उंडा adj  ball shaped. spherical. गोळ आकाराच॑. uis  बूंदि लाडू ऊंडा असाम॑-तरीन, उंडा धराच कामांतून चुकींगाला ते खारा-बूंदीस्क॑ उतिर-उतिर (मोक्कळ) करणेपणीं आहे.

उंडासांभार n  a type of sambhar with steamed balls of pulses and cerels. शिजिवलते दाळांत केलते उंडा घालून केलते एक रीतीच सांभार. uis  उंडासांभार तंजावूर मराठी लोकांच एक विशेष कालिवण॑ आहे.

उंदीर n  rat. mouse. एक ल्हान प्राणि. uis  घरांत॑ उंदीराच तंटा उदंड झालाहे-ते-करतां अम्ही एक मांदर॑ वाढिवाला निश्चय केलों.

उंबरा n  threshold. कवाडाच खालच॑ अडव॑ लांकड. uis  वराड करींगून नवरी पह्यिलंदा दाल्लाच घरच॑ उंबरा वलांडींगून आंत वेघताना उजव॑ पांय पह्यिल॑ आंत ठिवाम॑ म्हणून सांगणे आहे. 

उंबळणे vt  to abort pregnancy. गर्भपात करींगणे. गर्भ राह्ते करणे. गर्वारपण॑ राह्ते करणे ; उबळणें in SM.  uis थोडक वर्षापुढे अयरलॅन्डांत भारत देशाच एक स्त्रीला स्वंत जीवन रक्षा करींगाला गर्वार राह्ते कराच आवश्य होत॑ तरीन तिकडल॑ सरकार गर्भ उंबळणे धर्म-विरुद्ध आहे म्हणून सांगून अनुमती देल॑ नाही अणी तजमळे शेवटी त्यंच जीवन बलि देमते अवस्थांत जाऊन पावल॑.   





ऊ the sixth vowel and the sixth  letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच सहावां स्वर॑.

ऊठ imp  stand up. उठून ओठाक/होठाक. uis ऊठ म्हणून तला भरूनदपा सांगिलों तरीन बसलते ठामांत बसूनच आहे तो.

ऊठ imp  wake up. झोंपींतून जागे हो. uis पाष्टे सहा घंटेला या म्हणून तेनी तुम्हाला सांगिट्ले तरीन अण्खीन तेनी उठले नाहीत॑, दोन घंटे थांबून यांत, उठलसतील॑.

ऊत n  boil and overflow. पात्रांतून तावून बाहेर येणे. uis  दूध तावताना उतून बाहेर येइनास्क असाला एक प्रत्येक विधाच पात्र दुकानांत मिळत॑.

ऊदी n  sacred ash. यज्ञकुंडांत जळून मिळाच भस्म. uis  यज्ञकुंडांत जळलते वस्तूला अम्ही ऊदी म्हणतों अणी तज महत्व वेगळच॑ अस्ते.

ऊन n  Sun's heat. Sun's warmth. सूर्याच उष्ण. uis  हिंवाळाच(हिमाळाच) दिवसी ऊनांत होठाकाला बेष असेल॑.

ऊन n  heat. ऊन. uis  निवलते चायकी कोफीकी पुन्हाईं ऊन करलतर॑ ते पीयाला मला अवडना.

ऊब n  sultriness. उबारा. उष्ण. uis  हे वर्ष अग्नि-नक्षत्राच दिवसी मी चेन्नैंत॑ जाऊन सांपडींगटलों. तिकडल॑ भयंकर ऊबांत॑ तरपडून गेलों.

ऊब n  steam. fumes. वाफ. uis चार दिवसापसून मला पडसा आहे, अण्खीन गेल॑नाही. डोस्केच व॑र एक कापड॑ घालून  तावून कढिवलते पाणीच ऊब स्वास धरून सोडलतर॑ बर॑ होऊया.

ऊर n  chest. breast. छाती. Note :- (1) woman's breast is थान or स्तन. (2) छाती means "chest/breast" as well as, a woman's breast. uis हेल्त-चेकप करताना ई-सी-जी काढणे म्हणजे मला थोडक प्रयास होइळ, कारण ऊर पूरा केंस असाकरतां ईसीजी यंत्राच "सेन्सर" कित्ती चेंपून ठिवलतरीन बरोर राह्यीना.

ऊर n  heart. हृदय. uis सौत-आफ्रिकाच डॉक्टर क्रिस्त्यन बरनार्ड, हेनीच भूलोकांत पह्यिल॑-पह्यिल॑ एक मनुषाच ऊर अण्खिएक मनुषाला ट्रान्सप्लान्ट ऑपरेषन करून वांचिवलते.

ऊर चेंपणे vi  to have heart congestion. to have an heart attack. ऊरचेंपा होणे. uis (1) म्हातारपणांत॑ काहीतरीं "ओपरेषन" झालत॑र तजमळे अम्च रंक्तांत "क्लोट" येऊन थोड महीना झाला नंतर तेच "क्लोट" ऊरचेंपाच कारण होऊया. (2) अम्च देशांत॑ चिकित्सा पद्धति बेष वाढलाहे तरीन ऊर चेंपून मरणारांच संख्या अत्ता फार जास्त झालाहे.

ऊरचेंपा n  heart attack. cardiac arrest. ऊर राहणे/धरणे. uis दहा दिवसापुढे एक मित्र ऊरचेंपा मळे मरूनगेले म्हणून ऐकून मला फार संकट वाटल॑.

ऊह n  conjecture. अनुमान॑. uis  मझ॑ मावशीच लोंक तज काम सोडूनटाकला म्हणून मी ऐकलों. विचारताना तो मला सांगटलते काय म्हणजे, तला विदेशाला डेप्युटेषनांत जायाला इष्ट नाही-ते-करतां काम सोडला म्हणून. ते खर॑ कारण म्हणून मला वाटत नाही. मला ते विसंबाला होत नाही. वेगळ॑ कायतरीन गडबड झालामुळे काम नाहीस्क बसलाहे, हे मझ॑ ऊह आहे.   

ऊं n  head lice. डोस्केच॑ केंसामद्ये असाच कीडा. पेन (Tamil)  ;  ऊ in sm. uis  साळेला जाणारी ल्हान पोरींच डोस्केंत॑ ऊं येइनास्क॑ पाह्यींगाला मध्य-मध्य त्यंच केंस डेटोळ घालून धुवाम॑.

ऊंट n  camel.  मरुभूमीच एक प्राणी. uis मरुभूमींत यात्रा कराला ऊंट सारख॑ योग्य प्राणी वेगळ॑ कोणतीन नाही म्हणून जुने काळांत अरबी देशांत हे प्राबल्यांत होत॑.

ऊंशी n  pillow. झोंपीजाताना डोस्के टेंकाला ठिवाच कापूस भरलते साधन॑. ; उशी in sm. uis डोस्केच खाले बरोरल॑ उंचाच ऊंशी ठिवून निजल॑ नाहीतर॑ गळासूळ येऊया.

ऊंस n  sugarcane. करुंबु (Tamil). साखरे तय्यार कराच गौताच/गवताच वर्गांतल॑ एक वनस्पति ; ऊस in sm.







ऋ the seventh vowel and the seventh  letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच सातवां स्वर॑.

ऋग्वेद n  Rigveda, the first of the four Vedas. चार वेदांतल॑ पह्यिलच॑ वेद. uis ऋग्वेद हिंदु धर्माच मात्र न्हो, मानव संस्काराचेच आद्य ग्रंथ आहे.

ऋग्वेदि adj  a sect that follows the doctrine of Rigveda. ऋग्वेद अनुसरण॑ कराच वर्ग. uis ऋग्वेद आचरण करणारालीं यजुरवेद आचरण करणारालीं उपाकर्माच दिवस वेगळ॑-वेगळ॑ असते.

ऋण n  debt. loan. रीण. कर्ज. उधार. Note :- रीन in sm.

ऋतु n  seasons. वातावरणांत॑ (हवामानांत॑) याच उन्हाळा, पाऊसाळा, हीम्हाळा असल॑ व्यत्यासपण॑ (संस्कृतांत॑ वसंत, ग्रीष्म, वर्ष, शरद, हेमंत, शिशीर अस॑ म्हणतात).

ऋषभ n  sign of Taurus in the Zodiac. एक राशीच नाव. वृषभ. uis  मनाच निम्मति, विश्वसनीय स्वभाव हे दोनीं ऋषभ राशीच लोकांच विशेष गुण आहे.

ऋषभ n  bull. बैल. वृषभ. uis  पुरावस्तु गवेषणांत॑ मोहन-ज-दारो, हरप्पा हे ठिकाणांतून मिळ्लते भरून मुद्रांत॑ ऋषभाच चिन्ह आहे. हेज अर्थ काय म्हणून अत्ता पणीं कोणालीं कळत नाही.

ऋषिपंचमि n  a religious rite performed by ladies during the fith day of the bright fortnight of Bhadrapada month. भाद्रपद महिनाच शुक्लपक्षांत॑ पंचमि दिवस कराच सप्तऋषींच पत्नींच पूजा.  uis  दीपावळि झाल॑-की-नाही, मागेच याच ऋषिपंचमि सण बायकांला एक उदंड महत्वाच सण आहे.

ऋषि n  Rishi. saint. मुनि. सन्यासि. uis  वसिष्ट, कौंडिन्य, मैत्रावरुणा हे ऋषींच नावांतल॑ तीन गोत्रहीं एकच प्रवराच आहे.





ए the ninth vowel and the ninth  letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच आठवां स्वर॑.

एक adj  one. पहिलच संख्या.

एक-एक adv  one-by-one. प्रति एक. एकेक. एक झाला नंतर अण्खीन एक. uis  पाणीच तान वाटलते कावळाच खाणींत॑ ते कावळा एक-एक धोंडा मडकेंतल॑ पाणीच आंत घालून, पाणी वर आणिवल॑. 

एक-एक दपा adv  once in a while. एक-एकदा. केम्हा तरीन एकदा. uis फार श्रद्धांत॑ एक काम कराम॑ म्हणूम अम्ही म्हणींगटलतरीन एक-एक दपा ते चुकून जात॑.

एकचनिघा n  focus on only one thing. concentration. one track mind. एकाचवर निघा ठिवणे. uis एकचनिघा ठिंगून वाचलतर कोण्त्येक विषयांत पणीं अम्ही पंडित होऊया. कारण अम्च बुद्धीच पूरा शक्ति तजवर सोडाला होईल.

एकट adj  alone. दूसर॑/वेगळ॑ कोण्तीन नाहीस्क॑ असाच स्थिति ; एकटा in sm. uis अट्लांटिक महासमुद्र विमानांत॑ एकट वलांडलते पहिलेच मनुष चार्ल्स लिन्डबर्ग होते.

एकट adj  solitary. single. दूसर॑/वेगळ॑ कोण्तीन नाहीस्क॑ असाच स्थिति. uis मैसूराच जवळ असाच नागरहोळे र्राणावाटि मी रात्रि बंडि पळींगून जात होत तम्हा वाटेच बाजु एक हत्ति एकट होटाकलोतते पाहलों.

एकटा pron  a single person. एकला.

एकदम adv  all at once. दिडीरशी (tamil). uis दिड-दिडशी मला कायतरीन प्रश्न विचारलतर॑ एकदम मला उत्तर द्याला होयना.

एकदंत n  Lord Ganesha. गणपति. uis गणपति त्यंच एक दंत मोडून तजांतून व्यासऋषीच महाभारत लिव्हले म्हणून हिंदु पुराणांत॑ आहे. हेजनंतर॑ एकच दंत उरल॑ते-करतां गणपतीला एकदंत म्हणून नाव आल॑.

एकदा u  once. one time. एकदपा. एकदफा. एकवेळ. uis (1) एकदा अम्हि बद्रीनाथाला गेलतम्हा भूकंपामुळे डोंगूराच वर जायाच वाटेला फार नाश होऊन अम्च बंडि एक रात्रि पूरा तिकडच राहूनगेल॑. (2) वय होतां-होतां जेवण॑ उणे करण॑ सहजच॑. पाष्टे एकदा जेवलतर॑-पणीं आंगाला पुरे होईल॑.   

एकदाणें n  a necklace with one prominent gold bead in the middle of other different beads. दुसर॑ विधाच पोतीच मध्य एकच सोनेच पोति ओवलते माळ॑.   

एक-दोन fig  very few (in numbers). उदंड उणे संख्याच. uis (1) गेल महिना पूरा फार ऊब होत॑. आज कायकी एक-दोन बूंदाच शिंतोडे पडले. (2) अम्च खेडेगामाच साळेंत॑ बरोर शिकिवनात॑ म्हणून अग्गिदनालीं कळले. हे वर्षाच एस.एस.एल.सी परीक्षांत॑ कायकी एक-दोन लेंकरे जिंतलतर तेच जास्ति म्हणूया.

एकर n  acre. जमीनाच विस्तार सांगाच एक माप. uis चार-पांच वर्षांत॑ जमीनाच मोल उदंड वाढलाहे. एकराला दहा हदार रुपे होतते जमीन अस्कीन अत्ता दहा लाखाला पणीं ध्याला लोक तय्यार आहेत॑.

एकला pron  a person. एकटा. एक मनुष. एक पोर. uis गेलंदपा पाकिस्थानांत॑ पेषावरांत॑ झालते विस्फोट एकच एकलाच काम होत॑ म्हणून नंतर केलते अन्वेषणांत कळ्ल॑.

एकली pron  a woman or girl. एक बायको/एक पोरी/पोरे. uis जातकाच प्रश्नामुळे, ते पोराच वराड उदंड दिवसा-पसून झाल॑ नाही. शेवटी, एकच एकलीच जातक तज जातकाच बरोर मिळून अल॑ अस॑ मी ऐकलों.

एकवचन॑ gram  singular. (व्याकरणांत॑) एकच असाच स्थिति. uis दक्षिणी-मराठींत॑ एकवचन॑ अणी बहुवचन॑ अस॑ दोन विधाच वचन॑ आहे.

एकवेळ adv  one time. once. एकदा. एकदपा. एकच वेळ. uis  अत्ता अस्कीन मी एकवेळच जेवतों.

एकवेळ n  a probability. maybe. एकवेळ. uis हे वर्ष दीपावळीला मझ॑ लोंकीं सूनीं अमेरिकांतून कंडिप-होऊन येतील म्हणून मला सांगाला होयना. एकवेळ आलतरीन येतील॑. Note:- this expression appears to be a translitteration of the Tamil usage ओरु वेळे.

एकसरा adj  at one go. at one stretch. एकस्र॑. एकच वेळी.

एकसारख॑ adj  identical in all respects. एकस्क॑. एकसार्ख. अस्कि प्रकारीं तुल्य असाच॑. uis विषय कळनाते लोकांस॑ वज्रयीन अमेरिकन डयमंडयीन प्हायाला एकसारख॑ असेल॑, थोड पणीं व्यत्यास दिसना. 

एकसारख॑ adv  in a uniform manner without variation. एकस्क॑. एकसार्ख. व्यत्यास काहीं नाहीस्क॑. समान ;  एकसारखा in sm. uis एक वारा पसून डोंगूर प्रदेशांत चोखोट पाऊस झाल होत-ते-मळे यंदा कुत्तालमांत॑ पाणी एकसार्ख पडाच अम्हि पाह्यलों.

एकसार्ख adj  identical in all respects. एकस्क॑. एकसारख॑. अस्कि प्रकारीं तुल्य असाच॑.

एकसार्ख adv  in a uniform manner without variation. एकस्क॑. एकसारख॑. व्यत्यास काहीं नाहीस्क॑. समान. 

एक सोडून एक adv  one after the other. एकाच नंतर॑ एक. 

एक सोडून एक adv  alternately. पहिलच॑, नंतर॑ दुसरच॑ परतून परतून आवृत्ति होत असणे. uis हिंदू देऊळाच भोंताल॑-भिंतांत॑ काषाय अणी पंढ्र॑ रंगाच पट्टी एक सोडून एक ओढलसाच पाव्हूया.

एकस्क॑ adj  identical. एकसार्ख. एकसारख॑.

एकस्र॑ adj  at one go. at one stretch. एकसरा. एकच वेळी.

एकादशि n  eleventh day after full or new moon. पौर्णमि अणी अमावस्या झाल॑ नंतरल॑ अक्रावां दिवस.

एकादशि करणे adv  to observe  a day of fasting on ekadasi day. एकादशि दिवस उपवास करणे. uis अम्ही एकदपा पणीं चुकनास्क॑ एकादशि करणे आहे. ते मुळे मनाला शांत मात्र न्हो, आंगाल पणीं चोखोट वाटते.

एकादशि ब्राह्मण॑ fig  a term of ridicule or otherwise to indicate a niggardly brahman. एक कंजूस ब्राह्मणाला मष्किरींतून सांगाच गोष्ट. uis मझ॑ चुलतभाऊला उदार मन्न॑ थोड पणीं नाही. अम्च सोयरीकां मध्ये तला एक एकादशि ब्रह्ममण॑ म्हणून सांगणे आहे.

एकादा adv  sometimes. कित्येकदा. 

एकापक्षा-एक adv  one over another (viewpoint, attributes etc). एकापक्षा-एक. uis गेल वार॑ अम्च सभेंत यात्राला जायाच विषयावर चर्चा झाल॑. एकेकदनीं त्यंच-त्यंच अभिप्राय सांगाच ऐकलतर॑ एकापक्षा-एक विचित्र होत॑ अस॑ मला वाटल॑. शेवटी ते सभेंत काहींनच निर्णय कराला झाल नाही.

एकालेक adv  mutually one upon another (entangled). तेपटीस-हेपटीस (सांपडींगटलते). uis ते दोघीन चोखोट उद्योग सोडून त्यंचच बिसिनस आरंभ केले. ते बरोर चालत नाही वाटत॑. अत्ता एकालेक सांपडींगून अवस्था भोगत आहेत॑.

एकांत n  solitude. कोणाचीं संबंध नसाच ठिकाण/स्थिति.

एकी n  urine. मूत. uis  एकीच वास येईनास्क असाला परसाकडेच खोलि बेष फिनैल घालून धुवाम॑. Note:- derived from No. 1 or  एक, a slang for urination, similar to No. 2, for defacating.

एकी adv  urination. मुतणे. uis आठ वर्षाच वय झालतरीन तो अत्ता पणीं अंथरूणांत॑ रात्रीच वेळ एकी करतो.

एकेक n  one by one. एक झालानंतर॑ अण्खीन एक. एका मागे एक. एक-एक. uis (1) तळून काढताना तीन-चार कच्चा पापड एकदम तावलते तेलांत घालाचपक्षा एकेक होऊन घाटलतर॑ ते करपनास्क॑ पाहींगुया. (2) पाणीच तान वाटलते कावळाच खाणींत॑ ते कावळा एक-एक धोंडा मडकेंतल॑ पाणीच आंत घालून, पाणी वर आणिवल॑.

एकेच-एक adj  only one. एक मात्र. uis पिका करतां घासांत॑ गुंडाळून ठिवलते दहा अंबांत॑ नौ अंबा कुजून हाळ झाल॑. एकच-एक मात्र बरोर पिकून मिळ्ल॑.

एडवट॑ n  half or partially done in an imperfect manner. अर्ध केलते पणीं बरोर करनास्क॑ सोडलते. अर्धवट॑. अर्धगच्छ. अर्धम-पर्द (kannada). पूर्त झाल नाहीते. uis तिरुपतींत॑ नवसून केंस क्षवर॑ कराला हजामाच समोर बसल तर॑, तो एडवट॑ काम करून जायनास्क पाह्यींगाम॑. कारण, अम्हाला तसेच बसिवूनटाकून तो एक नव ग्राकीला हुडुकींगून गेल तर॑, तो परतून या पर्यंतीन तिकडच बसामते पडेल॑.

एथे adv  here. this side. in this place. हे ठिकाणि. इकडे. यथे. इथे.  uis अम्च घरच प्रश्न फार अवघड स्थितींत॑ जाऊन पावलाहे. ते बरोर कराला म्हणून तू एथे आलास म्हणजे पणीं प्रयोजन काहीं होईना.

एथे-तथे adv hither and thither. इकडे-तिकडे. यथे-तथे. इथे-तथे. uis मझ॑ जेबांत ठींगटल होतते वज्राच तोडाच फिरकी कसकी खाले पडल॑. एथे-तथे हुडुकून पणीं ते मिळ्ल॑ नाही.

एथेले adj  relating to this side. हे पटीसच॑. इकडच॑. यथेल॑. इथेल॑. हे बाजूच॑. uis आजू-बाजू घरांत॑ एकच  कामवाले असताने. कां म्हणजे, अम्च एथेले एक-एक विशेषीं बाजु घराला तेनी कंडिप कळिवतील॑.

एथेले-तथेले adj  of various places. इकडच॑-तिकडच॑. यथेले-तथेले. इथेले-तथेल॑.

एथून adv  from here. इकडून. यथून. इथून. एथसून. यथसून. इथसून. uis एथून चेन्नै सुमार दोनशे मैल दूर आहे.

एणि n  ladder. शीडि. uis अत्ता अस्कीन घराच आंत वापराला अलुमिनियमाच एणि मिळते. Note :- from Tamil.

एमात्तम n  deception. cheating. वंचना. मोस॑. Note :-from Tamil.

एमारिवणे vt  to deceive. वंचना करणे. मोस करणे ; फसविणे in sm. uis घरांत॑ येऊन जुने पेपर घेणार लोकांकड॑ वागताना अम्ही दत्तन/जत्तन असाम॑. कां म्हणजे, तूक्कम करताना एमारिवाला पाह्तील॑. Note :-from Tamil.

एरि n  lake. सरोवर. तडाग. पाणीच कुंड. Note :-from Tamil.

एरंडेल n  castor oil. एक प्रकारच॑ तेल. uis पोट शुद्ध करिवाला मद्य-मद्य एरंडेलाच तेल पीणे आहे.

एर्पाड n  arrangement. व्यवस्था. uis तमिल-नाडाच मुख्य मंत्रि जयलळिताच दत्त लोंकाच वराडाच एर्पाड ब्रह्मांड होते म्हणून थोर आरोप झाल॑. Note :-from Tamil.

एलम n  auction. लोकांमद्ये पोटि करिवून कोण जास्ति मोल देतातकी त्यांस॑ विकाच एक व्यवस्था ; लेलाम in sm. uis गेल वर्ष चाललते आइ.पी.एलाच एलमांत॑ एक दोन खेळणारांस॑ उदंड जास्ति रोक्कमांत॑ कित्येक फ्रांचैसी लोक॑ घेटलेतरीन, त्यंच खेळ उदंड मामूली होत॑. Note :-from Tamil.

एळक्कारम n  disdain. उण॑ अभिप्राय. उणीवता. Note :-from Tamil.

एव n  income. आदाय. वरुमानम (Tamil). uis मझ॑ बापाला ते काळांत अधीक एव न्होत॑. तजांतच अम्हाला (अम्ही सहा लेंकरे) वाचीवून व॑र आणीवले. तेनाला किती कष्ट असलासाम॑ म्हणून मला अत्ता अर्थ होत आहे.

एवढूस्क॑ adv  a little. उदंड थोडक॑. नंखर॑. यवढूस्क॑ ; एवढासा in sm. uis खीर फार बेष आहेतरीन मला एवढूस्क॑ वाढलर पुरे.

एवढ॑ adj  this much, so much  (implying magnitude or quantity). येवढ॑. यवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑ ;  एवढा in sm. uis (1) तला पैसाच कष्ट आहे म्हणून उदंड दिवसा पसून मला कळ्ल॑ होत तरीन एवढ॑ कष्ट होत म्हणून म्हणींगटळोंच नाही.(2) सद्याला मझकड॑ पैसा एवढ॑च आहे. अण्खीन जास्ति पह्जतर॑ नंतर॑ पाठिवून देतों.

एवढ॑ adj  this much , so much etc. (implying multitude or number). येवढ॑. यवढ॑. केवढ॑ आहेकि तेवढ॑ ;  एवढा in sm. uis  आजच कार्यक्रमाला अम्ही दोनशे दन येतील म्हणून तज जोक्त पल्हाराच व्यवस्था केलोतों. पण, योचना केलत्यापक्षा पन्नास जण अधीक आलेतेकरतां सद्याला आलते एवढ॑ लोकांस॑ पल्हार वाढलांपिरी आवश्या प्रकार केवढ पह्जकी तेवढ॑ पल्हाराच व्यवस्थाला पुन्हाहीं सांगून पाठिवलों.

एवढ॑-तेवढ॑ adj  approximately. roughly. जवळ-जवळ.  यवढ॑-तेवढ॑. uis तुला ते पूरा कळनातरीन, तज विषयीं एवढ॑-तेवढ॑ तरीन कळ्लासलतर॑ अम्च काम कसतरीन चालिवूया म्हणून मला वाटत॑. 

एवढूस्क॑ collo very little. उदंड थोडक॑. उदंड नंखर॑. इतकूस्क॑. uis खीर फार बेष आहेतरीन मला एवढूस्क॑ वाढलर पुरे.





ऐ the tenth vowel and the tenth  letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच नौवां स्वर॑.

ऐकणे n  hearing. श्रवण. कानांत॑ शब्द पडणे. uis येतां-येतां मला कानाच ऐकणे उण॑ होत येत आहे.

ऐकणे vt  to hear. श्रवण करणे. uis दिवसोडि पाष्टे सात घंटेला मी रेडियोंत भक्ति गाणे ऐकणे आहे.

ऐकणे vt  to follow instructions. निर्देशाच प्रकार करणे. uis (1) थोरळे सांगाच ऐकणे म्हणाच चोक्कोट गुण॑ तला ल्हानपणांत पसून आहे. (2) तसलते वंगळ॑ काम कर नोको म्हणून तला भरूनदपा सांगट्लों तरीन ऐकना म्हणतो, मी काय करू ?

ऐकमत्य n  unanimity. अग्गिदनीं (अस्किदनीं) एक होऊन/मिळींग्यून असणे. uis दहावां शतकांत विदेशांतून आलते मुसलमानांच सैन्यांलकी, नाही तसच॑ सत्रावां शतकांत आलते ब्रिटनाच ईस्ट-इंद्या कंपनीलकी अम्च॑ देशाला सुलुभांत आक्रमण करून स्वाधीन कराला झालत्याला एक मुख्य कारण अम्च॑ इकडल॑ वेगळ॑ वेगळ॑ राजांच मघ्ये ऐक्यमत्य होत नाही म्हणाचेच॑.

ऐक्य n  unity. एक होऊन/मिळींग्यून असणे. uis अम्च मद्य ऐक्य असल तर॑ धैर्यान कोण्त प्रश्नीं सांभाळाला होईल॑.

ऐरावत॑ n  celestial elephant of Indra. इंद्राच हत्ति. uis क्षीरसमुद्र मंथन करताना मिळ्लते पंढ्र रंगाच ऐरावताला चार दंत आहे म्हणून हिंदू धर्म-इतिहास सांगते. 

ऐश्वर्य n  prosperity. fortune. richness. वैभव. uis लक्षमीदेवीच अनुग्रह कोठ-कोठ अस्त॑ की तेथ अग्गीन ऐश्वर्य असेल॑.

ऐस imp  wait. थांब. राह. राख. Note:- the verb (intransitive) form being असणे. uis मी या पर्यंतीन अण्खीन थोड वेळ तिकडेच ऐस. 

ऐंशी adj  eighty. दहा गुणा आठ. uis ऐंशी वर्षाच वय॑ झालत्यांस अग्गीन आयकर (इनकम-टॅक्स) विभागांतून कित्येक सौजन्य मिळल॑.






ओ the eleventh vowel and the eleventh  letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच दहावां स्वर॑.

ओखद n  medicine. औषध. uis आंगाला बर नाहीत असतम्हा अम्ही स्वता ओखद घ्यापक्षा डॉक्टराचकड॑ जावून ओखद घेणेच चोखोट.

ओखदवाणी n  medical shop. ओखदाच दुकान. औषधवाणी. वैद्यवाणी. Note:- ओखद (medicine) + वाणी (merchant). uis एवढ॑ दिवस अमच॑ खेडेंत॑ आयूर्वेद ओखद विकाच एक ओखदवाणी मात्र होत॑. अता अलोपती औषद विकाच एक दुकान नव॑ होऊन उघडल॑ आहे.

ओगाळणे vt  to remove the spell from an evil-eye afflicted person. ओवाळणे. दृष्टि काढणे. uis दुसर॑ लोकांच दृष्टि लागताने म्हणून ल्हान लेंकरांला मद्य-मद्य ओगाळणे आहे. 

ओघळणे vt  to grind-off / chip-off / scrape off small quantities. (एक वस्तूंतून) घासून अथवा थोड-थोड चूर करून वेगळ॑ करणे. uis जायफळ/जाकाय आयुर्वेद औषदांत उपयोग करतात. ते ओघाळून थोड दुधांत मिळिवून पीलतर॑ आंगांतल॑ दुखणे उणे होईल॑. तजांत॑ "'स्टीरोयड" काहींतरीन असुयाकी म्हणून मला संदेह आहे.

ओटे n  a hole. द्वार. डोबूर.  uis अम्च घर बांधाला पांयाच काम होत असताना तिकड॑ एक सरपाच पुत्तु होत॑. नंतर॑ तजांतल॑ सरप कोठकी एक ओटेंत घूसून गेल॑. Note :- from Tamil.

ओठाकणे vt  to stand up. होठाकणे. बसलते, नाहीतर निजलते स्थितींतून उठणे. Note:- 1. The word appears to be from ऊठ and टाकणे and होठाकणे a phonetic variation of it. 2. होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे. uis पंतोजी क्ळासाला वेघताना सगळ॑ विद्यार्थीनीं उठून ओठाकणे आणी नमस्कार करणे आहे.

ओठाकणे vt  to halt. होठाकणे. थांबणे. राखणे. Note:- होठाकणे is the hyper emphasized form of the correct ओठाकणे. uis एवढ॑ दिवस अम्च गामांत॑ एक्सप्रस ट्रैन कोण्तीन ओठाकतहोत नाही. हे महिना पसून चेन्नै-दादर एक्सप्रेस होठाकाला आरंभ झालाहे.

ओठाकिवणे vt  to make a person or thing stand or get up. होठाकिवणे. बसलते, नाहीतर, निजलते स्थितींतून उठिवणे. Note:- होठाकिवणे is the hyper emphasized form of the correct ओठाकिवणे. 

ओडु॑  n tile. कवल. खापर. छप्पर घालाच एक साधन॑. uis  (1) जुने काळास्क॑ अत्ताअग्गीन छप्पराच व॑र ओडु॑ घालणे नाही. तज बद्दिल ओडाच आकारांतच तगिडांत॑ केलते साधन घालतात॑. (2) हे काळांत॑ पोणावांटा घराला कोण्क्रीटाच छप्पर घालतात तरीन, समुद्राच कांठशीच प्रदेशांतीं जास्ति पाऊसाच प्रदेशांतीं अत्तापणीं ओडाच छप्पर घालतात॑. Note :-from Tamil.

ओड्याण॑ n  ornamental waist belt for ladies made of gold. बायके मादाचवर बांधाच एक सोनेच आभरण॑. पट्टा. uis  (1) जुने काळांत॑ ओड्याण घालणे बायकांला अलंकाराच विषय होते. (2) जुने काळाच फोटोंत विना अत्ता वेगळ॑ कोठीन बायका ओड्याण घालींगून असाच पाह्याला होईना. Note :- from Tamil. 

ओढणे vt  to pull. to drag. होढणे. बळ उपयोग करून स्वताकडे सरकिवणे. Note:- होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे. uis कोलकतांत॑ अत्तापणीं मनुष ओढींगून जायाच रिक्षा आहे. असलते लज्जाच विषय तिकडल॑ लोक॑ कस॑ सोसतात की !

ओढणे vt  to draw a picture or a line. होढणे. चित्र अथवा रेखा काढणे. Note:- होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे. uis शंभर वर्षापुढे राजा रवि वर्मा ओढलते चित्र अत्तापणीं प्रसिद्ध आहे.

ओढणे vt  to smoke a cigarette or beedi. होढणे. सिगरेट नाहीतर बीडि पीणे/फुंकणे. Note:- होढणे is the hyper emphasized form of the correct ओढणे. uis सिगरेट ओढलतर॑ लंग्साला कॅनसर येईल म्हणून कळींगूनिं ते दंडक सोडाला तय्यार नाहीते कित्येकदन आहेत॑.

ओढा n  a thick pulling-rope used for lifting water from a well, canal etc. तोढा. आड, कालवा यांतून पाणी शेंदाला उपयोग कराच॑ चरांट. Note:-1. from ओढणे, to pull. 2. sometimes incorrectly तोढा. uis आडांतून पाणी शेंदाला बालदीला (बादलीला) बांधलते चरांटाच ओढा खजून खजून तुटाच स्थितीला आल-ते-करतां आज संध्याकाळीच पुढेच एक नव॑ चरांट घेयींगून येम म्हणून म्हणींगटलोंहें.

ओतणे vt to pour out a liquid from a vessel. एक द्रव्याला भांडींतूं खाले सोडणे. uis साराच नित्तळ भागीं तज मंडीनिं/राडीं वेगळ॑ वेगळ॑ कराम म्हणजे, ढवळनास्क॑ ओतून काढलतर॑ होईल॑.

ओतींगणे vt  to pour out a liquid from a vessel. एक द्रव्याला भांडींतूं खाले सोडणे. 

ओपणे vt  to accept. वोपणे. स्वीकार करणे. uis मी सांगाच तो ओपलाकी कायकी. तरीं, तजकडे अण्खीन एकदा बोलून पाह्तों.

ओपिवणे vt  to hand over (responsibility or charge). to entrust or commit (with responsibility). वोपिवणे. दुसरेंकडे (जवाबदारि) देणे ; ओपणे/वोपणे in sm. uis एवढे वर्ष तो "गळ्फांत॑" असताना तज तीन लेंकरांचीं वाचिवाच/शिकिवाच जवाबदारी मी काढींगटलोतों. याच महिना तो वापस आलांपिरी जवाबदारि तला ओपिवाला जातों.

ओपींगणे vt  to accept (responsibility) on oneself. वोपींगणे. (जवाबदारी) घेणे. uis तला कायतरीन तंटा/उपद्रव आलतर॑, तो अपाप तजांसूं चुकींगाम॑. तज जवाबदारी तू कसाला ओपींगतोस॑ ?

ओपींगणे vt  to agree. to accept. संम्मत करणे. वोपींगणे. uis ते चूक काम मीच केलों म्हणून ओपींगटलोंकी. कसाला उगे-उगे मला सळिवतोस॑ ?

ओप्पंदम n  agreement. एकालेक ओपिंगणे. एकालेक संम्मत करींगणे. uis पाकिस्थानाच सरकारीं ते राज्याच कित्येक आतंगवादीनिं (तालीबानिं) गूढांत॑ ओप्पंदम केलाहेत॑ म्हणून सांगतात. Note :- from Tamil.

ओमपुडी n  name of a fried snack containing ajwain (carom seeds). ओंवा/ओमा मिळिवून केलत॑ एक तळ्ळत॑ पदार्थ. uis सणाच संपाक म्हणजे मझ॑ अम्मा खोबरेच/नारळीच बर्फीहीं ओमपुडीहीं सोडनास्क॑ करतील॑.

ओमा n  the spice ajwain (carom seeds). ओंवा ; ओवा in sm. uis दुकानांत॑ मिळाच ओमपुडींत॑ थोडकपणीं ओमा घाटलासना.

ओरपणे vt  to slurp down liquidy food. to eat or drink with a slurping noise. to eat with finger licking noise. वरपणे. पत्तळ पदार्थ शब्द करून गिळणे. बोटावाटे (सावडून) शब्द करत जेवणे. uis ओरपून ओरपून जेवलतर॑ पाह्णारांस कंटाळा वाटल॑ म्हणून भरूनदपा सांगट्लतरीन तो ऐकना म्हणतो. 

ओरे घालणे vt  to set fruits aside covered with hay etc for ripening. फळ गवतांत॑ गुंडाळून पिकिवाला ठिवणे. Note :- from Tamil.

ओल॑ adj  wet. पाणींत॑ भिजलते. वाळनाते ; ओला in sm.  uis  पाऊसांत॑ भिजींगून तो डोस्के ओल॑ करींगून आलाहे.

ओल॑ adj freshly green. हिरव॑. uis ओले मिरशिंगा वाटून घाटलते पदार्थ खालतर॑ पोटाला होयनात्यांस॑ वाळक॑ मिरशिंगा घाटलते पदार्थ खाणे थोड बर वाटेल॑. 

ओले n  individual leaves in a coconut frond. नारळी झाडाच मट्टाच प्रत्येक-प्रत्येक पान. uis ओलेच बुट्टि करून विकून रोडावर संसार कराच दरिद्र लोकांकडे मोटर-कारांत येवून उतरणार कितिकी पैसावंत लोक बेरम कराच पाहलतर॑ अम्हाला मनांत॑ कष्ट वाटत॑. Note:- from Tamil.

ओळरण॑ vt  to talk nonsense or gibberish. अर्थ नाहीस्क॑ बोलणे. व्यर्थबोली करणे. uis तो बोलाच तलाच कळतकी नाहीकी. अर्थ नाहीस्क॑ कायकी ओळरेत आहे. Note :- from Tamil.

ओवणे vt to string together. मोती, फूल असल्यांत॑ असाच ल्हान द्वारांतूं दोरा काढणे. uis पारिजात फूलांतून दोरा ओवून काढणे सुलूभ असते.

ओवणे vt  to pass thread through a needle. सूईंच द्वारांतून दोरा काढणे. uis वय झालांपिरि डोळेच शक्ती उणे झालतेकरतां मला सूईंच द्वारावाटी दोरा ओवणे फार कष्ट झालाहे.

ओवणे vt  to stitch. शिवणे. uis तांदूळकी वेगळ॑ धान्यकी भरलते गोणिचीला दत्तन/जत्तन ठींगाम॑ म्हणजे दाभणांत॑ बेष ओवून ठिवाम॑.

ओवळ॑ n  items not considered ritually clean for religious purposes. सोवळेला येईनाते. सोवळ॑ नाहीते. ; ओवळा in sm. uis कित्येकदन॑ कर्पूर॑/कापूर ओवळ॑ म्हणून तज बद्दल वाताच दिवांतून देवाच आरती करणे आहे.

ओवाळणी n  cash gift given to ladies who perform the act of removing the spell cast by evil eye. ओवाळून दृष्टि काढाच बायकांस द्याच पैसा.

ओवाळणे vt  to remove the spell from an evil-eye afflicted person. दृष्टि काढणे. ओगाळणे. uis दुसर॑ लोकांच दृष्टि लागताने म्हणून ल्हान लेंकरांला मद्य-मद्य ओवाळणे आहे.

ओवाळणे vt  arathi done by two ladies for bestowing blessings to people (not to gods) with haldi-kumkum-akshata mixed with water in a brass/silver plate but without a lamp/camphor. हळदी-कुंकू अक्षताच पाणीच ताटांत॑ (विना दिवा) लोकांला आशीर्वाद कराच एक विधाच ओवाळणे.

ओस adj  desolate (place). वोस. विजन॑ (स्थल॑). जन संपर्क नाहीते (ठिकाण). (काईं नाहीते) ठिकाण ; ओस/ओसाड in sm. uis सिटीच / पट्णाच बाहार असणे/राहणे एक विधांत आंगाला चोखोटच, कारण, तिकडल॑ वार॑-पाणी बेष अस्त. पण, रात्रीच वेळ उदंड ओस अस्त. तजमळे चोरटेंच भें आहे.

ओस बडिवलते ग्रामांत॑ गाढवेच सवाषणी say  a saying which implies "only a worthless person will try to shine or strut around in a meaningless and pointless situation". "व्यर्थ परिस्थितींत॑ एकालीन प्रयोजन नाहीते मनुष षाणपण॑ दाखिवाला प्रयत्न करेल॑", हे अर्थाच एक म्हण. Note :- the nearest translation of the saying is "lady-donkey struts around in a desolate village".

ओसाडे n  misty or very thin drizzle. a spray. बरीक शिंतोडे. वसाडे. uis अम्च घरच॑ खिडकीच वरल॑ छज्जाला रुंद उणे असामुळे थोड ओसाडे बडीवलतरीन आंत ओल॑ होत॑. खिडकी समच झांकांमत॑ पडत॑.

ओहळ॑ n  oozing. trickling. हळ्ळु गळणे.

ओहळणे vi  to ooze. निथळणे. हळू गळणे. uis उदंड ल्हान लेंकरांच तोडांतून लाळ ओहळून त्यंच अंगी ओल॑ होयनास्क॑ असाला त्यंच गळांत॑ एक रुमाल/"बिब" बांदणे आहे.

ओंकणे vi  to vomit. वांति होणे. uis बसांन्तकी मोटर-कारांन्तकी डोंगूर प्रदेशांत॑ प्रयाण केलतर॑ मला ओंकणे येईल म्हणून सदा ओंकाराच मात्रे हाती ठींगून असेन॑.

ओंकणे vt  to vomit. वांति करणे. uis होटलांत॑ कायकी खालत्यामुळे मी आज चारदपा ओंकणे केलों.

ओंकार n  the primordial sound in Hinduism "Om". हिंदु धर्माच आदिशब्द ("ओं").

ओंकारा n  retching. vomoting.  the feeling of nausea. वांति वाटणे ; ओकारी/ओकारा in sm. uis ओंकारा येनास्क॑ असाला घ्याच मात्रे गिळूनपणीं मला कित्येकदपा वांत॑ येईल॑.

ओंगळ॑ adj  bad. disgusting. loathsome. कंटाळा वाटाच॑. वोंगळ॑. वंगळ॑ ; ओंगळ/वंगळ in sm. uis हे काळाच कित्येक टीवी कार्यक्रम॑ पाह्याला फार ओंगळ॑ अस्त॑.

ओंटा n  a roofed platform on either side of the main threshold of a house. तिण्णै (Tamil). उंबराच बाहेरच दोन पठीसीं बसाला बांधलते ठिकाण ; ओटा in sm. uis (1) वर्षा-वर्षी मझ॑ आजा उगादि दिवसी घरच ओंटांत॑ गुढी बांधतील॑. (2) अम्च आजाच घरांत दूध धारकाढून द्याच दूधवाला तज गायीलीं वांसरूंलीं ओंटाच खांबांत॑ बांधत होता.

ओंटी n  the cavity formed by holding the end (padar)of a sari with two hands in order to receive ceremonial gifts. वानदान (वायनदान) घ्याला लुगड॑च पदर पसरून धराच॑ ; ओंटी/ओटी/ओटा in sm.

ओंटी n  lower portion of the abdomen. पोटाच खालेच भाग ; ओंटी/ओटी/ओटा in sm.

ओंटी n  rice/cereals, coconut, saree with blouse piece, turmeric, flowers, cash etc. used in the rite of ओंटीभरणे. ओंटी भराला उपयोग कराच धान्य/तांदूळ, नारळ॑, लुगड॑-चोळी, हळदी/हळेद, फूले अण्खी पैसा ; ओंटी/ओटी/ओटा in sm.

ओंटीभरणे n  the ritual of filling up the lap of a  pregnant lady with rice/cereals, coconut, sari with blouse piece, turmeric, flowers, cash etc.to ensure happy delivery. एक गर्भिणीच/गरवारीणाच ओंटींत॑ धान्य/तांदूळ, नारळ॑, लुगड॑-चोळि, हळदी/हळेद, फूले अण्खी पैसा घालून आशिर्वाद कराच एक विध॑.

ओंठ n  lip. ओंठ ; ओठ in sm. uis (1)येतां-येतां आजीलोक पणीं ओंठींत॑ लिप-स्टिक लावींगून हिंडतात॑ ! (2) अत्तच नव फॅषन काय म्हणजे पोरी ओंठावर एक ल्हान सोनेच फिरकी घालिंगणे. आंगात कोठ॑-कोठ॑ डोबूर करूयाकी तथे अस्कीन अस॑ घालिंगाला आरंभ झालाहे.

ओंडा n  a small thick wooden log. कोंडा. लांकडाच एक चूर ; कोंडका/ओंडा in sm.

ओंवा n  the spice ajwain (carom seeds). ओमा ; ओवा in sm.





औ the twelfth vowel and the twelfth  letter in the DM alphabet. दक्षिणी मराठीच अक्रावां स्वर॑.

औचित्य n propriety. उचित असणे.

औदार्य n  generosity. उदारपण॑. uis मझ॑ पणाजा फार औदार्य स्वभावाच होते म्हणून त्यांस॑ ट्रावनकूराच महाराजा "उदार-शिरोमणि" म्हणून एक पदवि देवून बहुमान केले.

औद्योगिक adj  official. उद्योगाला संबंध झालते.

औपचारिक adj  formal. उपचारपणाच वगणे.

औषध n  medicine. ओखद. uis त्यांस॑ उदंड वर्षापसून डयबीटिस आहेतरीन, वेळावारी औषद घ्याकरतां अत्ता पतोरी काहीं तापत्र्य झालनाही.

औषधवाणी n  medical shop. औषधाच दुकान. ओखदवाणी. वैद्यवाणी. Note:- औषध (medicine) + वाणी (merchant) uis लेंकरू चार दिवसापसून जेरांत निजून पडलाहे. दुसर॑ कोण्तीन औषधवाणी कडून वेगळ॑ ओखद आणल॑ तर॑ काय ?



अ॑

अ॑ the first  swaradi in the DM alphabet represented by the symbol ॑. दक्षिणी मराठीच पहिलच स्वरादि. हेज चिन्ह आहे ॑.


अं

अं the second  swaradi in the DM alphabet represented by the symbol ं. दक्षिणी मराठीच दुसर॑ स्वरादि. हेज चिन्ह आहे ं.


अः

अ: the third swaradi in the DM alphabet represented by the symbol ः. दक्षिणी मराठीच तिसर॑ स्वरादि. हेज चिन्ह आहे ः

No comments: